[अंतरराष्ट्रीय]
१- वॉशिंग्टन; विस्कॉन्सीन राज्यात क्रुझ, सँडर्स यांचा विजय
२- लंडन; दुस-या महायुद्धानंतर दुरावलेले प्रेमी ७० वर्षांनी करणार लग्न
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- भुजबळ कर्जबुडव्यांच्या यादीत, 'एसबीआय'कडून जप्तीच्या हालचाली
४- मोबाईलवर आता विना इंटरनेट 'फ्री'मध्ये पाहा दूरदर्शन
५- 'भारतमाता की जय'म्हणणाऱ्यांनाच मारहाण-केजरीवाल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- फाशी की जन्मठेप? 2003च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना आज शिक्षा
६- झालं समाधान ? पाकिस्तानच्या कोलांटीउडीवरून उद्धव ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र
७- रत्नागिरी एसटी डेपोला आग, कॅश विभाग जळून खाक
८- श्रीनगर; बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
९- दुष्काळामुळे मराठवाड्यातील कैद्यांचं नाशिकमध्ये स्थलांतर?
१०- मुंबई; महापौर उवाच्च... माझ्यामुळे वाढतो वृत्तपत्रांचा खप!
११- तिरंग्यावरून दुसऱ्या दिवशीही खडाजंगी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- लातूरमध्ये सीआयडी प्रमुखांच्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून हत्या
१३- बारामती; प्रबळ इच्छाशक्तीचा 'करिष्मा'! बारामतीच्या कन्येची 'नासा'मध्ये झेप
१४- पुणे; आयसिसची भरती करणारा संशयित पुण्यातून ताब्यात
१५- नागपूर; एका मेसेजमुळे बुकी सुभाष शाहूच्या हत्येचा पाच वर्षांनी उलगडा
१६- हैदराबाद; तीन इंचानी उंची वाढवण्यासाठी तरुणाची पाय कापून शस्त्रक्रिया
१७- श्रीनगर; कुपवाडामध्ये चकमकीत दहशतवादी ठार
१८- पुणे; कोथरुड परिसरात पुन्हा वाहन जळीतकांड
१९- लासूर; भर उन्हाळ्यात शेतकऱ्याने 'पिकवले' पाणी
२०- श्रीनगर: बिगर काश्मीरी विद्यार्थ्यावर लाठीमार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- आता हॅकर्सही हात टेकतील, तुमचं पर्सनल व्हॉट्सअॅप चॅट आणखी सुरक्षित
२२- शाओमीचा सहावा बर्थडे, ग्राहकांसाठी आज विशेष सेल, स्मार्टफोनमध्ये भरघोस सूट!
२३- सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला झापलं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२४- रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे आवश्यक ; महापौर स्वामी
२५- मुखेडमध्ये आगीचे तांडव; सात दुकाने जळून खाक
२६- इस्लापूर; सागवान तस्काराच्या हल्ल्यात दोन वनरक्षक जखमी
२७- व्यापाऱ्याच्या पुनर्वसनासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु - आ. चिखलीकर
२८- जिल्ह्यातील शोषखड्ड्याचा उपक्रम प्रेरणादायी - युनिसेफकडून कौतुक
२९- सामान्य दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती: नियमाचे उलंघन करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आठ दिवसाची मुदत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
मिलिंद जोंधळे, गणेश बोडके, मारोती कदम, श्रीकांत घोन्से, राजरतन साळवे, शिवकुमार कल्याणी, पठाण इम्रानखान, सैलेश राठोड, गुरमितसिंग महाजन, विनायक देशमुख
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
पैसा हा खतासारखा आहे, तो साचवला की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो
(रवींद्र गायकवाड, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
==========================================












१- वॉशिंग्टन; विस्कॉन्सीन राज्यात क्रुझ, सँडर्स यांचा विजय
२- लंडन; दुस-या महायुद्धानंतर दुरावलेले प्रेमी ७० वर्षांनी करणार लग्न
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- भुजबळ कर्जबुडव्यांच्या यादीत, 'एसबीआय'कडून जप्तीच्या हालचाली
४- मोबाईलवर आता विना इंटरनेट 'फ्री'मध्ये पाहा दूरदर्शन
५- 'भारतमाता की जय'म्हणणाऱ्यांनाच मारहाण-केजरीवाल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- फाशी की जन्मठेप? 2003च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना आज शिक्षा
६- झालं समाधान ? पाकिस्तानच्या कोलांटीउडीवरून उद्धव ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र
७- रत्नागिरी एसटी डेपोला आग, कॅश विभाग जळून खाक
८- श्रीनगर; बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
९- दुष्काळामुळे मराठवाड्यातील कैद्यांचं नाशिकमध्ये स्थलांतर?
१०- मुंबई; महापौर उवाच्च... माझ्यामुळे वाढतो वृत्तपत्रांचा खप!
११- तिरंग्यावरून दुसऱ्या दिवशीही खडाजंगी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- लातूरमध्ये सीआयडी प्रमुखांच्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून हत्या
१३- बारामती; प्रबळ इच्छाशक्तीचा 'करिष्मा'! बारामतीच्या कन्येची 'नासा'मध्ये झेप
१४- पुणे; आयसिसची भरती करणारा संशयित पुण्यातून ताब्यात
१५- नागपूर; एका मेसेजमुळे बुकी सुभाष शाहूच्या हत्येचा पाच वर्षांनी उलगडा
१६- हैदराबाद; तीन इंचानी उंची वाढवण्यासाठी तरुणाची पाय कापून शस्त्रक्रिया
१७- श्रीनगर; कुपवाडामध्ये चकमकीत दहशतवादी ठार
१८- पुणे; कोथरुड परिसरात पुन्हा वाहन जळीतकांड
१९- लासूर; भर उन्हाळ्यात शेतकऱ्याने 'पिकवले' पाणी
२०- श्रीनगर: बिगर काश्मीरी विद्यार्थ्यावर लाठीमार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- आता हॅकर्सही हात टेकतील, तुमचं पर्सनल व्हॉट्सअॅप चॅट आणखी सुरक्षित
२२- शाओमीचा सहावा बर्थडे, ग्राहकांसाठी आज विशेष सेल, स्मार्टफोनमध्ये भरघोस सूट!
२३- सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला झापलं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२४- रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे आवश्यक ; महापौर स्वामी
२५- मुखेडमध्ये आगीचे तांडव; सात दुकाने जळून खाक
२६- इस्लापूर; सागवान तस्काराच्या हल्ल्यात दोन वनरक्षक जखमी
२७- व्यापाऱ्याच्या पुनर्वसनासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु - आ. चिखलीकर
२८- जिल्ह्यातील शोषखड्ड्याचा उपक्रम प्रेरणादायी - युनिसेफकडून कौतुक
२९- सामान्य दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती: नियमाचे उलंघन करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आठ दिवसाची मुदत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
मिलिंद जोंधळे, गणेश बोडके, मारोती कदम, श्रीकांत घोन्से, राजरतन साळवे, शिवकुमार कल्याणी, पठाण इम्रानखान, सैलेश राठोड, गुरमितसिंग महाजन, विनायक देशमुख
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
पैसा हा खतासारखा आहे, तो साचवला की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो
(रवींद्र गायकवाड, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
==========================================
आता हॅकर्सही हात टेकतील, तुमचं पर्सनल व्हॉट्सअॅप चॅट आणखी सुरक्षित
मुंबई: तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी व्हॉट्सअॅप आणखी पावलं उचलत आहे. यापुढे तुमच्या व्हॉट्सअॅपचा डेटा कोणीही हॅक करु शकणार नाही. कारण आपल्या ग्राहकांची प्रायव्हसी जपण्यासाठी व्हॉट्सअॅपने ‘एंड-टू-एंड’ एनक्रिप्शन’ ही सुविधा सुरु केली आहे.
ज्यामुळे दोन व्यक्तींमध्ये व्हॉट्सअॅपवर पाठवले जाणारे मेसेज, व्हॉईस कॉल आता हॅक करता येणार नाहीत.
अमेरिकेत मोबाईल कंपनी अॅपल आणि पोलिस तपास यंत्रणा एफबीआय यांच्यातल्या कायदेशील लढाईनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
याआधी व्हॉट्स अॅपवर दोन व्यक्तींमध्ये पाठवले जाणारे मेसेज सहज हॅक करता येऊ शकत होते. पण अमेरिकेत अतिरेक्यांचा आयफोन चेक करण्यासाठी एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या परवानगीशिवाय फोन हॅक केला होता. त्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतलाय.
तुमचा डेटा आणि चॅट/संवाद सुरक्षित ठेवण्याला आमचं प्राधान्य आहे. हे आणखी सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान विकसित केलं आहे. तुमचा खासगी संवाद ‘एंड-टू-एंड’ एनक्रिप्शन’द्वारे आणखी सुरक्षीत होईल, असं व्हॉट्सअपचे संस्थापक जॅन कौम यांनी म्हटलं आहे.
“तुमचे मेसेज कोणीही पाहू शकणार नाही. हॅकर्सनाही ते शक्य होणार नाही. इतकंच काय तर आम्हालाही ते पाहता येणार नाही. ‘एंड-टू-एंड एनक्रिप्शन’मुळे व्हॉट्सअप चॅट आणखी सुरक्षीत होईल. अगदी समोरासमोर किंवा ‘फेस ट फेस’ संवाद साधल्याप्रमाणेच ते गोपनीय असेल” असा दावा व्हॉट्सअपने केला आहे.
==========================================
लातूरमध्ये सीआयडी प्रमुखांच्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून हत्या
लातूर: लातूरमध्ये सीआयडी प्रमुखांच्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना खळबळजनक घटना घडली आहे. आयपीएस अधिकारी प्रसाद अक्कानवरु यांचे वडील प्रल्हाद अक्कानवरु यांचा काल पहाटे अज्ञात व्यक्तीनं खून केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.
लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील बोथी रोडवर काल पहाटे प्रल्हाद अक्कानवरू (वय ७५) हे झोपले असताना अनोळखी इसमाने त्याच्या अंगावर दगड घालून त्याचा खून केला. चाकूरच्या बोथी रोड वर त्यांच्या मुलाचे दुकान आहे त्याच्या समोर प्रल्हाद अक्कानवरू हे झोपले होते. दरम्यान, पहाटेच्या वेळी त्यांच्या अंगावर दगड घालून त्यांनी त्यांची हत्या करण्यात आली.
या खुनाचं नेमकं कारण काय? याची सध्या पोलीस माहिती घेत आहेत. प्रल्हाद अक्कानवरू हे नागपूर सीआयडी विभागाचे आय पी एस अधिकारी प्रसाद अक्कानवरू यांचे वडील होते. चाकूरसारख्या ग्रामीण भागात, बोथी रोडवरील कायम माणसांचा राबता असलेल्या ठिकाणी अशी घटना घडल्याने पोलिसांबरोबरच सर्वासामान्य चाकूरकर देखील हादरुन गेले आहेत.
==========================================
फाशी की जन्मठेप? 2003च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना आज शिक्षा
मुंबई: 2003च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाकडं मुंबईसह देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
सरकारी वकील रोहिणी सैलियन यांनी आरोपींनी कठोर शिक्षा करण्याची मागणी कोर्टात केली आहे. आरोपी मुझम्मील अन्सारी फाशी, तर साकीब नाचन याला जन्मठेप ठोठावण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली आहे.
या स्फोटाचा मास्टरमाईंड साकीब नाचनसह 10 आरोपींना कोर्टानं दोषी ठरवलं आहे. तर 3 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. मुझम्मील अन्सारीला बॉम्ब ठेवण्यासह एकूण 18 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं आहे. आज या सर्व दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे.
डिसेंबर 2002 आणि मार्च 2003 दरम्यान मुंबईच्या विविध भागांमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. 6 डिसेंबर 2002 रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळ मॅक्डोनाल्डमध्ये, 27 जानेवारी 2003 रोजी पार्ल्याच्या भाजी मार्केटमध्ये तर 13 मार्च 2003 रोजी मुलुंड रेल्वे स्टेशनजवळ लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यात 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर 27 जण जखमी झाले होते.
==========================================
रत्नागिरी एसटी डेपोला आग, कॅश विभाग जळून खाक
रत्नागिरी: रत्नागिरीत एसटी डेपोला आज पहाटेच्या दरम्यान अचानक आग लागली. आग लागल्यानं त्यामुळे एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली.
कॅश विभागात आगीचा प्रभाव सर्वाधिक होता. यात तिकीटांची 100 हून अधिक मशीन जळून खाक झाले आहेत. दरम्यान, ही आग कशामुळे लागली आहे याबाबत अद्याप नेमकं कारण समजू शकलेलं नाही. आगीमध्ये एसटी आगाराचं मोठं नुकसान झाल्याचं समजतं आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांना जुनी तिकीट देण्यात आली आहेत.
गेल्या दोन महिन्यात रत्नागिरी एसटी डेपोला आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे आजच्या आगीनंतर परिक्षार्थी विद्यार्थी आणि प्रवाशांचे चांगलेत हाल झालेले पहायला मिळाले. त्यामुळे वारंवार आग लागण्याचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करीत आहेत.
==========================================
बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील बिगर काश्मिरी विद्यार्थ्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं समोर आलं आहे. या प्रकारानंतर एनआयटीच्या कॅम्पसमध्ये सध्या छावणीचं स्वरुप आहे.
काश्मिर बाहेरील विद्यार्थ्यांनीचं लाठीचार्जचा हा व्हिडिओ फेसबूकवर अपलोड करत, पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला आहे.
टी20 विश्वचषाकाच्या सेमिफायनलमध्ये टीम इंडियाच्या वेस्ट इंडिजकडून झालेल्या पराभवानंतर काही काश्मीरी विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला होता. तसेच त्यावेळी देशविरोधी घोषणाबाजी झाल्याचा आरोप आहे. या घटनेवरुन दोन गटात वाद झाला. यानंतर एनआयटी प्रशासनानं होस्टेल आणि क्लास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा होस्टेल आणि क्लास सुरु करण्यात आले. मात्र काश्मीर बाहेरील विद्यार्थ्यांच्या एक गटानं देशविरोधी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्पसबाहेर हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज समोर आलं आहे.
आम्ही शांततेने आंदोलन करत होतो, मात्र पोलिसांनीच हिंस्र रुप घेत लाठीमार केल्याचा दावा संबंधित विद्यार्थ्यांनी केला आहे.
दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी याप्रकरणी काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी बातचीत केली. मुफ्ती यांनी दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याचं सांगण्यात येत आहे.
==========================================
दुष्काळामुळे मराठवाड्यातील कैद्यांचं नाशिकमध्ये स्थलांतर?
लातूर: मराठवाड्यातील पाण्याचं दुर्भिक्ष दिवसेंदिवस गहिरं होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. लातूरमधील परिस्थिती तर खूपच भीषण आहे.
त्यामुळेच लातूर आणि बीड इथल्या कारागृहांतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काही कैद्यांना नाशिक आणि धुळे येथील कारागृहात हलविण्याची चाचपणी कारागृह प्रशासनाने केली.
लातूर आणि बीड जिल्ह्यात सुमारे ३५० कैदी आहेत. कारागृहात पाणी कमी पडत होते. मात्र, लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी तूर्त ३ टँकर उपलब्ध केले आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्यास १०० कैद्यांना धुळे आणि तेवढय़ांनाच नाशिक कारागृहात हलविण्याची तयारी सुरू आहे, असे औरंगाबाद विभागाचे कारागृह महानिरीक्षक राजेंद्र धाम्हणे यांनी सांगितले.
==========================================
शाओमीचा सहावा बर्थडे, ग्राहकांसाठी आज विशेष सेल, स्मार्टफोनमध्ये भरघोस सूट!
मुंबई: चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी आज आपला सहावा वर्धापनदिन साजरा करीत आहे. याचनिमित्त आज शाओमीनं ग्राहकांसाठी खास ऑफर आणल्या आहेत. तसंच आज पहिल्यांदाच Mi 5 हा शाओमीचा नवा स्मार्टफोनही खरेदी करता येणार आहे.
शाओमीचा फ्लॅश सेल आज सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत असणार आहे. यामध्ये अनेक डिव्हाइस आणि स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.
फ्लॅश सेलमधील विशेष ऑफर:
- Mi5 – आजपासून हा स्मार्टफोन भारतात मिळणार आहे. mi.com या वेबसाइटवर सकाळी 11.00 वाजता, दुपारी 2 आणि 5 वाजता यासाठी सेल असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये क्लॉलक्वॉम स्नॅपड्रॅगन 820 असणार आहे. 16 मेगापिक्सल कॅमेरा आणि गोरिला ग्लास सपोर्ट असणार आहे. हा स्मार्टफोन तुम्ही आज 24,999 रु. खरेदी करु शकतात.
- रेडमी नोट 3- मागील महिन्यात लाँच करण्यात आलेला रेडमी नोट 3 हा आजच्या फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला 9,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.
- Mi पॉवर बँक- 20,000 mAh क्षमतेची पॉवर बँक या फ्लॅश सेलमध्ये पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. याची किंमत अवघी 1,699 रु. आहे.
शाओमीच्या या फ्लॅश सेलमध्ये इतरही बऱ्याच ऑफर आज देण्यात आल्या आहेत. यामध्ये Mi 4 आणि रेडमी 2 प्राइम या स्मार्टफोनच्या किंमतीत सूट देण्यात आली आहे.
==========================================
भुजबळ कर्जबुडव्यांच्या यादीत, 'एसबीआय'कडून जप्तीच्या हालचाली
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग एनर्जी कंपनीनं स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयचं तब्बल 6 कोटींचं कर्ज बुडवल्यामुळं बँकेनं कंपनीच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणी एसबीआय बँकेकडून वृत्तपत्रात नोटीसही प्रसिद्ध कऱण्यात आली आहे. नाशकातल्या मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जमिनी आणि मुंबईतल्या विविध भूखंडावर बँकेनं प्रतिकात्मक स्वरूपाची जप्ती आणली आहे.
30 दिवसात कर्जाच्या रकमेची फेड न केल्यास, या संपत्तीचा बँकेकडून लिलाव करण्यात येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सदन आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटकेत असलेल्या भुजबळांमागील शुक्लकाष्ट काही केल्या कमी होताना दिसत नाही. पिंपळगाव टोल नाका आणि अशोका बिल्डकॉनच्या कार्यालयांवर काल ईडी आणि आयकर विभागाच्या संयुक्त पथकांनी धाडी टाकल्या. मात्र ही इन्कम टॅक्स विभागाची तपास मोहीम आहे. आम्ही त्यांना सहकार्य करत आहोत, असं अशोका बिल्डकॉनं सांगितलं आहे.
टोल कंत्राटाच्या बदल्यात अशोका बिल्डकॉन कंपनीकडून छगन भुजबळ यांना मोठा पैसा मिळाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता.
==========================================
सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला झापलं
मुंबई: सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयला मोठा झटका दिला. खेळाच्या विकासासाठी बीसीसीआयनं काहीही केलं नसल्याचा ठपका सर्वोच्च न्यायालयानं ठेवला आहे.
न्यायमूर्ती लोढा समितीनं केलेल्या शिफारशी का लागू केल्या जाऊ शकत नाहीत, याविषयी बीसीसीआयनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी हे खडे बोल सुनावले.
बीसीसीआयच्या पाच वर्षांच्या अहवालानुसार, बिहार, मणिपूर, मिझोरम आणि मेघालय या राज्यांना एक पैसाही मिळालेला नाही. मध्य प्रदेश, छत्तीसगडसह अकरा राज्यांनी केलेल्या निधीच्या मागणीकडे बीसीसीआयनं दुर्लक्ष केल्याचं या अहवालातून समोर आलंय. या प्रकऱणात पुढील सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे.
==========================================
आयसिसची भरती करणारा संशयित पुण्यातून ताब्यात
पुणे : आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करणारा इस्माईल अब्दुल रौफ याला पुण्याच्या लोहगाव विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीवरुन एनआयएने आज ही कारवाई केली.
33 इस्माईल अब्दुल रौफ हा कर्नाटकच्या भटकळ इथला मूळचा रहिवासी आहे. रौफ पुणे विमानतळावरुन दुबईला जात होता. तिथून तो आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियामध्ये जाणार होता, असं सांगितलं जात आहे.
मागील अनेक दिवसांपासून एनआयएची इस्माईल अब्दुल रौफवर नजर होती. रौफ इंटरनेट चॅटच्या माध्यमातून आयसिसमध्ये भरती करण्यासाठी तरुणांचा शोध घेत होता. एनआयए आता रौफची चौकशी करत आहे.
दरम्यान, आयसिसशी संबंध असल्याच्या संशयातून एनआयएने देशभरातून आतापर्यंत 14 तरुणांना अटक केली आहे.
==========================================
एका मेसेजमुळे बुकी सुभाष शाहूच्या हत्येचा पाच वर्षांनी उलगडा
नागपूर : नागपुरात पाच वर्षापूर्वी झालेल्या क्रिकेट बुकी सुभाष शाहूच्या हत्येचा उलगडा एका एसएमएसने झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी त्याचाच मित्र महेश लांबटला अटक केली आहे. पण साधू मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
सुभाष शाहू हा नागपुरमधील मोठा क्रिकेट बुकी होता. बेटिंगमधून त्याने प्रचंड माया कमावली होती. त्यामुळे शाहू नागपुरातील गुंडांच्या हिट लिस्टवर होता. ती भीती शाहूने त्याचा मित्र महेश लांबटला बोलूनही दाखवली. पण या अनाठायी भीतीनेच सुभाष शाहूचा घात केला.
महेश लांबटने सुभाषच्या सुरक्षेसाठी प्लॅन आखला. घरात आणि घरासमोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं लावायला सांगितलं. यादरम्यान लांबटने सुभाष शाहूची ओळख एका साधूसोबत करुन दिली. पण हा साधू लांबटचा मित्र होता. शाहूच्या घरातील सीसीटीव्हीचं वर्णन महेश लांबट तथाकथित साधूला द्यायचा आणि साधू त्याचा हवाला देऊन शाहूला भीती घालायचा.
भीतीच्या सावटात जगता जगता 2011 चा सप्टेंबर महिना उजाडला. घटस्थापनेचा दिवस होता. लांबटने तथाकथित साधूशी संगनमत करुन सुभाषला आशीर्वाद आणि प्रसाद दिला, ज्यात पोटॅशियम सायनाईड होतं. कुटुंबीयांना सुभाषला ह्रदयविकाराचा झटका आल्याचा आभास झाला. मात्र पोस्टमॉर्टेममध्ये विषप्रयोग झाल्याचं उघड झालं. पोलिसांनी तपास सुरु केला. पण त्यात फारसा दम नव्हता. निव्वळ वेळकाढूपणा करुन 2013 साली पोलिसांनी तपास बंद केला.
अखेर सुभाषची भाची प्रियाकाने थेट पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना मेसेज करुन मामाच्या हत्या प्रकरणात न्याय देण्याची मागणी केली. मग सूत्रं हलली. क्राईम ब्रान्चने हे प्रकरण पुन्हा उघडलं. तपास झाला आणि अवघ्या काही दिवसात महेश लांबट गजाआड झाला. पण अजूनही विषप्रयोग करणारा साधू फरार आहे. पोलिसांनी त्याच्या तपासासाठी पथकंही रवाना केली.
==========================================
तीन इंचानी उंची वाढवण्यासाठी तरुणाची पाय कापून शस्त्रक्रिया
हैदराबाद : निसर्गतः मिळालेलं शरीर आणि रुप यात फारसा बदल करता येत नाही, असं म्हणतात. मात्र अत्याधुनिक शास्त्रांच्या आधारे अघोरी उपाय करुन तथाकथित सौंदर्याच्या व्याख्यांमध्ये बसण्याचा प्रयत्न अनेकांकडून होतो. अशीच एक शस्त्रक्रिया अंगलट आल्याचं उदाहरण हैदराबादमध्ये समोर आलं आहे.
5 फूट 7 इंच इतकी उंची कोणालाही हेवा वाटावी अशीच. मात्र असं असूनही आणखी 3 इंचांनी उंच होण्याचा हव्यास 22 वर्षीय तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. तब्बल 7 लाख रुपये मोजून निखिल रेड्डीने उंच होण्यासाठी पाय कापून त्यात रॉड बसवण्याची शस्त्रक्रिया केली.
निखिलने करवून घेतलेली ही ऑर्थोपेडिक सर्जरी तब्बल 7 तास चालली. विशेष म्हणजे कोणी अडथळा आणू नये यासाठी त्याने आपल्या कुटुंबीयांच्या नकळत ही शस्त्रक्रिया करुन घेतली. ऑपरेशन टेबलवर जाण्यापूर्वी हैदराबादमधील एका प्रसिद्ध रुग्णालयाला त्याने 4 लाख रुपये दिली आणि आपला मोबाईल फोन स्वीच ऑफ केला.
तीन दिवस मुलाचा थांगपत्ता न लागल्यामुळे निखिलच्या आई-वडिलांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे निखिलचा शोध लावला आणि प्रकरणाचा उलगडा झाला. रेड्डी दाम्पत्याने आपल्या परवानगीविना मुलाचं ऑपरेशन केल्याप्रकरणी हॉस्पिटलला धारेवर धरलं आहे, तर मुलगा 18 वर्षांवरील असल्यामुळे पालकांची संमती आवश्यक नसल्याचा बचावात्मक पवित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.
==========================================
मोबाईलवर आता विना इंटरनेट 'फ्री'मध्ये पाहा दूरदर्शन
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ६ - सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगाच मोबाईल युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हीच बाब लक्षात घेऊन 'दूरदर्शन' चॅनेलने एक पाऊल पुढे टाकत नवी सुविधा आणली असून त्याद्वारे आता तुम्हाला मोबाईलवरही 'दूरदर्शन' चॅनेल पाहता येणार आहे आणि तेही विनाइंटरनेट म्हणजे 'फ्री'मध्ये...देशांतील १६ शहरांमध्ये दूरदर्शनतर्फे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ग्राहकांना यासाठी कोणतेही पैसे मोजावे लागणार नाहीत. २५ फेब्रुवारीपासून दिल्ली, मुंबई, औरंगाबाद, कोलकाता, चेन्नी, गुवाहाटी, पाटणा, रांची, लखनऊ, जालंधर, रायपूर, इंदौर, भोपाळ, बंगळुरू आणि अहमदाबाद या शहरांमध्ये दूरदर्शनची डिजीटल टेलिव्हिजन सेवा सुरू झाली असून आता ग्राहकांना मोबाईलवरही दूरदर्शनचे कार्यक्रम पाहता येणार आहेत.कसे पहाल मोबाईलवर दूरदर्शन चॅनेल?दूरदर्शनच्या या फ्री टीव्ही सुविधेचा लाभ उठवण्यासाठी तुम्हाला डीव्हीबी-टी २ हे डोंगल घ्यावे लागेल. त्यानंतर डोंगलच्याच माध्यमातून एक सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्ही स्मार्ट फोन वा टॅबलेटमध्ये दूरदर्शन मोफत पाहू शकता. तसेच प्रवासादरम्यान जर तुम्हाला ही सुविधा असेल तर त्याकरिता त्या वाहनांवर लावण्यात आलेल्या वायफाय डोंगलद्वारे ही सुविधा उपलब्ध होईल.कोणकोणती चॅनेल्स उपलब्ध ?या सुविधेअंतर्गत तुम्ही डीडी नॅशनल, डीडी न्यूज, डीडी भारती, डीडी स्पोर्ट्स, डीडी प्रादेशिक, व डीडी किसान ही चॅनेल्स पाहू शकाल.
==========================================
महापौर उवाच्च... माझ्यामुळे वाढतो वृत्तपत्रांचा खप!
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ६ - प्रसारमाध्यमांमुळे डेंग्यू वाढतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींची शासनपद्धती मला हिटलरशाहीसारखं वाटते अशी वादग्रस्त वक्तव्य करणा-या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेेकर यांनी वक्तव्यांची मालिका कायम ठेवली असून ' माझ्यामुळेच वृत्तपत्र खपतात' अशी नवी मुक्ताफळे उधळली आहेत. मंगळवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दरम्यान आंबेकर यांनी असे वक्तव्य करत शिवसेनेला पुन्हा एकदा अडचणीत आणले. त्यांच्या या बेताल वक्तव्यानंतर विरोधकांनी खिल्ली उडवायला सुरुवात केली, मात्र शिवसेनेचा एकही सदस्य त्यांच्या मदतीसाठी धावला नाही.स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक पार पडली, त्यावेळी महापौर स्नेहल आंबेकर पीठासीन अधिकारी होत्या. निवडणुकीपूर्वीच उमेदवारीचा अर्ज मागे घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता, सर्वत्र शांतता असताना विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी महापौरांना कोपरखळी मारत काही बोलण्याचा आग्रह केला. ' स्थायी समितीत महापौर आल्या आहेत, पण त्या गप्प आहेत, काहीच बोलत नाहीत. त्या बोलल्या तर तात्काळ बातम्या होतात,' असा टोला छेडा यांनी हाणला असतात सभागृहात खसखस पिकली. त्यांना प्रत्युत्तर देण्यापासून स्नेहल आंबेकरंना स्वत:ला आवरता आले नाही आणि त्यांनी हसत हसतच ' हो, मी बोलले की वृत्तपत्रांची विक्री वाढते' असे विधान केले. त्यांच्या या विधानानेही सभागृहात हशा पिकला खरा मात्र त्यांच्या उत्तरामुळे शिवसेनेचे नगरसेवक गांगरले, अवाक् झाले. आपल्या विधानाचा मतितार्थ लक्षात आल्यानंतर आंबेकर यांनीही पुढे काहीही बोलणे टाळले.
==========================================
झालं समाधान ? पाकिस्तानच्या कोलांटीउडीवरून उद्धव ठाकरेंचे सरकारवर टीकास्त्र
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ६ - पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेला हल्ला भारतीय अधिका-यांनीच रचल्याचा दावा पाकिस्तानने केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ' पठाणकोटचा हल्ला म्हणजे हिंदुस्थानचा ड्रामा आहे, असा अहवाल पाकिस्तानी पथकाने दिला आहे. पाकड्यांना पायघड्या अंथरण्याचेच हे फळ आहे. झाले समाधान? देशातील राष्ट्रभक्त जनतेच्या वतीने हा आमचा सरकारला हा सवाल आहे!' असे उद्धव यांनी म्हटले आहे.==========================================पाकिस्तानी पथकाला हिंदुस्थानात येऊन चौकशी करण्याची परवानगी देऊ नका, असे आम्ही एका तळमळीने केंद्र सरकारला सांगत होतो. मात्र सरकारने कोणाचेही न ऐकता आपला हट्ट पूर्ण केला. म्हणजे मित्राचे काही एक ऐकायचे नाही आणि शत्रू देशावर मात्र नको तितका विश्वास ठेवायचा असा हा उफराटा न्याय! अशी घणाघाती टीका त्यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून सरकारवर केली आहे. 'पाकिस्तानने पाठीत असा खंजीर खुपसल्यानंतर तरी आपण शहाणे व्हायला हवे होते. मात्र ज्यांनी हल्ला घडवला त्यांनाच आपण चौकशी अधिकारी म्हणून आपल्या देशात बोलावले' असेही उद्धव यांनी म्हटले.
दुस-या महायुद्धानंतर दुरावलेले प्रेमी ७० वर्षांनी करणार लग्न
- ऑनलाइन लोकमतलंडन, दि. ६ - दुस-या महायुद्धात सहभागी झालेल्या 'त्या'च्यावर युद्धातील हिंसाचाराचा, जीविताहानीचा इतका परिणाम झाला की त्याने आपल्या वाग्दत्त वधूशी लग्न मोडले.. मात्र आपले खरे प्रमे विसरू न शकल्याने तब्बल ७० वर्षांनी 'त्या'ने परत तिचा शोध घेतला आणि आता अखेर ते दोघे लग्न करणार आहेत.खरतरं एखाद्या चित्रपटात शोभेल अशी ही घटना... पण लंडनमध्ये ही घटना प्रत्यक्षात घडली असून दुस-या महायुद्धादरम्यान दुरावलेले प्रेमी रॉय विकरमॅन आणि नोरा जॅकसन हे तब्बल ७० वर्षांनी वयाच्या नव्वदीत एकमेकांशी 'विवाहबद्ध' होत आहेत.स्टॅफोर्डशायरमधील हार्टशील येथे राहणारे रॉय आणि नोरा या दोघांचीही दुस-या महायुद्धाआधी एंगेजमेंट झाली होती, मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसातंच रॉय यांना युद्धात सहभागी होण्यासाठी जावे लागले. रॉय यांनी जून १९४४च्या तसेच १९४४ डिसेंबर तेजानेवारी १९४५ दरम्यान झालेल्या 'बॅटल ऑफ बल्ज' या युद्धांमध्ये सहभाग घेतला. मात्र त्यादरम्यान झालेला हिंसाचार, जीवितहानी यांचा रॉय यांच्या मनावर प्रचंड परिणाम ( पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर) झाला होता, त्या दु:खद आठवणींमुळे ते अस्वस्थ झाले आणि त्यामुळेच त्यांनी नोराशी झालेली एंगेजमेंट तोडून टाकली.या घटनेला अनेक दशकं उलटून गेल्यानंतरही रॉय यांना आपल्या प्रेमाचा विसर पडला नव्हता, त्यामुळेच त्यांनी एका स्थानिक रेडिओ चॅनलच्या मदतीने नोराचा शोध घेतला आणि नोराची माफी मागण्यासाठी ते फुलांचा गुच्छ घेऊन तिच्या घरी गेले. दार उघडताच नोरा यांनी रॉयला पाहिले आणि स्वत:ला त्यांच्या मिठीत झोकून दिलं. आणि अखेर एका वर्षांच्या रिलेशननंतर रॉय यांनी ९०व्या वाढदिवशी ८९ वर्षांच्या नोराला तीच अंगठी देऊन प्रपोज केले आणि त्या दोघांची पुन्हा एंगेजमेंट झाली. आता थोड्याच दिवसात ते विवाहबद्ध होतील.नोरा यांचे याआधी लग्न झाले होते, मात्र काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. रॉय यांना पुन्हा कधी पाहू शकू अशी मला आशाच नव्हती, पण त्यादिवशी त्यांना माझ्या घरासमोर पाहून मला अतिशय आनंद झाला, असे नोरा यांनी सांगितले. रॉयसोबत पुढचं आयुष्य काढण्यासाठी मी अतिशय उत्सुक असल्याचेही त्या म्हणाल्या.
==========================================
कुपवाडामध्ये चकमकीत दहशतवादी ठार
कुपवाडामध्ये चकमकीत दहशतवादी ठार
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात आज (बुधवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा जिल्ह्यातील शेखपुरा भागात ही चकमक झाली. शेखपुरा गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी शोधमोहिम राबविली होती. या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरवात केली. सुरक्षा रक्षकांनी या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरात एक दहशतवादी ठार झाला. परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याचा संशय असून, शोधमोहिम तीव्र करण्यात आली आहे.
==========================================
पुण्यात कोथरुड परिसरात पुन्हा वाहन जळीतकांड
पुणे - कोथरुड परिसरातील किश्किंधानगर येथील नवनाथ मित्रमंडळाजवळ उभ्या केलेल्या दुचाकी पेटवल्यामुळे आठ दुचाकी, टेम्पो आणि रिक्षा अशा दहा वाहनांसह वीजेचा खांब व त्यावरील दिव्याचे नुकसान झाले.
पुण्यात कोथरुड परिसरात पुन्हा वाहन जळीतकांड
आज (बुधवार) पहाटे अडीचच्या सुमारास अज्ञात व्यक्तिने दुचाकी पेटवल्याचा संशय आहे.
मोलमजुरी करणारी कुटूंबे दाटीवाटीने घर करुन या भागात राहतात. पार्किंगला जागा नसल्याने रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करतात. गुंड टोळ्यांच्या संघर्षातून आणि विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तिंकडून या भागात अधून मधून गाड्यांची तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडत असतात. किश्किंधानगर पोलिस चौकीच्या मागच्या बाजूला असलेल्या गल्लीत ही घटना घडल्याने रहिवाशांनी पोलिसांबद्दल चीड व्यक्त केली. पोलिसांच्या पंचनाम्यानुसार आठ दुचाकींचे सुमारे चार लाखाचे नुकसान झाले. यातील काही गाड्यांचा वीमा नसल्याने त्यांना भरपाई मिळणे अवघड आहे.
अमृता मानकुंबरे म्हणाल्या, मी दुचाकीच्या शोरुममध्ये काम करते. तिथूनच कर्जावर गाडी घेतली होती. रिक्षाचालक दत्तात्रेय ठोंबरे म्हणाले की, माझी सीएनजीची रिक्षा होती. हात भाजत असूनही मी धाडस करुन ती बाजूला घेतली नाहीतर आग आणखीन भडकली असती. ठोंबरेंच्या रिक्षाचे हुड जळाले.
सहाय्यक पोलिस निरिक्षक आर. एम. चांदिवडे यांनी सांगितले की, डीजे वा इतर बाबींवर खर्च करण्यापेक्षा सीसीटीव्ही लावा अशा सुचना आम्ही मंडळांना केल्या होत्या. मागील वेळेस दुचाकी जाळणारांना आम्ही पकडले होते. आताही आम्ही नक्कीच गुन्हेगाराला पकडू. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नवनाथ मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या परिसरात सहा सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला. नगरसेवक रामचंद्र कदम म्हणाले की, सीसीटीव्हीसाठी तीस लाखाचे बजेट मागितले होते परंतु ते मंजुर झाले नाही. येथील चौकीत जादा पोलिस द्यावेत अशी आमची मागणी आहे.
==========================================
भर उन्हाळ्यात शेतकऱ्याने 'पिकवले' पाणी
भर उन्हाळ्यात शेतकऱ्याने 'पिकवले' पाणी
लासूर स्टेशन - शेतकऱ्यांनी कल्पकतेने पाण्याचा वापर व योग्य नियोजन केल्यास शेतीचे नंदनवन होऊ शकते; कमी पाण्यात चांगले उत्पन्न मिळविणे कठीण नाही. माळीवाडगावच्या गोरखनाथ कचरू गोरे व अशोक विठ्ठल गवळी या शेतकऱ्यांनी शेवगा, डाळिंबाच्या लागवडीद्वारे भरघोस उत्पन्न मिळविले. दुष्काळी परिस्थितीत ओसाड शिवारात या शेतातील हिरव्यागार झाडांना लगडलेली फळ शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
माळीवाडगावच्या गोरखनाथ गोरे यांनी पावसाळ्यात वाहून जाणारे पाण्याने विहीर फेरभरण केले होते; तसेच चाळीस गुंठ्यांत एक कोटी 35 लाख लिटर क्षमतेचे शेततळे घेतले. ते दिवाळीपूर्वीच पूर्णपणे भरले. श्री. गोरे यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार नियोजन करीत एका एकरात ओडिशी शेवग्याची नऊशे झाडे लावली. प्रत्येक झाडाला आठवड्यात चाळीस लिटर पाणी दिले. गेल्या साडेतीन महिन्यांत या शेवग्याने तब्बल अडीच लाखांचे उत्पन्न दिले. आणखी चार महिने शेवग्याच्या शेंगा निघतील, असे श्री. गोरे यांनी सांगितले. या कामी त्यांना वडील कचरू गोरे, आई काशाबाई, पत्नी सुनीता, मुलगा मंगेश; तसेच कृषी विभागाचे अधिकारी, मित्र प्रभाकर तुपे, राहुल साठे, अरुणबापू पवार आदींचे सहकार्य लाभले.
शेतात सेंद्रिय मल्चिंग, गांडूळ खत, वार्मवाश आदींसह राखेचा वापर करून पाण्याचा योग्य वापर केला. "सकाळ ऍग्रोवन‘ वाचून शेतीत विविध प्रयोग करण्यास प्रेरणा मिळते, असेही श्री. गोरे म्हणाले.
==========================================
'भारतमाता की जय'म्हणणाऱ्यांनाच मारहाण-केजरीवाल
नवी दिल्ली - एकीकडे देशभरात भारतमाता की जय अशी घोषणा न देणाऱ्यांना मारहाण करत आहे. तर, दुसरीकडे काश्मीरमध्ये भारतमाता की जय म्हणणाऱ्यांनाच मारहाण करत असल्याचे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
'भारतमाता की जय'म्हणणाऱ्यांनाच मारहाण-केजरीवाल
श्रीनगर येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील (एनआयटी) बिगर काश्मीरी विद्यार्थ्यावर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. कॅम्पसमध्ये काश्मीर विद्यार्थ्यांना विरोध करत बिगर काश्मीरी विद्यार्थ्यांनी भारतमाता की जय अशा घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर लाठीमार केला होता.
याविषयी बोलताना केजरीवाल म्हणाले की, बिगर काश्मीरी विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमाराची मी कडक शब्दांत निंदा करतो. काश्मीरमधील भाजप आणि पीडीपी सरकारने विद्यार्थ्यांवर होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न करावेत.
==========================================
विस्कॉन्सीन राज्यात क्रुझ, सँडर्स यांचा विजय
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवार रिपब्लिकन पक्षाचे टेड क्रुझ आणि डेमोक्रेटिक पक्षाचे बर्नी सँडर्स यांनी विस्कॉन्सीन राज्यात विजय मिळविला आहे.
विस्कॉन्सीन राज्यात क्रुझ, सँडर्स यांचा विजय
या दोघांनी हा विजय मिळवीत डोनाल्ड ट्रम्प व हिलरी क्लिंटन यांनी सूचक इशारा दिला आहे. या विजयामुळे अध्यक्षपदाच्या उमेदवारीतील चुरस आणखी वाढली आहे. कॅनडाच्या सीमेला लागून असलेल्या विस्कॉन्सीन राज्यात या दोन्ही नेत्यांनी मतमोजणी सुरु असताना अर्धा तासातच आपला विजय निश्चित केला होता. क्रुझ यांना 49 टक्के मते मिळाली. तर, डोनाल्ड ट्रम्प यांनी 35 टक्के मते मिळाली. ओहिओचे गव्हर्नर जॉन कसिच हे 14 टक्के मते मिळवून तिसऱ्या स्थानावर राहिले.
डेमोक्रेटिक पक्षातही सँडर्स यांनी 57 टक्के मते मिळवून आपला विजय निश्चित केला. तर, हिलरी क्लिंटन यांनी 43 टक्के मते मिळाली. अमेरिकेत 8 नोव्हेंबरला अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
==========================================
श्रीनगर: बिगर काश्मीरी विद्यार्थ्यावर लाठीमार
श्रीनगर: बिगर काश्मीरी विद्यार्थ्यावर लाठीमार
श्रीनगर - येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील (एनआयटी) बिगर काश्मीरी विद्यार्थ्यावर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यानंतर एनआयटी कॅम्पसमध्ये सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
ट्वेंटी-20 विश्वकरंडकात भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील उपांत्य सामन्याच्या निकालानंतर काश्मीरी आणि बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांत हाणामारी झाली होती. भारत वेस्ट इंडीजकडून पराभूत झाल्यानंतर काश्मिरी विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला होता. त्याला बाहेरून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी विरोध केल्याने वाद निर्माण झाला होता. या तणावामुळे एनआयटी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मंगळवारी पुन्हा एनआयटी सुरु झाल्यानंतर बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना कॅम्पसबाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला. यावेळी यांच्यात वाद झाला आणि पोलिसांनी हस्तक्षेप करत बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला. काश्मिर बाहेरील विद्यार्थ्यांनी लाठीमारचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर अपलोड करत, पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला आहे. आम्ही शांततेने आंदोलन करत होतो, मात्र पोलिसांनीच हिंस्र रुप घेत लाठीमार केल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून, दोन सदस्यीय पथक श्रीनगरकडे रवाना झाले आहे.
==========================================
तिरंग्यावरून दुसऱ्या दिवशीही खडाजंगी
मुंबई - तिरंग्याचा अवमान झाला हा सत्ताधाऱ्यांनी वादाचा मुद्दा केल्यावरून आज दुसऱ्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या गोंधळात सभागृह दोनदा तहकूब होऊन चाळीस मिनिटांचे कामकाज वाया गेले. अध्यक्षांनी सर्व चित्रफीत तपासून निर्णय घेतो, असे जाहीर निर्देश दिल्यानंतर पुढील कामकाज सुरू झाले.
तिरंग्यावरून दुसऱ्या दिवशीही खडाजंगी
मुंबई - तिरंग्याचा अवमान झाला हा सत्ताधाऱ्यांनी वादाचा मुद्दा केल्यावरून आज दुसऱ्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या गोंधळात सभागृह दोनदा तहकूब होऊन चाळीस मिनिटांचे कामकाज वाया गेले. अध्यक्षांनी सर्व चित्रफीत तपासून निर्णय घेतो, असे जाहीर निर्देश दिल्यानंतर पुढील कामकाज सुरू झाले.
भाजपचे आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेत त्यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे. तिरंग्याने तोंड पुसले आहे. डाव्या हाताने तिरंगा नेला आहे, त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी केली. यावर विरोधी बाकावरील सर्व सदस्य खवलळे. "वेल‘मध्ये जाऊन जोरजोराने घोषणाबाजी करू लागले. सत्ताधारी बाकावरील सर्व आमदारही "वेल‘मध्ये उतरले. सभागृहात घोषणाबाजी सुरू झाली. यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, सरकार या मुद्द्यावरून राजकारण करते आहे. हा मुद्दा कालच संपला आहे. यावर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट म्हणाले, की यामध्ये राष्ट्राचा अपमान झाला आहे. सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावून ती चित्रफीत पाहावी. त्यानंतर त्यांनी निर्णय घ्यावा, अशी विनंती केली. हा विषय लांबवायचा नाही, असे अध्यक्षांनी म्हटले. तरीही सभागृहातील वातावरण निवळले नव्हते.
त्यातच राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील म्हणाले, की अशा प्रकारच्या चित्रफितीचे शूटिंग कोणी केले? त्याला कोणी तसे करण्यास सांगितले? याचा शोध घेणे गरजेचे आहे. मी नरेंद्र मोदी यांचे नाव घेणार नाही; पण त्यांच्याकडूनही अनावधानाने अवमान झाला आहे. यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मोदी यांचे छायाचित्र असलेल्या बातमीची झेरॉक्स सभागृहात फडकावली. यानंतर हा विषय राष्ट्रध्वजाची आचारसंहिता तपासून मी हाताळतो, असे अध्यक्ष म्हणाले. यामध्ये सभागगृहाचे कामकाज दोनदा तहकूब झाले.
==========================================
No comments:
Post a Comment