[अंतरराष्ट्रीय]
१- साओ पावलो; 'इथे' तयार होतेय जगातील पहिले सेक्स थीम पार्क
२- ढाका; 'इथे, मुलींचा वडिलांबरोबर होतो विवाह
३- वॉशिंग्टन; पाणीटंचाईमुळे मानवी स्थलांतराचा मोठा धोका
४- केनिया; इमारतीखाली 6 दिवसानी महिला आढळली जिवंत
५- पेशावर; पाकमध्ये पंचायतीच्या निर्णयानंतर महिलेची हत्या
६- लॉस एंजिलिस; यंत्रमानवांमुळे जगभरातील नोकऱ्यांना धोका...
७- कैरो; इसिसचे सदस्य विकतायत कोंबड्या आणि अंडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
८- विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील 'नीट'ची टांगती तलवार कायम
९- भारताचा चुकीचा नकाशा दाखवणाऱ्यांना 7 वर्षांची जेल आणि 1 कोटी दंड
१०- शेतकऱ्यांसाठी सरकारच्या टॉप 8 बेवसाईट्स
११- कन्हैया कुमारची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात
१२- यंदा इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 50 कोटींवर
१३- भल्यासाठी केजरीवालांनी माफी मागावी- काटजू
१४- मोदींच्या 'बीए'चे प्रमाणपत्र जाहीर करा- केजरीवाल
१५- व्हाईस ऍडमिरल सुनील लांबा होणार नौदलप्रमुख
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१६- अल्पसंख्यांक शैक्षणिक निधी मिळवण्यात महाराष्ट्रात देशात दुसरा
१७- नागपूर; 8 वर्षीय युगच्या हत्येप्रकरणी दोषींची दुहेरी फाशी कायम
१८- भुजबळांच्या सीएलाही अटक, आता पंकजचा शोध?
१९- सलमानच्या सिनेमानं 300 कोटी कमावले तर त्याची किंमत वाढणारच ना? - राज ठाकरे
२०- हनुमानाचं नामकरण झालं धीरूभाई
२१- लखनऊ; उत्तर प्रदेशात माध्यान्ह भोजनात मिळणार फळे
२२- जया राजकारणात नको'; अमिताभचा होता सल्ला - अमरसिंह
२३- झारखंडमध्ये विद्यार्थिनीचे दोन्ही हात तोडून हत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२४- वसई; वसईत अधिकाऱ्याकडे 4 कोटींचे पाच फ्लॅट, दोन किलो सोनं
२५- अमरावती; राज्यातील पाणीसंकट दूर होईपर्यंत पाणीप्रश्नावर काम करणार - आमिर खान
२६- नाशिक; मोटारीच्या सहाय्याने पाणी भरताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
२७- सातारा : उष्माघाताने बिबट्याचा मृत्यू
२८- उज्जैनमध्ये तुफान वादळात 6 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी
२९- पणजी; बलात्काराचा गुन्हा राजकीय षड्यंत्र, निलंबित आमदार पोलिसांना शरण
३०- देहरादून; हरीश रावत यांना सीबीआय चौकशीचे समन्स
३१- उदयपुर; राजस्थानमध्ये आढळली उष्ण पाण्याची विहीर!
३२- रामीतील दहा हजार जीव झाले तृप्त!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३३- सचिनचा 11 वर्षांपूर्वीचा विक्रम कूक मोडणार?
३४- पीटर मुखर्जीला हवा आहे इंद्राणीकडून घटस्फोट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
नियमितपणा हा माणसाचा मित्र आहे, तर आळस हा त्याचा कट्टर शत्रू असतो
(राजवीर सोनटक्के, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
================================================

आज झालेल्या सुनावणीत महाराष्ट्राने आपलं म्हणणं मांडलं. राज्यातील अनेक विद्यार्थी मराठी माध्यमाचे तसेच ग्रामीण भागातील आहेत, त्यामुळे यावर्षीपासून नीट लागू करणं त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल, अशी भूमिका राज्याने न्यायालयात मांडली. त्याचप्रमाणे
2018 पासून महाराष्ट्रात नीट लागू करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
दरम्यान, राज्यात आज 4 लाख 9 हजार विद्यार्थ्यांनी एमएचटीसीटीची परीक्षा दिल्याची माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली आहे.

एरवी अधिकारी लाच घेताना गजाआड होतात, पण रेड्डीनं नवा विक्रम रचला. हा पठ्ठ्या लाच देताना रंगेहाथ पकडला गेला. खरं तर तीन वर्षांसाठी वाय शिवा रेड्डी सिडकोतून वसईमध्ये प्रतिनियुक्तीवर आला. त्याने बांधकामाची कंत्राटं देताना नियम, कायदे पायदळी तुडवले. लाचखोरी केल्याच्या तक्रारी होत्या. पण राजकीय लागेबांधे असल्यानं रेड्डीला वसईतून 7 वर्ष कुणीही हलवू शकलं नाही. अखेर शिवसेना नेते धनंजय गावडेंनी रेड्डीचे कारनामे कागदोपत्री बाहेर काढले, आणि त्याचं धाबं दणाणालं.
रेड्डीने गावडेंना 1 कोटींची लाच देऊ केली. ज्याचा 25 लाखाचा पहिला हप्ता देताना रेड्डीला अँटी करप्शननं रंगेहाथ अटक केली. वाय शिवा रेड्डी मूळचा आंध्रप्रदेशचा आहे. पण महाराष्ट्रात आल्यानंतर त्यानं अक्षरश: पैसे उपसण्याचं मशीनच लावलं.

विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील 'नीट'ची टांगती तलवार कायम
नवी दिल्ली : ‘नीट’ अर्थात नॅशनल एलिजिबीटी टेस्ट संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आजही ठोस निर्णय झाला नाही. या प्रकरणाची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांवरील टांगती तलवार कायम आहे.
आज झालेल्या सुनावणीत महाराष्ट्राने आपलं म्हणणं मांडलं. राज्यातील अनेक विद्यार्थी मराठी माध्यमाचे तसेच ग्रामीण भागातील आहेत, त्यामुळे यावर्षीपासून नीट लागू करणं त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल, अशी भूमिका राज्याने न्यायालयात मांडली. त्याचप्रमाणे
2018 पासून महाराष्ट्रात नीट लागू करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
दरम्यान, राज्यात आज 4 लाख 9 हजार विद्यार्थ्यांनी एमएचटीसीटीची परीक्षा दिल्याची माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली आहे.
================================================
8 वर्षीय युगच्या हत्येप्रकरणी दोषींची दुहेरी फाशी कायम
नागपूर : नागपुरातील 8 वर्षांचा चिमुरडा युग चांडकच्या हत्या आणि अपहरण प्रकरणातील दोषींना ठोठावलेली दुहेरी फाशीची शिक्षा नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने, आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना दोषी मानत दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली होती.
नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, त्यानंतर आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही शिक्षा कायम ठेवली आहे. हे दुर्मीळ प्रकरण असून आरोपी बाहेर राहणं समाजासाठी योग्य नसल्याचा निर्वाळा यावेळी कोर्टाने दिला.
कोणत्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा?
*लहान मुलाचे अपहरण केल्याने फाशी
*अपहरण करून हत्या – फाशी
*अपहरण-हत्येचा कट – जन्मठेप
*पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न – 7 वर्षांची शिक्षा
*दोन्ही आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा
================================================
वसईत अधिकाऱ्याकडे 4 कोटींचे पाच फ्लॅट, दोन किलो सोनं
वसई : वसई-विरारमध्ये प्रतिनियुक्तीवर आलेल्या वाय. शिवा रेड्डीने तिथे सात वर्ष काढली, आणि जमवली कोट्यवधी रुपयांची काळी माया. विशेष म्हणजे आपलं बिंग फुटू नये म्हणून दोन्ही हातांनी लाचखोरी करणाऱ्या रेड्डीनं चक्क तक्रारदारालाच लाच देऊ केली. मात्र अँटी करप्शनच्या सापळ्यात रेड्डी अडकला आणि समोर आली डोळे पांढरे होतील इतकी माया.
एरवी अधिकारी लाच घेताना गजाआड होतात, पण रेड्डीनं नवा विक्रम रचला. हा पठ्ठ्या लाच देताना रंगेहाथ पकडला गेला. खरं तर तीन वर्षांसाठी वाय शिवा रेड्डी सिडकोतून वसईमध्ये प्रतिनियुक्तीवर आला. त्याने बांधकामाची कंत्राटं देताना नियम, कायदे पायदळी तुडवले. लाचखोरी केल्याच्या तक्रारी होत्या. पण राजकीय लागेबांधे असल्यानं रेड्डीला वसईतून 7 वर्ष कुणीही हलवू शकलं नाही. अखेर शिवसेना नेते धनंजय गावडेंनी रेड्डीचे कारनामे कागदोपत्री बाहेर काढले, आणि त्याचं धाबं दणाणालं.
रेड्डीने गावडेंना 1 कोटींची लाच देऊ केली. ज्याचा 25 लाखाचा पहिला हप्ता देताना रेड्डीला अँटी करप्शननं रंगेहाथ अटक केली. वाय शिवा रेड्डी मूळचा आंध्रप्रदेशचा आहे. पण महाराष्ट्रात आल्यानंतर त्यानं अक्षरश: पैसे उपसण्याचं मशीनच लावलं.
================================================
अल्पसंख्यांक शैक्षणिक निधी मिळवण्यात महाराष्ट्रात देशात दुसरा
मुंबईः केंद्र सरकारकडून अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीयांच्या शैक्षणिक सोयी-सुविधांसाठी अनुदान मिळवण्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्राकडून महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीयांच्या शैक्षणिक सोयी-सुविधांसाठी साडेनऊ कोटींचा निधी मिळाला आहे.
एवढा निधी मिळवणारे महाराष्ट्र देशातील दुसरे राज्य ठरले आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने (टीआयएसएस) नुकताच एक अहवाल जारी केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
मागासवर्गीयांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी साल २००८-०९ दरम्यान केंद्र सरकारने मौलाना आझाद शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत दरवर्षी काही राज्यांना केंद्राकडून निधी दिला जातो. यावर्षी उत्तर प्रदेशातील 255 स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून 30.79 कोटींची निधी वितरीत झाला आहे. त्याखालोखाल महाराष्ट्राचा नंबर लागतो.
महाराष्ट्रातील विविध 68 स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) हा निधी वितरीत करण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर मागासवर्गीय मुलींना शिष्यवृत्ती उपलब्ध करुन देण्यातही महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.
अल्पसंख्यांकाच्या शैक्षणिक निधीसाठी मौलाना आझाद शिक्षण संस्थेचा एकूण ८५.९४ कोटी रुपये निधी आरक्षित असतो. यापैकी उत्तर प्रदेशला सर्वात जास्त म्हणजे एकूण निधीच्या ३५ टक्के ३०.७९ कोटी एवढा निधी देण्यात आला आहे.
त्यानंतर अनुक्रमे महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि हरियाणा या राज्यांचा क्रमांक लागतो, असे टीआयएसएसच्या अहवालात म्हटले आहे.
महाराष्ट्रात 2003-04 आणि 2013-14 या वर्षात 12,095 मुलींनी मौलाना आझाद शिष्यवृत्ती उपलब्ध करुन देण्यात आली असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश २१ टक्के, केरळ १४ टक्के आणि पश्चिम बंगाल ९ टक्के एवढी शिष्यवृत्ती मुलींसाठी उपलब्ध करुन दिली आहे.

निधी वाटपाची यंत्रणा अधिक सक्षम होण्यासाठी शिफारसी करण्याची विचारणा अल्पसंख्यांक मंत्रालयाने टीआयएसएसकडे केली होती. त्यानंतर टीआयएसएसने ‘रिव्हीजनिंग मौलाना आझाद फाऊंडेशन’ हा आपला अहवाल नुकताच शिफारशींसह सादर केला. “ अहवालामध्ये अल्पसंख्यांकांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याची गरज, तसेच काही आकडेवारी देण्यात आली आहे. सध्यापेक्षा अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी काही शिफारसी आम्ही केल्या आहेत”, असे टीआयएसएसच्या अहवाल समितीमध्ये असलेले प्राध्यापक बिनू पॉल यांनी सांगितले.
================================================
भारताचा चुकीचा नकाशा दाखवणाऱ्यांना 7 वर्षांची जेल आणि 1 कोटी दंड
नवी दिल्ली : भारताच्या नकाशाचं चुकीचं वर्णन करुन त्यात पाकव्याप्त काश्मिर आणि अरुणाचल प्रदेश हा देशाचा भाग नसल्याचं दाखवलं तर दंडाच्या कारवाईसह तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. भारताच्या नकाशाचं चुकीचं वर्णन करणाऱ्यांना 7 वर्षांच्या तुरुंगवासासह एक कोटी रुपयांचा दंड ठोठवला जाईल, असं मोदी सरकारच्या नव्या प्रस्तावित कायद्यामध्ये म्हटलं आहे.
सरकार लवकरच भौगोलिक माहिती नियमन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. एखादी संस्था तसंच व्यक्तीला अंतराळातून भारताचे फोटो किंवा एअरक्राफ्ट, एअरशिप, बलून तसंच यूएव्हीच्या मदतीने भारतातील जागेसंदर्भात माहिती घ्यायची असेल तर त्यांना सरकारची परवानगी आणि परवाना घेणं अनिवार्य असेल.
तसंच गूगलला गूगल मॅप किंवा गूगल अर्थ या सेवेसाठी परवान घेणं बंधनकारक असेल. देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी भारत सरकार अशा नकाशांवर “संवेदनशील परीक्षण” द्वारे नजर ठेवणार आहे.
================================================
भुजबळांच्या सीएलाही अटक, आता पंकजचा शोध?
मुंबईः पैशांच्या गैरव्यवहार प्रकरणात छगन भुजबळांच्या अटकेनंतर ईडीने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. ईडीने भुजबळांचे चार्टर्ड अकाऊंटंट सुनील नाईक यांना त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली.
याप्रकरणात 29 जणांवर पैशांच्या गैरव्यवहाराचा आरोप असून, त्यांची झाडाझडती सुरु आहे. या कारवाईदरम्यान, सुनील नाईक यांच्या घरी धाड टाकून त्यांना अटक करण्यात आली.
न्यायालयाने नुकताच त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. नाईक यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
================================================
सचिनचा 11 वर्षांपूर्वीचा विक्रम कूक मोडणार?
मुंबई : संपूर्ण भारतीय संघ आयपीएलमध्ये व्यस्त आहे. मात्र तिकडे आयपीएलपासून लांब असलेला इंग्लंडचा कर्णधार अलिस्टर कूक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 11 वर्षांचा मोठा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे.
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात 19 मे पासून कसोटी मालिका सुरु होत आहे. कूकने या कसोटीत 36 धावा केल्या, तर त्याच्या खात्यात 10 हजार धावा जमा होतील. महत्त्वाचं म्हणजे हा टप्पा पार करणारा कूक हा जगातील सर्वात तरुण फलंदाज ठरेल.
यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्ध दोन्ही डावात 52-52 करत, दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. त्यावेळी सचिनचं वय 31 वर्ष 10 महिने होतं.
जर श्रीलंकेविरुद्ध कूकने 36 धावा केल्यास, तो सचिनचा विक्रम पाच महिने आधी मोडेल. कारण सध्या कूकचं वय 31 वर्षे 4 महिने आहे. कूक 25 डिसेंबरला 31 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे 9,964 धावांवर असलेला कूक श्रीलंकेविरुद्ध 36 धावा करण्यास उत्सुक आहे. शिवाय 10 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून विक्रम रचण्याचाही त्याचा मानस आहे.
इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासात 10 हजार धावा करणारा कूक पहिला फलंदाज ठरणार आहे. तर जागतिक क्रिकेटमध्ये तो 12 वा खेळाडू असेल.
कूकने 2006 मध्ये भारताविरुद्धचं कसोटी पदार्पण केलं होतं. कूकने 126 कसोटीत 46.56 च्या सरासरीने 9964 धावा केल्या आहेत.
================================================
शेतकऱ्यांसाठी सरकारच्या टॉप 8 बेवसाईट्स
नवी दिल्ली : शेतकऱ्यांना परिस्थितीचा सामना करता यावा तसेच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या घालाव्या लागू नयेत म्हणून सरकारने अनेक वेबसाईट आणि पोर्टल्स उपलब्ध करुन दिलेले आहेत. ज्याद्वारे शेतकऱ्यांना अनेक हिताच्या योजनांची घरबसल्या माहिती घेता येऊ शकते. शिवाय कृषी विभागाचे मार्गदर्शनही मिळवता येऊ शकते.
1. माती आरोग्य कार्ड योजना
मातीचं आरोग्य तपासून पीक घेण्यासाठी शासनाकडून सॉईल हेल्थ कार्ड ही योजना सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या सेतू किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी जाऊन www.soilhealth.dac.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर या पोर्टलमध्ये आपले स्वतःचे खाते तयार करावे लागते. या कार्डअंतर्गत त्या भागातील प्रयोगशाळेत मातीचे आरोग्य तपासले जाते. त्यावरुन संबंधित शेतातील मातीत कोणते पीक चांगले येऊ शकेल, त्याला पोषक औषधे आणि त्यांचे प्रमाण कसे असावे, याची माहिती मिळवता येते. या सुविधेमुळे शेतकरी आपल्या शेतीला पोषक असे पिक घेऊ शकतात. या संकेतस्थळावर मराठी भाषेसह एकूण 22 भाषांचा पर्याय उपलब्ध आहे.
2. शेतकरी पोर्टल
शेतकरी www.farmer.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर त्यांचे गाव, गट, जिल्हा किंवा तालुका निवडावा लागतो. त्यानंतर आवश्यक त्या पीकासंबंधित माहिती किंवा किटकनाशके, पीककर्ज यांबाबत सर्व विस्तृत माहिती या वेबसाईटवर मिळते. ही माहिती आपल्याला समजणाऱ्या भाषेतील मजकूर, एसएमएस, ई-मेल किंवा ऑडिओ किंवा व्हिडीओ अशा स्वरुपात दिली जाते. गृहपृष्ठावर देण्यात आलेल्या भारताच्या नकाशाद्वारे सहजपणे या पातळ्यांवर जाता येते. शेतकऱ्यांना विशिष्ट प्रश्न विचारता येतील तसेच प्रतिक्रियाही देता येते.
3. मेरा किसान पोर्टल
हे एक मोबाईल किसान पोर्टल म्हणून परिचित आहे. www.mkisan.gov.in या वेबसाईटवर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत विविध प्रकारची माहिती मिळवता येते. त्यासाठी अगोदर या संकेतस्थळाचा सदस्य होणं आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. तसेच मोबाईल सेवेद्वारे एसएमएसद्वारेही माहिती मिळवू शकतात. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्हीही भाषांचा पर्याय या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
4. पंतप्रधान पीक विमा योजना
शेतकऱ्यांवर विम्याचे कवच असावे यासाठी सरकारने ही योजना सुरु केली. या योजनेतर्गत प्रत्येक पिकावर विमा पद्धत उपलब्ध आहे. www.agri-insurance.gov.in या वेबसाईटवर मेंबर होणं गरजेचे आहे. त्यानंतर विम्यासाठी ऑनलाईन अर्जही करता येतो. स्वत:शी संबंधित सर्व माहिती भरल्यानंतर हिंदी भाषेत पुढील पर्याय उपलब्ध आहेत.
5. पंतप्रधान कृषी विकास योजना
शेतकरी पावसावर अवलंबून असतो. मात्र हे अवलंबित्व कमी करुन प्रत्येक शेतात पाणी पोहचवण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली. शेतात पाणी साठवणे, सिंचन आणि जलसंधारणाचे विविध पर्याय www.pmksy.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सोबतच शासनाच्या या उपक्रमांतर्गत येणाऱ्या सर्व योजनांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
6. राष्ट्रीय शेती बाजार
शेतकऱ्यांना त्यांचा माल आवडत्या बाजारात विकता यावा किंवा ग्राहकांना कोणत्या मालाचा बाजारबाव काय आहे याची घरबसल्या माहिती घेता यावी या उद्देशाने राष्ट्रीय शेती बाजार या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. agmarknet.dac.gov.in या संकेतस्थळावर जाऊन शेती मालाचा सध्याचा बाजारभाव तसेच ग्राहकांनाही ऑनलाईन बाजारभाव पाहता यावा याविषयीचे पर्याय उपलब्ध आहेत. पीक निवडून राज्य, जिल्हा, तालुका आणि जवळची बाजारपेठ निवडणे असे पर्याय या संकेतस्थळावर आहेत.
7. ई-राष्ट्रीय शेती बाजार
राष्ट्रीय शेती बाजार या योजनेप्रमाणेच शेतीमाल विक्री किंवा बाजारात शेतीमाल येण्याची वेळ, बाजारभाव आणि खरेदी विक्री यांची माहितीwww.enam.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सध्या या संकेतस्थळावर देशभरातील काही मुख्य बाजारपेठांचा समावेश केला आहे. त्या बाजारपेठेमध्ये सध्या कोणत्या शेतीमालाला काय बाजारभाव मिळत आहे, हे पाहता येते. सोबतच ग्राहकांना देखील या संकेतस्थळाद्वारे खरेदी करण्यासाठी बाजारभावाविषयी खात्रीशीर माहिती मिळवता येते.
8. राष्ट्रीय यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान पोर्टल
शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीची कास धरायला लावणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. www.farmech.dac.gov.in या वेबसाईटला भेट दिल्यानंतर शेतीत आधुनिकीकरण कसं आणावं याबाबत सर्व माहिती उपलब्ध आहे. कोणत्या पिकासाठी कोणत्या यंत्राचा कसा वापर करावा ते या वेबसाईटवर व्हिडीओसह उपलब्ध आहे. यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करण्यास मदत होते.
================================================
सलमानच्या सिनेमानं 300 कोटी कमावले तर त्याची किंमत वाढणारच ना? - राज ठाकरे
- व्यंगचित्रकारांना आणि व्यंगचित्रकलेला सुगीचे दिवस यावे असं वाटत असेल तर व्यंगचित्रांचा दर्जा प्रचंड सुधारायला हवा असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. 5 मे 2016 या वर्ल्ड कार्टुनिस्ट डे निमित्त लोकमतचे गेस्ट एडिटर झालेल्या राजनी व्यंगचित्रकारांनी आपलं कॅलिबर वाढवायला हवं असं ते म्हणाले. व्यंगचित्रकारांना चांगले पैसे मिळत नाहीत, हे मत खोडून काढताना त्यांनी आर के लक्ष्मण यांचा दाखला दिला.टाइम्समध्ये बाकिचे सगळे एकिकडे आणि लक्ष्मण एकीकडे असं चित्र होतंच ना? असं विचारत राजनी उत्कृष्ट काम असेल तर उत्पन्नाला मर्यादा नसतात असे सूचित केले. सलमान खानच्या चित्रपटानं 300 कोटींचा व्यवसाय केला तर त्याची किंमत वाढणारच, पण एखाद्याचा सिनेमा दुसऱ्या दिवशी आपटला आणि तो सलमानएवढे पैसे मागायला लागला तर चालेल का? असा प्रश्न विचारत राजनी, दर्जेदार कामाचं महत्त्व अधोरेखीत केलं.
================================================
'इथे' तयार होतेय जगातील पहिले सेक्स थीम पार्क
- ऑनलाइन लोकमतसाओ पावलो, दि. ५ - ब्राझीलच्या इरॉटिक लँड येथे जगातील पहिले सेक्स थीम पार्क आकाराला येत आहे. २०१८ मध्ये हे सेक्स पार्क सुरु होणार आहे. या थीम पार्कला भेट देणा-यांच्या लैंगिक भावना जागृत होतील अशी पूर्ण व्यवस्था या पार्कमध्ये असेल.पण त्यांना इथे प्रत्यक्ष सेक्सचा अनुभव घेता येणार नाही. जास्त भावना अनावर झाल्या तर ते, जवळच्या शरीरविक्री करणा-या केंद्रावर जाऊ शकतात असे या थीम पार्कमध्ये गुंतवणूक करणा-यांनी सांगितले.या थीम पार्कमध्ये लैंगिकतेच्या इतिहासाची माहिती देणारे एक म्युझियम असेल. इथले कर्मचारी पर्यटकांना कंडोम वापरण्यासाठी प्रेरीत करतील.काय असणार आहे या सेक्स थीमपार्कमध्ये'७डी' सिनेमागृह ज्याच्या सीटस वायब्रेट होतीलट्रेन ऑफ प्लेजरलिंगाच्या आकाराच्या कारसेक्स प्लेग्राऊंड़लैंगिक पॉवर वाढवणा-या खाद्यपदार्थांचा बारसेक्सबद्दल एक चांगला दृष्टीकोन निर्माण करण्याचा प्रयत्न असून इथे होणा-या गुंतवणूकीमुळे २५० स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. साओ पावलो पासून दोन तासांच्या अंतरावर हे पार्क असेल.
================================================
युग चांडक हत्याकांड प्रकरणातील आरोपींची फाशी कायम
- ऑनलाइन लोकमतनागपूर. दि. ५ : संपूर्ण राज्यात खळबळ उडविणाऱ्या युग चांडक अपहरण व खून खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपींची फाशीची शिक्षा कामय ठेवली आहे. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने दोन्ही आरोपींना दुहेरी फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे आहे.1 सप्टेंबर 2014 रोजी राजेश धनालाल दवारे (वय 19) आणि अरविंद अभिलाष सिंग (वय 23) या दोन आरोपींनी युग चांडक या शाळकरी मुलाचे अपहरण करुन खून केला होता. दोन्ही आरोपींविरुद्ध लावण्यात आलेले आरोप जिल्हा न्यायालयात सिद्ध झाले. याअंतर्गत दोघांनाही दुहेरी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.युगला नाल्यात पुरून डोक्यावर ठेवला होता दगड -निष्पाप आणि असहाय्य बालक युग चांडक याचे अपहरण केल्यानंतर दोन्ही नराधमांनी त्याला सावनेर मार्गावरील लोणखैरी येथे नेऊन निर्घृण खून केला होता आणि तेथील नाल्यात मृतदेह गाडून युगच्या डोक्यावर मोठा दगड ठेवला होता. दोसरभवन चौकातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांचा वर्धमाननगरच्या सेंटर पॉर्इंट शाळेत तिसऱ्या वर्गात शिकणारा मुलगा युग याचे राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांनी १ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास लकडगंज छापरूनगर भागातील गुरुवंदना सोसायटीसमोरून अपहरण केले होते. आरोपींकडून दोनवेळा खंडणीसाठी फोन करण्यात आले होते. पहिला फोन १ सप्टेंबर २०१४ रोजी रात्री ८.१७ वाजता खुद्द डॉ. मुकेश चांडक यांना करण्यात आला होता.
================================================
'इथे, मुलींचा वडिलांबरोबर होतो विवाह
- ऑनलाइन लोकमतढाका, दि. ५ - प्रत्येक समाजामध्ये विवाहाच्या वेगवेगळया प्रथा, परंपरा असतात. विवाहसोहळयाच्यावेळी या परंपरांमधून आनंदही मिळतो. पण बांगलादेशातल्या मंडी समाजामध्ये विवाहाची एक वेगळीच प्रथा आहे. ही प्रथा सर्वसामान्यांना चक्रावून टाकणारी आहे. या समाजातल्या प्रथेनुसार मुलीचा तिच्याच वडिलांबरोबर विवाह होतो.मुलीचा आणि तिच्या आईचा पती एकच असतो. मंडी समाजातल्या ओरोला डालबोट (३०) या महिलेने सांगितले की, ती लहान असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. तिच्या आईने नोटेन नावाच्या माणसाबरोबर दुसरा विवाह केला. मी मोठी होत असताना नोटेन मला आवडायचे. माझी आई भाग्यवान आहे असे मला वाटायचे. त्याच्यासारखा पती मिळावा अशी माझी इच्छा होती.ओरोला वयात येत असताना एकदिवस तिला नोटेन बरोबर तिचा विवाह झाल्याचे सांगण्यात आले आणि तिला एकच धक्का बसला. ओरोला तीन वर्षांची असताना आईच्या दुस-या विवाहाच्या मंडपातच तिचा नोटेबरोबर विवाह लावून देण्यात आला होता. या मंडी समाजामध्ये विधवा महिलेचा पतीच्याच कुटुंबातील तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या पुरुषाबरोबर पुनर्विवाह लावून दिला जातो.जेव्हा नोटेन माझा पती असल्याचे मला समजले तेव्हा मला धक्काच बसला. मला पळून जायचं होत. पण मी हे सत्य स्वीकारलं पाहिजे असं मला आईने समजावलं अस ओरोलाने सांगितले. या समाजात विधवेला पुनर्विवाह करताना आपली एक मुलगी दुसरी पत्नी म्हणून दुस-या पतीला द्यावी लागते. वयात आल्यानंतर या मुलीबरोबर पतीचे शरीरसंबंध सुरु होतात.
================================================
राज्यातील पाणीसंकट दूर होईपर्यंत पाणीप्रश्नावर काम करणार - आमिर खान
- ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. ५ : राज्यात पाण्याची समस्या फार मोठी आहे. लोकचळवळीतून, लोकसहभागातून या प्रश्नावर मात करता येऊ शकते. म्हणून आम्ही पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यात ह्यसत्यमेव जयते वॉटर कपह्ण स्पर्धा आयोजित केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील वरूड, कोरेगाव (सातारा), अंबेजोगाई (बीड) या तीन तालुक्यांतील गावांमध्ये स्पर्धा सुरू केली असून स्पर्धेत सहभागी गावांसाठी ह्यपाणी फाऊंडेशनह्णच्यावतीने एक कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. राज्य टंचाईमुक्त होईपर्यंत पाणीप्रश्नावर सतत काम करीत राहीन, अशी ग्वाही पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमिर खान यांनी दिली.वरूड तालुक्यातील वाठोडा या गावी गुरूवारी पहाटे ६.३० वाजता आमिर खान यांचे मराठी सिने कलावंतांसह आगमन झाले.यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी काटोलचे आमदार आशिष देशमुख, आमदार अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, तहसीलदार भुसारी, पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, वसुधा बोंडे, सरपंच मनोज बाडे, उपसरपंच सरोज उपासे, पंचायत समितीचे माजी सभापती नीलेश मगर्दे, अभिनेत्री रिमा लागू, मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर, सुनील बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
================================================
मोटारीच्या सहाय्याने पाणी भरताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
- ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. ५ : चांदवड तालुक्यातील दुगाव येथे वीज मोटरीच्या सहाय्याने पाणी भरत असतांना विजेचा धक्का लागून संजय अशोक पवार (३३) या तरुणाचा मृत्यू झाला. पंधरा दिवसांनंतर नळाला पाणी आले होते. कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असल्याने इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने पाणी भरत असतांना ही दुर्घटना घडली. तालुक्यात पाणी टंचाईचा बळी गेल्याची चर्चा होत आहे.त्यांंच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. संजय हा एकुलता एक मुलगा असल्याने वृध्द आई - वडिलांचा आधार गेला आहे. परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
================================================
सातारा : उष्माघाताने बिबट्याचा मृत्यू !
- ऑनलाइन लोकमतसातारा. दि. ५ :- क-हाड तालुक्यातील सवादे येथील ह्यबेलदराह्ण नावच्या शिवारात गुरुवारी सकाळी बिबट्याचा चार महिन्यांचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. संबंधित बिबट्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिका-यांनी व्यक्त केली आहे. कोरड्या पाझर तलावापासून काही अंतरावर पंचनाम्याचे सोपस्कार उरकल्यानंतर सायंकाळी बिबट्याचा मृतदेह क-हाडला शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला.पशुवैद्यकीय अधिका-यांनी मृत बिबट्याची पाहणी केली. त्यावेळी त्याच्या तोंडातून फेस आला असल्याचे निदर्शनास आले. तसेच मृत्युपूर्वी त्याने उलट्या केल्याचेही दिसून येत होते. त्यामुळे उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिका-यांनी व्यक्त केला आहे. संबंधित चार महिन्यांचा बछडा मादी आहे.
================================================
पीटर मुखर्जीला हवा आहे इंद्राणीकडून घटस्फोट
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. 05 - शीना बोरा हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीच्या नात्यातील नवा ट्विस्ट समोर आला आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त करणा-या पीटर मुखर्जीला इंद्राणीकडून घटस्फोट हवा असल्याची माहिती मिळाली आहे. जानेवारी महिन्यापासून पीटर मुखर्जी घटस्फोटासाठी प्रयत्न करत आहे.'यावर्षीच्या सुरुवातीपासूनच पीटर मुखर्जी यांनी हे नातं आता संपलं असून मला घटस्फोट हवा असल्याचं म्हटलं आहे. पण त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सुरु असल्याने घटस्फोटाची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे', अशी माहिती पीटर मुखर्जीचे वकील मिहीर यांनी दिली आहे.'इंद्राणी मुखर्जीने पीटर मुखर्जीला डिसेंबर महिन्यापासून पत्र पाठवण्यास सुरुवात केली. इंद्राणीने आतापर्यत 40 पत्रं पीटर मुखर्जीला पाठवली आहेत. पीटर मुखर्जीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार लिहिलेलं पत्र हे त्यांच्याकडून पहिलंच पत्र होतं', असं पीटर मुखर्जी यांचे दुसरे वकील आबाद यांनी सांगितलं आहे. 'इंद्राणी मुखर्जी पीटरला सलग पत्र लिहित असून आपण आणि पीटर निर्दोष असल्याचं बोलत आहे. इंद्राणीने 21 डिसेंबरला जीवघेणा आजार होण्याची भीती व्यक्त केल्यानंतर पीटरने अखेर पत्र लिहिलं', असंही सांगितलं आहे.
================================================
हनुमानाचं नामकरण झालं धीरूभाई
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 5- रस्त्यांची आणि स्टेशनची नावं बदलण्याचा आग्रह अनेक राजकारण्यांचा असतो. या नामकरणाच्या बाबतीत भगवान हनुमानाला राजकारण्यांनी सोडलं नाही. अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या हनुमानाचं काळबादेवीतल्या एका रस्त्याला दिलेलं नाव पालिकेनं बदललं आहे. सुपरमॅनलाही उडण्याच्या बाबतीत मागे टाकतील इतकं भगवान हनुमान यांचं अफाट सामर्थ्य. मात्र राजकारण्यांनी त्यांच्या नावाबाबतही राजकारण करण्यास मागे-पुढे पाहिलं नाही.मुंबईतल्या काळबादेवी परिसरातल्या जुनी हनुमान गल्लीचं काही वर्षांपूर्वी धीरूभाई पारेख मार्ग नावानं नव्यानं नामकरण करण्यात आलं होतं. त्याबाबत आक्षेप नोंदवत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलींनी मुंबई महापालिकेला नाराजीचं पत्रही लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी भगवान हनुमानचं नाव का बदललं याचा पालिकेला जाब विचारला आहे. गलगलींनी पत्रात म्हटलं आहे की, 'हनुमान हा ब्रिटिश देव नव्हता. तेव्हा त्याचं नाव एका माणसाच्या नावाच्या स्वरूपात का बदललं. काळबादेवीत दोन हनुमान मंदिरं गेल्या 100 वर्षांपासून स्वतःचं अस्तित्व टिकवून आहेत. अनेकांची भगवान हनुमानावर श्रद्धा आहे. तेव्हा त्या रस्त्याचं पहिलं नावच पुन्हा त्या रस्त्याला देण्यात यावं, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे गलगलींनी केली आहे.
================================================
उज्जैनमध्ये तुफान वादळात 6 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5- उज्जैनमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान तुफान पाऊस पडला आहे. वादळी वा-यासह पडलेल्या पावसात आतापर्यंत 6 जणांनी जीव गमावला आहे. उज्जैनमध्ये आलेल्या वादळी वा-यासह पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.या वादळी वा-यात एका साधूसोबत 3 महिलांना जीव गमवावा लागला आहे. तर 20 हून अधिक लोक गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. सिंहस्थसाठी शुक्रवारी जवळपास 25 लाख लोक येणार आहेत. त्यामुळे एवढ्या लोकांचं नियोजन करण्याचं प्रशासनापुढे आव्हान आहे.दुपारपर्यंत वातावरण ठीक असताना संध्याकाळी 4 नंतर अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या अचानक कोसळलेल्या पावसामुळे प्रशासनाचं पुरतं नियोजन ढेपाळलं आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यानं बत्ती गुल झाली आहे. उज्जैनमध्ये पंचक्रोशीतून येण्यास लोकांनी सुरुवात केली आहे. मात्र मुसळधार पावसामुळे भाविकांच्या सुरक्षेची व्यवस्था सरकारला करावी लागणार आहे.
================================================
बलात्काराचा गुन्हा राजकीय षड्यंत्र - बाबूश मोन्सेरात
- ऑनलाइन लोकमतपणजी. दि. ५ : सांताक्रुझ मतदारसंघातील आमदार आतनासियो तथा बाबूश मोन्सेरात गुरुवारी दुपारी येथील रायबंदर येथे गुन्हा अन्वेषण विभागात शरण आले. त्यांना शरण येण्यासाठी ७२ तासांची मुदत दिली होती. बाबूश यांच्यावर बुधवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला. बाबूश यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी जेनिफरही होत्या. त्या ताळगावच्या काँग्रेसच्या आमदार आहेत. आमदारांचे समर्थक कार्यकर्ते यावेळी त्यांच्यासमवेत होते. ईशान्येकडील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलिसांनी बाबूश यांच्यावर दाखल केलेला आहे. पोलिस अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी हे प्रकरण पणजी पोलिसांकडून गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केले आहे.सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून जास्त माहिती देणे योग्य नाही, असे ते म्हणाले. सर्व आरोपांचा इन्कार बाबूश यांनी सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. आपल्यावरील आरोपांमागे राजकीय षड्यंत्र असल्याचे त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. आपल्यावरील आरोपांत तथ्य नसल्याचे न्यायालयात सिद्ध होईलच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ५० लाखाला मुलीची विक्री ? माझी सावत्र आई आणि मावशीने मिळून मला पन्नास लाख रूपयांना बाबूश यांना विकल्याची तक्रार संबंधित पिडीत मुलीने पोलिसांत केलेली आहे. बाबूश यांनी या आरोपाचाही इन्कार केला आहे.मुलीला भेटू देऊ नये आम आदमी पक्षाच्या निमंत्रक श्रीमती राजश्री नर्गेसकर यांनी गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पत्र लिहून बलाढ्य राजकारणी आणि अल्पवयीन परप्रांतीय कामगार यांच्यातील हे प्रकरण असल्याचा उल्लेख केला आहे. आरोपीला मुलीला कोणत्याही प्रकारे संपर्क करू देऊ नये तसेच भेटू देऊ नये अशी मागणी केली आहे. न्यायालयाच्या नियंत्रणाखालील विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास व्हावा, अशी मागणी नर्गेसकर यांनी केली आहे.
================================================
पाणीटंचाईमुळे मानवी स्थलांतराचा मोठा धोका
- वॉशिंग्टन : हवामान बदलामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई विकासावर परिणाम करून मानवी स्थलांतराला भाग पाडू शकते व भारतासह जगभर संघर्ष होऊ शकतो, असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. सध्या भारतात अनेक ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे.जागतिक बँकेच्या ‘हाय अँड ड्राय : क्लायमेट चेंज, वॉटर अँड इकॉनॉमी’ या नावाचा हा अहवाल मंगळवारी प्रसिद्धीस देण्यात आला. त्यात म्हटले आहे की, वाढती लोकसंख्या, वाढते उत्पन्न आणि विस्तारणाऱ्या शहरांत पाण्याची मागणी प्रचंड वेगाने वाढत असून, ती अधिकच वाढणार आहे. त्या तुलनेत पुरवठा अनियमित व खात्रीचा नाही.जगातच पाणीटंचाई ही आर्थिक स्थैर्य आणि विकासाला बाधक ठरली आहे व त्यात हवामान बदलाने भयंकर भर घातली आहे, असे जागतिक बँकेचे जिम योंग किम यांनी म्हटले. फार मोठ्या लोकसंख्येचे जे देश जलस्रोतांचे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करणार नाहीत तेथील लोक प्रदीर्घ काळपर्यंत नकारात्मक आर्थिक परिस्थितीत राहतील, असे जिम किम यांनी म्हटले.
================================================
कन्हैया कुमारची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात
नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याची बेमुदत उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कन्हैया कुमारला प्रकृती खालावल्याने विद्यापीठाच्या आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले. त्याला अशक्तपणा आला असून रक्तदाब कमी झाला आहे, असे संघटनेचा सरचिटणीस रामा नाग याने सांगितले. उपोषणामुळे कन्हैयाचे वजन घटले असून, त्यामुळे शारीरिक तक्रारी सुरू झाल्या आहेत. बेमुदत उपोषणाचा आज (गुरुवार) आठवा दिवस आहे.
विद्यापीठात 9 फेब्रुवारी रोजी दिलेल्या देशविरोधी घोषणांच्या घटनेची चौकशी करणाऱ्या उच्चस्तरीय चौकशी समितीने कन्हैयासह उमर खालिद व अन्य 18 विद्यार्थ्यांना दोषी ठरविले आहे. याच्या निषेधार्थ कन्हैयाने उपोषण सुरू केले आहे.
कन्हैया कुमारची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात
कन्हैया कुमारला प्रकृती खालावल्याने विद्यापीठाच्या आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले. त्याला अशक्तपणा आला असून रक्तदाब कमी झाला आहे, असे संघटनेचा सरचिटणीस रामा नाग याने सांगितले. उपोषणामुळे कन्हैयाचे वजन घटले असून, त्यामुळे शारीरिक तक्रारी सुरू झाल्या आहेत. बेमुदत उपोषणाचा आज (गुरुवार) आठवा दिवस आहे.
विद्यापीठात 9 फेब्रुवारी रोजी दिलेल्या देशविरोधी घोषणांच्या घटनेची चौकशी करणाऱ्या उच्चस्तरीय चौकशी समितीने कन्हैयासह उमर खालिद व अन्य 18 विद्यार्थ्यांना दोषी ठरविले आहे. याच्या निषेधार्थ कन्हैयाने उपोषण सुरू केले आहे.
================================================
उत्तर प्रदेशात माध्यान्ह भोजनात मिळणार फळे
लखनौ- उत्तर प्रदेशातील शाळांमधील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन म्हणून सकाळच्या वेळी फळे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (गुरुवार) दिली.
‘नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीपासून विद्यार्थ्यांना ताजी व हंगामी फळे देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना वेगळे काहीतरी व पौष्टिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फळांमध्ये सफरचंद, केळी, मोसंबी व हंगामी फळे असणार आहेत,‘ असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकारी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना विविध प्रकारची फळे दिल्यामुळे ते शाळेकडे आकर्षित होतील. शाळांना फळे पुरविण्याची जबाबदारी असणारी व्यक्ती आदल्या दिवशीच फळांचे नियोजन करेल. सकाळच्या वेळी फळे खाल्ल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात कॅलरीज मिळू शकतील. सर्व अधिकाऱ्यांनी ताजी फळे देण्याबाबत आदेश देण्यात आली आहेत.‘
उत्तर प्रदेशात माध्यान्ह भोजनात मिळणार फळे
‘नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीपासून विद्यार्थ्यांना ताजी व हंगामी फळे देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना वेगळे काहीतरी व पौष्टिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फळांमध्ये सफरचंद, केळी, मोसंबी व हंगामी फळे असणार आहेत,‘ असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकारी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना विविध प्रकारची फळे दिल्यामुळे ते शाळेकडे आकर्षित होतील. शाळांना फळे पुरविण्याची जबाबदारी असणारी व्यक्ती आदल्या दिवशीच फळांचे नियोजन करेल. सकाळच्या वेळी फळे खाल्ल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात कॅलरीज मिळू शकतील. सर्व अधिकाऱ्यांनी ताजी फळे देण्याबाबत आदेश देण्यात आली आहेत.‘
================================================
'तो' निलंबित आमदार पोलिसांना शरण
पणजी (गोवा) - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला गोव्यातील निलंबित आमदार आज (गुरुवार) गोवा पोलिसांना शरण आला आहे.
गोव्यातील कॉंग्रेसचा आमदार अंतानासिओ मॉन्सरेट उर्फ बाबूश याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला. त्यानंतर एक वर्षापूर्वी त्याला कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आले. दरम्यान आज (गुरुवार) तो गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेसमोर शरण आला. गोवा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार तिच्या आईने आणि दुसऱ्या एका महिलेने तिला बाबूशला विकले होते. बाबूशने 2017 मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिकडेच गोवा डेमोक्रॅटिक पक्षाचे सूत्रे हाती घेतल्याचे जाहीर केले होते.

यंदा इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 50 कोटींवर
नवी दिल्ली : या वर्षअखेरीपर्यंत देशातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 50 कोटींवर पोचणार आहे, अशी माहिती दूरसंचार मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी दिली आहे.
भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढून 40 कोटींवर पोचली आहे. ट्रायच्या आकडेवारीनुसार, हा आकडा 33.2 कोटींच्या आसपास आहे. दूरसंचार कंपन्यांच्या माहितीनुसार, ही संख्या 40.2 कोटी आहे. वर्षअखेर ही संख्या 50 कोटी होईल, असे प्रसाद यांनी सांगितले.
तसेच भारतातील मोबाईलधारकांची संख्या 100 कोटींच्या पुढे गेल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेतील आकडेवारीनुसार, फेब्रुवारीअखेरपर्यंत जीएसएम तंत्रज्ञान वापरणाऱ्या मोबाईल ग्राहकांची संख्या 98.2 कोटी झाली आहे. सीडीएमए नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 4.45 कोटी आहे.

इमारतीखाली 6 दिवसानी महिला आढळली जिवंत
नैरोबी (केनिया)- इमारत कोसळून त्याखाली गाडली गेलेली महिला तब्बल सहा दिवसानंतरही जिवंत आढळून आली आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी आज (गुरुवार) दिली.
पियुस मसई यांनी दिलेल्या महितीनुसार, इमारत कोसळून त्या खाली दबले गेल्यामुळे 36 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप 70 जण बेपत्ता आहेत. इमारतीखाली अडकलेल्यांचा शोध घेण्याबरोबरच मातीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू आहे. सहा दिवसानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली एक महिला जिवंत आढळून आली. उपचारासाठी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चांगली आहे.
दरम्यान, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सहा दिवसानंतर कोणी जिवंत असेल, असे वाटले नव्हते. परंतु, सहा दिवसांनी महिला जिवंत असल्याचे पाहून आनंद झाला. देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय आला, असेही मसई यांनी सांगितले.

भल्यासाठी केजरीवालांनी माफी मागावी- काटजू
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या भल्यासाठी माफी मागावी, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि "प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया‘चे माजी अध्यक्ष यांनी केले आहे.
उत्तराखंडमधील उच्च न्यायाधीशांसह देशभरातील अन्य काही न्यायाधीशांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांबाबत केजरीवाल यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर काटजू यांनी उत्तराखंडमधील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के.एस. जोसेफ यांची प्रकृतीच्या कारणामुळे बदली करण्यात आल्याचे फेसबुक पोस्टद्वारे सांगितले आहे. तसेच अन्य काही न्यायाधीशांच्या बदल्या या अन्य काही कारणांमुळे करण्यात आल्या असून त्यामागे राजकारण नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
"न्यायाधीशांच्या बदलीसंदर्भातील केजरीवाल यांनी त्यांच्या निराधार प्रतिक्रियेबद्दल माफी का मागू नये?‘ असा प्रश्न उपस्थित करत काटजू यांनी "त्यांनी (केजरीवाल) चूक झाल्याचे म्हणावे. आपण माणसे आहोत आणि आपण सारे चुका करतो. जर त्यांनी माफी मागितली तर त्यांची प्रतिमा अधिक उंचावेल‘ असे म्हटले आहे. तसेच जर त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांची प्रतिमा कायमस्वरुपी मलिन होईल, असा इशाराही दिला आहे.

पाकमध्ये पंचायतीच्या निर्णयानंतर महिलेची हत्या
पेशावर- एका युवती मित्रासोबत पळून गेली म्हणून गावच्या पंचायतीने तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला. यानंतर गावकरयांनी युवतीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस अधिकारी खुराम रशीद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वायव्य पाकिस्तानमधील जिरगा या गावामध्ये 29 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. युवतीला अंमलीपदार्थ दिल्यानंतर तिचा गळा कापला व त्यानंतर तिला पेटवून देण्यात आले होते. याप्रकरणी गावातील 13 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये युवतीच्या आईचाही समावेश आहे. पंचायतीच्या निर्णयाला तिने पाठिंबा दिला होता. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.‘
दरम्यान, पाकिस्तानमध्ये दर वर्षी हजारो मुलींना अशा प्रकारे मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.

हरीश रावत यांना सीबीआय चौकशीचे समन्स
डेहराडून- उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय डावपेचांच्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) राज्याचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना स्टिंग ऑपरेशन प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले आहे.
स्टिंग ऑपरेशनमधील सीडीमध्ये हरीश रावत लाच देण्याबद्दल बोलत असल्याचे दाखविण्यात आले आहे. सीबीआयने यासंदर्भात रावत यांना सोमवारी चौकशीसाठी बोलावले आहे. तत्पूर्वी, रावत यांनी त्या सीडीमधील आवाज आपलाच असल्याचे मान्य केले होते. परंतु, यामध्ये व्हिडिओचा एकच भाग दाखविण्यात येत आहे, तोच सोशल मीडयावर व्हायरल झाला आहे, असेही त्यांनी म्हटले होते.
बंडखोर आमदार आणि राजकीय संकटानंतर 27 मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीने उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्याबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. या प्रकरणाची शुक्रवारी सुनावणी होणार आहे

अन् रामीतील दहा हजार जीव झाले तृप्त!
रामी (ता. शिंदखेडा) येथील सुमारे सात हजार ग्रामस्थ आणि दोन ते अडीच हजार जनावरांना गेल्या दोन महिन्यांपासून घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. याबाबत "सकाळ‘ने "दाह दुष्काळाचा‘ या वृत्त मालिकेअंतर्गत गेल्या 22 एप्रिलला "अधिकाऱ्यांनो, आमच्या गावात राहून बघा!‘ या शीर्षकांतर्गत टंचाईचे सचित्र भीषण वास्तव मांडले होते. त्याची दखल घेत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीही जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत टंचाईची दाहकता मांडली. अखेर प्रशासनानेही याची दखल घेत रामी गावासाठी शेतकरी साहेबराव शंकर माळी यांनी तापी नदीवरून आठ किलोमीटरपर्यंत केलेली पाइपलाइन गावापर्यंत आणण्यास मंजुरी देत ग्रामस्थांना तापीचे पाणी उपलब्ध करून दिले. यामुळे दर वर्षी टंचाईचा सामना करणाऱ्या सुमारे दहा हजार जिवांना आता शाश्वत पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे ग्रामस्थांनी "सकाळ‘चे मनस्वी आभार मानले आहेत.

दोंडाईचा- नंदुरबार रस्त्यावरील दोंडाईचापासून चार किलोमीटरवरील रामी (ता. शिंदखेडा) या सुमारे सात हजार लोकवस्तीच्या गावात पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली होती. तालुक्यातील दुष्काळी गावांत अव्वल क्रमांकावर असलेल्या या गावात यंदा तर इतकी भीषण टंचाई निर्माण झाली होती, की गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल 60 फूट खोल सार्वजनिक विहिरीनेही तळ गाठला होता. ग्रामपंचायतीने काही वर्षांपूर्वी कूपनलिका केली. तीही आटली. कूपनलिकेचा एक पाइप गावविहिरीत टाकण्यात आला होता. या पाइपमधून दिवसभरात दहा ते पंधरा मिनिटे अर्ध्या-अर्ध्या तासाने थोडे फार पाणी पडत होते. हे साठलेले पाणी भरण्यासाठी ग्रामस्थ दिवस-रात्र विहिरीवर गर्दी करत. यामुळे ग्रामपंचायतीने दीड महिन्यापूर्वी टॅंकरचा प्रस्तावही दिला. प्रांताधिकारी, तहसीलदारांनी टंचाईची पाहणीही केली. मात्र, पुढे काहीच कार्यवाही होत नव्हती. याबाबत "सकाळ‘ने "दाह दुष्काळाचा‘ या वृत्तमालिकेंतर्गत गेल्या 22 एप्रिलला सचित्र वृत्त दिले. त्यात ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी तगमग निदर्शनास आणून देतानाच ग्रामस्थांशी केलेल्या चर्चेतून उपाययोजनाही सुचविली होती.

व्हाईस ऍडमिरल सुनील लांबा होणार नौदलप्रमुख
नवी दिल्ली - भारतीय नौदलाचे आगामी प्रमुख हे व्हाईस ऍडमिरल सुनील लांबा असणार असल्याचे आज (गुरुवार) स्पष्ट झाले.
सध्याचे नौदलप्रमुख ऍडमिरल आर के धोवन हे येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. यानंतर लांबा हे भारतीय नौदलाची धुरा सांभाळणार आहेत. लांबा हे नेव्हिगेशन क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. हिंदी महासागरामधील भारतीय प्रभावास चीनकडून निर्माण झालेल्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर होत असलेली लांबा यांची ही नियुक्ती अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. याचबरोबर, भारताच्या अमेरिकेबरोबरील विकसित होत असलेल्या व्यूहात्मक भागीदारीमध्येही द्विपक्षीय सागरी सहकार्याचा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
तेव्हा नवे नौदलप्रमुख लांबा यांच्यावर अनेक आव्हानांच्या यशस्वी व्यवस्थापनाची जबाबदारी असणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

मोदींच्या 'बीए'चे प्रमाणपत्र जाहीर करा- केजरीवाल
नवी दिल्ली - "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीचे प्रमाणपत्र (बीए) जाहीर करा‘, असे आवाहन करणारे पत्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश त्यागी यांना लिहिले आहे.
केजरीवाल यांनी पत्रात लिहिले आहे की, "जर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधातील सर्व कागदपत्रे संकेतस्थळावर जाहीर केले तर ते चांगले होईल.‘ तसेच मोदी यांनी लोकसभेची निवडणूक लढविताना दिल्ली विद्यापीठातील कला शाखेतील पदवी असल्याची नोंद केल्याचा संदर्भ केजरीवाल यांनी दिला आहे. "या देशातील जनतेला त्यांचे पंतप्रधान किती शिकले आहेत, हे जाणून घेण्याचा अधिकार आहे‘ असे पत्रात म्हटले आहे. बुधवारी केजरीवाल यांनी मोदी यांच्याकडे दिल्ली विद्यापीठातील बीएची पदवी नसल्याचा आरोप केला होता. "गुजरात विद्यापीठ म्हणत आहे की मोदी यांनी त्यांच्या विद्यापीठातून एमए केले आहे. मात्र त्यांनी तर बीएसुद्धा केलेले नाही. मग त्यांना एमसाठी प्रवेश कसा दिला गेला? यावरून त्यांच्या एमएची पदवी बनावट असल्याचा संशय येत आहे. हा खूप गंभीर विषय आहे‘, असेही केजरीवाल यांनी पत्रात लिहिले आहे.
मोदी यांची शैक्षणिक कारकिर्द चांगली असल्याचे म्हणत राज्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी (एमए) परीक्षेत त्यांना प्रथम श्रेणी मिळाल्याची माहिती गुजरात विद्यापीठाने दिली आहे. मोदींचे एमए हे 1983 मध्ये पूर्ण झाले. तसेच त्यामध्ये त्यांना 62.3 टक्के असल्याचेही विद्यापीठाने जाहीर केले आहे.

'जया राजकारणात नको'; अमिताभचा होता सल्ला!
नवी दिल्ली - अभिनेत्री जया बच्चन हिला राजकारणात घेऊ नये, असा सल्ला अभिनेते अमिताभ बच्चन यांनी दिला होता, असा धक्कादायक खुलासा अमरसिंह यांनी केला आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या "पनामा पेपर‘मध्ये अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन आणि अजय देवगणचे नाव आले आहे. या पार्श्वभूमीवर अमरसिंह एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलत होते. जया बच्चन यांचा स्वभाव अस्थिर असून त्यांना संधी देणे धोकादायक ठरू शकेल, अशी शंका अमिताभ यांनी उपस्थित केली होती, असे अमरसिंह म्हणाले. तसेच मला बच्चन कुटुंबाविषयी काहीही बोलायचे नाही, जे असेल ते त्यांच्याशी बोला, असेही अमरसिंह म्हणाले. यावेळी पनामा पेपर प्रकरणीही बोलणे त्यांनी टाळले.
अमरसिंह आणि अमिताभ यांच्यामध्ये काही वर्षांपूर्वी अगदी मैत्रीपूर्ण संबंध होते. अभिषेक-ऐश्वर्याच्या विवाहावेळी ही चांगली मैत्रीही हे दिसून आले. मात्र त्यानंतर मतभेद झाल्यामुळे दोघेही परस्परांपासून दुरावले.

यंत्रमानवांमुळे जगभरातील नोकऱ्यांना धोका...
लॉस एंजिलिस: प्रत्येकाच्याच दैनंदिन आयुष्यात सध्या स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. परंतू येत्या काही वर्षात स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे तयार झालेले यंत्रमानव जिवंत मनुष्याची जागा घेतील असे भाकीत केले जात आहे. कॅलिफोर्नियातील मिल्केन इन्स्टिट्यूटसच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत तंत्रज्ञानाचा बाजारपेठा आणि विशेषतः नोकऱ्यांवर होणारा प्रभाव याविषयी चर्चा झाली आहे. परिषदेत सुमारे 3,500 लोकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 700 जणांनी तंत्रज्ञानामुळे कमी वेतन असलेले आणि साध्या कौशल्यांवर आधारलेले रोजगार बंद झाल्याचे मान्य केले.
स्वयंचलित तंत्रज्ञानाचा फायदा प्रामुख्याने कामाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि चुकांचे प्रमाण कमी होण्यासाठी होतो. परंतू बऱ्याचवेळा यामुळे मनुष्यबळातदेखील घट होते, असे मत मँकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटचे मायकल चूई यांनी व्यक्त केले आहे. स्वयंचलित तंत्रज्ञानाचा आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा धोका आहे. येत्या 10 वर्षांमध्ये अमेरिका आणि युरोपामधील बँकिंग क्षेत्रातील 30 टक्के नोकऱ्यांमध्ये कपात होण्याचे भाकीत सिटीग्रुपच्या अहवालात करण्यात आले आहे.

झारखंडमध्ये विद्यार्थिनीचे दोन्ही हात तोडून हत्या
रामगड (झारखंड)- एका विद्यार्थिनीचे दोन्ही हात तोडून हत्या करण्यात आल्याची घटना येथे उघडकीस आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार)दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सौ. सोनाली चित्तरंजन मुरमू (वय 30) या बी.एड चे शिक्षण घेत होत्या. महाविद्यालयात जाण्यासाठी त्या घरातून बाहेर पडल्या होत्या. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांचा खून झाला आहे. महाविद्यालयाजवळच त्यांचा मृतदेह आढळून आला असून, दोन्ही हात तोडण्यात आले आहेत. मोटार सायकलवरून आलेल्यांनी त्यांचा पाठलाग करून हे कृत्य केल्याची शक्यता आहे. सोनाली यांच्या मागे चार वर्षांची मुलगी व पती असा परिवार आहे. या घटनेबाबत पुढील तपास सुरू आहे.‘
‘आमचा विवाह झाल्यानंतर सोनालीने मोबाइल क्रमांक बदलला होता. तिला कोणीतरी त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे महाविद्यालयात सोडण्यासाठी व आणण्यासाठी मी जात होतो. फक्त बुधवारीच (ता. 4) गेलो नव्हतो. बुधवारी दुपारी तिची हत्या झाली. आरोपीला शोधून त्याला कडक शिक्षा देण्यात यावी,‘ अशी मागणी सोनालीच्या पतीने केली आहे.

राजस्थानमध्ये आढळली उष्ण पाण्याची विहीर!
उदयपूर - राजस्थान राज्यामधील बिचर्डी या गावामध्ये उष्ण पाण्याचा झरा असलेली एक विहीर शास्त्रज्ञांना आढळून आली आहे. राज्यातील बेवार आणि पाली या जिल्ह्यांना जोडणाऱ्या राज्य महामार्गावर हे गाव आहे.
या विहीरीमधील पाण्याचे तापमान अत्यंत थंड हवामानामध्येही तब्बल 58 अंश सेल्सियसपेक्षा जास्त असल्याचे दृष्टोपत्तीस पडले आहे. अशी विहीर अत्यंत दुर्मिळ असून तांत्रिकदृष्टया अशा विहीरींना "जिओथर्मल वेल्स‘ या नावाने ओळखले जाते. भुराराम नावाच्या एका गरीब शेतकऱ्याची ही विहीर आहे. या विहीरीचे नाव नोखरा बेरा असे आहे.
""भूजल विभाग आणि राष्ट्रीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनादेखील येथे अशा स्वरुपाची विहीर असल्याची कल्पना नव्हती. यामुळे ही विहीर राजस्थानमधील अशा स्वरुपाची पहिलीच विहीर असल्याची दाट शक्यता आहे,‘‘ असे भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या पुष्पेंद्र सिंह राणावत यांनी सांगितले. दरम्यान, या विहीरीचे शास्त्रीय महत्त्व माहिती नसलेल्या भुरारामसाठी ही विहीर म्हणजे मोठी समस्या आहे. या विहिरीमधील पाण्याचा शेतीला पुरवठा करण्यासाठी ते रोज थंड करावे लागते!

इसिसचे सदस्य विकतायत कोंबड्या आणि अंडी
कैरो : जगभरात दहशत निर्माण करू पाहणाऱ्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेचे सदस्य सध्या लिबियामध्ये स्वस्तातल्या कोंबड्या आणि अंडी विकत आहेत. आर्थिक कोंडीत सापडल्याने इसिसवर ही नामुष्की ओढवली आहे.
इसिसने जेव्हा लिबियातील सिर्त शहरावर ताबा मिळविल्यावर तेथील अनेक मालमत्ता ताब्यात घेतल्या. त्यामध्ये शेती आणि काही खूप मोठे कुक्कुटपालन प्रकल्पांचा समावेश आहे, असे येथील एका स्थानिक रहिवशाने ‘मिडल ईस्ट आय‘शी बोलताना सांगितले.
इसिसचे वर्चस्व असलेल्या सिर्तमध्ये त्यांचे दहशतवादी घरपट्टी आणि कर यंत्रणा राबवत आहेत. त्याचबरोबर त्यांनी पोल्ट्रीचाही व्यवसाय सुरू केला आहे.

इराक आणि सीरियामधील इसिसची संपत्ती असलेले अड्डे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या फौजांनी हवाई हल्ल्यांनी उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे इसिसला पैशांची कमतरता भासू लागली आहे. इसिस आता त्यांच्या सदस्यांचे पगारातील अर्ध्याच रकमा देत असल्याचे यापूर्वीच उघडकीस आले आहे.

No comments:
Post a Comment