Friday, 13 May 2016

नमस्कार लाईव्ह १०-०५-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- वॉशिंग्टन; मुलांना जिहादची शिकवण देण्यासाठी इसिसचं अॅप 
२- इस्लामाबाद; लव्ह मॅरेजला पाठिंबा दिला म्हणून पाकिस्तानात पत्रकाराची हत्या 
३- दिलीमा रौसेफ यांची दशकभरापासूनची ब्राझीलमधील राजवट संपुष्टात 
४- बीजिंग; कर्मचा-यांच्या विश्रांतासाठी बॉसने ऑफिसमध्येच लावले बेड्स 
५- आज अनुभवा बिनसावलीचा दिवस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- मालेगाव स्फोट: NIA कडून साध्वी प्रज्ञा सिंहला क्लीन चिट 
७- दाभोलकर-पानसरे हत्या: बंदुकीच्या गोळ्यांचा तपास स्कॉटलंड यार्डाकडे 
८- प्रवाशाशी असंवेदनशील वर्तन, स्पाईसजेटला दहा लाखांचा दंड 
९- जगातील सर्वात मोठे कार्गो विमान भारतात दाखल 
१०- मल्ल्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) बजावण्याची विनंती केली  
११- रावत यांनी ४६ दिवसांनंतर घेतली मंत्रिमंडळाची बैठक 
१२- अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे वास्तव्य पाकिस्तानात! 
१३- ...तर भयंकर गुन्ह्यात अल्पवयीनही ठरणार प्रौढ! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- लातूरला पाणी पोहचविण्याचे रेल्वेचे बिल झाले चार कोटी 
१५- ‘जलदूत’चं बिल दुष्काळ निधीतून भागव : मुख्यमंत्री 
१५- विधान परिषदेच्या 10 जागांसाठी चुरस, निवडणूक वेळापत्रक जाहीर 
१६- मुंबईत पुन्हा छमछम, मुंबई पोलिसांकडून 3 डान्सबारना परवानगी 
१७- मुबारक बेगम यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार
१८- पनवेल लवकरच महानगरपालिका 
१९- कालव्यांऐवजी पाइपलाइनने पाणी 
२०- परिचारिका होणार ‘स्मार्ट’ 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२१- शिरत; अंत्यसंस्कारांऐवजी गोव्याला जाऊन एक-एक पेग मारा... - आत्महत्या केलेली तरुणी 
२२- ग्रेटर नॉएडामध्ये सचिनचा नवा फ्लॅट, किंमत फक्त १.६८ कोटी 
२३- चेन्नईत फिरता पाळणा कोसळून अपघात, एकाचा मृत्यू 
२४- पिंपरी; नागराज मंजुळे यांची पत्नी करतेय धुणी-भांडी करून उदरनिर्वाह...
२५- पटना; 'केंद्रामुळेच 'त्या' आमदारपुत्राकडे बंदुकीचा परवाना'
२६- कोलकाता; म्हैस चोरल्याच्या संशयावरून युवकाची हत्या
२७- वृद्धाचा शिर्डी ते नागपूर सायकलने प्रवास 
२८- 'हैदराबाद विद्यापीठ: आंदोलनाला कॉंग्रेसचा निधी' 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२९- आपल्याकडे जगणं नाही, पण सिनेमे गांभीर्यानं घेतात: नागराज मंजुळे 
३०- सिनेमात किसिंग सीन करणार नाही, सनी लिऑनची करारात अट 
३१- सलील अंकोल- संदीप पाटील बनणार व्याही... 
३२- संवाद हरविल्याने तणावात होतेय वाढ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३३- शाळेच्या पहिल्याच दिवसी होणार पाठ्यपुस्तक वाटप, ८२ हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके 
३४- मुखेड; शेत्ताल्याचे रेकोर्ड गायब; पाणलोट, मनरेगाअंतर्गत झालेल्या कामांची चौकशी 
३५- कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार द्यावे - लाल बावटाची मागणी 
३६- निनाद फाऊंडेशनच्या वतीने आज बी.के.हॉलजवळ रक्तदान शिबीर 
३७- केंद्र शासने दाखल घेतल्यास 'नीट' रद्द होऊ शकते - प्रा. चौगुले 
३८- पिग्मी एजंटला खंजरने मारहाण करून लुटले, चार आरोपीविरुद्ध गुन्हा 
३९- एसबीएच बँकेच्या एटीएममध्ये ५ लाखाची अफरातफर 
४०- पार्डी येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चातून केले नदी खोलीकरण व सरळीकरण 
४१- लातूरला उजनीच्या पाण्य्साठी ७०० कोटी द्या - खा. गायकवाड 
४२- दुष्काळ पाहणीसाठी राणे आजपासून लातूर जिल्हा दौऱ्यावर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दु:ख सहन करायला काय हरकत आहे
(पंकज सोनटक्के, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
जीवन कापसे, सुजाण उत्थाशिनी, श्रीकांत बारते, संतुलाल गुप्ता, सतीश नक्कावर, प्रनील कचावर, यशवंत जम्भृन्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

पनवेल लवकरच महानगरपालिका

पनवेल लवकरच महानगरपालिका
पनवेल पनवेल महानगरपालिका स्थापन करण्यासाठी नगरविकास विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली असून, शुक्रवारपर्यंत महापालिकेची अधिसूचनाही विधी व न्याय खात्यामार्फत काढण्यात येणार आहे.

पनवेल महापालिकेत 68 गावांचा समावेश

पनवेलसह लगतच्या 68 गावांचा समावेश करून नवीन महापालिका स्थापन करण्यात यावी, असा प्रस्ताव एमएमआरडीएने राज्य सरकारला पाठवला होता. कोकण विभागीय आयुक्तांनी ही महापालिका स्थापन करण्यास हिरवा कंदील दाखविला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याने महापालिका स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील 27 वी महापालिका

पनवेल नगरपालिकेसह लगतच्या 68 गावांचा महानगरपालिकेत समावेश असणार आहे. पनवेल महापालिका राज्यातील 27 वी महापालिका असेल. तर मुंबई महानगर प्रदेशामधील ही नववी महापालिका ठरणार आहे.


++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

‘जलदूत’चं बिल दुष्काळ निधीतून भागव : मुख्यमंत्री

‘जलदूत’चं बिल दुष्काळ निधीतून भागव : मुख्यमंत्री
लातूर मिरजेहून लातूरला रेल्वेने पुरवण्यात आलेल्या पाण्याचं 4 कोटी रुपयांचं बील रेल्वेने पाठवल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचं स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाने दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर रेल्वेने याविषयीची स्पष्टीकरण दिलं.

‘जलदूत’ने लातूरला पाणी दिल्याचं 4 कोटींचं बिल लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालं आहे. त्यामुळे या बिलाची रक्कम नेमकी कोणी द्यायची यावरुन संभ्रम होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे बिल राज्याला मिळालेल्या दुष्काळनिधीतून दिलं जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

‘जलदूत’चं बिल राज्याला पाठवल्याच्या बातम्यानंतर रेल्वे मंत्रालयावर टीका सुरु झाली होती. मात्र, रेल्वेने ट्वीटच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिले आहे.

रेल्वेकडून जलदूत एक्स्प्रेसच्या खर्चाचा भार उचलला जाणार होता. मात्र, राज्य सरकारने विनंतीवरुनच जलदूत एक्स्प्रेसचा खर्च निम्मा-निम्मा भागवणार असल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मालेगाव स्फोट: NIA कडून साध्वी प्रज्ञा सिंहला क्लीन चिट

मालेगाव स्फोट: NIA कडून साध्वी प्रज्ञा सिंहला क्लीन चिट?
मुंबई मालेगाव स्फोटांचा तपास करणारी एनआयए तपास यंत्रणा आज मुंबईच्या कोर्टात आरोपपत्र दाखल करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपपत्रात साध्वी प्रज्ञा सिंह आणि कर्नल श्रीकांत पुरोहित यांना क्लीन चिट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंहच्या सुटकेची शक्यता आता निर्माण झाली आहे.

याचसोबत सुरुवातीला या प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या तपासावर एनआयएने प्रश्न उभे केल्याचं समजतं आहे. तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी या प्रकरणात केलेला तपासही चुकीच्या पद्धतीने केला असल्याचं या आरोपपत्रात म्हणण्यात आल्याचं समजतं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसने कर्नल पुरोहीत यांच्या देवळाली इथल्या घरात बॉम्ब ठेऊन त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचं एनआयएने आरोपपत्रात म्हटलं आहे.

याचसोबत या खटल्यातील आरोपींवरचा मोक्का हटवण्याच्या विचारातही एनआयए आहे. त्यामुळे अवघ्या काही वर्षात एनआयएने घेतलेल्या यू-टर्नवर सर्वत्र आश्चर्य व्यक्त केला जातो आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

दाभोलकर-पानसरे हत्या: बंदुकीच्या गोळ्यांचा तपास स्कॉटलंड यार्डाकडे

दाभोलकर-पानसरे हत्या: बंदुकीच्या गोळ्यांचा तपास स्कॉटलंड यार्डाकडे
मुंबई डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडात वापरण्यात आलेल्या बुलेट्स आणि इतर पुरावे सीबीआयने स्कॉटलंड यार्डला तपासासाठी पाठवले आहेत. या दोन्ही हत्या प्रकरणातील समान धाग्यावर सेकंड ओपिनीयन घेण्यासाठी सीबीआयचं पाऊल उचललं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिनीनुसार डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरेंच्या हत्येत एकाच प्रकारचं शस्त्र वापरण्यात आलं होतं का याचा तपास करण्यासाठी सीबीआय सेकंड ओपीनियन म्हणून हे पुरावे अधिक तपासासाठी स्कॉटलंड यार्डला पाठवण्यात आले आहेत.

याआधी मुंबईतल्या फॉरेन्सिक लायब्ररीने या हत्या प्रकरणात एकाच प्रकराचं शस्त्र वापरण्यात आलं होतं असं स्पष्ट केलं होतं. पण ही बाब अधिक स्पष्ट होण्यासाठी हे पुरावे पुढच्या तपासासाठी स्कॉटलंड यार्डला पाठवण्याचा निर्णय सीबीआयने घेतला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी चुरस, निवडणूक वेळापत्रक जाहीर

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी चुरस, निवडणूक वेळापत्रक जाहीर
मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालं असून, येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी विधान परिषदेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

राज्यातील 10 विधानपरिषदेच्या जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगानं गुरुवारी या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या 10 जागांसाठी 31 मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत, तर 10 जूनला या जागांसाठी मतदान होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार रामराजे निंबाळकर, धनंजय मुंडे आणि प्रकाश बिनसाळे तर काँग्रेसच्या दिप्ती चौधरी आणि मुझफ्फर हुसैन, भाजपच्या शोभाताई फडणवीस आणि विनायक मेटे तर शिवसेनेचे सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांचा कार्यकाळ येत्या 7 जुलैला संपणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

आपल्याकडे जगणं नाही, पण सिनेमे गांभीर्यानं घेतात: नागराज मंजुळे

आपल्याकडे जगणं नाही, पण सिनेमे गांभीर्यानं घेतात: नागराज मंजुळे
मुंबई: ‘मी आयुष्य अनुभवतो, आयुष्याच्या कंबरेत हात घालून नाचतो. माझा कुठल्याही जातीला विरोध नाही, मात्र जातीवाद्यांना कायम विरोध आहे.’ असं परखड मत सैराट सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘माझा कट्ट्या’वर व्यक्त केलं. नागराज मंजुळेंसह आकाश आणि रिंकू (परशा-आर्ची), अरबाज आणि तानाजी (सल्या-लंगड्या) यांनी देखील कट्ट्यावर मनमोकळ्या गप्पा मारत आपली मतं व्यक्त केली.

‘सैराट सिनेमा लोकांना आवडणार, हे पहिल्या दिवसापासून माहित होतं. भारतीय लोक जगणं गांभीर्याने घेत नाही, मात्र सिनेमे गांभीर्याने घेतात.’ असं म्हणतं दिग्दर्शक नागराज यांनी प्रेक्षकांचेही कान टोचले.

नागराज मंजुळे यांनी कट्ट्यावर आपली परखड मतं व्यक्त केली. ‘बाईला दुय्यम लेखण्यासाठी या व्यवस्थेच अनेक चिन्हं आहेत. मी सिनेमा तयार केला आहे. तो चांगला की वाईट हे प्रेक्षक ठरवतील. या सिनेमाबाबत काय चर्चा सुरु आहे याचा मी विचार करीत नाही.’  असंही मंजुळे म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

अंत्यसंस्कारांऐवजी गोव्याला जाऊन एक-एक पेग मारा...

'अंत्यसंस्कारांऐवजी गोव्याला जाऊन एक-एक पेग मारा...'
फोटो : दैनिक भास्कर
सुरत : गुजरातच्या सुरतमधल्या ऊघाना परिसरात एका तरुणीने बिल्डिंगमधून उडी मारुन आत्महत्या केली आहे. वात्सल्य अपार्टमेंटच्या 11 व्या मजल्यावरुन उडी मारुन दिव्या बोरखतरियाने आयुष्य संपवलं. प्रेमप्रकरणाबाबत पालक नाखुश असल्यामुळे तिने टोकाचं पाऊल उचलल्याचं वृत्त आहे.

दिव्याच्या स्कूटीच्या डिकीतून सुसाईड नोट ताब्यात घेण्यात आली आहे. आई-वडिलांच्या नावे लिहिलेल्या या सुसाईड नोटमध्ये अंत्यसंस्कारांवर खर्च न करता गोव्यात जाऊन एक-एक पेग मारा असा उल्लेख आहे.

काय लिहिलंय सुसाईड नोटमध्ये?

माझं पालनपोषण केल्याबद्दल आभार. तुम्ही माझ्यासमोर दोन पर्याय ठेवले होते. लग्नासाठी दोन वर्ष वाट बघ किंवा ब्रेकअप कर. मी दोन वर्ष वाट पाहू शकत नव्हते. त्यामुळे माझ्याकडे एकच पर्याय उरला. जेव्हा तुम्ही ही चिठ्ठी वाचत असाल, तेव्हा मी निवडलेल्या पर्यायाविषयी तुम्हाला समजलं असेलच.

आई, तुझे रोजचे टोमणे ऐकून मी वैतागले होते. माझ्यात आणखी हिंमत उरलेली नाही. जिगर (भाऊ) मम्मी-पप्पांची काळजी घे, त्यांना आनंदात ठेव. मोठं होऊन त्यांचं नाव उज्ज्वल कर. लव्ह यू मम्मी, पप्पा, भाऊ आणि आजोबा.
20 वर्षीय दिव्या एसवायबीकॉमची विद्यार्थिनी होती. कॉलेजसोबतच ती ब्यूटी पार्लर आणि कोचिंग क्लासेसही चालवत होती. सहा महिन्यांपूर्वी ती एका ऑफिसमध्ये डाटा एन्ट्रीचं काम करत असे. तिथल्या एका तरुणासोबत तिचं प्रेम जुळलं. मात्र याची कुणकुण ऑफिसमध्ये लागताच दोघांनाही कामावरुन काढून टाकण्यात आलं.

दिव्याला त्या तरुणासोबत लग्न करायचं होतं. तिच्या वडिलांनी तिला परवानगी दिली, मात्र तिच्यापुढे दोन अटी ठेवल्या. शिक्षण पूर्ण करुन लग्नासाठी दोन वर्ष वाट बघ किंवा ब्रेकअप कर. मात्र राग डोक्यात घालून तिने शनिवारी वात्सल्य सोसायटी गाठली. स्कूटी पार्क करुन लिफ्टने 11 व्या मजल्यावर गेली आणि उडी मारुन आयुष्य संपवलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

प्रवाशाशी असंवेदनशील वर्तन, स्पाईसजेटला दहा लाखांचा दंड

प्रवाशाशी असंवेदनशील वर्तन, स्पाईसजेटला दहा लाखांचा दंड
मुंबई : सेरिब्रल पाल्सी झालेल्या प्रवाशाला विमानातून खाली उतरवल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्पाईसजेट विमान कंपनीला दणका दिला आहे. पीडितेला 10 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

19 फेब्रुवारी 2012 रोजी जिजा घोष या स्पाईसजेटच्या विमानाने कोलकात्याहून गोव्याला निघाल्या होत्या. तेव्हा त्यांना जबरदस्तीनं विमानातून उतरवण्यात आलं. याप्रकरणाची न्यायालयाने गांभीर्याने दखल घेत स्पाईसजेटची चांगलीच कानउघडणी केली. ही संवेदनशून्यता असल्याचं सांगत कोर्टाने स्पाईसजेटला झापलं.

जिजा यांना चांगली वागणूक मिळाली नाही, त्यांच्यासोबत भेदभाव करण्यात आला, असा ठपका स्पाईसजेटवर ठेवला. तसेच 10 लाख रुपये जिजा यांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

ग्रेटर नॉएडामध्ये सचिनचा नवा फ्लॅट, किंमत फक्त...

ग्रेटर नॉएडामध्ये सचिनचा नवा फ्लॅट, किंमत फक्त...
नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं शेजारी व्हावं अशी इच्छा भारतातच नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांची असेल. सध्या नॉयडामधील काही रहिवाशांना हे भाग्य लाभणार आहे. ग्रेटर नॉयडा नॅशनल कॅपिटल रिजन (एनसीआर) मध्ये नवीन फ्लॅट विकत घेतला आहे.

सचिनने खरेदी केलेल्या या फ्लॅटची किंमत 1.68 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. क्रेसेंट क्रॉस लक्झरी अपार्टमेंटच्या अकराव्या मजल्यावर आहे. सचिनची पत्नी अंजली यांनी स्टॅम्प ड्युटीची 8.40 लाखांची रक्कम भरली.

जेपी ग्रीन्स या शहरातील सर्वात मोठ्या टाऊनशीपचा क्रेसेंट कोर्ट हा एक भाग आहे. ही टाऊनशीप 452 एकरांवर पसरलेली आहे. यामध्ये 230 फ्लॅट्सचा समावेश आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

चेन्नईत फिरता पाळणा कोसळून अपघात, एकाचा मृत्यू

चेन्नईत फिरता पाळणा कोसळून अपघात, एकाचा मृत्यू
चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये किश्किंता थीम पार्कमध्ये भीषण अपघात झाला आहे. फिरता पाळणा अचानक कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला आहे, तर सात जण जखमी आहेत.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव मणीकंदन असून तो 20 वर्षांचा होता. तर जखमी झालेले सातही जण या पार्कचेच कर्मचारी आहेत. जॉय राईडची चाचणी करत असतानाच हा अपघात घडल्याची माहिती आहे.

पाळणा अंगावर पडल्यामुळे त्याखाली दबून कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान स्थानिक प्रशासनानं या संपूर्ण घटनेची चौकशी सुरु केली आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मुंबईत पुन्हा छमछम, मुंबई पोलिसांकडून 3 डान्सबारना परवानगी

मुंबईत पुन्हा छमछम, मुंबई पोलिसांकडून 3 डान्सबारना परवानगी
मुंबई: मुंबईत पुन्हा एकदा छमछम सुरु होणार आहे. कारण मुंबई पोलिसांकडून 3 डान्सबारना परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळं मुंबईत पुन्हा एकदा डान्सबार सुरु होणार असल्याचं जवळजवळ निश्चित आहे.

राज्य सरकारच्या जाचक अटींविरोधात आणि डान्सबारचे पुन्हा परवाने मिळावे यासाठी डान्स बार मालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला 8 डान्सबारना परवाने देण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार इंडियाना, साईप्रसाद आणि एरो पंजाब या डान्सबारना मुंबई पोलिसांकडून परवाने देण्यात आले आहेत. उर्वरित 5 डान्सबारना परवान्याची रक्कम जमा करताच, डान्स बार सुरु करण्याचा परवाना देण्यात येणार आहे. डान्स बारसंदर्भात राज्य सरकारनं एकूण 27 नियम तयार केले आहेत.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

सिनेमात किसिंग सीन करणार नाही, सनी लिऑनची करारात अट

सिनेमात किसिंग सीन करणार नाही, सनी लिऑनची करारात अट
मुंबई: बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री सनी लिऑननं आपल्या करारात एका अशी अट घातली आहे की, ज्यामुळे सिनेनिर्माते नाराज होऊ शकतात. यापुढे आपण सिनेमात लिप लॉक सीन करणार नसल्याचं तिनं म्हटलं आहे.

सनी लिऑननं एका करार तयार केला असून त्यात आपण यापुढे सिनेमात किसिंग सीन करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत सनी लिऑननं केलेल्या सिनेमात अनेक किसिंग आणि इंटिमेट सीन्सचा भडीमार असायचा. नुकताच तिचा रिलीज झालेला सिनेमा वन नाइट स्टॅण्ड रिलीज झाला. ज्याला बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

बॉलिवूडमधील अनेक नट्या ऑन स्क्रिन किसींग सीन पसंत करीत नाही. त्यामध्ये आता सनी लिऑनचंही नाव जोडलं आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

नागराज मंजुळे यांची पत्नी करतेय धुणी-भांडी करून उदरनिर्वाह...


  • पिंपरी : पडत्या काळात कष्ट करून साथ दिली; मात्र ज्यांच्यामुळे यश मिळाले त्यांनाच नागराज मंजुळे यांनी दूर लोटले, अशी कैफियत नागनाथ मंजुळे यांच्या पत्नी सुनीता यांनी व्यक्त केली आहे. सध्या चिंचवड येथील रामनगर झोपडपट्टीत वडिलांच्या घरी राहत असून, धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करीत आहे. मला बाकी काही नको. केवळ पत्नी म्हणून त्यांनी पुन्हा नांदवावे, असे सुनीता यांचे मागणे आहे. याबाबत नागनाथ मंजुळे यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
    चिंचवड येथील रामनगर झोपडपट्टीतील राहत्या घरी ‘लोकमत’शी बोलताना सुनीता म्हणाल्या, ‘‘१९९७मध्ये नागराज यांच्याबरोबर विवाह झाला. विवाहानंतरही त्यांचे शिक्षण सुरू होते. मला शिकायचे आहे, काही अपेक्षा बाळगू नको, मूलही नको, असे सांगून त्यांनी माझ्याबरोबर १५ वर्षे काढली. नागराज, भारत, शेषराज, भूषण ही चार भावंडे. त्यातील शेषराज, भूषण अगदी छोटे. त्यांना आईच्या मायेने वाढवले. शिक्षण झाले, यश मिळत गेले, तशी त्यांची माझ्याबरोबर वागण्याची पद्धत बदलली. पत्नीचा दर्जा न देता, तू अल्पशिक्षित आहेस, तुझ्या आई-वडिलांकडे जा, असे म्हणू लागले. त्यांचे वडील मला मुलीसारखे सांभाळायचे. त्यांचे २००७ मध्ये निधन झाले. त्यानंतर नागराज यांच्याकडून वाईट वागणूक मिळू लागली. २०११ मध्ये त्यांच्या ‘पिस्तुल्या’ या लघुपटाला राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. त्या वेळी मला एकटीला घरात सोडून, ते पुरस्कार घेण्यास गेले. ही गोष्ट माझ्या मनाला क्लेशदायक होती. पत्नी म्हणून ज्या घरात आले, त्या घरात मोलकरणीची वागणूक माझ्या वाट्याला आली. पत्नीचा दर्जा कधीच मिळाला नाही. इतकी वर्षे मी त्यांच्याकडे नांदले. सारे काही सोसले. बिकट परिस्थितीत साथ दिली. आता त्यांनी मला पत्नी म्हणून स्वीकारावे, एवढीही अपेक्षा मी का बाळगू नये? चार वर्षांपासून मी रामनगरला आई-वडिलांकडे राहत आहे. धुणी-भांडी अशी कामे करून जगत आहे. आई-वडील आता वृद्धापकाळाचे जीवन जगत आहेत. त्यांची साथ किती दिवस मिळणार, त्यानंतर पुढे काय, असा प्रश्न मला सतावत आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

सलील अंकोल- संदीप पाटील बनणार व्याही...


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १३ - भारताचा माजी खेळाडू व अभिनेता सलील अंकोला आणि भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख संदीप पाटील यांच्यात क्रिकेटशिवाय आणखी काही साम्य आहे का? तर याचं उत्तर आहे हो... तुम्हाला माहित नसेल पण सलील व संदीप लौकरच व्याही बनणार आहेत. सलील मुलगी सना आणि संदीप यांचा मुलगा चिराग या दोघांचा नुकताच साखरपुडा झाला असून थोड्याच काळात ते विवाहबंधनात अडकणार आहेत. 
    सना ही सलील व त्याची पहिली (दिवंगत) पत्नी परिणीता यांची मुलगी असून ती एका मॅगझिनसाठी काम करते. तर संदीप यांचा मुलगा चिराग हा वडिलांप्रमाणे क्रिकेटकडे न वळता अभिनयात नशीब आजमावत असून त्याने अनेक मराठी सिनेमा व मालिकांमध्ये काम केले आहे. 
    सलील अंकोला यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'संदीप हे आधी माझे आदर्श होते, त्यानंतर ते माझे सहकारी, मग कप्तान व त्यानंतर कोच बनले. आणि आता ख-या आयुष्यातही आम्ही व्याही म्हणून एकत्र येणार आहोत' असे सलीलने सांगितले. 
    सना आणि चिराग एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. गेल्या चार वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत, आमच्यासाठी तो एक (सुखद) धक्काच होता. मात्र त्यांचे प्रेम असेच बहरत राहिले आणि नुकताच त्यांनी एकमेकांसोबत (जोडीदार म्हणून) संपूर्ण आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. सना एका चांगल्या कुटुंबात जाणार आहे आणि विशेष म्हणजे माझ्या मित्राचीच सून बनणार आहे, याबद्दल मी खरच खूप आनंदी आहे.'
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

जगातील सर्वात मोठे कार्गो विमान भारतात दाखल


  • ऑनलाइन लोकमत 
    हैदराबाद, दि. १३ -  जगातील सर्वात मोठे मालवाहतूक विमान शुक्रवारी सकाळी भारतात दाखल झाले. 'एंटोनोवएन-२२५ मिरिया' हे विमान हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आहे. युक्रेनमध्ये निर्मिती झालेले जगतील हे सर्वात लांब आणि वजनदार विमान आहे. 
    एकावेळी ६४० टन वजन घेऊन उड्डाण करण्याची या विमानाची क्षमता आहे. या विमानामध्ये सहा टरबोफॅन इंजिन बसवण्यात आली आहेत. तुर्कमेनिस्ताहून हे विमान हैदराबादमध्ये उतरले आहे. अनिल अंबानी यांची रिलायन्स कंपनी संरक्षण सामग्रीच्या क्षेत्रात उतरली असून, त्यांनी मागच्या महिन्यात युक्रेनच्या एनटोनिक कंपनीबरोबर करार केला आहे. 
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

कालव्यांऐवजी पाइपलाइनने पाणी


  • अतुल कुलकर्णी, मुंबई
    धरणातील कालव्याद्वारे दिल्या जाणाऱ्या पाण्याचा अपव्यय, चोरी व कामांतील भ्रष्टाचार टाळण्यास बंद पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून तसा प्रस्ताव आगामी मंत्रिमंडळ बैठकीपुढे ठेवण्यात येणार आहे.
    जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याला दुजोरा दिला असून हा निर्णय अंमलात आला तर राज्याचा सिंचन नकाशाच बदलून जाईल, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. जलसंपदा विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आजमितीला राज्यात लागवडीलायक क्षेत्र २२५ लक्ष हेक्टर एवढे आहे. त्यापैकी भूपृष्ठावरील पाण्यातून (धरण, कालवे, तलाव, नदी) ८५ लक्ष हेक्टर, तर भूजल पाण्यातून ४१ लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. उर्वरित ९९ लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यास भगीरथ प्रयत्नही अपुरे पडतील. त्यामुळे यापुढे कालव्यांद्वारे नव्हे, तर पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचे धोरण जलसंपदा विभागाने आखले आहे. जिथे धरण बांधून तयार आहे पण कालवे झाले नाहीत, तसेच नव्या धरणांसाठी पाइपलाइनचा पर्याय पुढे आला आहे. ज्या ठिकाणी सपाट जमीन आहे अथवा जिथे पाणी पाइपलाइनद्वारे नेणे अशक्य आहे, अशा ठिकाणी मात्र कालव्यांची मदत घेतली जाणार आहे.कालव्यांमुळे भवतालच्या विहिरींची पाणीपातळी वाढण्यास काही प्रमाणात मदत झाली असली तरी मोठ्या प्रमाणावर जमीन नापिक झाली आहे. तसेच क्षारामुळे जमिनीचा कस कायमचा गेला आहे. कालव्यांवर मोटारी बसवून कोणतेही मोजमाप न करता पाणी पळवण्याचे प्रकार सररास घडतात. कालवे फोडून पाणी पळवण्याच्या घटनाही राज्यात घडलेल्या आहेत.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

परिचारिका होणार ‘स्मार्ट’


  • मुंबई : रुग्णांची सेवा करणाऱ्या, रुग्णांना वेळच्या वेळी औषधे देणाऱ्या परिचारिका काळानुरूप बदलून आता ‘स्मार्ट’ होणार आहेत. ‘महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल’मध्ये (एमएनसी) नोंदणी असलेल्या प्रत्येक परिचारिकेला आता एक ‘स्मार्ट कार्ड’ देण्यात येणार आहे. यावरील कोडवरून त्या परिचारिकेची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. जागतिक परिचारिका दिन आणि ‘महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल’चे सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित एका कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात पाच परिचारिकांना ‘स्मार्ट कार्ड’चे वाटप करण्यात आले.
    बिर्ला मातोश्री सभागृहात गुरुवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काळानुरूप परिचारिकांच्या शिक्षणात, कामाच्या स्वरूपात बदल झाले. त्याचप्रमाणे कौन्सिलही हायटेक करण्याच्या दृष्टीने हे एक पाऊल उचलण्यात आले आहे. खासगी रुग्णालये, नर्सिंग होम, दवाखान्यांमध्ये परिचारिका रुग्णांची सेवा करीत असतात. पण,
    त्या वेळी परिचारिका प्रशिक्षित आहे की नाही, याची खातरजमा कोणीच करत नाही. त्यामुळे अनेकदा फसवणूक होऊ शकते. असे प्रकार टाळण्यासाठी प्रशिक्षित नोंदणीकृत परिचारिकांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष रामलिंग माळी यांनी स्पष्ट केले.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मुबारक बेगम यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार


  • मुंबई : अंधेरीच्या महापालिकेच्या ‘बीएसईएस’ रुग्णालयात दाखल असलेल्या प्रख्यात गायिका मुबारक बेगम यांच्या उपचारांचा खर्च राज्य सरकार करणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दिली. ३ मे रोजी बेगम यांना रुग्णालयात दाखल केले होते.
    प्रख्यात गायिका मुबारक बेगम या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सात दिवस उलटूनही राज्य सरकारला याची काहीच कल्पना नव्हती. गुरुवारी सकाळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून सांस्कृतिक विभागाचे प्रभारी संचालक संजय पाटील यांनी मुबारक बेगम यांची भेट घेतली. त्या वेळी रुग्णालयात मुबारक बेगम यांची सून झरिना शेख आणि नात सना शेख उपस्थित होत्या. या दोघींशी पाटील यांनी चर्चा केली. 
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

‘रेड कॉर्नर’ नोटीससाठी प्रयत्न


  • डिप्पी वांकाणी,  मुंबई
    मद्य उद्योजक विजय मल्ल्या याला भारतात पाठविण्यास इंग्लंडने नकार दिल्यावर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) आंतरराष्ट्रीय पोलिसांना (इंटरपोल) मल्ल्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) बजावण्याची विनंती केली आहे.
    विजय मल्ल्याने विदेशात ठेवलेल्या पैशांबद्दल आम्ही तेथील यंत्रणांकडे केलेल्या विचारणेनंतर त्यांनी पाठविलेल्या उत्तरांमुळे ईडी मल्ल्या याची भारतातील मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू करणार आहे. मल्ल्याने आयडीबीआय बँकेकडून घेतलेल्या ९०० कोटी रुपये कर्ज घोटाळ्याचीच चौकशी ईडी करीत आहे. मल्ल्या वेगवेगळ्या बँकांना नऊ हजार कोटी रुपये देणे लागतो. याबाबत आम्ही इतर चौकशी यंत्रणांचे म्हणणे घेऊन मग या नऊ हजार कोटींच्या तपासाचे काम हाती घेऊ, असे ईडीचे म्हणणे आहे.
    विजय मल्ल्या याला भारतात पाठविण्यास इंग्लंडने नकार देऊन प्रत्यार्पणाचा उपाय तपासून बघावा, असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर रेड कॉर्नर नोटीस बजावली जाणे याला खूप महत्त्व आहे. मल्ल्या इंग्लंडमध्ये राहात असून, इतर देशांत जायचा त्याने प्रयत्न केल्यास त्याला अटक होईल. ईडीने केंद्रीय गुप्तचर खात्याला (सीबीआय-भारताची इंटरपोल) रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची विनंती केली आहे. ही नोटीस जारी झाल्यास इंग्लंडबाहेर कुठेही मल्ल्याने प्रवासाचा प्रयत्न केल्यास त्याला कोणत्याही विमानतळावर अटक केली जाईल.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

रावत यांनी ४६ दिवसांनंतर घेतली मंत्रिमंडळाची बैठक


  • डेहराडून : उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षेत बाजी मारणारे मुख्यमंत्री हरीश रावत यांना अनिश्चिततेच्या सावटानंतर पुन्हा पद बहाल होताच ४६ दिवसांनंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा मान मिळाला.
    बुधवारी रात्री राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आल्याचे जाहीर होताच रावत पुन्हा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाले. मंत्रिमंडळाच्या जुन्या निर्णयांच्या अंमलबजावणीला गती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले; तथापि नियमित होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. राजकीय अस्थैर्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाल्याबद्दल रावत यांनी खंत व्यक्त केली आहे. न्यायालयाने उत्तराखंडमधील जनतेचा लोकशाहीवरील विश्वास बळकट केला आहे. राज्याला प्रगतीकडे नेताना हा वाईट काळ विसरून जाऊ या, असेही ते म्हणाले.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मुलांना जिहादची शिकवण देण्यासाठी इसिसचं अॅप


  •  ऑनलाइन लोकमत
    वॉशिंग्टन, दि. 12- इराक आणि सीरियामध्ये धुमाकूळ माजवलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS)नं लहानग्यांना जाळ्यात ओढण्यासाठी एक अॅप तयार केलं आहे. या अॅपद्वारे लहान मुलांना जिहादची शिकवण दिली जाते आहे. 'जी' फॉर गन, 'टी' फॉर टँक आणि 'रॉकेट' या शब्दांचे अर्थ मुलांना अशा प्रकारे शिकवले जात आहेत. 
    इसिसनं 'लायब्ररी ऑफ झील' हे अॅप्लिकेशन सुरू केलं आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून अँड्रॉइड फोनवर मुलांना अरेबिक मुळाक्षरांची ओळख करून दिली जाते आहे, अशी माहिती लाँग वॉर जर्नलमध्ये देण्यात आली आहे.
    हे अॅप्लिकेशन इसिसच्या टेलिग्राम चॅनलसह अन्य फाइल शेअरिंग संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलं आहे. मुलांना या अॅप्लिकेशनबद्दल आकर्षण वाटावं, यासाठी या अॅपवर काही खेळही दिले आहेत. ते खेळ अरेबिक अक्षरात लोड करण्यात आले आहेत. या अॅप्लिकेशनवर नशीद हे इस्लामिक गाणंही टाकण्यात आलं आहे. त्यातही जिहादी शब्द मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले आहेत. 
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

लव्ह मॅरेजला पाठिंबा दिला म्हणून पाकिस्तानात पत्रकाराची हत्या


  • ऑनलाइन लोकमत 
    इस्लामाबाद, दि. १२ - मुलीच्या प्रेमविवाहाला पाठिंबा दिला म्हणून पाकिस्तानात एका पत्रकाराची गोळया झाडून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अजमल जोईया असे मृत पत्रकाराचे नाव आहे. दुचाकीवरुन घरी परतत असताना तिघांनी अजमल यांची गोळया झाडून हत्या केली. सोमवारी ही घटना घडली. 
    अजमल यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी चुलतभाऊही त्यांच्यासोबत होता. तो जखमी झाला असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. अजमल यांच्या ओळखीच्या एका मुलीने घरच्यांना न जुमानता तिच्या पसंतीच्या मुलाबरोबर लग्न केले होते. अजमल यांनी या लग्नाला पाठिंबा दिला होता. या नवविवाहीत दांम्पत्याला सुरक्षा देण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाशीही चर्चा केली होती. 
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

दिलीमा रौसेफ यांची दशकभरापासूनची ब्राझीलमधील राजवट संपुष्टात


  • ऑनलाइन लोकमत 
    ब्रासिलिया, दि. १२ - ब्राझीलच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा दिलीमा रौसेफ यांची ब्राझीलमधील सत्ता संपुष्टात आली आहे. रौसेफ यांच्या विरोधातील प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले असून, आता त्यांच्यावर महाभियोगाचा खटला चालणार आहे. रौसफ यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्यासाठी मतदान झाले. त्यात त्यांच्या बाजूने २२ तर विरोधात ५५ मते पडली. 
    ब्राझीलची सूत्रे आता उपराष्ट्रपती आणि रौसेफ यांचे राजकीय विरोधक मायकल टिमर यांच्या हाती गेली आहेत. रौसेफ यांची गच्छंती झाल्यामुळे ब्राझीलमध्ये तेरावर्षांपासून असलेली डाव्या विचारसरणीची सत्ता संपुष्टात येणार आहे. ब्राझील लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठा देश आहे. रौसेफ यांच्या विरोधातील प्रस्ताव मंजूर होताच विरोधक सिनेटर्सनी टाळयांचा एकच कडकडाट केला. 
    बजेट कायद्याचे उल्लंघन करुन निधी वापरल्याचा रौसेफ यांच्यावर आरोप आहे. रौसेफ यांचे सहा महिन्यांसाठी निलंबन झाले आहे. पीएमडीबी पक्षाचे मायकल टिमर आता ब्राझीलचे हंगामी अध्यक्ष म्हणून कामकाज संभाळणार आहेत. रौसेफ यांच्या पक्षाची दशकभरापासूनची राजवट संपुष्टात आली आहे. 
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

कर्मचा-यांच्या विश्रांतासाठी बॉसने ऑफिसमध्येच लावले बेड्स


  • ऑनलाइन लोकमत - 
    बिजिंग, दि. 12 - एखाद्या ऑफिसमध्ये रुजू होण्यापुर्वी कोणत्या सुविधा मिळणार आहेत हा प्रत्येकाचा प्रश्न ? पण जर तुम्हाला तुमच्या बॉसने काम करताना ऑफिसमध्ये विश्रांतीसाठी झोपण्याची परवानगी दिली तर....विश्वास बसत नाही ना..चीनमध्ये दाय शियांग यांनी आपल्या ऑफिसमध्ये कर्मचा-यांना झोप घेता यावी यासाठी 12 बेड लावले आहेत. 
    दाय शियांग यांनी इंजिनिअर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांना 72 तास काम करावं लागायचं. झोप आल्यानंतर दाय शियांग जमिनीवरच झोपायचे. त्यानंतर टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीत त्यांनी 15 वर्ष काम केलं. त्यावेळीही कधी डेस्क तर कधी जमिनीवर थोडा वेळ झोप काढायचे. सध्या त्यांनी स्वत:ची कंपनी उभारली आहे.
    जेव्हा दाय शियांग यांच्या कंपनीला पहिली बिजनेस ऑर्डर मिळाली तेव्हा त्यांनी सर्वप्रथम ऑफिसच्या शांत भागात 12 बेड्स लावून घेतले. 'तंत्रज्ञानाशी संबंधित काम करताना डोकं लावण्याची खूप गरज असते, कर्मचा-यांना नवीन गोष्टी शोधण्यासाठी वेळेचे गरज असते जेणेकरुन त्यांना नव्या कल्पना सुचतील', असं मत दाय शिंयांग यांनी व्यक्त केलं आहे. 'आमच्या ऑफिसमध्ये फक्त रात्रीच नाही तर सकाळीही झोपायला परवानगी देण्यात आल्याच', दाय शियांग यांनी सांगितलं आहे. 
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


आज अनुभवा बिनसावलीचा दिवस

पुणे - आपली कधीही साथ न सोडणारी सावली शुक्रवारी (ता. 13) दुपारी 12 वाजून 31 मिनिटांनी मात्र साथ सोडणार आहे. काही क्षणांसाठी सोडलेली ही साथ आकाश निरभ्र असेल, तरच अनुभवता येईल.

आपण म्हणतो की, सूर्य रोज दुपारी बारा वाजता डोक्‍यावर येतो, पण तो खरोखरच डोक्‍यावर येतो का?, तर नाही. उत्तरायण- दक्षिणायनामुळे सूर्य खगोलीय विषुववृत्ताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला प्रवास करतो. त्यामुळे 21 मार्च आणि 23 सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्त पार करत असतो. तेव्हा पृथ्वीवरील विषुववृत्तावर स्थानिक वेळेनुसार 12 वाजता सूर्य बरोबर डोक्‍यावर म्हणजेच ख-मध्य बिंदूवर येतो. यानंतर उत्तरेला प्रवास करताना, सूर्य आपल्या गावाच्या अक्षांशाइतक्‍या अंशांवर आला, की त्या दिवशी आपल्या गावी सूर्य स्थानिक वेळेनुसार बारा वाजता ख- मध्य बिंदूवर येतो. तो दिवस आपल्या गावासाठी "झीरो शॅडो डे‘ किंवा बिनसावलीचा दिवस म्हणून ओळखला जातो, अशी माहिती ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे सचिव डॉ. सागर गोखले यांनी दिली.

पुण्याचे अक्षांश 18.5 अंश सेल्सिअस असल्याने सूर्य उत्तरेला प्रवास करत शुक्रवारी ख- मध्य बिंदू पार करेल. या दिवशी पुण्यामध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार 12 वाजून 31 मिनिटांनी आपली सावली दिसेनाशी होईल. सूर्य 21 जूनपर्यंत कर्कवृत्तापर्यंत प्रवास करून दक्षिणेला परत फिरला की जुलैमध्ये अशी घटना परत घडते; परंतु त्या कालावधीत पावसाळा असल्याने आपल्याला त्यावेळेची निरीक्षणे करता येत नाहीत. त्यामुळे शुक्रवारी या घटनेचे निरीक्षण करण्याची उत्तम संधी आहे. याच पद्धतीने राज्यातील इतर शहरांमध्येही वेगवेगळ्या दिवशी हा दिवस अनुभवता येणार असल्याचेही डॉ. गोखले यांनी सांगितले. 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
'केंद्रामुळेच 'त्या' आमदारपुत्राकडे बंदुकीचा परवाना'

पाटणा (बिहार) - ओव्हरटेक करणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या बिहारमधील आमदारपुत्राला कोणत्याही पडताळणीशिवाय बंदुकीचा परवाना मिळाल्याची बाब समोर आल्यानंतर केंद्र सरकारच्या प्रभावाखालीच कोणीतरी बंदुकीचा परवाना देत असल्याचा आरोप बिहारचे उपमुख्यमंत्री तेजसद्वी यादव यांनी केला आहे.

बिहारच्या विधान परिषदेतील आमदार मनोरमा देवी यांचा पुत्र रॉकी यादव याने शनिवारी रात्री त्याच्या गाडीला ओव्हरटेक करणाऱ्या आदित्य सचदेव नावाच्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर रॉकी फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी एका फार्महाऊसमधून रॉकीला ताब्यात घेतले.  दरम्यान रॉकीकडे कोणत्याही पडताळणीशिवाय बंदुकीचा परवाना असल्याची बाब समोर आली. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी, "एका दु:खद घटनेवर होत असलेल्या राजकारणाचा आम्ही निषेध करतो. पडताळणीशिवाय दिल्ली पोलिस बंदुकीचा परवाना देत असल्याचे दिल्लीतील एका वृत्तपत्रात छापून आले आहे.‘ असे म्हणत "याविषयी कोणी काहीच का बोलत नाही?‘ असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. तसेच केंद्र सरकारच्या प्रभावाखाली कोणीतरी पडताळणीशिवाय बंदुकीचा परवाना देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
संवाद हरविल्याने तणावात होतेय वाढ
-

जळगाव - सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. प्रत्येक व्यक्‍तीला जीवनात आपले ध्येय साध्य करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही कसरत करत असताना मात्र व्यक्तीच्या मनावरील ताणतणाव वाढला आहे. सुरवातीला शिक्षणासाठी, नंतर नोकरी मिळविण्यासाठी, नोकरी मिळालीच तर मिळेल त्या पगारात परिवाराचा भार सांभाळणे कठीण झाले आहे या सर्व परिस्थितीमुळे राज्यात तणाव घेणाऱ्यांची संख्येत वाढ झाली आहे. एखादी गोष्ट आपण आवडीने करतो पण त्यात जर पाहिजे तसे यश नाही मिळाले तर नैराश्‍य निर्माण होते व पुढे याचेच रूपांतर तणावात होते. यामुळे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्‍यता अधिक असते. 
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे वास्तव्य पाकिस्तानात!

File Photoनवी दिल्ली - मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात भारत शोधत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पत्ता सापडल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केला असून स्टिंग ऑपरेशनद्वारे दाऊद हा पाकिस्तानमधील कराचीत वास्तव्यास असल्याचे म्हटले आहे.

कराचीतील क्‍लिफ्टनमधील डी 13, ब्लॉक 4 येथे दाऊदचा बंगला असल्याचे वृत्तात म्हटले आहे. स्टिंग ऑपरेशनद्वारे दाऊदचा बंगलाही दाखविण्यात आला आहे. दाऊदचा बंगला हा आबोटाबादमधील ओसामा बिन लादेनच्या बंगल्याप्रमाणेच असल्याचे वृत्तवाहिनीने म्हटले आहे. दाऊदचे वास्तव्य पाकिस्तानात असल्याचे भारताने अनेकदा सांगितले होते. मात्र ही बाब पाकिस्ताननने नेहमी फेटाळून लावली आहे. "या बातमीमुळे दाऊद पाकिस्तानात राहत असल्याच्या पुराव्याला बळकटी मिळाली असून हा मुद्दा पाकिस्तानसमोर उपस्थित करत राहू. पाकिस्तान सरकार दाऊदला भारताच्या ताब्यात देईल, अशी अपेक्षा आहे‘, अशा प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी व्यक्त केल्या आहेत.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
कोलकाता; म्हैस चोरल्याच्या संशयावरून युवकाची हत्या

File Photoकोलकाता - म्हैस चोरल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या हल्ल्यात 23 वर्षाच्या युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जमावाचे नेतृत्त्व करणाऱ्या तृणमूल कॉंग्रेसच्या एका नेत्याला पोलिसांनी अटक केले आहे.

हरीदंगा येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये (आयटीआय) शिकणारा कौशिक पुराकायस्था मंगळवारी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी डायमंड हार्बर येथे आला होता. त्यावेळी काही गावकऱ्यांनी त्याच्यावर म्हैस चोरल्याचा आरोप केला. त्यानंतर गावातील जमावाने त्याच्यावर हल्ला केला. ही बाब समजल्यावर कौशिकची आई, मावशी घटनास्थळी आल्या आणि त्यांनी कौशिकला सोडवण्याचा प्रयत्न केला. पण गावकऱ्यांना त्यांचे ऐकले नाही. दरम्यान या हल्ल्यात कौशिक गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर कौशिकला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान उपचारादरम्यान आज (शुक्रवार) सकाळी त्याचा मृत्यु झाला. या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तृणमूल कॉंग्रेसचा नेता तापस मुलिक याला अटक केले आहे.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
वृद्धाचा शिर्डी ते नागपूर सायकलने प्रवास

प्रबोधनासाठी दिनकरने गाठली सायकलने दीक्षाभूमी
नागपूर - माणसाचा स्वभाव लहरी असतो, असे म्हटले जाते. कदाचित काहीजणांना ही बाब लागूही होते. सुखसमृद्धीचे वातावरण सोडून पंचाहत्तरवर्षीय वृद्धाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर करण्यासाठी शिर्डी ते नागपूर प्रवास सायकलने करण्याचा संकल्प केला. तब्बल महिनाभरानंतर त्यांचा हा प्रवास पूर्ण झाला. 

दिनकर गायकवाड (वय 75, रा. सुर्रेगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे शिर्डी ते नागपूर सायकलने प्रवास करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती साजरी केली जात आहे. त्यानिमित्त अनेक कार्यक्रम व उपक्रम घेतले जात आहे. त्यामध्ये मीसुद्धा काहीतरी वाटा उचलावा, बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचावे या उद्देशाने सायकलने नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला. पत्नी व नोकरीवर असलेल्या दोन्ही मुलांनी याला विरोध केला. तुम्हाला नागपूरला जायचे असेल तर बसने जा, सायकलने जाऊ नका, ट्रॅफिक असते, तुमचे वय झाले, असे सांगत मनधरणी केली. परंतु, मी निणर्यावर ठाम होतो. माझ्या जिद्दीपुढे त्यांचे चालणार नसल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानंतर मुलांनीच दोन हजार रुपये दिले. वाटेत काही अडचण आल्यास संपर्क साधता यावा यासाठी मोबाईल दिला. 
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
'हैदराबाद विद्यापीठ: आंदोलनाला कॉंग्रेसचा निधी'

File Photoहैदराबाद - हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर करण्यात आलेल्या आंदोलनासाठी कॉंग्रेससह अन्य काही राजकीय पक्षांनी निधी उपलब्ध करून दिल्याचा आरोप विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या एका नेत्याने केला आहे.

एसएफआय या विद्यार्थी संघटनेचा नेता राज कुमार साहू याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याने म्हटले आहे की, चार महिन्याच्या आंदोलनानंतरही रोहित वेमुलाला न्याय मिळालेला नसून आंदोलनासाठी कॉंग्रेस, डावे आणि संधीसाधूंनी निधी उपलब्ध करून दिल्याची टीका केली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू यांनी ट्‌विटरद्वारे माहिती दिली आहे. ते म्हणाले, "हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या सचिवाने गौप्यस्फोट करत राजीनामा दिला आहे. रोहित वेमुला प्रकरणात डावे आणि कॉंग्रेसची भूमिका उघड पडली आहे‘ यावर्षी जानेवारीतील पहिल्या आठवड्यात रोहित वेमुला (वय 26) याने विद्यापीठातील वसतीगृहातील खोलीत आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही दोषी ठरविण्यात येऊ नये, असे त्याने लिहिले होते.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
...तर भयंकर गुन्ह्यात अल्पवयीनही ठरणार प्रौढ!

नवी दिल्ली - भयंकर गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये आरोपी हा जर अल्पवयीन असेल आणि त्याने किंवा तिने वय सिद्ध करण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे अविश्‍वासार्ह असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले, तर अशा प्रकरणांमध्ये आरोपीला अल्पवयीन समजण्यात येणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

ग्रेटर नोएडा येथे 2011 मध्ये झालेल्या एका हत्येच्या प्रकरणात न्यायाधीश ए. के. सिक्री आणि आर. के. अग्रवाल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. या प्रकरणात पराग भाटी नावाच्या आरोपीने गुन्हा घडला त्यावेळी आपण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्याबाबत सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे सिद्ध झाले. ‘जर आरोपी हा अल्पवयीन असल्याने स्पष्टपणे सिद्ध होत असेल तरच त्याला अल्पवयीनांसाठी असलेल्या कायद्याचा लाभ मिळेल. मात्र जर त्याच्या वयाबाबत संशय असेल आणि गुन्हा हा अत्यंत जाणीवपूर्वक, कट रचून करण्यात आला असेल तर अशा प्रकारात आरोपीच्या निरागसतेपेक्षा त्याच्या मनाची परिपक्वता विचारात घेतली जाईल‘, असा निर्णय खंडपीठाने दिला.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++


No comments: