[अंतरराष्ट्रीय]
१- येमेन; भारतीय ख्रिश्चन प्रिस्टना लवकरच सोडवू- परराष्ट्र मंत्री
२- वॉशिंग्टन; आण्विक सुरक्षेबाबत मोदींकडून अनेक उपाययोजनांची घोषणा
३- इस्लामाबाद; पठाणकोट हल्ल्याचे पुरावे देण्यात भारत अपयशी, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांचा दावा
४- वॉशिंग्टन; मसुद अजहरला संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी यादीत टाकण्यास चीनचा विरोध
५- शिकागो; अमेरिकेत मुस्लीम कुटुंबाला विमानातून उतरवले, भेदभावाचा आरोप
६- वॉशिंग्टन; अण्वस्त्र तंत्रज्ञान चोरांमुळे अण्वस्त्रांना धोका
७- न्यूयॉर्क; अमेरिकेत मोठ्या आर्थिक मंदीची भीती: ट्रम्प
८- ब्रुसेलमधलं विमानतळ कडक बंदोबस्तात पुन्हा खुलं केलं, तीन विमानांनी उड्डाण केलं
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
९- मसूद अझरवरील बंदी लांबल्यामुळे भारत नाराज
१०- सीरियातील चार बंधक भारतीयांची मुक्तता
११- 'आयडीबीआय'चे खाजगीकरण करू नका- केजरीवाल
१२- आझादांनीही 'भारतमाता की जय' म्हटले - प्रसाद
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना एकटं लढण्याच्या सूचना : सूत्र
१४- प्रत्युषानं याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता : अभिनेत्री सारा खान
१५- प्रत्युषाच्या प्रियकराला आले नैराश्य, रुग्णालयात दाखल
१६- पाच सखल ठिकाणे पूरमुक्त करा - आयुक्त
१७- शेतकरी कर्जबाजारी न होण्यासाठी प्रयत्न- मुख्यमंत्री
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- नमस्कार लाईव्हचे संपादक बाहेती यांनी घेतली माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांची सदिच्छा भेट
१९- उत्तर प्रदेश; बिजनौरमध्ये एनआयएच्या अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या
२०- वाराणसी; कारागृह अधीक्षकास कैद्यांनी ठेवले ओलिस
२१- गडचिरोली; नक्षलग्रस्त नागरिकांना मिळवून दिला रोजगार
२२- छतीसगढ; स्वच्छतेसाठी 'गंगा'ची मुख्यमंत्र्यांकडे धाव
२३- मुखेड; बि.जी.कोळसे पाटील, तृप्ती देसाई, सतिष रावजादे व शितल साठे यांच्या व्याख्यानाचे आयोजन
२४- लोणावळा टायगर्स पॉईंट व लोणावळा डॅमजवळ झालेल्या दोन मोटारसायकल अपघातात चौघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी.
२५- दिल्लीतील वसतिगृहात राजस्थानच्या मुलीचा मृतदेह; शिक्षकानं बलात्कार केल्याचा आरोप
२६- अहमदनगरमधल्या संगमनेरमध्ये बिबट्यानं दोघांवर हल्ला
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- ‘द वॉल’ टीम इंडियाचा नवीन प्रशिक्षक?
२८- आत्महत्येवेळी प्रत्युषा बॅनर्जी गर्भवती होती?
२९- टी-20 विश्वचषक कोण जिंकणार? ईडन गार्डनवर रंगणार अंतिम सामना
३०- प्रियंकानेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता - प्रियंका चोप्राचा माजी मॅनेजर प्रकाश जाजू
३१- 'मॅड मॅक्स' नॅथन जोन्सचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
३२- कोलकाता; विंडीजच्या महिलांसमोर 149 धावांचे आव्हान
३३- प्रत्युषाच्या आत्महत्येने कलाकार हळहळले...
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात, मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही
(भास्कर पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
===============================================

उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना एकटं लढण्याच्या सूचना : सूत्र
मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतशी शिवसेना-भाजपमधली दरी वाढू लागली आहे. यापुढे आपल्याला एकटं लढायचं आहे, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
विधानसभेत पराभूत झालेल्या सर्व शिवसेना उमेदवारांची आज शिवसेना भवनात बैठक झाली. यावेळी पक्षाच्या पुढच्या वाटचालीबाबत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सूचना केल्याची माहिती आहे.
जनतेसाठी आपण भाजपसोबत आलो, मात्र तोच भाजप आता शिवसेना संपवायला निघाल्याचा दावा या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केला, असं सुत्रांनी सांगितलं आहे.
===============================================
बिजनौरमध्ये एनआयएच्या अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या
बिजनौर (उत्तर प्रदेश) : पठाणकोट हल्ल्याच्या तपास करणाऱ्या एनआयएच्या अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातल्या बिजनौरमध्ये हा प्रकार घडला असून तांझील अहमद असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तांझील आपल्या पुतणीच्या लग्नावरुन परिवारासोहत परतत होते. यावेळी मोटारसायकलवरुन पाठीमागून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने तांझील यांच्यावर आपल्या ‘9 एम एम’ पिस्तुलीच्या सहाय्याने 21 गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात तांझील अहमद यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार पत्नीला एक गोळी लागली आहे.
तांझील यांच्या नातेवाईकांनी या हल्ल्यामागे अतिरेकी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील तपासासाठी एनआयएचं पाच सदस्यांचं पथक मोरारबादला दाखल झालं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास एनआय़ए करणार असल्याचं समजतं आहे.
कोण होते तांझील?
तंजील अहमद हे एनआयएच्या ऑपरेशन कोअर टीममधील एक महत्त्वाचे सदस्य होते. मोठमोठ्या दहशतवादी हल्ल्यांच्या चौकशी पथकातही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली असून काही महिन्यांपूर्वी झालेल्या पठानकोट हल्ल्याच्या चौकशी पथकातही ते सहभागी होते. पाकिस्तानहून जेव्हा जेआयटी आली होती, तेव्हा त्यांच्या टीमसोबत ते पाच दिवस होते.
===============================================
‘द वॉल’ टीम इंडियाचा नवीन प्रशिक्षक?
मुंबई : भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांच्यासोबतचं कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर बीसीसीआय भारतीय संघासाठी नवीन प्रशिक्षक शोधण्याच्या तयारीत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार बीसीसीआयच्या त्रिसदस्यीय समितीने राहुल द्रविडला प्रशिक्षकपदासाठी विचारणा केली आहे. सध्या राहुल द्रविडकडे भारताच्या अंडर-19 संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी आहे. संघातील तरुण खेळाडूंचा भरणा आणि कसोटी क्रिकेटचा विचार करता बीसीसीआयला एखादा तरुण खेळाडू प्रशिक्षकपदी हवा आहे. जर द्रविडने बीसीआयची ऑफर मान्य केल्यास बीसीसीआय त्याला 2019 चा विश्वचषकापर्यंत संधी देण्याच्या तयारीत आहे.
===============================================
प्रत्युषानं याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता : अभिनेत्री सारा खान
मुंबई : गळफास लावून स्वतःच जीवन संपवणाऱ्या प्रत्युषाने याआधीही दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्युषाची मैत्रिण आणि अभिनेत्री सारा खानने यासंदर्भातलं वक्तव्य केलं आहे.
याआधीही प्रत्युषाने एकदा विष पिण्याचा प्रयत्न करुन तर एकदा बाल्कनीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्युषाच्या घरी काम करत असलेल्या आणि आता सारा खानच्या घरी काम करणाऱ्या नोकराने आपल्याला ही माहिती दिल्याचं सारा खानने सांगितलं आहे.
दोन दिवसांपूर्वी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन प्रत्युषाने आपल जीवनं संपवलं होतं. सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी पोलिस प्रत्युषाच्या घरी पोहचले आहेत. त्यामुळे या प्रकरणात काय काय नवीन खुलासे होतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
===============================================
आत्महत्येवेळी प्रत्युषा बॅनर्जी गर्भवती होती?
मुंबई : अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येवेळी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. यासंदर्भातील काही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
प्रत्युषाच्या गर्भाशयात काही इन्फेक्शन झाल्याचीही शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. मात्र हा प्राथमिक अंदाज असल्यानं याबाबत ठोस माहिती आलेली नाही.
मात्र, प्रत्युषा बॅनर्जीची मैत्रिण आणि अभिनेत्री सारा खान हीनं प्रत्युषा गर्भवती असल्याची शक्यतेला नकार दिला आहे. याऊलट प्रत्युषाचा प्रियकर राहुल राज प्रत्युषाला त्रास द्यायचा. त्यामुळे तिनं याआधीही दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असा दावा सारा खाननं केला आहे.
दरम्यान, या सर्व तपासासाठी मुंबई पोलिसांनी आज प्रत्युषाचं घर सील केलं आहे. प्रियकर राहुल राजची कसून चौकशी सुरु आहे. आज राहुल राजची चौकशीदरम्यान प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
===============================================
टी-20 विश्वचषक कोण जिंकणार? ईडन गार्डनवर रंगणार अंतिम सामना
कोलकाता : ट्वेन्टी20च्या महायुद्धातील अखेरच्या लढतीसाठी कोलकात्याचं ईडन गार्डन्स सज्ज झालं आहे. रविवारी ईडनवर होणाऱ्या फायनलमध्ये वेस्ट इंडीज आणि इंग्लंडच्या संघांमधला मुकाबला रंगणार आहे.
डॅरेन सॅमीची कॅरिबियन टीम आणि इयॉन मॉर्गनची इंग्लिश आर्मी याच दोन टीम्समध्ये ट्वेन्टी20 विश्वचषकासाठीची लढाई रंगणार आहे.
यंदाच्या ट्वेन्टी20 विश्वचषकात इंग्लंड आणि वेस्ट इंडीजच्या टीम्सचं वर्णन जायंट किलर्स असंच करायला हवं. कारण वेस्ट इंडीजनं उपांत्य फेरीत यजमान भारताला हरवून फायनलचं तिकीट मिळवलंय. तर इंग्लंडनं साखळी फेरीत अजिंक्य असलेल्या न्यूझीलंडला हरवून फायनल गाठलीय.
दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडनं न्यूझीलंडला सात विकेट्स आणि 17 चेंडू राखून हरवलं होतं. मग मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीजनं भारतावर सात विकेट्स आणि दोन चेंडू राखून मात केली आणि फायनलमध्ये प्रवेश केला.
विशेष म्हणजे साखळी फेरीत या दोन्ही टीम्स एकाच गटात म्हणजे पहिल्या गटात खेळल्या आहेत. साखळी फेरीत पहिल्या गटाचा पहिला सामना याच दोन संघांमध्ये रंगला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या त्या लढतीत वेस्ट इंडीजनं 183 धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि इंग्लंडला सहा विकेट्स आणि अकरा चेंडू राखून हरवलं होतं.
===============================================
प्रत्युषाच्या प्रियकराला आले नैराश्य, रुग्णालयात दाखल
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ३ - आत्महत्या करुन जीवन संपवणा-या प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज सिंगला रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. राहुलला नैराश्य आल्याने तसेच त्याच्या छातीत दुखत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती राहुलचे वकिल नीरज गुप्ता यांनी दिली.प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्ये प्रकरणी राहुलची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. शनिवारी मुंबई पोलिसांनी त्याची चौकशी केली. बालिका वधू फेम प्रत्युषाने शुक्रवारी मुंबईतील गोरेगाव येथील रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. प्रत्युषाच्या आत्महत्येला राहुल जबाबदार असल्याचा कोणताही पुरावा न मिळाल्याने त्याला शनिवारी घरी जाऊ देण्यात आले असे पोलिसांनी सांगितले.मी निर्दोष असून, मला प्रत्युषाबरोबर लग्न करायचे होते असे त्याने सांगितले. नोव्हेंबर २०१५ पासून माझे प्रत्युषा बरोबर प्रेमाचे सूर जुळले होते. मी तिला पत्नी म्हणून पहात होतो. मी शुक्रवारी घरातून निघालो नसतो तर, ती आज जिवंत असती असे राहुलने सांगितले.
===============================================
प्रियंकानेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ३ - प्रत्युषा बॅनर्जीच्या आकस्मिक मृत्यूमुळे टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलिवूडमधल्या कलाकारांच्या आयुष्यावर चर्चा होत असताना अभिनेत्री प्रियंका चोप्राचा माजी मॅनेजर प्रकाश जाजूने प्रियंकानेही आत्महत्येचा प्रत्यत्न केला होता असा खळबळ उडवून देणारा दावा केला आहे.बॉलिवूड पाठोपाठ हॉलिवूडमध्येही प्रियंका सक्रीय झाल्याने ती सध्या प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असते. सुरुवातीला प्रियंकाने प्रचंड कठीण काळ पाहिला होता. त्यावेळी आत्महत्येचे विचार तिच्या मनात यायचे पण मी तिला रोखले असा दावा जाजूने त्याच्या टि्वटमध्ये केला
PRAKASH JAJU@PrakashjaajuFUND MANAGER IN MUMBAI FILM INDUSTRY FROM 35 YEARS. Active member of BJP, Membership No. 1000102466Andheri West, Mumbai
===============================================
भारतीय ख्रिश्चन प्रिस्टना लवकरच सोडवू- परराष्ट्र मंत्री
- येमेन, दि. 03- येमेनमध्ये भारतीय ख्रिश्चन प्रिस्टचं गेल्या महिन्यात अपहरण झालं होतं. ते ख्रिश्चन प्रिस्ट सुरक्षित असून, त्यांना लवकरच मुक्त करण्यात येणार असल्याचं सीबीसीआय या भारतीय कॅथलिक परिषदेनं सांगितलं आहे. दक्षिण येमेनमधल्या अडेन या शहरातून फादर टॉम यांचं अपहरण झालं होतं. बंदुकधारी दहशतवाद्यांनी त्यावेळी जवळपास 15 लोकांना ठार केलं होतं.ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी या हल्ल्याचा निषेधही नोंदवला होता. सीबीसीआय या भारतीय कॅथलिक परिषदेनं फादर टॉम यांच्या सुरक्षिततेसाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. भारत सरकार ख्रिश्चन प्रिस्टना सुरक्षितरीत्या भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी फादर जोसेफ चिन्नायन यांना सांगितलं आहे. फादरना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी बोलणी सुरू असल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी दिली आहे, असं फादर जोसेफ यांनी यावेळी सांगितलं.मात्र प्रसिद्धीमाध्यमांनी मागच्या आठवड्यात इसिसच्या दहशतवाद्यांनी फादर यांची हत्या केल्याचं वृत्त दिलं होतं. आणि गेल्या महिन्यात चार भारतीय ननच्या झालेल्या हत्येचीही अद्याप कोणी जबाबदारी स्वीकारली नाही आहे.
===============================================
पाच सखल ठिकाणे पूरमुक्त करा - आयुक्त
- मुंबई : हमखास पाण्याखाली जाणारी ठिकाणे यंदाच्या पावसाळ्यात तुंबू नयेत, याची खबरदारी घेण्याची ताकीदच पालिका आयुक्त अजय मेहता यांनी सर्व साहाय्यक आयुक्तांना दिली आहे़ यासाठी कृती आराखडा तयार करून दरवर्षी तुंबणारी पाच ठिकाणे पूरमुक्त करण्याचे लक्ष्यच त्यांनी अधिकाऱ्यांपुढे ठेवले आहे़मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांची शनिवारी बैठक बोलाविली होती़ या बैठकीत उपायुक्त व संपूर्ण २४ वॉर्डचे साहाय्यक आयुक्त उपस्थित होते़ या वेळी चर्चेदरम्यान सायन रोड क्ऱ २४, किंग्जसर्कल, कुर्ला शेल कॉलनी, दादर येथील हिंदमाता, अंधेरी येथील मिलन सब-वे ही पाच ठिकाणे पावसाळ्यात हमखास पाण्याखाली असतात, असे समोर आले़हे रस्ते प्रमुख असल्याने या परिसरात पाणी साचल्यावर संपूर्ण मुंबईतील वाहतुकीवर परिणाम होतो़ किंग्जसर्कल आणि हिंंदमाता परिसरात पाणी तुंबल्यानंतर पूर्व उपनगरात ठाणे व नवी मुंबईतून दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होतो़हे पाणी उपसण्यासाठी बसविलेले उच्च क्षमतेचे पंपही अशा वेळी कुचकामी ठरतात़ त्यामुळे ही पाच ठिकाणे पूरमुक्त ठेवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत़
===============================================
कारागृह अधीक्षकास कैद्यांनी ठेवले ओलिस
- वाराणसी : येथील जिल्हा कारागृहात शनिवारी सकाळी कर्मचारी आणि कैद्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्यास ओलिस ठेवले तर सहायक अधीक्षक गंभीर जखमी झाले.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छावणी पोलीस स्टेशनअंतर्गत चौकघाटस्थित वाराणसी जिल्हा कारागृहात सुरक्षा जवानांनी दोन कैद्यांना मारहाण केल्यानंतर इतर कैद्यांनी हिंसाचार सुरू केला.तुरुंगात मिळणारे निकृष्ट दर्जाचे जेवण आणि इतर समस्यांमुळेही कैद्यांमध्ये खूप दिवसांपासून असंतोष धुमसत होता. संतप्त कैद्यांनी कारागृह अधीक्षक आशिष तिवारी यांना ओलीस ठेवले आणि बॅरेकच्या एका भागावर ताबा मिळवून तो आतून बंद केला.
===============================================
आण्विक सुरक्षेबाबत मोदींकडून अनेक उपाययोजनांची घोषणा
- वॉशिंग्टन : अणुतस्करी टाळण्यासाठी आणि अणुतंत्रज्ञान दहशतवाद्यांच्या हाती पडू नये यासाठी तसेच अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील अणुसुरक्षा परिषदेत भारत सरकारने योजिलेल्या अनेक उपायांची घोषणा केली. या परिषदेत ५० पेक्षा जास्त देशांच्या नेत्यांनी आपले विचार मांडले.‘आण्विक दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी जागतिक पुढाकार’ या विषयावर २०१७ मध्ये होणारी परिषद भारत आयोजित करणार आहे. त्यानुसार अणुतस्करीच्या मुकाबल्यावर इंटरपोलसह एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्याचीही योजना आहे. याशिवाय भारत अणुसुरक्षा कोषात १० लाख अमेरिकी डॉलर देणार आहे.सौदीत आगमनअमेरिकेचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी यांचे शनिवारी सौदी अरेबियात आगमन झाले. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे. त्यात अनेक द्विपक्षीय करार होणार आहेत.सामरिक भागीदारी, सुरक्षा मजबूत करणे यावर भर दिला जाणार आहे. त्यांचा हा पहिलाच सौदी दौरा असून रियाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
===============================================
पठाणकोट हल्ल्याचे पुरावे देण्यात भारत अपयशी, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांचा दावा
- ऑनलाइन लोकमत -इस्लामाबाद, दि. २ - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारतात येऊन गेलेल्या पाकिस्तान तपास पथकाने पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा पुरावा देण्यात भारत अपयशी ठरल्याचा दावा केला आहे. हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा हात आहे असं सिद्ध करणारा एकही पुरावा भारत देऊ शकलेला नाही अशी माहिती तपास पथकाने दिल्याचं वृत्त पाकिस्तानमधील काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.पाकिस्तान तपास पथकाला पठाणकोटमधील एअरबेसमध्येजाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र तिथे फक्त 55 मिनिटे आम्हाला पाहणी करु दिली. इतक्या कमी वेळेत तपास पथक पुरावे गोळा करु शकत नाही अशी माहिती तपास पथकातील सुत्रांनी दिल्याचं जिओ न्यूजने वृत्त दिलं आहे. पाकिस्तान तपास पथकाला 29 मार्चला पठाणकोट एअरबेस जिथे हल्ला झाला त्याठिकाणी नेण्यात आलं होतं. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिका-यांनी यावेळी त्यांना हल्ल्याची माहिती दिली होती.
===============================================
मसुद अजहरला संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी यादीत टाकण्यास चीनचा विरोध
- ऑनलाइन लोकमत -वॉशिंग्टन, दि. २ - पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला करणा-या जैश-ए-मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसुद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यास चीनने विरोध केला आहे. चीन केलेल्या या विरोधावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चीनने केलेला विरोध हा फक्त तांत्रिक आधारावर घेतला गेला असून अनाकलनीय असल्याची टीका भारताने केली आहे.दहशतवादाचा सामना करण्यासाठी निवडक दृष्टीकोन ठेवला गेला असल्याचा आरोप भारताने केला आहे. चीनने प्रतिबंध करण्याचा (व्हेटो) अधिकार वापरत हा विरोध केला आहे. संयुक्त राष्ट्र समितीच्या पाच सदस्यांकडे (व्हेटो) प्रतिबंध करण्याचा अधिकार आहे. यामध्ये चीनचादेखील समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत पाच कायम सभासद राष्ट्रे (अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, चीन, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स) आहेत. त्या प्रत्येकास हा खास अधिकार या संघटनेच्या सनदेने दिलेला आहे.
===============================================
अमेरिकेत मुस्लीम कुटुंबाला विमानातून उतरवले, भेदभावाचा आरोप
- ऑनलाइन लोकमतशिकागो (अमेरिका), दि. 2 - पती व तीन मुलांसह वॉशिंग्टनला सुटीसाठी जाऊ इच्छिणाऱ्या मुस्लीम महिलेने मुस्लीम पेहराव असल्यामुळे युनायटेड एअरलाइन्सने विमानातून उतरवल्याचा आरोप केला आहे. फेसबुकवर इमान अमी साद शेबली या महिलेने दोन व्हिडीयो पोस्ट केले असून एअरलाइन्सचे अधिकारी सुरक्षेचे कारण देत या कुटुंबाला उतरवत असल्याचे दिसत आहे.आम्ही कसे दिसतो याखेरीज विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे दुसरे कोणतेही कारण नव्हते असा दावा शेबलीने केला आहे. तर आमच्याकडे भेदभावाला अजिबात थारा नसल्याचे सांगत केवळ सुरक्षेच्या कारणावरून या कुटुंबाला उतरवल्याचा दावा एअरलाइन्सने केला आहे.मुलांची जी सेफ्टी सीट या कुटुंबासोबत होती ती सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बसत नसल्याचे कारण विमानाच्या कप्तानाने दिले आहे. हे कारण शेबलीला मान्य नसल्याचे दिसत आहे. शेबलीने दुसऱ्या एका मुस्लीम महिलेचा अनुभव दिला आहे. या महिलेला सोडा उघडण्यास मनाई करण्यात आली होती. या बाटलीचा वापर शस्त्रासारखा केला जाऊ शकतो असे कारण देण्यात आले होते.
===============================================
मसूद अझरवरील बंदी लांबल्यामुळे भारत नाराज
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २ - पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड व "जैश-ए-मोहम्मद‘चा प्रमुख मसूद अझर याच्यावर बंदीला चीनने विरोध दर्शवला असून अझरवरील बंदीने लांबल्याने भारताने नाराजी दर्शवली आहे. 'मसूद अजहरच्या बंदीबाबत भारताने केलेल्या मागणीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) समितीने निर्णय लांबवल्याने आम्ही नाराज झालो आहोत' अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकासस्वरूप यांनी दिली. पठाणकोटच्या हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यात मसूद अझरचा सहभाग होता आणि हे भारतातर्फे सांगूनही त्याच्यावर अद्याप बंदीची कारवाई झालेली नाही. जगभरात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे जाळे पसरले असून त्यामुळे मानवतेला धोका आहे, असेही ते म्हणाले.दरम्यान चीनने पुन्हा एकदा मसूद अझरवर बंदी घालण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. याबाबतचा निर्णय त्वरित घेऊ नये, अशी विनंती चीनने "यूएन‘च्या समितीकडे केल्याने अझरवरील बंदी लांबणीवर पडली.
===============================================
अण्वस्त्र तंत्रज्ञान चोरांमुळे अण्वस्त्रांना धोका
- वॉशिंग्टन : अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान चोरट्या मार्गांनी वाहतूक करणारे आणि दहशतवाद्यांशी हात मिळविणाऱ्या देशांमुळे आज अण्वस्त्रांच्या सुरक्षिततेला सगळ्यात मोठा धोका निर्माण केला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दोन दिवसांच्या अण्वस्त्र सुरक्षा शिखर परिषदेनिमित्त व्हॉईट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या भोजन समारंभात ते बोलत होते. ब्रसेल्समध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देऊन मोदी म्हणाले ,‘‘दहशतवादापासून अण्वस्त्रांच्या सुरक्षिततेला किती खरा आणि तोंडासमोर उभा ठाकलेला धोका आहे हेच दाखवून दिले. या संदर्भात सगळ्या देशांनी आपापल्या आंतरराष्ट्रीय जबाबदारीचे पालन करावे.’’ दहशतवादाचे जाळे जगभर पसरलेले असताना आम्ही देशपातळीवरच कृती करीत आहोत, असे मोदी म्हणाले. या समारंभात मोदी ओबामा यांच्या शेजारी बसले होते. यावेळी अण्वस्त्रे सुरक्षा शिखर परिषदेसाठी आलेले २० पेक्षा जास्त देशांचे प्रमुखही उपस्थित होते.
===============================================
'मॅड मॅक्स' नॅथन जोन्सचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

नवी दिल्ली- हॉलिवूडस्टार नॅथन जोन्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून, टायगर श्रॉफची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अ फ्लाइंग जाट‘ या चित्रपटात दिसणार आहे.
WWE सुपरस्टारने चित्रपटांमध्ये अभिनय करणे आता नवीन राहिलेले नाही. द रॉक, बटिस्टा बिग शो, रँडी ओरटॉन यांनी हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, आता एक WWE सुपरस्टार बॉलिवूड चित्रपटामध्ये झळकणार आहे.
टायगर श्रॉफ या चित्रपटात सुपरहीरोची भूमिका साकारणार असून, त्यामध्ये धिप्पाड देहयष्टी असणारा नॅथन जोन्स खलनायकाची भूमिका साकारणार आहे. त्याने नुकतेच आपले शूटिंग वेळापत्रक पूर्ण केले, असे सूत्रांनी सांगितले.
‘मॅड मॅक्स- फ्युरी रोड‘ फेम नॅथन जोन्स याने अलीकडेच एका तमिळ चित्रपटात भूमिका साकारली. बुलोगम असे या चित्रपटाचे नाव असून, एन. कल्याणकृष्णन यांनी लेखन व दिग्दर्शन केले होते. WWE च्या चाहत्यांसाठी व चित्रपट रसिकांसाठी हा सुखद धक्का आहे.

विंडीजच्या महिलांसमोर 149 धावांचे आव्हान
कोलकता - महिलांच्या ट्वेंटी-20 विश्वकरंडक क्रिके़ट स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात वेस्टइंडीजसमोर विजयासाठी 149 धावांचे आव्हान ठेवले.
विंडीजच्या महिलांसमोर 149 धावांचे आव्हान
वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (रविवार) ईडन गार्डन्स मैदानावर अंतिम सामना खेळविला जात आहे. वेस्टइंडीजचे महिला आणि पुरुष असे दोन्ही संघ ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत गेले आहेत. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
आलस्या हिली आणि एल्स विलानी यांनी डावाची सुरवात केली. पण, हिली अवघ्या 4 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर आलेल्या कर्णधार लॅनिंगने विलानीच्या साथीने डाव सावरत अर्धशतकी भागीदारी नोंदविली. या दोघींनी चौफेर फटकेबाजी करत बाराव्या षटकात संघाची धावसंख्या 100 च्या जवळ नेली. दरम्यान, विलानीने 34 चेंडूत 9 चौकारांच्या साहाय्याने अर्धशतक पूर्ण केले. पण, ती अर्धशतकानंतर लगेच 52 धावांवर बाद झाली. लॅनिंगनेही अर्धशतक साजरे केले. तिने 8 चौकारांच्या साहाय्याने 49 चेंडूत 52 धावा केल्या. अखेर इलायस पेरीने शेवटच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलिया 148 धावांपर्यंत पोहचले.
===============================================
सीरियातील चार बंधक भारतीयांची मुक्तता
नवी दिल्ली - इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरुन सीरियामधील सरकारकडून अटक करण्यात आलेल्या चार भारतीय नागरिकांची सुटका करण्यात केंद्र सरकारला यश आले आहे.
सीरियाचे उपपंतप्रधान वालिद अल मौलेम यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याबरोबर झालेल्या भेटीमध्ये चार भारतीयांना अटक केल्याची माहिती दिली होती. यानंतर सुमारे अडीच महिन्यांच्या राजनैतिक प्रयत्नांनंतर या चार भारतीयांची मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेले हे चार भारतीय दहशतवादी नसून केवळ "बेकायदेशीर स्थलांतरित‘ असल्याचे निष्पन्न झाले आहे.
स्वराज यांनी ट्विटच्या माध्यमामधून यासंदर्भातील माहिती देत अरुण कुमार सैनी, सर्वजित सिंग, कुलदीप सिंग आणि जोगा सिंग या चार भारतीयांचे मायदेशी स्वागत असल्याचे म्हटले आहे. अर्थात, या प्रकरणाची अद्याप आणखी चौकशी करणे आवश्यक असल्याची भूमिका दोन्ही देशांमधील राजनैतिक अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

प्रत्युषाच्या आत्महत्येने कलाकार हळहळले...
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिने आत्महत्या केल्याचे समजताच अनेक कलाकारांनी रुग्णालयात व प्रत्युषाच्या घरी गर्दी केली होती. तिने आत्महत्या केल्यावर कुणाचाच विश्वास बसला नव्हता. ती आत्महत्या करूच शकत नाही, असे सर्वांचे म्हणणे होते.
एजाज खान : प्रत्युषा ही धीट मुलगी होती. ही आत्महत्या नाही. माझ्या दृष्टीने ही प्लानिंग करून केलेली हत्या आहे.
डॉली बिंद्रा : प्रत्युषा खूप स्ट्रॉंग होती. ती आत्महत्या करू शकत नाही.
राखी सावंत : मला खूप वाईट वाटते आहे की इंडस्ट्रीतल्या मुली अशा आत्महत्या करत आहेत. नैराश्य आल्यावर आत्महत्या न करता त्याला धीराने सामोरे गेले पाहिजे.
पूजा बोस : ती आत्महत्या करू शकत नाही. मी तिला जास्त जवळून ओळखत होते. ती धीट मुलगी होती.
सिद्धार्थ शुक्ला : ती आता आपल्यात नाही ही वस्तुस्थिती मन हेलावून सोडणारी आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी माझे तिच्यासोबत बोलणे झाले होते. तेव्हा ती चांगली होती.
कुशल टंडन : ही खूपच दु:खद घटना आहे. मला माहीत आहे की जीवन खूप कठीण आहे. मात्र असे करण्याची काय गरज आहे? प्रत्युषाचे वय कमी होते. मला माहीत नाही की असे काय असेल की तिला आत्महत्या कराविशी वाटली.
वीजे ऍण्डी : मी ट्विटरवर वाचले तेव्हा वाटले की कुणी "एप्रिल फूल‘ केले असेल. मात्र मला तनीषाचा फोन आला आणि तिने हे खरे असल्याचे सांगितले. अजूनही विश्वास बसत नाही. ती खूप आनंदी असायची. काही दिवसांपूर्वी भेटलो होतो तेव्हा ती चांगली होती.
काम्या पंजाबी : प्रत्युषा जीवनाकडे सहजपणे पाहायची. विश्वास बसत नाही.

एली अवराम : ही खूप दु:खद घटना आहे. ही बातमी ऐकून मला धक्का बसला. देव तिच्या घरातल्यांना शक्ती देवो.
सोफी चौधरी : ऐकून धक्काच बसला. नफीसा आणि जियाचीही आठवण आली. त्या सुंदर आणि हुशार मुली होत्या. ही मन हेलावून सोडणारी घटना आहे.
रागिणी खन्ना : विश्वासच बसत नाही की प्रत्युषा आता आपल्यात नाही. तिच्या आत्म्यास शांती लाभो.
संभावना शेठ : या बातमीवर विश्वासच बसत नाही. प्रत्युषाच्या आत्म्यास शांती लाभो.

अमेरिकेत मोठ्या आर्थिक मंदीची भीती: ट्रम्प
न्यूयॉर्क - अमेरिकेमध्ये "प्रचंड मोठी आर्थिक मंदी‘ येण्याची भीती येथील अध्यक्षीय निवडणुकीमधील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तविली आहे.
बेरोजगारीचे मोठे प्रमाण आणि शेअर बाजारामधील वाढती तेजी यांच्या संयोगामधून अमेरिकेस आणखी एका आर्थिक मंदीचा सामना करावा लागण्याची भीती असल्याचे मत प्रतिथयश उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी व्यक्त केले. अमेरिकेमधील एका वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये निव्वळ एक मोठा आर्थिक बुडबुडा निर्माण झाल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेमधील कामगार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीपेक्षा अमेरिकेमधील बेरोजगारीचे प्रमाण कितीतरी अधिक असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. अधिकृत आकडेवारी ही राजकीय नेते विशेषत: राष्ट्राध्यक्षांची प्रतिमा डागाळू न देण्याच्या उद्देशार्थ बनविण्यात आलेली असते, असा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावला. सध्या शेअर बाजारात गुंतवणुक करण्यासाठी अत्यंत वाईट काळ असल्याचे प्रतिपादन ट्रम्प यांनी केले.
याचबरोबर, राष्ट्राध्यक्ष झाल्यास अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर असलेले 19 लाख कोटी डॉलर्सचे राष्ट्रीय कर्ज आठ वर्षांच्या काळात पूर्णत: नष्ट करण्याचा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केला.

शेतकरी कर्जबाजारी न होण्यासाठी प्रयत्न- मुख्यमंत्री

नाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आमचा विरोध नाही. पण शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत म्हणून प्रयत्न करण्याचे सरकारने ठरवले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यापूर्वीच्या सरकारने कर्जमाफी केल्यावर शेतकरी कर्जबाजारी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे अध्यक्षस्थानी होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अजेंड्यावर शेतकरी असल्याचे अधोरेखित झाले आहे. दुष्काळामध्ये शेतीच्या योजनांच्या "ब्रॅंडींग‘ करण्यासाठी योजना गावापर्यंत पोचवण्याची तयारी पक्षाची आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या दीड वर्षात सरकारने चांगले काम केले असल्याचे सांगत हे काम लोकांपर्यंत न्यावे लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच येत्या पाच वर्षांमध्ये राज्याच्या विकासात आमुलाग्र बदल करण्याचे ध्येय सरकारने निश्चित केले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
श्री. दानवे यांनी वर्षभरातील संघटनात्मक कामांचा आढावा घेतला. राज्यात एक कोटी सभासद करण्याचे उद्दिष्ट्य होते. प्रत्यक्षात एक कोटी पाच लाख सभासदांची नोंदणी झाली आहे. त्याचप्रमाणे एक लाख कार्यकर्त्यांना 300 शिबिरांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती श्री. दानवे यांनी दिली. सायंकाळी चारला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठकीचा समारोप होईल. कृषी आणि राजकीय प्रस्ताव बैठकीत मांडला जाणार आहे.

नक्षलग्रस्त नागरिकांना मिळवून दिला रोजगार
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या नागरिकांना रोजगाराच्या कोणत्याही संधी उपलब्ध नाहीत. अशा सर्व नागरिकांना एकत्र आणून त्यांना शासनाच्या रोजगार हमी योजनेची माहिती देत रोजगार मिळवून दिला. याद्वारे त्यांची आर्थिक पत सुधारण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगताहेत नाशिक सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक व मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव....
सन 1991 मध्ये चेन्नईच्या "आयआयटी‘मधून सिव्हिल इंजिनिअरिगमध्ये एम.टेक.ची पदवी घेतल्यानंतर 1998 ला भारतीय वनसेवेच्या उपवनसंरक्षक पदाची परीक्षा उर्त्तीण झालो. यानंतर प्रशिक्षणाचा काळ पूर्ण झाल्यानंतर सन 2001 ला महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील वडासा वन विभागात नियुक्ती झाली. या नक्षलग्रस्त प्रदेशात साडेचार वर्षे काम केले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल होते. येथील नागरिकांना रोजगाराचे कोणतेच पर्याय उपलब्ध नसून, केवळ शासनाच्या रोजगार हमी योजनेत त्यांना काम मिळत असे. अशा वेळेस येथील आजूबाजूच्या लोकांना एकत्र करून त्या सर्वांना शासकीय रोजगार हमी योजनेची माहिती दिली. त्यांना जंगलात शास्त्रीय पद्धतीने लाकूडतोडीचे प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून दिला. यात जंगलातील इमारतींसाठी आवश्यक असलेली लाकूडतोड, बांबूकटाई येथील नागरिकांकडून करून घेत त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. या परिसरात पाण्याची उपलब्धता खूप कमी असल्याने ती भासू नये म्हणून संपूर्ण विभागात चारशे वन तलाव निर्माण करत पाण्याची व्यवस्था केली. यानंतर गोंदिया वन विभाग क्षेत्रात काम करत असताना नवेगाव राष्ट्रीय उद्यान योजनेंतर्गत जंगलात असलेल्या पाच गावांतील लोकांना जंगलाबाहेर आणून पाच नवीन गावांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन केले.

स्वच्छतेसाठी 'गंगा'ची मुख्यमंत्र्यांकडे धाव!
राजनांदगाव (छत्तीसगढ) - छत्तीसगढमधील राजनांदगाव जिल्ह्यातील गंगा साहू या ‘दिव्यांग‘ मुलीने आपल्या होणाऱ्या सासरी शौचालय तयार करण्यासाठी थेट मुख्यमंत्री डॉ.रमन सिंह यांनाच पत्र लिहिले आहे.
राजनांदगांव येथील महरूम गावाती निवासी विदेशीराम साहू यांची कन्या गंगा हीचा विवाह डौडीलोहारा विकासखंड येथील खैरकट्टा गावात विवाह निश्चित करण्यात आला आहे. येत्या 22 एप्रिल रोजी शिवन कुमार याच्याशी गंगाचा विवाह होणार आहे. मात्र गंगाला आपल्या होणाऱ्या सासरी शौचालयाची व्यवस्था नसल्याचे समजले. त्यामुळे तिने छत्तीसगढचे मुख्यमंत्री आणि खासदार अभिषेक सिंह यांना पत्र लिहून शौचालय उभारण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनीही गंगाच्या प्रयत्नांचे कौतुक करत अनुकूल प्रतिसाद दिला असून तातडीने शौचालय उभारण्याचे निर्देश दिले आहेत. शौचालय उभारून मुख्यमंत्री कार्यालयाला त्याबाबत कळवावे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेंतर्गत गंगाला 30 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्र्यांसह सिंह यांनीही या गंगा हीच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. सिंह म्हणाले, ‘गंगाचे पत्र मिळाल्यानंतर तिच्या मतदारसंघाचा खासदार असल्याचा मला अभिमान वाटत आहे. जिथल्या मुली स्वच्छतेच्या बाबतीत एवढ्या जागरूक आहेत.‘ आपल्या पत्राची गांभीर्याने दखल घेतल्याबद्दल गंगा हीने पत्र लिहून मुख्यमंत्री आणि खासदारांचे आभार मानले.

'आयडीबीआय'चे खाजगीकरण करू नका- केजरीवाल
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयडीबीआय बॅंकेचे खाजगीकरण करू नये, असे आवाहन राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
याबाबत केजरीवाल यांनी मोदी यांना पत्र लिहिले आहे. "मी विनंती करतो की आयडीबआय बॅंकेचे खाजगीकरण थांबवावे. बॅंकांना उद्योगपतींकडील कर्जवसूल करू द्या आणि मल्ल्यांसारख्या लोकांवर कडक कारवाई करू द्या. सरकार मल्ल्यासारख्या लोकांवर कडक कारवाई करण्याऐवजी त्यांना देशाबाहेर जाऊ दिले जाते हे अत्यंत दुदैवी आहे. सरकार एका बाजूला बॅंकांना कर्जवसूली करण्यापासून रोखत असून दुसरीकडे बॅंकांचे खाजगीकरण करत आहे.‘ तसेच देशातील उद्योगाचा विकास करण्यासाठी आयडीबीआय बॅंकेने गेल्या पाच वर्षांत महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही केजरीवाल यांनी पत्रात लिहिले आहे.

आझादांनीही 'भारतमाता की जय' म्हटले- प्रसाद
मथुरा - देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी लढणाऱ्या अनेक क्रांतिकारकांनी ‘भारतमाता की जय‘ अशी घोषणा दिल्याचे अब्दुल कलाम आझाद यांनीही ही घोषणा दिल्याचे केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना प्रसाद म्हणाले, ‘स्वातंत्र्यापूर्वी क्रांतिकारकांनी शेवटच्या श्वासापर्यंत ‘भारतमाता की जय‘ ही घोषणा दिली होती.‘ तसेच अब्दुल कलाम आझाद आणि अब्दुल हमीद या दोघांनीही ही घोषणा दिल्याचेही त्यांनी सांगितले.
‘कोलकाता येथील उड्डाणपूल कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी घटना असून या प्रकरणाची प्रामाणिक चौकशी करण्यात येईल. अधिकारी किंवा नेते जे दोषी ठरतील त्यांना क्षमा केली जाणार नाही‘, असेही त्यांनी सांगितले.
आझादांनीही 'भारतमाता की जय' म्हटले- प्रसाद
शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना प्रसाद म्हणाले, ‘स्वातंत्र्यापूर्वी क्रांतिकारकांनी शेवटच्या श्वासापर्यंत ‘भारतमाता की जय‘ ही घोषणा दिली होती.‘ तसेच अब्दुल कलाम आझाद आणि अब्दुल हमीद या दोघांनीही ही घोषणा दिल्याचेही त्यांनी सांगितले.
‘कोलकाता येथील उड्डाणपूल कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी घटना असून या प्रकरणाची प्रामाणिक चौकशी करण्यात येईल. अधिकारी किंवा नेते जे दोषी ठरतील त्यांना क्षमा केली जाणार नाही‘, असेही त्यांनी सांगितले.
===============================================
मुखेड; बि.जी.कोळसे पाटील, तृप्ती देसाई, सतिष रावजादे व शितल साठे यांच्या व्याख्यानाचे आयोजन
" मुखेड येथे फुले आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम "
' बि.जी.कोळसे पाटील, तृप्ती देसाई, सतिष रावजादे व शितल साठे यांच्या व्याख्यानाचे आयोजन "
मुखेड :-
राष्ट्रनिर्माते क्रांतिसुर्य ज्योतीराव फुले यांची 189 वी जयंती व विश्वभुषण महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती सोहळ्याचे औचीत्य साधून संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहीती जयंती समन्वयक राहुल दशरथराव लोहबंदे, शेख रियाज चांदपाशा यांनी दिली.
फुले आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती निमित्य शहरातील जिल्हा परिषद मुलिंचे मैदान येथे दि.9 एप्रिल रोज शनिवार सायं. 7 वाजता माजी न्यायमूर्ती बि.जी.कोळसे पाटील यांचे जाहिर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि.11 एप्रिल रोज सोमवार सकाळी 9 वाजता क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी ध्वजारोहन होईल व सकाळी 10 वाजता डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे व रात्री 7 वाजता भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचे जाहिर व्याख्यान होईल.
12 एप्रिल रोज मंगळवारी डाँ.राहुल कांबळे यांच्या वतीने सकाळी 6 पासुन 18 तास अभ्यासक्रमाचे आयोजन जि.प.हा.मुलिंचे सभागृह येथे करण्यात आले आहे. तसेच 13 एप्रिल रोज बुधवारी सायं.7 वाजता बहुजन समाजासाठी उल्लेखनीय योगदान असणा-या तालुक्यातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. 8 वाजता सतिष रावजादे कलापथक यांचा समाज प्रबोधनपर नाटिका कार्यक्रम होईल.
14 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता शालेय विद्यार्थ्यांची समता रँली व सकाळी 9 वाजता डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे ध्वजारोहन संपन्न होणार आहे. व सांय.4 वाजता महामानवांच्या प्रतिमेची भव्य परिवर्तनवादी मिरवणुक निघणार आहे आणि दि.26 एप्रिल रोजी सांय.7 वाजता जि.प.हा.मुलिंचे मैदान येथे क्रांतिशाहिर शितल साठे यांचा विद्रोही शाहिरी जलसा होणार आहे. संयुक्त जयंतीसाठी तालुक्यातील सर्व जनतेने या समाजप्रबोधन पर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहण संयुक्त जयंती सल्लागार प्रमुख माजी नगराध्यक्ष बाबुसावकार देबडवार, जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, डाँ.दिलीप पुंडे, माधव अण्णा साठे, माजी नगरसेवक उत्तम बनसोडे, विजय चौधरी, डाँ.अतुल देबडवार, डाँ.अविनाश पाळेकर, डाँ.राम श्रीरामे, प्रा.वाय.एच.कांबळे, संजय रावणगावकर, सुनिल पौळकर, डाँ.श्रावण रँपनवाड, दिलिप देवकांबळे, राजुदादा गंदपवाड, श्रावण नरबागे, गंगाधर सोंडारे, बालाजी लंगेवाड, नागनाथ लोखंडे, शौकत होनवडजकर, बाबु घोडके, शिवकुमार बंडे, राजु आडगुलवार, विनोद दंडलवाड, एकनाथ बनसोडे, डाँ.राहुल कांबळे, किशोर चौहाण, गुंडेराव गायकवाड, गौतम कांबळे, बालाजी बनसोडे, राहुल धामणगावकर, संदिप कांबळे, हसन बेळीकर, प्रसिद्धी प्रमुख पत्रकार सुशिल पत्की, किशोर संगेवार यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment