[अंतरराष्ट्रीय]
१- चीनने ‘पेंटॅगॉन’चा अहवाल फेटाळला
२- मेलबर्न; दोन हजार कांगारूंना आॅस्ट्रेलिया संपवणार
३- गुरुदासपूर; पाक महिलेला 13 वर्षांनी भारतीय नागरिकत्व
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- सुरक्षा आणि स्वातंत्र्याची हमी दिल्यास विजय मल्ल्या भारतात परतण्यास तयार
५- दिल्ली; महात्मा गांधींचे नातू कनू गांधी पत्नीसह वृद्धाश्रमात
६- भारतात तब्बल 400 कोटी रुपयांच्या नकली नोटा चलनात
७- पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाला प्रथमच मातोश्रींची भेट
८- विज्ञान आणि गणित विद्यार्थ्यांचे नावडते विषय - एक अहवाल
९- इच्छामरणाच्या विधेयकाचा मसुदा तयार, केंद्र सरकारने मागितली मते
१०- थकीत कर्ज वाढणार! - केंद्रीय वित्तमंत्रालय
११- नरेंद्र मोदींची महात्मा गांधी, शास्त्रींबरोबर तुलना
१२- मालेगाव बॉम्बस्फोट; सर्वोच्च न्यायालयानेच न्याय द्यावा- कॉंग्रेस
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- 'नीट' प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
१४- तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरीत आज मतदान
१५- गृहमंत्रिपद सांभाळणं हा पार्ट टाईम जॉब नाही : तृप्ती देसाई
१६- वर्ष उलटूनही प्रशिक्षणाचे मानधन नाही
१७- मच्छीमार नौकांसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प
१८- मालेगावच्या आरोपींवर मोदींची कृपा!
१९- जयललिता, करुणानिधी यांना नोटीस
२०- हिंदू राष्ट्र’वाद म्हणजे भगवा दहशतवाद नाही - शिवसेना
२१- लोहगाव विमानतळाच्या विस्ताराचा 'टेक ऑफ'
२२- लाचप्रकरणी खडसे यांच्या ओएसडीची चौकशी - रा. कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२३- दिल्ली; उमा भारतींच्या निवासस्थानी जवानाची आत्महत्या
२४- सातारा; बंदोबस्ताच्या ठिकाणीच पोलिसांना नाश्ता-जेवण
२५- खोडद; जगातील सर्वांत सुंदर फुले उमलतात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये!
२६- ठाणे; ४० कोटी खर्चून बांधणार चार हजार घरे
२७- सांगली; दोघा भावांनी काढला ४५ फूट विहिरीतील गाळ
२८- रविवार ठरला घातवार; तीन वेगवेगळ्या अपघातात राज्यातील २६ जणांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२९- कृणाल पंड्याचा धमाका, 37 चेंडूत 86 धावा
३०- नाशकात प्रेक्षकांची हुल्लडबाजी, आर्ची-परशाचा काढता पाय
३१- इटालियन ओपनमध्ये सानिया आणि मार्टिनाची जोडी अजिंक्य
३२- ऐश्वर्याने जांभळ खाल्ली का ? - सोशल मिडीयाचा सवाल
३३- बंगळूरू; केमोविना कर्करोग बरा करणार
३४- मी पुन्हा सहा षटकार ठोकणार - युवराजसिंग
३५- कोल्हापूर; तब्बल 18 वर्षांनंतर तिने खाल्ले अन्न
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३६- पोलीस अधीक्षक दहिया निरोपाविनाच मुंबईला
३७- ग्रामसेवकांचे आजपासून कामबंद
३८- बिलोली; रेल्वेत नौकारीचे आमिष दाखवून फसविणारी अर्शिया बिलोली पोलिसांच्या ताब्यात
३९- उमरी; डोणगाव जवळील कालव्यात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले
४०- नायगाव; तहसीलदारांनी पकडले अवैध रेती वाहतूक करणारे १३ टिप्पर, २ ट्रक्टर
४१- जिल्ह्यात पाच लाख ९२ हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी ८५२ ट्यँकर
४२- लोहा; जीपची रिक्षाला धडक; आठ गंभीर जखमी
४३- २० जुलै ते ३ ऑगस्ट पर्यंत नऊ जीळ्यासाठी होणार नांदेडला सैन्य भारती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आयुष्यात असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात, एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा करिती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो
[अरुण शेंडगे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
सचिन कवडे, शंकर शिंदे, सचिन नरवाडे, चाजीश चाचू, राजू बोटलवर, स्वप्नील शिंदे, मनीष शेलार, संदीप पावडे, मायुर जोगदंड, राहुल गायकवाड, विठ्ठल पवार, अमोल कदम, विवेक बुटले, सागर बंडेवार,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=========================================







धन्वंतरी कॉलेजच्या फॅशन शोच्या निमित्ताने ‘सैराट’ चित्रपटातील आर्ची-परशा म्हणजे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर नाशिकच्या चोपडा लॉन्सवर आले होते. पण आकाश आणि रिंकू मंचावर येताच त्यांना भेटण्यासाठी प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करत स्टेजवर प्रवेश केला.
त्याचवेळी बाऊंसर्सनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, पण गर्दी वाढतच चालल्याने अखेरीस आयोजकांनी राष्ट्रगीत सुरु करुन, कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.
दरम्यान या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी सभागृहाच्या बाहेर हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्याने काहीकाळ ट्रॅफिक जामही झालं होतं.
सैराट फिल्म रिलीज होऊन दोन आठवडे झाल्यानंतरही यातल्या कलाकारांची क्रेझ कायम आहे आणि याचाच फटका नाशिकमधल्या या कार्यक्रमाला बसला.

मोदींनी आपल्या 7 आरसीआर या निवासस्थानाची सैर मातोश्रींना घडवली. व्हिलचेअरवर बसवून त्यांनी परिसरातील बगिच्यात नेलं.
‘माझी आई गुजरातला परतली. मोठ्या कालावधीनंतर तिच्यासोबत क्वॉलिटी टाइम घालवता आला, तेही आरसीआरला तिने दिलेल्या पहिल्या भेटीत’ असं मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

सानिया आणि मार्टिनानं क्ले कोर्टवर सलग तिसऱ्या स्पर्धेत फायनल गाठली होती. याआधी स्टुटगार्ट आणि माद्रिदमधील स्पर्धांमध्ये सानटिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. पण आता इटालियन ओपन जिंकून सानिया आणि मार्टिनानं यंदाच्या मोसमातलं पाचवं विजेतेपद साजरं केलं.
सानिया-मार्टिनानं यंदा ऑस्ट्रेलियन ओपनसोबतच सिडनी, ब्रिस्बेन आणि सेंट पीटर्सबर्गमधील स्पर्धाही जिंकल्या होत्या. त्यानंतर इटालियन ओपनचं विजेतेपद हे सानिया आणि मार्टिनाचं एकूण चौदावं विजेतेपद आहे, तर सानियाचं हे कारकीर्दीतलं सदतिसावं विजेतेपद आहे.
१- चीनने ‘पेंटॅगॉन’चा अहवाल फेटाळला
२- मेलबर्न; दोन हजार कांगारूंना आॅस्ट्रेलिया संपवणार
३- गुरुदासपूर; पाक महिलेला 13 वर्षांनी भारतीय नागरिकत्व
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- सुरक्षा आणि स्वातंत्र्याची हमी दिल्यास विजय मल्ल्या भारतात परतण्यास तयार
५- दिल्ली; महात्मा गांधींचे नातू कनू गांधी पत्नीसह वृद्धाश्रमात
६- भारतात तब्बल 400 कोटी रुपयांच्या नकली नोटा चलनात
७- पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाला प्रथमच मातोश्रींची भेट
८- विज्ञान आणि गणित विद्यार्थ्यांचे नावडते विषय - एक अहवाल
९- इच्छामरणाच्या विधेयकाचा मसुदा तयार, केंद्र सरकारने मागितली मते
१०- थकीत कर्ज वाढणार! - केंद्रीय वित्तमंत्रालय
११- नरेंद्र मोदींची महात्मा गांधी, शास्त्रींबरोबर तुलना
१२- मालेगाव बॉम्बस्फोट; सर्वोच्च न्यायालयानेच न्याय द्यावा- कॉंग्रेस
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- 'नीट' प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
१४- तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरीत आज मतदान
१५- गृहमंत्रिपद सांभाळणं हा पार्ट टाईम जॉब नाही : तृप्ती देसाई
१६- वर्ष उलटूनही प्रशिक्षणाचे मानधन नाही
१७- मच्छीमार नौकांसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प
१८- मालेगावच्या आरोपींवर मोदींची कृपा!
१९- जयललिता, करुणानिधी यांना नोटीस
२०- हिंदू राष्ट्र’वाद म्हणजे भगवा दहशतवाद नाही - शिवसेना
२१- लोहगाव विमानतळाच्या विस्ताराचा 'टेक ऑफ'
२२- लाचप्रकरणी खडसे यांच्या ओएसडीची चौकशी - रा. कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२३- दिल्ली; उमा भारतींच्या निवासस्थानी जवानाची आत्महत्या
२४- सातारा; बंदोबस्ताच्या ठिकाणीच पोलिसांना नाश्ता-जेवण
२५- खोडद; जगातील सर्वांत सुंदर फुले उमलतात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये!
२६- ठाणे; ४० कोटी खर्चून बांधणार चार हजार घरे
२७- सांगली; दोघा भावांनी काढला ४५ फूट विहिरीतील गाळ
२८- रविवार ठरला घातवार; तीन वेगवेगळ्या अपघातात राज्यातील २६ जणांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२९- कृणाल पंड्याचा धमाका, 37 चेंडूत 86 धावा
३०- नाशकात प्रेक्षकांची हुल्लडबाजी, आर्ची-परशाचा काढता पाय
३१- इटालियन ओपनमध्ये सानिया आणि मार्टिनाची जोडी अजिंक्य
३२- ऐश्वर्याने जांभळ खाल्ली का ? - सोशल मिडीयाचा सवाल
३३- बंगळूरू; केमोविना कर्करोग बरा करणार
३४- मी पुन्हा सहा षटकार ठोकणार - युवराजसिंग
३५- कोल्हापूर; तब्बल 18 वर्षांनंतर तिने खाल्ले अन्न
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३६- पोलीस अधीक्षक दहिया निरोपाविनाच मुंबईला
३७- ग्रामसेवकांचे आजपासून कामबंद
३८- बिलोली; रेल्वेत नौकारीचे आमिष दाखवून फसविणारी अर्शिया बिलोली पोलिसांच्या ताब्यात
३९- उमरी; डोणगाव जवळील कालव्यात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले
४०- नायगाव; तहसीलदारांनी पकडले अवैध रेती वाहतूक करणारे १३ टिप्पर, २ ट्रक्टर
४१- जिल्ह्यात पाच लाख ९२ हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी ८५२ ट्यँकर
४२- लोहा; जीपची रिक्षाला धडक; आठ गंभीर जखमी
४३- २० जुलै ते ३ ऑगस्ट पर्यंत नऊ जीळ्यासाठी होणार नांदेडला सैन्य भारती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आयुष्यात असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात, एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा करिती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो
[अरुण शेंडगे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
सचिन कवडे, शंकर शिंदे, सचिन नरवाडे, चाजीश चाचू, राजू बोटलवर, स्वप्नील शिंदे, मनीष शेलार, संदीप पावडे, मायुर जोगदंड, राहुल गायकवाड, विठ्ठल पवार, अमोल कदम, विवेक बुटले, सागर बंडेवार,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=========================================
'नीट' प्रश्न सोडवण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
मुंबई: ‘नीट’ परिक्षेच्या घोळावर विद्यार्थी आणि पालकांची बाजू मांडण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली.
‘नीट’ परीक्षा कधीपासून लागू करायची यासंदर्भातला निर्णय पालक आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, असं राज ठाकरे म्हणाले. देश नेमकं कोर्ट चालवतंय की सरकार असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंत पंतप्रधानांसोबत बैठकीची वेळ मिळणार असल्याची माहिती राज यांनी या भेटीनंतर दिली.
राज ठाकरे यांनी नीटच्या मुद्द्यासोबतच राज्यातल्या भीषण दुष्काळाबाबतही मुख्यमंत्र्यांशी बातचित केली.
दरम्यान मुख्यमंत्री आज 12 वाजता नीटच्या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहेत.
=========================================
कृणाल पंड्याचा धमाका, 37 चेंडूत 86 धावा
विशाखापट्टणम: कृणाल पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं दिल्ली डेअरडेव्हिल्सवर तब्बल 80 धावांनी मात केली आणि आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखलं.
मुंबईचा हा तेरा सामन्यांमधला सातवा विजय ठरला असून मुंबईनं गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर दिल्लीचा हा अकरा सामन्यांमधला पाचवा पराभव असून, डेअरडेव्हिल्सची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे.
=========================================
तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरीत आज मतदान
चेन्नई : तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या तीन राज्यात आज विधानसभा मतदान होणार आहेत. सकाळी मतदानाला सुरूवात झाली आहे. तामिळनाडूमध्ये 234 , केरळमध्ये 140 तर पुद्दुचेरीत 30 जागांवर मतदान होणार आहे.
केरळच्या तिरूअनंतपुरमची लढाई चुरशीची ठरणार आहे. कारण भाजपनं क्रिकेटर श्रीसंतला उमेदवारी दिली आहे.
=========================================
महात्मा गांधींचे नातू कनू गांधी पत्नीसह वृद्धाश्रमात
नवी दिल्ली : देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्पिता महात्मा गांधींचे नातू हलाखीत जीवन जगत आहे. गांधीजींचे नातू कनू भाई आणि त्यांची पत्नी दिल्लीच्या गुरू वृद्धाश्रमात राहत आहेत.
केंद्रीय मंत्री महेश शर्मा य़ांनी दिल्लीतल्या वृद्धाश्रमाला भेट देऊन कनु गांधींची विचारपूस केली. महात्मा गांधींचे तिसरे पुत्र रामदास यांचे कनू गांधी हे एकुलते एक पुत्र आहेत.
87 वर्षांचे कनू गांधींनी पंतप्रधान मोदींशी फोनवर गुजरातीमध्ये संवाद साधला. गुजरात आणि साबरमती आश्रम गांधींच्या आदर्शांवर चालत नसल्याची खंत कनू गांधी यांनी पंतप्रधान मोदींकडे बोलून दाखवली. शिवाय मोदींना भेटण्याची इच्छा असल्याचंही सांगितलं.
वयाच्या 17 व्या वर्षांपर्यंत कनू गांधींनी महात्मा गांधीजींसोबत प्रवास केला होता.
=========================================
गृहमंत्रिपद सांभाळणं हा पार्ट टाईम जॉब नाही : तृप्ती देसाई
कोल्हापूर : गृहमंत्रिपद सांभाळणं हा पार्ट टाईम जॉब नाही, त्यामुळे ते खातं सक्षम व्यक्तीकडे द्यावं, असं मत व्यक्त करुन भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. कोल्हापुरात एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली.
त्याआधी अंबाबाई मंदिरात मारहाण करणाऱ्या श्रीपूजक आणि अन्य कार्यकर्त्यांवर आठ दिवसात गुन्हे दाखल करा, अन्यथा राजवाडा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला.
इतकंच नाही, तर राज्यातल्या मंदिरांमध्ये महिला श्रीपूजकांची नियुक्ती करुन त्यांना पूजेचा अधिकार देण्याची मागणीही त्यांनी केली.
=========================================
भारतात तब्बल 400 कोटी रुपयांच्या नकली नोटा चलनात
नवी दिल्ली : एका रिपोर्टनुसार, देशातील दर 10 लाखामागे 250 नोटा नकली असल्याचे समोर आले आहे. देशात आजच्या घडीला एकूण 400 कोटी रुपयांच्या नकली नोटा आहेत. नकली नोटांच्या एका अभ्यासातून ही माहिती उघड झाली आहे.
भारतीय बाजारात प्रत्येक वर्षी 70 कोटी रुपयांच्या नकली नोटा आणल्या जातात. भारतीय सांख्यिकी संस्थेने (आयएसआय) हा अभ्यास केला आहे.
आर्थिक दहशतवादाशी लढायचं असल्यास कठोप पावलं उचलायला केंद्रानेही सुरुवात केली आहे. यामध्ये एनआयएला सीबीआय, आयबी, डीआयआय, रॉ आणि राज्य पोलिसांच्या विभागांची सोबत आहे.
आजच्या घडीला जवळपास 50 टक्के हजार रुपयांच्या नकली नोटा आहेत. विशेष म्हणजे 100 आणि 500 च्या नकली नोटांच्या प्रमाण 1000 च्या नकली नोटांपेक्षा 10 टक्क्यांनी जास्त आहे.
भारतीय सांख्यिकीचा अभ्यास बँकिंग क्षेत्रातील रोख रकमेच्या देवणा-घेवणीवर आधारित आहे.
बँकांना अधिक प्रमाणात नकली नोटा सापडतात. या अभ्यासानुसार, अजूनही बाजारात अनेक नकली नोटा असतील. नकली नोटा शोधण्याची मोहीम आणखी वेगवान केली पाहिजे, असेही अभ्यासातून सूचना देण्यात आली आहे.
=========================================
नाशकात प्रेक्षकांची हुल्लडबाजी, आर्ची-परशाचा काढता पाय
नाशिक : सैराटच्या चाहत्यांच्या हुल्लडबाजीमुळे आयोजित कार्यक्रम 2 मिनिटात गुंडाळण्याची नामुष्की नाशिकमध्ये आली. प्रेक्षकांच्या वेढ्यामुळे आर्ची-परश्याला काढता पाय घ्यावा लागला.
धन्वंतरी कॉलेजच्या फॅशन शोच्या निमित्ताने ‘सैराट’ चित्रपटातील आर्ची-परशा म्हणजे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर नाशिकच्या चोपडा लॉन्सवर आले होते. पण आकाश आणि रिंकू मंचावर येताच त्यांना भेटण्यासाठी प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करत स्टेजवर प्रवेश केला.
त्याचवेळी बाऊंसर्सनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, पण गर्दी वाढतच चालल्याने अखेरीस आयोजकांनी राष्ट्रगीत सुरु करुन, कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.
दरम्यान या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी सभागृहाच्या बाहेर हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्याने काहीकाळ ट्रॅफिक जामही झालं होतं.
सैराट फिल्म रिलीज होऊन दोन आठवडे झाल्यानंतरही यातल्या कलाकारांची क्रेझ कायम आहे आणि याचाच फटका नाशिकमधल्या या कार्यक्रमाला बसला.
=========================================
पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाला प्रथमच मातोश्रींची भेट
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री त्यांच्या निवासस्थानी भेटीला आल्या होत्या. या भेटीचे फोटो पंतप्रधानांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.
मोदींनी आपल्या 7 आरसीआर या निवासस्थानाची सैर मातोश्रींना घडवली. व्हिलचेअरवर बसवून त्यांनी परिसरातील बगिच्यात नेलं.
‘माझी आई गुजरातला परतली. मोठ्या कालावधीनंतर तिच्यासोबत क्वॉलिटी टाइम घालवता आला, तेही आरसीआरला तिने दिलेल्या पहिल्या भेटीत’ असं मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
=========================================
इटालियन ओपनमध्ये सानिया आणि मार्टिनाची जोडी अजिंक्य
मुंबई : भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस या अव्वल मानांकित जोडीनं इटालियन ओपनचं विजेतेपद मिळवलं. वर्ल्ड नंबर वन सानिया आणि मार्टिनानं रशियाच्या एलेना व्हेसनिना आणि एकाटरिना माकारोव्हा या जोडीवर 6-1, 6-7 आणि 10-3 अशी मात केली.
सानिया आणि मार्टिनानं क्ले कोर्टवर सलग तिसऱ्या स्पर्धेत फायनल गाठली होती. याआधी स्टुटगार्ट आणि माद्रिदमधील स्पर्धांमध्ये सानटिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. पण आता इटालियन ओपन जिंकून सानिया आणि मार्टिनानं यंदाच्या मोसमातलं पाचवं विजेतेपद साजरं केलं.
सानिया-मार्टिनानं यंदा ऑस्ट्रेलियन ओपनसोबतच सिडनी, ब्रिस्बेन आणि सेंट पीटर्सबर्गमधील स्पर्धाही जिंकल्या होत्या. त्यानंतर इटालियन ओपनचं विजेतेपद हे सानिया आणि मार्टिनाचं एकूण चौदावं विजेतेपद आहे, तर सानियाचं हे कारकीर्दीतलं सदतिसावं विजेतेपद आहे.
=========================================
सुरक्षा आणि स्वातंत्र्याची हमी दिल्यास विजय मल्ल्या भारतात परतण्यास तयार
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. 16 - बँकांचे 9000 कोटी रुपये बुडवून परदेशात निघून गेलेल्या विजय मल्ल्यांनी आपण दिलेलं वचन पाळण्याची हमी दिली आहे. तसंच स्टेट बँक ऑफ इंडियासहित इतर बँकांसमोर ठेवलेल्या नव्या प्रस्तावावर लवकरच काम करण्यास सुरुवात करणार असल्याचं विजय मल्ल्यांनी सांगितलं असल्याची माहिती युनायटेड ब्रेवरीज लिमिटेडच्या (युबीएल) बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी दिली आहे. व्हिडिओ कॉन्फिरन्सिंगद्वारे विजय मल्ल्यांसोबत झालेल्या बोर्ड ऑफ मीटिंगमध्ये ते सहभागी झाले होते.शुक्रवारी मुंबईत युबीएलची बोर्ड मीटिंग पार पडली. यावेळी विजय मल्ल्या लंडनहून व्हिडिओ कॉन्फिरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. 'आम्ही अनेक विषयांवर चर्चा करत चिंता व्यक्त केली, मल्ल्या यांनी बँकांचे कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न करत असून लवकरात लवकर कर्ज फेडू अशी हमी दिली आहे. मी भारतात परत येऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे, पण माझ्या सुरक्षेची आणि स्वातंत्र्याची हमी देण्यात यावी असं विजय मल्ल्या बोलले आहेत', अशी माहिती स्वतंत्र बोर्ड सदस्य किरण मजुमदार शॉ यांनी दिली आहे.
=========================================
ऐश्वर्याने जांभळ खाल्ली का ? - सोशल मिडीयाचा सवाल
- ऑनलाइन लोकमतपॅरिस, दि. १६ - कान्स चित्रपट महोत्सवातील ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकची नेहमीच माध्यमांमध्ये चर्चा असते. रविवारी कान्समधला ऐश्वर्याचा लूक असाच माध्यमांमध्ये खासकरुन टि्वटरवर चर्चेचा विषय ठरला आहे. रविवारी ऐश्वर्या माध्यमांसमोर आली तेव्हा तिने ओठांना उठावदार जांभळया रंगाचे लिपस्टिक लावले होते.नेहमीपेक्षा तिचा हा लूक एकदम वेगळा होता. मेकअपमध्येही ऐश्वर्याचे सौदर्य खुलून दिसते पण यावेळी ऐश्वर्याची लिपस्टिकच जास्त उठून दिसत होती. यावर टि्वटरवरुन वेगवेगळया प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. काल तिच्या 'सरबजीत' या आगामी चित्रपटाचे कान्समध्ये स्क्रिनिंग झाले.कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या गोल्डन ड्रेसमध्ये अवतरतली आणि तिने अनेकांना घायाळ केले. यात तिचा पती अभिषेक बच्चनही होता. अभिषेकने तिचा ब्लँक अँड व्हाईट लूकमधला फोटोही सोशल मिडीयावर पोस्ट करुन एक फोटो हजार शब्दांचे काम करतो असा संदेश लिहीला होता.
=========================================
विज्ञान आणि गणित विद्यार्थ्यांचे नावडते विषय
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १६ - गणित आणि विज्ञान विषय शिकवण्याच्या त्याच त्याच जुनाट पद्धतीमुळे माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांचा या दोन विषयांमधील रस कमी होत चालल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीने हे निरीक्षण नोंदवले आहे.गणित आणि विज्ञान विषयात रुची नसल्यामुळे विद्यार्थी पुढे मानवविज्ञान आणि कॉमर्स या विषयांकडे वळत असल्याचेही समितीने म्हटले आहे. गणित, विज्ञान या दोन विषयात दर्जेदार आणि चांगल्या शिक्षकांची कमतरता असल्याचेही या समितीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी नव्याने योजना आखण्यासाठी विशेष कार्यदलाची स्थापना करण्याची सूचना समितीने आपल्या अहवालात केली आहे.गणित-विज्ञान शिकवण्याच्या कौशल्यात सुधारणा करण्याबाबत शिक्षकही तितके गंभीर नसल्याचे समितीने म्हटले आहे. समितीने दिल्ली, महाराष्ट्र, तेलंगण, त्रिपुरा आणि उत्तरप्रदेशमधील शाळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या तसेच विविध माहितींचा अभ्यास करुन हा अहवाल तयार केला आहे.
=========================================
बंदोबस्ताच्या ठिकाणीच पोलिसांना नाश्ता-जेवण
- प्रगती जाधव-पाटील,सातारा-अहोरात्र सेवा बजावताना पोलिसांची अन्नाअभावी होणारी आबाळ लक्षात घेऊन सातारा पोलिस दलाने अन्नपूर्णा व्हॅनची निर्मिती केली. यामुळे बंदोबस्ताच्या ठिकाणीच पोलिसांना ताजा आणि सकस नाष्टा, जेवण मिळू लागले आहे. पोलिसांचे आरोग्य राखण्यात या उपक्रमाचा मोठा हातभार लागत असल्याने ही योजना कोल्हापूर परिक्षेत्रात राबविण्यात येणार आहे.सातारा जिल्ह्यात पोलिसांवर गुन्ह्यांपेक्षाही यात्रा, जत्रा, उत्सव आणि निवडणूक यांचा ताण असतो. बंदोबस्ताच्या ठिकाणी जेवण उशीर मिळते किंवा मिळतही नाही. याची दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पुढाकार घेतल्यानंतर अन्नपूर्णा व्हॅन सातारा पोलिसांत दाखल झाली.एकावेळी सुमारे सातशेहून अधिक पोलिसांच्या ताज्या जेवणाची सोय या व्हॅनमार्फत होत आहे. (प्रतिनिधी)>अशी असते सोय : बंदोबस्तासाठी कोणत्या ठिकाणी किती कुमक जाणार याचे नियोजन ठरल्यानंतर व्हॅनमधील कर्मचाऱ्यांना त्याची माहिती दिली जाते. त्यानंतर आवश्यक शिदा घेऊन ही व्हॅन निघते. अनेकदा भाजी, दूध आणि अन्य जिन्नस यांची सोय मुक्कामाच्या गावाच्या ठिकाणी केली जाते. बंदोबस्ताच्या ठिकाणापासून सर्वांना जवळ पडेल, अशा मोकळ्या जागेवर ही व्हॅन उभी करण्यात येते.
=========================================
जगातील सर्वांत सुंदर फुले उमलतात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये!
- अशोक खरात,खोडद (जि. पुणे)- आपल्या आजूबाजूला गुलाब, मोगरा, जाईजुई अशी किती तरी सुंदर फुलं आहेत. पण आॅर्किडला जगातील सर्वाधिक सुंदर फुलाचा मान मिळालेला आहे. या फुलाचे ४ प्रकार जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये नाणेघाट व जीवधन किल्ल्याच्या जंगलात आढळले आहेत.आॅर्किड्सची फुलांची मोठी गंमत म्हणजे ही फुले झाडावर उलटी लागतात. म्हणजेच वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर. ही फुले एवढी मनमोहक असतात की, कोणीही सहज आकर्षित होतं.खोडद (ता. जुन्नर) येथील वनस्पती अभ्यासक राजकुमार डोंगरे यांनी सांगितले की काही आॅर्किड्स काही मीटरपर्यंत वाढतात. याउलट वृक्षांच्या खोडात वाढणारी आॅर्किड्स दरवर्षी नवीन जन्म घेतात. एकदा वाढलेली फांदी प्रजननाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गळून पडते. नवीन वर्षी नव्या फांद्या फुटतात. यामध्येदेखील मुळांच्या रूपानं आॅर्किड निसर्गात मुक्त श्वास घेत असतं.झाडांच्या खोडांत वाढणारी आॅर्किड्स ही बहुधा या प्रकारातील असतात, म्हणजेच ते कुठल्या तरी वृक्षांच्या फांद्यांवर किंवा खोडांत वाढतात. पण अन्नद्रव्यांसाठी ते त्यावर अवलंबून नसतात.फुलाची दांडी ही १८० कोनामध्ये वळलेली असते. अर्थात हे आपण वरवर पाहताना लक्षात येत नाही. आणखी एक गमतीदार गोष्ट म्हणजे आॅर्किडच्या बिया अतिशय सूक्ष्म असतात. सूक्ष्म म्हणजे नुसत्या डोळ्यांनी न दिसण्याइतक्या सूक्ष्म असतात. त्यासाठी सूक्ष्मदर्शीचा उपयोग करावा लागतो, असेही डोंगरे यांनी सांगितले.
=========================================
४० कोटी खर्चून बांधणार चार हजार घरे
- ठाणे : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे व प्रतीक्षा यादीत असलेल्या चार हजार बेघर कुटुंबीयांना इंदिरा आवास योजनेतून घरकुले दिली जाणार आहे. त्यासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित आहे.जिल्हा प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षात सुमारे चार हजार घरकुले बांधण्याचे नियोजन आहे. एका घरकुलास सुमारे १ लाख रुपये खर्च आहे. यानुसार, सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यातील या घरकुलांसाठी खर्च होणार आहे. मात्र, यासाठी सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणातील नवीन दारिद्र्यरेषेची यादी प्रसिद्ध होणे गरजेचे आहे. या नव्या यादीतील सुमारे ४ हजार गरजू कुटुंबीयांना या घरकुलाचा लाभ देण्याचे नियोजन आहे. अन्यथा, जुन्या यादीतील कुटुंबीयांपैकी शिल्लक राहिलेली २ हजार घरकुलेही या वर्षी बांधावी लागणार आहेत. सामाजिक, आर्थिक जात सर्वेक्षणातील संपूर्ण त्रुटी पूर्ण केलेल्या आहेत. तसा अहवालही आता केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे. त्यावर निर्णय होऊन नवीन दारिद्र्यरेषेची यादी लवकरच प्रसिद्ध होण्याची अपेक्षा जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. त्यानुसार, या वर्षात जाहीर केलेली अर्थसंकल्पीय तरतूद खर्च करावी लागणार आहे. अन्यथा, हा निधी रद्द होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
=========================================
दोघा भावांनी काढला ४५ फूट विहिरीतील गाळ
- मानाजी धुमाळ,सांगली-दुष्काळी परिस्थितीमध्ये रेठरेधरण (ता. वाळवा, जि. सांगली) येथील दोघा भावांनी कोणत्याही यंंत्राशिवाय महिनाभर परिश्रम घेऊन ४५ फूट विहिरीमधील दहा फूट गाळ काढला. शिवाय तो स्वत:च डोकीवरून वाहून विहिरीबाहेर टाकला.उत्तम व हणमंत पंडित पाटील अशी त्यांची नावे आहेत. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कुटुंबाची व शेतीची जबाबदारी खांद्यावर पडलेल्या पाटील बंधूंनी कष्टाच्या जोरावर शेती फुलवली. शेतीमध्ये उत्पन्न निघाले नसल्यामुळे आणि दुष्काळामुळे काम नसल्याने त्यांनी विहिरीमधील गाळ यारीच्या साहाय्याने काढण्याऐवजी स्वत:च काढण्याचा निर्णय घेतला.सकाळी सहा ते दुपारी एक व दुपारी तीन तास विश्रांती घेऊन पुन्हा दुपारी चार ते सायंकाळी सातपर्यंत श्रम करून टिकाव, खोरे व पाट्यांच्या साहाय्याने विहिरीमधील गाळ बाहेर काढला. विहिरीमध्ये सुरुवातीला दोन ते तीन फूट पाणी होते. त्यामुळे बादलीच्या साहाय्याने पाणी विहिरीबाहेर टाकले. एका महिन्यात सुमारे १० फूट म्हणजे साधारणत: १४ ट्रॉली गाळ उपसण्यात दोघांना यश आले.
=========================================
इच्छामरणाच्या विधेयकाचा मसुदा तयार, केंद्र सरकारने मागितली मते
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16- अनेक वर्षं कायदेशीर लढाई लढल्यानंतर अखेर केंद्रानं इच्छामृत्यूला परवानगी देण्यासाठी विधेयक तयार केलं आहे. या विधेयकानुसार रुग्णाला प्रकृतीत सुधारणा होत नसल्यास स्वतःच्या मनानं वैद्यकीय उपचार थांबवून इच्छामृत्यूची परवानगी मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी गेल्या आठवड्यात या विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. या विधेयकाची माहिती केंद्रीय मंत्रालयाच्या वेबसाईटवरही टाकण्यात आली आहे. केंद्र सरकारनं लोकांना या विधेयकावर वेबसाईट, इमेलद्वारे जास्तीत जास्त अभिप्राय नोंदवण्याचाही सल्ला दिलाय. 19 जून 2016च्या आधी या विधेयकावर लोकांनी मत कळवण्याचं आवाहनही यावेळी केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे.हे विधेयक रुग्णानं इच्छामृत्यू घेतल्यास डॉक्टरसह रुग्णालाही सुरक्षा पुरवणार आहे. हे विधेयक तज्ज्ञांच्या शंकांचंही निरसन करणार आहे. एखाद्या रुग्णाला त्याच्या शेवटच्या क्षणी आरोग्याची पुनर्प्राप्ती होणार नाही असे वाटत असल्यास तो या विधेयकानुसार इच्छामृत्यू घेऊ शकणार आहे. या विधेयकातील परिच्छेद 11 नुसार रुग्णानं जरी इच्छामृत्यू घेतला तरी त्याच्या मृत्यूला डॉक्टरला जबाबदार धरता येणार नाही. या विधेयकाच्या मान्यतेसाठी सरकार वैद्यकीय टीमसोबत हायकोर्टात जाणार आहे. मागच्या वेळी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका इच्छामृत्यूच्या प्रकरणात केंद्र सरकारनं यू-टर्न घेतला होता. त्या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्यात होणार आहे. त्यामुळे या विधेयकावर वैद्यकीय चिकित्सकांसोबत कायदेशीर सल्लाही घेण्यात येतो आहे. मंत्रालयाच्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या ड्राफ्टनुसार 16 वर्षांच्या वरील व्यक्तीला प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव इच्छामृत्यूची परवानगी मिळणार आहे.हिंदुजा हॉस्पिटलचे न्युरॉलॉजिस्ट आणि सर्वोच्च न्यायालयात केईएम परिचारिका अरुणा शानबाग यांची बाजू मांडण्यासाठी नियुक्त केलेल डॉ. रूप गुरसहानी यांच्या मते, सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. इच्छामृत्यूबाबत आणखी व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मंत्रालयाचं इच्छामृत्यूच्या परवानगीसाठी सकारात्मक पाऊल आहे. तर डॉक्टर नागेश सिम्हा यांच्या मते, इच्छामृत्यू चांगल्या मृत्यूसाठी योग्य आहे. आपण यावर आणखी अधिक उपयुक्त माहिती गोळा केली पाहिजे. देश हा एखाद्या विकसित यंत्रणेसारखं काम करू लागला आहे. मेंदू निष्क्रिय असल्याचं प्रमाणपत्र मिळाल्यावरच त्याला इच्छामृत्यूची परवानगी देणं योग्य ठरणार असल्याचं मत डॉ. नागेश सिम्हांनी मांडलं आहे.
=========================================
रविवार ठरला घातवार
- मुंबई : रविवारी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात राज्यातील २६ जणांचा मृत्यू व सात जण जखमी झाले. तेलंगणच्या आदिलाबाद जिल्ह्यात अॅपे आॅटोला खडीने भरलेल्या टिप्परने दिलेल्या धडकेत नांदेडच्या १३ मजुरांसह १५ भाविक ठार व ३ जण गंभीर जखमी झाले़ तर, मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी पहाटे शिवनेरी बस आणि मोटारीच्या झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. नगर-मनमाड महामार्गावर लक्झरी बस व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन चार जण जागीच ठार तर चार जखमी झाले.नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील १८ मजूर आदिलाबादच्या निर्मलजवळील आडेली देवीच्या दर्शनाला आॅटोने जात असताना मध्यरात्री दहेगाव शिवारात समोरून येणाऱ्या टिप्परने (पान १० वर)(पान १ वरून) जोरदार धडक दिली़ त्यानंतर खडीने भरलेला हा टिप्पर उलटल्याने आॅटोचा चक्काचूरझाला. क्रेनच्या सहाय्यानेटिप्परला बाजूला करून मृतांना बाहेर काढले़यात गणपत आडेलू बाजेकर (५०), रतनबाई गणपत बाजेकर (४५), नरसिंग गणपत बाजेकर (३२), वंदना नरसिंग बाजेकर (३०), महानंदा दिलीप बाजेकर (२८), दीपा दिलीप बाजेकर (७), साई दिलीप बाजेकर (४),राजेश नरसिंग बाजेकर (२), शोभा राहुल बाजेकर (१९), प्रेम प्रल्हाद भालेराव (३), अर्चना सुरेश भालेराव (१०) ( सर्व जि़ नांदेड), प्रियंका गंगाधर दिवटेकर (१३) व आॅटोचालक बालू पोशट्टी संपागी (दोघेही तेलंगण), सुशीलाबाई बाबुराव गायकवाड (४५) व अर्जुन बाबुराव गायकवाड (११, दोघेही रा़ रामखडक, ता़उमरी, जि़नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला़ तर, राहुल गणपत बाजेकर (२२), दिलीप गणपत बाजेकर (३२), गंगाधर चन्ना ब्रम्हैया (२५) हे गंभीर जखमी झाले आहेत़लक्झरी-कंटेनर अपघातात चार ठारराहाता (अहमदनगर) : राहाता तालुक्यात पिंप्रीनिर्मळ हद्दीत नगर-मनमाड महामार्गावर लक्झरी बस व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन चार जण ठार तर चार जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली़रविवारी पहाटे पाचच्या सुमारास लक्झरी बस व कंटेनर हे एकामागून एक शिर्डीकडून नगरच्या दिशेने जात होते़ या कंटेनरमध्ये पवनचक्कीचे पाते होते़कंटेनरने अचानक जोराचा ब्रेक मारल्याने पाठीमागून येणारी आराम बस कंटेनरला धडकली़ पवन चक्कीचे पाते बसमध्ये घुसले़ यात बसचालक जितेंद्र रामरतन मुक्ती (४३), रचना जैन (४२), अर्चना शहा (४५, सर्व मध्य प्रदेश) व वाहक राकेश (पूर्ण नाव माहित नाही) यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)>शिवनेरी-कारचा अपघातमहाड : मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी पहाटे माणगाव तालुक्यातील रुद्रोली गावाजवळ पणजी-मुंबई शिवनेरी बस आणि एका मोटारीच्या झालेल्या अपघातात सात जणांवर काळाने झडप घातली. डोंबिवली येथील तांबे कुटुंबीय हे मंडणगड तालुक्यातील पेवे येथे जात असताना चालकाला झोप अनावर झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यात मोटारीतील संतोष तांबे (४३), स्वाती तांबे (३५), वृषभ तांबे (६), भिकूराम तांबे (७२) व प्रवीण पांडव (२९) मोटारचालक हे जागीच ठार झाले तर सूर्यकांत तांबे (४७), स्वप्निल तांबे (३५) यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
=========================================
वर्ष उलटूनही प्रशिक्षणाचे मानधन नाही
- मुंबई : राज्यातील हजारो शिक्षकांना शिक्षण विभागाने गेल्या वर्षी पाचवी आणि या वर्षी सहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले. मात्र या प्रशिक्षणासाठी देण्यात येणारे मानधन शिक्षकांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे हजारो शिक्षकांचे थकीत मानधन तत्काळ देण्याची मागणी शिक्षक परिषदेने प्रकल्प संचालकांकडे केली आहे.याबाबत शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, राज्यात ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ उपक्रम राबवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिक्षकवर्ग मदत करत आहे.या उपक्रमातील इयत्ता पाचवीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शिक्षकांना एप्रिल २०१५मध्ये देण्यात आले. सहा दिवसांच्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील हजारो शिक्षकांनी हजेरी लावली. त्याबदल्यात प्रशिक्षणार्थी शिक्षकांना दैनिक भत्ता, मार्गदर्शकांचे मानधन व अन्य खर्चासाठी निधी मिळतो. हा निधी केंद्र शासनाकडून अनुदान स्वरूपात मंजूर केला जातो. मात्र प्रशिक्षण आयोजित करणाऱ्या संयोजकांनाच अनुदान मिळाले नसल्याने राज्यातील हजारो शिक्षकही मानधनापासून वंचित आहेत. संबंधित अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यानेच अनुदान आणि मानधन मिळण्यात विलंब होत असल्याचा आरोप बोरनारे यांनी केला आहे.
=========================================
मच्छीमार नौकांसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प
- मनोहर कुंभेजकर,मुंबई-राज्यात असलेला पाण्याचा भीषण दुष्काळ आणि मुंबई महानगरपालिकेने मुंबईत केलेली पाणीकपात यांच्या कातरीत मुंबईतील मच्छीमार समाज सापडला आहे. त्यामुळे खोल समुद्रात जाणाऱ्या मच्छीमार नौकांना पाणीपुरवठा करणे ही मच्छीमारांची मोठी समस्या बनली आहे. यावर मात करत वेसावे कोळीवाड्यातील बाजार गल्ली कोळी जमात संस्थेच्या सुमारे ४५० सभासदांनी एकमताने निर्णय घेऊन आणि सामाजिक बांधिलकी जपत नाममात्र दरात वेसावे समुद्रकिनारी वेसावकरांना आधारवड ठरणारा आणि राज्यातील समुद्रकिनारी असलेला पहिलाच जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केला आहे. रोज २४ तास हा जलशुद्धप्रकल्प सुरू असतो आणि येथील मच्छीमार बांधवांनादेखील यामुळे रोजगार मिळाला आहे. येथील मच्छीमार नौकांसाठी गरजेनुसार या प्रकल्पातून शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.या प्रकल्पातून शुद्धीकरण केलेले पाणी थेट समुद्रकिनारी शाकारलेल्या मच्छीमार नौकांच्या पाण्याच्या कॅनमध्ये भरल्यामुळे मच्छीमारांची दमछाक थांबली आहे. मासेमारीसाठी जाणाऱ्या २० ते २२ मच्छीमार नौकांना या प्रकल्पाचा लाभ होत आहे.
=========================================
मालेगावच्या आरोपींवर मोदींची कृपा!
- नवी दिल्ली : २००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाखल केलेल्या ताज्या आरोपपत्राने भारताची सचोटी व दहशतवादाविरुद्ध लढा देण्यातील प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह लावले आहे, असे सांगून या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात आली पाहिजे, अशी जोरदार मागणी काँग्रेसने केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालेगाव प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी करण्याचा आदेश देऊन आपली संविधानाची घेतलेली शपथ सार्थक ठरवावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत केले. ‘एनआयए’ ही आता ‘नमो तपासी संस्था’ (नमो इन्व्हेस्टीगेशन एजन्सी) बनली आहे, असा स्पष्ट आरोप करून शर्मा म्हणाले, मुंबई एटीएसचे प्रमुख (दिवंगत) हेमंत करकरे यांनी केलेला सखोल तपास मोडीत काढण्याच्या उद्देशानेच एनआयएने हे आरोपपत्र दाखल केले आहे, असे दिसते. एटीएसने याआधी नोंदविलेले सर्व जाबजबाब आता निष्प्रभ ठरविण्यासाठीच एनआयएने आरोपींवरील ‘मकोका’चे आरोप मागे घेतल्याचे स्पष्ट होते.एनआयएने साध्वी प्रज्ञासिंहसह सहा आरोपींवरील ‘मकोका’ रद्द केला होता. एनआयएने अचानक ही भूमिका का घेतली, याचा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत तपास करण्यात आला पाहिजे, अशी मागणी करून शर्मा म्हणाले, या घडामोडीमुळे भारताची अखंडता आणि दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या कटिबद्धतेवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. करकरेंचे बलिदान व्यर्थ घालविण्याच्या उद्देशाने एनआयएने हा नवा पवित्रा घेतला आहे काय? आता मोदींनीच यात हस्तक्षेप केला पाहिजे.
=========================================
जयललिता, करुणानिधी यांना नोटीस
- चेन्नई : निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये फसवी आश्वासने देऊन आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल तामिळनाडूच्या अण्णाद्रमुकच्या अध्यक्ष आणि राज्याच्या मुख्यमंत्री जयललिता व द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांना निवडणूक आयोगाने ‘कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच साडेसहा कोटींची रोकड जप्त केल्यानंतर व मतदारांना रोख रकमेची लाच वाटली जात असल्याच्या तक्रारी आल्यावर आयोगाने तामिळनाडूच्या कुरुर जिल्ह्याच्या अरवाकुरुची मतदारसंघातील मतदान २३ मेपर्यंत पुढे ढकलले.
=========================================
केमोविना कर्करोग बरा करणार
- बंगळुरू : अत्यंत क्लेषदायक असे ‘साईड इफेक्ट’ होणाऱ्या केमोथिरपीविना विविध प्रकारचे कर्करोग बरे करण्याचे एक अभिनव तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने येथील ‘इंडियन इस्टिट्यूट आॅफ सायन्स’च्या वैज्ञानिकांनी आश्वासक प्रगती केली आहे.या संस्थेच्या ‘सेंटर फॉर नॅनो सायन्स अॅण्ड इंजिनियरिंग’मधील (सीईएनएसई) वैज्ञानिकांच्या चमुने रुग्णाच्या शरिरातील कर्करोगग्रस्त अवयवाच्या बाधित पेशींना अत्यंत सुक्ष्म अशा ‘नॅनो व्हॉयेजर्स’द्वारे थेट औषध पोहोचविण्याचे तंत्र विकसित केले आहे. हे औषधवाहक ‘नॅनो व्हॉयेजर्स’ पाच नॅनोमीटर एवढ्या सुक्ष्म आकाराचे असतात. (एक नॅनोमीटर म्हणजे एक मीटरचा एक अब्जावा भाग). हे ‘व्हॉयेजर्स’ कर्करोगरोधी औषधांच्या अणिकणांनी अवंगुंठित असतात. ते हे औषध थेट बाधित पेशींपर्यंत पोहोचवितात. परिणामी कर्करोगग्रस्त पेशी नष्ट होतात व त्यामुळे कर्करोगाचा प्रसार थांबतो.या केंद्राच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, हे तंत्र आम्ही सैद्धांतिकदृष्ट्या विकसित केले आहे. आता या ‘नॅनो व्हॉयेजर्स’व्दारे नेमक्या कोणत्या कर्करोगरोधी औषधाचा वापर करणे सर्वाधिक परिणामकारक ठरेल हे ठरविण्यासाठी आम्ही बंगळुरु येथील ‘किडवई मेमोरियल इन्स्टिट्यूट आॅफ आॅन्कॉलॉजी’मधील कर्करोगतज्ज्ञ आणि काही रेडिएशन तज्ज्ञांच्या मदतीने आणखी काही प्रयोग करणार आहोत.
=========================================
चीनने ‘पेंटॅगॉन’चा अहवाल फेटाळला
- बीजिंग : अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने चीनच्या लष्करी क्षमतेबाबत तयार केलेल्या अहवालावर चीनने हल्लाबोल केला. या अहवालाने परस्पर विश्वासाला ‘मोठा तडा’ दिल्याचे म्हटले आहे. पेंटॅगॉनने आपल्या संरक्षणविषयक धोरणाला मुद्दाम विपर्यास्त स्वरूपात मांडल्याचेही चीनचे म्हणणे आहे.पेंटॅगॉनने शुक्रवारी आपला जागतिक संरक्षणविषयक अहवाल जारी केला. त्यात चीनच्या वाढत्या लष्करी शक्तीचा आणि त्या देशाच्या लष्करी हालचालींचा मागोवा घेण्यात आला आहे. या अहवालावर चीनने ‘तीव्र’ असंतोष व्यक्त केला. अहवालात लष्करी विकासाला चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचे म्हटले आहे. दक्षिण चीन सागर, भारतीय सीमेवर आणि पाकिस्तानात चीन आपली लष्करी उपस्थिती वाढवीत असल्याचे आणि त्यातून तणाव वाढत असल्याचे म्हटले आहे. विशेषत: दक्षिण चीन सागरात लष्करी उपस्थिती वाढविण्याबाबत विश्लेषण केले आहे.
=========================================
दोन हजार कांगारूंना आॅस्ट्रेलिया संपवणार
- मेलबर्न : कांगारूंचा देश म्हणून ओळख असलेल्या आॅस्ट्रेलियाला आता कांगारूंची संख्या कशी कमी करावी, असा प्रश्न पडला असून, त्यासाठी त्यांच्यावर उपचार करून त्यांची जननक्षमता थांबवण्याचे वा कमी करण्याचे तेथील वन प्रशासनाने ठरवले आहे. पण तेवढे पुरेसे नसल्याने आॅस्ट्रेलियाच्या राजधानी परिसरातील १0 अभयारण्यांमध्ये असलेल्या तब्बल १९९१ कांगारूंना मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हे करण्यासाठी मोहीमच उघडण्यात येणार असून, रोज संध्याकाळी ही सारी अभयारण्ये बंद ठेवण्यात येणार आहेत. त्या काळात कांगारूंना मारण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे.
=========================================
थकीत कर्ज वाढणार!
- मुंबई : कर्जबुडवे उद्योगपती विजय मल्ल्या यांच्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आलेल्या थकीत कर्जाच्या ग्रहणाने बँकिंग उद्योगाला ग्रासले असले असतानाच, आता या ग्रहणाची सावली आणखी दाट होण्याचे संकेत खुद्द केंद्रीय वित्तमंत्रालयानेच दिले आहेत.अर्थ मंत्रायलाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात थकीत कर्जाचे वाढते प्रमाण यासंदर्भात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. यातील काही प्रमुख मुद्दे सांगायचे झाल्यास, देशाच्या विकासाच्या प्रक्रियेला गतिमान करण्यासाठी सरकारने स्वाभाविक प्राधान्य हे पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी दिले. मात्र, असे होताना कर्जाची उचल ही प्रामुख्याने सरकारी बँकांकडूनच झाली. यातील खाजगी बँकांचे प्रमाण तुलनेने किरकोळ आहे. रस्तेबांधणी, बंदरविकास, विमानतळ अशा दीर्घकालीन प्रकल्पांसाठी हजारो कोटी रुपयांचे कर्ज हे प्रकल्प साकारू पाहणाऱ्या किंवा खाजगी-सरकारी भागेदारी तत्त्वावर करून पाहणाऱ्या कंपन्यांना दिली गेली. कर्ज वितरण झाले तरी प्रकल्प पूर्तीसाठी आवश्यक त्या परवानग्या रखडल्या वा काही ठिकाणी कोर्टकज्जे झाल्याने प्रकल्प रखडले. परिणामी कर्ज थकले. याचा फटका केवळ त्या कंपन्यांनाच बसला नाही, तर या थकीत कर्जामुळे बँकांवरही प्रचंड प्रमाणावर ताण आला आहे.
=========================================
नवी दिल्ली - कर्करोगासारख्या गंभीर आजारातून बरा होत पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणारा भारतीय क्रिकेटपटू युवराजसिंगने कर्करोगग्रस्त मुलांना प्रेरणा देत मी पुन्हा सहा षटकार मारणार असल्याचे सांगितले.
मी पुन्हा सहा षटकार ठोकणार - युवराजसिंग
| |
-
| |
आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात युवराजने 24 चेंडूत 42 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यानंतर युवराजने कर्करोगग्रस्त मुलांची भेट घेतली. सात ते आठ वय असलेल्या या मुलांना युवराजने जगण्याची प्रेरणा देत अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या. यावेळी मुलांनी युवराजला प्रश्न विचारले. एका मुलाने युवराजला पुन्हा सहा षटकार मारणार का? असे विचारले असता तो म्हणाला की तुम्ही प्रार्थना करा मी पुन्हा सहा षटकार मारेल.
दक्षिण आफ्रिकेत 2007 मध्ये झालेल्या ट्वेंटी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत युवराजने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सलग सहा षटकार खेचले होते. याबाबत युवराजने मलाच माहित नाही, मी कसे षटकार मारले होते असे म्हटले आहे. युवराजला 2011 च्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत सामनावीर म्हणून निवडण्यात आले होते. त्याचवेळी त्याला कर्करोग असल्याचे समजले होते. त्याने कर्करोगावर यशस्वीरित्या मात करून पुन्हा क्रिकेट खेळण्यास सुरवात केली.
=========================================
पाक महिलेला 13 वर्षांनी भारतीय नागरिकत्व
| |
-
| |
गुरदासपूर - एका पाकिस्तानी महिलेला 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय नागरिकत्व मिळाले आहे.
गुरदासपूरमधील कादिया भागात राहणाऱ्या ताहिरा हुजूर यांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र उपायुक्त प्रदीप सबरवाल यांच्या हस्ते देण्यात आले. 33 वर्षीय ताहिरा यांनी मकबूल अहमद यांच्याशी 2003 मध्ये विवाह केला होता. सात वर्षे त्यांच्यासोबत राहिल्यानंतर मार्च 2011 मध्ये त्यांनी भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केला होता. पंजाब सरकारनेही केंद्रीय गृह मंत्रालयाकडे याबाबत पाठपुरावा केला होता. अखेर केंद्रीय गृह मंत्रालयाने ताहिरा यांना भारतीय नागरिकत्व दिले आहे. त्यांना कादियामधून इतरत्र बाहेर फिरण्यास मनाई होती. पण, आता त्या भारतात कोठेही फिरू शकणार आहेत. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे.
ताहिरा या मुळच्या पाकिस्तानमधील फैसलाबाद येथील रहिवाशी आहेत. त्यांनी आता भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर सर्वप्रथम पाकिस्तानला जाऊन आईची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यांची आई गेल्या काही वर्षांपासून आजारी आहे. त्यामुळे त्या पासपोर्ट मिळण्यासाठी अर्ज करणार आहेत.
=========================================
दाहोद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याबरोबर तुलना केली आहे.
नरेंद्र मोदींची महात्मा गांधी, शास्त्रींबरोबर तुलना
| |
-
| |
रविवारी पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन गुजरातमधील दाहोद येथे करण्यात आले. यावेळी अमित शहा यांच्यासह शिवराजसिंह चौहान, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे उपस्थित होत्या. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींवर जोरदार स्तुतिसुमने उधळण्यात आली.
शिवराजसिंह चौहान म्हणाले की, महात्मा गांधीचे म्हणणे ज्याप्रमाणे जगातील नागरिक उत्सुकतेने ऐकत असत. तसेच आता पंतप्रधान मोदींचे भाषण जगभरातील नागरिक कुतुहलाने ऐकतात.
तर अमित शहा म्हणाले की, एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी सोडण्याचे पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी अन्नधान्याच्या कमतरतेमुळे स्वेच्छेने काही अन्न सोडण्यास सांगतिले होते. त्यावेळी नागरिकांनी याला प्रतिसाद देत दाळ-भात खाण्याचे सोडले होते.
=========================================
'‘हिंदू राष्ट्र’वाद म्हणजे भगवा दहशतवाद नाही'
| |
-
| |
मुंबई - सत्याची व न्यायाची बूज राखणे म्हणजे दबाव असेल तर आठ वर्षांपूर्वी ज्या बनावट पद्धतीने हिंदू दहशतवादाचा बागूलबुवा उभा केला गेला व निरपराध्यांना अडकवले गेले त्यास काय म्हणायचे? मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात २१ मुसलमान तरुणांना निर्दोष म्हणून सोडले. आम्ही त्याचेही स्वागत करतो व प्रज्ञा सिंह दोषमुक्त झाल्याचाही आनंद व्यक्त करतो. खरे आरोपी बहुधा पाकिस्तानातच पळाले असावेत, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींवरील मोक्का हटविण्यात आल्याचे एनआयएने सांगितले आहे. याच मुद्द्यावर शिवसेनेने आपली भूमिका सामनातील अग्रलेखातून मांडली आहे.
शिवसेनेने म्हटले आहे की, मालेगाव बॉम्बस्फोटात नाहक अडकवून ज्यांचा छळ केला अशा सर्व लोकांनी तपास अधिकार्यांवर बदनामीचा गुन्हा दाखल करायला हवा. मालेगाव बॉम्बस्फोट हा हिंदू दहशतवादाचा प्रकार असल्याची डरकाळी तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताधार्यांनी फोडली. हिंदू कट्टरवादी मंडळींनी हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा बोगस तपास तेव्हाच्या ‘एटीएस’ने म्हणजे दहशतवादविरोधी पथकाने केला. साध्वी प्रज्ञा सिंह, ले. कर्नल पुरोहित यांच्यासह सात-आठ लोकांना या प्रकरणात नाहक गोवले. त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. यानिमित्ताने हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्याची भरपाई कधीच होणार नाही. बरेच लोक हिंदुस्थानचे दुसरे पाकिस्तान करण्याचे मनसुबे पूर्ण करू इच्छित आहेत व राजकीय स्वार्थासाठी अशा लोकांना पाठबळ मिळत आहे, हाच देशद्रोह आहे! त्यामुळे हिंदू राष्ट्र संकल्पना म्हणजे भगवा दहशतवाद नाही.
=========================================
उमा भारतींच्या निवासस्थानी जवानाची आत्महत्या
| |
-
| |
नवी दिल्ली - केंद्रीय जलसंसाधन व नदी विकास मंत्री उमा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बंदोबस्तासाठी असलेल्या जवानाने रविवारी मध्यरात्री गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
दिल्लीतील अकबर रस्त्यावर उमा भारती यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानाबाहेर दिल्ली पोलिसांतील हेड कॉन्स्टेबल बृजपाल हे सेवेस होते. त्यांनी रविवारी मध्यरात्री आपल्या जवळील सर्व्हिस बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.
बृजपाल यांनी हे कृत्य का केले, याचा शोध घेण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांतील सुरक्षा विभागात बृजपाल कार्यरत होता.
=========================================
लोहगाव विमानतळाच्या विस्ताराचा 'टेक ऑफ'
| |
-
| |
पुणे - पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या विस्तारासाठी हवाई दलाकडून विमानतळ प्राधिकरणाला 15.84 एकर जमीन भाडेकरारावर दिली जाणार आहे. या कराराचे तांत्रिक सोपस्कार करण्यापूर्वीही विकासकामांना सुरवात करता येईल. त्यामुळे पुढील महिन्यापासून विमानतळाच्या विकासाची कामे सुरू करता येतील, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी येथे सांगितले.
पुण्याचे लोहगाव हे भारतीय हवाई दलाचे विमानतळ आहे. त्यामुळे सुरक्षा ही विमानतळ विस्तारातील मोठे आव्हान आहे. विमानतळ विस्तारासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. याबाबत पर्रीकर यांनी आज विमानतळावर बैठक आयोजित केली होती. पर्रीकर यांनी विमानतळाच्या जागेवर जाऊन तेथे पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""गेल्या दोन वर्षांपासून विमानतळाच्या विकासासाठी अडथळे प्राथमिक स्तरावर दूर करण्यात आले आहेत. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली आहे. वर्षभरात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या 55 लाखांपर्यंत पोचली आहे. पुण्याच्या विमानतळाचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी हवाई दलाने शक्य तितके सर्व सहकार्य केले आहे. राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने यापुढे जास्त सहकार्य करता येणार नाही. त्यामुळे विमानतळाचा विस्तार करण्यासाठी कालमर्यादेमध्ये विमानतळ प्राधिकरणाला पुण्यासाठी नवीन विमानतळ करावेच लागेल. पण तरीही पुण्याची अडचण लक्षात घेता, येथील उद्योगांची गरज आणि येथून होणारी मालाची वाहतूक लक्षात घेऊन विमानतळाला 15.84 एकर जमीन देण्यात आली आहे. हवाई दल विमान प्राधिकरणाला ही जमीन भाडे करारावर देणार आहे. या करारावर स्वाक्षऱ्या होईपर्यंत याचे काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. हे काम सुरू असतानाच प्रशासनातर्फे कराराचे सोपस्कार पूर्ण केले जातील.‘‘
पुण्याचे लोहगाव हे भारतीय हवाई दलाचे विमानतळ आहे. त्यामुळे सुरक्षा ही विमानतळ विस्तारातील मोठे आव्हान आहे. विमानतळ विस्तारासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. याबाबत पर्रीकर यांनी आज विमानतळावर बैठक आयोजित केली होती. पर्रीकर यांनी विमानतळाच्या जागेवर जाऊन तेथे पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""गेल्या दोन वर्षांपासून विमानतळाच्या विकासासाठी अडथळे प्राथमिक स्तरावर दूर करण्यात आले आहेत. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली आहे. वर्षभरात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या 55 लाखांपर्यंत पोचली आहे. पुण्याच्या विमानतळाचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी हवाई दलाने शक्य तितके सर्व सहकार्य केले आहे. राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टीने यापुढे जास्त सहकार्य करता येणार नाही. त्यामुळे विमानतळाचा विस्तार करण्यासाठी कालमर्यादेमध्ये विमानतळ प्राधिकरणाला पुण्यासाठी नवीन विमानतळ करावेच लागेल. पण तरीही पुण्याची अडचण लक्षात घेता, येथील उद्योगांची गरज आणि येथून होणारी मालाची वाहतूक लक्षात घेऊन विमानतळाला 15.84 एकर जमीन देण्यात आली आहे. हवाई दल विमान प्राधिकरणाला ही जमीन भाडे करारावर देणार आहे. या करारावर स्वाक्षऱ्या होईपर्यंत याचे काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. हे काम सुरू असतानाच प्रशासनातर्फे कराराचे सोपस्कार पूर्ण केले जातील.‘‘
=========================================
तब्बल 18 वर्षांनंतर तिने खाल्ले अन्न
| |
-
| |
कोल्हापूर - सविता चार वर्षांची असताना खेळताना पडली. तिच्या जबड्याला दुखापत झाली. मोठमोठ्या शहरांत तिच्यावर उपचार झाले. पण कालांतराने तिच्या जबड्यात दातांच्या दोन्ही कवळ्या एकमेकांना घट्ट चिकटल्या आणि तिचं खाण बंद झालं. गेली 18 वर्षे ती दाताला असलेल्या किंचित फटीतून पातळ पदार्थांच्या सेवनावर जगली आहे. अखेर सलग 8 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर तिचा जबडा उघडण्यात छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले. ती आता जवळपास चार इंच जबडा उघडू शकते अन्नपदार्थ खाऊ शकते. सांगाव (ता. कागल) इथल्या सविता मोरे हिची जगण्याची वाटच यामुळे सुखकर झाली आहे.
कोल्हापूर - जबड्याच्या शस्त्रक्रियेनंतर अन्न खाणे सुकर झालेल्या सविता मोरे हिला लाडू भरविताना तिचे वडील. शेजारी शस्त्रक्रिया यशस्वी करणारे सीपीआरमधील डॉक्टर.
डॉक्टरांनी तिच्या जबड्याचे स्कॅनिंग केले. त्यात जबड्यातील मागील हाड कवटीच्या हाडाला नैसर्गिकरीत्या जोडले गेल्याने तोंडाची उघडझाप बंद झाल्याचे दिसत होते. शस्त्रक्रियेद्वारे हे हाड विच्छेद करून जबडा उघडण्याचा पर्याय पुढे आला. पण भूल देण्यासाठी पहिल्यांदा जबडा उघडणे गरजेचे होते. जबडाच उघडत नसल्याने भूल देणे अशक्य झाले.
गळ्याला छिद्र पाडून भूल द्यायचे निश्चित झाले. पण तिचे वय तरुण असल्याने तोही निर्णय मागे घेण्यात आला. अखेर फायबर ऑप्टिकल ब्रान्कोस्कोप या अत्याधुनिक उपकरणाद्वारे तिला पूर्ण भूल देण्यात आली. त्यानंतर हाड विच्छेदनाची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर 15 दिवसांत तिच्यावर उपचार व देखरेख सुरू होती. अखेर ती जबडा उघडू शकली आहे. सविताला पत्रकार परिषदेतच उपस्थित केल्यानंतर तिच्या वडिलांनी लाडू तोंडात भरविला. तोही ती योग्यरीत्या खाऊ शकली. सविताला बरं करणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक करताना सविताच्या वडिलांचे डोळे पाणावले.
डॉ. प्रियेश पाटील, भूलतज्ज्ञ डॉ. प्रदीप राऊत, डॉ. चेतन घोरपडे, परिचारिका व वैद्यकीय कर्मचारी यांनी ही शस्त्रक्रिया केली. त्याबद्दल अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. वसंत देशमुख, डॉ. शिवप्रसाद हारुगडे, डॉ. लता खोब्रागडे यांनी डॉक्टरांचे अभिनंदन केले.
=========================================
लाचप्रकरणी खडसे यांच्या ओएसडीची चौकशी
| |
-
| |
मुंबई - महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे कथित स्वीय सहायक गजानन पाटील याला 30 कोटींची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली आहे. तक्रारीमध्ये महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) उन्मेश महाजन यांचेदेखील नाव नमूद करण्यात आले असल्याने त्यांनादेखील अटक करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी केली.
याबाबत बोलताना मलिक म्हणाले की, महसूल विभागात अडकलेले जमिनीचे प्रकरण मंजूर करण्यासंदर्भात डॉ. रमेश जाधव यांची महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे ओएसडी उन्मेश महाजन यांच्या सोबत मंत्रालयात बैठक झाली होती. तेव्हा उन्मेश महाजन यांनीच डॉ. रमेश जाधव यांना गजानन पाटील यांची ओळख करून दिली.
या प्रकरणासाठी जाधव यांच्याकडे 30 कोटींची मागणी केली. त्यानंतर बराचशा बैठका रामटेक बंगल्यावर, तसेच मंत्रालयात झाल्या. यादरम्यान त्यांच्यात झालेल्या संवादाचे रेकॉर्डिंग एसीबीकडे आहे. शेवटी आठ महिने जाधव यांना दुर्लक्षित केले गेले. दोन दिवसांपूर्वी लोकायुक्तांनी या प्रकरणामध्ये सुनावणी घेतली व आदेश पारित केले. त्यानंतर या प्रकरणी गजानन पाटील याला अटक करण्यात आली. परंतु यातील मुख्य सूत्रधार बाहेरच आहे. एसीबीने हे प्रकरण दाबण्यासाठी आठ महिने ट्रॅप लावला नाही, अशी टीका मलिक यांनी केली आहे.
=========================================
सर्वोच्च न्यायालयानेच न्याय द्यावा- कॉंग्रेस
| |
-
| |
नवी दिल्ली - मालेगाव बॉंबस्फोट मालिका प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य पाच जणांना दोषमुक्त करण्याचा प्रकार म्हणजे महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी तपास दलाने केलेल्या तपासावर पाणी फिरविणे आहे. तसेच हुतात्मा हेमंत करकरे यांचा उघड अवमान आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसने आज टीका करून सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सर्व कागदपत्रे व दस्तावेज ताब्यात घेऊन उचित न्याय देण्याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.
राज्यसभेतील कॉंग्रेसचे उपनेते आनंद शर्मा आणि माजी गृहराज्यमंत्री आर. पी. एन. सिंग यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत "एनआयए‘तर्फे सध्या ज्या पद्धतीने या प्रकरणाचा फेरतपास सुरू आहे. त्याबाबत शंका व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र "एटीएस‘ आणि खुद्द "एनआयए‘ने केलेला तपास, दस्तावेज, कागदपत्रे व पुरावे नष्ट करून हे प्रकरण कायदेशीरदृष्ट्या कमजोर करण्याचा प्रकार सुरू असल्याने सरकारच्या हेतुबद्दल संशय निर्माण होण्याबरोबरच "एनआयए‘च्या विश्वासार्हतेबद्दलदेखील प्रश्नचिन्ह उत्पन्न झाले आहे, असे या दोघांनी सांगितले. अभाविप आणि अन्य भाजप-संघपरिवारातील संस्थांशी निगडित असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह व अन्य लोकांना सोडविण्याचा हा खटाटोप असून, यातून भारतीय तपास संस्थांची जगभरात असलेली विश्वसनीयताच नष्ट होईल, याकडेही या नेत्यांनी लक्ष वेधले.
=========================================

No comments:
Post a Comment