[अंतरराष्ट्रीय]
१- अफगाणिस्तानात सहा तालिबानी कैद्यांना फाशी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- जयपूर; राजस्थानमधील इतिहासाच्या पुस्तकातून नेहरुंचं नाव आणि गांधीजींच्या हत्येचा उल्लेख गायब!
३- ‘112‘ क्रमांक 1 जानेवारीपासून सक्रिय होणार
४- गरिबांना 1 ते 2 रुपये किलोनं तांदूळ मिळण्यासाठी राज्यांना सबसिडी देण्यात आली - मोदी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- नैनिताल; आमदारांना 25-25 लाख रुपये दिल्याचा आरोप, हरिश रावतांचं नवं स्टिंग उजेडात
६- पुणे; FTII च्या संचालकांना धमकीचं पत्र, पत्रासोबत स्फोटकसदृश पावडर
७- आता कर्न्फम रेल्वे तिकीटाचे ट्रान्सफर शक्य
८- इंदोरमध्ये लॅन्डिंग दरम्यान विमान रन वेवरुन घसरलं
९- नाशिक रोड, एकलहरे, पाथर्डी, अंबड इथं पावसासह गारपिटीची हजेरी
१०- गोवा विधानसभेच्या 22 जागा शिवसेना लढवणार
११- नाशिक- इगतपुरीत क्लोरिन टँकरचा स्फोट, स्फोटामध्ये २५ जण जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- सांगली: शालेय मुलींची छेडछाड काढणाऱ्या 'त्या' गावगुंडांना अखेर बेड्या
१३- पुण्यात पुन्हा जळीतकांड, पार्किंगमधील 7 दुचाकी जाळल्या
१४- लातूर; रेल्वेच्या पाण्याच्या शुद्धीकरणानंतरच पाईपलाईनमधून पाणीगळती
१५- श्रीनगर; काश्मीरमध्ये पोलिसांच्या 4 रायफल्स पळविल्या
१६- नागपूर; पत्नीला पाणी घेण्यापासून रोखलं, दलित पतीनं 40 दिवसांत खोदली विहीर
१७- केरळ; लॉ विद्यार्थीनीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी तामिळनाडूतील कोईमबतोर येथे निदर्शने.
१८- सोलापूर मजरेवाडी येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोडाऊनला आग
१९- वाशिम मालेगाव येथील नायब तहसिलदार आर. बि. डाबेराव यांच्या पत्नीची रेल्वेखाली आत्महत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- मधू-मिलिंदच्या 'त्या' जाहीरातीच्या कल्पनेमुळे तंत्रज्ञ अडचणीत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
मनुष्य केवळ आपल्या गुणांनी आणि कर्मानेच मोठा होतो
(पृथ्वीराज ठाकूर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=================================================

शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून हा प्रकार घडत होता. यातून निघणारं पाणी हे आजूबाजूच्या शेतात वाहून जात असल्याचं पाहून नागरिकांनी प्रशासनाला याची माहिती दिली, पण कित्येक वेळ एकही कर्मचारी या जागी फिरकलाच नाही.
काही काळानंतर आलेल्या कर्मचाऱ्याने हा बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पण यात त्याला यश आलं नाही. यातील गंभीर प्रकार म्हणजे रेल्वेने आलेलं पाणी शुद्धीकरण करुन शहरात पोहचवणाऱ्या वॉल्वमधूनच पाणी वाया गेल्याने प्रशासनाचा ढिम्म कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

सांगली: शालेय मुलींची छेडछाड काढणाऱ्या 'त्या' गावगुंडांना अखेर बेड्या
सांगली : सांगलीत गावगुंडाच्या भीतीनं ज्या मुलींना शाळेत जाणं अवघड बनलं होतं, त्या गावगुंडावर अखेर कारवाई केली गेली आहे. याप्रकरणात राजेंद्र पवार, इंद्रजित खोत, सागर खोत आणि अमयसिद्ध बबळेश्वर या चौघांवर पाठलाग करणं, विनयभंग करणे, असे गुन्हे दाखल झाले आहेत.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या मसुचीवाडी या गावासह अनेक गावातील मुलं, मुली बोरगाव याठिकाणी शिक्षणासाठी येतात. मात्र, त्यादरम्यानच्या वाटेवर गावगुंड नेहमी मुलींची छेडछाड काढायचे. त्याला कंटाळून मुलींना बोरगावात न पाठवण्याचा निर्णय मसुचीवाडीच्या लोकांनी घेतला होता.
धक्कादायक म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून हा सर्व प्रकार सुरु असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. मात्र आता तब्बल दोन वर्षांनी गावगुंडावर कारवाई करण्यात आली आहे.
=================================================
आमदारांना 25-25 लाख रुपये दिल्याचा आरोप, हरिश रावतांचं नवं स्टिंग उजेडात
नैनीताल : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे बंडखोर आमदार हरक सिंह रावत यांनी एक नव स्टिंग समोर आणलं आहे. ज्यात आमदार खरेदीसाठी हरिश रावत यांनी पैसे दिल्याचा दावा काँग्रेस आमदार मदनसिंह बिश्त करत आहेत.
काँग्रेस आमदार आपल्यासोबतच राहावेत, यासाठी हरिश रावत यांनी प्रत्येकी 25 लाखांची ऑफर दिल्याचं बिश्त यांनी म्हटलं आहे.
या स्टिंग ऑपरेशनमधले सर्व आरोप हरिश रावत यांनी फेटाळले असून, सत्तेसाठी भाजपचा हा डाव असल्याचा आरोप रावत यांनी केला आहे.
दरम्यान, उत्तराखंडच्या सत्तास्थापनेबाबत मंगळवारी काँग्रेसला बहुमत सिद्ध करायचं आहे. मात्र, त्यात हे स्टिंग उजेंडात आल्यानं अडचणीत भर पडली आहे.
=================================================
राजस्थानमधील इतिहासाच्या पुस्तकातून नेहरुंचं नाव आणि गांधीजींच्या हत्येचा उल्लेख गायब!
जयपूर : राजस्थानमधील आठवीच्या समाजिक शास्त्राच्या पुस्तकात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या हत्येचा आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या नावाचा उल्लेख नसल्याचं समोर आलं आहे. या पुस्तकातून, ‘गांधीजींची हत्या कुणी केली?’ आणि ‘भारताचे पहिले पंतप्रधान कोण?’ हे प्रश्नच गायब झाले आहेत. पुस्तकं अजून बाजारात आली नाहीत. मात्र, राजस्थान राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या वेबसाईटवरुन याबाबतची माहिती उघड झाली आहे.
इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, वीर सावरकर, भगत सिंह, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक यांसारख्या नेत्यांची माहिती पाठ्यापुस्तकात आहेत. मात्र, जवाहरलाल नेहरु आणि इतर काँग्रेस नेत्यांबद्दल इतिहासाच्या पुस्तकात माहिती देण्यात आलेली नाही.
याबाबतचा वाद वाढताना दिसल्यानंतर उदयपूरस्थित स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगने (SIERT) पाठ्यपुस्तकांच्या रिव्हिजनचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे याआधीच्या आवृत्तीत ‘नॅशनल मुव्हमेंट’ प्रकरणात नेहरुंसह अन्य नेत्यांच्या नावाचही उल्लेख होता.
=================================================
पुण्यात पुन्हा जळीतकांड, पार्किंगमधील 7 दुचाकी जाळल्या
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा जळीतकांड घडलं आहे. उत्तमनगर परिसरात तब्बल 7 दुचाकी वाहनं अज्ञातांनी जाळल्याची माहिती मिळते आहे. सातही दुचाकी वाहनं सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी होती.
उत्तमनगर परिसरातील जळीतकांडाची ही घटना रात्री अडीचच्या सुमारास घडली. उत्तमनगरमधील मोरया पेट्रोल पंपामागील भागात ही घटना घडली आहे.
आगाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. या आगीचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसलं तरीही, आगीचं स्वरुप पाहता ही आग शॉट सर्किटमुळे नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
दरम्यान, याआधीही पुण्यात अशाप्रकारच्या जळीतकांडाच्या घटना समोर आल्या होत्या. अगदी गेल्याच महिन्यात 21 एप्रिलला एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी 6 ट्रक आणि 6 बाईक जाळण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुण्यातील जळीतकांडाचं हे सत्र सुरुच असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
=================================================
FTII च्या संचालकांना धमकीचं पत्र, पत्रासोबत स्फोटकसदृश पावडर
पुणे : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला पाठिंबा दिल्याच्या कारणावरुन पुण्यातील एफटीआयआयचे माजी संचालक प्रशांत पाठारे यांना धमकीचं पत्र आलं आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.
धमकीच्या पत्रासोबत एक पार्सलही पाठवण्यात आलं आहे. पार्सलमध्ये डिटोनेटर आणि स्फोटकासारखी पावडर असून, त्या पार्सलवर दिल्लीचा पत्ता आहे. हे पत्र एफटीआयआयच्या कार्यालयात आलं असून, त्यावर माजी संचालक प्रशांत पाठारे यांचं नाव आहे.
“कन्हैयाला पाठिंबा दिल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि कन्हैया कुमारला एफटीआयआयमध्ये येण्यास मनाई करावी”, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.
याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पार्सलमध्ये डिटोनेटर आणि स्फोटकासारखी पावडर आढळल्यानं बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी केल्यानंतर हे पार्सल पोलिसांकडे देण्यात आलं आहे. हे धमकीचे पत्र नेमके कोणी पाठवलं आहे याचा पोलिस शोध घेत आहेत.
=================================================
रेल्वेच्या पाण्याच्या शुद्धीकरणानंतरच पाईपलाईनमधून पाणीगळती
लातूर : एकीकडे पाणीटंचाईमुळे होरपळणाऱ्या लातूरला रेल्वेने पाणी देण्यात आलं, मात्र पाण्याच्या नासाडीबद्दल प्रशासन काही गंभीर नसल्याचं चित्र आहे. शहरातल्या रिंग रोड परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या वॉल्वची क्लिप निघाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून हा प्रकार घडत होता. यातून निघणारं पाणी हे आजूबाजूच्या शेतात वाहून जात असल्याचं पाहून नागरिकांनी प्रशासनाला याची माहिती दिली, पण कित्येक वेळ एकही कर्मचारी या जागी फिरकलाच नाही.
काही काळानंतर आलेल्या कर्मचाऱ्याने हा बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पण यात त्याला यश आलं नाही. यातील गंभीर प्रकार म्हणजे रेल्वेने आलेलं पाणी शुद्धीकरण करुन शहरात पोहचवणाऱ्या वॉल्वमधूनच पाणी वाया गेल्याने प्रशासनाचा ढिम्म कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
=================================================
मधू-मिलिंदच्या 'त्या' जाहीरातीच्या कल्पनेमुळे तंत्रज्ञ अडचणीत
- ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. ८ - प्रसिद्ध मॉडेल मधू सप्रे आणि मिलिंद सोमण यांची १९९५ साली प्रिंट मिडीयामध्ये प्रसिद्ध झालेली एक जाहीरात प्रचंड वादग्रस्त ठरली होती. या जाहीरातीमध्ये मधू आणि मिलिंद यांनी न्यूड पोझ दिली होती. त्यांच्या पायात बूट होते आणि त्यांच्या विवस्त्रशरीराभोवती अजगराने वेटोळे घातल्याचे या जाहीरातीत दाखवण्यात आले होते.मुंबई पोलिसांनी दोघांच्या विरोधात अश्लीलतेचा गुन्हा नोंदवला होता. त्याबरोबरच वन्यजीव सुरक्षा कायद्यातंर्गतही गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी फक्त दहा वर्षांच्या असणा-या अनिरुद्ध सेनला ही जाहीरात फार आवडली होती. त्यातील न्यूडीटी किंवा सापांमुळे नव्हे तर, त्यातून सौदर्याचे जे दर्शन घडले होते ते अनिरुद्धला प्रचंड आवडले होते.आता दोन दशकानंतर अनिरुद्धने पुन्हा तसाच साप आणि मॉडेलचा छायाचित्रांसाठी केलेला प्रयोग त्याला चांगलाच महाग पडला आहे. त्याच्यावर वनखात्याने गुन्हा नोंदवला आहे. अनिरुद्ध पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीयर असून पार्ट टाईम फोटोग्राफर आहे.अनिरुद्धने जिवंत साप न्यूड मॉडेलबरोबर छायाचित्र काढण्यासाठी वापरले आणि ते फोटो फेसबुकवर अपलोड केले. वन्यजीव सुरक्षा कायदा १९७२ नुसार वन्य प्राण्यांना मारहाण आणि व्यावसायिक उद्देशासाठी त्यांना वापरण्यास मनाई आहे. त्यामुळे अनिरुद्ध विरोधात कारवाई सुरु झाली आहे.
- बंगाल वन खात्याने प्रथमच छायाचित्रकारा विरोधात अशा प्रकारचा गुन्हा नोंदवला आहे. सेन शिवाय त्याचा सहाय्यक, मॉडेल आणि मेकअप कलाकाराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्राण्यांच्या माणसासोबतच्या फोटोग्राफीला मनाई आहे हे मला माहित नव्हते असे आपला बचाव करताना अनिरुद्धने सांगितले.
=================================================
आता कर्न्फम रेल्वे तिकीटाचे ट्रान्सफर शक्य
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ८ - लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात एखाद्या व्यक्तीचे तिकीट कर्न्फम झाल्यानंतर त्या व्यक्तीला काही कारणाने प्रवास करत आला नाही तर, ते तिकीट वाया जात होते. पण आता रेल्वे मंत्रालयाने नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे कर्न्फम तिकीट असलेल्या व्यक्तीला प्रवास करता येणार नसेल तर २४ तास आधी त्या व्यकीचे तिकीट दुस-या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकते.कर्न्फम रेल्वे तिकीट आता तुमच्या रक्तातातील नात्याच्या दुस-या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकते.सरकारी कर्मचारी कर्न्फम तिकीट दुस-या सरकारी कर्मचा-याच्या नावावर ट्रान्सफर करु शकतो.१) रेल्वे प्रशासनाने महत्वाच्या स्थानकांवरील मुख्य रिझर्व्हेशन सुपरवायझर्सना कर्न्फम तिकीटावरील प्रवाशांचे नाव बदलण्याची परवानगी दिली आहे.२) प्रवासी सरकारी कर्मचारी असेल तर, ट्रेन सुटायच्या नियोजित वेळेआधी म्हणजे २४ तास आधी त्याला दुस-याच्या नावावर तिकीट बदलण्यासाठी लिखित अर्ज करावा लागेल.३) ट्रेन सुटायच्या २४ तास आधी कर्न्फम तिकीटावर दुस-याचे नाव चढवण्यासाठी लिखित अर्जाव्दारे विनंती करावी लागेल. कुटुंबातील दुस-या सदस्याच्या उदहारणार्थ आई, वडील, भाऊ, बहिण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांचे नाव तिकीटावर टाकता येईल.४) मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी प्रवासी असतील तर, त्या शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाला ४८ तास आधी कर्न्फम तिकीटावर दुस-याचे नाव टाकण्यासाठी अर्ज करावा लागेल. विद्यार्थ्यांना कर्न्फम तिकीट दुस-या विद्यार्थ्याच्या नावावर ट्रान्सफर करता येईल.
=================================================
काश्मीरमध्ये पोलिसांच्या 4 रायफल्स पळविल्या
काश्मीरमध्ये पोलिसांच्या 4 रायफल्स पळविल्या
श्रीनगर - काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज (रविवार) पहाटे संशयित दहशतवाद्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या चार रायफल्स पळवून नेण्याची घटना घडली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील अदिजान भागात आज पहाटे दोन वाजता बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या चार बंदुका पळविण्यात आल्या आहेत. या चार बंदुकांमध्ये दोन एसएलआर आणि दोन इन्सास रायफल्स आहेत. या रायफल्सचा परिसरात शोध घेण्यात येत आहे. यासाठी पोलिस पथके बनविण्यात आली आहेत.
=================================================
‘112‘ क्रमांक 1 जानेवारीपासून सक्रिय होणार
‘112‘ क्रमांक 1 जानेवारीपासून सक्रिय होणार
नवी दिल्ली - कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास केवळ एकाच क्रमांकावर दुरध्वनी करुन मदत मिळविण्याची सोय आता 1 जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अमेरिका, कॅनडा व ब्रिटनमध्ये ज्याप्रमाणे आपत्कालीन क्रमांक अस्तित्वात आहे, त्याचप्रमाणे भारतातही ‘112‘ हा राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यास नुकतीच दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) सरकारी दूरसंचार समितीने मंजुरी दिली.
दूरसंचार मंत्रालयाने एकच आपत्कालीन क्रमांक ठेवण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये ‘911‘ आणि ब्रिटनमध्ये ‘999‘ हा क्रमांक राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून वापरला जातो. याच धर्तीवर भारतातही ट्रायने राष्ट्रीय स्तरावर एक क्रमांक आपत्कालीन स्थितीत नागरिकांना वापरता यावा, यासाठी विचार केला होता. भारतात 100 (पोलिस), 101 (अग्निशामन), 102 (रुग्णवाहिका) आणि 108 (आपत्ती व्यवस्थापन) या क्रमांकांचा वापर करण्यात येतो. पण, आता या सर्व सुविधा ‘112‘ क्रमांकावर उपलब्ध होणार आहेत.
ट्रायने म्हटले आहे, की या क्रमांकावर येणाऱ्या दूरध्वनींना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच एसएमएसलाही उत्तर देण्यात येईल. घटनास्थळापर्यंत मदत पोहचविण्यासाठी दूरध्वनी करणाऱ्याची सर्व माहिती संबंधित विभागांना तत्काळ देण्यात येईल. त्यामुळे मदत पोचविण्यास मदत होणार आहे.
=================================================
पत्नीला पाणी घेण्यापासून रोखलं, दलित पतीनं 40 दिवसांत खोदली विहीर
- ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 8- दशरथ मांजी यांच्या चित्रपटातील भीमपराक्रमासारखं काम वाशीम जिल्ह्यातील बापूराव ताजणे यांनी केलं. सवर्ण जातीच्या शेजा-यांनी पत्नीला त्यांच्या विहिरीचं पाणी देण्यास नकार दिल्यानं बापूराव ताजणेंनी चक्क विहीर खोदली आहे. जवळपास 40 दिवसांहून अधिक काळ ते विहीर खोदत होते.ताजणे त्यांच्या कुटुंबीयांसह वाशीम जिल्ह्यातील कलांबेश्वर गावात राहतात. त्यांनी खोदलेल्या विहिरीचा गावातील सगळ्याच दलितांना उपयोग होतो आहे. बापूराव ताजणे हे दररोज 8 तासांच्या मजुरीचं काम करतात. मात्र उर्वरित राहिलेल्या तासांपैकी जवळपास 6 तास ते विहीर खोदण्यासाठी देत होते. या प्रकारामुळे शेजारी त्यांची नेहमीच टिग्गल करून त्यांना वेड्यात काढत होते. आजूबाजूच्या तीन विहिरी आणि एक बोअरवेल भीषण दुष्काळामुळे पूर्णतः कोरड्या पडल्या होत्या. त्यातच त्यांच्या या विहीर खोदण्याच्या अट्टहासामुळे लोक त्यांची चेष्टा करत होते. विहीर खोदण्यास चार- पाच जणांची गरज असताना बापूराव ताजणेंनी स्वकष्टानं एकट्यानं ही विहीर खोदली. त्यांना पाणी देण्यास नकार दिलेल्या व्यक्तीचं ताजणेंनी नावंही सांगितलं नाही. गावात मला खून-खराबा आणि हाणामारी नको आहे. मात्र आम्ही गरीब असल्यानंच आम्हाला पाणी नाकारण्यात आलं. त्यादिवशी मला खूप दुःख झालं, असं बापूराव ताजणेंनी सांगितलं.पत्नीला पाणी न दिल्यामुळे आता कोणाकडे काहीच मागायचं नाही, असं मी ठरवल्याचं बापूराव ताजणेंनी म्हटलं आहे. मालेगावात जाऊन मी विहीर खोदण्याची अवजारे घेऊन आलो आणि खोदकाम सुरू केलं. देवाच्या कृपेमुळेच माझ्या विहिरीला आज पाणी लागलं आहे, असं बापूराव ताजणे म्हणाले.
=================================================
No comments:
Post a Comment