[अंतरराष्ट्रीय]
१- उत्तर भारतासह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र झटके
२- लंडनमध्येही दहशतवादी हल्ल्याची होती योजना - सूत्र
३- फिलिपिन्समध्ये सेनेची तुकडी आणि मुस्लिम विद्रोह्यांमध्ये वाद, दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू, 73 जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी दिल्ली, चंदिगड, हरियाणा हादरलं
५- अनुपम खेर यांची श्रीनगर विमानतळावर पोलिसांकडून अडवणूक
६- पटना; संयुक्त जनता दलाच्या अध्यक्षपदाची धुरा नितीशकुमार यांच्या खांद्यावर
७- कोहिनूर' परत आणता येणार नाही: केंद्र सरकार
८- बंदरांच्या विकासासाठी 1 लाख कोटी: गडकरी
९- केरळ दुर्घटना - गरज भासल्यास जखमींना उपचार साठी मुंबई अथवा दिल्लीला नेहण्यासाठी केंद्र सरकार मदत करेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी
१०- संसदेच्या एनेक्स बिल्डिंगच्या दुस-या मजल्यावर आग, आगीवर मिळवलं नियंत्रण
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- आयपीएल महाराष्ट्राबाहेर नेल्याने दुष्काळात फरक नाही : धोनी
१२- आयपीएल सामने बाहेर हलवल्यास राज्याला १०० कोटींचा तोटा - अनुराग ठाकूर
१३- ब्रिटनचे राजपुत्र सपत्नीक मुंबईत, मास्टरब्लास्टरशी भेट
१४- लातूरकरांची तहान भागवण्यासाठीची पाण्याची रेल्वे मिरजेत दाखल
१५- केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये, तर गंभीर जखमींना 2 लाखांची मदत जाहीर
हैदराबादमध्ये क्रेन वाहून नेणाऱ्या विमानाला अपघात, दुर्घटना कॅमेऱ्यात कैद
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- अमृतसरमध्ये बीएसएफच्या जवानांनी दोन पाकिस्तानी घुसखोरांना ठार केलं, 45 कोटींची हेरॉ़इन जप्त
१७- नाशिक-पुणे महामार्गावर खांडगाव फाट्याजवळ बस आणि दुचाकीमध्ये अपघात, ३ ठार एक जण जखमी.
१८- अहमदनगरमधल्या कर्जतमध्ये पतीकडून आई आणि मुलाची हत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेंना बीसीसीआयकडून बाहेरचा रस्ता
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
गुरु विना ज्ञान नाही
ज्ञानाविना आत्मा नाही
(सुर्यकांत गायकवाड, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
=============================================

काहीच दिवसांपूर्वी श्रीनगर एनआयटीमध्ये स्थानिक आणि राज्याबाहेरील विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष उसळला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी अनुपम खेर यांना दिल्लीला परतण्यास सांगितल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.
अनुपम खेर रविवारी सकाळी श्रीनगर विमानतळावर उतरले होते. विद्यार्थ्यांना नैतिक पाठिंबा देण्यासाठी ते काश्मीर दौऱ्यावर आले होते. रविवारी सकाळी त्यांनी ट्विटरवरुन आपला मानस व्यक्त केला होता. ‘श्रीनगरला पोहचलो. हे ‘घरा’पासून दूर असलेलं घर आहे. एनआयटी श्रीनगरला जाणार.
विद्यार्थ्यांची भेट घेणार. त्यांना मिठी मारणार आणि एक भेटही देणार’ असं त्यांनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आयपीएलच्या नवव्या मोसमातील क्रिकेट सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याची मागणी मुंबई भाजपने काही दिवसांपूर्वी केली होती. त्यासंबंधी कोर्टात याचिकाही करण्यात आली होती. आयपीएलच्या सामन्यांदरम्यान पाण्याची मोठी नासाडी होत असल्याचा आरोप याचिकाकर्ते आणि मुंबई भाजपचा आहे.

मुंबईतल्या ताज हॉटेलला भेट देत त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. तसंच हॉटेल ताजमधील कर्मचाऱ्यांशी बातचीतही केली.

अफगाणिस्तान, पाकिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे. भूकंपाची तीव्रता 6.6 रिश्टर स्केल असल्याची माहिती आहे. भूकंपाचे केंद्रस्थान अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये आहे.
दिल्लीसह नोएडा आणि परिसरात पाच मिनिटांपर्यंत हे धक्के जाणवल्याची माहिती आहे. भूकंपामुळे दिल्लीतील मेट्रोसेवाही काही मिनिटांसाठी थांबवल्याचं सांगितलं जातं.

अनुपम खेर यांची श्रीनगर विमानतळावर पोलिसांकडून अडवणूक
श्रीनगर : सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची जम्मू काश्मीर पोलिसांनी श्रीनगर विमानतळावर अडवणूक केल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी खेर यांना श्रीनगर एनआयटी म्हणजेच राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत प्रवेश करण्यास मनाई केल्याची माहिती आहे.
काहीच दिवसांपूर्वी श्रीनगर एनआयटीमध्ये स्थानिक आणि राज्याबाहेरील विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष उसळला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी अनुपम खेर यांना दिल्लीला परतण्यास सांगितल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.
अनुपम खेर रविवारी सकाळी श्रीनगर विमानतळावर उतरले होते. विद्यार्थ्यांना नैतिक पाठिंबा देण्यासाठी ते काश्मीर दौऱ्यावर आले होते. रविवारी सकाळी त्यांनी ट्विटरवरुन आपला मानस व्यक्त केला होता. ‘श्रीनगरला पोहचलो. हे ‘घरा’पासून दूर असलेलं घर आहे. एनआयटी श्रीनगरला जाणार.
विद्यार्थ्यांची भेट घेणार. त्यांना मिठी मारणार आणि एक भेटही देणार’ असं त्यांनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
=============================================
आयपीएल महाराष्ट्राबाहेर नेल्याने दुष्काळात फरक नाही : धोनी
मुंबई : दुष्काळी परिस्थितीत राज्यात आयपीएल सामने खेळवण्याबद्दल रायझिंग पुणे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपलं मतं नोंदवलं आहे. सध्या दुष्काळाचा प्रश्न खरंच गंभीर आहे, मात्र आयपीएलचे काही सामने राज्याबाहेर हलवण्याने दुष्काळाच्या परिस्थितीत फरक पडणार नाही,
त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचं धोनीने म्हटलं आहे.
त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचं धोनीने म्हटलं आहे.
“काही धरणात पाणीसाठा कमी झाला आहे, पण आयपीएलचे सामने राज्याबाहेर नेल्याने हा प्रश्न सुटणार नाही. दुष्काळावर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.” असं महेंद्रसिंह धोनी म्हणाला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आयपीएलच्या नवव्या मोसमातील क्रिकेट सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याची मागणी मुंबई भाजपने काही दिवसांपूर्वी केली होती. त्यासंबंधी कोर्टात याचिकाही करण्यात आली होती. आयपीएलच्या सामन्यांदरम्यान पाण्याची मोठी नासाडी होत असल्याचा आरोप याचिकाकर्ते आणि मुंबई भाजपचा आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आयपीएल महाराष्ट्राबाहेर खेळवण्यास हरकत नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आयपीएल महाराष्ट्राबाहेर नेल्यास आता राज्याचं 100 कोटींचं नुकसान होईल, असा दावा बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी केला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
=============================================
ब्रिटनचे राजपुत्र सपत्नीक मुंबईत, मास्टरब्लास्टरशी भेट
मुंबई : इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन पहिल्यांदाच सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. रविवारी सकाळी ते मुंबईत दाखल झाले. दोन्ही देशांचे संबंध दृढ करण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
मुंबईतल्या ताज हॉटेलला भेट देत त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. तसंच हॉटेल ताजमधील कर्मचाऱ्यांशी बातचीतही केली.
=============================================
भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी दिल्ली, चंदिगड, हरियाणा हादरलं
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीसह आसपासचा परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. उत्तरेकडील दिल्ली, चंदिगढ, हरियाणा, श्रीनगर या राज्यांमध्ये रविवारी दुपारी 4 वाजून 1 मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले.
अफगाणिस्तान, पाकिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे. भूकंपाची तीव्रता 6.6 रिश्टर स्केल असल्याची माहिती आहे. भूकंपाचे केंद्रस्थान अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये आहे.
दिल्लीसह नोएडा आणि परिसरात पाच मिनिटांपर्यंत हे धक्के जाणवल्याची माहिती आहे. भूकंपामुळे दिल्लीतील मेट्रोसेवाही काही मिनिटांसाठी थांबवल्याचं सांगितलं जातं.
=============================================
लातूरकरांची तहान भागवण्यासाठीची पाण्याची रेल्वे मिरजेत दाखल
लातूर : पाणी टंचाईमुळे पिण्याच्या पाण्यासाठी तडफडणाऱ्या लातुरकरांची तहान भागवण्यासाठीची पाण्याची रेल्वे आज मिरजेत दाखल झाली आहे. वारणा धरण ते मिरज रेल्वे स्टेशन या दरम्यानची पाईपलाईन अद्याप तयार झाली नसल्यानं रेल्वेनं दुसऱ्या मार्गाची चाचपणी सुरु केली आहे.
आता त्याऐवजी रेल्वे जंक्शनमध्ये ज्या पाईपलाईनद्वारे पाणी येतं, तिथूनच पाणी नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा प्रयत्न पूर्णत्वास नेऊन आजच लातूरसाठी रेल्वे रवाना करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.
आज सकाळी 50 वॅगन असलेली रेल्वे गाडी मिरजेत दाखल झाली. साधारण 10 वॅगन पाणी भरुन आज पहिली रेल्वे लातूरला रवाना होण्याची शक्यता आहे.
=============================================
क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेंना बीसीसीआयकडून बाहेरचा रस्ता
मुंबई : आयपीएलच्या नवव्या मोसमात क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेंचा आवाज क्रिकेटप्रेमींना ऐकता येणार नाही. कारण बीसीसीआयने हर्षा भोगले यांच्यासोबतचा करार रद्द केला आहे.
यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयपीएलच्या ऑक्शन आणि काही प्रमोशनल व्हीडीओजमध्ये भोगले यांना स्थान देण्यात आलं होतं. आयपीएलमध्ये समालोचनाचे अधिकार हे सोनी नेटवर्क कंपनीकडे आहेत, मात्र या स्पर्धेचं आयोजन बीसीसीआय करत असल्यामुळे समालोचकांच्या अंतिम यादीचा निर्णय बीसीसीआयचं घेतं.
हर्षा भोगलेंचं कंत्राट अचानक रद्द केल्याचं कारण अजुन समजू शकलं नसलं तरीही बीसीसीआयमधील एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनूसार टी-20 विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यात भोगले यांचे विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांशी खटके उडाले होते. त्यानंतरचं भोगलेंचं कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं आहे.
=============================================
आयपीएल सामने बाहेर हलवल्यास राज्याला १०० कोटींचा तोटा
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 10- आयपीएलचे सामने दुसऱ्या राज्यात गेले तरी चालतील. मात्र यासाठी सरकार पाणी देणार नसल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे... परंतु मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावर भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी कुरघोडी केली आहे. भाजपचे खासदार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांनाच घरचा आहेर दिला. आयपीएलचे सामने राज्याबाहेर गेल्यास महाराष्ट्राला तब्बल १०० कोटींच्या महसुलास मुकावे लागणार असल्याचं यावेळी अनुराग ठाकूर यांनी सांगितलं आहे. आयपीएलच्या महसुलाचा वापर दुष्काळी भागासाठी करण्याचा सल्लाही यावेळी अनुराग ठाकूर यांनी सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या एका माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ठाकूर माहिती तंत्रज्ञानविषयक संसदेच्या संयुक्त समितीचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित होते. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात मैदानावर पाण्याची नासाडी करणाऱ्या आयपीएल सामन्यांना न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या सामन्यांना न्यायालयाने हिरवा झेंडा दाखवला असला तरी त्याबाबतची पुढील सुनावणी मंगळवारी, १२ एप्रिल रोजी होणार आहे. यंदाच्या हंगामात महाराष्ट्राला १०० कोटींचा महसूल मिळणार असून या निधीचा उपयोग राज्याला दुष्काळी भागासाठी करता येईल, असे ठाकूर म्हणाले. आयपीएलच्या मागील हंगामात मिळालेल्या महसुलाच्या आकडेवारीच्या अभ्यासावरून सद्यस्थितीतील महसुलाची आकडेवारी आपण मांडत आहोत, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले. आयपीएलमधील फ्रॅन्चाईझींनाही येत्या आठवडय़ात त्यांना मिळणाऱ्या महसुलाचा उपयोग कसा करतील याविषयी अहवाल सादर करण्यास सांगण्यात आल्याचे बीसीसीआय सचिवांनी अखेरीस स्पष्ट केले. शनिवारपासून सुरू झालेल्या आयपीएलच्या नवव्या हंगामातील एकंदर २० सामने राज्यात खेळवले जाणार आहेत.
=============================================
संयुक्त जनता दलाच्या अध्यक्षपदाची धुरा नितीशकुमार यांच्या खांद्यावर
- ऑनलाइन लोकमतपाटणा, दि. १० - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची संयुक्त जनता दलाच्या (संजद) अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. संजदच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नितीशकुमार यांची पक्षाच्या सर्वोच्चपदी निवड झाल्याबरोबरच तीनदा पक्षाध्यक्ष राहिलेले शरद यादव यांचा दशकभराचा कार्यकाळही संपुष्टात आला. यादव यांनी चौथ्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळण्यास नकार दिला होता. बिहारमध्ये संजदचा चेहरा असलेले नितीशकुमार यांची पक्षाध्यक्षपदी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधीचे पक्षाध्यक्ष राहिलेले जॉर्ज फर्नांडिस आणि शरद यादव हे बिहारबाहेरचे होते, परंतु त्यांनी बिहारलाच आपले राजकीय घर बनविले होते. शरद यादव यांनी नितीशकुमार यांचे नाव सुचविले आणि सरचिटणीस के. सी. त्यागी व जावेद रजा यांच्यासह अन्य नेत्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभा निवडणुकीत संजदला घवघवीत यश मिळाले होते आणि त्यानंतर नितीशकुमार मुख्यमंत्री बनले होते. ‘समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत,’ असे नितीशकुमार यांनी पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सांगितले.
- =============================================
उत्तर भारतासह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र झटके
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १० - आज सायंकाळी चारच्या सुमारास भारतासह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. उत्तरेकडील दिल्ली, चंदिगढ, हरियाणा, श्रीनगर या राज्यांमध्ये रविवारी दुपारी ४ वाजून ०१ मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले. भुकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल ऐवढी होती. भूकंपाच्या धक्क्यानं दिल्ली मेट्रो प्रभावित झाली आणि तिची सेवा तात्पुरती थांबवली गेली होती. दिल्लीसह नोएडा आणि परिसरात पाच मिनिटांपर्यंत हे धक्के जाणवल्याची माहिती आहे. या भूकंपामुळे जम्मु काश्मीरसहितच एकंदरच उत्तर भारतामधील जनजीवन बाधित झाले.भूकंपाचे केंद्रस्थान अफगाणिस्तानमधील एशकशाम या गावाजवळ होते. एशकशाम हे ठिकाण मध्य आशियातील ताजिकिस्तान या देशाच्या सीमारेषेपासून जवळ आहे. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलपासून भूकंपाचे केंद्रस्थान हे ईशान्य दिशेस सुमारे २८२ किमीवर असल्याचे अमेरिकेच्या भूकंपमापन संस्थेने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या (२०१५) ऑक्टोबर महिन्यात याच भागास शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला होता.जम्मू काश्मीर, हरियाणा, चंडीगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथे भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. काबूल येथे भूकंपाचा तीव्र धक्का बसला. पाकिस्तानच्या माध्यमांनी देखील तेथील पंजाब प्रांतात धक्के बसल्याचे सांगितले आहे. सुदैवाने अद्याप जीवितहानीचे वृत्त आले नाही. या भूकंपामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी घराबाहेर पडून मोकळ्या जागांचा आश्रय घेतला.
=============================================
जेडीयूच्या अध्यक्षपदी नितीशकुमार यांची निवड
- ऑनलाइन लोकमतबिहार, दि. १०- बिहारमध्ये स्वतःच्या कामानं आणि स्वच्छ प्रतिमेनं बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना धोबीपछाड देणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड या पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्रिपदासोबत नितीश कुमारांवर पक्ष सांभाळण्याचं कसबही दाखवावं लागणार आहे. संयुक्त जनता दलाच्या नेतेपदीही नितीशकुमारांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. सलग तीनदा पक्षाचे अध्यक्षपद भूषवणारे 68 वर्षांचे खासदार शरद यादव यांनी राजीनामा दिल्यानं अध्यक्षपदाची जागा रिकामी झाली होती. राजीनामा देते वेळी त्यांनी पक्षाचा कार्यभार नितीश कुमारांकडे सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसारच नितीश कुमार यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
=============================================
लंडनमध्येही दहशतवादी हल्ल्याची होती योजना
लंडन - गेल्या महिन्यात बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रुसेल्स येथे घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असल्याच्या संशयावरुन नुकतीच अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याची ब्रिटनमध्येही दहशतवादी हल्ला घडविण्याची योजना होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मोहम्मद अब्रिनी असे या दहशतवाद्याचे नाव आहे. अब्रिनी याने ब्रिटनमध्ये गेल्या जुलै महिन्यातील एक आठवडा विविध ठिकाणांची टेहळणी करण्यात घालवल्याचे सूत्रांनी सांगितले. मूळचा मोरोक्कोमधील असलेला अब्रिनी हा बेल्जियमचा नागरिक आहे. त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या फोनमध्ये दहशतवादी हल्ला घडविण्याच्या उद्देशार्थ पाहणी करण्यात आलेली रेल्वे स्थानके आणि इतर ठिकाणांची छायाचित्रे आढळली आहेत.
ब्रुसेल्समधील विमानतळ व मेलबीक मेट्रो स्थानकावर गेल्या 22 मार्च रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात 32 नागरिक मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.

कोहिनूर' परत आणता येणार नाही: केंद्र सरकार
नवी दिल्ली - भारतीय ऐश्वर्याचे प्रतीक मानला जाणारा जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा भारतात परत आणला जाण्याची शक्यता जवळपास नसल्याची भूमिका केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारताबाहेर नेण्यात आलेल्या पुरातन; वा ऐतिहासिक ठेवा असलेल्या वस्तु देशात परत आणण्यासंदर्भातील कायद्याच्या मर्यादेमुळे कोहिनूर परत आणणे अवघड असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. 1972 मध्ये संमत करण्यात आलेल्या या कायद्यानुसार भारताबाहेर केवळ बेकायदेशीररित्या नेण्यात आलेल्या पुरातन वस्तुच देशात परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा पुरात्त्व खात्यास अधिकार आहे. कोहिनूर हिऱ्यासंदर्भात माहितीच्या अधिकाराखाली दाखल करण्यात आलेल्या अर्जास उत्तर देताना सरकारची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
""कोहिनूर हा भारताबाहेर स्वातंत्र्यपूर्व काळात नेण्यात आला असल्याने या प्रकरणी निर्णय घेण्याचा अधिकार पुरातत्त्व खात्यास नाही,‘‘ असे सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे देण्यात आलेल्या उत्तरामध्ये म्हटले आहे.
कोहिनूर हिरा परत आणण्यासंदर्भात करण्यात येत असलेल्या प्रयत्नांसंदर्भात माहिती मागविणारा हा अर्ज मुळात परराष्ट्र मंत्रालयाकडे दाखल करण्यात आला होता. मात्र हा सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील विषय असल्याचे सांगत परराष्ट्र मंत्रालयाकडून हा अर्ज येथे वर्ग करण्यात आला होता. कोहिनूर हिऱ्यासंदर्भात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेसंदर्भात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या या अर्जास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

बंदरांच्या विकासासाठी 1 लाख कोटी: गडकरी
नवी दिल्ली - देशातील बंदरांच्या आधुनिकीकरणासाठी येत्या 26 मेपर्यंत 60 हजार कोटी रुपये किंमतीची विविध कंत्राटे केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार) दिली.
"जहाज बांधणी क्षेत्रामध्ये 40 हजार कोटींच्या विकासकामांस याआधीच प्रारंभ झाला आहे. 26 मेच्या आतमध्ये आणखी 60 हजार कोटी किंमतीच्या कंत्राटांना परवानगी देण्यात येईल. देशातील बंदराच्या संपूर्ण आधुनिकीकरणाची मोहिम सरकारतर्फे हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून बंदर व जहाज बांधणी क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत 83,361 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे,‘‘ असे गडकरी म्हणाले.
साडेसात हजार किमी लांबीचा प्रदीर्घ सागरीकिनारा लाभलेल्या भारतामधील बंदरांचा विकास "सागरमाला‘ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत करण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये एकूण 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन त्याद्वारे सुमारे 1 कोटी रोजगार निर्माण होतील, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.
बंदरांच्या विकासासाठी 1 लाख कोटी: गडकरी
"जहाज बांधणी क्षेत्रामध्ये 40 हजार कोटींच्या विकासकामांस याआधीच प्रारंभ झाला आहे. 26 मेच्या आतमध्ये आणखी 60 हजार कोटी किंमतीच्या कंत्राटांना परवानगी देण्यात येईल. देशातील बंदराच्या संपूर्ण आधुनिकीकरणाची मोहिम सरकारतर्फे हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून बंदर व जहाज बांधणी क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत 83,361 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे,‘‘ असे गडकरी म्हणाले.
साडेसात हजार किमी लांबीचा प्रदीर्घ सागरीकिनारा लाभलेल्या भारतामधील बंदरांचा विकास "सागरमाला‘ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत करण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये एकूण 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन त्याद्वारे सुमारे 1 कोटी रोजगार निर्माण होतील, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.
=============================================
No comments:
Post a Comment