Friday, 8 April 2016

नमस्कार लाईव्ह ०८-०४-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
1- इंग्लंडमधली रतन टाटांची टाटा स्टील कंपनी चौकशीच्या फे-यात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
2- कोलकाता;  १० मिनिटांसाठी कोलकातामधील ८५ विमानांचा संपर्क तुटला 
3- आयपीएस अधिका-यांच मुल्यमापन होणार ऑनलाइन 
4- येड्डुयुरप्पा, मौर्य, संपलांची प्रदेशाध्यक्षपदी निवड  
5- पाकमध्ये दहशतवाद्यांचे सरकार- सुब्रमण्यम 
6- भारताला उद्दिष्ट्यांचा विसर: मोहन भागवत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
7- अखेर शनी शिंगणापूरचं दार महिलांसाठीही खुलं 
8- संपकरी डॉक्टरांना ‘मेस्मा’ लावा - सभापतींचे निर्देश 
9- सामने बाहेर हलवा; पाणी देणार नाही: फडणवीस 
10- पंचवटी; गोदामाईचे रामकुंड 140 वर्षांनंतर कोरडेठाक 
11- फ्रीडम 251 या मोबाईल कंपनीविरोधात अलाहाबाद कोर्टात एफआयआर दाखल 
12- लातूरमध्ये सरकारी रुग्णालयात फक्त अत्यावश्यक शस्त्रक्रिया होणार, सरकारी रुग्णालयांना पाण्यात तुटवडा 
13- यवतमाळमधल्या उमरखेडमध्ये दोन जणांना 13 जिवंत काडतुसांसह अटक 
14- अहमदनगर- भूमाता ब्रिगेडच्या महिलांचा शनी मंदिराच्या चौथ-यावर प्रवेश 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
15- नांदेड; गुटखा विक्री कायमची बंद करण्यासाठी दि. 11 एप्रिल रोजी 25 जणांचे आमरण उपोषण 
16- मुंबई; शेवटची सीएसटी - वाशी लोकल रात्री ११.२0 वा. 
17- डीसी लोकल तिकीट १० हजार रुपयांचे 
18- नाशिक; मालेगावमध्ये संतप्त जमावाने शाळा पेटवली 
19- दिव्यांगामध्ये हुंकार भरणारी रेणुका 
20- लखनऊ; एनआयए अधिकाऱ्याची हत्या नातेवाईकाकडूनच 
21- हिंगोली; उंडेगावात साकारले एक कोटी लिटरचे तळे 
22- लोणी काळभोर; वादग्रस्त कारकिर्दीमुळे आंधळकर नेहमीच चर्चेत 
23- जलाऊनमध्ये चार अल्पवयीन मुलींवर बलात्कार, पोलिसांत गुन्हा दाखल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
24- झक्कास ऑफर... अवघ्या 999 रुपयांत सॉलिड स्मार्टफोन 
25- सनरायझर्स हैदराबादला धक्का, युवराज दोन आठवडे खेळणार नाही 
26- एक छोटीशी वेलची, पण मोठे फायदे... 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाहीत, हे जितकं खर तितकेच त्या प्रगतीचा मार्ग दाखवत नाहीत हे हि तितकच खर
(भगवान जाधव, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


============================================

अखेर शनी शिंगणापूरचं दार महिलांसाठीही खुलं

अखेर शनी शिंगणापूरचं दार महिलांसाठीही खुलं
अहमदनगर : गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शनी शिंगणापुरातील वादावर अखेर पडदा पडल्याची चिन्हं आहेत. कारण यापुढे शनी चौथऱ्यावर कोणालाही प्रवेश बंदी करणार नाही, अशी घोषणा मंदिर समितीच्या विश्वस्तांनी केली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर विश्वस्तांनी हा निर्णय घेतला.

“यापुढे आम्ही कोणालाच चौथरा प्रवेशबंदी करणार नाही. आम्ही सगळ्यांनाच प्रवेशबंदी केली होती मात्र कावडीवाले गेले आहेत. त्यामुळे आता कोणालाही रोखणार नाही. तृप्ती देसाई आल्या तरीही त्यांना जाऊ देणार आहोत”, असं विश्वस्तांनी सांगितलं.

दम्यान, पाडव्याच्या मुहुर्तावर आज शनी शिंगणापूरच्या विश्वस्तांचा विरोध डावलून शिंगणापूरमधल्या स्थानिकांनी चौथऱ्यावर प्रवेश केला.
shani abhishek
पाडव्याच्या दिवशी शनीच्या शिळेवर गंगाजलाचा जलाभिषेक केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरु आहे. मात्र, यंदा महिला आंदोलनामुळे वाद पेटल्यानं मंदिर समितीनं ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला न जुमानता स्थानिकांनी चौथऱ्यावरुन प्रवेश करुन जलाभिषेक केला. 
तिकडे पुरुषांनी चौथऱ्यावर प्रवेश केल्यास महिलाही चौथऱ्यावर जाणार, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला होता. त्यामुळे साहजिक यावरुन पुन्हा वादावादी होण्याची शक्यता होती. मात्र हा वाद टाळण्यासाठीच विश्वस्तांनी हा निर्णय घेतला. 
दरम्यान, हायकोर्टाने जिथे पुरुषांना प्रवेश मिळतो, तिथे महिलांनाही प्रवेश मिळायलाच हवा, असं ठणकावून सांगितलं होतं. मात्र तरीही इथे महिलांना प्रवेश मिळत नव्हता. मात्र आज पाडव्याच्या निमित्ताने शनी शिंगणापूरात सिमोल्लंघन झालं आहे. 
विद्या बाळ यांचा न्यायालयीन लढा 
शनी शिंगणापूर वादाबाबत न्यायालयीन लढ्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी दिलेल्या लढ्याला अखेर यश आलं. 
हायकोर्टाने ठणकावलं
कायद्याने महिलांना कुठेही प्रवेश नाकारला जाऊ शकत नसताना शनि शिंगणापूरला महिलांना प्रवेश कसा नाकारला जातो? असा सवाल मुंबई उच्च न्यायालायने राज्य सरकारला विचारला होता. महिलांना प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगत हायकोर्टाने राज्य सरकारला धारेवर धरलं.
 राज्य सरकारची भूमिका
दरम्यान, राज्य सरकारने जिथे पुरुषांना प्रवेश आहे, तिथे महिलांनाही प्रवेश मिळायला हवा, अशीच भूमिका घेतली होती. मात्र कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना, त्यामध्ये कमतरता दिसत होती.
 तृप्ती देसाईंच्या भूमाता ब्रिगेडचा लढा
शनी मंदिरातील चौथरा प्रवेशासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा यांनीही लढा दिला. प्रत्यक्ष शिंगणापुरात जाऊन, महिलांसोबत त्यांनी चौथरा चढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गावकऱ्यांच्या प्रचंड विरोधामुळे त्यांना यश येत नव्हतं.पण तरीही त्यांनी हिम्मत न हरता, आपला लढा चालूच ठेवला होता. यासाठी त्यांना अनेकवेळा धक्काबुक्की आणि पोलीस स्टेशनच्या वाऱ्याही करावा लागला होता.
 काय होता शनी शिंगणापूर वाद?
शनी शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश बंदी होती. मात्र 28 नोव्हेंबर 2015 रोजी एका महिलेने चौथऱ्यावर जाऊन शनीवर अभिषेक केला होता. महिलेने 400 वर्षांची परंपरा मोडित काढत शनिदेवाला अभिषेक केला. 
या घटनेनंतर 7 सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आलं होतं. 
महिला भक्ताने शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन त्याचं दर्शन घेत तेलाचा अभिषेक केल्याचं प्रकरण उघडकीस येताच शिंगणापूरसह राज्यभरात चांगलाच गदारोळ माजला. मात्र, तिने शनिदेवाचं दर्शन घेणं ही एका क्रांतीची नांदी असल्याचं सांगत सामाजिक स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला.
दुसरीकडे महिलेने थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतल्यामुळे ग्रामस्थांनी निषेध सभा घेतल्या. इतकंच नाही तर शनीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करुन शुद्धी करण्याचाही घाट घातला.
============================================
नांदेड; गुटखा विक्री कायमची बंद करण्यासाठी दि. 11 एप्रिल रोजी 25 जणांचे आमरण उपोषण - अहेमद कुरेशी


गुटखा विक्री कायमची बंद करण्यासाठी दि. 11 एप्रिल रोजी 25 जणांचे आमरण उपोषण - अहेमद कुरेशी
नांदेड, शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुके व ग्रामीण भागात शासनाने बंदी आणलेल्या गुटखा ची विक्री सर्रास सुरु आहे. ज्यामुळे तरुणांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता राज्य शासनाने गुटखा विक्रीवर कायदेशीर बंदी आणली असताना सुद्धा जिल्हाभरात गुटखा विक्री सर्रास सुरु आहे. सदरील गुटखा विक्री कायमची बंद करावी यासाठी अहेमद कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली दि. 11 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किमान 25 कार्यकर्ते आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन आज दि. 31 रोजी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

शहर, तालुके गावातील गल्ली-बोळीत प्रत्येक पानटपरी, लहान मोठ्या दुकानांवर गुटखा खुलेआम विक्री केला जात आहे. गुटखा माफिया आंध्रा व तेलंगाना राज्यातून दररोज लाखो रुपयाचा गुटखा खुलेआम आयात करीत असून महिन्याकाठी करोडो रुपयाचा गुटखा विकला जात आहे. विशेष म्हणजे कोणी आंदोलन, उपोषण, तक्रार केली असता काही दिवसासाठी गुटखा विक्री बंद कलेली जाते आणि परत जशास तसे विक्री सुरु होत आहे. शासनाकडून काही ठिकाणी धाडी टाकून माल जब्त करण्यात येत असला तरीही मोठ्या व्यापारी वर्गावर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने गुटखा विक्री कायमची बंद होत नाही. म्हणूनच गुटखा विक्री कायमची बंद करून बड्या व्यापारी वर्गावर कायदेशीर कार्यवाही 08 दिवसाच्या आत करण्यात आली नाही तर दि. 11 एप्रिल रोजी अहेमद कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली किमान 25 कार्यकर्ते आमरण उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी याना देण्यात आले आहे.
============================================

झक्कास ऑफर... अवघ्या 999 रुपयांत सॉलिड स्मार्टफोन

झक्कास ऑफर... अवघ्या 999 रुपयांत सॉलिड स्मार्टफोन
मुंबई: चीनी स्मार्टफोन कंपनी LeEco 7 आणि 8 एप्रिलला LeEco दिवस साजरा करीत आहे. या दिवशी भारतात लाँच करण्यात आलेले दोन स्मार्टफोन Le 1s आणि Le मॅक्सवर जबरदस्त सूट मिळते आहे. फ्लिपकार्टवर या दोन्ही स्मार्टवर ग्राहकांना एक्सचेंज ऑफरही मिळते आहे.

Le 1s स्मार्टफोन:

10,999 रु. किंमतीचा हा स्मार्टफोन एक्सचेंज ऑफरमध्ये अवघ्या 999 रुपयात खरेदी करता येणार आहे. 999 रुपये आयफोन 5s आणि LeEco या फोनवर एक्सचेंज ऑफर मिळणार आहे.

जर 999 रुपयात Le 1s खरेदी करायचा असल्यास त्यासाठी आयफोन 5S किंवा LeEcoवरच ऑफर मिळणार आहे.

या स्मार्टफोनसाठी सगळ्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. तसेच एका लकी विजेत्याला महिंद्राची KUV100 कार जिंकण्याची संधी आहे.

Le मॅक्स स्मार्टफोन:

32,999 रु. किंमतीचा Le मॅक्स 11,998 रुपयात खरेदी करता येणार आहे. पण हा स्मार्टफोन तुम्हाला एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणार आहे.

Le 1s स्मार्टफोन पूर्णपणे बॉडी मेटल असून त्याचा डिस्प्ले 5.5 इंच आहे. याचं रेझ्युलेशन 1920×1080 पिक्सल आहे. अँड्रॉईड 5.0 सपोर्ट आहे.

यामध्ये मीडियाटेक एक्सटेन टर्बो ऑक्टाकोअर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तसंच यामध्ये 3 जीबी रॅम आहे. तसंच 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तसंच यामध्ये 32 जीबी इनबिल्ट मेमरी असून 3000 mAh बॅटरी क्षमता आहे.
============================================

सनरायझर्स हैदराबादला धक्का, युवराज दोन आठवडे खेळणार नाही

सनरायझर्स हैदराबादला धक्का, युवराज दोन आठवडे खेळणार नाही
मुंबई: सनरायझर्स हैदराबादच्या संघाला आयपीएल सुरु होण्याआधीच मोठा धक्का बसला आहे. सनरायझर्सचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग दुखापतीमुळं पहिल्या दोन आठवड्यांत खेळू शकणार नाही.

ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात युवराजच्या डाव्या पायाच्या घोटा दुखावला होता. त्यामुळं त्याला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातून माघार घ्यावी लागली होती. त्या दुखापतीतून सावरण्यासाठी युवराजला अजूनही दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळं सनरायझर्स हैदराबादच्या पहिल्या दोन आठवड्यांत होणाऱ्या सामन्यांमध्ये युवराज सिंग खेळू शकणार नसल्याचं प्रशिक्षक टॉम मूडी यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आयपीएलच्या यंदाच्या मोसमात म्हणजे 9 एप्रिल ते 29 मे या कालावधीत एकूण साठ सामने 9 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स या दोन संघांमधल्या लढतीनं आयपीएलची सुरुवात होईल.

खेळवले जाणार आहेत. त्यात 56 साखळी सामने, प्लेऑफच्या तीन लढती आणि फायनलचा समावेश आहे.

यंदा 10 शहरांमधल्या दहा स्टेडियम्समध्ये आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. मुंबई, पुणे, बंगळुरु, हैदराबाद, कोलकाता, राजकोट, दिल्ली आणि मोहाली या आठ फ्रँचायझींच्या आठ होमटाऊन्स सोबतच नागपूर आणि रायपूरमध्येही आयपीएलचे सामने होणार आहेत. पंजाबची टीम आपले तीन सामने नागपुरात तर दिल्लीची टीम आपले दोन सामने रायपूरमध्ये खेळणार आहे.
============================================

एक छोटीशी वेलची, पण मोठे फायदे...

एक छोटीशी वेलची, पण मोठे फायदे...
मुंबई: चहाची चव वाढावी किंवा माऊथ फ्रेशनर म्हणून वेलचीचा वापर केला जातो. पण या छोट्याशा वेलचीचे तसे बरेच फायदे आहेत. छोट्या दिसणाऱ्या वेलची जाणून घेऊयात मोठे फायदे. 
पाचनसंबंधी समस्य असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं. पोटात जळजळ अथवा उलटी होत असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं. त्यामुळेच जेवणानंतर वेलची खाण्यासाठी दिली जाते. त्याचप्रमाणे माऊथ फ्रेशनर म्हणूनही वेलचीचा वापर केला जातो. तसंच अॅसिडीटीवरही वेलची फारच उपायकारक आहे. वेलचीमध्ये असणाऱ्या रासायनिक गुणांमुळे फायदा होतो. 
याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वेलचीच्या सेवनानं सेक्स लाइफमध्ये सुधारणा होऊ शकते. वेलचीमुळे शरीरात उर्जा प्राप्त होते. त्यामुळेच वेलची सेवन करणं चांगलं मानलं जातं. 
वेलचीमध्ये आवश्यक घटक असल्यानं त्यामुळे नपुंसकता, इरेक्टारइल डिस्फंक्शन और इंफर्टिलिटी यासारख्या समस्यांवर मात केली जाऊ शकते. वेलचीमध्ये आर्यन, व्हिटामिन सी, रिबोफ्लोविन आणि नियासिन यासारखे पोषक द्रव्य यात असतात. तसेच वेलचीच्या सेवनानं अॅनिमियापासूनही संरक्षण होतं. 
घसा दुखणं किंवा खवखव असल्यास वेलचीच्या सेवनानं नक्कीच आराम मिळतो. तसंच वेलचीच्या सेवनानं रक्ताची असणारी कमतरताही दूर होते.
============================================

अरे बापरे ! १० मिनिटांसाठी कोलकातामधील ८५ विमानांचा संपर्क तुटला

  • ऑनलाइन लोकमत - 
    कोलकाता, दि. ८ - तब्बल १० मिनिटांसाठी ८५ विमानांचा संपर्क कोलकाता एअर ट्राफिक कंट्रोलशी तुटला होता. त्यामुळे हजारो लोकांचा जीव धोक्यात आला होता. सरकारने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी अहवाल मागवला आहे. गुरुवारी हा प्रकार घडला. सकाळी ७.३०च्या दरम्यान विमानांचं ठिकाण दाखवणारा डिस्प्ले बंद पडल्याने विमानांशी संपर्क पुर्णपणे तुटला होता. यावेळी कोलकातामध्ये ८५ विमाने उडत होती. 
    विमानांच्या वाहतुकीची माहिती देणारी यंत्रणा बंद पडल्याने प्रोटोकॉलप्रमाणे हाय फ्रिक्वेन्सीद्वारे विमानांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ती यंत्रणादेखील बंद पडल्याचं लक्षात आलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोलकाता विमानतळावरील बीएसएनएल नेटवर्क फेल झाल्याने ही समस्या निर्माण झाली. इंटरनेट प्रोटोकॉलच्या माध्यमातून वापरण्यात येणा-या या लाईनद्वारे वैमानिकांशी संपर्क साधून त्यांना इतर विमानांची माहिती दिली जाते. तसंच विमानांमधील सुरक्षित अंतर किती आहे याबद्द्ल संदेश दिला जातो. 
    अशाप्रकारे संपर्क तुटल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोलकाता विमानतळावर देशातील अर्ध्याहून जास्त विमानांवर नियंत्रण ठेवलं जात. त्यामुळे ही समस्या निर्माण झाल्यावर सगळ्यांचीच गडबड झाली होती. एअर ट्राफिक कंट्रोलच्या अधिका-यांनी वाराणसी, पाटणा, गया येथे संदेश पाठवून विमानांशी संपर्क साधून त्यांना मार्गदर्शन करण्याची सूचना केली होती. १० मिनिटांनी नेटवर्क पुन्हा सुरळीत झाल्याचं अधिका-यांनी सांगितलं आहे. 
============================================

आयपीएस अधिका-यांच मुल्यमापन होणार ऑनलाइन

  • डिप्पी वंकाणी - लोकमत एक्स्क्लुझिव्ह 
    मुंबई, दि. ८ - आयपीएस अधिका-यांची मुल्यमापन प्रक्रिया आता ऑनलाइन होणार असून स्मार्ट परफॉर्मन्स अप्रेझल रिपोर्ट रेकॉर्डींग ऑनलाइन (स्पॅरो) या प्रोजेक्टअंतर्गत केलं जाणार आहे. केंद्रीय गृह विभागाने घेतलेल्या या निर्णयाचं अधिका-यांनी स्वागत केलं आहे. अधिकारी आणि त्यांच्या वरिष्ठांसाठी ज्यांना ठराविक वेळेत अधिका-यांच्या कामाची समीक्षा करायची आहे त्यांच्यासाठी वेळेचं बंधन असल्याने कामात पारदर्शकता निर्माण होईल असं मत अधिका-यांनी व्यक्त केलं आहे. ज्याप्रमाणे कामात प्रगती होत जाईल त्याप्रमाणे अधिका-यांना त्याचा ईमेलदेखील मिळणार आहे. 
    गेल्यावर्षीयपर्यंत अधिका-यांना आपल्या कामाकाजाचा लेखाजोखा कागदोपत्री जमा करावा लागत होता. आता मात्र त्यांना सक्तीने आपल्या कामाची माहिती ऑनलाइन स्पॅरो अंतर्गत जमा करावी लागणार आहे. अधिका-यांना यासाठी डिजीटल सिग्नेचर सर्टिफिकेटदेखील लागणार आहे ज्याचा मुल्यमापनाच्या सर्व कागदपत्रांवर वापर करणे सक्तीचं असेल.
    अधिका-यांना आपली माहिती आयजीला 5 एप्रिलअगोदर पाठवण्यास सांगितलं आहे ज्याच्या मदतीने वैयक्तिक आयडी तयार केले जाणार आहेत. पासवर्ड मोबाईल फोनवर पाठवण्यात येणार आहेत ज्याच्या मदतीने अधिकारी स्पॅरोच्या www.IPS.gov.in वेबसाईटवर लॉग इन करु शकतात.
    परफॉर्मन्स अप्रेझल रिपोर्टची पाहणी करण्यासाठी तसंच डीजीपींकडून मंजुरी मिळण्यासाठी वेळेची मर्यादा ठेवण्यात आली आहे. वरिष्ठांनी दिलेल्या शे-यावर जर अधिकारी सहमत नसेल तर तो आपला मुद्दा मांडू शकतो. याअगोदर अधिका-यांना आपल्या फाईलची माहिती मिळत नव्हती मात्र आता त्यांना प्रत्येक स्टेजला एसएमएस आणि ईमेल मिळणार आहे. आमची सर्व प्रक्रिया आता ऑनलाइन झाली आहे अशी माहिती वरिष्ठ आयपीएस अधिका-याने दिली आहे.
============================================

शेवटची सीएसटी - वाशी लोकल रात्री ११.२0 वा.

  • मुंबई : येत्या शनिवारी मध्यरात्री सीएसटी ते पनवेल, तसेच ठाणे ते वाशी, बेलापूर, पनवेल मार्गावर डीसी ते एसी परावर्तन मध्य रेल्वेकडून केले जाणार आहे. पहाटे साडे सहा वाजेपर्यंत हे काम चालणार असून, यासाठी ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेतला जाईल. या कामासाठी हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील शनिवारी रात्री शेवटच्या आणि रविवारी पहाटेच्या लोकल वेळेत बदल करण्यात आले आहेत.
============================================

डीसी लोकल तिकीट १० हजार रुपयांचे

  • मुंबई : मध्य रेल्वेने दुष्काळग्रस्तांना निधी देण्यासाठी अजब फंडा तयार केला आहे. हार्बर मार्गावर डीसी (१,५00 व्होल्ट डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 व्होल्ट अल्टरनेट करंट) परिवर्तनाचे काम होणार आहे. हे काम होण्यापूर्वी शनिवारी रात्री डीसी विद्युप्रवाहावरील शेवटचा विशेष लोकल प्रवास प्रवाशांना घडविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यासाठी तीन डबे राखीव ठेवणार असून, प्रत्येक प्रवाशामागे दहा हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. यातून जमा होणारा निधी दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे.
    डीसी विद्युतप्रवाहावरील पहिली लोकल ३ फेब्रुवारी १९२५ रोजी मुंबई ते कुर्ला या मार्गावर धावली होती. शेवटचा डीसी लोकल प्रवास ऐतिहासिक करण्यासाठी जे.जे.स्कूल आॅफ आर्ट्ससह मध्य रेल्वेने नियोजन केले आहे. येत्या ९ एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजता शेवटची डीसी लोकल कुर्ल्याहून सीएसटीसाठी सुटेल. ही लोकल मध्यरात्री सव्वा बारा वाजता सीएसटी स्थानकात पोहोचेल. ही लोकल ४0 वर्षे जुनी असेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
    नऊ डब्यांच्या या विशेष लोकलमध्ये तीन डबे प्रवाशांसाठी राखीव असतील. या डब्यातील प्रत्येक प्रवाशामागे दहा हजार रुपये तिकीट आकारण्यात येणार आहेत. जे.जे.स्कूल आॅफ आर्ट्सकडून याची तिकिट विक्री केली जाईल. चौकशी आणि तिकिटे मिळविण्यासाठी ९0२९0८२६९0 क्रमांकावर एसएमएस किंवा २२६२१६४९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. दहा हजार रुपयांची तिकिटे घेणाऱ्या प्रवाशांचा खास पाहुणचार केला जाईल. लोकलमधून प्रवास झाल्यानंतर प्रवाशांना सीएसटीच्या खास दालनात नेण्यात येईल आणि होणाऱ्या डीसी-एसी परिवर्तनाचे थेट व्हिडीओ चित्रीकरणही पाहता येणार आहे.
============================================

संपकरी डॉक्टरांना ‘मेस्मा’ लावा - सभापतींचे निर्देश

  • मुंबई : जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे वैद्यकीय सेवेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे या डॉक्टरांवर ‘मेस्मा’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले.
    राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी या संपावर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांपासून बैठका सुरू आहेत, असे सांगितले.
    राज्यातील निवासी डॉक्टर संपावर
    जे.जे.तील संपाला पाठिंबा देत राज्यातील साडेचार हजार निवासी डॉक्टरांनी ८ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे.
============================================
मालेगावमध्ये संतप्त जमावाने शाळा पेटवली

मालेगाव (जि. नाशिक) - शाळेतील स्वच्छता कामगाराने ज्युनिअर केजीमधील चार वर्षाच्या बालिकेला भीती दाखविल्याप्रकरणी शाळेत जमा झालेल्या संतप्त पालकांनी शाळेला आग लावण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांची जीप आणि दोन मोटारसायकलीही पेटवल्या. 

येथील खातून एज्युकेशन संस्थेच्या मदर आयेशा शाळेत ज्युनिअर केजीमध्ये शिकत असलेल्या एका बालिकेला शाळेतील स्वच्छता कामगाराने भीती दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बालिकेच्या पालकांनी शाळेत तक्रार करून संबंधित कामगाराला कामावरून काढून टाकण्याची मागणी केली होती. या घटनेला दोन दिवस उलटून गेले होते. दरम्यान शहरात अफवेचे लोण पसरले. दोन दिवसांनंतरही शाळेने काहीही कारवाई केले नसल्याचे पाहून आज विद्यार्थ्यांचे पालक शाळेत जमा झाले. दरम्यान माजी आमदार रशीद शेख, माजी महापौर मलीक युनूस इसा, अप्पर पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर जमावाने शाळेला आग लावली. तसेच पोलिसांची जीप आणि मोटारसायकल पेटवली. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर परिसरात तणावाचे वातावरण असून जिल्हाभरातून पोलिसांची कुमक मागविण्यात येत आहे.
============================================
सामने बाहेर हलवा; पाणी देणार नाही: फडणवीस
मुंबई : ‘‘इंडियन प्रीमिअर लीग‘चे सामने महाराष्ट्राबाहेर हलविले, तरीही फरक पडत नाही; पण या सामन्यांसाठी कुठल्याही स्टेडियमला पिण्याचे पाणी दिले जाणार नाही,‘ अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) घेतली. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असतानाही ‘आयपीएल‘साठी लाखो लिटर पाणी वाया जाणार असल्याची टीका गेले काही दिवस सुरू आहे. न्यायालयानेही याविषयी नाराजी व्यक्त केली होती. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "‘आयपीएल‘च्या यंदाच्या मोसमासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार नाही. मग यामुळे ‘आयपीएल‘चे सामने राज्याबाहेर हलविले, तरीही आम्हाला फरक पडत नाही.‘‘ यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, उद्या (रविवार) होणाऱ्या ‘आयपीएल‘च्या पहिल्या सामन्याला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. 

तसेच, हे सामने होणाऱ्या स्टेडियमला पुरविले जाणारे पाणी पिण्यायोग्य असते की नसते, यासंदर्भातील अहवाल देण्याचे आदेशही राज्य सरकार आणि महापालिकेला दिले होते. ‘स्टेडियमची देखभाल करण्यासाठी 60 लाख लिटर पाण्याची नासाडी होत असल्याने दुष्काळी परिस्थितीमध्ये ‘आयपीएल‘चे सामने राज्याबाहेर खेळविले जावे‘ अशा आशयाची याचिका एका स्वयंसेवी संस्थेने केली होती.
============================================
येड्डुयुरप्पा, मौर्य, संपलांची प्रदेशाध्यक्षपदी निवड 
नवी दिल्ली- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येड्डुयुरप्पा यांची कर्नाटक, केशव प्रसाद मौर्य यांची उत्तर प्रदेशच्या तर विजय संपला यांची पंजाबच्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रदेशाध्यक्षपदी आज (शुक्रवार) निवड करण्यात आली आहे. 

येड्ड्युरप्पा हे सध्या भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व लोकसभेचे खासदार आहेत. प्रल्हाद जोशी यांच्या जागेवर त्यांची निवड करण्यात आली आहे. केशव प्रसाद मौर्य यांची उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे.

पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी विजय संपला यांची निवड करण्यात आली आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहेत. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आलेले तिघेही लोकसभेचे खासदार आहेत.
============================================
दिव्यांगामध्ये हुंकार भरणारी रेणुका
जर प्रबळ इच्छाशक्ती व आत्मविश्‍वास असेल तर ती व्यक्ती कुठल्याही संकटाला सहजपणे तोंड देऊ शकते. स्वत: दिव्यांग असूनदेखील शेकडो दिव्यांगाच्या जीवनात हुंकार भरून त्यांना जगण्याचे नव बळ देण्याचे काम एक महिला गेल्या 11 वर्षांपासून करीत आहे. तिच्या कार्याची गुढी दिवसागणिक उंचावत आहे. रेणुका बिडकर हे तिचे नाव. 

एक वर्षाची असताना पोलिओमुळे अपंगत्व आलेली रेणुका एक दिवस शेकडो दिव्यांग आणि गोरगरीब महिलांचा आधारवड ठरेल याची कल्पना कुणी केली नसेल. आई-वडिलांचा आधार आणि मार्गदर्शनामुळे त्यांना कधी दिव्यांग असल्याची जाणीव झाली नाही. त्यामुळेच त्यांनी दिव्यांग असल्याचे भांडवल करीत बसण्यापेक्षा त्यावर मात करून आपल्या सारख्याच इतरांसाठी काही तरी करण्याचा ध्यास घेतला. बीकॉम, सॉयकालॉजी, एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या घरी शांत बसल्या नाही. एक दिवस त्या आईवडिलांसह अपंगांचा कार्यक्रम पाहण्यासाठी अपंगांच्या वसतिगृहात गेल्या. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी वसतिगृहातील दिव्यांग विद्यार्थ्यांची चर्चा केली. त्यांच्या समोर अनेक समस्या असतानासुद्धा ते हसतखेळत त्याला सामोरे जात होते. तिथूनच रेणुकाच्या जीवनाला वेगळी कलाटणी मिळाली. त्यानंतर दिव्यांगासाठी व निर्धार, गोरगरीब महिलांसाठी काही तरी करण्याचा संकल्प केला. 2005 मध्ये "विरजा अपंग उत्थान संस्था‘ स्थापन केली. या संस्थेचे सुरुवातीला 25 सदस्य होते. पुढे त्यांनी दिव्यांगाना रोजगार देऊन आत्मनिर्भर होण्याचे धडे दिले. रोटी कव्हर तयार करणे, मेणबत्ती तयार करणे अशा छोट्या छोट्या कामांचे प्रशिक्षण दिले. गरीब आणि निर्धार महिलांना गृहउपयोगी वस्तू तयार करण्याचे काम मिळवून दिले. त्यामुळे शेकडो महिला आणि दिव्यांगाना रोजगार मिळाला. त्यांचे काम त्यांनी जिल्ह्यापुरतेच मर्यादित ठेवले नाही. तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत त्यांनी शाखा उघडून त्यामाध्यमातून महिला आणि दिव्यांगांना रोजगारासाठी मार्गदर्शन केले. 
============================================
एनआयए अधिकाऱ्याची हत्या नातेवाईकाकडूनच
लखनौ- एनआयए अधिकारी तंजिल अहमद यांची हत्या एका नातेवाईकानेच केल्याचे तपासात आज (शुक्रवार) उघड झाले आहे. 

गुप्तचर विभागांनी दिलेल्या माहितीमुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी रेहान मोहम्मदला गुरुवारी (ता. 7) अटक केली होती. रेहान हा तंझील यांच्या मेव्हण्याचा पुतण्या आहे. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, ‘अहमद संपत्तीत वाटा मिळावा यासाठी बहिणीच्या पतीचा वापर करत होते. माझ्या वडिलांसह भावांचा ते अपमान करत होते. शिवाय, अजोबांचाही एकदा अपमान केला होता. आपल्या कुटुंबाचा वारंवार होत असलेला अपमान व छळवणूक केलेल्या रागातून अहमद यांची हत्या केली. 

दरम्यान, इंडियन मुजाहिदीनशी संबंध असलेल्या प्रकरणाचा तपास करणारे तंजिल अहमद यांची तीन एप्रिल रोजी मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार करत हत्या केली होती. तंजिल हे उत्तर प्रदेशातील बिजनौर शहराजवळ एक विवाह सोहळा आटोपून घरी परतत होते. या गोळीबारात त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. अतिरिक्त महासंचालकांनी काल म्हटले की, हत्येमागे एखादे वैयक्तिक कारण असू शकते. तसेच काही पुराव्याच्या आधारे लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल, अशी आशा व्यक्त केली होती.
============================================
उंडेगावात साकारले एक कोटी लिटरचे तळे
रामेश्वर - येथून जवळच असलेल्या उंडेगाव (ता. हिंगोली) परिसरात दुष्काळावर मात करण्याच्या हेतूने पाच शेतकऱ्यांनी एकत्र येत, एक कोटी लिटरचा पाणीसाठा करणारे शेततळे निर्माण केले आहे. विशेष म्हणजे यात दोन महिला शेतकऱ्यांचाही समावेश आहे. या पाचजणांनी दाखविलेले हे कर्तृत्व परिसरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय बनले आहे. 

"ऍग्रोवन‘ची साथ मोलाची... 
शेतकरी सुभाष वैद्य हे "ऍग्रोवनचे वाचक आहेत. 2010 पासूनचे "ऍग्रोवन‘चे अंक त्यांच्या संग्रही आहेत. "ऍग्रोवन‘मध्ये आलेल्या लेखाची प्रेरणा घेऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सोबत घेत हा प्रयोग केल्याचे ते अभिमानाने सांगतात. 

उंडेगाव येथील शेतकरी सौमित्रा सुभाष वैद्य, प्रकाश वैद्य, संताबाई वैद्य, विलास वैद्य, दिलीप वैद्य यांनी एकत्र येऊन शेततळी घ्यायचे ठरवले; मात्र अशा प्रकारचे शेततळे मोठ्या आकाराचे असल्याने इतरांना सोबत घेत मोठे नियोजन केले. त्यानंतर या शेतकऱ्यांनी कृषी खात्याकडे संपर्क साधून शेततळे घेण्यासाठी अनुदानाची मागणी केली. त्यानुसार कृषी खात्याने त्यासाठी तीन लाख 39 हजार रुपये अनुदान उपलब्ध करून दिले. उर्वरित खर्च शेतकऱ्यांनी केला. दुष्काळातील परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतातमध्येच संरक्षित पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने हे काम करण्यात आले. तसेच शेततळे घेतल्यानंतर त्यातील पाणी जमिनीत मुरून जाऊ नये म्हणून पॉलिथिन टाकण्याचे ठरले. तसेच बाष्पीभवनाने पाणी नष्ट होऊ नये, म्हणून तळ्याच्या वरच्या बाजूने झाकण टाकण्याचे नियोजन केले. मागील महिन्यात या तळ्याचे बांधकाम शेतकऱ्यांनी केली. सौमित्रा सुभाष वैद्य यांच्या शेतातील अर्धा एकर क्षेत्रात 34 बाय 24 मीटरवर शेततळे घेण्यात आले. जवळपास एक कोटी लिटर पाणी त्यात जमा होणार आहे. या शेततळ्यात ते मासेपालन व्यवसाय करणार आहेत. तसेच शेततळ्याच्या आधारावर पन्नास एकर शेती बागायती होणार आहे. एक कोटी लिटर पाणी या पाचही शेतकऱ्यांच्या शेतीला ठिबकने पुरविले जाणार आहे. एका वेळी दहा लाख लिटर पाणी ठिबकने अंदाजे पन्नास एकर शेतीला सोडले तर हळदीसारखे बागायतीचे पीक घेता येऊ शकते, अशी त्यामागची त्यांची संकल्पना आहे. 
============================================
वादग्रस्त कारकिर्दीमुळे आंधळकर नेहमीच चर्चेत
लोणी काळभोर - विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या संदर्भातील अपशब्द असो अथवा शिरूर पोलिस ठाण्यातील पारध्याची हत्या, तर कधी गुप्तधनासाठीचे उत्खनन असो वा दौंड तालुक्‍यातील एका दूध डेअरीवरील छापा, अशा अनेक प्रकरणांमुळे जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली. 

आंधळकर हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्‍यातील रहिवाशी. पोलिस खात्याची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून राजकारणात जम बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला नाही. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील वाळू व्यावसायिकांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांचे जोमाने प्रयत्न सुरू होते. त्यातूनच त्यांनी पोलिसांच्या विरोधातच चिथावणीखोर वक्तव्य केल्याने त्यांच्याविरोधात फेब्रुवारी महिन्यात यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 
त्यांच्या पाठीमागे सोलापूरमधील एका नेत्याचा वरदहस्त कायम राहिल्याने नोकरीच्या काळात त्यांनी कशाचीही पर्वा न करता मनमानी पद्धतीने कारभार केल्याची तक्रार त्यांच्याविरोधात सातत्याने केली गेली. 

वडगाव मावळ येथे पोलिस निरीक्षक म्हणून काम केल्यानंतर, 2006 मध्ये गुन्हे शाखेची जबाबदारी त्यांच्याकडे आली. नियमाप्रमाणे येथून तीन वर्षांत बदली होणे अपेक्षित असताना, त्यांनी कधी "मॅट‘ तर कधी राजकीय नेत्यांशी संधान ठेवत, वेगवेगळ्या क्‍लृप्त्या वापरून साडेपाच वर्षे गुन्हे शाखा ताब्यात ठेवली. 2006 पासूनच त्यांनी मोहरा मावळातील वादग्रस्त जमीन व्यवहारांकडे वळवला होता. जमीन प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडेच सोपविण्याचा वादग्रस्त आदेश तेव्हा काढण्यात आला होता. 
============================================
पाकमध्ये दहशतवाद्यांचे सरकार- सुब्रमण्यम
नवी दिल्ली - पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्या वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पाकिस्तानमधील तथाकथित लोकशाही सरकार बनावट असल्याचे म्हणत तेथे लष्कर आणि दहशतवाद्यांचे सरकार असल्याची टीका केली आहे. 



भारताबरोबरील शांतता प्रक्रिया तूर्त स्थगित असल्याचे वक्तव्य बासित यांनी गुरूवारी केले होते. तसेच पठाणकोट प्रकरणाचा तपास करण्यासाठी भारतीय तपास पथकाला पाकिस्तान दौऱ्याची परवानगी देण्याची शक्‍यताही साफ फेटाळून लावली होती. या पार्श्‍वभूमीवर बोलताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, ‘आपल्याला जे जगाला दाखवावेसे वाटते ते आपण पाकिस्तानच्या सरकारला दाखवतो ही गोष्ट बाब आहे. पाकिस्तानमधील तथाकथित सरकार हे बनावट असून ते त्यांचा शब्द पाळत नाहीत. नेहमीच काहीतरी पळवाटा शोधतात. त्यांचे संयुक्त तपास पथक भारतात आले. त्यांना भारताकडे सबळ पुरावे असल्याचे समजले.‘ तसेच ‘पाकिस्तानला आपण सहकार्य करण्याची तयारी दर्शवित आहोत मात्र तेथील सरकार हे लष्कराचे आणि दहशतवाद्यांचे असल्याचे आपण आता दाखवून द्यायला हवे, असे माझे मत आहे‘, असेही स्वामी म्हणाले.
============================================
भारताला उद्दिष्ट्यांचा विसर: मोहन भागवत
नागपूर - "भारतासोबतच मागे-पुढे इस्त्रायल आणि चीन स्वतंत्र झाले. स्वातंत्र्यानंतर आपण उद्दिष्ट्य विसरून बसलो आणि इस्त्रायल व चीन संघर्ष करून उद्दिष्ट्यावर वाटचाल करीत राहिले. परिणामी आज हे दोन्ही देश भारतापेक्षा प्रगत आहेत,‘ असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.

पुण्यातील सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित वनवासी कृषी ग्रामविकास कार्यकर्त्यांच्या त्रैवार्षिक संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला सरसंघचालक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ट्रस्टचे प्रमुख य.गो. घैसास आणि स्मिता घैसास व्यासपीठावर उपस्थित होते. 

डॉ. भागवत म्हणाले: ‘बरेचदा निःस्वार्थ काम करण्याच्या धुंदीत आपण ते का करतोय, याचा विसर पडतो. स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारतालाही आपले उद्दिष्ट्य माहिती होते. पण, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उद्दिष्ट्यांचा विसर पडला. त्याचवेळी स्वतंत्र झालेल्या इस्त्रायलने संघर्ष करून वाळवंटाचे नंदनवन केले. चीनने गरिबीवर मात करून जागतिक बाजारपेठेवर वर्चस्व प्राप्त केले. ते समृद्ध झाले असे म्हणणार नाही, पण, त्यांची पुढे जाण्याची इच्छा आहे, हे निश्चित. भारताने काहीच प्रगती केली नाही, असेही नाही. थोडेफार आपणही पुढे आहोत. मात्र काही केले नसते तरी एवढी प्रगती झालीच असती.’ स्वातंत्र्यानंतर सत्तेत आलेल्या सर्वच सरकारची चांगली-वाईट चर्चा झाली. पण, या देशाचा भाग्यविधाता येथील सर्वसामान्य माणूस आहे. तो देशभक्त असला पाहिजे. त्यानेच देशाची सेवा करायची आहे‘.  
============================================
गोदामाईचे रामकुंड 140 वर्षांनंतर कोरडेठाक
पंचवटी - सिंहस्थ कुंभमेळानगरी नाशिकच्या जगण्याचा श्‍वास असलेल्या गोदावरीचे रामकुंड 140 वर्षांनंतर कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या कालावधीमधील आज (ता. 8)च्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांना येथे तीर्थस्नान करता येणार नाही. गोदावरीच्या कोरड्या पडलेल्या पात्रामधील पूर्वीच्या सीताकुंड आणि शाहीस्नान पर्वणी सोहळ्यापूर्वी एक झालेल्या रामकुंडात सकाळपासून मुले क्रिकेट खेळतानाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. 

गंगापूर धरणात 27 टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे धरणातून गोदावरीमधील विसर्ग बंद आहे. त्यातून गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडल्याने पिढ्यान्‌पिढ्या पौरोहित्य करणाऱ्यांसह तीर्थक्षेत्रावर अवलंबून असलेल्या पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांतील ज्येष्ठांनी हळहळ व्यक्त केली. सिंहस्थ कुंभमेळ्याचा समारोप 11 ऑगस्ट 2016 ला होणार आहे. तत्पूर्वी उन्हाळ्याच्या सुटीत धार्मिक विधीसाठी येणाऱ्या पर्यटकांची रीघ नाशिकमध्ये लागणार आहे. अशा भाविकांची निराशा होणार आहे. गोदापात्रात पाण्याचा ठणठणाट झाल्याने व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. एका ज्येष्ठांनी "आईचं असं रूप 72 च्या भीषण दुष्काळातही पाहिलं नव्हतं‘ अशी खंत व्यक्त केली. 

दुष्काळात 1972 मध्ये पाण्यापेक्षाही अन्नधान्याची भीषण टंचाई होती. या वेळच्या दुष्काळात अन्नधान्याचा तुटवडा नसला, तरीही पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईने घसा कोरडा पडला आहे. 1956 मध्ये गोदावरी नदीवर गंगापूरच्या वरील बाजूस धरण बांधण्यात आले. मात्र त्याआधी म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात गोदावरीच्या पात्रात दगडी कुंडांचे बांधकाम करण्यात आले होते. हे करताना नदीपात्राच्या तळाशी कॉंक्रिटीकरण केले नव्हते. त्यामुळे अनेक जिवंत झरे गोदेच्या पात्रातच उगम पावत तिला सतत प्रवाही ठेवत असत. याशिवाय नदीपात्रात ठराविक अंतरासाठी स्वतंत्र कुंड बांधण्यात आले होते. नाशिक महापालिकेच्या स्थापनेनंतर आलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर गोदावरीच्या पात्रात अहिल्यादेवी होळकर पूल ते टाळकुटेश्‍वर मंदिर परिसरापर्यंत संपूर्ण कॉंक्रिटीकरण करण्यात आले. कॉंक्रिटीकरणामुळे नदीपात्रातील नैसर्गिक झरे गडप झाले. 
============================================

इंग्लंडमधली रतन टाटांची टाटा स्टील कंपनी चौकशीच्या फे-यात

  • ऑनलाइन लोकमत
    इंग्लंड, दि. ८- रतन टाटांची इंग्लंडमधली कंपनी टाटा स्टीलची स्थानिक पोलीस चौकशी करत आहेत. टाटा स्टीलचे कर्मचारी स्टीलच्या उत्पादनात भेसळ करून  बनावट प्रमाणपत्र देत असल्याचा इंग्लंडच्या पोलिसांनी आरोप केला आहे. या प्रकरणाची इंग्लंडचे पोलीस अधिकारी अधिक तपास करत असल्याचं वृत्त डेली मेल या वर्तमानपत्रानं दिलं आहे. 500 ग्राहकांशी लागेबांधे असलेल्या टाटा स्टीलच्या जवळपास 9 कामगारांना या भेसळप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे.
    त्यामुळे बीएई आणि रोल्स रॉयस या कंपन्या प्रभावित झाल्या आहेत. मात्र या प्रकरणाची चौकशी साध्या पद्धतीनं करणं अपेक्षित असतानाही गुन्हेगारी पार्श्वभूमीनुसार या कंपनीतल्या कामगारांची चौकशी केली जाते आहे. मुंबईत झालेल्या एका बैठकीत रतन टाटांनी इंग्लंडमधला टाटा स्टीलचा सर्व व्यवसाय विकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं होतं. इंग्लंडमधल्या टाटा स्टील कंपनीतल्या कारखान्यात हजारो लोक जोखमीवर नोकरी करत आहेत. कंपनीच्या मते उत्पादनाच्या किमतीमुळे कंपनी मोठ्या प्रमाणात तोटा सहन करत आहे. चीनशी स्पर्धा असल्यानं मोठ्या प्रमाणात स्टीलचा जागतिक बाजारात पुरवठा करावा लागतो आहे.
    टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटांनीही कंपनीत गुंतवणूक कमी आणि माणसे जास्त असल्याचं मान्य केलं आहे. इंग्लंडमध्ये टाटा स्टील कंपनीतल्या कारखान्यातल्या जवळपास 1 हजार लोकांना नोकरी गमवावी लागली आहे. तर तालबोटमधल्या 750 जणांनी नोकरी सोडावी लागली आहे. ऑक्टोबर 2015ला जवळपास 1200 कामगारांना नोकरी गमवावी लागली आहे. त्याचवेळी रेडकारमधला स्टीलचा कारखाना बंद करावा लागला आहे. प्रसिद्ध उद्योगपती संजीव गुप्तांनीही टाटा स्टीलनं  यातून बाहेर पडण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तर टाटा कंपनीचे बिझनेस सेक्रेटरी साजिद जावेद यांनी टाटा स्टील विकण्याच्या विचारत असल्याचं प्रतिपादन केलं आहे.
============================================

No comments: