[अंतरराष्ट्रीय]
१- ट्विटर अधिक सुटसुटीत, फोटो आणि लिंक्स कॅरेक्टर लिमिटमधून वगळल्या
२- वॉशिंग्टन; ‘अल कायदा’ आता सिरियाला करणार लक्ष्य
३- बर्लिन; घराच्या बागेतही उतरवता येणार विमान
४- तेहरान; इराण:इस्लामविरोधी कृत्याबद्दल 8 जणांना अटक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- राहुल गांधींच्या प्रकृतीविषयी पंतप्रधान मोदी चिंतातूर
६- हैदराबाद; यंदा EPFO शेअर मार्केटमध्ये 6000 कोटी रुपये गुंतवणार
७- पेट्रोल-डिझेल महागलं, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
८- 'नीट' एक वर्ष पुढे ढकला, दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची मागणी
९- पटना; मनोरमा देवी शरण, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
१०- पटना; मनोरमा देवी शरण, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
११- करकरेंच्या तपासातील निष्कर्ष जाहीर करा - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश
१२- खडसेंच्या जावयाची अलिशान लिमोझिन जप्त करा - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया
१३- पंधरा महिन्यात दिल्लीने आम, भाजपला नाकारले - काँग्रेस
१४- पाच दिवस देशात उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता - भारतीय हवामान विभाग
१५- 'स्टुपिड मोदीं'वर काय कारवाई केली- अल्वी
१६- राजन मनाने भारतीय नाहीत; स्वामींचे मोदींना पत्र
१७- हवेच्या प्रदूषणामुळे मानवी आयुर्मानात घट - भारतीय उष्पप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था
१८- 'जेएनयू'तील देशविरोधी घोषणांचे व्हिडिओ खरेच - न्यायवैद्यक प्रयोगशाळा
१९- पठाणकोटच्या सूत्रधारास 'युपीए'ने केले होते मुक्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
२०- विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटकांना उमेदवारी
२१- वाहतुकीचे नियम मोडल्यावरील दंडाच्या रकमेत वाढ
२२- वीरप्पन सुपरस्टार रजनीकांतलाही किडनॅप करणार होता - राम गोपाल वर्मा
२३- आसाममध्ये कमळ फुलण्याची शक्यता, बंगालमध्ये दीदींची जादू चालणार
२४- माझाही आंतरजातीय विवाह, पण माझी कोणी हत्या केली नाही: रामदास आठवले
२५- मुंबईत 15 वर्षांखालील तरुणींच्या गर्भपातात 114 टक्क्यांनी वाढ
२६- महाराष्ट्राच्या नरसिंग यादवविरोधात सुशीलकुमारचा शड्डू
२७- जलयुक्त शिवार अभियानाला मुख्यमंत्री निधीचा हातभार
२८- भारतातून वर्षभरात 4.6 अब्ज डॉलर बाहेर...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२९- नागपूर; घरात मौल्यवान सामान ठेवू नका, पोलिस महासंचालकांचा सल्ला
३०- ...तर पोलिसांनाच दंड ठोठावणार, यवतमाळ पोलिस अधीक्षकांची नियमावली
३१- सोलापूर; जब्याला नागराज देतो महिना सात हजार रुपये!
३२- नाशिक; चव्हाणच्या लॉकरमध्ये सव्वापाच किलो सोने
३३- पुणे; डॉक्टरांच्या काळ्या धंद्याचं वास्तव, ‘डिसेंडिंग डायग्नोसिस'
३४- ऑपरेशनडॉक्टर : कुणाला गर्भपाताची, तर कुणाला मूतखड्याची भीती
३५- बंगळूर; मोदींचे बनावट फोटो अपलोड करणाऱ्याला अटक
३६- 'त्या' चौकीत 23 वर्षात बलात्काराचा गुन्हा नाहीच - राजस्थान
३७- औरंगाबाद; जुन्या रागातून 'त्याने' केला 'तिच्या' वडिलांचा खून
३८- नाशिक; नाशिकमध्ये चार महिन्यांत 19 खून
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३९- मुंबईचे भवितव्य गुजरात, दिल्ली, बंगलोरच्या पराभवावर
४०- मायक्रोमॅक्सचा 4G स्मार्टफोन, किंमत 8,499 रुपये
४१- रेल्वे नव्हे, बसपेक्षाही विमान तिकीट स्वस्त, स्पाईसजेटची भन्नाट ऑफर
४२- कोहली, एबी आणि गेलचा धुमधडाका, कोलकाताचा धुव्वा
४३- ...म्हणून क्रिकेटर्स सरावादरम्यान फुटबॉल खेळतात
४४- हृतिक-कंगना वादावरील चित्रपटात हृतिकच मुख्य भूमिकेत
४५- एक नजर जिथे केला आर्ची-परशाने संसार....
४६- गायक अंकित तिवारीला पाच हजार रुपयांचा दंड
४७- डिव्हिलर्स 'बॅटमॅन', तर कोहली 'सुपरमॅन': ख्रिस गेल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
४८- जिल्ह्यात २४ तासात तीन शेतकऱ्याच्या आत्महत्या
४९- तामसा; पत्नीचा कुऱ्हाडीने खून करून संशाखोर पतीने घेतला गळफास
५०- झरी शिवारात गळा चिरून तरुणीचा खून
५१- शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे उद्या अपंगाचे ठिय्या व रास्तारोको आंदोलन
५२- हॉकर्सचा बसमध्ये प्रवेश बंद, जबाबदारी वाहकाची
५३- ३० शिक्षकांवर बोगस बदल्या प्रकरणी प्रशासानाडून कारवाईचे संकेत
५४- शिक्षण विस्तार अधिकारी मेकाले निलंबित
५५- बंगळूर; मोबाईल तपासल्याने पतीच्या बोटांवर वार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
जगाबरोबर लढा पण पण आपल्या माणसांसोबत नाही, कारण आपल्या माणसांसोबत जिंकायचे नसते तर जगायचे असते
[गिरीश वाकोडीकर, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
प्रल्हाद पाटील, संजय गलहोत, माणिक लोमटे, अरुण सूर्यवंशी, एजाज रौनक, सत्यजित सातवसे, उत्तमराव दौड, अधी खांद्सोडे, खायुम शेख, नायक चव्हाण, अनिल पवार, देवानंद वाघमोडे, अतिश गावंडे, वीरेंद्र वार्ष्णेय, साईनाथ चान्नावार,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
==============================================

केंद्र सरकार नीटच्या निर्णयाविरोधात कायदेतज्ञाचं मत जाणून घेणार आहे. मेडिकलच्या ‘नीट’ परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेतली होती.
राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी

पोलिस दलातील कामचुकार आणि बेजबाबदार पोलिस कर्मचाऱ्यांमुळे खाकी वर्दीवरचा विश्वास कमी होत चालला असताना महासंचालकांच्या वक्तव्यामुळे जनतेच्या मनात धास्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कुणीही घरात सोनं-नाणं किंवा किंमती ऐवज ठेवू नका असं धक्कादायक आवाहन दीक्षित यांनी केलं.
नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खरं तर पोलिसांनी जनतेच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करणं गरजेचं असतं. मात्र घरात किंमत ऐवज न ठेवण्याचा सल्ला प्रवीण दीक्षितांनी दिला आहे. त्यामुळे जनतेच्या संपत्तीचं संरक्षण करण्यास महाराष्ट्र पोलिस सक्षम नाहीत का, असा सवाल या वक्तव्यानंतर उपस्थित होत आहे.

रिओ ऑलिम्पिकमध्ये 74 किलो वजनी गटात भारताचं प्रतिनिधित्व नरसिंग यादव करणार की सुशीलकुमार याचा निर्णय उद्या भारतीय कुस्ती फेडरेशनच्या बैठकीत होण्याची शक्यता होती. मात्र त्याआधीच सुशीलकुमारने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सोनपतमध्ये आयोजित ऑलिम्पिक सराव शिबीरात सुशीलकुमारचा समावेश झालेला नाही. त्यात केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
भारतासाठी मी ऑलिम्पिकचा कोटा मिळवला असून, मलाच संधी मिळायला हवी अशी मागणी नरसिंग यादवनं केली आहे. तर सुशीलकुमारनं नरसिंग यादवशी चाचणी कुस्ती खेळवण्यात यावी अशी मागणी केली.
भारतीय कुस्ती फेडरेशनच्या बैठकीत मंगळवारी निर्णय होण्यापूर्वीच सुशीलकुमारने दिल्ली हायकोर्टात धाव घेतल्यानं या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

दारु पिऊन गाडी चालवल्यास थेट 10 हजार रुपयांपर्यंत दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, तर गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

हृतिक-कंगना यांच्यातील या ‘सायबरवॉर’वर लवकरच एखादा चित्रपट येण्याची शक्यता आहे. हृतिक-कंगनातील वाद हे एक निमित्तमात्र आहे, हृतिकवर एखादी तरुणी खरंच जीवापाड प्रेम करत पाळत ठेवू शकते. एका हँडसम तरुणाचा पिछा पुरवणाऱ्या एका मुलीवर सिनेमाचं
कथानक बेतल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे.
बॉलिवूडमधील एका प्रथितयश निर्मात्याकडून आणि एका नवोदित दिग्दर्शकाकडून हृतिकला स्क्रिप्ट मिळाल्याची माहिती आहे. सायबर स्टॉकिंग करणाऱ्या तरुणीला हृतिकची व्यक्तिरेखा बळी पडते आणि तो सर्वांच्या चर्चेचा विषय ठरतो, अशी सिनेमाची कथा असेल.
हृतिक सध्या ‘काबील’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याच्याकडे इतर सिनेमांसाठी वेळ नाही. मात्र त्याने स्क्रिप्ट ऐकण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. त्यामुळे कंगना-हृतिकमधील वादाशी साम्य असलेला हा चित्रपट हृतिकने स्वीकारला, तर स्वतःवर
आधारित चित्रपटात खुद्द हृतिकच काम करताना दिसेल.

विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटकांना उमेदवारी
मुंबई: विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाण्यातून महायुतीकडून शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसंत डावखरे यांना शिवसेनेच्या फाटकांचं कडवं आव्हान असेल.
उमेदवारी भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. त्यामुळे रवींद्र फाटक आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेकडून शेवटच्या दिवशी उमेदवारी जाहीर केली.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे विधानपरिषद निवडणुकीसाठी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे युतीचे उमेदवार म्हणून रवींद्र फाटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
==============================================
राहुल गांधींच्या प्रकृतीविषयी पंतप्रधान मोदी चिंतातूर
नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आजारी आहेत. त्यांची प्रकृतीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय चिंतातूर असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी ट्विटरवरुन दिली.
जे पी नड्डा यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “पंतप्रधानांकडून समजलं की राहुल गांधी आजारी आहे. ते राहुल यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहेत. पंतप्रधानांची काळजी लक्षात घेऊन मी राहुल गांधींच्य प्रकृतीविषयी विचारणा केली. तसंच त्यांची प्रकृती लवकर सुधारावी अशी प्रार्थना केली आहे.”
==============================================
मायक्रोमॅक्सचा 4G स्मार्टफोन, किंमत 8,499 रुपये
मुंबई : भारताची स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने आपला 4G बजेट स्मार्टफोन ‘कॅनव्हास इव्होक’ लाँच केला आहे. हा फोन सध्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर मिळेल. महत्त्वाचं म्हणजे ‘कॅनव्हास इव्होक’ 4G स्मार्टफोनची किंमत अवघी 8,499 रुपये आहे.
‘कॅनव्हास इव्होक‘चे फिचर्स
*डिस्प्ले – 5.5 इंच
*रिझॉल्युशन – 1280×720 पिक्सल
*प्रोसेसर -1.4GHz ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 415
* रॅम – 3GB
* मेमरी – इंटरनल 16GB, मेमरीकार्डद्वारे वाढवण्याची क्षमता
*कॅमेरा – एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सल रियर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
*बॅटरी – 3000mAh
*कनेक्टिव्हिटी – 4G LTE सपोर्ट. मायक्रो यूएसबी, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 4.0, जीपीएस, ए-जीपीएस यासारखे फिचर्स उपलब्ध
==============================================
रेल्वे नव्हे, बसपेक्षाही विमान तिकीट स्वस्त, स्पाईसजेटची भन्नाट ऑफर
मुंबई : स्पाईसजेट विमान कंपनीने 11 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांना अशक्यप्राय वाटेल अशी ऑफर दिली आहे. कारण केवळ रेल्वेच नव्हे तर खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटापेक्षाही कमी किमतीत विमान प्रवासाची ऑफर देण्यात आली आहे.
केवळ 511 रुपयात देशांतर्गत विमान प्रवास ही ऑफर स्पाईसजेटने दिली आहे. तर परदेशी प्रवास टॅक्स वगळून केवळ 2,111 रुपयात करता येणार आहे. तीन दिवसांसाठी ही ऑफर आहे.
आजपासून म्हणजे 17 मे ते 19 मे 2016 पर्यंत तिकीट बुक करता येणार आहे. 19 मे रोजी मध्यरात्रीपर्यंत बुकिंग सुरु असेल.
हे बुकिंग केल्यानंतर तुम्ही 15 जून 2016 ते 30 सप्टेंबर 2016 या कालावधी दरम्यान देशांतर्गत प्रवास करु शकाल. तर देशाबाहेर प्रवासासाठी 1 जून 2016 ते 20 जुलै 2016 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
स्पाईसजेटच्या थेट विमानसेवा असलेल्या मार्गांसाठीच ही ऑफर लागू असेल. तसंच एकेरी प्रवासासाठीच या सुविधेचा लाभ घेता येईल.
==============================================
...म्हणून क्रिकेटर्स सरावादरम्यान फुटबॉल खेळतात
मुंबई : सरावादरम्यान मैदानात फुटबॉल खेळणारे क्रिकेटर्स, ही दृश्य आपल्यासाठी नवी नाहीत. पण क्रिकेटर्स फुटबॉलच का खेळतात, फुटबॉल खेळल्याने क्रिकेटर्संना नेमका काय फायदा होता, असे प्रश्न अनेकांना पडले असेल. आयपीएलच्या निमित्ताने या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत.
रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीच्या मते, मैदानाला चार फेऱ्या मारण्यापेक्षा काही मिनिटं फुटबॉल खेळल्याने चांगला व्यायाम होतो, शरीराची ताकद आणि चपळाई वाढते आणि थकवाही लवकर दूर होतो. त्यामुळे अनेकदा व्यायामाऐवजी केल्यावर क्रिकेटर्स फुटबॉल खेळणं पसंत करतात.
स्वतः विराट एक उत्तम फुटबॉलर असल्याची पावतीच त्याचा बंगलोरचा टीममेट शेन वॉटसनने दिली आहे. भारताचा कसोटी कर्णधार विराट हा रॉयल चॅलेन्जर्स संघाचा रोनाल्डो आहे, असं वॉटसनने म्हटलं आहे. विराटप्रमाणेच लोकेश राहुलही उत्तम फुटबॉल असल्याचं वॉटसनने म्हटलं आहे.
==============================================
कोहली, एबी आणि गेलचा धुमधडाका, कोलकाताचा धुव्वा
कोलकाता : ख्रिस गेल, विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरच्या तोफा आज एकत्र धडाडल्या. या तिघांच्या फटकेबाजीच्या जोरावर बंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखलं.
बंगलोरचा हा बारा सामन्यांमधला हा सहावा विजय असून कोलकाताचा हा बारा सामन्यांमधला पाचवा पराभव ठरला आहे.
ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात कोलकाताने बंगलोरला विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना ख्रिस गेल आणि विराट कोहलीने 71 धावांची सलामी दिली. मग विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने दुसऱ्या विकेटसाठी 115 धावांची अभेद्य भागीदारी रचून बंगलोरला विजय मिळवून दिला.
गेलने 31 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 49 धावांची खेळी केली. कोहलीने 51 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद 75 धावांची खेळी उभारली. तर डिव्हिलियर्सने 31 चेंडूंतली नाबाद 59 धावांची खेळी पाच चौकार आणि तीन षटकारांनी सजवली.
त्याआधी गौतम गंभीर आणि मनिष पांडेच्या अर्धशतकांच्या जोरावर कोलकाताने 20 षटकांत पाच बाद 183 धावांची मजल मारली होती.
==============================================
यंदा EPFO शेअर मार्केटमध्ये 6000 कोटी रुपये गुंतवणार
हैदराबाद : चालू आर्थिक वर्षात ईपीएफओ (EPFO) म्हणजेच भविष्य निर्वाह निधी संघटना शेअर मार्केटमध्ये सहा हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम गुंतवणार आहे. केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी ही माहिती दिली. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय ईपीएफओची केंद्रीय विश्वस्त मंडळच करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय कामगार मंत्री या विश्वस्त मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे 2015-2016 मध्येही ईपीएफओने एसबीआय म्युच्युअल फंडाच्या दोन ईटीएफच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये सहा कोटी रुपयांची रक्कम गुंतवली होती.
यावर्षीही ईपीएफओ शेअर मार्केटमधील गुंतवणूक वाढवण्याचा विचार करत आहे. कारण शेअर मार्केटमध्ये ईटीएफच्या माध्यमातून केली जाणारी गुंतवणूक ही दीर्घकालीन असते. अल्पकाळात त्यापासून फारसा फायदा होत नाही. त्यामुळेच दीर्घकाळ पीएफची रक्कम गुंतवलेली राहण्यासाठी नियमित गुंतवणूक करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
==============================================
ट्विटर अधिक सुटसुटीत, फोटो आणि लिंक्स कॅरेक्टर लिमिटमधून वगळल्या
मुंबई : जगभरातल्या कोट्यवधी यूजर्सना ट्विटर लवकरच एक खुशखबर देणार आहे. युजर्स आपल्या 140 कॅरेक्टरच्या ट्वीटमध्ये जोडत असलेले फोटो आणि लिंक कॅरेक्टर लिमिटमधून लवकरच वगळल्या जाणार आहेत.
यूजर्स आता ट्विटरवर कितीही फोटो किंवा मोठी यूआरएल लिंक शेअर करु शकतील आणि पुन्हा 140 कॅरेक्टरचा पूर्ण ट्वीटही टाईप करुन शेअर करु शकतील.
म्हणजेच ट्विटरवर फोटो किंवा लिंक्स शेअर करणाऱ्या यूजर्सना आता पूर्ण लांबीचा म्हणजे 140 कॅरेक्टरचा ट्वीट शेअर करता येणार आहे. या आधी यूजर्स जेव्हा फोटो किंवा लिंक्स शेअर करायचे तेव्हा मूळ 140 कॅरेक्टर मर्यादेतून फोटो आणि लिंक्ससाठी लागणारे कॅरेक्टर वजा होत असत.
ट्विटरने स्वतःहून लिंक शॉर्ट (छोट्या) केल्या तरी किमान 23 कॅरेक्टर त्यासाठी वापरले जात असत. म्हणजेच युजर्सला आपला ट्वीट 117 कॅरेक्टर्समध्येच संपवावा लागत होता.
ट्विटरमध्ये लवकरच येऊ घातलेल्या नव्या अपडेटनुसार तुम्ही फोटो किंला लिंक्स शेअर केल्या तरी तुम्हाला पूर्ण 140 कॅरेक्टरचा ट्वीट शेअर करता येणार आहे.

ट्विटरकडून अधिकृतपणे या अपडेटविषयी अजून कसलंही सूतोवाच करण्यात आलं नसलं तरी ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने त्याबाबतच वृत्त ट्विटरमधील विश्वासार्ह सुत्रांच्या हवाल्याने प्रकाशित केलं आहे.
गेल्या वर्षीच ट्विटरने डायरेक्ट मेसेजची कॅरेक्टर लिमिट 140 कॅरेक्टर्सवरुन दहा हजार कॅरेक्टर्सपर्यंत केली होती. त्याचवेळी ट्विटर मेसेजची 140 कॅरेक्टर्स ही लिमिटही 10 हजारपर्यंत वाढवण्याची योजना होती, मात्र सध्या ट्विटर वापरणारांच्या तीव्र विरोधानंतर ट्विटरने हा विचार सोडून दिला.
==============================================
वीरप्पन सुपरस्टार रजनीकांतलाही किडनॅप करणार होता
मुंबई : कर्नाटकच्या जंगलातील क्रूरकर्मा चंदन तस्कर वीरप्पन तामिळ सिनेमाचा मेगास्टार रजनीकांत यांचं अपहरण करणार होता, अशी माहिती सिनेमा दिग्दर्शक राम गोपालल वर्मा याने दिली आहे. राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केलेला ‘वीरप्पन’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
वीरप्पनच्या आयुष्यावरील सिनेमासाठी संशोधन करताना आपल्याला ही माहिती मिळाल्याचं राम गोपाल वर्माने म्हटलं आहे. वीरप्पनच्या सिनेमासाठी माहिती गोळा करताना त्याने वीरप्पनचे एकेकाळचे सहकारी, वीरप्पन आणि सरकार यांच्यातील चर्चेतील मध्यस्थ, तसंच वीरप्पनचा खातमा करण्याच्या मोहीमेतील काही अधिकारी यांच्याशीही चर्चा केली. त्यातूनच त्याला ही माहिती मिळाली.
वीरप्पनने कन्नड मेगास्टार राजकुमार यांचंही अपहरण केलं होतं. त्याच धर्तीवर त्याला रजनीकांतचं अपहरण करायचं होतं.
वीरप्पनने कन्नड स्टार राजकुमार याचं अपहरण केल्यानंतर संबंध देश हादरला होता. कर्नाटक चित्रपट उद्योगावरही त्याचा मोठा परिणाम झाला. तामिळनाडूमधील राजकुमार यांच्या एका फार्महाऊसवरुन वीरप्पनने त्याचं अपहरण केलं होतं. ते जवळपास 108 दिवस वीरप्पनच्या ताब्यात होते.
==============================================
पेट्रोल-डिझेल महागलं, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल 0.83 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 1.26 रुपये प्रति लिटर महागलं आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
याआधी 30 एप्रिलला दरवाढ करण्यात आली होती. तेव्हा पेट्रोल 1.06 रुपये प्रति लिटर, आणि डिझेल 2.94 रुपये प्रति लिटर महागलं होतं. अवघ्या 15 दिवसात पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आल्यानं ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार आहे.
तर याआधी 5 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते. म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले.
==============================================
'नीट' एक वर्ष पुढे ढकला, दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची मागणी
नवी दिल्ली : आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ‘नीट’ परीक्षा एक वर्ष पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. नड्डा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
केंद्र सरकार नीटच्या निर्णयाविरोधात कायदेतज्ञाचं मत जाणून घेणार आहे. मेडिकलच्या ‘नीट’ परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक घेतली होती.
राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी
राज्यातील विद्यार्थ्यांवर ‘नीट’परीक्षा लादण्यात आली असून त्यामुळे त्यांचं नुकसान होईल. राज्य सरकार संपूर्ण प्रयत्न करत आहे. मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी परीक्षेची तयारी करावी. ‘नीट’प्रश्नी केंद्र सरकार काही करु शकेल का, अशी विनंती पंतप्रधानांना करणार आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विद्यार्थ्यांना दिलं आहे.
==============================================
आसाममध्ये कमळ फुलण्याची शक्यता, बंगालमध्ये दीदींची जादू, एबीपी-नेल्सन एक्झिट पोल
नवी दिल्ली: पाच राज्यातील मतदान आज सपलं असून आता सगळ्यांनाच निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. पाचही राज्यात भाजपचं सरकार नसल्यानं भाजपसमोर एक मोठं आव्हान आहे. या सगळ्याचा खुलासा 19 मेला निकालाचा दिवशी होणार आहे.
निवडणुकीनंतर एबीपी माझा आणि नेल्सननं सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार, आसाममध्ये पहिल्यांदाच कमळ फुलण्याची शक्यता आहे. तर प. बंगालमध्ये ममतांना कौल मिळत असल्याचं समजतं आहे.
या सर्व्हेनुसार, भाजपला आसाममध्ये संपूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार आसाममध्ये भाजप-एजीपी-बीपीएफला 81 जागा, काँग्रेसला 33 तर एयूडीएफला 10 तर इतर 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची जादू कायम राहणार असल्याचं दिसून येतं आहे. मात्र, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा त्यांच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. सर्व्हेनुसार, तृणमूल काँग्रेसला 163 जागा, डाव्यांना 126 जागा, भाजपला 1 तर इतरांना 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.
==============================================
माझाही आंतरजातीय विवाह, पण माझी कोणी हत्या केली नाही: रामदास आठवले
पुणे: ‘सैराट या सिनेमात आंतरजातीय विवाह केला म्हणून आर्ची आणि परश्याची हत्या करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं आहे. मीपण आंतरजातीय विवाह केलेला आहे. परंतु माझी हत्या कोणी करू शकलं नाही.’ अशी प्रतिक्रिया आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली आहे. ते आज पुण्यात बोलत होते.
‘सैराट सिनेमाबाबत बरीच चर्चा सुरु आहे. आतंरजातीय विवाहाकडे सर्व समाजाचं लक्ष वेधणारा हा सिनेमा आहे. अनेक चित्रपटानं मागे टाकून या सिनेमानं ५५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपट हा समाजाला जोडण्याचं काम करतो.’ असं म्हणत रामदास आठवले यांनी या सिनेमाचं आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं कौतुक केलं आहे.
‘आज 16 मे आहे. आजच्याच दिवशी माझा आंतरजातीय विवाह झाला होता. सैराट सिनेमाही याच विषयावर बेतलेला आहे. त्यात दोघांची हत्या केल्याचं दाखवलं आहे. मात्र, मी आंतरजातीय विवाह केल्यानंतर माझी काही हत्या करण्यात आली नाही.’ असं वक्तव्य आठवले यांनी केलं
‘काही ठिकाणी सैराटसारख्या घटना घडत आहे. त्यामुळे समाजाला एकत्र कसं आणायचं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मी हा सिनेमा अजून पाहिलेला नाही. मात्र, माझाही आंतरजातीय विवाह झाल्यामुळे आता मी देखील सैराट पाहणार आहे. त्याचबरोबर आपणही सर्वांनी सैराट सिनेमा नक्की पहावा.’ असा सल्लाही आठवलेंनी दिला आहे.
==============================================
घरात मौल्यवान सामान ठेवू नका, पोलिस महासंचालकांचा सल्ला
नागपूर : राज्याच्या पोलिस महासंचालकांनी अनाहुत सल्ला देऊन राज्यातील जनतेला धक्का दिला आहे. घरफोडी थांबवण्यासाठी घरात मौल्यवान ऐवज ठेवू नका, असं धक्कादायक आवाहन पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केलं आहे.
पोलिस दलातील कामचुकार आणि बेजबाबदार पोलिस कर्मचाऱ्यांमुळे खाकी वर्दीवरचा विश्वास कमी होत चालला असताना महासंचालकांच्या वक्तव्यामुळे जनतेच्या मनात धास्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कुणीही घरात सोनं-नाणं किंवा किंमती ऐवज ठेवू नका असं धक्कादायक आवाहन दीक्षित यांनी केलं.
नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खरं तर पोलिसांनी जनतेच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करणं गरजेचं असतं. मात्र घरात किंमत ऐवज न ठेवण्याचा सल्ला प्रवीण दीक्षितांनी दिला आहे. त्यामुळे जनतेच्या संपत्तीचं संरक्षण करण्यास महाराष्ट्र पोलिस सक्षम नाहीत का, असा सवाल या वक्तव्यानंतर उपस्थित होत आहे.
==============================================
मुंबईत 15 वर्षांखालील तरुणींच्या गर्भपातात 114 टक्क्यांनी वाढ
मुंबई : ‘सोळावं वरीस धोक्याचं’ असं एकेकाळी म्हटलं जायचं. मात्र, आता सोळाव्या वर्षाआधीच तरुणाई धोक्याच्या वळणावर येऊन ठेपली आहे. गेल्या वर्षभरात मुंबईत झालेल्या गर्भपातांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या तीन वर्षात 15 वर्षांखालील गरोदर मुलींच्या गर्भपातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
15 वर्षांखालील गर्भपातांच्या संख्येत 144 टक्क्यांनी वाढ झाल्याचं माहिती अधिकाराद्वारे उघड झालं आहे. 2011 या वर्षात 15 वर्षांखालील मुलींच्या गर्भपाताची संख्या 111 एवढी होती. 2012 मध्ये या वयोगटातल्या मुलींमध्ये गर्भपातांचं प्रमाण 185 पर्यंत वाढलं. तर, 2015 मध्ये ही संख्या 271 वर पोहचली आहे.
गेल्या वर्षभरात मुंबईत एकूण 34 हजार गर्भपात झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे. गर्भपाताच्या वाढत्या टक्केवारीमुळे डॉक्टर आणि समाजशास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षभरात मुंबईत एकूण 34 हजार गर्भपात झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे. गर्भपाताच्या वाढत्या टक्केवारीमुळे डॉक्टर आणि समाजशास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
लैंगिक आकर्षण, त्याबाबत असणारं अज्ञान आणि लैंगिक शोषण यातून अल्पवयीन मुली गरोदर राहत असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचं मत आहे. 2014-15 या वर्षात मुंबईत 31 हजार महिलांनी गर्भपात केला. त्यापैकी सहा हजार केसेस एकट्या अंधेरीतील होत्या. खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन गर्भपात करून घेणाऱ्या मुलींची संख्या यापेक्षाही जास्त असू शकते. त्यामुळे हा आकडा अधिक असल्याचीही भीती व्यक्त करण्यात आली आहे.
==============================================
महाराष्ट्राच्या नरसिंग यादवविरोधात सुशीलकुमारचा शड्डू
मुंबई : रिओ ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी नरसिंग यादवशी आपली ‘चाचणी कुस्ती’ खेळवण्यात यावी, या मागणीसाठी पैलवान सुशीलकुमारनं आता दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रिओच्या तिकीटासाठी महाराष्ट्राचा नरसिंग यादव आणि सलग दोन ऑलिम्पिकचा पदकविजेता सुशील कुमार या दोघांमध्ये चढाओढ सुरू आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये 74 किलो वजनी गटात भारताचं प्रतिनिधित्व नरसिंग यादव करणार की सुशीलकुमार याचा निर्णय उद्या भारतीय कुस्ती फेडरेशनच्या बैठकीत होण्याची शक्यता होती. मात्र त्याआधीच सुशीलकुमारने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सोनपतमध्ये आयोजित ऑलिम्पिक सराव शिबीरात सुशीलकुमारचा समावेश झालेला नाही. त्यात केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
भारतासाठी मी ऑलिम्पिकचा कोटा मिळवला असून, मलाच संधी मिळायला हवी अशी मागणी नरसिंग यादवनं केली आहे. तर सुशीलकुमारनं नरसिंग यादवशी चाचणी कुस्ती खेळवण्यात यावी अशी मागणी केली.
भारतीय कुस्ती फेडरेशनच्या बैठकीत मंगळवारी निर्णय होण्यापूर्वीच सुशीलकुमारने दिल्ली हायकोर्टात धाव घेतल्यानं या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
==============================================
वाहतुकीचे नियम मोडल्यावरील दंडाच्या रकमेत वाढ
मुंबई : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर वसूल केल्या जाणाऱ्या दंडात लवकरच मोठी वाढ होणार आहे.
दारु पिऊन गाडी चालवल्यास थेट 10 हजार रुपयांपर्यंत दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, तर गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि अपघातांना आळा बसावा यासाठी अधिकाधिक दंड वसूल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
दरम्यान गेल्या काही महिन्यांत झालेल्या अपघातांमध्ये अल्पवयीन चालकांचं प्रमाण मोठं होतं. त्याला आळा घालण्यासाठी अशा अपघातांमध्ये मुलांच्या पालकांना दोषी ठरवण्यात येणार आहे.
==============================================
...तर पोलिसांनाच दंड ठोठावणार, यवतमाळ पोलिस अधीक्षकांची नियमावली
यवतमाळ: सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यानं कर्तव्यात कसूर केल्यास आधी चौकशी, मग साक्षीपुरावे आणि अखेरीस क्वचितच कारवाई. असं आजवरचं चित्रं होतं. मात्र, पोलिस प्रशासन अधिक पारदर्शी बनविण्यासाठी यवतमाळ पोलिस अधीक्षकांनी एक अभिनव नियमावली तयार केली आहे. निश्चित वेळेत नेमून दिलेली जबाबदारी पार पाडली नाही तर रोख रकमेच्या स्वरुपात संबंधित पोलिसाकडून दंड आकारला जाणार आहे.
विशेष म्हणजे या दंडात कर्मचारी किंवा अधिकारी असा कोणता ही भेद केला जाणार नाही. पोलिस दलात मात्र या नव्या नियमावलीला मोगलाई संबोधले जात आहे.
कर्तव्यावर गैरहजर – दोन हजार दंड
रात्र गस्तीला गैरहजर – तीन हजार दंड
बंदोबस्त किंवा व्हीआयपी बंदोबस्तास गैरहजर – पाच हजार दंड
बेशिस्त वर्तणूक – पाच हजार दंड
गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई न केल्यास – पाच हजार दंड
आवश्यक असतानाही आरोपीला अटक न केल्यास – पाच हजार दंड
पोस्ट मार्टम रिपोर्ट मिळविण्याकरिता उशीर केल्यास – तीन हजार दंड
घटनास्थळी न जाणाऱ्या, उशिरा पोहोचणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना – पाच हजार दंड
साक्षीदारांचे जबाब न नोंदवणाऱ्या अधिकाऱ्यांना – तीन हजार दंड
गंभीर गुन्हा घडल्यास ठाणेदार घटनास्थळी न गेल्यास किंवा उशिरा पोहोचल्यास – दहा हजार दंड
घटना गंभीर असताना अधिकारी घटनास्थळावरुन लवकर कार्यालयात परतल्यास – पाच हजार दंड
अशी पोलिसांची नवी नियमावली असणार आहे. यवतमाळचे पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी १३ मे रोजी ही नियमावली यवतमाळ जिल्ह्यात लागू केली आहे. अनेकदा प्रकरणं, गुन्हे विनाकारण प्रलंबित ठेवले जातात. परिणामी वेळेत न्याय मिळत नाही. कधी-कधी प्रकरणे प्रलंबित राहिल्यानं न्यायालयकडून ताशेरे ओढले जाते. आता मात्र यापुढे कोणी हलगर्जीपणा केल्यास त्याला दंड भरावा लागणार आहे.
सुरवातीला कर्मचाऱ्यांना समज देत कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल. त्यानंतर दंड वसूल केला जाईल असे अखिलेशकुमार सिंह म्हणाले.
डीवायएसपी दर्ज्याच्या अधिकाऱ्यांवर ही दंडाची तरतूद या नियमावलीत आहे. दरम्यान, आतापासूनच पोलिस दलात या नियमावलीचा विरोध सुरु झाला आहे. चुकीच्या आणि अर्धवट तपासामुळे आरोपी सुटल्यास न्यायालयात पोलिसांना जबाबदार धरलं जातं. या नियमावलीमुळे निष्काळजीपणाच्या वृत्तीला लगाम लावण्याचे प्रयत्न केले जाणार आहे.
==============================================
हृतिक-कंगना वादावरील चित्रपटात हृतिकच मुख्य भूमिकेत
मुंबई : बॉलिवूडचा मोस्ट डिझायरेबल अभिनेता हृतिक रोशन आणि ‘क्वीन’ कंगना रनौत यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. हा वाद एखाद्या सिनेमाला शोभेल असाच म्हणावा लागेल. प्रत्येक मोठ्या बातमीतून नाट्य शोधणारं बॉलिवूड याबाबतीत मागे कसं राहील?
हृतिक-कंगना यांच्यातील या ‘सायबरवॉर’वर लवकरच एखादा चित्रपट येण्याची शक्यता आहे. हृतिक-कंगनातील वाद हे एक निमित्तमात्र आहे, हृतिकवर एखादी तरुणी खरंच जीवापाड प्रेम करत पाळत ठेवू शकते. एका हँडसम तरुणाचा पिछा पुरवणाऱ्या एका मुलीवर सिनेमाचं
कथानक बेतल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे.
बॉलिवूडमधील एका प्रथितयश निर्मात्याकडून आणि एका नवोदित दिग्दर्शकाकडून हृतिकला स्क्रिप्ट मिळाल्याची माहिती आहे. सायबर स्टॉकिंग करणाऱ्या तरुणीला हृतिकची व्यक्तिरेखा बळी पडते आणि तो सर्वांच्या चर्चेचा विषय ठरतो, अशी सिनेमाची कथा असेल.
हृतिक सध्या ‘काबील’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे त्याच्याकडे इतर सिनेमांसाठी वेळ नाही. मात्र त्याने स्क्रिप्ट ऐकण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. त्यामुळे कंगना-हृतिकमधील वादाशी साम्य असलेला हा चित्रपट हृतिकने स्वीकारला, तर स्वतःवर
आधारित चित्रपटात खुद्द हृतिकच काम करताना दिसेल.
==============================================
मनोरमा देवी शरण, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- ऑनलाइन लोकमतपाटणा, दि. १७ - जेडीयूच्या निलंबित आमदार मनोरमा देवी यांनी अखेर मंगळवारी सकाळी गया न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनोरमा देवी यांच्या घरात मद्याच्या बाटल्या सापडल्यानंतर त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते.अटक चुकवण्यासाठी त्या पळत होत्या. मनोरमा देवींचा मुलगा रॉकी यादवने त्याच्या गाडीला ओव्हटेक केले म्हणून आदित्य सचदेव या १९ वर्षीय युवकाची गोळया झाडून हत्या केली होती. न्यायालयाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी मनोरमा देवी त्यांच्या वकिलासह न्यायालयात हजर झाल्या.आत्मसमर्पणाची त्यांची याचिका प्राधान्याने विचारात घ्यावी अशी त्यांच्या वकिलाने न्यायालयाला विनंती केली. प्रसारमाध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्या सकाळीच न्यायालयात हजर झाल्या. मनोरमा देवी या आजारी असतात त्यामुळे तुरुंगात त्यांना वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात अशी त्यांच्या वकिलाने न्यायालयाला विनंती केली.
==============================================
इथे केला आर्ची-परशाने संसार....
- ऑनलाइन लोकमतपुणे, दि. १७ - संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणा-या सैराट चित्रपटातील ‘आर्ची - परशा’चा संसार ज्या हैद्राबादमधील झोपडपट्टीमध्ये सुरु होतो; ती झोपडपट्टी हैद्राबादमधील नसून पुण्याच्या मध्यवस्तीतील ‘जनता वसाहत’ येथील आहे. चित्रपटाच्या उत्तरार्धात दाखवण्यात आलेली आक्काची दोन्ही घरे, सार्वजनिक शौचालय, घरच्यांची आठवण आल्यामुळे आर्चीने जिथून फोन केला तो पीसी... हे सर्व काही पुण्यातील 'जनता वसाहत' येथे चित्रीत झाले. या साध्या ‘लोकेशन्स’ वापरुन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी कष्टक-यांच्या वस्त्यांची अवस्थाही समाजासमोर आणली आहे.पर्वती पायथ्यापासून ते हिंगण्यापर्यंत विस्तारलेल्या जनता वसाहतीमध्ये 'आर्ची परशाचे' घर शोधणे म्हणजे फारच अवघड काम होते. वसाहतीमधील पोलीस चौकीपासून थोड्या अंतरावर गेल्यावर त्यांच्या खोलीच्या दिशेने टेकडीवर चढायला सुरुवात करावी लागते. अरुंद गल्ली बोळांमधून चढून गेल्यानंतर अगदी वरच्या बाजुला वाघजाई मंदिर लागते. या मंदिराच्या उजव्या हाताला काही झोपड्या आहेत. झोपडपट्टीचे हे आकाशाला भिडलेले शेवटचे टोक आहे. तेथेच लक्ष्मी रमाकांत लांडगे यांची खोली आहे. लक्ष्मी या पत्नी रमाकांत, मुलगी ऐश्वर्या, अंतरा आणि मुलगा आदित्य यांच्यासह राहण्यास आहेत.
==============================================
मुंबईचे भवितव्य गुजरात, दिल्ली, बंगलोरच्या पराभवावर
- नामदेव कुंभारमुंबई, दि. १६ - मुंबई इंडियन्सने मागील लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर ८० धावांनी धडाकेबाज विजय मिळवताना नवव्या इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या असल्या तरी इतर संघाच्या पराभवावर त्यांना प्लेऑफ मध्ये प्रवेश मिळणार आहे. मुंबई संघ १३ सामन्यात ७ विजय आणि ६ पराभवासह १४ गुण मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. मुंबईचा पुढील सामना बलाढ्य गुजरात लायन्स बरोबर आहे. या सामन्यात मुंबईला विजयाबरोबरच धावगती वाढवण्याचं आव्हान असेल. तर दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आता ११ सामन्यांत १२ गुण झाले असून, तो पाचव्या स्थानी घसरला आहे. दिल्लीचे उर्वरीत ३ सामने पुणे, हैदराबाद आणि बँगलोर बरोबर आहेत.कोलकाता, मुंबई, गुजरात, दिल्ली, आणि बंगलोर या प्रत्येक संघाला प्लेऑफ मध्ये स्थान पटकावण्याची संधी आहे. कोलकाताचे १२ सामन्यात ७ विजयासह १४ गुण आहेत. त्यांची आगामी लढत गुजरात आणि हैदराबाद संघाबरोबर आहेत. कोलकाताची धावगती + 0.373 अशी चांगली आहे. बंगलोरने १२ सामन्यात ६ विजयासाह १२ गुणांची कमाई केली आहे. त्यांचे उर्वरित सामने दिल्ली आणि पंजाब यांच्या बरोबर आहेत.
==============================================
जब्याला नागराज देतो महिना सात हजार रुपये!
- राजा मानेसोलापूर, दि. १७ - कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गावोगावी होणार्या छोट्या-मोठय़ा कार्यक्रमात हलगी वाजविणे आजही त्यांच्या नशिबी आहे.. मोलमजुरी ही देखील आईच्या पाचवीला पूजलेलीच..हे वास्तव चित्र आहे देश-विदेशात गाजलेल्या 'फॅन्ड्री'चा हीरो जब्या.. सोमनाथ लक्ष्मण अवघडे याच्या जीवनाचे !त्यात आनंदाची बाब म्हणजे सोमनाथ आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी सच्ची धडपड करतोय. इयत्ता दहावी पार करून आता तो कॉलेजला निघण्याच्या तयारीला लागलाय.'सैराट'चा यशाचा वारू सुसाट असताना त्यावर स्वार झालेला नागराज मंजुळे त्याला दरमहा सात हजार रुपये देऊन मदत करतोय. याशिवाय सोमनाथच्या जीवनातील पालकाची खरी भूमिका वटविणारे करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. प्रदीप मोहिते व त्यांच्या पत्नी कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. संगीता मोहिते यांनीही त्याचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी चंग बांधला आहे.'सैराट' अनेक विक्रम नोंदवत असताना 'फॅन्ड्री'चा हीरो आणि त्याचे कुटुंब आज काय करताहेत हे जाणण्याचा 'लोकमत'ने प्रयत्न केला. नागराजला फॅन्ड्रीचा हीरो जब्या करमाळा तालुक्यातील केम या छोट्याशा गावात हलगी वाजवणारा सोमनाथ लक्ष्मण अवघडे हा शाळकरी मुलगा सापडला. सोमनाथचे वडील लक्ष्मण पोतराज तर आई जयश्री घरकाम व मोलमजुरी करणारी. हातावरचे पोट असलेल्या या कुटुंबातील सोमनाथ फॅन्ड्रीमुळे रात्रीत जब्याच्या रूपाने हीरो झाला अन् देश-विदेशात पोहोचला.
==============================================
चव्हाणच्या लॉकरमध्ये सव्वापाच किलो सोने
- नाशिक : राज्यभरातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले केबीसीचा प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब व आरती चव्हाण यांच्या बँकेतील सहाव्या लॉकरमध्ये सोमवारी एक कोटी ५९ लाख रुपये किमतीचे पाच किलो ३०० ग्रॅम वजनाचे सोने आढळून आले़आर्थिक गुन्हे शाखेने चव्हाण दाम्पत्याच्या लॉकरमधून आतापर्यंत १३ किलो ९६५ ग्रॅम सोने व २ किलो ३०० ग्रॅम चांदी असा ऐवज जप्त केला आहे़ केबीसी मल्टिट्रेड अॅण्ड रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचा प्रमुख सूत्रधार भाऊसाहेब व आरती चव्हाण यांनी गुंतवणूकदारांना तिप्पट रकमेचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये जमा केले़ मात्र गुंतवणूकदारांना परतावा न देता त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. गुन्हा नोंदवल्यानंतर सिंगापुरला फरार झालेल्या चव्हाण दाम्पत्यास मुंबई विमानतळावरून अटक झाली़ आतापर्यंत केबीसीची ८० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती़
==============================================
जलयुक्त शिवार अभियानाला मुख्यमंत्री निधीचा हातभार
- मुंबई : राज्यातील तीव्र टंचाईग्रस्त जिल्ह्यांतील जलयुक्त शिवार अभियानाची कामे पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १६ जिल्ह्यांना प्रत्येकी दोन कोटी रूपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्याचा लाभ दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेल्या मराठवाडा व विदर्भातील प्रत्येकी सात आणि उर्वरीत महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांना मिळणार आहे.दुष्काळ निवारणासाठी राज्यातील जनतेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहभाग दिला होता. हा निधी देण्यामागील जनतेची भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारण आणि शेतीसाठी शाश्वत सिंचन निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवारची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार टंचाईग्रस्त १६ जिल्ह्यांना प्रत्येकी दोन कोटी रुपये देण्यात येणार आहेत.दुष्काळ निवारणासाठी आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद विभागीय आयुक्तांना १० कोटी, लातूर जिल्ह्यासाठी ५ कोटी ९४ लाख आणि १६ जिल्ह्यांसाठी ३२ कोटी असे एकूण ४८ कोटी रु पये मंजूर केले आहेत. त्यातील औरंगाबाद विभागीय आयुक्तांना सर्व १० कोटी, लातूर जिल्ह्यासाठी तीन कोटी आणि १६ जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक कोटी याप्रमाणे १६ कोटी, असे एकूण २९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
==============================================
गायक अंकित तिवारीला पाच हजार रुपयांचा दंड
- मुंबई : बलात्कार प्रकरणातून आरोपमुक्त करण्यात यावे, यासाठी केलेल्या अर्जावरील युक्तिवादासाठी वारंवार मुदत वाढवून मागितल्याप्रकरणी सोमवारी विशेष महिला न्यायालयाने गायक अंकित तिवारीला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.यापूर्वी २० एप्रिल आणि २५ एप्रिल रोजी अंकित तिवारी सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याने सत्र न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. मात्र त्याच्या वकिलाने वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज केल्याने सत्र न्यायालयाने वॉरंटला स्थगिती दिली. परंतु, वॉरंट रद्द करण्यास नकार दिला. ‘जोपर्यंत आरोपी न्यायालयात हजर राहत नाही, तोपर्यंत वॉरंट रद्द करणार नाही,’ असे विशेष न्यायालयाच्या न्या. अंजु शेंडे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर तिवारीच्या वकिलाने या प्रकरणातून आरोपमुक्त करण्यात यावे, यासाठी न्यायालयात अर्ज केला.यापूर्वी ४ मे रोजी अंकित हजर न राहिल्याने १६ मेपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली. मात्र सोमवारच्या सुनावणीतही अंकित गैरहजरच राहिला. नाराज झालेल्या न्यायालयाने अंकितला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावत १९ मे रोजी या अर्जावर सुनावणी ठेवली आहे.अंकितने २०१२ ते २०१३ या कालावधीत अनेक वेळा बलात्कार केल्याची तक्रार एका विवाहितेने केली होती. विशेष न्यायालयाने अंकितवर आरोप निश्चित केले. संबंधित महिलेची या संबंधांना सहमती होती, असे अंकितने उच्च न्यायालयाला सांगितले. उच्च न्यायालयाने त्याच्यावरील आरोप रद्द केले. अंकितने विशेष महिला न्यायालयात आरोपमुक्त करण्यासाठी अर्ज केला आहे.
==============================================
करकरेंच्या तपासातील निष्कर्ष जाहीर करा
- मुंबई : तत्कालीन एटीएस प्रमुखहेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी केलेल्या तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले, भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सरकारने अनेक तथ्य जनतेसमोर मांडण्याची गरज आहे. हेमंत करकरे हयात असताना त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी केलेल्या तपासावर भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेतले होते. त्यासंदर्भात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मनमोहन सिंग यांनी वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांसह तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना अडवाणींच्या निवासस्थानी पाठवून या चौकशीत समोर आलेल्या गंभीर बाबी अवगत केल्या होत्या. वस्तुस्थिती लक्षात आल्यामुळे अडवाणी यासंदर्भात एका शब्दानेही कधी बोलले नाहीत, याकडे मोहन प्रकाश यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. आज करकरेंच्या तपासावर अयोग्य आक्षेप घेतले जात असताना अडवाणींनी मौन न बाळगता त्या वेळी त्यांच्यासमोर कोणते तथ्य आले होते, ते जाहीर करावे अशी अपेक्षा मोहन प्रकाश यांनी व्यक्त केली.मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची माहिती देण्यासाठी करकरे यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली होती. एवढेच नव्हे, तर संबंधित संघटनेकडून सरसंघचालक भागवत यांच्या जिवालाही धोका असल्याचे करकरे यांनी या भेटीमध्ये सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात सरसंघचालकांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. भागवतांनी त्यांची करकरेंशी भेट झाली होती की नाही, ते जाहीर केले पाहिजे, अशीही मागणी मोहन प्रकाश यांनी केली.
==============================================
‘अल कायदा’ आता सिरियाला करणार लक्ष्य
- वॉशिंग्टन : अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयएने दशकभर ड्रोनने केलेल्या हल्ल्यांमुळे फारच दुबळ्या बनलेल्या अल कायदाच्या पाकिस्तानातील वरिष्ठ नेतृत्वाने आपल्या गटाचे भवितव्य सिरियामध्येच असल्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर गुप्तपणे डझनपेक्षा जास्त अनुभवी लोक सिरियात पाठविले असल्याचे वरिष्ठ अमेरिकन आणि युरोपियन गुप्तचरांनी तसेच दहशतवादविरोधी अधिकाऱ्यांनी सांगितले.अल कायदाच्या वरिष्ठ जिहादींच्या हालचालींवरून या दहशतवादी संघटनेसाठी सीरियाचे महत्त्व वाढत चालल्याचे दिसते. त्यामुळे या गटाचा इस्लामिक स्टेटशी (आयएस) असलेला रक्तरंजित संघर्ष वाढू शकतो, असे पाश्चिमात्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सिरियामध्ये पर्यायी मुख्यालय स्थापन्याची प्रक्रिया सुरू करण्यास हस्तकांना तसेच इस्लामिक स्टेटला शह देण्यासाठी अल कायदाच्या सिरियाशी संलग्न असलेल्या नुसरा फ्रंटच्या माध्यमातून प्रत्यक्ष लोकांमध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे.आयएसपासून २०१३मध्ये नुसरा फ्रंट वेगळी झाली. पायाभूत म्हणता येईल अशी परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत स्वायत्त राज्य (एमिरेट) स्थापन करण्यास आतापर्यंत अल कायदा आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या गटांचा विरोध होता; त्यामुळे आताचा झालेला बदल महत्त्वाचा समजला जात आहे.
==============================================
घराच्या बागेतही उतरवता येणार विमान
- बर्लिन : घरात भिंतीला असलेल्या इलेक्ट्रिक सॉकेटमधून वीज घेऊन दोन आसनी व घराच्या बागेतही उतरविता येईल असे विमान जर्मनीमध्ये तयार होत आहे. नव्याने सुरू झालेली जर्मन कंपनी जगातील पहिलेच अति हलके व खासगी, उभ्या अवस्थेत उड्डाण करणारे, उतरणारे आणि पर्यावरणपूरक विमान बनवीत आहे.दोन जण बसतील असे हे पूर्णपणे इलेक्ट्रिक विमान असून, त्याचे पंख हे नलिका आकाराचे असल्यामुळे ते खूपच साधे, आवाज न करणारे आणि पारंपरिक हेलिकॉप्टरच्या तुलनेत सुरक्षित असे आहे. रोजच्या रोज वापरता येईल असे विमान बनविण्याचा आमचा उद्देश आहे. आम्ही असे विमान बनवीत आहोत की, ज्याला विमानतळावर गुंतागुंतीची आणि खर्चीक अशा पायाभूत सुविधांची गरज लागणार नाही, असे लिलुम या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅनियल वेगॅन्ड म्हणाले. आवाज आणि प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही इलेक्ट्रिक इंजिन्स वापरणार आहोत व त्यांचा वापर खेड्यापासून शहरांपर्यंतही करता येईल, असे डॅनियल म्हणाले. या विमानाच्या निम्म्या आकाराच्या नमुन्याच्या उड्डाण चाचण्या सध्या घेण्यात येत आहेत. विमानाचा पूर्ण आकाराचा व चालकविरहित नमुना या उन्हाळ्यात तयार असेल, असे एझेडओ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉरस्टेन रुडोल्फ यांनी सांगितले.।न्युनिक विद्यापीठातून पदवीघेऊन बाहेर पडलेल्या चार जणांनी ही कंपनी स्थापन केली असून, डॅनियल त्यापैकी एक आहेत. विमानाचा आवाका500किलोमीटरचा असेल व ते २०१८मध्ये विक्रीला उपलब्ध असेल. त्याचे नियंत्रण फ्लाय बाय वायरने व टचस्क्रीनवर फिचर्स असतील. साठवणुकीची क्षमताही जास्त असेल व त्याची बॅटरी घरातील इलेक्ट्रिक सॉकेटवरही चार्ज करता येईल.
==============================================
डॉक्टरांच्या काळ्या धंद्याचं वास्तव, ऑपरेशन डॉक्टर
पुणे: खरं तर डॉक्टरला देवाचं रुप मानतात. कारण अनेक रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचं काम अनेक डॉक्टरांनी केलं आहे. पण गेल्या काही वर्षात काही डॉक्टरांनी फक्त पैसा कमवायचा उद्देश ठेवून रुग्णसेवेचा व्यवसाय मांडला आहे.
‘डिसेंडिंग डायग्नोसिस’ या पुस्तकातून दोन डॉक्टरांनीच डॉक्टरांच्या काळ्या धंद्याचं वास्तव समोर आणलं आहे. डॉ. अभय शुक्ला आणि डॉ. अरुण गद्रे असं या डॉक्टर-लेखकांचं नाव आहे.
==============================================
ऑपरेशनडॉक्टर : कुणाला गर्भपाताची, तर कुणाला मूतखड्याची भीती
मुंबई: डॉक्टरांच्या काळ्या कारभाराचा फटका काही रुग्णांनाही बसला आहे. चुकीच्या उपचारामुळे रुग्णांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली.
डॉक्टरांच्या अशाच गोरखधंद्याची शिक्षा भोगणारे मुलुंडचे चंद्रशेखर कुलकर्णी. वय वर्षे 63… 2012 साली पोटदुखी सुरु झाली. फॅमिली डॉक्टर म्हणाले किडनी स्टोन असेल. मुलुंडच्या सुश्रुशा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले… तिथल्या डॉक्टरांनी निदान केलं हर्नियाचं… आणि त्यानंतर थेट कॅन्सरचं निदान केलं.
चुकीच्या उपचारामुळे कुलकर्णी कोमात गेले… मृत्यूशी झुंज सुरु झाली… कशी बशी मृत्यूला मात देऊन चंद्रशेखर जिंकले. पण त्यानंतर सुरु झाली… अनंत काळाची डॉक्टरांसोबत लढाई.
डॉक्टरांच्या नफेखोरीची आणखी एक पीडित श्रेया निमोणकर…
गर्भाशयाची पिशवी काढताना, दोन्ही मूत्रपिंड नलिकांना इजा झाली, त्यामुळे माझ्या दोन्ही किडन्या डॅमेज झाल्या. डॉक्टरांनी माफी मागितली, पण दुसऱ्या दिवशी काय करायचं ते करून घे, अशी भाषा केली, असा अनुभव श्रेयांनी सांगितला.
गेल्या 6 वर्षांपासून डॉक्टरांच्या निष्काळजीपणाची शिक्षा भोगणाऱ्या श्रेया निमोणकर यांची कहाणी प्रत्येकाच्या काळजात चर्रर्रर्र करणारी आहे
“मी आजारी होते, तेव्हा माझी मुलगी माझ्या बेडखाली झोपायची, माझे पती लेडीज वॉर्डाशेजारी झोपायचे”, असंही श्रेयांनी सांगितलं.
पुण्यातल्या रीना यांनाही असाच अनुभव आला असता, पण सेकंड ओपिनियनने त्यांना वाचवलं.
माझं मिसकॅरेज होईल अशी मला भीती घातली… पण मी सेकंड ओपिनियन घेतलं, आणि मी बचावले, असं रीना म्हणाल्या.
पुण्यातल्या रीना सुदैवी म्हणा किंवा जागरुक म्हणा… त्या बचावल्या, पण असे अनेक रुग्ण आहेत… ज्यांना सेकंड चान्स मिळाला नाही… कारण त्यांच्या जीवापेक्षा डॉक्टरांच्या तराजूत पैसा हा वजनी ठरला.
==============================================
खडसेंच्या जावयाची अलिशान लिमोझिन जप्त करा - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया
मुंबई : राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेलवलकर यांची सोनाटा लिमोझिन ही अलिशान गाडी जप्त करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.
अंजली दमानिया यांनी ट्विट करुन ही मागणी केली आहे. खडसेंच्या जावयाची लिमोझिन कार अवैध असल्याचा दावा दमानियांनी केला आहे.
“भाजप सरकार एकनाथ खडसेंच्या जावयाची MH 19 AQ 7800 ही अवैध सोनाटा लिमोझिन कार जप्त करणार का?” असा सवाल दमानियांनी केला आहे.
==============================================
मोदींचे बनावट फोटो अपलोड करणाऱ्याला अटक
| |
-
| |
बंगळूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बनावट छायाचित्र सोशल नेटवर्किगवर अपलोड करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (मंगळवार) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मोहम्मद मेहबूब (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोपल जिल्ह्यातून सोमवारी (ता. 16) रात्री त्याला अटक केली. मोहम्मद याने मोदींचे वादग्रस्त छायाचित्र तयार करून फेसबुकवर अपलोड केले होते. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने तक्रार दाखल केली होती.‘
‘मोहम्मद याने वादग्रस्त छायाचित्र फेसबुकवरील त्याच्या खात्यावर प्रोफाइल पिक्चर म्हणून ठेवले होते. मात्र, त्याने आपण हे छायाचित्र बनवले नसून, मित्राने पाठविल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे,‘ असेही पोलिसांनी सांगितले.

'पंधरा महिन्यात दिल्लीने आम, भाजपला नाकारले'
| |
-
| |
नवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) पोटनिवडणुकीच्या निकालानंतर ‘पंधरा महिन्यातच दिल्लीने भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाला नाकारले आहे‘ अशा प्रतिक्रिया कॉंग्रेसने व्यक्त केल्या आहेत.
एमसीडीमध्ये 13 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. त्यामध्ये आम आदमी पक्षाला पाच, कॉंग्रेसला चार, भाजपला तीन तर अपक्षाला एक जागा मिळाली. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कॉंग्रेस नेते अजय माकन यांनी, "मला आनंद आहे की कॉंग्रेसने दिल्लीत पुनरागमन केले आहे. केवळ पंधरा महिन्याच्या कालावधीतच दिल्लीने आप आणि भाजपला नाकारले. यापूर्वी कधीही न जिंकलेल्या चार जागांवर कॉंग्रेसला विजय मिळाला आहे. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे हे मोठे यश आहे. त्याबद्दल मी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. या सर्वांचे श्रेय आमचे नेते राहुल गांधीजी यांना जाते. या विजयात त्यांचे खूप मोठे योगदान आहे.‘ दिल्लीतील झिलमिल, मुनिरका, खिचडीपूर आणि कमरुद्दीन नगर वॉर्डात कॉंग्रेसने विजय मिळविला आहे. तर शालिमार बाग, वजिरपूर आणि नेवाडा वॉर्डातून भाजप उमेदवार निवडून आले आहेत.

पाच दिवस देशात उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता
| |
-
| |
मुंबई - आजपासून (ता. 17) पुढचे पाच दिवस उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतासह देशाच्या विविध भागांत उष्णतेची तीव्र लाट पसरण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (आयएमडी) वर्तविण्यात आली आहे.
आयएमडी आणि महाराष्ट्र सरकारने आज प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, आजपासून पाच दिवसांनंतर मे महिन्याच्या शेवटी उष्णतेची लाट हळूहळू कमी होत जाईल. विदर्भ, राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगण शिमल्यामध्ये आधीच उष्णतेची लाट आलेली आहे. ही लाट १७ ते २१ मे या काळात उत्तर-मध्य महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, चंदिगड आणि गुजरातसह देशाच्या काही भागांतही येईल.
यंदा मॉन्सूनचे सहा दिवस उशिराने आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण कर्नाटकमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यांना थोडाफार दिलासा मिळेल, असा अंदाज आहे. सोमवारी मध्य प्रदेशातील नोवगाँग येथे देशातील सर्वाधिक ४७ अंश तापमानाची, तर छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे देशातील सर्वात कमी २३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर मराठवाडा- विदर्भात सूर्य आग ओकू लागला असून नागपुरातील तापमान ४५ अंशांच्या वर तर राज्यातील तापमान ४३ अंशावर पोहोचले आहे.
==============================================
जैसलमेर (राजस्थान)- देशभरातील विविध पोलिस चौक्यांमधील बलात्काराच्या गुन्ह्यांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, येथील पोलिस चौकीमध्ये गेल्या 23 वर्षांत एकही बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला नाही.
जैसलमेर येथून 15 कि.मी. अंतरावर असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर शाहगद पोलिस चौकी आहे. या पोलिस चौकीमध्ये 1993 मध्ये शेवटचा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या पोलिस चौकीत 23 वर्षांत फक्त 55 इतर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत एकही आरोपी चौकीमध्ये बंदिस्त नाही.
पोलिस चौकीची फक्त इमारत उभी आहे. इमारतीला वीज व पाण्याची सोय नाही. चौकीच्या जवळपास लोकसंख्याही नाही. पोलिस निरीक्षकासह 15 पोलिस कर्मचाऱयांची पदे नियुक्त करण्यात आली आहेत. परंतु, सध्या सहाय्यक पोलिस निरीक्षक व सहा पोलिस कर्मचारी या चौकीमध्ये आहेत. सरकारी कामासाठी सॅटेलाइट फोनचा वापर केला जातो.
'त्या' चौकीत 23 वर्षात बलात्काराचा गुन्हा नाहीच

मुंबई: भारतातील नागरिकांना गेल्या वर्षभरात विविध कारणांसाठी परदेशात 4.6 अब्ज डॉलरची रक्कम (रेमिटन्स) पाठवली आहे. देशातील नागरिकांना ‘लिबर्लाइज्ड रेमिटन्स स्कीम‘अंतर्गत गिफ्ट, नातेवाईकांची देखभाल, गुंतवणूक किंवा अगदी मालमत्ता खरेदीसाठी पैसा पाठविण्यास परवानगी आहे. याच योजनेचा फायदा करुन घेत भारतीयांनी देशाबाहेर विक्रमी रक्कम पाठवली आहे.
या योजनेअंतर्गत बँकिंग व्यवहारामार्फत 2,50,000 डॉलरपर्यंत रक्कम देशाबाहेर नेण्याची परवानगी आहे. गेल्या वर्षभराचा आढावा घेतला असता जून 2015 नंतर रेमिटन्समध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जून महिन्यापुर्वी दर महिन्याला देशातून 10 कोटी डॉलरची रक्कम बाहेर जात असे. त्यानंतर हा आकडा 40 कोटी डॉलरपर्यंत पोचला. जवळच्या नातेवाईकांची देखरेख आणि परदेशात शिक्षणासाठी जास्त प्रमाणावर हा पैसा पाठविण्यात आला आहे. परंतु या वाढीचे नेमके कारण समोर आलेले नाही.
भारतातून वर्षभरात 4.6 अब्ज डॉलर बाहेर...

जुन्या रागातून 'त्याने' केला 'तिच्या' वडिलांचा खून
| |
-
| |
नातेवाइकांकडील लग्नसमारंभातील घटना
औरंगाबाद - दोन वर्षांपूर्वी मुलीशी विवाह न लावून दिल्याचा राग धरून नात्यातीलच मुलाने मुलीच्या वडिलांचा नातेवाइकांकडील लग्नसमारंभात खून केला. ही थरारक घटना रविवारी (ता. १५) रात्री सव्वाआठच्या सुमारास बीड बायपास येथील प्रसाद लॉनमध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार - सदाशिव यादवजी जाधव (वय ४५, रा. निर्मलनगर, झोपडपट्टी, मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. सदाशिव जाधव यांच्या मुलीशी विवाह लावून देण्याचा तगादा संदेश ऊर्फ बाळू पटेकर (वय २२, रा. निर्मलनगर) याने तीन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांकडे लावला होता. मात्र, स्थळ पसंत नसल्याने त्यांनी मुलीचा विवाह दोन वर्षांपूर्वीच अन्यत्र केला. याच कारणावरून संदेश पटेकर व सदाशिव जाधव यांच्यात सातत्याने धुसफूस सुरू होती. त्यांचे वाद पोलिस ठाण्यापर्यंतही पोचले होते. रविवारी (ता. १५) रात्री बीड बायपास रस्त्यावरील प्रसाद लॉन येथे जाधव यांचे नातेवाईक राजू पाईकराव यांच्या भावाचे लग्न होते. वऱ्हाडी व निमंत्रित लग्नासाठी जमले होते. त्यावेळी संदेश, त्याचे वडील सुरेश पटेकर (वय ४५) आणि मावसे गोरख कोकणे (वय ३५) लग्नासाठी आले. लग्नासाठी थोडाच अवधी असतानाच, संदेशने लग्नमंडपात सदाशिव जाधव यांना गाठले. चाकूने त्यांच्या पाठीत, पोटावर व कमरेवर सपासप वार केले. अचानक झालेल्या प्रकाराने पाईकराव मध्यस्थी करण्यास गेले; पण हल्ल्यात ते जखमी झाले. हल्ल्यानंतर संदेशसह तिघे लग्नस्थळावरून पसार झाले. पोलिसांना बोलावून जाधव व पाईकराव यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले; परंतु रात्री दहानंतर अतिरक्तस्राव झाल्याने जाधव यांचा मृत्यू झाला.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात मूर्ख पंतप्रधान असल्याचे गुगल सर्चमध्ये निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करणारे कॉंग्रेस नेते रशीद अल्वी यांना तीव्र टीकेला सामोरे जावे लागले आहे.
एका वृत्तवाहिनीने मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याशी चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात इराणी यांना प्रश्न विचारताना अल्वी यांनी, "गुगल सर्चमध्ये मोदी सर्वात मूर्ख पंतप्रधान असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई झाली?‘ असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपस्थितांनी अल्वींवर तीव्र टीका करत शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली. तर त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना इराणी म्हणाल्या, "नरेंद्र मोदींविरुद्ध विष ओकणारे मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत हे विसरत आहेत.‘ तसेच अशा वक्तव्यामुळे मोदी किंवा मोदी समर्थक नाराज होणार नाहीत तर अल्वी स्वत:चीच प्रतिमा खराब करत आहेत, असेही इराणी म्हणाल्या.
'स्टुपिड मोदीं'वर काय कारवाई केली- अल्वी

नवी दिल्ली - भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना ताबडतोब पदावरुन काढून टाकण्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात त्यांनी रघुराम राजन यांच्यावर प्रखर टीका करत रघुराम राजन हे मनाने पूर्णपणे भारतीय नसल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपुर्वी स्वामींनी राजन यांना देशाच्या बिकट आर्थिक परिस्थितीसाठी जबाबदार असून ते देशासाठी लायक नसल्याचे मत व्यक्त केले होते.
राजन मनाने भारतीय नाहीत; स्वामींचे मोदींना पत्र
| |
-
| |
"डॉ. राजन यांचा भारतीय अर्थव्यवस्थेला उध्वस्त करण्याचा जाणूनबुजून सुरु असलेला प्रयत्न पाहून मला धक्का बसला आहे.", असे स्वामी यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
==============================================
कोलकाता : यंदाच्या ‘आयपीएल‘मध्ये भन्नाट खेळी आणि वेगवान भागीदारी करत अवघ्या क्रिकेटविश्वाला भुरळ पाडणाऱ्या विराट कोहली आणि एबी डिव्हिलर्स यांना ख्रिस गेलने ‘बॅटमॅन‘ आणि ‘सुपरमॅन‘ अशी उपमा दिली आहे. मर्यादित षटकांतील क्रिकेटमधील सर्वांत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा विराट आणि सर्वांत वैविध्यपूर्ण फलंदाज अशी ओळख असणारा डिव्हिलर्स या दोघांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचे आव्हान यंदाच्या स्पर्धेत कायम राखण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
या स्पर्धेत 12 सामन्यांत कोहली आणि डिव्हिलर्स या दोघांनी मिळून एकूण 1349 धावा चोपल्या आहेत. ‘आयपीएल‘च्या सध्याच्या नवव्या पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्येही कोहली आणि डिव्हिलर्स हेच दोघे आघाडीवर आहेत. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध काल (सोमवार) झालेल्या सामन्यामध्येही कोहली-डिव्हिलर्स जोडीने बंगळूरचा आणखी एक विजय साकारला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने पाच गडी गमावून 183 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोहली (नाबाद 75) आणि डिव्हिलर्स (नाबाद 59) या दोघांनी मनसोक्त फटकेबाजी करत संघाला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. त्याआधीच्या सामन्यात याच जोडीने गुजरात लायन्सविरुद्ध 229 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. यात दोघांनीही शतके झळकाविली होती.
डिव्हिलर्स 'बॅटमॅन', तर कोहली 'सुपरमॅन': गेल

मोबाईल तपासल्याने पतीच्या बोटांवर वार
| |
-
| |
बंगळूर - पतीने मोबाईल तपासल्याने रागाच्या भरात पत्नीने स्वयंपाक घरातील सुरीने पतीच्या बोटांवर वार केल्याची खळबळजनक घटना बंगळूरमध्ये घडली आहे.
बंगळूरमधील कईकोनडनाहल्ली भागात ही घटना घडली असून, या भागात आयटीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पतीने पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर ही घटना समोर आली आहे. त्याने पत्नीपासून बचावासाठी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. सुनीता सिंह आणि चंद्रप्रकाश सिंह असे या जोडप्याचे नाव असून, ते मुळचे बिहारमधील आहेत. ते दोघेही आयटी कंपनीत नोकरीस होते, सुनीताने नुकतीच नोकरी सोडली असून, ती घरी असते.
चंद्रप्रकाश यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुनीताला मोबाईलमध्ये व्यस्त राहण्याचे प्रचंड वेड आहे. चार मे च्या रात्री कामावरून घरी परतल्यानंतर सुनीताकडे जेवण देण्याची मागणी केल्यानंतर ती मोबाईलमध्ये व्यस्त होती. त्यावेळी आमच्या दोघांमध्ये खूप शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे मी तिचा मोबाईल तपासण्यासाठी घेतला. तिने रागाच्या भरात चाकूने माझ्या बोटांवर वार केले.
चंद्रप्रकाश यांच्या तक्रारीनंतर सुनीता यांनीही त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. पोलिसांनी या दोघांनाही बोलावून समज दिली आहे. तसेच पोलिसांनी काही दिवस या दोघांवरही लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
==============================================
नवी दिल्ली - हवेच्या प्रदूषणामुळे श्वासाद्वारे शरीरामध्ये जाणाऱ्या प्रदूषित घटकांमुळे मानवी आयुर्मानात साधारण 3.4 वर्षांची घट होत असल्याचे भारतीय उष्पप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. हवेच्या प्रदूषणाचा भारतातील सर्व राज्यांच्या तुलनेत दिल्लीमध्ये मानवी आयुर्मानावर सर्वाधिक परिणाम होत असून तेथील आयुर्मान 6.3 वर्षांनी कमी होत आहे. "गेल्या दोन दशकांपासून उद्योगांमध्ये, तसेच शहरांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतुकीतून उत्सर्जित होणाऱ्या हवेमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे‘, अशी माहिती आयआयटीएमचे अधिकारी सचिन घुडे यांनी दिली. जमिनीवरील ओझोन श्वासाद्वारे शरीरात गेल्याने उद्भवणाऱ्या फुफ्फुसांच्या गंभीर आजारामुळे दरवर्षी 31 हजार भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. दिल्लीनंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागत असून तेथील मानवी आयुर्मान 6.1 वर्षांनी कमी झाले आहे. तर त्यानंतर बिहारचा क्रमांक लागत असून तेथील आयुर्मान 5.7 वर्षांनी कमी झाले आहे.
हवेच्या प्रदूषणामुळे मानवी आयुर्मानात घट

तेहरान - ऑनलाईन मॉडेलिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आठ नागरिकांना इराणमध्ये अटक करण्यात आली असून या नागरिकांविरोधात इस्लामविरोधी कृत्य केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
इराणमध्ये सध्या महिलांकडून इन्स्टाग्राम वा अन्य सामाजिक संकेतस्थळांवर हिझाब न वापरता (मस्तक व केस आच्छादून न घेता) प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या छायाचित्रांविरोधात मोहिम सुरु करण्यात आली आहे. इराणमध्ये 1979 मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर महिलांना केस झाकून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
अशा स्वरुपाच्या गैरइस्लामिक कृत्यांमध्ये सहभाग असलेल्या 170 जणांची यादी सुरक्षा दलाकडे तयार आहे. यामध्ये फॅशन क्षेत्रातील 59 छायाचित्रकार व वेशभुषाकार, 58 मॉडेल्स आणि 51 व्यवस्थापक व तत्सम व्यावसायिकांचा समावेश आहे. "सोशल मिडीयाच्या माध्यमामधून कुटूंबव्यवस्थेच्या पायास आणि नैतिकतेस धक्का पोहोचविणाऱ्यांविरोधात‘ ही मोहिम सुरु करण्यात आली असल्याचे येथील सरकारी वकिल जवाद बबाई यांनी सांगितले.
इराण:इस्लामविरोधी कृत्याबद्दल 8 जणांना अटक

नाशिक - शहर परिसरात 2015 मध्ये 40 खुनाच्या घटना घडल्या असताना चालू वर्षाच्या अवघ्या साडेचार महिन्यांत 19 खून झाले. गेल्या आठवड्यात सिडकोतील लेखानगर परिसरात भरदिवसा टोळीयुद्धात एकाचा जागीच मृत्यू, तर दुसऱ्या भावाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. संबंधित घटना ताजी असतानाच रविवारी (ता. 15) सायंकाळी रविवार कारंजा येथे सराईत गुन्हेगारांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला.
शहर-परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी टोळ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशत पसरविण्याच्या प्रकारातूनही गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अशा गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली. लेखानगर परिसरात गेल्या गुरुवारी (ता. 12) दुपारच्या सुमारास काळे-गायकवाड आणि दांडेकर या टोळीत धुमश्चक्री झाली. यात दांडेकर गटातील अशोक दांडेकर याचा जागीच मृत्यू झाला; तर गंभीर जखमी तात्या दांडेकर याचा मुंबईत उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात दोन्ही टोळ्या या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असून, तात्या दांडेकरवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते.
नाशिकमध्ये चार महिन्यांत 19 खून

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) 9 फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमात देशविरोधी घोषणा देण्यात आलेल्या व्हिडिओची सत्यता केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेने (सीएफएसएल) पडताळली असून विद्यापीठात खरोखरच देशविरोधी घोषणा देण्यात आल्याचे म्हटले आहे.
भारताच्या संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफजल गुरूला फाशी देण्यात आलेला दिवस विद्यापीठात 9 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे कार्यक्रमाच्या उपलब्ध व्हिडिओ क्लिप्स सीएफएसएलकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. गुजरातमधील गांधीनगरमधील सीएफएसएलने या व्हिडिओची तपासणी केली असून त्यातील चार व्हिडिओमध्ये देशविरोधी घोषणा देण्यात आल्याचे म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे सारे व्हिडिओ विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केले होते. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्या व्यक्तींची ओळख सिद्ध होत आहे, त्यांची चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे.
'जेएनयू'तील देशविरोधी घोषणांचे व्हिडिओ खरेच!

नवी दिल्ली - पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार असलेल्या दहशतवाद्यास याआधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारने मुक्त केल्याचे आढळून आले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाकिस्तानबरोबरील संबंध सुधारण्याच्या राजनैतिक प्रयत्नांचा भाग म्हणून (गुडविल गेस्चर) जैश-इ-मुहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या शाहिद लतीफ याला 2010 मध्ये मुक्त केले होते. लतीफ हाच पठाणकोट येथे घडविण्यात आलेल्या "फिदायीन‘ हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार होता.
पठाणकोटच्या सूत्रधारास 'युपीए'ने केले होते मुक्त
| |
-
| |
==============================================
No comments:
Post a Comment