Sunday, 10 April 2016

नमस्कार लाईव्ह १०-०४-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- युनोत प्रथमच आंबेडकर जयंती साजरी होणार 
२- न्यूयॉर्क; भारतासह अमेरिकेचा जागतिक अजेंडा 
३- भारत-पाक मतभेद दूर करण्यास संयुक्त राष्ट्रे तयार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- औषध घोटाळा : औषध खरेदीत 297 कोटींचा अपहार, युती सरकारवर आरोप 
५- केरळच्या पुत्तिंगल देवीच्या मंदिरात अग्नितांडव, 102 लोकांचा मृत्यू 
६- सातव्या वेतन आयोगाने महागाईवर परिणाम 
७- बाटलीबंद पाणी व कोल्ड्रिंक कंपन्यांचा पाणीपुरवठाही बंद करा! 
८- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान 
९- नापाक पाककडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन 
१०- दिल्लीहून तिरंगा नेणारे तरुण पोलिसांच्या ताब्यात 
११- बंदरांच्या विकासासाठी 1 लाख कोटी: गडकरी 
१२- अनुपम खेर यांना श्रीनगर विमानतळावर रोखले 
१३- पुँछमध्ये पाक सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- कोल्हापूर; आघाडी सरकारचं कौतुक होत असल्यास आपण नालायक : उद्धव 
१५- गोंदियाच्या काँग्रेस आमदाराला भाजप नगरसेवकाकडून मारहाण 
१६- बुमराहची कामगिरी प्रशंसनीय : बाँड 
१७- बाबासाहेबांनी मांडली होती त्रिराज्याची संकल्पना - जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे 
१८- पत्नी,मुलांचे नाव भारतमाता की जय ठेवणार:कन्हैया 
१९- पुण्यात चार दिवसांत 134 कोटींची 'अल्प'बचत 
२०- सत्ताधारी शिवसेना विरोधकांच्या गोटात 
२१- चेन्नई; जयललितांविरोधात तृतीयपंथीयास उमेदवारी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- मुंबई; तक्रार न घेणाऱ्या पोलिसावर कारवाई 
२३- गतविजेत्या मुंबईची पुण्यासमोर शरणागती 
२४- अखंड महाराष्ट्रावर वादळी चर्चा शक्‍य 
२५- मुंबई; 91 वर्षांच्या अखंड सेवेनंतर 'डीसी' लोकलचा युगान्त 
२६- कोल्हापूर; ...आणि अग्नि देण्यापूर्वी सरणावरील महिला जिवंत झाली 
२७- चेन्नई; तमीळ मनिला कॉंग्रेसचा ‘पीडब्ल्यूएफ‘ला पाठिंबा  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- आयपीएल पदापर्णात धोनीच्या पुणे रायझिंगचा मुंबईवर विजय 
२९- प्रियदर्शिनी चॅटर्जी मिस इंडिया 2016ची विजेती 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
माधव सूर्यवंशी, विशाल रेड्डी, आनंद पाटील, धम्मदीप जोंधळे, शिवकुमार पवार, देविदास गीते, चंद्रकांत जोशी, शिवा खानसोळे, कृष्णसिंग भारद्वाज, अमर देशमुख, महेंद्र राठोड, सुनील जोगदंड, अन्वर देसाई, गोविंद अरसुळे, भास्कर खुडे, शिवाजी सूर्यवंशी, महेश ढानके 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
अडचणीच्या काळातच आपल्या तत्वाची खरी परीक्षा अडते. आपण प्रामाणिक आहोत का नाही, हे अडचण आल्याशिवाय काळात नाही
(नंदाराज ठाकरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


==========================================

औषध घोटाळा : औषध खरेदीत 297 कोटींचा अपहार, युती सरकारवर आरोप

औषध घोटाळा : औषध खरेदीत 297 कोटींचा अपहार, युती सरकारवर आरोप
मुंबई : एकीकडे चिक्की घोटाळ्याचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना, राज्यातल्या युती सरकारवर आणखी एका घोटाळ्याचा आरोप होतो आहे. राज्यात 297 कोटींच्या औषधांची मनमानी पद्धतीने खरेदी करण्यात आल्याचं कळतं आहे. 
केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानाअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने काही ठराविक औषधांसाठी निविदा मागवल्या होत्या. ज्याच्या खरेदीच्या जाहिराती मेघालय, शिलाँग, दिब्रूगड इथल्या वृत्तपत्रांमध्ये देण्यात आल्या आहेत.

काय आहे औषध घोटाळा? 

मात्र प्रत्यक्षात या भागात कोणत्याही औषध कंपन्या नसल्यामुळे प्रक्रियेत कोणी भाग घेतला, कोणाच्या निविदा मंजूर झाल्या, हे स्पष्ट होत नाही.

त्यातच काही महापालिकांना गरजेपेक्षा जास्त औषधं पाठवून खरेदी केलेला माल खपवण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती कोटींची खरेदी झाली आहे, याचा आकडा आरोग्य विभाग जाहीर करत नाही.
==========================================

केरळच्या पुत्तिंगल देवीच्या मंदिरात अग्नितांडव, 102 लोकांचा मृत्यू

केरळच्या पुत्तिंगल देवीच्या मंदिरात अग्नितांडव, 102 लोकांचा मृत्यू
UPDATE : केरळच्या पुत्तिंगल देवीच्या मंदिरात अग्नितांडव, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून केरळच्या दिशेने रवाना

कोल्लम : केरळमधील पुत्तिंगल देवीच्या मंदिरात घडलेल्या अग्नितांडवात 102 हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. तर 200 हून अधिक जखमी झाले आहेत.
कोल्लम जिल्ह्यातील परवुर या ठिकाणच्या पुत्तिंगल देवीच्या मंदिरात ही घटना घडली. नवरात्र उत्सवानिमित्त पहाटे पाचच्या सुमारास याठिकाणी फटाक्यांची आतषबाजी होत होती. त्यापैकी एक ठिणगी जवळच्या फटाक्यांच्या दुकानावर जाऊन पडल्यानं आग भडकली.
==========================================

91 वर्षांच्या अखंड सेवेनंतर 'डीसी' लोकलचा युगान्त

91 वर्षांच्या अखंड सेवेनंतर 'डीसी' लोकलचा युगान्त
मुंबई : तब्बल 91 वर्षांच्या सेवेनंतर डीसी विद्युतप्रवाहावर धावणाऱ्या लोकलला सन्मानानं निरोप देण्यात आला. कुर्ला स्थानकाहून काल रात्री साडेअकरा वाजता हार-फुलांनी सजवलेली डीसी लोकल अखेरचा प्रवास करण्यासाठी निघाली आणि मध्यरात्री सव्वाबारा वाजता सीएसटी स्थानकात पोहोचली.

यावेळी खासदार राहुल शेवाळे, खासदार अरविंद सांवत, मध्य रेल्वेचे व्यवस्थापक सुनीलकुमार सूद, जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या लोकलला कुर्ला  ते सीएसटीदरम्यान प्रत्येक स्थानकात मध्य रेल सांस्कृतिक अकादमीच्या सर्व कलाकारांनी वाजतगाजत अखेरचा निरोप दिला. ही लोकल जेव्हा सीएसटी स्थानकात पोहचली तेव्हा तीचं ढोल-ताशे आणि बँड वाजवून स्वागत करण्यात आलं.. या विशेष लोकलच्या प्रवासासाठी रेल्वेनं10 हजार रुपयांचं तिकीट आकारलं होतं. मात्र त्याकडं प्रवाशांनी पाठ फिरवली.
==========================================

गोंदियाच्या काँग्रेस आमदाराला भाजप नगरसेवकाकडून मारहाण

गोंदियाच्या काँग्रेस आमदाराला भाजप नगरसेवकाकडून मारहाण
कोणालाही मारहाणीचा अधिकार नाही : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार

पक्षाकडून योग्य ती कारवाई, भाजप प्रवक्ते माधव भंडारींचं आश्वासन

ही सत्तेची मस्ती, नगरसेवकाच्या हकालपट्टीची धनंजय मुंडेंची मागणी

इतरांच्या मनात धास्ती भरवणारा नियोजित हल्ला, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडेंचा दावा

कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर : विखे पाटील

राज्यातील वैमनस्य वाढत चाललंय : शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे

भाजप म्हणजे गुंडांची पार्टी, मारहाण करणं ही महाराष्ट्राची परंपरा नाही : विलास मुत्तेमवार

झालेला प्रकार तालिबानी, काँग्रेस नेते विलास मुत्तेमवारांची प्रतिक्रिया
==========================================

आयपीएल पदापर्णात धोनीच्या पुणे रायझिंगचा मुंबईवर विजय

आयपीएल पदापर्णात धोनीच्या पुणे रायझिंगचा मुंबईवर विजय
मुंबई : गतविजेत्या मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या पहिल्या सामन्यातच पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. धोनीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सने मुंबई इंडियन्सचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून आयपीएलच्या पदार्पणात विजयी सलामी दिली.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने पुण्याला विजयासाठी 122 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणेनं नाबाद अर्धशतक झळकावलं. रहाणेनं 42 चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 66 धावांची खेळी केली, तर फॅफ ड्यू प्लेसीनं 34 आणि केविन पीटरसननं नाबाद 21 धावा केल्या.

रायझिंग पुणेच्या गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सला 20 षटकांत आठ बाद 121 धावांवर रोखण्याचा पराक्रम गाजवला. हरभजन सिंग, अंबाती रायुडू आणि विनयकुमारचा अपवाद वगळता मुंबईच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या रचता आली नाही.

हरभजननं 45, रायुडूनं 22 आणि विनयकुमारनं 12 धावांची खेळी केली. रायझिंग पुणेकडून ईशांत शर्मा आणि मिचेल मार्शनं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या.
==========================================

आघाडी सरकारचं कौतुक होत असल्यास आपण नालायक : उद्धव

आघाडी सरकारचं कौतुक होत असल्यास आपण नालायक : उद्धव
कोल्हापूर : ‘राज्यात युतीचं सरकार आल्यानंतरही जर काँग्रेस-राष्ट्रवादीचं नाव निघत असेल तर आपल्याला नालायक म्हणण्याशिवाय दुसरा शब्द नाही’, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दुष्काळाच्या मुद्द्यावरुन भाजप नेत्यांना सुनावलं आहे.

कोल्हापुरात उद्धव ठाकरेंच्या हस्ते माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं, त्यावेळी त्यांनी भाजपला कानपिचक्या दिल्या. ‘सध्या महाराष्ट्रात भीषण स्थिती आहे.

मराठवाडा-विदर्भात पाण्याचा ऐतिहासिक तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जोवर महाराष्ट्रातील दुष्काळ दूर होत नाही, तोवर सत्ताधारी आणि विरोधकांनी बाकीचा वाद बाजूला ठेऊन एकत्रितपणे काम करायला पाहिजे’ असंही उद्धव म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर भाजप नेते आणि सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटीलही उपस्थित होते. मराठवाड्यात गेल्या वर्षभरात हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही सरकार दुष्काळावर उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याची टीका होत आहे.
==========================================

...आणि अग्नि देण्यापूर्वी सरणावरील महिला जिवंत झाली

...आणि अग्नि देण्यापूर्वी सरणावरील महिला जिवंत झाली
कोल्हापूर : खाजगी रुग्णालयातील डॉक्टर आणि नातेवाईकांच्या हलगर्जीमुळे एका वृद्ध महिलेवर जिवंतपणीच सरणावर ठेवण्याची वेळ आली होती. मात्र अग्नी देण्यापूर्वीच ती महिला जिवंत असल्याचं समजल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

अंगावर काटा आणणारी ही घटना कोल्हापूरच्या कुत्रिडे गावात घडली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या वनिता भास्कर यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचार शक्य नसल्याचं डॉक्टरांनी वनिता यांच्या नातेवाईकांना सांगितलं.

वनिता यांना घरी नेत असताना त्यांच्या शरीराच्या हालचाली थांबल्या. त्यामुळे वनिता यांचा मृत्यू झाल्याचा समज त्यांच्या नातेवाईकांनी करुन घेतला.

वनिता यांच्या अंत्यसंस्काराची तयारी झाली. त्यांना स्मशानात सरणावरही ठेवण्यात आलं. मात्र अग्नी देण्यापूर्वी वनिता हालचाल करत असल्याचं निदर्शनास आलं. अखेर सरिता यांना सरणावरुन पुन्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सरकारी डॉक्टरांनी शर्थीचे उपचार करुन वनिता यांचे प्राण वाचवले आहेत.
==========================================

सातव्या वेतन आयोगाने महागाईवर परिणाम

  • नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीने महागाईवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या परिणाम होणार आहे. त्यातल्या त्यात घरभाडे, गृहनिर्माण आणि वाहतूक क्षेत्रावर त्याचा सर्वाधिक परिणाम होणार असून, शासकीय कर्मचाऱ्यांची खर्च करण्याची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
    गेल्या मंगळवारी रिझर्व्ह बँकेने नवीन आर्थिक वर्षातील पहिले द्वैमासिक पतधोरण जाहीर केले. त्यात व्याजदरात पाव टक्का कपात केली त्यावेळीच रिझर्व्ह बँकेतर्फे सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीवर भाष्य करण्यात आले. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे महागाई १.५ टक्क्यापर्यंत वाढू शकेल. मात्र, चालू वित्तीय वर्षात सकल घरेलू उत्पादनात जवळपास ०.४ टक्का वृद्धी होण्याची शक्यता असल्याचे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा परिणाम दोन वर्षांपर्यंत दिसून येईल. यापूर्वीही हा परिणाम दोन वर्षांपर्यंत दिसून आला होता. मात्र, ताबडतोब परिणाम घरभाडे या क्षेत्रावर होईल. महागाई आणि घरभाड्यावर होणारा परिणाम त्वरित आणि सतत चालू असणारी प्रक्रिया आहे. अप्रत्यक्ष परिणाम मात्र ‘किरकोळ असेल, असे रिझर्व्ह बँक म्हणते. सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाईवर जसा परिणाम झाला होता तसा तो यावेळीही तेव्हढाच काळ दिसून येईल. सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आॅगस्ट २००८ मध्ये करण्यात आली होती. मात्र, घरभाडे भत्ता सप्टेंबर २००८ पासून मिळाला होता. त्यावेळी त्याचा परिणाम जुलै २००९ ते जानेवारी २०१० दरम्यान जास्त प्रमाणात दिसून आला होता. सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीने जेवढी महागाई वाढली होती तेवढी यावेळी वाढण्याची शक्यता नसल्याचे रिझर्व्ह बँकेचे आकलन आहे. सातव्या वेतन आयोगाचा मोठा परिणाम गृहनिर्माण क्षेत्रावरही होईल. द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील छोट्या शहरांत ८० टक्के केंद्रीय कर्मचारी राहतात. या सर्वांचेच वेतन वाढल्याने त्यांचा स्वत:चे घर घेण्याकडे कल वाढेल.
==========================================

बाटलीबंद पाणी व कोल्ड्रिंक कंपन्यांचा पाणीपुरवठाही बंद करा!

  • मुुंंबई : राज्याच्या अनेक भागांतील जनता भीषण दुष्काळ आणि भयंकर पाणीटंचाईने होरपळत असताना, मद्यनिर्मितीसाठी पाणी देऊ नये, या मागणीपाठोपाठ आता बाटलीबंद पाणी आणि कोल्ड्रिंकसाठीही पिण्याचे पाणी देऊ नये, अशी मागणी राज्यभरातून आणि विशेषत: मराठवाड्यातून सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या संघटनांनीही त्यास जोरदार पाठिंबा दिला आहे.
    मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समितीने सहा महिन्यांपूर्वीच या संदर्भात राज्यपालांची भेट घेतली होती. त्या वेळी बाटलीबंद पाण्याच्या कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. या कंपन्या वाट्टेल तसा पाण्याचा उपसा करीत असून, त्यामुळे मराठवाड्यातील लोकांना साधे पिण्याचे पाणी मिळताना अडचणी येत आहे. त्यामुळे त्या कंपन्यांवर कायमस्वरूपी नियंत्रण आणावे आणि सध्याच्या स्थितीत या, तसेच कोल्ड्रिंक कंपन्यांचे पाणी बंद करावे, अशी मागणी संघर्ष समितीचे प्रदीप पुरंदरे आणि अण्णासाहेब खंदारे यांनी केली आहे.
    हाच मुद्दा अधिक स्पष्ट करताना पाणी विषयातील तज्ज्ञ एच. एम. देसरडा म्हणाले की, ‘१ लीटर बीअर वा मद्यनिर्मितीसाठी ३0 लीटर पाणी लागते, तर १ लीटर बाटलीबंद पाणी, कोल्ड्रिंकसाठी १0 ते १२ लीटर पाणी लागते. साधे पाणी मिळत नसताना या कंपन्यांना पाणीपुरवठा करणे आणि जनतेला पाण्यापासून वंचित ठेवणे हा गुन्हाच समजायला हवा. सामान्यांना नियमितपणे पिण्याचे पाणी कायमस्वरूपी मिळेपर्यंत या कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यावर बंदी आणावी,’ अशी मागणीही त्यांनी केली.
==========================================

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान

  • मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्भय होते. त्यांनी प्रेमासह सहचाराची, मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि मानवतेचा विचार केला. बाबासाहेबांनी आयुष्यात कधीच हार मानली नाही. ते निर्भय होते. म्हणून आजही मला अडचणी आल्या किंवा समस्यांना सामोरे जावे लागले. परिस्थिती अत्यंत कठीण झाली की मी बाबासाहेबांची आठवण काढतो. त्यामुळे मला प्रेरणा मिळते. म्हणून बाबासाहेब हेच माझे प्रेरणास्थान आहेत, असे उद्गार बॉलीवूड अभिनेते आमीर खान याने काढले.
    राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या वतीने वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या ‘बाबासाहेबांच्या विचारांचा महोत्सव’ या कार्यक्रमात आमीर खान बोलत होता. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, नेपाळचे कॅबिनेट मंत्री विश्वेंद्र पासवान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ संगीतकार हरिहरन, संगीतकार जतीनललित, नाटयनिर्माते राहुल भंडारे, मुंबई स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चव्हाण, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
    विश्वेंद्र पासवान यांनी उपस्थितांना बाबासाहेबांची समता, बंधुता आणि न्यायाची शिकवण अंमलात आणावी, असे आवाहन केले. प्रकाश आंबेडकर यांनीही परिवर्तनाची भावना कृतीत आणण्यासह पुस्तकातील बाबासाहेब माहिती करून घ्या, असे आवाहन केले. शिवाय रोहित वेमुला याची आई येत्या १४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता आंबेडकर भवन येथे बौद्ध धर्माची दिक्षा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. हर्षदीप कांबळे यांनी पुढील पंचवीस वर्षे आमची समिती विद्यार्थ्यांच्या आणि उद्योजकांच्या मदतीसाठी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असल्याचे नमुद केले. दरम्यान, यावेळी गायक अभिजित कोसंबी, गायिका रैना अग्नी, तबलानवाज मुकेश जाधव आणि श्याम जावडा या कलाकारांनी आपआपली कला सादर करत रसिकप्रेक्षकांचे तब्बल पाच तास मनोरंजन केले. शिवाय यावेळी कलाकार राजेश ढावरे यांच्या ‘द ट्रू सन आॅफ इंडिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या अल्बमचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
==========================================

तक्रार न घेणाऱ्या पोलिसावर कारवाई

  • मुंबई : कालिना येथे एका तरुणीला झालेली मारहाण आणि विनयभंगप्रकरणी तक्रार दाखल करून घेण्यात दिरंगाई करणे वाकोला पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार यांना भोवले आहे. या प्रकरणी प्राथमिक चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या पवार यांची वेतनवाढ एक वर्षासाठी रोखण्यात आली आहे.
    कालिना परिसरात राहणाऱ्या एका मेकअप आर्टिस्ट तरुणीला २७ फेबु्रवारी रोजी रवी जाधव (२७) नावाच्या तरुणाने मारहाण करत तिचा विनयभंग केला होता. त्याबाबत ती पोलिसांकडे तक्रार देण्यास गेली असता तत्कालीन ड्युटी अधिकारी पवार यांनी निव्वळ अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल करून तिला परत पाठविले होते. हे प्रकरण वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर या प्रकरणी मारहाण आणि विनयभंगाची एफआयआर दाखल करून घेण्यात आली आणि जाधवला अटक करण्यात आले. सहायक निरीक्षक यांच्या हलगर्जीपणाबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सहायक आयुक्तांनी संबंधितांचे जबाब घेऊन अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. पवार यांनी तरुणीची भाषा समजत नसल्याने तिचा विनयभंगदेखील झाला, ही बाब मला समजली नाही, असा जबाब दिला होता. दरम्यान, मी पवार यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे समाधानी आहे. मात्र माझ्यावर हल्ला करणाऱ्या इसमाला कडक शिक्षा व्हावी, अशी माझी इच्छा आहे जेणेकरून त्याने पुन्हा असा काही प्रकार अन्य कोणासोबत करू नये, असे या प्रकरणातील पीडित तरुणीने ‘लोकमत’ला सांगितले. 
==========================================

नापाक पाककडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन

  • ऑनलाइन लोकमत
    जम्मू-काश्मीर, दि. १०- श्रीनगरमधल्या पुँछ जिल्ह्यात शनिवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर गोळीबार करत पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं आहे.  पुँछ जिल्ह्यातील शहापूर सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती यावेळी लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतीय जवानांनीही पाकिस्तानच्या या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
    पाकिस्तानी सैन्याकडून पहाटे साडेचारपर्यंत गोळीबार सुरू होता. पाक सैन्याने मॉर्टर्सचाही वापर केला. या गोळीबारात एकही भारतीय जवान जखमी झाला नसल्याची माहिती मिळत आहे. पाक सैन्याने हा गोळीबार घुसखोरीसाठी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.
==========================================

प्रियदर्शिनी चॅटर्जी मिस इंडिया 2016ची विजेती

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. १०- जगाच्या सौंदर्यात भर टाकणा-या एफबीबी फेमिना मिस इंडिया 2016चा किताब प्रियदर्शिनी चॅटर्जीनं पटकावला आहे. 9 एप्रिलला यश राज स्टुडिओमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी प्रियदर्शिनी चॅटर्जीला मिस इंडिया 2016 घोषित करण्यात आलं आहे. मिस इंडिया हा किताब पटकावलेल्या प्रियदर्शिनी चॅटर्जी मिस वर्ल्ड 2016ला भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. यावेळी पंखुरी गिडवानी हिला रनर या कॅटगरीत एफबीबी फेमिना मिस इंडिया 2016चं दुसरं पारितोषिक मिळालं आहे. तर सुश्रूती क्रिष्णा हिला रनर अप कॅटेगरीत पहिला पारितोषिक मिळालं आहे. मात्र प्रियदर्शिनी चॅटर्जी यावेळी मिस इंडिया 2016ची विजेती ठरली आहे. या कार्यक्रमाला दिग्गज बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती.
==========================================

बुमराहची कामगिरी प्रशंसनीय : बाँड

  • मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँड याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यावर स्तुतिसुमनांची उधळण केली आहे. जसप्रीत बुमराह याची ट्वेंटी-२0 मधील कामगिरीची प्रशंसा व्हायला हवी, असे त्याने सांगितले.
    बाँड म्हणाला, ‘बुमराह गेल्या वर्षी गुडघेदुखीनंतर सामना खेळण्यास आला होता. त्यामुळे तो त्याची सर्वोत्तम कामगिरी करू शकला नव्हता; परंतु गतवर्षी त्याच्यात झालेल्या बदलासाठी त्याच्या मेहनतीला श्रेय मिळायला हवे. तो असा खेळाडू आहे की, जो नेहमीच पुढे जात आहे. त्याने ज्याप्रमाणे ट्वेंटी-२0 मध्ये भारतासाठी गोलंदाजी केली ती सर्वोत्तम आहे.’
    बाँडने खेळाच्या बदलत्या स्वरूपातील फलंदाजीविषयी म्हटले, खेळात आता खूप टेक्निक आले आहे व विशेषत: खेळाच्या विश्लेषणात. त्यामुळे फलंदाज सामन्यात कोठे आणि केव्हा प्रहार करील, तसेच कोणत्या फलंदाजाविरुद्ध तुम्ही कोणत्या गोलंदाजाचा उपयोग होईल याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. तसेच अनेक बाबी आहेत ज्या जिंकण्याची संधी मिळवून देतात. शेवटी गोलंदाजाला दबावाच्या स्थितीतून जावे लागते आणि योग्य ठिकाणी गोलंदाजी करावी लागते.
==========================================

दिल्लीहून तिरंगा नेणारे तरुण पोलिसांच्या ताब्यात

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. १० - दिल्लीतून तिरंगा घेऊन निघालेल्या जवळपास दीडशे तरुणांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी लखनपूर इथून ताब्यात घेतलं आहे. श्रीनगरमधील एनआयटीतील विद्यार्थ्यांवर तिरंगा फडकाविल्याबद्दल लाठीमार झाल्यानंतर दिल्लीतल्या तरुणांनी हा प्रकार केला. दिल्लीहून सुमारे 150 तरुण शनिवारी तिरंगा घेऊन श्रीनगरकडे रवाना झाले होते. परंतु त्यांना श्रीनगरला पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
     एनआयटीत पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. श्रीनगर एनआयटीतील परिस्थिती आणखी चिघळू नये, यासाठी या तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली आहे. एनआयटीतील बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांच्या निषेधार्थ तिरंगा फडकाविला होता. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला होता.
    या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. 12 राज्यांतून येऊन दिल्लीतून हे तरुण तिरंगा घेऊन येथे जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
==========================================

युनोत प्रथमच आंबेडकर जयंती साजरी होणार

  • संयुक्त राष्ट्रे : भारतीय घटनेचे शिल्पकार आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्त राष्ट्रात प्रथमच साजरी केली जाणार आहे. त्यात ‘टिकाऊ विकास आणि सामाजिक असमता’ या विषयावर एक पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली आहे.
    संयुक्त राष्ट्रात भारताच्या ‘स्थायी मिशन कल्पना सरोज फाऊण्डेशन आणि फाऊण्डेशन फॉर ह्युमन होराईजन’च्या सहकार्याने आंबेडकर जयंतीच्या एक दिवस अगोदर १३ एप्रिल रोजी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाईल.
    यानिमित्ताने तेथे ‘टिकाऊ विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सामाजिक असमानतेविरुद्ध लढाई’ या विषयावर एक पॅनल चर्चा आयोजित करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्रात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. (वृत्तसंस्था)
    भारतीय आपल्या ‘राष्ट्रीय प्रेरणास्रोतांची १२५ वी जयंती साजरी करीत असून, ते कोट्यवधी भारतीय व जगभरातील समानता व सामाजिक न्यायाच्या समर्थकांसाठी प्रेरणा बनले आहेत, असे भारतीय मिशनतर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. या पत्रकात पुढे म्हटले आहे की, २०३० पर्यंत गरिबी, सामाजिक आणि आर्थिक असमानता संपुष्टात आणण्याचा निर्धार संयुक्त राष्ट्रांनी केला आहे.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टीही याच उद्दिष्टांवर होती. संयुक्त राष्ट्रांनी केलेला ठराव आणि डॉ. आंबेडकर यांचे उद्दिष्ट एकच आहे. हा एक अभूतपूर्व योगायोग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १९९० मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी किताब देऊन सन्मानित करण्यात आले होते.
==========================================

भारतासह अमेरिकेचा जागतिक अजेंडा

  • न्यूयॉर्क : अमेरिकेचे संरक्षमंत्री अ‍ॅश्टन कार्टर भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत असून, ते भारतासह अमेरिकेचा जागतिक अजेंडा असल्याचे आणि त्यात सर्व मुद्दे असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानाशी असलेले अमेरिकेचे संबंध मात्र दहशतवाद आणि आणि अफगाणिस्तानशी निगडित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
    अमेरिकेच्या दृष्टीने भारत व पाक यांच्यात कोणतेही अंतर नाही, असेही कार्टर यांनी स्पष्ट केले आहे. एका वरिष्ठ अमेरिकी थिंक टँक कौन्सिल फॉर फॉरेन रिलेशनमध्ये भारत-अमेरिकेसंबंधांचा पाकवरील परिणाम विचारण्यात आला होता. त्यात ते म्हणाले की, पाक महत्त्वपूर्ण सुरक्षा भागीदार आहे. दहशतवाद हा सर्वात प्रभावी मुद्दा आहे. या महत्त्वाच्या मुद्दावरच पाकसोबत काम करीत आलो आहोत.
==========================================

भारत-पाक मतभेद दूर करण्यास संयुक्त राष्ट्रे तयार

  • संयुक्त राष्ट्रे : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी आपण मदत करण्यास तयार आहोत, असे संयुक्त राष्ट्र सरचिटणीस बान की मून यांनी स्पष्ट केले आहे; मात्र अशा प्रकारची मदत हवी की नाही, हे दोन्ही देशांनाच ठरवावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
    भारतासोबतची शांतता प्रक्रिया ‘निलंबित’ केल्याची घोषणा गेल्या गुरुवारी पाकिस्तानने केली. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांतर्फे हा प्रस्ताव आला आहे. बान यांचे प्रवक्ता स्तेफाने दुयारिच यांनी पत्रकारांना सांगितले की, जेव्हा सदस्य देशांत मतभेद होतात तेव्हा कर्तव्य म्हणून सरचिटणीस मदतीचा प्रस्ताव मांडतात; पण हा प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे त्या दोन देशांवर अवलंबून आहे.
    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांतता प्रक्रिया पुन्हा ‘बाधित’ झाली आहे या स्थितीत सरचिटणीस मदत करणार काय? असे विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले. 
==========================================

बंदरांच्या विकासासाठी 1 लाख कोटी: गडकरी

नवी दिल्ली - देशातील बंदरांच्या आधुनिकीकरणासाठी येत्या 26 मेपर्यंत 60 हजार कोटी रुपये किंमतीची विविध कंत्राटे केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज (रविवार) दिली. 

"जहाज बांधणी क्षेत्रामध्ये 40 हजार कोटींच्या विकासकामांस याआधीच प्रारंभ झाला आहे. 26 मेच्या आतमध्ये आणखी 60 हजार कोटी किंमतीच्या कंत्राटांना परवानगी देण्यात येईल. देशातील बंदराच्या संपूर्ण आधुनिकीकरणाची मोहिम सरकारतर्फे हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून बंदर व जहाज बांधणी क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत 83,361 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे,‘‘ असे गडकरी म्हणाले. 

साडेसात हजार किमी लांबीचा प्रदीर्घ सागरीकिनारा लाभलेल्या भारतामधील बंदरांचा विकास "सागरमाला‘ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत करण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये एकूण 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन त्याद्वारे सुमारे 1 कोटी रोजगार निर्माण होतील, असा आशावाद व्यक्‍त करण्यात आला आहे.

==========================================
बाबासाहेबांनी मांडली होती त्रिराज्याची संकल्पना
नागपूर - महाराष्ट्रात वेगळ्या विदर्भ राज्यावरून वाद सुरू आहेत. डॉ. आंबेडकर यांनी महाराष्ट्रात त्रिराज्याची योजना संकल्पना मांडली होती. त्रिराज्याचा नकाशाही तयार केला होता. औरंगाबादेतील मिलिंद महाविद्यालयात ते त्रिराज्याचा नकाशा समजावून सांगत होते, असे परखड मत आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार तसेच जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांनी व्यक्त केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्काराने अस्मितादर्शकार डॉ. गंगाधर पानतावणे यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांच्या हस्ते शनिवारी सन्मानित करण्यात आले. आंबेडकरराइट मूव्हमेंट ऑफ कल्चर ऍण्ड लिटरेचर संस्थेतर्फे विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात सोहळा पार पडला. 

डॉ. पानतावणे म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी त्रिराज्य योजनेत पूर्व महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि पश्‍चिम महाराष्ट्र अशी विभागणी केली होती. आजच्या महाराष्ट्र व विदर्भवाद्यांनी बाबासाहेबांच्या या संकल्पनेचा कवडीचा अभ्यास न करता वाद-विवाद करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. 

कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम म्हणाले, 21 वे शतक आंबेडकरी चळवळीचे आहे. प्रत्येकाला बाबासाहेबांच्या विचारांचा आधार घ्यावा लागत आहे. प्रा. अशोक गोडघाटे यांनी 60 वर्षांच्या चळवळीचा आलेख नजरेसमोर उभा केला. दादाकांत धनविजय यांनी प्रास्ताविक केले. पल्लवी वहाणे यांनी मानपत्राचे वाचन केले. छाया खोब्रागडे यांनी अभिवादन गीत सादर केले. सचिव डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांनी संचालन केले. राजन वाघमारे यांनी आभार मानले. आयोजनाकरिता महेंद्र गायकवाड, राजन वाघमारे, डॉ. सविता कांबळे, डॉ. सुरेश वर्धे, प्रा. सुदेश भोवते, सुधीर भगत, निर्गुणशा ठमके, मुक्ताक्षर गायकवाड व प्रवीण भुयारकर यांनी सहकार्य केले.
==========================================
अनुपम खेर यांना श्रीनगर विमानतळावर रोखले
श्रीनगर - श्रीनगर एनआयटीमधील विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले अभिनेते अनुपम खेर यांनी पोलिसांनी विमानतळावरच रोखले व त्यांना कॅम्पसमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. 

अनुपम खेर यांनी श्रीनगरला दाखल होण्यापूर्वी येथील विद्यार्थ्यांना नैतिक समर्थन देण्याची गरज असल्याचे म्हटले होते. तसेच एक भारतीय नागरिकाच्या नात्याने येथील विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी श्रीनगरला जात असल्याचे सांगितले होते. आज सकाळी अनुपम खेर श्रीनगर विमानतळावर दाखल होताच काश्मीर पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांना एनआयटी कॅम्पसमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

ट्वेंटी-20 विश्वकरंडकात भारताचा वेस्टइंडीजकडून पराभव झाल्यानंतर काश्मीरी विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला होता. याला बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांनी विरोध केल्याने वाद झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांनी तिरंगा फडकावत राष्ट्रगीत गायले होते. त्यावेळी झालेल्या वादानंतर पोलिसांनी बिगर काश्मिरी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला होता. त्यामुळे येथील परिस्थिती तणावग्रस्त बनली आहे. 
==========================================
तिरंगा घेऊन जाणारे तरुण पोलिसांकडून ताब्यात
नवी दिल्ली - दिल्लीतून तिरंगा घेऊन निघालेल्या सुमारे दीडशे तरुणांना जम्मू काश्मीर पोलिसांनी लखनपूर येथे ताब्यात घेतले आहे. 

श्रीनगरमधील एनआयटीतील विद्यार्थ्यांवर तिरंगा फडकाविल्याबद्दल लाठीमार झाल्यानंतर दिल्लीहून सुमारे 150 तरुण शनिवारी तिरंगा घेऊन श्रीनगरकडे रवाना झाले होते. मात्र, त्यांना श्रीनगरला पोहचण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एनआयटीला छावणीचे स्वरुप असून, याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त आहे. येथील परिस्थिती आणखी बिघडू नये, यासाठी या तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

एनआयटीतील बिगर काश्मीरी विद्यार्थ्यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांच्या निषेधार्थ तिरंगा फडकाविला होता. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला होता. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. 12 राज्यांतून हे तरुण तिरंगा घेऊन येथे जात होते.
==========================================
पुँछमध्ये पाक सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
श्रीनगर - जम्मूतील पुँछ जिल्ह्यात शनिवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुँछ जिल्ह्यातील शहापूर सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंद गोळीबार केला. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी सैन्याकडून पहाटे साडेचारपर्यंत गोळीबार सुरु होता. पाक सैन्याने मॉर्टर्सचाही वापर केला. या गोळीबारात एकही भारतीय जवान जखमी झालेला नाही.

पाक सैन्याने हा गोळीबार घुसखोरीसाठी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात शोधमोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता असून, याठिकाणी गोळीबाराची घटना घडलेली नाही. 
==========================================
पत्नी,मुलांचे नाव भारतमाता की जय ठेवणार:कन्हैया
नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैया कुमारने आपण आपल्या पत्नी व मुलांची नावे भारतमाता की जय ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेला कन्हैया कुमार हा सध्या सध्या महिन्यांच्या अंतरिम जामीनावर कारागृहाबाहेर आहे. कन्हैयाने सध्या देशभरात चर्चेत असलेल्या भारतमाता की जय घोषणेवर वक्तव्य केले आहे. भारतमाता की जयच्या घोषणेच्या सक्तीवरून राजकारण होत असताना, आता कन्हैयानेही यात उडी घेतली आहे.

कन्हैया म्हणाला की, ते म्हणत आहेत देश आपल्यासाठी सर्वकाही आहे आणि तुम्ही भारतमाता की जय घोषणा दिल्या पाहिजेत. त्यामुळे आता मी हा निर्णय घेतला आहे, की लग्न झाल्यानंतर मी माझ्या पत्नीचे नाव बदलून भारतमाता की जय ठेवणार आहे. तसेच माझ्या मुलांचीही नावे हेच असणार आहे. याबरोबरच मी माझेही नाव भारतमाता की जय करुन घेणार आहे. यामुळे माझी मुले शाळेत गेली अन् त्यांना शिक्षकांनी पालकांची नावे विचारली तर ती भारतमाता की जय म्हणतील. त्यामुळे त्यांना मोफत शिक्षण मिळेल आणि कसलेही शुल्क भरावे लागणार नाही.
==========================================
पुण्यात चार दिवसांत 134 कोटींची 'अल्प'बचत
पुणे - एकीकडे संगणक प्रणालीतील "कनेक्‍टिव्हिटी‘ची समस्या आणि दुसरीकडे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा रेटा, अशा दुहेरी संकटाला सामोरे जाताना टपाल (पोस्ट) खात्याच्या वरिष्ठांनी राबविलेल्या वेगवान यंत्रणेमुळे मार्चअखेरीच्या शेवटच्या चार दिवसांत सजग पुणेकरांनी तब्बल 134 कोटी रुपयांची "अल्प‘बचत केली. 

व्याजदर कमी होण्यापूर्वी पोस्टात गुंतवणूक करणाऱ्यांना अडथळे येत असल्याचे वृत्त "सकाळ‘ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले व त्यावर तोडगा निघेपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला होता. मार्चअखेरीच्या चार दिवसांत झालेल्या रु. 134 कोटींच्या गुंतवणुकीपैकी मासिक उत्पन्न योजनेत (एमआयएस) सुमारे रु. 31 कोटी, मुदत ठेवींत (टीडी) रु. 15.70 कोटी, तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांत (एनएससी) रु. 10.66 कोटींची गुंतवणूक झाल्याचे टपाल खात्याच्या वरिष्ठांनी सांगितले. 
==========================================
सत्ताधारी शिवसेना विरोधकांच्या गोटात
मुंबई - वेगळ्या विदर्भावर ठाम असलेल्या भारतीय जनता पक्षाची कोंडी करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व अन्य पक्ष सरसावले आहेत. विरोधी पक्षांसह शिवसेनेनेही ‘अखंड महाराष्ट्राचा ठराव’ करण्याचा प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे दिला असून, या प्रस्तावावर विधान परिषदेत चर्चा झाली, तर भाजपची मोठी पंचाईत होणार आहे. 

दोन आठवड्यांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने अखंड महाराष्ट्राचा ठराव करण्याबाबतचा प्रस्ताव सभापतींकडे दाखल केला आहे. हा प्रस्ताव विधान परिषद नियम-२३ आणि २३-ब अन्वये चर्चेला घेण्याची मागणी या पक्षांनी केली आहे. राज्याच्या इतिहासात या नियमान्वये असा प्रस्ताव आजपर्यंत चर्चेला आला नसल्याने सभापती काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. ‘महाराष्ट्राची निर्मिती १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून; तसेच अनेक पिढ्यांच्या संघर्षातून झाली आहे. मुंबई, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासह अखंड महाराष्ट्र निरंतर कायम ठेवण्याची शिफारस ही विधान परिषद राज्य शासनामार्फत राज्यपालांकडे आणि केंद्र शासनास करत आहे’ असा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावावर शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांचे एकमत झाले असून, अधिवेशनात चर्चा होण्याबाबत येत्या सोमवारी निर्णय होण्याची शक्‍यता आहे. सदरचा प्रस्ताव चर्चेसाठी घेऊन अखंड महाराष्ट्राचा ठराव झाल्यास भाजपची कोंडी होणार आहे. विरोधकाकडून धनंजय मुंडे, सुनील तटकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, शेकापचे जयंत पाटील, कपिल पाटील आदी नेते या मुद्‌द्‌यावरून भाजपला धारेवर धरू शकतात. या ठिकाणी शिवसेना सत्तेत असली तरी या मुद्यावर त्यांनीही बाह्या सरसावल्या आहेत. डॉ. नीलम गोऱ्हे, ॲड. अनिल परब आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहेत. या चर्चेत शिवसेना मंत्र्यांची मात्र अडचण होणार आहे. शिवसेनेचे रामदास कदम आणि दिवाकर रावते आक्रमक असले तरी ते मंत्री असल्यामुळे बोलणार किंवा नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल. वास्तविक पाहता पक्ष म्हणून तेदेखील भूमिका मांडू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. 
==========================================
गतविजेत्या मुंबईची पुण्यासमोर शरणागती
मुंबई - भारत, वेस्ट इंडीज आणि इंग्लंडच्या खेळाडूंमुळे भरक्कम झालेली मुंबई इंडियन्सची फलंदाजी प्रत्यक्ष मैदानावर मात्र कोसळली आणि यंदाच्या आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या रायझिंग पुणे सुपरजायंट्‌सने नऊ विकेट राखून शानदार सलामी दिली. अजिंक्‍य रहाणेने वेगवान 66 धावांची खेळी करून पुण्याचा विजय अधिकच सोपा केला. 

टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत ज्या वानखेडे स्टेडियमवर भारताचे आव्हान संपुष्टात आले, त्याच मैदानावर धोनीच्या पुणे संघाने गोलंदाजीत कमालीची शानदार कामगिरी केली. याच स्टेडियमवर भारताच्या पराभवास कारणीभूत ठरलेला विंडीजचा लेंडल सिमन्स, भारताचा रोहित शर्मा आणि या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमकदार फलंदाजी करणारा जोस बटलर आणि तडाखेबंद हार्दिक पंड्या हे पहिले चार फलंदाज एकेरी धावांत बाद झाले, त्यामुळे 4 बाद 30 अशी अवस्था झालेल्या मुंबईचा डाव अखेरपर्यंत लंगडत राहिला. 
==========================================
अखंड महाराष्ट्रावर वादळी चर्चा शक्‍य
ठरावाचा प्रस्ताव विधान परिषदेत; भाजपची कोंडी 
मुंबई - वेगळ्या विदर्भावर ठाम असलेल्या भारतीय जनता पक्षाची कोंडी करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व अन्य पक्ष सरसावले आहेत. विरोधी पक्षांसह शिवसेनेनेही "अखंड महाराष्ट्राचा ठराव‘ करण्याचा प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे दिला असून, या प्रस्तावावर विधान परिषदेत चर्चा झाली, तर भाजपची मोठी पंचाईत होणार आहे. 

दोन आठवड्यांपूर्वी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने अखंड महाराष्ट्राचा ठराव करण्याबाबतचा प्रस्ताव सभापतींकडे दाखल केला आहे. हा प्रस्ताव विधान परिषद नियम-23 आणि 23-ब अन्वये चर्चेला घेण्याची मागणी या पक्षांनी केली आहे. राज्याच्या इतिहासात या नियमान्वये असा प्रस्ताव आजपर्यंत चर्चेला आला नसल्याने सभापती काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. "महाराष्ट्राची निर्मिती 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून; तसेच अनेक पिढ्यांच्या संघर्षातून झाली आहे. मुंबई, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासह अखंड महाराष्ट्र निरंतर कायम ठेवण्याची शिफारस ही विधान परिषद राज्य शासनामार्फत राज्यपालांकडे आणि केंद्र शासनास करत आहे‘ असा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. या प्रस्तावावर शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांचे एकमत झाले असून, अधिवेशनात चर्चा होण्याबाबत येत्या सोमवारी निर्णय होण्याची शक्‍यता आहे. सदरचा प्रस्ताव चर्चेसाठी घेऊन अखंड महाराष्ट्राचा ठराव झाल्यास भाजपची कोंडी होणार आहे. विरोधकाकडून धनंजय मुंडे, सुनील तटकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, शेकापचे जयंत पाटील, कपिल पाटील आदी नेते या मुद्‌द्‌यावरून भाजपला धारेवर धरू शकतात. या ठिकाणी शिवसेना सत्तेत असली तरी या मुद्यावर त्यांनीही बाह्या सरसावल्या आहेत. डॉ. नीलम गोऱ्हे, ऍड. अनिल परब आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहेत. या चर्चेत शिवसेना मंत्र्यांची मात्र अडचण होणार आहे. शिवसेनेचे रामदास कदम आणि दिवाकर रावते आक्रमक असले तरी ते मंत्री असल्यामुळे बोलणार किंवा नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल. वास्तविक पाहता पक्ष म्हणून तेदेखील भूमिका मांडू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
==========================================
जयललितांविरोधात तृतीयपंथीयास उमेदवारी
चेन्नई - अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्याविरोधात सी. देवी या तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. चेन्नईतील आर. के. नगर विधानसभा मतदारसंघातून सी. देवी यांना नाम तमिलर कत्ची पक्षाने उमेदवारी दिली आहे. 

तमिळनाडूतील सालेम जिल्ह्यातील सी. देवी या 2004पासून विविध सामाजिक संस्थांबरोबर काम करत आहेत. त्या जेव्हा 16 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांना आपण तृतीयपंथी असल्याचे ध्यानात आले. त्यानंतर आपल्या पालकांचा मोठा विरोध असताना ही सी. देवी यांनी लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतली. तेव्हापासून त्या तृतीयपंथी आणि वेश्‍यांच्या सबलीकरणासाठी काम करत आहेत. त्यांनी 2009मध्ये अनाथांसाठी थैमदी नावाचे अनाथालय सुरू केले असून, त्यात सध्या 60 व्यक्तींना आसरा देण्यात आला आहे.

तमिळनाडूतील सर्वसामान्य नागरिकांच्या भल्यासाठी आणि इलम तमिळसाठी मी काम करते आहे. माझ्या मतदारसंघात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन सी. देवी प्रचारादरम्यान मतदारांना देतात.

तमीळ मनिला कॉंग्रेसचा ‘पीडब्ल्यूएफ‘ला पाठिंबा 
चेन्नई - माजी केंद्रीय मंत्री जी. के. वासन यांच्या नेतृत्वाखालील तमीळ मनिला कॉंग्रेस (टीएमसी) आज पीपल्स वेलफेअर फ्रंटमध्ये (पीडब्ल्यूएफ) सहभागी झाला. विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडूत तिसरा पर्याय मतदारांसमोर ठेवण्याचा प्रयत्न "पीडब्ल्यूएफ‘कडून सुरू आहे. "टीएससी‘ला 26 जागांवर उमेदवारी दिली जाणार असल्याचे समजते. अण्णा द्रमुकबरोबर आघाडीबाबत सुरू असलेली चर्चा फिस्कटल्यानंतर "टीएमसी‘ने "पीडब्ल्यूएफ‘मध्ये सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला. 
==========================================

No comments: