Friday, 15 April 2016

नमस्कार लाईव्ह १५-०४-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- ब्रुसेल्स हल्ला: सुरक्षेतील त्रुटींमुळे मंत्र्यांचा राजीनामा 
२- मोदी आल्यापासून चर्चा थांबली- पाकिस्तान 
३- लंडन; मुलीचं नाव सायनाईड ठेवण्यास न्यायालयानं केली मनाई 
४- टोकियो; ...या बेटावर वन-वे तिकीट काढणं बेकायदेशीर 
५- वॉशिंग्टन; परिधान केलेले कपडे बनणार संगणक 
६- कुमामतो; जपानमध्ये भूकंपात 9 ठार; 800 जखमी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
७- पेट्रोल व डिझेल झाले स्वस्त 
८- दिल्लीत तंबाखू, गुटखा, पान मसाल्यावर बंदी 
९- कर्जबुडव्या विजय माल्यांचा पासपोर्ट रद्द 
१०- शेवटच्या श्वासापर्यंत कन्हैया आणि उमरला मारण्याचा करणार प्रयत्न - अमित जानी 
११- अपशब्द वापरणाऱ्यांना 'अनफॉलो' करा- केजरीवाल 
१२- पटना; पंतप्रधान देशासाठी अपशकुनी- लालूप्रसाद यादव 
१३- कन्हैया कुमारला धमकीचे पत्र; सुरक्षेत वाढ 
१४- श्रीमंत देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१५- लातूर; खडसेंच्या १५ मिनिटांच्या प्रवासासाठी १० हजार लिटर पाण्याची नासाडी 
१६- हेलिपॅडसाठी पाणी वापरल्याचं माहित नाही : खडसे 
१७- आता हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी तृप्ती देसाईंचे आंदोलन 
१८- त्र्यंबकच्या गर्भगृहात प्रवेशास मनाई 
१९- लातूरकरांना वाऱ्यावर सोडणार नाही : खडसे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- जळगाव; 'दारु कंपन्याना होणाऱ्या पाणीपुरवठ्याची चौकशी करा' - गिरीश महाजन 
२१- अमरावती; आमदार रवी राणा यांच्या कार्यालयाची तोडफोड 
२२- ...तर प्रवीण पोटेंच्या कानाखाली लगावेन : रवी राणा 
२३- वडाळा; अपघातानंतर ते दोघे 45 मिनिटं तडफडत होते, लोक मात्र बघत होते 
२४- बंगळूरू; आंब्याच्या रसातून विष देऊन आई-वडिलांनीच केली मुलीची हत्या 
२५- चाळीसगाव; गरीब बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया 
२६- मोहालीच्या पोलिस अधीक्षकांची संपत्ती 152 कोटी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- सिडनी; ऑस्ट्रेलियाच क्रिकेटपटू मिचेल स्टार्क विवाहबंधनात 
२८- 'माझ्यावर बंदी घालता येणार नाही', 'अंगुरी भाभी' उर्फ शिल्पा शिंदेचा दावा 
२९- भारतीय तरुण या गोष्टीसाठी वापरतात सर्वाधिक इंटरनेट 
३०- शिल्पा शिंदेची आर्टिस्ट असोसिएशन विरोधात तक्रार 
३१- क्रिकेट खेळण्यापेक्षाही अॅक्टिंग कठीण: सचिन तेंडुलकर 
३२- कॅटला करायचंय पॅचअप, रणबीरची ना-ना 
३३- प्रत्युषाने पालकांना दिले होते अडीच कोटी रुपये 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
प्रेमळ व सत्य बोलण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही.
(स्वप्नील तांबे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


==========================================

'दारु कंपन्याना होणाऱ्या पाणीपुरवठ्याची चौकशी करा'

'दारु कंपन्याना होणाऱ्या पाणीपुरवठ्याची चौकशी करा'
जळगाव: मराठवाड्यात घागरभर पाण्यासाठी लोकांची वणवण सुरु असताना दारु कारखान्यांसाठी होत असलेल्या भरमसाठ पाणी पुरवठ्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी दिले आहेत.

गिरीश महाजन आज जळगाव दौऱ्यावर असताना एबीपी माझाशी बोलत होते.

औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नांदेड या तीन जिल्ह्यात असलेल्या दारु कारखान्यांसाठी कोट्यवधी लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. जोवर पाऊस पडत नाही तोवर हा पाणीपुरवठा बंद केल्यास शेकडो गावं, वाड्यावस्त्यांची तहान भागेल असं शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे.

एका वर्षात मराठवाड्यात 27 कोटी लीटर बीअरचं उत्पादन होतं. एका लीटर बीअरसाठी 4 लिटर पाणी लागतं. आणि ही चैन दुष्काळात परवडण्यासारखी नाही. त्यामुळं सध्या दारुकंपन्यांना होत असलेला पाणीपुरवठा तातडीनं बंद करण्याची मागणी जोर धरतेय.

दरम्यान जोवर पाऊस पडत नाही, तोवर म्हणजेच पुढचे दोन महिने दारुच्या कारखान्यांना होणारा पाणीपुरवठा तातडीनं बंद करायला पाहिजे अशी भूमिका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घेतली आहे.
==========================================

हेलिपॅडसाठी पाणी वापरल्याचं माहित नाही : खडसे

हेलिपॅडसाठी पाणी वापरल्याचं माहित नाही : खडसे
लातूर :  महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या लातूर दौऱ्यावेळी 10 हजार लिटर पाण्याची नासाडी झाली. मात्र हेलिपॅडसाठी पाण्याचा वापर केल्याची काहीही माहिती नसल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

आज खडसेंचा लातूर दौरा नियोजित आहे. लातूरनंतर औसा तालुक्याच्या बेलकूंड गावाला ते भेट देणार आहेत. मात्र, याच बेलकूंडमध्ये हेलिपॅड उभारणीसाठी 10 हजार लिटर पाण्याची नासाडी केली.
==========================================

आमदार रवी राणा यांच्या कार्यालयाची तोडफोड

आमदार रवी राणा यांच्या कार्यालयाची तोडफोड
अमरावती : अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तोडफोड सुरु असताना पोलिस तिथे हजर असून कोणीही त्यांना जुमानलं नाही. पोलिसांसमोरच कार्यालयाच्या काचा फोडल्या आणि खुर्च्याही फेकल्या

दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप, आमदार रवी राणा यांनी केला आहे. अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटेंविरोधात केलेल्या विधानामुळे रवी राणांच्या ऑफिसची तोडफोड झाल्याचं म्हटलं जात आहे.

…तर प्रवीण पोटेंच्या कानाखाली लगावेन : रवी राणा

काय आहे वाद?
अमरावतीच्या भीमटेकडी परिसरात डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण नियोजित होतं. मात्र परवानगी मिळण्याआधीच 13 तारखेच्या मध्यरात्री आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी पुतळ्याचं अनावरण केलं. यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत रवी राणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अडथळा आणणारे प्रवीण पोटे यांच्या कानाखाली लगावेन, अशी धमकी दिली होती.

रवी राणा हे अमरावतीतील अपक्ष आमदार आहेत. तर प्रवीण पोटे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्रीही आहेत.
==========================================

ऑस्ट्रेलियाच क्रिकेटपटू मिचेल स्टार्क विवाहबंधनात

ऑस्ट्रेलियाच क्रिकेटपटू मिचेल स्टार्क विवाहबंधनात
सिडनी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि महिला संघाची यष्टीरक्षक एलिसा हिली लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. स्टार्क – हिलीचा  विवाहसोहळा शुक्रवारी संपन्न झाला.

दुखापतीमुळे यंदा स्टार्क टी 20 विश्वचषकात खेळू शकला नव्हता. याशिवाय यंदा आयपीएलमध्येही तो सहभागी झालेला नाही.

दुसरीकडे एलिसी हिलीनं महिलांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकाची फायनल गाठणाऱ्या ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

क्रिकेट हे एलिसाच्या रक्तातच आहे. तीचे वडील ग्रेग ऑस्ट्रेलियातले प्रथम श्रेणी क्रिकेटर होते, तर ऑस्ट्रेलियाचे महान यष्टीरक्षक इयन हिली हे एलिसाचे चुलते आहेत.

एलिसा आणि मिचेल यांची जुनी मैत्री आहे.  दोघेही आपआपल्या संघाकडून कसोटीतही खेळतात.
==========================================

अपघातानंतर ते दोघे 45 मिनिटं तडफडत होते, लोक मात्र बघत होते

अपघातानंतर ते दोघे 45 मिनिटं तडफडत होते, लोक मात्र बघत होते
मुंबई : मुंबईच्या वडाळा भागात दुचाकीचा अपघात होऊन दोन तरुण जबर जखमी झाले. अपघातानंतर तब्बल 45 मिनिटं या तरुणांनी मदतीची याचना केली. मात्र, एकही माणूस त्यांच्या मदतीला पुढे आला नाही. लोक सोडाच पण, रात्रपाळीला रस्त्यावर गस्त घालणारी मुंबई पोर्ट ट्रस्टची गाडी अपघातस्थळावरुन गेली. मात्र आमचं काम गस्त घालण्याचं आहे, असं सांगून तेही तिथून निघून गेले.

काही लोकांनी धाडस करत ४५ मिनिटांनंतर जखमी तरुणांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पोलिसही तिथे दाखल झाले. सध्या दोघांवर उपचार सुरु असले तरी त्यांची प्रकृती गंभीर आहे.

हे तरुण वडाळ्यावरुन जात असताना त्यांच्या बाईकचा अपघात झाला. दोन्ही तरुण वेदनेने तडफडत होते. त्यांचा आवाज ऐकून रस्त्यावरील काही लोक तिथे जमा झाले. त्यापैकी काहींनी याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्याचवेळी तिथून मुंबई पोर्ट ट्रस्टची गाडी जात होती. लोकांनी त्यांची मदत मागितली पण कर्मचाऱ्यांनी नकार दिला. हे पेट्रोलिंगची गाडी असल्याने आम्ही या तरुणांना रुग्णालयात घेऊन जाऊ शकत नाही, असं उत्तर त्यांनी दिलं.

नियम शिथिल, मात्र असंवेदनशीलता कायम
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, या हेतूनं अनेक नियम शिथील केले. अपघातग्रस्तांना नेणाऱ्या लोकांना कायद्याचा जाच होऊ नये, म्हणून त्यांच्या चौकशीचा आग्रह धरु नका, रुग्णालयाने पोलिसांची वाट न बघता उपचार सुरु करावेत, अशा अनेक नियमांचा त्यात सहभाग होता.

मात्र, वडाळ्यात घडलेल्या घटनेनंतर अपघातापेक्षा माणसांची असंवेदनशीलताच भीषण असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
==========================================

दिल्लीत तंबाखू, गुटखा, पान मसाल्यावर बंदी

दिल्लीत तंबाखू, गुटखा, पान मसाल्यावर बंदी
नवी दिल्ली : दिल्ली सरकारने तंबाखू, गुटखा ,पान मसाला, खैनी आणि जर्दाच्या खरेदी विक्री, आणि साठवणुकीवर एक वर्षांची बंदी घातली आहे. अन्न सुरक्षा विभागाने गुरुवारी यासंदर्भात सूचना जारी केली आहे.
या सूचनेनुसार सुट्ट्या तंबाकूच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.
तंबाखू, गुटखा, पान मसाल्याचं उत्पादन, साठवणूक, वितरण किंवा विक्री तसंच खरेदीवर एक वर्षांची बंदी असेल. या बंदीची अंमलबजावणी सुरु आहे की नाही, हे तपासण्यासाठी दिल्ली पोलिसांचं पथक आरोग्य विभागासह छापाही टाकू शकतात.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली सरकारने सप्टेंबर 2012 मध्ये बंदीची अध्यादेश जारी केला होता. मात्र त्यामध्ये गुटखा या शब्दाचा उल्लेख होता. त्यामुळे विक्रेते तंबाखूच्या  माध्मातून इतर उत्पादनांची विक्री करत होते.
मात्र आता दिल्ली सरकारने तंबाखूसह सगळ्या हानीकारक उत्पादनांवर बंदी घातली आहे.
==========================================

...तर प्रवीण पोटेंच्या कानाखाली लगावेन : रवी राणा

...तर प्रवीण पोटेंच्या कानाखाली लगावेन : रवी राणा
अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अडथळा आणणारे अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या कानाखाली लगावेन, अशी धमकी अपक्ष आमदार रवी राणा यांनी जाहीर सभेतच दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण प्रवीण पोटे यांनीच थांबवलं होतं, असा आरोप करत रवी राणा यांनी ही धमकी दिली.

अमरावतीच्या भीमटेकडी परिसरात डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण नियोजित होतं. मात्र परवानगी मिळण्याआधीच 13 तारखेच्या मध्यरात्री आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी पुतळ्याचं अनावरण केलं. यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत रवी राणा यांनी ही धमकी दिली.

रवी राणा हे अमरावतीतील अपक्ष आमदार आहेत. तर प्रवीण पोटे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्रीही आहेत.
==========================================

'माझ्यावर बंदी घालता येणार नाही', 'अंगुरी भाभी' उर्फ शिल्पा शिंदेचा दावा

'माझ्यावर बंदी घालता येणार नाही', 'अंगुरी भाभी' उर्फ शिल्पा शिंदेचा दावा
मुंबई: ‘भाभीजी घर पर हैं’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि मालिकेचा निर्माता बेनफेर कोहली यांच्यात दिवसेंदिवस वाद वाढतच आहे. त्यातच शिल्पावर आजीवन बंदी घालण्याच्याही काल बातम्या समोर येत होत्या.

बॅनच्या बातमीवर शिल्पा शिंदेचं म्हणणं आहे की, ‘सिन्टा मला काम करण्यापासून रोखू शकत नाही. आता हे प्रकरण कोर्टात आहे. मला शोच्या निर्मात्यांनी एक नोटीस धाडली आहे. ज्यांच मी उत्तर दिलं आहे.’

anguri-bhabhi8-775x400शिल्पा म्हणते की, ‘त्या लोकांनी मला कितीही घाबरविण्याचा प्रयत्न केला तरीही मी ही लढाई चालू ठेवेन.’

अंगुरी भाभीची भूमिका बरीच गाजते आहे. या शोचा टीआरपी देखील यांच्यामुळेच चांगला येतो आहे. शिल्पा चॅनलसोबत आणखी शो करीत होती. मात्र, तिला तसं करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. तेव्हापासून हा वाद सुरु झाला आहे.

चॅनल आणि प्रोडक्शन हाऊसकडून त्रास देण्यात येत असून धमक्याही दिल्या जात आहेत. जर तिने दुसऱ्या कोणत्या चॅनलसोबत काम केलं तर करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचा आरोप शिल्पानं केला आहे.
==========================================

भारतीय तरुण या गोष्टीसाठी वापरतात सर्वाधिक इंटरनेट

भारतीय तरुण या गोष्टीसाठी वापरतात सर्वाधिक इंटरनेट!
मुंबई: भारतातील नेटीझन्स इंटरनेटचा सर्वाधिक वापर कशासाठी करतात याबाबत नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. दिल्ली, मुंबई, बंगळुरु, जयपूर, अहमदाबाद आणि हैदराबाद यासारख्या सहा बड्या शहरातील तरुणांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला.

या सर्व्हेमधून सर्वांना चकीत करणारा निष्कर्ष समोर आला आहे. 98% तरुणाचं म्हणणं आहे की, ते इंटरनेटचा सर्वाधिक वापर हा ऑनलाइन शॉपिंगसाठी करतात. तर 96% सोशल नेटवर्किंगसाठी करतात.

18 ते 30 वयातील तरुणांना ऑनलाइन बिल भरणं पसंत आहे. दिल्ली आणि बंगळुरुमधील 81% तरुण ऑनलाईन बिल भरतात. तर मुंबईत 69% तरुण आपलं बिल ऑनलाईन भरतात.

ऑनलाइन शॉपिंगसाठी इंटरनेटचा सर्वाधिक वापर होतो कारण की, बऱ्याच ब्रँण्डेड वस्तूंवर बरचंस डिस्काउंट मिळतं. तसंच कॅशबॅक ऑफर, डिस्काउंट कूपन या देखील गोष्टी असतात.

सर्व्हेनुसार, एक भारतीय तरुण यापुढे वर्षभरात जवळजवळ 60% खर्च ऑनलाईन शॉपिंगवरच करेल असा अंदाज आहे.
==========================================

शिल्पा शिंदेची आर्टिस्ट असोसिएशन विरोधात तक्रार

शिल्पा शिंदेची आर्टिस्ट असोसिएशन विरोधात तक्रार
मुंबई : ‘भाभीजी घर पर है’ मधील अंगुरी भाभी उर्फ शिल्पा शिंदेने सिन्टा (सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) विरोधात मुंबईच्या बंगुरनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

मालिका मध्येच सोडल्याच्या कारणामुळे सिन्टा शिल्पा शिंदेवर आजीवन बंदी घालण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र मला काम करण्यापासून रोखण्याचा अधिकार सिन्टाला नाही, असं शिल्पा शिंदेंने तक्रार दाखल करण्यापूर्वी म्हटलं होतं. मला निर्मात्यांकडून सातत्याने त्रास होत आहे, असा आरोप शिल्पाने केला आहे.

एका इंग्लिश वृत्तपत्रानुसार मालिका मध्ये सोडणं आणि अनप्रोफेशनल वागणुकीविरोधात निर्माता बिनेफर कोहलीने शिल्पाविरोधात सिन्टाकडे तक्रार केली होती. त्यानंतर CINTAA ने शिल्पाविरोधात नॉन को-ऑपरेशन सर्क्युलर जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ आता तिच्यासोबत कोणत्याही चॅनल किंवा निर्मात्याला काम करण्याची परवानगी नसेल.
==========================================

क्रिकेट खेळण्यापेक्षाही अॅक्टिंग कठीण: सचिन तेंडुलकर

क्रिकेट खेळण्यापेक्षाही अॅक्टिंग कठीण: सचिन तेंडुलकर
मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिनच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचा टिझर लाँच, ‘सचिन- अ बिलीअन ड्रीम्स’ काल रिलीज करण्यात आला. त्यामुळे सचिनचा प्रवास पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येणार आहे.

क्रिकेटच्या मैदानात भल्याभल्या गोलंदाजांची भंबेरी उडवणाऱ्या सचिन तेंडुलकरची मात्र मोठ्या पडद्यावर एंट्री करताना बरीच दमछाक झाली. खुद्द सचिननंच याबाबत सांगितलं. जगातील वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा करण्यापेक्षाही कॅमेरा समोर काम करणं कठीणं आहे. असं सचिन म्हणाला.

‘आजवर मी जे काम करायचो ते कॅमेरा शूट करायचं. पण आता मला अचानक सांगण्यात आलं की, तुम्ही हे (अभिनय) करा आणि ते शूट केलं जाईल. जे माझ्यासाठी फारच कठीण होतं.’ असं सचिन म्हणाला.

क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर अभिनयात पदार्पण करणारा  सचिन म्हणतो की, ‘क्रिकेट खेळण्यापेक्षा अभिनय करणं फारच कठीण आहे. मी याविषयी कधी विचारही केला नव्हता.’
==========================================

पेट्रोल व डिझेल झाले स्वस्त

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. १५ - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने होणारी घट भारतासाठी दिलासा देणारी ठरली आहे. पेट्रोलची किमत प्रति लिटर ७४ पैशांनी तर डिझेलची किंमत प्रति लिटर १ रुपया ३० पैशांनी कमी करण्यात आली आहे. नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. 
    मुंबईमध्ये  पेट्रोलची किमत प्रति लिटर ६९.३८ रुपये तर डिझेल ५५.८० रुपये प्रतिलिडर मिळेल.
    तेल कंपन्या १५ दिवसातून एकदा पेट्रोल व डिझेलच्या किमतीची समीक्षा करतात, ज्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाचे दर आणि घरगुती पातळीवरील चलन विनिमय दर विचारात घेण्यात येत असतो. याच आधारावर इंधनदरात कपात व वाढ याबाबत निर्णय घेण्यात येतो.
    दहा दिवसांपूर्वीच म्हणजेच ५ एप्रिललाच पेट्रोल प्रति लिटर २.१९ रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर ९८ पैशांनी महागलं होतं. त्या तुलनेत इंधनाच्या दरात झालेली कपात खूपच कमी आहे.
==========================================

खडसेंच्या १५ मिनिटांच्या प्रवासासाठी १० हजार लिटर पाण्याची नासाडी

  • ऑनलाइन लोकमत
    लातूर, दि. १५ -  मराठवड्यातील भीषण दुष्काळामुळे एकीकडे लातूरला रेल्वेने पाणी देण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी मात्र बिनधास्तपणे पाण्याची उधळपट्टी करत आहेत.राज्याचे कृषीमंत्री एकनाथ खडसे आज लातूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या लातूर दौऱ्यासाठी तब्बल १० हजार लिटर पाण्याची नासाडी झाली आहे.
    लातूरनंतर औसा तालुक्याच्या बेलकूंड गावाला ते भेट देणार आहेत. मात्र, याच बेलकूंडमध्ये हेलिपॅड उभारणीसाठी १० हजार लिटर पाण्याची फवारणी करण्यात आली आहे.
    लातूर शहरापासून बेलकूंड हे गाव अवघं ४० किलोमीटर लांब आहे. मात्र, खडसेंनी वाहनानं प्रवास न करता १५ मिनिटांच्या या प्रवासासाठी हेलिकॉप्टरनेच जाणं पसंत केलं. परंतु खडसेंच्या या हवाई हौसेसाठी तब्बल १० लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली. लातूरमध्ये भीषण पाणी टंचाई असल्याने सांगलीच्या मिरजमधून दररोज रेल्वेद्वारे १० वॅगन पाणी पोहोचवलं जात आहे.
    दरम्यान, काही दिवसांपूर्वीच काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसासाठी दोन हजार लिटर पाणी वापल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. परंतु आता त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री एकनाथ खडसे यांच्या फक्त हवाई हौसेसाठी १० हजार लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली आहे.
==========================================

कर्जबुडव्या विजय माल्यांचा पासपोर्ट रद्द

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १५ - बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बूडवून देशाबाहेर पळालेले विजय माल्या यांचा भारतीय पासपोर्ट सरकारने अखेर रद्द केला आहे. तीनवेळा समन्स बजावूनही विजय माल्या हजर न झाल्यामुळे सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) आता दिल्लीतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला त्यांचा पासपोर्ट रद्द किंवा हस्तगत करावा, असे कळविले होते. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून आता माल्यांवर मायदेशी परतण्याचा दबाव निर्माणहोईल, असा ईडीचा होरा आहे.
    ‘युबी ग्रुप’चे माजी अध्यक्ष माल्या हे सध्या परदेशात आहेत. पासपोर्ट रद्द झाल्यामुळे परदेशातील त्यांचे वास्तव्य बेकायदा ठरून त्यांना मायदेशी परतणे भाग पडेल, असे मत ‘ईडी’तील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना नोंदवले होते. 
    दरम्यान ईडीने मल्ल्यांविरुद्ध उचललेले हे पहिले पाऊल असून त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटकवॉरंट काढण्यासाठी ईडी लवकरच न्यायालयातही धाव घेणार आहे.
    ईडीने मल्ल्यांना बजावलेल्या तिसऱ्या समन्समध्ये नऊ एप्रिलला चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले होते. मात्र, मल्ल्या हजर झाले नाहीत. ईडी ९०० कोटी रूपयांच्या आयडीबीआय कर्ज घोटाळ््याचा तपास करीत आहे. मल्ल्यांचा पासपोर्ट रद्द करावा, असे आम्ही पासपोर्ट प्रशासनाला लिहिले असून अजामीनपात्र अटक वॉरंटसाठी न्यायालयात कधी जायचे याचाही आम्ही लवकरच निर्णय घेणार आहोत, असे वरिष्ठ ईडी अधिकाऱ्याने सांगितले.
==========================================

कॅटला करायचंय पॅचअप, रणबीरची ना-ना

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १५ - बॉलिवूडमधील क्युट कपल रणबीर-कतरिनाच्या ब्रेकअपमुळे त्यांचे चाहते खूप दुखावले असून त्या दोघांनी परत यावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र या दोघांचेही मार्ग आता वेगळे झाल्याचे दिसत आहे. दरम्यान कतरिना कैफ अद्यापही रणबीरच्या प्रेमात असून तिला त्याच्याशी पॅचअप करण्याची इच्छा आहे, रणबीर मात्र पॅचअपच्या मूडमध्ये नसून आपण यातून बाहेर पडल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, एका मैत्रिणीच्या पार्टीत रणबीर व कतरिना दोघेही पण स्वतंत्ररित्या उपस्थित होते. थोडा वेळ मित्रांसोबत घालवल्यानंतर कतरिनाने रणबीरजवळ जाऊन त्याच्याशी खासगीत बोलण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र रणबीरने त्यास स्पष्टपणे नकार देत जे काही बोलायचे असेल ते सर्वांसमोर बोल, असे तिला सांगितले.
    रणबीरच्या वर्तनामुळे दुखावल्यानंतरही कतरिनाने त्याला सर्वांसमोरच पुन्हा एकत्र येण्याविषयी विचारणा केली असता, रणबीरने त्यालाही नकार दर्शवला. ' माझ्यासाठी हे नातं संपलं आहे. मी या नात्यातून बाहेर पडलो आहे आणि तूही तसंच करावं असं मला वाटतं' अशा स्पष्ट शब्दात रणबीरने तिचा प्रस्ताव धुडकावून लावला.
    सर्वांसमोर झालेला अपमान आणि परत एकत्र येण्याची उरलीसुरली आशाही संपुष्टात आल्याने कतरिना अतिशय दुखावली गेली असून पार्टीतील उपस्थितांनाही रणबीरच्या या वर्तनामुळे धक्का बसला.
==========================================

आता हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी तृप्ती देसाईंचे आंदोलन

  • कोल्हापूर, दि.१५ - शनी शिंगणापूरची लढाई जिंकल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आता हाजीअली दर्गा आणि शबरीमाला मंदिरात प्रवेशासाठी आंदोलन छेडणार असल्याचे म्हटले आहे.  आता त्र्यंबकेश्वर, शबरीमाला आणि मुुंबईतील हाजी अली दर्ग्यातील प्रवेशासाठी आंदोलन केले जाणार आहे. हाजी अली दर्ग्यातील प्रवेशाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यावर राज्य सरकारने आपले म्हणणे मांडले आहे. येथील प्रवेशाच्या मुद्द्याबाबत काही मुस्लीम महिला संघटना मला भेटल्या आहेत. मुंबईत पुढील आठवड्यात त्यांची बैठक घेऊन आंदोलनाची रणनीती ठरविणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले.
    ‘अंबाबाई देवीच्या मंदिरातील बुधवारची स्थिती पाहता, हिंदुत्ववादी संघटनांनी माझ्या हत्येचा कट रचला होता. मंदिरातील गाभारा प्रवेशावेळी माझ्यावर हल्ला झाला. सीसीटीव्ही फुटेज पाहून संबंधित हल्ला करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा माझाही दाभोलकर, पानसरे यांच्याप्रमाणे खून होईल,’ अशी भीती भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली. पूर्ण स्थिती माहीत असूनही बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अन्यथा मंत्रालयात या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
    अंबाबाईच्या मंदिरातील गाभारा प्रवेशावेळी बुधवारी रात्री देसाई यांना विरोधी महिलांनी मारहाण केली होती. त्यानंतर, त्यांना रात्री उशिरा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गुरुवारी दुपारी पुण्याकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
    देसाई म्हणाल्या, ‘अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येत असल्याची पूर्वकल्पना पोलीस, प्रशासनाला दिली होती. तरीही पोलिसांनी १४४ कलम लावून माझ्यासमवेत आलेल्या काही महिलांना ताब्यात घेतले. मंदिरात मला विरोध करणारे बघितल्यानंतर, १४४ कलम केवळ भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनाच लागू होते का? असा प्रश्न निर्माण होतो. मंदिरात गेल्यानंतर पोलीस असतानाही माझ्यावर हल्ला झाला. त्यात गळा दाबला, कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला. या वेळी पोलिसांचे नियोजन चुकीचे होते. शिवाय, ते बघ्याची भूमिका घेतात हे आश्चर्यकारक आहे.
==========================================

त्र्यंबकच्या गर्भगृहात प्रवेशास मनाई

  • गुन्हा दाखल : स्वराज्य महिला संघटनेची पोलिसात तक्रार
    ऑनलाइन लोकमत
    त्र्यंबकेश्वर, दि. १५ - त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात जाऊन दर्शन करण्यास मज्जाव केल्याप्रकरणी स्वराज्य महिला संघटनेच्यावतीने पुरोहित, ग्रामस्थ अशा २००-२५० जणांविरूद्ध त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मंदिरातील गर्भगृहाच्या प्रवेशासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, मात्र आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला तसेच धक्काबुक्कीही करण्यात आल्याचा आरोप स्वराज्य महिला संघटनेच्या अध्यक्ष वनिता गुट्टे यांनी केला आहे.
==========================================

शेवटच्या श्वासापर्यंत कन्हैया आणि उमरला मारण्याचा करणार प्रयत्न - अमित जानी

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. १५ - शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत जेएनयू नेताकन्हैया कुमार आणि उमर खालिद यांना मारण्याचा प्रयत्न करू अशी धमकी उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे नेते अमित जानी यांनी व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान जेएनयू कँपसमध्ये जाणा-या बसमध्ये हत्यारे व धमकीचे पत्र मिळाल्यानंतर पोलिसांनी कन्हैया व उमर यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. तर या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि धमकीनंतर अमित जानी याने फोन बंद केला असून तो गायब झाला आहे. 
    जेएनयू येथून आयएसबीटी येथे जाणा-या एका बसमध्ये पोलिसांना एका बॅगमध्ये एक पत्र तसेच गावठी रिव्हॉल्व्हर आणि काही गोळ्या सापडल्या. त्या पत्रात कन्हैया व उमरचे मुंडके उडवण्याची धमकी दिली होती व त्यावर अमित जानी याची सही होती' अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर कन्हैया व उमरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून ते पत्र चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. 
    दरम्यान अमित जानी याने यापूर्वीही कन्हैया व उमर याला ठार मारण्याची धमकी दिली होती.
==========================================

आंब्याच्या रसातून विष देऊन आई-वडिलांनीच केली मुलीची हत्या

  • ऑनलाइन लोकमत
    बंगळुरू, दि. १५ - इतर जातीतील मुलाशी असलेल्या प्रेमसंबंधामुळे चिडलेल्या पालकांनी पोटच्या पोरीचीच आंब्याच्या रसातून विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधील नांजनगुड येथे घडली आहे. 
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैसूरपासून सुमारे ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या नांजनगुड येथे राहणारी मधुकुमारी ही २१ वर्षीय तरूणी एक दलित मुलगा, जयरामच्या प्रेमात पडली होती. मात्र तिच्या आई-वडिलांना ही बाब पसंत नव्हती. त्यामुळे सोमवारी त्यांनी मधुकुमारीला आंब्याच्या रसात विष घालून दिले आणि तो पिताच तिला अस्वस्थ वाटू लागले. मात्र कोणीच तिच्या मदतीला धावून आले नाही वा डॉक्टरांनाही बोलावण्यात आले नाही. थोड्याच वेळात मधुकुमारीचा तडफडून मृत्यू झाला.
    याप्रकरणी पोलिसांनी मधुकुमारीची आई मंजुळा (४८), वडील गुरुमपल्ला (६४) आणि भाऊ गुरूप्रसाद (२६) यांना अटक केली असून ज्या भांड्यातून विषमिश्रीत ज्यूस देण्यात आला तोही जप्त करण्यात आला आहे. तसेच मधुकुमारीची काही पत्रेही पोलिसांना मिळाली असून, त्यामध्ये तिने स्वत:च्या जीवाला धोका असल्याची भीती वर्तवली होती.
    दरम्यान पोलिसांनी जयरामला सुरक्षाही पुरवली असून मधुकुमारीच्या पालकांविरोधात हत्या व पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
==========================================

मुलीचं नाव सायनाईड ठेवण्यास न्यायालयानं केली मनाई

  • ऑनलाइन लोकमत
    लंडन, दि. 15 - एका महिलेनं आपल्या मुलीचं नाव सायनाईड (विष) असं ठेवण्याचा बेत आखला परंतु तिला तसं करण्यास न्यायालयानं बंदी घातल्याची घटना येथे  घडली आहे. या महिलेला जुळी मुलं झाली. तिनं मुलाचं नाव प्रीचर ठेवलं आणि मुलीचं सायनाईड. सायनाईड हे किती गोड आणि छान नाव आहे, अशी तिची प्रतिक्रिया होती. हिटलरनं गोळी झाडून घेत आत्महत्या करण्यापूर्वी सायनाईड हे विष प्राशन केलं होतं.
    ज्यावेळी परिसरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांना असं नाव ठेवण्यात येत असल्याची कल्पना आली त्यावेळी त्यांनी कोर्टाला याची कल्पना दिली. अशी जगावेगळी नावं मुलांची ठेवली तर त्यांच्यावर दुष्परिणाम होतील असं सांगत कोर्टानं सायनाईड हे नाव ठेवण्यास मनाई केली. 
    या महिलेला याआधी मानसिक आजारानं ग्रासलं होतं, तसंच ती मद्यसेवनाच्या आहारीही गेली होती, असं कोर्टाच्या निदर्शनास यावेळी आणण्यात आलं. 
    या महिलेच्या वकिलांनी मुलांची नावं निवडण्याचा अधिकार महिलेचा असल्याचा युक्तिवाद केला. परंतु न्यायाधीशांनी अशा जालीम विषाचं नाव मुलीसाठी निवडणं कधीही मान्य होणार नाही असा निकाल दिला. 
    हिटलर आणि गोबेल्ससारख्यांचा सायनाईडनं घेतला, जी चांगली गोष्ट आहे, त्यामुळे मुलीचं नाव सायनाईड ठेवावं असंही या महिलेनं सांगून बघितलं.
    परंतु, परिस्थितीनुसार आवडीनिवडी बदलतात, नावं बदलतात, फॅशन आणि विचार बदलतात, तरीही लहान मुलीचं असं नाव ठेवणं गैर असल्याचं मत न्यायाधीशांनी नोंदवलं आहे.
==========================================

...या बेटावर वन-वे तिकीट काढणं बेकायदेशीर

  • ऑनलाइन लोकमत - 
    टोकियो, दि. १५ - जपानच्या आयलँड इजु ओशिमामध्ये असणा-या माउंट मिहारा येथे तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला परतीचं तिकीट काढणं सक्तीचं आहे. जर का तुम्ही वन-वे तिकीट काढलं तर ते बेकायदेशीर आहे. ऐकून आश्चर्य वाटत असेल पण हे खरं आहे. त्यामागचं कारणही तितकच भयानक आहे. 
    जगातील काही जागा सुसाईड पॉईंट म्हणून ओळखल्या जातात ज्यामध्ये माउंट मिहाराचादेखील समावेश आहे. माउंट मिहारा येथे ज्वालामुखी आहे. या ज्वालामुखीत उडी मारुन लोक आत्महत्या करतात, त्यामुळेच वन-वे तिकीट दिलं जात नाही. विश्वास बसणार नाही पण 1993 मध्ये 944 लोकांनी ज्वालामुखीत उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर माउंट मिहारामध्ये 350पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केली आहे. येथे फिरण्यासाठी येणारे अनेक लोक या धगधगत्या ज्वालामुखीमध्ये उडी मारुन आत्महत्या करतात. त्यामुळे याठिकाणी जाणा-या पर्यटकांना वन-वे तिकीट देण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
==========================================
लातूरकरांना वाऱ्यावर सोडणार नाही : खडसे
लातूर : लातूरची पाणी समस्या गंभीर असून, या प्रश्‍नावर लातूरकरांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज स्पष्ट केले. खडसे यांनी पाणीप्रश्‍नाबाबत आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

लातुरातील पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी उजनी, माजलगावातून योजना राबविण्यावर भर देणार आहोत. या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे ते म्हणाले. लातूर आणि मिरज रेल्वेस्थानक परिसरात पाणीपुरवठा अधिक प्रभावी होण्यासाठीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या पाण्यासाठीचा खर्च रेल्वे मंत्रालय उचलणार असल्याने राज्य शासनावर बोजा पडणार नाही अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, पालकमंत्री पंकजा मुंडे या शनिवारी लातूर दौऱ्यावर येणार असून, त्या रेल्वेस्थानक परिसरात सुरू असलेल्या पाणी वितरण व्यवस्थेची पाहणी करतील.
==========================================
अपशब्द वापरणाऱ्यांना 'अनफॉलो' करा- केजरीवाल
नवी दिल्ली- सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या ट्‌विटरवरून अपशब्द वापरणाऱ्यांना ‘अनफॉलो‘ करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर पाच मागण्या ठेवण्यात आल्या असून त्यांनी त्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (शुक्रवार) केली आहे. 

पंतप्रधानांनी पुढील पाच मागण्यांचे पालन केल्यास देशासाठी मोठे बक्षीस ठरेल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. रोहित वेमुलापासून ते उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीपर्यंतचे मुद्दे केजरीवाल यांनी उपस्थित केले आहेत. 

केजरीवाल यांनी उपस्थित केलेले मुद्दे पुढीलप्रमाणे- 
1) ट्‌विटरवर मुली, बहिणी व मातांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना अनफॉलो करा. 
2) हैदराबाद येथील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करून रोहितला न्याय द्यावा. 
3) राज्यांच्या निवडणुका प्रामाणीकपणे लढवाव्यात. 
4) दिल्लीतील नागरिक दिल्ली सरकारवर खूष असल्याने दिल्ली सरकारला काम करू द्यावे. 
5) भारत माता की जय न बोलणाऱयांना व खाण्याच्या मुद्यावरून मारहाण करणाऱ्यांना कारागृहात टाकावे.
==========================================
ब्रुसेल्स हल्ला: सुरक्षेतील त्रुटींमुळे मंत्र्यांचा राजीनामा
ब्रुसेल्स : बेल्जियममधील विमानतळांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवरील परखड मत असलेली गोपनीय कागदपत्रे समोर आल्यानंतर बेल्जियमच्या वाहतूक मंत्र्यांनी आज (शुक्रवार) राजीनामा दिला. 22 मार्च रोजी ब्रुसेल्स येथील विमानतळावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 32 जण मृत्युमुखी पडले होते. 

बेल्जियमच्या विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा गेल्या वर्षी घेण्यात आला होता. त्यामध्ये या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवरही बोट ठेवण्यात आले होते. शिवाय, विमानतळांवरील तपासणीच्या पद्धतीमध्येही गंभीर त्रुटी असल्याचे आढळले होते. या सर्वांचा उल्लेख असलेली गोपनीय कागदपत्रे बेल्जियममधील दोन विरोधी पक्षांनी प्रसिद्ध केली. यानंतर बेल्जियमचे वाहतूक मंत्री जॅकलिन गॅलंट यांनी राजीनामा दिला. 

बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांनी वाहतूक मंत्र्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. ‘वाहतूक मंत्री जॅकलिन गॅलंट यांनी पदाचा राजीनामा दिला आहे आणि तो मान्यही झाला आहे,‘ असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 
==========================================
मोदी आल्यापासून चर्चा थांबली- पाकिस्तान
न्यूयॉर्क - पाकिस्तानसोबतची चर्चा पूर्ववत सुरु ठेवण्यासाठी भारत पुढाकार घेत नसून भारताच्या या दृष्टिकोनामुळे दोन्ही देशांतील परस्पर संबंधामध्ये अडथळे निर्माण होत आहेत, असा आरोप संयुक्त राष्ट्रसंघातील पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्याने केला आहे. तसेच भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार आल्यापासून चर्चेची प्रक्रिया थांबल्याचा आरोपही पाकिस्तानने केला आहे. 

संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मलिहा लोधी संयुक्त राष्ट्राच्या लष्करी महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. त्या म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर दोन्ही देशातील संबंधांमध्ये सकारात्मक सुरुवात होण्याऐवजी स्वीकार करता येणार नाहीत अशा अटी लादल्याने दोन्ही देशातील चर्चा स्थगित झाली आहे. अद्यापही भारताने ही चर्चा सुरु ठेवण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. भारताचा हा दृष्टिकोन दोन्ही देशांतील संबंधांमध्ये अडथळा ठरत आहे.‘ 

दहशतवादाविरुद्ध लढा देणे, देशाचा आर्थिक विकास, शेजारी देशांशी मैत्रिपूर्ण संबंध निर्माण करणे या बाबींना पाकिस्तानच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमाचे विषय आहेत. यासह अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करणे तसेच भारतासोबत चांगले संबंध निर्माण करणे या बाबींचाही त्यामध्ये समावेश असल्याचेही लोधी म्हणाले.
==========================================
प्रत्युषाने पालकांना दिले होते अडीच कोटी रुपये
मुंबई- प्रत्युषा बॅनर्जी खून प्रकरणात एकामागून एक गौप्यस्फोट होत आहेत. प्रत्युषाने तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंह आणि तिच्या पालकांच्या खात्यात अनेकवेळा लाखो रुपये जमा केल्याचे निदर्शनास आले आहे. 

पोलिसांनी या प्रकरणाबाबत खुलासा करताना सांगितले की, मागील चार वर्षांपासून प्रत्युषाने आपल्या कुटुंबीयांच्या खात्यावर सुमारे अडीच कोटी रुपये जमा केले होते. त्याचप्रमाणे प्रत्युषाने तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंह याच्या खात्यावर 35 लाख रुपये जमा केले होते. 
पैशांच्या या व्यवहारासंदर्भात पोलिसांनी प्रत्युषाच्या पालकांकडे चौकशी केली असता ते याबाबत काही उत्तर देऊ शकले नाहीत.

डिप्रेशन...
प्रत्युषाचा बॉयफ्रेंड आणि तिचे पालक तिच्याकडे वारंवार पैशांची मागणी करीत होते, असेही आता उघडकीस आले आहे. त्यामुळे प्रत्युषा ही डिप्रेशनमध्ये गेली होती. परिणामतः प्रत्युषाने आपल्या पालकांशी बोलणेही बंद केले होते. 
==========================================
गरीब बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया
वरखेडे (ता. चाळीसगाव) - घरात अठरा विश्‍व दारिद्रयामुळे मुले काय खातात, कशाशी खेळतात याकडे लक्ष देण्यास पालकांना वेळ नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या विकून दिवस पार केला जातो. अशा कुंटुबातील दहा वर्षाच्या बालकाला हृदयाचा विकार जडतो. शासकीय यंत्रणा, सवेदनशील पत्रकार आणि कर्तव्याची जाण असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समन्वयातून या बालकावर आज सकाळी मुंबईतील ज्युपिटर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाली. हा बालक लवकरच आपल्या घरी सुखरूप परत येणार आहे. 

याबाबत माहिती अशी, येथील रहिवासी आनंदा अल्हाट हे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर प्लॅस्टिकचा कचरा वेचून आपला उदरनिर्वाह करतात. मुलांचे चांगले पोषण करण्याइतकी ऐपत नसल्याने त्यांनी आपल्या दहा वर्षांच्या प्रवीण या मुलाला गावातील उदेसिंगअण्णा पवार सर्वोदय आश्रमशाळेत तिसरीच्या वर्गात दाखल केले आहे. शाळेत बालसंस्कार कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका राठोड यांना प्रवीणला हृदयाचा विकार जडल्याची शंका आली. त्यांनी त्याला पुढील तपासणीसाठी जळगावला नेले. त्यात प्रवीणला हृदयाचा विकार जडल्याचे निष्पन्न झाले व त्याच्यावर मुंबईत शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. मात्र, आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची व घरात अज्ञान असल्याने आल्हाट कुटुंबीयांकडे कुठलीच कागदपत्रे नव्हती. प्रवीणची शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी योजनेतून करण्याचे ठरले असले, तरी कागदपत्रांच्या अभावी अनेक अडचणी येत होत्या. 
==========================================
परिधान केलेले कपडे बनणार संगणक
वॉशिंग्टन डी सी - माहिती तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार लवकरच प्रत्यक्षात उतरणार असून शरीरावर परिधान केलेले कपडे संगणकाची भूमिका पार पाडणार आहेत. याबाबत सुरु असलेल्या संशोधनाबाबत संशोधकांनी माहिती दिली आहे. 

कोलंबसमधील ओहायो विद्यापीठातील संशोधकांनी एक गट या विषयावर संशोधन करत आहे. या बाबतचा लेख एका नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला आहे. शरीरावर परिधान केलेल्या कपड्यांनी स्मार्ट फोन किंवा टॅब्लेटसाठी अँटिनाची भूमिका पार पाडावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याशिवाय शरीरावरील विविध अवयवांची सक्रियता, खेळाडूंच्या शरीरातील फीटनेसची पातळी तपासण्यासाठीची आवश्‍यक माहिती आदींबाबत हे कपडे माहिती देऊ शकतील. त्यासाठी कपड्यांमध्ये 0.1 मिलिमीटरचे इलेक्‍ट्रानिक सर्किट बसविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. "या संशोधनामुळे टेक्‍सटाईल उद्योगात मोठी क्रांती होईल. या कपड्यांचा संवादासाठी तसेच आरोग्याबाबतची माहिती मिळविण्यासाठी उपयोग होऊ शकेल, अशी आम्हाला आशा आहे‘, अशी माहिती या संशोधक असिमीना किओर्ती यांनी दिली.
==========================================
पंतप्रधान देशासाठी अपशकुनी- लालूप्रसाद यादव
पाटणा- नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान होताच नागरिकांचा अकाली मृत्यू, पूर व दुष्काळसारखे संकट येत आहे. यामुळे मोदी हे देशासाठी अपशकुनी पंतप्रधान आहेत, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय जनता दलाच्या मुख्यालयात आज (शुक्रवार) एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना लालूप्रसाद यादव म्हणाले, ‘बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यात केलेली दारूबंदी हा क्रांतिकारी निर्णय आहे. बिहारमधील नागरिकांनी दूध, दही खाऊन यादवांचे गुण गावे व दारूला पळवावे.‘ 

योगगुरू रामदेवबाबा यांच्यावर टीका करताना लालूप्रसाद यादव म्हणाले, ‘हाय-फाय साधू-संत असणाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करायला हवी. रामदेवबाबा यापूर्वी मुलायमसिंह यांचे गुण गात होते आता ते नरेंद्र मोदी व भाजपकडे गेले आहेत.‘
==========================================
जपानमध्ये भूकंपात 9 ठार; 800 जखमी
कुमामातो (जपान)- दक्षिण जपानमध्ये झालेल्या भूकंपामध्ये किमान नऊजण मृत्युमुखी पडले आहेत, तर 800 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.5 एवढी असून, यामध्ये अनेक घरे कोलमडली आहेत. तसेच, रस्ते उखडले गेले आहेत, असे जपान सरकारच्या प्रमुख प्रवक्त्याने सांगितले. 

राजधानी टोकियोपासून नैऋत्येला 1300 किलोमीटर अंतरावर भूकंप झालेल्या प्रदेशाला भेट देऊन तेथील नुकसानीची पाहणी करून अंदाज घेणार असल्याचे जपान मंत्रिमंडळाचे मुख्य सचिव योशिशिदे सुगा यांनी सांगितले. 
आपत्तीग्रस्त भागात सुमारे 1600 सैनिक तैनात करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच, सैनिकांकडून हजारो आपत्तीग्रस्त लोकांना गोधड्या व कपड्यांचे वाटप करण्यात येत असल्याचे जपानी वृत्तवाहिन्यांनी दाखविले. घरे उद्ध्वस्त झाल्याने अनेक लोक असुरक्षित झाले आहेत, त्यांनी मिळेल तिथे आसरा घेतला आहे. काही लोक सकाळी घरी परतले, तर सुमारे 44 हजार लोकांनी सरकारकडे आश्रयाची मागणी केली आहे.
==========================================
मोहालीच्या पोलिस अधीक्षकांची संपत्ती 152 कोटी
मोहाली- पंजाब पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधीक्षक गुरप्रीत सिंग भुल्लर यांची संपत्ती तब्बल 152 कोटी रुपये एवढी आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या यादीद्वारे पुढे आली आहे. 

पंजाब कॉंग्रेसचे आमदार केवल धिलॉंन व करण कौर ब्रार हे विधानसभेतील दोन श्रीमंत आमदार आहेत. दोघांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार धिलॉन यांची संपत्ती 137 कोटी व करण ब्रार यांची संपत्ती 128 कोटी रुपये एवढी आहे. मात्र, या दोघांपेक्षाही भुल्लर हे अधिक श्रीमंत ठरले आहेत. 

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मोहालीचे सर्वाधिक काळ पोलिस अधीक्षकपद भूषविलेल्या भुल्लर यांची एकूण संपत्ती 152 कोटी रुपये एवढी आहे. सन 2009 ते 2013 व 2015 पासून ते आतापर्यंत भुल्लर मोहालीचे ते पोलिस अधीक्षक आहेत. त्यांच्या एकूण 16 मालमत्ता असून त्यामध्ये आठ रहिवासी, चार शेती भूखंड व तीन व्यापारी मालमत्ता आहेत. मध्य दिल्लीत बाराखंबा रस्त्यावर 85 लाखांचा व्यापारी भूखंड व दिल्लीच्या पॉश सैनिक फार्म्सवर येथे 1500 स्कवेअरचा मोकळा भूखंड आहे. मोहालीत बरेली गावात 45 कोटींची जमिन आहे. कागदपत्रांनुसार भुल्लर यांना जास्तीत जास्त मालमत्ता वडिलोपार्जित मिळाल्या आहेत. 
==========================================
कन्हैया कुमारला धमकीचे पत्र; सुरक्षेत वाढ
नवी दिल्ली- देशद्रोहाचा आरोप असलेला व जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) छात्रसंघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला धमकीचे पत्र दिल्ली पोलिसांना मिळाले आहे. या पत्रानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

दिल्ली पोलिसांना गुरुवारी एक पत्र मिळाले आहे. पत्रात म्हटले आहे की, कन्हैया कुमार व उमर खालिद यांचे शीर धडावेगळे करणाऱ्याला बक्षीस दिले जाईल. पत्रामध्ये अनिल जानी असे नाव आढळून आले आहे. शिवाय, पोलिसांना रात्री एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी केला होता. ‘जेएनयू‘जवळून जाणाऱ्या 605 क्रमांकाच्या बसमध्ये गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ बसची तपासणी करून पिस्तूल व काडतुसे जप्त केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

दरम्यान, पोलिसांनी ‘जेएनयू‘ प्रशासनालाही याबाबत माहिती दिली असून, कन्हैयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
==========================================
श्रीमंत देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर
संग्रहित चित्रमुंबई - जगातील सर्वाधिक श्रीमंत देशांच्या यादीत भारताला तिसरा क्रमांक मिळाला असून चीनला प्रथम तर अमेरिकेला दुसरे स्थान मिळाले आहे. राष्ट्रीय देशांतर्गत उत्पनाच्या (जीडीपी) आधारे जगातील श्रीमंत देशांचा क्रम ठरविण्यात आला आहे. 

जगातील अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या एका संस्थेने प्रसिद्ध केलेल्या या यादीत मागील आर्थिक वर्षातील जीडीपीनुसार चीन (20.85 लाख कोटी डॉलर), अमेरिका (18.56 लाख कोटी डॉलर) तर त्यानंतर भारताचा (8.64 लाख कोटी डॉलर) क्रमांक आहे. मात्र केवळ जीडीपीच्या आकडेवारीनुसार देशाच्या श्रीमंतीचा बांधलेला अंदाज फारसा विश्‍वसनीय नसल्याची टीका करण्यात येत आहे. फोर्ब्स मासिकाच्या एका अहवालानुसार, भारतात मागील पंधरा वर्षांच्या कालावधीत लक्षाधीशांच्या संख्येत 400 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. तर देशातील एकूण संपत्तीमध्ये 211 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. मात्र तरीही भारतात मोठ्या प्रमाणात दारिद्य्ररेषेखालील लोकसंख्या आहे.
==========================================
==========================================

No comments: