[अंतरराष्ट्रीय]
१- टोकियो - उ. कोरियाकडून 'आयसीबीएम'च्या इंजिनची चाचणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- वेळ वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदी विमानातच करतात झोप पूर्ण
३- ‘सराफा बंद’मुळे सोने खरेदीचा मुहूर्त चुकला; वस्तूखरेदीला पसंती
४- आधी गुजरातचे तुकडे करा! - राज ठाकरे
५- महाराष्ट्राच्या पाणीटंचाईकडे केंद्राचे दुर्लक्ष
६- विजय मल्ल्यांनी ईडीकडे मागितली आणखी मुदत
७- 250 तरुण तिरंगा घेऊन श्रीनगरला जाणार
८- स्वातंत्र्यानंतर उद्दिष्टांचा विसर- मोहन भागवत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- अमित शाह सुटले, मग राम मंदिर कोर्टात का अडकलं : राज ठाकरे
१०- मुंबई; लोकलची जुनी ‘ऊर्जा’ इतिहासजमा होणार, ऐतिहासिक प्रवासासाठी 10 हजाराचं तिकीट
११- 'मेस्मा'च्या हालचालीनंतरही 'मार्ड' संपावर ठाम
१२- मुंबईत मनसे विभाग अध्यक्षावर धारदार शस्त्राने हल्ला
१३- महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही - राज ठाकरे
१४- कोखापूर; १३ एप्रिलपासून महालक्ष्मी मंदिर प्रवेशासाठी लढा - तृप्ती देसाई
१५- पुणे; ...तर माझाही कन्हैया होईल : नाना पाटेकर
१६- महाविद्यालयांत राजकारण रंगणार
१७- एसटीच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण घटले
१८- मुंबई - कायदेशीर मत आल्यानंतर दोषींवर कारवाई
१९- नागपूर; अंधांच्या डोळ्यांत प्रकाश पेरणारे महात्मे रुग्णालय
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- नांदेड; पाणी द्या, अन्यथा अंत्यविधीस या, स्मशानात चिता रचून आमरण उपोषण
२१- इसापुरच्या पाण्यासाठी उमरीत रास्ता-रोको आंदोलन
२२- पटना; 'दारूअभावी' बिहारमध्ये झाला दोघांचा मृत्यू
२३- कोल्हापूर; अंबाबाई शालूचा लिलाव दुसऱ्यांदा तहकूब
२४- मुंबई- डॉक्टरांच्या संपाविरुद्ध हायकोर्टात याचिका
२५- पुणे- हडपसरमध्ये मोटारीने घेतला पेट; एकाचा मृत्यू
२६- कोलकाता - सुनील नारायणची गोलंदाजी शैली वैध
२७- शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांचा प्रवेश; 'ती'ने उभारली परिवर्तनाची गुढी
२८- पुणे; 'जेईई'साठी 75 टक्के गुणांची अट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२९- आयपीएल : मुंबई-पुण्यात वरचढ कोण? वानखेडेवर आज रंगणार महामुकाबला
३०- IPL उद्घाटन सोहळ्यात ब्राव्होचा 'चॅम्पियन डान्स'
३१- देवाला मराठी येते?, चाहत्याचा प्रश्नाला सचिनचं उत्तर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
माणिकराव लोह्गावे, बालाजी गोडसे, कैलाश गोरांत्याल, विश्वजित उमरेकर, संध्या चौधरी, सुरेश खांबेगावकर, पंडित नरवाडे, पिराजी पाटील, लखन अट्टल, मारोती झाडे, विश्वजित उमरेकर, सन्नीसिंघ बुंगई
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
जन्मामुळे नव्हे तर केवळ सदगुणांमुळेच आपण थोर बनतो
(श्रद्धा जाधव, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
===========================================

लोकलची जुनी ‘ऊर्जा’ इतिहासजमा होणार, ऐतिहासिक प्रवासासाठी 10 हजाराचं तिकीट
मुंबई : तब्बल 91 वर्षांच्या सेवेनंतर डीसी विद्युतप्रवाहावर धावणारी लोकल इतिहासजमा होणार आहे. डीसीवर चालणारी शेवटची विशेष लोकल आज रात्री 11.30 वाजता कुर्ला ते सीएसटी स्थानकांदरम्यान धावणार आहे.
विशेष म्हणजे या ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी प्रवाशांना 10 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. त्यासाठी तीन डबे प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तिकिटांची विक्री सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसद्वारे करण्यात येणार आहे.
Central Railway
@Central_Railway
Official Twitter Account of Central Railway
Mumbai · http://www.cr.indianrailways.gov.in
यातून जमा होणारा निधी राज्यातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे. शेवटच्या डीसी लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सीएसटी येथील खास दालनात डीसी ते एसी विद्युत परिवर्तनाच्या कामांचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात येईल.पहिली डीसी लोकल 3 फेब्रुवारी 1925 रोजी मुंबई ते कुर्ला स्थानकादरम्यान धावली होती.
===========================================
===========================================
अमित शाह सुटले, मग राम मंदिर कोर्टात का अडकलं : राज ठाकरे
मुंबई : आंदोलनं अर्धवट सोडतो अशी टीका मनसेवर माध्यमातून होते. मात्र कोणतं आंदोलन अर्धवट सोडलं? मोबाईलवर मराठी, रेल्वेतील नोकऱ्या, मराठी पाट्या, हे मनसेचं यश मनसेमुळेच महाराष्ट्रातील 65 टोलनाके बंद झाले. मात्र राम मंदिराच्या आंदोलनाचं काय झालं? राम मंदिराचा वाद कोर्टात आहे म्हणता, मात्र अमित शाह कोर्टातून सुटतात, मग राम मंदिराचा प्रश्न का नाही? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, शिवसेने, पीडीपी, ओवेसी या सर्वांवर चौफेर घणाघात केला.
मनसेने आयोजित केलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी देशभरात सध्या सुरु असलेल्या अनेक विषयांवर तिरकस भाष्य केलं.
अमित शाह सुटतात, राम मंदिर का नाही?
मनसेवर आंदोलन अर्धवट सोडल्याचा आरोप करता, मग तुमच्या राम मंदिर आंदोलनाचं काय झालं? ज्या घोषणेवरून सत्तेत आला, त्या घोषणेचं काय झालं? राम मंदिराचा मुद्दा कोर्टात आहे म्हणता, पण अमित शहांचा मुद्दा पण कोर्टातच होता, ते सुटले मग राम मंदिराचा मुद्दा का सुटत नाही, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
जे काँग्रेसच्या राज्यात, तेच मोदींच्या राज्यात
जी परिस्थिती काँग्रेसच्या राज्यात होती, तीच परिस्थिती मोदींच्या राज्यातही आहे. मोदींकडून लोकांना खूप आशा होती. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्वीही होत होत्या, आताही होत आहेत, मग त्यांच्यात आणि यांच्यात काय फरक?, असंही सवाल राज यांनी विचारला.
आधी गुजरातचे तुकडे करा
सातत्याने महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भाषा सुरु आहे. संघाचीही तीच भावना आहे, मात्र महाराष्ट्राकडे पाहण्यापूर्वी आधी तुमच्या लाडक्या गुजरातचे तुकडे करा, असा सल्ला राज यांनी संघाला दिला.
===========================================
आयपीएल : मुंबई-पुण्यात वरचढ कोण? वानखेडेवर आज रंगणार महामुकाबला
मुंबई : रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आयपीएलचं गतविजेतेपद राखण्यासाठी सज्ज झाली आहे. आयपीएलच्या नवव्या मोसमाला आजपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होत असून, सलामीच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा मुकाबला महेंद्रसिंग धोनीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सशी होईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रात्री 8 वाजता हा सामना होणार आहे.
वास्तविक महाराष्ट्रातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात होत असलेल्या आयपीएलच्या सामन्यांवर अनिश्चिततेचं सावट होतं. आयपीएल सामन्यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेची सुनावणी मंगळवारी अपेक्षित आहे. पण उच्च न्यायालयानं सलामीच्या सामन्याला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळं मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे संघांमधला सलामीचा सामना पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार आज रात्री आठ वाजता सुरू होईल.
चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांच्या अनुपस्थितीत आगामी दोन मोसमांसाठी रायझिंग पुणे आणि गुजरात लायन्स संघांचा आयपीएलमध्ये समावेश करण्यात आला आहे. आयपीएलमधल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नई आणि राजस्थान संघांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.
===========================================

'मेस्मा'च्या हालचालीनंतरही 'मार्ड' संपावर ठाम
मुंबई: राज्य सरकारनं ‘मेस्मा’ लावण्याची तयारी करूनही ‘मार्ड’ने संप मागे घेण्याची कोणतीही तयारी दाखवलेली नाही. जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या समर्थनार्थ मार्डनं राज्यव्यापी संप पुकारल्यामुळं रुग्णांचे हाल सुरू आहेत.
मुंबईसह राज्यभरातील सरकारी रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा पाहायला मिळाल्या.
दरम्यान मार्डच्या संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचेकवर आज सुनावणी होणार आहे. तेव्हा मार्डविरोधात सरकार आणि हायकोर्ट काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्रविभागाच्या प्रमुख रागिणी पारेख यांना हटवण्याच्या मागणीसाठी मार्डनं संप पुकारला आहे.
निवासी डॉक्टरांनी डॉ. तात्याराव लहाने आणि रागिणी पारेखांवर मानसिक छळाचा आरोप केला आहे. मात्र संप पुकारणाऱ्या डॉक्टरांविरोधात मेस्मा लावा असे आदेश विधान परिषदेच्या सभापतींनी दिले आहेत. तसंच विधानभवनात वैद्यकिय शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर मार्डविरोधात मेस्मानुसार कारवाई करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
===========================================
पाणी द्या, अन्यथा अंत्यविधीस या, स्मशानात चिता रचून आमरण उपोषण
नांदेड: मराठवाड्यातील पाणी टंचाई किती भीषण आहे, हे पुन्हा एका समोर आलं आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील माळाकोळीच्या ग्रामस्थांनी स्मशानात आमरण उपोषण सुरू केलं आहे. ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
सुमारे 12 हजार लोकवस्तीच्या या गावाला सध्या पाणी टंचाईचा समान करावा लागत आहे. या गावाजवळ लिंबोती धरण आहे. या धरणातून नांदेडसह लातूर जिल्हात अनेक ठिकाणी पाणी नेण्यात आलं आहे. पण या धरणातून पाईपलाईन टाकून माळाकोळीला मात्र पाणी देण्यात आलं नाही. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी येथील ग्रामस्थांची झाली आहे.
याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडं वारंवार पाठपुरावा केला. मात्र काहिही उपयोग झाला नाही. त्यामुळं अखेर स्मशानात चिता रचून ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग अवलंबवला आहे. सरकारनं ठोस कृती न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
माळाकोळी हे गाव शिल्पकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. देशातील विविध भागात इथले कलाकार दगडातून देव साकारतात. दगडाला देवत्त्व देतात. पण गावालगत धारण असूनही ग्रामस्थांना पाणी मिळत नाही आहे. निवेदने झाली, किरकोळ आंदोलने झाली, तरीही सरकारला जाग येत नाही. त्यामुळेच आता एक तर सरकारने माळाकोळीला पाण्यासाठी ठोस कृती करावी, अन्यथा ग्रामस्थांच्या अंत्यविधीस यावे असा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे.
===========================================
IPL उद्घाटन सोहळ्यात ब्राव्होचा 'चॅम्पियन डान्स'
मुंबई : आयपीएलच्या नवव्या मोसमाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी रात्री मुंबईत संपन्न झाला. वरळीत नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियाच्या इनडोअर स्टेडियममध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्ताने क्रिकेट आणि बॉलिवूडचे स्टार्सही रेड कार्पेटवर अवतरले.
आयपीएलच्या आठही संघांच्या कर्णधारांनी आणि मुंबई तसंच पुण्याच्या संघातील खेळाडूंनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती. आठही कर्णधारांनी यावेळी सर्व क्रिकेटर्सच्या वतीने खिलाडूवृत्तीची शपथ घेतली.
पण आयपीएलच्या याआधीच्या मोसमांपेक्षा यंदाच्या उदघाटन सोहळ्याचा रंग काहीसा फिका वाटला. वेस्ट इंडीजचा क्रिकेटर ड्वेन ब्राव्होचा ‘चॅम्पियन्स’ डान्स हे या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरलं. ब्राव्होने ‘चलो चलो’ या गाण्यावरही डान्स केला. त्याशिवाय कतरिना कैफ, जॅकलिन फर्नांडिस आणि योयो हनी सिंगच्या परफॉर्मन्सलाही प्रेक्षकांची दाद मिळाली.
===========================================
देवाला मराठी येते?, चाहत्याचा प्रश्नाला सचिनचं उत्तर
मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या मनाचा मोठेपणा गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आला. ट्विटरवर सचिनला मराठीतून तिरकसपणे विचारलेल्या प्रश्नाना त्याने अतिशय शांतपणे उत्तर दिलं. प्रश्न विचारणाऱ्यासाठी ही चपराकच होती, असं म्हणावं लागेल.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने सचिन तेंडुलकरने ट्विटरवरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. #AskSRT हा हॅशटॅग वापरुन चाहत्यांनी सचिनशी संवाद साधला.
मात्र सुरेश जोशी नावाच्या चाहत्याने गुढीपाडव्याची चर्चा आंग्ल भाषेतून असेल की मराठीतून?, मला माहित आहे प्रश्नाचं उत्तर येणार नाही! देवाला मराठी येते? असा सवालही त्याने विचारला.
त्यावर सचिनने दिलेलं उत्तर,
“सुरेश, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. मी गुढीपाडवा घरी साजरा केला. नातेवाईक माझ्या घरी जमले आहेत. दुपारी एकत्र जेवलो आणि आणि रात्रीचं जेवणही एकत्र करणार आहोत.”
===========================================
मुंबईत मनसे विभाग अध्यक्षावर धारदार शस्त्राने हल्ला
मुंबई : मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिंडोशी विभाग अध्यक्ष अरुण सुर्वे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. अज्ञातांनी सुर्वे यांच्या मानेवर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार केले.
चारकोप परिसरात आज दुपारी ही घटना घडली. या हल्ल्यात अरुण सुर्वे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.
'दारूअभावी' बिहारमध्ये झाला दोघांचा मृत्यू
- ऑनलाइन लोकमतपाटणा, दि. ९ - संपूर्ण बिहारमध्ये एप्रिल महिन्यापासून दारूबंदी लागू करण्यात आली असून अनेक नागरिक दारूअभावी कासावीस झाले आहेत. ही कडक दारूबंदी दोन जणांच्या जीवावर बेतली असून दारू न मिळाल्याने राज्यात दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून त्यात एका पोलिसाचाही समावेश आहे.मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी गेल्या वर्षी निवडणुकीदरम्यान केलेल्या घोषणेनुसार, १ एप्रिलपासून संपूर्ण राज्यात दारूबंदी लागू करण्यात आली, रोज दारू प्यायची सवय असलेल्या नागरिकांना दारू न मिळाल्यामुळे त्रास झाल्याचे अनके किस्से या आठवड्याभरात समोर आले. अनेकांना चक्कर आली तर काहींच्या शरीराला कंपही सुटला. दारूअभावी एका सहाय्यक पोलिसाचा व आणखी एका व्यक्तीचा तर मृत्यूच झाला.मिळालेल्या माहितीनुसार, रघुनंदन बेसरा असे मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसाचे नाव असून रोजचा दारूचा कोटा न मिळाल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते, त्यांना उपचारांसाठी पाटणा मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल (पीएमसीएच) येथे दाखल करण्यात आले होते. मात्र तेथेच त्यांचा मृत्यू झाला. तर दारूअभावी मृत्यूमुखी पडलेल्या दुस-या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.राज्यात १ एप्रिलपासून दारूबंदी लागू करण्यात आली, त्यानंतर अवघ्या ४-५ दिवसांत लोक दारूअभावी आजारी पडू लागले, विक्षिप्त वर्तन करू लागले, एका व्यक्तीने तर नशा मिळवण्यासाठी चक्क साबणाची वडीच खाल्ली
===========================================
वेळ वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदी विमानातच करतात झोप पूर्ण
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ९ - विदेश दौ-यांच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेकदा लक्ष्य केले जाते, विरोधक त्यांच्यावर टीकाही करत असतात. मात्र जास्तीत जास्त देशांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यावर मोदींचा भर असून ते विरोधकांच्या टीकेकडे जास्त लक्ष देत नाहीत, ना भाष्य करतात.. मात्र असे असले तरी हेच मोदी परदेश दौ-यांदरम्यान काटेकोरपणे वेळेची बचत करण्यास प्राधान्य देतात आणि त्यासाठीच रात्री विमानप्रवास करून ते प्रवासादरम्यानच आपली झोप पूर्ण करतात.'एअर इंडिया'च्या फ्लाईटने संपूर्ण जगभर प्रवास करणा-या पंतप्रधान मोदींच्या चेक-इन बॅग्ज सध्या विमानाच्या बाहेर येताना दिसतच नाहीत, त्याचे कारण म्हणजे वेळ वाचवण्याच्या दृष्टीने मोदी रात्री हॉटेलमध्ये आराम करण्याऐवजी त्याच वेळेत प्रवास करण्यास प्राधान्य देतात आणि विमानातच आपली झोप पूर्ण करतात.पंतप्रधान मोदी नुकतेच, बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या दौ-यावर गेले होते. या दौ-यादरम्यान मोदींनी तीन रात्री विमानातूनच प्रवास केला, तर दिवसभरात त्यांनी या देशांना भेटी देऊन आपली कामे पूर्ण करण्यावर भर दिला. दिल्ली ते ब्रसेल्स ( बेल्जियम), ब्रसेल्स ते वॉशिंग्टन डी.सी आणि तेथून रियाधला जाण्यासाठी त्यांनी रात्रीच प्रवास करण्यास प्राधान्य दिले.एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी केवळ २ रात्री, वॉशिंग्टन व रियाध येथे हॉटेलमध्ये मुक्काम केला. ' केवळ ९७ तासांमध्ये मोदींनी अमेरिकेसह विविध देशांचा दौरा केला. जर त्यांनी रात्री विमान प्रवास करण्याचा निर्णय घेतला नसता तर याच दौ-यासाठी आम्हाला कमीत कमी ६ दिवस तरी लागले असते' असे त्या अधिका-याने नमूद केले.दरम्यान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे विदेश दौरे हे अधिक काळाचे व एका शहरापुरतेच मर्यादित असायचे, अशी माहिती एका अधिका-याने नाव गुप्त राखण्याच्या अटीवर सांगितली. ते फार कमी वेळी रात्री प्रवास करत असत. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनांनुसार, विदेश दौरे हे थोडक्यात आटोपणारेच असतात. रात्रीच्या सुमारास जर कोणतीही महत्वपूर्ण कामे होणार नसतील, तर अशा वेळेस रात्री हॉटेलमध्ये थांबणे म्हणजे वेळेचा दुरूपयोग केल्यासारखेच आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी ते रात्रीच्या वेळेस प्रवास करण्यास प्राधान्या देतात, अशी माहिती अधिका-याने दिली.आपल्या दोन वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान मोदी ९५ दिवस विदेश दौ-यांवर होते, तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग युपीए-१ व युपीए-२ च्या कार्यकाळात याच अवधीत (२ वर्ष) विदेश दौ-यानिमित्त ७२ दिवस बाहेर होते. पंतप्रधान मोदींनी २० दौ-यांमध्ये ४० देशांना भेट दिली तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी युपीए-१ च्या कार्यकाळात १५ दौ-यांमध्ये फक्त १८ देशांना तर युपीए-२ च्या कार्यकाळात दोन वर्षांमध्ये १७ दौ-यांमध्ये २४ देशांना भेट दिली.
===========================================
१३ एप्रिलपासून महालक्ष्मी मंदिर प्रवेशासाठी लढा - तृप्ती देसाई
- ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, ९ - मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शनी चौथरामहिलांसाठी खुला करून दिल्याने सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. देवस्थानच्या या निर्णयाचे सर्व स्तरांवर स्वागत होत असून शुक्रवारी संध्याकाळी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी चौथऱ्यावर जाऊन शनीच्या शिळेचे दर्शन घेतले. मात्र शनि चौथ-यावर प्रवेश मिळणे ही फक्त सुरूवात असल्याचे त्यांनी नमूद केले. आमचा लढा कायम सुरू राहणार असून १३ एप्रिलपासून महालक्ष्मी मंदिरातील गाभा-यात प्रवेश मिळावा याकरता लढा देणार असल्याचे देसाई यांनी नमूद केले.' आम्ही तीन महिन्यांपूर्वी संघर्ष सुरू केला आणि महिला शक्तीचा विजय झाला, ही तर केवळ सुरुवात आहे. महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळावा म्हणून १३ एप्रिलपासून आंदोलन करणार आहोत' असे त्या म्हणाल्यागेल्याच आठवड्यात महालक्ष्मी मंदिराच्या गाभा-यात प्रवेश करणा-या महिला कार्यकर्त्यांना महिला पुजा-यांनीच रोखून धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. त्याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी हा निर्णय घेतला असून ज्या ज्या मंदिरात महिलांना केवळ महिला आहेत म्हणून प्रवेश नाकारला जाईल, तेथे आमचा लढा सुरूच राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
===========================================
...तर माझाही कन्हैया होईल : नाना पाटेकर
- पुणे : मी नट म्हणून बोललो की, माझा कृष्ण म्हणून गौरव होतो, तेच मी कार्यकर्त्याच्या भूमिकेतून बोललो तर माझा कन्हैया होईल. जागा बदलली की भूमिका बदलते. एखादी भूमिका घेतल्यानंतर त्याचे होणारे परिणाम भोगण्याची तयारी आमच्याकडे नाही, त्यामुळे आपण ठाम भूमिका घेत नाही. ठाम भूमिका घेऊन त्याचे परिणाम भोगण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.अच्युत गोडबोले व नीलांबरी जोशी यांनी विदेशी चित्रपटसृष्टीवर लिहिलेल्या ‘लाइमलाइट’ या पुस्तकाचे प्रकाशन पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अच्युत गोडबोले, नीलांबरी जोशी, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर उपस्थित होते.नाना पाटेकर म्हणाले, ‘‘मराठवाडा, खान्देश, विदर्भात फिरल्यानंतर माझी दु:खाची व्याख्या बदलली. पाणी, वीज या मूलभूत गोष्टीही आपण त्यांना देऊ शकलेलो नाही. त्यांना वंचित ठेवणे ही काहींची गरज असल्यामुळे कदाचित असे घडले असेल. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांनी आतापर्यंत ३० कोटी रुपयांची मदत केली आहे. यातून विधवा महिलांना मदतीचे धनादेश देण्याची तात्पुरती मलमपट्टी केली. त्याचबरोबर ३६५ किलोमीटर नदीपात्र विस्तीर्ण करण्याचे काम यातून करण्यात आले. शासकीय यंत्रणेला हेच काम करण्यास अनेक वर्षे लागली असती. अच्युत हा लिहिण्यापेक्षा सांगतो. गोष्ट सांगितल्याप्रमाणे तो पुस्तकातून लिहितो. त्यामुळे त्याचे लिखाण वाचायला कंटाळा येत नाही, ते बोजड वाटत नाही अशा शब्दांत पाटेकर यांनी अच्युत गोडबोले यांचा गौरव केला.जब्बार पटेल म्हणाले, ‘‘जगात वेगळे काही करणाऱ्या मंडळींवर हे पुस्तक लिहिले आहे. विदेशी चित्रपटाला सर्वांगीण स्पर्श करण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणारा नाना आणि बिहारमधील लोकांच्या मदतीसाठी धावून येणारा प्रसिद्ध अभिनेता ब्रॅन्डो यांचे नाते असल्याचे दिसून येते.’’अच्युत गोडबोले यांनी सांगितले, ‘‘विदेशी साहित्य, चित्रपट, संगीत यावर लिहिण्याचा मानस केला होता. त्यानुसार साहित्यावर झपुर्झाचे दोन भाग लिहिले. त्यानंतर चित्रांवर कॅनव्हास लिहिले. चित्रपटांविषयी लाइमलाइट या पुस्तकांमध्ये सविस्तर मांडणी केली आहे.’’
===========================================
‘सराफा बंद’मुळे सोने खरेदीचा मुहूर्त चुकला; वस्तूखरेदीला पसंती
- चेतन ननावरे, मुंबईगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सराफांचा बंद कायम राहिल्याने सोने खरेदीसाठी आतुर असलेल्या ग्राहकांच्या उत्साहावर विरजण पडले. दुसरीकडे बँक व्याजदरात झालेल्या कपातीमुळे घर आणि वाहन खरेदीत अधिक उत्साह दिसून आला.अबकारी कराविरोधात सराफांनी पुकारलेला बेमुदत बंद गुढीपाडव्यालाही कायम राहिला. परिणामी, गेल्या ३८ दिवसांपासून सोने खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना सोने खरेदीसाठी आता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताची वाट पाहावी लागणार आहे. सराफांच्या बंदमुळे सोन्याचे बाँड खरेदीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सराफा बाजारात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाने खरेदी होत असल्याने बाँडला तितकासा प्रतिसाद मिळाला नसल्याचे बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी सांगितले.उटगी म्हणाले की, सोन्याची नाणी देणे बँकांनी गेल्या काही वर्षांत बंद केले आहे. सोन्याच्या आयातीवर निर्बंध यावेत, म्हणून शासनाने ग्राहकांना घरातील सोने बँकेत ठेवण्याचे आवाहन केले होते, त्यासाठी आकर्षित व्याजदर देण्याचा प्रयत्न केला. मात्र गुढीपाडव्याला त्या योजनेलाही प्रतिसाद मिळालेला नाही. रिअल इस्टेटमध्ये मात्र नेहमीच्या मानाने अधिक उत्साह दिसून आल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर आॅफ हाउसिंग सोसायटीचे (एमसीएचआय) अध्यक्ष धर्मेश जैन यांनी सांगितले. घरांच्या किमतीत आणि बँकेतर्फे देण्यात येणाऱ्या गृहकर्जात घट झाल्याने ग्राहकांना घर खरेदी करण्याची उत्तम संधी आत्ता आहे. सध्या अनेक ठिकाणी गृह प्रकल्पांचे प्रदर्शन भरले असून, मोठ्या प्रमाणात गृह खरेदीसाठी चौकशी होत आहे. त्याचे रूपांतर घरांच्या बुकिंगमध्ये कितपत होईल, हे येत्या दोन दिवसांत कळेल.
===========================================
महाविद्यालयांत राजकारण रंगणार
- मुंबई : महाविद्यालयीन आणि विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीची तरतूद नव्या सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात करण्यात आली असून, यासंबंधीचे विधेयकशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अलीकडेच विधानसभेत मांडले. येत्या सोमवारी त्यावर सभागृहात चर्चा होणार आहे.विद्यापीठाच्या सिनेट, व्यवस्थापन परिषद, कॉलेज विकास समिती तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यास मंडळावर विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे. अभ्यास मंडळांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात येईल. त्यामुळे नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत अशा विद्यार्थ्यांची मते विचारात घेतली जातील.लिंगडोह समितीच्या शिफारशी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार प्रस्तावित कायद्यात महाविद्यालयीन व विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका सुचविण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे विधेयक मंजूर झाल्यास महाविद्यालयीन निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल आणि अनेक वर्षांनंतर महाविद्यालयीन राजकारण रंगणार आहे. अधिसभेची रचना ही १९९४च्या कायद्यानुसार सारखीच ठेवण्यात आली असून, यामध्ये निवडणुका व प्रतिनिधित्व कायम ठेवले आहे. तथापि, अधिसभेतील संख्या व रचना यामध्ये पुनर्रचना करण्यात आली आहे. व्यवस्थापन परिषदेची रचना स्थूलमानाने सारखीच आहे. विद्याविषयक परिषदेची रचना ही, प्रत्येक विद्याशाखेतील अध्यापकांच्या प्रतिनिधित्वाशिवाय नामनिर्देशनावर आधारलेली आहे. नामवंत राष्ट्रीय उद्योग, क्रीडा व संलग्न क्षेत्रांमधील परिसंस्था व संघटना यामधून प्रख्यात तज्ज्ञांना प्रतिनिधित्व दिले आहे.
===========================================
एसटीच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण घटले
- मुंबई : ‘सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांचा प्रवास विनाअपघात व सुरक्षित होण्यासाठी नियमितपणे प्रयत्न करण्यात येतात. २0१४-१५ वर्षांशी तुलना करता २0१५-१६ या वर्षांत एसटीच्या अपघातांत घट झाली आहे. २0१४-१५मध्ये एकूण ४९५ जण अपघातांत दगावले होते. यामध्ये एसटी प्रवासी, एसटी कर्मचारी व अन्य वाहनांमधील प्रवाशांचा समावेश आहे. २0१५-१६मध्ये ४0७ जण जणांनी जीव गमावला आहे. गेल्या ४ वर्षांत एसटीच्या अपघातांत एकूण १ हजार ८६५ जणांचा मृत्यू झाला आहे.एसटीचे अपघात होऊ नयेत यासाठी चालकांमध्ये महामंडळाकडून जनजागृती केली जाते. दारू पिऊन वाहन न चालविणे, ओव्हरटेक न करणे, जलद गतीने वाहन न चालविण्याबाबत माहिती दिली जाते. एसटी महामंडळाकडून तर अपघात टाळण्यासाठी बसेसना ताशी ६५ किमीचे ‘स्पीड लॉक’ही लावले आहेत. या उपाययोजना करतानाच विनाअपघात प्रवास करणाऱ्या चालकांसाठी महामंडळाने प्रोत्साहन योजनाही सुरू केल्या आहेत. एसटी महामंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपाययोजना केल्याने एसटी बसच्या अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. सरासरी वर्षाला जवळपास ४८५ जण एसटी अपघातात दगावत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये एसटी प्रवाशांच्या अपघातांचे प्रमाण साधारपणे ६९ आहे.
===========================================
अंबाबाई शालूचा लिलाव दुसऱ्यांदा तहकूब
- कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीस गतवर्षी नवरात्रोत्सवात तिरुपती बालाजी देवस्थानकडून शालू अर्पण करण्यात आला होता. त्याचा अर्थात साडी प्रसादाचा लिलाव आज, शुक्रवारी गुढीपाडव्यादिवशी आयोजित केला होता. मात्र, अपेक्षित ४ लाख २० हजारांहून अधिकची बोली न आल्याने हा लिलाव दुसऱ्यांदा तहकूब करण्यात आला.बालाजी देवस्थानने नवरात्रोत्सव २०१५ मध्ये हा शालू देवीस अर्पण केला होता. पहिल्या लिलावात अपेक्षित किंमत न आल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने हा लिलाव रद्द केला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी १२ वाजता अंबाबाई देवी मंदिरातील देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कार्यालयात लिलाव घेण्यात आला. यावेळी देवस्थानचे सहसचिव शिवाजी साळवी यांनी ४ लाख २० हजार ही सरकारी बोलीची रक्कम असून या किमतीच्या वर बोली लावण्यास सांगितले. मात्र, लिलावात सहभागी झालेल्यांनी काही प्रतिसाद न दिल्याने साळवी यांनी इच्छुकांना आपली बोली बोलण्यास सांगितले. त्यानुसार इचलकरंजीचे राम आडके यांनी २५ हजार रुपये इतकी सुरुवातीची बोली बोलली. त्यानंतर प्रदीपसिंह देसाई यांनी ३० हजार, सुभाष आमशे यांनी ५१ हजारची बोली लावली. काही काळ कोणीच बोली न लावल्याने पुन्हा समितीकडून बोली लावण्याचे आवाहन केले गेले. त्यानंतर राजेंद्र बुढ्ढे यांनी ५५ हजारांची बोली लावली. पुन्हा त्यानंतर प्रदीपसिंह यांनी ६५ हजार, तर आमशे यांनी ७० हजार आणि शेवटची बोली बुढ्ढे यांनी ७२ हजार इतकी लावली. शेवटच्या बोलीनंतर प्रक्रियाच थांबविण्यात आली.
===========================================
आधी गुजरातचे तुकडे करा!
- मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. गो. वैद्य राज्याचे चार तुकडे करा म्हणतात. कोण ते मागो वैद्य? काय मागू ते मिळेल काय, म्हणे महाराष्ट्राचे चार तुकडे करणार. संघाने आधी गुजरातचे तुकडे करावेत, मग महाराष्ट्राचे बोलावे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संघाचा समाचार घेतला.गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज यांनी तब्बल ७ वर्षांनंतर शिवाजी पार्कवरील जाहीर सभा घेतली. एक तासाच्या भाषणात त्यांनी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि एमएमआयएमच्या ओवैसी यांच्यावर सडकून टीका केली. राज्यात जाणीवपूर्वक विदर्भ आणि मराठवाडा वेगळा करण्याची भाषा केली जात आहे, असे सांगत सर्वाधिक काळ राज्यात आणि केंद्रात सत्ता भोगूनही विदर्भ आणि मराठवाड्यातील नेत्यांना त्यांच्या भागाचा विकास करता येत नसेल तर त्याचा दोष महाराष्ट्रावर कसा? इतका काळ सत्ता भोगूनही आपल्या भागाचा विकास करता येत नसेल तर खुर्च्या सोडा. पण तुमच्यासाठी महाराष्ट्र तोडू देणार नाही, असा इशाराही राज यांनी दिला.जे महाराष्ट्रात घडतेय तेच केंद्रात घडत आहे. मोदींनी गुजरातचा विकास केला म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण पंतप्रधान झाल्यापासून ते बदलून गेले. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्या मोदींनी केसाने गळा कापला, म्हणून आज मोदींवर टीका करीत आहे. सत्तेवर येताना भाजपाने ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखविली होती. आज काहीच घडत नसल्याने सत्ताधाऱ्यांचा नालायकपणा झाकण्यासाठी आरएसएसच्या आडून भावनिक मुद्दे उगाळले जात आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आपल्या भाषणानंतर तीनवेळा ‘भारतमाता की जय’चा नारा द्यायच्या. भाजपा आणि संघाने देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटू नयेत, असा टोला राज यांनी लगावला.
===========================================
डॉक्टरांच्या संपाविरुद्ध हायकोर्टात याचिका
- मुंबई : जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने व नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख रागिणी पारेख यांची बदली करण्यासाठी गेले सहा दिवस जे.जे.चे निवासी डॉक्टर संपावर आहेत. संपूर्ण राज्यातून जे.जे.मध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांचे हाल होत असल्याने डॉक्टरांना संप मागे घेण्याचा आदेश द्यावा, असा अर्ज उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाला आज सुटी असतानाही या अर्जावर सुनावणी घेण्याकरिता विशेष न्यायालय बसणार आहे.४ ते ६ एप्रिल या काळात एकूण १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा याचिकाकर्ते अफाक मांडविया यांनी केला आहे. (प्रतिनिधी)> मार्डला ‘कारणे दाखवा’ नोटीसमुंबई : जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या मास बंकला शुक्रवारपासून सेंट्रल मार्डने सक्रिय पाठिंबा देत राज्यव्यापी मास बंक पुकारला. निवासी डॉक्टरांचा मास बंकचा तिढा सुटत नसल्याने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी मार्डला कारणे दाखवा नोटीस शुक्रवारी पाठविली आहे.७ एप्रिलला विधान परिषदेचे सभापती यांनी निवासी डॉक्टरांना तत्काळ कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही हा आदेश फेटाळून मार्डने राज्यव्यापी मास बंक पुकारला. त्यामुळे आता कर्तव्यावर रुजू न झाल्यास मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करू, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.मार्डने आपला निर्णय अजूनही बदललेला नाही. जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांची बदली करा, अशी मार्डची प्रमुख मागणी आहे. शासनाशी चर्चा करूनही तोडगा न निघाल्यामुळे राज्यव्यापी मास बंक करण्याचा निर्णय अखेर ५ दिवसांनी घेण्यात आला. राज्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने मार्डच्या संपाला पाठिंबा दर्शविला असल्याचे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.
===========================================
कायदेशीर मत आल्यानंतर दोषींवर कारवाई
- मुंबई : रस्ते दुरुस्तीतील डेब्रिज घोटाळा प्रकरणात चौकशी समितीने ठपका ठेवलेल्या अधिकारी, सल्लागार आणि ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे़ मात्र नालेसफाई घोटाळ्याप्रकरणात तोंडघशी पडल्यानंतर शहाणपण आलेल्या प्रशासनाने कारवाईआधी विधी खात्याचे मत मागविले आहे़ त्यानंतरच दोषींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे़नाल्यांमधून काढलेला गाळ वाहून नेण्यात ठेकेदारांनी हातचलाखी केल्याचे गेल्या वर्षी उघडकीस आले़ त्यानंतर महापौर स्नेहल आंबेकर यांनी गोपनीय पत्राद्वारे रस्ते विभागातील घोटाळ्यांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले होते़ महापौरांच्या या पत्राने राजकीय वादळ उठले होते, तरी आयुक्तांनी मात्र गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले़ त्यानुसार सहा महिन्यांच्या चौकशीनंतर या समितीने आपला अहवाल आयुक्तांना सादर केला आहे़या अहवालात पाच अधिकारी व सहा ठेकेदारांवर ठपका ठेवण्यात आला आहे़ मात्र नालेसफाई घोटाळाप्रकरणात ठेकेदारांनी न्यायालयात धाव घेऊन पालिकेच्या कारवाईवर स्थगिती आणली होती़ त्यामुळे या वेळीस प्रशासनाने सावध पावले उचलली आहेत़ त्यानुसार दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कारवाईपूर्वी पालिकेची बाजू मजबूत असेल, याची खात्री करून घेण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)उपायुक्त वसंत प्रभू आणि दक्षता प्रमुख अभियंता एस़ कोरी यांच्या चौकशी समितीने २०१३ ते २०१६ या तीन वर्षांतील रस्त्यांच्या कामांची चौकशी केली़ या काळात दोनशे रस्त्यांच्या कामांचे कंत्राट २६ ठेकेदारांना देण्यात आली होती़रस्त्यांसाठी वापरलेली डांबरमिश्रित खडी, सिमेंट आदी साहित्याची तपासणी केली़ तसेच रस्ते दुरुस्तीवेळी तयार झालेले डेब्रिज कुठे टाकण्यात आले, याचा आढावा या समितीने घेतला़ यामध्ये ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे साहित्य रस्ते बांधणीसाठी वापरले असल्याचे आढळून आले़चौकशी समितीने ३४ रस्त्यांची पाहणी करून सहा ठेकेदारांवर कारवाईची शिफारस केली आहे़, तर रस्ते विभागातील पाच अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे़ यामध्ये एका माजी प्रमुख अभियंत्याचाही समावेश आहे़नालेसफाईचा घोटाळा उघड झाल्यानंतर पालिका आयुक्तांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू केली होती़ मात्र या कारवाईविरोधात ठेकेदारांनी न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवले़ त्यामुळे या वेळीस कायदेशीर मत आल्यानंतर कारवाईचा अंतिम निर्णय पालिका आयुक्तच घेणार आहेत़
===========================================
महाराष्ट्राच्या पाणीटंचाईकडे केंद्राचे दुर्लक्ष
- सुरेश भटेवरा : नितीन अग्रवाल , नवी दिल्लीभारताचे शेजारी राष्ट्र मालदीव बेटात डिसेंबर २0१४ मध्ये पाण्याचे संकट उभे राहिले तेव्हा पंतप्रधान मोदींनी तत्परतेने हवाई दलाच्या ५ विमानाव्दारे व नेव्हीच्या लढाऊ जहाजांव्दारे लाखो टन पाणी मालदीवला पाठवले. आपल्या अनेक परदेश दौऱ्यात या कृतीचा गौरवपूर्ण उल्लेखही पंतप्रधानांनी साऱ्या जगाला ऐकवला. महाराष्ट्राच्या भीषण दुष्काळात पिण्याच्या पाण्याचे देखील संकट निर्माण झाले असतांना, केंद्रातले मोदी सरकार नेमके काय करते आहे, याची लोकमतच्या दिल्ली ब्युरोने माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाकडून विचित्र उत्तरे ऐकायला मिळाली. राष्ट्रीय आपत्ती निवारण यंत्रणा (एनडीआरएफ) देखील याविषयी सक्रिय नसल्याचे जाणवले. अपवाद फक्त सुरेश प्रभूंच्या रेल्वे मंत्रालयाचा, मराठवाड्यात विशेषत: लातूरमधे वॉटर ट्रेन चालवण्याचा इरादा प्रभूंनी व्यक्त केला आहे.महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहोचवण्यासाठी आपले मंत्रालय नेमके काय करते आहे, याची माहिती लोकमतने केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना विचारली तेव्हा ‘तूर्त सारे मंत्रालय जल सप्ताहाच्या विविध कार्यक्रमांमधे व्यस्त आहे, सोमवारपूर्वी या संबंधी कोणतीही माहिती देता येणार नाही.महाराष्ट्रातल्या पाणी संकटासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची मदत पुरवण्याची तूर्त कोणतीही योजना नाही’, असे विचित्र उत्तर ऐकायला मिळाले.
===========================================
उ. कोरियाकडून 'आयसीबीएम'च्या इंजिनची चाचणी
टोकियो - उत्तर कोरियाने स्वदेशी बनावटीच्या आंतरराष्ट्रीय क्षेपणास्त्राच्या (आयसीबीएम) इंजिनची आज (शनिवार) यशस्वी चाचणी केली आहे. या इंजिनमुळे यशस्वी चाचणीमुळे अमेरिका उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आले आहे.
उ. कोरियाकडून 'आयसीबीएम'च्या इंजिनची चाचणी
सरकारी वृत्तवाहिनी केसीएनएने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाचे नेते किम जॉंग यून यांनी या इंजिनच्या यशस्वी चाचणीला दुजोरा दिला आहे. उत्तर कोरिया आता अधिक शक्तीशाली अणुबॉम्बचा या इंजिनच्या साहाय्याने वापर करु शकणार आहे.
उत्तर कोरियाने नुकतेच केएन-08 मोबाईल आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. त्यापूर्वी अमेरिकेसह सर्व जगाचा विरोध झुगारून उत्तर कोरियाने हायड्रोजन बाँबची भूमिगत चाचणी घेतली. तेव्हापासून सतत उत्तर कोरियाकडून चाचण्या घेण्यात येत आहेत.
===========================================
विजय मल्ल्यांनी ईडीकडे मागितली आणखी मुदत
मुंबई - उद्योजक विजय मल्ल्या हे आजही (शनिवार) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) न्यायालयासमोर उपस्थित राहू शकत नसून, त्यांनी मे महिन्यातील एखादी तारीख मागितली आहे. काही दिवसांपुर्वी मल्ल्या यांनी तिसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले होते.
विजय मल्ल्यांनी ईडीकडे मागितली आणखी मुदत
विजय मल्ल्या यांनी पत्नी व मुलांच्या नावावर असलेली सर्व वैयक्तिक संपत्ती जाहीर करावी व बँकांसमोर पुढील दोन आठवड्यात कर्जफेडीचा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मल्ल्या यांनी बँकांसमोर ठेवलेला चार हजार कोटी रुपयांच्या कर्जफेडीबाबतचा प्रस्ताव बँकांनी नाकारला असून त्यांनी स्वतः येऊन बँकांशी बातचीत करावी अशी मागणी बँकांनी केली आहे. आपली विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी मल्ल्यांनी न्यायालयाकडे ठराविक रक्कम जमा करावी. येत्या 21 एप्रिलपर्यंत मल्ल्या नेमकी किती रक्कम जमा करु शकतात याची माहिती द्यावी लागणार आहे
जर तिसऱ्यांदा दिलेल्या तारखेला मल्ल्यांनी ईडीसमोर उपस्थिती टाळल्यानंतर ईडीसमोर प्रकरण न्यायालयात नेण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
===========================================
हडपसरमध्ये मोटारीने घेतला पेट; एकाचा मृत्यू
पुणे - हडपसर गाडीतळाजवळ सासवड रस्त्यावर ओमीनी कारने पेट घेतल्याने एका तरुणाचा जळून मृत्यू झाला.
हडपसरमध्ये मोटारीने घेतला पेट; एकाचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, सासवड रस्त्यावर प्राची हॅाटेलसमोर आज (शनिवार) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. अजित अत्माराम इंगळे (वय. २५ रा. फलटण, जि. पुणे) असे या मृत चालकाचे नाव आहे.
हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित मित्राची गाडी घेवून पुण्याला येत होता. यावेळी त्याची ग्लायडिंग सेंटरसमोर गाडी बंद पडली होती. यावेळी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छता करावयाची होती. त्यामुळे अजित याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्यामुळे पुण्याच्या दिशेला असणारी गाडी त्याने उतार असल्याने सासवडच्या बाजूने ढकलत नेली. त्यानंतर तो गाडीत बसला. यावेळी अचानक गाडीने पेट घेतला. मित्राकडे जावयाचे असल्याने त्याने दुसऱ्या व्यक्तीची गाडी आणली होती. गाडी गॅसवर चालणारी असल्याने तीने पेट घेतला व या अपघातात त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
===========================================
250 तरुण तिरंगा घेऊन श्रीनगरला जाणार
नवी दिल्ली - तिरंगा फडकाविल्याबद्दल श्रीनगरमधील एनआयटीतील विद्यार्थ्यांवर लाठीमार झाल्याची घटना ताजी असतानाच आता दिल्लीहून सुमारे 250 तरुण तिरंगा घेऊन श्रीनगरला जाणार आहेत.
250 तरुण तिरंगा घेऊन श्रीनगरला जाणार
एनआयटीतील बिगर काश्मीरी विद्यार्थ्यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांच्या निषेधार्थ तिरंगा फडकाविला होता. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला होता. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत असून, आता तरुणांनी तिरंगा घेऊन एनआयटीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 12 राज्यांतून हे तरुण दुचाकीवरून तिरंगा घेऊन जाणार आहेत.
दरम्यान, जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंह यांनी लाठीमार झालेल्या विद्यार्थ्यांसोबत सुमारे सहा तास चर्चा केली. तसेच दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आश्वासन दिले. आम्ही याठिकाणी पूर्णपणे सुरक्षा पुरविली आहे.
===========================================
सुनील नारायणची गोलंदाजी शैली वैध
सुनील नारायणची गोलंदाजी शैली वैध
कोलकता - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वेस्टइंडीजचा फिरकीपटू व कोलकता नाईट रायडर्स संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू सुनील नारायण याची गोलंदाजी शैली वैध ठरविली आहे. त्यामुळे नारायणला आयपीएलपूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे.
अवैध गोलंदाजी शैलीबद्दल सुनील नारायणला ट्वेंटी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुनील नारायणची गोलंदाजी शैली अवैध असल्याने आयसीसीने त्याच्यावर बंदी घातली होती. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेण्यात आला होता. यापूर्वीही 2014 मध्ये चॅम्पियन्स लीग स्पर्धेदरम्यान त्याच्या शैलीवर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की नारायणची गोलंदाजी शैली वैध ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो आता आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये गोलंदाजी करू शकतो.
===========================================
'ती'ने उभारली परिवर्तनाची गुढी
शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांचा प्रवेश
शनिशिंगणापूर (नगर) - शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढत "ती‘ने आज पाडव्याच्या मुहूर्तावर परिवर्तनाची गुढी उभारली. येथील शनी मंदिरातील चौथऱ्यावर महिलांनी प्रवेश करून शिळेला जलाभिषेक व तैलाभिषेक केला. स्त्री-पुरुष समानतेचे आणखी एक पाऊल यामुळे टाकले गेले.
'ती'ने उभारली परिवर्तनाची गुढी
शनिशिंगणापूर (नगर) - शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढत "ती‘ने आज पाडव्याच्या मुहूर्तावर परिवर्तनाची गुढी उभारली. येथील शनी मंदिरातील चौथऱ्यावर महिलांनी प्रवेश करून शिळेला जलाभिषेक व तैलाभिषेक केला. स्त्री-पुरुष समानतेचे आणखी एक पाऊल यामुळे टाकले गेले.
शनिशिंगणापुरातील परंपरेचे बंधन आज तुटले. महिलांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याच्या, तीन महिने गाजत असलेल्या वादावर पडदा पडला! भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या दोन महिला कार्यकर्त्या सायंकाळी चार वाजता संरक्षक कठड्यांवरून उड्या मारून चौथऱ्यावर गेल्या. त्यांनी शनीला तेलाने अभिषेक करीत दर्शन घेतले. "नारी शक्तीचा विजय असो!‘ अशा घोषणा देत त्यांनी महिलांना वर येऊन दर्शन घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर कोणताच अडथळा न येता सर्वच भाविकांनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास सुरवात केली.
एका मुलीने शनीच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशावरून गेल्या काही महिन्यांपासून नव्याने वाद सुरू झाला होता. त्यानंतर महिला संघटनांनीही शनिचौथऱ्यावर प्रवेशावरून आंदोलन केले होते. मात्र त्याला ग्रामस्थांनी विरोध केला होता. त्यानंतर काही संघटनांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. राज्य सरकारने न्यायालयात भूमिका मांडताना "हिंदू प्लेसेस ऑफ पब्लिक वर्शिप‘ या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल व ज्या ठिकाणी पुरुषांना प्रवेश आहे तेथे महिलांनाही प्रवेश देण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. यानंतर शनी मंदिराच्या विश्वस्तांनी शनिचौथऱ्यावर आता पुरुषांनाही प्रवेश देण्यात येणार नाही, अशी भूमिका जाहीर केली होती. या निर्णयाला संदर्भ गुढीपाडव्याच्या दिवशी करण्यात येणाऱ्या अभिषेकाचा.
चौथऱ्यावरून अभिषेक करण्याला बंदी घातल्यावरून ग्रामस्थ व देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बेबनाव निर्माण झाला होता. कोणत्याही परिस्थितीत परंपरेप्रमाणे चौथऱ्यावर जाऊन जलाभिषेक करण्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या तरुणांशी सकाळी चर्चा करण्यात आली. मात्र गावातील तरुणांनी चौथऱ्यावर जाऊन जलाभिषेक करण्याची भूमिका कायम ठेवली. अखेरीस देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माघार घेतली. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास या तरुणांनी "सूर्यपुत्र शनिदेव की जय‘ असा जयघोष करत चौथऱ्यावर जाऊन जलाभिषेक केला.

'जेईई'साठी 75 टक्के गुणांची अट
पुणे - आयआयटीसह नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (ट्रिपल आयटी) या संस्थांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना 2017 मध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर बारावीला 75 टक्के गुण मिळविणे बंधनकारक आहे. मात्र, या प्रवेशासाठी बारावीचे गुण गाह्य धरले जाणार नाहीत, तर संयुक्त प्रवेश परीक्षेच्या (जेईई-मेन) गुणांवरच प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. तसेच यापुढे जेईई परीक्षा देण्यासाठी बारावीत किमान 75 टक्के गुण आवश्यक आहेत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या गुणांचा निकष हा 65 टक्के असेल.
पार्श्वभूमी व परिणाम
राष्ट्रीय तंत्रशास्त्र शिक्षण संस्थांमध्ये 2013 पासून जेईईच्या आधारे प्रवेश सुरू झाले. या परीक्षेत मिळालेल्या गुणांपैकी 60 टक्के गुण आणि बारावीतील 40 टक्के गुण सरासरी केली जात असे. त्याचे पर्सेंटाइल तयार करून त्याची गुणवत्ता यादी तयार केली जात असे. त्यानुसार प्रवेश दिले जात होते; परंतु देशात विविध शिक्षण मंडळे (बोर्ड), त्यांचे अभ्यासक्रम वेगळे असल्याने त्यांची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सस्थांच्या प्रवेश परीक्षेसाठी समान पातळीवर कसे आणावे यावर विचार सुरू झाला होता. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यासाठी अशोक मिश्रा समिती नियुक्त केली होती. या समितीने केलेली शिफारस स्वीकारण्यात आली आहे. त्यामुळे या संस्थांचे प्रवेश हे 2017 पासून "जेईई मेन‘च्या आधारे होतील. आयआयटीचे प्रवेश हे जेईई ऍडव्हान्सद्वारे केले जातील.

महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही - राज ठाकरे
मराठवाडा-विदर्भातील नादान नेत्यामुंळे हा भाग भकास
मुंबई - कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, तुकडेच करायचे असतील गुजरातचे करा, असे आवाहन करतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा-विदर्भातील नादान राज्यकर्त्यांमुळेच हा भाग मागास राहिल्याची टीका आज केली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात राज यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचा खरपूस समाचार घेतला.

वेगळा मराठवाडा आणि विदर्भावर गेल्या काही दिवसांत चर्चा सुरू झाल्याने राज ठाकरे यांनी तेथील राज्यकर्त्यांवर निशाणा साधला. यासाठी त्यांनी विदर्भ-मराठवाड्यातील मुख्यमंत्री, आजी-माजी केंद्रीय आणि राज्यातील मंत्र्यांची यादी वाचून दाखविली. या भागाचा विकास करण्यासाठी कुणी तुमचा हात धरला होता का, असा सवाल करून राज यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीकेची झोड उठविली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, की अफझल गुरूच्या फाशीच्या विरोधात ठराव करणाऱ्या "पीडीपी‘सोबत जम्मू-काश्मीरमध्ये युती करता आणि "भारतमाता की जय‘चा ढोंगीपणा का करता, जे कॉंग्रेसने केले तेच आता तुम्हीही करत आहात, कॉंग्रेस आणि तुमच्यात फरक काय, असा सवाल त्यांनी केला. शंभर दिवसांत अच्छे दिन आणणार होता, आता 300 दिवस झाल्यानंतरही अच्छे दिन कुठे आहेत, असा प्रश्नही राज यांनी मोदींना विचारला.
===========================================
स्वातंत्र्यानंतर उद्दिष्टांचा विसर- मोहन भागवत
नागपूर - भारतासोबतच काही अंतराने इस्राईल आणि चीन स्वतंत्र झाले. स्वातंत्र्यानंतर आपण उद्दिष्ट विसरून बसलो आणि इस्राईल व चीन संघर्ष करून उद्दिष्टावर वाटचाल करीत राहिले. परिणामी, आज हे दोन्ही देश भारतापेक्षा प्रगत आहेत, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.
पुण्यातील सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित वनवासी कृषी ग्रामविकास कार्यकर्त्यांच्या त्रैवार्षिक संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला सरसंघचालक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी ट्रस्टचे प्रमुख य. गो. घैसास आणि स्मिता घैसास व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वातंत्र्यानंतर उद्दिष्टांचा विसर- मोहन भागवत
पुण्यातील सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित वनवासी कृषी ग्रामविकास कार्यकर्त्यांच्या त्रैवार्षिक संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला सरसंघचालक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी ट्रस्टचे प्रमुख य. गो. घैसास आणि स्मिता घैसास व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. भागवत म्हणाले, की बरेचदा निःस्वार्थ काम करण्याच्या धुंदीत आपण ते का करतोय, याचा विसर पडतो. स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारतालाही आपले उद्दिष्ट माहिती होते. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उद्दिष्टांचा विसर पडला. त्याच वेळी स्वतंत्र झालेल्या इस्राईलने संघर्ष करून वाळवंटाचे नंदनवन केले. चीनने गरिबीवर मात करून जागतिक बाजारपेठेवर वर्चस्व प्राप्त केले. ते समृद्ध झाले असे म्हणणार नाही, पण त्यांची पुढे जाण्याची इच्छा आहे, हे निश्चित. भारताने काहीच प्रगती केली नाही, असेही नाही. थोडेफार आपणही पुढे आहोत. मात्र काही केले नसते तरी एवढी प्रगती झालीच असती. स्वातंत्र्यानंतर सत्तेत आलेल्या सर्वच सरकारची चांगली-वाईट चर्चा झाली. पण या देशाचा भाग्यविधाता येथील सर्वसामान्य माणूस आहे. तो देशभक्त असला पाहिजे. त्यानेच देशाची सेवा करायची आहे.
===========================================
अंधांच्या डोळ्यांत प्रकाश पेरणारे महात्मे रुग्णालय
नागपूर - नेत्रदान चळवळ उभारण्यासोबतच दृष्टिहीनांना सृष्टी पाहण्याची संधी देण्याचे पवित्र काम महात्मे नेत्रपेढी आणि रुग्णालय करीत आहे. अंधांच्या डोळ्यांत प्रकाशाची पेरणी करून त्यांना डोळस करण्याचे काम 1986 सालापासून पद्मश्री डॉ. विकास महात्मे करीत आहेत. विदर्भात आता नेत्रदानाच्या चळवळीचा वटवृक्ष तयार झाला. हे सेवाधर्माचे कार्य महात्मे आय बॅंक-आय हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू आहे. या संस्थेला पदव्युत्तर शिक्षण संस्थेचा दर्जाही प्राप्त झाला.
महात्मे नेत्र रुग्णालयात अमरावती, गोंदिया, आरमोरी, गडचिरोली, यवतमाळ, मेळघाट येथील दुर्गम क्षेत्रातील रुग्ण उपचारासाठी येतात. विशेष असे की, एकूण रुग्णांपैकी 65 टक्के रुग्णांवर मोफत उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया केल्या जात असल्याची माहिती डॉ. विकास महात्मे यांनी दिली. आतापर्यंत 1 लाख 80 हजार दृष्टिहीन व्यक्तींवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील 80 हजारांपेक्षा जास्त शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. तर, 8 लाख रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. महात्मे नेत्र रुग्णालयातर्फे वर्षभर ग्रामीण भागातील आदिवासी दुर्गम भागात, झोपडपट्टीत नेत्ररोग शिबिर घेतात. रुग्णांचा प्रवास, निवास खर्च, भोजन, शस्त्रक्रिया पूर्वतपासणी आणि शस्त्रक्रियेनंतरच्या सर्व तपासणी मोफत केल्या जातात. मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी "फेको‘ हे नवीन तंत्र येथे उपलब्ध आहे. तर, शुष्क डोळ्यांवर उपचार, बुबुळांचे गोंदण आदी अनेक संशोधनातून नेत्रचिकित्सेच्या उभारणीत रुग्णालयाने भर घातली. डॉ. महात्मे यांच्या नेत्रचिकित्सेला भारतातील सर्वोत्तम शोधनिबंधास दिला जाणारा कर्नल रंगाचारी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. याशिवाय मुलुंड गौरव पुरस्कार, विदर्भ भूषण पुरस्कार, सह्याद्री संजीवन पुरस्कार, धनय्या पुरस्कार, रोटरी, मेडस्कोप, मानवता प्रकाश पारितोषिकाने डॉ. महात्मे यांना गौरविले आहे. इजिप्त, रोमानिया, रशिया, इराक, इंडोनेशिया, मलेशियातील नेत्रतज्ज्ञांना प्रात्यक्षिक देण्याचे काम त्यांनी केले. वर्षभरापूर्वी जागतिक आरोग्यदिनाच्या पर्वावर भारतात प्रथमच राईट टू हेल्थ हा नवा उपक्रम डॉ. महात्मे यांनी सुरू केला.

इसापुरच्या पाण्यासाठी उमरीत रास्ता-रोको आंदोलन

उमरी तालुक्यात उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी बळेगांव बंधार्यात पाणी सोडण्यात यावे यासाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्तित बालाजी पा. ढंगे युवा जिल्हा अध्यक्ष ,सुरेश पा.ढंगे तालुकाध्यक्ष, गोविंद पा. शिंदे तालुका उपाध्यक्ष, किसन पा. हिवराळे युवा तालुका अध्यक्ष, राजीव पा. सावंत युवा शहर प्रमुख, ज्ञानेश्वर नागधरे उपशहर प्रमुख, रवि पा.ढंगे, पप्पु पा. सावंत गोरठेकर, दत्ताहरि ढंगे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

sachin tendulkar
No comments:
Post a Comment