[अंतरराष्ट्रीय]
१- कोचीमधल्या तरुणासोबत मार्क झुकेरबर्गचा व्यवहार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- पुण्यातील सामने विशाखापट्टणमला?
३- निष्पाप लोकांचा बळी जात असेल तर कधीच शांतता येणार नाही - फारुख अब्दुल्ला
४- देशविघातक शक्तिंपासून मुक्ती मिळावी म्हणून जेएनयू्मध्ये हिंदू सेनेने केली पूजा
५- तृप्ती देसाई मारहाण प्रकरणी 7 जणावर गुन्हे दाखल
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
६- ठाणे; 18 टन, 2 हजार कोटींचं एफेड्रिन ड्रग्ज जप्त
७- बीड; दारु कंपन्यांचं पाणी बंद करणं अयोग्य : पंकजा मुंडे
८- दारु कंपन्यांना पाणीपुरवठा करण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध
९- भंगारासाठी देवनार डम्पिंगला आग लावल्याचा आरोप, 9 भंगार विक्रेत्यांना अटक
१०- आरोग्य विभागाचा घोटाळा समजून घेण्यासाठी बघा हा व्हिडियो
११- नागपुरचा पारा पुन्हा चढला, आजचे तापमान 45 अंश सेल्सिअस; तापमान आणखी वाढण्याची शक्यता
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- मुंबई; 100 वर्षांच्या महिलेचा विनयभंग करणाऱ्याला अटक
१३- औरंगाबादेत 244 जोडप्यांचा सामुदायिक विवाह
१४- जळगाव; दुष्काळ निवारणासाठी सामूहिक धोरण ठरविण्याची गरज
१५- पुणे - सतीश शेट्टी हत्या प्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी,
१६- नवी दिल्ली - ब्रिटनचे प्रिन्स विल्यम्स आणि केट मिडलटन यांनी ताजमहालला दिली भेट.
१७- उत्तराखंडमध्ये बस खड्ड्यात कोसळून झालेल्या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू आणि 24 जखमी.
१८- पश्चिम बंगाल येथे तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांची अज्ञात हल्लेखोरांनी केली गोळ्या झाडून हत्या
१९- हरियाणातील सोनिपत येथे स्कूल बसमध्ये लागली आग.
२०- बेळगाव: संकेश्वरजवळ कार-ट्रकच्या अपघातात ४ ठार, तिघे गंभीर जखमी.
२१- इंदौर - लिफ्टमध्ये अडकून ७ वर्षांच्या मुलाचा झाला मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- 'आम्रपाली'सोबतच्या ब्रेकअपनंतर भज्जी म्हणाला, वेल डन धोनी
२३- भारताचा गोलांचा धडाका;ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनल
२४- दिलीप कुमार यांना न्यूमोनिया झाल्याचे निष्पन्न; पुढील ७२ तास महत्वाचे - डॉ. जलील परकार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते
( साईनाथ कस्तुरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
===============================================

18 टन, 2 हजार कोटींचं एफेड्रिन ड्रग्ज जप्त
ठाणे : ठाणे पोलिसांनी सुमारे साडे 18 टन एफेड्रिन नावाचं ड्रग्ज पकडलं आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 2 हजार कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही पहिलीच कारवाई आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, यात एका नायजेरियन नागरिकाचाही समावेश आहे.
धक्कादायक म्हणजे हे ड्रग्ज बनवणारी कंपनी सोलापुरात असल्याचं उघड झालं आहे. सोलापुरातून हे ड्रग्ज अहमदाबादला पाठवण्यात येत होतं. त्यावेळी ठाण्याजवळ गुजरात रस्त्यावर हे ड्रग्ज पकडण्यात आलं.
याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजरसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षापासून हे रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळत आहे. ही मुंबई – ठाण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे.
===============================================
दारु कंपन्यांचं पाणी बंद करणं अयोग्य : पंकजा मुंडे
बीड : दुष्काळी मराठवाड्यात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य असताना, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अजब वक्तव्य केलं आहे. “दारु किंवा उद्योगधंद्याना देण्यात येणारं पाणी हे आरक्षित केलेलं असतं. त्यामुळे अशा उद्योगांचं पाणी बंद करणं अयोग्य होईल. त्यांना जर पिण्याचं पाणी देण्यात येत असेल तर बंद करावं”, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्या बीडमध्ये बोलत होत्या.
दारु कंपनी किंवा उद्योग कंपन्यांवर चालणारी अनेक पोटं आहेत. जर या कंपन्या बंद पडल्या तर अनेकांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे हे पाणी बंद करणं चुकीचं ठरेल, असं पंकजा यांनी नमूद केलं.
मात्र मराठवाड्यात माणसांना पिण्यासाठी पाणी नाही. लातुरसारख्या भागात तर रेल्वेने पाणी पुरवलं जात आहे. पाण्यासाठी अनेकांचे जीव गेले आहेत. असं सगळं घडत असताना पंकजा मुंडे यांनी मात्र कंपन्यांना देण्यात येणारं पाणी आरक्षित असल्यामुळे, ते लोकांना पिण्यासाठी देणं अयोग्य असल्याचंच अप्रत्यक्षरित्या म्हटलं आहे.
त्यामुळे पंकजा मुंडे यांना लोकांना पिण्यासाठी पाण्यापेक्षा, दारु किंवा तत्सम उद्योगधंद्याना पाणी जास्त आवश्यक असल्याचं वाटतं की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
===============================================
दारु कंपन्यांना पाणीपुरवठा करण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध
औरंगाबाद: बीअर कंपन्यांविरोधात ‘एबीपी माझा’ने हाती घेतलेल्या मोहीमेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. मराठवाड्यात दारु कंपन्यांना दिलं जाणारं पाणी तात्काळ बंद करा, दुष्काळी परिस्थितीत दारुऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणं आवश्यक असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
औरंगाबादमध्ये शिवसेनेनं आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात उद्धव बोलतं होते. राज्यात आयपीएलनंतर बीअर कंपन्यांचं पाणी तात्काळ बंद करण्याची मागणी होत आहे. मद्यप्रेमींना पिण्यासाठी पाणी आहे. पण तहानलेल्यांना पिण्यासाठी पाणी नाही. हीच शोकांतिका माझानं मांडल्यानंतर, आता मराठवाड्यातल्या दारु कंपन्यांविरोधात लोकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.
आता सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेनंही हीच मागणी केल्यानं सरकार यावर काय उत्तर देतं. याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
===============================================
'आम्रपाली'सोबतच्या ब्रेकअपनंतर भज्जी म्हणाला, वेल डन धोनी
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने रियल इस्टेट कंपनी आम्रपाली ग्रुपसोबतचा करार रद्द केल्यानंतर, फिरकीपटू हरभजन सिंहने कौतुक केलं आहे.
हरभजनने ट्विट करून धोनीचं कौतुक केलं आहे. “आम्रपाली बिल्डर्ससोबतचं नातं तोडून धोनी तू चांगलं काम केलं आहेस. 2011 विश्वचषकानंतर त्यांनी आपल्याला घरं देण्याची घोषणा केली होती, मात्र त्यांनी अद्याप दिलेलं नाही”, असं ट्विट भज्जीने केलं आहे.
===============================================
भंगारासाठी देवनार डम्पिंगला आग लावल्याचा आरोप, 9 भंगार विक्रेत्यांना अटक
मुंबई: देवनार डम्पिंग आगीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 9 भंगार विक्रेत्यांना आज कुर्ला कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी देवनार पोलिसांनी काल कारवाई केल्यानंतर आज या भंगारविक्रेत्यांना कोर्टात हजर करण्यात आलं.
भंगारातल्या लोखंडासाठी या विक्रेत्यांनी ही आग लावल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. यासाठी प्रसंगी भंगारविक्रेत्यांनी परिसरात राहणाऱ्या लहान मुलांचाही वापर केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
अटक करण्यात आलेल्या या ९ भंगारविक्रेत्यांची दुकानं देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागूनचं आहेत, त्यातचं या विक्रेत्यांकडे कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसल्याचंही समजतं आहे.
===============================================
कोचीमधल्या तरुणासोबत मार्क झुकेरबर्गचा व्यवहार
- ऑनलाइन लोकमत -कोची, दि. १६ - मार्क झुकेरबर्गने ऑनलाईन सोशल नेटवर्किंगमध्ये क्रांती घडवली असेल. त्याने फेसबुकच्या सहाय्याने करोडो रुपये कमवले असतील. पण भारतातल्या एका तरुणाने अशी एक गोष्ट केली की ज्यामुळे मार्क झुकेरबर्गला स्वत: त्याच्याशी संपर्क साधून व्यवहार करावा लागला. अमल अगस्टाइन या तरुणाने एक डोमेन रजिस्टर केले होते जे मार्क झुकेरबर्गने विकत घेतले आहे.मार्क झुकेरबर्गने मुलीचा जन्म झाल्यानंतर तिचे नाव मॅक्सिम चॅन झुकेरबर्ग असं ठेवलं होतं. त्यानंतर अमल अगस्टाइनने maxchanzuckerberg.org नावाने डोमेन रजिस्टर केले होते. फेसबुक टीमने अमल अगस्टाइनची माहिती काढत त्याच्याशी संपर्क साधला आणि या डोमेनची 700 डॉलरला खरेदी केली आहे. आपल्याशी फेसबुक व्यवहार करत आहे याची माहिती नसणा-या अमल अगस्टाइनने आनंद व्यक्त केला आहे. फेसबुकच्याच माध्यमातून त्याने ही माहिती दिली आहे.'फेसबुकने माझ्याशी संपर्क साधला याचा मला खूप आनंद आहे. मला डोमेन रजिस्टर करण्याची खूप आवड आहे आणि यातूनच मला हा फायदा झाला आहे. मी याअगोदरही अनेक डोमेन रजिस्टर केले आहेत, गेल्या खूप काळापासून मी हे करत आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात मार्क झुकेरबर्गला मुलगी झाल्यानंतर मी हे डोमेन रजिस्टर केले होते', असं अमल अगस्टाइनने सांगितलं आहे. अमल अगस्टाइन सध्या इलेक्ट्रॉनिक्सच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे.अमल अगस्टाइनला GoDaddy या मेल आयडीवरुन विनंती करणार मेल आला होता. ज्यामध्ये डोमेन विकण्यामध्ये तुम्हाला रस आहे का ? आणि त्याची किती किंमत घेणार ? असं विचारण्यात आलं होतं. अमल अगस्टाइन 700 डॉलरला विकण्याचा प्रस्ताव ठेवला होता. जो लगेच मान्य करण्यात आला. त्यानंतरच अमल अगस्टाइनला आपण फेसबुकसोबत व्यवहार करत आहोत असं कळलं.
===============================================
आरोग्य विभागाचा घोटाळा समजून घेण्यासाठी बघा हा व्हिडियो
- मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या मनमानी खरेदीचा भांडाफोड लोकमतने केल्यानंतर विरोधीपक्ष नेत्यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा विषय गाजवला. या खरेदी प्रकरणाची एसीबी मार्फत चौकशी करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली, तर ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून खरेदी झाल्याचा आरोप विधानसभेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.हा भांडाभोड करणारे लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी उलगडून सांगताहेत नक्की काय आहे हा घोटाळा?
===============================================
100 वर्षांच्या महिलेचा विनयभंग करणाऱ्याला अटक
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16 - शंभर वर्षाच्या वृद्ध महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कल्याण पोलीसांनी 18 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. बुधवारी हा प्रकार घडला होता. पहाटेच्या वेळी ही महिला घरी झोपली असताना, त्याच परीसरात राहणारा अक्षय बोराडे हा तरूण तिच्या घरात घुसला आणि त्याने या महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला.या तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आज शनिवारी त्याला अटक करण्यात आल्याचे पीटीआयने म्हटले आहे.
===============================================
औरंगाबादेत 244 जोडप्यांचा सामुदायिक विवाह
औरंगाबाद : दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत शनिवारी (ता. 16) स्टेशन रोडवरील अयोध्यानगरी मैदानावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. दुष्काळग्रस्त भागातील 244 जोडप्यांचे विवाह त्या त्या धर्माच्या रिवाजाप्रमाणे लावले गेले.
सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री अनंत गिते यांची प्रमुख उपस्थिती होती. सोहळ्यासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला होता. हा विवाह सोहळा आयोजित केल्यामुळे अनेक गरीब शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याची भावना विवाह सोहळ्यातील वधूं वरांनी व्यक्त केली. ‘दुष्काळात अनेक शेतकऱ्यांवर दुःखाचे डोगर कोसळले असून अशा परिस्थितीत शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असून परिस्थिती चांगली होईपर्यंत असे सोहळे आयोजित करणार असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ‘‘सामुहिक विवाह सोहळे काळाची गरज आहे. असे विवाह सोहळे पाण्याची बचतच करतात. भीषण पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात अशा सोहळ्यांची गरज आहे,‘‘ असे मत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.

दुष्काळ निवारणासाठी सामूहिक धोरण ठरविण्याची गरज
जळगाव : राज्यात सध्या भीषण दुष्काळ आणि पाणीटंचाईची स्थिती आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नी आता राजकारणापलीकडे विचार करुन सामूहिकपणे धोरण ठरविण्याची आवश्यकता आहे. केंद्र व राज्य सरकारने त्यासाठी प्रयत्न करावेत, आम्हीही सहकार्य करु अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.
जळगावात अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघ व जैन इरिगेशन सिस्टिम्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय डाळिंब परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. वृत्तपत्रातील एका लेखाचा दाखला देत गेल्या दीड-दोन वर्षांत राज्यातील सिंचनक्षेत्रात एक टक्काही वाढ झाली नाही, असेही ते म्हणाले. राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनीही पवारांच्या या वक्तव्याला सहमती दर्शवली.

पुण्यातील सामने विशाखापट्टणमला?
नवी दिल्ली : मे महिन्यातील आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर नेण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबई आणि पुणे फ्रॅंचायजीने पर्याय निवडण्याची प्रक्रिया सुरू केली. पुण्याचे सामने विशाखापट्टणमला होण्याची शक्यता आहे. मुंबईने दोन दिवसांची मुदत मागितली आहे. मुंबईतील अंतिम सामना बंगळूरला होण्याचे जवळपास नक्की आहे.

दुष्काळ आणि आयपीएल सामन्यांदरम्यान होणारी पाण्याची नासाडी यावर कडक भूमिका घेत उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच मे महिन्यातील सामने राज्यातून बाहेर नेण्याचा आदेश दिला. यास आव्हान न देण्याची भूमिका बीसीसीआयने घेतली, त्यानंतर आज आयपीएल संयोजन समिती आणि मुंबई, पुण्याच्या प्रतिनिधींनी चर्चा केली.
महाराष्ट्रात (मुंबई, पुणे, नागपूर) 20 सामने होणार होते, यातील एक सामना मुंबईत झाला होता. 1 मेपासून 13 सामने होते, यामध्ये क्वालिफायरचे दोन आणि अंतिम सामन्याचा समावेश होता. यासाठी बैठकीत वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी झाली.
पुण्याला विशाखापट्टणम आणि रायपूर असे दोन पर्याय देण्यात आले होते. रायपूर येथे संघाला चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता असली, तरी त्यांनी विशाखापट्टणमला प्राधान्य दिल्याचे समजते. मुंबई इंडियन्ससमोर रायपूर, कानपूर आणि जयपूर असे पर्याय ठेवण्यात आले. त्यांनी या तिन्ही ठिकाणांबाबत चर्चा केली; परंतु अंतिम निर्णय दोन दिवसांनंतर घेणार असल्याचे कळवले.
पुण्यात साखळी सामन्यांसह क्वालिफायर आणि एलिमिनेटर असे दोन सामने होणार आहेत. कोलकात्यात क्वालिफायर-2 आणि एलिमिनेटर असे दोन सामने होतील, तर क्वालिफायर-1 आणि अंतिम सामना बंगळूर येथे होईल.
===============================================
भारताचा गोलांचा धडाका;ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनल
मुंबई : मलेशियास या स्पर्धेत ब्रॉंझ पदकाचीच फार तर संधी आहे, असे मलेशिया मार्गदर्शकांनी भारताविरुद्धच्या हॉकी लढतीपूर्वी सांगितले होते. भारतीयांनी यजमानांना प्रतिकाराची कोणतीही संधी न देता टेनिस सामन्याप्रमाणे 6-1 असा दणदणीत विजय संपादला. ऑस्ट्रेलियाविरुद्धची अंतिम लढत आज (शनिवार) सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

इपोहला सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतास मलेशियाविरुद्ध विजय पुरेसा होता, तर मलेशियास अंतिम लढतीस पात्र ठरण्यासाठी सात गोलने विजय हवा होता. मलेशियास हवा असलेला विजयी फरक भारतीयच साध्य करणार असे वाटत होते. विश्रांतीस 4-0 अशा एकतर्फी आघाडीनंतर भारतास 6-1 असा विजय काहीसा सलतच असेल.
भारताने या स्पर्धेत 12 गुणांची कमाई करीत गतविजेत्या न्यूझीलंडला मागे टाकले. किवींचे अकरा गुणच झाले व त्यांना आता जास्तीत जास्त ब्रॉंझ पदकच जिंकता आले. भारताची अंतिम लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. त्यांनी सर्व सहा सामने जिंकत 18 गुण मिळवले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम लढतीचा सराव करताना भारतीयांनी गोलक्षेत्रातील राखलेले वर्चस्व महत्त्वाचे ठरले. निक्कीन थिमय्या याने तिसऱ्या मिनिटास गोल करून दिला आणि भारतीयांच्या एकतर्फी वर्चस्वास हादरा देणे मलेशियास क्वचितच जमले. हरजित सिंगने सातव्या मिनिटास, रमणदीप सिंगने 25 व्या, तर डॅनिश मुजतबाने 27 व्या मिनिटास गोल केला. रमणदीप, तसेच डॅनिशने पेनल्टी कॉर्नरवर गोल केले होते. रमणदीपने 39 व्या, तर तलविंदर सिंगने 50 व्या मिनिटास गोल करीत विजय निश्चित केला. मलेशियाचा एकमेव गोल शाहरिल साबाह याने 46 व्या मिनिटास केला होता.
पूर्वार्धातील भारतीयांचा खेळ सुखावणारा होता. वेगवान आक्रमण, तसेच पासेस अथक सुरू होते. मलेशियास यामुळे बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. त्यांनी धसमुसळा खेळ करीत भारतीयांना रोखण्याचा प्रयत्न केला. वर्चस्व हाती असलेले भारतीय शांत राहिले आणि त्यामुळे मलेशिया खेळाडूंना ताकीद मिळू लागली. गोल वर्तुळाबाहेर मलेशियाचे सदोष टॅकलिंग भारतीयांच्या पथ्यावर पडले. मात्र त्यांना या चुका करण्यास भारतीयांनीच भाग पाडले होते.
पूर्वार्धातील भारतीयांचा खेळ सुखावणारा होता. वेगवान आक्रमण, तसेच पासेस अथक सुरू होते. मलेशियास यामुळे बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. त्यांनी धसमुसळा खेळ करीत भारतीयांना रोखण्याचा प्रयत्न केला. वर्चस्व हाती असलेले भारतीय शांत राहिले आणि त्यामुळे मलेशिया खेळाडूंना ताकीद मिळू लागली. गोल वर्तुळाबाहेर मलेशियाचे सदोष टॅकलिंग भारतीयांच्या पथ्यावर पडले. मात्र त्यांना या चुका करण्यास भारतीयांनीच भाग पाडले होते.
===============================================
No comments:
Post a Comment