[अंतरराष्ट्रीय]
१- दुबई; शेजाऱ्यांचं वाय-फाय चोरुन वापरणं इस्लामविरोधी, दुबईतील धर्मसंस्थेचा फतवा
२- लाहोर; २० वर्षांपासून पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या भारतीयाचा मृत्यू
३- लंडन; टाटाकडून ब्रिटनमधील एका पोलाद प्रकल्पाची विक्री
४- अमेरिकेच्या नौदलाचं इंडो-एशिया महासागरात 60 टक्के युद्धनौका उभ्या करण्याचं लक्ष्य
५- पाकिस्तान: पुरावा म्हणून सादर केलेल्या हँडग्रेनेडचाच कोर्टात झाला स्फोट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, स्कायमेटचा अंदाज
७- रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हे, बलिदान : राहुल गांधी
८- धोनी आम्हाला घर मिळवून दे, 'आम्रपाली'च्या ग्राहकांचा तगादा
९- भारतावर हल्ल्यासाठी इसिसचा नवा प्लॅन
१०- लातूर पाणीप्रश्नी केजरीवालांकडून मोदींचे कौतुक
११- केरळ: मंदिर अध्यक्ष, महासचिवांची शरणागती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- सोनंखरेदीला अखेर मुहूर्त सापडला, सराफा दुकानं उघडणार
१३- लातूर; ५ लाख लीटर पाणी घेऊन अखेर 'पाणी एक्सप्रेस' लातुरात दाखल
१४- वानखेडेवरील सामन्यांसाठी पवारांचा मास्टरस्ट्रोक
१५- मुंबई महापालिकेत घोटाळा; मुख्यमंत्र्यांची कबुली
१६- आठ दिवसांत राज्य रोष्टर एक - तावडे
१७- फटाक्यांवर बंदी आणण्याचा केरळ सरकारचा विचार
१८- महाराष्ट्रात एलईडी बल्ब आता 85 रुपयांत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- औरंगाबादेत ‘मुन्नाभाई’ अटकेत, परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक पद्धत
२०- नालासोपारा; कुटुंबाचा प्रेमाला विरोध, अल्पवयीन प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
२१- हैदराबाद; रिअॅलिटी शोमध्ये 'टॅलेंट' दाखवणाऱ्या तरुणाचा जळून मृत्यू
२२- ठाणे; भिवंडीतील लूम फॅक्टरीची आग नियंत्रणात
२३- 2017 पासून प्रत्येक स्मार्टफोनमध्ये हे खास बटण असणार
२४- वाशीम; नगरसेविकेच्या पतीच्या त्रासाला कंटाळून तरुण व्यापाऱ्याची आत्महत्या
२५- नाशिक; विद्यार्थिनीच्या वडिलांच्या उपचारासाठी मदत
२६- नागपूर; भावाला वाचविण्यासाठी जीव लावला पणाला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- जमशेदपूर; सेक्स स्कँडलमध्ये अडकेली अभिनेत्री लवकरच करण जोहरच्या सिनेमात
२८- हरभजन आणि गीता लवकरच गूड न्यूज देणार
२९- बंगळूरू; कोहली, गेल, डिव्हिलियर्स, वॉटसन विरुद्ध धवन, वॉर्नर, युवराज, नेहरा
३०- मोहाली; आयपीएल पदार्पणात गुजरातची विजयी सलामी, पंजाबचा धुव्वा
३१- आम्ही महाराष्ट्रीयन..! गाणे आता यूट्युबवर
३२- 'त्या' रात्री बांगलादेशचा संघ जेवला नाही - मश्रफे मोर्तझा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३४- अपंगांचा जिल्हा परिषदेत ठिय्या, प्रशासनाच्या आश्वासनावर अंध-अपंगांची तीव्र नाराजी
३५- नांदेड पॅटर्णचे आज पुन्हा दिल्लीत सादरीकरण
३६- भूमिहीन, कास्तकारांना गायरान जमीन देण्याची मागणी
३७- आंबेडकरवादी मिशनच्या 'भिमयुग' महोत्सवाला प्रारंभ
३८- पाण्यासाठी महापालिकेवर घागरमोर्चा धडकला
३९- आमदार बॅनरवर न दिसता जनतेत दिसले पाहिजे - धोंडगे
४०- नांदेड बाजार समितीवर कॉंग्रेसचाच झेंडा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
रामदास फुलवळे, संजय पवार, दिनेश अवड्के, श्याम सावंत, सुधाकर जाधव, अरविंद बेटेवाड, अनंत पांढरे, महेंद्र लाभशेटवार, मारोती कोम्पलवार, गजानन बामणे, शेख रहीम
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आधी विचार करा, मग कृती करा
(विशाल ठाकूर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
============================================

लग्नसराई आणि लोकांची मागणी लक्षात घेता दुकानं सुरु करणाऱ्या निर्णय महाराष्ट्र सराफ असोसिएशनने घेतला आहे. उद्या राज्य सरकारला प्रस्ताव देण्यात येणार आहे. सराफा दुकानं पुन्हा खुली होण्याच्या निर्णयामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान प्रस्ताव मंजूर न झाल्यास 24 तारखेपासून पुन्हा दुकानं बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोनेखरेदीचा गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकला होता, मात्र लग्नसराईच्या तोंडावर आलेल्या या निर्णयामुळे सोने खरेदीदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

आम्रपाली बिल्डर्स आणि कॅप्टन कूल माही यांचं नातं 6 वर्ष जुनं आहे. जेव्हा धोनी स्टार नव्हता, तेव्हा आम्रपाली बिल्डर्सने त्याच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला. त्यांच्या प्रत्येक नव्या प्रोजेक्टसाठी धोनीचाच चेहरा वापरण्यात येतो. मात्र याच नात्यामुळे धोनीचे हात दगडाखाली आले आहेत. आम्रपाली बिल्डरच्या आडमुठेपणामुळे जेरीस आलेल्या ग्राहकांनी ट्विटरवर धोनीविरोधातच मोहीम सुरु केली आहे.
#amrapalimisusedhoni हा ट्रेण्ड ट्विटरवर ट्रेण्डिंगमध्ये होता. नॉयडा सेक्टर 45 मधील आम्रपाली सफायर प्रोजेक्टच्या ग्राहकांनी बिल्डरविरोधात शंख फुंकला. त्यानंतर सिलिकॉन सिटी, प्लॅटिनम, झोडिअॅक सारख्या आम्रपालीच्या अन्य प्रकल्पातील ग्राहकांनीही बिल्डरविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली.
कोणी फ्लॅट देण्याचा तगादा लावला आहे, तर काही जण अर्धवट राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी मागे लागलं आहे. आम्रपाली बिल्डरसोबत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून असलेलं नातं तोडण्यासाठी धोनीवर दबाव आणला जात आहे.
दरम्यान एका पत्रकार परिषदेत धोनीला आम्रपाली बिल्डरविषयी प्रश्न विचारला असता बिल्डरसोबत या विषयावर बातचित करण्याचं आश्वासन दिलं आहे.

एका रिअॅलिटी शोमध्ये स्वतःचं टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न संबंधित तरुण करणार होता. त्यासाठी तोंडातून आगीचे लोळ काढण्याचा व्हिडिओ तयार करण्याचा त्याचा मानस होता. शूटिंगसाठी त्याने शेजारच्या काही पोरांना गोळा केलं होतं. मात्र कुठल्याही शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाशिवाय त्याने केलेला हा प्रयत्न त्याच्या चांगलाच अंगलट आला.
जलील उद्दीनने आधी स्वतःच्या तोंडात केरोसिन ओतून घेतलं. मात्र तो प्रयत्न फसल्यानंतर त्याने स्वतःच्या अंगावर केरोसिन ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं लक्षात आल्यावर आजूबाजूच्या मुलांनी पळ काढला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांदरम्यान तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे कुटुंबीयांना मुलाच्या इच्छेबाबत कोणतीही कल्पना नव्हती. मृत्यूपूर्वी जलीलने या प्रकाराला आपणच जबाबदार असल्याचं पोलिसांना लिहून दिलं आहे.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, स्कायमेटचा अंदाज
मुंबई : यंदा पाऊसमान चांगला असेल, असा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेने अंदाज वर्तवला आहे. दुष्काळ, गारपीट आणि अवकाळीमुळे बळीराजाचं कंबरडं मोडलं असताना स्कायमेटचा अंदाज नक्कीच आशादायी आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, जून महिन्यात सरासरीच्या 90 टक्के, जुलै महिन्यात 105 टक्के, ऑगस्ट महिन्यात 108 टक्के, तर सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 115 टक्के पाऊस पडणार आहे. एकूण सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे.
जूनमध्ये 164 मीमी पाऊस, जुलैमध्ये 289 मीमी, ऑगस्टमध्ये 261 मीमी, तर सप्टेंबर महिन्यात 173 मीमी पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. बळीराजाच्या दृष्टीने चांगल्या पावसाचं भाकित स्कायमेटने वर्तवलं आहे.
============================================
हरभजन आणि गीता लवकरच गूड न्यूज देणार
मुंबई : हरभजन सिंह आणि गीता बसरा यांच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल लागली आहे. हरभजन आणि गीता लवकरच आई-बाबा होणार असल्याची माहिती जवळच्या सुत्रांनी दिली आहे.
भज्जी आणि गीता यांचं लग्न मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालं होतं. आयपीएल 9 च्या उद्घाटन सोहळ्यात गीता अगदीच सैल ड्रेस परिधान करुन आली होती. त्यामुळे गीता प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगू लागली. गीता डिलिव्हरीसाठी लवकरच लंडनला जाणार आहे. लंडनमध्ये तिचे आई-वडील राहतात.
============================================
सेक्स स्कँडलमध्ये अडकेली अभिनेत्री लवकरच करण जोहरच्या सिनेमात
जमशेदपूर : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेली अभिनेत्री श्वेता प्रसाद बासू लवकरच करण जोहरच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. ‘दैनिक भास्कर’च्या वृत्तानुसार, श्वेताने करण जोहराचा नवा सिनेमा साईन केला आहे. या सिनेमात तिच्यासह आलिया भट आणि वरुण धवन यांचाही सामावेश आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल.
सेक्स स्कँडलमध्ये नाव आलं होतं…
– साल 2014 मध्ये हैदराबादच्या बंजारा हिल्समधील एका सेक्स स्कँडलमध्ये श्वेता बासूचं नाव आलं होतं.
– दोन महिन्यात सुधारगृहात राहिल्यानंतर ती घरात परतली होती.
– मात्र हैदराबादच्या सत्र न्यायालयाने श्वेता बासूला या प्रकरणात क्लिन चिट दिली होती.
– जेलबाहेर आल्यानंतर स्पष्टीकरण देताना ती म्हणाली की, अशाप्रकारच्या कोणत्याही रॅकेटमध्ये माझा समावेश नव्हता.
श्वेता ‘मकडी‘साठी राष्ट्रीय पुरस्कार
– 2002 मध्ये आलेल्या ‘मकडी’ सिनेमातील अभिनयासाठी श्वेता बासूला सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
– त्यानंतर 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या इक्बालमधील श्वेताच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. यासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले होते.
– सिनेमासह श्वेताने कहानी घर-घर की आणि करिश्मा का करिश्मा यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही अभिनय केला होता.
– याशिवाय राम गोपाल वर्माच्या डरना जरुरी है मध्येही श्वेता दिसली होती. यानंतर श्वेताने काही तेलुगू सिनेमांतही काम केलं होतं.
============================================
सोनंखरेदीला अखेर मुहूर्त सापडला, सराफा दुकानं उघडणार
मुंबई : 14 एप्रिलपासून सराफा दुकानं उघडण्याचा निर्णय महाराष्ट्र सराफ असोसिएशनने घेतला आहे. साधारणपणे 38 दिवसांपासून सराफाची दुकानं बंद असल्यामुळे ग्राहक त्रस्त होते.
लग्नसराई आणि लोकांची मागणी लक्षात घेता दुकानं सुरु करणाऱ्या निर्णय महाराष्ट्र सराफ असोसिएशनने घेतला आहे. उद्या राज्य सरकारला प्रस्ताव देण्यात येणार आहे. सराफा दुकानं पुन्हा खुली होण्याच्या निर्णयामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने एक टक्का अबकारी कर मागे घ्यावा, या मागणीसाठी सराफांचा संप सुरु होता.
दरम्यान प्रस्ताव मंजूर न झाल्यास 24 तारखेपासून पुन्हा दुकानं बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोनेखरेदीचा गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकला होता, मात्र लग्नसराईच्या तोंडावर आलेल्या या निर्णयामुळे सोने खरेदीदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
============================================
रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हे, बलिदान : राहुल गांधी
आदिवासी आणि दलितांचं आरक्षण धोक्यात : सोनिया गांधी
देशाला संघ आणि भाजपच्या विचारांपासून धोका : सोनिया गांधी
आरएसएसच्या इशाऱ्यावर देशाचा कारभार : सोनिया गांधी
काँग्रेसची सरकारं पाडण्याचा मोदींचा डाव : सोनिया गांधी
भाजप विभाजनाचं राजकारण करतंय, सोनिया गांधींची टीका
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत : सोनिया गांधी
संघाच्या विचारधारेसमोर कधी झुकणार नाही, देशाला कोणापुढे झुकू देणार नाही : राहुल गांधी
सरकार केवळ मनुविचाराच्या रक्षणाला प्राधान्य देतं : राहुल गांधी
रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हे, बलिदान : राहुल गांधी
आंबेडकरांनी उपस्थित केलेले प्रश्नच रोहित वेमुलाने मांडले : राहुल गांधी
मनुच्या विरोधातला लढा हा आंबेडकर आणि काँग्रेसचा : राहुल गांधी
============================================
औरंगाबादेत ‘मुन्नाभाई’ अटकेत, परीक्षेत कॉपी करण्यासाठी हायटेक पद्धत
औरंगाबाद : परीक्षेत कॉपीच्या अनेक पद्धती पाहण्यात, ऐकण्यात आल्या असतील. मात्र औरंगाबादमधील विद्यार्थ्यांनी नक्कल करण्याची हायटेक पद्धती वापरल्याचं समोर आलं आहे. चक्क बनियनच्या आतून वायरिंग करून या बहाद्दरांनी मोबाईल डिव्हाईसच्या माध्यमातून नक्कल करण्याचा प्रयत्न केला. तो देखील राज्य राखीव दलाच्या पोलीस भरती परीक्षेत.
मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात संजय दत्त मोबाईलच्या माध्यमातून परीक्षेत नक्कल करताना दाखवला होता. मात्र, औरंगाबादेत यापेक्षाही हायटेक मुन्नाबाई नक्कल करताना पकडले गेले आहेत. सातारा पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपींनी चक्क बनियनच्या आतून वायरिंग करत हायटेक पद्धतीने परीक्षेत नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. तो देखील राज्य राखीव दलाच्या परीक्षेत.
सातारा परिसर येथे 850 विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा घेण्यात आली त्या परीक्षेत मदन घुसिंगे आणि विजयसिंह जारवाल या विद्यार्थ्यांनी हायटेक पद्धतीने नक्कल करण्याचा प्रयत्न केला. बनियनच्या शिलाईमध्ये मोबाईल छोट्या डिव्हाईसच्या माध्यमातून वायरिंग लपवण्यात आली होती. ब्लूटूथच्या माध्यमातून परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाची उत्तर ऐकण्यासाठी एक छोट डिव्हाईस कानामध्ये ठेवण्यात आल होतं.
राज्य राखीव दलाच्या पोलिसांना सर्व प्रकार पेपर सुरु होण्याचे वेळी लक्षात आला आणि दोनही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं. दोन आरोपींना अटक करत असताना पवन चारावंडे हा युवक त्यांच्या भावांच्या नावावर परीक्षा देत असताना आढळून आला. नक्कल करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांवर नकलीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
सातारा पोलिसांनी अटक केलेल्या या दोन मुन्नाभाईना असे सर्किट कोणी तयार करून दिले याचा तपास पोलीस करत असून यामागे कोणती टोळी सक्रीय आहे का याचा तपास सातारा पोलीस करत आहे.
============================================
कुटुंबाचा प्रेमाला विरोध, अल्पवयीन प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
नालासोपारा: नालासोपारात अल्पवयीन प्रेमीयुगलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून यात प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. तर प्रियकरावर वसई-विरार पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत मुलगी नववीत शिकणारी अवघी १५ वर्षाची होती. तर मुलगा अकरावीत शिकणारा आहे.
मुलीच्या आईने प्रेमाला विरोध केल्याने या अल्पवयीन मुलांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात मुलीचा मृत्यू झाला आहे. तर अकरावीत शिकणारा १९ वर्षाचा प्रियकर सुदैवान वाचला आहे.
काल सकाळापासून मुलगी अचानक गायब झाली होती. तिचा शोध घेण्याचा पालकांनी प्रयत्न केला. त्यावेळी मुलाच्या घरात दोघेजण विष प्यायलेल्या अवस्थेथ आढळून आले. मुलीच्या घरच्यांनी दोघांना तात्काळ पालिकेच्या रुग्णालयात भरती केलं. मात्र मुलीला मृत घोषित करण्यात आलं तर तरुण सुदैवाने वाचला.
============================================
धोनी आम्हाला घर मिळवून दे, 'आम्रपाली'च्या ग्राहकांचा तगादा
नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी हा आम्रपाली या देशातील एका मोठ्या रिअल इस्टेट कंपनीचा ब्रँड अँबेसेडर आहे. आम्रपाली बिल्डरने वेळेत घरं न दिल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. त्यामुळे बिल्डरवर दबाव आणण्यासाठी धोनीचा गळा धरण्यात आला आहे. ट्विटरवर धोनीच्या विरोधात मोहिम सुरु करण्यात आली आहे.
आम्रपाली बिल्डर्स आणि कॅप्टन कूल माही यांचं नातं 6 वर्ष जुनं आहे. जेव्हा धोनी स्टार नव्हता, तेव्हा आम्रपाली बिल्डर्सने त्याच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला. त्यांच्या प्रत्येक नव्या प्रोजेक्टसाठी धोनीचाच चेहरा वापरण्यात येतो. मात्र याच नात्यामुळे धोनीचे हात दगडाखाली आले आहेत. आम्रपाली बिल्डरच्या आडमुठेपणामुळे जेरीस आलेल्या ग्राहकांनी ट्विटरवर धोनीविरोधातच मोहीम सुरु केली आहे.
#amrapalimisusedhoni हा ट्रेण्ड ट्विटरवर ट्रेण्डिंगमध्ये होता. नॉयडा सेक्टर 45 मधील आम्रपाली सफायर प्रोजेक्टच्या ग्राहकांनी बिल्डरविरोधात शंख फुंकला. त्यानंतर सिलिकॉन सिटी, प्लॅटिनम, झोडिअॅक सारख्या आम्रपालीच्या अन्य प्रकल्पातील ग्राहकांनीही बिल्डरविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली.
कोणी फ्लॅट देण्याचा तगादा लावला आहे, तर काही जण अर्धवट राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी मागे लागलं आहे. आम्रपाली बिल्डरसोबत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून असलेलं नातं तोडण्यासाठी धोनीवर दबाव आणला जात आहे.
दरम्यान एका पत्रकार परिषदेत धोनीला आम्रपाली बिल्डरविषयी प्रश्न विचारला असता बिल्डरसोबत या विषयावर बातचित करण्याचं आश्वासन दिलं आहे.
============================================
रिअॅलिटी शोमध्ये 'टॅलेंट' दाखवणाऱ्या तरुणाचा जळून मृत्यू
हैदराबाद : रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्यासाठी एका 19 वर्षीय तरुणाने केलेला स्टंट त्याच्या जीवावर बेतला आहे. तोंडात केरोसिन घेऊन आगीचा लोळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या हैदराबादच्या तरुणाचा उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
एका रिअॅलिटी शोमध्ये स्वतःचं टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न संबंधित तरुण करणार होता. त्यासाठी तोंडातून आगीचे लोळ काढण्याचा व्हिडिओ तयार करण्याचा त्याचा मानस होता. शूटिंगसाठी त्याने शेजारच्या काही पोरांना गोळा केलं होतं. मात्र कुठल्याही शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाशिवाय त्याने केलेला हा प्रयत्न त्याच्या चांगलाच अंगलट आला.
जलील उद्दीनने आधी स्वतःच्या तोंडात केरोसिन ओतून घेतलं. मात्र तो प्रयत्न फसल्यानंतर त्याने स्वतःच्या अंगावर केरोसिन ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं लक्षात आल्यावर आजूबाजूच्या मुलांनी पळ काढला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांदरम्यान तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे कुटुंबीयांना मुलाच्या इच्छेबाबत कोणतीही कल्पना नव्हती. मृत्यूपूर्वी जलीलने या प्रकाराला आपणच जबाबदार असल्याचं पोलिसांना लिहून दिलं आहे.
============================================
शेजाऱ्यांचं वाय-फाय चोरुन वापरणं इस्लामविरोधी, दुबईतील धर्मसंस्थेचा फतवा
दुबई : शेजाऱ्याचं वाय-फाय चोरुन वापरण्याविरोधात दुबईमधील एका धर्मसंस्थेने एक अजब फतवा जारी केला आहे. शेजाऱ्याचं वाय-फाय चोरुन वापरणं हे इस्लामचं पालन न करण्यासारखं आहे, असं म्हणणं या धर्मसंस्थेचं आहे.
इस्लामिक अफेअर्स अँड चॅरिटेबल अॅक्टिव्हिटीज डिपार्टमेंट असं फतवा काढणाऱ्या संस्थेचं नाव आहे. विशेष म्हणजे या संस्थेने हा फतवा वेबसाईटवर अपलोड करुन जारी केला आहे. फतवा जारी केल्यानंतर अनेकांनी वेगवेगळे प्रश्नही विचारले आहेत.
फतव्यात काय म्हटलं आहे?
“तुमचा शेजारी तुम्हाला त्यांचं वाय-फाय वापरण्यास परवानगी देत असेल, तर वाय-फाय वापरण्यास हरकत नाही. मात्र, शेजाऱ्याच्या परवानगीविना त्यांचं वाय-फाय वापरु नये.”
इस्लामिक अफेअर्स अँड चॅरिटेबल अॅक्टिव्हिटीज डिपार्टमेंट या धर्मसंस्थेची स्थापना 1969 साली झाली असून इस्लामी संस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्याचं उद्दिष्ट या संस्थेचं आहे. कुराण आणि इस्लाम धर्माचा प्रसार, हे मूळ ध्येय आहे.
============================================
५ लाख लीटर पाणी घेऊन अखेर 'पाणी एक्सप्रेस' लातुरात दाखल
लातूर: दुष्काळानं त्रस्त झालेल्या लातुरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आजची सकाळ ही लातुरकरांसाठी नव्या सुर्योदयासह एक नवी उमेद घेउन आली आहे. असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
कारण, गेले कित्येक दिवस पाण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लातुरकरांची पाण्याची प्रतीक्षा अखेर आज संपुष्टात आली आहे. कारण पाण्याची मिरज एक्सप्रेस आज सकाळी लातुरात दाखल झाली आहे.
============================================
भिवंडीतील लूम फॅक्टरीची आग नियंत्रणात
ठाणे : भिवंडीतील नागावमधील कासिमपुरा भागातील लूम फॅक्टरीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर यश मिळवलं. सध्या अग्निशमन दलाचे जवान कुलिंगचं काम करत आहेत, मात्र या आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आहे.
लूम फॅक्टरीला सकाळी सातच्या सुमारास ही आग लागली. ‘राहत मंजिल’ असं या इमारतीचं नाव आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर लूम , पहिल्या मजल्यावर गोदाम आहे, तर वरील दोन मजले रहिवाशी असल्यामुळे इथे अनेक कुटुंब अडकली होती.
अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीतील 50 पेक्षा अधिक रहिवाशांना यशस्वीरित्या बाहेर काढलं.
============================================
वानखेडेवरील सामन्यांसाठी पवारांचा मास्टरस्ट्रोक
मुंबई: मुंबई हायकोर्टाच्या दणक्यानंतर वानखेडे स्टेडीयमवरील आयपीएलचे सामने रद्द होतात की काय अशी परिस्थिती असताना, एमसीए अध्यक्ष शरद पवार यांनी मास्टरस्ट्रोक लगावला आहे.
वानखेडे स्टेडीयमवरच्या सामन्यांसाठी शरद पवारांनी ‘रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब’ला त्यांच्या सांडपाणी प्रक्रिया उद्योगातून पाणी देण्याची विनंती केली आहे. यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेस्टर्न इंडिया क्लबनेही पवारांची विनंती मान्य केली आहे.
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सचा ट्रॅक देखरेख, मेन्टेन ठेवण्यासाठी ‘रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब’ पाणी पुरवतं. मात्र आता रेसिंगचा हंगाम संपत आला आहे. त्यामुळे हे पाणी वानखेडे मैदानासाठी द्यावं, अशी विनंती पवारांनी केली होती. ती ‘रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब’ने मान्य केली आहे.
यानुसार वानखेडेवरच्या सामन्यांसाठी 7 ते 8 टँकर वेस्टर्न इंडिया क्लब पुरवणार आहे. त्यामुळे वानखेडेवरच्या सामन्यावरचं सावट आता काही काळासाठी तरी दूर झालंय असं म्हणायला हरकत नाही.
============================================
कोहली, गेल, डिव्हिलियर्स, वॉटसन विरुद्ध धवन, वॉर्नर, युवराज, नेहरा
बंगळुरू: ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकानंतर टीम इंडियाचा शिलेदार विराट कोहली आता आयपीएलसाठी सज्ज झाला आहे. आयपीएलच्या रणांगणात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरला आज डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादचा सामना करायचा आहे.
विराटची रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर टीम आयपीएलच्या नवव्या मोसमात आपला पहिला सामना घरच्या मैदानात म्हणजे बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरच खेळणार आहे.
मंगळवारी होणाऱ्या या लढतीत बंगळुरुच्या टीमला सनरायझर्स हैदराबादचा सामना करायचा आहे.
रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर ही खरंतर आयपीएलची सर्वात तगडी टीम ठरायला हवी. कारण या संघात विराटसोबतच ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स हे ट्वेन्टी20 क्रिकेटमधले सर्वात स्फोटक फलंदाज आहेत. कोणत्याही गोलंदाजी आक्रमणाची पिसं काढण्यात हे तिघंही पटाईत आहेत.
पण एवढे तगडे शिलेदार संघात असूनही बंगळुरूला आजवर एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही.
2009 आणि 2011च्या मोसमात बंगलोरनं फायनल गाठली होती. तर गेल्या वर्षी त्यांचं आव्हान प्लेऑफमध्ये संपुष्टात आलं तरी यंदाच्या मोसमात बंगळुरुचं पारडं जडच मानलं जातंय.
============================================
2017 पासून प्रत्येक स्मार्टफोनमध्ये हे खास बटण असणार
नवी दिल्ली : रस्त्यावर एकटी जाताना किंवा टॅक्समध्ये एकटी प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा धोका जाणवल्यास महिला केवळ एक बटण दाबून मदत मागू शकतात. महिला सुरक्षा लक्षात घेऊन स्मार्टफोन बनवणाऱ्या सर्व कंपन्यांना 1 जानेवारी 2017 पासून असा हॅण्डसेट बनवणं बंधनकारक आहे, ज्यात पॅनिक बटण असेल.
महिला आणि बालकल्याण मंत्रालय आणि माहिती-प्रसारण मंत्रालय यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. सुत्रांच्या माहितीनुसार, याच आठवड्यात यासंदर्भात नोटिफिशेकन जारी होऊ शकते.
या फीचरमुळे युझरला काही वेळ हे बटण दाबून ठेवावं लागेल, जेणेकरुन कुटुंबीयांना आणि मित्र-मैत्रिणींना युझर्सच्या लोकेशनची माहिती मिळेल. यूपीए सरकारने बनवलेल्या निर्भया फंडमधून या योजनेला पैसे देण्यात येतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
सध्याच्या फोनमध्ये सेफ्टी फीचर कसं अॅड करता येईल, यावर चर्चा सुरु असून योजनेची आखणी सुरु आहे. आम्ही सॉफ्टवेअरवर विचार करत आहोत, जे पॅनिक बटण सारखं काम करेल. युझर्सना सर्व्हिस सेंटरमध्ये गेल्यावर अशा पद्धतीचं अॅप मोफत मिळेल, याबाबत स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांशी बातचीत सुरु आहे, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.
डिसेंबर 2012 मध्ये झालेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी अनेक सूचना आल्या होत्या. त्यामध्ये मोबाईल पॅनिक बटण लावण्याचाही समावेश होता.
============================================
नगरसेविकेच्या पतीच्या त्रासाला कंटाळून तरुण व्यापाऱ्याची आत्महत्या
वाशिम : वाशिच्या रिसोडमध्ये एका 22 वर्षीय तरुण व्यापाऱ्याने भूखंडाच्या व्यवहारातून आत्महत्या केली आहे. नगरसेविकेच्या पतीच्या त्रासाला कंटाळून कल्पेश वर्मा या व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी रिसोडचे मुख्याधिकारी, नगरसेविका मीना अग्रवाल आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पेश वर्मा तीन दिवसांपूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये कल्पेशने नगरसेविका मीना अग्रवाल यांचे पती अशोक अग्रवालचा उल्लेख केला आहे.
कल्पेशने सिव्हील लाईनमधील सरकारी भूखंड भाडेतत्त्वावर घेतला होता. पण त्यापैकी अर्धा भूखंड आपल्याला मिळावा यासाठी नगरसेविका मीना अग्रवाल, त्यांचे पती अशोक अग्रवाल आणि सुनील बगडिया यांनी कल्पेशला त्रास देणं सुरु केलं, असा आरोप कल्पेशच्या नातेवाईकांनी केला. इतकंच नाही तर पालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर पाणझाडे यांना हाताशी धरुन त्रास दिल्याचा आरोपही वर्मा कुटुंबीयांनी केला आहे.
सरकारी भूखंडापैकी अर्धा भाग नगरसेविकेचा पती अशोक अग्रवाल यांना दे, नाहीतर तुझ्या मालकीच्या जागेवर बुल्डोझर चालवू, अशी धमकी मुख्याधिकारी सुधाकर पाणझाडेने कल्पेशला दिली. त्यामुळे कल्पेश तणावाखाली होता. त्यातूनच कल्पेशने 7 एप्रिलच्या रात्री 2 ते 3 च्या दरम्यान आत्महत्या केला. सुसाईड नोटमध्ये त्याने नगरसेविकेचा पती अशोक अग्रवालच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला.
============================================
आयपीएल पदार्पणात गुजरातची विजयी सलामी, पंजाबचा धुव्वा
मोहाली : सुरेश रैनाच्या गुजरात लायन्सने किंग्स इलेव्हन पंजाबचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवून आयपीएलच्या पदार्पणात विजयी सलामी दिली. मोहालीत झालेल्या या सामन्यात पंजाबने गुजरातला विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरात लायन्सने हे लक्ष्य 17.4 षटकात पार केलं.
त्याचा पाठलाग करताना गुजरातचा सलामीवीर ब्रेण्डन मॅक्युलम भोपळाही न फोडता माघारी परतला. पण अॅरॉन फिन्चने आधी सुरेश रैनाच्या साथीने 51 धावांची आणि मग दिनेश कार्तिकच्या साथीने 65 धावांची भागीदारी रचून गुजरातचा डाव सावरला. फिन्चने 47 चेंडूंमध्ये 12 चौकारांसह 74 धावांची खेळी उभारुन गुजरातच्या विजयाचा पाया घातला. मग दिनेश कार्तिकने 26 चेंडूंत सात चौकारांसह नाबाद 41 धावांची खेळी रचून गुजरातला विजय मिळवून दिला.
याआधी ड्वेन ब्राव्होच्या भेदक माऱ्यामुळं गुजरातनं पंजाबला 20 षटकांत सहा बाद 161 धावांत रोखलं. ब्राव्होने चार षटकांत 22 धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स काढल्या. पंजाबकडून मुरली विजयने 42, मनन व्होराने 38 आणि मार्कस स्टॉइनिसने 33 धावांची खेळी केली.
============================================
आम्ही महाराष्ट्रीयन..! गाणे आता यूट्युबवर
- मुंबई :धाव जरी पोटासाठी,डोळ्यात स्वप्ने मोठी...मुलखात कित्येकांनाआहे दिला आसरा...गर्दी ही इथली न्यारी,दिसे आईना बिलोरीप्रतिरूप भासे भारताचेहसरे रुपेरी...अशा आश्वासक शब्दरचनेसह महाराष्ट्राचे नवे गीत आकाराला आले आहे. ‘महाराष्ट्रीयन... आम्ही महाराष्ट्रीयन...’ असे म्हणणारे हे गीत राज्यासह देशातल्या ख्यातनाम अशा २१ गायकांनी गायले असून, ते आता यूट्युबवर रसिकांना उपल्बध झाले आहे.चार मिनिटांचे हे सुरेख गाणे अरुण म्हात्रे या नामवंत कवीने लिहिले असून, परीक्षित भातखंडे यांनी त्याला संगीताचा साज चढवला आहे. सुरेश वाडकर, शंकर महादेवन, रूपकुमार राठोड, जावेद अली, सुनाली राठोड, अनुराधा पौडवाल, साधना सरगम, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, महालक्ष्मी अय्यर, अजित परब यांच्यासह मंगेश बोरगावकर, कीर्ती किल्लेदार, श्रीरंग भावे, धवल चांदवडकर, स्वप्निल गोडबोले, सावनी रवींद्र, सायली पंकज, आनंदी जोशी आणि रीवा राठोड या नव्या दमाच्या गायकांनी ‘आम्ही महाराष्ट्रीयन.. आम्ही महाराष्ट्रीयन...’चा ठेका धरला आहे.
============================================
'त्या' रात्री बांगलादेशचा संघ जेवला नाही
- ऑनलाइन लोकमतश्रीनगर, दि. १२ - टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताकडून एक रन्सने झालेला पराभव बांगलादेशच्या इतका जिव्हारी लागला होता की, त्या रात्री बांगलादेशच्या संघातील एकही खेळाडू जेवला नव्हता. बांगलादेशचा कर्णधार मश्रफे मोर्तझाने स्वत: ही माहिती सांगितली. मोर्तझा सध्या काश्मिरमध्ये सुट्टया घालवण्यासाठी आला आहे.भारताकडून झालेल्या पराभवाने आम्ही अत्यंत निराश झालो होतो. त्या रात्री आम्ही कोणी जेवलो नाही. पराभव हा खेळाचा एक भाग असला तरी, आम्हाला तो सामना गमावायचा नव्हता असे स्थानिक संकेतस्थळाने मोर्तझाच्या हवाल्याने म्हटले आहे.मोर्तझाने काश्मिरमधल्या स्थानिक क्रिकेटपटूंशी संवाद साधला. तेव्हा एका स्थानिक मुलाने बांगलादेश शेवटच्या तीन चेंडूत दोन धावा करु शकला नाही असा प्रश्न त्याला विचारला. त्याला उत्तर देताना मोर्तझाने ही कबुली दिली.सोनमर्गहून श्रीनगरच्या दिशेने जात असताना कुलान येथे त्याला काही स्थानिक मुले क्रिकेट खेळताना दिसली. मोर्तझा गाडी थांबवून तिथे गेला. त्याने मुलांशी संवाद साधला, त्यांच्यासोबत क्रिकेट खेळला.
============================================
२० वर्षांपासून पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या भारतीयाचा मृत्यू
- ऑनलाइन लोकमतलाहोर, दि. १२ - २० वर्षाहून अधिक काळ पाकिस्तानातील लाहोर तुरुंगात खितपत पडलेल्या भारतीय नागरीकाचा मृत्यू झाला आहे. कीरपाल सिंग (५०) असे या व्यक्तीचे नाव असून, त्याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाली होती. सोमवारी तो सेलमध्ये मृतावस्थेत आढळला. १९९२ साली कीरपालला पाकिस्तानच्या हद्दीत अटक झाली होती.पंजाब प्रांतातील बॉम्ब स्फोटा प्रकरणी त्याला देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. शवविच्छेदनासाठी कीरपालचा मृतदेह लाहोरच्या जिन्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सहकैद्यांकडे कीरपालच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितले की, कीरपालने छातीत दु:खत असल्याची तक्रार केली त्यानंतर लगेचच त्याने प्राण सोडला.पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील असलेल्या कीरपालची बॉम्ब स्फोटाच्या आरोपातून लाहोर उच्च न्यायालयाने मुक्तता केली होती. पण अज्ञात कारणामुळे त्याची देहदंडाची शिक्षा कायम ठेवली होती.आर्थिक दुर्बलतेमुळे आम्ही कीरपालच्या सुटकेसाठी आवाज उठवू शकलो नाही आणि कुठल्याही राजकरण्याने किरपालच्या सुटकेचा विषय लावून धरला नाही असे कीरपालची बहिण जागिर कौरने सांगितले. यापूर्वी कोट लखपत जेलमध्ये एप्रिल २०१३ मध्ये सरबजित सिंग या भारतीय कैद्यावर सहकैद्यांनी अत्यंत क्रूर हल्ला केला होता. त्यामध्ये सरबजितचा मृत्यू झाला होता. सरबजितच्या सुटकेचे प्रकरण भारताने लावून धरले होते.
============================================
मुंबई महापालिकेत घोटाळा; मुख्यमंत्र्यांची कबुली
- मुंबई : मुंबई महापालिकेत नालेसफाई, रस्तेदुरुस्तीत घोटाळे झाल्याची कबुली देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्ष शिवसेनेला सोमवारी अप्रत्यक्षपणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या टॅबच्या खरेदीत मात्र कोणताही घोटाळा नसल्याचे प्रमाणपत्र त्यांनी दिले.मुंबई आणि कोकणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई महापालिका प्रशासनाने नालेसफाईच्या कंत्राटाची चौकशी केली असता त्यात अनियमितता आढळल्या. एकच काम वारंवार करणे, एकच फेरी करून जास्त फेऱ्या केल्याचे दाखविणे, जादाचा गाळ काढल्याचे दाखविणे असे प्रकार घडल्याचे ते म्हणाले. रस्ते दुरुस्तीच्या कामातही अनियमितता झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे, असे त्यांनी सांगितले.नालेसफाईतील अनियमितता तपासण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालानुसार या कामात ३८ कोटींची फसवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकरणी १३ कर्मचाऱ्यांना पालिका आयुक्तांनी सेवेतून निलंबित केले आहे.त्याचप्रमाणे ३२ कंत्राटदारांपैकी २४ नालेसफाई कंत्राटदार तर ८ वजनकाटा ठेकेदारांवर कारवाई करण्यात आली आहे. या ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करून तुरु ंगात पाठविण्यात आले असून, त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
============================================
आठ दिवसांत राज्य रोष्टर एक
- मुंबई : आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या आठ दिवसांत राज्य रोष्टर एक करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक आंतरजिल्हा कृती समितीच्या शिष्टमंडळाला सोमवारी दिले. आंतरजिल्हा बदलीसाठी नवीन धोरण आखताना कृती समितीच्या मागण्यांचा विचार करावा, या मागणीसाठी शिक्षकांनी सोमवारी आझाद मैदानात उपोषण केले.कृती समितीचे राज्य अध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेतील शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी अडचणी येत असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. ही बाब समितीने तावडे यांच्या निदर्शनास आणून दिली.शिक्षक आंतरजिल्हा बदली प्रकरणामध्ये सध्या असलेल्या शासन निर्णयामुळे २० ते २५ हजार शिक्षक १० ते १२ वर्षे बदलीपासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तवही त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत चर्चा झाली असून, हा प्रश्न आठ दिवसांत सोडविला जाईल, असे आश्वासन तावडे यांनी कृती समितीला दिले आहे.कृती समितीने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागाच्या येऊ घातलेल्या ‘मदत’ प्रणालीमुळे बदलीग्रस्तांचा प्रश्न सुटणार नाही. उलट बदलीची प्रक्रिया रखडणार आहे. शिक्षकांवर एक प्रकारचा अन्याय होणार आहे.आत्तापर्यंत आंतरजिल्हा बदलीग्रस्तांच्या मागणीसाठी ३० आमदारांनी पाठिंबा दिला असून, शासनाला ३ हजार ६३ शिक्षकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन पाठविले आहे. अद्याप याबाबत सकारात्मक निर्णय झालेला नाही. नवीन धोरण आखताना कृती समितीच्या मागण्यांचा विचार करावा, अशी समितीची मागणी आहे.
============================================
टाटाकडून ब्रिटनमधील एका पोलाद प्रकल्पाची विक्री
- लंडन : टाटाने आर्थिक संकटात सापडलेल्या आपल्या ब्रिटिश पोलाद प्रकल्पापैकी ‘लाँग प्रॉडक्टस् युरोप’ हा प्रकल्प गुंतवणूक कंपनी ग्रेबुल कॅपिटलला विकला आहे. या सौद्याबरोबर ब्रिटनमधील आपला पोलाद प्रकल्प विकण्याच्या प्रक्रियेलाही टाटाकडून रीतसर प्रारंभ करण्यात आला आहे.टाटा स्टील युके ही उपकंपनी टाटांचा ब्रिटनमधील व्यवसाय पाहते. या कंपनीनील आपली संपूर्ण भागीदारी टाटा विकून टाकणार आहे. त्यासाठी केपीएमजी एलएलसी या कंपनीची प्रक्रिया सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय स्लॉटर अँड मे या कंपनीची कायदेशीर सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.एका अधिकृत निवेदनात टाटाने म्हटले की, लाँग प्रॉडक्टस् युरोप या व्यवसायाची फॅमिली इन्व्हेस्टमेंट कंपनी ग्रेबुल कॅपिटलला विक्री करण्यात आली आहे. त्यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. हा संपूर्ण व्यवसाय ग्रेबुल ताब्यात घेईल. त्यात संपत्ती आणि देणेदारीचा समावेश आहे. काही अटींची पूर्तता झाल्यानंतर हा व्यवहार पूर्ण होईल. कराराचे हस्तांतरण, काही ठराविक सरकारी मंजुऱ्या आणि समाधानकारक आर्थिक व्यवस्था यांचा त्यात समावेश आहे.दरम्यान, ब्रिटनमधील टाटाचे पोलाद प्रकल्प खरेदी करण्याची इच्छा प्रसिद्ध उद्योगपती संजीव गुप्ता यांनी या आधीच व्यक्त केली आहे. कंपनीच्या स्टीलच्या चार हजार कामगारांचा रोजगार वाचविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे संजीव गुप्ता यांनी म्हटले आहे. पोर्ट टालबोट येथील हा पोलाद कारखाना ब्रिटनमधील सगळ्यात मोठा असून तो विक्रीस निघाला आहे. लिबर्टी हाऊस ग्रुपचे गुप्ता हे प्रमुख आहेत. त्यांनी टाटा स्टीलची जबाबदारी घेण्यात गोडी दाखविली आहे.विकण्यात आलेल्या या कंपनीच्या ब्रिटनमधील प्रकल्पात ४,४00 कामगार आहेत, तसेच फ्रान्समध्ये ४00 कामगार आहेत. ३१ मार्च रोजी टाटा स्टील युरोपच्या संचालक मंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत हा व्यवसाय विकून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.टाटाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ग्रेबुल कॅपिटलसोबत संभाव्य प्रकल्प विक्रीसाठी वाटाघाटी करण्यासाठी इरादापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. लाँग प्रॉडक्टस् युरोपचे कार्यकारी चेअरमन बिमलेंद्र झा यांनी सांगितले की, हा विक्री व्यवहार कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे, तसेच संभाव्य खरेदीदारासाठीही हा सौदा आकर्षक आहे.
============================================
अमेरिकेच्या नौदलाचं इंडो-एशिया महासागरात 60 टक्के युद्धनौका उभ्या करण्याचं लक्ष्य
- ऑनलाइन लोकमतअमेरिका, दि. ११- अमेरिकेच्या नौदलानं 2019पर्यंत इंडो-एशिया महासागरात जवळपास 60 टक्के युद्धनौका उभं करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. दहशतवादाचा बीमोड करण्याच्या सामग्रीसोबतच या युद्धनौकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची अत्याधुनिक खानपानाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. आमच्या नौदलानं आधीच 60 टक्के पाणडुब्बी समुद्रात तैनात केल्या आहेत. आमचं 2019पर्यंत इंडो-आशिया समुद्रात 60 टक्के युद्धनौका तैनात करण्याचं लक्ष्य आहे, अशी माहिती व्हाइस ऍडमिरल जनरल जोसेफ ऑकॉइन यांनी दिली आहे.पणजी आणि गोव्याच्या समुद्रात या युद्धनौकांना आश्रय देण्यात येणार असून, अमेरिकेच्या 10 ते 15 अशा जवळपास 60 टक्के युद्धनौका समुद्रात उभ्या राहणार आहेत. या युद्धनौका फक्त आकड्यांमध्ये नसून, त्या उत्तम प्रकारे संरक्षणात उभ्या राहतील.दहशतवाद्याच्या मुकाबल्यासोबतच आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास या युद्धनौका भारत आणि अमेरिकेच्या मदतीसाठी कार्यतत्पर असतील. समुद्रमार्गे वाहतूक होत असल्यानं मेरिटाइम संरक्षण फारच महत्त्वाचं आहे. जवळपास 90 टक्के वाहतूक ही समुद्रमार्गे होत असते. आम्ही भारत, दक्षिण आणि पश्चिम आशियातल्या देशांच्या मदतीसाठी काम करू, अशीही माहिती व्हाइस ऍडमिरल यांनी दिली आहे.
============================================
भारतावर हल्ल्यासाठी इसिसचा नवा प्लॅन
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ११- इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS)नं भारतावर हल्ला करण्यासाठी कॅनडातल्या शीख दहशतवाद्यांसोबत हातमिळवणी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इसिस आणि कॅनडातले हे शीख दहशतवादी लवकरच भारतावर हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.कॅनडातले हे शीख दहशतवादी लपून भारतावर हल्ल्याची तयारी करत आहेत. एका महिला शीख दहशतवाद्याच्या फोन रेकॉर्डिंगवरून भारतातल्या गुप्तचर यंत्रणांना ही माहिती मिळाली आहे. या फोन संभाषणावरून दिल्ली हे हल्ल्याचं मुख्य केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर येते आहे. या रिपोर्टनुसार इसिस भारतावर हल्ल्यासाठी पाकिस्तानमधल्या स्लीपर सेल आणि बनावट पैशांची मदत घेणार आहे. इसिसचे दहशतवादी मालदीव आणि बांगलादेशमध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे भारताला या हल्ल्याची भीती आहे.
============================================
पाकिस्तान: पुरावा म्हणून सादर केलेल्या हँडग्रेनेडचाच कोर्टात झाला स्फोट
- ऑनलाइन लोकमतकराची, दि. ११ - एका खटल्यादरम्यान न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात आलेल्या हँड ग्रेनेडचा कोर्टातच स्फोट झाल्याने २ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना पाकिस्तानातील कराची येथे घडली.मिळालेल्या माहितीनुसार, कराचीतील स्थानिक दहशतवादविरोध न्यायालय क्रमांक ३ येथे सोमवारी एका संशयितविरोधात बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी महत्वपूर्ण खटला सुरू होता. त्यावेळी पोलिसांनी पुरावे म्हणून काही शस्त्रे व स्फोटके सादर केली होती. मात्र त्यापैकी एका हँड ग्रेनेडचा अचानक स्फोट झालाआणि एका पोलिसासह न्यायालयातील एक कर्मचारी जखमी झाला. त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ' हा बॉम्ब निकामी कसा करायचा याची माहिती आहे का असा सवाल न्यायाधीशांनी पोलिसांना विचारला असता, त्यांनी होकार दर्शवत त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हँड ग्रेनेडची पिन काढली आणि परिणामी कोर्टात मोठ्ठा स्फोट झाला.'दरम्यान या घटनेनंतर कोर्टातील इतर सर्व खटल्याची सुनावणी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.
============================================
फटाक्यांवर बंदी आणण्याचा केरळ सरकारचा विचार
त्रिवेंद्रम - पुट्टींगल मंदिरात रविवारी पहाटे फटाक्यांमुळे लागलेल्या मोठ्या आगीच्या घटनेनंतर केरळ सरकार फटाक्यावर बंदी आणण्याच्या विचारात असून त्यासंदर्भात बुधवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी माहिती दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना चंडी म्हणाले, ‘14 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता मी सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. या बैठकीत आम्ही या विषयावर (फटाक्यावरील बंदी) चर्चा करणार असून त्याबाबत मंत्री, विरोधी पक्ष आणि सर्वपक्षीय नेत्यांचे मत जाणून घेणार आहोत. हा एक मोठा धोरणात्मक निर्णय असेल. त्याबाबत बैठकीतील चर्चेनंतर योग्य निर्णय घेणार आहोत. आगीमधील जखमींवर दिल्ली, कोइंबतूर येथून मदत मागविण्यात येत आहे. जखमींवरील उपचारासाठी शक्य ती सर्व मदत करण्यात असून त्यांच्यावर विनामूल्य उपचार करण्यात येत आहेत.‘
केरळमधील परावूर पुट्टींगल देवी मंदिरात रविवारी पहाटे फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या घटनेत 108 जणांचा मृत्यू झाला. तर 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर फरार झालेल्या मंदिराच्या अध्यक्ष आणि महासचिवांसह पाच जणांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.
फटाक्यांवर बंदी आणण्याचा केरळ सरकारचा विचार
प्रसारमाध्यमांशी बोलताना चंडी म्हणाले, ‘14 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता मी सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. या बैठकीत आम्ही या विषयावर (फटाक्यावरील बंदी) चर्चा करणार असून त्याबाबत मंत्री, विरोधी पक्ष आणि सर्वपक्षीय नेत्यांचे मत जाणून घेणार आहोत. हा एक मोठा धोरणात्मक निर्णय असेल. त्याबाबत बैठकीतील चर्चेनंतर योग्य निर्णय घेणार आहोत. आगीमधील जखमींवर दिल्ली, कोइंबतूर येथून मदत मागविण्यात येत आहे. जखमींवरील उपचारासाठी शक्य ती सर्व मदत करण्यात असून त्यांच्यावर विनामूल्य उपचार करण्यात येत आहेत.‘
केरळमधील परावूर पुट्टींगल देवी मंदिरात रविवारी पहाटे फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या घटनेत 108 जणांचा मृत्यू झाला. तर 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर फरार झालेल्या मंदिराच्या अध्यक्ष आणि महासचिवांसह पाच जणांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.
============================================
लातूर पाणीप्रश्नी केजरीवालांकडून मोदींचे कौतुक
लातूर पाणीप्रश्नी केजरीवालांकडून मोदींचे कौतुक
नवी दिल्ली - मराठवाड्यातील लातूर शहराचा पाणीप्रश्न सोडविल्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कौतुक केले आहे. तसेच दिल्लीही लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी तयार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दुष्काळामुळे त्रस्त असलेल्या लातूरकरांसाठी आज (मंगळवार) सकाळी जलराणी एक्स्प्रेस लातूरमध्ये दाखल झाली. यामुळे लातूरकरांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. मिरजहून लातूरला रेल्वेच्या दहा जलदूतांमधून पाणी आणण्यात आले आहे. यानंतरही लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने तातडीने पाऊल उचलत पाणी पोचविले आहे.
केजरीवाल यांनी मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, रेल्वेतून लातूरसाठी दिल्लीतून रोज 10 लाख लीटर पाणी पाठविण्याचा प्रस्ताव मी त्यांच्यासमोर ठेवत आहे. 21 व्या शतकात कोणाचा पाण्यासाठी मृत्यू होणे, हे आपल्यासाठी लज्जास्पद आहे. दिल्लीतील नागरिक पाणी पाठविण्यासाठी तयार आहेत. केंद्र सरकारने फक्त पाणी पाठविण्याची व्यवस्था करावी. दिल्ली सरकार मदतीसाठी पूर्णपणे तयार आहे.
============================================
विद्यार्थिनीच्या वडिलांच्या उपचारासाठी मदत
नाशिक - महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या वडिलांना दुर्धर आजार असल्याचे समजताच महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपत त्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात दिला.
एचपीटी-आरवायके महाविद्यालयातील एफ.वाय. बी.एस्सी.ची विद्यार्थिनी वैष्णवी मनोहर हिचे वडील मकरंद मनोहर कर्करोगाने ग्रस्त आहेत. वैष्णवीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने उपचाराचा खर्च त्यांना पेलावणारा नाही. हे समजल्यावर सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थी व प्राध्यापक मदतीसाठी एकत्र आले. एचपीटी-आरवायके महाविद्यालयाने तीस हजार रुपये वैष्णवीच्या आई वर्षा मनोहर यांच्याकडे आज सुपूर्द केले. नंतर एचपीटी-आरवायके महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाचे कार्यकारी अधिकारी प्रा. उत्तम पवार आणि प्रा. डॉ. विद्या पाटील यांच्या एकत्रित निर्णयाने एनएसएस विभागाचे मानधन वैष्णवीच्या वडिलांच्या उपचारासाठी देण्यात आले. दर वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे एनएसएस कार्यक्रमासाठी कार्यक्रम अधिकाऱ्याला मिळणारे मानधन दहा हजार रुपये आज सुपूर्द केले. या वेळी प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य रूपन सिंग, डॉ. खंडेलवाल, प्रा. उत्तम पवार, प्रा. डॉ. विद्या पाटील, प्रा. डॉ. प्रमोद हिरे, विद्यापीठ प्रतिनिधी सुरेश नखाते, पुष्कर तिवारी व सौरभ बेंडाळे उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना नेहमीच सकारात्मक हेतूने कार्य करते. एचपीटी-आरवायकेच्या एनएसएस विभागाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत अनेक कार्यशाळा व कार्यक्रमांत भाग घेतला आहे. विद्यापीठाने महाविद्यालयाला दिलेले मानधन वैष्णवीच्या कुटुंबाला दिले आहे.

महाराष्ट्रात एलईडी बल्ब आता 85 रुपयांत
महाराष्ट्रात एलईडी बल्ब आता 85 रुपयांत
मुंबई - वीजेची बचत करणाऱ्या एलईडी बल्ब आता महाराष्ट्रात ग्राहकांना 100 रुपयांऐवजी 85 रुपयांना उपलब्ध होणार आहेत. एनर्जी एफशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने (ईईएसएल) ‘उन्नत ज्योती बाय अॅफॉर्डेबल एलईडीज् फॉर ऑल" अर्थात ‘उजाला‘ योजनेअंतर्गत नव्याने 54.90 रुपयांना हे बल्ब खरेदी केले आहेत. त्यामुळे सर्व राज्यांना थेट किंमतीचा लाभ हस्तांतरित होणार आहे.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन आणि पॉवरग्रिड या सरकारी उर्जा कंपन्यांच्या संयुक्त भागीदारीतून ईईएसलची स्थापना करण्यात आली आहे.
प्रशासकीय खर्च, वितरण आणि जनजागृती खर्च व राज्यांमधील विशिष्ट कर गृहीत धरुन देशभरात एलईडी दिव्यांची किंमत 75 ते 95 रुपयांदरम्यान आहे. राज्यांतील विशिष्ट करांमुळे प्रत्येक राज्यात एलईडी दिव्यांची शेवटची किंमत वेगळी आहे. परंतु तेथील स्थानिक करांमुळे वितरणाची किंमतदेखील वेगवेगळी आहे, अशी माहिती ईईएसएलने सादर केलेल्या निवेदनात दिली आहे.
============================================
केरळ: मंदिर अध्यक्ष, महासचिवांची शरणागती
केरळ: मंदिर अध्यक्ष, महासचिवांची शरणागती
कोल्लम - केरळमधील परावूर पुट्टींगल देवी मंदिरात रविवारी पहाटे फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या घटनेनंतर बेपत्ता झालेले मंदिराच्या अध्यक्ष, महासचिवांसह पाच जणांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीनंतर बेपत्ता झालेले मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष पी. एस. जयालाल, महासचिव कृष्णाकुट्टी पिल्लई यांच्यासह विश्वस्त प्रसाद, सोमासुंदरम पिल्लई आणि रविंद्रन पिल्लई यांनी सोमवारी मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांसमोर शरणागती पत्करली. यापूर्वी या आगीप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
या आगीत 108 जणांचा मृत्यू, तर 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत. रविवारी पुट्टींगल मंदिराचा वार्षिकोत्सव सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. ही आग एवढी भीषण होती, की यात होरपळलेल्या अनेकांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. सर्व जखमींना तिरुअनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मंदिर परिसरात आतषबाजी करण्यास परवानगी नसतानाही आतषबाजी करण्यात आली होती.
============================================
भावाला वाचविण्यासाठी जीव लावला पणाला
भावाला वाचविण्यासाठी जीव लावला पणाला
नागपूर - कपडे वाळत घालताना तारांमध्ये करंट येऊन मोठ्या भावाला इलेक्ट्रिक शॉक लागल्याचे पाहून त्याचा जीव वाचविण्यासाठी लहान भावाने जिवाची पर्वा न करता त्याला सोडविण्याचा जोरदार प्रयत्न केला. भावाचा मृत्यू डोळ्यासमोर पाहत त्याने सर्व शक्ती पणाला लावली. मात्र, नियतीला काही औरच मान्य होते. मोठ्या भावाला वाचविण्यात त्याला यश आले; मात्र स्वतःला प्राण गमवावा लागल्याची घटना सोमवारी घडली. मोठ्या भावावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रितिक मानसिंग पाल (वय 11) असे मृत्यू पावलेल्या दुर्दैवी लहान भावाचे नाव आहे तर निखिल मानसिंग पाल (वय 12, रा. कस्तुरबानगर) असे जखमी मुलाचे नाव आहे. हृदयाचा थरकाप आणि बंधुप्रेमाचे उदाहरण ठरलेली ही घटना आहे.
मानसिंग पाल (वय 40) हे पत्नी व मुलगा निखिल व रितिकसह कस्तुरबा नगरात राहतात. ते कुल्फी विक्रीचा व्यवसाय करतात. निखिल व रितिक हे सहाव्या वर्गात शिक्षण घेतात. घराला लागूनच एक विद्युत रोहित्र (डीपी) आहे. सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास निखिल आणि रितिक दोघांनाही आंघोळ करून शाळेत जायचे होते. वडील कामावर गेले होते तर आई घरात स्वयंपाक करीत होती. दरम्यान, ही घटना घडली.
============================================
No comments:
Post a Comment