Monday, 4 April 2016

नमस्कार लाईव्ह ०४-०४-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
1- ब्रसेल्स विमानतळ १२ दिवसांनंतर सुरू 
2- इस्लामाबाद; भारतीय ‘हेरा’वरून इराण-पाक तणाव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
3- पनामा पेपर्स लीक, ब्लॅकमनी साठवण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश 
4- .. तर लाखो डोकी धडावेगळी झाली असती : रामदेव बाबा 
5- नागपूर; संविधानाला हात लावू देणार नाही! - कॉंग्रेस  
6- भारतात आता जीएसटी (वस्तू व सेवाकर) लागू होणार - पंतप्रधान 
7- भारतात लवकरच व्यवसायपूरक वातावरण- मोदी  
8- भय्याजी जोशींवर सरकारने कारवाई करावी-कॉंग्रेस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
9- श्रीनगर; मेहबूबा मुफ्ती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान 
10- दुष्काळी भागात दारूबंदी करा : नाना पाटेकर  
11- ‘भारतमाता की जय’वरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न - फडणवीस 
12- परिस्थिती बदला, अन्यथा उद्रेक होईल- पवार 
13- "महाराष्ट्र मॉडेल' गुजरातपेक्षा सरस- मुख्यमंत्री 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
14- मुंबईत भरधाव कारने एकाच कुटुंबातील चौघांना उडवलं, 5 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू  
15- कोल्हापुरात पाण्याच्या टँकरवरुन दोन गटात तलवार हल्ला 
16- लातुरात भीषण पाणी टंचाई, पाण्याच्या टाक्यांना पोलीस संरक्षण 
17- अहमदाबाद; गुजरातमधील शाळेत अर्जावर 'भारत माता की जय' लिहिलं तरच प्रवेश 
18- तमिळनाडुत काँग्रेस लढणार 41 जागांवर 
19- प. बंगाल, आसाममध्ये आज मतदान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
20- कोलकाता; विंडिजच्या विजयानंतर सॅम्युअल्सच्या डोक्यात हवा 
21- डॅशिंग कोहली टी ट्वेण्टी विश्वचषकाचा मालिकावीर 
22- कोहलीने दिलेली जर्सी आणि ब्रॅथवेटचे सलग चार षटकार ! 
23- ट्वेण्टी 20 विश्वचषकावर 'बेस्ट' इंडिजने कोरलं नाव 
24- इस्ट या वेस्ट, महिला-पुरुष- अंडर 19 मध्ये वेस्ट इंडिज बेस्ट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
25- राज्य शासनाने मंजूर केलेला 'आकृतिबंध' चार महिन्यापासून पडून 
26- शहराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ; पारा - ४३.५ ंC
27- कंधार; तब्बल ५२ वर्षानंतर बारूळचे मानार धारण कोरडे 
28- देगलूर; छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे पाच शारीरिक विकलांग व्यक्तींना तीनचाकी सायकलींचे वाटप 
29- किनवट; वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले तीन महिन्यांपासून 
30- मयत नागनाथ बगल यांच्या कुटुंबियांना आ. हेमंत पाटील यांच्याकडून एक लाखांची मदत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
सय्यद उमर, श्रीपाद देव, जितु वाघोले, विजय शिंदे, श्रीकांत मांजरमकर, शिवाजी शिंदे, रुपेश बाळके, इंद्रजीत पांचाळ, चंद्रकांत पाटील, शरद पाटील, केदार पाटील, सह्फिक सय्यद, विलाश बराटे, शिवानंद मठपती, रुशिकेत मस्के, शेखर चावंड, विनोद पाटील, अरविंद खोबे, नाझीं क़्वाझी, विनोद जाधव, किरण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो
(विक्रम चव्हाण, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


============================================

पनामा पेपर्स लीक, ब्लॅकमनी साठवण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश

पनामा पेपर्स लीक, ब्लॅकमनी साठवण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश
नवी दिल्ली जगभरातल्या पत्रकारांनी मिळून पनामा पेपर्स या नावाने ब्लॅकमनी साठवण्याच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. पत्रकारितेच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट मानला जातोय. पनामा पेपर्स या नावाने हा गौप्यस्फोट आज जगातील सर्वात मुख्य चर्चेचा विषय आहे.
जगभरातील अतीश्रीमंत सत्ताधीश, राजकारणी आणि उद्योगपती यांनी आपला ब्लॅकमनी कसा परदेशी पाठवला आहे, याचा खुलासा या पनामा पेपर्समधून करण्यात आलाय. जगभरातील हुकूमशहा आणि सत्ताधीशांच्या यादीत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचंही नाव आहे. त्याशिवाय युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक, लिबियाचे मोहम्मद गडाफी, सिरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांचा समावेश आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचे कुटुंबीय, आईसलँडचे पंतप्रधान तसंच सौदी अरेबियाचे राजे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या काळ्या पैशाबाबत पनामा पेपर्समध्ये उल्लेख आहे. 
============================================

विंडिजच्या विजयानंतर सॅम्युअल्सच्या डोक्यात हवा

विंडिजच्या विजयानंतर सॅम्युअल्सच्या डोक्यात हवा
कोलकाता : डॅरेन सॅमीच्या वेस्ट इंडीज संघानं इंग्लंडला चार विकेट्सनी हरवून, ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकावर दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं. या सामन्यात मार्लन सॅम्युअल्स सामनावीर ठरला. त्याने 66 चेंडूत नाबाद 85 धावा करत विंडिजच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 
मात्र याच विजयाची हवा सॅम्युअल्सच्या डोक्यात गेल्याचं दिसून आला. विंडिजचे खेळाडू आपला विजय अनोख्या पद्धतीने साजरा करतात हे जगाला माहित आहे. मात्र सॅम्युअल्सने त्यापुढे मजल मारली.
या सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सॅम्युअल्स पूर्णवेळ टेबलावर पाय ठेवूनच बसला होता. त्यानं प्रश्नांना उत्तरंही तशीच दिली. सॅम्युअल्सच्या या वर्तनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निंदा होत आहे. 
विजयाचं सेलिब्रेशन व्हायलाच हवं, पण या विजयाचं उन्मादात रुपांतर होता कामा नये, अशी भावना क्रिकेट वर्तुळात व्यक्त होत आहे.
============================================

मेहबूबा मुफ्ती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

मेहबूबा मुफ्ती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान
श्रीनगर जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी मेहबूबा मुफ्ती विराजमान झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी आज शपथ घेतली.  राज्यपाल व्ही. एन. व्होरा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. 
गेल्यावर्षी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुफ्ती महंमद सईद यांच्या पुढाकारानं भाजप आणि पीडीपीची युती झाली. मात्र, मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर सत्ता स्थापनेला जवळपास तीन महिने विलंब झाला. 
त्यामुळं भाजप आणि पीडीपीचे सरकार पुन्हा एकत्र येणार की नाही? याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, मेहबूबा यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन राज्यात दोन्ही पक्षाची सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
============================================

डॅशिंग कोहली टी ट्वेण्टी विश्वचषकाचा मालिकावीर

डॅशिंग कोहली टी ट्वेण्टी विश्वचषकाचा मालिकावीर
कोलकाता: भारताचा डॅशिंग फलंदाज विराट कोहली यंदाच्या ट्वेन्टी20 विश्वचषकाचा मालिकावीर ठरला. 
विराटनं यंदाच्या विश्वचषकात पाच सामन्यांमध्ये 136.50च्या सरासरीनं 273 धावांचा रतीब घातला. विराटनं यादरम्यान तीन अर्धशतकंही ठोकली. इतकंच नाही, तर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध सामन्यांत विराट सामनावीरही ठरला होता. 
टीम इंडियाला ट्वेन्टी20 विश्वचषकाची फायनल गाठण्यात अपयश आलं असलं, तरी या स्पर्धेवर विराटनं आपली छाप पाडली. 
विराटने मॅचविनिंग खेळी करत, भारताला सेमीफायनलपर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. या स्पर्धेतील विराटच्या खेळी पाहून जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्याचं कौतुक केलं.
============================================

कोहलीने दिलेली जर्सी आणि ब्रॅथवेटचे सलग चार षटकार !

कोहलीने दिलेली जर्सी आणि ब्रॅथवेटचे सलग चार षटकार !
कोलकाता :  कार्लोस ब्रॅथवेट… हे नाव आता ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या इतिहासात अजरामर झालं आहे. ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या अंतिम षटकात वेस्ट इंडीजला विजयासाठी 19 धावा हव्या असताना, याच कार्लोस ब्रॅथवेटनं बेन स्टोक्सच्या सलग चार चेंडूंवर चार षटकार ठोकले आणि वेस्ट इंडीजला दुसऱ्यांदा ट्वेन्टी20 विश्वचषक जिंकून दिला. 
याआधी विंडीजनं 2012 साली ट्वेन्टी ट्वेन्टीचा विश्वचषक जिंकला होता. 
ब्रॅथवेटने विंडिजला गरज असताना सलग चार षटकार ठोकले. मात्र हाच ब्रॅथवेट भारताचा डॅशिंग फलंदाज विराट कोहलीचा खूप मोठा फॅन आहे. 
सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजने भारतावर विजय मिळवून फायनलमध्ये धडक मारली होती. या सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी विंडिज खेळाडूंचं त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन अभिनंदन केलं होतं. 
यावेळी विराट कोहलीने त्याची जर्सी ब्रेथवेटला भेट दिली. इतकंच नाही तर कोहलीने त्यावर स्वाक्षरीही केली होती. 
विराटने ख्रिस गेल आणि ब्रेथवेटसोबत सेल्फी घेतला. तर ब्रेथवेटने विराटसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. शिवाय वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रुममध्ये आल्याबद्दल ब्रेथवेटने विराटचे आभार मानले. शिवाय सेल्फीसाठी आभार मानत विराट लिजंड असल्याचं म्हटलं होतं.
============================================

ट्वेण्टी 20 विश्वचषकावर 'बेस्ट' इंडिजने कोरलं नाव

ट्वेण्टी 20 विश्वचषकावर 'बेस्ट' इंडिजने कोरलं नाव
कोलकाता : ट्वेण्टी 20 विश्वचषक 2016 वर कॅरेबियन टीम वेस्ट इंडीजने नाव कोरलं आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात इंग्लंडवर 4 विकेट्स राखून विंडीजने विजय मिळवला. टी 20 विश्वचषक दुसऱ्यांदा उंचावण्याचा मान वेस्ट इंडिजला मिळाला आहे. ब्रॅथवेटने शेवटच्या षटकामध्ये सलग 4 षटकार ठोकून विजेतेपद खेचून आणलं. 

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियवर झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडनं वेस्ट इंडीजला 156 धावांचं आव्हान दिलं होतं. अखेरच्या षटकात विंडीजला विजयासाठी 19 धावांची गरज होती. पण कार्लोस ब्रॅथवेटनं बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार ठोकून विंडीजला यादगार विजय मिळवून दिला. 

खरं तर विंडीजचे जॉन्सन चार्ल्स, ख्रिस गेल आणि लेण्डल सिमन्स हे खंदे शिलेदार स्वस्तात माघारी परतले होते. पण मार्लन सॅम्युअल्सनं 66 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 85 धावांची खेळी करून विंडीजला विजय मिळवून दिला. ड्वेन ब्राव्होनंही 27 चेंडूंत 25 धावांची खेळी करून विंडीजच्या विजयाला हातभार लावला. 
या विजयाबरोबरच वेस्ट इंडीज हा ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकणारा पहिलाच संघ ठरला. याआधी 2012 साली विंडीजला टी 20 चं विश्वविजेतेपद मिळालं होतं.
============================================

इस्ट या वेस्ट, महिला-पुरुष- अंडर 19 मध्ये वेस्ट इंडिज बेस्ट

इस्ट या वेस्ट, महिला-पुरुष- अंडर 19 मध्ये वेस्ट इंडिज बेस्ट
मुंबई : क्रिकेटच्या दुनियेत सध्या एकच नाद घुमत आहे. वेस्ट इंडिज चॅम्पियन.. वेस्ट इंडिजच्या महिला आणि पुरुष क्रिकेट संघांनी ट्वेन्टी20 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. कोलकात्यात डॅरेन सॅमीच्या टीमचा विजय, हे वेस्ट इंडीजचं यंदाच्या वर्षातलं तिसरं विश्वचषक विजेतेपद ठरलं. 
महिला आणि पुरुषांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकांबरोबरच विंडीजने यंदा अंडर-19 विश्वचषकही जिंकला होता. टी 20 विश्वचषक दुसऱ्यांदा उंचावण्याचा मान वेस्ट इंडिजला मिळाला आहे. या विजयाबरोबरच वेस्ट इंडीज हा ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकणारा पहिलाच संघ ठरला. याआधी 2012 साली विंडीजला टी 20 चं विश्वविजेतेपद मिळालं होतं. 
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात इंग्लंडवर 4 विकेट्स राखून विंडीजने विजय मिळवला. ब्रॅथवेटने शेवटच्या षटकामध्ये सलग 4 षटकार ठोकून विजेतेपद खेचून आणलं.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियवर झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडनं वेस्ट इंडीजला 156 धावांचं आव्हान दिलं होतं. अखेरच्या षटकात विंडीजला विजयासाठी 19 धावांची गरज होती. पण कार्लोस ब्रॅथवेटनं बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार ठोकून विंडीजला यादगार विजय मिळवून दिला.
============================================

वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाला टी 20 विश्वचषकाचं जेतेपद

वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाला टी 20 विश्वचषकाचं जेतेपद
विंडीजच्या महिलांचा हा क्रिकेटमधला पहिलाच विश्वचषक विजय ठरला आहे.
कोलकाता : वेस्ट इंडिजच्या महिला संघाने तीनवेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला. विंडीजच्या महिलांचा हा क्रिकेटमधला पहिलाच विश्वचषक विजय ठरला आहे.

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या अंतिम सामन्या ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडिजला विजयासाठी 149 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना कर्णधार स्टेफानी टेलरनं हेली मॅथ्यूजच्या साथीनं 120 धावांची सलामी दिली.

हेली मॅथ्यूजनं 45 चेंडूंमध्य सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 66 धावांची खेळी केली. तर स्टेफानी टेलरनं 57 चेंडूंत सहबा चौकारांसह 59 धावांची खेळी रचून कॅरिबियन टीमचा विजय निश्चित केला. त्यानंतर डिअँड्रा डॉटी आणि ब्रिटनी कूपरनं विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

एलिस विलानी आणि मेग लॅनिंगच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 20 षटकांत पाच बाद 148 धावांची मजल मारली होती. सदर्न स्टार्स नावानं ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला टीमचा वेस्ट इंडीजकडून हा पहिलाच पराभव ठरला. याआधीच्या आठ सामन्यात ऑस्ट्रेलियाने विंडीजला
लोळवलं होतं.

ईडन गार्डनवर वेस्ट इंडीजच्या महिला संघाने ऑस्ट्रेलियावर पहिला वहिला विजय साजरा करत प्रथमच टी 20 विश्वचषक उंचावण्याचा मानही पटकवला.
============================================

मुंबईत भरधाव कारने एकाच कुटुंबातील चौघांना उडवलं, 5 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

मुंबईत भरधाव कारने एकाच कुटुंबातील चौघांना उडवलं, 5 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
मुंबई मुंबईतल्या ओशिवारा भागात रात्री कारच्या धडकेत पाच वर्षाच्या चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागला. अपघात मृत्यू झालेल्या मुलाचं नाव संदीप कोळेकर असं आहे.पल्या आजी, आजोबा आणि आईसह आनंदनगरच्या रस्त्यावरुन घरी परतत होता. त्यावेळी रात्री साडेदहाच्या सुमारास रस्ता क्रॉस ओलांडत असताना एका चारचाकी कारनं या कुटुंबाला जोरात धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यात पाच वर्षांचा संदीप दूर फेकला गेला.जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सरू आहेत. मात्र, संदीपला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या अपघाताप्रकरणी कारचालक इंद्रजित मरोल याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कारच्या अतिवेगानं हा अपघात झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
============================================

कोल्हापुरात पाण्याच्या टँकरवरुन दोन गटात तलवार हल्ला

कोल्हापुरात पाण्याच्या टँकरवरुन दोन गटात तलवार हल्ला
कोल्हापूर कोल्हापुरातील बिंदू चौकात पाण्याच्या टँकरवरुन तरुणांच्या दोन गटात हाणामारी झाली आहे. यावेळी दोन गटांमध्ये झालेल्या तलवार हल्ल्यात तिघे जण जखमी झाल्याचं कळतं आहे.

कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातला पाणीसाठा कमी झाल्यामुळे महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे.

काल रात्री गंजी गल्ली परिसरात पाण्याचा टँकर आला असताना बाराईमाम आणि भोई गल्ली परिसरातल्या तरुणांमध्ये पाण्यावरुन वाद झाला. पण त्या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठांनी तो वाद मिटवला.

बाराईमाम आणि भोई गल्ली इथल्या  तरुणांच्या दोन गटांत झालेल्या तलवार हल्ल्यात तिघेजण जखमी झाले. दोन्ही बाजूंच्या तरुणांनी परिसरात प्रचंड दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलिसांची फौज घटनास्थळी आल्याने हल्लेखोर पसार झाले.

त्यानंतर दोन्ही गटांचे तरुण बिंदू चौकात जमा झाले. यावेळी काही तरुणांनी एकमेकांवर तलवारीने हल्ला केला. ज्यात तिघे जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

या हाणामारीत तौसिफ आरिफ मोमीन, झाकीर सय्यद मोमीन, हाकिब मुसा सौदागर हे तरुण जखमी झाले आहेत. जखमींना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
============================================

लातुरात भीषण पाणी टंचाई, पाण्याच्या टाक्यांना पोलीस संरक्षण

लातुरात भीषण पाणी टंचाई, पाण्याच्या टाक्यांना पोलीस संरक्षण
लातूर लातुरात पाण्यासाठी टाकीवर टँकरसाठी होणारे तंटे लक्षात घेता, पाण्याच्या टाकीच्या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. एका कॉन्स्टेबलसह 6 होमगार्ड पाण्याच्या टाकीजवळ तैनात करण्यात आले आहेत.

एरवी मोठमोठ्या गुन्ह्याचा तपास करणारे तसंच मोठ्या मंत्र्यांच्या सुरक्षेची जाबाबदारी पार पाडणारे हे पोलिस सध्या पाण्याला सुरक्षा देत आहेत. लातुरात पाण्यासाठी होणाऱ्या संघर्षात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
latur water custody5
पाण्यासाठी चिडलेल्या लोकांनी याआधीच पाण्याच्या टाकीवर चढून आपला रोष व्यक्त केला होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरात कलम 144 लागू केलं होतं.. या कलमाची मुदत 1 एप्रील रोजी संपल्यानं पाण्याच्या टाकीवर जाऊन गोंधळ घालण्याचा प्रकार वाढला होता. त्यामुळे वाद टाळण्यासाठी हा बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तर लातुरातीला नागरिकांनी घरातील पाण्याच्या टाक्यांना टाळं ठोकलं आहे. लातूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न किती गंभीर झाला आहे, हे या सर्व प्रकारातून दिसून येतं आहे.
============================================

.. तर लाखो डोकी धडावेगळी झाली असती : रामदेव बाबा

... तर लाखो डोकी धडावेगळी झाली असती : रामदेव बाबा
नवी दिल्ली : ‘भारत माता की जय’ या घोषणेवरुन सुरु झालेला वाद अजूनही सुरुच आहे. योगगुरु रामदेव बाबांनीही आता यात उडी घेतली आहे. ‘काही लोक म्हणतात की डोकं उडवलं तरी भारत माता की जय म्हणणार नाही, मात्र त्यांना माहिती नाही, कायद्याचे हात बांधलेले नसते, तर लाखो शीर
आतापर्यंत धडावेगळी झाली असती’ असं वक्तव्य रामदेवबाबांनी केलं आहे. 
‘जो धर्म भारत माता की जय बोलणं योग्य मानत नाही, तो धर्म देशास हितावह नाही’ असं मत रामदेव बाबांनी हरियाणाच्या रोहतकमधील सभेमध्ये व्यक्त केलं. विशेष म्हणजे सामाजिक एकता प्रस्थापित करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. देशभक्तीचं उदाहरण देत
ओवेसींवर निशाणा साधताना ते स्वतःच वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
============================================

ओशिवारामध्ये कारने दिलेल्या धडकेत ५ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. ४ - ओशिवारा परिसरात कारने दिलेल्या धडकेत 5 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. संदीप कोळेकर असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. कुटुंबियांसोबत रस्ता ओलांडत असताना कारने दिलेल्या धडकेत संदीप कोळेकरचा मृत्यू झाला आहे. अपघात झाला तेव्हा संदीप कोळेकरसोबत त्याची आजी, आजोबा आणि आईदेखील होते. 
    संदीप कोळेकर कुटुंबियांसोबत आनंदनगरच्या रस्त्याने घरी परतत असताना मागून येणा-या कारने या कुटुंबाला जोरदार धडक दिली. कारने दिलेल्या धडकेमुळे संदीप कोळेकर लांब फेकला गेला. संदीपला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अपघातात संदीपचे आजोबा गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी कारचालक इंद्रजित मरोल याला ताब्यात घेतलं आहे. इंद्रजित बेदरकारपणे कार चालवत असल्याने अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून चौकशी करत आहेत. 
============================================

गुजरातमधील शाळेत अर्जावर 'भारत माता की जय' लिहिलं तरच प्रवेश

  • ऑनलाइन लोकमत - 
    अहमदाबाद, दि. ४ - 'भारत माता की जय' बोलण्यावरुन देशभरात वाद-विवाद सुरु असताना गुजरातमध्ये या प्रकरणाने वेगळेच वळण घेतलं आहे. अमरेली येथील श्री पटेल विद्यार्थी आश्रम ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेने या प्रकरणात विद्यार्थ्यांना खेचल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. ज्या विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे त्यांना अर्जावर 'भारत माता की जय' लिहावं लागणार आहे अन्यथा त्यांना प्रवेश मिळणार नाही असं सांगण्यात आलं आहे. भाजपा नेता दिलीप संघानी हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. 
    अमरेलीमध्ये श्री पटेल विद्यार्थी आश्रम ट्रस्टचे संस्थेचं प्राथमिक विद्यालिय, दोन हायस्कूल आणि कॉलेज आहे. सध्या या संस्थेत 4500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रविवारी झालेल्या संस्थेच्या बैठकीत हा अजब निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात येण्यासाठी दिलीप संघानी यांनी हा निर्णय घेतला गेल्याचा आरोप इतर पक्षातील राजकीय नेते करत आहे. दिलीप संघानी यांना याबाबत विचारले असता 104 वर्ष जुन्या संस्थेकडून विद्यार्थ्यांना देशभक्तीची प्रेरणा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. 
    'सध्या जेव्हा शैक्षणिक कॅम्पसमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या जात आहेत त्यावेळी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांनी देशाचा आदर करावा अशी अपेक्षा करतो. त्यामुळे आम्ही अर्जावर 'भारत माता की जय' लिहिणा-यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्यसैनिक मोहन वीरजी पटेल यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. अशाप्रकारचा देशभक्तीचा वारसा असणा-या या संस्थेची विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत करणे जबाबदारी आहे. येणा-या टर्मसाठी हा नियम लागू असणार आहे. जे विद्यार्थी अर्जावर 'भारत माता की जय' लिहिणार नाहीत त्यांना प्रवेश मिळणार नाही', असं दिलीप संघानी यांनी सांगितलं आहे. 
    राज्यशिक्षण मंत्री भुपेंद्रसिंग चुडासमा यांनी अशाप्रकारे कोणीही जबरदस्ती करु शकत नसल्याचं म्हंटलं आहे. हा एका संस्थेचा वैयक्तिक निर्णय आहे. याचा भाजपाशी काही संबंध नाही. भारत माता की जय म्हणणं ही चांगली गोष्ट आहे मात्र त्याची सक्ती केली जाऊ शकत नाही. मला याप्रकरणी कोणतीच तक्रार आलेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हक्कांचं उल्लंघन झालं आहे क नाही ? असं  भुपेंद्रसिंग चुडासमा बोलले आहेत.
============================================

संविधानाला हात लावू देणार नाही! - कॉंग्रेस 

  • कमलेश वानखेडे,  नागपूर
    भारतीय संविधान, आरक्षण, दलित- मागासवर्गीयांवर होणारे हल्ले आदी मुद्यांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. यासाठी काँग्रेसने ‘एक शपथ... संविधानाला हात लावू देणार नाही!’ अशी आक्रमक ‘थीम’ तयार केली असून ११ एप्रिल रोजी कस्तुरचंद पार्कवर आयोजित सभेत सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या भाषणाचा रोख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना कोणत्याही परिस्थितीत बदलू देणार नाही, असाच असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
    सत्तास्थापनेनंतर भाजपा नेत्यांनी केलेली वादग्रस्त वक्तवे, सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाची समीक्षा करण्याबाबत केलेले वक्तव्य याचे पडसाद बिहारच्या निवडणूक निकालात उमटले आणि भाजपाला मोठा पराभव पत्करावा लागला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आरक्षण लागू राहील, असे स्पष्ट केले. पण हा वाद शांत होत नाही तोच रोहित वेमुला प्रकरण समोर आले. यावरून देशभरातील दलित संघटना आक्रमक झाल्या. आरक्षण, राज्यघटना या मुद्यांवर भाजपा, संघ परिवार ‘बॅकफूट’वर गेला असल्याचा अंदाज काँग्रेसने बांधला आहे. ही संधी साधत दुरावलेल्या दलित समाजाला पुन्हा आपलेसे करण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. सत्तेपासून दूर गेल्यानंतर काँग्रेसने १९९९-२००० साली देशभर संविधान बचाव रॅली काढल्या. या रॅलीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार कमबॅक’ केले होते. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या माध्यमातून काँग्रेसने पुन्हा एकदा तशीच तयारी चालविली आहे.
============================================

दुष्काळी भागात दारूबंदी करा : नाना पाटेकर 

  • मुंबई : दोन्ही पिकं गेली आहेत. पुढच्या दोन ते तीन महिन्यांचा काळ संवेदनशील आहे. पीक गेलेच आहे, आता पाणीही नाही. त्यामुळे दु:खात असताना आम्हाला (शेतकऱ्यांना) दारू जवळ करावीशी वाटते. त्या नशेत बैलाच्या गळ्यातला कासरा शेतकरी गळ्याला लावतो, हे होऊ द्यायचे नसेल तर मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात तीन महिन्यांसाठी दारूबंदी जाहीर करा. थोडा महसूल बुडेल. पण अनेक शेतकऱ्यांचे जीव वाचतील, असे भावनिक आवाहन नानांनी केले तेव्हा अवघे सभागृह गदगदून गेले.
    अणेंना नानांचा टोला
    विदर्भ आणि मराठवाड्याच्या भूमिकेमुळे चर्चेत आलेले माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांना नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणातून कोपरखळी मारली. ‘अणे, विदर्भ माझा, खान्देश माझा आणि बिहारसुद्धा माझाच आहे. तुमचे वक्तव्य चूक की बरोबर, गैर आहे की नाही याची मीमांसा मला करायची नाही. माझा एक हात-पाय तोडला तर मी जिवंत कसा राहू शकतो? आपण सगळ्यांनी एकत्र राहू या.’ नानांच्या या वाक्यावर सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. ‘नानां’साठी सर्वाधिक मते : ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर अ‍ॅवॉर्ड’ पुरस्कारासाठी ‘नटसम्राट’ चित्रपटासाठी नाना पाटेकर यांचे नामांकन होते. पुरस्कारासाठी आॅनलाइन मतदान होते. ८० नामांकनांमध्ये सर्वाधिक मते नानांना मिळाली.आमच्या पोलिसांना घरे कधी मिळतील, असा सवाल नानांनी मुख्यमंत्र्यांना केला तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, ‘नाना, तुम्ही माझ्या मनातील प्रश्न विचारलात, या वर्षी पोलिसांच्या २९ हजार घरांचे नियोजन केले आहे. पोलिसांना हक्काचे, कायमस्वरूपी घर मिळण्याकरिता जे विकासक पोलिसांना घरे देतील, त्यांना अधिक चटईक्षेत्र निर्देशांक देत असल्याचे स्पष्ट केले.’ यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.
============================================

‘भारतमाता की जय’वरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

  • मुंबई : आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात ४५ मिनिटे राज्यातील दुष्काळ आणि विकास कामांबद्दल बोललो. तर
    अवघी ५ मिनिटे ‘भारतमाता की जय’ आणि शनी शिंगणापूर वादाबद्दल मत मांडले. मात्र माध्यमांनी सोयीस्करपणे केवळ ‘भारतमाता की जय’बाबतचा काही भाग उचलून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
    नाशिक येथील जाहीरसभेत शनिवारी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्र्यानी टिष्ट्वटरच्या माध्यमातून खुलासा केला. ‘भारतमाता की जय’च्या वक्तव्यावरून माध्यमातील काही घटक विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. या घोषणेचा आणि धर्माचा काही एक संबंध नाही. १७ मार्च रोजी माहीम येथील दर्ग्यात पाचशेहून अधिक मौलवींनी तिरंगा फडकाविला आणि भारतमाता की जयच्या घोषणा दिल्या. हजरत मकदूम फतेह अली माहिमींच्या ६०३व्या उरूसात मान्यवर मौलवींनी केलेल्या या ध्वजारोहणाबद्दल अभिमान वाटतो आणि त्यांना आम्ही सलाम करतो, असेही आपण भाषणात म्हटले होते. मात्र हा सारा भाग माध्यमांनी वगळल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.
    ‘भारतमाता की जय’ ही निव्वळ एखादी घोषणा नाही; हीच घोषणा देत लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्ययुद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली. आजही हजारो जवान याचा घोष करत स्वत:चे सर्वस्व देशासाठी अर्पण करतात, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कोणी ‘जय हिंद’ म्हणो अथवा ‘जय भारत’ किंवा ‘जय हिंदुस्थान’ म्हणो, कोणती घोषणा दिली जाते हा अजिबात वादाचा मुद्दा नाही. मात्र जर कोणी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नसेल, म्हणणार नाही अशी भूमिका घेत असेल तर त्याला माझा तीव्र आक्षेप आहे. लांगुलचालनालाही काही मर्यादा घालावी लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.
    ‘भारतमाता की जय’ला विरोध करणाऱ्यांचा हेतू शुद्ध नाही. समाजात दुही माजवायची आहे, समाजात तेढ निर्माण करायची आहे, अशीच मंडळी घोषणेच्या नावाखाली वाद निर्माण करीत आहेत आणि कोणत्याही स्थितीत अशा लोकांकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे मुख्यमत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
============================================

मोदी म्हणाले, जीएसटी लवकरच

  • रियाध (सौदी अरेबिया) : भारतात आता जीएसटी (वस्तू व सेवाकर) लागू होणार आहे. त्यामुळे पूर्वलक्षी प्रभावाचा कर आता इतिहासजमा होणार आहे, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदीच्या दौऱ्यादरम्यान येथे दिले. उद्योगांसाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्याचा शब्द देत त्यांनी गुंतवणूकदारांना भारतात येण्याचे आवाहनही केले.
    सौदीतील कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व भारतीय उद्योग व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधींच्या बैठकीला संबोधित करताना मोदी बोलत होते. मोदी यांनी सौदीतील उद्योगपतींना भारतात रेल्वे, संरक्षण आणि ऊर्जा यासारख्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. मोदी म्हणाले की, देशात आता एकसमान अप्रत्यक्ष कर व्यवस्था जीएसटी लागू होणार आहे. ते म्हणाले की, जीएसटीबाबत काळजी करण्याची आवश्यकता नाही. जीएसटी लवकरच प्रत्यक्षात येईल. मी आपणाला निश्चित वेळ, काळ सांगू शकत नाही, पण जीएसटी लागू होणार हे मात्र निश्चित. पूर्वलक्षी प्रभावाचा कर आता इतिहासजमा झाला आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, मागील सरकारच्या काळातील प्रलंबित कायदेशीर प्रकरणाबाबत मात्र आपण सध्या काही करू शकत नाही. प्रलंबित प्रकरणांबाबत मोदींनी कुणाचे नाव घेतले नाही; पण असे दोन प्रकरणे वोडाफोन आणि केयर्स यांच्याशी संबंधित आहेत. जीएसटीचे विधेयक सध्या राज्यसभेत प्रलंबित आहे. या सभागृहात सत्तारूढ सरकारचे बहुमत नाही. लोकसभेने हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलेले आहे. दरम्यान, विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी टिष्ट्वट केले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी सौदी अरामकोचे अध्यक्ष खालीद ए अल- फलीह यांच्यासोबत ऊर्जा व आरोग्य क्षेत्रातील मुद्यांवर चर्चा केली. सौदीचे विदेशमंत्री अदेल अल जुबेर यांनीही मोदींसोबत चर्चा केली.
============================================

ब्रसेल्स विमानतळ १२ दिवसांनंतर सुरू

  • ब्रसेल्स : ‘इसिस’ने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर गेले १२ दिवस बंद असलेले ब्रसेल्सचे विमानतळ रविवारी अंशत: सुरू करण्यात आले. त्यानंतर अथेन्स, ट्युरिन आणि फेरो येथे तीन विमाने रवाना झाली.
    अर्थात हे विमानतळ ‘सांकेतिकरीत्या’ खुले करण्यात आले असून, प्रवाशांची कडक झडती घेतली जात आहे. २२ मार्च रोजी दोन इसमांनी आत्मघातकी बॉम्बस्फोट घडविला होता. तेव्हापासून हे विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. त्याच दिवशी मेट्रो स्टेशनवरही बॉम्बस्फोट झाला होता. या दोन्ही हल्ल्यात एकूण ३२ जण ठार आणि अन्य ३०० जण जखमी झाले होते.
============================================

भारतीय ‘हेरा’वरून इराण-पाक तणाव

  • इस्लामाबाद : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात पकडण्यात कथित भारतीय ‘हेरा’चा संबंध येथील माध्यमांनी इराणशी जोडल्याने इराण सरकार संतप्त झाले आहे. अशा वृत्तामुळे उभय देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधावर ‘नकारात्मक परिणाम’ होईल, असा इशारा इराणने पाकिस्तानला दिला आहे.
    अटक करण्यात आलेले कथित भारतीय हेर कुलभूषण जाधव इराणमध्ये व्यवसाय करीत होते. त्यामुळे त्यांच्या कारवायांना इराणचे समर्थन असल्याचा संकेत देणारे वृत्तान्त येथील प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर इराणने हा इशारा दिला आहे. त्यानंतर पाकिस्तान सरकारनेही आपल्या माध्यमांना यावर वार्तांकन करताना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अलिखान म्हणाले की, इराण आणि पाकिस्तान यांच्यात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध आहेत.
============================================

No comments: