[अंतरराष्ट्रीय]
१- वायुवेगानं धावणारी ट्रेन... लवकरच
२- जेएनयू-कन्हैय्या वादाचा फायदा उठवण्याचा होता इसिसचा डाव?
३- न्युयॉर्क; जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचं 116व्या वर्षी निधन
४- अमेरिका-पाक संबंध घसरणीला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- पुणे विमानतळ जागेची योग्य वेळी घोषणा - मुख्यमंत्री
६- भारतात सर्वाधिक आंतरजातीय विवाह कुठे होतात?
७- यूपीएससी टॉपर टिना दाबीचं मराठमोळं कनेक्शन
८- केवळ अभ्यासच नव्हे, तर यशासाठी हेही महत्त्वाचं, UPSC टॉपर टीनाचा सल्ला
९- मोदी सरकारला राज्यसभेमध्ये बहुमत मिळणे अवघड
१०- कन्हैया कुमारवरील शिस्तभंग कारवाईला स्थगिती
११- गोव्यातल्या विजय माल्यांचा बंगला बँकांनी घेतला ताब्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- 30 कोटींची लाच मागणाऱ्या खडसेंच्या कथित पीएला अटक
१३- बिल्डरच्या फसवणुकीमुळं दादरमधील मराठी कुटुंबं देशोधडीला
१४- राज कंदारींच्या सुसाइड नोटमध्ये विपीन थापरचं नाव, थापर अटकेत
१५- डोळे उघडणारं यश... मराठमोळ्या प्रांजलीचा यूपीएससीतील संघर्षमय प्रवास
१६- नागराज मंजुळे यांचा घटस्फोट कायदेशीरच!
१७- २४ तुरुंग अधिकाऱ्यांच्या बदल्या
१८- मेडीगट्टा धरणाची उंची १०० मीटर ठेवणार - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
१९- २०० पोलिसांचा अवयवदानाचा संकल्प
२०- खासगी बँकांमध्ये विदेशी हिस्सेदारी वाढविली!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२१- सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प.रे. पुन्हा विस्कळीत
२२- राज्यभरातील चोरीच्या ट्रकची धुळ्यात विल्हेवाट
२३- औरंगाबाद; मद्यनिर्मितीसाठी २०० कोटी लिटर पाण्याचा वापर
२४- पुणे-मुंबई मार्गावर प्रथमच ग्रीन कॉरिडोर
२५- ‘नीट’संदर्भात ‘मार्ड’चे पंतप्रधानांना पत्र
२६- मोकळ्या श्वासाचा खर्च ५० लाख कोटी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- इमारतीच्या जिन्यात चाहत्यांचा गराडा, 'सैराट' टीमला पोलिस संरक्षण
२८- प्रशिक्षक पदावरुन कोहली-व्हेटोरीची काय चर्चा झाली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२९- पाणी जपून वापरा; व्यावसायिक उद्योजकांच्या बैठकीत काकाणी यांचे प्रतिपादन
३०- सत्यगणपतीच्या दानपेटीत १४.४६ हजार, ११ किलो चांदी, ५ तोळे ५८ ग्राम सोने
३१- किरोडा येथे माजी सैनिकांनी केला वृद्धाचा खून
३२- दक्षिण नांदेडसाठी फक्त २.७० दलघमी मृत पाणीसाठा
३३- किनवट; सामुहिक विवाह मेळाव्यात ३३ जोडपी विवाहबद्ध
३४- माळेगावच्या 'रोहयो' कामात लाखो रुपयाचा घोटाळा
३५- नीटला विरोध नाही; फक्त यावर्षी सीईटी ठेवा - प्रा. चौगुले
३६- बारूळ धरणातील गाळ काढण्यासाठी चीखलीकरांची मुख्यमंत्र्यांकडे १५० कोटींची मागणी
३७- राष्ट्रीय प्रबोधनकार 'मी वादळ वारा' फेम अनिरुद्ध बंकर आज धर्माबादेत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
समस्या नाही असा कोणीही नाही व समाधान नाही अशी कोणतीही समस्या नाही
[राजेश इंगळे]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
दिगंबर बुचले, अर्चना मुंगळ, राजेश गन्देवर, अनिकेत सोनवणे, सागर यादव, जयदीप देशमुख, सुधाकर शिरसेवर, आशिष सुर्कुतलावर, निलेश कांबळे, माधव घोरबंद, गुरदीपसिंघ, कालरा, राहुल शिंदे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=================================================







मूळचे ग्वाल्हेरचे कंदारी कोपरखैरणेत आले. फोटोग्राफीतून करियर सुरु केलेल्या कंदारी यांनी 15 वर्षांपूर्वी रियल इस्टेटमध्ये प्रवेश केला. छोट्या-मोठ्या दलालीतून ते बांधकाम व्यवसायात आले आणि 1998 मध्ये स्वराज बिल्डर्स अँड डेव्हपर्सची सुरुवात केली.
आधी छोट्या मोठ्या इमारतींपासून सुरु केलेल्या कंदारी हळूहळू मोठ्या इमारती बांधू लागले.

दोन शहरांमध्ये अशा प्रकारच्या ट्यूब टाकण्यासाठी किमान 50 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यासोबतच हायपरलूपला वेग पकडण्याआधी अनेक अडथळे पार करावे लागणार आहेत. मात्र संशोधक हे अडथळे पार करण्यासाठी सज्ज आहेत.

१- वायुवेगानं धावणारी ट्रेन... लवकरच
२- जेएनयू-कन्हैय्या वादाचा फायदा उठवण्याचा होता इसिसचा डाव?
३- न्युयॉर्क; जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचं 116व्या वर्षी निधन
४- अमेरिका-पाक संबंध घसरणीला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- पुणे विमानतळ जागेची योग्य वेळी घोषणा - मुख्यमंत्री
६- भारतात सर्वाधिक आंतरजातीय विवाह कुठे होतात?
७- यूपीएससी टॉपर टिना दाबीचं मराठमोळं कनेक्शन
८- केवळ अभ्यासच नव्हे, तर यशासाठी हेही महत्त्वाचं, UPSC टॉपर टीनाचा सल्ला
९- मोदी सरकारला राज्यसभेमध्ये बहुमत मिळणे अवघड
१०- कन्हैया कुमारवरील शिस्तभंग कारवाईला स्थगिती
११- गोव्यातल्या विजय माल्यांचा बंगला बँकांनी घेतला ताब्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- 30 कोटींची लाच मागणाऱ्या खडसेंच्या कथित पीएला अटक
१३- बिल्डरच्या फसवणुकीमुळं दादरमधील मराठी कुटुंबं देशोधडीला
१४- राज कंदारींच्या सुसाइड नोटमध्ये विपीन थापरचं नाव, थापर अटकेत
१५- डोळे उघडणारं यश... मराठमोळ्या प्रांजलीचा यूपीएससीतील संघर्षमय प्रवास
१६- नागराज मंजुळे यांचा घटस्फोट कायदेशीरच!
१७- २४ तुरुंग अधिकाऱ्यांच्या बदल्या
१८- मेडीगट्टा धरणाची उंची १०० मीटर ठेवणार - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
१९- २०० पोलिसांचा अवयवदानाचा संकल्प
२०- खासगी बँकांमध्ये विदेशी हिस्सेदारी वाढविली!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२१- सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प.रे. पुन्हा विस्कळीत
२२- राज्यभरातील चोरीच्या ट्रकची धुळ्यात विल्हेवाट
२३- औरंगाबाद; मद्यनिर्मितीसाठी २०० कोटी लिटर पाण्याचा वापर
२४- पुणे-मुंबई मार्गावर प्रथमच ग्रीन कॉरिडोर
२५- ‘नीट’संदर्भात ‘मार्ड’चे पंतप्रधानांना पत्र
२६- मोकळ्या श्वासाचा खर्च ५० लाख कोटी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- इमारतीच्या जिन्यात चाहत्यांचा गराडा, 'सैराट' टीमला पोलिस संरक्षण
२८- प्रशिक्षक पदावरुन कोहली-व्हेटोरीची काय चर्चा झाली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२९- पाणी जपून वापरा; व्यावसायिक उद्योजकांच्या बैठकीत काकाणी यांचे प्रतिपादन
३०- सत्यगणपतीच्या दानपेटीत १४.४६ हजार, ११ किलो चांदी, ५ तोळे ५८ ग्राम सोने
३१- किरोडा येथे माजी सैनिकांनी केला वृद्धाचा खून
३२- दक्षिण नांदेडसाठी फक्त २.७० दलघमी मृत पाणीसाठा
३३- किनवट; सामुहिक विवाह मेळाव्यात ३३ जोडपी विवाहबद्ध
३४- माळेगावच्या 'रोहयो' कामात लाखो रुपयाचा घोटाळा
३५- नीटला विरोध नाही; फक्त यावर्षी सीईटी ठेवा - प्रा. चौगुले
३६- बारूळ धरणातील गाळ काढण्यासाठी चीखलीकरांची मुख्यमंत्र्यांकडे १५० कोटींची मागणी
३७- राष्ट्रीय प्रबोधनकार 'मी वादळ वारा' फेम अनिरुद्ध बंकर आज धर्माबादेत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
समस्या नाही असा कोणीही नाही व समाधान नाही अशी कोणतीही समस्या नाही
[राजेश इंगळे]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
दिगंबर बुचले, अर्चना मुंगळ, राजेश गन्देवर, अनिकेत सोनवणे, सागर यादव, जयदीप देशमुख, सुधाकर शिरसेवर, आशिष सुर्कुतलावर, निलेश कांबळे, माधव घोरबंद, गुरदीपसिंघ, कालरा, राहुल शिंदे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
=================================================
30 कोटींची लाच मागणाऱ्या खडसेंच्या कथित पीएला अटक
मुंबई : राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा खासगी पीए असल्याचं सांगणाऱ्या गजमल पाटील उर्फ गजानन पाटील, याला 30 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयात त्याला अटक केली.
ठाण्यातील मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थेला जमीन हस्तांतरित करण्यासठी गजानन पाटीलने संस्थेच्या विश्वस्तांकडे तब्बल 30 कोटींची लाच मागितली होती. यानंतर संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. त्यावर कारवाई करत एसीबीने गजानन पाटीलला मंत्रालयात अटक केली.
काय आहे प्रकरण?
कल्याणमधील इंटरनॅशनल सोसायटी फॉर एक्सलन्स या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेने 2004 मध्ये 37 एकर जमीन खरेदी केली होती. मंत्रालयात आग लागल्यानंतर कागदपत्रं जळून खाक झाल्याने संबंधित जमिनीची खरेदी प्रलंबित होती. यानंतर महसूल विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळावं यासाठी संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव पाठपुरावा करत होते. यादरम्यान एकनाथ खडसेंचे ओएसडी उन्मेश महाजन यांनी रमेश जाधव यांची भेट गजानन पाटीलशी घालून दिली. काम करुन देण्याच्या मोबदल्यात गजानन पाटीलने सुरुवातीला एक फ्लॅट आणि एक कोटीची मागणी केली. पाटीलने जाधव यांना चर्चेसाठी खडसेंच्या रामटेक बंगल्यावरही अनेकदा बोलावल्याचं समजतं. हळूहळू त्याची मागणी वाढ गेली आणि जमीन हस्तांतरित करण्यासाठी त्याने तब्बल 30 कोटींची मागणी केली. त्यानंतर रमेश जाधव यांनी लाचलुचत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
=================================================
यूपीएससी टॉपर टिना दाबीचं मराठमोळं कनेक्शन
नवी दिल्ली : बुद्धीचा कस पाहणाऱ्या परीक्षांमधली एक परीक्षा म्हणजे यूपीएससी. नुकताच युपीएससीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालानंतर देशात एकाच नावाची चर्चा सुरु झाली ती म्हणजे टिना दाबी. टीनाने यूपीएससी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला. तिने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी हे यश संपादन केलं आहे.
टिनाच्या या यशामागे मराठमोळा हात आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं टीनाचं मराठी नातं आहे. कारण टिनाच्या या यशात महत्वाची भूमिका आहे, ती तिच्या आईची. टीनाच्या आई हिमाली कांबळे या महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील पुलगावच्या आहेत.
हिमाली कांबळे आणि टिना दाबी यांनी ‘माझा’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपल्या महाराष्ट्राविषयी असलेल्या नात्याबद्दल रंजक गोष्टी सांगितल्या.
महाराष्ट्र जन्मभूमी, कर्मभूमी
टिनाच्या आईचं कुटुंब पुलगावमध्ये राहत होतं. हिमाली यांचे आजोबा स्टेशन मास्तर होते. पण त्यांच्या निधनानंतर हिमाली यांचं कुटुंब नागपूरला शिफ्ट झालं. मध्यमवर्गीय कुटुंबात हिमाली यांचा जन्म झाला. कुटुंबाची जबाबदारी हिमाली यांच्या आईवर असायची. हिमाली यांनी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलं. हिमाली याचं शिक्षण नागपूर आणि मध्य प्रदेशात झालं. अभियांत्रिकीचं शिक्षण घेऊन त्यांनी सरकारी खात्यात नोकरी देखील केली, असं हिमाली यांनी सांगितलं.
=================================================
भारतात सर्वाधिक आंतरजातीय विवाह कुठे होतात?
नवी दिल्ली : नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ सिनेमामुळे राज्यासह देशात सध्या आंतरजातीय विवाहाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. मात्र आजही आंतरजातीय विवाहांना स्वीकारलं जात नाही, हे वास्तव आहे. परंतु भारतात असं एक राज्य आहे जे आंतरजातीय विवाहांमध्ये अव्वल आहे.
भारतात सर्वाधिक आंतरजातीय विवाह मिझोराममध्ये होतात. नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या (एनसीएईआर) सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.
भारतात केवळ 5 % आंतरजातीय विवाह
मिझोराममध्ये 55 टक्के लग्न आंतरजातीय होतात. एनसीएईआरच्या अहवालानुसार, भारतात 95 टक्के विवाह एकाच जातीत होतात.
पण मिझोराम याला अपवाद आहे. मिझोरामची 87 टक्के लोकसंख्या ख्रिश्चन धर्मिय आहे.
आंतरजातीय विवाहाच्या बाबतीत 46 टक्क्यांसह मेघालय दुसऱ्या आणि 38 टक्क्यांसह सिक्कीम तिसऱ्या स्थानावर आहे.
इंडियन ह्यूमन डेव्हलपमेंट सर्व्हेनुसार, आंतरजातीय विवाहाच्या बाबातीत जम्मू-काश्मीर चौथ्या आणि गुजरात पाचव्या स्थानावर आहे.
या सर्वेक्षणात भारतातील 33 राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 41,554 कुटुंबाचा समावेश करण्यात आला होता.
=================================================
केवळ अभ्यासच नव्हे, तर यशासाठी हेही महत्त्वाचं, UPSC टॉपर टीनाचा सल्ला
नवी दिल्ली : यूपीएससीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते टिना दाबी या 22 वर्षीय तरुणीने. टिनाने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवलं आहे, त्यामुळे तिचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. केवळ मेहनत, जिद्द, संवेदनशीलता यांच्या बळावरच हे बळ मिळवलं, असं टिनाने ‘ एबीपी माझा’ दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.
टिनाने मिळवलेल्या यशाबद्दल सांगताना यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे अनुभव शेअर केले आहेत.
पूर्वतयारी आणि कठोर मेहनत
माझं आयुष्याचं ध्येय आधीच निश्चित होतं. त्यामुळे माझा मार्ग सरळ होता, त्यात कसलाही अडथळा नव्हता किंवा कसलाही मानसिक गोंधळ नव्हता, असं टिना सांगते. कॉलेजमध्ये शिकत असतानाच यूपीएससी करायची ठरल्यामुळे विषयाची निवड आधीच केली होती. त्यामुळे अभ्यास करणं अधिक सोप झालं, असं टिना सांगते.
स्वतःमध्ये असलेल्या क्षमतेचा कस यूपीएससीचा अभ्यास करताना लागतो. केवळ क्षमता असणं चालत नाही तर ती वापरण्याची कला देखील अवगत करावी लागते, असा सल्ला टिना देते.
=================================================
बिल्डरच्या फसवणुकीमुळं दादरमधील मराठी कुटुंबं देशोधडीला
मुंबई: पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डरांकडून मराठी माणसाची सर्रास फसवणूक होते आहे. बिल्डरांच्या या कारभारामुळं पिढ्यानं पिढ्या दादरमध्ये राहिलेला मराठी माणूस रस्त्यावर आला आहे. बिल्डर इमारतीचं बांधकाम पूर्ण करत नाही. राहण्यासाठी घर नाही. त्यामुळं मराठी माणसाची अवस्था बिकट झाली आहे. मराठीच्या नावानं राजकीय पोळी भाजून घेणारे आता यासंदर्भात आवाज उठवणार का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
सेना भवन आणि राजगडापासून अगदी हाकेच्या अंतरावर अर्धवट बांधकाम इमारत. अर्धवट बांधकामाप्रमाणं इथल्या रहिवाशांचंही स्वप्न अर्धवट राहिलं आहे. बिल्डरवर विश्वास ठेवून 2006 साली रहिवाशांनी जुन्या घरावर हातोडा मारण्याची परवानगी दिली. पण बिल्डरनं फसवलं आणि रहिवाशांच्या हातचं तेलही गेलं आणि तूपही.
माधुरी साळुंखे, वय 53 वर्षे. बिल्डरकडून झालेल्या फसवणुकीमुळं कर्जबाजारी झाल्या. हातची नोकरी सुटली. रहिवाशांनी तात्पुरता आडोसा तयार करुन संसार थाटले आहेत. पण पाण्याविना आणि अंधारात. डोक्यावर मेघगर्जना सुरु असताना राहायचं कसं असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे?
याच ठिकाणी राहणारी सुप्रिया पांचाळ बी कॉमच्या प्रथम वर्षात शिकते. पण तिला अभ्यास करणं कठीण झालं आहे.
शिवसेनेनं आता फसवणूक करणाऱ्या बिल्डरांविरोधात जन आंदोलनाची तयारी सुरु केली आहे. मात्र हे निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेलं गाजर तर नाही ना असा प्रश्न उभा राहतो आहे?
=================================================
प्रशिक्षक पदावरुन कोहली-व्हेटोरीची काय चर्चा झाली
बंगळुरु: न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या डॅनियल व्हेटोरीशी आपण टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाविषयी चर्चा केल्याची कबुली भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीनं दिली आहे.
आयपीएलच्या मैदानात विराट हा बंगलोरचं कर्णधारपद भूषवत आहे. त्यामुळं आयपीएलच्या याच मोसमादरम्यान आपण व्हेटोरीकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा विषय छेडला होता, अशी माहिती विराटनं दिली.
भारताचे टीम डायरेक्टर रवी शास्त्री यांच्याशी बीसीसीआयनं केलेल्या कॉण्ट्रॅक्टची मुदत ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकानंतर संपली होती. त्यामुळं बीसीसीआय भारतीय संघासाठी नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे.
टीम इंडिया जून महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर जात असून, हा दौरा जेमतेम महिन्याभरावर आला आहे. त्यामुळं साहजिकच टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकासाठीची मोहीम तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीनं डॅनियल व्हेटोरीशी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाविषयी चर्चा केली. त्यात काही गैर नसल्याची भावनाही विराटनं व्यक्त केली आहे.
=================================================
राज कंदारींच्या सुसाइड नोटमध्ये विपीन थापरचं नाव, थापर अटकेत
नवी मुंबई: नवी मुंबईतील प्रसिद्ध स्वराज बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे मालक राज कंदारी यांच्या आत्महत्या प्रकरणी दररोज नवं-नवीन माहिती समोर येते आहे. पोलिसांच्या चौकशीत राज कंदारी यांची दुसरी सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये विपिन थापर याच्या नावाचा उल्लेख आहे.
विपिन यानंच आपल्याला दगा दिल्यानं माझ्या आत्महत्येला विपिनच जबाबदार असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. या प्रकरणी सानपाडा पोलिसांनी विपिनला अटक केली आहे. राज कंदारी आणि विपिन थापर हे नातेवाईक आणि चांगले मित्र होते.
राज कंदारी यांनी आपला व्यवसाय थापरच्या हाती सोपवला होता. त्यानंच दगा दिल्यानं आपलं मोठं नुकसानं झाल्याचं राज कंदारी यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळं आता पोलीस विपिन थापर याची कसून चौकशी करत आहेत.
एक सामान्य फोटोग्राफर… ते सक्सेसफुल्ल बिल्डर… राज कंदारी यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे.. मात्र करिअरचा आलेख चढता असलेल्या या बिल्डरने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हा प्रश्न उपस्थित होतो.
मूळचे ग्वाल्हेरचे कंदारी कोपरखैरणेत आले. फोटोग्राफीतून करियर सुरु केलेल्या कंदारी यांनी 15 वर्षांपूर्वी रियल इस्टेटमध्ये प्रवेश केला. छोट्या-मोठ्या दलालीतून ते बांधकाम व्यवसायात आले आणि 1998 मध्ये स्वराज बिल्डर्स अँड डेव्हपर्सची सुरुवात केली.
आधी छोट्या मोठ्या इमारतींपासून सुरु केलेल्या कंदारी हळूहळू मोठ्या इमारती बांधू लागले.
=================================================
डोळे उघडणारं यश... मराठमोळ्या प्रांजलीचा यूपीएससीतील संघर्षमय प्रवास
=================================================
वायुवेगानं धावणारी ट्रेन... लवकरच
सौजन्य: यूट्यूब
मुंबई: तुम्ही बीडमधे आहात, मुंबई ऑफिसमधून सहकाऱ्याचा फोन येतो, कुठैस बे? बॉस बोलावतोय अर्ध्या तासात मीटिंग आहे. तुम्ही उत्तर द्याल, हे काय आलोच, पोहोचतो 15-20 मिनिटात.
भारतात आज नाही, पण येत्या काही दशकात हा संवाद खरा ठरु शकतो. काय विश्वास बसत नाही ना? मात्र, लवकरच हायपरलूप या सुपरसॉनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं हा वायुवेगाचा प्रवास शक्य होणार आहे.
पात्र क्रमांक 2- बोल भावा
पात्र क्रमांक 1- भावा कुठं हाईस?
पात्र क्रमांक 2- भावा कोल्हापुरात
पात्र क्रमांक 1- मुंबईला लवकर ये की लेका बॉस बोलवतोय मीटिंग हाय
पात्र क्रमांक 2- आलो भावा 20 मिनिटात आलो.
हे असलं संभाषण ऐकून तुम्ही नक्कीच चक्रावाल. भले कोल्हापूर ते मुंबई हा 400 किलोमीटरचा प्रवास 20 मिनिटात कसा होणार? पण मंडळी अशाप्रकारचा संवाद येत्या काही दिवसातच होऊ शकणार आहे आणि त्याची चाचणी सुरुही झाली आहे. अमेरिकेतलं नेवाडा इथं नुकतीच याची चाचणी पार पडली
काय आहे हायपरलूप सूपरसोनिक तंत्रज्ञान?
हायपरलूप या सुपरसॉनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं अवघ्या 1.1 सेकंदात 186 किलोमीटरचा वेग गाठता येणार आहे.
या तंत्रज्ञानाने 1 तासात जवळपास 1 हजार किलोमीटरचं अंतर सहजपणे कापता येणार आहे. दोन शहरांमध्ये ट्यूब टाकून त्यातून ही ट्रेन हवेवर तरंगत ट्यूबच्या पोकळीतून प्रवास करणार आहे.
या ट्यूबमधून 2019 पर्यंत वायुवेगाने मालवाहतूक आणि 2021 पर्यंत प्रवाशी वाहतूक शक्य होईल असे प्रयत्न सुरु आहेत. ट्यूबमधल्या या ट्रेनवर विपरित हवामानाचा कोणताही परिणाम न होता हा प्रवास करता येणार आहे.
दोन शहरांमध्ये अशा प्रकारच्या ट्यूब टाकण्यासाठी किमान 50 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यासोबतच हायपरलूपला वेग पकडण्याआधी अनेक अडथळे पार करावे लागणार आहेत. मात्र संशोधक हे अडथळे पार करण्यासाठी सज्ज आहेत.
मंडळी समजा आपल्या महाराष्ट्रात ही सेवा सुरु झाली तर काय होईल? अहो चांदा ते बांदा तुम्ही काही मिनिटात पोहोचाल.
मुंबई–बीड 18 मिनिटे
मुंबई-जळगाव 20 मिनिटे
मुंबई–कोल्हापूर 17 मिनिटे
मुंबई–नागपूर 40 मिनिटे
मुंबई –दिल्ली 70 मिनिटे
मुंबईकर म्हणा किंवा कुणीही बस किंवा ट्रेनची वाट पाहण्यात जितका वेळ रोजच्यारोज घालवतात तितक्या वेळेत माणसं लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण करतील.
अर्थात हे स्वप्न परकियांनी पाहिलं, ते सत्यात उतरवण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. आपण मात्र, अजूनही त्यांच्या स्वप्नातल्या बुलेट ट्रेनमध्ये रममाण आहोत. ज्याची चर्चा आता कुठे सुरु झाली आहे.
=================================================
इमारतीच्या जिन्यात चाहत्यांचा गराडा, 'सैराट' टीमला पोलिस संरक्षण
मुंबई : राज्यात सध्या फक्त आणि फक्त ‘सैराट’ची चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘सैराट’च्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चाहत्यांमध्ये सिनेमातील कलाकरांना पाहण्याची, भेटण्याची, त्यांच्यासोबत फोटो काढण्याची प्रचंड क्रेझ आहे. चित्रपटातील आर्ची, परशा, सल्या, लंगड्या आणि दिग्दर्शक नागराज मंजुळेला पाहण्यासाठी चाहते ना दिवस पाहतात ना रात्र. या सगळ्यांची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते रात्री 12.30 वाजेपर्यंत तात्कळत उभे होते. इतकंच नाही तर चाहत्यांच्या गराड्यामुळे ‘सैराट’च्या टीमसाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
मुंबईच्या वरळी पोलिस वसाहतीत हा प्रकार पाहायला मिळाला. नागराज मंजुळेसह रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, तानाजी गालगुंडे आणि अरबाज शेख वरळीत आले होते. सैराटमध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका बजावणारे राम पवार हे नागराजचे मित्र. ते स्वत: पोलीस आहेत. त्यांनीच या टीमला जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. त्यामुळे नागराजसह सगळे जण रात्री 9.30 च्या सुमारास त्यांच्या घरी पोहोचले.
चाहत्यांचा मध्यरात्री झिंगाट
सैराटची टीम आल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं आणि त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी झाली. सुरुवातीला 30 ते 40 जणांचा ग्रुप जमा झाला. त्यानंतर हळूहळू त्यांची संख्या वाढली. रात्र 12 पर्यंत शेकडो चाहते तिथे गोळा झाले होते. मात्र एवढ्या रात्रीही त्यांच्या उत्साह मावळला नव्हता. चाहते आर्ची आणि परशाच्या नावाने ओरडत होते. झिंगाट, सैराट झालं जी, याड लागलं ही गाणी लावून अक्षरश: धम्माल करत होते. मोठ्या संख्येने चाहते गोळा झाल्याने सैराटच्या टीमला घराबाहेर पडणं शक्य होत नव्हतं. अखेर गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं.
=================================================
जेएनयू-कन्हैय्या वादाचा फायदा उठवण्याचा होता इसिसचा डाव?
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १४ - इस्लामिक स्टेट (इसिस) ही दहशतवादी संघटना आगामी काळात भारतात अनेक कारवाया करणार असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती, मात्र आता हे वृत्त खरेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच राजधानी दिल्लीतील जेएनयू व कन्हैया कुमार दरम्यान झालेल्या विवादात सहभागी होऊन त्याचा ( आपल्या कारवायांसाठी) फायदा उठवावा, असा आदेश आपल्याला देण्यात आल्याचे भारतातील इसिसच्या रिक्रूटर्सनी ( भरती करण्याची जबाबदारी असणारे) दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.'जुनुद अल खलीफा-ए-हिंद' (जेकेएच) या भारतातील 'इसिस'च्याशाखेतील ३ रिक्रूटर्स आशिक अहमद उर्फ राजा, मोहम्मद अब्दुल अहद आणि मोहम्मद अफजल या तिघांनी पोलिसांसमोर दिलेल्या जबाबातून अशा अनेक बाबी समोर आल्या आहेत.१९ फेब्रुवारी रोजी कन्हैयाकुमार देशद्रोहाच्या आरोपाखाली तिहार तुरूंगात होता व त्याची सुटका व्हावी यासाठी अनेक विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थी आंदोलन करत होते. त्याचवेळी 'इसिस'च्या अहमद अलीने पश्चिम बंगालमधील १९ वर्षीय आशिक अहमद उर्फ राजाला या आंदोलनात सहभागी होऊन गाड्यांची जाळपोळ तसेच तोड-फोड करण्याची सूचना दिली होती. तसेच देशात अस्थिरतेच वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी चिथावणी देऊन हे आंदोलन आणखी भडकावण्याची इसिसची योजना होती, असेही एनआयएच्या अधिका-यांनी सांगितले.
=================================================
सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प.रे. पुन्हा विस्कळीत
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १४ - सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेचीवाहतूक शनिवारी सलग तिस-या दिवशी विस्कळीत झाली आहे.अंधेरी ते जोगेश्वरी स्थानकादरम्याने ब-याच काळापासून अनेक गाड्या खोळंबल्या असून अप व डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे.सिग्नल यंत्रणेत नेमका काय बिघाड झाला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही मात्र रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोचले असून बिघाड लवकरच दुरूस्त होईल असे समजते. सलग तिस-या दिवशी झालेल्या रेल्वे खोळंब्यामुळे प्रवासी मात्र संतप्त झाले असून स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. अनेक प्रवाशांनी गाड्यांमधून उतरून ट्रॅकमधून चालत जाण्याचा मार्ग अवलंबला आहे.
=================================================
हम साथ साथ है! प्रीती झिंटाच्या रिसेप्शनला सलमानसोबत लुलियाही हजर..
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि, १४ - बॉलिवूडचा दबंग स्टार अभिनेता सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया व्हंतूर हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा जोर धरू लागली असून काही दिवसांपूर्वी लुलिया सलमानच्या कुटुंबियांसोबत एअरपोर्टवरही दिसली होती. त्यामुळे खान कुटुंबियांचाही या नात्याला होकार असून या वर्षाअखेरीस ते दोघे लग्न करणार असल्याचे वृत्त होते. मात्र सलमानने त्यावर कोणतेही भाष्य केले नव्हते.मात्र अभिनेत्री प्रीती झिंटाच्या रिसेप्शनला लुलियासोबत जाहीर हजेरी लावून सलमानने सर्व चर्चांना पूर्णविराम देत 'हम साथ साथ है' असेच स्पष्ट केल्याचे दिसते. दोन महिन्यांपूर्वी अभिनेत्री प्रीती झिंटा बॉयफ्रेंड जेन गुडइनफसोबत विवाहबंधनात अडकली. हा विवाहसोहळा अगदी खासगी स्वरूपात झाला असला तरीही काल (१३ मे) तिने मुंबईतील एका हॉटेलमध्ये प्रीती-जेनचा भव्य रिसेप्शन सोहळा पार पडला.
=================================================
नागराज मंजुळे यांचा घटस्फोट कायदेशीरच!
- पुणे : पुन्हा नांदविण्याची मागणी करणाऱ्या सुनीता लष्करे यांच्याशी ‘सैराट’फेम प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा २०१४मध्येच न्यायालयात रीतसर घटस्फोट झाल्याचे पुढे आले आहे. मात्र, फसवणूक करून आपल्याला घटस्फोट दिल्याचा आरोप सुनीता यांनी केला आहे.‘नागराज मंंजुळेची पत्नी करतेय धुणी-भांडी’ हे वृत्त ‘लोकमत’मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावर याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या.पडत्या काळात कष्ट करून साथ दिली, मात्र ज्यांच्यामुळे यश मिळाले त्यांनाच नागराज मंजुळे यांनीदूर लोटले, असा आरोप करीत मला पत्नी म्हणून पुन्हा नांदवावे, अशी मागणी मंजुळे यांच्या घटस्फोटीत पत्नी सुनीता यांनी गुरूवारी केली होती.मात्र, यासंबंधीची न्यायालयीन कागदपत्रे ‘लोकमत’च्या हाती आली असून या कागदपत्रांनुसार १० नोव्हेंबर २०१४ रोजी नागराज आणि सुनीता या दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता.यासाठी सुनीता यांना सात लाख रुपयांची एकरकमी पोटगीही देण्यात आली होती. शिवाय, सुनीता यांनी पत्नी म्हणून सर्व अधिकार सोडत असल्याचे तसेच भविष्यात कोणत्याही स्थावर वा जंगम मालमत्तेवर अधिकार मागितला नसल्याचेही कबुल केले होते.
=================================================
२४ तुरुंग अधिकाऱ्यांच्या बदल्या
- पुणे : राज्यातील २४ तुरुंगाधिकाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी करण्यात आल्या. कारागृहाचे प्रमुख अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.बदल्या झालेल्या तुरूंगाधिकाऱ्यांची नावे (कोठून कोठे ) : श्रीकृष्ण भुसारे (यवतमाळ जिल्हा कारागृह ते किशोर सुधारालय, नाशिक), दिगंबर इगवे (पैठण खुले जिल्हा कारागृह ते सोलापूर जिल्हा कारागृह), धनसिंग कवाळे (बीड जिल्हा कारागृह ते जालना जिल्हा कारागृह), विलास साबळे (नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह ते औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह), पांडुरंग भुसारे (नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह ते अलिबाग जिल्हा कारागृह), मंगेश जगताप (नाशिकरोड मध्यवर्ती ते यवतमाळ जिल्हा कारागृह), सचिन साळवे (धुळे जिल्हा कारागृह ते पैठण खुले जिल्हा कारागृह), भानुदास श्रीराव (जळगाव जिल्हा ते धुळे जिल्हा कारागृह), हरिश्चंद्र जाधवर (मुंबई मध्यवर्ती ते कोल्हापूर मध्यवर्ती), युवराज बावीसकर (मुंबई मध्यवर्ती ते कल्याण जिल्हा), कुंदा जांभुळकर (ठाणे मध्यवर्ती ते कल्याण जिल्हा कारागृह), विलास कापडे (कल्याण जिल्हा ते ठाणे मध्यवर्ती), मुरलीधर अवघडे (कल्याण जिल्हा ते सातारा जिल्हा कारागृह), उमरासिंग पाटील (भायखळा जिल्हा ते मुंबई मध्यवर्ती कारागृह), तानाजी घरबुडवे (कल्याण जिल्हा ते भायखळा जिल्हा कारागृह), गजानन सरोदे (येरवडा मध्यवर्ती ते दौ. जा. तु. अ. प्र. म. येरवडा), पल्लवी कदम (येरवडा मध्यवर्ती कारागृह ते नाशिकरोड मध्यवर्ती), सुशील कुंभार (कोल्हापूर मध्यवर्ती ते सांगली जिल्हा), यशवंत फड (सोलापूर जिल्हा ते नाशिकरोड मध्यवर्ती), महादेव पवार (सांगली जिल्हा ते बीड जिल्हा कारागृह), नितीन क्षीरसागर (अमरावती मध्यवर्ती ते येरवडा मध्यवर्ती), हरिदास कुंटे (अमरावती मध्यवर्ती ते नाशिकरोड मध्यवर्ती) आणि अशोक जाधव (चंद्रपूर जिल्हा ते अमरावती मध्यवर्ती कारागृह).
=================================================
राज्यभरातील चोरीच्या ट्रकची धुळ्यात विल्हेवाट
- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईराज्यभरातून चोरीला गेलेल्या ट्रकची धुळ्यामध्ये विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विल्हेवाट लावलेल्या ट्रकचे इंजीन व इतर पार्ट पुन्हा कुर्ला तसेच तळोजा परिसरात विकले जायचे. अनेक वर्षांपासून त्याठिकाणी हा प्रकार सुरू असतानाही स्थानिक पोलिसांची त्याकडे डोळेझाक सुरू होती.ट्रक चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एपीएमसी पोलीस वाहनचोर टोळीच्या शोधात होते. यावेळी एका टोळीची माहिती तपास पथकाला मिळाली होती. ही टोळी चोरीच्या ट्रकची धुळ््यामध्ये विल्हेवाट लावत होती. यानुसार पोलीस निरीक्षक प्रमोद रोमन यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक निरीक्षक धनंजय माने यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. मुंबई- आग्रा मार्गालगत मोहाडे पोलीस ठाणे हद्दीत राज्यभरातील चोरीच्या ट्रकची विल्हेवाट लावण्याचा प्रकार सुरू होता. त्यानुसार घटनास्थळी असे ५० हून अधिक ट्रक व शेकडो ट्रकचे सुटे भाग आढळून आले. जे ट्रक त्याठिकाणी उभे होते त्यांचे महत्त्वाचे पार्ट काढून घेण्यात आलेले होते. तसेच सदर ट्रकची ओळख पटू नये याकरिता त्यावर रंग मारल्याचेही निदर्शनास आल्याचे सहाय्यक निरीक्षक धनंजय माने यांनी सांगितले. त्यानुसार घटनास्थळावरून जुबेर अहमद ऊर्फ बाबा शेख (४९), रंजीत रामप्रसाद सोनी (२७) व मोहसीन खान (१९) यांना अटक करण्यात आलेली आहे. मोहसीनच्या वडिलांच्या नावे मार्गालगतच्या मोकळ्या जागेत अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. याकरिता त्याठिकाणी सहा गाळे बांधण्यात आले होते. त्याठिकाणी चोरून आणलेले ट्रक विल्हेवाट लावण्यासाठी लपवले जायचे. या टोळीने अद्यापपर्यंत केवळ टाटा कंपनीचेच ट्रक चोरल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. हे ट्रक गुजरात, वापी मार्गे दलालामार्फत त्याठिकाणी आणले जायचे अशी कबुली अटकेत असलेल्या तिघांनी दिली आहे.
=================================================
मेडीगट्टा धरणाची उंची १०० मीटर ठेवणार
- मुंबई : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यालगत तेलंगणात होणाऱ्या मेडीगट्टा (कल्लेश्वरम) धरणाची उंची १०० मीटर ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांच्या जलसंपदा मंत्र्यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत मुंबईत घेतला आहे. त्यामुळे आता फक्त ५६ हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार असून एकही गाव बाधित होणार नाही, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत होणाऱ्या या मेडीगट्टा धरणामुळे सुमारे २५ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार असून, अनेक गावे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यपाल तेलंगणाचे असल्याने त्यांच्या दबावापोटी राज्य सरकार तेलंगणाचा प्रकल्प पुढे रेटत आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. या धरणाची उंची वाढविण्यास स्थानिकांनीही विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर आज दोन्ही राज्यांच्या जलसंपदा मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत धरणाची उंची १०० मीटर ठेवण्यावर एकमत झाले असून या धरणामुळे पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार नाही की वन विभागाची जामीन बाधित होत नाही, असा दावा मंत्री महाजन यांनी केला आहे.
=================================================
मद्यनिर्मितीसाठी २०० कोटी लिटर पाण्याचा वापर
- संजय देशपांडे, औरंगाबादमद्य व बीअरनिर्मिती करणाऱ्या दहा कारखान्यांनी २०१५-१६ आर्थिक वर्षात तब्बल २०० कोटी लिटर पाणी वापरल्याचे स्पष्ट झाल. बीअरच्या सहा कारखान्यांनी ३१ कोटी ७ लाख १,७८१ लिटर, तर विदेशी मद्य तयार करणाऱ्या चार कारखान्यांनी ७ कोटी ६३ लाख १६,६१९ लिटर उत्पादन घेतले. २०१४-१५ वर्षाच्या तुलनेत बीअरनिर्मितीत तीन टक्के, तर विदेशी मद्यनिर्मितीत नऊ टक्के वाढ झाली.औरंगाबादेतील बीअर व मद्यनिर्मिती उद्योगांना अवघ्या १६ रुपयांत एक हजार लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) या क्षेत्रातील १२ उद्योगांना दररोज ४० लाख लिटर पाणी पुरवले जात होते. ‘लोकमत’ने ७ व ८ एप्रिलच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करून याकडे लक्ष वेधले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल झालेल्या. मद्यनिर्मिती कंपन्यांच्या पाण्यात ६० टक्के, तर इतर उद्योगांच्या पाण्यात २५ टक्के कपात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परिणामी उत्पादन ६० टक्क्यांनी घटले आहे. अशी झाली वाढ२०१४-१५ यावर्षी ६ कोटी ९९ लाख ६८,३४० लिटर विदेशी मद्य तयार झाले.२०१५-१६ मध्ये ७ कोटी ७३ लाख १६,६१६ लिटर मद्य तयार झाले. उत्पादनात ९ टक्के वाढ झाली.२०१४-१५ यावर्षी ३० कोटी १६ लाख ५२,१५७ लिटर बीअर तयार झाली.२०१५-१६ यावर्षी ३१ कोटी ७ लाख १,७८१ लिटरची निर्मिती झाली. उत्पादनातील वाढ ३ टक्के आहे.२०१४-१५ यावर्षात राज्य सरकारला ३,१५५ कोटी रुपयांचा, तर २०१५-१६ यावर्षी ३,५४८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
=================================================
२०० पोलिसांचा अवयवदानाचा संकल्प
- मुंबई : आॅन ड्युटी २४ तास देशसेवेत कार्यरत असणाऱ्या पोलिसांनी मृत्यूनंतरही जनतेची सेवा घडावी म्हणून अवयवदानाचा संकल्प केला आहे. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या उपस्थितीत परिमंडळ ७मधील तब्बल २०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला.पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी शुक्रवारी घाटकोपर पोलीस ठाण्यास भेट दिली. या वेळी पोलीस ठाण्यातील अंमलदारांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्याचबरोबर पडसलगीकर यांनी थेट जनतेशी संवाद साधला. घाटकोपर परीसरातील सर्व क्षेत्रातील मंडळींनी या वेळी आवर्जून हजेरी लावली होती.पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड आणि घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक व्यंकटेश पाटील यांच्या संकल्पनेतून अधिकारी वर्गाने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. मृत्यूनंतरही जनतेच्या सेवेसाठी कामी यावे म्हणून अवयवदानाचा संकल्प केला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.पडसलगीकर यांच्या उपस्थितीत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, पार्क साईट आणि घाटकोपर पोलीस ठाण्यातील तब्बल २०० अधिकाऱ्यांनी अवयवदान करण्यासाठीचे अर्ज भरले आहेत. हे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी सायन रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
=================================================
पुणे-मुंबई मार्गावर प्रथमच ग्रीन कॉरिडोर
- मुंबई : हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी होऊ लागल्यानंतर प्रथमच पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस-वे’वरून हृदय अवघ्या १ तास ३५ मिनिटांत मुंबईत आणण्यात यश मिळाले आहे. गुरुवारी मध्यरात्री पहिल्यांदाच पुणे ते मुंबई मार्गावर ग्रीन कॉरिडोर करण्यात आला. त्यामुळे १४ वर्षीय मुलाला जीवनदान मिळाले आहे.२८ वर्षीय मुलाचा अपघात झाल्यामुळे पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. अपघातात या मुलाच्या डोक्याला जबर मार बसला होता. या मुलाला गुरुवारी ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी हृदय, दोन मूत्रपिंड आणि यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. या मुलामुळे चार जणांना जीवनदान मिळाले. मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात गेली चार महिने प्रतीक्षा यादीत असलेल्या १४ वर्षीय मुलाला त्यामुळे हृदय मिळाले. मुंबईतील ही १७वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होती.बोरीवली येथे राहणाऱ्या १४ वर्षीय मुलाला कार्डिओ मायोपॅथी या हृदयाच्या आजाराने ग्रासले होते. हृदय प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. गेल्या चार महिन्यांपासून हा मुलगा हृदयाच्या प्रतीक्षेत होता.
=================================================
‘नीट’संदर्भात ‘मार्ड’चे पंतप्रधानांना पत्र
- मुंंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील चार लाख विद्यार्थ्यांचे स्वप्न नीटमुळे भंगणार का, असा संभ्रम निर्माण झाला आहे. एमएचसीईटी देऊनसुद्धा विद्यार्थ्यांना नीट द्यावी लागणार असल्यामुळे विद्यार्थी, पालक तणावाखाली आहेत. महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) विद्यार्थ्यांची व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांना पत्र लिहिले आहे.नीट ही परीक्षा देशातील अनेक शिक्षण मंडळांच्या बारावीच्या समान अभ्यासक्रमांवर घेण्याची मागणी मार्डने केली आहे. यासाठी एका समितीची स्थापना करावी, असे आवाहनही मार्डने केले आहे. नीट ही सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. त्यामुळे या परीक्षेचा मोठा फटका राज्यातील विद्यार्थ्यांना बसणार आहे. अवघ्या तीन महिन्यांत सीबीएसीईचा अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थ्यांसाठी मोठे आवाहन आहे. राज्य सरकारही यासाठी प्रयत्न करीत आहे. नीट ही सीबीएसईच्या अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असते.राज्यात सीईटी दिलेल्या बहुतांश विद्यार्थी नीट २ च्या परीक्षेलाही बसणार आहेत. तरीही त्यांचे कमी नुकसान व्हावे म्हणून बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा घ्यावी, अशी मागणी पत्राद्वारे केली असल्याचे मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.
=================================================
मोकळ्या श्वासाचा खर्च ५० लाख कोटी
- मुंबई : ना विकास क्षेत्रांतील तीन हजार हेक्टर जागा विकासासाठी खुली केल्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांच्या भुवया उंचाविल्या आहेत़ मात्र दाटीवाटीने उभ्या व गजबलेल्या मुंबईचा श्वास मोकळा करण्यासाठी ५० लाख कोटी रुपये खर्च येणार आहे़ हा खर्च आवाक्याबाहेर असल्याने भूखंडांवरील आरक्षणात सूट देण्याचे धोरण पालिका प्रशासनाने अवलंबिले असल्याचे आयुक्त अजय मेहता यांनी आज स्पष्ट केले़मुंबईत पाच हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रफळ मोकळ्या जागा म्हणून आरक्षित आहेत़ यापैकी २५ टक्क्यांहून कमी जागा पालिकेच्या ताब्यात आहे़ उर्वरित भूखंड खाजगी मालकांकडून खरेदी करून त्यावर मैदाने व उद्याने तयार करण्यासाठी सुमारे ५० लाख कोटी रुपये खर्च येणार आहे़ एवढा पैसा उभा करणे अशक्य असल्याने आरक्षित भूखंडांतील काही भाग मोकळा होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय पालिकेने घेतला असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे़ मात्र ना विकास क्षेत्र व इतर भाग असे सुमारे तीन हजार हेक्टरचा विकास होत असताना यातून पाणथळाची जागा, नैसर्गिक वने, खारफुटी, सागरी नियंत्रण क्षेत्र एक या क्षेत्रात येणाऱ्या भूखंडांवर विकास होणार नाही़ अशी सुमारे दहा हजार ३५१ हेक्टर जागा नैसर्गिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली आहे़ यावर भविष्यातही कोणत्याप्रकारचा विकास केला जाणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे़ (
=================================================
मोदी सरकारला राज्यसभेमध्ये बहुमत मिळणे अवघड
- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीसत्ताधारी मोदी सरकारसाठी राज्यसभा हा सतत डोकेदुखीचा विषय ठरला आहे. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत सध्या एनडीएचे ६२ सदस्य आहेत. राष्ट्रपतींनी नुकत्याच नामनियुक्त केलेल्या ७ सदस्यांची बेरीज त्यात मिळवली तर ही संख्या ६९ होते. काँग्रेसचे राज्यसभेत ६१ खासदार आहेत. त्यात युपीएच्या घटक पक्षांची सदस्य संख्या मिळवली तर प्रमुख विरोधी आघाडीची सदस्य संख्या ८0 वर पोहोचते. याखेरीज तृणमूल, अद्रमुक, बीजेडी, समाजवादी आणि बसप या अन्य विरोधकांची संख्या त्यात मिळवल्यास ही सदस्य संख्या थेट ९0 चा आकडा पार करते.येत्या जून जुलै महिन्यात राज्यसभेचे ५७ सदस्य निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी नव्या सदस्यांची निवडणूक ११ जून रोजी आहे. या निवडणुकीनंतर राज्यसभेचे चित्र नेमके कसे दिसेल? त्याचा वेध घेतल्यास भाजपाच्या काही जागा जरूर वाढतील मात्र राज्यसभेत विधेयके मंजूर करण्याइतके हे संख्याबळ २0१८ पर्यंत नसेल. सरकारमधले ५ मंत्री व्यंकय्या नायडू, पियुष गोयल, निर्मला सितारामन, वाय.एस. चौधरी व मुख्तार अब्बास नकवींची मुदतही जूनमध्ये समाप्त होत असली तरी या सर्वांचे पुन्हा निवडून येणे निश्चित आहे.
=================================================
कन्हैया कुमारवरील शिस्तभंग कारवाईला स्थगिती
- नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालीद, अनिर्बान भट्टाचार्य आणि अन्य काही जणांवर विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईला शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या सर्वांना न्यायालयाने दिलेला हा मोठाच दिलासा आहे.तत्पूर्वी, न्यायालयाने बेमुदत उपोषणावर बसलेल्या या विद्यार्थ्यांना आपले आंदोलन तात्काळ मागे घेण्याचे आवाहन केले होते. न्यायालयाने या विद्यार्थ्यांविरुद्धच्या कारवाईला सशर्त स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ते विद्यापीठात चालू केलेले बेमुदत उपोषण त्वरित थांबवतील आणि भविष्यात विद्यापीठ परिसरात कोणतेही आंदोलन करणार नाहीत. कन्हैया कुमार आणि या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावरील शिस्तभंगाच्या कारवाईला दिल्ली उच्य न्यायालयात आव्हान दिले होते.या विद्यार्थ्यांनीही विद्यापीठाच्या अपिलीय प्राधिकरणाकडे कारवाईविरुद्ध दाद मागितली आहे. त्यावर या प्राधिकरणाने निर्णय घेईपर्यंत त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर विद्यार्थ्यांनी एक शपथपत्र दाखल करून आपण बेमुदत उपोषण मागे घेत आहोत आणि भविष्यात विद्यापीठ परिसरात आंदोलन करणार नाही, असे लेखी आश्वासन दिले.
=================================================
जगातील वयोवृद्ध व्यक्तीचे निधन
- न्यूयॉर्क : जगातील सगळ्यात वयोवृद्ध महिला सुसना मुशात्त जोन्स (११६) यांचे येथे निधन झाले. जेरोन्टोलॉजी रिसर्च ग्रुपने ही माहिती दिली. जोन्स यांचा जन्म दक्षिण अमेरिकेतील अलाबामात १८९९ मध्ये झाला. तिचे वडील खंडकरी शेतकरी होते. पदवी शिक्षण घेतल्यावर सुसनाह जोन्स १९२२ मध्ये न्यूजर्सीत व तेथून न्यूयॉर्कला राहायला गेल्या. तेथे त्यांनी मुलांना सांभाळण्याचे काम केले, असे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसने म्हटले.
=================================================
अमेरिका-पाक संबंध घसरणीला
- इस्लामाबाद : पाकिस्तानला आठ एफ-१६ विमानांची विक्री काँग्रेसने रोखल्यानंतर निर्माण झालेल्या वादाने पाक-अमेरिका यांच्या संबंधावर परिणाम झाला आहे. विदेशविषयक बाबींचे पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजीज यांनी हे वक्तव्य केले आहे.अजीज यांनी उभय देशांतील संबंधात ‘घसरण’ झाल्याचे सिनेटसमोर कबूल केले. ते म्हणाले की, अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या तीन महिन्यांपासून दडपणाखाली असून, संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाकला एफ-१६ विमाने सवलतीत हवी आहेत. पण या विमानांवरील प्रस्तावित सबसिडी परत घेण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानला पूर्ण किंमत देऊनच ती विमाने खरेदी करावी लागतील.अजीज यांनी तीन वेळा ‘भारतीय फॅक्टर’चा उल्लेख केला. ते म्हणाले की, ही विमाने पाकला मिळू नयेत, म्हणून भारतीय लॉबी प्रयत्न करीत आहे. पण आम्ही भारतीय आक्षेप ठोसपणे फेटाळून लावले आहेत. पठाणकोट हवाई तळावर झालेल्या हल्ल्याचा वापर पाकच्या विरोधात भारत करीत आहे. अमेरिकेतील भारतीय लॉबी अतिशय आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहे.
=================================================
जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचं 116व्या वर्षी निधन
- ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क, दि. 13- जगातली सर्वात वयोवृद्ध महिला सुशन्ना मुशत्ता जोन्स यांचं 116व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदही झाली आहे. ब्रुकलीनमध्ये वयोवृद्धांना राहण्यासाठी केलेल्या वृद्धाश्रमातच 12 मेच्या रात्री जोन्स यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या 10 दिवसांपासून जोन्स आजारी होत्या, अशी माहिती वार्धक्य शास्त्राच्या रिसर्च ग्रुपचे रॉबर्ट यंग यांनी दिली.अल्बामातल्या मेंटागोमेरीमधल्या छोट्याश्या खेडेगावात 1899 साली जोन्स यांचा जन्म झाला. 11 भावंडांमध्ये त्या एक होत्या. 1922साली त्यांनी पदवी संपादन केली. त्यानंतर त्या कुटुंबीयांना शेतीच्या कामात मदत करू लागल्या. काही वर्षांनंतर त्यांनी ते काम करणं सोडून दिलं आणि न्यूयॉर्कला निघून गेल्या. जोन्स यांना कोणतंही अपत्य नव्हतं. त्यांचं लग्नही काही काळापुरतंच मर्यादित राहिलं. त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही नेहमीच प्रेम आणि उदारता दिली. त्या नेहमीच शेती फुलवण्यासाठी स्वतःच्या काकीला शेतात मदत करत होत्या. शेतातलीच ताजी फळं आणि भाज्या त्या खात होत्या. त्यामुळेच त्यांची प्रकृती उत्तम होती.जोन्स या अमेरिकेतल्या 1800 सालानंतरच्या सर्वात वयोवृद्ध महिला आहेत. त्यांचा वयाची नोंद सर्वाधिक जगणा-या लोकांमध्ये झाली आहे. इटलीतल्या एम्मा मोरॅनो याही 116 वर्षं जगल्या होत्या. मात्र जोन्सपेक्षा काही महिन्यांनी त्या तरुण होत्या. मात्र त्या अधिकृत जगातल्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती नाहीत.
=================================================
खासगी बँकांमध्ये विदेशी हिस्सेदारी वाढविली!
- मुंबई : रिझर्व्ह बँकेने बेसल-३ नियमांच्या अनुरूप व्यावसायिक बँकांच्या वाढत्या भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी खासगी बँकांत विदेशी बँकांच्या हिस्सेदारीची मर्यादा वाढवून ७४ टक्क्यांपर्यंत केली आहे.रिझर्व्ह बँकेने गुरुवारी रात्री याबाबत दिशानिर्देश जारी केले. त्यातच खासगी बँकांत विदेशी बँकांच्या हिस्सेदारीची मर्यादा निश्चित केली. त्यानुसार सध्याच्या विदेशी गुंतवणुकीच्या धोरणानुसार खासगी बँकांत विदेशी बँका ७४ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. मात्र त्यात २६ टक्के हिस्सेदारी अनिवासी भारतीयांकडे असली पाहिजे ही अट आहे. विदेशी बँका इक्विटी शेअरच्या जास्तीतजास्त १० टक्क्यांपर्यंत अधिग्रहण करू शकतात. विशिष्ट परिस्थितीत ही मर्यादा वाढविली जाऊ शकते. खासगी बँकांत व्यक्तिगत हिस्सेदारीची मर्यादा १० टक्के, गैर वित्तीय संस्थांची १० टक्के, गैर नियमित व असूचीबद्ध वित्तीय संस्थांची १५ टक्के आणि नियमित व सूचीबद्ध संस्थांची हिस्सेदारी ४० टक्क्यांपर्यंत होऊ शकते. विशेष अनुमतीतहत निवडक बँकांसाठी यापूर्वी वाढविण्यात आलेल्या मर्यादेवर या नवीन दिशा-निर्देशाचा काहीही परिणाम होणार नाही, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
=================================================
पुणे विमानतळ जागेची योग्य वेळी घोषणा
- पुणे : पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रश्नाबाबत आम्ही बरेच पुढे गेलो आहोत. जागा जाहीर केल्यानंतर काय गोंधळ सुरु होतो हे माहिती आहे, म्हणून जागेबाबत योग्य वेळी घोषणा करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानतळ जिल्ह्यात कोठेही करा, पण लवकर करा, अशी विनंती मुख्यमंत्र्याकडे केली.पुणे जिल्ह्यात येऊ घातलेल्या फॉक्सकॉनसारख्या परदेशी कंपन्यांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज वाढली होती. त्यात दोन महिन्यांपूर्वी मुबंई येथे झालेल्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात सर्वच उद्योजकांनी पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळासाठीची जागा निश्चित झाली असून, याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाला जिल्ह्यातील कोये-पाईट, शिरोली-चांदूस, जेजुरी आणि चौफुला या चार जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आले होते. सर्व बाबीची तांत्रिक तपासणी एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडिया आणि हवाई दलाच्या उच्चपदस्थांनी पाहणी करून तांत्रिक अहवाल सादर केला आहे.
=================================================
गोव्यातल्या विजय माल्यांचा बंगला बँकांनी घेतला ताब्यात
- ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 13 - विजय माल्या यांचा गोव्यातल्या कंडोलिम इथलाकिंगफिशर व्हिला कर्ज दिलेल्या बँकांच्या वतीने एसबीआय कॅपिटलने ताब्यात घेतला आहे. बुधवारी उत्तर गोव्याचे तहसीलदार व जिल्हा न्यायाधीश नीला मोहनन यांनी किंगफिशर व्हिला ताब्यात घेण्याची बँकांना अनुमती दिली होती.या आलिशान बंगल्याची किंमत 90 कोटी रुपये असून गोव्यामध्ये बड्या सेलिब्रिटींना पार्ट्या देण्यासाठी या बंगल्याचा वापर माल्या करत असत. एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी दुपारी व्हिला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. अधिकाऱ्यांनी बंगल्यातल्या सगळ्या सामानाची नोंद केली आहे, यामध्ये गाड्या, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आदींचा समावेश आहे.बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवलेल्या माल्यांच्या या बंगल्याचा ताबा मिळावा अशी मागणी बँकांच्या समूहाच्या वतीने स्टेट बँकेने केली होती.
=================================================

No comments:
Post a Comment