Tuesday, 5 April 2016

नमस्कार लाईव्ह ०५-०४-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- न्यूयॉर्क; प्रियंका चोप्राला ओबामांचं डिनरसाठी आमंत्रण? 
२- लाहोर; वकार युनूस पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार 
३- गुगलने तालिबानी अॅप प्ले स्टोअरमधून काढून टाकले 
४- पनामा सिटी; पनामाला सतावतेय प्रतिमेची भीती 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- ‘पठाणकोट हमला भारत का ड्रामा’, पाकिस्तानी तपास पथकाचा रिपोर्ट लीक 
६- लखनऊ; पिलिभीत बनावट चकमकीप्रकरणी 47 पोलिसांना जन्मठेप 
७- देशातल्या सर्वात जलद एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा! 
८- पेट्रोल प्रति लिटर 2.19 रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर 98 पैशांनी महाग 
९- पनामा पेपर्सवर नजर, कारवाई होणारच : अर्थमंत्री 
१०- भाजपचे 'मुँह में राम बगल मे छुरी'- केजरीवाल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- ‘भारतमाता की जय’ वरून विधिमंडळात गदारोळ 
१२- शाब्बास, मुख्यमंत्री! ओवेसी सुटला तरी चालेल…, सेनेची सामनातून टोलेबाजी 
१३- मुख्यमंत्री पिकलेल्या केळ्याप्रमाणे नरम झाले:सेना 
१४- शाळाबाह्य मुलं शोधा आणि एक हजार रुपये मिळवा! 
१५- बहुप्रतीक्षित एसी लोकल मुंबईत दाखल, 16 एप्रिलपासून चाचणी 
१६- रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात 
१७- विदर्भासह कोकणदेखील स्वतंत्र करा - प्रकाश आंबेडकर
१८- सांगली; कर्नाटकनं मागितलं तीन टीएमसी पाणी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- राजकोट; लग्नापूर्वीच सासरच्यांकडून जाडेजाला 95 लाखांची ऑडी भेट 
२०- मुंबई; 42 वर्षीय महिलेची कमाल, चेन स्नेचरलाच बाइकवरुन खाली खेचलं! 
२१- मुंबई; हेमा मालिनी आणि एकनाथ खडसेंना हायकोर्टाचा दिलासा 
२२- माथाडी कामगार शेतकऱ्यांच्या जीवावर का उठलेत? 
२३- डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात 'ज्ञानपुष्प आरोग्य योजनेत मोफत उपचार - डॉ. वर्षा चौरे  
२४- मुंबई उपनगरासह धुळे जिल्ह्यात पावसाच्या सरी 
२५- औरंगाबाद; पाणी विकत घेऊन "ते' भागवितात शेकडोंची तहान 
२६- लातूर; अभिनंदन टेरेसने वाचविले 50 टक्के पाणी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- एअरटेल गर्ल पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर साशा ट्रेण्डिंगमध्ये 
२८- 'द जंगल बुक' चित्रपटाला U/A सर्टिफिकेट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२९- अतिक्रमणावर लवकरच हातोडा; आयुक्ताकडून क्षेत्रीय अधिकाऱ्याची बैठक, नियोजन करण्याच्या सूचना 
३०- भोकर; रोजगार हमी योजनेतून ३२७ विहिरीपूर्ण 
३१- मुखेड; बावरीनगर प्रमाणेच मुखेडात धम्मविहार उभारणार 
३२- करमणूक करात विक्रमी वसुली; मराठवाड्यात नांदेड दुसरा; सव्वासहा कोटी वसूल 
३३- नरसी. नायगाव, हदगाव, मनाठामध्ये पंधरा ते वीस मिनिटे जोरदार पाऊस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
उत्तम शेळके, माधव तिडके, संदीप अंभोरे, प्रशांत महामुने, रवी कलाने, धनंजय उमरेकर, धम्मानंद प्रधान, सिद्राम मिर्दोडे, कल्पना डोंगलीकर, दत्ता शिंदे, बालाजी साधू, 

अमोल वानखेडे, कुमार विनोद, सुरेश मुधोळकर, रावसाहेब माने, साई झुंजरवार, रणजीत सूर्यवंशी, मनोहर पाटील 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर अपयश पचविण्यास शिका
(संदीप पुरी, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


===========================================

एअरटेल गर्ल पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर साशा ट्रेण्डिंगमध्ये

एअरटेल गर्ल पुन्हा चर्चेत, सोशल मीडियावर साशा ट्रेण्डिंगमध्ये
मुंबई एअरटेल गर्ल अर्थात साशा छेत्री पुन्हा एकदा चर्चेत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात एअरटेलचं नेटवर्क मिळतं, असा दावा करणारी साशा वादाता सापडली असून सोशल मीडियावर तिच्याबाबत अनेक बातम्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्ये साशाविरोधात खटला दाखल झाल्यापासून ती एअरटेल सोडून रिलायन्स जिओमध्ये सामील झाल्याचं म्हटलं जात आहे.

सत्य काय आहे?
साशाने एअरटेल 4G सोडून रिलायन्स जिओ जॉईल केल्याचं वृत्त microfinancemonitor.com ने तीन दिवसांपूर्वी छापलं होतं. यानंतर ती सोशल मीडियावर ट्रेण्डिंगमध्ये होती. नेटीझन्सनी साशाबाबत अनेक कमेंट्स केल्या.

खरंतर या बातमीद्वारे लोकांना एप्रिल फूल बनवलं जात होतं. “साशाने एअरटेल सोडलं कारण सिग्नल व्यवस्थित न आल्याने मियाम लेकवर राहणाऱ्या एका व्यक्तीला भारत-वेस्ट इंडिज सामना पाहता आला नाही. त्यामुळे त्याने एअरटेल आणि साशाविरोधात खोटा दावा केल्याचा खटला दाखल केला,” असं वृत्त microfinancemonitor.com ने छापलं होतं.
===========================================

‘पठाणकोट हमला भारत का ड्रामा’, पाकिस्तानी तपास पथकाचा रिपोर्ट लीक

‘पठाणकोट हमला भारत का ड्रामा’, पाकिस्तानी तपास पथकाचा रिपोर्ट लीक
नवी दिल्ली पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी तपास पथकाचा अहवाल लीक झाला आहे. या अहवालातून अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पाकिस्तानी जेआयटीचं अहवाल कथित स्वरुपात लीक झालं आहे. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तांनुसार, ‘भारत का ड्रामा’ असा उल्लेख पाकिस्तानी तपास पथकाने पठाणकोट हल्ल्याच्या अहवालात केला आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधून एक तपास पथक पठाणकोट हल्ल्यासंदर्भात तपासासाठी भारतात आलं होतं. या तपास पथकाचा अहवाल पाकिस्तानी मीडियामध्ये लीक झाला आहे. पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी पठाणकोटमध्ये हल्ल्याचा ड्रामा केल्याचं लीक झालेल्या अहवालात म्हटलं आहे.

तपास पथकाच्या लीक झालेल्या अहवालात स्पष्ट म्हटलं गेलं आहे की, पठाणकोट हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानातून आल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. शिवाय, भारतीय अधिकाऱ्यांनी तपास पथकाला सहकार्य केलं नसल्याचा गंभीर आरोप अहवालातून भारतावर करण्यात आला आहे.

येत्या काही दिवसांतच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पठाणकोट हल्ल्यासंदर्भातील हा अहवाल सुपूर्द केला जाणार आहे.
===========================================

पिलिभीत बनावट चकमकीप्रकरणी 47 पोलिसांना जन्मठेप

पिलिभीत बनावट चकमकीप्रकरणी 47 पोलिसांना जन्मठेप
लखनऊ: लखनौच्या पिलिभीतमध्ये झालेल्या बनावट चकमक प्रकरणातील मृतांच्या नातेवाईकांना तब्बल 25 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे.

सीबीआयच्या विशेष न्यायालयानं बनावट चकमकीसाठी जबाबदार असणाऱ्या 47 पोलिसांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.  12 जुलै 1991ला घडलेल्या त्या घटनेमुळं संपूर्ण देश हादरला होता.

शीख यात्रेकरूंच्या  बसमधून 10 जणांना खाली उतरवून त्यांची हत्या करण्यात आली होती. ज्यांची हत्या करण्यात आली ते दहशतवादी होते असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र सीबीआयच्या तपासानंतर 57 पोलिसांवर हत्येचे आरोप लावण्यात आले. 57 पैकी 10 आरोपींचा निकालापूर्वी मृत्यू झाला, तर उर्वरित 47 जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
===========================================

शाब्बास, मुख्यमंत्री! ओवेसी सुटला तरी चालेल…, सेनेची टोलेबाजी

शाब्बास, मुख्यमंत्री! ओवेसी सुटला तरी चालेल…, सेनेची टोलेबाजी
मुंबई: भारत माता की जय प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत दाखवलेल्या आक्रमक अवतारावर आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाधून उपरोधिक टोले लगावण्यात आले आहेत.

‘भारत माता की जय म्हणावचं लागेल असा आक्रमक पवित्रा घेतला. पण, अवघ्या काही दिवसातचं मुख्यमंत्री आपल्या भूमिकेवरुन नरम पडले. अखंड महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या शिवसैनिकांवर नाशकात दरोड्याचे गुन्हे टाकण्यात आले, मग राज्यात येऊन ‘भारत माता की जय’ म्हणणार नाही असं म्हणणाऱ्या ओवैसीवर कारवाई करुन त्याला तुरुंगात टाकण्याची मुख्यमंत्र्यांनी हिंमत का दाखवली नाही?’ असा उपरोधिक सवाल आजच्या सामनामधून विचारण्यात आला आहे.

दरम्यान, आता सेनेच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
===========================================

शाळाबाह्य मुलं शोधा आणि एक हजार रुपये मिळवा!

शाळाबाह्य मुलं शोधा आणि एक हजार रुपये मिळवा!
मुंबई शाळाबाह्य मुलांची संख्या वाढताना दिसते आहे. शाळाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ होणं अत्यंत चिंतेची बाब आहे. यावर राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने अनोखी शक्कल लढवली आहे. ‘शाळाबह्य मुलांना शोधून द्या आणि एक हजार रुपये मिळावा’ अशी घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत केली आहे.

राज्यात शाळाबाह्य मुलांची फौज!

राज्यातील शिक्षण क्षेत्रात अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. गावागावांमध्ये शाळाबाह्य मुलांची फौज तयार होत आहे. सरकारी आकडेवारीनुसार राज्यात 74 हजार शाळाबाह्य मुलं आहेत. मात्र, ही झाली सरकारी आकडेवारी. प्रत्यक्षात याही पुढचा आकडा असण्याची शक्यता नाकारता येतन नाही.

शाळाबाह्य मुलं शोधणाऱ्यांना बक्षीस!

शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत असल्याने यापुढे वर्षातून दोन ते तीन वेळा शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. त्यानंतरही शाळाबाह्य मुलं आढळली, तर अशा मुलांना शोधून देणाऱ्यांना एक हजार रुपये बक्षीस देण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.

बक्षीसाचा शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणमंत्र्यांना फटका!

शाळाबाह्य मुलांना शोधून देणाऱ्यांना एक हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. हे बक्षीस थेट शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणमंत्र्यांच्या पगारातून दंड कापलं जाणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या पगारातून 500 रुपये, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या पगारातून 250 रुपये, तर शिक्षणमंत्र्यांच्या पगारातून 250 रुपये दंड म्हणून कापले जातील.
===========================================

लग्नापूर्वीच सासरच्यांकडून जाडेजाला 95 लाखांची ऑडी भेट

लग्नापूर्वीच सासरच्यांकडून जाडेजाला 95 लाखांची ऑडी भेट
राजकोट : टीम इंडियाचा शिलेदार रवींद्र जाडेजाला लग्नाआधीच सासरच्या मंडळींकडून ऑडी कार भेट मिळाली आहे. जाडेजाचं लग्न 17 एप्रिल रोजी रिवा सोळंकीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

सोळंकी कुटुंबियांनी जाडेजाला ऑडीच्या क्यू सेव्हन या आलिशान कारची भेट दिली. या कारची किंमत 95 लाख रुपये असून जाडेजा आणि त्याची भावी पत्नी रिवाबाने राजकोटच्या शोरुममधून ती कार ताब्यात घेतली.

रवींद्र जाडेजाला ऑडी कारचा आधीपासूनच शौक आहे. त्यातच सासरच्या मंडळींनी दिलेल्या अनपेक्षित भेटीने त्याचा चेहरा चांगलाच खुलला होता.
===========================================

42 वर्षीय महिलेची कमाल, चेन स्नेचरलाच बाइकवरुन खाली खेचलं!

42 वर्षीय महिलेची कमाल, चेन स्नेचरलाच बाइकवरुन खाली खेचलं!
फाइल फोटो
मुंबई: कामावरुन घरी परतणाऱ्या एका महिलेनं हिंमतीचं एक असं उदाहरण दाखवून दिलं की, ज्यानं मुंबई पोलिसही प्रभावित झाले आहेत. निर्मनुष्य रस्त्यावर साखळी चोरांनी हल्ला केल्यानंतरही महिलेनं हिंमत न हरता स्वत:ला वाचवित चेन स्नेचरलाच बाइकवरुन खाली पाडलं. त्यानंतर पोहचलेल्या पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

इंग्रजी वृत्तपत्र मिड-डेच्या वृत्तानुसार, कॉल सेंटरमध्ये काम करणारी 42 वर्षीय महिला शुक्रवारी सकाळी जवळजवळ 3 वाजून 45 मिनिटांनी ऑफिसहून निघाली. तिनं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कांदिवली पूर्वला जाण्यासाठी रिक्षा थांबवली. रिक्षा काही अंतर दूर जाताच एक स्कूटी थेट रिक्षाच्या समोरच येऊन उभी राहिली.

रिक्षाचा वेग कमी होताच बाइकवरील आरोपींनी महिलेची पर्स खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने हिंमत सोडली नाही आणि आपली पर्स घट्ट पकडून ठेवली. त्यानंतर तिनं स्कूटीवरील त्या आरोपीला एवढ्या जोरात खेचलं की, तो थेट खालीच पडला. घटनास्थळापासून काही अंतर दूर असलेल्या गस्तीवरील पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत आरोपीला अटक केली.
===========================================

बहुप्रतीक्षित एसी लोकल मुंबईत दाखल, 16 एप्रिलपासून चाचणी

बहुप्रतीक्षित एसी लोकल मुंबईत दाखल, 16 एप्रिलपासून चाचणी
मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासी प्रतीक्षा करत असलेली एसी लोकल अखेर मुंबईत दाखल झाली आहे. सध्या या लोकलचा मुक्काम कुर्ला कारशेडमध्ये आहे. या लोकलच्या चाचणीला 16 एप्रिलपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. घामाच्या धारांनी हैराण होणाऱ्या मुंबईकरांना गारेगार प्रवास अनुभवता येणार आहे.

…म्हणून 16 एप्रिलपासून एसी लोकलची सुरुवात!
भारतीय रेल्वेची सुरुवात 16 एप्रिल 1853 रोजी मध्य रेल्वेमधूनच झाली. हा ऐतिहासिक दिवस लक्षात घेता 16 एप्रिलचा मुहूर्त एसी लोकलच्या चाचणीसाठी निवडण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेआधी मध्य रेल्वेचा नंबर!
सुरुवातीला पश्चिम रेल्वेवर ही एसी लोकल धावणार होती. मात्र, रेल्वे मंत्रालयाने या लोकलला मध्य रेल्वेमार्गावर आणण्याचा निर्णय घेतला.त्यामुळं आता ही एसी लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार आहे. रेल्वेच्या चेन्नईतील इंटीग्रल कोच फँक्टरीमध्ये या लोकलची निर्मिती करण्यात आली आहे.

नव्या एसी लोकलची वैशिष्ट्ये:
  1. आधुनिक सुविधांची देशातली पहिली 12 डब्यांची एसी लोकल
  2. या लोकलमधील 6-6 डबे आतून एकमेकांना गँगवेमार्फत जोडलेले असणार
  3. डब्यांना ऑटोमॅटिक दरवाजे
  4. प्लॅटफॉर्मवर जेव्हा लोकल येईल, तेव्हा मोटरमनच्या हातात दरवाजे उघडणे, बंद करण्याचे नियंत्रण
  5. अडचणीच्या वेळी प्रवाशांना एका नॉबच्या सहाय्यानं दरवाजे उघडता येणार
  6. स्टीलपासून बनवलेले वातानुकुलित कोच स्टील ग्रे आणि इंडीगो रंगात
  7. प्रत्येक कोचमध्ये मोठ्या खिडक्या
  8. सुरक्षेच्या दृष्टीनं खिडक्यांच्या काचा आणि दरवाजांमध्ये विशेष रचना
  9. डब्यात सीट्स अत्यंत आरामदायी असतील
  10. दोन सीटच्या अंतरात वाढ, गर्दीत उभं राहून प्रवाशांना प्रवास शक्य
  11. नव्या पद्धतीचे हँडल आणि दरवाजातील खांब
  12. एका डब्यात सुमारे 400 प्रवासी
  13. 12 डब्यात 5 हजार प्रवासी प्रवास करु शकणार
  14. मोटरमनशी बोलण्यासाठी टॉक बॅक मशिनची सुविधा
  15. एसी लोकलच्या प्रत्येक डब्यात 15 टनांचे दोन एसी
===========================================

देशातल्या सर्वात जलद एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा!

देशातल्या सर्वात जलद एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा!
नवी दिल्ली: देशातील सर्वात जलद रेल्वे अर्थात गतिमान एक्स्प्रेसला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन आणि आगरा कॅट दरम्यान ही रेल्वे धावणार आहे.

१६० किमी प्रतितास वेगाने धावणारी गतिमान एक्स्प्रेस दिल्ली ते आगरा दरम्यानचं अंतर अवघ्या १०० मिनिटांत कापेल. आठवड्यातील ६ दिवस ही रेल्वे चालवली जाईल.

विमानामधील एअर होस्टेसप्रमाणे गतिमान एक्स्प्रेसमध्ये ट्रेन होस्टेस प्रवाशांच्या स्वागतासाठी हजर असतील. तर गतिमान एक्स्प्रेसमध्ये चेअरकारचं तिकीट ७५० रूपये तर एक्झिक्युटीव्ह क्लासचं तिकीट १५०० रूपये इतकं असणार आहे.
===========================================

रिझर्व्ह बँकेचं पतधोरण आज, कर्जावरील व्याजदरात कपातीची शक्यता

रिझर्व्ह बँकेचं पतधोरण आज, कर्जावरील व्याजदरात कपातीची शक्यता
मुंबई: चालू आर्थिक वर्षांतील पहिले पतधोरण आज जाहीर होणार आहे. या पतधोरणात रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या निर्णयाची साऱ्यांनाच अपेक्षा आहे. या कपातीनंतर गृहकर्जाचे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. 
‘अधिक व्याजदर हे अर्थव्यवस्थेसाठी मारक आहेत.’ असं वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पतधोरण पूर्वदिनी केलं. या पार्श्वभूमीवर जेटली यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे. 
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तीन आठवड्यातच केंद्र सरकारनं पोस्टातील योजनांसह अन्य योजनांवरील बचतीवरील व्याजदर कमी केले. केंद्र सरकारच्या अल्प बचत योजनांच्या व्याज दरात मोठी कपात केल्यानं रिझर्व्ह बँकेला रेपो दरात कपात करण्यास मार्ग मोकळा केला असल्याचे मानले जात आहे. 
जर रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपात केली तर कर्ज स्वस्त होणार आहे. त्यामुळे इतर बँकांना त्याचा फायदा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचविता येणार आहे. रिझर्व्ह बँकेने 2015 वर्षात रेपो रेटमध्ये सव्वा टक्के कपात केली होती.
===========================================

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल प्रति लिटर 2.19 रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर 98 पैशांनी महागलं आहे. नवे दर मध्यरात्रीपासून लागू होतील. 
यापूर्वी 16 मार्च रोजी पेट्रोलचे 3.07 रुपयांनी आणि डिझेलचे दर 1.90 रुपयांनी वाढवण्यात आले होते. तर 17 फेब्रुवारीला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल केले होते. तेव्हा पेट्रोलचे दर 32 पैशांनी स्वस्त झालं होतं. मात्र डिझेल 28 पैशांनी महागलं होतं.
===========================================

पनामा पेपर्सवर नजर, कारवाई होणारच : अर्थमंत्री

पनामा पेपर्सवर नजर, कारवाई होणारच : अर्थमंत्री
नवी दिल्ली : परदेशात अनेक भारतीयांनी काळा पैसा लपवल्याचं पनामा पेपर्समधून समोर आल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कारवाईचं आश्वासन दिलं आहे.

पनामाच्या मोझॅक फोन्सेका कंपनीचे एक कोटी दहा लाख गोपनीय दस्तऐवजी लीक झाले आहेत. मेझॅक फोन्सेकाने कशाप्रकारे आपल्या ग्राहकांचे कर वाचवण्यात, कर चोरी करण्यात, काळा पैसा पांढरा करण्यात आणि नियामातून वाचवण्यात कशाप्रकारे मदत केली, याचा खुलासा या दस्तऐवजांमध्ये झाला आहे.

अवैधरित्या परदेशात पैसा ठेवणाऱ्यांवर कारवाई होणारच, असं भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यावर अनेक यंत्रणांचा ग्रुप बनवला असून त्यामध्ये सीबीडीटी, एफआययू, आरबीआय, एफटी आणि टीआरचा समावेश आहे. या यंत्रणांची पनामा पेपर्सच्या माहितीवर नजर असून कारवाई केली जाईल, असंही जेटली म्हणाले.
===========================================

हेमा मालिनी आणि एकनाथ खडसेंना हायकोर्टाचा दिलासा

हेमा मालिनी आणि एकनाथ खडसेंना हायकोर्टाचा दिलासा
मुंबई : बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमामालिनी आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर पोलिस कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने स्थगित केली आहे. हेमामालिनी यांच्या डान्स अकॅडमीसाठी मुंबईतील भूखंड अत्यल्प दरात विकल्याच्या आरोपातून हेमामालिनी आणि एकनाथ खडसेंविरोधात फसवणूकीचा खटला दाखल करण्याची मागणी याचिकेत केली होती. 
हेमामालिनी यांच्याविरोधात गुन्हेगारी स्वरुपाची कारवाई करण्याऐवजी याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी नागरी याचिका दाखल करावी, असं जस्टीस अभय ओक यांच्या खंडपीठाने सुचवलं. 
जाहिरातीद्वारे अर्ज मागवल्याशिवाय राज्य सरकार सार्वजनिक मालमत्तेचं वाटप करु शकत नाही, असे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश असल्याचं याचिकेत म्हटलं होतं. मात्र हायकोर्टाचे आदेश पायदळी तुडवून अंधेरीतील मोक्याचा भूखंड हेमामालिनी यांच्या भरतनाट्यम प्रशिक्षण केंद्रासाठी अत्यल्प दरात विकल्याचा आरोपही यात करण्यात आला होता.
===========================================

प्रियंका चोप्राला ओबामांचं डिनरसाठी आमंत्रण?

प्रियंका चोप्राला ओबामांचं डिनरसाठी आमंत्रण?
न्यूयॉर्क : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा भारताचा झेंडा अटकेपार रोवताना दिसत आहे. ‘क्वॉन्टिको’ सारखी परदेशी मालिका, ऑस्करच्या मंचावर हजेरी आणि ‘बेवॉच’मधील हॉलिवूड डेब्यू ही उदाहरणं ताजी असतानाच प्रियंकाला थेट ओबामांनी भेटीचं आमंत्रण दिल्याचं वृत्त आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या व्हाईट हाऊस डिनरला प्रियंका हजेरी लावण्याची शक्यता आहे. ओबामा कुटुंबीयांनी यजमानपद भूषवलेल्या डिनरला ब्रॅडली कूपर, जेन फोंडा, ल्युसी लियू यासारख्या हॉलिवूड कलाकारांसोबत सहभागी होण्याची संधी पीसीला मिळू शकते.

ओबामांचं हे अखेरचं व्हाईट हाऊस डिनर असेल. द व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्ट्स असोसिएशन डिनरला राष्ट्राध्यक्ष, फर्स्ट लेडी म्हणजेच त्यांच्या पत्नी आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकारी यांसारखी मंडळी उपस्थित राहतात.
===========================================

वकार युनूस पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार

वकार युनूस पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार
लाहोर : पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रशिक्षक वकार युनूसने अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शाहिद आफ्रिदने रविवारीच पाकिस्तानच्या ट्वेन्टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लाहोरमध्ये झाालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर वकार युनूसने अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. 
भारतात खेळवण्यात आलेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकात पाकिस्तानचा संघ साखळी फेरीतच गारद झाला. त्यामुळे कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि प्रशिक्षक वकार युनूस यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली होती. तसंच विश्वचषकाआधीही पाकिस्तानला आशिया चषक आणि न्यूझीलंडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. 
त्याच निराशाजनक कामगिरीचा मोठा फटका कर्णधार आफ्रिदी आणि प्रशिक्षक वकार युनूस यांना बसला आहे.
===========================================

माथाडी कामगार शेतकऱ्यांच्या जीवावर का उठलेत?

माथाडी कामगार शेतकऱ्यांच्या जीवावर का उठलेत?
नवी मुंबई : सरकारने किरकोळ व्यापारी धोरण आणि एपीएमसीतून माथाडींना वगळल्यामुळे गेले दोन दिवस संप सुरु आहे. त्यामुळे हजारोच्या संख्येने ट्रकभरुन भाजीपाला आणि फळं एपीएमसीत सडू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे.

केवळ एपीएमसीवरची मक्तेदारी कायम राहावी यासाठी व्यापारी आणि नेत्यांशी संगनमत करुन माथाडी अडवणूक करत असल्याचा आरोप होत आहे. ऐन दुष्काळात रक्ताचं पाणी करुन पिकवलेला भाजीपाला एपीएमसीत सडताना बघून शेतकऱ्याचा जीव तुटतोय, पण त्याचं सोयरसुतक ना माथाड्यांना आहे, ना व्यापाऱ्यांना.

नुकतंच सरकारनं किरकोळ व्यापारी धोरण जाहीर केलं. त्यातून माथाडी कामगारांना वगळ्यात आलं. त्याविरोधात शनिवारी दुपारी अचानक बंद पुकारण्यात आला. फळं, भाजीपाला, कांदा-बटाटा आणि मसाल्याचं मार्केट बंद झालं. मात्र तोवर राज्यभरातून शेकडो ट्रक भाजीपाला, फळं मार्केटमध्ये आली. ज्याला माथाड्यांनी हातही लावला नाही.

शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना माथाडींचे नेते राजकारण करण्यात व्यस्त आहेत. सरकारनं माथाडींना किरकोळ व्यापार धोरण आणि एपीएमसीतून वगळताना विश्वासात घेतलं नाही, असा आरोप होत आहे.
===========================================
डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात 'ज्ञानपुष्प आरोग्य योजनेत मोफत उपचार - अशी माहिती डॉ. शाम मोरे यांनी दिली.  हि योजना जनसामान्यापर्यंत पोहचण्यासाठी डॉ. वर्षा चौरे ह्या प्रयत्न करत आहेत.

===========================================

'द जंगल बुक' चित्रपटाला U/A सर्टिफिकेट 

  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. ५ - जंगल जंगल पता चला हैं, चड्डी पहन के फूल खिला हैं' हे गाणं ज्याप्रमाणे अजूनही अनेकांच्या लक्षात आहे त्याचप्रमाणे त्यातील मोगली हे पात्र आजही अनेकांना आकर्षित करत आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यत प्रत्येकाच्या यासंबंधी काही ना काहीतरी आठवणी आहेत. बालपणीच्या आठवणी जागे करणारा मोगली पुन्हा हॉलीवूड चित्रपट 'द जंगल बुक'च्या निमित्ताने पुन्हा रुपेरी पडद्यावर येतं आहे. सेन्सर बोर्डाने मात्र हॉलीवूड चित्रपट  'द जंगल बुक'ला युए सर्टिफिकेट दिले आहे. 
    सेन्सर बोर्डाने हॉलीवूड चित्रपट  'द जंगल बुक'ला युए सर्टिफिकेट दिल्याने अनेकांनी भुवया उंचवल्या आहेत. 'पुस्तकाच्या आधारे तुम्ही विचार करु नका. चित्रपट पाहा आणि त्यानंतर मुलांनी एकटे पाहणे योग्य आहे की नाही ? हे ठरवा. थ्रीडी एफेक्टमुळे प्राणी प्रेक्षकांमध्येच उडी मारत आहेत असा भास होत असल्याने मुलं घाबरण्याची शक्यता आहे. चित्रपटाचं संपुर्ण पॅकेजिंग पाहूनच हा निर्णय घेतला', असल्याची माहिती सेन्सर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी दिली आहे. 
     
    'युए सर्टिफिकेटचा चुकीचा अर्थ लावला जात असून त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं निहलानी यांनी सांगितलं आहे. युए सर्टिफिकेटमुळे पालकांना चित्रपटाबद्द्ल कल्पना येते त्यामुळे मुलांना चित्रपटाला पाठवायचे की नाही ? ठरवता येते. चित्रपट न पाहता पालकांना कसं काय कळेल की चित्रपटात काय आहे ? त्यासाठीच युए सर्टिफिकेट असल्याचं', पहलाज निहलानी यांनी सांगितलं आहे.
===========================================

गुगलने तालिबानी अॅप प्ले स्टोअरमधून काढून टाकले

  • ऑनलाइन लोकमत - 
    काबूल, दि. ५ - इस्लाम मुलतत्ववाद्यांनी तयार केलेले अॅप गुगल प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहे. हे अॅप पाश्तो भाषेत होते. तसंच या अॅपमधून अफगाणिस्तान चळवळीसंबंधी फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जात होते. 1 एप्रिलला हे अॅप लाँच करण्यात आले होते. मात्र लगेचच गुगुल प्ले स्टोअरमधून हे अॅप काढून टाकण्यात आले आहे. तांत्रिक समस्येमुळे हे अॅप बंद झाल्याचा दावा या ग्रपुने केला आहे. 
    बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार गुगल अॅप पॉलिसीनुसार भडकाऊ भाषण देणे नियमांच्या विरोधात आहे. या नियमाचे उल्लघंन केल्यामुळेच हे अॅप काढून टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेतील साईट इंटेल ग्रुपने ही माहिती पुरवली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जिहादींच्या सर्व हालचालींवर साईट इंटेल ग्रुप लक्ष ठेवून असतो. गुगलने मात्र यासंबंधी काही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 
    'आमच्या युजर्स आणि डेव्हलपर्सना चांगला अनुभव मिळावा या हेतूने पॉलिसी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आमच्या पॉलिसीचं उल्लंघन करणा-यांचे अॅप आम्ही काढून टाकतो', अशी माहिती गुगलने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. 'जागतिक स्तरावर प्रेक्षक तयार करण्यासाठी हे अॅप आमच्या प्रगत तंत्रज्ञानाचा हा भाग होता', असं तालिबानच्या प्रवक्त्याने ब्लूमबर्गशी बोलताना सांगितलं आहे.
===========================================

पनामाला सतावतेय प्रतिमेची भीती

  • पनामा सिटी : विधी संस्थेतून फुटलेल्या दस्तावेजातून जगभरातील अनेक नेते, प्रमुख खेळाडू आणि इतर नामवंतांनी अब्जावधी डॉलरचे घबाड पनामात लपविले असल्याचे संकेत आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर करचोरांचे आश्रयस्थान किंवा हवाला व्यवहाराचे मोठे केंद्र अशी पनामाची प्रतिमा बनण्याची भीती आहे. पनामा हा छोटा देश असून त्याची लोकसंख्या केवळ ४० लाख आहे. प्रसिद्ध पनामा कालवा हा त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. पनामाने आपली प्रतिमा बदलण्यासाठी अलीकडे पावले उचलली होती. तथापि, रविवारच्या खुलाशानंतर देशाने प्रतिमा बदलण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना धक्का बसू शकतो. पूर्ण बेकायदेशीर?
    या प्रकरणात ज्यांची नावे समोर आली आहेत तो व्यवहार पूर्ण बेकायदेशीर आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत आयसीआयजेचे म्हणणे आहे की, हे बेकायदेशीर असू शकते. अर्थात हे पूर्णपणे बेकायदेशीर नसले तरी हे स्पष्ट दिसत आहे की, कशा प्रकारे या बड्या लोकांनी कर वाचविण्याचा प्रयत्न करून देशाचे नुकसान केले आहे.
    कशासाठी विदेशी खाते? मोठे लोक देशाबाहेर जी खाती उघडतात त्यामागे देशातील बँकिंग व्यवस्थेपासून लपवून पैसा बाहेर नेणे आणि टॅक्स वाचविणे हा हेतू असतो.
===========================================
रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात
मुंबई - रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज (मंगळवार) जाहीर केलेल्या द्विमाही पतधोरणाच्या आढाव्यात रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. आता रेपो रेट 6.75 टक्क्यांवरून 6.50 टक्के करण्यात आला आहे. यामुळे गृहकर्जदारांना दिलासा मिळाला असून, गृहकर्जाचे हप्ते कमी होणार आहेत.

आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज पतधोरण जाहीर केले. सीआरआर दरात कोणतेही बदल करण्यात आलेला नाही. रोख निधी गुणोत्तर (सीआरआर) 4 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. तर रिव्हर्स रेपो दर आता 6 टक्के आहे. गेल्या द्विमाही पतधोरण आढाव्यात आरबीआयने व्याजदर "जैसे थे‘ ठेवले होते.

घाऊक तसेच किरकोळ महागाईचे दर नियंत्रणात असल्याने आणि महागाई दर आरबीआयने निर्धारित केलेल्या समाधान पातळीवर आहेत. शिवाय सरकारने वित्तीय तुटीला आवर घातल्याचे दिसून येत असल्याने आरबीआयने रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केल्याचे बोलले जात आहे. आता आरबीआयने दरकपात केल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. अर्थात कर्जाप्रमाणेच ठेवींवरील व्याजदरदेखील कमी झाल्याने मात्र व्याजावर अवलंबून असलेल्या नागरिकांना झळ सोसावी लागणार आहे.
===========================================
भाजपचे 'मुँह में राम बगल मे छुरी'- केजरीवाल

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षवाले एका बाजूला "भारतमाता की जय‘ म्हणत आहेत, तर दुसरीकडे भारताच्या भूमीवर आयएसआयला परवानगी देऊन भारतमातेच्या पाठीत सुरा खुपसत आहेत, असे म्हणत राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे, ‘मुँह मे राम बगल मे छुरी. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले एका बाजूला ‘भारतमाता की जय‘ म्हणत आहेत आणि आयएसआयला भारताच्या भूमीवर परवानगी देऊन भारतमातेच्या पाठीत चाकू खूपसत आहेत.‘ पठाणकोटवरील दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी अलिकडेच पाकिस्तानचे संयुक्त तपास पथकाने भारताला भेट दिली होती. तर "भारतमाता की जय‘ या घोषणेवरून देशभर चर्चा सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी सरकारवर टीका केली आहे.
===========================================
मुंबई उपनगरासह धुळे जिल्ह्यात पावसाच्या सरी
मुंबई - मुंबई व उपनगरात आज (मंगळवार) सकाळी सातच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. तर, सातारा जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि उपनगरात पावसाचा शिडकावा झाला. अनेक ठिकाणी सकाळी 7 च्या सुमारास 15 ते 20 मिनिटे पाऊस पडला. परिणामी सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. सीएसटी परिसरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पावसामुळे काही ठिकाणी लोकल धीम्यागतीने धावत आहेत.

धुळे जिल्ह्यात पाऊस 
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पिंपळनेरसह परिसरातील  चिकसे, सामोडे, बलहाणे, देशशीरवाडे, दिघावे, जेबापुर, धोगडे, सुकापुर या ठिकाणी आज पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होते. अखेर सकाळी साडेसातच्या सुमारास ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि विजांच्या कडकडाटासह जोरात पावसास सुरूवात झाली. सुमारे 20 मिनिटे पाऊस सुरू होता.
===========================================
मुख्यमंत्री पिकलेल्या केळ्याप्रमाणे नरम झाले:सेना
मुंबई - फडणवीस यांनी हे आधी जोरात सांगितले व नंतर ‘भारतमाता की जय‘च्या प्रश्‍नी ते नरम पडले. फडणवीस यांनी माघार घेण्याची गरज नव्हती, पण त्यांनी माघार घेतली व त्याचे खापर नेहमीप्रमाणे मीडियावर फोडले. हे असे का झाले याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनीच करायला हवा. मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच ठरते, पण ते आधी कठोर झाले व नंतर जास्त पिकलेल्या केळ्याप्रमाणे नरम झाले, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

भारतमाता की जय वरून सध्या देशभरात राजकारण तापले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा न देणाऱ्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही, असे म्हटले होते. याच वक्तव्यावरून शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. शिवसेनेने सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून आपले मत मांडले आहे. 

शिवसेनेने म्हटले आहे, की जे भारतमाता की जय बोलणार नाहीत त्यांना महाराष्ट्रात व देशात राहाण्याचा अधिकार नाही! भारतमातेचा अपमान करणार्‍या ओवेसीवर महाराष्ट्रात गुन्हा दाखल करा. अशी गर्जना करून आम्ही काही गुन्हा केला असेल तर मुख्यमंत्री महोदय, आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. ओवेसी सुटला तरी चालेल, पण देशप्रेमी तुरुंगात गेलेच पाहिजेत. देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पद्धतीने सांगितले की, ‘भारतमाता की जय बोलावेच लागेल. जे भारतमाता की जय बोलणार नाहीत त्यांना हिंदुस्थानात राहाण्याचा अधिकार नाही!’ सरसंघचालक मोहनराव भागवत यांनीही आधी सगळ्यांना भारतमाता की जय बोलावेच लागेल, भारतमाता की जयचा नारा जगभरात घुमवू असे बजावले; पण लगेच सरसंघचालकही नरम पडले! अशी सक्ती करून कसे चालेल? अशी भूमिका त्यांनी घेतली. या बदललेल्या भूमिका आश्‍चर्यकारक, तितक्याच धक्कादायक आहेत. दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना भेटा व हे सर्व ‘राष्ट्रीय’ उपक्रम मार्गी लावा! देशविरोधी फतवा काढणार्‍या देवबंदवाल्यांचे नरडे दाबा. भारतमातेचा अपमान करणार्‍या ओवेसीवर महाराष्ट्रात गुन्हा दाखल करा व जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबाबाईंना एकदा तरी भारतमाता की जय बोलायला लावा! वाटल्यास हे सर्व करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अणे वकिलांची नेमणूक करावी! बोला, भारतमाता की जय!
===========================================
पाणी विकत घेऊन "ते' भागवितात शेकडोंची तहान
औरंगाबाद - उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच प्रवासात जर पाणी विकत घ्यायचे म्हटले, तर 20 रुपये मोजावे लागतात. मात्र, जर कोणी शुद्ध पाणी मोफत वाटप करीत असेल, तर प्रवासी त्याला "दुआ‘ देणारच यात शंका नाही. औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकावर पार्किंगची व्यवस्था सांभाळणारे सय्यद मजहर उद्दिन हे फेब्रुवारी महिन्यापासून फिल्टर केलेले थंड पाण्याचे जार घेऊन पाणीवाटप करत आहेत. 

सय्यद मजहर उद्दिन हे 20 लिटर पाण्याचा एक जार असे दररोज 25 जार विकत घेतात. एक जार त्यांना 30 रुपयांना मिळतो. प्रवाशांच्या पाण्याच्या सोयीसाठीची ही तळमळ पाहत, किशनचंद तनवाणी यांनीसुद्धा प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना दररोज 15 जार देऊ केले आहेत. 

पाणी बाटने से दुआं मिलती है 
उन्हाळ्यात सर्वत्र लाहीलाही होते. तीन वर्षांपासून तर दुष्काळाचे संकट कायम आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई भासते आहे. मी पाणीवाटप करतो. त्यातून प्रवाशांचा आशीर्वाद मिळतो; पण सध्या हे पाणी दिवसाकाठी पुरत नाही. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सेवाभावी संस्थांनी यात सहभाग घेतला तर हे कार्य आणखी वाढेल, असे मजहर उद्दिन म्हणाले. 
===========================================
अभिनंदन टेरेसने वाचविले 50 टक्के पाणी
लातूर - दुष्काळात होरपळणाऱ्या लातूर शहरात पाणी बचतीचे विविध प्रयोग केले जात आहेत. यात येथील सूत मिल रस्त्यावरील अभिनंदन टेरेस या अपार्टमेंटमध्ये 23 फ्लॅटला पाण्याचे 63 मीटर बसवून 50 टक्के पाण्याची बचत करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पाणी, वीजबिलाची बचत तर झालीच; पण आपापसांत होणारे मतभेदही आता बंद झाले आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच अपार्टमेंटमध्ये असा प्रयोग झाला तर पाण्याची मोठी बचत होण्यास मदत होणार आहे. 

पाण्याचा अमर्याद वापर 
या अपार्टमेंटमध्ये शहरातील इतर अपार्टमेंटसारखाच पाण्याचा अमर्याद वापर सुरू होता. यामुळे दररोज 18 ते 20 हजार लिटर पाणी हे फ्लॅटधारक वापरत होते. पाणी मुबलक येत असल्याने किती पाणी वाया घालत आहोत याची चिंता कोणी करीत नव्हते. त्यामुळे दररोज पाण्याची टाकी भरावी लागत होती. 

वीजबिल भरमसाट 
पाण्याचा वापर अमर्याद राहिल्याने या अपार्टमेंटमध्ये दररोज आठ ते दहा तास बोअरची मोटार सुरू राहायची. यातून दरमहा सरासरी दहा हजार रुपये वीजबिल सर्वांना मिळून भरावे लागत होते. यात आम्ही जास्त पाणी वापरत नाही, तुम्ही वापरता असे म्हणत मतभेदही होत असत. 

सहा महिन्यांपूर्वी मांडली कल्पना 
सहा महिन्यांपूर्वी सोसायटीचे सचिव डॉ. सदाशिव केंद्रे, अध्यक्ष डॉ. व्ही. एम. बांगड, परबसअप्पा नागुरे, प्रा. पारशेट्टी यांनीही नळाला मीटर बसविण्याची कल्पना मांडला. त्यातून 23 फ्लॅटला 63 मीटर बसविण्यात आले. एका फ्लॅटला सरासरी तीन ते चार मीटर बसविण्यात आले आहेत. यातून रोज केवळ सात हजार लिटर पाणी लागत आहे. विजेचे बील दरमहा पाच हजारांवर आले आहे. 
===========================================
‘भारतमाता की जय’ वरून विधिमंडळात गदारोळ
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून विधिमंडळात विरोधक आक्रमक
मुंबई - ‘भारतमाता की जय’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कथित वक्तव्यावरून आज विधिमंडळात पुन्हा एकदा रणकंदन माजले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांनी फडणवीस यांनी नाशिक येथे केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेत आणि विधान परिषदेतही प्रचंड गोंधळ घातला. फडणवीस यांनी यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्रिपद असले काय किंवा नसले काय? मी भारत माता की जय म्हणणारच, अशी भूमिका घेतल्याने विरोधकांनी अधिकच आक्रमक होत दोन्ही सभागृहांत सभात्याग केला.

काल (रविवारी) नाशिक येथे प्रदेश भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना ‘भारत माता की जय’ न म्हणणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही असे वक्तव्य केले होते. याच मुद्यावरून फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर हरकत घेऊन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी फडणवीस यांच्या माफीनाम्याची मागणी केली. विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे मांडलेल्या या मुद्यावरून आक्रमक झालेले विरोधक आणि फडणवीसांच्या समर्थनासाठी सरसावलेले सत्ताधारी यामुळे सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करत विरोधक जाणीवपूर्वक राजकारण करत असल्याचे स्पष्ट करीत फडणवीस म्हणाले, की मी काल जे वक्तव्य केले होते त्यावर मी आजही ठाम आहे.

मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य घटनात्मकपदाचा अवमान करणारे असल्याचे म्हणत विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या माफीनाम्याची मागणी केली. त्यांच्या या स्थगन प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड बोलण्यास इच्छुक असूनही त्यांना तालिका अध्यक्षांनी परवानगी नाकारल्याने विरोधक आक्रमक झाले. फडणवीसांच्या विरोधात घोषणाबाजी करत हौदात उतरलेल्या विरोधकांनी राष्ट्रध्वज फडकावले. याचदरम्यान फडणवीस यांच्या समर्थनासाठी सत्ताधारीही आक्रमक झाले. मात्र, गोंधळ वाढतच गेल्याने तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी पंधरा मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. त्यानंतर सभागृह सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे आमदार नसीम खान तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस यांच्या माफीनाम्याची मागणी लावून धरली. हे राज्य घटनेच्या आधारे चालणार, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे राज्य चालवणार याचे उत्तर द्यावे, असा सवाल चव्हाण यांनी केला. त्यामुळे झालेल्या गोंधळात पुन्हा एकदा अर्ध्या तासासाठी सभागृह तहकूब करण्यात आले. त्यानंतर फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, त्यावर समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला. 
===========================================
विदर्भासह कोकणदेखील स्वतंत्र करा-आंबेडकर
चिपळूण- "छोट्या राज्याचा विकास गतिमान पद्धतीने होतो. त्या राज्याची प्रगती चांगली होते. विदर्भ स्वतंत्र झाल्यास आमची जुनी श्रीमंती आम्ही परत मिळवू. कोकणच्या विकासासाठी स्वतंत्र कोकणाची मागणी करा,‘ असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज चिपळूण येथे केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ऍड. प्रकाश आंबेडकर चिपळूणला आले होते. त्या वेळी त्यांनी "सकाळ‘शी संवाद साधला. 
ते म्हणाले, "विदर्भात नैसर्गिक सुबत्ता आहे, तरी विदर्भ मागासलेला आहे. याला शासन जबाबदार आहे. पूर्वी कोकण आणि विदर्भातील माणूस खाऊन पिऊन सुखी होता, तर पश्‍चिम महाराष्ट्र नेहमी उपाशी आणि अवलंबी होता. विदर्भात पाऊस कमी पडला तरी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष नव्हते. देशातील 35 टक्के कडधान्य विदर्भात पिकते. देशाला 70 हजार कोटींचे उत्पन्न कडधान्यातून मिळते. त्यापैकी 25 हजार कोटी रुपये विदर्भातील शेतकऱ्यांला मिळत होते. एका पिकातून विदर्भ समृद्ध होत होता. ही श्रीमंती आज राहिलेली नाही. आज हे पैसे व्यापाऱ्यांच्या खिशात जात आहेत. कापसाचे विक्रमी पीक येत असूनही शासनाने सूत गिरण्या विदर्भात आणल्या नाहीत. कापसाला सुरक्षा आणि हमीभाव नाही. विकासाची दृष्टी बदलली म्हणून श्रीमंत असलेला विदर्भ मागासलेला झाला. याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे.‘‘ 
(कै.) ए. आर. अंतुले मुख्यमंत्री झाले नसते तर कोकणचा विकास झालाच नसता. अंतुले मुख्यमंत्री होण्यापूर्वी मी कोकणात आल्यानंतर बोटीने कुठेतरी उतरायचो, एसटीने आलो तर महामार्गावर उतरून पायी चालत जात होतो. अंतुले मुख्यमंत्री झाल्यानंतर गावोगावी रस्ते झाले. जेटी, बंदरांचा विकास झाला. त्यामुळे आज आम्ही चारचाकी गाड्यातून येत आहोत. दुर्दैवाने कोकण विकासाची दूरदृष्टी त्यानंतरच्या नेत्यांमध्ये नाही. काजू, मासळी, आंबा, पर्यटनाच्या माध्यमातून कोकणचा विकास करणे शक्‍य आहे. सुमारे 15 कोटींचा काजू दररोज आयात होतो. एखाद्या आमदाराने 5 कोटींचे काजू उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न केले तरी कोकण विकासाला फार मोठी चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. 
===========================================
कर्नाटकनं मागितलं तीन टीएमसी पाणी
दुष्काळात पाणी देणे अशक्‍य असल्याची महाराष्ट्राची भूमिका 
सांगली - कोयना धरणातून दोन ते तीन टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कर्नाटकने महाराष्ट्राकडे केली आहे. कोयनेत सध्या अवघा 37.76 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील अडीच-तीन महिने पाणी जपून वापरावे लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकला पाणी विकत दिले जाणार नाही. कोयनेतून सोडलेले पाणी सांगली बंधाऱ्यातून पुढे जाणार नाही, इतकी खबरदारी घेतली आहे. 

कोयना धरणाची क्षमता 105 टीएमसी आहे. या वर्षी अवघा 79 टीएमसी पाणीसाठा झाला. तो पुढे आठ महिने टिकवण्याचे आव्हान आहे. त्यामुळे पाणी वापराचे नियोजन काटेकोर करण्यात आले आहे. आजअखेर 37.76 टीएमसी पाणीसाठा आहे. तो एप्रिल, मे व जूनपर्यंत पुरवावा लागणार आहे. टेंभू, ताकारी योजना याच पाण्यावर अवलंबून आहेत. शिवाय, दरमहा सुमारे सव्वापाच टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरावे लागते. कृष्णा नदीच्या पाण्यावर कऱ्हाड तालुक्‍यासह सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या धडक योजनाही अवलंबून आहेत. त्यांना कृष्णेचे पाणी उचलण्याचा अधिकृत अधिकार नसला, तरी निर्बंध घालता आलेले नाहीत. उलटप्रसंगी वीज विकत घेऊन ते पाणी धडक योजनांना द्या, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली होती. कृष्णाकाठची ही स्थिती असताना कर्नाटकला पाणी देण्याचा विचारही करता येत नाही, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.
एरवी कोयना धरण शंभर टक्के भरायचे. राज्यात कृष्णा खोऱ्यात पुरेसा पाऊस असायचा तेव्हा कोयनेतून दरवर्षी दोन-चार टीएमसी पाणी कर्नाटकला दिले जाई, अर्थात त्याचे राज्याला आठ-दहा कोटी मिळत. सध्या एक टीएमसी पाण्याची किंमत सव्वादोन कोटी होते. मध्यंतरी कर्नाटककडून पाण्याची मागणी नसताना फक्त दूषित पाणी वाहते करण्यासाठी दोन टीएमसी पाणी फुकटात सोडले जायचे. यंदा दुष्काळामुळे ते परवडणारे नाही. कर्नाटकने या वर्षीही पाण्याची मागणी केली खरी. अलमट्टीतील पाणीसाठा मृतसंचयाला गेला आहे. गेल्या आठवड्यात जलसंपदाच्या बैठकीत त्याची माहिती देण्यात आली. आता कर्नाटकातही पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. 
===========================================

No comments: