[अंतरराष्ट्रीय]
१- ह्युस्टनमध्ये महाभयंकर पूर, आपत्ती निवारण विभागाकडून ऐतिहासिक पावसाची नोंद
२- लंडन; शिक्षकांचा सन्मान वाढवण्यासाठी अर्जेंटिनामध्ये कठोर शिक्षेची तरतूद
३- लंडन; 'डब्लूटीओ'च्या निर्णयाविरोधात भारत मागणार दाद
४- अमेरिका: शिख तरुणास उतरवावी लागली पगडी
५- वॉशिंग्टन; 'घरातील प्रदूषणापासून सावधान!'; संशोधकांचा इशारा
६- वॉशिंग्टन; मोदी अमेरिकन कॉंग्रेसला संबोधित करणार
७- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आजपासून 3 देशांच्या दौ-यावर, सौदी अरब, जर्मनी आणि युकेचा दौरा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
८- आता हाजी अली दर्गा प्रवेशासाठी तृप्ती देसाईंचा एल्गार; 28 एप्रिलला हाजी अली दर्ग्यात प्रवेश करणार
९- समझोता बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितविरुद्ध कोणतेच पुरावे नाही- एनआयए
१०- कर्मचाऱयांनो काम करा; राजकारण नको-केजरीवाल
११- देशातील 25% लोकसंख्येस दुष्काळाचा फटका
१२- गोळवलकर गुरुजींच्या फोटोसमोर नितीशकुमार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- आमीरचं स्तुत्य पाऊल, महाराष्ट्रातील दोन दुष्काळग्रस्त गावं दत्तक
१४- मुंबई - पुणे सामना गहुंजे मैदानावरच
१५- लातूर; अंत्यसंस्कारातील कार्यांना फाटा देऊन पाणीपुरवठा
१६- मणिपूरमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळात 2 हजार घरांची पडझड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- औरंगाबाद; बाळाचा मृतदेह हातात घेऊन भीक मागणाऱ्या महिलेला अटक
१८- नांदेड; सगळीकडे दुष्काळाचा हाहाकार; नांदेडच्या व्यंकटेशनगर मध्ये मात्र पाणी रस्त्यावर
१९- नाशिक; त्र्यंबकेश्वर गर्भगृहासमोरच महिलांना अमानुष मारहाण
२०- नाशिक - स्वराज्य संघटनेच्या महिलांना झालेल्या मारहाण प्रकरणी ४ जणांसह १५० ग्रामस्थांवर गुन्हे दाखल
२१- जम्मू-काश्मीर : व्हॉट्सअॅप ग्रुप उघडण्यासाठी मिळवावा लागणार 'लायसन्स'
२२- नागपूर; एमबीए होऊनही बंटी विकतो चहा
२३- आग्रा; 'श्रावणबाळ' वीस वर्षांपासून करतोय आईची सेवा
२४- पिंपरी-चिंचवडला दिवसाआड पाणीपुरवठा होणार
२५- यवतमाळ : पुसद येथे ट्रॅक्टरने २ बाईक्सना चिरडले. ५ ठार, २ गंभीर जखमी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- 'त्या' अटीनंतर दीपिका आणि सलमान एकत्र
२७- ब्रेकअपनंतर अकिंता लोखंडे लवकरच बॉलिवूडमध्ये
२८- महाराष्ट्राची धावपटू रोहिणी राऊतवर डोपिंगचा डाग
२९- मुंबईच्या रस्त्यावर स्टेनची गोलंदाजी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात
(अजय कागदे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
============================================

आता हाजी अली दर्गा प्रवेशासाठी तृप्ती देसाईंचा एल्गार
मुंबई: शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर आणि कोल्हापूरच्या अंबाबाईनंतर आता तृप्ती देसाई यांनी मुंबईच्या हजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळण्यासाठी लढा सुरु केला आहे.
यासंदर्भात ‘हाजी अली सबके लिए’ फोरमची स्थापना करण्यात आली आहे. हजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी ट्रस्टींसोबत चर्चा केली जाणार आहे. जर महिलांना दर्ग्यामध्ये प्रवेश मिळाला नाही तर 28 एप्रिल रोजी ‘हाजी अली सबके लिए’ फोरम धरणं आंदोलन करणार आहे.
मुंबईतील काही सेक्युलर संस्था आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एक बैठक घेऊन या फोरमची स्थापना केली आहे.
या फोरमच्या माध्यमातून स्त्रियांना सर्व धार्मिक स्थळांवर पुरूषांप्रमाणेच समान अधिकार मिळावेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या, “हिंदुत्ववाद्यांचा आरोप होता की आम्ही विशिष्ट धर्माला विरोध करत आहोत. मात्र तसे नसून आम्ही संविधानातील अधिकारांसाठी संघर्ष करतोय. आतापर्यंत भूमाता ब्रिगेड आंदोलन करत होती. आता आमच्यासोबत या सर्व संघटना आहेत याचा आनंद आहे. सर्व जाती धर्मांच्या महिलांना त्यांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन करणार. आम्ही परंपरेच्या विरोधात नाही चुकीच्या परंपरेविरोधात लढतोय. हायकोर्टातही भूमाता ब्रिगेडकडून हाजी अली बाबतचा निर्णय घेण्यासाठी निवेदन केलं जाईल”.
============================================
बाळाचा मृतदेह हातात घेऊन भीक मागणाऱ्या महिलेला अटक
औरंगाबाद : बाळाचा मृतदेह हातात घेऊन भीक मागणाऱ्या एका महिलेला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत ही महिला कुटुंबासहत राजस्थानमधून औरंगाबादेत आल्याचं समोर आलं आहे.
शहरातील दिल्ली गेट परिसरात या चार महिन्यांच्या बाळाचा मतदेह कपड्यात गुडांळून ही महिला भीक मागत होती. मात्र पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना संशय आल्याने त्यांनी महिलेला ताब्यात घेतलं. अधिक चौकशी केली असता बाळ मृत असल्याचं समोर आलं.
या बाळाचा मृत्यू कधी झाला?, भीक मागताना बाळ जिवंत होतं की मृत याची चौकशी सुरु आहे.
============================================
ब्रेकअपनंतर अकिंता लोखंडे लवकरच बॉलिवूडमध्ये
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतपाठोपाठ त्याची एक्स गर्लफ्रेण्ड अंकिता लोखंडेही मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. लवकरच अंकिता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
लोकप्रिय टीव्ही मालिका ‘पवित्र रिश्ता‘मध्ये अंकिता आणि सुशांतसिंह राजपूत झळकले होते. या मालिकेच्या माध्यमातून ही जोडी घराघरात पोहोचली होती. या जोडीने पद्यावर आणि पद्यामगे आपल्या चाहत्यांच्या मनात एक छाप सोडली आहे. पण आता ही जोडी वेगळी झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच सुशांत – अंकिताचं ब्रेकअप झालं आहे.
सुशांतसिंह राजपूतने ‘काय पो छे‘ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. आता अंकिताही त्याच्या पावलावर पाऊल टाकणार आहे. अंकिता एका स्क्रिप्टवर काम करत आहे. अंकिता ही स्क्रिप्ट लवकरच साईन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ब्रेकअपनंतर अंकितानेही करिअर मनावर घेतलं आहे.
============================================
महाराष्ट्राची धावपटू रोहिणी राऊतवर डोपिंगचा डाग
नागपूर : महाराष्ट्राच्या मैदानी खेळाला लागलेला डोपिंगचा डाग आणखी गडद होताना दिसत आहे. कारण नागपूरची धावपटू रोहिणी राऊत ही उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळली आहे. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी अर्थात ‘नाडा’ने 28 फेब्रुवारीला ही चाचणी घेतली होती. त्यात रोहिणी दोषी आढळली. त्यामुळे राज्याच्या क्रीडा वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नाडाने 23 मार्च 2016 ला रोहिणीला पहिल्या चाचणीत दोषी आढळल्याची नोटीस पाठवली आहे. नाडाने हे पत्र अॅथलेटिक्स महासंघ आणि राज्य संघटनेलासुद्धा पाठवलं आहे.
नवी दिल्ली इथं फेब्रुवारीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीत रोहिणी विजेती ठरली होती. त्यानंतर नाडाने रिओ ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेवून काटेकोर नियोजन करण्याचं ठरवलं आहे. त्यादृष्टीने नाडाने महत्त्वाची असलेल्या डोपिंग टेस्टला प्राधान्य दिलं. त्यामुळेच देशभरात यंदा झालेल्या विविध मॅरेथॉन स्पर्धक विजेत्या धावपटूंची उत्तेजक चाचणी नाडाने घेतली.
विजेते खेळाडू राहात असलेल्या शहरात अचानक जाऊन धाडी टाकून डोपिंग चाचणीसाठी खेळाडूंचे युरीन नमुने घेतले.
त्यानुसार रोहिणीने काही उत्तेजकं घेतल्याचं आढळल्याचा दावा नाडाने केला आहे.
मात्र दाढ दुखी थांबण्यासाठी जानेवारीत औषधं घेतली होती. ती बंदी घातलेल्या औषधांच्या यादीत समाविष्ट असल्याचं मला माहीत नव्हतं, असं रोहिणीने म्हटलं आहे.
रोहिणीने जी औषधं घेतली आहेत, ती स्नायूंच्या बळकटीसाठी घेतली जातात, असं नाडाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
============================================
समझोता बॉम्बस्फोट: कर्नल पुरोहितविरुद्ध कोणतेच पुरावे नाही- एनआयए
नवी दिल्ली: मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटकेत असलेला लेफ्टनंट कर्नल पुरोहितला एनआयकडून समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटात क्लिन चीट देण्यात आली आहे. समझोता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात पुरोहितविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं एनआयएचं म्हणणं आहे.
समझोता एक्सप्रेस स्फोटाप्रकरणी जरी क्लीन चीट मिळाली असली तरीही मालेगाव स्फोटाप्रकरणी पुरोहितची चौकशी अजूनही सुरुच आहे. एनआयएचे डीजी शरद कुमार म्हणाले की, “समझोता बॉम्बस्फोटात त्याच्या विरुद्ध कोणतेही पुरावे सापडलेले नाही. तो त्या प्रकरणात कधीही आरोपी नव्हता. मी अजूनही हैराण आहे की, त्याचं नाव या प्रकरणात का जोडण्यात आलं.” तसंच ते पुढे म्हणाले की, 2008 साली मालेगाव स्फोटाप्रकरणी मुबंई एटीएसने पुरोहित विरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. याचप्रकरणी त्याची एनआयएकडून चौकशी सुरु आहे.
एनआयएने समझोता बॉम्बस्फोटाप्रकरणी आठ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. ज्यामध्ये स्वामी असीमानंद, सुनील कलसंगरा, संदीप दांगे (दोघे फरार आहेत), लोकेश कुमार, कमल चौहान, अमित आणि राजेंद्र चौधरी यांचा समावेश आहे.
============================================
'त्या' अटीनंतर दीपिका आणि सलमान एकत्र
मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोणला अखेर बॉलिवूडचा दबंग सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. दिग्दर्शक कबीर खानच्या आगामी सिनेमात ती सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मात्र हा सिनेमा साईन करण्यापूर्वी दीपिकाने कबीरसमोर एक अट ठेवली होती.
कबीर खान नुकतेच दीपिका पादुकोणकडे नव्या सिनेमाची ऑफर घेऊन गेले होते. मात्र सलमान असलेल्या सिनेमात दुय्यम भूमिका साकारणार नाही, अशी अट दीपिकाने कबीर खानसमोर ठेवली.
खरंतर सलमानच्या सिनेमात अभिनेत्रींना फक्त सुंदर दिसण्याशिवाय दुसरं काम नसतं. संपूर्ण सिनेमात सलमानच दिसतो. त्यामुळे दीपिकाने आधीच कबीर खानला सांगितलं की, तिची भूमिका दमदार असायला हवी. आता कबीर खानही दीपिकाची ही अट लक्षात घेऊन स्क्रिप्टवर काम करत आहेत.
मागील एका मुलाखतीत दीपिकाने सलमान खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर काबूल एक्स्प्रेस, एक था टायगरचे दिग्दर्शक कबीर खानने तिला सल्लूसोबतच्या सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. यानंतर दीपिकाने ठेवलेली अट कबीर खानने मान्य केली.
============================================
मुंबईच्या रस्त्यावर स्टेनची गोलंदाजी
मुंबई: आयीपएलच्या निमित्तानं भारतात आलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन मुंबईत गल्ली क्रिकेट खेळताना दिसला. स्वतः स्टेननंच मुंबईच्या छोट्या मैदानातील आपल्या गोलंदाजीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
स्टेडियम असो वा गल्ली, स्टेनचा नेम कधी चुकत नाही, असंच म्हणायला हवं. स्टेन यंदा आयपीएलमध्ये गुजरात लायन्सचं प्रतिनिधित्व करतोय. मात्र त्याला अजून यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही.
============================================
आमीरचं स्तुत्य पाऊल, महाराष्ट्रातील दोन दुष्काळग्रस्त गावं दत्तक
मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खान चित्रपटांसोबतच सामाजिक कार्यासाठीही ओळखला जातो. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पाहता, आमीरने ताल आणि कोरेगाव ही दोन गावं दत्तक घेतली आहेत.
बॉलीवूड अभिनेता आमिर खान चित्रपटांबरोबर सामाजिक कार्यासाठीही ओळखला जातो. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी आमीरने ताल आणि कोरेगाव ही दोन गावं दत्तक घेतली आहेत. आमीरने काही दिवसांपूर्वीच या गावांचा दौरा केला होता. त्यावेळीच त्याने ही गावं दत्तक घेण्याचं ठरवलं होतं.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी बॉलिवूडमधील काही संवेदनशील कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, अक्षय कुमार पाठोपाठ आता आमीर खानही दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून आला आहे.
दुष्काळ निवारणासाठी ‘पाणी फाऊंडेशन’च्या माध्यमातून प्रयत्न
राज्यातील दुष्काळ निवारणासाठी आमीर खान ‘पाणी फाऊंडेशन’च्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. आमीर आणि दिग्दर्शक सत्यजीत भटकळ ‘पाणी फाऊंडेशन’ आणि ‘सत्यमेव जयते वॉटर कप’साठी काम करत आहे. आमीरने काही दिवसांपूर्वी औरंगाबादला भेट देऊन राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानाचं कौतुक केलं होतं. शिवाय तिथल्या लोकांना दुष्काळाशी लढण्याचे उपाय सांगितले होते.
============================================
त्र्यंबकेश्वर गर्भगृहासमोरच महिलांना अमानुष मारहाण
नाशिक : त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी गेलेल्या स्वराज्य संस्थेच्या महिलांना तिथेच अमानुष मारहाण करण्यात आली. आज सकाळी ही घटना घडली.
कायद्याने सगळ्यांना गर्भगृहात प्रवेश देण्याचे आदेश कोर्टाने दिल्यानंतर स्वराज्य संस्थेच्या महिलांनी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली. मात्र मंदिर पुजारी आणि मानकऱ्यांसह गावकऱ्यांनीही विरोध केला.
गर्भगृह प्रवेश टाळण्यासाठी कडक अटी, शर्ती लागू करण्यात आल्या. त्यानुसार आज सकाळी 6 ते 7 ही दर्शनासाठीची वेळ म्हणून निश्चित करण्यात आली. मात्र महिला गर्भगृहासमोर दर्शनासाठी येताच वेळ संपल्याचं सांगत बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला.
या अटींना विरोध केल्यानंतर गर्भगृहासमोर असलेल्या तथाकथित संस्कृतीरक्षकांनीच महिलांना अमानुष मारहाण केली. या प्रकरणी 150 गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
============================================
मुंबई - पुणे सामना गहुंजे मैदानावरच
मुंबई: मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे संघांमध्ये एक मे रोजी होणारा आयपीएलचा सामना हा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुण्यातच होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं तो सामना पुण्यात खेळवण्यासाठी बीसीसीआयला परवानगी दिली आहे.
महाराष्ट्रातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, आयपीएलचे 30 एप्रिलनंतरचे महाराष्ट्रातले सामने अन्य शहरांमध्ये खेळवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता. त्यामुळं रायझिंग पुणेनं मे महिन्यातल्या सामन्यांसाठी आपलं होमग्राऊंड म्हणून पुण्याऐवजी विशाखापट्टणमचा पर्याय स्वीकारला. पण रायझिंग पुणेचा गुजरात लायन्सविरुद्धचा सामना हा 29 एप्रिलला पुण्यात खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे एक मे रोजी पुण्याचा पुढचा सामना मुंबई इंडियन्सशी नियोजित आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा सामना महाराष्ट्राबाहेर खेळवायचा तर, त्या सामन्यासाठी टेलिव्हिजन प्रक्षेपणाचं सामान केवळ एका दिवसांत दुसऱ्या शहरात म्हणजे पर्यायानं विशाखापट्ट्णमला हलवणं आवश्यक होतं. पण दळणवळणांच्या सोयींअभावी ते शक्य नसल्याचं कारण पुढे करून, एक मेचा मुंबई-पुणे सामना हा पुण्यातच खेळवण्याची परवानगी द्यावी म्हणून बीसीसीआयनं मुंबई उच्च न्यायालयाकडे विनंती अर्ज केला होता. बीसीसीआयची ती विनंती मुंबई उच्च न्यायालयानं स्वीकारली आहे.
============================================
जम्मू-काश्मीर : व्हॉट्सअॅप ग्रुप उघडण्यासाठी मिळवावा लागणार 'लायसन्स'
- ऑनलाइन लोकमतश्रीनगर, दि. २० - कोणत्याही अफवा पसरून काश्मीर खो-यातील वातावरण बिघडू नये यासाठी जम्मू-काश्मीर सरकार कठोर पावले उचलत असून त्याच पार्श्वभूमीवर आता व्हॉट्सअॅप न्यूज ग्रुप उघडण्साठी लायसन्स मिळवावा लागणार आहे. हांडवारा येथे नुकत्याच झालेल्या निदर्शनांदरम्यान ५ नागरिकांना जीव गमवावा लागल्यानंतर काश्मीरमध्ये तीन दिवस इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.त्यानुसार आता व्हॉट्सअॅप न्यूज ग्रुप उघडण्यासाठी अॅडमिनला येत्या १० दिवसांत सरकारी अधिका-यांकडे अर्ज करून परवाना मागावा लागेल. ' एखाद्या ग्रुपवर टाकण्यात आलेल्या कोणत्याही पोस्ट्ससाठी त्या ग्रुपचा अॅडमिन जबाबदार असेल. तसेच कोणत्याही बेजबाबदार पोस्ट्स व शे-यांमुळे अप्रिय घटना घडल्यास त्यासाठी त्या ग्रुप अॅडमीनवर कारवाई करण्यात येईल' असे कुपवाडा जिल्हाधिका-यांच्या कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
============================================
ह्युस्टनमध्ये महाभयंकर पूर, आपत्ती निवारण विभागाकडून ऐतिहासिक पावसाची नोंद
- ऑनलाइन लोकमतअमेरिका, दि. 20- ह्युस्टन शहरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ह्युस्टनमध्ये सोमवारी 44.7 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. ही नोंद ऐतिहासिक असल्याचंही आपत्ती निवारण विभागानं म्हटलं आहे. टेक्सासच्या गव्हर्नरनं ह्युस्टनमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. 70,000 हजार लोकांनी वीज नसल्यानं शहर सोडलं आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरातून जवळपास 1200 लोकांनी वाचवण्यात यश आलं आहे. या पूर परिस्थितीमुळे ह्युस्टन शहराचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. या पुरात अनेक प्राणी वाहून गेल्याची माहिती समोर येते आहे. सरकारनं लहान मुलांना पाण्यात खेळण्यासही मज्जाव केला आहे. या पूरस्थितीमुळे अनेक जण प्रभावित झाले आहेत.
============================================
शिक्षकांचा सन्मान वाढवण्यासाठी अर्जेंटिनामध्ये कठोर शिक्षेची तरतूद
- ऑनलाइन लोकमतलंडन, दि. २० - समाजात शिक्षकी पेशाला आदर, सन्मानाचे स्थान मिळाले पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षक गुरुस्थानी असतो. पण बदलत्या काळानुसार शिक्षणाचे बाजारीकरण झाल्यामुळे शिक्षकी पेशाबद्दलचा हा आदर, सन्मान लोप पावत चालला आहे. जगभरात शिक्षकांना मारहाणीच्या त्यांच्यावरील हल्ल्याच्या घटना वाढत आहेत.दक्षिण अमेरिकेतील देश अर्जेंटिनाने समाजातील शिक्षकांचे महत्व लक्षात घेऊन शिक्षकांच्या सुरक्षेसाठी विशेष कायद्याचा प्रस्ताव तयार केला आहे. नव्या कायद्यात अन्य नागरीकांसारखा शिक्षकांवर हल्ला केला तर, जास्त शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरीकावर हल्ला केल्यानंतर जी शिक्षा होते त्यापेक्षा २५ टक्के जास्त तुरुंगवास शिक्षकावर हल्ला केल्यानंतर भोगावा लागेल.अर्जेंटिनाचे शिक्षणमंत्री इस्टेबॅन बुलरिच यांनी ही माहिती दिली. शिक्षकांबद्दलचा आदर, धाक वाढावा यासाठी ही तरतुद केल्याचे त्यांनी सांगितले. अर्जेंटिना काँग्रेसने अद्याप या कायद्याला मंजुरी दिलेली नाही. फक्त मारहाणच नव्हे तर शिक्षकाला शाब्दीक अपशब्द वापरणे, धमकावण्यासाठीही शिक्षेची तरतुद आहे.
============================================
कर्मचाऱयांनो काम करा; राजकारण नको-केजरीवाल
नवी दिल्ली- कर्मचाऱयांनो काम करा; राजकारण नको. राजकारणात जर जायचे असेल तर प्रथम राजीनामा द्या, निवडणूक लढा व आमच्याशी सामना करा, असा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कर्मचाऱयांना दिला आहे.
केजरीवाल यांनी कर्मचाऱयांना कड्या शब्दांत फटकारले आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ते म्हणाले, ‘तुम्ही समजा अथवा समजू नका. परंतु, पुढील 10-15 वर्षे आम्ही कुठे जाणार नाही. नागरिकांमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींशी राजकारण करू नका. राजकारणामुळे सरकारी कामावर व विश्वासहार्यतेवर परिणाम होतो. माझे सरकार हे दिल्लीच्या नागरिकांसाठी काम करत आहे. काम करण्यासाठी जनतेने आम्हाला निवडून दिले आहे.‘
‘सरकारी कर्मचाऱयांनी विश्वासाने व पारदर्शी सरकारचा एक भाग झाले पाहिजे. दिल्लीच्या नागरिकांची सेवा केली पाहिजे. आम्ही पुढील 10-15 वर्षे कुठे जाणार नाही. कोणाला जर नोकरी करायची नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन राजकारणात जावे,‘ असेही केजरीवाल म्हणाले.
कर्मचाऱयांनो काम करा; राजकारण नको-केजरीवाल
केजरीवाल यांनी कर्मचाऱयांना कड्या शब्दांत फटकारले आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना ते म्हणाले, ‘तुम्ही समजा अथवा समजू नका. परंतु, पुढील 10-15 वर्षे आम्ही कुठे जाणार नाही. नागरिकांमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींशी राजकारण करू नका. राजकारणामुळे सरकारी कामावर व विश्वासहार्यतेवर परिणाम होतो. माझे सरकार हे दिल्लीच्या नागरिकांसाठी काम करत आहे. काम करण्यासाठी जनतेने आम्हाला निवडून दिले आहे.‘
‘सरकारी कर्मचाऱयांनी विश्वासाने व पारदर्शी सरकारचा एक भाग झाले पाहिजे. दिल्लीच्या नागरिकांची सेवा केली पाहिजे. आम्ही पुढील 10-15 वर्षे कुठे जाणार नाही. कोणाला जर नोकरी करायची नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन राजकारणात जावे,‘ असेही केजरीवाल म्हणाले.
============================================
'डब्लूटीओ'च्या निर्णयाविरोधात भारत मागणार दाद
लंडन - भारतामधील सौर कंपन्यांबरोबर येथील सरकारने केलेले करार हे आंतरराष्ट्रीय व्यापार संकेतांचे उल्लंघन करणारे असल्याच्या जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) समितीने दिलेल्या निर्णयाविरोधात अपील करणार असल्याचे सरकारने आज (बुधवार) स्पष्ट केले.
भारताचे धोरण हे अमेरिकन कंपन्यांवर अन्याय करणारे असल्याचा आरोप करत अमेरिकेने 2014 मध्ये या प्रकरणी डब्यूटीओमध्ये धाव घेतली होती. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर समितीने गेल्या फेब्रुवारी महिन्यात भारताविरोधात निर्णय दिला होता. मात्र या निर्णयाविरोधात "येत्या काही दिवसांत‘ दाद मागणार असल्याचे केंद्रीय उर्जा मंत्री पीयुष गोयल यांनी सांगितले. ""अमेरिकेमधील सुमारे 16 योजनांतर्गत येथील देशांतर्गत उत्पादकांना सरकारद्वारे पाठिंबा देण्यात येत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. यामुळे भारताची भूमिका अधिक बळकट होईल,‘‘ असे गोयल म्हणाले.
भारतामधील सौर धोरणांतर्गत अवलंबिण्यात आलेले देशांतर्गत उत्पादनासंदर्भातील कलम हे भेदभावाचे असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. डब्ल्यूटीओमध्ये अमेरिकेविरोधात भारतास दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला आहे. याआधी अमेरिकेतील मांस व अंड्यांवर भारतामध्ये घालण्यात आलेली बंदी ही आंतरराष्ट्रीय व्यापार संकेतांचा भंग करणारी असल्याचे सांगत डब्ल्यूटीओने अमेरिकेच्या बाजुने निर्णय दिला होता. भारतामधील नव्या सरकारच्या उर्जा धोरणामध्ये सौरउर्जेस विशेष स्थान देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हे वृत्त अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

अमेरिका: शिख तरुणास उतरवावी लागली पगडी
सॅन फ्रान्सिस्को - अमेरिकेमधील शिख समुदायाच्या मुलांना सामना कराव्या लागणाऱ्या वर्चस्ववादासंदर्भात एक पुस्तक लिहिणाऱ्या शिख तरुणास कॅलिफोर्निया येथील विमानतळावर जबरदस्तीने पगडी उतरविण्यास भाग पाडले गेल्याचे वृत्त आज (बुधवार) सूत्रांनी दिले.
करणवीर सिंग पन्नु या न्यू जर्सीमधील 18 वर्षीय तरुणाने "बुलींग ऑफ सिख अमेरिकन चिल्ड्रेन: थ्रु दी आईज ऑफ ए सिख अमेरिकन हाय स्कूल स्टुडंट‘ हे पुस्तक लिहिले असून; कॅलिफोर्नियातील बेकर्सफिल्ड येथील शिख तरुणांच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये व्याख्यान देण्यासाठी तो जात असताना हा प्रकार घडला.
""विमानतळावरील मेटल डिटेक्टरची चाचणी झाल्यानंतर मला पगडीसंदर्भातील चाचणीचे निर्देश देण्यात आले. यानंतर दुसऱ्या खोलीमध्ये नेऊन माझी पगडी पूर्णपणे काढण्यास सांगण्यात आले. आधी मी यास नकार दिला; मात्र त्याशिवाय मला विमानप्रवासाची परवानगी देता येणार नाही, असे सांगण्यात आल्याने मी यास मान्यता दिली. मात्र मला पगडी पुन्हा बांधण्यासाठी आरसा देण्यात यावा, अशी अट मी घातली होती,‘‘ असे पन्नु म्हणाला.
दरम्यान, विमानतळ प्रशासनाने या प्रकाराबद्दल थेट प्रतिक्रिया टाळली आहे. मात्र सर्व प्रवाशांना आदर व मानाची वागणूक देण्यासंदर्भातील प्रशिक्षण येथील सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या प्रकारामुळे आपण "अत्यंत अपमानित व व्यथित‘ झाल्याचे पन्नु याने म्हटले आहे.

देशातील 25% लोकसंख्येस दुष्काळाचा फटका
नवी दिल्ली - देशातील सुमारे 33 कोटी नागरिकांचे जीवन दुष्काळामुळे होरपळून निघाल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयास देण्यात आली.
दुष्काळच्या आव्हानावर उपाययोजना करणाऱ्या राज्यांना केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीमधून मदत देण्यात येत असल्याचेही केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पी एस नरसिंह यांनी आज न्यायालयामध्ये यासंदर्भातील माहिती सादर केली. मनरेगा योजनेंतर्गत या महिन्यात आत्तापर्यंत सुमारे 19 हजार कोटी रुपयांचा निधी विविध राज्यांत पाठविण्यात आला असून यामुळे 21 लाखपेक्षा जास्त कुटूंबांस 100 पेक्षा जास्त दिवसांचा रोजगार मिळाला आहे.
परंतु, देशातील दुष्कळाची परिस्थिती यापेक्षाही अधिक गंभीर असण्याची भीती आहे. बिहार आणि हरियाना या दोन राज्यांनी कमी पाऊस झाला असतानाही दुष्काळ जाहीर केलेला नाही. या राज्यांनी दुष्काळ जाहीर न केल्यास केंद्रास मदत करता येणार नाही, असे नरसिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.

न्यायाधीश मदन बी लोकुर आणि न्यायाधीश एन व्ही रामण्णा यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आलेल्या या अहवालामध्ये देशातील एकूण 678 जिल्ह्यांपैकी किमान 254 जिल्ह्यांमधील अडीच लाखांहून जास्त गावांना दुष्काळाचा फटका बसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र हा अहवालामध्ये गुजरात राज्याचा समावेश न करण्यात आल्याबद्दल खंडपीठाकडून विचारणा करण्यात आल्यानंतर असे चुकून झाल्याचे स्पष्ट करत गुजरातमधील परिस्थिती स्पष्ट करणारी माहितीही न्यायालयासमोर सादर करण्यात येईल, असे नरसिंह यांनी सांगितले.
दुष्काळाचा सर्वाधिक फटका उत्तर प्रदेश राज्यास बसला आहे. राज्यातील 50 जिल्ह्यांमधील पावसाच्या कमी प्रमाणामुळे सुमारे 9.88 नागरिकांचे जनजीवन प्रभावित झाले आहे. सरकार या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व उपाययोजना करत असून दुष्काळग्रस्त नागरिकांस दिलासा व मदत करण्यासाठी अधिकाधिक निधीची सोय करण्यात येत आहे.

'घरातील प्रदूषणापासून सावधान!'; संशोधकांचा इशारा
वॉशिंग्टन डी सी - नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून घरातील प्रदूषणामुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी धोरण तयार करणे आवश्यक असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.
युरोपियन, ऑस्ट्रेलियन आणि ब्रिटनमधील संशोधकांनी संयुक्तपणे केलेल्या संशोधनातून घरातील प्रदूषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे संशोधन नुकतेच एका नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे. "विविध माध्यमांतून आपल्या घरातील किंवा कार्यालयातील हवा प्रदूषित होत असते. त्यामध्ये स्वयंपाक करताना निर्माण झालेले वायू, विविध वस्तूंवर तसेच भिंतींवर लावलेले रंग, बुरशीजन्य वनस्पती आदी कारणांमुळे घरातील हवा बाहेरील हवेपेक्षा अधिक प्रदूषित होत असते.‘ अशी माहिती सुरै विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. प्रशांत कुमार यांनी दिली. जगभरात 2012 मध्ये घरातील प्रदूषणामुळे 43 लाख जणांना प्राणाला मुकावे लागले होते. तर त्याचवर्षी बाहेरील प्रदूषणातील केवळ 37 लाख जणांचा मृत्यु झाला होता.
शहरी भागातील लोक दिवसभरातील 90 टक्के वेळ हा बंद खोल्यात किंवा घरात घालवत असतात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या "सिक बिल्डिंग सिंड्रोम‘मुळे श्वसनासह आरोग्यावर दुष्परिणाम होत असतात. जर एखाद्या व्यक्तीला घरातील हवेची गुणवत्ता सहजपणे तपासता आली तर त्या व्यक्तीला घरामधील हवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करता येऊ शकतील, असेही कुमार यांनी सांगितले.

एमबीए होऊनही बंटी विकतो चहा
नागपूर - वडिलांचे निधन झाल्यावर जिद्दीच्या बळावर शिक्षण पूर्ण केले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एमबीए पूर्ण करून नोकरीसाठी शोधाशोध केली. मात्र, नोकरी मिळाली नाही. कुटुंबाला आधार व्हावा, यासाठी आईसोबत चहाच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. वर्षभरापासून नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून चहाचे दुकान चालविणारा बंटी कुटुंबाचा गाडा ओढतो आहे.
एमबीए होऊनही बंटी विकतो चहा
दीक्षाभूमी परिसरात बंटीचे चहाचे दुकान आहे. बंटीचे शिक्षण एमबीए झाले. परंतु, पोटासाठी चहाचे दुकान चालवितो. वडिलांच्या निधनाने त्याच्या आईने चहा विकायला सुरुवात केली. बंटी आईला मदत म्हणून ग्राहकांना चहा देतो. ऊन-पावसाची पर्वा न करता आईसोबत काम केले. पावसाळ्यात पुस्तके भिजतील म्हणून ताडपत्री अंगावर घेऊन दुकानातच अभ्यास केला. दहावीपर्यंत अध्ययन मंदिर येथे शिक्षण घेतले. पुढचे शिक्षण डॉ. आंबेडकर महाविद्यालयात झाले.
चांगली नोकरी मिळावी म्हणून एमबीए करायचे ठरविले. एमबीएचे शुल्क देण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून व्याजाने काढले. कॉलेज झाल्यानंतर दुकानात काम केले. एमबीए पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी शोधाशोध केली. मात्र, यश काही मिळाले नाही. आईचे वय झाल्यामुळे ती एकटी दुकान सांभाळू शकत नाही. म्हणून बंटी आणि त्याची बहीण दोघेही दुकानात राबतात. नोकरीसाठी प्रयत्न सुरू आहेत, पण मिळत नाही. म्हणून पोटासाठी हा पर्याय निवडल्याचे बंटी सांगतो.
आईने खूप परिश्रम केले. तिच्या कष्टाचे चीज व्हावे यासाठी माझी धडपड सुरू आहे. नोकरी मिळत नाही म्हणून नैराश्य आले होते. पण, आईकडे बघून पुन्हा उभारी मिळते.
- बंटी कदम
============================================
'श्रावणबाळ' वीस वर्षांपासून करतोय आईची सेवा
आग्रा- गेल्या वीस वर्षांपासून आईला डोक्यावर बसवून चालत चारधाम तीर्थयात्रा घडविण्याचे काम कलियुगातील ‘श्रावणबाळ‘ करत आहे. कैलास गिरी असे (वय 50) असे या ‘श्रावणबाळा‘चे नाव.
कैलास गिरी हे मध्यप्रदेशातील जबलपूरचे रहिवासी. कैलास यांना लहान असताना त्यांच्या आईने रामायणातील श्रावणबाळाची गोष्ट सांगितली होती. या गोष्टीचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. कैलास हे 28 वर्षांचे असताना त्यांनी प्रथम कीर्ती देवी आईला चारधाम यात्रा घडविण्याचे ठरविले. एक टोपली तयार करून आईला त्यामध्ये बसून ते पायी चारधामची तीर्थयात्रा घडवितात. 36 हजार 582 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला आहे.
‘फेब्रुवारी 1996 पासून आईला डोक्यावर घेऊन चारधामची यात्रा करत आहे. आईमुळेच माझीही तीर्थयात्रा घडली आहे. लहान असताना एका झाडावरून खाली पडलो होतो. नागरिकांनी मृत्युमुखी पडल्याचे सांगितले. परंतु, आईने मांडीवर घेऊन देवाकडे प्रार्थना केली. पुढे मला जीवदान मिळाले. दहा वर्षांचा असतानाच वडिलांचे निधन झाले आहे. पुढे बहीण व भावाचाही मृत्यू झाला. यामुळे आयुष्यभर आईची सेवा करायची ठरवले. माझ्याकडून आईला कोणतीही अपेक्षा नाही. परंतु, आईची सेवा केल्यामुळे मोठे समाधान मिळत आहे. अनेकजण मला श्रावण म्हणून हाक मारतात. परंतु, मला हे आवडत नाही. मी फक्त माझे कर्तव्य करत आहे,‘ असे कैलास यांनी सांगितले.
दरम्यान, कैलास गिरी यांनी नुकतीच चारधाम तीर्थयात्रा केली. गावात परतल्यानंतर गावकऱयांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले.

मोदी अमेरिकन कॉंग्रेसला संबोधित करणार
वॉशिंग्टन - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेमधील लोकप्रतिनिधीगृहांच्या आगामी संयुक्त अधिवेशनास संबोधित करण्यासाठी आमंत्रित करण्यात यावे, अशा आशयाची मागणी अमेरिकेमधील चार लोकप्रतिनिधींनी येथील लोकप्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष पॉल रायन यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केली आहे. मोदी हे येत्या जून महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
"संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, अवकाश संशोधन अशा इतर अनेक क्षेत्रांमध्ये भारत व अमेरिका या दोन देशांमधील संबंधांच्या वाढत्या व्याप्तीच्या पार्श्वभूमीवर भारतीय पंतप्रधानांची यासंदर्भातील भूमिका थेटपणे जाणून घेण्याची ही उत्तम संधी असेल. भारतीय पंतप्रधानांस या अधिवेशनास संबोधित करण्याच्या आमंत्रणामधून दोन देशांमधील या विशेष भागीदारीस सभागृहाचा असलेला पाठिंबा स्पष्टपणे दर्शविता येईल,‘‘ असे या पत्रामध्ये म्हटले आहे.
मोदी अमेरिकन कॉंग्रेसला संबोधित करणार
"संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, अवकाश संशोधन अशा इतर अनेक क्षेत्रांमध्ये भारत व अमेरिका या दोन देशांमधील संबंधांच्या वाढत्या व्याप्तीच्या पार्श्वभूमीवर भारतीय पंतप्रधानांची यासंदर्भातील भूमिका थेटपणे जाणून घेण्याची ही उत्तम संधी असेल. भारतीय पंतप्रधानांस या अधिवेशनास संबोधित करण्याच्या आमंत्रणामधून दोन देशांमधील या विशेष भागीदारीस सभागृहाचा असलेला पाठिंबा स्पष्टपणे दर्शविता येईल,‘‘ असे या पत्रामध्ये म्हटले आहे.
============================================
गोळवलकर गुरुजींच्या फोटोसमोर नितीशकुमार
नवी दिल्ली - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे संघमुक्त भारताची घोषणा करत असतानाच माजी सरसंघचालक गोळवलकर गुरूजींच्या प्रतिमेसमोर एका कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करतानाचे त्यांचे छायाचित्र ट्विटरद्वारे समोर आले आहे.
मागील आठवड्यात संयुक्त जनता दलाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर नितीशकुमार यांनी, "देशाचे विभाजन करणाऱ्या भाजप आणि त्याच्या विचारसरणीला रोखण्यासाठी सर्व भाजपेतर पक्षांनी एकत्र यायला हवे. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये संघाचे कसलेही योगदान नाही‘ असे म्हणत देशाला विनाकारण राष्ट्रवाद आणि घोषणाबाजीच्या संघर्षात ओढले जात असल्याचे सांगून संघमुक्त भारताची घोषणा केली.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते राम माधव यांनी नितीशकुमार हे गुरुजींच्या प्रतिमेसमोर एका कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करत असल्याचे छायाचित्र ट्विटरद्वारे शेअर केले आहे. हे छायाचित्र नयन मणी कुमार नावाच्या व्यक्तीने ‘संघयुक्त भारतासाठी गुरूजींचे आशीर्वाद घेताना नितीश बाबु‘ असे लिहून ट्विटरवर शेअर केले होते. या छायाचित्राबाबत अधिक तपशील देण्यात आलेला नाही. मात्र हेच छायाचित्र राम माधव यांनी रिट्विट करत "हा त्यांच्या (नितीशकुमार) धोरणाचा एक भाग असू शकतो‘ असे म्हटले आहे. या छायाचित्रामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अंत्यसंस्कारातील कार्यांना फाटा देऊन पाणीपुरवठा
लातूर - भुतडा परिवाराने कौशल्याबाई भुतडा यांच्या स्मरणार्थ तीन टॅंकरद्वारे नागरिकांसाठी मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.
अंत्यसंस्कारातील कार्यांना फाटा देऊन पाणीपुरवठा
लातूर - अंत्यसंस्कारातील धार्मिक कार्यांना बगल देऊन भुतडा परिवाराने समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. भुतडा परिवाराच्या वतीने कौशल्याबाई भुतडा यांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने तीन टॅंकरद्वारे तहानलेल्या नागरिकांना मोफत पाणीपुरवठा केला जात आहे.
सत्संग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच धार्मिक, सामाजिक उपक्रमात हिरीरीने सहभाग नोंदवणारे रमेश भुतडा, सुरेश भुतडा, लक्ष्मीरमण भुतडा यांच्या आई कौशल्याबाई नारायणदास भुतडा (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात धार्मिक कर्म टाळून तहानलेल्या लातूरकरांसाठी मोफत पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. सध्या तीन टॅंकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. कौशल्याबाई भुतडा धार्मिक कार्ये व लोककल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत असत. त्यांनी १५ वर्षांपूर्वी गांधी चौक परिसरात उन्हाळ्यात पाणपोई चालवून त्याद्वारे तहानलेल्यांना पाणी देण्याचे काम केले होते. आईचा हा वारसा पुढे चालवण्याचे काम भुतडा बंधूंनी हाती घेतले असून, शहराजवळील कव्हा, कातपूर शिवारासह मिळेल तेथून पाणी विकत घेऊन शहरवासीयांना मोफत पुरवले जात आहे. मोतीनगर, मंठाळेनगर, हनमंतवाडी, रामगल्ली, केशवराज मंदिर, पापनास रोड, सोलापूर गल्ली, उजनीवाली गल्ली, एलआयसी कॉलनी, बोधेनगर आदी भागांत हा पाणीपुरवठा सुरू आहे.
============================================
No comments:
Post a Comment