[अंतरराष्ट्रीय]
१- लंडन; ब्रिटीश स्तंभलेखकाने सॅमीची मागितली माफी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- काळा पैसा लपविल्यास महागात पडेल: जेटली
३- 'समझोता'संबंधी तपासासाठी NIA पथक अमेरिकेला
४- देशातील विद्यापीठांचं रँकिंग जाहीर
५- पीलभीत बनावट चकमक, ४७ पोलिसांना जन्मठेप
६- रिझर्व्ह बँकेकडून कर्जदरात कपातीची शक्यता
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- मुख्यमंत्रीपद गेलं तरी बेहत्तर, 'भारत माता की जय' म्हणणारच : फडणवीस
८- महाराष्ट्र तापला, अकोल्यात देशातील सर्वाधिक तापमान
९- कोल्हापूर; आता अंबाबाई मंदिराच्या गाभारा प्रवेशासाठी महिला आक्रमक
१०- मुंबई; इंग्लंडवर बेट लावणाऱ्या पंटर्सनी गमावले 2000 कोटी रुपये
११- वाराणसी; ..तर गरिबांना मोफत अन्नधान्य- पासवान
१२- लखनौ; बूट पुसणारे आज राज्यकर्ते- भाजप नेता
१३- कोलकाता; प. बंगालमध्ये 63, आसाममध्ये 45 टक्के मतदान
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- रायपुर; 'इस्पात'च्या संचालकांना 4 वर्षांचा तुरुंगवास
१५- निल्लोड; अंधार हटवून केले प्रकाशमय जीवन
१६- तृप्ती देसाई यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल
१७- नाशिक सटाणा येथे तरुणाने पत्नी व मुलीचा गाळा दाबून हत्या केली, त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली.
१८- छत्तीसगडच्या कंकेरमध्ये झालेल्या स्फोटात १ पोलिस व १ नागरिक जखमी
१९- छत्तीसगडच्या कंकेरमध्ये झालेल्या स्फोटात १ पोलिस व १ नागरिक जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- कोलकाता; मी बॅटने उत्तर देतो, माईकवर नाही, सॅम्युअल्सच वॉर्नला सडेतोड उत्तर
२१- माझ्यातच काहीतरी कमतरता असेल... : शिखर धवन
२२- शाहिद कपूरच्या घरी लवकरच 'कुणीतरी येणार गं' ?
२३- माझं नाव सोहेलशी का जोडलं हे मला माहितेय : हुमा कुरेशी
२४- आयसीसीच्या जागतिक टी-२० संघाच्या कर्णधारपदी विराट कोहली
२५- 'शॉर्ट ऑफ ब्रेन'बद्दल मार्क निकोलसने सॅमीची माफी मागितली
२६- बीसीसीआयनेच आमची काळजी घेतली: ब्राव्हो
२७- प्लीज कोहली, माझ्यासाठी अनुष्काला सोड - कंदील बलोच
२८- बेन स्टोक्स उद्ध्वस्त झालाय: मॉर्गन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा
(मंजुश्री बिरादार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
=============================================

‘माझ्यातच काहीतरी कमतरता असेल. जसा परफॉर्मन्स द्यायचा होता, तसा देऊ शकलो नाही. मात्र आता चुकांना बलस्थानांमध्ये बदलून आणखी चांगला खेळाडू होण्याचा प्रयत्न करेन’ असं ट्वीट शिखर धवनने केलं होतं. विंडीजकडून झालेल्या टीम इंडियाच्या पराभवानंतर दोन एप्रिलला शिखरने हे ट्वीट केलं.

मीरा राजपूतने 2 एप्रिलला पती शाहिदसोबत लॅक्मे फॅशन वीकला हजेरी लावली होती. यावेळी सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने डिझाईन केलेला अटायर तिने परिधान केला होता. तेव्हा मीराचे ‘बेबी बम्प’ दिसल्याचे संकेत मिळत आहेत.
फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने 4 एप्रिलला इन्स्टाग्रामवर दोघींचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये #Repost @mira.kapoor with @repostapp. ・・・ Two M’s and a Bum #sayheytobey – little M (दोन एम आणि एक बम, लिटल ‘एम’ला हेल्लो करा) असं मसाबाने फोटोखाली लिहिलं आहे.
यातील मेख अशी की मसाबा आणि मीरा दोघींचंही नाव ‘एम’वरुन सुरु होत असल्यामुळे नक्की कोणाचं बेबी बम हे स्पष्ट होत नाही.
शाहिद आणि मीरा गेल्या वर्षी जुलै महिन्यात विवाहबंधनात अडकले होते.

‘ट्विटर हा माझ्या आयुष्यातील घडमोडी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा मार्ग आहे. त्यामुळे माझ्यासोबत जे काही चांगलं-वाईट घडेल त्याबाबत मीच तुम्हाला ट्वीट करुन माहिती देईन.’ असं हुमाने ठणकावून सांगितलं. ‘सवंग प्रसिद्धीसाठी काही प्रसारमाध्यमं माझ्याबाबत अफवा पसरवतात. याचं कारणही मला माहित आहे. मी आयुष्यात जे काही मिळवलं आहे, ते मेहनतीच्या जोरावर नसून बॉलिवूडमध्ये ज्याला मानाचं स्थान आहे, त्या व्यक्तीशी असलेल्या जवळीकीमुळे हे मीडियाला दाखवून द्यायचं आहे. हे खेदजनक आहे’ असं हुमा म्हणते.
‘आधी मी खूप फटकळ होते. मात्र गेल्या काही वर्षांत मी खूप काही शिकले आहे. एक बॉलिवूड अभिनेत्री म्हणून तुम्हाला तसं असून चालत नाही.’ असं हुमाने मोकळेपणाने सांगितलं.
गँग्ज ऑफ वासेपूर, बदलापूर, देढ इष्किया सारख्या चित्रपटातून प्रसिद्ध झालेल्या हुमा कुरेशीचं नाव सोहेल खानशी जोडलं जात होतं. हुमाने सोहेल आणि सीमा यांच्या सुखी संसारात विष कालवल्यामुळे ते काडीमोड घेत असल्याच्या चर्चा जोरावर होत्या. मात्र हुमाने या सर्व अफवा फेटाळून लावत आपली बाजू स्पष्ट केली आहे.

मुख्यमंत्रीपद गेलं तरी बेहत्तर, 'भारत माता की जय' म्हणणारच : फडणवीस
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भारत माता’च्या जयघोषाबद्दल केलेल्या विधानाचे आज सभागृहात जोरदार पडसाद उमटले.
काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना आपल्या विधानाबाबत माफी मागण्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला. यावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच खडाजंगीही रंगली.
पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
नाशिकच्या भाजप कार्यकारिणीत आपण मुख्यमंत्री म्हणून भाषण केलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून, असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी विचारला.
यावर उत्तर देताना संघात मला फक्त राष्ट्रवाद शिकवला. या देशाच्याविरोधात जे बोलले त्यांच्याविरोधात मी बोललो, तर माझं काय चुकलं? असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
=============================================
महाराष्ट्र तापला, अकोल्यात देशातील सर्वाधिक तापमान
मुंबई: महाराष्ट्र सध्या उन्हानं लालबुंद झाला आहे. कारण, काल देशातलं सर्वाधिक तापमान अकोला शहरात नोंदवलं गेलं. काल अकोल्याचा पारा ४३.८ इतका होता.
‘स्कायमेट’ या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेनं ही आकडेवारी जाहीर केली आहे.
चिंतेची बाब म्हणजे, देशातल्या सर्वाधिक तापमानांच्या १० शहरांमध्ये महाराष्ट्राची ५ शहरं आहेत. नागपूर, वर्धा, नांदेड आणि परभणी या शहरांतही पारा चाळीशीच्या पार पोहचला होता.
याआधी हवामान विभागाने नोंदवलेल्या अंदाजानुसार यंदा उन्हाच्या झळा वाढण्याचं भाकीत केलं आहे.
त्यामुळे लोकांनी उन्हांच्या झळांपासून वाचण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
1) अकोला – ४३.८
2) नागपूर – ४३.६
3) वर्धा – ४३.५
4) नांदेड – ४३.५
5) परभणी – ४३.३
3) वर्धा – ४३.५
4) नांदेड – ४३.५
5) परभणी – ४३.३
=============================================
मी बॅटने उत्तर देतो, माईकवर नाही, सॅम्युअल्सच वॉर्नला सडेतोड उत्तर
कोलकाता : ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद 85 धावांची खेळी रचून मार्लन सॅम्युल्सने वेस्ट इंडिजला चॅम्पियन बनवलं. त्याचीच ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून निवड करण्यात आली. सॅम्युअल्सने त्याचा सामनावीराचा किताब ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नला समर्पित केला. “मी बॅटने उत्तर देतो, माईकवर नाही,” असं म्हणत शेन वॉर्नला सडेतोड उत्तर दिलं.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सॅम्युअल्स म्हणाला की, “मी आज सकाळी उठलो, तेव्हा माझ्या डोक्यात एकच विचार सुरु होता. शेन वॉर्न सतत बोलत होता आणि मला केवळ हेच सांगायचं होतं, शेन वॉर्न हा किताब तुला समर्पित आहे. मी बॅटने उत्तर देतो, माईकवर नाही.”
काय आहे प्रकरण?
सॅम्युअल्स म्हणाला की, ” मी जानेवारी 2016 मध्ये आस्ट्रेलियात कसोटी मालिकेत खेळलो. शेन वॉर्नला माझी अडचण वाटत होती, का ते माहित नाही. मी कधीही त्याचा अपमान केला नाही. त्याच्या मनात खूप आहे, जे व्यक्त करण्याची गरज आहे. तो माझ्याबद्दल ज्याप्रकारे बोलतो ते काही कौतुकास्पद नाही.
=============================================
माझ्यातच काहीतरी कमतरता असेल... : शिखर धवन
मुंबई : वेस्ट इंडिजने टी 20 विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर जगभरातून कॅरेबियन टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र उपान्त्य फेरीत विंडीजकडून झालेला पराभव टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनच्या जिव्हारी लागला असावा. धवनने आपल्या भावनांना ट्विटरच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिली.
‘माझ्यातच काहीतरी कमतरता असेल. जसा परफॉर्मन्स द्यायचा होता, तसा देऊ शकलो नाही. मात्र आता चुकांना बलस्थानांमध्ये बदलून आणखी चांगला खेळाडू होण्याचा प्रयत्न करेन’ असं ट्वीट शिखर धवनने केलं होतं. विंडीजकडून झालेल्या टीम इंडियाच्या पराभवानंतर दोन एप्रिलला शिखरने हे ट्वीट केलं.
Shikhar Dhawan
@SDhawan25
Opening batsman of the Indian Cricket Team and the Hyderabad Sunrisers. My family and Cricket are the two most important things in my life.
India · http://www.bcci.tv/player/41
=============================================
शाहिद कपूरच्या घरी लवकरच 'कुणीतरी येणार गं' ?
मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर बोहल्यावर चढून काहीच दिवस झाले आहेत, असं त्याच्या चाहत्यांना वाटतं. मात्र शाहिद कपूरच्या घरी लवकरच गोड बातमी येण्याची शक्यता आहे. शाहिद कपूरची पत्नी मीरा प्रेग्नंट असल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातं.
मीरा राजपूतने 2 एप्रिलला पती शाहिदसोबत लॅक्मे फॅशन वीकला हजेरी लावली होती. यावेळी सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने डिझाईन केलेला अटायर तिने परिधान केला होता. तेव्हा मीराचे ‘बेबी बम्प’ दिसल्याचे संकेत मिळत आहेत.
फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने 4 एप्रिलला इन्स्टाग्रामवर दोघींचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये #Repost @mira.kapoor with @repostapp. ・・・ Two M’s and a Bum #sayheytobey – little M (दोन एम आणि एक बम, लिटल ‘एम’ला हेल्लो करा) असं मसाबाने फोटोखाली लिहिलं आहे.
यातील मेख अशी की मसाबा आणि मीरा दोघींचंही नाव ‘एम’वरुन सुरु होत असल्यामुळे नक्की कोणाचं बेबी बम हे स्पष्ट होत नाही.
शाहिद आणि मीरा गेल्या वर्षी जुलै महिन्यात विवाहबंधनात अडकले होते.
=============================================
माझं नाव सोहेलशी का जोडलं हे मला माहितेय : हुमा कुरेशी
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या दोन्ही भावंडांच्या आयुष्यात सध्या वादळ आल्याचं चित्र आहे. एकीकडे अर्पिताला मुलगा झाल्याने खान कुटुंब आनंदात असतानाच अरबाज आणि सोहेल यांचं वैवाहिक आयुष्य ढवळून निघालं आहे. मात्र सोहेलच्या आयुष्यात मीठाचा खडा टाकल्याचा आरोप ज्या अभिनेत्रीवर झाला त्या हुमा कुरेशीनेच आता मौन सोडलं आहे.
‘ट्विटर हा माझ्या आयुष्यातील घडमोडी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा मार्ग आहे. त्यामुळे माझ्यासोबत जे काही चांगलं-वाईट घडेल त्याबाबत मीच तुम्हाला ट्वीट करुन माहिती देईन.’ असं हुमाने ठणकावून सांगितलं. ‘सवंग प्रसिद्धीसाठी काही प्रसारमाध्यमं माझ्याबाबत अफवा पसरवतात. याचं कारणही मला माहित आहे. मी आयुष्यात जे काही मिळवलं आहे, ते मेहनतीच्या जोरावर नसून बॉलिवूडमध्ये ज्याला मानाचं स्थान आहे, त्या व्यक्तीशी असलेल्या जवळीकीमुळे हे मीडियाला दाखवून द्यायचं आहे. हे खेदजनक आहे’ असं हुमा म्हणते.
‘आधी मी खूप फटकळ होते. मात्र गेल्या काही वर्षांत मी खूप काही शिकले आहे. एक बॉलिवूड अभिनेत्री म्हणून तुम्हाला तसं असून चालत नाही.’ असं हुमाने मोकळेपणाने सांगितलं.
गँग्ज ऑफ वासेपूर, बदलापूर, देढ इष्किया सारख्या चित्रपटातून प्रसिद्ध झालेल्या हुमा कुरेशीचं नाव सोहेल खानशी जोडलं जात होतं. हुमाने सोहेल आणि सीमा यांच्या सुखी संसारात विष कालवल्यामुळे ते काडीमोड घेत असल्याच्या चर्चा जोरावर होत्या. मात्र हुमाने या सर्व अफवा फेटाळून लावत आपली बाजू स्पष्ट केली आहे.
=============================================
आता अंबाबाई मंदिराच्या गाभारा प्रवेशासाठी महिला आक्रमक
शनी शिंगणापूरनंतर आता कोल्हापुरातही मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाचं लोण पोहोचलं आहे. आज कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात 'अवनि' अर्थात अन्न,वस्त्र, निवारा या संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुजारी महिलांकडून यावेळी विरोध झाल्यानं आंदोलक महिलांनी गाभाऱ्यातच तीव्र घोषणाबाजी केली.
कोल्हापूर : शनी शिंगणापूर वादानंतर आता कोल्हापुरातही मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाचं लोण पोहोचलं आहे. आज कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात ‘अवनि’ अर्थात अन्न,वस्त्र, निवारा या संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुजारी महिलांकडून यावेळी विरोध झाल्यानं आंदोलक महिलांनी गाभाऱ्यातच तीव्र घोषणाबाजी केली.
सध्या मंदिर परिसरात तणावाचं वातावरण आहे.
गाभाऱ्यात जाताना पावित्र्य राखण्यासाठी शुचिर्भुत होऊन सोवळे नेसून जाण्याचा दंडक ठेवण्यात आला आहे. त्यामुळे इथे केवळ पुरुषांनाच प्रवेश मिळतो. त्याविरोधात यापूर्वीही आंदोलनं झाली आहेत.
अंबाबाईच्या मंदिरात महिलांनी धडक दिल्याची ही पहिलीच घटना नाही.
यापूर्वी 2011 साली तत्कालिन मनसे आणि सध्याचे भाजप आमदार राम कदम यांनी विधानसभेत आवाज उठवून कोल्हापूरच्या महालक्ष्मी दर्शनाचा मुद्दा मांडला होता.
त्यानंतर भाजप महिला आघाडीच्या नेत्या नीता केळकर यांच्या नेतृत्त्वात महिलांनी गाभाऱ्यात प्रवेश केला होता. त्यावेळी नीता केळकर यांनी गाभाऱ्यात जाऊन अंबाबाईची ओटी भरून पूजा केली होती.
=============================================
देशातील विद्यापीठांचं रँकिंग जाहीर
नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. देशातील टॉप-100 विद्यापीठ आणि अभियांत्रिकी विद्यापीठांची, मॅनेजमेंट आणि फार्मसीमधील टॉप-50 विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ, मुंबईतील केमिकल टेक्नॉलॉजी विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठी यासंह अनेक विद्यापीठांचा या याद्यांमध्ये समावेश आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापाठीचा टॉप-100 विद्यापीठांमध्ये क्रमांक लागला नाहीय.
विद्यापीठ (टॉप-10 रँकिंग)
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलुरु (बंगळुरु, कर्नाटक)
- इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी (मुंबई, महाराष्ट्र)
- जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (दिल्ली)
- हैदरबाद विद्यापीठ (हैदराबाद, तेलंगणा)
- तेझपूर विद्यापीठ (तेझपूर, आसाम)
- दिल्ली विद्यापीठ (दिल्ली)
- बनारस हिंदू विद्यापीठ (वाराणसी, उत्तर प्रदेश)
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नोलॉजी (तिरुअनंतपुरम, केरळ)
- बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स (पिलानी, राजस्थान)
- अलिगढ मुस्लीम विद्यापीठ (अलिगढ, उत्तर प्रदेश)
इंजिनिअरिंग (टॉप-10 रँकिंग)
- आयआयटी मद्रास (तामिळनाडू)
- आयआयटी मुंबई (महाराष्ट्र)
- आयआयटी खरगपूर (पश्चिम बंगाल)
- आयआयटी दिल्ली (दिल्ली)
- आयआयटी कानपूर (उत्तर प्रदेश)
- आयआयटी रुर्की (उत्तराखंड)
- आयआयटी हैदराबाद (तेलंगणा)
- आयआयटी गांधीनगर (गुजरात)
- आयआयटी रोपार-रुपनगर (पंजाब)
- आयआयटी पाटणा (बिहार)
मॅनेजमेंट (टॉप-10 रँकिंग)
- आयआयएम बंगळुरु (कर्नाटक)
- आयआयएम अहमदाबाद (गुजरात)
- आयआयएम कोलकाता (पश्चिम बंगाल)
- आयआयएम लखनौ (उत्तर प्रदेश)
- आयआयएम उदयपूर (राजस्थान)
- आयआयएम कोझीकोडे (केरळ)
- आयआयएम नवी दिल्ली (दिल्ली)
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट (भोपाळ, मध्यप्रदेश)
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (कानपूर, उत्तरप्रदेश)
- आयआयएम इंदौर (मध्य प्रदेश)
फार्मसी (टॉप-10 रँकिंग)
- मणिपल कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स (मणिपल, कर्नाटक)
- युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स (चंदीगड)
- जामिया हमदर्द (दिल्ली)
- पूना कॉलेज ऑफ फार्मसी, एरंडवणे (पुणे, महाराष्ट्र)
- इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, निर्मा युनिव्हर्सिटी (अहमदाबाद, गुजरात)
- बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी (मुंबई, महाराष्ट्र)
- बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (रांची, झारखंड)
- अम्रिता स्कूल ऑफ फार्मसी (कोची, केरळ)
- जेएसएस कॉलेज ऑफ फार्मसी (तामिळनाडू)
- जेएसएस कॉलेज ऑफ फार्मसी (कर्नाटक)
विद्यापीठं, इंजिनिअरिंग विद्यापीठं, मॅनेजमेंट विद्यापीठं आणि फार्मसी विद्यापीठांची संपूर्ण यादी म्हणजेच टॉप-100 रँकिंग यादी पाहण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या https://www.nirfindia.org/ranking या लिंकवर क्लिक करा.
=============================================
इंग्लंडवर बेट लावणाऱ्या पंटर्सनी गमावले 2000 कोटी रुपये
- डिप्पी वांकाणीमुंबई, दि. 4 - ख्रिस गेलसह तीन विकेट झटपट गेल्यानंतर इंग्लंडच्या बाजुने पैसे लावणाऱ्यांच्या तोंडचं पाणी वेस्टइंडिजने पळवलं असून तब्बल 2000 कोटी रुपयांचा फटका पंटर्सना बसला आहे. ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही वेस्टइंडिजवर पैसे लावले त्यांना मात्र करोडोंची लॉटरीच लागली.बेटिंग विश्वातल्या बुकिजनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार टी-20 वर्ल्डकपमध्ये तब्बल 25 हजार कोटींचं बेटिंग झालं. विश्वचषकातला अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी, मध्यंतरात, वेस्टइंडिजची प्रत्येक विकेट जाताना, आणि शेवटच्या षटकातल्या प्रत्येक सिक्सनंतर बुकीज रेट बदलत होते.सामना सुरू होण्यापूर्वी वेस्ट इंडिज हा बुकींचा फेवरेट संघ होता. मध्यंतरापर्यंत वेस्टइंडिजवरच बुकीजनी पैसे लावले होते. मात्र, पहिल्या दोन विकेट गेल्यानंतर 19 व्या ओव्हरपर्यंत इंग्लंडचा संघ शिरजोर होता आणि या संघावरच तुफान पैसे लागले होते. मात्र, ब्रेथवेटने शेवटच्या षटकात 19 धावा जिंकायला हव्या असताना स्टोक्सला सलग चार षटकार लगावले आणि केवळ वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला नाही, तर वेस्ट इंडिजवर पैसे लावणाऱ्यांनाही करोडो रुपये मिळवून दिले. ज्यांनी इंग्लंडवर पैसे लावले त्यांनी मात्र सुमारे 2000 कोटी रुपये गमावले, असे एका मुंबईस्थित बुकीने सांगितले.बुकींच्या सांगण्यानुसार www.betfair.com आणि www.bet365.com यासारख्या वेबसाइट्सच्या माध्यमातून बुकिंग स्वीकारण्यात आलं आणि देशातले आघाडीचे बुकी जयपूर आणि कोलकात्यातून व्यवहार करत होते. ज्या पंटर्सनी कालच्या सामन्यात पैसे गमावले आहेत, ते आता झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आयपीएलची वाट पहात आहेत.
=============================================
पीलभीत बनावट चकमक, ४७ पोलिसांना जन्मठेप
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ४ - दहा शीख यात्रेकरुंना दहशतवादी दाखवून बनावट चकमकीत त्यांची हत्या करणा-या ४७ पोलिसांना विशेष सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २५ वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशच्या पीलभीतमध्ये ही घटना घडली होती.विशेष न्यायालयाने शुक्रवारी या ४७ पोलिसांना बनावट चकमकीच्या आरोपामध्ये दोषी ठरवले होते. १२ जुलै १९९१ रोजी उत्तरप्रदेशच्या पीलभीतमध्ये पोलिसांनी शीख यात्रेकरुंनी भरलेली बस जबरदस्तीने थांबवली. त्यातील १० प्रवाशांना जबरदस्तीने खाली उतरवले होते.त्यानंतर या यात्रेकरुंना वेगवेगळया पोलिस स्थानकात नेऊन त्यांची हत्या करण्यात आल्याचे आरोपपत्रात म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत होती. सीबीआयने एकूण ५७ जणांना आरोपी केले होते. मात्र खटल्याच्या सुनावणी दरम्यान १० जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी अतिरेक्यांना मारण्यासाठी पुरस्कार होते. त्यासाठी हे हत्याकांड घडवण्यात आले.
=============================================
आयसीसीच्या जागतिक टी-२० संघाच्या कर्णधारपदी विराट कोहली
- ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. ४ - आयसीसीने निवडलेल्या टी-२० जागतिक संघाच्या कर्णधारपदी भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहलीची निवड केली आहे. या संघामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरालाही स्थान मिळाले आहे.यंदाच्या टी-२० वर्ल्डकपचा मालिकावीर ठरलेल्या विराटने ही स्पर्धा आपल्या फलंदाजीने गाजवली. वर्ल्डकप टी-२०मधील कामगिरीच्या आधारावर माजी क्रिकेटपटू आणि समालोचकांनी पुरुष आणि महिला संघाची निवड केली. या वर्ल्डकपमध्ये कोहलीन १३६.५० च्या सरासरीने एकूण २७३ धावा केल्या. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश होता.विराटने या स्पर्धेत २९ चौकार आणि पाच षटकार लगावले. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणा-या फलंदाजांमध्ये तमिम इक्बालच्या पाठोपाठ दुस-या स्थानावर आहे. तमिमने २९५ धावा केल्या. नेहराने फक्त पाच विकेट घेतल्या पण धावा रोखण्यामध्ये त्याची गोलंदाजी किफायतशीर ठरली.
=============================================
'शॉर्ट ऑफ ब्रेन'बद्दल मार्क निकोलसने सॅमीची माफी मागितली
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ३ - टी-२० वर्ल्डकपपूर्वी वेस्ट इंडिजच्या संघाला कमी लेखून डोक नसलेल्या क्रिकेटपटूंचा संघ म्हणून त्यांच्यावर टीका करणारे इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मार्क निकोलस यांनी ईएसपीएन आणि क्रिकइन्फोवर लिहीलेल्या आपल्या स्तंभामध्ये वेस्ट इंडिज संघ आणि डॅरन सॅमीची माफी मागितली आहे.वेस्ट इंडिजच्या वर्ल्डकप विजयानंतर मार्क यांना ही उपरती झाली आहे. मला वेस्ट इंडिजच्या संघाबद्दल पूर्ण आदर आहे ते डोक्याने कमी नाहीत असे मार्क यांनी आपल्या स्तंभात मान्य केले आहे.मी सहज म्हणून वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू डोक्याने कमी आहेत असे म्हटले होते. ते बिनडोक आहेत असे मी म्हटले नव्हते अशी सारवासारव मार्कने केली आहे. सॅमीनेही विजयानंतर मार्कवर निशाणा साधला होता.मार्क निकोलसच्या टीकेमुळे आमच्यामध्ये संघ भावना जागृती झाली आणि आम्ही अधिक जवळ आलो असे सॅमीने म्हटले होते. मार्कने वर्ल्डकप विजयासाठी इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांना पसंती दिली होती.
=============================================
ब्रिटीश स्तंभलेखकाने सॅमीची मागितली माफी
लंडन - वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना बुद्धी कमी असते, अशा आशयाचे विधान करणारा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मार्क निकोलस याने आज (सोमवार) विश्वविजेत्या वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार डॅरेन सॅमी याची बिनशर्त माफी मागितली.
निकोलस याने विश्वकरंडक स्पर्धा सुरु होण्याआधी लिहिलेल्या एका लेखामध्ये अशा आशयाच्या केलेल्या विधानावर सॅमी याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर निकोलस याने माफी मागितली आहे.
"वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना आपण निर्बुद्ध म्हटलेले नाही. परंतु त्याचबरोबर क्रिकेटच्या थोर परंपरेचा अपमान करणारे विधान माझ्याकडून करण्यात आले, हे मला मान्य आहे. विश्वकरंडक स्पर्धेचा निकाल काहीही लागला असता; तरी मी विंडीजची माफीच मागितली असती. अर्थातच, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना बुद्धी कमी असते, ही वस्तुस्थिती नाही. प्रस्तुत लेख हा मुख्यत: भारत व महेंद्रसिंह धोनीसंदर्भात होता. या स्पर्धेचा विजेता म्हणून माझ्यासमोर भारतीय संघ होता. मात्र वेस्ट इंडिज संघाबद्दल असे विधान केल्याचा मला पश्चाताप होत असून मी यासंदर्भात माफी मागतो,‘‘ असे निकोलस याने म्हटले आहे.
ब्रिटीश स्तंभलेखकाने सॅमीची मागितली माफी
निकोलस याने विश्वकरंडक स्पर्धा सुरु होण्याआधी लिहिलेल्या एका लेखामध्ये अशा आशयाच्या केलेल्या विधानावर सॅमी याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर निकोलस याने माफी मागितली आहे.
"वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना आपण निर्बुद्ध म्हटलेले नाही. परंतु त्याचबरोबर क्रिकेटच्या थोर परंपरेचा अपमान करणारे विधान माझ्याकडून करण्यात आले, हे मला मान्य आहे. विश्वकरंडक स्पर्धेचा निकाल काहीही लागला असता; तरी मी विंडीजची माफीच मागितली असती. अर्थातच, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना बुद्धी कमी असते, ही वस्तुस्थिती नाही. प्रस्तुत लेख हा मुख्यत: भारत व महेंद्रसिंह धोनीसंदर्भात होता. या स्पर्धेचा विजेता म्हणून माझ्यासमोर भारतीय संघ होता. मात्र वेस्ट इंडिज संघाबद्दल असे विधान केल्याचा मला पश्चाताप होत असून मी यासंदर्भात माफी मागतो,‘‘ असे निकोलस याने म्हटले आहे.
=============================================
काळा पैसा लपविल्यास महागात पडेल: जेटली
नवी दिल्ली: जगभरातील उद्योजक, सत्ताधीशांच्या काळ्या पैशासंदर्भातील उघड झालेला गोपनीय दस्ताऐवज ‘पनामा पेपर्स‘मुळे खळबळ माजलेली असताना, परदेशात मालमत्ता लपवणाऱ्या भारतीयांना ही कृती महागात पडू शकते असा कडक इशारा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिला आहे.
"काळ्या पैशाच्या समस्येवर मात करण्यासाठी जगभरात एकत्रितपणे विविध उपक्रम राबवले जात आहेत. जी 20 उपक्रम, एफएटीसीए आणि द्विपक्षीय करार सुरु झाल्यानंतर जगातील व्यवहारांमध्ये कमालीची पारदर्शकता येणार आहे. तरीही परदेशात मालमत्ता लपवून धोका पत्करणाऱ्यांना हा खेळ अत्यंत महागात पडू शकतो.", असे विधान जेटली यांनी भारतीय उद्योग महामंडळाच्या कार्यक्रमात बोलताना केले.
काळ्या पैशाच्या समस्येवरील उपाययोजनेअंतर्गत गेल्या वर्षी (2015) कराश्रय सुविधा देणाऱ्या देशांमध्ये अघोषित मालमत्ता असलेल्यांना माहिती सरकारकडे उघड करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यासाठी त्यांना 90 दिवसांची मुदत दिली होती. त्यावेळी 4,147 कोटी रुपयांच्या मालमत्ता घोषित करण्यात आली होती.
"त्यावेळी बऱ्याच जणांनी सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या संधीचा फायदा घेतला, कदाचित काही जणांनी नाही घेतला...परंतु आज वृत्तपत्रांमध्ये याविषयी बातम्या पाहिल्यानंतर मला वाटते याचा केवळ भारतावरच नाही तर सगळ्या जगावर परिणाम होत आहे. माझ्या मते हा आपल्या सर्वांसाठीच धोक्याचा इशारा आहे‘, असेही ते म्हणाले. भारतासह सुमारे 500 उद्योजक, सत्ताधीश आणि कलाकारांचा काळा पैसा पडून असल्याची धक्कादायक बाब ‘पनामा पेपर्स‘मध्ये उघड झाली आहे.

'समझोता'संबंधी तपासासाठी NIA पथक अमेरिकेला
नवी दिल्ली- समझोता एक्सप्रेस स्फोटांसंबंधी अमेरिकेने केलेल्या खुलाशानंतर याचा संबंध लष्कर-ए-तैयबा या पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेशी असल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटांमध्ये ‘लष्कर‘ची भूमिका काय होती याचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करीत असून, त्यासाठी ‘एनआयए‘चे महानिदेशक शरद कुमार यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय पथक अमेरिकेला रवाना झाले आहे.
पाकिस्तानात कराचीमध्ये राहणारा आरिफ कसमानी याने समझोता एक्सप्रेस स्फोटांसाठी पैसे जमविले होते, असा दावा अमेरिकेच्या ‘ट्रेजरी‘ विभागाने केला आहे. आरिफ हा लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख समन्वयक आहे. या दाव्यानंतर महानिदेशक कुमार यांच्या नेतृत्वाखाली पथक अमेरिकेला रवाना झाले आहे.
दिल्ली ते लाहोर दरम्यान धावणाऱ्या समझोता एक्सप्रेसमध्ये 2007 मध्ये हरियानातील पानिपतजवळ जोरदार स्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 68 लोक मारले गेले होते. त्यामध्ये बहुतांश पाकिस्तानी नागरिकांचा समावेश होता. या प्रकरणात नोव्हेंबर 2010 मध्ये अटक करण्यात आलेला स्वामी असीमानंद याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले होते.
हैदराबादच्या मक्का मशिदीत, तसेच अजमेर दर्ग्यात झालेल्या स्फोटांच्या प्रकरणांमध्येही असीमानंद हा आरोपी आहे. असीमानंदला 2014 मध्ये जामीन मिळाला होता. त्यावर पाकिस्तानने संताप व्यक्त केला होता.

'इस्पात'च्या संचालकांना 4 वर्षांचा तुरुंगवास
रायपूर - कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणात झारखंडमधील इस्पात या खासगी कंपनीच्या दोन संचालकांना विशेष न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
या गैरव्यवहाराची चौकशी करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने आज (सोमवार) इस्पातचे संचालक आर. एस रुंगठा आणि आर. सी. रुंगठा यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. या दोन्ही संचालकांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. विशेष न्यायालयाने दोघांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, तसेच त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इस्पात कंपनीला देखील दंडापोटी 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार असताना कोळसा खाण वाटप गैरव्यवहार उघडकीस आला होता. या गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरही आरोप करण्यात आलेले आहेत.

रिझर्व्ह बँकेकडून कर्जदरात कपातीची शक्यता
नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक (आरबीआय) उद्या (मंगळवार) नव्या आर्थिक वर्षातील पहिला द्विमाही पतधोरण आढावा जाहीर करणार आहे. त्यामध्ये आरबीआय रेपो दरात पाव ते अर्ध्या टक्क्यांची कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरबीआयच्या निर्णायकडे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
आरबीआयकडून होणार्या दर कपातीच्या अपेक्षेने आज (सोमवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात 150 अंशांनी वधारला होता.
महागाईचा कमी होणारा दर आणि औद्योगिक क्षेत्रातील निराशाजनक वातावरणामुळे आरबीआयकडून व्याजदर कपातीची शक्यता बळावली आहे. त्याचप्रमाणे सरकारची सकल देशी उत्पादनातील तूट 3.5 टक्क्यांवर आणण्याचे प्रयत्न या अपेक्षेला कारणीभूत आहे.
टपाल खात्याच्या (पोस्ट) माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सर्व अल्पबचत योजनांच्या व्याजदरात अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणावर कपातीची कुऱ्हाड चालवून मोदी सरकारने सर्वसामान्य, मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना ‘जोर का झटका‘ दिला आहे. ही व्याजदर कपात करून ‘चेंडू‘ रिझर्व्ह बॅंकेच्या कोर्टात टाकला आहे. केंद्राने अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपात करून आरबीआयचा कर्ज स्वस्त करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
गेल्या द्विमाही पतधोरण आढाव्यात आरबीआयने व्याजदर "जैसे थे‘ ठेवले होते. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट 6.75 टक्के कायम ठेवला होता आणि रोख राखीव गुणोत्तर (सीआरआर) 4 टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो दरही 5.75 टक्के कायम ठेवला होता.

..तर गरिबांना मोफत अन्नधान्य- पासवान
वाराणसी- उत्तर प्रदेशात 2017 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एनडीएची सत्ता आली तर राज्यातील गरीब नागरिकांना मोफत अन्नधान्य देऊ, अशी घोषणा केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे.
अन्नधान्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी पासवान बोलत होते. ते म्हणाले, ‘केंद्र सरकार प्रत्येक किलो गव्हावर 18 रुपये व तांदळावर 28 रुपये अनुदान देत आहे. राज्य सरकारने गहू व तांदळावरील 2 व 3 रुपये दर टाळावेत. परंतु, बिहार व उत्तर प्रदेश सरकार हे गोरगरीब नागरिकांना कमी किंमतीमध्ये अन्नधान्य देण्यास उत्सुक नाही. तमिळनाडूसह विविध राज्य सरकार कोणतेही दर न आकारता अन्नधान्य पुरवत आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत जर उत्तर प्रदेशात एनडीएची सत्ता आल्यास गरिबांना मोफत अन्नधान्य देऊ.‘
‘उत्तर प्रदेशातील सरकार अन्नधान्य सुरक्षा कायद्याखाली 1 मार्चपासून सुधारणा करत आहे. 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार होती. परंतु, विविध बैठकांमध्ये विविध कारणेच दाखविण्यात आली. यामध्ये सुधारणा होण्याची गरज आहे,‘ असेही पासवान म्हणाले.

'प्लीज कोहली, माझ्यासाठी अनुष्काला सोड'
नवी दिल्ली- ‘ओह माय गॉड, विराट कोहली बेहद एट्रॅक्टिव हैं। प्लीज कोहली मेरे लिए अनुष्का को छोड़ दो।, असे पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच हिने म्हटले आहे.
सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवरून बलोच हिने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. तिने म्हटले आहे की, ‘विराट हा खूपच हॅण्डसम आहे. कोलकता येथे भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान विराटने काय फलंदाजी केली. विराट आय लव्ह यू. प्लीज माझ्यासाठी तू अनुष्काला सोड.‘
दरम्यान, बलोचचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवरून मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागला असून अनेकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.
'प्लीज कोहली, माझ्यासाठी अनुष्काला सोड'
सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवरून बलोच हिने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. तिने म्हटले आहे की, ‘विराट हा खूपच हॅण्डसम आहे. कोलकता येथे भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान विराटने काय फलंदाजी केली. विराट आय लव्ह यू. प्लीज माझ्यासाठी तू अनुष्काला सोड.‘
दरम्यान, बलोचचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवरून मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागला असून अनेकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.
=============================================
बीसीसीआयनेच आमची काळजी घेतली: ब्राव्हो
कोलकत्ता - विश्वकरंडक जिंकल्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळावर तीव्र टीका करणाऱ्या कर्णधार डॅरेन सामी याला संघातील प्रसिद्ध अष्टपैलु खेळाडू ड्वेन ब्राव्हो यानेही पाठिंबा दर्शविला आहे. विंडीज मंडळापेक्षा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेस्ट इंडिज संघासाठी अधिक केल्याची भावना ब्राव्हो याने यावेळी व्यक्त केली.
"वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाचे व्यवस्थापन योग्य हाती नाही. मंडळाच्या एकाही पदाधिकाऱ्याचा वा संचालकाचा आम्हाला शुभेच्छा देणारा दुरध्वनी आला नाही. किंबहुना आम्ही हा विश्वकरंडक जिंकु; वा जिंकावा, असे मंडळास वाटत नव्हते,‘‘ अशी टीका ब्राव्होने केली. "वेस्ट इंडिजच्या एकदिवसीय संघामधून मला; वा गेल, रसेल यांसारख्या खेळाडूंना वगळण्यामागील कारण काय आहे,‘ अशी विचारणाही त्याने यावेळी केली.
""या वर्षामध्ये आता आणखी ट्वेंटी ट्वेंटी सामने होणार नाहीत. आम्हाला एकदिवसीय संघामधून वगळण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वेस्ट इंडिज संघाचे सामने होणार आहेत. परंतु, त्यावेळी संघात आम्ही नसू. भारतामध्ये आम्हाला मिळालेले प्रेम पहा. आमच्या स्वत:च्या मंडळापेक्षा बीसीसीआयने आमच्यासाठी जास्त केले आहे. मात्र क्रिकेटमुळे वेस्ट इंडिजमधील नागरिक एकत्र येत आहेत, ही अत्यंत आनंदाची बाब आहे,‘‘ असे ब्राव्हो म्हणाला.

बूट पुसणारे आज राज्यकर्ते- भाजप नेता
लखनौ- काही जण कधी काळी बूट पुसायचे काम करत होते. परंतु, आज ते राज्यकर्ते झाले आहेत, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला मोर्चाच्या अध्यक्षा मधु मिश्रा यांनी म्हटले आहे.
होळी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी बोलताना मिश्रा म्हणाल्या, ‘साथीदारांनो आपण सर्वजण येथे बसलेलो आहोत. यामधील काही जणांची माफी मागते. परंतु, तुमच्या डोक्यावर बसून काहीजण आज राज्य करत आहेत. एकदा आठवून पहा, कधी काळी त्यांनी तुमचे बूट पुसले आहेत. आज ते तुमचे वर गेले आहेत. यामागील कारण म्हणजे आपण विभागलो गेलो आहोत.‘
माझा छोटा भाऊ गौतमला 40 वर्षानंतरचा भारत दिसू लागला आहे. तुमची मुले पुन्हा गुलाम होऊ नयेत. उठा जागे व्हा, आपला अधिकार मिळविण्यासाठी लढत रहा, असेही मिश्रा म्हणाल्या. मिश्रा यांच्या वक्तव्यावर नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केल्यामुळे त्यांनी माफी मागितली. पुढे त्या म्हणाल्या, ‘मी आपल्या समाजाच्या कार्यक्रमात बोलत आहे. आपल्या समाजाची मी मुलगी व सून आहे. कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नाही. कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफी मागते.‘

प. बंगालमध्ये 63, आसाममध्ये 45 टक्के मतदान
कोलकाता / गुवाहाटी - विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज (सोमवार) सकाळपासून मतदाना सुरवात झाली असून, दुपारी एकपर्यंत पश्चिम बंगालमधअये 63 टक्के, तर आसाममधअये 45 टक्के मतदान झाले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांमध्ये अत्यंत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदानामुळे चार राज्यांतील निवडणुकीला खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये पश्चिम मिदनापूर, बांकुरा आणि पुरुलिया या जिल्ह्यांमधील मतदारसंघांचा समावेश पहिल्या टप्प्यात आहे. हा भाग एकेकाळी नक्षलवाद्यांच्या कारवायांसाठी प्रसिद्ध असल्याने पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. राज्यामध्ये तृणमूल कॉंग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्येच प्रमुख लढत असून भाजप आणि कॉंग्रेसनेही काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. मतदानपूर्व कलचाचणीमध्ये नागरिकांनी तृणमूल कॉंग्रेसच्या बाजूने कौल दिल्याचे दिसून आले होते. राज्यातील एकूण सहा टप्प्यांपैकी पहिला टप्पा आज पूर्ण होत आहे.
भाजपला सत्ताबदलाची मोठी अपेक्षा असलेल्या आसाममध्येही पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. दुसरा आणि अखेरच्या टप्प्यासाठी 11 एप्रिलला मतदान आहे. आसाममध्ये सत्ताधारी कॉंग्रेस, भाजप- आसाम गण परिषद- बोडोलॅंड पीपल्स फ्रंट आघाडी आणि ऑल इंडिया डेमोक्रॅटिक युनायटेड फ्रंट यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. मतदानपूर्व कलचाचणीमध्ये कॉंग्रेस आणि भाजप आघाडीला जवळपास सारख्याच जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने तिसऱ्या पक्षाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई आणि भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्वनंदन सोनोवाल यांचे भवितव्यही आज मतपेटीत बंद होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत- बांगलादेश सीमेवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, चाळीस हजारांहून अधिक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
=============================================
अंधार हटवून केले प्रकाशमय जीवन
निल्लोड - जन्मापासूनच दृष्टिहीन असलेल्या सहावर्षीय मोहसीन मेवाती याच्या घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याच्यावर शस्त्रकिया करणे अशक्य बनले. अशावेळी दानशूर उद्योगपतींनी दिलेल्या एक लाखाच्या लेन्स, डॉक्टरांचे प्रयत्न यामुळे मोहसीनचे अंधकारमय आयुष्य प्रकाशमान झाले आहे.

नानेगाव (ता. सिल्लोड) येथील मोहसीन आसिफ मेवाती याच्या दोन्ही डोळ्यांत जन्मतः मोतीबिंदू असल्याने त्याला अजिबात दिसत नव्हते. सगळे जग त्याच्यासाठी अंधारमय झालेले. वडील अल्पभूधारक शेतकरी. शेतीत भागत नसल्यामुळे आईलासुद्धा मोलमजुरी करावी लागते. अशा प्रतिकूल परिस्थितीत पुढील जीवनाचा आधारस्तंभ असलेला मुलगाच नेत्रहीन असल्यामुळे त्यांना मोठा आघात झाला. वडील, आजोबा हिंमत न हारता त्याला दृष्टी मिळावी यासाठी दोन वर्षांपासून वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवत राहिले. प्रत्येक डॉक्टर शस्त्रक्रिया करावी हाच सल्ला देत होते. याच काळात त्यांची भेट सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातील नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. महेश वैष्णव यांच्याशी झाली. त्यांनीही तपासून मोहसीनच्या दोन्ही डोळ्यांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करावी लागेल, असा सल्ला दिला. शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारा लाखोंचा खर्च कुठून आणावा, हा प्रश्न त्यांना पडला. अंदाजे खर्च किती येईल, अशी विचारणा केल्यानंतर डॉ. वैष्णव यांनी, "एक रुपयाही खर्च येणार नाही,‘ असे सांगून मोफत उपचार होईल, असे सांगितले. यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. त्यामुळे ते पुन्हा सिल्लोडला गेले नाहीत. डॉ. वैष्णव यांनी नानेगाव येथील रुग्णामार्फत निरोप देऊन त्यांना सिल्लोडला बोलावून घेतले. औरंगाबाद येथील डॉ. राजीव मुंदडा यांच्याकडे घेऊन गेले. घरच्या हलाखीच्या परिस्थितीची जाणीव ठेवून डॉ. मुंदडा यांनी मोफत शस्त्रक्रिया करण्याची तयारी दाखविली. ता. 22 फेब्रुवारीला मोहसीनच्या दोन्ही डोळ्यांवर औरंगाबादमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. भूलतज्ज्ञ डॉ. विजय दौडे यांनीही कोणताच मोबदला घेतला नाही. मोहसीनच्या दोन्ही डोळ्यांत फोल्डेबल लेन्स बसविल्या असून, मोहसीन आता दोन्ही डोळ्यांनी पाहू शकतो. येत्या शैक्षणिक वर्षात तो शाळेत जाणार असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.

बेन स्टोक्स उद्ध्वस्त झालाय: मॉर्गन
कोलकत्ता - ट्वेंटी-ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडकडून अखेरचे षटक टाकलेला अष्टपैलु खेळाडू बेन स्टोक्स हा उद्ध्वस्त झाल्याची शक्यता असल्याचे कर्णधार इऑन मॉर्गन याने म्हटले आहे. स्टोक्स याने टाकलेल्या अखेरच्या षटकांत वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रॅथवेट याने चार गगनचुंबी षटकार लगावत विंडीजला स्वप्नवत मिळवून दिला होता. यामुळे थक्क झालेल्या स्टोक्स याची निराशा मैदानावर लपत नव्हती. या पार्श्वभूमीवर, स्टोक्स याच्या मानसिक अवस्थेबद्दल मॉर्गन याला विचारणा करण्यात आली होती.

"स्टोक्स हा उद्ध्वस्त झाला आहे. त्याला या धक्क्यातून सावरण्यासाठी काही दिवस नक्कीच लागतील. मात्र आम्ही त्याच्याबरोबर आहोत, क्रिकेट हा खरोखरच निर्दय खेळ आहे. आमच्या हातामधून सामना निसटेल, असे कधी वाटलेच नव्हते. प्रेक्षकांच्या पाठिंब्यासह प्रत्येक गोष्ट आमच्या बाजुने घडत होती,‘‘ असे मॉर्गन याने सांगितले. परंतु, संघामधील प्रत्येक खेळाडूचा अभिमान असल्याची भावनाही त्याने यावेळी व्यक्त केली.

शिक्षकांनी मुस्लिम मुलास संबोधले दहशतवादी
होस्टन (टेक्सास)- एका शाळेत दोन शिक्षकांनी 12 वर्षाच्या विद्यार्थ्यास त्याच्या पालकांसमोर दहशतवादी संबोधल्याची घटना घडली आहे. यामुळे चिडलेल्या पालकांनी तक्रार केल्यानंतर शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, वलिद अबुशाबेन हा इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. एकदा वर्गात चित्रपट दाखविण्यात आला होता. यावेळे त्याने बॉम्बवरून जोक सांगितला होता. शिक्षकांनी तेव्हापासून त्याला गंमत म्हणून बॉम्ब व दहशतवादी म्हणून संबोधण्यास सुरवात केली होती. शिवाय, शाळेतील इतर विद्यार्थीही त्याला चिडवत होते. यामुळे त्याने पालकांकडे तक्रार केली होती. शिक्षकांनी पालकांसमोरही हास्यविनोद करत त्याला दहशतवादी संबोधले होते.
पालकांनी शाळेकडे तक्रार केल्यानंतर दोन शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे, असे शाळेच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment