[अंतरराष्ट्रीय]
१- लंडन; अयोग्य व्हिसामुळे हिथ्रो विमानतळावर अक्षयकुमारची अडवणूक
२- वेश्यागमन करणे हा फ्रान्सने ठरविला गुन्हा
३- जिनिव्हा; पनामा प्रकरणाचे धक्के सुरूच
४- जकार्ता; स्टेजवर परफार्म करताना साप चावून पॉपस्टारचा मृत्यू
५- इस्लामाबाद; अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत पाकिस्तानशी चर्चेस तयार
६- भारतातील करव्यवस्थेत सुधारणा हवी: अमेरिका
७- लंडन; संपूर्ण जग कोसळल्यासारखे वाटले: बेन स्टोक्स
८- ब्रुसेल्स हल्ल्याप्रकरणी नव्या संशयिताचा शोध
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
९- पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानने शब्द फिरवत शांतता चर्चा थांबवली
१०- पंतप्रधान मोदींचा केवळ पाणी पिऊन 9 दिवसांचा व्रत
११- महिलांसाठी आरोग्यमंत्र्यांकडून वेलवेट कंडोम लॉन्च
१२- दिल्ली; 'ती'च को-पायलट हवी, एअर इंडियाच्या पायलटने 2 तास विमान थांबवलं
१३- बरेली; गरोदर महिलांना हज यात्रेत सहभागी होण्यास बंदी
१४- मल्ल्या, संपत्तीची सर्व माहिती द्या! - सुप्रीम कोर्ट
१५- मोदींचे 'मेक इन इंडिया' यशस्वी होते आहे: मूडीज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१६- मनसेचा गुढीपाडवा मेळावा, होमपिचवर राज ठाकरेंची अग्निपरीक्षा
१७- अच्छे दिवस कधी येतील हो? - शिवसेना
१८- राज्यभरात पाडव्याचा गोडवा
१९- महानायकाकडून अनोख्या पद्धतीने गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!
२०- भोपाळ; मध्य प्रदेशात 12 महिन्यांत 16 वाघ मृत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२१- दिल्ली; लैंगिक अत्याचार करुन चिमुरडीची हत्या, चुलत भावाला अटक
२२- डोंबिवली; माझा संकल्प, माझे वर्ष... सौरउर्जेवर फिरणारी अनोखी गुढी
२३- मीरा रोड; कारचोरी प्रकरणी शिवसेना उपविभागप्रमुखाला बेड्या
२४- बरेली; एचआयव्ही झाला म्हणून पत्नीने वडिलांच्या मदतीने केली पतीची हत्या
२५- नाशिक; ...अन् सहा महिन्यांचा बालक पाहू लागला जग
२६- कर्जत; लातूरकडे वाहतोय माणुसकीचा झरा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- हृतिक रोशनला अटक करा, कंगनाची मागणी
२८- धोनी-रहाणेच्या उपस्थितीत रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या जर्सीचं लॉन्चिंग
२९- त्याही अवस्थेत मातेच्या ओठांवर फुलविले हास्य
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
आनंद धंजे, मुखीद शेख, गणपत आढाव, बालाजी डोसने, पद्माकर सावंत, संदीप मुमुरे, अमोल धुळे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात
(दिवाकर कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
=========================
🎋गुढीपाडवा🎋
आपणांस नवीन वर्ष सुखाचे समृध्दीचे, भरभराटीचे, आनंदाचे,
आरोग्य संपन्न जावो !
🚩नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या🚩
===========================================

प्रफुल्ल शिरसाट सहा वर्षांपासून अॅड. साधना पाटील यांच्याकडे शिरसाट ड्रायव्हरचं काम करायचा. त्यांचीच कार शिरसाटने चोरल्याचं उघडकीस आलं आहे. 9 डिसेंबर 2006 रोजी शिरसाटनं साधना पाटील यांची इनोव्हा कार चोरली.
त्यानंतर नंबर प्लेट बदलून शिरसाट इनोव्हाचा बिनदिक्कतपणे वापर करत होता. अंधेरी आणि इतर भागांमध्ये शिरसाटला फिरताना पाहिल्याचं काही जणांनी अॅड. साधना पाटलांना सांगितलं. गाडीचा नंबर बदलला असला तरी रंग सारखाच असल्यानं पाटील यांचा संशय बळावला. त्यानुसार त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
अखेर मीरा रोड पोलिसांनी इनोव्हा कारचा चेसीज नंबर आणि इतर कागदपत्रं तपासली असता संबंधित इनोव्हा साधना पाटील यांचीच असल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी प्रफुल्ल शिरसाटला गजाआड केलं आहे.

बुधवारी चेन्नईहून माले येथे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या पायलटने आवडत्या महिला को-पायलटसाठी तब्बल दोन तास विमान थांबवून ठेवले. या विमानात 110 प्रवासी असल्याची माहिती आहे. ही फ्लाईट तिरुअनंतपुरम मार्गे चेन्नईहून मालेला जाणार होती.
एअर इंडियाच्या चेअरमन आणि एमडी अश्वनी लोहानी यांनी पत्रकाद्वारे अशी वर्तणूक खपवून घेतली जाणार नसल्याचं सांगितलं आहे. संबंधित वैमानिकाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असंही एअर इंडियातर्फे सांगण्यात आलं.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार कॅनडाचं नागरिकत्व असलेल्या अक्षयकुमारला विमानतळ अधिकाऱ्यांकडून पासपोर्टची छाननी होईपर्यंत ताटकळत रहावं लागलं. कॅनडाचा नागरिकत्व असलेल्यांना पर्यटक म्हणून किंवा बिझनेससाठी व्हिसाशिवाय 90 दिवस यूकेमध्ये राहण्याची परवानगी आहे. मात्र ही सर्व छाननी होईपर्यंत अक्षयला वाट पाहत बसावं लागलं होतं.
‘अक्षयला ताब्यात घेतल्याचं वृत्त चुकीचं आहे. अक्षयला इमिग्रेशन प्रक्रियेसाठी विलंब झाला, ज्यासाठी अधिकाऱ्यांनी माफीही मागितली.’ अशी माहिती अक्षयच्या जवळच्या सुत्रांनी पीटीआयला दिली. अक्षयकुमार सध्या रुस्तम चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे. व्हिसा नसल्यामुळे अक्षयला दीड तास थांबवण्यात आल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं.
सुटका करण्यासाठी अक्षयने आपल्या स्टारडमचा वापर केल्याचंही काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. मात्र हे दावेही अक्षयकुमारच्या टीमने फेटाळून लावले आहेत.

मनसेचा गुढीपाडवा मेळावा, होमपिचवर राज ठाकरेंची अग्निपरीक्षा
फाइल फोटो
मुंबई: आज शिवाजी पार्कवर होणारा मनसेचा गुढीपाडवा मेळावा म्हणजे राज ठाकरेंसाठी अग्निपरीक्षाच असणार आहे. कारण गेल्या काही वर्षांत मनसेच्या प्रमुख मावळ्यांनी राज ठाकरेंना पाठ दाखवली आहे. त्यामुळं मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह आणि जोश फुंकण्याचं आव्हान राज ठाकरेंसमोर आहे.
19 मार्च 2006 नंतर राज ठाकरे तिसऱ्यांदा पुन्हा एकदा शिवतीर्थावरच्या अग्नीपरीक्षेसाठी तयार झाले आहेत. पण मनसेच्या स्थापना सभेला मराठी माणसानं प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतर राज ठाकरेंनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या राज ठाकरेंना महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. मराठी पाट्यांच्या आंदोलनानं राज देशभरात पोहोचले. रेल्वेत स्थानिकांना संधी मिळावी म्हणून राज यांनी उत्तर भारतीयांना सळो की पळो करुन सोडलं. ‘टोलचा झोल’ असो की ‘आदर्शचा घोटाळा’ राज ठाकरेंनी प्रत्येक बॉलवर सिक्सर मारला. क्रिकेटमध्ये सचिनचं टायमिंग आणि राजकारणात राज यांच्या टायमिंगचे दाखले दिले जात होते. त्यामुळंच 2009 साली पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेला तुडुंब यश मिळालं.
बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, प्रवीण दरेकर, राम कदम, प्रकाश भोईर, मंगेश सांगळे, रमेश पाटील, रमेश वांजळे, अतुल भोसले, उत्तमराव ढिकले, वसंत गीते आणि हर्षवर्धन जाधव. असे 13 आमदार निवडून आले.
भाजप आणि शिवसेनेपेक्षा मनसेचा कडवा विरोध त्यांना प्रमुख विरोधी पक्षाची जागा देऊन गेला. शिवसेनेचा मराठीचा मुद्दा मनसेनं हायजॅक केला आणि त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही झाला.
===========================================
पंतप्रधान मोदींचा केवळ पाणी पिऊन 9 दिवसांचा व्रत
नवी दिल्ली : राज्यभरात आज गुढीपाडव्याचा उत्साह आहे. तर तिकडे गुजरातमध्ये नवरात्री पर्वाची धामधूम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदीही मनोभावे या उत्साहात सहभागी होतात. मोदींचा आजपासून 9 दिवस नवरात्री उपवास आहे. केवळ पाणी पिऊन मोदी हा उपवास करतात. सध्या आसाम दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी कामाख्या मंदिरात जाऊन पूजा केली.
या नऊ दिवसात मोदींचा उपवास असला, तरीही ते दैनंदिन कामकाज करतच राहणार आहेत. मोदी आजही आसाममध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करणार आहेत. आसाममध्ये मोदींच्या आज चार सभा आहेत, इथे ते संबोधित करतील.
या रॅलीपूर्वी मोदींनी कामाख्या मंदिरात जाऊन पूजा केली. लोकसभा निवडणुकीदरम्यानही मोदी कामाख्या मंदिरात दर्शनासाठी आले होते.
हिंदू पंचांगानुसार आजपासून नववर्षाची सुरुवात होते. विक्रम संवत 2073 चा आज पहिला दिवस आहे. भारतीय इतिहासात ‘विक्रम संवत’ला सर्वात लोकप्रिय संवत मानलं जातं. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी जनतेला नवनर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
===========================================
राज्यभरात पाडव्याचा गोडवा
मुंबई: मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. मुंबईच्या गिरगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज शोभायात्रा निघणार आहे. फडके गणेश मंदिरापासून ही भव्य शोभायात्रा निघेल.
20 फूट भारतमातेची प्रतिमा, 18 फूट महिषासूरमर्दिनीची प्रतिमा उभारण्यात आवी आहे. या शोभायात्रेत 1200 तरूण तरूणी ढोलताशांचा गजर करणार आहेत. तर तिकडे डोंबिवलीतही नववर्ष स्वागतयात्रा निघणार आहे. काल रात्रीपासूनचं डोंबिवलीत रस्त्यांवर रांगोळ्या पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडं तरूणींचं ढोलपथकही सज्ज झालं आहे.
डोंबिवलीच्या श्रीगणेश मंदिर संस्थानतर्फे मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी भव्य रांगोळीही साकारण्यात आली आहे. तब्बल 48 बाय 12 फुटांची ही रांगोळी असून त्यासाठी 700 किलो रांगोळी आणि 300 किलो रंग वापरण्यात आला आहे.
तर ठाण्याच्या गांवदेवी मैदानावर संस्कार भारतीतर्फे शंभर फुटांची भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. राज्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे. त्यामुळे पाणी वाचवण्याचा संदेश यावेळी रांगोळीच्या माध्यमातून देण्यात येतो आहे. पाडव्यानिमित्त मराठी संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या डोंबिवली, पुणे आणि मुंबई परिसरातील स्वागतयात्रांनाही काही वेळात सुरुवात होणार आहे.
===========================================
महिलांसाठी आरोग्यमंत्र्यांकडून वेलवेट कंडोम लॉन्च
नवी दिल्ली : भारतात पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं महिलांसाठी वेलवेट कंडोम तयार करण्यात आलं आहे. एचएलएल लाईफकेअर लिमिटेड कंपनीने तयार केलेल्या या वेलेवट ब्रँडच्या कंडोमचं दिल्लीत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी लॉन्चिंग केलं. राजधानी दिल्लीत दोन दिवसीय राष्ट्रीय कुटुंब नियोजन शिखर संमोलनात या कंडोमचं लॉन्चिंग करण्यात आलं.
जे. पी. नड्डा या कार्यक्रमात म्हणाले, “महिलांना हे कंडोम पूर्णपणे सुरक्षा देईल. शिवाय, महिलांना सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी नियंत्रणही प्रदान करेल. महिलांचं कंडोम महिलांना सशक्त बनवण्यास उपयुक्त ठरेल. या कंडोममुळे एचआयव्ही/एड्ससारख्या रोगांनाही लगाम लागेल.”
एचएलएलच्या वेलवेट ब्रँडच्या महिला कंडोमला जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्यता दिली आहे. गर्भधारणा आणि संक्रमणाच्या दृष्टीने सुरक्षित असं हे कंडोम आहे. प्रभाव आणि विश्वासार्हता या दोन्हींमध्ये पुरुषांच्या कंडोम इतकंच साम्य आहे.
केरळच्या तिरुअनंतपुरमस्थित एचएलएल कंपनीने हे स्वदेशी कंडोम विकसित केलं आहे. 2016 मार्चमध्ये जागतिक आरोग्य संघटना आणि यूएनएफपीएने या कंडोमला मान्यता दिली आहे.
===========================================
लैंगिक अत्याचार करुन चिमुरडीची हत्या, चुलत भावाला अटक
नवी दिल्ली: दिल्लीमधील उत्तम नगर येथील एका आठ वर्षीय चिमुरडीवर चुलत भावानेच लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चिमुरडीचा मृतदेह तिच्याच घराजवळ आढळून आला.
मंगळवारपासून ही चिमुरडी बेपत्ता होती. अपहरणाची तक्रारही नोंदविण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांचा शोधही सुरु होता.
मुलीच्या घरापासून काहीशी अंतरावर असलेल्या एका नाल्यामध्ये मुलीचं शव आढळून आलं. त्यानंतर तपासाची चक्र वेगानं फिरवण्यात आली. त्यानंतर पोलिसांना तिच्या चुलत भावावर संशय आला. हा चुलत भाऊ उत्तम नगरमधील झोपडपट्टीमध्येच राहतो.
दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, ज्या दिवशी मुलगी हरवली तेव्हा त्यानं मुलीला या भावासोबतच पाहिलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तिच्या भावाला अटक केली. सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे.
===========================================
महानायकाकडून अनोख्या पद्धतीने गुढी पाडव्याच्या शुभेच्छा!
मुंबई : आज गुढीपाडवा. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण. पंतप्रधानांपासून सर्वांनीच महाराष्ट्रातील जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात हिंदी सिनेसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन तरी मागे कसा राहील?
Amitabh Bachchan
@SrBachchan
Actor ... well at least some are STILL saying so !!
Mumbai, India · http://srbachchan.tumblr.com
===========================================
माझा संकल्प, माझे वर्ष... सौरउर्जेवर फिरणारी अनोखी गुढी
डोंबिवली: नववर्षाचे स्वागत करतांना नवनवीन सामाजिक संदेशही दिला जावा, हा हेतू मनात ठेवून डोंबिवलीतील स्वाती जोशी यांनी सौरऊर्जेवर फिरणारी गुढी तयार केली आहे. सध्या कल्याण- डोंबिवलीमध्ये त्यांनी तयार केलेल्या गुढीची चांगलीच चर्चा आहे.
ही सोलार गुढी सोलार पॅनलच्या मदतीनं स्वतःभोवती फिरत असल्याममुळं ती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते आहे. गुढीच्या माध्यमातून स्वाती जोशी यांना सोलार एनर्जीचा वापर वाढवण्याच्या संदेश दिला आहे.
गुढी ही नाविन्याचं प्रतिक मानलं जातं आणि सोलार पॅनलवर फिरणारी गुढी निर्माण करून स्वाती जोशी यांनी खऱ्या अर्थानं नाविन्याची गुढी उभारली आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
आजकाल दारासमोर उभ्या केल्या जाणाऱ्या मोठ्या गुढीबरोबरच कार, कार्यालयात टेबलावर ठेवता येईल अशा छोटय़ा आकाराच्या गुढ्या बाजारात येऊ लागल्या आहेत. अशा शोभिवंत गुढ्या भेटवस्तू म्हणून एकमेकांना देण्यात येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीत भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हे व्यावसायिक असणाऱ्या स्वाती जोशी यांनी सौरऊर्जेवर स्वत:भोवती फिरणारी गुढी तयार केली आहे. सौर पॅनलद्वारे फिरणारी ही गुढी स्वत:भोवती फिरते.
ह्या गुढीचे वैशिष्ट म्हणजे हि गुढी घराबाहेर उन्हात ठेवल्यावर ती स्वत:भोवती फिरेलच, मात्र यात बसविलेल्या आणखी एका संयंत्रामुळे ती घरामध्ये ट्यूब अथवा एलईडी दिव्याच्या प्रकाशातही फिरू शकेल. या अनोख्या गुढीमुळे पारंपारिक उर्जेचे महत्व पटवून देण्यात मदतच होणार आहे.
===========================================
कारचोरी प्रकरणी शिवसेना उपविभागप्रमुखाला बेड्या
मीरा रोड : शिवसेनेच्या उपविभागप्रमुखाने केलेल्या कारचोरीमुळे पक्षावर नामुष्कीची वेळ ओढवली आहे. मीरा रोडच्या विभाग क्रमांक 7 आणि 8 चा उपविभागप्रमुख प्रफुल्ल शिरसाटला कार चोरीच्या आरोपात पोलिसांनी अटक केली आहे.
प्रफुल्ल शिरसाट सहा वर्षांपासून अॅड. साधना पाटील यांच्याकडे शिरसाट ड्रायव्हरचं काम करायचा. त्यांचीच कार शिरसाटने चोरल्याचं उघडकीस आलं आहे. 9 डिसेंबर 2006 रोजी शिरसाटनं साधना पाटील यांची इनोव्हा कार चोरली.
त्यानंतर नंबर प्लेट बदलून शिरसाट इनोव्हाचा बिनदिक्कतपणे वापर करत होता. अंधेरी आणि इतर भागांमध्ये शिरसाटला फिरताना पाहिल्याचं काही जणांनी अॅड. साधना पाटलांना सांगितलं. गाडीचा नंबर बदलला असला तरी रंग सारखाच असल्यानं पाटील यांचा संशय बळावला. त्यानुसार त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
अखेर मीरा रोड पोलिसांनी इनोव्हा कारचा चेसीज नंबर आणि इतर कागदपत्रं तपासली असता संबंधित इनोव्हा साधना पाटील यांचीच असल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी प्रफुल्ल शिरसाटला गजाआड केलं आहे.
===========================================
हृतिक रोशनला अटक करा, कंगनाची मागणी
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता हृतिक रोशनमधील वाद शिगेला पोहोचल्याचं दिसत आहे. कंगना राणावतच्या वकिलांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून हृतिकला अटक करण्याची मागणी केली आहे.
कंगनाला बदनाम करण्यासाठी तिने हृतिकला पाठवलेले खाजगी मेल आणि फोटो जगजाहीर केल्याचा आरोप त्या पत्रात करण्यात आला आहे.
हृतिक-कंगनाच्या भांडणात नवा ट्विस्ट
तसंच हृतिक कंगनाला धमकावत असल्याचा आरोपही कंगनाच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन हृतिक रोशनवर कारवाई करावी अशी कंगनाची मागणी आहे.
कंगना केस जिंकल्यास हृतिकला 10 वर्षांचा तुरुंगवास?
कंगनाच्या वकिलांच्या पत्रातील मुद्दे
कंगनाला बदनाम करण्यासाठी तिने पाठवलेले खासगी मेल आणि फोटो हृतिकने जगजाहीर केले. त्यापूर्वी हृतिकने कंगनाला नोटीस पाठवून तशी धमकीही दिली होती. कंगनावर दडपण आणण्यासाठी हृतिक ते कृत्य करत आहे. कृपया आपण याची दखल घेऊन गुन्हा दाखल करावा. फौजदारी संहितेच्या कलम 151 नुसार हृतिकला अटक होणं गरजेचं आहे.
===========================================
'ती'च को-पायलट हवी, एअर इंडियाच्या पायलटने 2 तास विमान थांबवलं
नवी दिल्ली : आपल्या आवडीच्या महिला को-पायलटसाठी अडून बसलेल्या वैमानिकाला आडमुठेपणा महागात पडण्याची शक्यता आहे. ‘ती’च्यासाठी दोन तास प्रवाशांना ताटकळत ठेवणाऱ्या एअर इंडियाच्या पायलटची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बुधवारी चेन्नईहून माले येथे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या पायलटने आवडत्या महिला को-पायलटसाठी तब्बल दोन तास विमान थांबवून ठेवले. या विमानात 110 प्रवासी असल्याची माहिती आहे. ही फ्लाईट तिरुअनंतपुरम मार्गे चेन्नईहून मालेला जाणार होती.
एअर इंडियाच्या चेअरमन आणि एमडी अश्वनी लोहानी यांनी पत्रकाद्वारे अशी वर्तणूक खपवून घेतली जाणार नसल्याचं सांगितलं आहे. संबंधित वैमानिकाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असंही एअर इंडियातर्फे सांगण्यात आलं.
===========================================
अयोग्य व्हिसामुळे हिथ्रो विमानतळावर अक्षयकुमारची अडवणूक
लंडन : योग्य व्हिसा नसल्यामुळे बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षयकुमारची लंडनच्या हिथ्रो विमानतळावर अधिकाऱ्यांनी अडवणूक केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर येत होत्या. मात्र यात काहीच तथ्य नसल्याचा दावा अक्षयच्या प्रवक्त्यांनी केला आहे. अक्षयला काही मिनिटांतच एअरपोर्टवरुन बाहेर जाऊ दिल्याचं म्हटलं आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार कॅनडाचं नागरिकत्व असलेल्या अक्षयकुमारला विमानतळ अधिकाऱ्यांकडून पासपोर्टची छाननी होईपर्यंत ताटकळत रहावं लागलं. कॅनडाचा नागरिकत्व असलेल्यांना पर्यटक म्हणून किंवा बिझनेससाठी व्हिसाशिवाय 90 दिवस यूकेमध्ये राहण्याची परवानगी आहे. मात्र ही सर्व छाननी होईपर्यंत अक्षयला वाट पाहत बसावं लागलं होतं.
‘अक्षयला ताब्यात घेतल्याचं वृत्त चुकीचं आहे. अक्षयला इमिग्रेशन प्रक्रियेसाठी विलंब झाला, ज्यासाठी अधिकाऱ्यांनी माफीही मागितली.’ अशी माहिती अक्षयच्या जवळच्या सुत्रांनी पीटीआयला दिली. अक्षयकुमार सध्या रुस्तम चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे. व्हिसा नसल्यामुळे अक्षयला दीड तास थांबवण्यात आल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं.
सुटका करण्यासाठी अक्षयने आपल्या स्टारडमचा वापर केल्याचंही काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. मात्र हे दावेही अक्षयकुमारच्या टीमने फेटाळून लावले आहेत.
===========================================
धोनी-रहाणेच्या उपस्थितीत रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या जर्सीचं लॉन्चिंग
मुंबई : आयपीएलची नवी टीम रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या जर्सीचं आज कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अजिंक्य रहाणे यांच्या उपस्थितीत लॉन्चिंग करण्यात आलं.
आयपीएलच्या नवव्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होत असून, सलामीच्या सामन्यात रायझिंग पुणेचा मुकाबला गतविजेत्या मुंबई इंडियन्सशी होईल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
2013 सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आयपीएलमधल्या चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्या दोन संघांऐवजी रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि गुजरात लायन्स या दोन संघांचा आगामी दोन वर्षांसाठी आयपीएलमध्ये समावेश करण्यात आला आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असलेला धोनी आगामी दोन वर्षांत रायझिंग पुणेच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. राजस्थान रॉयल्सचा बिनीचा शिलेदार असलेल्या अजिंक्य रहाणेवर आता रायझिंग पुण्याच्या फलंदाजीची मदार असेल.
===========================================
पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानने शब्द फिरवत शांतता चर्चा थांबवली
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. ८ - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारतीय अधिका-यांना पाकिस्तानात येऊन पुरावे गोळा करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही असं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानचं तपास पथक भारतात येऊन तपास करुन गेले असताना पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी हे वक्तव्य केलं आहे. याअगोदरही पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) कोलांटी उडी मारत पठाणकोट हल्ला म्हणजे पाकला बदनाम करण्यासाठी भारतानेच रचलेले नाटक होते असा आरोप केला होता.पाकिस्तानी तपास पथकाचा दौरा ही देवाण घेवाण नव्हती असं अब्दुल बसित बोलले आहेत. तसंच भारतासोबत सुरु असलेली शांतता चर्चादेखील रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानने आपला शब्द फिरवल्यामुळे केंद्र सरकार कोंडीत सापडण्याची शक्यता असून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानचं तपास पथक भारतात येईल आणि त्या बदल्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी पाकिस्तानात जाऊन तपास करतील असं ठरल होतं अशी माहिती सरकारने दिली आहे.
===========================================
गरोदर महिलांना हज यात्रेत सहभागी होण्यास बंदी
- ऑनलाइन लोकमत -बरेली, दि. ८ - केंद्रीय हज समितीने जारी केलेल्या नव्या सुचनेनुसारहज यात्रेमध्ये 4 महिने पुर्ण झालेल्या गरोदर महिलांना सहभागी होता येणार नाही आहे. हज यात्रा सप्टेंबरपासून सुरु होत असून अर्ज भरतेवेळी महिला गरोदर असेल आणि 4 महिने पुर्ण झाले असतील तर त्या महिलेला सहभागी करण्यात येणार नाही. जर त्या महिलेने ही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला आणि प्रवासाला सुरुवात केली तरी अर्ध्या प्रवासातून त्या महिलेला विमानातून उतरवून परत पाठवण्यात येईल अशी माहिती हज अधिका-यांनी दिली आहे. मात्र विमानात महिला गरोदर आहेत की नाहीत याची तपासणी कशी केली जाणार आहे? याबद्दल काहीच माहिती देण्यात आलेली नाही.'हज यात्रा सप्टेंबरपासून सुरु होत असून गरोदर महिलांना परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या गरोदर महिलांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी 4 महिने पुर्ण झालेले नाहीत याची खात्री करुन घ्यावी. नाहीतर त्यांना प्रवासात रोखण्यात येईल', अशी माहिती बरेली हज सेवा समिती सचिन नजीम बेग यांनी दिली आहे. केंद्रीय हज सेवा समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अता-उर-रहमान यांनी हे आदेश दिले असून त्यांनी अगोदरच ज्या महिलांनी पैसे भरले आहेत त्यांना ते परत घेऊन आपल्या सीट्स रद्द करण्यास सांगितलं आहे.महिलांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नजीम बेग यांनी दिली आहे. 'पहिले पाच दिवस खुप घाई गडबडीचे असतात. तुम्हाला एका जागेवरुन लगेच दुस-या जागी पोहचायचे असते, तुम्हाला दम लागण्याची शक्यता असते. तसंच पवित्र जागी तुम्हाला फे-या मारायच्या असतात. त्यामुळे गरोदर महिलांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेतल्याचं', नजीम बेग यांनी सांगितलं आहे.
===========================================
एचआयव्ही झाला म्हणून पत्नीने वडिलांच्या मदतीने केली पतीची हत्या
- ऑनलाइन लोकमत -बरेली, दि. ८ - एचआयव्ही झाला असल्याने पत्नीने आपल्या वडिलांच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडीत व्यक्ती ट्रक ड्रायव्हर असून आपल्या पत्नीच्या घरी राहत होती. 2013 मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. आपल्यालाएचआयव्ही असल्याचं माहिती पडल्यानंतर पिडीत व्यक्तीने एआरटी सेंटरमध्ये काऊंसिलिंगला सुरुवात केली. काऊंसिलिंग संपल्यानंतर तो आपल्या पत्नीच्या घरी भोजीपुरा येथे राहायला गेला होता.पिडीत व्यक्तीला एड्स झाल्याची माहिती होती, मात्र लोकांच्या भीतीने त्याने कोणालाही याबद्द्ल सांगितलं नव्हतं. त्याने स्थानिक एआरटी सेंटरमध्ये काऊंसिलिंग घेण्यास सुरुवात केली होती अशी माहिती पोलीस तपासात मिळाली आहे. बुधवारी त्याचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत पत्नी आणि सासरा समाधानक उत्तरे देऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावला. तसंच मृत्यूनंतर त्यांनी पोलिसांना न कळवता पिडीत व्यक्तींच्या घरच्यांना कळवून अंत्यसंस्काराची तयारीदेखील सुरु केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.पिडीत व्यक्तींच्या कुटुंबियांना मृतदेहावर जखमा आढळल्यानंतर त्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवलं. शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पिडीत व्यक्तीची पत्नी, सासरा आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एड्स रुग्णाला घरात ठेवणं कलंक त्यांना कलंक वाटत होतं आणि त्यामुळेच हत्या केली असावी असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अजून कोणाला अटक करण्यात आलेलं नाही.
===========================================
मल्ल्या, संपत्तीची सर्व माहिती द्या! - सुप्रीम कोर्ट
- नवी दिल्ली : आपल्या कंपन्यांनी सरकारी बँकांकडून घेतलेले हजारो कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशी निघून गेलेले वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या यांनी स्वत:च्या, पत्नीच्या व मुलाच्या नावे असलेल्या सर्व प्रकारच्या स्थावर-जंगम मालमत्तेचा तपशील येत्या १५ दिवसांत सादर करावा, असेनिर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले.मल्ल्या यांनी वरीलप्रमाणे ३१ मार्च २०१६ पर्यंतच्या संपत्तीचा तपशील देणारे प्रतिज्ञापत्र २१ एप्रिलपर्यंत सादर करायचे आहे. तसेच कर्ज फेडण्याचा आपला हेतू प्रामाणिक आहे हे दाखविण्यासाठी किती रक्कम रोख स्वरूपात न्यायालयात जमा करण्याची तयारी आहे व मल्ल्या स्वत: सर्वोच्च न्यायालयापुढे हजर राहू शकतात, याची माहितीही त्यांनी याच प्रतिज्ञापत्रात द्यायची आहे.मल्ल्यांच्या कंपन्यांना स्टेट बँक आॅफ इंडियासह १७ सरकारी बँकांनी दिलेली ९,००० कोटी रुपयांची कर्जे थकलेली आहेत. यापैकी चार हजार कोटी रुपये येत्या सप्टेंबरपर्यंत फेडण्याचा सशर्त प्रस्ताव मल्ल्या यांनी गेल्या तारखेला दिला होता. यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी थोडासा सुधारित प्रस्ताव दिला होता.न्या. कुरियन जोसेफ व न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणी झाली तेव्हा मल्यांचे हे दोन्ही प्रस्ताव आपल्याला अमान्य असल्याचे बँकांनी न्यायालयास सांगितले.
===========================================
वेश्यागमन करणे हा फ्रान्सने ठरविला गुन्हा
- पॅरिस : वेश्या व्यवसायावर प्रतिबंध नसलेल्या फ्रान्सने वेश्यागमन हा गुन्हा ठरविणारा कायदा बुधवारी संमत केला. यामुळे वेश्येला पैसे देऊन शरीरसुख घेणारा ग्राहक पकडला गेल्यास त्यास दंड भरण्याखेरीज मानसिकता बदलण्यासाठी समुपदेशनाच्या वर्गांना हजेरी लावावी लागणार आहे.फ्रान्समध्ये व्यक्तिगत स्वरूपात वेश्या व्यवसाय करणे कायदेशीर आहे. मात्र कुंटणखाने, वेश्यांसाठी दलाली करणे व अल्पवयीन व्यक्तीने वेश्येकडे जाणे यावर कायद्याने बंदी आहे. याआधी वेश्यांनी रस्त्यांवर ग्राहक शोधत फिरण्यास प्रतिबंध करणारा कायदा २००३ मध्ये केला गेला होता. पण त्याची अंमलबजावणी कधी कडकपणे झाली नाही.आता वेश्यागमन आणि वेश्या व्यवसायासाठी महिलांच्या तस्करीस प्रतिबंध करणारा नवा कायदा फ्रेंच संसदेच्या ‘नॅशनल असेंब्ली’ या कनिष्ठ सभागृहाने बुधवारी ६४ विरुद्ध १२ मतांनी संमत केला. सर्वच युरोपीय देशांत वेश्यांसाठी दलाली करणे हा गुन्हा आहे. पण वेश्यागमन हा गुन्हा ठरविणारा फ्रान्स हा स्वीडन, नॉर्वे, आइसलँड व ब्रिटननंतर आता युरोपमधील पाचवा देश ठरला आहे. या कायद्यानुसार वेश्यागमन करताना पहिल्यांदा पकडले गेल्यास १,५०० युरो व त्यानंतर पुन्हा पकडले गेल्यास ३,७५० युरो दंड होईल. याखेरीज वेश्यागमनाशी संबंधित धोक्यांसंबंधी समुपदेशन करणाऱ्या वर्गासही त्यास हजर राहावे लागेल.
===========================================
पनामा प्रकरणाचे धक्के सुरूच
- जिनिव्हा : पनामा पेपर्स जाहीर झाल्यानंतर खळबळजनक घटना घडत आहेत. स्वीस अधिकाऱ्यांनी युरोपियन फुटबॉलच्या मुख्यालयावर छापा घातला, तर आइसलँडला नवे पंतप्रधान मिळाले व मोठ्या औषध कंपनीचे विलीनीकरण बारगळले.जिनिव्हातील युनियन आॅफ युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या (यूईएफए) कार्यालयांची पोलिसांनी चॅम्पियन्स लीगच्या टेलिव्हिजन हक्कांच्या प्रकरणाच्या सुरू असलेल्या चौकशीचा भाग म्हणून झडती घेतली.आइसलँडचे कृषिमंत्री सिगुरदुर इंगी जोहान्नस्सन यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. पनामातील बँकांमध्ये सिगमुंदूर डेव्हिड गुन्नलाऊगस्सन यांनी गुंतवणूक केल्याचे उघड झाल्यावर त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेथे आता येत्या हिवाळ्यात निवडणुका होणार आहेत.पनामामुळे फायझर या कंपनीचे अलेगरनमध्ये होणारे विलीनीकरण बारगळले आहे.
===========================================
स्टेजवर परफार्म करताना साप चावून पॉपस्टारचा मृत्यू
- ऑनलाइन लोकमतजकार्ता, दि. ७ - इंडोनेशियातील पॉपस्टार इरमा बुले हिचा स्टेजवर परफार्म करताना सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली.येथील स्थानिक वृत्तानुसार, पॉपस्टार इरमा बुले ज्यावेळी परफार्म करत होती. त्यावेळी तिच्यासोबत स्टेजवर साप होते. यातील एका सापाच्या शेपटीवर तिचा पाय पडल्याने त्या सापाने तिच्या पायाचा चावा घेतला. यावेळी तिने त्याकडे दुर्लक्ष करत जवळजवळ ४५ मिनिटे परफार्म सुरुच ठेवला. त्यानंतर ती स्टेजवर कोसळली. या घटनेनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.दरम्यान,ज्या सापावर तिचा पाय पडला, तो साप विषारी नसल्याचे इरमा बुले हिला वाटले असावे, असे येथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. आधीही तिने अनेक सापांसोबत परफार्म केला आहे. तसेच, या भागात अनेक कलाकार हे सापांसोबत परफॉर्म करत असतात.
===========================================
अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत पाकिस्तानशी चर्चेस तयार
- ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. ७- पाकिस्ताननं प्रमाणापेक्षा जास्त शस्त्रसाठा केला आहे. मात्र आणखी शस्त्रसाठा न करण्याच्या मुद्दा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान भारताशी चर्चा करण्यास तयार झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी भारत आणि पाकिस्ताननं अणुशक्ती कमी करण्यावर भर दिला पाहिजे. त्याचबरोबर दोन्ही लष्कराला सैन्याचा सिद्धांत विकसित करण्याची गरज असल्याचंही प्रतिपादन केलं आहे.पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्यानंही आम्ही पाकिस्तान आणि भारतात शांतता नांदावी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामांच्या सूचनेवर विचार केला आहे. दोन्ही देशांचे सिद्धांत विकसित करणे गरजेचं आहे, जेणेकरून दोन्ही देश स्वतःच्या मार्गापासून भरकटणार नाहीत. पाकिस्तान शस्त्रास्त्रं कमी करण्यावर भारतासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचंही यावेळी पाकचे परराष्ट्र प्रवक्ते नफीस जकारियांनी सांगितलं आहे. पाकिस्तानची अणुशक्ती ही आत्मसंरक्षणासाठी असल्याचंही यावेळी जकारियांनी सांगितलं आहे.आमच्या समोर दोन आव्हानं आहेत. अणुशक्ती बाळगणारे अमेरिका आणि रुस हे दोन मोठे देश जोपर्यंत नेतृत्व करण्यास तयार होत नाहीत तोपर्यंत अणुशक्तीमध्ये कमी होणं मुश्कील असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामांनी सांगितलं आहे. ओबामांनी दोन दिवस चाललेल्या वॉशिंग्टनमधल्या सुरक्षा शिखर संमेलनात प्रतिपादन केलं होतं.
===========================================
...अन् सहा महिन्यांचा बालक पाहू लागला जग
...अन् सहा महिन्यांचा बालक पाहू लागला जग
जुने नाशिक - जन्मतः मोतीबिंदू झाल्याने सहा महिन्यांच्या बालकाचे भविष्य अंधारमय झाले होते. मात्र, डॉक्टरांच्या वेळीच व यशस्वी प्रयत्नांमुळे बालकाची 85 टक्के दृष्टी आली असून, लवकरच बाळ पूर्णपणे पाहू शकणार आहे. दृष्टी मिळाल्याने त्याच्या कुटुंबीयांचा आनंद गगनाला भिडणारा होता.
डॉक्टर व सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमुळे माझ्या सहा महिन्याच्या चिमुकल्याच्या आयुष्यातील अंधकार दूर झाला आहे. त्यांची नेहमी ऋणी राहील.
- रुख्साना मलिक
पाचोऱ्यातील बहारपुऱ्यामधील अय्युब मलिक कुटुंबात सहा महिन्यांपूर्वी जुबेर मलिक याचा जन्म झाला. त्यामुळे मलिक कुटुंबीय आनंदात होते. मात्र, बाळाला जन्मतःच मोतीबिंदू असल्याचे समजल्यावर कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले. चिमुकल्याच्या डोळ्यांची दृष्टी पुन्हा येण्यासाठी कुटुंबीयांनी प्रयत्न सुरू केले. त्यातही त्यांना यश आले नाही. कथडा येथील युवा आदर्श सोशल संस्था व तुलसी आय केअर हॉस्पिटलतर्फे होणाऱ्या नेत्ररोग तपासणी शिबिरात मोतीबिंदूच्या रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मलिक कुटुंबाला मिळाली.
रुख्साना मलिक व अयुब मलिक यांनी चिमुकल्यासोबत नाशिक गाठले. नातेवाइकांच्या मदतीने वडाळ्यात झालेल्या शिबिरात जुबेरच्या डोळ्यांची तपासणी केली. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून तो पूर्णपणे बरा होणार नाही, तर त्यास विशिष्ट प्रकारची लेन्स बसवावी लागणार होती. त्यासाठी मोठा खर्च येणार होता. मात्र, त्या कुटुंबाची परिस्थिती बघता डॉक्टरांनी त्यांना मोफत शस्त्रक्रिया व लेन्स बसविण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार सात दिवसांपूर्वी त्या चिमुकल्याच्या डोळ्यांची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. नंतर बाळाची 80 टक्के दृष्टी आल्याचे सांगण्यात आले. शस्त्रक्रियेची जखम बरी झाल्यानंतर लेन्स बसविल्यास शंभर टक्के दृष्टी परत येण्याची आशा व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत जुबेरच्या डोळ्यांची वेळोवेळी मोफत तपासणी होणार आहे.
===========================================
अच्छे दिवस कधी येतील हो? - शिवसेना
मुंबई - ‘साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा गुढीपाडवा. हिंदूंची म्हणा किंवा मराठीजनांची ही नवीन वर्षाची सुरुवात. पण नवीन वर्षात महाराष्ट्राला, मराठीजनांच्या जीवनात नवे असे काय मिळणार आहे? ज्यांच्यासाठी गुढ्या-तोरणे उभारली, भगव्या पताका फडकवल्या, राज्याला "अच्छे‘ म्हणजे आनंदाचे दिवस येतील, असे वाटेल तो पाडवा उगवलाच नाही‘, अशी खंत शिवसेनेने ‘सामना‘च्या अग्रलेखातून व्यक्त केली आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, ‘विचारांचे सोने दसऱ्याला लुटतात, पण पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रथा-परंपरा-शुभशकुन म्हणून गुंजभर तरी सोने विकत घेऊन वर्षाच्या शुभ दिनाची सुरुवात करावी तर महाराष्ट्रातील "सोने‘ पेढीवाले संपावर गेले आहेत. सोन्यासारख्या राज्यात सोन्याचा धूर निघायचे राहिले बाजूला, पण सोने-चांदीवालेही आपापली दुकाने बंद करून अंधारात बसले. महाराष्ट्रासाठी हा शुभशकुन नाही.‘ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी दौरे करत असूनही एकही देश भारताच्या बाजूने उभा नसल्याबद्दल अग्रलेखातून खंत व्यक्त केली आहे.
"शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्र ऐक्याची व मराठी स्वाभिमानाची गुढी पन्नास वर्षांपूर्वी उभारली. ही गुढीच महाराष्ट्राला जगण्याचे आणि लढण्याचे बळ देईल. ही गुढीच मस्तवाल राज्यकर्त्यांचा नाश करून मराठीजनांच्या स्वप्नातले राज्य मंत्रालयात आणील. हे शिवरायांचे राज्य शिवसेना राखील व वाढवत जाईल.‘ अशी आशा व्यक्त करत "याच महाराष्ट्र धर्माची गुढी उभारून मराठीजनांनी ऐक्याचे दर्शन देशाला घडवावे!‘ असे आवाहनही अग्रलेखात केले आहे.

भारतातील करव्यवस्थेत सुधारणा हवी: अमेरिका
वॉशिंग्टन - भारतामधील करव्यवस्थेत सुधारणा होण्याची आवश्यकता अधोरेखित करत अमेरिकेने भारतातील प्रस्तावित वस्तु व सेवा कर (जीएसटी) अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याची भूमिका व्यक्त केली आहे.
"भारतीय अर्थव्यवस्थेची प्रचंड गरज आणि अर्थव्यवस्थेच्या 10 टक्के असलेले कराचे प्रमाण नक्कीच उल्लेखनीय आहे. याचबरोबर, भारतामधील कर धोरण अधिक विकसित करण्यास आता मोठा वाव आहे. कर प्रशासनामधील निर्णयप्रक्रियेस लागणारा विलंब आणि त्या अनुषंगाने उद्योग जगतामध्ये उद्भविणाऱ्या समस्या ही भारतामधील मुख्य आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर जीएसटीस अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतामधील करव्यवस्थेमध्ये सुधारणा आणण्याच्या तेथील सरकारच्या प्रयत्नांस आमचा पाठिंबा आहे,‘‘ असे अमेरिकेच्या अर्थमंत्रालयाचे उपमंत्री नॅथन शीट्स यांनी सांगितले.
अमेरिका व भारत द्विपक्षीय संबंधांमधील करव्यवस्थेविषयीच्या आव्हानासंदर्भातही प्रगती होत असल्याचे शीट्स म्हणाले. अमेरिका व एकंदरच जगभरातील गुंतवणुकदारांसाठी भारतामधील करव्यवस्था हा संवेदनशील विषय असून या पार्श्वभूमीवर जीएसटी अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.

मध्य प्रदेशात 12 महिन्यांत 16 वाघ मृत
भोपाळ - मध्य प्रदेश राज्यामध्ये गेल्या सुमारे एका वर्षाच्या काळामध्ये चोरटी शिकार व इतर कारणांमुळे तब्बल 16 वाघांचा मृत्यु झाल्याची धक्कादायक बाब स्पष्ट झाली आहे. यांपैकी बहुसंख्य वाघांचा मृत्यु नैसर्गिकरित्या झाल्याचे येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले असले; तरी सरकारच्या अपयशामुळेच या वाघांचा मृत्यु ओढविल्याचा आरोप या क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेने केला आहे.
""कधीकाळी वाघांचे राज्य अशी ओळख असलेल्या मध्य प्रदेशची आता सर्वाधिक वाघांचा निवास असलेल्या राज्यांच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानापर्यंत घसरण झाली आहे. राज्य सरकार वाघांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्यामुळेच ही परिस्थिती ओढविली आहे. मध्य प्रदेशमध्ये आठ वर्षांनंतरही वाघांच्या संरक्षणाच्या उद्देशार्थ विशेष पथकाची स्थापना करण्यात आलेली नाही. मध्य प्रदेशमध्ये वाघांची चोरटी शिकार करणाऱ्या तस्करांना शिक्षा होण्याचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. तस्करीसंदर्भात माहिती गोळा करण्याचे प्रमाण जवळपास शून्य आहे. नजीकच्या काळात तस्करांना अटक झाल्याचेही आढळून आलेले नाही,‘‘ असे "प्रयत्न‘ या स्वयंसेवी संस्थेचे संचालक अजय दुबे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वाघांच्या सुरक्षेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात असल्याचा दावा वनविभागाचे उच्चाधिकारी शाहबाझ अहमद यांनी केला आहे. बहुसंख्य वाघांचे मृत्यु हे नैसर्गिक असून त्यांच्या शिकारीचे प्रमाणही नगण्य असल्याचे अहमद यांनी यावेळी सांगितले. विशेष पथकाच्या नियुक्तीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मृत वाघांपैकी तब्बल 7 वाघ पेंच व्याघ्रप्रकल्पामधील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्याघ्रप्रकल्पामध्ये गेल्या महिन्यामध्ये एका वाघिणीची तिच्या दोन बछड्यांसह शिकार करण्यात आली होती. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यातही पेंचमध्ये चार तस्करांना अटक करण्यात आली होती.

मोदींचे 'मेक इन इंडिया' यशस्वी होते आहे: मूडीज
नवी दिल्ली: देशात यावर्षी जानेवारी महिन्यात झालेली उच्चांकी थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया‘ उपक्रमाचे यश आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय पतमापन संस्था मूडीजने आपल्या अहवालात केले आहे. "थेट परकीय गुंतवणूकीतील वाढ ही परदेशी गुंतवणूकदारांचा मजबूत भारतीय अर्थव्यवस्थेतील उत्साही सहभाग दर्शवीत आहे. काही क्षेत्रांमध्ये परकीय गुंतवणूक मर्यादांचे उदारीकरण आणि आणि मेक इन इंडिया उपक्रमांसारख्या प्रयत्नांना आता यश येत असल्याचे दिसत आहे", असे या अहवालात म्हटले आहे.
जानेवारी 2016 मध्ये भारतात तब्बल तीन अब्ज डॉलर गुंतवणूकीचा ओघ आला आहे. 2003 सालापासून 2014 पर्यंत कायम चालू खात्यात तूट कायम होती परंतु चालू खात्यातील शिल्लक व निव्वळ परकीय गुंतवणकीमुळे (बेसिस बॅलेन्स) गेल्यावर्षी (2015) चालू खात्यात अतिरिक्त रोख रक्कम जमा झाली आहे. यामुळे रुपयाचे मूल्यदेखील सुधारण्यास मदत होणार आहे. "सध्या केवळ परदेशात काम करणाऱ्या भारतीयांकडून येणाऱ्या निधीत (रेमिटन्स) झालेली घट ही चिंतेची बाब आहे. पश्चिम आशियातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थांमुळे सप्टेंबर ते डिसेंबर 2015 मध्ये भारतात येणारा रेमिटन्स 30 टक्क्यांनी कमी झाला आहे. परंतु सध्या कमोडिटीजच्या किंमतीत मोठी घट झाल्याने मागील तीन वर्षापासून भारताची बाह्य आर्थिक गरज कमी झाल्याचे,‘ मूडीजने म्हटले आहे.

"औद्योगिक कॉरीडोर, गुंतवणूक आणि उत्पादन क्षेत्रांचा विकास आणि स्मार्ट सिटीज प्रकल्पांमुळे परकीय गुंतवणूकीला चालना मिळेल. विशेषतः उत्पादन क्षेत्रातील ओघ वाढणार आहे. येत्या 2022 पर्यंत उत्पादन क्षेत्राची जीडीपीमधील हिस्सेदारी 22 टक्क्यांवर नेण्याच्या सरकारचा प्रयत्न आह. तसेच पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूक आणि मागील अर्थसंकल्पात या क्षेत्रासाठी विशेष निधीच्या स्थापनेमुळे या क्षेत्रात खासगी कंपन्यांचा सहभाग वाढीस लागेल. पर्यायाने भारतात या क्षेत्रातील समस्या दूर होऊन आणखी परकीय गुंतवणूक वाढेल," असे संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

संपूर्ण जग कोसळल्यासारखे वाटले: बेन स्टोक्स
लंडन - नुकत्याच झालेल्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रॅथवेट याने अखेरच्या षटकातील चार चेंडूंवर सलग चार षटकार मारत विंडीजला स्वप्नवत विजय मिळवून दिला होता. ब्रॅथवेटच्या या तुफानी फटकेबाजीचे लक्ष्य झाला तो इंग्लंडचा अष्टपैलु खेळाडू बेन स्टोक्स....
ब्रॅथवेट एकीकडे गगनचुंबी षटकार मारत असताना स्टोक्स याच्या चेहऱ्यावरील निराशा मात्र लपत नव्हती. या क्षणानंतर आजुबाजुचे सर्व जग कोसळत असल्याची भावना झाल्याचे स्टोक्स याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
""माझ्यामुळे ब्रिटनने विश्वकरंडक गमाविल्याची माझी धारणा झाली. माझा स्वत:वर विश्वास बसत नव्हता. मी पूर्णपणे उध्वस्त झालो होतो. निराशा ही त्यावेळी मनामधील सर्वांत प्रभावी भावना होती,‘‘ असे स्टोक्स याने म्हटले आहे. दरम्यान, स्टोक्स याला पाठिंबा दर्शविताना स्ट्युअर्ट ब्रॉड आणि ऍलेस्टर कुक या ब्रिटीश खेळाडूंनी बेन इंग्लंडसाठी पुन्हा एकदा अंतिम षटकात गोलंदाजी करेल, असा आशावाद व्यक्त केला आहे.
स्टोक्स याने यावेळी ब्रॅथवेटची मोकळ्या मनाने प्रशंसा केली. ""ब्रॅथवेट हा खरचं एक प्रतिभावान खेळाडू आहे. तो सामना संपल्यानंतर माझ्याशी बोलण्यासाठी आला. मी वेस्ट इंडिजच्या संघास मनापासून शुभेच्छा दिल्या. प्रतिस्पर्धी संघाचा आदर ठेवणे आवश्यक असून मैदानावरील घडामोडी मैदानावर संपावयास हव्यात,‘‘ असे स्टोक्स याने म्हटले आहे.

लातूरकडे वाहतोय माणुसकीचा झरा
कर्जत - राज्यातील अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई आहे. मराठवाड्यातील लातूर परिसरात पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे सरकार रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा विचार करत आहे. या तीव्र दुष्काळाच्या बातम्या ऐकून-वाचून कर्जतमधील काही सामाजिक कार्यकर्ते अस्वस्थ झाले. दररोज त्यांचा घास ओठाशी अडू लागला. आपणही काहीतरी मदत केली पाहिजे, या भावनेतून हे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. त्यांनी कर्जतमधून लातूरला जाणाऱ्या एक्स्प्रेसने दुष्काळग्रस्तांसाठी पाणी पाठवण्यास सुरवात केली आहे. विहिरी, नद्या, तलाव कोरडे पडले असले, तरी माणुसकीचा झरा अजूनही वाहत आहे, याचा अनुभव यातून दुष्काळग्रस्तांना येत आहे.
लातूरकडे वाहतोय माणुसकीचा झरा
दररोज वृत्तपत्रांत पाणीटंचाईच्या बातम्या वाचून कर्जतमधील ‘राज कॉटेज’चे मालक मोहनराज, स्मिता म्हामुणकर, राजेश कालवार, अशोक ओसवाल, रमेश मुंढे, दीपक बेहेरे, संजीव दातार, मंदार मेहेंदळे यांनी लातूरमध्ये जाऊन पाहणी केली. तहानेने व्याकूळ झालेली माणसे पाहिली. खपाटलेली गुरांची पोटे पाहिली. पाण्याच्या शोधात फिरणारी पाखरे पाहिली. या दुष्काळाच्या झळा त्यांच्या काळजापर्यंत पोचल्या. त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. तेथील काही दुष्काळग्रस्तांशी बोलून त्यांनी कर्जतमधून येणाऱ्या लातूर एक्स्प्रेसने शक्य तेवढे पाणी पाठवण्याचे ठरवले. त्यासाठी या कार्यकर्त्यांनी रिकामे प्लॅस्टिकचे कॅन गोळा केले आणि पाणी पाठवण्यास सुरवातही केली. कर्जतमधील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
===========================================
त्याही अवस्थेत मातेच्या ओठांवर फुलविले हास्य
प्रसूतीच्या कळा अर्थात मातेचा दुसरा जन्म! या कळांच्या काळात वाडिया हॉस्पिटलमध्ये प्रसूतीशास्त्राचे धडे गिरविणाऱ्या, प्रॅक्टिस करणाऱ्या दोघी मुली बाळाचा जन्माच्या आनंदाने इतक्या उत्साहित होतात, की त्यांच्या त्या मजेशीर वागण्याने प्रसूतीकळा देणारी ती माता हसायला लागली. त्यात बाळाच्या जन्माने आनंदाने उड्याच मारणाऱ्या या दोन मुलींपैकी एक मुलगी म्हणजे डॉ. क्षमा अघोर. यांच्या जीवनातील हा अविस्मरणीय क्षण त्यांच्याच शब्दांत.
त्याही अवस्थेत मातेच्या ओठांवर फुलविले हास्य
माझा मोठा भाऊ डॉक्टर आहे. त्यामुळे मलाही डॉक्टर होण्याची इच्छा होती. मुलगी असल्याने घरच्यांना मी प्रसूतीशास्त्र विषय घ्यावा असे वाटले. त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळाले. एम.बी.बी.एस. करीत असताना मानवी शरीराची स्वतंत्र हाताळणी करता आली नव्हती. मात्र, एमडीच्या प्रवेशानंतर प्रसूतीशास्त्राचे धडे गिरवत असताना मला वाडिया हॉस्पिटलच्या शासकीय मॅटर्निटी हॉलमध्ये अनेक महिलांना प्रसूतीसाठी अभ्यासता आले.
एक दिवस सिस्टरने आम्हाला बोलावले. मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी त्या वॉर्डत गेलो. ती नॉर्मल डिलेव्हरी होती. मात्र, त्या सिस्टरला सोबत कोणी नसल्याने त्यांनी तातडीने आम्हाला बोलावले होते. प्रसूतीसाठी आलेल्या त्या महिलेचीही ती पहिलीच खेप असल्याने ती खूप ओरडत होती आणि अचानक बाळ दिसू लागले आणि माझ्या सोबत शिकणारी ती मैत्रीण किंचाळली. त्या बाळाला पाहून ती आनंदाने नाचायलाच लागली. तिचा आनंद पाहून बाळ पकडण्यासाठी सांगितल्यावर माझी होत असलेली थरथर मी क्षणभर विसरले आणि मीही आनंदाने हसू लागले. आमचे खूश होणे पाहून ती त्रासात असलेली मातादेखील आनंदाने बोलू लागली. ती तिचा त्रास क्षणार्धात विसरली आणि आमचे ते मजेशीर वागणे पाहून सिस्टर आम्हाला पाहून हसत होत्या. तो क्षण, जो आनंद देऊन गेला तो कायम स्मरणात राहिला. पुढे अनेक वर्ष असे आनंदाचे क्षण मला अनुभवता आले. एकदा सात वेळा ऍबॉर्शन झालेल्या मातेला माझ्याकडून उपचार घेतल्यानंतर मूल झाले. 39व्या वर्षी तीदेखील अशीच आनंदाने खूश झालेली पाहून तो पहिला दिवस पुन्हा आठवला.
===========================================
ब्रुसेल्स हल्ल्याप्रकरणी नव्या संशयिताचा शोध
ब्रुसेल्स - युरोप खंडामधील बेल्जियम या देशाची राजधानी असलेल्या ब्रुसेल्स येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आणखी एका संशयित दहशतवाद्याचे नवे चित्रीकरण येथील सुरक्षा दलाने प्रसिद्ध केले आहे. या संशयितास नागरिकांनी पाहिले असल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन सुरक्षा दलातर्फे करण्यात आले आहे.
सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या माध्यमामधून हॅट व फिकट रंगाचे जॅकेट घातलेल्या या संशयिताची हालचाल पकडण्यात यश आले आहे. ब्रुसेल्स शहरामधील युरोपिअन युनियनच्या इमारतींजवळील भागामधून हा संशयित नाहीसा झाला असून शहरामधील मेलबीक मेट्रो स्थानकाजवळून हे ठिकाण फारसे दूर नाही. या संशयिताने जॅकेट काढून टाकल्याचे निष्पन्न झाले असून त्यासंदर्भातील कोणतीही माहिती असल्यास ती सुरक्षा दलास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याआधी मिळविण्यात आलेल्या चित्रीकरणामध्ये हा संशयित इतर दोन आत्मघातकी दहशतवाद्यांजवळून विमानतळावरील ट्रॉली ढकलताना दिसला होता. संशयिताची शेवटची हालचाल मेलबीक मेट्रो स्थानकावर घडविण्यात आलेल्या स्फोटाआधी सुमारे 40 मिनिटांपूर्वी दिसून आली आहे.
ब्रुसेल्समधील विमानतळ व मेलबीक मेट्रो स्थानकावर गेल्या 22 मार्च रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात 32 नागरिक मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.

No comments:
Post a Comment