[अंतरराष्ट्रीय]
१- इक्वाडोरमध्ये शक्तीशाली भूकंप, 41 मृत्यूमुखी, त्सुनामीचा इशारा
२- तबिल्सी; वादळामुळे झाड कारवर कोसळलं, गाडीचा चक्काचूर
३- वॉशिंग्टन; टाटा समूहाला अमेरिकेत ठोठावला 94 कोटी डॉलरचा दंड
४- म्यानमारच्या राष्ट्रपतींकडून 83 कैद्यांची शिक्षा माफ
५- दक्षिण अमेरिकेतलं इक्वेडोर भूकंपानं हादरलं
६- वॉशिंग्टन; ‘इंटेल’ करणार मनुष्यबळ कपात
७- लंडन; शाळांतून शिकविली जाते ‘असहिष्णुता’
८- वॉशिंग्टन; व्हिसा शुल्कवाढ कायद्याने आवश्यक
९- मेलबर्न; अदानीच्या प्रकल्पाला ऑस्ट्रेलियात मंजुरी
१०- टाटा समूहाला अमेरिकेत 6200 कोटींचा दंड
११- जपानमध्ये भूकंपात शेकडो लोक गाडल्याची भीती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
१२- बहुमताने निवडलेल्या मोदींना पाठिंबा द्या, शाहरुखचं आवाहन
१३- ...म्हणून प्रत्येक रेल्वे तिकीटावर सुरेश प्रभूंचं ट्विटर हँडल
१४- ...तोपर्यंत व्हिसा शुल्क कमी होणे अशक्य- जेटली
१५- भारत म्हणजे अंधांच्या राज्यात एक डोळ्याचा राजा
१६- डाळी पुन्हा महागल्या; नियंत्रण आवश्यक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१७- देवनार डम्पिंग ग्राऊंड आग प्रकरण: आणखी चार भंगार विक्रेत्यांना अटक
१८- पाणी एक्स्प्रेसच्या भेटीनंतर लातूरच्या विद्यार्थ्यांना जलबचतीचे धडे
१९- दुष्काळग्रस्तांसाठी 'नाम'तर्फे मुंबई-पुण्यात व्यवस्था
२०- भोपाळ; बांधकामामुळे नाखुश यशोधरा राजे-शिंदेंचा उद्घाटनास नकार
२१- दारु कंपन्यांचं पाणी बंद करणं अयोग्य : पंकजा मुंडे
२२- पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू
२३- दीड वर्षात सिंचनात एक टक्काही वाढ नाही
२४- राज्यात उष्णतेची लाट
२५- दुष्काळ निवारणासाठी नेते सरसावले
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२६- मुंबईत रांगेच्या वादातून प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
२७- कल्याण; कोंबडी झाडावर बसल्याने शेजाऱ्याला बेदम मारहाण
२८- नालासोपारा; बंदुकीच्या धाकावर चार किलो सोनं लुटलं, घटना सीसीटीव्हीत कैद
२९- औरंगाबादेत उद्योगांना १० टक्के पाणीकपात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३०- लग्नाआधी रवींद्र जाडेजाची तलवारबाजी
३१- 'आम्रपाली'सोबतच्या ब्रेकअपनंतर भज्जी म्हणाला, वेल डन धोनी
३२- न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनच्या शिरपेचात मानाचा तुरा
३३- रणदीप हुडाच्या 'खर्च करोड'ची यूट्यूबवर धूम
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३४- शहरातील वाटर प्लांटची उद्यापासून तपासणी
३५- नायगाव व लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेसाठी आज मतदान
३६- हिमायतनगर; जनावरांची वाहतूक करणारी दोन वाहने पकडली
३७- दलित वस्ती निधी परत गेल्याप्रकरणी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे - सत्तार
३८- कंधार; आजारी मोर पक्षास पोलिसांकडून जीवनदान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
राहुल मराठे, हमामसिंग चव्हाण, क्षितीज राजुरे, एम. ए. बैग, शुभम शिंदे,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
या जगात मानाने जगायचे असेल तर लोकांपुढे वारंवार हात जोडू नका. मेहनत व परिश्रम करायला शिका. यश सदैव दुमच्या बरोबर राहील व लोक कायम यशस्वी लोकांच्या बरोबर असतात
(ओम आढाव, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
==============================================

ज्ञानप्रकाश विद्यालयाच्या मुलांनी मिरजेहून पाणी घेऊन आलेली वॉटर एक्स्प्रेस पाहिली. विद्यार्थ्यांना पाणी बचतीचं महत्त्व कळावं यासाठी या प्रयोगशील शाळेने पाणी एक्स्प्रेसला भेट दिली होती.
गेली 17 वर्षे वेगवेगळे प्रयोग ज्ञानप्रकाश शाळा करत आली आहे. 4 लिटर पाण्यात लहानग्यांनी आणि 7 लिटर पाण्यामध्ये मोठ्यांनी स्वच्छ आंघोळ कशी करावी याचा धडा मुलांना दिला आहे.

धार्मिक असहिष्णुता ही सर्वात वाईट असून त्यामुळे भारताची वाटचाल अंधाराकडे होत असल्याचं वक्तव्य गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शाहरुखने केलं होतं. त्यानंतर शाहरुखविरोधात भाजपसह अनेक स्तरातील व्यक्तींनी टीकेची झोड उठवली होती.
‘एकदा आपण आपल्या देशाचा नेता निवडला की त्याला सर्वांनी पाठिंबा द्यायलाच हवा. मग तो कुणीही असो. आपल्या देशाने बहुमताने त्यांना निवडलं असतं. त्यामुळे नकारात्मकता पसरवण्यापेक्षा त्या व्यक्तीला पाठिंबा देऊन देश पुढे नेण्यास मदत करायला हवी.’ असं मत ‘इंडिया टीव्ही’ चॅनेलवरील ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात शाहरुखने व्यक्त केलं आहे.
‘असहिष्णुतेवरील माझ्या वक्तव्याचा विनाकारण संबंध जोडण्यात आला’ असा पुनरुच्चारही किंग खानने केला. ‘मला या देशाने सर्व काही दिलं आहे, माझे वडील स्वातंत्र्यसेनानी होतं, मग हा देश माझ्यावर अन्याय करतोय, असा विचार मी करुच कसा शकेन’ असा सवाल शाहरुख विचारतो.
‘माझं कुटुंब हा छोटा भारतच आहे. मी जन्माने मुस्लीम, माझी पत्नी हिंदू, माझी तीन मुलं तीन वेगवेगळ्या धर्मांचं पालन करतात.’ असंही शाहरुख सांगतो.

मुंबई आणि पुण्यात स्थलांतरितांना सुविधा उपल्ब्ध करुन देण्याचं आवाहनही ‘नाम’ फाऊंडेशनने केलं आहे. अनेक स्वयंसेवी संघटना ‘नाम’ फाऊंडेशनच्या संपर्कात असल्याचं नाना पाटेकरांनी सांगितलं. मुंबई-पुण्यात महापालिकेच्या मोकळ्या जागा, मैदानं यांच्यावर स्थलांतरितांसाठी तात्पुरती घरं, छावण्या उभाराव्यात यासाठी ‘नाम’ प्रयत्नशील आहे.
‘नाम’ फाऊंडेशन मुंबई-पुण्यातील महापालिका प्रशासनांशी संपर्क साधण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीला स्थलांतरितांच्या जेवणाची सोय करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करताना राजकीय पक्षांनी आपली वितुष्टे आणि श्रेयवादाची लढाई बाजूला ठेवावी, अशी विनंतीही नाना पाटेकरांनी हात जोडून केली आहे.

प्रत्येक विभागातील तीन ते चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचं ट्विटर हँडलही रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलं आहे. कुठलीही तक्रार किंवा सूचना असल्यास या अकाऊण्टला मेन्शन करण्याचं आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आलं आहे.
रेल्वेत वसुली करणारा शिपाई, घरातून पळून जाऊन लग्न करण्याच्या तयारीत असलेलं अल्पवयीन प्रेमी युगुल, पाण्याच्या बाटलीवर अतिरिक्त रक्कम घेणारे रेल्वे कर्मचारी किंवा तान्हुल्यासाठी रेल्वेत दूधाची व्यवस्था केल्याची घटना, प्रत्येक वेळी प्रवाशांनी ट्विटरवर साद दिल्यानंतर त्याची तातडीने दखल घेण्यात आली आणि कारवाई झाली. त्यामुळे प्रवाशांच्या मनात रेल्वेमंत्र्यांबद्दल विश्वासाचं नातं निर्माण झालं.
रेल्वेतील अस्वच्छता, दादागिरी, छेडछाड, जेवण किंवा पाण्याची व्यवस्था, भ्रष्टाचार अशा कुठल्याही तक्रारीचं निवारण करण्याचं आश्वासन रेल्वेतर्फे देण्यात आलं आहे.

बबन माळी असं हत्या झालेल्या इसमाचं नाव असून हत्येप्रकरणी पोलिसांनी बबन माळी यांचा भाऊ रामचंद्र माळी आणि त्याच्या दोन मुलांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बबन आणि रामचंद्र या दोन भावांमध्ये वडिलोपार्जित विहिरीतील पाणीवाटपावरुन वाद सुरू होते.
घटनेच्या दिवशी बबन माळी पाणी सोडण्यासाठी विहिरीवर गेले असता आरोपींनी त्यांची गळा चिरुन हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी बबन यांचा मृतदेह जमिनीखाली पुरला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीनं तपास करत फक्त 12 तासांत गुन्ह्याचा छडा लावला.

जोपर्यंत हॉस्टेल किमान सुविधांनी सुसज्ज केले जात नाही, तोपर्यंत याचं उद्घाटन स्थगित करण्यात आलं आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

विल्यमसन सध्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व करत आहे. विस्डेनचा लीडिंग क्रिकेटर म्हणून विल्यमसनची निवड झाल्याचं कळताच हैदराबादच्या त्याच्या टीममेट्सनी सेलिब्रेशन केलं.
विल्यमसनशिवाय गेल्या वर्षातील टॉप फाईव्ह क्रिकेटर्समध्ये न्यूझीलंडचा ब्रेन्डन मॅक्युलम, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ तसंच इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टोचीही निवड झाली आहे.

या गाण्याच्या व्हिडिओमध्ये अभिनेता रणदीप हुडासोबत गायक-रॅपर फझीलपुरिया दिसत आहे. विपीन पटवाने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला पंजाबी लहेजा आहे. विकास आणि विपीन पटवा यांनी हे गाणं गायलं आहे.
एकीकडे सरबजीत चित्रपटाच्या टीझरमध्ये रणदीप हुडा एका वेगळ्या भूमिकेत दिसत असताना, त्याचं हे फंकी आणि कूल रुप चाहत्यांना आनंददायी ठरेल.

इक्वाडोरमध्ये शक्तीशाली भूकंप, 41 मृत्यूमुखी, त्सुनामीचा इशारा
वॉशिंग्टन : दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर भूकंपच्या धक्क्याने हादरलं. पश्चिम समुद्रकिनाऱ्याजवळ आलेल्या 7.8 रिश्टर स्केल क्षमतेच्या शक्तीशाली भूकंपामुळे आतापर्यंत 41 नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
उपराष्ट्रपती जॉर्ज ग्लेस यांच्या माहितीनुसार, आजूबाजूच्या सहा शहरांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. शिवाय बचावकार्यासाठी नॅशनल गार्ड तैनात करण्यात आले आहेत. तर भूकंपामुळे प्रचंड नुकसान झालं आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
भूकंपाचं केंद्र आग्नेय समुद्रकिनाऱ्यावरील मुईज्नेजवळ होतं. भूकंपानंतर परिसरातील घरांची छप्परं तुटली आणि एक उड्डाणपूलही कोसळला.
भूकंपाच्या केंद्राच्या 300 किमी क्षेत्रातील समुद्रकिनाऱ्याजवळच्या परिसरात उंच लाटांची शक्यता आहे, असं पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने सांगितलं.
==============================================
मुंबईत रांगेच्या वादातून प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
मुंबई : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस शनिवारी रात्री लढाईचं मैदानच बनलं होतं. कुर्ल्याच्या एलटीटीवर रांगेच्या वादातून प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे.
या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी सहा प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मारामारी करणारे हे सर्व प्रवासी गोदान एक्स्प्रेसने जाणार होते. यासाठी सगळे जण रांगेत उभे होते. यानंतर दोन गटातील प्रवाशांमध्ये रांग लावण्यावरुन सुरुवातील बाचाबाची झाली. मात्र यानंतर वाद अधिक वाढला आणि बघता बघता प्लॅटफॉर्म जणू लढाईचं मैदान बनलं.
मारामारी सुरु असताना रेल्वे पोलिस तिथे उपस्थित नव्हते. मात्र यावेळी प्लॅटफॉर्मवरील एका प्रवाशाने या हाणामारीचा व्हिडीओ मोबाईलवर चित्रीत केला आणि त्यानंतर पोलिसांना सोपवला. त्यानंतर कारवाई करत पोलिसांना सहा जणांना अटक केली.
पाहा व्हिडीओ
==============================================
लग्नाआधी रवींद्र जाडेजाची तलवारबाजी
मुंबई : गुजरातच्या सौराष्ट्र प्रांतातलं राजकोट शहर त्यांचा लाडका क्रिकेटर रवींद्र जाडेजाच्या लग्नासाठी सज्ज झालं आहेे. रवींद्र जडेजा त्याच्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरु करणार आहे. रवींद्र जडेजा आणि त्याची प्रेयसी रिवा सोळंकी आज विवाहबंधनात अडकणार आहे.
राजकोटमध्ये राजपूत परंपरेनुसार हा विवाह पार पडणार आहे. क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज आणि राजकारणी मंडऴी या लग्न सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
दरम्यान, लग्नाआधी फटक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. यावेळी रवींद्र जाडेजाने तलवारबाजी केली. तर हॉटेलच्या बाहेरच जबरदस्त डान्स बघायला मिळाला. लग्नसोहळा आटोपल्यानंतर नवविवाहित दाम्पत्य रवींद्र जडेजाच्या मूळगावी हाडाटोडा येथे जाणार आहे. त्याठिकाणी शाही रिसेप्शन पार पडणार आहे.

रवींद्र आणि रिवाच्या लग्नाचा थाट इतका मोठा आहे की, एखाद्या शाही विवाहसोहळ्याला शोभाव्यात अशा परंपरा आणि विधी त्यांच्या लग्नानिमित्त दिसून येत आहेत. रवींद्र जाडेजाला त्याच्या सासरच्या मंडळींकडून म्हणजे सोळंकी कुटुंबीयांकडून 95 लाख रुपयांच्या ऑडीची मिळालेली भेट आपण आधीच पाहिली होती.
==============================================
वादळामुळे झाड कारवर कोसळलं, गाडीचा चक्काचूर
तबिल्सी (जॉर्जिया) : काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा पुरेपुर प्रत्यय जॉर्जियात आला. राजधानी तबिल्सीमध्ये चालक त्याची कार पार्क करुन बाहेर पडत असताना भलं मोठं झाड कारवर कोसळलं. या घटनेत कालचालक सुदैवाने बचावला, पण कारचा मात्र चक्काचूर झाला.
ही घटना शनिवारी घडली. या थरारक घटनेचा व्हिडीओ तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
जॉर्जियामध्ये मागील काही दिवसांपासून वादळी वारे वाहत आहेत. यामुळे शहरातील अनेक मोठमोठी वृक्ष उन्मळून पडत आहेत. तर वादपामुळे घरं आणि कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
यामुळे जीवितहानी झाली नसली तरी बचावदलाच्या जवांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ
==============================================
कोंबडी झाडावर बसल्याने शेजाऱ्याला बेदम मारहाण
कल्याण : कोंबडी पाळणं किती महागात पडू शकते हे कल्याणमध्ये घडलेल्या एका घटनेवरुन समोर आलं आहे. शेजाऱ्याची कोंबडी झाडावर बसल्याने झाडाच्या मालकाने शेजाऱ्याला आणि त्याच्या मुलाला बेदम मारहाण केली. या घटनेत बाप-लेक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कल्याणच्या गौरीपाडा परिसरात राहणाऱ्या शांताराम म्हात्रे यांची पाळीव कोंबडी घराजवळ असलेल्या झाडावर चढली होती. मात्र हे झाड आपलं आहे असं सांगत शांताराम म्हात्रे आणि त्यांचा शेजारी विलास म्हात्रेने दावा केला. दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्याचं रुपांत हाणामारीत झालं.
विलास म्हात्रे वडिलांना मारहाण होत असल्याचं पाहून शांताराम यांचा मुलगा वाद सोडवण्यासाठी मध्ये पडला. मात्र त्यालाही विलास म्हात्रेने मारहाण केली.
या प्रकरणी खटकपाडा पोलिस स्टेशनमध्ये विलास म्हात्रेविरोधात कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
==============================================
नालासोपारा; बंदुकीच्या धाकावर चार किलो सोनं लुटलं, घटना सीसीटीव्हीत कैद
नालासोपारा : नालासोपाऱ्यात बंदुकीच्या धाकावर दरोडेखोरांनी चार किलो सोनं लुटलं. नालासोपारा-वसई लिंक रोडवर असलेल्या मार्टिन कॉम्पेक्समधील नक्षत्र ज्लेलर्समध्ये ही लूट करण्यात आली.
तोंडाला रुमाल बांधून आलेल्या या दरोडेखोरांनी दुकानमालकाला बंदुकीचा धाक दाखवून एका बाजूला नेलं आणि दुकानाची लूट केली. हे सर्व दरोडेखोर दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाले आहे. मात्र रुमालामुळे त्यांचा चेहरा झाकलेला असल्याने त्यांची ओळख पटवण्यास अडचणी येत आहे.
दरम्यान या प्रकरणी तुळींच पोलिस दरोडोखोरांचा शोध घेत आहेत. मात्र भरचौकात घडलेल्या दरोड्याच्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
काही दिवसांपूर्वीच एका व्यापाऱ्याला भर रस्त्यात गोळ्याघालून लूटण्यात आलं होतं. आता पुन्हा झालेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे वसई-विरारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
==============================================
देवनार डम्पिंग ग्राऊंड आग प्रकरण: आणखी चार भंगार विक्रेत्यांना अटक
मुंबई : देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या आगीप्रकरणी आणखी चार भंगार विक्रेत्यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटक झालेल्यांची संख्या 13 झाली आहे.
पोलिसांनी शनिवारी 9 भंगार विक्रेत्यांना अटक केली होती. या 9 जणांना कुर्ला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. भंगारातील लोखंडासाठी या विक्रेत्यांनी ही आग लावल्याचा संशय पोलिसांना आहे.
==============================================
पाणी एक्स्प्रेसच्या भेटीनंतर लातूरच्या विद्यार्थ्यांना जलबचतीचे धडे
ज्ञानप्रकाश विद्यालयाच्या मुलांनी मिरजेहून पाणी घेऊन आलेली वॉटर एक्स्प्रेस पाहिली. विद्यार्थ्यांना पाणी बचतीचं महत्त्व कळावं यासाठी या प्रयोगशील शाळेने पाणी एक्स्प्रेसला भेट दिली होती.
लातूर : उन्हाळी सुट्टीत बच्चे कंपनी झुकझुक करणाऱ्या आगगाडीतून मामाच्या गावाला जाण्याची स्वप्न बघत असतात. लातूरच्या रेल्वे स्टेशनवर पाण्याची गाडी पाणी कशी असते हे पाहण्यासाठी शाळांच्या सहली सुरु झाल्या आहेत.
ज्ञानप्रकाश विद्यालयाच्या मुलांनी मिरजेहून पाणी घेऊन आलेली वॉटर एक्स्प्रेस पाहिली. विद्यार्थ्यांना पाणी बचतीचं महत्त्व कळावं यासाठी या प्रयोगशील शाळेने पाणी एक्स्प्रेसला भेट दिली होती.
गेली 17 वर्षे वेगवेगळे प्रयोग ज्ञानप्रकाश शाळा करत आली आहे. 4 लिटर पाण्यात लहानग्यांनी आणि 7 लिटर पाण्यामध्ये मोठ्यांनी स्वच्छ आंघोळ कशी करावी याचा धडा मुलांना दिला आहे.
लातूरमधील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सांगलीकरांनी पाणी एक्स्प्रेसच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला.
==============================================
बहुमताने निवडलेल्या मोदींना पाठिंबा द्या, शाहरुखचं आवाहन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशवासियांनी निवडून दिलं आहे, त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा, असं विधान बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने केलं आहे. आपल्याला कुठल्याही राजकीय पक्षाचं वावडं नसल्याचंही शाहरुखने स्पष्ट केलं आहे.
धार्मिक असहिष्णुता ही सर्वात वाईट असून त्यामुळे भारताची वाटचाल अंधाराकडे होत असल्याचं वक्तव्य गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शाहरुखने केलं होतं. त्यानंतर शाहरुखविरोधात भाजपसह अनेक स्तरातील व्यक्तींनी टीकेची झोड उठवली होती.
‘एकदा आपण आपल्या देशाचा नेता निवडला की त्याला सर्वांनी पाठिंबा द्यायलाच हवा. मग तो कुणीही असो. आपल्या देशाने बहुमताने त्यांना निवडलं असतं. त्यामुळे नकारात्मकता पसरवण्यापेक्षा त्या व्यक्तीला पाठिंबा देऊन देश पुढे नेण्यास मदत करायला हवी.’ असं मत ‘इंडिया टीव्ही’ चॅनेलवरील ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात शाहरुखने व्यक्त केलं आहे.
‘असहिष्णुतेवरील माझ्या वक्तव्याचा विनाकारण संबंध जोडण्यात आला’ असा पुनरुच्चारही किंग खानने केला. ‘मला या देशाने सर्व काही दिलं आहे, माझे वडील स्वातंत्र्यसेनानी होतं, मग हा देश माझ्यावर अन्याय करतोय, असा विचार मी करुच कसा शकेन’ असा सवाल शाहरुख विचारतो.
‘माझं कुटुंब हा छोटा भारतच आहे. मी जन्माने मुस्लीम, माझी पत्नी हिंदू, माझी तीन मुलं तीन वेगवेगळ्या धर्मांचं पालन करतात.’ असंही शाहरुख सांगतो.
==============================================
दुष्काळग्रस्तांसाठी 'नाम'तर्फे मुंबई-पुण्यात व्यवस्था
मुंबई : मराठवाड्यातील दुष्काळामुळे स्थलांतर करणाऱ्या नागरिकांसाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंच्या ‘नाम’ फाऊंडेशनतर्फे मदतीचा हात दिला जाणार आहे. स्थलांतरितांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मुंबई-पुण्यात करण्यात येणार आहे.
मुंबई आणि पुण्यात स्थलांतरितांना सुविधा उपल्ब्ध करुन देण्याचं आवाहनही ‘नाम’ फाऊंडेशनने केलं आहे. अनेक स्वयंसेवी संघटना ‘नाम’ फाऊंडेशनच्या संपर्कात असल्याचं नाना पाटेकरांनी सांगितलं. मुंबई-पुण्यात महापालिकेच्या मोकळ्या जागा, मैदानं यांच्यावर स्थलांतरितांसाठी तात्पुरती घरं, छावण्या उभाराव्यात यासाठी ‘नाम’ प्रयत्नशील आहे.
‘नाम’ फाऊंडेशन मुंबई-पुण्यातील महापालिका प्रशासनांशी संपर्क साधण्याच्या तयारीत आहे. सुरुवातीला स्थलांतरितांच्या जेवणाची सोय करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करताना राजकीय पक्षांनी आपली वितुष्टे आणि श्रेयवादाची लढाई बाजूला ठेवावी, अशी विनंतीही नाना पाटेकरांनी हात जोडून केली आहे.
==============================================
...म्हणून प्रत्येक रेल्वे तिकीटावर सुरेश प्रभूंचं ट्विटर हँडल
नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने अधिकाधिक टेक्नोसॅव्ही होण्याचा आणि प्रवाशांच्य सोयीसुविधांकडे लक्ष देण्याचा चंगच बांधला आहे. ट्विटरच्या माध्यमातून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू प्रवाशांच्या तक्रारी सोडवण्यात तत्परता दाखवत आहेत. त्यामुळे रेल्वेने सुरेश प्रभू यांचं ट्विटर हँडल जनरल तिकीटांवर छापण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक विभागातील तीन ते चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचं ट्विटर हँडलही रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलं आहे. कुठलीही तक्रार किंवा सूचना असल्यास या अकाऊण्टला मेन्शन करण्याचं आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आलं आहे.
रेल्वेत वसुली करणारा शिपाई, घरातून पळून जाऊन लग्न करण्याच्या तयारीत असलेलं अल्पवयीन प्रेमी युगुल, पाण्याच्या बाटलीवर अतिरिक्त रक्कम घेणारे रेल्वे कर्मचारी किंवा तान्हुल्यासाठी रेल्वेत दूधाची व्यवस्था केल्याची घटना, प्रत्येक वेळी प्रवाशांनी ट्विटरवर साद दिल्यानंतर त्याची तातडीने दखल घेण्यात आली आणि कारवाई झाली. त्यामुळे प्रवाशांच्या मनात रेल्वेमंत्र्यांबद्दल विश्वासाचं नातं निर्माण झालं.
रेल्वेतील अस्वच्छता, दादागिरी, छेडछाड, जेवण किंवा पाण्याची व्यवस्था, भ्रष्टाचार अशा कुठल्याही तक्रारीचं निवारण करण्याचं आश्वासन रेल्वेतर्फे देण्यात आलं आहे.
==============================================
'आम्रपाली'सोबतच्या ब्रेकअपनंतर भज्जी म्हणाला, वेल डन धोनी
सातारा : विहिरीतील पाणीवाटपाच्या वादातून भावानेच भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील निमसोड गावात घडली आहे.
बबन माळी असं हत्या झालेल्या इसमाचं नाव असून हत्येप्रकरणी पोलिसांनी बबन माळी यांचा भाऊ रामचंद्र माळी आणि त्याच्या दोन मुलांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून बबन आणि रामचंद्र या दोन भावांमध्ये वडिलोपार्जित विहिरीतील पाणीवाटपावरुन वाद सुरू होते.
घटनेच्या दिवशी बबन माळी पाणी सोडण्यासाठी विहिरीवर गेले असता आरोपींनी त्यांची गळा चिरुन हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी बबन यांचा मृतदेह जमिनीखाली पुरला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीनं तपास करत फक्त 12 तासांत गुन्ह्याचा छडा लावला.
==============================================
बांधकामामुळे नाखुश यशोधरा राजे-शिंदेंचा उद्घाटनास नकार
भोपाळ : एखाद्या वास्तूच्या उद्घाटनाला आल्यानंतर त्याचा दर्जा न आवडल्यामुळे मंत्री उद्घाटन न करताच परत गेल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे? मध्यप्रदेशातील मंत्री यशोधरा राजे शिंदे यांनी मात्र नापसंती दर्शवत उद्घाटनास नकार दिल्याचं समोर आलं आहे.
मध्य प्रदेशातील उद्योगमंत्री यशोधरा राजे शिंदे यांना एका आयटीआय कॉलेजच्या हॉस्टेलच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्या बांधकामाचा दर्जा न आवडल्यामुळे यशोधरा यांनी उद्घाटन न करताच परतणं पसंत केलं.
जोपर्यंत हॉस्टेल किमान सुविधांनी सुसज्ज केले जात नाही, तोपर्यंत याचं उद्घाटन स्थगित करण्यात आलं आहे, अशी घोषणा त्यांनी केली.
यशोधरा यांच्या आकस्मिक भूमिकेमुळे हॉस्टेलचे बांधकाम करणारा कंत्राटदारही अवाक झाला. नामुष्की टाळण्यासाठी त्याने थेट मंत्रीमहोदयांचेच पाय धरले.
==============================================
दारु कंपन्यांचं पाणी बंद करणं अयोग्य : पंकजा मुंडे
बीड : दुष्काळी मराठवाड्यात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य असताना, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अजब वक्तव्य केलं आहे. “दारु किंवा उद्योगधंद्याना देण्यात येणारं पाणी हे आरक्षित केलेलं असतं. त्यामुळे अशा उद्योगांचं पाणी बंद करणं अयोग्य होईल. त्यांना जर पिण्याचं पाणी देण्यात येत असेल तर बंद करावं”, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्या बीडमध्ये बोलत होत्या.
दारु कंपनी किंवा उद्योग कंपन्यांवर चालणारी अनेक पोटं आहेत. जर या कंपन्या बंद पडल्या तर अनेकांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे हे पाणी बंद करणं चुकीचं ठरेल, असं पंकजा यांनी नमूद केलं.
मात्र मराठवाड्यात माणसांना पिण्यासाठी पाणी नाही. लातुरसारख्या भागात तर रेल्वेने पाणी पुरवलं जात आहे. पाण्यासाठी अनेकांचे जीव गेले आहेत. असं सगळं घडत असताना पंकजा मुंडे यांनी मात्र कंपन्यांना देण्यात येणारं पाणी आरक्षित असल्यामुळे, ते लोकांना पिण्यासाठी देणं अयोग्य असल्याचंच अप्रत्यक्षरित्या म्हटलं आहे.
त्यामुळे पंकजा मुंडे यांना लोकांना पिण्यासाठी पाण्यापेक्षा, दारु किंवा तत्सम उद्योगधंद्याना पाणी जास्त आवश्यक असल्याचं वाटतं की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
==============================================
न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनच्या शिरपेचात मानाचा तुरा
मुंबई : न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची ‘विस्डेन’ मासिकानं लीडिंग क्रिकेटर ऑफ द ईयर म्हणून निवड केली आहे. 2015 सालातील कामगिरीसाठी विल्यमसनला हा बहुमान देण्यात आला.
विल्यमसन सध्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व करत आहे. विस्डेनचा लीडिंग क्रिकेटर म्हणून विल्यमसनची निवड झाल्याचं कळताच हैदराबादच्या त्याच्या टीममेट्सनी सेलिब्रेशन केलं.
विल्यमसनशिवाय गेल्या वर्षातील टॉप फाईव्ह क्रिकेटर्समध्ये न्यूझीलंडचा ब्रेन्डन मॅक्युलम, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ तसंच इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टोचीही निवड झाली आहे.
==============================================
रणदीप हुडाच्या 'खर्च करोड'ची यूट्यूबवर धूम
मुंबई : ‘लाल रंग’ या रणदीप हुडाच्या आगामी चित्रपटातील पहिलं गाणं रिलिज झालं आहे. ‘तेरे पे करदू खर्च करोड’ हे पंजाबी धाटणीचं रॅप साँग यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.
या गाण्याच्या व्हिडिओमध्ये अभिनेता रणदीप हुडासोबत गायक-रॅपर फझीलपुरिया दिसत आहे. विपीन पटवाने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला पंजाबी लहेजा आहे. विकास आणि विपीन पटवा यांनी हे गाणं गायलं आहे.
पाहा व्हिडिओ :
अभिनेता रणदीप हुडा एका वेगळ्याच रुपात पाहायला मिळणार आहे. कपूर अँड सन्स चित्रपटातल्या कर गयी चुल गाण्यानंतर फझीलपुरिया पुन्हा सर्वांना थिरकवण्यास सज्ज आहे.
एकीकडे सरबजीत चित्रपटाच्या टीझरमध्ये रणदीप हुडा एका वेगळ्या भूमिकेत दिसत असताना, त्याचं हे फंकी आणि कूल रुप चाहत्यांना आनंददायी ठरेल.
==============================================
टाटा समूहाला अमेरिकेत ठोठावला 94 कोटी डॉलरचा दंड
- ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. १७- टाटा समूहाच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(टीसीएस), टाटा इंटरनॅशनल अमेरिकन कॉर्प या दोन कंपन्यांना अमेरिकेच्या ट्रेड सिक्रेट लॉसूटच्या खटल्यात 94 कोटी डॉलर म्हणजेच 6200 कोटी रुपयांचा दंड ग्रँड ज्युरीनं ठोठावला आहे. अमेरिकेतल्या एपिक सिस्टम्सनं दाखल केलेल्या खटल्यात हा दंड ठोठावण्यात आला आहे.टाटा समूहाच्या दोन्ही कंपन्यांना एपिक सिस्टीम्सच्या सॉफ्टवेअरची चोरी केल्याच्या आरोपाखाली 24 कोटी डॉलरची नुकसानभरपाई आणि 70 कोटी डॉलरचे दंडात्मक नुकसान देण्याचा आदेश ग्रँड ज्युरीनं दिला आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये एपिक सिस्टम्सने टाटा समूहाच्या कंपन्यांविरोधात एपिकचे ट्रेड सिक्रेट्स, गोपनीय माहिती, कागदपत्रे आणि डेटा चोरल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता.कंपनीने ग्राहकाचे सल्लागार सेवा देताना हा डेटा चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. टीसीएसच्या कर्मचाऱ्यांनी सल्लागार करारासाठी आवश्यक असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात एपिकच्या सॉफ्टवेअरचा वापर करुन आपले उत्पादन उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, असे एपिक सिस्टीम्सने म्हटले होते. त्यामुळे अमेरिकेत टाटा समूहाला हा मोठा दणका मानण्यात येतो आहे.
==============================================
म्यानमारच्या राष्ट्रपतींकडून 83 कैद्यांची शिक्षा माफ
- ऑनलाइन लोकमतम्यानमार, दि. १७- म्यानमारचे राष्ट्रपती तीन क्वा यांनी पदाची सूत्रे हाती घेताच पहिल्याच दिवशी 83 कैद्यांची शिक्षा माफ करण्याच्या कागदावर स्वाक्षरी केली आहे. राजकीय कैद्यांनाही शिक्षेतून माफी देण्याचा विचार असल्याचं यावेळी राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तीन क्वा यांचे सल्लागार आणि नॅशनल लीग डेमोक्रेसीचे नेते आंग सान सू की यांच्या निर्देशानुसार 83 कैद्यांना मुक्त करण्यात आलं आहे.म्यानमारच्या आगामी येणा-या नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर या कैद्यांना शिक्षेतून मुक्तता देण्यात आली आहे. शिक्षेतून मुक्त झालेल्या कैद्यांनी आम्हाला फार आनंद झाला आहे. देशाला समन्वय साधणारं नेतृत्व लाभलं असल्याचंही यावेळी म्हटलं आहे. राष्ट्रपतींनी 200 राजकीय कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे सूतोवाच केले आहेत.राष्ट्रपती तीन क्वा यांच्या निर्णयामुळे शिक्षणासाठी आंदोलन केल्यानं वर्षभराहून अधिक काळ जेलमध्ये खितपत पडलेल्या डझनाहून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राजकीय कार्यकर्त्यांना झालेली शिक्षा माफ करणार असल्याचं आश्वासनंही यावेळी राष्ट्रपती तीन क्वा यांनी दिलं आहे.

दक्षिण अमेरिकेतलं इक्वेडोर भूकंपानं हादरलं
- ऑनलाइन लोकमतअमेरिका, दि. १७- दक्षिण अमेरिकेतल्या एक्वेडोर या शहराला जोरदार भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाच्या धक्क्यात आतापर्यंत 41 जणांना मृत्यू झाला आहे. शहराला 7.8 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसल्यानं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. एक्वोडोरमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.मी टीव्हीवर चित्रपट पाहत असताना अचानक सगळं हलण्यास सुरुवात झाली. आम्ही लागलीच घरातून रस्त्यावर धावलो. काय होईल मला माहिती नव्हतं, असा अनुभव क्विटोतल्या लोरेना कझारेस यांनी सांगितला. या महाभयंकर भूकंपामुळे शहरातला एक पूलही कोसळला आहे. मंता शहरातल्या विमानतळावरचा टॉवरही कोसळला आहे.अनेक ठिकाणी टेलिफोनचे पोल कोसळून संपर्क तुटला आहे. सध्या लोक व्हॉट्सअपमुळे एकमेकांच्या संपर्कात आहेत. एका शॉपिंग मॉलमधल्या भिंतीलाही तडे गेले आहेत. या भूकंपामुळे एक्वेडोर शहराचं मोठं नुकसान झालं आहे. एक्वेडोर शहराला सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.
==============================================
‘इंटेल’ करणार मनुष्यबळ कपात
- वॉशिंग्टन : प्रसिद्ध संगणक उत्पादक कंपनी ‘इंटेल’ आपल्या काही व्यावसायिक प्रतिष्ठानांतील मनुष्यबळ कमी करण्याची शक्यता आहे. या कपातीची टक्केवारी दोन आकडी असेल, असे वृत्त ओरेगॉन लाईव्ह या वेबसाईटने दिले आहे.अमेरिकेत गेल्या वर्षी अकराशेहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती. इंटेलमधील या वर्षीची मनुष्यबळ कपात त्याहून अधिक असेल, असे या वृत्तात म्हटले असून हे वृत्त कंपनीशी निकटचे संबंध असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आले आहे. कंपनी येत्या मंगळवारी पहिल्या तिमाहीतील वित्तीय परिणाम जाहीर करणार असून त्यानंतर लगेचच मनुष्यबळ कपात केली जाणार आहे.
==============================================
शाळांतून शिकविली जाते ‘असहिष्णुता’
- लंडन : हिंदू, ख्रिश्चन आणि अहमदी या अल्पसंख्याक मुस्लिमेतर धर्मीयांविरुद्ध पाकिस्तानातील शाळांतून असहिष्णुतेचे धडे दिले जात असल्याचे एका नवीन अभ्यासात आढळून आले आहे.यू एस कमिशन आॅन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम (यूएससीआयआरएफ) पुरस्कृत अभ्यासात पाकिस्तानातील शाळांतून विद्यार्थ्यांना काय शिकविले जाते यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. पाकिस्तानात असलेले हिंदू, ख्रिश्चन आणि अहमदी हे सर्व बिगर मुस्लिम अल्पसंख्याक धर्म अविश्वासू, धार्मिकदृष्ट्या घुसखोर, बाहेरचे आणि वैचारिकदृष्ट्या कारस्थानी असल्याची शिकवण पाठ्यपुस्तकातून दिली जाते. पाकिस्तानात असलेल्या चारही प्रमुख प्रांतातील पाचवी ते दहावी वर्गाच्या ७८ पाठ्यपुस्तकांतील अभ्यासक्रमांचे विश्लेषण करण्यात आले असताना ही बाब आढळून आली. विशेष म्हणजे पाकिस्तानातीलच ‘पीस अॅण्ड एज्युकेशन फाऊंडेशन’ (पीईएफ) या स्वयंसेवी संस्थेनेच हा अभ्यास केला आहे. या सर्वच पुस्तकातून इतर धर्मीयांविरुद्ध पक्षपाताची शिकवण दिली जात असल्याची किमान ७० प्रकरणे आढळली आहेत. विशेष म्हणजे २०११ मध्येच हा अभ्यास करण्यात आला आहे. जवळपास सर्वच पाठ्यपुस्तकातून ‘दासदायक’ बाबी आढळल्याचे हा अहवाल म्हणतो. हा अभ्यास जारी करताना यूएससीआयआरएफचे चेअरमन रॉबर्ट पी जॉर्ज म्हणाले की, पाठ्यपुस्तकातून ही असहिष्णुतेची शिकवण देताना ऐतिहासिक ‘वस्तुस्थितीकडे’ दुर्लक्ष करण्यात आले आहे.
==============================================
व्हिसा शुल्कवाढ कायद्याने आवश्यक
- वॉशिंग्टन : व्हिसा शुल्काच्या वाढीने भारतीय आयटी कंपन्यांवर विपरीत परिणाम झाला असला तरीही ती तशी करणे कायद्याने बंधनकारक असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.येथे दौऱ्यावर आलेले भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी द्विपक्षीय चर्चेत व्हिसाचा प्रश्न उपस्थित केला होता आणि व्हिसा शुल्क वाढ पक्षपाती असल्याचे म्हटले होते. चर्चेत दोन मुद्दे उपस्थित झाले, त्यात व्हिसातील शुल्क वृद्धीचा एक मुद्दा आहे. आयटी व्यावसायिकांसाठी समग्र शुल्क लावण्याचा मुद्दा जुना आहे. त्यावर कायद्यानुसार आम्ही वृद्धी करतो, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे कायद्यात जोपर्यंत बदल होत नाही, तोपर्यंत हे प्रकरण असेच कायम राहण्याची शक्यता आहे, असे जेटली म्हणाले.
==============================================
अदानीच्या प्रकल्पाला ऑस्ट्रेलियात मंजुरी

मेलबर्न : अदानी समूहाच्या ऑस्ट्रेलियातील 21.7 अब्ज डॉलरच्या कोळसा खाणकाम प्रकल्पाला अखेर तेथील पारंपरिक मालकांची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मूलनिवासी गटांचे या प्रकल्पासाठी संपुर्ण साह्य असल्याचे सूचित होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. वॅंगन अँड जगालिंगो (डब्लू ऍण्ड जे) गटाने शनिवारी कंपनीसोबत झालेल्या बैठकीत बहुमताने या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. संपूर्ण समुदायाला, त्यांच्या मुलांना आणि नातवंडाना भविष्यात मिळणाऱ्या संधी लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय दिल्याचे कंपनीने म्हटले आहे.
परंतु डब्लू ऍण्ड जे समुदायाच्या प्रकल्पाच्या विरोधात असलेल्या सदस्यांनी ही बैठक ढोंगी असून कंपनीने पैसे देऊन घडवून आणल्याचा आरोप केला आहे. तसेच या बनावट कराराला न्यायालयात आव्हान देण्याची त्यांनी घोषणा केली आहे.

टाटा समूहाला अमेरिकेत 6200 कोटींचा दंड
वॉशिंग्टन : टाटा समूहाच्या दोन कंपन्यांना अमेरिकेच्या ‘ग्रँड ज्युरी‘ने 94 कोटी डॉलरचा (6200 कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. अमेरिकेतील एपिक सिस्टम्सने दाखल केलेल्या ‘ट्रेड सिक्रेट‘ खटल्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि टाटा अमेरिका इंटरनॅशनलला कॉर्पोरेशनविरोधात निकाल लागला आहे.
टाटा समूहाला अमेरिकेत 6200 कोटींचा दंड
टाटा समूहाच्या दोन्ही कंपन्यांना एपिक सिस्टम्सच्या सॉफ्टवेअरची चोरी केल्याच्या आरोपाखाली 24 कोटी डॉलरची नुकसान भरपाई व 70 कोटी डॉलरचे दंडात्मक नुकसान देण्याचा आदेश विस्कॉन्सिन राज्यातील ग्रँड ज्युरीने दिला आहे.
ऑक्टोबर 2014 मध्ये एपिक सिस्टम्सने टाटा समुहाच्या कंपन्यांविरोधात एपिकचे ट्रेड सिक्रेट्स, गोपनीय माहिती, कागदपत्रे आणि डेटा चोरल्याचा आरोप करत खटला दाखल केला होता. कंपनीने ग्राहकाचे सल्लागार सेवा देताना हा डेटा चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. टीसीएसच्या कर्मचाऱ्यांनी सल्लागार करारासाठी आवश्यक असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात एपिकच्या सॉफ्टवेअरचा वापर करुन आपले उत्पादन उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, असे एपिक सिस्टम्सने म्हटले होते.
==============================================
...तोपर्यंत व्हिसा शुल्क कमी होणे अशक्य- जेटली
वॉशिंग्टन : व्हिसा शुल्कामध्ये वाढ करणे कायद्याने बंधनकारक असल्याचे अमेरिकेने भारताला सांगितले आहे. त्यामुळे अमेरिकन कायद्यात बदल होत नाही तोपर्यंत व्हिसा शुल्कात बदल होण्याची शक्यता नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
व्हिसा शुल्काच्या वाढीने भारतीय आयटी कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले अर्थमंत्री जेटली यांनी भारत-अमेरिकेदरम्यानच्या द्विपक्षीय चर्चेत व्हिसाचा मुद्दा मांडला. व्हिसा शुल्क वाढ पक्षपाती असल्याचे त्यांनी म्हटले होते.
भारत-अमेरिकेदरम्यान चर्चेत दोन मुद्दे नेहमीच महत्त्वाचे असतात. व्हिसा शुल्क वृद्धीचा एक मुद्दा आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) व्यावसायिकांसाठी एकूण शुल्क आकारण्याचा मुद्दा आहे. त्यामध्ये कायद्यानुसार आम्ही वाढ करतो, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे कायद्यात जोपर्यंत बदल होत नाही, तोपर्यंत हे प्रकरण असेच कायम राहण्याची शक्यता आहे, असे जेटली म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू

कोलकाता- पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज (रविवार) मतदानाला सुरवात झाली. या टप्प्यात 56 मतदारसंघांमध्ये निवडणूक होत असून, रिंगणात 33 महिलांसह एकूण 383 उमेदवार आहेत.
निवडणूक प्रचारादरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तसेच तृणमूल कॉंग्रेसचे नेते अनुव्रत मंडल यांना निवडणूक आयोगाने नुकत्याच नोटिसा बजावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हे मतदान होत आहे.
दुसऱ्या टप्प्यात उत्तर बंगालमधील अलिपूरदुआर, जलपायगुडी, दार्जिलिंग, उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर व माल्डा आणि दक्षिण बंगालमधील वीरभूम या जिल्ह्यांतील मतदारसंघांचा समावेश आहे. मतदारांसाठी 13 हजार 600 मतदानकेंद्रे असून, त्यातील 2909 केंद्रे महत्त्वाची आहेत.

दीड वर्षात सिंचनात एक टक्काही वाढ नाही

जळगाव : राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर दीड वर्षात एक टक्काही सिंचन झाले नाही ही चिंतनीय बाब आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. एका वृत्तपत्रातील बातमीचा आधार त्यांनी या वेळी दिला. व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी त्याला दुजोरा दिला, तर जलसंपदामंत्र्यांनी मात्र मौन बाळगले.
जळगाव येथील जैन हिल्स येथे तीन दिवसीय डाळिंब परिषदेच्या उद्घाटनासाठी श्री. पवार येथे आले असता त्यांनी हे मत व्यक्त केले.
पवार म्हणाले की, आपण कोणत्याही समारंभाच्या भाषणात कोणावरही टीका करीत नाही. परंतु राज्यात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. अशातच राज्यात मोठे विदारक चित्र समोर आले आहे. गेल्या दीड वर्षात राज्यात एक टक्काही सिंचन झाले नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. व्यासपीठावर असलेले शासनातील मंत्री खडसे व महाजन यांना काय हे खरे आहे काय? अशी विचारणा केली. त्या वेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी कोणतेही मत व्यक्त न करता मान हलवून कबुली दिली. मात्र, जलसंपदामंत्री महाजन यांनी मात्र मौन बाळगले. त्यानंतर बोलताना पवार म्हणाले की, जर खरंच असं असेल, तर ही अतिशय गंभीर बाब आहे.

भारत म्हणजे अंधांच्या राज्यात एक डोळ्याचा राजा
वॉशिंग्टन: जागतिक अर्थव्यवस्थेतील गुंतवणूकीसाठी उत्तम पर्याय म्हणून भारताकडे पाहिले जात असताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मात्र भारताला ‘अंधांच्या राज्यातील एक डोळ्याचा राजा‘ अशी उपमा दिली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह अनेक संस्थांनी भारत जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असल्याचे म्हटले आहे. परंतु भारताला बाह्यधोक्यांपासून सुरक्षित ठेऊन प्रभावी बदल राबवणाऱ्या राजन यांनीच हे मत व्यक्त केले आहे.
"मला वाटते भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती अजून तितकीशी समाधानकारक नाही. "अंधांच्या राज्यात एक डोळ्याचा राजा" अशी आमच्याकडे म्हण आहे. सध्या भारताची अशीच काहीशी परिस्थिती आहे.", असे राजन म्हणाले.
वॉलस्ट्रीट डिजिटल नेटवर्कच्या डाऊ जोन्सने प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या ‘मार्केटवॉच‘ वेबसाईटसाठी मुलाखात देताना राजन बोलत होते. यावेळी राजन म्हणाले, मध्यमगतीने विकास करु शकतो असे आम्ही मानत असल्याने त्यादृष्टीने सध्या सर्व गोष्ट योग्य रितीने पार पडत आहेत. गुंतवणूकीतदेखील चांगली वाढ होत आहे. आमच्या अर्थव्यवस्थेलादेखील आता स्थैर्य आले आहे. अर्थात, आमची अर्थव्यवस्था सगळ्याच धोक्यांपासून सुरक्षित नाही परंतु बऱ्याच धोक्यांपासून सुरक्षित झाली आहे.
राजन यांना भारत आणि चीन यांच्यातील तुलनेविषयी विचारले असता भारतात चीनप्रमाणे आर्थिक सुधारणा घडून येण्यासाठी आणखी दशकभराचा कालावधी लागेल असे त्यांनी सांगितले. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार चीनपेक्षा खुप लहान आहे परंतु जर योग्य वेळी योग्य दिशेने पावले उचलल्यास भारताचा निश्चित विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत परंतु अजून काही गोष्टी बाकी आहेत. इतर देशांनी स्वीकारलेल्या मार्गाने न जाता भारताने आपल्या क्षमता ओळखून त्याचा योग्य रितीने वापर करावा असे प्रतिपादन त्यांनी केले.

राज्यात उष्णतेची लाट

पुणे - पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानाने चाळिशी गाठली. राज्यात मालेगाव, भिरा, बुलडाणा येथे उष्णतेची लाट आली असून, सर्वाधिक तापमान मालेगाव येथे 44. 8 अंश सेल्सिअसची नोंद झाली.

पुण्यात 10 एप्रिलपासून सातत्याने तापमान वाढत आहे. शहरातील कमाल तापमानाचा पारा पुढील दोन दिवसांमध्ये 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. रविवारी विदर्भात उष्णतेच्या तीव्र लाट येणार असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी दिवसाच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत 3 ते 5 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे.
पुण्यासह नगर आणि नाशिक येथील किमान तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानाची दरी वाढली आहे. पुण्याचे कमाल तापमान सरासरीपेक्षा वाढून 40.2 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 1.1 अंश सेल्सिअसने कमी होऊन 18.6 इतके झाले.
पुण्यासह नगर आणि नाशिक येथील किमान तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानाची दरी वाढली आहे. पुण्याचे कमाल तापमान सरासरीपेक्षा वाढून 40.2 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 1.1 अंश सेल्सिअसने कमी होऊन 18.6 इतके झाले.
==============================================
डाळी पुन्हा महागल्या; नियंत्रण आवश्यक
पुणे - डाळींच्या भावांत पुन्हा तेजी निर्माण झाली असून तूर, हरभरा आणि उडीद डाळींच्या भावांत वाढ होत आहे. या डाळींचा नवीन हंगाम सुरू होण्यास सहा महिन्यांचा कालावधी असून, वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर पुन्हा भाववाढीचा प्रश्न समोर येईल.
डाळी पुन्हा महागल्या; नियंत्रण आवश्यक
पुण्यातील घाऊक बाजारात डाळींची प्रतिदिन 20 ते 30 टन आवक होत आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यांत डाळींचे भाव स्थिर होते; परंतु गेल्या पंधरा दिवसांत एकदम तूर, हरभरा, उडीद आणि मसूर डाळींचे भाव वधारले. ही वाढ होण्यामागे सट्टेबाज असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सरकारने डाळींचे भाव नियंत्रणात राहण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापाऱ्यांनीच केली आहे. गेल्या वर्षी दिवाळीत डाळींचे भाव वधारल्यानंतर राज्य सरकारने व्यापाऱ्यांवरच कारवाई केली; पण साठेबाज आणि सट्टेबाजांकडे दुर्लक्ष केले. या वेळी घाऊक बाजारात तूरडाळीचा भाव 180 ते 190 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचला होता. कारवाईनंतर डाळीच्या बाजारात सावध खरेदी सुरू झाली होती. नवीन हंगाम डिसेंबर-जानेवारीमध्ये सुरू झाल्यानंतर हे भाव प्रतिकिलो 125 रुपयांपर्यंत खाली आले होते. पुन्हा वधारू लागले आहे.
देशात गेल्या वर्षी साडेसोळा लाख टन डाळीचे उत्पादन झाले होते. या वर्षी 17 लाख टन उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती; पण प्रत्यक्षात 15 लाख टन हाती येण्याची शक्यता आहे. शेतकरी हा माल टप्प्याटप्प्यानेच बाजारात आणत असल्याने मागणी आणि पुरवठा यांच्यातील घडी बिघडत आहे.
गेल्या काही दिवसांत सार्वजनिक सुट्या मोठ्या प्रमाणावर आल्या आणि आर्थिक वर्षाची अखेर या कारणांमुळे डाळींच्या बाजारपेठांमधील उलाढाल थांबली होती. या काळात मागणी आणि पुरवठ्यात निर्माण झालेल्या दरीचा फायदा सट्टेबाजांनी घेतला.
==============================================
जपानमध्ये भूकंपात शेकडो लोक गाडल्याची भीती
अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या, 32 जण मृत्युमुखी
कुमामोटो (जपान) - दोन मोठ्या भूकंपांनंतर वादळी पाऊसही होण्याची भीती आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अनेक इमारती जमीनदोस्त होऊन त्यांचे ढिगारे बनले आहेत. त्यामध्ये अनेक नागरिक गाडले गेल्याची भीती आहे.
गुरुवारी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यातून जपान सावरत असताना शनिवारी पुन्हा 7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने जपानच्या दक्षिणेकडील भाग हादरला. या भूकंपात ठार झालेल्यांची संख्या 32 झाली असल्याची माहिती मुख्य कॅबिनेट सचिवांनी दिली.
मोठ्या भूकंपाच्या धक्क्यानंतर अनेक लहान धक्के बसले असून, त्यामुळे अनेक ठिकाणी घरे, रस्ते आणि रेल्वे रूळ उद्ध्वस्त झाले असून, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे.

भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या असून, या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण जीवंत गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मोठमोठ्या इमारती जमिनदोस्त झाल्या असून, विद्यापीठांमधील वसतिगृहांच्या इमारतीही कोसळल्या आहेत. ""कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली अनेक जण गाडले गेले असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस, अग्निशामक दले आणि मदत पथकांच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू केले आहे,‘‘ अशी माहिती मुख्य कॅबिनेट सचिव योशिहिदे सुगा यांनी पत्रकार परिषदेत दिली. धरण फुटण्याची शक्यता गृहीत धरून त्या भागातील तीनशे नागरिकांना सुरक्षित जागी हलविण्यात आले आहे. तर सुमारे 70 हजार नागरिकांचे सुरक्षित जागी स्थलांतर करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
==============================================
दुष्काळ निवारणासाठी नेते सरसावले
‘जलयुक्त शिवार‘साठी पोकलेन यंत्रे देण्याची शरद पवारांची सूचना
मुंबई - दुष्काळात होरपळणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी राज्यातील बलाढ्य साखर कारखान्यांची मदत घेण्याची सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. समाधानकारक मॉन्सूनचे भाकीत हवामान खात्याने केले असताना, तसेच ‘जलयुक्त शिवार‘ची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला असतानाच ही सूचना पवार यांनी केली आहे.
राज्यातील प्रत्येक साखर कारखान्याने नाला रुंदीकरण; तसेच नदी विस्तारीकरण योजनेला प्रत्येकी एक पोकलेन मशिन देण्याचा प्रस्ताव पवार यांनी ठेवला आहे. मुख्यमंत्री फडणवी
स यांनी ही सूचना अतिशय महत्त्वाची असल्याने त्याचे लगेच पालन करा, असे साखर तसेच सहकार आयुक्तांना कळवले आहे.
दुष्काळ निवारणासाठी नेते सरसावले
‘जलयुक्त शिवार‘साठी पोकलेन यंत्रे देण्याची शरद पवारांची सूचना
मुंबई - दुष्काळात होरपळणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी राज्यातील बलाढ्य साखर कारखान्यांची मदत घेण्याची सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. समाधानकारक मॉन्सूनचे भाकीत हवामान खात्याने केले असताना, तसेच ‘जलयुक्त शिवार‘ची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला असतानाच ही सूचना पवार यांनी केली आहे.
राज्यातील प्रत्येक साखर कारखान्याने नाला रुंदीकरण; तसेच नदी विस्तारीकरण योजनेला प्रत्येकी एक पोकलेन मशिन देण्याचा प्रस्ताव पवार यांनी ठेवला आहे. मुख्यमंत्री फडणवी
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी युद्धस्तरावर उपाययोजना आखताना रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात आली आहेत. गेल्या वर्षापासून सुरू झालेली जलयुक्त शिवार योजना प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. साखर कारखानदारीचा या संकटातून मार्ग काढण्यासाठी कसा उपयोग होईल, हे तपासून पाहिले जात आहे. याविषयी साखर कारखानदारांची पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक होणार आहे. साखर कारखानदारी संकटात असली, तरी आजवरचा सहकार; तसेच व्यवस्थापन क्षेत्रातला अनुभव लक्षात घेऊन या कारखान्यांचे मार्गदर्शन घेण्याची राज्य सरकारची भूमिका आहे.
==============================================
औरंगाबादेत उद्योगांना १० टक्के पाणीकपात
भीषण टंचाईमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
औरंगाबादेत उद्योगांना १० टक्के पाणीकपात
भीषण टंचाईमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
औरंगाबाद - वाढती दुष्काळी परिस्थिती, जायकवाडीतील मृतसाठ्यातून सुरू असलेला उपसा, कोरडे पडलेले लहान-मोठे प्रकल्प आणि आणखी तीन महिन्यांत कराव्या लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आदी बाबी लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योगांना पुरवठा केला जाणाऱ्या पाण्यामध्ये दहा टक्के कपात करण्याचा निर्णय शनिवारी (ता. १६) घेतला. त्यामुळे आता उद्योगांच्या पाणीपुरवठ्यात एकूण २० टक्के कपात झाली आहे.
गेल्या आठवड्यापासून उद्योगांच्या पाणीकपातीबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या बैठकांवर बैठका झाल्या. उपलब्ध पाणी, जूनपर्यंत टॅंकरने करावा लागणारा पाणीपुरवठा पाहता उद्योगांना दिल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याच्या निर्णयावर अखेर शनिवारी शिक्कामोर्तब झाले.
सलग दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर २०१५ पासूनच टंचाई परिस्थिती उद्भवली आहे. यंदा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात टॅंकरग्रस्त गावांची संख्या साडेपाचशेच्या घरात पोचली आहे. या गावांना पावणेसातशे टॅंकरने पिण्याचे पाणीपुरवठा केले जात आहे. एकीकडे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे पाणीसाठा कमी कमी होत आहे. प्रकल्प कोरडे पडल्याने विहिरींवरच टॅंकर भरावे लागणार आहेत. त्यामुळे जायकवाडीतील मृतसाठ्यातील पाणी अधिकाधिक पिण्यासाठी वापरण्यावर भर दिला जात आहे.
जून-जुलै महिन्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. भविष्यातील टंचाई परिस्थिती लक्षात घेता उद्योगाच्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपातीचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. हा निर्णय गेल्या जून-जुलै २०१५ मध्ये घेण्यात आला होता. तेव्हापासून दहा टक्के पाणीकपात सुरू आहे. तर शनिवारी घेतलेल्या निर्णयाने उद्योगाच्या पाणीकपातीत आणखी दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
==============================================

No comments:
Post a Comment