[राष्ट्रीय]
१- बळीराजाला दिलासा! यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक, खासगी कंपनीचा अंदाज
२- दुष्काळी पट्ट्यातील मंगळवेढ्याचा गौरव, ज्वारीला जीआय मानांकन
३- छातीसगड; आजारी कुत्र्याला हॉस्पिटलमध्ये नेताना भूसुरुंग स्फोटात 7 जवान शहीद!
४- 'प्रत्युषा आत्महत्या करुच शकत नाही, हा खून आहे' - एजाज खान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- ..तर भारत माता की जय' म्हणावंच लागेल: मुख्यमंत्री
६- प्रत्युषाचा मृत्यू गळफासामुळेच, शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट
७- जगातील जबरदस्त इलेक्ट्रिक कारची आता भारतात एंट्री
८- वर्ध्यातील समाजसेवी डॉक्टर, रुग्णांच्या मोफत सेवेसाठी 17 लाखांचं कर्ज
९- कोल्हापूर; भ्रष्टाचार रोखा, नाहीतर लोक घरात घुसून मारतील, उदयनराजेंचा इशारा
१०- शंभर मुलांपैकी एक जण असतो स्वमग्न! - तज्ञ डॉक्टर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- अहमदनगर; शनी शिंगणापुरात आस्था विरुद्ध कायदा, तृप्ती देसाई ताब्यात
१२- बीड; पंकजा मुंडेंनी चौथऱ्यावर जाऊन शनीदेवाचं दर्शन घेतलं
१३- प्रत्युषाच्या विम्यावर राहुलने जबरदस्तीने स्वत:चं नाव लिहिलं होतं: राखी
१४- प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज पोलिसांच्या ताब्यात
१५- दिल्ली; गुंगीचं औषध देऊन व्यापारी महिलेवर बलात्कार, आरोपी फरार
१६- देवनारसाठी आता काटेकोर उपाययोजना राबवण्याची गरज!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- टीम इंडियाची वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रुममध्ये हजेरी
१८- नेहरा आणि विराटच्या 'या' फोटोमागचं सत्य काय
१९- पहा, प्रत्युषा बॅनर्जी आणि बॉयफ्रेंड राहुलची 'ती' मुलाखत
२०- प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिचा बॉयफ्रेंड चिप्स खात होता: राखी सावंत
२१- टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड ?
२२- आज ठरणार टी-२० चॅँम्पियन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२३- मनावर घेतले तर दोन दिवसात 'कॉन्सील' बरखास्त करू शकतो - आयुक्त खोड्वेकर
२४- हदगाव येथे शुल्लक कारणावरून दोघांचा खून; तिघांची प्रकृती गंभीर
२५- जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची उद्या बैठक
२६- ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलला मान्यता रद्द करण्याची नोटीस
२७- देगलूर; मनरेगा अपहर प्रकरणी दहा जणांवर गुन्हा तत्कालीन महिला सरपंच व गटविकास अधिकारी रामोड यांचा समावेश
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
मारोती येजगे, गणेश ताडलापुरकर, मारोती तोटावार, प्रदीप भालेराव, माझहेर काझी, सतीश भारांडे, आकाश बोबडे, उमेश सरोदे, माधव पवार, सचिदानंद शिंदे, अशोक लोणीकर, तय्यब अझीझ, चंद्रकांत पाटील
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
अनुभवामुळेच चांगला निर्णय घेता येतो, मात्र दुर्भाग्य हे आहे की, अनुभवाचा जन्म नेहमी चुकीच्या निर्णयामुळे होतो.
[वैभव घाटे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
===================================================



















१- बळीराजाला दिलासा! यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक, खासगी कंपनीचा अंदाज
२- दुष्काळी पट्ट्यातील मंगळवेढ्याचा गौरव, ज्वारीला जीआय मानांकन
३- छातीसगड; आजारी कुत्र्याला हॉस्पिटलमध्ये नेताना भूसुरुंग स्फोटात 7 जवान शहीद!
४- 'प्रत्युषा आत्महत्या करुच शकत नाही, हा खून आहे' - एजाज खान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- ..तर भारत माता की जय' म्हणावंच लागेल: मुख्यमंत्री
६- प्रत्युषाचा मृत्यू गळफासामुळेच, शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट
७- जगातील जबरदस्त इलेक्ट्रिक कारची आता भारतात एंट्री
८- वर्ध्यातील समाजसेवी डॉक्टर, रुग्णांच्या मोफत सेवेसाठी 17 लाखांचं कर्ज
९- कोल्हापूर; भ्रष्टाचार रोखा, नाहीतर लोक घरात घुसून मारतील, उदयनराजेंचा इशारा
१०- शंभर मुलांपैकी एक जण असतो स्वमग्न! - तज्ञ डॉक्टर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- अहमदनगर; शनी शिंगणापुरात आस्था विरुद्ध कायदा, तृप्ती देसाई ताब्यात
१२- बीड; पंकजा मुंडेंनी चौथऱ्यावर जाऊन शनीदेवाचं दर्शन घेतलं
१३- प्रत्युषाच्या विम्यावर राहुलने जबरदस्तीने स्वत:चं नाव लिहिलं होतं: राखी
१४- प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज पोलिसांच्या ताब्यात
१५- दिल्ली; गुंगीचं औषध देऊन व्यापारी महिलेवर बलात्कार, आरोपी फरार
१६- देवनारसाठी आता काटेकोर उपाययोजना राबवण्याची गरज!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- टीम इंडियाची वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रुममध्ये हजेरी
१८- नेहरा आणि विराटच्या 'या' फोटोमागचं सत्य काय
१९- पहा, प्रत्युषा बॅनर्जी आणि बॉयफ्रेंड राहुलची 'ती' मुलाखत
२०- प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिचा बॉयफ्रेंड चिप्स खात होता: राखी सावंत
२१- टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड ?
२२- आज ठरणार टी-२० चॅँम्पियन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२३- मनावर घेतले तर दोन दिवसात 'कॉन्सील' बरखास्त करू शकतो - आयुक्त खोड्वेकर
२४- हदगाव येथे शुल्लक कारणावरून दोघांचा खून; तिघांची प्रकृती गंभीर
२५- जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची उद्या बैठक
२६- ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलला मान्यता रद्द करण्याची नोटीस
२७- देगलूर; मनरेगा अपहर प्रकरणी दहा जणांवर गुन्हा तत्कालीन महिला सरपंच व गटविकास अधिकारी रामोड यांचा समावेश
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
मारोती येजगे, गणेश ताडलापुरकर, मारोती तोटावार, प्रदीप भालेराव, माझहेर काझी, सतीश भारांडे, आकाश बोबडे, उमेश सरोदे, माधव पवार, सचिदानंद शिंदे, अशोक लोणीकर, तय्यब अझीझ, चंद्रकांत पाटील
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
अनुभवामुळेच चांगला निर्णय घेता येतो, मात्र दुर्भाग्य हे आहे की, अनुभवाचा जन्म नेहमी चुकीच्या निर्णयामुळे होतो.
[वैभव घाटे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
===================================================
प्रत्युषाचा मृत्यू गळफासामुळेच, शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट
मुंबई : अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूप्रकरणी शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. ऑक्सिजनचा कमी पुरवठा झाल्यामुळं प्रत्युषाचा गुदमरून मृत्यू झाल्याचं अहवालात म्हटलं आहे.
प्रत्युषाच्या गळ्यावर फास लागल्याच्या खुणा असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. त्यामुळं प्रत्युषाचा मृत्यू गळफासामुळंच झाल्याचं अहवालानुसार स्पष्ट होतं आहे.
प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येप्रकरणी तिचा प्रियकर राहुलला पोलिसांनी चौकशी करुन सोडून दिलं आहे. प्रत्युषाच्या आत्महत्येपूर्वी दोघांमध्ये वाद झाला नसून आदल्या रात्री दोघांनीही आपल्या एका मित्रासह पार्टी केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हंटलं आहे. या पार्टीत रात्रभर दारू प्यायल्याची माहिती मिळते आहे.
सकाळी राहुल आपल्या मित्राला सोडायला गेला तेव्हा ही प्रत्युषा मद्यप्राशन करत होती, असं पोलिसांनी माहितीत म्हंटलं आहे. प्रत्युषा दुपारीही मद्यप्राशन करत होती आणि त्यानंतर राहुल तासाभरासाठी जेवण आणण्यासाठी बाहेर गेला आणि यादरम्यान प्रत्युषानं आत्महत्या केल्याचं राहुलनं म्हंटलं.
काल प्रत्युषाच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
===================================================
..तर भारत माता की जय' म्हणावंच लागेल: मुख्यमंत्री
नाशिक : ‘भारत माता की जय’ वादात आता मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी उडी घेतली आहे. “देशात राहायचं असेल तर ‘भारत माता की जय’ म्हणावंच लागेल,” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
नाशिकमध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठकीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
गळ्यावर चाकू ठेवला तरी भारत माता की जय म्हणणार नाही, असं एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी एका जाहीर सभेत बोलले होते. त्यानंतर यावरुन वाद निर्माण झाला. यानंतर दारुम उलूमने मुस्लिमांनी भारत माता की जय म्हणायचं नाही, असा फतवा काढून या वादाला आणखी हवा दिली.
काही नेते भारत माता की जय का म्हणणार नाही, असं बोलतात. पण अनेक पक्षांचे नेते त्यांच्या समर्थनार्थ पुढे येतात. मात्र अशा लोकांना देशात राहण्याचा अधिकार नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी टीका केली.
===================================================
शनी शिंगणापुरात आस्था विरुद्ध कायदा, तृप्ती देसाई ताब्यात
अहमदनगर : शनी शिंगणापुरात आस्था विरुद्ध कायदा अशी स्थिती निर्माण झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शनी चौथऱ्यावर दर्शनाचा चंग बांधलेल्या भूमाता ब्रिगेडला गावकऱ्यांनी रोखलं आहे. पोलिसांनी तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतलं आहे.
चौथऱ्यावरील महिला प्रवेशबंदी ही शेकडो वर्षापासून आहे. ती अबाधित राहावी, असा दावा शनी मंदिर बचाव कृती समितीने केला आहे.
दुसरीकडे भक्तीचा अधिकार हा कायद्याने मान्य केला असून शनी मंदिर चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नाकारणाऱ्यांना कायद्यानं धडा शिकवावा, अशी तंबी हायकोर्टाने राज्य सरकारला दिली होती. मात्र कोर्टाच्या आदेशानंतरही आज महिलांची अडवणूक करण्यात आली.
===================================================
पंकजा मुंडेंनी चौथऱ्यावर जाऊन शनीदेवाचं दर्शन घेतलं
बीड : एकीकडे शनीशिंगणापूरमध्ये राडा सुरु असताना दुसरीकडे पाथर्डीमध्ये महिला आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शनी चौथऱ्यावर जाऊन शनीदेवाला तेल वाहिलं.
महिलांना मंदिरामध्ये प्रवेश द्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज पंकजा मुंडे यांनी पाथर्डीमधल्या शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतलं आहे.
शनीशिंगणापूरप्रमाणे याठिकाणी महिलांना चौथऱ्यावर जाण्यासाठी बंदी नव्हती. पण महिला चौथऱ्याच्या खाली उभ्या राहूनच शनिदेवाचं दर्शन घ्यायच्या. मात्र आज पंकजा मुंडे यांनी पाथर्डीमधील शनी मंदिरात चौथऱ्यावर जाऊन शनी देवाला तेल वाहिलं.
PankajaGopinathMunde
@Pankajamunde
Minister for Rural Dev. & Water Conservation, EG Scheme, Women & Child Development, Guardian Minister for Beed & Latur, Maharashtra
Maharashtra · http://www.pankajagopinathmunde.com
===================================================
टीम इंडियाची वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रुममध्ये हजेरी
मुंबई : ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पॅकअप झाल्यानंतर टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रुममध्ये हजेरी लावली. यावेळी भारतीय क्रिकेटपटूंनी विंडीजच्या खेळाडूंसोबत सेल्फीही घेतली. विराटने त्याची जर्सी ब्रेथवेटला भेट दिली. इतकंच नाही तर कोहलीने त्यावर स्वाक्षरीही केली.
तर हरभजन सिंहनेही आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघातील त्याचा सहकारी लेंडल सिमन्सला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.
===================================================
प्रत्युषाच्या विम्यावर राहुलने जबरदस्तीने स्वत:चं नाव लिहिलं होतं: राखी
मुंबई : प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री राखी सावंतने नवा दावा केला आहे. प्रत्युषाने काही महिन्यांपूर्वी एक कोटी रुपयांचा विमा काढला होता. या पॉलिसीमध्ये प्रत्युषाचा बॉयफ्रेण्ड राहुल राजने तिच्याकडून जबरदस्तीने लिहून घेतलं होतं की, प्रत्युषानंतर हा पैसा राहुलला मिळेल.
‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या
त्यावेळी मी तिला असं न करण्याचा सल्ला दिला होता. शिवाय राहुलऐवजी आई-वडिलांना इन्शुरन्स पॉलिसीचा नॉमिनी बनवावं, असंही प्रत्युषाला सांगितल्याचा दावा राखी सावंतने केला आहे.
प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज पोलिसांच्या ताब्यात
पण तरीही तिने राहुलला नॉमिनी केलं आणि आता प्रत्युषाच्या आत्महत्येची बातमी येणं योगायोग नाही, असं राखी म्हणाली. या पैशांसाठीच प्रत्युषाची हत्या झाली का, याचीही चौकशी करावी. शिवाय या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवाव, अशी मागणी राखीने केली आहे
‘प्रत्युषा आत्महत्या करुच शकत नाही, हा खून आहे’
राखीच्या या दाव्यानंतर प्रत्युषाचा बॉयफ्रेण्ड राहुल राय याच्यावरील संशय अधिकच वाढला आहे.
प्रत्युषा बॅनर्जी आणि बॉयफ्रेंड राहुलची ‘ती’ मुलाखत!
प्रत्युषाने शुक्रवारी संध्याकाळी तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर पोलिसांनी आज तिचा बॉयफ्रेण्ड राहुल राज याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
प्रत्युषाच्या काही खास मित्रांनी सांगितलं की, ‘प्रत्युषा मागील काही दिवसांपासून खूपच निराश होती. काम न मिळणं, पैशाची चणचण आणि वारंवार बॉयफ्रेंडसोबत होणारे वाद यामुळे ती फारच त्रासून गेली होती.’
===================================================
प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज पोलिसांच्या ताब्यात
मुंबई: अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात तिचा प्रियकर राहुल राज सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे. ताब्यात घेतल्यानंतप राहुलला घेऊन पोलिस सिद्धार्थ रुग्णालयात दाखल झाले आहेत. सिद्धार्थ रुग्णालयात प्रत्युषाचं पार्थिव ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, प्रत्युषाचे आई वडिलही मुंबईत दाखल झाले असून ते सिद्धार्थ रुग्णालयात पोहोचले आहेत.
आनंदीच्या भूमिकेतून घराघरात आपली छाप सोडलेल्या प्रत्युषा बॅनर्जीनं गोरेगावमधल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्या प्रियकरानं म्हणजेच राहुल राज सिंगनं तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनंतर तिच्या जमशेदपूरच्या घरावर शोककळा पसरली आहे. प्रत्युषाच्या आत्महत्येची बातमी समजताच कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. काही दिवसांपूर्वी प्रत्युषाचा फोन आला होता. तेव्हा ती नाराज वाटत होती. अशी माहिती प्रत्युषाच्या काकांनी दिली. आपली स्वप्न साकार करण्याची जिद्द ठेवणारी आज आपल्यात नाही, हे सत्य मानायला अजूनही कुटुंबीय तयार नाही.
===================================================
गुंगीचं औषध देऊन व्यापारी महिलेवर बलात्कार, आरोपी फरार
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये एका बिझनेस वुमनसोबत लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील कनॉट
प्लेस परिसरात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळच्या दरम्यान या घटनेची माहिती मिळाली.
प्लेस परिसरात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळच्या दरम्यान या घटनेची माहिती मिळाली.
दक्षिण दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका 33 वर्षीय व्यापारी महिलेने आरोप केला आहे. महिला शुक्रवारी चंदीगडला राहणाऱ्या बिझनेसमनकडे मीटिंगसाठी कॅनॉट प्लेसमध्ये आली होती. लंचच्या वेळेस दोघांची मुलाखत झाली. त्याचेवेळेस आपल्याला त्या व्यक्तीनं कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध दिलं. ज्यामुळे ती महिला बेशुद्ध झाली.
त्यानंतर आरोपीनं हॉटेलच्या रुममध्ये जाऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिथून फरारही झाला. जेव्हा महिलेला शुद्ध आली त्यावेळी तिनं याबाबत पोलिसांना याबाबत माहिती दिली. आपण त्या व्यक्तीला आधीपासून ओळखत असून याआधी बिझनेसनिमित्त आपण त्याला चंदीगडमध्येही भेटलो होतो.
महिलेने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून सध्या आरोपीचा शोध सुरु आहे.
===================================================
जगातील जबरदस्त इलेक्ट्रिक कारची आता भारतात एंट्री
मुंबई: जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला आपल्या सर्वात स्वस्त कार मॉडेल 3सह भारतीय बाजारात एंट्री करणार आहे. या कारसाठी कंपनीने प्री ऑर्डरही सुरु केलं आहे. या कारचं उत्पादन 2017च्या शेवटी सुरु होणार असून याची डिलिव्हरी 2018 पासून होणार आहे.
ही कार अवघ्या 1000 डॉलरमध्ये (जवळजवळ 66,300) बुक करता येणार आहे. भारतात कार लाँचिंगसह आपलं इंफ्रस्ट्रक्चरही भारतात सुरु करण्याचा कंपनीचा मानस आहे.
कॅलिफोर्नियातील एका इव्हेंटमध्ये मॉडेल 3चं मॉडेल प्रदर्शित करण्यात आलं. याची किंमत जवळजवळ 35,000 डॉलर (जवळजवळ 23लाख) असणार आहे. कंपनी या कार अमेरिकेत तयार करणार आहे. भारतात ही कार आणखी महाग होऊ शकते. कारण की, निर्यातीमुळे या कारवर बराच टॅक्स लागू शकतो.
ही कार कशी बुक कराल?
मॉडेल3 च्या बुकींगसाठी tesla.com वेबसाइटवर लॉग इन करुन आपली आवडती कार बुकींग सिलेक्ट करुन त्याबाबत माहिती द्यावी. या कारच्या बुकींगीसाठी आपण कार्ड पेमेंट कुरु शकतात. तसेच उर्वरित रक्कम कार डिलिव्हरी वेळेस द्यायची आहे.
===================================================
वर्ध्यातील समाजसेवी डॉक्टर, रुग्णांच्या मोफत सेवेसाठी 17 लाखांचं कर्ज
वर्धा : आलिशान घर, आलिशान गाडी किंवा फार फारत तर व्यवसाया थाटण्यासाठी अनेकजण कर्ज घेतात. मात्र कुणा गरिबाचं घर सुखी व्हावं, या उद्देशानं कुणी कर्ज घेतल्याचं ऐकलंय? पणव वर्ध्यातील एका डॉक्टरने गरीब कुटुंबातील रुग्णांना मोफत उपचार मिळावा, यासाठी कर्ज घेतलं आहे. कृष्णा शेंडे असं या सेवाभावी डॉक्टरचं नाव आहे.
कृष्णा शेंडे हे गेल्या चार वर्षांपासूने जिल्हा सामान्य रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. काम करत असताना असं लक्षात आल की, साधारण शंभर महिलांमागे चार महिलांना आजार असतो. ज्यामध्ये पोटात काही पेशींची वाढ होऊन पोटात गोळा तयार होतो. त्यासाठी खासगी रुग्णालयात ऑपरेशनच खर्च हा 50 ते 80 हजारांच्या घरात जातो.
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार कमी खर्चात होत असतं आणि महिनाभर आराम करावा लागत असे. पण रोजमजुरी करणाऱ्यां रुग्णांना हा उपचार ही परवडण्यासारखा नव्हता. पण राजीव गांधी योजनेत हेच ऑपरेशन अत्याधुनिक पद्धतीने केलं तर रुग्णांना विनामूल्य सेवाही मिळते आणि रुग्ण दोन दिवसात ठणठणीत होतो. म्हणून त्यांनी वैयक्तिक 17 लाखांचे कर्ज घेत अत्याधुनिक मशीन लावण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेतली. परवानगी मिळाली आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्यधुनिक पद्धतीने उपचाराची सोय झाली. एवढंच काय तर दोन महिलांवर यशस्वी शास्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली आहे.
लेप्रोस्कोपीक पद्धतीने ऑपरेशन हे महाराष्ट्रात कुठल्याच जिल्हा सामान्य रुग्णालयात आजवर झालेलं नाही. त्यामुळे वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय अशाप्रकारे ऑपरेशन करणारं पाहिलंच रुग्णालय आहे. यात डॉक्टरला जेवढं समाधान आहे. तेवढं समाधान आम्हालसुद्धा होत असल्याची भावना जिल्हा शल्यचिकित्सक पुरुषोत्तम मडावी आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी व्यक्त केली.
स्वतः कर्ज काढून गरिबांना उपचार मोफत मिळवून देणाऱ्या डॉक्टरचं कौतुक करावं तेवढं थोडचं आहे. तसेच या मशीनमुळे आता गोरगरिबांनासुद्धा महागड्या शस्त्रक्रिया करणं शक्य झालंय, ते केवळ या डॉक्टरमध्ये असलेल्या रुग्णसेवेमुळे.
===================================================
भ्रष्टाचार रोखा, नाहीतर लोक घरात घुसून मारतील, उदयनराजेंचा इशारा
कोल्हापूर : भ्रष्टाचार रोखा, नाहीतर लोक घरात घुसून मारतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी भ्रष्टाचारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधिंना दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
काही दिवसांपूर्वीही खासदार उदयनराजे भोसलेंनी भ्रष्टाचाऱ्यांवर शरसंधान साधलं होतं. “धरणं, कालवे भ्रष्टाचाराने भरल्यानेच शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली”, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
शिवाय, “ज्यांना आपण धुतल्या तांदळासारखे असल्याचं वाटतं, त्यांनी सुरक्षेशिवाय रस्त्याने फिरून दाखवावं. हिम्मत असेल तर एकट्याने रस्त्यावरून जावं, मग बघा लोकांच्या मनात तुमच्याबद्दल किती राग आहे. मी एकटाच सगळीकडे फिरतो, मी नैतिकता पाळली आहे, तुम्ही अशी नैतिकता पाळून दाखवा, असं चॅलेंज देतो”, असंही काही दिवसांपूर्वी उदयनराजे म्हणाले होते.
===================================================
नेहरा आणि विराटच्या 'या' फोटोमागचं सत्य काय
नवी दिल्ली: वेस्टइंडिजसोबत सेमीफायनलमध्ये हरल्यानंतर भारत टी-20 विश्वषचषकातून बाहेर पडलं असलं तरी या दरम्यान, विराट कोहलीचा एक फोटो खूपच व्हायरल झाला. या फोटोमध्ये विराट कोहलीसोबत आशिष नेहरा दिसतो आहे. जो विराटला अवॉर्ड देतोय. पण या फोटोमागचं नेमकं सत्य काय आहे ते जाणून घेऊयात.
या फोटोमध्ये टी-२० क्रिकेटचा क्रमांक एकचा फलंदाज विराट कोहली आणि टीम इंडियाचा सीनियर गोलंदाज आशिष नेहरा दिसत आहेत. विश्वचषकात विराट कोहलीच्या कामगिरीची बरीच चर्चा झाली. त्याचवेळी याच संघात आशिष नेहराही होता. त्यामुळेच हा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला.
एबीपी न्यूजनं या फोटोचा खरेपणा तपासल्यानंतर याबाबत फारच रोचक माहिती समोर आली. आजपासून 13 वर्षापूर्वी म्हणजेच 2003 साली अंडर 16च्या एका सामन्यात चांगलं प्रदर्शन करणाऱ्या विराट कोहलीला आशिष नेहराच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं होतं.
2003 साली दिल्लीच्या हरिनगर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये एक टुर्नामेंट झाली होती. त्यावेळी विराट फक्त 15 वर्षाचा होता. तर तेव्हा आशिष 1999 च्या टीम इंडियाचा भाग होता आणि संघात आपलं स्थान पक्कं करण्याचं प्रयत्न नेहरा करीत होता.
विराट कोहली सध्या टी-20 मधील नंबर एकचा फलंदाज आहे. तसंच कसोटी टीमचा कर्णधारही आहे. आशिष नेहरा कसोटी क्रिकेट खेळत नसला तरीही स्थानिक क्रिेकेट खेळताना दिल्लीच्या संघाचा विराट कर्णधार होता. त्यावेळी नेहरा त्याच्या संघात होता.
सध्या विराट कोहली यशाचा शिखरावर आहे. तर 36 वर्षीय आशिष नेहरानं टीम इंडियामध्ये सीनियर गोलंदाज म्हणून तब्बल 5 वर्षानं पुनरागमन केलं आहे. विराट आणि नेहरा हे दोघेही 2011च्या विश्वचषकातील विजयी संघातील सदस्य होते.
===================================================
बळीराजाला दिलासा! यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक, खासगी कंपनीचा अंदाज
नवी दिल्ली : सरकारी हवामान खात्यानं यंदाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्याआधीच एका खासगी कंपनीने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. खासगी कंपनीचा पावसाबाबतचा अंदाज बळीराजाला दिलासा देणार आहे. यंदा जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता या वर्तवण्यात आली आहे.
देशातील काही भागांमध्ये 104 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. मात्र, याला ईशान्य भारतातील राज्य अपवाद असतील, असेही या अंदाजात म्हटलं आहे.
डब्ल्यूआरएमएस (वेदर रिस्क मॅनेजमेंट सर्व्हिसेस) या खासगी कंपनीने हा अंदाज व्यक्त केला आहे. कृषी क्षेत्रातील विविध घटकांचा अभ्यास ही कंपनी करत असते. शिवाय, स्कायमेटप्रमाणेच हवामानाचा अंदाजही वर्तवण्यचां काम ही कंपनी करते. हवामाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या कंपन्यांमधील खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांक डब्ल्यूआरएमएस कंपनीचा लागतो.
विशेष म्हणजे या खासगी कंपनीने जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये किती पाऊस पडेल, याची टक्केवारी प्रसिद्ध केली आहे. शिवाय, प्रत्येक प्रदेशानुसारही पावसाची टक्केवारी जाहीर केलीय. मात्र, जाहीर केलेली अंदाज तंतोतंत खरा ठरेल, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आलीय. कारण पावसाळ्याला काही महिने बाकी असताना हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
“आम्ही सध्या कोणतीही ठाम अशी आकडेवारी जाहीर करत नाही. मात्र, पावसाबाबत एक साधारण अंदाज व्यक्त करत आहोत.”, असे डब्ल्यूआरएमएसचे हवामान तज्ञ क्रांती प्रसाद यांनी सांगितले.
===================================================
दुष्काळी पट्ट्यातील मंगळवेढ्याचा गौरव, ज्वारीला जीआय मानांकन
सोलापूर : मंगळवेढ्यातील ज्वारीला जीआय मानांकन मिळाल्याने दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार, हे निश्चित. स्वादिष्ट नैसर्गिक ज्वारी आता सात समुद्रापार देखील ग्राहकांना मिळू शकणार आहे.
पूर्वी सोलापूरची ओळख ‘ज्वारीचे कोठार’ अशी होती. कालांतराने बाजारपेठ आणि सातत्याने बदलत गेलेल्या पीक पद्धतीमुळे मागे पडलेली ही ओळख आता पुन्हा ज्वारीला जीआय मानांकन मिळाल्याने जगासमोर येणार असून कायम दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या या परिसरातील बळीराजाला देखील आता चांगले दिवस येऊ शकतात.
जीआय अर्थात भौगोलिक निर्देशन मानांकन, यंदा राज्यातील 7 पिकांना मिळाल्याने या शेतामालांना प्रतिष्ठा मिळून ही पिके साता समुद्रापार बाजारपेठेत देखील आता जावू शकणार आहेत.
मंगळवेढा हा कायमच्या दुष्काळी पट्ट्यातील भाग, अनेक भागात असलेली काळी सुपीक जमीन हे खरे मंगलावेढ्याचे वैभव. मात्र वरुणराजाची नेहमीच अवकृपा असली तरी केवळ एका पावसावर येथील बहाद्दर शेतकरी शेकडो पोती ज्वारीच्या पांढऱ्या शुभ्र दाण्यांचे पीक घेतो. कोणतेही रासायनिक खते आणि फवारण्याशिवाय मंगळवेढा येथे पिकलेली सेंद्रिय ज्वारी नुसती चवदारच नाही तर औषधी देखील आहे.
मंगळवेढा येथील 1 लाख 14 हजार हेक्टर क्षेत्रापैकी सध्या 45 हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले जाते. हलक्या जमिनीत एकरी 8 ते 10 क्विंटल, मध्यम जमिनीत 15 ते 20 आणि चांगल्या जमिनीत 25 ते 30 क्विंटल ज्वारीचे उत्पादन होते.
===================================================
प्रत्युषा बॅनर्जी आणि बॉयफ्रेंड राहुलची 'ती' मुलाखत
मुंबई: प्रत्युषा बॅनर्जी आणि तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एका रियालिटी शोमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी एबीपी माझाला त्यांनी दिलेली विशेष मुलाखत.
पाहा त्यावेळेस काय म्हणाली होती प्रत्युषा आपल्या बॉयफ्रेंडबद्दल.
VIDEO:
===================================================
प्रत्युषाच्या मृत्यूनंतर तिचा बॉयफ्रेंड चिप्स खात होता: राखी सावंत
मुंबई: ‘बालिका वधू’ फेम टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली आहे. मुंबईच्या गोरेगावमधील राहत्या घरी गळफास घेतला. प्रत्युषा अवघ्या 24 वर्षीची होती. प्रत्युषाच्या मृत्यून तिच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे.
प्रत्युषाच्या मृत्यूबाबत माहिती मिळाल्यानंतर अभिनेत्री राखी सावंतही काल तिच्या घरी गेली होती. त्यानंतर बोलताना राखी म्हणाली की, “प्रत्युषाचा मृतदेह पाहिला तेव्हा तिच्या कपाळावर सिंदूर भरलं होतं. मला विश्वासच बसत नाही. होळीच्या पार्टीत आम्ही एकत्रच होतो. तिचा मृतदेह पाहून मला धक्काच बसला. तिच्या गळ्यावर काही निशाण आहेत. तर तिचे ओठही काळे पडले होते. एवढ्या सुंदर मुलीला मी या अवस्थेत पाहूच शकत नाही.”
प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल रॉय हाच प्रत्युषाचा मृतदेह घेऊन रुग्णालयात गेला होता. मात्र, त्यानंतर तो तिथून गायब झाला होता. त्याच्याबद्दल बोलताना राखी सावंत म्हणाली की, “बॉयफ्रेंड राहुल राज तिचा मोबाइलही घेऊन पळाला आहे. ज्यामध्ये बरेच रेकॉर्डिंग आणि इतर गोष्टी असतील. ज्या तो नक्कीच डिलीट करेल. तिच्या मृत्यूनंतर तिचा बॉयफ्रेंड बाहेर चिप्स खात बसला होता. हे फारच धक्कादायक आहे.
प्रत्युषाच्या जवळील लोकांच्या मते, ही आत्महत्या नसून तिचा खून करण्यात आला आहे.
===================================================
आजारी कुत्र्याला हॉस्पिटलमध्ये नेताना भूसुरुंग स्फोटात 7 जवान शहीद!
दंतेवाडा (छत्तीसगड) : छत्तीसगडच्या दंतेवाड्यात झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे सात जवान शहीद झाले. मात्र, या हल्ल्याबात एक नवी माहिती समोर आली आहे. आजारी असलेल्या प्रशिक्षित कुत्र्याला हॉस्पिटलमध्ये भरतीसाठी नेताना रस्त्यात भूसुरुंग स्फोट झाला आणि त्यात सात सीआरपीएफ जवान शहीद झाले.
नक्षलवाद्यांनी बुधवारी रस्त्याच्या मधोमध भूसुरुंग स्फोट घडवला आणि या स्फोटात सीआरपीएफचे सात जवान शहीद झाले. हे सातही जवान आजारी असलेला आपल्या कुत्र्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते.
स्काऊट नावाचा हा प्रशिक्षित स्निफर डॉग होता. बेल्जियन मॅलिनॉईस जातीचा कुत्रा असून जंगलात राहिल्याने त्याला डिहायड्रेशन झालं होतं. त्यामुळे आजारी पडला होता. त्याच्यावर उपचार व्हावेत, म्हणून प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात येत होतं.
नक्षलवादी हल्ला होण्याची भीती ओळखून तशी पूर्वतयारीही जवानांनी केली होती. सर्व जवान साध्या वेशात आणि सीआरपीएफच्या गाडीऐवजी टेम्पोमधून प्रवास करत होते. मात्र, तरीही नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातू नते वाचू शकले नाहीत. नक्षलवाद्यांनी रस्त्यावर 40 ते 50 किलो स्फोटकांचा वापर करुन गाडीला उडवून दिलं.
हे सातही जवान साथी असलेल्या प्रशिक्षित कुत्र्याला वाचवताना शहीद झाले. विशेष म्हणजे ज्या कुत्र्याला वाचवताना सात जवान शहीद झाले, त्या कुत्र्याने गेल्या वर्षभरात नक्षलवाद्यांनी लपवलेले भूसुरुंग शोधून काढले होते.
===================================================
'प्रत्युषा आत्महत्या करुच शकत नाही, हा खून आहे'
मुंबई: ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जीनं काल (शुक्रवारी) आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, सुत्रांच्या मते, प्रत्युषाच्या शरीरावर काही संशयास्पद खुणा दिसून आल्या आहेत.
दरम्यान, प्रत्युषाचा खास मित्र आणि तिच्यासोबत काम करणारा एजाज खानने प्रत्युषाची हत्या झाली असल्याचा दावा केला आहे. ‘प्रत्युषा फारच धीट मुलगी होती. ती कधीही आत्महत्या करु शकत नाही. तिची हत्याच करण्यात आली आहे. तसंच प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राज हा या घटनेपासून फरार आहे. तसंच तो प्रत्युषाचा मोबाइलही घेऊन पळाला आहे. त्यामुळे मला वाटतं प्रत्युषाची हत्याच झाली असावी.’ असा आरोप एजाज खाननं केला आहे
===================================================
'बालिका वधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या
मुंबई : ‘बालिका वधू’ फेम टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली आहे. मुंबईच्या गोरेगावमधील राहत्या घरी गळफास घेतला.
यानंतर तिला अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
दरम्यान, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र वैयक्तिक आयुष्यातील चढउतारांमुळे ती डिप्रेशनमध्ये होती. त्यातूनच जमशेदपूरमध्ये जन्मलेल्या प्रत्युषाने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
कलर्स चॅनलवरील ‘बालिका वधू’ मालिकेतील आनंदीच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर ती ‘झलक दिखला जा’च्या पाचव्या आणि ‘बिग बॉस’च्या सातव्या सीझनची स्पर्धक होती. सध्या ती पॉवर कपल नावाच्या रिअॅलिटी शो करत होती.
===================================================
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड ?
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ३ - माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद संभाळावे अशी बीसीसीआयची इच्छा असून, त्यासाठी राहुल द्रविडशी संपर्क साधण्यात आल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. बीसीसीआयने नियुक्त केलेल्या मुख्य सल्लागार समितीने राहुल द्रविडकडे मुख्य प्रशिक्षकपदासाठी विचारणा केली आहे.बीसीसीआयने नियुक्त केलेल्या सल्लागार समितीमध्ये भारताच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण हे दिग्गज आहेत. राहुल द्रविड मागच्यावर्षभरापासून भारत 'अ' आणि अंडर-१९ संघाचे प्रशिक्षकपद संभाळत आहे.कसोटी क्रिकेट आणि भारतातील युवा गुणवान क्रिकेटपटूंना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी राहुल द्रविड या पदासाठी योग्य असल्याचे बीसीसीआयचे मत आहे. राहुल द्रविडकडून होकार आला तर, त्याला संघ बांधणीसाठी पूर्ण मोकळीक देण्यात येईल तसेच दूरदृष्टीचा विचार करुन त्याची २०१९ पर्यंत मुख्यप्रशिक्षकपदावर नियुक्ती केली जाऊ शकते.भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांचा संघासोबतचा करार टी-२० वर्ल्डकपपर्यंतचा होता. त्यांना भारतीय संघासोबत काम करण्याची इच्छा आहे. पण त्यांच्या नावाचा मुख्य प्रशिक्षकपदासाठी विचार होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्य प्रशिक्षकपदावर चर्चा करण्यासाठी सल्लागार समितीची मंगळवारी बैठक होणार आहे.द्रविडने सध्या आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हील्स संघाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी स्वीकारली आहे. मागच्या महिन्यात राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदाखाली भारताच्या अंडर-१९ संघाने अंतिमफेरीपर्यंत मजल मारली होती.
===================================================
आज ठरणार टी-२० चॅँम्पियन
- टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दोन माजी विजेते संघ आज आपल्या दुसऱ्या जेतेपदासाठी समोरासमोर उभे ठाकणार आहेत. इंग्लंडने २०१०मध्ये, तर वेस्ट इंडिजने २०१२मध्ये टी-२० विश्वचषकावर नाव कोरले आहे. दोन्ही संघ दुसऱ्या किताबासाठी सज्ज झाले आहेत. तुफानी फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या क्रिकेट प्रकारात दोन्ही संघ ‘सुपर टेन ओव्हर’मध्ये तगडे आहेत. या पार्श्वभूमीवर, आकडे काय बोलतात हे पाहू या.वेस्ट इंडिजने या स्पर्धेतील ५ सामन्यांत धावांचा पाठलाग करून ४ सामन्यांत विजय मिळविला. अफगाणिस्तानविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३पैकी २ सामन्यांत विजय मिळविला, तर २ सामन्यांत धावांचा पाठलाग करून विजयावर शिक्कामोर्तब केले.
===================================================
‘त्यांना’ देशात राहण्याचा अधिकार नाही
- नाशिक : भारतमाता की जय म्हणायचे की नाही यावरून सध्या देशात वाद सुरू असून, भारतमाता की जय न म्हणणाऱ्यांना देशात राहण्याचा कोणताच अधिकार नाही, असे ठणकावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारच्या घोषणा देणाऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी उभे राहत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.भाजपाच्या राज्यस्तरीय कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने शनिवारी गोदाकाठावर आयोजित संवाद यात्रेच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे होते. आपल्या पाऊण तासाच्या भाषणात फडणवीस यांनी, ‘भारत माता’ विरोधात घोषणा देणाऱ्यांना आडवे हात घेतले.भारतमाता की जय, वंदे मातरम या विषयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असून, विरोधकांनी प्रसंगी भाजपाला विरोध करावा; परंतु भारत मातेला विरोध करू नये; ते देशातील जनता कदापि सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.नाशिकच्या गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी देण्याच्या विषयावरही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, मराठवाड्याला पाणी सोडले त्यावेळी आमदार, खासदार यांनी आपल्याकडे येऊन तक्रार केली; परंतु राज्यातील एक भाग तहानलेला असताना त्यांना पाणी न देणे योग्य होणार नाही, अशी भूमिका आपण घेतली व मराठवाड्याला पाणी सोडले, असे त्यांनी स्पष्ट केले.शिवसेनेला केले लक्ष्यस्वतंत्र मराठवाड्याच्या विषयावरून भाजपाच्या महिला मेळाव्यावर हल्ला करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी लक्ष्य केले. ज्यांनी स्वतंत्र मराठवाड्याला विरोध केला, त्यांनीच मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध दर्शविला, एकीकडे संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करायची व दुसरीकडे मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध करायचा ही कोणती नैतिकता आहे, असा सवाल करून मराठवाड्यातील जनता आपलीच आहे, ती पाकिस्तानी नाही त्यामुळे एकदा ठरवून टाका जे करायचे ते करा, मला विरोध घ्यावा लागला तरी घेईन व प्रसंगी नाशिककरांची माफी मागेन; परंतु मराठवाड्यासाठी घोटभर पाणी देईन, असे फडणवीस म्हणाले.
===================================================
शंभर मुलांपैकी एक जण असतो स्वमग्न!
- मुंबई : देशात जन्माला येणाऱ्या १०० मुलांपैकी १ किंवा २ मुले स्वमग्न असू शकतात. हा एक आजार आहे. पण स्वमग्नता म्हणजे गतिमंद नाही, हे लक्षात घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.२ एप्रिल हा दिवस स्वमग्नता जनजागृती दिन म्हणून पाळला जातो. स्वमग्न असणारी मुले ही आपल्याच विश्वात रमलेली असतात. त्यांना लोकांशी संवाद साधताना अडचणी येतात. पण याचा अर्थ त्यांची आकलन क्षमता कमी आहे, असा लावला जातो. या मुलांना काही कळत नाही, त्यांची बौद्धिक क्षमता कमी आहे, असा विचार करूनच त्यांना डॉक्टरांकडे आणले जाते. स्वमग्न मुलांच्या पालकांना त्यांची मुले ओझे वाटतात. हे अत्यंत चुकीचे आहे, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.या व्यक्ती एकट्या राहतात. त्यांना समाजात मिसळायला आवडत नाही. ते दुसऱ्यांशी संवाद साधत नाहीत. अनेकदा आपल्या विचारात असताना ही मुले सतत हालचाल करणे, एकटक पाहत राहणे अशा गोष्टी करतात. अनेकदा ही मुले पालकांशी संवाद साधत नाहीत. पालकांनी लाडाने जवळ बोलावून ही मुले त्यांच्या भावंडांबरोबर खेळत नाहीत. त्यांना आवडणाऱ्या काही तरी वेगळ्या गोष्टी करत असतात. त्यामुळे पालकांचा तणाव वाढतो.पालकांनी घाबरून जाऊ नये. या मुलांमध्ये कौशल्य नैसर्गिकरीत्या विकसित होत नाहीत. त्यांना प्रशिक्षण द्यावे लागते. साध्या गोष्टी त्यांना शिकवाव्या लागतात. त्यांच्या आवडीच्या गोष्टीत ते चांगली प्रगती करू शकतात. त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना ट्रेनिंग सेंटरमध्ये नेले पाहिजे. त्यामुळे या मुलांची प्रगती चांगली होईल.
===================================================
देवनारसाठी आता काटेकोर उपाययोजना राबवण्याची गरज!
- प्रासंगिक : शेफाली परब-पंडितझपाट्याने विकसित होणाऱ्या शहराचे नियोजनही दूरगामी असणे आवश्यक आहे़ मात्र महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे आज अनेक नागरी व पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे़ पाणीपुरवठ्याने यापूर्वीच मुंबईच्या तोंडचे पाणी पळविले आहे़ त्यात आता कचरा समस्येने भर घातली आहे़ कचऱ्याच्या या डोंगराला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे देवनार डम्पिंग ग्राउंडच्या रूपाने पूर्व उपनगर गॅसवर आहे़मुंबईची लोकसंख्या वाढली तशीच कचऱ्याचे ढीगही टनावरी वाढत आहेत. आजच्या घडीला मुंबईत दररोज साडेनऊ हजार मेट्रिक टन कचरा तयार होतो़ यामध्ये ई-कचरा, जैविक कचरा आणि बांधकाम साहित्याच्या रूपाने डेब्रिजच्या कचऱ्याने भर घातली आहे़ हा कचरा सामावून घेण्यासाठी अवघे तीन डम्पिंग ग्राउंड उरले आहेत़ त्यापैकी दोन डम्पिंग ग्राउंडची क्षमता यापूर्वीच संपुष्टात आली आहे़ कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागांची व्यवस्था होत नसल्याने मुंबईत कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ त्यामुळे कचरा तयार होतो, त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणे हाच एकमेव पर्याय उरला आहे़निवासी सोसायट्यांमध्ये कचरा वर्गीकरणाची सक्ती करून दशक उलटले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकलेली नाही़ कचऱ्यापासून वीजनिर्मिती हा कागदावरच राहिलेला प्रयोग़ कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी साडेतीन हजार कोटी खर्च करण्याचा प्रकल्प काही वर्षांपूर्वी तयार झाला़ मात्र या प्रकल्पामध्ये काम कमी आणि आरोपच जास्त झाले़ परिणामी कचऱ्याची समस्या जैसे थेच आहे़ त्यात आता देवनार डम्पिंग ग्राउंडवर वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांनी पालिकेची डोकेदुखी वाढवली आहे़भंगार माफिया, कचरावेचक, बांधकाम माफिया, बेकायदा झोपड्या या सर्व घटकांमुळे देवनार डम्पिंग ग्राउंडचा भडका उडू लागला आहे़ ही आग लागते की लावण्यात येते, याचे सत्य अजून उघड झालेले नाही़ देवनारच्या आगीमुळे राजकीय वाद पेटला आहे़ मात्र सत्य बाहेर आणण्यात राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती दिसून येत नाही़ पुढच्या वर्षी महापालिका निवडणुका असल्याने या आगीचे भांडवल करून राजकीय कचराफेक सुरू झाली आहे़

No comments:
Post a Comment