[अंतरराष्ट्रीय]
१- बँकॉक; तोकडे कपडे घालणाऱ्या महिला म्हणजे रॅपर नसलेलं चॉकलेट
२- स्पेन; ख्रिस गेलच्या अॅकॅडमीतील तरुण क्रिकेटरची गोळ्या झाडून हत्या
३- ह्युस्टन; किशोरवयीन मुलाने तयार केले स्वस्त ‘श्रवणयंत्र’
४- चीनमध्ये धावली विनाचालक कार
५- कराची; कुलभूषण जाधवांविरुद्ध दहशवादी कारवायांचा आरोप
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- केजरीवालांकडून वेमुलाच्या MSc पास भावाला क्लर्कच्या नोकरीची ऑफर
७- संयुक्त राष्ट्रात पहिल्यांदाच महामानवाची जयंती साजरी होणार
८- यंदा चांगला पाऊस, स्कायमेटपाठोपाठ IMD चाही अंदाज
९- दलितांना हत्यारे दिली असती तर देशावरील आक्रमण रोखता आलं असत - आरएसएस
१०- दिल्ली; शहरात सेक्सबद्दल खुलेपणा वाढतोय, वीसवर्षाखाली गर्भपाताचे प्रमाण सर्वाधिक
११- टाईम्स ऑफ इंडियाचं ट्विटर अकाऊंट हॅक
१२- श्रीनगर; काश्मीरमधील गोळीबार; लष्कराचे चौकशीचे आदेश
१३- पंतप्रधानांनी देवनार साफ करून दाखवावे - राहुल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१४- नाशिकच्या जिल्ह्याधिकाऱ्यांची गाडी आणि खुर्ची जप्त
१५- कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, पेन्शनबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय
१६- गुडगाव नव्हे... गुरुग्राम! हरियाणा सरकारचा निर्णय
१७- IPL महाराष्ट्राबाहेर नेण्याचा विचार करा, कोर्टाचा BCCI ला सल्ला
१८- लातूर; जलदूताचे स्वागत अन् श्रेयासाठी धावाधाव
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- दहिसर; कारपूल करणाऱ्या तरुणाला झटका; दंडासह परवानाही जप्त
२०- देहरादून; 'शक्तिमान' आधाराशिवाय उभा राहतोय...
२१- उल्हासनगर; मेहंदी सुकण्याआधी भावाने बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं
२२- ...म्हणून अक्षय कुमारला 19 वर्षीय श्रेया नाईकचा प्रचंड अभिमान वाटतो
२३- हरिद्वार; हनीमूनला येणा-या जोडप्यांमुळे केदारनाथमध्ये महापूर - स्वरुपानंद
२४- रायगड; मुंबई - गोवा हायवेवर अपघातात चौघांचा मृत्यू
२५- कोल्लम; पुत्तिंगल मंदिरातील आतषबाजीविरोधात ८० वर्षीय महिलेचा एकहाती लढा
२६- पटना; राजद आमदाराच्या बहिणीचा मारहाणीत मृत्यू
२७- औरंगाबाद; दुष्काळात रेशीम शेतीने दिला मदतीचा हात
२८- सुरतमधील तरुणाकडून मुंबईतील मुलाला जीवदान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२९- 'सेलिब्रेटींना जबाबदार धरता येणार नाही', धोनीच्या बचावासाठी किंग खान सरसावला
३०- गेल, कोहली, डिव्हिलियर्सपेक्षा 18 वर्षाच्या सरफाजची तुफान खेळी
३१- सुलतान रिलीजआधीच सुपरहिट, टिजरला एका दिवसांत ३० लाख हिट्स
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३१- दलित वस्तीसाठी आलेला १० कोटी रुपयाचा निधी गेला परत
३२- तुप्पा येथील डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्याला लागलेल्या आगीवर सहा तासानंतर नियंत्रण
३३- कंधारच्या महा लोकअदालतीत १२६ पैकी ३१ प्रकरने निकाली
३४- पोहरादेवी, शिखर शिंगणापूर, महाकालीसाठी १९५ बसेस धावणार
३५- महावितरण कार्यालयातून पगार काढण्यासाठी लाचेची मागणी; दोघे ताब्यात
३६- मुखेड; फुले-आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त १६१ जणांनी केले रक्तदान
३७- जिल्ह्यात १४ एप्रिलला ड्राय-डे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
गीविंद पवार, सीताराम मालकर, प्रवीण गिरी, वैभव भूतले, संदीप जाधव, अब्दुल माजित, महेश मगर, कुलदीप राक्षसमारे, शिवाजी पारवेकर, रोजित चाम्पारवर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
नियमितपणा हा माणसाचा मित्र तर आळस हा कट्टर शत्रू आसतो
(महेश उपाध्याय, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
===============================================

हरियाणाला पौराणिक काळापासून विशेष महत्त्व आहे. भगवतगीता आणि हरियाणा यांचं वेगळं नातं आहे. महाभारत काळात गुरु द्रोणाचार्य याच भागात राजपुत्रांना प्रशिक्षण देत असत, त्यामुळे नावात बदल करुन गुरुग्राम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गुडगावचं नाव बदलण्यासाठी दीर्घ काळापासून रहिवासी मागणी करत होते, त्यानंतर हा निर्णय घेतल्याचं हरियाणा सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे मेवात जिल्ह्याचं नामकरणही नूह असं करण्यात आलं आहे.

सहा दिवसापूर्वीचं पंकज गौहेर आणि पूजा सौदे यांचं सर्वांच्या संमतीनं कोर्टात लग्न झालं होतं. पूजाच्या घरची आर्थिक परिस्थिती ही पंकजच्या आर्थिक स्थितीपेक्षा चांगली होती. तसेच पंकज हा सरकारी नोकरीत नसल्याने पूजाच्या घरच्या लोकांना त्याचा राग होता. या लग्नामुळे समाजात
आपली बदनामी झाल्याची खदखद पूजाच्या नातेवाईकांच्या मनात होती.
याच रागातून सोमवारी पूजाचा भाऊ अरुण आणि त्याचे साथीदार पंकजच्या घरी घुसले. त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. पंकजला वाचवण्यासाठी पूजासह नातेवाईकांनी प्रयत्न केला, पण त्यांनाही मारहाण झाली. पंकजला तातडीनं रुग्णालयात नेलं पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे, तर पूजानं आपल्या भावाला फाशी व्हावी अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ आहे. अशा स्थितीमध्ये बीसीसीआय मुख्यमंत्री सहाय्यता निधीला काही मदत करु इच्छिते काय, असा सवालही कोर्टानं विचारला आहे. एका सामन्यासाठी किती पाणी वापरलं जातं याची माहिती देण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.
वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब अर्थात महालक्ष्मी रेसकोर्सवरुन पाणी आणू, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनं कोर्टाला दिली. याप्रकरणी आजची सुनावणी स्थगिती करण्यात आली असून उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे

नाशिकच्या जिल्ह्याधिकाऱ्यांची गाडी आणि खुर्ची जप्त
नाशिक : मालेगाव दिवाणी न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिकचे जिल्ह्याधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची गाडी आणि खुर्ची जप्त करण्यात आली आहे. 15 वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई झाली आहे.
मालेगावच्या 14 शेतकऱ्यांची जमीन 2001 साली पाझर तलावासाठी संपादित करण्यात आली होती. त्या मोबदल्यात या 14 शेतकऱ्यांना नऊ कोटी 64 लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती. मात्र पंधरा वर्ष झाली तरी हा मोबदला मिळालेला नाही.
दोन वेळा सांगून ही शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने न्यायालयाने थेट जिल्हाधिकाऱ्यांची गाडी आणि खुर्चीच जप्त करण्याचे आदेश दिले. या कारवाईसाठी न्यायालयाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकऱ्यांचे वकील आणि शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते आणि जप्तीची कारवाई केली.
===============================================
'सेलिब्रेटींना जबाबदार धरता येणार नाही', धोनीच्या बचावासाठी किंग खान सरसावला
मुंबई: नोएडामधील आम्रपाली बिल्डरने अनेक ग्राहकांना वेळेवर घर न दिल्यानं या कंपनीचा ब्रँण्ड अॅम्बेसेडर महेंद्रसिंह धोनी मात्र वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोशल मीडियावर याबाबत मोठ्याप्रमाणात प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. या दरम्यान बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खाननं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शाहरुखनं कॅप्टन कूल धोनीचा बचाव करताना शाहरुख म्हणाला की, ‘ब्रॅण्डची जाहिरात करणारे सेलिब्रेटी हे जबाबदार नाहीत. मात्र, जाहिरात करण्याआधी सेलिब्रेटींनी कंपनीच्या प्रोडक्टबाबत खात्री करुन घेतली पाहिजे.’
कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करताना सेलिब्रिटींनी त्या उत्पादनाची खात्री करून घेणं गरजेचं आहे.. पण उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत सेलिब्रिटींना जबाबदार धरता येणार नाही, असा बचावात्मक पवित्रा शाहरूखनं घेतला आहे.
उत्पादनात काही अपायकारक गोष्टी आढळल्यास ती जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटीला पाच वर्षांची शिक्षा आणि 50 लाखांच्या दंडाची शिफारस एका संसदिय समितीनं केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार लवकरच हे ग्राहक संरक्षण विधेयक संसदेत मांडण्यात येईल.
===============================================
कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, पेन्शनबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई: 2006 सालाच्या आधी निवृत्ती घेतलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण की, 2006 पूर्वी निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे.
पेन्शनवाढीच्या याच निर्णयाप्रमाणे 33 वर्ष नोकरी केल्यास मिळणारी संपू्र्ण पेन्शन ही अटही शिथिल केली आहे. पेन्शन कल्याण विभागानं निर्णय घेतला आहे की, 2006 पूर्वीच्या पेन्शनधारकांना समेकित पेन्शन, वेतनमान आणि ग्रेड वेतन हे 50 टक्के वेतनापेक्षा कमी असता कामा नये. जरी कर्मचाऱ्यांनी 33 वर्ष नोकरी केलेली नसली तरीही.

नियमाप्रमाणे, केंद्र सरकारचा एक कर्मचारी कमीत कमी 10 वर्ष सेवा केल्यानंतर पेन्शनचा हकदार बनतो. सहा एप्रिलला एक शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, “सुधारित पेन्शन थकबाकी एक जानेबारी 2006 पासून लागू होणार आहे.”
===============================================
कारपूल करणाऱ्या तरुणाला झटका; दंडासह परवानाही जप्त
मुंबई : कामावर जात असताना दररोज आपल्या मार्गावरील प्रवाशांकडून लिफ्ट देऊन पैसे घेणाऱ्या दहीसरमधील तरुणाला वाहतूक पोलिसांनी चांगली अद्दल घडवली आहे. वाहतूक पोलिसांनी या तरुणला दंड ठोठावून त्याचा परवाना जप्त केला आहे. रौनक कोटेचा असं या तरुणाचं नाव आहे.
रौनक दररोज दहिसर ते वांद्रे या ऑफिसच्या मार्गावर प्रवाशांना त्याच्या गाडीतून लिफ्ट देतो. पण लिफ्ट देताना तो प्रवाशांकडून पैसे वसूल करायचा.
रौनक कोचेटाचं हे काम वाहतूक पोलिसांच्या नजरेतून सुटलं नाही. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी रौनकला दंड ठोठावून त्याचं लायसन्सही जप्त केलं. रौनक त्याच्या गाडीचा वापर पैसे मिळवण्यासाठी करत असल्याचा दावा पोलिसांचं म्हणणं आहे.
===============================================
'शक्तिमान' आधाराशिवाय उभा राहतोय...
देहरादून : भाजपच्या आंदोलनादरम्यान जखमी झाल्यानंतर पाय गमावलेल्या शक्तिमानची प्रकृती आता सुधारली आहे. इतकंच नाही, तर कृत्रिम पाय बसवल्यानंतर शक्तिमानला आता कोणत्याही आधाराशिवाय उभा राहता येत आहे.
देहराडूनमध्ये महिन्याभरापूर्वी झालेल्या भाजपच्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या सेवेत असलेल्या शक्तिमानचा पाय लोखंडी अँगलमध्ये अडकून मोडला होता. यानंतर त्याचा पाय कापावा लागला होता. शरीरात संसर्ग होऊ नये, यासाठी शस्त्रक्रिया करुन घोड्याचा पाय शरीरापासून वेगळा केला आणि त्याला कृत्रिम पाय लावला होता.
===============================================
गेल, कोहली, डिव्हिलियर्सपेक्षा 18 वर्षाच्या सरफाजची तुफान खेळी
बंगळुरू: विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादचा 45 धावांनी धुव्वा उडवून आयपीएलमध्ये विजयी सलामी दिली.
बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात एबी डिव्हिलियर्स, विराट कोहली, शेन वॉटसन आणि सरफराझ खानच्या तुफानी खेळीच्या जोरावर बंगलोरनं 20 षटकांत चार बाद 227 धावांची मजल मारली होती. त्यानंतर हैदराबादला विजयासाठीच्या 228 धावांचा पाठलाग करताना 20 षटकांत 6 बाद 182 धावांचीच मजल मारता आली.
हैदराबादसाठी कर्णधार डेव्हिड वॉर्नरनं एकाकी झुंज देत 25 चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांसह 58 धावांची खेळी उभारली. तर आशीष रेड्डीनंही 32 धावा केल्या.
===============================================
केजरीवालांकडून वेमुलाच्या MSc पास भावाला क्लर्कच्या नोकरीची ऑफर
नवी दिल्ली : हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या करणाऱ्या रोहित वेमुलाच्या भावाला दिल्ली सरकारने क्लर्कच्या नोकरीची ऑफर दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे रोहितचा भाऊ राजा वेमुला याच्याकडे एमएससीची पदवी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या या ऑफरवर जोरदार टीका होत आहे. हैदराबाद विद्यापीठाच्या काही विद्यार्थांनी ही ऑफ अपमानजनक असल्याचं म्हटलं आहे.
सहानुभूती म्हणून या नोकरीची ऑफर देण्यात आल्याचं राजा वेमुलाने सांगितलं. मात्र एमएमसी फर्स्ट क्लास असलेल्या राजाने ही ऑफर अजून स्वीकारलेली नाही.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येवर वाद झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 24 फेब्रुवारी रोजी त्याच्या आईची भेट घेतली होती. तसंच रोहितच्या भावाला नोकरी देण्याची घोषणाही केली होती.
असिस्टंट प्रोफेसरसाठी पात्र, मात्र ऑफर क्लर्क पदाची
शैक्षणिक पात्रतेचा विचार केल्यास राजा वेमुलाने पाँडिचेरी सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून फर्स्ट क्लाससह एमएससीची पदवी मिळवली आहे. इतकंच नाही तर तो नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) साठीही पात्र ठरला आहे. या पदवीमुळे त्याला देशातील कोणत्याही कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसरची नोकरी मिळू शकते.
===============================================
गुडगाव नव्हे... गुरुग्राम! हरियाणा सरकारचा निर्णय
चंदिगड : हरियाणा राज्यातील दोन जिल्ह्यांच्या नावामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुडगावचं नाव गुरुग्राम तर मेवात जिल्ह्याचं नाव बदलून नूह ठेवण्यात येणार आहे.
हरियाणाला पौराणिक काळापासून विशेष महत्त्व आहे. भगवतगीता आणि हरियाणा यांचं वेगळं नातं आहे. महाभारत काळात गुरु द्रोणाचार्य याच भागात राजपुत्रांना प्रशिक्षण देत असत, त्यामुळे नावात बदल करुन गुरुग्राम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गुडगावचं नाव बदलण्यासाठी दीर्घ काळापासून रहिवासी मागणी करत होते, त्यानंतर हा निर्णय घेतल्याचं हरियाणा सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे मेवात जिल्ह्याचं नामकरणही नूह असं करण्यात आलं आहे.
आतापर्यंत भारतातील शहर/जिल्हे यांची बदललेली नावं :
बॉम्बे – मुंबई
कलकत्ता – कोलकाता
मद्रास – चेन्नई
गौहाटी – गुवाहाटी
पंजिम – पणजी
बँगलोर – बंगळुरु
त्रिवेंद्रम – तिरुअनंतपुरम
अहिल्यानगर – इंदौर
पॉन्डिचेरी – पुदुचेरी
बनारस – वाराणसी
प्रयाग – अलाहाबाद
ओडिसा- उदिशा
बॉम्बे – मुंबई
कलकत्ता – कोलकाता
मद्रास – चेन्नई
गौहाटी – गुवाहाटी
पंजिम – पणजी
बँगलोर – बंगळुरु
त्रिवेंद्रम – तिरुअनंतपुरम
अहिल्यानगर – इंदौर
पॉन्डिचेरी – पुदुचेरी
बनारस – वाराणसी
प्रयाग – अलाहाबाद
ओडिसा- उदिशा
===============================================
तोकडे कपडे घालणाऱ्या महिला म्हणजे रॅपर नसलेलं चॉकलेट
बँकॉक : थायलंडचे पंतप्रधान प्रयूत चान ओचा यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “तोकडे कपडे घालणाऱ्या महिला रॅपर नसलेल्या चॉकलेटप्रमाणे असतात. रॅपर नसलेलं चॉकलेट लोकांना आवडत नाही,” असं पंतप्रधान म्हणाले. तसंच देशातील महिलांनी अंगप्रदर्शन होईल असे कपडे घालू नयेत, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
थायलंडमध्ये लवकरच सोन्क्रानची सुरुवात होणार असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे. पारंपरिक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी थायलंडमध्ये सोन्क्रान साजरा केला जातो. या सणादरम्यान लोक एकमेकांवर पाणी उडवतात. मात्र यावेळी महिलांशी छेडछेडीचे प्रकारही घडतात.
त्याचनिमित्तान चान ओचा यांनी मंगळवारी बोलत होते. “सान्क्रोनदरम्यान महिलांनी योग्य कपडे परिधान करावे. थायलंडच्या संस्कृतीला साजेशे हे कपडे असावेत. या कपड्यांमध्ये महिला अधिक सुंदर आणि त्यांचा सभ्यपणा दिसेल. जे चॉकलेट चांगल्या रॅपरमध्ये गुंडाळलेलं असतं ते बराच काळ शेल्फवर ठेवतात,” असं पंतप्रधान चान ओचा म्हणाले.
चान ओचा माजी लष्कर अधिकारी असून ते राजकीय विरोधकांवरील तिखट हल्ल्यासाठी ओळखले जातात. महिलांबाबत यापूर्वीही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. थायलंडच्या बीचवर दोन ब्रिटीश महिला पर्यटकांची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. बिकीनी घातल्यामुळे तर त्यांची हत्या झाली नाही ना, अशी शंका चान ओचा यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.
===============================================
ख्रिस गेलच्या अॅकॅडमीतील तरुण क्रिकेटरची गोळ्या झाडून हत्या
पोर्ट ऑफ स्पेन: ब्रिटिश युवा क्रिकेटर अॅड्रियन सेंट जॉन यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेनमध्ये घडली आहे. अवघ्या 22 वर्षीय या खेळाडूची हत्या करण्यात आली. अॅड्रियन लंडनमधील क्रिस गेलच्या एका अॅकॅडमीसाठी खेळत होता.
बीबीसीच्या माहितीनुसार, मंगळवारी अॅड्रियन आपल्या मित्रासाठी एके ठिकाणी थांबलेला असताना त्याच्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला. दरोडेखोरांनी त्याला लुटून मग त्याची हत्या केली असल्याची माहिती समजते आहे.
अॅड्रियनच्या हत्येनंतर वेस्टइंडिजचा फलंदाज ख्रिस गेलने याबाबत ट्वीट केलं. “वाईट बातमी ऐकून दु:ख झालं. त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या दु:खात मी सहभागी आहे. अॅड्रियन अॅकॅडमीचा कर्णधार होता.”
ख्रिस गेलच्या अॅकॅडमचे प्रबंधक डोनावन मिलर म्हणाले की, “माझ्यासाठी ही गोष्ट मान्य करणं खूपच कठीण आहे. एवढ्या चांगल्या व्यक्तीची कोणी कशी काय हत्या करु शकतं?” असं म्हणत त्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं.
===============================================
मेहंदी सुकण्याआधी भावाने बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं
उल्हासनगर : घराण्याची बदनामी झाल्याच्या समजुतीतून उल्हासनगरमध्ये भावानेच बहिणीच्या पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. लग्नानंतर अवघ्या आठवड्याभरातच तरुणाने आपल्या बहिणीचा संसार मोडला.
सहा दिवसापूर्वीचं पंकज गौहेर आणि पूजा सौदे यांचं सर्वांच्या संमतीनं कोर्टात लग्न झालं होतं. पूजाच्या घरची आर्थिक परिस्थिती ही पंकजच्या आर्थिक स्थितीपेक्षा चांगली होती. तसेच पंकज हा सरकारी नोकरीत नसल्याने पूजाच्या घरच्या लोकांना त्याचा राग होता. या लग्नामुळे समाजात
आपली बदनामी झाल्याची खदखद पूजाच्या नातेवाईकांच्या मनात होती.
याच रागातून सोमवारी पूजाचा भाऊ अरुण आणि त्याचे साथीदार पंकजच्या घरी घुसले. त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. पंकजला वाचवण्यासाठी पूजासह नातेवाईकांनी प्रयत्न केला, पण त्यांनाही मारहाण झाली. पंकजला तातडीनं रुग्णालयात नेलं पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे, तर पूजानं आपल्या भावाला फाशी व्हावी अशी मागणी केली आहे.
===============================================
संयुक्त राष्ट्रात पहिल्यांदाच महामानवाची जयंती साजरी होणार
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रात पहिल्यांदाच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आज म्हणजे एक दिवस आधी बाबासाहेबांची जयंती साजरी करणार आहे. या जयंतीनिमित्त काही कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात येणार आहे.
संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ट्वीट करुन याची माहिती दिली होती. कल्पना सरोज फाऊंडेशन आणि फाउंडेशन फॉर ह्यूमन होराइजनच्या मदतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीचं वर्ष असल्यामुळे या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने असमानता दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर परिसंवादही होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 मध्ये मरणोत्तर भारतरत्नने सन्मानित करण्यात आलं होतं. आंबेडकरांनी आयुष्यभर दलित आणि वंचितांच्या अधिकारांसाठी संघर्ष केला.
===============================================
IPL महाराष्ट्राबाहेर नेण्याचा विचार करा, कोर्टाचा BCCI ला सल्ला
मुंबई : आयपीएलसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी काही पाणी दुष्काळग्रस्त भागाला देण्यासाठी तयार आहात का असा सवाल मुंबई उच्च न्यायालायानं बीसीसीआयला विचारला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आयपीएलचे सामने व्हावे की नाही यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना कोर्टानं हा प्रश्न विचारला.
महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ आहे. अशा स्थितीमध्ये बीसीसीआय मुख्यमंत्री सहाय्यता निधीला काही मदत करु इच्छिते काय, असा सवालही कोर्टानं विचारला आहे. एका सामन्यासाठी किती पाणी वापरलं जातं याची माहिती देण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.
वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब अर्थात महालक्ष्मी रेसकोर्सवरुन पाणी आणू, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनं कोर्टाला दिली. याप्रकरणी आजची सुनावणी स्थगिती करण्यात आली असून उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे
===============================================
यंदा चांगला पाऊस, स्कायमेटपाठोपाठ IMD चाही अंदाज
नवी दिल्ली: गेल्या तीन वर्षांपासून चांगल्या पावसाची आस धरुन बसलेल्या जनतेला भारतीय हवामान विभागाने मोठा दिलासा दिला आहे. कारण यंदा पाऊसमान हे उत्तम म्हणजेच सरासरीच्या तब्बल 106 % असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
इतकंच नाही तर विदर्भ आणि दुष्काळी मराठवाड्यातही चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कालच खाजगी हवामान संस्था स्कायमेटनेही देशभरात चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
स्कायमेट आणि भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज जवळपास सारखाच आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, जून महिन्यात सरासरीच्या 90 टक्के, जुलै महिन्यात 105 टक्के, ऑगस्ट महिन्यात 108 टक्के, तर सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 115 टक्के पाऊस पडणार आहे. एकूण सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे.
===============================================
...म्हणून अक्षय कुमारला 19 वर्षीय श्रेया नाईकचा प्रचंड अभिमान वाटतो
मुंबई : मुंबईतील अंधेरीत राहणारी 19 वर्षीय श्रेया नाईक सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनली आहे. “मला तुझा अभिमान वाटतो” असं म्हणत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने श्रेयाचं कौतुक केलं आहे. कोण आहे श्रेया नाईक, तिने असं काय केलं आहे, ज्यामुळे अक्षय कुमारलाही तिची दखल घ्यावीशी वाटली.
श्रेया नाईक ही मुंबईतील अंधेरीत राहणारी 19 वर्षीय तरुणी. तिने एक असं धाडसाचं काम केलं, जे इतर मुलींनाही प्रेरणादायी ठरेल. तिच्या या धाडसाची थेट बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारनेही दखल घेतली आणि तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
श्रेयानं काय केलं?
श्रेयाला एकटी पाहून एका टवाळखोर तरुणाने तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. मात्र, श्रेयाने त्याला न घाबरता धडा शिकवला. इतकंच नव्हे, त्या टवाळखोराला पोलिसांच्या ताब्यातही दिलं. आता अशा तरुणीचा अक्षयलाच काय संपूर्ण देशाला अभिमान वाटायला हवा. पण श्रेयाने हे धाडस दाखवण्याचं श्रेय जातं ते अक्षय कुमार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना.
===============================================
दलितांना हत्यारे दिली असती तर देशावरील आक्रमण रोखता आलं असत - आरएसएस
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. १३ - 'भारतीय समाजातील अनेक घटकांना आणि मुख्यत: दलितांना लढण्याची परवानगी न दिल्याने परकीय आणि मुस्लिम अतिक्रमण करण्यात यशस्वी झाले', असं आंबेडकरांचं म्हणण होतं असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) केला आहे. आरएसएसने मुखपत्र ऑर्गनायझर मधून हा दावा केला आहे. 'जर अस्पृश्यांना हत्यारांपासून वंचित ठेवलं नसत तर देशावर परकीय शक्तीने राज्य केलं नसत', असं आंबेडकरांनी म्हंटल्याच आरएसएसने सांगितलं आहे.टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) आंबेडकरांबद्दलची आपली आस्था सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लिमांच अतिक्रमण रोखण्यासाठी आंबेडकरांचा काय दृष्टीकोन होता हे सांगण्याचा प्रयत्न आरएसएसने केला आहे. 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशभरात साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने आरएसएसने आंबेडकरांच्या लढ्यापासून ते योगदानापर्यंतची माहिती मुखपत्रात छापली आहे.आरएसएसने आंबेडकरांच्या आयुष्याची माहिती दोन भागांत विभागली आहे. पहिल्या भागात आंबेडकर समाज आणि देशासाठी कसे जगले याबद्दल सांगण्यात आलं आहे. तर दुस-या भागात देशाचा विकास, सुरक्षा, एकता याबद्दलचे त्यांचे विचार मांडण्यात आले आहेत.
===============================================
हनीमूनला येणा-या जोडप्यांमुळे केदारनाथमध्ये महापूर - स्वरुपानंद
- ऑनलाइन लोकमतहरिव्दार, दि. १३ - केदारनाथमध्ये २०१३ मध्ये आलेल्या प्रलयकारी महापूरासाठी स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी हनीमूनसाठी येणा-या जोडप्यांना जबाबदार धरले आहे. केदारनाथला हनीमून साजरा करण्यासाठी येणा-या जोडप्यांमुळे महापूराची आपत्ती ओढवली असे वादग्रस्त विधान व्दारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले आहे.पवित्र हिंदू स्थळांवरील पर्यावरण असेच प्रदूषित होत राहिले तर, आणखी एखादी अशी आपत्ती ओढवेल असा इशारा त्यांनी दिला आहे. देशाच्या विविध भागातून पिकनिक, हनीमूनची मजा करण्यासाठी लोक देवभूमी उत्तराखंडमध्ये येतात. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी केदारनाथमध्ये महापूर आला होता. अशा अपवित्र गोष्टी इथे थांबल्या नाहीत तर पुन्हा अशीच आपत्ती ओढवेल असे स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. हिंदुस्थान टाईम्सने हे वृत्त दिले आहे.शनी शिंगणापूरच्या मंदिरात महिलांना प्रवेश द्यायलाही त्यांचा विरोध होता. शनी शिंगणापूरच्या मंदिरात महिलांना प्रवेश दिला तर, महिलांविरोधात बलात्कार, विनयभंगाच्या घटना वाढतील असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. केंद्रीय मंत्री व्यंकया नायडू यांनी स्वरुपानंदांच्या विधानाशी असहमती दर्शवत त्यांचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले होते.
===============================================
सुलतान रिलीजआधीच सुपरहिट, टिजरला एका दिवसांत ३० लाख हिट्स
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. १३ - अभिनेता सलमान खानचा चित्रपट असला की प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असते. त्याचप्रमाणे सलमान खानच्या आगामी सुलतान चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला. अवघ्या 12 तासांत या टिझरला 10 लाख तर एका दिवसांत 30 लाख हिट्स मिळाले आहेत. त्यामुळे चित्रपट रिलीज होण्याआधीच सुपरहिट होणार असल्याचं मत काही समीक्षकांनी व्यक्त केलं आहे.यावर्षी रिलीज होणा-या बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे सुलतान. ईदला हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटात सलमान हरियाणाचे कुस्तीपटू सुलतान अली खान यांची भूमिका साकारत आहे. यशराज फिल्म्सच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले आहे. तर सलमान खानच्या नायिकेच्या भूमिकेत अनुष्का शर्मा आहे.सलमान खानच्या फॅन्सना हवा असलेला सगळा मसाला चित्रपटात असल्याचं टीझरवरुन दिसत आहे. कुस्तीपटूची भुमिका असल्याने सलमान खानला शर्टलेस पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे. टीझरमध्येदेखील सलमान आपली बॉडी दाखवताना दिसत आहे. त्यात कुस्तीच्या मैदानावरचा रोमांचही टीझरमधून दाखवण्यात आला आहे.
===============================================
शहरात सेक्सबद्दल खुलेपणा वाढतोय, वीसवर्षाखाली गर्भपाताचे प्रमाण सर्वाधिक
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, १३ - शहरी भागात तरुणाईचा सेक्स बद्दलचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. इथे सेक्स, शरीरसंबंध सामान्य बाब बनले आहेत. शहरी भागातील गर्भपाताच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, वीस वर्षाखालील तरुणींची संख्या सर्वाधिक आहे. कमी वयातच तरुण-तरुणी शारीरीक सुखाच्या ओढीने जवळ येत असून, सेक्सबद्दल अधिक खुलेपणा येत असल्याचे हे लक्षण आहे.सरकारच्या आरोग्य सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. एनएसएसओच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागात गर्भवती रहाणा-या स्त्रियांचे प्रमाण ७७ टक्के तर, शहरी भागात ७४ टक्के आहे. ग्रामीण भागात गर्भपाताचे प्रमाण दोन टक्के तर, शहरात तीन टक्के आहे. पण शहरी भागात वीसवर्षाखालील वयोगटातील गर्भपात करण्याचे प्रमाण सर्वाधिक १४ टक्के आहे.१५ ते ४९ वयोगटात ग्रामीण भागात गर्भवती रहाणा-या महिलांचे प्रमाण ९.६ टक्के तर, शहरात ६.८ टक्के आहे. ग्रामीण भारतात ५६ टक्के मुलांचा जन्म सरकारी रुग्णालयात तर, २४ टक्के मुलांचा जन्म खासगी रुग्णालयात होतो. शहरी भागात ४२ टक्के मुलांचा जन्म सरकारी रुग्णालयात तर, ४८ टक्के मुलांचा जन्म खासगी रुग्णालयात होतो.
===============================================
टाईम्स ऑफ इंडियाचं ट्विटर अकाऊंट हॅक
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. १३ - टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राच ट्विटर हॅण्डलर हॅक करण्यात आलं होतं. आज बुधवारी सकाळी @TOIIndiaNews हे ट्विटर हॅण्डलर हॅक करण्यात आलं होतं. टाईम्स ऑफ इंडियाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने निषेध केला असून वाचकांना काही आक्षेपार्ह मेसेज गेले असल्याची शक्यता वर्तवली आहे.
===============================================
मुंबई - गोवा हायवेवर अपघातात चौघांचा मृत्यू
- ऑनलाइन लोकमत -रायगड, दि. १३ - मुंबई - गोवा हायवेवर कोलाडजवळ एसटीने रिक्षाला धडक दिली आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. एसटी बस चिपळूणहून मुंबईला जात असताना हा अपघात झाला आहे. एसटीने दिलेली धडक इतकी जोरदार होती की रिक्षामधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत पावलेले सर्वजण माणगावच्या खरवली येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे हायवेवरच टेमपालेजवर एसटीने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत.
===============================================
पुत्तिंगल मंदिरातील आतषबाजीविरोधात ८० वर्षीय महिलेचा एकहाती लढा
- ऑनलाइन लोकमत -कोल्लम, दि. १३ - पुत्तिंगल देवी मंदिरात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे लागलेल्या भीषण आगीत होरपळून ११२ जणांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरात केली जाणारी आतषबाजीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या दुर्देवी घटनेमुळे एकीकडे देवळांच्या प्रांगणात फटाके उडविण्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी राज्यातील विविध स्तरांतून करण्यात येत असताना, पंकजाक्षी अम्मा मात्र गेली अनेक वर्ष याविरोधात लढा देत आहेत.पंकजाक्षी अम्मा यांचं वय 80 वर्ष आहे. मंदिर परिसरात राहणा-या अनेक लोकांचा आतषबाजीला विरोध आहे. मात्र यातील कोणाचीही याविरोधात पुढे होऊन तक्रार करण्याची हिंमत झाली नाही. पण पंकजाक्षी अम्मा यांनी मंदिर प्रशासनाविरोधात तक्रार करण्याचं धैर्य दाखवत एकहाती लढा दिला आहे. पंकजाक्षी अम्मा यांचं घर मंदिरापासून अवघ्या 50 मीटरच्या अंतरावर आहे. दरवेळी जेव्हा आतषबाजी केली जाते तेव्हा पंकजाक्षी अम्मा यांच्या घराचं प्रचंड नुकसान होतं.
===============================================
किशोरवयीन मुलाने तयार केले स्वस्त ‘श्रवणयंत्र’
- ह्यूस्टन : भारतीय वंशाच्या एका १६ वर्षीय मुलाने स्वस्त ‘श्रवणयंत्र’ तयार केले असून, केवळ ६० डॉलर एवढी किंमत असलेले हे श्रवणयंत्र महागडे श्रवणयंत्र खरेदी करू न शकणाऱ्यांसाठी ‘वरदान’ ठरणार आहे.कंटुकीमधील लुईबिल शहरातील निवासी मुकुंद वेंकटकृष्णन असे या स्वस्त ‘श्रवणयंत्र’ तयार करणाऱ्या मुलाचे नाव आहे. त्याने २ वर्षांपासून या श्रवणयंत्रावर संशोधन केले होते. त्याने ‘जेफरसन काऊंटी पब्लिक स्कूल आयडिया’मध्ये हे यंत्र सादर केले. अलीकडेच त्याने कंटुकी स्टेट सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग फेअरमध्ये या श्रवणयंत्रासाठी प्रथम क्रमांक पटकावला होता. या यंत्राचा वापर स्वस्त हेडफोनच्या साह्यानेही केला जाऊ शकतो. यात विविध स्तराचे आवाज वाजवून हेडफोनद्वारे व्यक्तीच्या ऐकण्याची क्षमता जाणून घेतली जाते. त्यानंतर ठरलेल्या प्रोग्रॅमनुसार एक ‘श्रवणयंत्र’ म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकतो. व्यक्तीच्या आवाज ऐकण्याच्या क्षमतेनुसार आवाज कमी-जास्त केला जाऊ शकतो.हे श्रवणयंत्र तयार करणाऱ्या डुवोंट मॅन्युअल हायस्कूलचा विद्यार्थी असलेल्या मुकुंद याने सांगितले की, या श्रवणयंत्राने डॉक्टरची मदत घेण्याची गरज नाही. खरे तर हे ‘अॅम्प्लिफायर’ (ध्वनिसंवर्धक) आहे. आपल्याला जेवढा मोठा आवाज ऐकायचा आहे तेवढा त्याचा आवाज वाढवता येतो. त्यासाठी सध्या १५०० डॉलरपर्यंत रक्कम घेतली जाते; पण आता हेच काम ६० डॉलरमध्ये होते. येणाऱ्या कोणत्याही सिग्नलचा आवाज वाढविण्यासाठी लागणारे प्रोसेसर याचा सर्वात महागडा भाग आहे.
===============================================
चीनमध्ये धावली विनाचालक कार
- ऑनलाइन लोकमतचीन, दि. १२- चीनची ऑटोमोबाईल कंपनी 2018पर्यंत चालकविरहित कार बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे. दोन चालकविरहित कारची चीनच्या ऑटोमोबाईल कंपनीनं प्रात्यक्षिकंही केली आहेत. गुगलच्या कारला टक्कर देण्यासाठी चीननं ही कार बनवली आहे.चीनला 2020पर्यंत चालकविरहित कार रस्त्यावर धावतील, अशी आशा आहे. या कार चालकाला त्याचा मार्ग शोधण्यासाठीही मदत करणार आहेत. शहरातले रस्ते आणि महामार्गावर या गाड्या चांगल्या प्रकारे चालणार आहेत. मात्र या गाड्यांना नियोजित स्थळी जाण्यासाठी चालकाच्या मार्गदर्शनाची गरज लागणार आहे.आम्ही या गाड्यांमधलं सेन्सर आणि प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी सुधारत असल्याचं ऑटोमोबाईल कंपनीनं म्हटलं आहे. ही चालकविरहित कार 2018पर्यंत बाजारात आणण्याचं चीनचं लक्ष्य आहे. या गुगलच्या चालकविरहित कारनं आतापर्यंत 10 लाखांच्या मैलाचा टप्पा पार केला आहे.
===============================================
राजद आमदाराच्या बहिणीचा मारहाणीत मृत्यू
राजद आमदाराच्या बहिणीचा मारहाणीत मृत्यू
पाटणा - बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) आमदार सरोज यादव यांची बहिण शैली देवी यांचा गुंडांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आमदार असलेले सरोज यादव यांची बहिण शैली देवी रिक्षातून प्रवास करत असताना गुंडांनी त्यांची छेड काढली. या छेडछाडीला विरोध केल्यानंतर त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आणि रिक्षातून खाली फेकून देण्यात आले. जखमी अवस्थेत त्यांना आगोदर स्थानिक आणि नंतर पाटणातील रुग्णालयात आणण्यात आले. पण, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. तिघांचा शोध घेण्यात येत आहे. राजद आमदार सरोज यादव यांनी या घटनेनंतर आपल्याच सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
===============================================
कुलभूषण जाधवांविरुद्ध दहशवादी कारवायांचा आरोप
पाकिस्तानमधील बलुचिस्तानच्या गृह मंत्रालयाची कारवाई
कराची - दहशवादी आणि घातपाती कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप ठेवत पाकिस्तानात अटक करण्यात आलेले संशयित भारतीय गुप्तहेर कुलभूषण जाधव यांच्या विरोधात आज प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला. बलुचिस्तान सरकारने ही कारवाई केली असल्याचे वृत्त पाकिस्तानातील "न्यूज इंटरनॅशनल‘ने दिले आहे. इराणमधून पाकिस्तानात प्रवेश केल्यानंतर जाधव यांना पाकिस्तानात अटक करण्यात आली होती.

जाधव हे भारतीय गुप्तहेर असून, पाकिस्तानात घातपाती कारवाया करत असल्याचा आरोप त्यांच्या विरोधात ठेवण्यात आला होता. मात्र, भारताने पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावत जाधव यांच्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आपण भारताचे गुप्तहेर असल्याची कबुली देणारा जाधव यांचा व्हिडिओही पाकिस्तानी माध्यमांतून प्रसिद्ध झाला होता. मात्र, हा व्हिडिओ खोटा असल्याचे भारताने म्हटले आहे.
जाधव यांच्या विरोधात क्वेट्टा येथील दहशतवादविरोधी विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलुचिस्तानातील चमन भागात त्यांना अटक करण्यात आली होती. प्रांतीक सरकारच्या गृह विभागाने दिलेल्या तक्रारीनुसार जाधव यांच्या विरोधात आज प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली.
===============================================
काश्मीरमधील गोळीबार; लष्कराचे चौकशीचे आदेश
काश्मीरमधील गोळीबार; लष्कराचे चौकशीचे आदेश
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील हंडवाडा येथे मंगळवारी लष्करी जवानांनी केलेल्या गोळीबारामध्ये दोन तरुण ठार झाल्याच्या घटनेचे चौकशीचे आदेश लष्कराने दिले आहेत. तर, काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती कारवाईचे आश्वासन दिले आहे.
लष्करी जवानांकडून झालेल्या मुलींच्या कथित लैंगिक शोषणप्रकरणी छेडण्यात आलेल्या आंदोलनात हे तरुण सहभागी झाले होते. मंगळवारी याच मुद्यावरून आंदोलन करत हे तरुण रस्त्यावर उतरले होते. महंमद इक्बाल आणि नईम कादीर भट अशी गोळीबारामध्ये ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेनंतर हंडवाडा आणि लगतच्या परिसरामध्ये आंदोलनाचा भडका उडाला आहे. आज (बुधवार) काश्मीर खोऱ्यात बंद ठेवण्यात आला आहे.
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, या गोळीबाराला जबाबदार असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कडक कारवाई करण्यात येईल. शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकारची छबी अशा घटनांमुळे नाकारात्मकरित्या पसरत आहे. लष्करानेही पोलिसांत तक्रार दाखल करत या गोळीबाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
===============================================
दुष्काळात रेशीम शेतीने दिला मदतीचा हात
औरंगाबाद - यंदाच्या दुष्काळाने मराठवाड्याचा घसा कोरडा पडला असला तरी कमी जागेत, कमी कालावधीत तुती लागवड करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात थोडा तरी दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. मराठवाड्यातील हे प्रमाण राज्याच्या तुलनेत 50 टक्के असल्याची माहिती रेशीम विभागातील सूत्रांनी दिली. मुख्यत्वे मराठवाड्यातील सर्वांत जास्त रेशीम उत्पादक शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांनी रेशीम शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पादनाबरोबरच ग्रामीण भागात रोजगाराचे साधनही निर्माण केल्याने रेशीम शेतीला आता उद्योगाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
दोन वर्षांच्या तुलनेत मराठवाड्यात तिपटीपेक्षा जास्त तुती लागवड झाली आहे. 2013-14 मध्ये मराठवाड्यात 1575 एकरवर तुती लागवड होती. तीच 2015-16 मध्ये 5148 एकरवर झाली आहे. अंडीपुंज आणि कोष उत्पादनाच्या बाबतीतही मराठवाड्याची संख्या लक्षणीय आहे. 2015-16 मध्ये राज्यात 27 लाख 56 हजार एकरवर तुती लागवड झाली, तर मराठवाड्यात 12 लाख 93 हजार एकरवर लागवड झाली आहे. 2013-14 मध्ये राज्यात 607 टन कोष उत्पादन होते, मराठवाड्यात तेच प्रमाण यंदा 719 टनांवर गेले आहे. केवळ लागवडीचे क्षेत्रच वाढले नाही, तर यंदा (2015-16) तुती लागवड करणारे राज्यातील 7662 शेतकरी, तर मराठवाड्यात 4705 शेतकरी संख्या आहे. मराठवाड्याला 2015-16 मध्ये 1625 एकरवर तुती लागवडीचे लक्ष्य होते. यामध्ये वाढ होत 2209 एकरवर लागवड झाली आहे.

राज्यात एकही प्रशिक्षण, संशोधन केंद्र नाही
रेशीम शेती आणि उद्योगाचा वाव लक्षात घेऊन विकासात्मक दृष्टीने मराठवाड्यात तुती रेशीम संचालनालय होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. राज्यात रेशीम शेतीवर आधारित संशोधन कमी पडत आहे; तसेच रेशीम शेती करण्यासाठी शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी म्हैसूर येथे जावे लागते; पण प्रशिक्षण, संशोधन केंद्रे राज्यात, मराठवाड्यात झाली तर रेशीम उत्पादनास आणखी वाव मिळेल.
रेशीम शेती आणि उद्योगाचा वाव लक्षात घेऊन विकासात्मक दृष्टीने मराठवाड्यात तुती रेशीम संचालनालय होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. राज्यात रेशीम शेतीवर आधारित संशोधन कमी पडत आहे; तसेच रेशीम शेती करण्यासाठी शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी म्हैसूर येथे जावे लागते; पण प्रशिक्षण, संशोधन केंद्रे राज्यात, मराठवाड्यात झाली तर रेशीम उत्पादनास आणखी वाव मिळेल.
===============================================
जलदूताचे स्वागत अन् श्रेयासाठी धावाधाव
तहानलेल्या लातूरकरांसाठी मिरजहून पाच लाख लिटर पाणी
लातूर - तहानलेल्या लातूरकरांसाठी मिरजहून पाच लाख लिटर पाणी घेऊन सोमवारी सकाळी निघालेली रेल्वे मंगळवारी पहाटे येथे दाखल झाली. रेल्वेने पाण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून ताणली गेलेली उत्सुकता संपुष्टात आली. रेल्वे मिरजला परतीच्या वाटेला लागताच शुद्धीकरणाची प्रक्रिया करून टॅंकरद्वारे पाणी काही लातूरकरांच्या घरांतही पोचले. दरम्यान, भाजपने या रेल्वेचे जोरदार स्वागत करताना शक्तिप्रदर्शनाची संधीही साधली. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी राजकीय प्रदर्शन केले, त्या वेळी शिवसेनेचे कुणीही तेथे नव्हते.

मार्गातील अडचणी, पाणी भरताना किंवा काढताना उद्भवणाऱ्या समस्यांची चाचपणी करण्यासाठी ही रेल्वे सोडण्यात आली. त्यामुळे या रेल्वेद्वारे पाच लाख लिटर एवढेच पाणी नेले होते. ही चाचपणी यशस्वी झाल्यासारखी आहे. त्यामुळे लवकरच 50 वॅगन्सची दुसरी रेल्वे उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशा दोन रेल्वे लातूरकरांची तहान भागविणार आहेत. पावसाळ्यापर्यंत दोन रेल्वेच्या माध्यमातून दर दीड दिवसाला 50 लाख लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.
"जलराणी एक्स्प्रेस‘ मिरजहून सोमवारी सकाळी अकराला निघाली होती. मंगळवारी (ता. 12) पहाटे चार वाजून वीस मिनिटांनी ती येथे पोचली. दरम्यानच्या काळात रेल्वेस्टेशन परिसरात माजी नगराध्यक्ष एस. आर. देशमुख यांच्या शेतातील विहिरीत पाणी उतरवून घेण्याची व्यवस्था पूर्ण झाली होती. रेल्वेने आलेले पाणी पहाटे पाचला या विहिरीत टाकायला सुरवात झाली. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी जलपूजन केले. सकाळी साडेनऊला हे काम पूर्ण होताच रेल्वे मिरजेकडे परतीच्या वाटेला लागली.
विहिरीतील पाणी चार वीज पंपांच्या साहाय्याने चार टॅंकरमध्ये भरून शुद्धीकरण केंद्रात नेण्यात आले. तेथून 80 टॅंकर्सद्वारे ते शहरात वितरित करण्यात आल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.
===============================================
पंतप्रधानांनी देवनार साफ करून दाखवावे - राहुल
मुंबई - ‘स्वच्छ भारत‘ बोलणे वेगळे आणि देश स्वच्छ करून दाखवणे वेगळे, अशा शब्दांत स्वच्छ भारत मोहिमेची खिल्ली उडवतानाच पंतप्रधानांनी देवनार क्षेपणभूमी साफ करून दाखवावी, असे आव्हान मंगळवारी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. ही क्षेपणभूमी बंद करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
पंतप्रधानांनी देवनार साफ करून दाखवावे - राहुल
देवनार क्षेपणभूमी तीन महिन्यांपासून धुमसत आहे. कचऱ्यातून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. मुंबईतील प्रदूषणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राहुल यांनी या क्षेपणभूमीची पाहणी केली. साधारण 15 मिनिटे कचऱ्यावरून चालत त्यांनी समस्या समजून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर हल्ला चढवला. पंतप्रधान स्वच्छ भारताच्या घोषणा करतात; पण येथे प्रत्येक माणूस रडत आहे. एका लहान मुलाचा प्रदूषणामुळे मृत्यूही झाला आहे, असे सांगत त्यांनी केंद्र व राज्य सरकारबरोबरच महापालिकेच्या कारभारावरही ताशेरे ओढत शिवसेनेला लक्ष्य केले. क्षेपणभूमीच्या दुर्गंधीमुळे राहुल यांना कमांडोने "मास्क‘ दिला होता; मात्र त्यांनी तो मास्क वापरला नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम व कृपाशंकर सिंह यांनीही मास्क गळ्यातच राहू दिले.
मुंबई हे शहर भारताच्या प्रगतीचे बोधचिन्ह आहे. फक्त "स्वच्छ भारत‘ म्हणून काही होणार नाही. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी काम केले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. या वेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांनी क्षेपणभूमी बंद करा, असे लिहिलेले फलक राहुल यांना दाखवले.
===============================================
सुरतमधील तरुणाकडून मुंबईतील मुलाला जीवदान
अपघातानंतर कुटुंबीयांचा अवयवदानाचा निर्णय
मुंबई - सुरत येथून आलेल्या हृदयामुळे मुंबईत 16 वर्षांच्या मुलाला जीवदान मिळाले. सुरतमधील महावीर रुग्णालयात 22 वर्षांच्या मुलाला रस्ते अपघातानंतर मेंदू मृत घोषित केले. त्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.
रुग्णालयात 22 वर्षांच्या तरुणाला मेंदू मृत जाहीर केले. तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी या मुलाचे हृदय, कॉर्निया, यकृत आणि किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी हृदय लातूरच्या तरुणाला बसविण्यात आले. हृदयाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या या तरुणाचे अवयव प्रत्यारोपण यादीत एक महिन्यापूर्वी नाव नोंदविले होते. मुलुंडमधील फोर्टीस रुग्णालयात ही शस्त्रक्रिया झाली. बाल हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय अग्रवाल यांनी ही शस्त्रक्रिया केली. डॉ. अन्वय मुळे यांनी मृत व्यक्तीच्या शरीरातील हृदय काढून ते मुंबईला आणले. मुंबईत झालेली ही 13 वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे, तर प्रत्यारोपणासाठी दुसऱ्या राज्यातून हृदय आणण्याची ही पाचवी वेळ आहे. डोमेस्टिक एअरपोर्ट ते रुग्णालय या मार्गात ग्रीन कॉरिडोर केला होता.

No comments:
Post a Comment