[अंतरराष्ट्रीय]
१- कॅनडाच्या जंगलातला वणवा धुमसताच, 7 दिवसांनीही नियंत्रणाबाहेर
२- अजब ! इसीसच्या उदयासाठी टॉम अॅण्ड जेरी जबाबदार
३- मानवाधिकार कार्यकर्त्याची पाकमध्ये हत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- अफवा, भ्रम निर्माण करुन युद्ध जिंकता येत नाही, ‘सामना’तून मोदींवर निशाणा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- बीफ बॅन प्रश्नी सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत
६- उत्तराखंडमध्ये ट्विस्ट, 9 बंडखोर आमदारांची याचिका फेटाळली
७- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची निराशा, अवघ्या 5 मिनिटांत सर्व ट्रेन हाऊसफुल्ल
८- गिरणी कामगारांच्या घरांची आज सोडत
९- भाजपसोबत युतीविना शिवसेना गोव्याच्या निवडणुकीच्या रिंगणात
१०- उत्तराखंडमधील बहुमत चाचणीत मतदान करण्यास ९ बंडखोर आमदार अपात्र
११- औरंगाबाद; गळती न रोखणारे महावितरणचे सात अभियंते निलंबि
१२- हरीश रावत यांच्या पुन्हा स्टिंगच्या जाळ्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- पुण्यात वहिनीवरील रागातून दिराने 7 दुचाकी जाळल्या!
१४- नोकरी मागायला गेलेल्या तरुणीला बेदम मारहाण
१५- पालघर; आठवडा बाजारांमधून नकली नोटा पसरवण्याचा प्रयत्न, दोघे अटकेत
१६- पटना; बारावीच्या विद्यार्थ्याची हत्या, आमदारपुत्रावर आरोप
१७- कांजूर; सहा तासांत १६ घरांवर दरोडा
१८- वडाळा; टँकरमधून डिझेलची चोरी करणाऱ्या दोघांना रविवारी रेशन अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले
१९- गोरखपूर; योगी आदित्यनाथ वाघावर, राहुल गांधी गाढवावर; भाजपचे बॅनर
२०- नाशिक; पतीच्या पश्चात शाश्वत उत्पन्नाचे भान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- पुन्हा एकदा सचिनच्या पायावर युवराजचा माथा, अर्जुन म्हणाला...
२२- सचिनच्या वेड्या फॅनची खरी कहाणी!
२३- शतकात फक्त 13 वेळा घडणारी अवकाशीय अद्भुत घटना आज दिसणार!
२४- कार्तिकची दमदार खेळी, कोलकाताला नमवून गुजरात पुन्हा अव्वल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
माफी मागून झालेली चूक सुधारू शकतो पण माफी मागून तुटलेला विश्वास कधीही मिळत नाही
(परमेश्वर देशमुख , नमस्कार लाईव्ह वाचक )
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
===============================================

कॅनडा सरकानं सध्या आगीचं मुख्य ठिकाण असलेल्या अल्बर्टामध्ये आणीबाणी घोषित केली आहे. अंदाजे 80 हजार कॅनेडियन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मात्र या भीषण आगीने लाखोंना बेघर केलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत.

गोव्यातून 20 ते 22 जागा लढवण्याचा शिवसेनेचा निर्धार असल्याचं राऊत म्हणाले. ‘गोव्यात भाजपशी युती करण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही एकट्याने लढण्याची तयारी केली आहे.’ असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.
कॅसिनो, बेरोजगारी, गोव्यात अवैधपणे राहणाऱ्या रशियन आणि नायजेरियन नागरिकांची वाढती संख्या, ड्रग माफिया, इंग्रजी माध्यमांच्या शाळांना दिल्या जाणाऱ्या अनुदानामुळे कोकणी आणि मराठी शाळांमधली विद्यार्थ्यांची गळती यासारख्या मुद्द्यांवर सेना निवडणूक लढणार आहे.
गेल्या 5 वर्षांत भाजपने अनेक आश्वासनं दिली, मात्र एकाचीही पूर्तता न केल्याचं राऊत म्हणाले. गोव्यातील रहिवाशांचे अनेक प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज असल्याचंही राऊत यांनी सांगितलं आहे.

या बैठकीत मंत्रिमंडळाच्या नियोजित विस्तारावरही चर्चा झाल्याचं समजतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे संघ मुख्यालयात दाखल झाले होते. येथे तब्बल दोन तास त्यांनी संघाच्या नेत्यांशी चर्चा केली.
चर्चेचा सविस्तर तपशील बाहेर आला नसला तरी बीफ बॅनचा मुद्दाच चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याची माहिती आहे. दरम्यान, या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

बिहार विधानपरिषदेतील जेडीयूच्या आमदार मनोरमा देवी यांचा मुलगा रॉकी आणि अंगरक्षक यांनी ही हत्या केल्याचं समोर येत आहे. या घटनेत मृत पावलेल्या मुलाचं नाव आदित्य असून तो बारावीत शिकत होता. आदित्य श्रीवास्तव हा एका बिझनेसमनचा मुलगा होता.
यानंतर केलेल्या गोळीबारात एक गोळी आदित्यच्या डोक्यात लागली. ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अारोपी रॉकीचे वडील बिंदी यादव यांनी हे आरोप नाकारले आहेत. आदित्य आणि त्याच्या मित्रांनी आपल्या मुलाची गाडी अडवून त्याला मारहाण केली. मात्र स्वतःच्या बचावासाठी त्याने चुकून गोळी झाडली आणि आदित्यचा मृत्यू झाला असा दावा त्यांनी केला आहे.

उत्तराखंडमध्ये ट्विस्ट, 9 बंडखोर आमदारांची याचिका फेटाळली
देहरादून : उत्तराखंड हायकोर्टाने भाजपला जोरदार झटका दिला आहे. कारण काँग्रेसच्या बंडखोर 9 आमदारांची याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे बहुमतावेळी त्यांना मतदान करता येणार नाही. परिणामी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांचा मार्ग सुकर झाला आहे.
काय आहे उत्तरखंडचा राजकीय वाद?
उत्तराखंड विधानसभेत 70 आमदार आहेत. त्यातील 36 काँग्रेसचे तर 28 जण भाजपचं प्रतिनिधित्व करतात. तर इतर पक्षांचे 6 आमदार आहेत.
काँग्रेसच्या 9 आमदारांनी बंड केल्याने हरीश रावत सरकार अस्थिर झालं होतं. 27 मार्चला रावत सरकारला बहुमत सिद्ध करायचं होतं, पण ती संधी न देताच केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली होती, असा आरोप आहे. त्याविरोधात हरीश रावत सरकारने हायकोर्टात धाव घेतली होती.
यावर नैनीताल हायकोर्टाने 21 एप्रिलला राष्ट्रपती राजवट हटवण्याचा निर्णय दिला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे 22 एप्रिलला सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.
भाजपने घोडेबाजार करुन काँग्रेस आमदारांना फोडण्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यासाठी प्रत्येक आमदाराला 25 लाख रुपये दिल्याचा आरोप हरिश रावत यांनी केला होता.
त्यामुळे बंडखोर आमदारांना बहुमतावेळी मतदान करता येऊ नये अशी मागणी रावत यांनी केली होती, त्याला हायकोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे.
===============================================
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची निराशा, अवघ्या 5 मिनिटांत सर्व ट्रेन हाऊसफुल्ल
मुंबई : यंदा गणेशोत्सवासाठी रेल्वेने कोकणात जाण्याचे मनसुबे तुम्ही आखत असाल, तर तुमचा भ्रमनिरास होणार आहे. कारण गणेशोत्सवाच्या काळातल्या रेल्वेचं बुकिंग अवघ्या काही मिनिटांमध्येच फुल्ल झालं आहे.
वेटिंग लिस्ट 500 वर
5 सप्टेंबरसाठीच्या रेल्वेच्या तिकिटाचं रविवारी सकाळी बुकिंग सुरु झालं आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं बुकिंग हातोहात फुल्ल झालं. काही गाड्यांची वेटिंग लिस्ट ही तब्बल 500 वर जाऊन पोहोचली आहे.
3 आणि 4 सप्टेंबरच्या गाड्यांची अवस्थाही काहीशी अशीच आहे. नियमाप्रमाणे 120 दिवस आधी आपण रेल्वेची तिकिटे आरक्षित करु शकतो. त्यामुळे उशिरा जागे झालेल्या प्रवाशांची घोर निराशा होणार आहे.
कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस आणि जनशताब्दीसह कोकणात साऱ्याच गाड्या आतापासूनच फुल्ल झाल्या आहेत. फक्त रेल्वेच नाही, तर राज्य परिवहन महामंडळाच्या आणि खासगी बसेसही आतापासूनच हाऊसफुल्ल झाल्या आहेत.
===============================================
पुन्हा एकदा सचिनच्या पायावर युवराजचा माथा, अर्जुन म्हणाला...
विशाखापट्टणम : टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंहने पुन्हा एकदा क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरचे पाय धरले. आयपीएलमध्ये काल सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान, हे दृश्य जगाने पाहिलं.
मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना युवराजने हैदराबादकडून 23 चेंडूत 39 धावांची खेळी केली. तसंच हैदराबादने हा सामना 85 धावांनी जिंकला.
या सामन्यानंतर युवराज थेट मुंबई इंडियन्सच्या मैदानाबाहेरील ताफ्याकडे वळला. ते मुंबईचा मेंटर आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सचिनजवळ गेला आणि थेट त्याचे पाय पकडले. यावेळी सचिनने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत युवराजने सचिनचे पाय पकडले होते.
सचिनप्रती युवराजला नेहमीच आदराची भावना आहे. त्यामुळेच युवराज सचिनला गुरुस्थानी मानतो.
===============================================
पुण्यात वहिनीवरील रागातून दिराने 7 दुचाकी जाळल्या!
पुणे : पुण्यातील उत्तमनगर परिसरातील सोसायटीत झालेल्या जळीतकांडाच्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. घरगुती वादातून सात वाहनं जाळल्याची माहिती मिळते आहे. रमेश शिंदे या आरोपीने वहिनीवरच्या रागातून दुचाकी जाळल्या.
रविवारी पहाटे आरोपीने उत्तमनगरमधील मोरया पेट्रोलपंपामागील भागातील सोसायटीच्या पार्किंगमधील सात दुचाकी जाळल्या. तक्रारदार महिला राधिका शिंदे यांच्या दिरानेच घरगुती वादातून दुचाकी जाळल्याचं उघड झालं आहे.
उत्तमनगर पोलीस ठाण्यात राधिका शिंदे यांनी तक्रार केल्यानंतर, 12 तासांत पोलिसांनी आरोपीचा छडा लावला आहे. मध्यरात्री पोलिसांनी आरोपी रमेश शिंदेला अटक केली.
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात जळीतकांडाच्या अनेक घटना घडल्या असल्याने, त्या घटनांचा उत्तमनगरमधील घटनेशी संबंध असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, आरोपीला अटक केल्यानंतर हा प्रकार घरगुती वादातून घडल्याचं समोर आलं आहे.
===============================================
सचिनच्या वेड्या फॅनची खरी कहाणी!
मुंबई: वानखेडेपासून- रावळपिंडीपर्यंत, मेलबर्नपासून ते ऑकलँडपर्यंत जगभरातील क्रिकेटमैदानावर एक क्रिकेट फॅन दिसतो. संपूर्ण शरिरावर तिरंगा पेंट करून, त्यावर 10 तेंडुलकर असं लिहिलेलं असतं. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात भारताचा सामना असो, हा फॅन दिसतोच- दिसतो. या क्रिकेट फॅनचं नाव सुधीर कुमार गौतम उर्फ सुधीर गौतम होय.
सुधीर गौतमला कोणी क्रिकेटप्रेमी म्हणतं, तर कोणी क्रिकेटवेडं. पण सुधीर स्वत: सचिनप्रेमी आणि सचिनवेडा आहे. सुधीरकडे ना कोणता जॉब आहे, ना नियमीत पगार. मात्र तो स्वत:चं एकच काम मानतो, ते म्हणजे मॅच पाहणं.
सुधीरने त्याच्या वडिलांसोबत कधी बोलणं किंवा गप्पा मारल्या आहेत, ते त्यालाही आठवत नाही. मात्र क्रिकेटच्या देवाची अर्थात सचिन तेंडुलकरची पहिली भेट तो कधीच विसरलेला नाही.
सचिनचा हा फॅन सध्या टीव्ही, रेडिओ, न्यूजपेपर, जाहिराती इत्यादी सर्व ठिकाणी झळकत असतो. कमाई शून्य असूनही, सुधीर जगभरात मॅच पाहण्यासाठी कसं काय पोहोचतो? सुधीरसाठी सचिन का देव आहे? सुधीरचं स्वप्न काय? त्याची ही रंजक कहाणी
- मॅचसाठी तिकीट कलेक्टरची नोकरी सोडली-
क्रिकेटवेडा सुधीर आज जगभरातील मैदानात दिसतो. मात्र याच क्रिकेटच्या वेडापायी सुधीरने तीन नोकऱ्यांवर पाणी सोडलं आहे. सुधीर सर्वात आधी मुजफ्फपूर, बिहारच्या एका डेअरीमध्ये कामाला होता. इथे तो कलाकंदपासून- खव्यापर्यंत सर्व पदार्थ बनवण्यातील एक एक्स्पर्ट म्हणून ओळखला जात होता. मात्र त्याने ही नोकरी सोडली आणि मिळवलेल्या पैशातून पासपोर्ट बनवून घेतला.
यानंतर सुधीरने शिक्षण मित्र म्हणून काम केलं. ही नोकरी पार्ट टाईम होती. त्यामुळे सुधीर इंडियाची प्रत्येक मॅच पाहू शकत होता. त्याच्या या जॉबशी संबंधित एक ट्रेनिंग होतं. मात्र ते सोडून तो स्वत:ची सायकल घेऊन पाकिस्तानला गेला.
यानंतर 2005 मध्ये सुधीर रेल्वेची तिकीट कलेक्टरची परीक्षा पास झाला. त्याला मुलाखतीसाठी हैदराबादमध्ये बोलावण्यात आलं. मात्र त्याच दिवशी दिल्लीत भारत- पाकिस्तान यांच्यात वन डे मॅच होती. हाडाचा क्रिकेटप्रेमी असलेल्या सुधीरने मुलाखतीचं पत्र फाडून टाकलं आणि मॅचसाठी रवाना झाला.
- सचिनच्या भेटीसाठी सायकलवरून निघाला
वर्ष 2003 मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात तिरंगी मालिका खेळवण्यात आली. त्यावेळी 1 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होता. हा सामना पाहाण्यासाठी सुधीर 8 ऑक्टोबरलाच मुंबईकडे सायकलवरून रवाना झाला. सुधीर 24 ऑक्टोबरला मुंबईत दाखल झाला. त्या दिवशी दिवाळी होती. सुधीर त्या दिवशी दिवसभर सचिनचं घर शोधण्यासाठी भटकत राहिला. यादरम्यान तो मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य प्रोफेसर रत्नाकर शेट्टी आणि लालचंद राजपूत यांची भेट झाली. सुधीरने त्यांच्याकडे सचिनला भेटण्याबाबत चौकशी केली.
- पहिल्या भेटीत सचिनच्या पाया पडला
सचिन त्याच दिवशी हॉटेल ट्रायडेंटमध्ये येणार असल्याचं काही पत्रकारांनी सुधीरला सांगितलं. सुधीरने आपल्या सायकलवरून थेट हॉटेल ट्रायडेंट गाठलं. इथे तो सचिनची वाट पाहात थांबला. सचिन आल्याचं कळताच, सुधीरने ना सिक्युरिटीची तमा बाळगली, ना गर्दीची. तो थेट सचिनच्या दिशेने धावला आणि क्रिकेटच्या देवाचे पाय धरले. मग सचिननेही सुधीरला त्याच ठिकाणी आपल्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं.
- सचिनच्या घरचं जेवण
सुधीर 29 ऑक्टोबरला सचिनला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला. त्यावेळी सचिनने त्याला स्वत:च्या घरचं जेवण दिलं. तसंच त्याच्याशी गप्पा मारून, त्याला पुढील सामन्याचे पासही दिले.
- पोलिसांनी पकडलं, सचिनमुळे सुटका
सुधीरची सचिनसोबत झालेली पुढची भेट वेगळीच होती. सुधीरची पदवीची परीक्षा होती. सचिनने तेव्हा सुधीरला परीक्षा देऊन येण्यास सांगितलं. मात्र त्याचवेळी कटकमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे सामना होता. त्यामुळे सुधीरने विचार केला की, परीक्षा तर केव्हाही देता येईल पण आधी मॅच महत्त्वाची असं म्हणत, त्याने क्रिकेट ग्राऊंड गाठलं.
या मॅचमध्ये भारताची स्थिती नाजूक होती, मात्र सचिन मैदानात होता. सचिनने तेव्हा दमदार फलंदाजी केल्याने, सचिनच्या पाया पडण्यासाठी सुधीर थेट मैदानात धावला. मात्र यावेळी त्याला पोलिसांनी पकडलं. पण सचिनने त्याची सुटका केली. सचिनने त्याला असं करण्यास मनाई केली.
6)पुन्हा मैदानात धावला, थेट जेलमध्ये गेला
हैदराबादच्या मैदानात भारताचा सामना सुरू होता. यावेळी सचिनने शतक ठोकलं. त्यावेळीही सुधीर पुन्हा मैदानात धावला. मात्र पोलिसांनी त्याला पकडून थेट सिकंदराबाद पोलिस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं.
7) लग्न करणार नाही
सुधीरच्या कुटुंबियांनी त्याला लग्नासाठी आग्रह केला. मात्र सुधीरने लग्न करण्यास मनाई केली आहे. “माझा काही ठाव-ठिकाणा नाही. मला नोकरी नाही. माझं आयुष्य क्रिकेटला समर्पित आहे”, असं सुधीर म्हणतो.
8) बहिण- भावाच्या लग्नाला जाऊ शकला नाही
सुधीर नेहमीच भारताच्या कोणत्या ना कोणत्या मॅचमध्ये बिझी असतो. सुधीरच्या बहिणीचं लग्न होतं, त्यावेळी भारताचा सामना होता. त्यामुळे तो लग्नालाही गेला नाही. तीच स्थिती लहान भावाच्या लग्नावेळीही होती. सुधीर रक्षाबंधनला कधी श्रीलंकेत असतो, तर कधी न्यूझीलंडमध्ये.
9) कुटुंब आजही गरीब
सचिनचा वेडा फॅन असलेल्या सुधीरचं कुटुंब आजही गरीबच आहे. जुन्या भिंती, गळकं छत असं सुधीरचं घर. कुटुंबाची अशी परिस्थिती असताना, त्याला परदेशवारीसाठी पैसे येतात कुठून हा प्रश्न साहजिकच पडू शकतो.
सुधीरला या परदेशवाऱ्या अनेक टीव्ही चॅनेल्स, रेडिओ वा अन्य कोणीही घडवतं. त्याचा सर्व खर्च करण्यासाठी आता रांगा लागल्या आहेत. त्याबदल्यात सुधीर त्यांच्यासाठी प्रोग्राम करतो.
10) तेंडुलकरचे शूज सुधीरच्या पायात
सुधीर 2015 मध्ये वर्ल्डकपच्या सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया – न्यूझीलंडमध्ये होता. नेहमीप्रमाणे संपूर्ण शरिरावर तिरंगा रंगवून, हातात भला मोठा तिरंगा घेऊन सुधीर मैदानात दिसत होता. त्यावेळी सुधीरच्या पायात जे शूज होते, ते त्याला सचिनने गिफ्ट दिले होते.
सुधीरला या शूजच्या मॅचिंगची जर्सी, ट्रॅक पँट आणि कॅप रमेश माने यांनी दिले आहेत. माने हे मालिशवाले आहेत.
11) विना तिकीट प्रवास
सुधीर हा भारतातील सामने पाहाण्यासाठी ट्रेनने प्रवास करायचा. तो तिकीट काढत नव्हता. सुधीर कोलकात्यामध्ये मॅचसाठी जात असताना, त्याला टीटीने पकडलं. यावेळी सुधीरने टीटीला सचिन आणि स्वत:बद्दल सांगितलं. त्यानंतर टीटीने त्याला सोडून दिलं. मात्र त्यावेळी टीटी सुधीरला म्हणाला, तुझ्या अशाप्रकारामुळे तू सचिनचं नाव खराब करत आहे. त्यानंतर मात्र सुधीरने फुकटात प्रवास करणं बंद केलं.
पाकिस्तानचा बशीर चाचा, श्रीलंकेचा पर्सी, वेस्ट इंडिजचा ग्रेवी आणि आयर्लंडचा लॅरी हे क्रिकेटवेडे जगभरात प्रसिद्ध आहेत. सुधीर गौतमही असाच एक क्रिकेटवेडा. मात्र या सर्वांपेक्षा नक्कीच वेगळा.
===============================================
नोकरी मागायला गेलेल्या तरुणीला बेदम मारहाण
मुंबई : नोकरीसाठी दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणीसोबत प्लेसमेंट एजन्सीमधील लोकांनी गैरवर्तन केलं. तसंच तिला आणि तिच्या आईला बेदम मारहाणही केली. या घटनेत जखमी झालेल्या मायलेकींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सायली धुर्वे असं या पीडित तरुणीचं नाव आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी एक्सपर्ट प्लेसमेंट एजन्सीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
काय आहे प्रकरण?
प्लेसमेंट एजन्सीचा मालक आणि कर्माचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. मुलीचे वडील शिवाजी धुर्वे यांच्या माहितीनुसार, “सायलीने अंधेरीच्या एका प्लेसमेंट एजन्सी एक्सपर्ट मॅनेजमेंटमध्ये नोकरीसाठी अर्ज दिला आहे. एजन्सीने यासाठी तरुणीकडून 650 रुपये घेतले होते. पण आठ दिवसांनंतही सायलीला कोणत्याही कंपनीतून कॉल न आल्याने तिने प्लेसमेंट एजन्सीमध्ये फोन करुन विचारणा केली. यानंतर प्लेसमेंट एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी सायलीला ऑफिसमध्ये बोलावलं. तुला ट्रेनिंग द्यावी लागेल, असं सांगत एजन्सीने आणखी पैशांनी मागणी केली.”
===============================================
आठवडा बाजारांमधून नकली नोटा पसरवण्याचा प्रयत्न, दोघे अटकेत
पालघर : पालघर जिल्ह्यातील वाडा पोलिसांनी अनिकुल मेहमूद शेख व रेजाऊल गुलाब हुसेन या दोन पश्चिम बंगाल येथून आलेल्याकडून 1 लाख 77 हजाराच्या पाचशे व हजाराच्या खोट्या नोटा बाजारात पसरवत असताना अटक केलं आहे.
वाडा न्यायालयाने या दोघांना 13 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वाडा तालुक्यातील कुडूस या ओद्योगिक पट्यात आठवडा बाजारात पाचशे व हजाराच्या नकली नोटा फिरवल्या जात आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून अनिकुल मेहमूद शेख व रेजाऊल गुलाब हुसेन या पश्चिम बंगाल येथील दोघा संशयितांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता, त्यांच्या खिशात 10 हजार 500 रुपये रोख आढळले. तसेच त्यांच्या रूमची तपासणी केल्यानंतर एक हजाराच्या 95 नोटा, तर पाचशेच्या 164 नोटा, असे तब्बल 1 लाख 77 हजारांच्या, पाचशे व हजार रुपयांच्या नकली नोटा त्यांच्या जवळ आढळून आल्या.
या नोटा नक्की आल्या कुठून, कोणी त्या छापल्या व अद्याप कितीजण अशा प्रकारे नकली नोटा पसरवत आहेत, याचा वाडा पोलीस शोध घेत आहेत. सध्या ग्रामीण बाजारपेठेत हजार व पाचशे रुपयाच्या नकली नोटा पसरविण्यासाठी बांगलादेशी मजुरांचा वापर करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.
===============================================
गिरणी कामगारांच्या घरांची आज सोडत
मुंबई : गिरणी कामगार आणि वासरदारांच्या घरांची सोडत आज जाहीर होणार आहे. सहा बंद गिरण्यांच्या जमिनीवर बांधलेल्या 2634 घरांची सोडत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. सकाळी 10 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात या लॉटरीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल.
भारत मिल, वेस्टर्न इंडिया मिल, सेंच्युरी मिल, प्रकाश कॉटन मिल, रुबी मिल आणि स्वान मिल ज्युबिली या गिरण्यांमधील या कामगारांना आणि त्यांच्या वारसदारांना ही घरं मिळणार आहेत. सहा गिरण्यांचे सहाच कोड असल्याने सोडतीचा कार्यक्रम एक ते दोन तासांतच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
===============================================
अफवा, भ्रम निर्माण करुन युद्ध जिंकता येत नाही, ‘सामना’तून मोदींवर निशाणा
मुंबई : “काँग्रेसचा पराभव होऊन मोदी यांचे राज्य लोकांनी आणले. तरीही महागाई, बेरोजगारी, दुष्काळ, पाणी, भ्रष्टाचार व दहशतवादाचे प्रश्न कायम आहेत. सरकारचे लक्ष्य सोनिया व राहुलला तुरुंगात टाकण्याचे आहे. ते जरूर करावे, पण जनतेच्या प्रश्नांचे काय? प्रत्येकवेळी अफवा, भ्रम निर्माण करून युद्ध जिंकता येत नाही.”, असे म्हणत शिवसेनेने पुन्हा एकदा ‘सामना’तून केंद्र सरकार आणि मोदींवर निशाणा साधला आहे.
‘सामना’तून इंदिरा पर्वाची आठवण
जनता पक्षाच्या काळात इंदिरा गांधींचं नेतृत्व पुन्हा देशाने स्वीकारलं, याला कारणही जनता पक्षाचं सरकारच असल्याचं ‘सामना’तून म्हटलं आहे. इंदिरा गांधींच्या काळाची आठवण करुन देत ‘सामना’तून मोदी सरकारला एकाप्रकारे इशारा देण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे.
‘सामना’त म्हटलं आहे, “इंदिरा गांधी यांना पुन्हा देशाचे नेतृत्व करण्याचा मार्ग त्यावेळच्या जनता पक्षाच्या येडबंबू सरकारनेच मोकळा करून दिला होता. जनतेने हातात दिलेले राज्य करायचे सोडून हे लोक तेव्हा इंदिरा गांधींच्या मागे हात धुऊन लागले व इंदिरा गांधींना त्रास देणे हेच त्यांचे जणू ध्येय ठरले. त्यांनी इंदिरा गांधी यांना अटक करून तुरुंगात पाठवले हे एकवेळ ठीक असेल, पण तेव्हाही लोकांचा प्रश्न तोच होता की, तुम्ही जनतेसाठी काय केले व देशासाठी नवे काय केले, ते सांगा. कारण त्या काळातही इंदिरा गांधींना अटक करून व त्यांच्या विरोधात खटला दाखल करून महागाई व भ्रष्टाचार कमी झाला नव्हता. उलट तो वाढला. त्यामुळे इंदिराजींचे राज्य काय वाईट होते? असा विचार लोकांनी केला. इंदिरा गांधी व त्यांच्या चिरंजीवांनी केलेले सर्व गुन्हे माफ करून जनतेने काँग्रेसला पुन्हा जोरदारपणे सत्तेवर आणले.”
===============================================
शतकात फक्त 13 वेळा घडणारी अद्भुत घटना आज दिसणार!
===============================================
गॅस कनेक्शनसोबत आता शेगडीसाठीही सबसिडी
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या उज्वला योजनेच्या अंतर्गत आता शेगडीसाठी कुणालाही भटकावं लागणार नाही. गॅस शेगडी एजन्सीमधूनच मिळू शकेल आणि तेही मोफत. या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे रोजीच केला होता.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना आता केवळ गॅस कनेक्शनच नव्हे, तर गॅस शेगडीही दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या उज्वला योजनेच्या अंतर्गत बीपीएल कार्ड धारकांना गॅस एजन्सीकडून अतिशय साध्या प्रक्रियेच्या माध्यमातून शेगडी मिळणार आहे. यासाठी नोंदणीही सुरु झाली आहे.
===============================================
कार्तिकची दमदार खेळी, कोलकाताला नमवून गुजरात पुन्हा अव्वल
कोलकाता : सुरेश रैनाच्या गुजरात लायन्सला सलग तीन पराभवांनंतर अखेर विजयी सूर सापडला. गुजरातने कोलकाता नाईट रायडर्सला 5 विकेट्सनी हरवून आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. गुजरातचा हा अकरा सामन्यांतला सातवा विजय ठरला तर कोलकात्याचा हा दहा सामन्यांतला चौथा पराभव ठरला.
ईडन गार्डन्सवरील लढतीत दिनेश कार्तिकच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने 159 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. कार्तिकने 29 चेंडूंमध्ये 51 धावांची खेळी केली. तर ब्रेन्डन मॅक्युलमने 29, ड्वेन स्मिथने 27 आणि अॅरॉन फिन्चने 29 धावांची खेळी करुन गुजरातच्या विजयाला हातभार लावला.
त्याआधी गुजरातच्या प्रवीण कुमारने दोन तर धवल कुलकर्णी आणि ड्वेन स्मिथने प्रत्येकी एक विकेट काढली आणि कोलकात्याला 20 षटकांत चार बाद 158 धावांत रोखलं. कोलकात्याच्या युसूफ पठाणने 63 तर शाकिब अल हसनने 66 धावांची झुंजार खेळी केली. त्या दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 134 धावांची भागीदारी रचली. आयपीएलच्या इतिहासात पाचव्या विकेटसाठी भागीदारीचा हा उच्चांक ठरला.
===============================================
कॅनडाच्या जंगलातला वणवा धुमसताच, 7 दिवसांनीही नियंत्रणाबाहेर
ओटावा : कॅनडाच्या पश्चिम भागातील जंगलात वणवा पेटला आहे. वणव्यामुळे संपूर्ण जंगलाने रौद्र रुप धारण केलं. गगनाला भिडणारा धुर पाहता जंगलातील वणव्याची तीव्रता लक्षात येत आहे.
वणवा पेटला आणि क्षणार्धात दोन हजार स्क्वेअर किलोमीटरचा परिसर आगीने गिळंकृत केला. ऑईल सॅन्ड सिटी म्हणून ओळखलं जाणारं फोर्ट मॅकमुराय शहरही या आगीच्या विळख्यातून सुटू शकलं नाही.
कॅनडा सरकानं सध्या आगीचं मुख्य ठिकाण असलेल्या अल्बर्टामध्ये आणीबाणी घोषित केली आहे. अंदाजे 80 हजार कॅनेडियन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मात्र या भीषण आगीने लाखोंना बेघर केलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत.
===============================================
भाजपसोबत युतीविना शिवसेना गोव्याच्या निवडणुकीच्या रिंगणात
मुंबई : गोवा विधानसभेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेचा खासदार संजय राऊत यांनी मित्रपक्ष भाजपशिवाय शिवसेना गोव्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे.
गोव्यातून 20 ते 22 जागा लढवण्याचा शिवसेनेचा निर्धार असल्याचं राऊत म्हणाले. ‘गोव्यात भाजपशी युती करण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही एकट्याने लढण्याची तयारी केली आहे.’ असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.
कॅसिनो, बेरोजगारी, गोव्यात अवैधपणे राहणाऱ्या रशियन आणि नायजेरियन नागरिकांची वाढती संख्या, ड्रग माफिया, इंग्रजी माध्यमांच्या शाळांना दिल्या जाणाऱ्या अनुदानामुळे कोकणी आणि मराठी शाळांमधली विद्यार्थ्यांची गळती यासारख्या मुद्द्यांवर सेना निवडणूक लढणार आहे.
गेल्या 5 वर्षांत भाजपने अनेक आश्वासनं दिली, मात्र एकाचीही पूर्तता न केल्याचं राऊत म्हणाले. गोव्यातील रहिवाशांचे अनेक प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज असल्याचंही राऊत यांनी सांगितलं आहे.
===============================================
बीफ बॅन प्रश्नी सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत
नागपूर : बीफ बॅनच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची चाचपणी सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून आज नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी संघाच्या नेत्याची भेट घेऊन चर्चा केली.
या बैठकीत मंत्रिमंडळाच्या नियोजित विस्तारावरही चर्चा झाल्याचं समजतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे संघ मुख्यालयात दाखल झाले होते. येथे तब्बल दोन तास त्यांनी संघाच्या नेत्यांशी चर्चा केली.
चर्चेचा सविस्तर तपशील बाहेर आला नसला तरी बीफ बॅनचा मुद्दाच चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याची माहिती आहे. दरम्यान, या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
===============================================
बारावीच्या विद्यार्थ्याची हत्या, आमदारपुत्रावर आरोप
पाटणा : रस्त्यातून जात असताना केवळ आपल्या गाडीला साईड दिली नाही म्हणून आमदाराच्या मुलाने आणि अंगरक्षकाने एका विद्यार्थ्याची गोळी मारुन हत्या केल्याचा आरोप होत आहे. बिहारमध्ये घडलेल्या या घटनेने तीव्र संताप व्यक्त केलं जात आहे.
बिहार विधानपरिषदेतील जेडीयूच्या आमदार मनोरमा देवी यांचा मुलगा रॉकी आणि अंगरक्षक यांनी ही हत्या केल्याचं समोर येत आहे. या घटनेत मृत पावलेल्या मुलाचं नाव आदित्य असून तो बारावीत शिकत होता. आदित्य श्रीवास्तव हा एका बिझनेसमनचा मुलगा होता.
घटनेच्या वेळी आदित्य आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीवरुन गाडीने परत येत होता. याचवेळी आमदरांची गाडी त्याच मार्गाने जात होती. यावेळी हॉर्न देऊनही आपल्याला साईड न दिल्याने रागावलेल्या अंगरक्षकाने आदित्य आणि त्याच्या मित्रांना थांबवून मारहाण केली.
यानंतर केलेल्या गोळीबारात एक गोळी आदित्यच्या डोक्यात लागली. ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अारोपी रॉकीचे वडील बिंदी यादव यांनी हे आरोप नाकारले आहेत. आदित्य आणि त्याच्या मित्रांनी आपल्या मुलाची गाडी अडवून त्याला मारहाण केली. मात्र स्वतःच्या बचावासाठी त्याने चुकून गोळी झाडली आणि आदित्यचा मृत्यू झाला असा दावा त्यांनी केला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी आमदाराची गाडी ताब्यात घेतली असून पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.
===============================================
No comments:
Post a Comment