[अंतरराष्ट्रीय]
१- इस्लामाबाद; छोटू गँगमुळे पाक सैन्याच्या नाकी नऊ, 2 हजार जवान टोळक्याच्या शोधात
२- काबुलमधील पुली महमूद खान परिसरात स्फोट; 24 जणांचा मृत्यू , 161 जण जखमी
३- तालिबानने स्विकारली काबूलमधील हल्ल्याची जबाबदारी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- बिग बींना अतुल्य भारतचे ब्रँड अॅम्बेसेडर करण्यास स्थगिती
५- देशाची अवस्था देवनार डंपिंग ग्राऊंडसारखी, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका
६- रेल्वे प्रकल्पावर ड्रोनद्वारे नजर
७- ‘मिस कॉल’ सदस्यांचा भाजपाला विसर
८- संघाची विचारसरणी देशाच्या हिताची नाही - नितीश कुमार
९- विधानसभा निवडणूक; पाच राज्यांतून ६२ कोटी ताब्यात
१०- निर्यातीत 5.5% घसरण; 16 महिन्यांचा नीचांक
११- डाळ मागणी नोंदविण्याची केंद्राची राज्यांना सूचना
१२- राज्यपाल हे केंद्राचे दलाल नव्हे - उत्तराखंड उच्च न्यायालय
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- पुण्यातील तरुणीचा मृत्यू बसच्या धडकेत नाही : पोलिस
१४- आत्महत्येपूर्वी प्रत्युषाने गर्भपात केला होता : डॉक्टर
१५- एप्रिलअखेरपर्यंतच पूर्ण पीएफ काढणे शक्य
१६- चौथ्या गोळीवर तुमचं नाव नको, साहित्यिक सुभाष देसाईंना धमकी
१७- मद्यकारखान्यांना पाण्याबाबतचं पंकजांचं वक्तव्य स्वार्थातून - राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक
१८- बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा वाद, उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी हायकोर्टाला अमान्य
१९- अहमदाबाद; दंगलीत सहभागी प्रत्येक व्यक्ती तितकीच जबाबदार - गुजरात उच्च न्यायालय
२०- महाराष्ट्र दिनी फडकवणार विदर्भाचा झेंडा
२१- मोदी, अहंकाराची स्फोटके बाजूला ठेवा- शिवसेना
२२- नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा धुव्वा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२३- मुंबई; बारमध्ये महिला कामगार ‘डान्सर’
२४- म्हाडाच्या मुंबईतील घरांची जाहिरात मे महिन्यात
२५- पुणे; कोथिंबीर विकणाऱ्याकडून चित्रकलेची भक्ती
२६- मुरबाड; आजींच्या शाळेमुळे फांगणे गाव झळकले
२७- बिहार - ट्रॅक्टर पलटल्याने झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू तर 24 जण जखमी
२८- आसाममध्ये सकाळी ६ वाजून ४४ मिनिटांनी जाणवले ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२९- एकाच वेळी 100 शहरांत अक्षयच्या 'हाऊसफुल 3' चा ट्रेलर लाँच
३०- आयपीएलमध्ये रोहितच्या मुंबई इंडिसन्सचा तिसरा पराभव
३१- मोगलीच्या 'द जंगल बुक'ची दहा दिवसांत जबरदस्त कमाई
३२- दिल्लीत एकाच रात्री 2 सिलेंडर स्फोट, 6 मृत्युमुखी 35 जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३३- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून दीड हजाराची लाच घेणाऱ्या कनिष्ठ लिपिकास अटक
३४- युवा नांदेडने घेतले दुष्काळमुक्तीसाठी वादेपुरी गाव दत्तक
३५- महावीर जन्मोत्सव निमित्त नांदेड शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रम
३६- उज्जैन येथील कुंभमेळ्यासाठी नांदेडहून दोन विशेष गाड्या
३७- नाम फाऊंडेशनतर्फे मालेगावला नाला सरळीकरणाचे काम सुरु
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
गोपीनाथ मुत्नेपवाड, प्रभाकर पवार, विजय ढाकणे, कैलाश ठाकूर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
रागाला जिंकण्याच्या एकमेव उपाय "मौन"
(सचिन चव्हाण, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
==================================================

100 शहरांमध्ये एकाच वेळी ‘हाऊसफुल 3’चा ट्रेलर लाँच करण्यात येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या शहरातील सुमारे 50 हजार प्रेक्षकांना एकाच वेळी हा ट्रेलर पाहता येईल.
मुंबईतील ट्रेलर लाँच चित्रपटात भूमिका साकारणारे अभिनेते अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाकरी आणि लिजा हेडन यांच्यासोबत दिग्दर्शक नाडियाडवाला उपस्थित राहतील.
मुंबईसोबत नाशिक, ग्वालियर, उदयपूर, रायपूर, राजकोट, सुरत, कोटा, पाटणा, गया, रांची, जमशेदपूर आणि बनारस यासारख्या 100 शहरांमध्ये ‘हाउसफुल-3’चा ट्रेलर लाँच होईल.
ट्रेलर लाँचनंतर सर्व कलाकार उपस्थितांना एक खास मेसेज देणार आहेत. दिग्दर्शकानेही सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर असल्याचं सांगितलं आहे. ‘हाउसफुल-3’ तीन जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

अतुल्य भारतचा माजी ब्रँड अॅम्बेसेडर आमीर खानसोबतचा करार संपल्यानंतर अमिताभ बच्चन आणि प्रियंका चोप्रा यांच्या खांद्यावर ही धुरा देण्यात येणार होती. शिवाय थेट मंत्रालयातून अतुल्य भारत अभियानाच्या जाहिरातींसाठी हा करार करण्यात येणार आहे. मात्र जगभरात खळबळ माजवणाऱ्या पनामा पेपर्सनुसार कर चुकवण्यासाठी परदेशात गुंतवणूक करणाऱ्यांच्या यादीत अमिताभ बच्चन यांचं नाव आलं आणि सरकारने सावध पावलं उचलण्याचा निर्णय घेतला.
पनामा पेपर्सच्या गौप्यस्फोटानंतर अर्थ मंत्रालयाने चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अहवालानंतर आता मंत्रालय यासंदर्भात निर्णय घेणार आहे. मात्र तूर्तास बिग बी यांच्या नावाचा विचार सोडून देण्यात आला आहे. प्रियंका चोप्रा अतुल्य भारतची एकमेव ब्रँड अॅम्बेसेडर असेल.

पंजाब प्रांतातील सिंधू नदीच्या 10 किमी परिसरातील एका बेटावर या गँगने 24 पोलिसांनाच ओलिस ठेवल्याची माहिती आहे. छोटू गँगकडे मोठा शस्त्रसाठा असल्यामुळे पाकिस्तानी सैन्यातील दोन हजार जवानांना या मोहिमेत सहभागी करुन घेण्यात आलं आहे.
सोमवारी सैन्यातील जवानांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बेटावर उतरवण्यात आलं. दुपारी दोन वाजता छोटू गँगला शरण येण्यास सांगितलं गेलं, मात्र त्यांनी दाद न दिल्यामुळे सर्च ऑपरेशन सुरु ठेवण्यात आलं. यात 6 पोलिस शहीद झाले आहेत.
छोटू गँगमध्ये नेमके किती जण आहेत, याची माहिती पोलिसांकडेही नाही. मात्र हे सर्च ऑपरेशन दोन आठवडे चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छोटू गँगवर हत्या, अपहरण, लूटमार यासारखे शेकडो गुन्हे दाखल आहेत.

पीएफची रक्कम काढताना त्यावर कर आकारण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी ठेवण्यात आला होता. मात्र याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यामुळे केंद्राने हा प्रस्ताव मागे घेतला. त्यापैकी संपूर्ण रक्कम काढता न येण्याचा निर्णय कायम राखण्यात आला आहे. तो 1 मे पासून लागू करण्यात येईल.
आतापर्यंत असलेल्या नियमानुसार कर्मचारी नोकरी सोडल्यावर दोन महिने बेरोजगार राहिल्यास त्याला पूर्ण रक्कम काढता येत असे. आता मात्र अशा कर्मचाऱ्यांना ‘पीएफ’मध्ये फक्त पगारातून जमा झालेली रक्कम मिळू शकेल. मालक किंवा कंपनीकडून आलेली रक्कम काढता येणार नाही. हा नवीन नियमही 1 मे पासून लागू होणार आहे.
महिलांना सवलत
कामगार मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्याबाबत विशेष सवलत दिली आहे. यानुसार जर कोणत्याही महिलेने लग्न, गरोदरपण तसंच बाळाच्या जन्मासारख्या कारणांसाठी नोकरी सोडली असेल, तर दोन महिन्यांच्या कालावधीनंतरही संपूर्ण रक्कम मिळू शकेल.

गांधीनगरच्या कैलाशनगर परिसरात तीनमजली इमारतीत संध्याकाळी 7 च्या सुमारास पहिला स्फोट झाला. स्फोटामुळे संपूर्ण इमारतीला आगीच्या ज्वाळांनी वेढलं. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार समोरच्या इमारतीचा काही भाग खाली कोसळून रहिवासी जखमी झाले.
सनलाईट कॉलनीत रात्री 8.30 वाजता एका तीनमजली इमारतीत दुसरा स्फोट झाला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तिसऱ्या मजल्यावरील एक महिला आणि तिच्या दोन मुलींचा समावेश आहे.

धक्कादायक बाब म्हणजे पंकजा मुंडे याही संचालक होत्या. आता त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. दारु कारखान्यांचं पाणी तोडू नका या पंकजा मुंडेंच्या वक्तव्याला वैयक्तिक स्वार्थाची किनार असल्याचं चित्र आहे.
‘लोकांना प्यायला पाणी नसताना स्वतःच्या बिअर कारखान्यासाठी पाणी वापरुन दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ लावणाऱ्यांनो जनता तुम्हाला माफ करणार नाही’ असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

पुण्यातील तरुणीचा मृत्यू बसच्या धडकेत नाही : पोलिस
पुणे : पुण्यातील तरुणीचा मृत्यू महापालिकेच्या बसच्या धडकेत नव्हे तर दुभाजकाला धडकून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीनंतर पोलिसांनी ही माहिती दिली.
सिंहगड रस्त्यावर राजाराम पुलाजवळ तिचा अपघात झाला. यानंतर अॅक्टिव्हास्वार तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यानंतर पालिकेच्या असंवेदनशील कारभाराचा कळस पाहायला मिळाला. अपघातानंतर तरुणीचा मृतदेह पाऊण तास रस्त्यावर तसाच पडून होता. अपघातामुळे रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. त्यानंतर अखेर तिचा मृतदेह उचलण्यासाठी रुग्णवाहिका आली.
==================================================
आत्महत्येपूर्वी प्रत्युषाने गर्भपात केला होता : डॉक्टर
मुंबई : टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात जेजे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे. प्रत्युषा गर्भवती होती, मात्र आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी तिने गर्भपात केला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ‘बालिका वधू’ या मालिकेत आनंदीची भूमिका साकारलेल्या 24 वर्षीय प्रत्युषाने 1 एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
गर्भाशयाच्या ऊतींची हिस्टोपॅथॉलॉजिकल चाचणीनंतर ही बाब समोर आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आत्यहत्येच्या काही दिवस किंवा महिनाभरआधी प्रत्युषाला गर्भधारणा झाली होती. शिवाय गर्भाचा मृत्यू झाल्याचं या चाचणीतून समोर आलं आहे. मात्र गर्भ नेमकं किती दिवसांचं होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
==================================================
एकाच वेळी 100 शहरांत अक्षयच्या 'हाऊसफुल 3' चा ट्रेलर लाँच
मुंबई : अक्षयकुमारची भूमिका असलेल्या ‘हाऊसफुल 3’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच अत्यंत भव्य पद्धतीने करण्याचा घाट घालण्यात येत आहे. एकाच वेळी 100 शहरांमध्ये सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्याचा दिग्दर्शक साजिद नाडियादवालांचा मानस आहे.
100 शहरांमध्ये एकाच वेळी ‘हाऊसफुल 3’चा ट्रेलर लाँच करण्यात येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या शहरातील सुमारे 50 हजार प्रेक्षकांना एकाच वेळी हा ट्रेलर पाहता येईल.
मुंबईतील ट्रेलर लाँच चित्रपटात भूमिका साकारणारे अभिनेते अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाकरी आणि लिजा हेडन यांच्यासोबत दिग्दर्शक नाडियाडवाला उपस्थित राहतील.
मुंबईसोबत नाशिक, ग्वालियर, उदयपूर, रायपूर, राजकोट, सुरत, कोटा, पाटणा, गया, रांची, जमशेदपूर आणि बनारस यासारख्या 100 शहरांमध्ये ‘हाउसफुल-3’चा ट्रेलर लाँच होईल.
ट्रेलर लाँचनंतर सर्व कलाकार उपस्थितांना एक खास मेसेज देणार आहेत. दिग्दर्शकानेही सिनेमाच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर असल्याचं सांगितलं आहे. ‘हाउसफुल-3’ तीन जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
==================================================
बिग बींना अतुल्य भारतचे ब्रँड अॅम्बेसेडर करण्यास स्थगिती
नवी दिल्ली : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना ‘अतुल्य भारत’ अभियानाचे ब्रँड अॅम्बेसेडर करण्याला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. पनामा पेपर्स प्रकरणात बिग बी यांचं नाव आल्यामुळे या निर्णय टाळण्यात आला आहे.
अतुल्य भारतचा माजी ब्रँड अॅम्बेसेडर आमीर खानसोबतचा करार संपल्यानंतर अमिताभ बच्चन आणि प्रियंका चोप्रा यांच्या खांद्यावर ही धुरा देण्यात येणार होती. शिवाय थेट मंत्रालयातून अतुल्य भारत अभियानाच्या जाहिरातींसाठी हा करार करण्यात येणार आहे. मात्र जगभरात खळबळ माजवणाऱ्या पनामा पेपर्सनुसार कर चुकवण्यासाठी परदेशात गुंतवणूक करणाऱ्यांच्या यादीत अमिताभ बच्चन यांचं नाव आलं आणि सरकारने सावध पावलं उचलण्याचा निर्णय घेतला.
पनामा पेपर्सच्या गौप्यस्फोटानंतर अर्थ मंत्रालयाने चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अहवालानंतर आता मंत्रालय यासंदर्भात निर्णय घेणार आहे. मात्र तूर्तास बिग बी यांच्या नावाचा विचार सोडून देण्यात आला आहे. प्रियंका चोप्रा अतुल्य भारतची एकमेव ब्रँड अॅम्बेसेडर असेल.
पनामा पेपर्स लिक प्रकरणी अमिताभ बच्चन यांनी मात्र आरोप फेटाळून लावले आहेत. जगभरातल्या श्रीमंतांच्या काळ्या पैशाचा पर्दाफाश करणाऱ्या या पेपर्स लीक प्रकरणामुळे अमिताभ बच्चनही अडचणीत आले आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’ वर्तमानपत्राच्या बातमीत छापून आलेल्या सी बल्क शिपिंग कंपनी लिमिटेड, लेडी शिपिंग लिमिटेड, ट्रेजर शिपिंग लिमिटेड या कंपन्यांमधील कोणालाही मी ओळखत नाही. तसेच यातील कोणत्याही कंपनीत मी संचालक नाही, असं म्हणत बि बींनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
आपल्या नावाचा दुरुपयोग करण्यात आल्याची शक्यताही अमिताभ बच्चन यांनी बोलून दाखवली आहे. बिग बींनी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे.
जगभरातल्या पत्रकारांनी मिळून पनामा पेपर्स या नावाने ब्लॅकमनी साठवण्याच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. पत्रकारितेच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट मानला जातो. पनामा पेपर्स या नावाने केलेला हा गौप्यस्फोट जगभरात चर्चेचा विषय आहे.
==================================================
छोटू गँगमुळे पाक सैन्याच्या नाकी नऊ, 2 हजार जवान टोळक्याच्या शोधात
फोटो सौजन्य : दैनिक भास्कर
इस्लामाबाद : गँगस्टर्सच्या एका टोळीने पाकिस्तानी सैन्याच्या नाकी नऊ आणले आहेत. राजनपूर गँगस्टर्स म्हणजेच छोटू गँग नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सशस्त्र टोळीला जेरबंद करण्यासाठी दोन हजार पाकिस्तानी जवान तैनात करण्यात आले आहेत.
पंजाब प्रांतातील सिंधू नदीच्या 10 किमी परिसरातील एका बेटावर या गँगने 24 पोलिसांनाच ओलिस ठेवल्याची माहिती आहे. छोटू गँगकडे मोठा शस्त्रसाठा असल्यामुळे पाकिस्तानी सैन्यातील दोन हजार जवानांना या मोहिमेत सहभागी करुन घेण्यात आलं आहे.
सोमवारी सैन्यातील जवानांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बेटावर उतरवण्यात आलं. दुपारी दोन वाजता छोटू गँगला शरण येण्यास सांगितलं गेलं, मात्र त्यांनी दाद न दिल्यामुळे सर्च ऑपरेशन सुरु ठेवण्यात आलं. यात 6 पोलिस शहीद झाले आहेत.
छोटू गँगमध्ये नेमके किती जण आहेत, याची माहिती पोलिसांकडेही नाही. मात्र हे सर्च ऑपरेशन दोन आठवडे चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छोटू गँगवर हत्या, अपहरण, लूटमार यासारखे शेकडो गुन्हे दाखल आहेत.
==================================================
म्हाडाच्या मुंबईतील घरांची जाहिरात मे महिन्यात!
मुंबई : म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठीची लॉटरी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण गिरणी कामगारांसाठी असलेल्या घरांच्या लॉटरीनंतर मुंबई मंडळाच्या लॉटरीची जाहिरात येणार आहे, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे यांनी दिली.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील घरांसाठी म्हाडाच्या लॉटरीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. तर मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हाडाच्या घरांची लॉटरी जाहीर होणार आहे.
मुंबईत सर्वसामान्यांसाठी सुमारे हजार घरं असतील, अशी शक्यता आहे. मात्र अद्याप संख्या निश्चित झाली नाही. गोरेगावमध्ये यंदा सर्वात जास्त घरं असून, गोरेगावमधील सिद्धार्थ नगर 1 आणि 2 मधील घरांसाठी लॉटरी निघणार आहे. त्याचसोबत, मुलुंडमध्येही या लॉटरीत म्हाडाची घरं असणार आहेत.
==================================================
एप्रिलअखेरपर्यंतच पूर्ण पीएफ काढणे शक्य
मुंबई : नोकरदार वर्गाला पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधीची संपूर्ण रक्कम काढायची असल्यास एप्रिलअखेर पर्यंतच काढता येणार आहे. एक मे नंतर कर्मचाऱ्यांना वयाची 58 वर्ष पूर्ण केल्यानंतरच पीएफची संपूर्ण रक्कम काढता येणे शक्य होणार आहे.
पीएफची रक्कम काढताना त्यावर कर आकारण्याचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी ठेवण्यात आला होता. मात्र याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यामुळे केंद्राने हा प्रस्ताव मागे घेतला. त्यापैकी संपूर्ण रक्कम काढता न येण्याचा निर्णय कायम राखण्यात आला आहे. तो 1 मे पासून लागू करण्यात येईल.
आतापर्यंत असलेल्या नियमानुसार कर्मचारी नोकरी सोडल्यावर दोन महिने बेरोजगार राहिल्यास त्याला पूर्ण रक्कम काढता येत असे. आता मात्र अशा कर्मचाऱ्यांना ‘पीएफ’मध्ये फक्त पगारातून जमा झालेली रक्कम मिळू शकेल. मालक किंवा कंपनीकडून आलेली रक्कम काढता येणार नाही. हा नवीन नियमही 1 मे पासून लागू होणार आहे.
महिलांना सवलत
कामगार मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्याबाबत विशेष सवलत दिली आहे. यानुसार जर कोणत्याही महिलेने लग्न, गरोदरपण तसंच बाळाच्या जन्मासारख्या कारणांसाठी नोकरी सोडली असेल, तर दोन महिन्यांच्या कालावधीनंतरही संपूर्ण रक्कम मिळू शकेल.
==================================================
चौथ्या गोळीवर तुमचं नाव नको, साहित्यिक सुभाष देसाईंना धमकी
कोल्हापूर : कोल्हापुरातील ज्येष्ठ साहित्यिक सुभाष देसाईंना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सनातन धर्माला विरोध करु नका, अन्यथा तीन गोळ्यांनी ज्याप्रकारे अचूक वेध घेतला, तसं चौथ्या गोळीवर तुमचं नाव नको, अशी धमकी पत्रात देण्यात आली आहे.
तसंच भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई थोडक्यात बचावल्या, असा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे.
दरम्यान, या पत्रामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. डॉ. देसाई यांनी या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात तक्रार नोंदवली असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय लिहिलं आहे पत्रात?
महालक्ष्मी ही महालक्ष्मी नसून अंबाबाई आहे. शिवाय ती शिवपत्नी आहे. विष्णूपत्नी नाही, असे तुमचे म्हणणे आहे, ते तुमच्या पुरतेच ठेवा. याला तुम्ही प्रबोधन वगैरे म्हणत असाल पण असले प्रबोधन करणाऱ्यांचा शेवट कोल्हापुरात कसा झाला हे सांगायला नको. साळोखे नगरातील घरी तुम्ही असता. त्यामुळे आम्हाला तुमची काळजी वाटते. ऑफिसमध्येही जरा सांभाळून राहा, कारण आजूबाजूचे लोकही मदत करतील असे वाटत नाही. सनातन धर्माला, सनातन परंपरेला आणि पुरोहितांना विरोध करु नका. आमच्या तीन गोळ्यांनी अचूक वेध घेतलाय. चौथ्या गोळीवर स्वत:चे नाव लिहून घेण्याचा अट्टाहास सोडा. नशिबाने एक देसाई वाचली, दुसऱ्या देसाईचे नशिब साथ देईलच असे नाही.
एक हितचिंतक
==================================================
आयपीएलमध्ये रोहितच्या मुंबई इंडिसन्सचा तिसरा पराभव
हैदराबाद : आयपीएलच्या रणांगणात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला आज तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून आपलं गुणांचं खातं उघडलं.
हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णधार डेव्हिड वॉर्नर. या सामन्यात मुंबई इंडियन्सने हैदराबादला विजयासाठी 143 धावांचं आव्हान दिलं होतं. डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद 90 धावांच्या खेळीच्या जोरावर हैदराबादने 15 चेंडू आणि सात विकेट्स राखून विजयासाठीचं लक्ष्य पार केलं.
मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा शिखर धवन पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतला. पण डेव्हिड वॉर्नरने मोझेस हेन्ऱिक्सच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी रचली आणि हैदराबादचा डाव सावरला. मग वॉर्नरने इयान मॉर्गनच्या साथीने 34 धावांची आणि दीपक हुडाच्या साथीने 45 धावांची अभेद्य भागीदारी रचून हैदराबादला विजय मिळवून दिला.
डेव्हिड वॉर्नरने 59 चेंडूंत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 90 धावांची खेळी उभारली. मुंबई इंडियन्सकडून टिम साऊदीने तीन फलंदाजांना माघारी धाडलं.
त्याआधी हैदराबादच्या गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सला 20 षटकांत सहा बाद 142 धावांवर रोखलं होतं. मुंबई इंडियन्ससाठी अंबाती रायुडूने 54 आणि कृणाल पंड्याने नाबाद 49 धावांची खेळी केली. हैदराबादकडून बरिंदन सरनने सर्वाधिक तीन विकेट्स काढल्या.
==================================================
मोगलीच्या 'द जंगल बुक'ची दहा दिवसांत जबरदस्त कमाई
मुंबई : हॉलिवूड दिग्दर्शक जॉन फेवरो दिग्दर्शित ‘द जंगल बुक’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर केवळ दहा दिवसात सिनेमाने 100 कोटींहून अधिक रुपयांचा गल्ला जमवला आहे.
‘द जंगल बुक’ पहिल्यांदा भारतात रिलीज झाला. 8 एप्रिलला भारतात प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट आठवडाभराने अमेरिकेत रिलीज झाला.
‘द जंगल बुक’ आणखी सुसाट, विकेंडला बक्कळ कमाई
भारतीय बॉक्स ऑफिसवर द जंगल बुकने आतापर्यंत 101.82 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाने पहिल्याच आठवड्यात 40.19 रुपये कमावले होते.
ना 100, ना 200, ना 300 कोटी, अवघ्या सात दिवसात ‘द जंगल बुक’ची कमाई…
बॉलिवूड ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, “‘द जंगल बुक’च्या कमाईचा वेग दुसऱ्या आठवड्यात कायम आहे. चित्रपटाने शुक्रवारी 8.02 कोटी, शनिवारी 8.51 कोटी आणि रविवारी 10.67 कोटी रुपये कमावले. एकूण कमाई 101.82 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जबरदस्त
==================================================
दिल्लीत एकाच रात्री 2 सिलेंडर स्फोट, 6 मृत्युमुखी 35 जखमी
नवी दिल्ली : राजधानी दिल्ली सिलेंडर स्फोटाच्या दोन घटनांनी हादरली आहे. गांधीनगर आणि सनलाईट कॉलनी परिसरात झालेल्या सिलेंडर स्फोटात 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, 35 हून अधिक जण जखमी आहेत.
गांधीनगरच्या कैलाशनगर परिसरात तीनमजली इमारतीत संध्याकाळी 7 च्या सुमारास पहिला स्फोट झाला. स्फोटामुळे संपूर्ण इमारतीला आगीच्या ज्वाळांनी वेढलं. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार समोरच्या इमारतीचा काही भाग खाली कोसळून रहिवासी जखमी झाले.
सनलाईट कॉलनीत रात्री 8.30 वाजता एका तीनमजली इमारतीत दुसरा स्फोट झाला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तिसऱ्या मजल्यावरील एक महिला आणि तिच्या दोन मुलींचा समावेश आहे.
==================================================
मद्यकारखान्यांना पाण्याबाबतचं पंकजांचं वक्तव्य स्वार्थातून?
मुंबई : ‘पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे हे रॅडिको डिस्टिलरीचे संचालक आहेत. शेंद्रा एमआयडीसीत रॅडिको डिस्टिलरी आहे. या कारखान्याला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो’, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे पंकजा मुंडे याही संचालक होत्या. आता त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. दारु कारखान्यांचं पाणी तोडू नका या पंकजा मुंडेंच्या वक्तव्याला वैयक्तिक स्वार्थाची किनार असल्याचं चित्र आहे.
‘लोकांना प्यायला पाणी नसताना स्वतःच्या बिअर कारखान्यासाठी पाणी वापरुन दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ लावणाऱ्यांनो जनता तुम्हाला माफ करणार नाही’ असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
“दारु किंवा उद्योगधंद्याना देण्यात येणारं पाणी हे आरक्षित केलेलं असतं. त्यामुळे अशा उद्योगांचं पाणी बंद करणं अयोग्य होईल. त्यांना जर पिण्याचं पाणी देण्यात येत असेल तर बंद करावं”, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं. मात्र या मुद्यावरुन टीकेचे धनी झालेल्या पंकजा मुंडे रविवारी माध्यमांवरच भडकल्या. प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्त्तव्याचा विपर्यास केला असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला.
==================================================
बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा वाद, उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी हायकोर्टाला अमान्य
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावर सुरू असलेल्या सुनावणीत जयदेव ठाकरे यांनी सादर केलेल्या ठाकरे कुटुंबियांच्या माहितीची नोंद करून घेऊ नये, ही उद्धव ठाकरे यांची मागणी उच्च न्यायालयाने अमान्य केली आहे.
मृत्यूपत्राच्या वादात कुटुबियांचा तपशील देणे व्यवहार्य नाही व त्याचा काही उपयोग नाही. तेव्हा जयदेव यांनी सादर केलेल्या कुटुंबियांच्या माहितीची नोंद करून घेऊ नये, अशी मागणी करणारा अर्ज उद्धव यांनी केला होता. त्यावर न्यायाधीश गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने उद्धव यांची मागणी मान्य केली नाही. जयदेव यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी कुटुंबियांची माहिती दिली आहे. त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही, असे नमूद करत न्यायालयाने हा अर्ज निकाली काढला.
जयदेव यांनी कुटुंबियांच्या माहितीसह बाळासाहेबांशी संबंधित नऊ कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत. बाळासाहेबांवर लिलावती रूग्णालयात सुरू होते. याविषयीच्या कागदपत्रांची न्यायालयाने नोंद करून घेतली व इतर कागदपत्रे तपासणीसाठी न्यायालय प्रशासनाकडे पाठवली.
सोमवारीच्या सुनावणीसाठी जयदेव हे न्यायालयात हजर होते. त्यांची उद्धव यांचे वकील उलटतपासणी घेणार होते. मात्र आजच्या सुनावणीला राहू शकत नाही, असे जयदेव यांनी कळवले होते. त्यामुळे ऐनवेळी त्यांची उलटतपासणी घेऊ शकत नाही, असे उद्धवे यांच्या वकीलांनी स्पष्ट केले.
17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेबांचे निधन झाले. त्यांचे मृत्यूपत्र प्रमाणित करून घेण्यासाठी उद्धव यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावर जयदेव यांनी आक्षेप घेतल्याने यावर न्यायाधीश पटेल यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. हे मृत्यूपत्र तयार करताना बाळासाहेबांची प्रकृती खालावलेली होती. त्यांची दिशाभूल करून हे मृत्यूपत्र तयार करण्यात आले आहे. मृत्यूपत्र प्रामणित करून घेण्यासाठी उद्धव हे न्यायालयात अर्ज करू शकत नाही, असा दावा जयदेव यांनी केला आहे.
==================================================
दंगलीत सहभागी प्रत्येक व्यक्ती तितकीच जबाबदार - गुजरात उच्च न्यायालय
- ऑनलाइन लोकमत -अहमदाबाद, दि. १९ - दंगलीत सहभागी झालेली प्रत्येक व्यक्ती तितकीच जबाबदार असल्याच मत गुजरात उच्च न्यायालयाने मांडलं आहे. गर्दीत सहभागी असलेल्या एका व्यक्तीने गुन्हा केल्यास त्याची जबाबदारी त्याठिकाणी उपस्थित सर्वांचीच असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. अहमदाबादमधील शाह-ए-आलम परिसरातील हत्या, दरोडा आणि दंगल प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या 13 वर्षीय जुन्या प्रकरणातील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे मत मांडलं आहे.2003मध्ये जमावाने प्रवाशांना मारहाण केली होती, दरोडा टाकला होता तसंच मुकेश पांचाळ या व्यक्तीची हत्या केली होती. याप्रकरणी 12पैकी 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात अर्ज करण्यात आला आहे.'दंगलींच्या प्रकरणांना व्यवस्थित हाताळणे गरजेचे आहे. दंगलींमध्ये मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटना नेहमी समोर येत असतात.दंगलींमध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी असतात. मात्र त्यातील एखाद्या कट्टर व्यक्तीवर पुरावे अवलंबून असतात. अशावेळी निर्दोष लोकांना शिक्षा होण्याचीदेखील शक्यता असते. आपल्या शत्रुंना यामध्ये गोवण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात', असं मत न्यायाझीश झवेरी आणि शाह यांच्या खंडपीठाने मांडलं आहे.'बेकायदेशीररित्या एखाद्या गोष्टीविरोधात निदर्शन करण्यासाठी जमलेल्या जमावापैकी एका व्यक्तीने जरी गुन्हा केला तरी कायद्याप्रमाणे जमावातील प्रत्येक व्यक्ती त्या गुन्ह्यासाठी जबाबदार असल्याचंही', न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं आहे. आरोपी फक्त प्रेक्षत होते हा बचावपक्षाचा दावा न्यायालयाने फेटाळला आहे. 'शहरात भीती निर्माण करण्याचा त्यांचा उद्धेश स्पष्ट होता', असं न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयाने आरोपींची जन्मठेपेची शिक्षा रद्द केली असून 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
==================================================
देशाची अवस्था देवनार डंपिंग ग्राऊंडसारखी, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि, १९ - पटेल आरक्षणाच्या मुद्यावर गुजरातमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सामना संपादकीयमधून टीका केली आहे. देशाची अवस्था देवनार डंपिंग ग्राऊंडसारखी झाली आहे. वरवर आग विझलेली दिसत असली तरी कचर्याच्या ढिगार्याखाली धुमसणे सुरूच आहे. त्यामुळे अचानक आगीचे भडके उडत आहेत. फक्त राजकीय छूमंतर किंवा आश्वासनांची फवारणी करून या आगीचे लोळ विझणार नाहीत असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलं आहे.पंतप्रधान मोदी हे जागतिक शांततेची ज्योत घेऊन जगभ्रमण करीत आहेत. देशोदेशीचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्याशी हस्तांदोलन किंवा आलिंगन देतानाची छायाचित्रे प्रसिद्ध होत आहेत, पण खुद्द त्यांचे गुजरात पेटले असून पटेल समुदायाने भडका उडवला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मेहसाणामध्येच सगळ्यात जास्त भडका उडाला आहे व तेथे संचारबंदी लागू करून पोलिसी दडपशाही सुरू आहे. हिंदुस्थानातील जनतेच्या मनात नेमकी काय खदखद चालली आहे त्याचे चित्र गुजरातमध्ये दिसावे हे दुर्दैवच म्हणायला हवे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
==================================================
काबुलमधील पुली महमूद खान परिसरात स्फोट
- ऑनलाइन लोकमत -काबूल, दि. १९ - पुली महमूद खान परिसरात मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचं जवळ असलेल्या अमेरिकी दुतावासातून दिसत आहे. स्फोटामुळे अमेरिकी दुतावासाला मात्र कोणतच नुकसान झालेलं नाही. नाटोचे मुख्यालयदेखील जवळ आहे. मुख्यालयदेखील सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. स्फोट नेमका कसा झाला ? याची नेमकी माहिती अजून मिळू शकलेली नाही. पण शहरावर रॉकेट हल्ले नेहमी होत असतात त्यामुळे हा रॉकेट हल्ला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
==================================================
रेल्वे प्रकल्पावर ड्रोनद्वारे नजर
- नवी दिल्ली : महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रथमच रेल्वे ड्रोनचा वापर केला असून, आता अन्य निर्माणाधीन योजनांवर निगराणी ठेवण्याच्या उद्देशाने या उडत्या मानवरहित हवाई वाहनाचा वापर केला जाणारआहे.डेडिकेटेड फ्रीट कॉरिडोरच्या (डीएफसी) निरीक्षणासाठी पहिल्यांदाच सुनियोजितरीत्या ड्रोनचा वापर झाला. हा प्रयोग अन्य अंमलबजावणी होत असलेल्या सर्व प्रकल्पांसाठी केला जाणार आहे. रेल्वे अपघातानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठीही रेल्वेने हवाई सर्वेक्षणाचा आधार घेण्याचे ठरविले आहे. ड्रोन हे खरे तर उडता रोबो आहे. तो सुदूर नियंत्रित सॉफ्टवेअरच्या आधारे उडविला जातो. जीपीएसशी (ग्राऊंड पोझिशनिंग सिस्टीम) तो जोडलेला असतो. हवाई सर्वेक्षणासाठी एका खासगी आॅपरेटरकडून ड्रोन तीन हजार प्रति कि.मी. या दराने भाड्याने घेण्यात आले होते. सध्या दुहेरीकरण आणि नवे मार्ग अशा १७० प्रकल्पांचे काम सुरू आहे. दुर्गावती- सासाराम डीएफसीच्या संबंधित खंडाचे काम पूर्ण झाले. हा कॉरिडोर संचालित होण्यापूर्वी रेल्वे सुरक्षा मंजुरीची प्रतीक्षा आहे
==================================================
महाराष्ट्र दिनी फडकवणार विदर्भाचा झेंडा
- योगेश पांडे, नागपूरवेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीची हाक संपूर्ण देशात जावी, यासाठी १ मे रोजी विदर्भवादी संघटनांतर्फे सर्व ११ जिल्ह्यांतील मुख्यालयी विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येणार असून महाराष्ट्र दिनी संपूर्ण विदर्भात काळा दिवस पाळण्यात येणार आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे हे स्वत: नागपूरात विदर्भाचा झेंडा फडकविणार आहेत.१ मे १९६० रोजी विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला अन् त्यानंतर शासनाने नागपूर कराराचे पालनच केलेले नाही. विदर्भाकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले.वेगळ्या विदर्भाची भूमिका घराघरामध्ये जावी व नागरिकांचे जास्तीतजास्त समर्थन मिळावेयासाठी विदर्भवादी संघटनांकडून१ मे रोजी काळा दिवस पाळण्यात येणार आहे, अशी माहिती अशी माहिती ‘विदर्भ कनेक्ट’चे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ यांनी दिली. राज्याचे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
==================================================
बारमध्ये महिला कामगार ‘डान्सर’
- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईउत्पादन शुल्क विभागाकडून बारसाठी दिल्या जाणाऱ्या नोकरनाम्यात धोरणात्मक बदलाची गरज निर्माण झाली आहे. एका बारसाठी किमान आवश्यकपुरुष व महिला कामगारांची खातरजमा न करताच नोकरनामे होत आहेत. यामुळे नोकरनाम्यात समावेश असलेल्या जादा महिलांचा वापर बारमध्ये अनैतिक प्रकारासाठी होत आहे.बारमालकाकडून सादर केलेल्या नोकरनाम्यावर केवळ शिक्कामोर्तब करण्याचे काम सद्यस्थितीला सुरू आहे. या अनागोंदी कारभाराचा पुरेपूर फायदा बारमालकांकडून घेतला जातोे. बहुतांश बार अपुऱ्या व अडचणीच्या जागेत चालवले जात असून त्याठिकाणी ३० ते ३५ ग्राहक बसतील एवढीच बैठक व्यवस्था आहे. यानुसार प्रत्येक टेबलकरिता एक किंवा दोन याप्रमाणे १० ते १५ कामगारांची त्याठिकाणी आवश्यकता असते. छोट्याशा लेडीज सर्व्हिस बारमध्येही गरजेपेक्षा जादा महिला कामगार असल्याने विनापरवाना डान्सबारमध्ये डान्सर म्हणून किंवा देहविक्रीसाठी त्यांचा वापर होण्याची शक्यता असते. तसे चित्रही पोलिसांच्या यापूर्वीच्या कारवायांमध्ये समोर आलेले आहे. परंतु कारवाईवेळी नोकरनाम्याच्या आधारावर त्यांची सहज सुटका होते. यामुळे बारची पाहणी करून बारसाठी गरजेइतक्याचा कामगारांना मंजुरी मिळणे आवश्यक आहे. याकरिता नोकरनाम्याच्या प्रक्रियेत धोरणात्मक बदलाची गरज निर्माण झाली आहे.
==================================================
‘मिस कॉल’ सदस्यांचा भाजपाला विसर
- अनिकेत घमंडी, डोंबिवली (ठाणे)तब्बल १० कोटी सदस्यांची नोंदणी करून जगभरातील सर्वच राजकीय पक्षांचे सदस्य नोंदणीचे विक्रम मोडीत काढणाऱ्या भाजपाला बिहारबरोबरच काही राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पराभवाचा फटका बसल्याने आता आपल्या सदस्यांची शोधाशोध पक्षाने सुरू केली आहे.‘मिस कॉल’ देऊन पक्षसदस्य बनलेल्या बहुतांश मंडळींना प्रत्यक्ष भेटण्याचा विसर भाजपाला पडल्याने हे हवशे-गवशे कमळाला मत देण्याचे विसरून गेले, असे आता पक्षाच्या निदर्शनास आले आहे. या ‘मिस कॉल’ घोळाची मंगळवारी दिल्लीत झाडाझडती घेतली जाणार आहे. देशभरात नोव्हेंबरमध्ये महाजनसंपर्क अभियान राबवले गेले. त्याअंतर्गत राज्य, जिल्हा, तालुका, शहर, गावस्तरावर सदस्य नोंदणी करण्यात आली. मंत्री, नेते, उपनेते, पदाधिकारी आदींना सदस्य नोंदणीचे लक्ष्य दिले होते. त्यामुळे भाजपाची मंडळी मिस कॉल देऊन सदस्य होण्याचा आग्रह धरीत होती. त्या लोकांना गाठून त्यांना पक्षकार्यात आणण्याची जबाबदारी मात्र विसरल्याचे काही निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले. विशेषत: बिहार निकालानंतर ही बाब चर्चेत आली होती. मात्र, आता ठिकठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पराभव पदरी आल्यावर या सदस्य नोंदणीचे बिंग फुटले
==================================================
संघाची विचारसरणी देशाच्या हिताची नाही
- पाटणा : देशात सहिष्णुता असणे आवश्यक असून, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे दोघे मिळून असहिष्णुतेचे वातारण निर्माण करीत आहेत, त्यातून देशातील शांतता आणि सद्भाव यांना धक्का पोहोचला आहे. एकूणच संघ आणि भाजप यांची विचारसरणी देशाच्या हिताची नाही, असे प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी केले.दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकांच्या वेळी भाजपने जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण करण्यात त्या पक्षाला अपयश आले आहे. त्यामुळे त्यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी शांतता आणि सद्भाव यांनाच धक्का देत समाजामध्ये असहिष्णुता निर्माण केली जात आहे, असे सांगून ते म्हणाले की काळा पैसा परत आणण्याची भाषा करणारा हा पक्ष आता गोमांस, जिहाद यासारखे मुद्दे उकरून काढत आहे. आम्ही काही काळ भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी होतो, हे खरे आहे. पण त्यामुळे आम्ही आमच्या विचारसरणीशी कधी समझोता केला नाही, असे ते म्हणाले.
==================================================
पाच राज्यांतून ६२ कोटी ताब्यात
- नवी दिल्ली : ज्या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, तिथून निवडणूक आयोगाच्या पथकांनी आतापर्यंत तब्बल ६२ कोटी रुपये ताब्यात घेतले आहेत. ही सर्व रक्कम बेहिशेबी असून, मतदारांना वाटण्यासाठी ती वापरण्यात येणार होती, असा अंदाज आहे.एकट्या तामिळनाडूमधून निवडणूक आयोगाच्या पथकांनी २४ कोटी ९0 लाख रुपये ताब्यात घेतले आहेत. तामिळनाडूमध्ये पुढील महिन्यात मतदान होणार असून, आता कुठे तिथे प्रचाराला सुरुवात होत आहे. आसाममध्ये दोन टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले आहे, तर पश्चिम बंगालमध्येही मतदानाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून,अद्याप चार टप्प्यांचे मतदान व्हायचे आहे. आसाममधून १२ कोटी ३३ लाख रुपये, तर पश्चिम बंगालमधून १२ कोटी ८४ लाख रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत. केरळमध्येही अद्याप मतदान व्हायचे असून, आतापर्यंत त्या राज्यातून ११ कोटी ७३ लाख रुपये जप्त करण्यात आले. पुडुच्चेरीमध्येही मतदान व्हायचे असून, तेथून ६0 लाख ८८ हजार रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत.हे आकडे रविवारपर्यंतचे असून, पश्चिम बंगालमधून आणखीही काही बेहिशेबी रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. त्याची अद्याप मोजदाद व्हायची आहे.
==================================================
निर्यातीत 5.5% घसरण; 16 महिन्यांचा नीचांक
नवी दिल्ली : अभियांत्रिकी आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत घसरण झाल्यामुळे पुन्हा एकदा मार्च महिन्यात निर्यातीला नुकसान झाले आहे. या महिन्यातील निर्यात 5.5 टक्क्यांनी घसरून 22.7 अब्ज डॉलरवर आली आहे. हा निर्यातीचा सोळा महिन्यांतील नीचांक आहे.
परंतु, या काळात आयातदेखील 21.6 टक्क्यांनी कमी होऊन 27.8 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. सोन्याची आयात 80.5 टक्क्यांनी घसरुन 97.28 कोटी डॉलरवर पोचली आहे. त्यामुळे व्यापार तूटही कमी होऊन 11.4 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. मार्चमध्ये पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात 21.4 टक्क्यांनी कमी होऊन 2.1 अब्ज झाली आहे तर अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात 11.3 टक्क्यांनी कमी होऊन 5.3 अब्ज डॉलर झाली आहे.
जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांप्रमाणेच भारताच्या निर्यातीतदेखील घट झाल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.
गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात निर्यातीत 15.9 टक्क्यांनी घसरण झाली आहे. एप्रिल ते मार्चदरम्यान 261.1 अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. त्यापुर्वीच्या आर्थिक वर्षात 310.3 अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. दरम्यान, आयातदेखील 15.3 टक्क्यांनी घसरुन 379.6 अब्ज डॉलरवर पोचली आहे. त्यामुळे 118.5 अब्ज डॉलरची व्यापारी तूट निर्माण झाली आहे.

मोदी, अहंकाराची स्फोटके बाजूला ठेवा- शिवसेना
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः संपूर्ण जगात शांततेची ज्योत घेऊन फिरत आहेत. परंतु ज्या गुजरातमधून त्यांचे नेतृत्व पुढे आले तिथेच असंतोषाची आग भडकत आहे. अहंकाराची स्फोटके बाजूला ठेवा, अशा शब्दांत शिवसेनेने मोदींना घरचा आहेर दिला आहे.
गुजरातमधील पाटीदार समाजाच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात आणि केंद्र सरकारमध्ये सत्ताधारी घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ‘सामना‘ या मुखपत्रातून सेनेने मोदींवर निशाणा साधला आहे.
"पंतप्रधान मोदी हे जागतिक शांततेची ज्योत घेऊन जगभ्रमण करीत आहेत. देशोदेशीचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्याशी हस्तांदोलन किंवा आलिंगन देतानाची छायाचित्रे प्रसिद्ध होत आहेत, पण खुद्द त्यांचे गुजरात पेटले असून पटेल समुदायाने भडका उडवला आहे. त्यातही पंतप्रधान मोदी यांच्या मेहसाणामध्येच सगळ्यात जास्त भडका उडाला आहे," असे ‘सामना‘च्या अग्रलेखात म्हटले आहे.
गुजरातमध्ये संचारबंदी लागू करून पोलिसी दडपशाही सुरू आहे. हिंदुस्थानातील जनतेच्या मनात नेमकी काय खदखद चालली आहे त्याचे चित्र गुजरातमध्ये दिसावे हे दुर्दैवच म्हणायला हवे.

कोथिंबीर विकणाऱ्याकडून चित्रकलेची भक्ती
पुणे - कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना शिक्षणाबरोबरच चित्रकलेच्या आवडीलाही अक्षरशः मुरड घालावी लागली. स्वस्थ बसून देईल ती कला कसली ! त्यामुळे कोथिंबीर विक्रीचा पिढीजात व्यवसाय सांभाळात त्यांनी गुरूविना या कलेची भक्ती केली. जलरंगासारख्या अवघड प्रकारावरही त्यांनी हुकूमत गाजविली. आता आपली ही कला जगाला पाहता यावी, यासाठी बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन भरविले आहे. या चित्रकाराचे नाव आहे नंदकुमार काची.
चित्रकलेची आवड होती. गुरू, प्रशिक्षण नसतानाही केवळ अनुभव व छंदापोटी ही कला जोपासत गेलो. रंगांचे मिश्रण ओळखण्याची देणगी मिळाली. या कलेने माझ्या जगण्याला अर्थ प्राप्त करून दिला आहे.
- नंदकुमार काची, चित्रकार
काची हे शाळेत असतानाच 1976 मध्ये त्यांचे वडील वारले. त्यामुळे थोरला मुलगा म्हणून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. परिणामी त्यांना शिक्षण व चित्रकलेचा छंदही सोडावा लागला. संसार स्थिरस्थावर झाल्यानंतर 2013 पासून त्यांच्यातील चित्रकार पुन्हा जागा झाला. चित्रकलेविषयीचे प्रश्न, माहिती इंटरनेटवरून घेण्यास सुरवात केली. चित्रकला प्रदर्शनाला भेटी देत चित्रकारांशी संवाद साधत त्यातील बारकावे समजून घेतले. पत्नी राधा, दोन मुले व त्यांच्या सारसबाग मित्र मंडळाने त्यांच्यातील कलाकाराला प्रोत्साहन दिले. तीन वर्षांमध्ये काची यांनी विविध प्रकारांमधील दोनशे चित्र काढली.
कोथिंबीर विकणाऱ्याकडून चित्रकलेची भक्ती
पुणे - कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना शिक्षणाबरोबरच चित्रकलेच्या आवडीलाही अक्षरशः मुरड घालावी लागली. स्वस्थ बसून देईल ती कला कसली ! त्यामुळे कोथिंबीर विक्रीचा पिढीजात व्यवसाय सांभाळात त्यांनी गुरूविना या कलेची भक्ती केली. जलरंगासारख्या अवघड प्रकारावरही त्यांनी हुकूमत गाजविली. आता आपली ही कला जगाला पाहता यावी, यासाठी बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन भरविले आहे. या चित्रकाराचे नाव आहे नंदकुमार काची.
- नंदकुमार काची, चित्रकार
काची हे शाळेत असतानाच 1976 मध्ये त्यांचे वडील वारले. त्यामुळे थोरला मुलगा म्हणून कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. परिणामी त्यांना शिक्षण व चित्रकलेचा छंदही सोडावा लागला. संसार स्थिरस्थावर झाल्यानंतर 2013 पासून त्यांच्यातील चित्रकार पुन्हा जागा झाला. चित्रकलेविषयीचे प्रश्न, माहिती इंटरनेटवरून घेण्यास सुरवात केली. चित्रकला प्रदर्शनाला भेटी देत चित्रकारांशी संवाद साधत त्यातील बारकावे समजून घेतले. पत्नी राधा, दोन मुले व त्यांच्या सारसबाग मित्र मंडळाने त्यांच्यातील कलाकाराला प्रोत्साहन दिले. तीन वर्षांमध्ये काची यांनी विविध प्रकारांमधील दोनशे चित्र काढली.
==================================================
आजींच्या शाळेमुळे फांगणे गाव झळकले
आजींच्या शाळेमुळे फांगणे गाव झळकले
मुरबाड - शाळांमधील परीक्षा संपून सुट्ट्याही लागल्या आहेत; पण या शाळेला सुट्टी लागलेली नाही. शाळेतल्या बाई वर्गात यायच्या आधीच विद्यार्थी शाळेत आलेले असतात. शाळेला सुट्टी मिळत नाही म्हणून इथले विद्यार्थी अजिबात नाराज नाहीत; शिवाय हे विद्यार्थी शाळेला दांडी मारायचा विचारही करत नाहीत... कारण ही शाळाच आहे आगळीवेगळी... ही शाळा आहे फांगणे गावातली "आज्जीबाईंची शाळा!‘ येत्या दोन महिन्यांत आपल्याला लिहिता-वाचता आलेच पाहिजे, असा निश्चय केल्याने आमच्या शाळेला सुट्टीच नको, असे मत शाळेत शिकायला आलेल्या आज्ज्यांनी व्यक्त केले आहे. शिक्षणाच्या जागृतीबरोबरच या शाळेमुळे गावाच्या विकासालाही चालना मिळाल्याबद्दल येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेले मुरबाड तालुक्यातील फांगणे गाव. या गावात 8 मार्च 2016 अर्थात महिला दिनाच्या मुहूर्तावर गावातील ज्येष्ठ महिलांसाठी शाळा सुरू झाली. ही शाळा सुरू करण्यात अंबरनाथ येथील उद्योजक दिलीप दलाल यांनी पुढाकार घेतला. त्यांना जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक योगेंद्र बांगर आणि ग्रामस्थांनी मोलाची साथ दिली. या सर्वांच्या प्रयत्नांतून साकारली ती "आज्जीबाईंची शाळा‘. या आज्जीबाईंच्या शाळेची सर्वप्रथम दखल "सकाळ‘ने घेतल्यानंतर फांगणे गाव चर्चेत आले. या अनोख्या शाळेची दखल मुंबईतील बहुतांश वर्तमानपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी घेतली. आपल्या या उपक्रमाची दखल घेतल्यामुळे ग्रामस्थांचा तर उत्साह वाढलाच आहे; पण साक्षर होण्याची जिद्द असलेल्या सर्व आज्ज्यांचा हुरूपही वाढला आहे. सध्या या शाळेमध्ये 28 आज्ज्या शिकत आहेत. शाळेची वेळ दोन ते चार अशी आहे; पण या आज्ज्यांचा उत्साह इतका आहे की, त्या दोनच्या आधीच शाळेत येऊन हजर असतात. कारण येत्या दोन महिन्यांत साक्षर होण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. या शाळेत शिकणाऱ्या गंगूबाई बुधाजी केदार व कांताबाई लक्ष्मण मोरे या आज्ज्यांचा शिक्षणाचा वेग इतरांच्या तुलनेत अधिक असल्याची माहिती शिक्षिका शीतल मोरे यांनी दिली.
==================================================
डाळ मागणी नोंदविण्याची केंद्राची राज्यांना सूचना
डाळ मागणी नोंदविण्याची केंद्राची राज्यांना सूचना
नवी दिल्ली - डाळींच्या पुरवठ्याकडे केंद्राने पुन्हा एकदा बारकाईने लक्ष देणे सुरू केले असून, राज्यांनी त्यांना हवी असलेली मागणी आधीच नोंदवावी, अशी सूचनाही केंद्र सरकारने दिली आहे. या मागणीच्या आधारे डाळसाठ्यातून पुरवठा करणे सोईचे होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. आतापर्यंत सरकारी संस्थांनी 50 हजार टन डाळ खरेदी केली असून, 25 हजार टन साठा आयात करण्याचे करारही पूर्ण केले आहेत, तर खासगी व्यापाऱ्यांनी 55 लाख टन डाळींची आयात केली आहे.
डाळींच्या दरातील गेल्या काही दिवसांमध्ये ताजी चढ-उतार केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची झोप उडविणारी ठरली आहे. त्यामुळे या दरांवर सरकारने लक्ष देणे सुरू केले आहे. म्हणूनच राज्यांना त्यांनी आपापली मागणी नोंदवावी, जेणे करून बफर स्टॉकमधून डाळींचा पुरवठा करणे सोईस्कर होईल, अशी सूचना करण्यात आली आहे. शिवाय, दर नियंत्रणासाठी साठेबाजांवर कारवाई करता यावी यासाठी राज्यांना साठवण मर्यादेचा अधिकार वापरण्याचीही सूचना केंद्राने दिली आहे.
==================================================
राज्यपाल हे केंद्राचे दलाल नव्हे
राज्यपाल हे केंद्राचे दलाल नव्हे
नैनिताल - उत्तराखंडमधील घडामोडींमध्ये केंद्र सरकारने केलेला हस्तक्षेप दुर्लक्षून चालणार नाही, असे सांगत उत्तराखंड उच्च न्यायालयाने राज्यपाल म्हणजे केंद्राचे दलाल नव्हे, असे ठणकावले आहे. उत्तराखंडमधील राष्ट्रपती शासनाला आव्हान देत माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.
उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी झाली. नऊ बंडखोर आमदारांच्या निलंबनावरून भारत सरकारला काळजी वाटून त्यांनी राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करावा, ही केंद्र सरकारची कृती "पूर्णपणे अवाजवी‘ नाही काय, अशी विचारणा त्यांनी या वेळी केंद्राकडे केली. अत्यंत दुर्मिळ प्रसंगीच राष्ट्रपती राजवटीसारख्या अधिकारांचा वापर करणे आवश्यक असताना बंडखोर आमदारांच्या निलंबनामुळे अशी कोणती दुर्मिळ परिस्थिती उद्भवली होती, असेही त्यांनी विचारले आहे. राज्याच्या कारभारात असा हस्तक्षेप दुर्लक्षून चालणार नाही, असे न्या. जोसेफ यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ""लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या राज्य सरकारचा कार्यकाल संपत आला असताना ते सरकार तुम्ही पाडू शकता? याबाबत निर्णय घ्यायचा अधिकार सर्वस्वी राज्यपालांचा आहे. राज्यपाल हे केंद्राचे दलाल नव्हे.‘‘
==================================================
नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा धुव्वा
नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा धुव्वा
मुंबई - राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा धुव्वा उडाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळविल्या असून, त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला समसमान जागा मिळाल्या आहेत.
जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना काँग्रेस आघाडी सरकारने नगरपंचायतींचा दर्जा दिला. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सातारा जिल्ह्यातील लोणंद, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, मोहोळ आणि माढा तर उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहाराचा समावेश आहे. या नगरपंचायतींसाठी काल (रविवार) मतदान झाले. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर केला असून या सहा नगरपंचायतींतील एकूण जागांपैकी भाजपला अवघ्या पाच जागा मिळाल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस व माढा या नगरपंचायतींत भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. सर्वाधिक २१ जागा काँग्रेसने जिंकल्या असून त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने प्रत्येकी २० जिंकल्या आहेत. निवडणुकीत अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांच्या पारड्यात ३६ जागा पडल्या आहेत.
==================================================
No comments:
Post a Comment