[अंतरराष्ट्रीय]
१- बर्लिन; जर्मनीतील गुरुद्वारा हल्ल्याप्रकरणी २ अल्पवयीन अटकेत
२- लंडनमध्ये सुरु होणार जगातील पहिलं न्यूड रेस्टॉरंट
३- चॅन्हस्सेन; पॉप संगीताचा सुपरस्टार प्रिन्सचे निधन
४- न्युयॉर्क; प्रियंका, सानिया टाईमच्या जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये, मोदींना वगळल...
५- लंडन; महाराणी एलिझाबेथ यांचा ९० वा वाढदिवस उत्साहात
६- बर्लिन; भारतीय मान्सूनचे भाकीत अधिक अचूक असणार
७- बीजिंग; दक्षिण चीनी समुद्रात चीनचा आण्विक उर्जा प्रकल्प
८- अमेरिकेत बोगद्यात सापडले आठ टन अमली पदार्थ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
९- विजय मल्ल्यांचा बँकांसमोर नवा प्रस्ताव, ६८६८ कोटी भरण्याची तयारी
१०- सुब्रमण्यम स्वामी, नवज्योतसिंग सिद्धू, मेरी कोम जाणार राज्यसभेवर?
११- सुरात; आसारामबापूचा फास आवळला
१२- उत्तराखंड: केंद्र आता सर्वोच्च न्यायालयात
१३- 'आयपीएल' आता देशाबाहेरच हलविण्यावर विचार - बीसीसीआय‘चे सचिव अनुराग ठाकूर
१४- शिवसेनेची पाणीमाफियांना साथ: भाजपचा आरोप
१५- केंद्राकडून दहा हजार टन डाळ बाजारात
१६- जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१७- नाश्यिक; तृप्ती देसाईंचा त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश
१८- मुंबई; मुंबईवर 'प्रभू'कृपा, एसी लोकल 15 मेपासून, वायफायही सुरु होणार
१९- मुंब्वाई; अंगुरी भाभीवरील अन्यायाविरोधात मनसेचा आवाज
२०- मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा : सुप्रिया सुळे
२१- कृष्णेचे आतापर्यंत ९५ लाख लीटर पाणी लातुरात
२२- सिद्धिविनायक मंदिराजवळ रस्ता खचला
२३- मुंबई महापालिकेतही पाणी प्रश्न पेटला
२४- ‘कार’नाम्याने बाबासाहेबांना मानवंदना
२५- दहावीच्या भूगोलात 55 चुका
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२६- जुहू बीचवरील १८ स्टॉल आगीत जळून खाक
२७- पुण्यात एकाच रात्री जळीतकांडाच्या दोन घटना, 6 ट्रक, 6 बाईक खाक
२८- ठाणे; ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत
२९- सिंधुदुर्गच्या समुद्रात जहाज बुडालं, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
३०- भोपाळ; मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाबुलाल गौर यांचं महिलेशी असभ्य वर्तन
३१- गिरगाव; आॅन ड्युटी’ नसताना बजावली ‘ड्युटी
३२- बारामती; आदिवासींनी साकारले 1100 एकरांचे जंगल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३३- मार्शमेलो ओएसवर चालणारा मायक्रोमॅक्सचा नवा स्मार्टफोन, किंमत केवळ....
३४- iPhone पाठोपाठ एलजी G5 चंही SE व्हर्जन लवकरच...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३५- हदगावमध्ये साकारणार पहिली वातानुकुलीत शाळा
३६- आसना पाणीपुरवठा योजनेत इसापुरचे पाणी तिसऱ्यांदा सोडण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली
३७- फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या कैद्याकडून पोलिसांवर हल्ला
३८- काळ्या बाजारात जाणारा राशनचा गव्हू पकडला; दोघे ताब्यात
३९- भोकर; पाणी आणण्यासाठी गेलेले दोन युवक पडले विहिरीत; एकाचा मृत्यू, एक गंभीर
४०- वनविभाग, सामाजिक वनीकरण, विभागीय व्यवस्थापक कार्यालयाकडून होणार पाच लाख पाच हजार वृक्ष लागवड
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
अमजद खान पठाण, काशीम सय्यद, अनिल जगताप, संदीप धारूरकर, चैतन्य वाघमारे, अविनाश सूर्यवंशी, अभिजित सोमय्या, संजय पतंगे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
ज्याने आयुष्यात पावलोपावली दु:ख भोगलय तोच नेहमी इतरांना हसवु शकतो,कारण हसण्याची किँमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते
[सुधाकर कांबळे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=========================================

मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्र्यांमध्ये विविध प्रकल्पांवर झालेली चर्चा

याविरोधात शिल्पाच्या समर्थनात मनसेने पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी आपण निर्मात्यांच्या नोटिशीला वेळोवेळी उत्तर देत असल्याचं शिल्पानं म्हटलं आहे. तर मराठी कलाकारांना मिळणाऱ्या भेदभावाविरोधात मनसेने आवाज उठवला आहे.

भोपाळमध्ये पालिकेच्या बसच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री महोदयांनी बसमध्ये चढणाऱ्या महिलेशी अश्लील वर्तन केल्याचं म्हटलं जात आहे. बसमध्ये संबंधित महिला चढत असताना बाबूलाल गौर यांनी छेड काढल्याचा आरोप आहे.
दरम्यान बसमध्ये चढताना गर्दी होती. त्यामुळे आपण महिलांना चढण्यास सांगत होतो. मात्र आपल्यावर महिलेची छेड काढल्याचा आरोप केला जात आहे, असा दावा बाबूलाल गौर यांनी केला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील एकोड पाचोड गावापासून सुळे यांनी सकाळी दुष्काळ पाहणीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी गेवराईत अमरसिंग पंडित यांनी सुरु केलेल्या चारा छावणीलाही भेट दिली. तसंच साखर कारखाने जगवायचे असतील तर ड्रिप इरिगेशनला पर्याय नाही. त्यामुळे ऊस बंद करणं हा पर्याय नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असलं पाहिजे, त्यामुळे दारु कंपन्यांना पाणी पुरवण्याबाबत विचार करा, असंही सुप्रिया सुळेंनी सुनावलं आहे.
दरम्यान मराठवाड्यातल्या दुष्काळाला ऊस आणि कारखाने जबाबदार आहेत, असा निष्कर्ष काढायला मी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह नाही, अशी खोचक टिपणी शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

पुण्यात एकाच रात्री जळीतकांडाच्या दोन घटना, 6 ट्रक, 6 बाईक खाक
पुणे : पुण्यात एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांच्या जळीतकांडाची घटना घडली आहे. पुण्यातील वाघोलीत सहा ट्रक आणि शुक्रवार पेठेत सहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.
वाघोली परिसरातील एका बाबूभाई गॅरजेमधील सहा ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. आज पहाटेच्या दरम्यान ही आग लागल्याचं कळतं. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 ते 4 गाड्यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली.
तर दुसरीकडे शुक्रवार पेठ भागात रात्री साडेतीनच्या सुमारास सहा दुचाकी जळून खाक झाल्या. महत्त्वाचं म्हणजे पोलिस चौकीसमोरच हे जळीतकांड घडलं आहे. या आगीचंही कारण अद्याप समजलेलं नाही.
मात्र एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
=========================================
तृप्ती देसाईंचा त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश
नाशिक : स्वराज्य संघटनेच्या महिलांनंतर आज भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनीही त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. मंदिराच्या नियमानुसार तृप्ती देसाई यांनी साडी नेसून गर्भगृहात प्रवेश केला आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं.
यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिराला छावणीचं रुप आलं होतं.
दर्शनानंतर तृप्ती देसाईंनी आनंद व्यक्त केला. तसंच सर्व मंदिरामध्ये महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
मात्र आजही तृप्ती देसाईंना विरोधाचा सामना करावा लागला. त्र्यंबकेश्वरवासियांनी काळे झेंडे लावून तृप्ती देसाईंचा निषेध केला. पोलिसांचा वापर करुन धार्मिक भावना दुखावल्याचं सांगत निषेध म्हणून एकही महिला आज मंदिरात जाणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया त्र्यंबकेश्वरच्या महिलांनी दिली.
तर तृप्ती देसाईंना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याबद्दल स्थानिक तरुणीने संताप व्यक्त केला. हा देसाईंचा पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप करत गोंधळ घातला. पोलिसांनी संबंधित तरुणीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळ वाढत असल्याचं पाहून पोलिसांनी तृप्ती देसाईंना तिथून तात्काळ रवाना केलं.
=========================================
ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत
ठाणे : ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाणे-ऐरोली स्टेशनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे ठाणे-वाशी आणि ठाणे-पनवेल मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रशासनाकडून हा बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरु आहेत.
मात्र या बिघाडामुळे मुंबईकर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परंतु प्रवाशांनी आणखी गैरसोय होऊ नये म्हणून ठाणे महापालिका आणि नवी मुंबई महापालिकेला जादा बस सोडण्याची विनंती करण्यात आली आहे.
=========================================
सिंधुदुर्गच्या समुद्रात जहाज बुडालं, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील रेडी समुद्रात खनिज मालवाहू जहाज बुडालं. जहाजावरील चारही खलाशांना वाचवण्यात यश आलं आहे. जहाज बुडतानाचा थरारक प्रसंग एका प्रत्यक्षदर्शीने त्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
समुद्राला उधाण आल्याने आणि क्षमतेपेक्षा जास्त सामान असल्याने हे जहाज बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेत सुमारे 4 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. तर जहाजावरील चारही खलाशांची सुखरुप सुटका करण्यात आली.
भर समुद्रात उभ्या असलेल्या मालवाहू जहाजात सामान भरण्याचं काम सुरु असतानाच ते बुडालं. या घटनेत अंदाजे 1 हजार टन माल बुडाल्याने कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.
=========================================
मार्शमेलो ओएसवर चालणारा मायक्रोमॅक्सचा नवा स्मार्टफोन, किंमत केवळ....
मुंबई : मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टीमने सज्ज असलेला नवा आणि स्वस्त स्मार्टफोन मायक्रोमॅक्सने लाँच केलाय. मायक्रोमॅक्सचा हा नवा स्मार्टफोन कॅनव्हास सीरिजमधील आहे. या स्मार्टफोनचं नाव मायक्रोमॅक्स कॅनव्हास स्पार्क 2 प्लस असं आहे आणि याची किंमत फक्त रू. 3999 आहे. हा स्मार्टफोन फक्त स्नॅपडिलवरच उपलब्ध होणार आहे.
मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास 6 आणि कॅनव्हास 6 प्रो या हायएन्ड स्मार्टफोनच्या लाँचिंग कार्यक्रमात स्पार्क 2 प्लस लवकरच लाँच करणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं होतं. पहिल्यांदाच स्मार्टफोन वापरणाऱ्या यूजर्ससाठी हा अतिशय स्वस्तातला स्मार्टफोन मायक्रोमॅक्सने लाँच केलाय. पहिल्यांदाच स्मार्टफोन वापरणाऱ्या यूजर्ससाठी मार्शमेलो या सर्वात अद्ययावत ओएसने सज्ज असलेला स्पार्क 2 प्लस मेटॅलिक ग्रे, कॉपर गोल्ड आणि शँपेन गोल्ड अशा तीन रंगात उपलब्ध करून देण्यात आलाय.
स्पेसिफिकेशनच्या बाबतीत सांगायचं तर मायक्रोमॅक्स कॅनव्हास स्पार्क 2 प्लस स्मार्टफोनला 480X854 पिक्सेलचा FWVGA प्रकारातील पाच इंची डिस्प्ले आणि 1.3GHz क्षमतेचा क्वाडकोअर प्रोसेसर आहे. तसंच स्पार्क 2 प्लसमध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने ही मेमरी 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
या स्मार्टफोनचा रिअर म्हणजे मुख्य कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा तर फ्रंट म्हणजे सेल्फी कॅमेरा 2 मेगापिक्सेलचा आहे. मायक्रोमॅक्स कॅनव्हास स्पार्क 2 प्लसची बॅटरी 2000 mAh क्षमतेची आहे. तसंच कनेक्टिव्हिटी जीपीआरएस, ईडीजीई आणि 3जी स्पीडने इंटरनेट वापरता येणार आहे. तसंच ब्लूटूथ, वायफाय आणि मायक्रोयूएसबी ही संपर्क व्यवस्था या स्मार्टफोनसोबत आहे.
या स्मार्टफोनच्या लाँचिगच्या कार्यक्रमात मायक्रोमॅक्सचे मुख्य वितरण अधिकारी शुभजीत सेन यांनी स्पष्ट केलं ही अतिशय स्वस्तातला हा स्मार्टफोन सध्या फीचर किंवा बेसिक फोन वापरत असलेल्या यूजर्सनी स्मार्टफोन वापरावा यासाठीच खास बनवण्यात आला आहे. त्यांना आवश्यक तेवढीच स्पेसिफिकेशन्स या स्मार्टफोनसोबत देण्याती आलीत. तसंच हा स्मार्टफोन फक्त स्नॅपडिल या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरच उपलब्ध होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मायक्रोमॅक्स कॅनव्हास स्पार्क 2 प्लसची वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्स थोडक्यात :
स्क्रीन डिस्प्ले : 5 इंच
स्क्रीन रिझोल्यूशन : 480X854 पिक्सेल FWVGA
स्क्रीन डिस्प्ले : 5 इंच
स्क्रीन रिझोल्यूशन : 480X854 पिक्सेल FWVGA
प्रोसेसर : 1.3GHz क्वाडकोअर
रॅम : 1 जीबी
इनबिल्ट मेमरी : 8 जीबी
मेमरी (मायक्रोएसडी) सपोर्ट : 32 जीबी
रॅम : 1 जीबी
इनबिल्ट मेमरी : 8 जीबी
मेमरी (मायक्रोएसडी) सपोर्ट : 32 जीबी
फ्रंट (सेल्फी) कॅमेरा : 2 मेगापिक्सेल
रिअर (मुख्य) कॅमेरा : 5 मेगापिक्सेल
बॅटरी : 2000 mAh
ऑपरेटिंग सिस्टीम : अँड्राईड 6.0 मार्शमेलो
रिअर (मुख्य) कॅमेरा : 5 मेगापिक्सेल
बॅटरी : 2000 mAh
ऑपरेटिंग सिस्टीम : अँड्राईड 6.0 मार्शमेलो
=========================================
मुंबईवर 'प्रभू'कृपा, एसी लोकल 15 मेपासून, वायफायही सुरु होणार
मुंबई : केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी भारतीय रेल्वेवर हायटेक कृपा केली आहे. भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सुरेश प्रभूंनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यातील मुख्य म्हणजे एसी लोकल 15 मेपासून सुरु होण्याची चिन्हं आहेत, तर 15 रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा सुरु होणार आहे.
मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्र्यांमध्ये विविध प्रकल्पांवर झालेली चर्चा
सीएसटी-पनवेल उन्नत रेल्वे मार्ग ( 10 हजार कोटी रुपये), या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा
तयार, भूमिपूजन 15 ऑगस्टला करणार, या प्रकल्पामध्ये रेल्वेलाईन बरोबर रस्ते वाहतूकही असणार
चर्चगेट-विरार उन्नत रेल्वे मार्ग ( 25 हजार कोटी रुपये) दोन टप्प्यांमध्ये बांधला जाणार, विरार – वांद्रे आणि वांद्रे -चर्चगेट असा मार्ग असणार
सिग्नल यंत्रणा 4000 कोटी निधी
– हार्बर रेल्वेच्या सिग्नल व्यवस्थेत बदल करुन आधुनिक करणार
– त्यामुळे दर दोन मिनिटाला हार्बर मार्गावर लोकल ट्रेन धावणार
– MUTP 3 च्या कामाला 15 ऑगस्टपर्यंत सुरुवात होणार
– मुंबईतील 15 रेल्वे स्थानकांवर वाय फायची सुविधा
– मध्य रेल्वेच्या 10 आणि पश्चिम रेल्वेच्या 10 रेल्वे स्थानकांवर एस्कलेटर
– सीएसटी स्थानकाचं नूतनीकरण करणार, यात 7 किल्ले सदृश्य इमारती आणि शिवाजी महाराज पुतळा असणार
– मुंबई आणि दिल्ली दरम्यान Talgo ट्रेन धावणार, त्यामुळे प्रवासाचा 6 तास वेळ वाचणार, जपानी तंत्रज्ञान
– लोकल ट्रेन, बस, टॅक्सी, मोनो, मेट्रो यासाठी सामायिक तिकीट व्यवस्था सुरु करणार, मोबाईलवर वापरता येईल
– हार्बर रेल्वेवर एसी-डीसी परिवर्तन
– जूनपर्यंत हार्बरवरील सर्व गाड्या 12 डब्यांच्या असणार
– एसी लोकल 15 मे पर्यंत सुरु करणार
– 40 स्टेशनचं आधुनिकीकरण करणार, त्यात मॉल, राहण्याची व्यवस्था, वायफाय, एस्कलेटर असणार
– गेली 20 वर्ष जे रेल्वेचे प्रकल्प रखडले आहेत, ते SPV च्या माध्यमातून फास्ट ट्रॅक करणार
– सीएसटी स्थानकाच्या आधुनिकीकरणामध्ये आझाद मैदान मेट्रो स्थानक, चर्चगेट आणि सीएसटी भूमिगत मार्गाने जोडणार
प्रमुख प्रकल्पांची आणि त्या प्रकल्पाच्या प्रगतीची मुंबईतील कार्यक्रमात माहिती प्रभू यांनी दिली. मांटुगा रेल्वे कारखान्याच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरेश प्रभू मुंबईत आले होते. यावेळी प्रभूंच्या हस्ते करीरोडच्या फूट ओव्हर ब्रिजचंही उद्घाटन करण्यात आलं.
=========================================
iPhone पाठोपाठ एलजी G5 चंही SE व्हर्जन लवकरच...
मुंबई : अॅपलने SE सीरिजमधील तुलनेने स्वस्त आयफोन लाँच केल्यानंतर एलजी या स्मार्टफोन उत्पादक कंपनीनेही त्यांच्या LG G5 या हायएन्ड फ्लॅगशिप स्मार्टफोनची SE एडिशन मार्केटमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
एलजी G5 या फ्लॅगशिपचं SE व्हर्जन लाँच करणार असल्याची चर्चा स्मार्टफोन आणि गॅझेटप्रेमींच्या क्षेत्रात अनेक दिवसांपासून होती, आता त्याला पूर्णविराम मिळाला आहे. एलजी G5 च्या SE व्हर्जनमध्ये लेटेस्ट अँड्राईड ओएस मार्शमेलो बरोबरच स्नॅपड्रॅगनचा 625 हा तुलनेने कमी क्षमतेचा प्रोसेसर असल्याचं रशियातून आलेल्या वृत्तात म्हटलं आहे. एलजीच्या LG G5 या स्मार्टफोनमध्ये सध्या स्नॅपड्रॅगन 820 हा सध्याचा सर्वात शक्तीशाली प्रोसेसर आहे. मात्र SE व्हर्जनमध्ये प्रोसेसरची क्षमता घटवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
एलजीने G5 या स्मार्टफोनची घोषणा वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये केली होती. त्यानंतर रशियात एका कार्यक्रमात एलजीनेच LG G5 च्या SE व्हर्जनची घोषणा केली. हायएन्ड LG G5 आणि त्याचं SE व्हर्जनमध्ये सध्या तरी फक्त प्रोसेसरचाच काय तो फरक आहे. रशियातून आलेल्या काही रिपोर्ट्सवरुन LG G5 च्या एसई व्हर्जनमध्ये रॅमबाबतही काहीशी तडजोड करण्यात आल्याची शक्यता आहे. LG G5 या स्मार्टफोनला 4 जीबी रॅम आहे तर त्याच्या SE व्हर्जनसोबत 3 जीबी रॅम देण्यात आला आहे.
अन्य स्पेसिफिकेशन्समध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. म्हणजे LG G5 आणि LG G5 SE या दोन्ही व्हर्जनमध्ये स्क्रीन 5.3 इंच आणि डिस्प्ले QHD रिझोल्यूशनचा आहे.
LG G5 आणि LG G5 SE या दोन्ही व्हर्जनमध्ये कॅमेराही सारखाच आहे. दोन्ही स्मार्टफोनचा रिअर म्हणजे मुख्य कॅमेरा 16 मेगापिक्सेलचा तर फ्रंट म्हणजे सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे. दोन्ही स्मार्टफोनची बॅटरी 2800 mAh क्षमतेची असून फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा देण्यात आली आहे.
=========================================
अंगुरी भाभीवरील अन्यायाविरोधात मनसेचा आवाज
मुंबई : ‘भाभीजी घर पे है’ या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेली शिल्पा शिंदे आणि मालिकेच्या निर्मात्यांमध्ये झालेल्या वादात आता मनसे उतरलं आहे. मराठी कलाकारांवरील अन्यायाविरोधात मनसे चित्रपट सेनेने शिल्पाला समर्थन दिलं आहे.
शिल्पाला भाभीजी घर पे है ही मालिका सोडायची असून तिच्या भूमिकेसाठी दुसरी अभिनेत्री मिळत नसल्यानं मालिकेच्या निर्मात्यांशी शिल्पाचा वाद झाला. या वादानंतर शिल्पानं मालिका सोडली आणि त्यानंतर नाराज झालेल्या निर्मात्यांनी शिल्पाला नोटीस बजावत पूर्ण टीव्ही इंडस्ट्रीमध्येच तिच्यावर बंदी आणण्याची मागणी केली.
याविरोधात शिल्पाच्या समर्थनात मनसेने पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी आपण निर्मात्यांच्या नोटिशीला वेळोवेळी उत्तर देत असल्याचं शिल्पानं म्हटलं आहे. तर मराठी कलाकारांना मिळणाऱ्या भेदभावाविरोधात मनसेने आवाज उठवला आहे.
=========================================
मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाबुलाल गौर यांचं महिलेशी असभ्य वर्तन
भोपाळ : मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौर यांच्यावर त्यांच्याच पक्षातल्या महिला कार्यकर्तीची छेड काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गौर यांच्या आक्षेपार्ह वर्तनाचा व्हिडिओही कैद झाला आहे.
भोपाळमध्ये पालिकेच्या बसच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री महोदयांनी बसमध्ये चढणाऱ्या महिलेशी अश्लील वर्तन केल्याचं म्हटलं जात आहे. बसमध्ये संबंधित महिला चढत असताना बाबूलाल गौर यांनी छेड काढल्याचा आरोप आहे.
दरम्यान बसमध्ये चढताना गर्दी होती. त्यामुळे आपण महिलांना चढण्यास सांगत होतो. मात्र आपल्यावर महिलेची छेड काढल्याचा आरोप केला जात आहे, असा दावा बाबूलाल गौर यांनी केला आहे.
=========================================
मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा : सुप्रिया सुळे
औरंगाबाद : दुष्काळाची भीषणता बघून राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या आजपासून दोन दिवसांच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील एकोड पाचोड गावापासून सुळे यांनी सकाळी दुष्काळ पाहणीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी गेवराईत अमरसिंग पंडित यांनी सुरु केलेल्या चारा छावणीलाही भेट दिली. तसंच साखर कारखाने जगवायचे असतील तर ड्रिप इरिगेशनला पर्याय नाही. त्यामुळे ऊस बंद करणं हा पर्याय नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला असलं पाहिजे, त्यामुळे दारु कंपन्यांना पाणी पुरवण्याबाबत विचार करा, असंही सुप्रिया सुळेंनी सुनावलं आहे.
दरम्यान मराठवाड्यातल्या दुष्काळाला ऊस आणि कारखाने जबाबदार आहेत, असा निष्कर्ष काढायला मी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह नाही, अशी खोचक टिपणी शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
=========================================
विजय मल्ल्यांचा बँकांसमोर नवा प्रस्ताव, ६८६८ कोटी भरण्याची तयारी
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. २२ - बँकांचे जवळपास ९००० कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांनी बँकांसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. विजय मल्ल्या यांनी 6868 कोटी भरण्यास तयार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. याअगोदरमल्ल्या यांनी सप्टेंबरपर्यंत ४००० करोड भरण्याचा ठेवलेला प्रस्तावबँकांसमोर ठेवला होता. मात्र बँकांनी हा प्रस्ताव नाकारला होता. यानंतर विजय मल्ल्या यांनी आता अजून 2468 भरण्याची तयारी दर्शवली आहे.सर्वोच्च न्यायालयाने विजय मल्ल्या यांना भारतात कधी परतणार ? याबाबत विचारणाही केली. मात्र यावर मल्ल्यांकडून काहीच उत्तर देण्यात आलं नाही. किंगफिशरमध्ये 6107 कोटींचं नुकसान झालं असतानाही 6868 कोटी भरण्याचा हा प्रस्ताव माझ्याकडून सर्वोत्तम असल्याचं विजय मल्ल्या यांनी सांगितलं आहे.किंगफिशर एअरलाईन्स, किंगपिशर फिनवेस्ट आणि युबीचे शेअर्स विकून 1591 कोटींची रक्कम सर्वोच्च न्यायालयात जमा करु शकतोअशी माहिती विजय मल्ल्या यांनी दिली आहे. कर्ज फेडण्यासाठी माझी तयारी आहे मात्र सरकारने पासपोर्ट रद्द करुन तसंच अजामीनपात्र वॉरंट जारी करुन माझ्यावर जबरदस्ती करु नये असंही विजय मल्ल्यांनी म्हटलं आहे.
=========================================
सुब्रमण्यम स्वामी, नवज्योतसिंग सिद्धू, मेरी कोम जाणार राज्यसभेवर?
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २२ - भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी, माजी क्रिकेटपटू व खासदार नवज्योतसिंग सिद्धू आणि ऑलिम्पिप पदक विजेती बॉक्सर मेरी कोम यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेत नामांकनाद्वारे पाठवण्यात येणा-या सदस्यांसाठी केंद्र सरकार या तिघांसह आणखी काही नावांची शिफारस करणार असल्याचे समजते. त्यामध्ये मल्याळम अभिनेता सुरेश गोपी, पत्रकार स्वपन दासगुप्ता, अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांचाही समावेश असेल, अशा माहिती मिळत आहे.काँग्रेससाठी अडचणी निर्माण करणारे भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे नाव राज्यसभेसाठी नक्की पुढे पाठवण्यात येणार असल्याचे समजते. तर भाजपावर नाराज असणा-या नवज्योतसिंग सिद्ध यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या नावाचीही शिफारस करून एक दगडात दोन पक्षी मारण्याचा भाजपाचा विचार असल्याचे समजते. सिद्धूंचे नाव पुढे केल्याने ते आम आदमी पक्षात प्रवेश करून पंजाबमध्ये भाजपा-अकाली दलासमोर अडचणी निर्माण करण्याची संधी संपुष्टात येईल आणि दुसरे म्हणजे त्यांच्या रुपाने पक्षाला राज्यसभेत एक चांगला वक्ताही मिळेल.राज्यसभेत सध्या ७ जागा रिकाम्या असून सरकारला त्यासाठी सदस्यांची नावे नामांकित करायची आहेत. याप्रकरणी अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकरच ही नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.
=========================================
जर्मनीतील गुरुद्वारा हल्ल्याप्रकरणी २ अल्पवयीन अटकेत
- ऑनलाइन लोकमत -बर्लिन, दि. २२ - पश्चिम जर्मनीमधील गुरुद्वा-यात करण्यात आलेल्या स्फोटप्रकरणी पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. महत्वाचं म्हणजे हे दोन्ही हल्लेखोर अल्पवयीन आहेत. गुरुवारी झालेल्या स्फोटात 3 लोक जखमी झाले होते. अटक करण्यात आलेलेआरोपी आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे.हल्ल्यानंतर पोलिसांनी फुटेज जारी केलं होतं, ज्यामध्ये दोन व्यक्ती बॅग घेऊन जातात दिसत होत्या. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटक बॅगेत लपवली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. पोलिसांनी फुटेज जारी केल्यानंतर यातील एका आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. तर दुस-या आऱोपींला पोलिसांनी छापा टाकून अटक केली. दोन्ही अल्पवयीन हल्लेखोर जर्मनीचे नागरिक आहेत. जखमी झालेल्या तिघांपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर होती. प्रकृतीत सुधारणा होत असून चिंतेची गरज नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
=========================================
लंडनमध्ये सुरु होणार जगातील पहिलं न्यूड रेस्टॉरंट
- ऑनलाइन लोकमत -लंडन, दि. २२ - एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असेल तर सगळ्यात पहिला प्रश्न पडतो कोणते कपडे घालायचे ?. पण लंडनमध्ये एक असं रेस्टरंट सुरु होणार आहे जिथे जाताना तुम्हाला कपड्यांची चिंता करण्याची गरज नाही. ऐकून आश्चर्य वाटेल पण लंडनमध्ये न्यूड रेस्टॉरंट सुरु होणार आहे. ज्यासाठी 11 हजार लोकांनी नोंदणीदेखील केली आहे. लंडनमध्ये सुरु होणा-या या रेस्टॉरंटचं नाव 'बुनियादी' ठेवण्यात आलं आहे. जूनमध्ये हे रेस्टॉरंट लोकांसाठी खुलं करण्यात येणार आहे.हे रेस्टॉरंट दोन भागात विभागले असणार आहे. ज्यांना कपडे घालून रेस्टॉरंटमध्ये जेवायचं आहे त्यांच्या बसण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. तर नग्न असणा-यांना वेगळी जागा असणार आहे. रेस्टॉरंटमध्ये 42 लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच हस्तनिर्मित भांड्यांवर जेवण वाढण्यात येणार आहे. रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे जेवण मिळणार आहे.'लोकांना कोणतीही भेसळ नसलेली मस्ती करायला मिळायला हवी. कोणतीही कृत्रिम गोष्ट नसलेला अनुभव मिळावा. ज्यामध्ये कोणताही रंग, केमिकल, वीज, गॅस, फोन यांच्यासोबतच इच्छा असेल तर कपडेही नसावेत. त्यांना ख-या स्वातंत्र्याचा अनुभव मिळावा ही यामागची संकल्पना असल्याचं', रेस्टॉरंटचे मालक सेब लिआल यांनी सांगितलं आहे.'ग्राहकांसमोर येणारी प्रत्येक गोष्ट नग्न असावी अशी जागा बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली आहे. रेस्टॉरंटमध्ये कोणत्याही प्रकारचा देखावा करण्यात आलेला नाही. बांबू आणि मेणबत्तीचा फक्त वापर करण्यात आला आहे. आमच्यासाठी हे खूपच आव्हानात्मक होतं, आम्ही खूप उत्साहित आहोत', असंही सेब लिआल यांनी म्हटलं आहे.रेस्टॉरंटमध्ये येणा-या प्रत्येक व्यक्तीला तिकीट दिलं जाणार आहे. प्रथम येईल त्याला प्राधान्य देण्यात येईल. यासाठी रेस्टॉरंटच्या वेबसाईटवरर जाऊन रजिस्टर करावं लागणार आहे. रेस्टॉरंटमध्ये येणा-या ग्राहकांना चेंजिंग रुम आणि लॉकर्सची सुविधा देण्यात येणार आहे. ग्राहकांना आपल्या टेबलावर पोहाचेपर्यंत घालण्यासाठी कपडे देण्यात येणार आहेत. या रेस्टॉरंटमध्ये फोटो काढायला परवानगी नसणार आहे.
=========================================
जुहू बीचवरील १८ स्टॉल आगीत जळून खाक
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. २२ - जुहू बीचवरील स्टॉल्सना आज शुक्रवारी सकाळी आग लागली होती. या आगीत बीचवरील 18 स्टॉल जळून खाक झाले आहेत. सकाळी पावणे सहाच्या सुमारास ही आग लागली होती. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला कळवण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणण्यात आलं. आगीत स्टॉल पुर्पणणे जळून खाक झाले आहेत. मात्र सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. आगीच नेमकं कारण कळू शकलेलं नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे.
=========================================
कृष्णेचे आतापर्यंत ९५ लाख लीटर पाणी लातुरात
- लातूर : मिरजहून सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी ५० वॅगनच्या जलपरीने २५ लाख लीटर पाणी लातुरात आणले. आतापर्यंत मिरजेहून कृष्णेचे ९५ लाख लीटर पाणी लातुरात आले आहे. जलपरीच्या ५० वॅगनची पहिली फेरी बुधवारी सकाळी झाली.गुरुवारी सकाळी या वॅगनमधील पाणी केवळ ६.३० तासांत उतरवून घेण्यात आले. त्यानंतर १ वाजून १५ मिनिटांनी जलपरी मिरजच्या दिशेने रवाना झाली. आता ५० वॅगनच्या जलपरीची दररोज १ खेप होणार असल्याचे रेल्वेसूत्रांकडून सांगण्यात आले.आतापर्यंत १० वॅगनच्या ९ फेऱ्या झाल्या असून, ५० वॅगनच्या दोन फेऱ्या जलपरीने केल्या आहेत. ५० वॅगनच्या दोन फेऱ्यांतून ५० लाख लीटर आणि १० वॅगनच्या नऊ फेऱ्यांतून ४५ लाख लीटर असे एकूण ९५ लाख लीटर कृष्णेचे पाणी आतापर्यंत लातूरकरांना मिळाले आहे. (वार्ताहर)मिरज : मिरजेतून ५० रेल्वे टॅँकरमधून २५ लाख लीटर पाण्याची तिसरी खेप लातूरला पाठविण्यात आली. गुरुवारी जलदूत एक्स्प्रेस रवाना झाली.मिरज रेल्वे जलशुद्धीकरण केंद्रापासून अडीच किलोमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर मंगळवारपासून दररोज २५ लाख लीटर पाणी भरून जलदूत एक्स्प्रेस लातूरला जात आहे. दिवसभर पाणी भरण्याचे काम पूर्ण झाल्याने रात्री जलदूत एक्स्प्रेस लातूरकडे रवाना झाली. ५० रेल्वे टॅँकर भरण्यासाठी नदीतील जॅकवेल व हैदरखान विहिरीतील पंप सुरू करण्यासाठी जीवन प्राधिकरणामार्फत २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मिरजेतून रेल्वेने केलेल्या पाणी व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मिरजेला येणार आहेत.लातूर : ‘जलयुक्त लातूर, सर्वांसाठी पाणी’ ही संकल्पना घेऊन गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात आलेल्या मांजरा नदीवरील साई बंधाऱ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे अडीच किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तर, दुसऱ्या टप्प्यातील नागझरी बंधाऱ्यावरील कामाचा शुभारंभ रविवारी करण्यात येणार असल्याची माहिती जलयुक्त लातूर व्यवस्थापन समितीचे डॉ़ अशोक कुकडे यांनी पत्र परिषदेत दिले़जलयुक्त चळवळीच्या मदतीसाठी सर्वच स्तरांतील दानशूर लातूरकर सरसावले आहेत़ या माध्यमातून आजपर्यंत ३ कोटी ७५ लाखांचा निधी संकलित करण्यात आला असल्याचे कुकडे यांनी सांगितले.
=========================================
सिद्धिविनायक मंदिराजवळ रस्ता खचला
- मुंबई : सिद्धिविनायक मंदिराच्या पाठीमागील घाणेकर मार्गात गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक रस्ता खचून ६ ते ७ फूट खोल खड्डा पडला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. यामध्ये कोणी जखमी झालेले नाही. मात्र याचा सर्वाधिक फटका वाहतुकीला बसला. त्यामुळे प्रभादेवी परिसरामध्ये वाहतुकीच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर माहीम-माटुंगा आणि वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरही वाहनांची एकच गर्दी झाली होती. स्थानिक पोलीस ठाण्यासह अग्निशमन दल, पालिका घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे अन्य मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रवक्ते धनंजय कुलक र्णी यांनी केले.
=========================================
महापालिकेतही पाणी प्रश्न पेटला
- मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीसाठी काही महिने उरले असताना शिवसेना-भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत़ रस्ते घोटाळा, टँकरमाफिया अशा अनेक विषयांमध्ये उभय पक्षांनी परस्परांना लक्ष्य केले आहे़ एकीकडे भ्रष्टाचाराच्या आरोपांनी खचणार नाही, असे शिवसेनेने ठणकावले़, तर दुसरीकडे हे आव्हान स्वीकारून भाजपाने ही तर नुसती सुरुवात आहे, असा इशारा मित्रपक्षाला दिला आहे़ त्यामुळे निवडणुकीपूर्वीच युतीमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे़ सध्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत पाणीगळती, टँकरमाफिया या मुद्द्यांवर भाजपाने शिवसेनेला धारेवर धरले आहे.स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाने राज्यात सत्तेवर असलेल्या आपल्या सरकारचा पुरेपूर फायदा उठवत प्रत्येक कामाचे के्रडिट घेण्यास सुरुवात केली आहे़ बेस्ट उपक्रमाच्या कमी अंतराच्या प्रवासी भाड्यामध्ये घट करण्याचा निर्णय घेऊन भाजपाने शिवसेनेवर कुरघोडी केली.त्यानंतर अशा धक्क्यांची मालिका सुरूच ठेवत भाजपाने शिवसेनेच्या नाकी नऊ आणले आहेत.त्यामुळे शिवसेनेनेही मित्रपक्षावर हल्लाबोल केला आहे़पालिकेच्या पाण्याची विक्री करून टँकरमाफिया गबर झाल्याचा आरोप भाजपाने बुधवारी केला़ त्यानंतर भाजपाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अजय मेहता यांची गुरुवारी भेट घेऊन टँकरमाफियांवर कारवाईची मागणी केली़ मुंबईत दररोज वाया जाणाऱ्या २७ टक्के बेहिशोबी पाण्यामध्ये १२ ते १५ टक्के टँकरमाफियांच्या घशात जात असल्याचा आरोप भाजपाने केला आहे़ (प्रतिनिधी)वीज ग्राहकांना असा होणार फायदाटीडीएलआरमुळे शहर भागातील बेस्टच्या वीज ग्राहकांचे बिल २५ टक्क्यांनी वाढले होते़ मात्र यामध्ये आता २० टक्के कपात झाल्यास प्रति युनिट ११ रुपये ४५ पैशांऐवजी शहरातील दहा लाख वीज ग्राहकांना आठ रुपये ३० पैसे मोजावे लागतील, असा दावा शेलार यांनी केला आहे़
=========================================
‘कार’नाम्याने बाबासाहेबांना मानवंदना
- मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मूळ भारतीय वंशाच्या भारुलता कांबळे (४२) लंडनपासून महाडच्या चवदार तळ््यापर्यंत कारने प्रवास करणार आहेत. एकूण २८ देशांमधून तब्बल ३१ हजार किलोमीटरचा प्रवास भारुलता एकट्याने पूर्ण करणार आहेत.या मॅरेथॉन प्रवासाविषयी माहिती देताना भारुलता म्हणाल्या की, लंडनमधील ल्यूटन येथून १६ जुलै २०१६ रोजी या प्रवासाची सुरुवात होईल. दोन खंडांमधील २८ देशांमधून हा प्रवास असेल. या प्रवासापैकी ५ हजार ५०० किलोमीटरचा रस्ता हा डोंगराळ भागांतून जातो. त्यात अत्युच्च ठिकाण हे ३ हजार ७०० मीटर उंचीवरील आहे. या प्रवासादरम्यान २ हजार ५०० किलोमीटरचा रस्ता हा वाळवंटी भागातून जातो. त्यामुळे वेगवेगळ््या परिस्थितीत कारने प्रवास करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार असल्याचे भारुलता यांनी सांगितले. या जागतिक विक्रमाच्या माध्यमातून स्त्री सबलीकरण आणि शिक्षणाचा संदेश देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. या जागतिक विक्रमादरम्यान विक्टर ब्रुस या ब्रिटिश महिलेने १९२७ साली केलेला आर्टिक्ट सर्कलचा विक्रमही मोडणार असल्याचे भारुलता यांनी सांगितले. ब्रुसने तिच्या पतीसोबत ४०० किलोमीटरचा प्रवास करून हा विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र आर्टिक्ट सर्कलच्या जमिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत जाणार असल्याने पुन्हा दुसरी कोणतीही महिला नव्याने प्रस्थापित होणारा विक्रम मोडू शकणार नाही, असा दावाही भारुलता यांनी केला आहे.
=========================================
आॅन ड्युटी’ नसताना बजावली ‘ड्युटी
- मुंबई : आॅन ड्युटी नसतानादेखील दोन अंमलदारांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता व्यापाऱ्याची बॅग हिसकावून पळ काढत असलेल्या लुटारूच्या मुसक्या आवळल्या. ही बाब पोलीस दलाला समजताच त्यांचे पोलीस दलातून कौतुक करण्यात आले. अनंत शिरसाठ आणि अभिजित साळुंखे असे दोघा पोलीस अंमलदारांचे नाव आहे.गिरगावच्या खेतवाडी मुख्य मार्गावर पोलीस वसाहतीसमोर व्यापारी संजय मेहता यांचे दुकान आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास मेहता दुकान बंद करून घरी निघत होते. दरम्यान, तेथे आलेल्या लुटारूने त्यांना धक्का देत त्यांची बॅग हिसकावून पळ काढला. याबाबत मेहता यांनी आरडाओरड करताच खेतवाडी पोलीस वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ उभे असलेले अनंत शिरसाठ आणि अभिजित साळुंखे सतर्क झाले. त्याचदरम्यान एक लुटारू बॅग घेऊन पळत असताना त्यांना दिसला. त्यांनी तत्काळ त्या लुटारूचा पाठलाग करीत त्याला पकडले. झाकीर अन्सारी असे त्याचे नाव असून, तो पनवेल येथील रहिवासी आहे. त्याचा मानसरोवर स्थानकावर फळविक्रीचा व्यवसाय आहे. बुधवारी दुपारी तो गिरगाव येथील मित्राकडे आला होता. त्याने आतापर्यंत आणखी काही गुन्हे केले आहेत का? याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
=========================================
आसारामबापूचा फास आवळला
- सुरत : लैंगिक शोषणाच्या आरोपात तुरुंगात बंद आसारामबापू आणि त्याचा मुलगा नारायणसाईभोवती आयकर विभागाने आपला फास आवळला आहे. विभागाने या बापलेकाच्या २५०० कोटी रुपयांच्या संपत्तीवर ३० टक्के कराच्या हिशेबाने ७५० कोटी रुपयांच्या करवसुलीची कारवाई सुरू केली आहे.सुरत आयकर विभागाने यासंदर्भात एक अहवाल तयार करून अहमदाबाद कार्यालयाला पाठविला आहे.२५०० कोटींची संपत्ती उघडआयकर विभागाला आसारामबापूच्या एका साधकाच्या घरून दस्तावेजांच्या ४२ पिशव्या मिळाल्या होत्या. यात अनेक लॅपटॉप आणि कॉम्प्युटरही होते. यापैकी बहुतांश उपकरणात दुहेरी पासवर्ड टाकण्यात आला होता. म्हणजेच योग्य पासवर्ड टाकल्यावरही स्क्रीनवर चुकीचा पासवर्ड दिसत होता. ही गुंतागुंत सोडविल्यानंतरच कॉम्प्युटर आणि लॅपटॉप सुरू होऊ शकले. आणि आसारामबापू व नारायणसाईच्या २५०० कोटी रुपयांच्या संपत्तीचा भंडाफोडझाला. यासोबतच आयकर विभागाने देशभरातील ७० आश्रमांमध्ये धाडी घातल्या होत्या. या कारवाईनंतर विभागाने शंभरावर मालमत्तांची तात्पुरती जप्ती केली असून तूर्तास त्यांची विक्री करता येणे शक्य नाही. (वृत्तसंस्था)मिळालेल्या माहितीनुसार सुरत आयकर विभागाने तुरुंगात बंदिस्त नारायणसाईची दोनदा चौकशी केली. परंतु आश्रम आणि संपूर्ण व्यवसाय आपले वडील आसारामबापूच सांभाळत असल्याचे त्याने सांगितले. मग विभागाने जोधपूर कारागृहात जाऊन आसारामबापूकडेही संपत्तीबाबत विचारणा केली. परंतु त्यानी कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी मौन पाळले.
=========================================
पॉप संगीताचा सुपरस्टार प्रिन्सचे निधन
- ऑनलाइन लोकमतचॅन्हस्सेन, दि. २२ - अमेरिकन पॉप संगीताचा सुपरस्टार असलेल्या प्रिन्सचे काल रात्री वयाच्या ५७ व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले आहे. प्रिन्सच्या घरामध्ये त्याचा मृतदेह आढळला असुन हा मृतदेह सिंगर प्रिन्सचा असल्याचे अमेरिकन मीडियाने म्हटले आहे. मिनेसोटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रिन्सच्या घरामध्ये एक मृतदेह आढळला आहे.५७ वर्षीय सिंगर प्रिन्स याला फ्लू मुळे काही दिवसांपूर्वी तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता. सिंगर प्रिन्सच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
=========================================
जर्मनीतील गुरुद्वारा हल्ल्याप्रकरणी २ अल्पवयीन अटकेत
- ऑनलाइन लोकमत -बर्लिन, दि. २२ - पश्चिम जर्मनीमधील गुरुद्वा-यात करण्यात आलेल्या स्फोटप्रकरणी पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. महत्वाचं म्हणजे हे दोन्ही हल्लेखोर अल्पवयीन आहेत. गुरुवारी झालेल्या स्फोटात 3 लोक जखमी झाले होते. अटक करण्यात आलेलेआरोपी आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे.हल्ल्यानंतर पोलिसांनी फुटेज जारी केलं होतं, ज्यामध्ये दोन व्यक्ती बॅग घेऊन जातात दिसत होत्या. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटक बॅगेत लपवली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. पोलिसांनी फुटेज जारी केल्यानंतर यातील एका आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. तर दुस-या आऱोपींला पोलिसांनी छापा टाकून अटक केली. दोन्ही अल्पवयीन हल्लेखोर जर्मनीचे नागरिक आहेत. जखमी झालेल्या तिघांपैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर होती. प्रकृतीत सुधारणा होत असून चिंतेची गरज नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
=========================================
प्रियंका, सानिया टाईमच्या जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये, मोदींना वगळल...
- ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क, दि. २२ - टाईम या मॅगझीनने काल रात्री उशीरा जाहीर केलेल्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये भारतातील बऱ्याच लोकांची वर्णी लागली आहे. यामध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा, रिजर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, सानिया मिर्झा, गुगलचे सीईओ सुंदर पिचई आणि फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बंसल यांचा समावेश आहे. विषशेष मह्णजे गेल्या वर्षी या यादीत स्थान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव मात्र यावेळी वगळण्यात आले आहे.
=========================================
महाराणी एलिझाबेथ यांचा ९० वा वाढदिवस उत्साहात
- लंडन : आतषबाजीसह बंदुकीच्या फैरी झाडून ब्रिटनने गुरुवारी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा ९० वा वाढदिवस साजरा केला. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी देश आणि राष्ट्रकुलची आधारशिला अशा शब्दांत महाराणींचा गौरव करत वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. महाराणींचे वारस प्रिन्स चार्लस् यांनी आपल्या आईसाठी एक संदेश ध्वनिमुद्रित केला. या संदेशात त्यांनी प्रख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या हेन्री ८ मधील एका संपादित उताऱ्याचे वाचन केले. कॅमेरून यांनी आपल्या संदेशात म्हटले की, महाराणी आमच्या जगातील काही अद्भुत अशा क्षणांत आमच्यासोबत आहेत. अगदी दुसऱ्या महायुद्धापासून १९६६ मध्ये इंग्लंडने वर्ल्डकप जिंकेपर्यंत किंवा त्यानंतर तीन वर्षांनी चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल पडेपर्यंतच्या अनेक घडामोडींच्या महाराणी साक्षीदार आहेत. संस्कृतीत स्थित्यंतरे झाली. राजकारणानेही अनेक चढ-उतार पाहिले. तथापि, महाराणी देशासाठी नेहमीच प्रेरणादायी व सामर्थ्यशाली आधारशिला राहिल्या. संसदेत महाराणींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे नेतृत्व कॅमेरून करणार आहेत.
=========================================
भारतीय मान्सूनचे भाकीत अधिक अचूक असणार
- बर्लिन : भारतात मान्सूनचे आगमन कधी होणार आणि तो निरोप कधी घेणार याचे भाकीत आता पूर्वीच्या पद्धतीपेक्षा अधिक अर्थपूर्णरीत्या करता येणार आहे. शास्त्रज्ञांनी ही नवी पद्धत विकसित केली असून, त्यामुळे भारतीय उपखंडातील शेती आणि जलविद्युत प्रकल्पांना पाणीपुरवठ्याचे जास्तीत जास्त चांगले नियोजन करतायेईल.ही नवी पद्धत विभागीय हवामानाच्या उपलब्ध माहितीच्या विश्लेषणावर आधारित आहे. संशोधक हीच पद्धत भारतीय हवामान विभागानेही अवलंबवावी, असे सांगतील. भारतीय उपखंडातील लोकसंख्येचे भरणपोषण करणाऱ्या लक्षावधी शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्यात जोरदार पाऊस पडणे खूप महत्त्वाचे आहे. पुढे होणाऱ्या हवामानातील बदलाचा मान्सूनच्या स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो व त्यामुळे नेमके भाकीत हे अधिक प्रासंगिकठरेल.‘भारतीय मान्सून कधी सुरू होणार याचे भाकीत आम्ही दोन आठवडे आणि तो कधी निरोप घेणार याचे भाकीत सहा आठवडे आधी करू शकतो. हे सगळेच जो शेतकरी रोज एकेक दिवस मोजतो आहे त्याच्यासाठी मोठे महत्त्वाचे आहे,’ असे व्हेरोनिका स्टोलबोवा यांनी म्हटले. स्टोलबोवा या जर्मनीतील पोट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट चेंज इम्पॅक्ट रिसर्चने केलेल्या या संशोधनाच्या प्रमुख आहेत.
=========================================
उत्तराखंड: केंद्र आता सर्वोच्च न्यायालयात
नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय रद्दबातल ठरविण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यासंदर्भात ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सरकारतर्फे याचिका दाखल केली.
या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रोहतगी यांनी केले. तसेच, उत्तराखंड विधानसभेतून निलंबित केलेल्या कॉंग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांनीही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मुख्यमंत्री हरीश रावत यांना 29 एप्रिल रोजी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यावेळी या बंडखोर आमदारांना मतदानास बंदी घालण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला होता. या आमदारांना उच्च न्यायालयानेही अपात्र ठरविले होते. या याचिकेवर 23 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
उत्तराखंड: केंद्र आता सर्वोच्च न्यायालयात
या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रोहतगी यांनी केले. तसेच, उत्तराखंड विधानसभेतून निलंबित केलेल्या कॉंग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांनीही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मुख्यमंत्री हरीश रावत यांना 29 एप्रिल रोजी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यावेळी या बंडखोर आमदारांना मतदानास बंदी घालण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेतला होता. या आमदारांना उच्च न्यायालयानेही अपात्र ठरविले होते. या याचिकेवर 23 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
=========================================
दक्षिण चीनी समुद्रात चीनचा आण्विक उर्जा प्रकल्प
बीजिंग : वादग्रस्त दक्षिण चीनी समुद्रामध्ये सामुद्रिक आण्विक उर्जा प्रकल्प उभारण्याची चीनची तयारी जवळपास पूर्णत्वास पोहोचली असल्याचा दावा येथील एका स्थानिक वृत्तपत्राने केला आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण चीनी समुद्रातील चीनच्या प्रकल्पांना ‘संरक्षण‘ देणे शक्य होईल, असेही त्यात नमूद केले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये चीनने दक्षिण चीनी समुद्रातील बेटे बळकावून तिथे लष्करी हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच, या बेटांवर मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधाही विकसित केल्या जात आहेत. चीनच्या दाव्यानुसार मात्र, या सर्व सुविधा मुख्यत्वे नागरी हेतूंसाठी आहेत. ‘द ग्लोबल टाईम्स‘ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, या भागातील आण्विक उर्जा प्रकल्पांमुळे दुर्गम भागातही उर्जा पोहोचविण्याचा उद्देश साध्य केला जाऊ शकतो. चीनचे लक्ष्य असलेल्या दक्षिण चीनी समुद्रामध्ये तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रचंड साठे असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच चीनने येथे पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ब्रुनेई, मलेशिया, फिलिपिन्स, तैवान आणि व्हिएतनाम या देशांचाही या भागावर अधिकार आहे.

दहावीच्या भूगोलात 55 चुका
दहावीच्या भूगोलात 55 चुका
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या भूगोल पाठ्यपुस्तकामागील शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे नाहीत. नव्या शैक्षणिक वर्षासाठी आलेल्या नव्या आवृत्तीत चुकांची पुनरावृत्ती झाली आहे. व्याकरणाच्या चुका, चुकीचे संदर्भ आणि नव्या चुका अशा एकूण 55 चुका या पुस्तकात आहेत.
नव्या आवृत्तीतही चुका
- पान क्र. 30 वर बिकानेर हा आशियातील सर्वांत मोठा लोकरीचा बाजार आहे असे म्हटले आहे; तर दुसऱ्या पानावर जगातील सर्वांत मोठा बाजार असल्याचे नमूद आहे.
- पान क्र. 30 वर भारतातील सर्वांत मोठे क्षारयुक्त सरोवर म्हणून सांभार सरोवरचा उल्लेख आहे; तर पान क्र. 75 वर हा मान चिलका सरोवरला देण्यात आला आहे.
- पान क्र. 41 वर गंगेच्या खोऱ्याची लांबी एक हजार 50 किलोमीटर आहे असे म्हटले आहे. याच पानावर अन्य ठिकाणी वरच्या खोऱ्याची लांबी 550 किलोमीटर; तर मधल्या खोऱ्याची लांबी 600 किलोमीटर दर्शवली आहे. त्यांची बेरीज एक हजार 150 किलोमीटर होते. शिवाय गंगेच्या खालच्या पात्राची लांबी दिलेली नाही.
- पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीर नकाशात स्वतंत्रपणे दर्शवले आहे. या भूभागाची लोकसंख्याही दिलेली नाही. मागील आवृत्तीमधील ही चूक नव्या आवृत्तीमध्येही कायमच आहे.
=========================================
'आयपीएल' आता देशाबाहेरच हलविण्यावर विचार
नवी दिल्ली : ऐनवेळी नियोजनात करावा लागणारा बदल, सतत बदलणारी सामन्याची ठिकाणे अशा अडचणींमुळे पुढील वर्षी ‘इंडियन प्रीमिअर लीग‘ देशाबाहेर खेळविण्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) गांभीर्याने विचार करत आहे. ‘बीसीसीआय‘चे सचिव अनुराग ठाकूर यांनी काल (गुरुवार) याबाबत संकेत दिले.
अनुराग ठाकूर म्हणाले, "‘बीसीसीआय‘ म्हणजे ‘पंचिंग बॅग‘ झाली आहे. ‘आयपीएल‘विरोधात दाखल होणाऱ्या जनहित याचिकांमुळे स्पर्धेचे मोठे नुकसान होत आहे. विमानाची तिकिटे रद्द करणे, इतर नियोजन रद्द करणे यातून ‘बीसीसीआय‘ आणि सहभागी संघांनाही तोटा सहन करावा लागत आहे. सतत काही ना काही अडथळे येतच आहेत. नियोजनाच्या दृष्टीने हे सर्व भयानक त्रासदायक आहे. यावर आम्हाला तोडगा काढायलाच हवा. त्यामुळे ‘आयपीएल-10‘साठी योग्य ठिकाण निवडण्यासाठी कार्यकारी समितीची बैठक लवकरच होईल.‘‘
यापूर्वी 2009 मध्ये देशात लोकसभा निवडणूक असल्याने त्या वर्षी ‘आयपीएल‘चे आयोजन दक्षिण आफ्रिकेमध्ये करण्यात आले होते.
'आयपीएल' आता देशाबाहेरच हलविण्यावर विचार
अनुराग ठाकूर म्हणाले, "‘बीसीसीआय‘ म्हणजे ‘पंचिंग बॅग‘ झाली आहे. ‘आयपीएल‘विरोधात दाखल होणाऱ्या जनहित याचिकांमुळे स्पर्धेचे मोठे नुकसान होत आहे. विमानाची तिकिटे रद्द करणे, इतर नियोजन रद्द करणे यातून ‘बीसीसीआय‘ आणि सहभागी संघांनाही तोटा सहन करावा लागत आहे. सतत काही ना काही अडथळे येतच आहेत. नियोजनाच्या दृष्टीने हे सर्व भयानक त्रासदायक आहे. यावर आम्हाला तोडगा काढायलाच हवा. त्यामुळे ‘आयपीएल-10‘साठी योग्य ठिकाण निवडण्यासाठी कार्यकारी समितीची बैठक लवकरच होईल.‘‘
यापूर्वी 2009 मध्ये देशात लोकसभा निवडणूक असल्याने त्या वर्षी ‘आयपीएल‘चे आयोजन दक्षिण आफ्रिकेमध्ये करण्यात आले होते.
=========================================
शिवसेनेची पाणीमाफियांना साथ: भाजपचा आरोप
शिवसेनेची पाणीमाफियांना साथ: भाजपचा आरोप
मुंबई : पाणीमाफियांचे पितळ उघडे केल्यानंतर महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृहनेत्या प्रशासनाला जाब विचारत नाहीत. त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक लागेबांधे आहेत, असे सांगत शिवसेनेची पाणीमाफियांना साथ असल्याचा अप्रत्यक्ष आरोप बुधवारी (ता. 20) भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला. त्यावर भाजपचे नगरसेवक इतके दिवस काय करत होते, असा प्रतिप्रश्न करीत शिवसेनेने हल्लाबोल केला. पाणीमाफियांबरोबरच त्यांना बेकायदा पाणी देणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सोमय्या यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली; परंतु त्यांनी केलेल्या आरोपांमुळे शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.
मुंबईत दररोज एक कोटी लिटर पाणी काळ्या बाजारात विकले जात आहे. बिल्डर, हॉटेलमालक आदींना चढ्या भावाने पाणी दिले जात आहेच; त्याचबरोबर योग्य पुरवठा होत नसलेल्या भागात एक ते दीड रुपया लिटरने नागरिकांना विकले जाते, असा आरोप सोमय्या यांनी केला. शंभर दिवसांत 48 हजार 180 टॅंकरने पाणीपुरवठा झाला आहे. त्यातील 20 ते 25 लाख लिटर पाणी बिल्डरना बेकायदा विकले असल्याचे पुरावे आयुक्तांना दिले असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासनही आयुक्तांनी दिले असल्याचे ते म्हणाले.
=========================================
केंद्राकडून दहा हजार टन डाळ बाजारात
केंद्राकडून दहा हजार टन डाळ बाजारात
नवी दिल्ली : डाळींचे दर पुन्हा एकदा कडाडल्यामुळे केंद्र सरकारचे धाबे दणाणले आहे. दर नियंत्रणासाठी केंद्राने बफर साठ्यातून दहा हजार टन डाळ (प्रामुख्याने तूर आणि उडीद) खुल्या बाजारात आणली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या डाळीचा विक्रीदर 120 रुपये प्रतिकिलो असेल. मंत्रिमंडळ सचिवांनी तातडीने या संदर्भात राज्यांना पत्र लिहून साठेबाजांविरुद्ध कारवाईचे आदेश दिल्याचे समजते.
डाळींच्या दरांवरून गेल्या वर्षी चांगलेच रणकंदन होऊन किफायतशीर दराने डाळ पुरवताना सरकारच्या तोंडाला अक्षरशः फेस आला होता. आधीच दुष्काळी परिस्थिती असताना पुन्हा डाळ महागाईचे संकट तोंड वर काढत आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी केंद्राने राज्य सरकारांना आपापल्या कार्यक्षेत्रात किती डाळसाठ्याची आवश्यकता आहे याची मागणी नोंदवावी, असे सांगितले होते. पाठोपाठ मंत्रिमंडळ सचिवांनीही राज्यांना पत्र लिहून साठेबाजांविरुद्ध कठोर कारवाईचे आणि साठवण मर्यादेच्या निर्बंधांचेही बारकाईने पालन केले जावे, असे आदेश दिले.
केंद्र सरकारने आज बफर स्टॉकमधील दहा हजार टन डाळ साठा खुला केला. यामध्ये तूर आणि उडीद डाळींचा प्रामुख्याने समावेश आहे. बफर स्टॉकसाठी खरेदी केलेले कडधान्य पूर्ण स्वरूपातील होते. मात्र, उपलब्ध करून देण्यात आलेला साठा मिलिंग ऑणि पॉलिश केलेला आहे, असे सांगण्यात आले. अर्थात, याचे दर किती असावेत याबाबत मतभिन्नता होती. परंतु, अधिक दर असल्यास स्वतः सरकारच डाळीच्या महागाईला हातभार लावत आहे, असे चित्र निर्माण होऊ नये म्हणून गेल्या वर्षीच्या म्हणजे 120 रुपये किलो दरानेच डाळीची विक्री करावी, असे ठरल्याचे समजते.
हरभरा, मसूरवर लक्ष
सरकारी यंत्रणांनी खरीप हंगामात 50 हजार टन डाळसाठा खरेदी केला असून, 25 हजार टन साठा आयातीचे करारही करण्यात आले आहेत. रब्बी हंगामातही डाळ खरेदी केली जाणार असून, बफर साठ्यामध्ये एक लाख टन हरभरा आणि मसूर डाळ खरेदीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
=========================================
आदिवासींनी साकारले 1100 एकरांचे जंगल
आदिवासींनी साकारले 1100 एकरांचे जंगल
बारामती - आज एकीकडे स्वतःला सुशिक्षित व श्रीमंत समजणारा माणूस जंगलतोड करून घर बांधतो आहे. डोंगर फोडून बंगले बांधतो आहे; तर दुसरीकडे जगात जंगल असेल तरच जल राहील, असे सांगत वसुंधरा वाचविण्याचा "पण‘ करीत एक "आदिवासी‘ युवक गेली दोन तपे अशिक्षित आदिवासींना एकत्र करून जल, जंगल, जमीन, जन आणि जनावरांची पंचसूत्री राबवतो आहे. त्यांच्या या कष्टाला फळ असे मिळाले, की तब्बल 1100 एकरांचे चंद्रकोरीसारखे जंगल त्याने नव्याने निर्माण केले आहे. खाण्याला मोताद असलेल्या आदिवासींच्या शेतात त्याने तांदळापासून ते द्राक्षे, स्ट्रॉबेरीपर्यंतची बागायती पिकेही पोचविली आहेत. गाव समृद्ध करणारे "चैतराम‘ आता राज्यातल्या इतर आदिवासी भागात बारीपाड्यासारखे 15 ते 20 "क्लस्टर‘ विकसित करण्यासाठी धडपड करतो आहे.
जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने धुळ्यापासून शंभर किलोमीटरवरच्या बारीपाड्याची आठवण आली नाही, तरच नवल. नुकत्याच बारामतीतल्या "चैत्रपालवी‘ कार्यशाळेत या गावच्या सुपुत्राची व कर्त्याकरवित्या "चैतराम पवार‘ यांची कहाणी राज्यातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांपर्यंत ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने पोचवली. या कार्यशाळेत चैतराम पवार यांनी आपल्या आयुष्याची गाथा विशद केली, तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी उठून चैतराम यांच्या व्रताला सलाम केला.
=========================================
अमेरिकेत बोगद्यात सापडले आठ टन अमली पदार्थ
सॅन दिएगो- अमेरिका आणि मेक्सिको दरम्यान अलीकडेच आढळून आलेल्या एका बोगद्यात बेकायदेशीररीत्या साठवलेले सुमारे आठ टन अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
या भागातून लाकडाचा व्यापार करण्यात येत असल्याची जाहिरात कॅलिफोर्नियात करण्यात येत होती. प्रत्यक्षात मात्र येथे अमली पदार्थांचा बेकायदेशीर साठा करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
सॅन दिएगो येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अर्धा मैल लांबीचा बोगदा सॅन दिएगोच्या दक्षिणेकडील तिजुआना प्रदेशातील एका घराला एका औद्योगिक भागाशी जोडतो. तिजुआना हे अमेरिकन पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असणारे शहर आहे.
या बोगद्यामध्ये रेल्वे मार्ग, प्रकाश व्यवस्था, तसेच स्वयंचलित जिन्याची (एलेव्हेटर) सोय करण्यात आली आहे. दहा व्यक्ती या एलेव्हेटरने जाऊ शकतात. अधिकाऱ्यांनी येथून एक टन कोकेन आणि सात टन गांजा जप्त केला आहे. कॅलिफोर्निया आणि मेक्सिको दरम्यानच्या सीमेवर अशा पद्धतीचा तेरावा छुपा अड्डा सापडला आहे.
अमेरिकेत बोगद्यात सापडले आठ टन अमली पदार्थ
या भागातून लाकडाचा व्यापार करण्यात येत असल्याची जाहिरात कॅलिफोर्नियात करण्यात येत होती. प्रत्यक्षात मात्र येथे अमली पदार्थांचा बेकायदेशीर साठा करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
सॅन दिएगो येथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अर्धा मैल लांबीचा बोगदा सॅन दिएगोच्या दक्षिणेकडील तिजुआना प्रदेशातील एका घराला एका औद्योगिक भागाशी जोडतो. तिजुआना हे अमेरिकन पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असणारे शहर आहे.
या बोगद्यामध्ये रेल्वे मार्ग, प्रकाश व्यवस्था, तसेच स्वयंचलित जिन्याची (एलेव्हेटर) सोय करण्यात आली आहे. दहा व्यक्ती या एलेव्हेटरने जाऊ शकतात. अधिकाऱ्यांनी येथून एक टन कोकेन आणि सात टन गांजा जप्त केला आहे. कॅलिफोर्निया आणि मेक्सिको दरम्यानच्या सीमेवर अशा पद्धतीचा तेरावा छुपा अड्डा सापडला आहे.
=========================================
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सने भारतीय चौक्यांवर आज (गुरुवार) गोळीबार केला.
या वेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना जोरदार उत्तर दिले. पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसलेल्या बिबट्यास पळवून लावण्यासाठी सैनिकांनी हा गोळीबार केल्याचे सांगण्यात आले. भारतीय अधिकाऱ्यांनीही यास दुजोरा दिला आहे.

No comments:
Post a Comment