============================================================
मुंबई : ज्या चित्रपटाने महाराष्ट्रासह भारताला वेड लावलं आहे, तो ‘सैराट’ पाहून बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खानही निःशब्द झाला आहे. आमीरने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
‘नुकताच सैराट पाहिला. माझं हृदय हेलावून गेलं आहे. चित्रपटाच्या शेवटाच्या धक्क्यातून अजून सावरतोय.’ असं आमीरने पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दुसऱ्या ट्वीटमधून आमीरने दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतद्वयी अजय अतुल, अभिनेत्री रिंकू राजगुरु, अभिनेता आकाश ठोसर यांच्यासह सहाय्यक भूमिकेत असलेल्या तानाजी गालगुंडे आणि अरबाज शेख या गुणी अभिनेत्यांचंही कौतुक केलं आहे. सैराटच्या सर्व
कलाकार आणि तंत्रज्ञांसह झीचं अभिनंदन, असं आमीरने दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
कलाकार आणि तंत्रज्ञांसह झीचं अभिनंदन, असं आमीरने दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
तिसऱ्या ट्वीटमध्ये आमीरने अद्यापही ‘सैराट’ न पाहिलेल्या प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे.
============================================================
मेडिकलचे प्रवेश 'नीट' नुसारच
============================================================
गया हत्याकांड : आमदारपुत्र रॉकी यादवला अटक
नवी दिल्ली : बिहारच्या गया येथील विद्यार्थी हत्येप्रकरणी पोलिसांनी जेडीयूच्या आमदार मनोरमा देवी यांच्या मुलाला अखेर अटक करण्यात आली आहे. रॉकी यादव असं आमदाराच्या मुलाचं नाव आहे. पोलिसांनी अटकेच्या पार्श्वभूमीवर अधिक माहिती देण्यास नकार दिला. पोलिस आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाशी संबंधित माहिती देण्याची शक्यता आहे.
गाडी ओव्हरटेक करण्यावरुन शनिवारी रॉकी आणि आदित्य नावाचा पीडित मुलगा यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर रॉकीने रस्त्यावरच गोळी मारुन त्याची हत्या केली होती. या घटनेनंतर रॉकी फरार झाला होता. पोलिस त्याच्या शोधात होते.
============================================================
भिवंडीत महिलेला भर रस्त्यात विवस्त्र करुन मारहाण, लालबावटा संघटनेचं कृत्य
भिवंडी : लालबावटा संघटनेच्या पुरुष सदस्यांनी सविता पाटील या 35 वर्षीय विवाहित महिलेला भर रस्त्यात अडवून विवस्र करून लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती मिळते आहे.
वाचवण्यासाठी आलेल्या पतीलाही जबर मारहाण
मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी श्रमजीवी संघटनेच्या पॅनेलचं काम केल्याचा राग मनात ठेवून लालबावटा संघटनेच्या पुरुष सदस्यांनी सविता पाटील यांना जबर मारहाण केली. त्यावेळी सविता यांना वाचवण्यासाठी आलेल्या त्यांचा पती संतोष पाटील व इतर कार्यकर्त्यांनासुद्धा त्यांचा पाठलाग करुन, रस्त्यात पाडून लाकडी दांडक्याने मारहाण केली.
============================================================
नवी मुंबईत बिल्डर राज कंदारी यांचा आत्महत्येचा प्रयत्न
नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रसिद्ध स्वराज बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे मालक राज कंदारी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सानपाडा येथील राहत्या घरी त्यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी घातली. जखमी अवस्थेत त्यांना वाशीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून ते व्हेंटिलेटरवर आहेत.
राज कंदारी यांनी चेंबूर, ऐरोली, कोपरखैराणे, सानपाडा, उलवे, नवीन पनवेल येथे मोठे टॉवर उभारले आहेत.
आर्थिक संकटातून आत्महत्या?
राज कंदारी हे गेल्या काही दिवसापासून आर्थिक संकटात असल्याचे सांगितले जात आहे. नवीन पनवेल आणि उलवा इथे हाती घेतलेल्या प्रोजेक्टमध्ये त्यांचं मोठं नुकसान होत होते. पनवेलमधील वाकडी गावाजवळ 99 एकर परिसरात स्वराज लगुना हा राज कंदारी यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. मात्र या प्रोजेक्टला काही परवानग्या मिळत नव्हत्या. तर उलवा येथील होम प्रोजेक्टला काही राजकीय कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जात असल्याचे समजतं. मागील काही दिवसापासून राज कंदारी आर्थिक संकटात होते. त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही कामावरुन काढलं होतं. तर काहींचा पगार कमी केला होता.
दरम्यान, राज कंदारी यांच्याशेजारी सुसाईड नोट सापडली आहे. मात्र यात त्यांनी कोणाच्याही नावाचा स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही. त्यामुळे आता राज कंदारी यांनी आत्महत्येचा केलेला प्रकार म्हणजे ठाण्यातील ‘ सूरज परमार’ प्रकरण तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.
============================================================
भेंडवळमधील भविष्यवाणीतून बळीराजाला दिलासा
बुलडाण्यातील भेंडवळमधील भविष्यवाणीला सुरुवात झाली आहे. आज पुंजाजी वाघ, शारंगधर वाघ यांनी सकाळी घटस्थापना करुन भविष्यावाणीला सुरुवात केली. त्यानुसार यंदा पाऊस साधारण स्वरुपात चांगला राहील.
पहिला महीना साधारण पण लहरी पाऊस. दुसऱ्या महिन्यात चांगला पाऊस, अतिवृष्टी संभवते, तर तिसऱ्या महिन्यात चांगला पाऊस अतिवृष्टीही होईल, असा अंदाज भविष्यवाणीत मांडण्यात आला आहे.
देशावर चारा-पाण्याची टंचाई येईल. मूग आणि उडीद पिकांची काही भागात नासाडी, तीळ पिक साधारण असेल, पण नासाडीही होईल, असंही भविष्यवाणीत वर्तवण्यात आलं आहे. तांदूळ, जवस यांची नासाडी होण्याचंही यात म्हटलं आहे. तर गहू, हरभरा पिकांच्या भावात तेजी मंदी राहील.
देशाच्या संरक्षण खात्यावर ताण येईल. शिवाय, परकीय घुसखोरीचं आव्हानही देशासमोर असेल. त्यामुळे सैन्यासमोरील आव्हानं वाढतील, असंही भेंडवळच्या भविष्यवाणीत म्हटलं आहे.
देशात आर्थिक तणाव राहील. देश आर्थिक संकटात येईल. पंतप्रधानांना हे वर्ष बरे नाही. त्यांच्यावर अनेक राजकीय आणि आर्थिक संकटं येतील, असेही या भविष्यवाणीत म्हटलं गेलं आहे.
============================================================
विराटच्या बंगलोरचा पंजाबवर सनसनाटी विजय
मोहाली : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरने किंग्स इलेव्हन पंजाबवर अवघ्या एका धावेने सनसनाटी विजय मिळवून आयपीएलमधले आपलं आव्हान कायम राखलं. बंगलोरचा नऊ सामन्यांमधला हा चौथा विजय ठरला. या चार विजयांसह बंगलोरच्या खात्यात आठ गुण झाले असून, आयपीएलच्या गुणतालिकेत बंगलोर आता सहाव्या स्थानावर आहे.
दरम्यान, बंगलोर आणि पंजाब संघांमध्ये मोहालीत झालेला सामना अखेरच्या चेंडूंपर्यंत रंगला. या सामन्यात बंगलोरने पंजाबला विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने विजयासाठी कठोर संघर्ष करुनही त्यांना एका धावेने पराभव स्वीकारावा लागला.
मुरली विजयच्या कर्णधारास साजेशा खेळीच्या जोरावर पंजाबने 20 षटकांत चार बाद 174 धावांची मजल मारली. मुरली विजयची ही खेळी पंजाबला विजय मिळवून देऊ शकली नाही. मुरली विजयने 57 चेंडूंत 12 चौकार आणि एका षटकारासह 89 धावांची खेळी उभारली.
त्याआधी एबी डिव्हिलियर्सच्या तुफानी खेळीच्या जोरावर बंगलोरनं 20 षटकांत सहा बाद 175 धावांची मजल मारली. डिव्हिलियर्सने 35 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने 64 धावांची खेळी रचली. लोकेश राहुलने 42 आणि सचिन बेबीने 33 धावांची खेळी करुन बंगलोरच्या डावाच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलला.
============================================================
अटकपूर्व जामीनासाठी निलेश राणें हायकोर्टात अर्ज करणार
============================================================
भारतातच मी अखेरचा श्वास घेईन : सोनिया गांधी
नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर लाच प्रकरणात गोत्यात आलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पंतप्रधानांना उत्तर दिलं आहे. मी शेवटचा श्वास भारतातच घेईन असं सोनिया गांधींनी केरळमधील एका सभेत म्हटलं.
‘भारताविषयी माझ्या मनात असलेलं प्रेम आणि समर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हिसकावू शकत नाहीत. भारतच माझं घर आहे आणि मी इथेच अखेरचा श्वास घेईन. माझ्या मृत्यूनंतर राखही इथल्याच जमिनीत मिसळेल, कारण इथल्या जनतेवर माझं प्रेम आहे.’ असं प्रत्युत्तर सोनियांनी दिलं.
हेलिकॉप्टर घोटाळा, नॅशनल हेराल्ड प्रकरण, रॉबर्ट वड्रा जमिन प्रकरणात गांधी कुटुंब सध्या भाजप आणि नरेंद्र मोदींच्या निशाण्यावर आहे. केरळ आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी सोनिया गांधींवर हल्लाबोल केला आहे.
============================================================
नागपुरातील गे आरोपीची भावासह भोपाळमधून धरपकड
============================================================
माजी खासदार निलेश राणेंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
============================================================
पनामा पेपर्सची माहिती टाकली ऑनलाइन
- ऑनलाइन लोकमत -वॉशिंग्टन, दि. 10 - इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमने (ICIJ) पनामा पेपर्सची लीक झालेली माहिती ऑनलाइन टाकली आहे. यामध्ये गुप्तरित्या कारभार करणा-या 2 लाखांहून अधिक कंपन्यांची माहिती यामध्ये देण्यात आली आहे.मोसेक फोन्सेकाकडून लीक झालेल्या डेटाबेसमधील काही कागदपत्रांच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे. या डेटाबेसमध्ये गुप्तरित्या कारभार करणा-या 3 लाख 60 हजार व्यक्ती आणि कंपन्यांची माहिती देण्यात आली असल्याची माहिती इंटरनॅशनल कंझोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमने दिली आहे.पनामा पेपर्स लीकप्रकरणी एप्रिलमध्ये रिपोर्ट जाहीर करण्यात आला होता. पनामा पेपर्स लीक झाल्यानंतर आयलँडचे पंतप्रधान सिगमंदर डेव्हिड गुनलॉसन आणि स्पेनचे औद्योगिक मंत्री जोस यांना राजीनामा द्यावा लागला होता. लोकहितासाठी तसंच टॅक्सचोरीच्या विरोधात जागतिक चळवळ म्हणून ही कागदपत्रे ऑनलाइन टाकत असल्याचं आयसीआयजेने सांगितलं आहे.पनामा पेपर्स लीकमधील माहिती ऑनलाइन जरी टाकण्यात आलेली असली तरी यामध्ये सर्वच माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. ज्या कागदपत्रांमध्ये वैयक्तिक तसंच बँक खात्यांची माहिती आहे त्यांची माहिती शेअर केली गेलेली नाही.
============================================================
राजस्थानमधील शाळांमध्ये पाठ्यपुस्तकात गाईनं लिहिलेलं पत्र
- ऑनलाइन लोकमत -जयपूर, दि. 10 - वसुंधरा राजे यांच्या राजस्थान सरकारने सरकारी शाळांमधील पाठ्यपुस्तकात नवा धड्याचा समावेश केला आहे. या धड्यात गाईने आई म्हणून मुलांना पत्र लिहिलेलं आहे जे मुलांना शिकवण्यात येणार आहे. हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेणारं राजस्थान सरकार एकमेव आहे ज्यांनी गाईंसाठी वेगळ मंत्रालय ठेवलं आहे.पाचवीतील विद्यार्थ्यांना हिंदीच्या पुस्तकातून हा धडा शिकवला जाणार आहे. या धड्यात हिंदू देवतांचे फोटो देण्यात आले आहेत ज्यामध्ये गायदेखील आहे. गाईला आपली माता मानल्यास होणारे फायदे यातून सांगितले जाणार आहेत. या पत्राची सुरुवात माझ्या मुलांनो आणि मुलींनो अशी करण्यात आली आहे. 'मी प्रत्येकाला सामर्थ्य, बुद्धीमत्ता, दिर्घायुष्य, आरोग्य, आनंद आणि समृद्धी देते. जे मला माता मानतात त्यांच्यावर मी मुलांप्रमाणे प्रेम करते', असं या पत्रात लिहिण्यात आलं आहे.
============================================================
ओव्हरटेक केल्यामुळे हत्या करणारा आमदारपुत्र अटकेत
- ऑनलाइन लोकमतगया, दिय. १० : कार ओव्हरटेक केल्यामुळे संतप्त होत एका २० वर्षीय युवकाला गोळ्या झाडून ठार करणारा संजदच्या( जेडी-यू) आमदार मनोरमा देवी यांचा मुलगा रॉकी कुमार यादव याला अखेर अटक करण्यात आली आहे. शनिवारी घटना घडल्यानंतर रॉकी फरार होता. रॉकीला गया येथून त्याच्या वडिलांच्या घरातून अटक करण्यात आली आहे.रॉकी कुमारच्या अटकेला पोलीस अधीक्षक गरीमा मलिक यांनी दुजोरा दिला आहे. पोलींसानी आमदार मनोरमा देवी यांच्याशी ३ तास चौकशी केल्यानंतर त्यांच्या घरातून रॉकीला अटक करण्यात आली आहे. बिहारच्या गया येथे पोलीसलाईनजवळ ओव्हरटेक केले म्हणून रॉकीने २० वर्षीय तरुणाची हत्या केली. त्यानंतर या भागात नागरिकांनी जोरदार निषेध करीत रॉकीच्या अटकेची मागणी केली होती.
============================================================
तोकडे कपडे घातले म्हणून तरुणीला मारहाण
- ऑनलाइन लोकमत -पुणे, दि. 10 - सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात शॉर्ट ड्रेस घातला म्हणून पाच जणांनी तरुणीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 1 मे रोजी ही घटना घडली असून पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.पिडीत तरुणीने दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपींनी तिला केसाने ओढून गाडीतून बाहेर काढले आणि मारहाण केली. 'आमच्या कुटुंबातील कोणतीच मुलगी असे तोकडे कपडे घालत नाही, आणि सकाळी 5 वाजता पुरुषांसोबत अशी फिरत नाही', असं म्हणत आरोपींनी मारहाण केल्याची माहिती पिडीत तरुणीने दिली आहे.तरुणीने पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र एक आठवडा उलटून गेला तरी पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. अखेर वरिष्ठ पोलीस अधिका-याशी संपर्क साधल्यानंतर कारवाई करण्यात आली असं पिडीत तरुणीने सांगितलं आहे. ज्या पोलिसांनी हलगर्जीपणा केला आहे त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस आय़ुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली आहे.
============================================================
वित्ताविना रखडले ज्येष्ठांचे धोरण!
- मुंबई : ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वर्षांवरून ६० वर्षे करण्यास सामाजिक न्याय विभागाने मान्यता दिलेली असताना वित्त विभागाने आता खो घातला आहे.सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० वर्षे करण्यात येईल, अशी घोषणा डिसेंबर २०१५च्या नागपूर विधिमंडळ अधिवेशनात केली होती. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. बडोले यांच्या विभागाने त्यासाठीचा प्रस्ताव तयार केला, पण गेले दीड वर्ष तो अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे शासनावर वित्तीय भार येणार असल्याने संबंधित विभागांचे अभिप्राय घ्यावेत, असे सांगत वित्त विभागाने तूर्त प्रस्तावाला खो घातला आहे. ज्येष्ठ नागरिकासाठीची वयोमर्यादा ६५ ऐवजी ६० केल्यास आर्थिक भार येईल तो केवळ एसटी महामंडळावर. एसटीच्या प्रवास सवलतीची रक्कम ज्या घटकांना लागू होते त्या घटकांशी संबंधित विभागाकडून ती भरली जाते. सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० करून त्या अनुषंगाने येणारा आर्थिक भार सहन करण्याची तयारी आधीच दर्शविली आहे.
============================================================
दुष्काळ निवारणासाठी चीनचा मदतीचा हात
- मुंबई : चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोचे सदस्य हेन झेंग यांनी आज शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासंदर्भात मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. मुंबई व शांघाय शहरांमधील सिस्टर सिटी मैत्री कराराची अंमलबजावणी पुढे सुरू ठेवण्यासंदर्भातही चर्चा झाली.सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत झेंग यांच्यासह चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे उपमंत्री चेन फेनझंिग, शांघायचे उपमहापौर झोऊ बा तसेच राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, शांघायमधील भारताचे कौन्सिल जनरल प्रकाश गुप्ता आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, शांघायमधील उद्योगांनी महाराष्ट्रात यावे, यासाठी कम्युनिस्ट पार्टी आॅफ चीनने तेथील कंपन्यांना प्रोत्साहन देऊन सहकार्य करावे. आम्ही या कंपन्यांचे स्वागत करून त्यांना सर्व सहकार्य करू. जास्तीत जास्त उद्योगांनी महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक, उत्पादन निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करावी. भारतामध्ये बॉलिवूडचे महत्व मोठे आहे.
============================================================
रानडे इन्स्टिट्यूटवर ‘लेटरबाँम्ब’
- पुणे : एफटीआयआय पाठोपाठ रानडे इन्स्टिट्यूटला ‘लेटर बॉम्ब’ मिळाला आहे. संस्थेला शनिवारी पोस्टाद्वारे आलेले हे पार्सल सोमवारी दुपारी उघडण्यात आले. तेव्हा त्यामध्ये डिटोनेटर, स्फोटक पावडरसोबत ‘तुम्ही कन्हैया कुमारला पाठींबा दिला. त्यामुळे आम्ही हाय एक्स्प्लोजिव्ह पाठवत आहोत’ असे पत्र आढळून आले. एफटीआयआयला पाठवण्यात आलेलेच पत्र रानडे इन्स्टिट्यूटला पाठवण्यात आल्याची माहिती परिमंडल एकचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.रानडे इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. माधवी रेड्डी यांच्या नावाने एक बंद लिफाफा पोस्टाद्वारे आला होता. शनिवारी हा लिफाफा संस्थेला मिळाला होता. मात्र, त्यादिवशी उघडण्यात आला नाही. रविवारच्या सुटीनंतर सोमवारी कार्यालय उघडण्यात आले. दुपारी पत्र पहात असताना हा लिफाफा फोडण्यात आला. तेव्हा आतमध्ये एक डिटोनेटर, स्फोटक पावडर आणि पत्र मिळाले. याबाबत संस्थास्तरावर चर्चा केल्यानंतर संध्याकाळी डेक्कन पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.
============================================================
गुगलने घेतला मोदींचा धसका
- गौरीशंकर घाळे, मुंबईभारताचा चुकीचा नकाशा दाखविण्याचा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नव्या विधेयकाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. वर्षानुवर्षे जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला विविदीत भूमी म्हणून रेखाटणा-या गुगल मॅपने सुधारणा केली आहे. गुगल मॅपवरील भारतीय नकाशात आता ही दोन्ही राज्ये भारताचा अविभाज्य भाग म्हणून दाखविण्यात येत आहेत.अलीकडेचे केंद्रातील मोदी सरकारने जियोसॅप्टिअल रेग्युलेशन बिल तयार केले. या विधेयकानुसार भारताच्या नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखविल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासासह १०० कोटी पर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भारताचे चुकीचे नकाशे प्रसारीत होत आहेत. यात भारताच्या आंतराष्ट्रीय सीमा चुकीच्या पद्धतीने रेखाटण्यात आल्या. भारतीय नकाशात जम्मू काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश तुटक रेषेने दाखवून त्यांचा विवादीत क्षेत्र असा उल्लेख करण्यात येत असे. हे प्रकार रोखण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने जियोसॅप्टिअल रेग्युलेशन बिल आणले. या बिलातील कठोर तरतूदीचा धसका घेत गुगल मॅपने आपली चूक सुधारली आहे. गुगल मॅपवरील भारतीय नकाशातील तुटक रेषा काढण्यात आल्या असून संपूर्ण जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग म्हणून दाखविण्यात आला आहे.
============================================================
अक्षय्य तृतीयेला मुंबईकर सुसाट
- मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी दुचाकी आणि चारचाकी खरेदीला तुफान प्रतिसाद दिला. मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी आणि बोरीवली येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये ६००हून अधिक वाहनांची नोंदणी झाली.वडाळा कार्यालयात २८ चार चाकी आणि ८४ दुचाकींची नोंद झाली आहे, तर ताडदेव कार्यालयात ३० चार चाकी आणि १९५ दुचाकींची नोंद झालीे. अंधेरी आणि बोरीवली कार्यालयांत एकूण २००हून अधिक वाहनांची नोंदणी झाली. अशा प्रकारे दिवसभरात ६००हून अधिक वाहनांची नोंद केली आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेत प्रशासनानेही विशेष व्यवस्था केली होती.
============================================================
१ एप्रिलपासून ८५% भागावरील इशारा लागू
- मुंबई : सिगारेटच्या पाकिटावरील ८५ टक्के भागावर छापील चित्राद्वारे वैधानिक इशारा देणे बंधनकारक करण्यासंदर्भात मार्चमध्ये केंद्र सरकारने नियमामध्ये सुधारणा केली. परंतु, हा नियम पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू केला जाऊ शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने १ एप्रिलनंतर उत्पादित करण्यात आलेल्या सगारेटसाठीच हा नियम लागू केला जाऊ शकतो, असे स्पष्ट केले.नियमांची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात आल्याने हा नियम त्या दिवसापासून लागू करता येऊ शकतो, असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. कर्णिक यांनी म्हटले. १ एप्रिलपर्यंत सिगारेट कंपन्या पाकिटाच्या ४० टक्के भागावर चित्राद्वारे वैधानिक इशारा छापत होत्या. दरम्यान, या कंपन्यांनी केंद्र सरकारच्या नव्या अधिसूचनेला आव्हान दिले आहे. या नियमामुळे कंपन्यांच्या अधिकारावर गदा येत आहे, असेही कंपन्यांचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयाने उन्हाळ्याच्या सुटीनंतर या याचिकेवरील सुनावणी ठेवत कंपन्यांना तात्पुरता दिलासा दिला आहे.
============================================================
‘सीपीएस’च्या कारभारावर अंकुश हवा
- पूजा दामले, मुंबईसंस्थेमार्फत स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेणे, लाखो रुपये घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विचार न करता प्रवेश देणे, पैशांची मागणी करून गुणांमध्ये फेरफार करणे असा मनमानी कारभार वैद्यकीय पदविका देण्याच्या नावाखाली ‘कॉलेज आॅफ फिजिशियन अॅण्ड सर्जन’ (सीपीएस) संस्थेत सुरू आहे. त्यामुळे संस्थेवर नेमका अंकुश कोणाचा, असा प्रश्न उपस्थित करत ‘महाराष्ट्र वैद्यकीय परिषदे’ने (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, एमएमसी) अन्य वैद्यकीय महाविद्यालयांचे नियम ‘सीपीएस’ला लागू करण्याची मागणी केली आहे. ‘सीपीएस’ला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिपत्याखाली आणा, अशा मागणीचे पत्र त्यांनी राज्य सरकारला पाठवले आहे.राज्य सरकारची मान्यता असलेली ‘सीपीएस’ ही संस्था १९३५ साली मुंबईत स्थापन करण्यात आली. चार वर्षांपूर्वीपर्यंत ‘सीपीएस’मध्ये १५ हजार रुपये अनामत रक्कम भरून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असे. अभ्यासक्रम संपल्यावर ही रक्कम संबंधित विद्यार्थ्याला परत दिली जायची. गेल्या चार वर्षांपासून प्रवेशाच्या नावाखाली लाखो रुपये आकारले जात आहेत, असा आरोप ‘सीपीएस’वर करण्यात येत आहे.
============================================================
परीक्षा नियंत्रकपदासाठीचे सर्व उमेदवार झाले ‘नापास’
- मुंबई : विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्याची धुरा परीक्षा नियंत्रकावर असते. विद्यापीठातर्फे परीक्षा नियंत्रक पदासाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीत मात्र सारेच उमेदवार ‘नापास’ ठरले आहेत.मुंबई विद्यापीठातर्फे ९ मे रोजी परीक्षा नियंत्रक पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. या पदासाठी एकूण २४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. पण या मुलाखतीतून एकाही उमेदवाराची निवड होऊ शकली नाही. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदासाठी ७, ८ आॅक्टोबर २०१५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीहोती. एकूण उमेदवारांपैकी छाननी समितीने चार नावांची शिफारस निवड समितीला केली होती.पण अंतिम मुलाखतीत निवड समितीने परीक्षा नियंत्रक पदासाठी कोणत्याही नावाची शिफारस केलीनाही, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव (जनसंपर्क) लीलाधर बनसोड यांनी दिली.
============================================================
पीएम होण्याचे गुण नितीशकुमारांमध्ये नाहीत
- किशनगंज : मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यामध्ये पंतप्रधानपदासाठी लागणारे गुण नाहीत. असे असताना ते पंतप्रधान बनू पाहत असतील, तर ते दिवास्वप्नच ठरेल, असे वक्तव्य बिहारचे माजी मंत्री आणि सत्ताधारी राष्ट्रीय जनता पार्टीचे लोसकभा सदस्य मोहम्मद तस्लिमुद्दिन यांनी केले आहे.बिहारमध्ये प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे, दिवसाढवळ्या राज्यात हत्या होत आहेत, राज्यात सुशासन नाही. तरीही नितीशकुमार देशाचे नेते, पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न करीत असतील, तर ते यशस्वी होणार नाहीत, अशी टीकाही खा. तस्लिमुद्दिन यांनी केली. तस्लिमुद्दिन पाचव्यांदा लोकसभेवर निवडून गेलेले राष्ट्रीय जनता पार्टीचे नेते आहेत.नितीशकुमार पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या मदतीने मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनीच राज्यभर दारूचे परवाने दिले होते. दारूची दुकाने उघडली जाताना, शेजारी शाळा, मंदिरे, मशिदी असल्याचाही विचार केला गेला नाही. आता मात्र त्यांना अचानक उपरती झाली आहे. मात्र खऱ्या प्रश्नांकडून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ते असले स्टंट करीत आहेत, असे सांगून ते म्हणाले की, आता नितीशकुमार देशभर दारूबंदी करण्याची भाषा करीत असले तरी ती कदापि यशस्वी होणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे.
============================================================
नेपाळमधील राजदूताची हकालपट्टी नाही
- काठमांडू : नेपाळमधील भारतीय राजदूत रणजीत राय यांच्या हकालपट्टीचा सरकार विचार करीत असल्याच्या अफवांचा नेपाळ सरकारने सोमवारी इन्कार केला. ही अफवा असली तरी भारत आणि नेपाळ यांच्यातील आतापर्यंत चांगले असलेले संबंध हळूहळू बिघडत असल्याचे जाणकारांचे मत आहे.नेपाळची नवी राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर मधेशींचे जे आंदोलन झाले, तेव्हापासून संबंधांमध्ये बिघाड व्हायला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे नेपाळ सरकारने चीनशी संबंध सुधारायला सुरुवात केली आहे आणि व्यापार तसेच देशांतर्गत काही प्रकल्पांबाबत चीनशी काही करार केले आहेत. त्यामुळे भारत सरकारही नेपाळच्या पावलांकडे शंकेने पाहत आहे. त्यातच अशा अफवा पसरू लागल्या आहेत. या अफवा ‘निराधार’ व उभय देशांतील द्विपक्षीय संबंध बिघडविण्याच्या हेतूने पसरविण्यात आल्याचे उपपंतप्रधान व परराष्ट्रमंत्री कमल थापा यांनी म्हटले. नेपाळच्या अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांचा पहिलाच भारत दौरा रद्द होणे आणि नेपाळचे भारतातील राजदूत दीप कुमार उपाध्याय यांना सरकार माघारी बोलावून घेणार असल्यामुळे निर्माण झालेला वाद या पार्श्वभूमीवर राय यांच्या हकालपट्टीचा सरकार विचार करीत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत आल्या होत्या.
============================================================
थायलंड - पवित्र बैलांनी वर्तवला चांगल्या पावसाचा अंदाज
- ऑनलाइन लोकमतबँकॉक (थायलंड), दि. 9 - पवित्र बैलांनी येत्या मोसमात चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आणि दुष्काळाने ग्रासलेल्या थायलंडवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला. थायलंडमध्ये दरवर्षी नांगरणीची सुरुवात शाही इतमामात होते. भाताच्या पिकापासून सुरुवात करण्याची इथं फार जुनी परंपरा आहे.परंपरेने चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे हा सोहळा साजरा केला जातो. शांत स्वभावाच्या परंतु नियमात बसणारी अंगकाठी असलेल्या जनावरांना यावेळी विविध खाद्य दिलं जातं. यंदा निवड झालेल्या पांढऱ्या बैलांनी भात, गवत, पाणी आणि देशी मद्य खाण्यासाठी निवडलं. त्यांची ही खाद्य पदार्थांची निवड यंदा पुरेसा पाऊस, भरपूर पिक आणि चांगला विदेश व्यापार सुचवते असं अनुमान थायलंडच्या पशुउद्योग खात्यानं काढलं आहे.गेल्या वर्षीही बैलांनी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला होता, परंतु जो चुकीचा ठरला. त्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई अनेक भागात भेडसावत आहे. तसेच, पिकं न आल्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने कर्जबाजारी झाले आहेत.
============================================================
दुसरा ‘फ्लार्इंग सिख’ पाहण्याची इच्छा : मिल्खा सिंग
- पुणे : रोम आॅलिम्पिकमधील माझ्या कामगिरीला आता सुमारे ५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. आपल्या भारत देशाची लोकसंख्या सुमारे १२० कोटींपर्यंत गेली, पण अजूनही दुसरा मिल्खा सिंग निर्माण होऊ शकला नाही, याची मला सारखी खंत वाटते आणि दु:ख होते. मी आता नव्वदीच्या घरात आहे. हे जग सोडण्यापूर्वी एखादा तरुण किंवा तरुणी मिल्खा सिंग बनेल आणि ट्रॅक अॅण्ड फिल्ड क्रीडाप्रकारात आपल्या देशाचा तिरंगा फडकावेल, अशी इच्छा आहे. हा सुदिन उजाडण्याचीच मी वाट पाहत आहे, असे भावपूर्ण उद्गार ‘फ्लार्इंग सिख’ मिल्खा सिंग यांनी काढले.कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे इंटरनॅशनल स्पोर्टस् एक्स्पोचा (पीआयएसई) रविवारी समारोप झाला. यानिमित्त रिओ आॅलिंपिकसाठी स्पर्धकांना शुभेच्छा देण्याचा, तसेच यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार त्यांच्या हस्ते झाला. या वेळी मिल्खा यांनी आपल्या आयुष्यातील हृदयद्रावक आणि हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा देताना उपस्थितांना हेलावून सोडले. व्यासपीठावर विशाल चोरडिया, मंदार ताम्हाणे उपस्थित होते.
============================================================
रैना पत्नी प्रियांकाला भेटण्यासाठी हॉलंडला पोहोचला
- नवी दिल्ली : आयपीएलच्या नवव्या सत्रातील संघ गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैना आपली पत्नी प्रियंकासोबत राहण्यासाठी हॉलंडला पोहोचला आहे़ प्रियंका आपल्या पहिल्या अपत्याला जन्म देणार आहे़ अनुभवी क्रिकेटर रैनाचा संघ गुजरातने रविवारी कोलकाता नाईट रायडर्सला त्यांच्याच घरेलू मैदानावर ईडन गार्डनवर पाच विकेटने हरवले होते़ त्यानंतर रैना आपली गर्भवती पत्नी प्रियंकासोबत राहण्यासाठी हॉलंडला रवाना झाला़ रैना आणि प्रियंका गतवर्षी तीन एप्रिल रोजी विवाहबद्ध झाले होते़ रविवारचा सामना जिंकल्यानंतर रैना म्हणाला, मी उद्या आपल्या पत्नीची भेट घेणार आहे़ मी हॉलंडला जात आहे़ यासाठी खूपच उत्साहित आहे़
============================================================
राहुल गांधींना 'ताप'; पुदुच्चेरी, केरळ दौरा रद्द
नवी दिल्ली - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ताप आल्याने त्यांनी आपला दोन दिवसीय पुदुच्चेरी, केरळ आणि तमिळनाडूचा दौरा रद्द केला आहे.
राहुल गांधींना 'ताप'; पुदुच्चेरी, केरळ दौरा रद्द
राहुल गांधी यांना सोमवारी पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. राहुल आज (मंगळवार) पुदुच्चेरी येथे कॉंग्रेस-द्रमुक युतीच्या एका सभेसाठी येणार होते. तेथेच त्यांना जिवे मारू अशा धमकीचे तमीळ भाषेतील निनावी पत्र ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व्ही. नारायणस्वामी यांना मिळाले होते. हे पत्र मिळाल्यानंतर कॉंग्रेसच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन राहुल यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती.
मात्र, या सभेला येण्यापूर्वीच राहुल गांधी यांनी सोमवारी ट्विटरवरून आपणास रविवारपासून खूप ताप असल्याचे सांगत, डॉक्टरांनी दोन दिवस विश्रांतीचा सल्ला दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मी पुदुच्चेरी, केरळ आणि तमिळनाडूतील नागरिकांची माफी मागतो. लवकरच मी याठिकाणी सभा घेईल, असे राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे.
============================================================
बारवातील गाळ काढताच झऱ्यातून फुटले पाणी
किल्लेधारूर - सोळा वर्षांपूर्वी खारवणी बारवाचा गाळ काढून जी स्वच्छता केली होती, त्याचप्रमाणे पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती रविवारी (ता. 8) केल्याने आता खारवणीतील बंद पडलेले झरे पुन्हा वाहू लागले असून शहरातील काही भागांतील सांडपाण्याची सोय होणार आहे.
किल्लेधारूरची पाणीटंचाई तीव्र स्वरूपाची होत असताना शहरातील युथ क्लबने विविध ठिकाणी पाणपोई, कल्पकतेतून वृक्षसंवर्धन आणि आता जलस्रोतातील गाळ काढण्याचा उपक्रम सुरू केला आहे. शहरात सहा ते सात ठिकाणी पुरातन बारव आहेत. या बारवातील गाळ उघडा पडला असून त्यासाठी नागरिकांनी श्रमदान आणि नगरपालिकेने पुढाकार घेतल्यास पाणी साठवण क्षमता आणि काही अंशी सांडपाण्याची गरज भागविता येणे शक्य होणार आहे. याच हेतूने शहरातील युथ क्लबने रविवारी शहरातील कसबा विभागातील वीर पांडुरंग चौक आणि साठेनगर भागातील खारवणी (मनकर्णिका) बारवातील गाळ उपसा करण्यासाठी संयुक्त अभियान सुरू केले. खारवणी बारवातील पाण्याची चव खारट आहे. युथ क्लबच्या 35 सदस्यांनी श्रमदान करून गाळ उपसण्याचे काम सुरू केले. टोपली, खोरी, घमेल्यांच्या साहाय्याने तब्बल तीन तासांहून अधिक श्रमदान केल्यानंतर अंदाजे दोन ट्रॅक्टरहून अधिक गाळाचा उपसा करण्यात या युवकांना यश आले. यामध्ये काही स्थानिक तरुणांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यामुळे खारवणी बारवास गतवैभव प्राप्त झाले. यातील झरे नव्याने वाहू लागल्याने या पाण्याचा वापर पशुधनासोबत सांडपाण्यासाठी करता येणार आहे. या सदंर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले म्हणाले, शहरातील सर्व आड, विहिरी व बारवांतील गाळ काढण्यासाठी रोहयोतून काढण्याची कामे प्रस्तावित केली होती. त्यासाठी नगरपालिकेस दहा लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. काढलेला गाळ नेण्यासाठी व वाहतुकीचा प्रश्न आहे. यासाठी पर्यायांचा शोध असल्याची माहितीही मुख्याधिकारी श्री. भोसले यांनी दिली.
बारवातील गाळ काढताच झऱ्यातून फुटले पाणी
किल्लेधारूर - सोळा वर्षांपूर्वी खारवणी बारवाचा गाळ काढून जी स्वच्छता केली होती, त्याचप्रमाणे पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती रविवारी (ता. 8) केल्याने आता खारवणीतील बंद पडलेले झरे पुन्हा वाहू लागले असून शहरातील काही भागांतील सांडपाण्याची सोय होणार आहे.
============================================================
पुण्यात 1.8 मिमी पावसाची नोंद
पुण्यात 1.8 मिमी पावसाची नोंद
पुणे - पुणे शहर व परिसरात आज (मंगळवार) पहाटे झालेल्या विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सकाळी आठ वाजेपर्यंत 1.8 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पुणे शहर व उपनगरात आज पहाटे अडीचच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. साधारण अर्धा तास जोरदार पाऊस कोसळला. यामुळे अनेक भागात पाणी साचले होते. शहरातील मध्यवर्ती भागासह खडकवासला, वारजे, कात्रज, औंध यांसह सर्व भागांना पावसाने झोडपले. यामुळे हवेत गारवा पसरला होता. तसेच अनेक भागात पाणी साचले होते.
आज सकाळी आठ वाजेपर्यंत वेधशाळेत 1.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रणरणत्या उन्हात भाजून निघालेल्या पुणेकरांनी सोमवारी दुपारी पडलेल्या वळवाच्या पहिल्या पावसाचे चिंब भिजत स्वागत केले. शहर आणि परिसरात पावसाची ही हजेरी पुढील तीन दिवस कायम राहणार आहे.
============================================================
नाशिक; सटाणात ट्रकमधील सिलिंडरचा स्फोट
नाशिक - जिल्ह्यातील सटाणा शहरात आज (मंगळवार) पहाटे व्यावसायिक सिलिंडर घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अपघात झाल्याने पाच ते सात सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
नाशिक; सटाणात ट्रकमधील सिलिंडरचा स्फोट
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. गुजरातहून सिलिंडर घेऊन आलेला हा कंटेनर सटाण्यातील व्हीपीएन विद्यालयाजवळ दुभाजकाला धडकला. दुभाजकाला धडक दिल्याने तो पलटी झाला आणि संघर्ष झाल्याने सिलिंडरने पेट घेतला. त्याक्षणी पाच ते सात सिलिंडरचा स्फोट झाला. तसेच काही सिलिंडरमधून गॅस गळती झाली. त्यामुळे परिसरातील घरांमध्ये गॅस पसरला होता. नागरिकांनी स्फोटाचा आवाजामुळे घराबाहेर येत सुरक्षित ठिकाण गाठले. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. कंटेनर सुमारे 50 सिलिंडर होते.
============================================================
वीस गुंठ्यांत दिले काकडीने तीन लाख
आष्टी - तीव्र दुष्काळी स्थितीमुळे एकीकडे शेतकरी हतबल झालेला असताना तालुक्यातील नांदूर येथील दत्तात्रेय विधाते यशस्वी ठरले. त्यांनी अवघ्या महिनाभरात काकडीच्या पिकापासून तीन लाखांचे घवघवीत उत्पन्न मिळविले आहे.

श्री. विधाते यांची नांदूर (विठ्ठलाचे) येथे चार एकर जिरायत शेती आहे. पारंपरिक पिके घेण्यावरच त्यांचा भर होता. मात्र, यातून हाती काहीच लागत नव्हते. त्यांचा केडगाव (नगर) येथील महेश गुंजाळ यांच्याशी परिचय झाला. त्यांनी रंगीत ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले आहे. ती प्रेरणा घेऊन दत्तात्रेय विधाते यांनी बॅंकेच्या कर्जाची माहिती घेतली. त्यांना नगरच्या फेडरल बॅंकेने 15 लाखांचे कर्ज दिले. दुष्काळात ढोबळी मिरचीऐवजी काकडीचे उत्पादन जास्त फायदेशीर ठरेल, असा विचार करून विधातेंनी काकडी पीक घेण्याचे ठरविले. त्यानुसार कृषी विभागाच्या अनुदानातून 20 गुंठे क्षेत्रावर पॉलीहाऊस उभारणी केली. स्ट्रक्चर व पाणी देण्यासाठी अत्याधुनिक ड्रीप यंत्रणेसाठी सुमारे 18 लाख खर्च आला. पिकाला वैशिष्ट्यपूर्ण लाल माती टाकण्यासाठी तीन लाख रुपये लागले. काकडीची पुणे येथून प्रत्येकी दहा रुपयाला एक याप्रमाणे चाळीस हजारांची चार हजार रोपे आणली. याशिवाय 20 ब्रास शेणखताला 60 हजार रुपये असा एकूण सुमारे 22 लाख रुपये खर्च आला.
श्री. विधाते यांनी 20 फेब्रुवारी रोजी रोपांची पॉलीहाऊसमध्ये लागवड केली. आयती रोपे लावल्याने दहा ते बारा दिवस आधीच पीक हाती आले. अवघ्या महिनाभरातच त्यांना 20 टन काकडीचे उत्पादन मिळाले. हा सर्व माल पुणे बाजार समितीत त्यांनी विकला. तेथे 15 रुपये किलोप्रमाणे भाव मिळून तीन लाखांचे उत्पन्न हाती आले. पिके अशीच साधत राहिली तर वर्ष-दीड वर्षात पूर्ण उत्पादन खर्च निघून नफ्याकडे वाटचाल सुरू होणार आहे.

पनामा'च्या खुलाशात 2 हजार भारतीयांची माहिती
पनामा'च्या खुलाशात 2 हजार भारतीयांची माहिती
नवी दिल्ली - पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय समुहाने (आयसीआयजे) ‘पनामा पेपर्स‘चा संपुर्ण दस्ताऐवज ऑनलाईन प्रसिद्ध केला आहे. या माहितीत भारतातील तब्बल 2,000 व्यक्ती, कंपन्या आणि येथील पत्ते आढळून आले आहेत.
इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इंडियन जर्नलिस्टतर्फे 21 देशांमध्ये गुप्तरित्या कारभार करणाऱ्या 2 लाखांपेक्षा जास्त कंपन्यांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. मोसेक फोन्सेस्काच्या ‘लीक‘ झालेल्या कागदपत्रांद्वारे ही संपुर्ण माहिती गोळा करण्यात आली आहे. यात आतापर्यंत परदेशी कंपन्यांविषयी प्रसिद्ध झालेल्या सर्वाधिक माहितीचा साठा आहे, असे आयसीआयजेने प्रसिद्ध केलेल्या माहिती म्हटले आहे.
भारताबद्दलची माहिती सहजरित्या चाळली असता त्यात 22 परदेशी कंपन्या, 1046 अधिकारी व व्यक्ती, 42 मध्यस्थ आणि दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमधील 828 पत्त्यांचा उल्लेख आहे. संपुर्ण यादीत संबंधित व्यक्तींची नावे, त्यांची कंपनी, कंपनीची स्थापना इत्यादी सर्व माहिती देण्यात आली आहे. परंतू परदेशात कंपन्या स्थापन करणे कायदेशीर गुन्हा नाही. परंतू या कंपन्या स्थापन करताना काही गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या यादीत प्रसिद्ध झालेल्या व्यक्तींनी एखादा नियम मोडला आहे किंवा काही चुकीचे काम केले आहे असे आम्ही सांगू इच्छित नाही. लोकहिताच्या दृष्टीने ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे, असा ऑनलाईन संदेशदेखील समुहाने प्रसिद्ध केला आहे.
आयसीआयजेने पहिल्या टप्प्यात प्रसिद्ध केलेल्या माहितीत 500 भारतीय कंपन्यांची नावे समोर आली होती. विविध प्रशासकीय पातळ्यांवर याविषयी तपास सुरु आहे.
============================================================
शिवसेना-कॉंग्रेसची वाढतेय जवळीक
स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजप-राष्ट्रवादी विरोधात एकीचे संकेत
मुंबई - राज्य व केंद्रातल्या सत्तेची समीकरणे समविचारी पक्षांसोबत जुळवली जात असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र विचारांची समीकरणे सोडून सत्तेचे राजकारण जुळवण्याचा "पॅटर्न‘ राज्यात नवा नाही. त्यातच सत्ताधारी भाजपने सर्व ताकद पणाला लावून राज्यभरात शिवसेनेची कोंडी करण्याची संधी सोडायचीच नाही, असा संकल्प सोडल्याने सध्या पराभूत मानसिकतेतली कॉंग्रेस व राजकीय ईर्षेने एकवटलेली शिवसेना यांच्यात जवळीक होत असल्याचे संकेत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये "राष्ट्रवादी‘ने सतत कॉंग्रेसवर कुरघोडी केली, तर आता भाजपने शिवसेनेला बगल देत स्वबळाची तयारी केली आहे. या राजकीय कुरघोडीच्या डावपेचाने राज्यभरात कॉंग्रेस व शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमधे मात्र समन्वयाचे सूर जुळत असल्याचे चित्र आहे.
मागील काही वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कॉंग्रेस व "राष्ट्रवादी‘चेच वर्चस्व अबाधित राहिले आहे; पण सत्तास्थापनेत दोन्ही पक्षांनी परस्परांना शह काटशह देत भाजप व शिवसेनेचा पाठिंबा घेतल्याची उदाहरणे आहेत. पुणे पॅटर्न तर राज्यात अशा पद्धतीच्या दोन भिन्न विचारी पक्षांची मोट बांधणारा पहिला पॅटर्न ठरला होता. त्यानंतर उस्मानाबादमध्ये कॉंग्रेस व शिवसेनेने छुपी महाआघाडी करत राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न केला होता. कोल्हापूर जिल्हा परिषदेतही कॉंग्रेस व "राष्ट्रवादी‘नी परस्परविरोधी पक्षांची सोबत करत कुरघोडी केली होती. याशिवाय, यवतमाळ, अकोला, अमरावती, नाशिक यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांत पुणे पॅटर्नचे प्रतिबिंब उमटले होते.

मोदींच्या शैक्षणिक पात्रतेचा वाद सुरूच
भाजपने सादर केली प्रमाणपत्रे; "आप‘ने फेटाळले दावे
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या मुद्द्यावरून भाजप आणि "आम आदमी पक्षा‘तील (आप) वाक्युद्ध आजही सुरूच होते.
पंतप्रधानांच्या बी. ए. व एम. ए.च्या पदव्यांची प्रमाणपत्रे आज जाहीर करून मोदींनी दिल्ली विद्यापीठातून 1978मध्ये तृतीय श्रेणीत बी. ए.ची परीक्षा उत्तीर्ण केल्याचा व गुजरात विद्यापीठातून 1983 मध्ये एम.ए. पदवी मिळविल्याचे स्पष्टीकरण भाजपने आज केले. मात्र, "आप‘ने भाजपचे सारे दावे फेटाळून मोदी यांच्या बी. ए. पदवी प्रमाणपत्रांची वैधता संशयास्पद असल्याचा पुनरुच्चार केला, आहे.
पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा लागणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले, तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी, "आप‘सारख्या बेजबाबदार पक्षांकडून देशाच्या संघराज्य रचनेलाच धोका असल्याचा इशारा दिला. पदवीच्या मुद्द्यावर बिनबुडाचा वाद निर्माण करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून जाहीर माफीची मागणीही भाजपने केली आहे.
"आप‘च्या नेतृत्वावर टीकेची झोड उठवता शहा यांनी सांगितले, की पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत बिनबुडाचे व खोटे आरोप करून केजरीवाल यांनी सार्वजनिक जीवनातील पातळी खाली आणलीच; पण जगात भारताची प्रतिमा व प्रतिष्ठाही मलिन केली. त्यांनी देशाची जाहीर माफी मागावी. या खोट्या आरोपांच्या वाहत्या गंगेत जेडीयूचे के. सी. त्यागी व कॉंग्रेसचे मनीष तिवारी यांच्यासारख्यांनीही हात धुवून घेतले. आता मोदींच्या या अधिकृत पदव्या केजरीवाल यांनाही पाठविण्यात येणार आहेत, असे सांगून यानंतर हा अनावश्यक वाद थांबेल, अशी आशा शहा यांनी व्यक्त केली.

महात्मा.बसवेश्वरांची जयंती उत्साहात साजरी
नमस्कार लाईव्ह कंधार वार्ताहर
व्हि के कतरे पांगरेकर
थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांची ८८५ वी जयंती सोमवारी नांदेड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.आय,टि,आय,पासुन ते महात्मा फुले पुतळयापासून सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली.यात हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. जयंती निमित्त शहरात अन्य ठिक ठिकाणी विविध कार्यक्रम घेवून म.बसवेश्वरांना अभिवादन करण्यात आले.
जगतज्योती म.बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त समाज बांधवासह बसव ब्रिगेड वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी ६ च्या सुमारास फुले पुतळयापासून बसव ब्रिगेडच्या वतीने भव्य मिरवणुक काढण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बसव ब्रिगडचे जयंतीचे अध्यक्ष नागनाथ स्वामी,व तसेच शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे, आमदार हेमंत पाटील,बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश भोसीकर, जिल्हाध्यक्ष दत्ता शेंबाळे, कंधार बसव ब्रिगेडचे अध्यक्ष देविदास डांगे, नगरसेवक बालाजी कल्याणकर, सेनेचे शहरप्रमुख वैजनाथ देशमुख,सुभाषिश कामेवार,प्रकाश शेटे,विशाल गौड, विठठल कत्तरे,भुषन पेठकर, गणेश भोसीकर, शिवशंकर कारमुंगे, आमोल रजुरकर, यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. या मिरवणूकीचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. ढोल-ताशाच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीचा बसवेश्वर वजिराबाद चौक येथे राञी १०:३० वाजता समारोप करण्यात आला.

महात्मा बसवेश्वर यांचे सुधारणावादी विचार समाजासाठी उपयुक्त -सौ,वर्षाताई भोसीकर
नमस्कार लाईव्ह कंधार वार्ताहर
व्हि,के,कतरे,पांगरेकर
जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे सुधारणावादी विचार आजही समाजासाठी उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांनी केले. महात्मा बसवेश्वर यांची 885 वी जयंती कंधार येथील प्रियदर्शिनी मुलींच्या शाळेत साजरी करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, मुख्याध्यापिका राजश्री शिंदे, हणमंतराव पेठकर, किरण बडवणे, सुधीर तपासे, अनिल रावळे आदींची उपस्थिती होती.पुढे त्या म्हणाल्या, महात्मा बसवेश्वर यांनी हिंदू धर्मातील जातीय व्यवस्था, कर्मकांड इतर अनिष्ठ प्रथांना विरोध केला होता. इ.स.12 व्या शतकात सत्य अहिंसा सर्वधर्मसमानता इत्यादी क्रांतीकारक विचार मांडले. समानतेच्या वागणूकीसह विधवा पुनर्विवाहास त्यांनी मान्यता दिली. बालविवाह होऊ नये यासाठी प्रचार व प्रसार केला. अशा या सुधारणावादी विचारांची आजही समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांनी केले. प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राजश्री शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोनटक्के यांनी तर उपस्थितांचे आभार किशोर अंबेकर यांनी मानले.

No comments:
Post a Comment