[अंतरराष्ट्रीय]
१- उत्तर कोरिया; उत्तर कोरियात आठवडाभर लग्न आणि अंत्ययात्रांवर बंदी
२- पॅरीस; तीन नव्या ग्रहांचा शोध, जीवसृष्टीची शक्यता
३- व्हर्जिनिया; शाळा चुकवणाऱ्या मुलाला धडा शिकवण्यासाठी बापाची क्रूर शक्कल
४- ब्राझील; न्यायाधीशांकडून व्हॉटसअॅप 72 तासांसाठी ब्लॉक
५- "ट्रम्प, पाक हा काही अमेरिकेची कॉलनी नाही'
६- लादेनचा ठावठिकाणा पाकला माहित होता- क्लिंटन
७- न्यूयॉर्क; चाकूने गर्भ पाडणाऱ्या महिलेस 100 वर्षांची शिक्षा
८- F16 विमानांची खरेदी स्वत:च्या पैशांनी करा, अमेरिकेचा पाकिस्तानला सल्ला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
९- मला हरवण्यासाठी गोविंदाने दाऊदची मदत घेतली होती : राम नाईक
१०- ऑगस्टा घोटाळा : राहुल गांधींचीही चौकशी करा : सोमय्या
११- ऑगस्टा घोटाळा : राहुल गांधींचीही चौकशी करा : सोमय्या
१२- पाकमधील मंदिरे पाडण्यास आमचा विरोध-सईद
१३- सतत टीका होत असल्याने आनंदच- राहुल
१४- भारतात 2015 मध्ये वाढली असहिष्णुता, USCIRFचा अहवाल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१५- महाराष्ट्राचा केक कापल्याबद्दल श्रीहरी अणेंचा माफीनामा
१६- मुख्यमंत्री, राजीनामा द्या, राज ठाकरेंची मागणी
१७- पुणे; पाणी देण्याच्या विरोधात मनसेकडून तोडफोड
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- पिंपरी; पाच सावकारांच्या जाचामुळे महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
१९- कोंड; शिक्षणासाठी गहाण ठेवलेले मंगळसूत्र मिळेना
२०- केरळात दलित युवतीवर अमानूष बलात्कार व खून
२१- सोलापूर - 15 फूट खड्यात पडून महापालिका कर्मचारी मधुकर काशिनाथ वाघमारे यांचा मृत्यू.
२२- लातूरमध्ये कला पथकाची जीप पुलावरून कोसळून चौघांचा मृत्यू, चार जखमी.
२३- सिलामपूर मेट्रो स्थानकाबाहेर 37 वर्षीय व्यापा-याची गोळ्या घालून हत्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- खेलरत्न पुरस्कारासाठी विराट कोहलीची शिफारस
२५- कंगना माझ्या मुलाला मारहाण करायची, शेखर सुमन यांचा आरोप
२६- 63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज दिल्लीत वितरण
२७- हृतिकसोबतच्या वाढत्या जवळीकतेबाबत सुझान म्हणते...
२८- 2050 मध्ये हिंदू बनेल जगातील तिसरा मोठा धर्म
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
(सुमित महाजन, नमस्कार लाईव्ह वाचक )
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
================================================

अणेंच्या कृतीला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी अणे यांचा फोटो असलेला केक कापला होता, तर केकच्या माध्यमातून राज्याचे दोन तुकडे करणारे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे हा वाढदिवस आयुष्यभर लक्षात ठेवतील, असा धमकीवजा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. औरंगाबादमध्ये श्रीहरी अणेंचा केक कापून शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र अणेंनी दिलगिरी व्यक्त करुन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

‘बाहुबली’ने सर्वोत्कृष्ट चित्रपट या पुरस्कारावर मोहर उमटवली आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी अमिताभ बच्चन आणि कंगना राणावत यांचा सन्मान होईल. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून संजय लीला भन्साळी यांना गौरवण्यात येणार आहे. ‘सैराट’मधील भूमिकेमुळे प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी ‘आर्ची’ अर्थात रिंकू राजगुरु, ‘कट्यार..’ चित्रपटातील गाण्यांनी रसिकांवर मोहिनी घालणारे पार्श्वगायक महेश काळे यांचाही राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येईल.

महिलेने पतीच्या औषधांसाठी 10 टक्के व्याजानं एक लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. चक्रवाढ व्याजामुळे ही रक्कम तब्बल 5 ते 6 लाखांपर्यंत पोहोचली. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून त्यांनी सावकारांना व्याजही दिलं होतं.
एका सावकाराच्या कर्जाचं व्याज फेडण्यासाठी पीडितेनं दुसऱ्या सावकाराकडून कर्ज घेतलं, अशामुळे पीडित महिलेवर अनेकांच्या कर्जाचा डोंगर झाला. मात्र आता व्याजाचे हफ्ते थकल्याने सावकारांचे सतत फोन येऊ लागले. सावकारांच्या उद्धट भाषेमुळे महिलेने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

36 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तारुढ पक्षाने बैठक बोलवली आहे. 33 वर्षांचे किम जोंग आपलं नेतृत्व बळकट करण्यासाठी प्रयत्न करतील. उत्तर कोरियाला अण्वस्त्र सज्ज देश म्हणून घोषित केलं जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर उ. कोरियाचे कडक सुरक्षाव्यवस्था राखण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी लग्न समारंभ आणि अंत्ययात्रांवर बंदी घालण्यात आली आहे.

कंगना माझ्या मुलाला मारहाण करायची, शेखर सुमन यांचा आरोप
मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यातील वादाने टोक गाठलं असताना अभिनेते शेखर सुमन यांनी यात उडी घेतली आहे. कंगनाचा एक्स बॉयफ्रेण्ड अध्ययन सुमन याच्या दाव्यांना पाठबळ देत शेखर सुमन यांनी कंगनावर काळी जादू केल्याचा आरोप केला आहे.
शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन आणि कंगना सात वर्षांपूर्वी रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यांच्यात अचानक आलेल्या दुराव्याचं कारण कोणालाच समजत नव्हतं. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं जोडपं अचानक एकमेकांपासून दूर झालं, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या.
शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन आणि कंगना सात वर्षांपूर्वी रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यांच्यात अचानक आलेल्या दुराव्याचं कारण कोणालाच समजत नव्हतं. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं जोडपं अचानक एकमेकांपासून दूर झालं, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या.
================================================
मला हरवण्यासाठी गोविंदाने दाऊदची मदत घेतली होती : राम नाईक
लखनौ : उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी बॉलिवूड अभिनेता गोविंदावर खळबळजनक आरोप केला आहे. “गोविंदाने 2004च्या निवडणुकीत मुंबई उत्तर मतदारसंघातून मला पराभूत करण्यासाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि बिल्डर हितेन ठाकूरची मदत घेतली होती,” असा दावा राम नाईक यांनी केला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी ‘चरैवति चरैवति’ या आत्मचरित्रात हा दावा केला आहे. मराठीत असलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत 25 एप्रिल रोजी झालं होतं.
राम नाईक यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, “तीन वेळा खासदार राहिल्यानंतर आणि मुंबईसाठी बरंच काही केल्यानंतरही मी केवळ 11 हजार मतांनी पराभूत झालो. हा पराभव मी अजूनही पचवू शकलेलो नाही. गोविंदाची दाऊद आणि ठाकूरसोबत मैत्री होती. मतदारांमध्ये दहशत परववण्यासाठी गोविंदाने या दोघांची मदत घेतली होती.
1999 पासून 2004 पर्यंत केंद्रीय मंत्रिपदाची धुरा सांभाळलेले राम नाई म्हणाले की, “गोविंदाचे दाऊद आणि ठाकूर यांच्याशी संबंध होते हे सांगताना मी अजिबात चुकीचं वाटत नाही. त्यांनी त्यांच्या ताकदीचा वापर निवडणुकीत माझ्याविरोधात केला आणि निकाल त्यांच्या बाजूने लागला.”
================================================
ऑगस्टा घोटाळा : राहुल गांधींचीही चौकशी करा : सोमय्या
नवी दिल्ली : भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी बहुचर्चित ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणात आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं नाव घेतलं आहे. सोमय्या यांनी अंमलबजावणी संचलनालय अर्थात ‘ईडी’ला पत्र लिहून राहुल गांधींच्या चौकशीची मागणी केली आहे.
इतकंच नाही तर ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळा आणि दिल्लीतील कॉमनवेल्थ घोटाळा यांच्यात समान दुवा असल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.
================================================
महाराष्ट्राचा केक कापल्याबद्दल श्रीहरी अणेंचा माफीनामा
नागपूर : वाढदिवसाला महाराष्ट्राच्या आकाराच्या केकचे तुकडे कापणारे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी माफी मागितली आहे. हे कृत्य करायला नको होतं, असं म्हणत राज्यातील नागरिकांच्या भावना दुखावल्या असल्यास मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया अणेंनी दिली.
स्वत:च्या वाढदिवशी अणे यांनी नागपुरात महाराष्ट्राची चित्र असलेल्या केकमधून विदर्भ कापून वेगळा केला होता. त्यांच्या या कृत्यामुळे राज्यभरातून टीकेचे बाण निघाले होते. अणे यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी करावी, मात्र महाराष्ट्राचा केक कापून नागरिकांच्या भावना दुखावण्याचा त्यांना अधिकार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया विविध स्तरातून उमटली होती.
अणेंच्या कृतीला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी अणे यांचा फोटो असलेला केक कापला होता, तर केकच्या माध्यमातून राज्याचे दोन तुकडे करणारे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे हा वाढदिवस आयुष्यभर लक्षात ठेवतील, असा धमकीवजा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. औरंगाबादमध्ये श्रीहरी अणेंचा केक कापून शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र अणेंनी दिलगिरी व्यक्त करुन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
================================================
63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज दिल्लीत वितरण
नवी दिल्ली : 63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज दिल्लीत वितरण होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज संध्याकाळी पार्श्वगायक महेश काळे, ‘आर्ची’ रिंकू राजगुरु यांच्यासह अन्य मराठी-हिंदी कलाकार आणि कलाकृतींचा गौरव होईल.
‘बाहुबली’ने सर्वोत्कृष्ट चित्रपट या पुरस्कारावर मोहर उमटवली आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी अमिताभ बच्चन आणि कंगना राणावत यांचा सन्मान होईल. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून संजय लीला भन्साळी यांना गौरवण्यात येणार आहे. ‘सैराट’मधील भूमिकेमुळे प्रेक्षकांची वाहवा मिळवणारी ‘आर्ची’ अर्थात रिंकू राजगुरु, ‘कट्यार..’ चित्रपटातील गाण्यांनी रसिकांवर मोहिनी घालणारे पार्श्वगायक महेश काळे यांचाही राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येईल.
सर्वोत्कृष्ट चित्रपट : बाहुबली
सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमिताभ बच्चन (पीकू)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगना राणावत (तनू वेड्स मनू रिटर्न्स)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साली (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट : बजरंगी भाईजान
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – दम लगा के हईशा
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – रिंगण
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – महेश काळे ( कट्यार काळजात घुसली)
विशेष दखल : वॉइस ओव्हर आर्टिस्ट – हरिष भीमानी (मला लाज वाटते)
विशेष दखल : रिंकू राजगुरू (सैराट) (मराठी)
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म – अमोल देशमुख – औषध (मराठी)
सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट– पायवाट (मराठी)
सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपट – दारवठा (मराठी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ज्युरी) – कल्की (मार्गारिटा विथ स्ट्रॉ)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – तन्वी आझमी (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट गीतकार – वरुण ग्रोवर (मोह मोह के धागे) दम लगा के हईशा
सर्वोत्कृष्ट गायिका – मोनाली ठाकूर (मोह मोह के धागे) दम लगा के हईशा
सर्वोत्कृष्ट पटकथा-संवाद – पीकू आणि तनू वेड्स मनू (विभागून)
सर्वोत्कृष्ट पटकथा (आधारित) – विशाल भारद्वाज (तलवार)
सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ) – जुही चतुर्वेदी (पीकू)
सर्वोत्कृष्ट नृत्य – रेमो (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट सेट डिझाईन – बाजीराव मस्तानी
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट – बाहुबली

मुख्यमंत्री, राजीनामा द्या, राज ठाकरेंची मागणी
मुंबई : स्वतंत्र विदर्भासाठी मतदान करणारा व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी का? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
“संयुक्त महाराष्ट्राबाबत मुख्यमंत्री मौन बाळगतात. शिवाय, फडणवीसांना स्वतंत्र विदर्भासाठी मतदानही केलं होतं. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी राहण्याची अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा.” असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. शिवाय, श्रीहरी अणेंना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपनेच पुढे केल्याचा आरोप राज यांनी केला आहे.
फडणवीस यांनी 2013 साली वेगळ्या विदर्भाच्या बाजूने मतदान केले होते. त्याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्टही अपलोड केली होती. या फेसबुक पोस्टचा दाखल देत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
================================================
पाच सावकारांच्या जाचामुळे महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
पिंपरी : तब्बल 5 सावकारांच्या जाचाला कंटाळून एका महिलेने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा घटना पिंपरीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेने पतीच्या औषधांसाठी 10 टक्के व्याजानं एक लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. चक्रवाढ व्याजामुळे ही रक्कम तब्बल 5 ते 6 लाखांपर्यंत पोहोचली. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून त्यांनी सावकारांना व्याजही दिलं होतं.
एका सावकाराच्या कर्जाचं व्याज फेडण्यासाठी पीडितेनं दुसऱ्या सावकाराकडून कर्ज घेतलं, अशामुळे पीडित महिलेवर अनेकांच्या कर्जाचा डोंगर झाला. मात्र आता व्याजाचे हफ्ते थकल्याने सावकारांचे सतत फोन येऊ लागले. सावकारांच्या उद्धट भाषेमुळे महिलेने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
================================================
ऑगस्टा घोटाळा : राहुल गांधींचीही चौकशी करा : सोमय्या
नवी दिल्ली : भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी बहुचर्चित ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणात आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं नाव घेतलं आहे. सोमय्या यांनी अंमलबजावणी संचलनालय अर्थात ‘ईडी’ला पत्र लिहून राहुल गांधींच्या चौकशीची मागणी केली आहे.
इतकंच नाही तर ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळा आणि दिल्लीतील कॉमनवेल्थ घोटाळा यांच्यात समान दुवा असल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे
================================================
उत्तर कोरियात आठवडाभर लग्न आणि अंत्ययात्रांवर बंदी
प्योंगयांग : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी देशात आठवडाभरासाठी लग्न आणि अंत्ययात्रांवर बंदी घातली आहे. किम जोंग यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरात जोरदार तयारी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही बंदी लादण्यात आली आहे.
36 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तारुढ पक्षाने बैठक बोलवली आहे. 33 वर्षांचे किम जोंग आपलं नेतृत्व बळकट करण्यासाठी प्रयत्न करतील. उत्तर कोरियाला अण्वस्त्र सज्ज देश म्हणून घोषित केलं जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर उ. कोरियाचे कडक सुरक्षाव्यवस्था राखण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी लग्न समारंभ आणि अंत्ययात्रांवर बंदी घालण्यात आली आहे.
================================================

मुंबई : देश-विदेशात प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या ‘द जंगल बुक’ सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 150 कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. या सिनेमाची आतापर्यंत भारतातील कमाई 160 कोटींच्या पुढे गेली आहे. 8 एप्रिलला हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाला होता.
डिस्नेचा लाईव्ह-अॅक्शन अॅडव्हेंचर असलेल्या या सिनेमात एकच मानवी पात्र आहे, ते म्हणजे मोगलीचं. मोगलीची भूमिका चिमुकल्या नील सेठीने साकारली आहे.
नुकतंच डिस्नेने यूट्यूबवर एक व्हिडीओ जारी केला आहे. ‘द जंगल बुक’ सिनेमा कसा शूट केला, त्याबाबतचा हा मेकिंग व्हिडीओ आहे.
एक मानवी पात्र सोडलं तर या संपूर्ण सिनेमात फक्त आणि फक्त प्राणीच दिसतात. मात्र प्रत्यक्ष शुटिंगदरम्यान एकही प्राणी नव्हता. ग्राफिक्स/व्हीएफएक्सच्या मदतीने ‘द जंगल बुक’ शूट करण्यात आला.
मुंबईत जन्मलेल्या रुडयार्ड किप्लिंग यांच्या पुस्तकावर आधारित ‘जंगल बुक’ हे कार्टून जगभरात गाजलं होतं. त्यावरच आधारित ‘द जंगल बुक’ सिनेमा आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मोगलीने टेलीव्हिजन स्क्रीनवरुन सिनेमागृहातल्या मोठ्या पडद्यावर झेप घेतली.
या सिनेमाच्या हिंदी डबिंग व्हर्जनमध्ये प्रियंका चोप्रा, इरफान खान, नाना पाटेकर, ओम पुरी, शेफाली शाह, नील सेठी यांचे व्हॉईस ओव्हर व्यक्तिरेखांना लाभले आहेत.
Making VIDEO:
================================================
हृतिकसोबतच्या वाढत्या जवळीकतेबाबत सुझान म्हणते...
मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनसोबतच्या वाढत्या जवळीकतेनंतर, सुरु झालेल्या चर्चांना पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न हृतिकची घटस्फोटीत पत्नी सुझान खानने केला आहे.
सुझानने याबाबत ट्विट करुन हृतिक आणि आपल्याबाबत तर्कवितर्क लढवण्याचं बंद करा, असं आवाहन केलं आहे.
“लोकांनी कृपया तर्कवितर्क लढवणं बंद करावं, अशी माझी विनंती आहे. हृतिकशी पुन्हा जवळीक होणार नाही. पण आम्ही नेहमी चांगले पालक राहू, आणि त्यालाच प्राधान्य असेल” असं ट्विट सुझानने केलं आहे.
================================================
तीन नव्या ग्रहांचा शोध, जीवसृष्टीची शक्यता
पॅरिस : पृथ्वीच्या वातावरणाशी साधर्म्य असलेल्या तीन ग्रहांचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. ‘नेचर’ या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. हे ग्रह पृथ्वीपासून 40 प्रकाशवर्ष दूर आहेत.
अत्यंत थंड असलेल्या बटू ताऱ्याभोवती हे ग्रह परिभ्रमण करत आहेत. या ग्रहांचा आकार आणि तापमान काही प्रमाणात पृथ्वी तसंच शुक्रासारखंच असावं, असा अंदाज शास्त्रज्ञांनी लावला आहे. त्यामुळे या तिन्ही ग्रहांवर जीवसृष्टी असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
बेल्जियमचे खगोलभौतिक शास्त्रज्ञ मायकल गिलन आणि त्यांच्या टीमने हा ग्रहांचा शोध लावला आहे. आपल्या सौरमालेबाहेर जीवसृष्टी असू शकते आणि याचे रासायनिक पुरावे शोधण्याची ही पहिलीच संधी आहे, असं मायकल गिलन म्हणाले.
नव्याने सापडलेल्या या तिन्ही ग्रहांचा आकार पृथ्वीएवढंच असू शकतं. तसंच वातावरणही सारखं असावं, या शोधामुळे जीवसृष्टीबाबत सुरु असलेल्या प्रयत्नांना गती मिळण्याचा अंदाज आहे.
================================================
शाळा चुकवणाऱ्या मुलाला धडा शिकवण्यासाठी बापाची क्रूर शक्कल
एका पित्याने शाळा चुकवणाऱ्या आपल्या 17 वर्षीय मुलाला धडा शिकवण्यासाठी अभद्र आणि क्रूर शक्कल लढवली. मुलाला शिस्त लावण्यासाठी चक्क त्याच्याशी बॉक्सिंग खेळून त्याला रक्तबंबाळ करण्यात आलं. धक्कादायक म्हणजे या पित्याने या सर्वप्रकाराचा व्हिडीओ शूट करून तो फेसबुकवर पोस्ट केला आहे.
अमेरिकेच्या व्हिर्जिनिया शहरात हा सर्व प्रकार घडला.
आपला मुलगा शाळेत गैरवर्तन करतो. मुलगा न सांगताच वर्गाच्या बाहेर जातो. तो घरी येत नाही, तो नेमकं काय करतो हे मला सांगत नाही. म्हणून त्याला धडा शिकवण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी मी त्याच्याशी बॉक्सिंग खेळत असल्याचं या वडिलाने व्हिडीओच्या सुरुवातीला सांगितले आहे.
मी सांगितलेली एकही गोष्ट तो ऐकत नाही. त्याच्या मनाला येईल, तसं तो वागतो. त्यामुळे त्याला शिस्त लावणं आवश्यक आहे. मात्र ही केवळ शिस्त नव्हे तर स्वसंरक्षणाचाही धडा आहे, असंही या बापाने म्हटलं आहे.
================================================
न्यायाधीशांकडून व्हॉटसअॅप 72 तासांसाठी ब्लॉक
रिओ दी जानेरो : ब्राझीलमध्ये न्यायाधीश मार्सेल मोंताल्वो यांनी व्हॉटसअॅप 72 तासांसाठी ब्लॉक केलं आहे. व्हॉटसअॅपची मालकी असलेल्या फेसबुकने एका गुन्हेगारी प्रकरणाशी संबंधित माहिती न्यायालयाला दिली नव्हती. त्यामुळे न्यायाधीशांनी थेट व्हॉटसअॅपव ब्लॉक केलं आहे.
72 तासांसाठी व्हॉटसअॅप ब्लॉक केल्याने ब्राझीलमधील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ब्राझीलमध्ये अशाच काही कारणांमुळे मागील वर्षी डिसेंबरमध्येही व्हॉटसअॅप काही काळासाठी बंद केलं होतं.
व्हॉटसअॅप ब्राझीलमध्ये लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. त्यामुळे व्हॉटसअॅप ब्लॉक झाल्यामुळे त्याचा फायदा टेलिग्राम या अॅपला मिळाला.
“72 तासांसाठी ब्लॉक करण्याच्या निर्णयामुळे निराशा झाली. आम्ही न्यायालयाला पूर्णत: सहकार्य केलं होतं,” असा दावा व्हॉटसअॅपने केला आहे. “हा निर्णय म्हणजे ब्राझीलच्या दहा कोटींपेक्षा जास्त लोकांना शिक्षा केल्यासारखं आहे, जे आमच्या सेवेवर विश्वास ठेवतात,” असंही व्हॉटसअॅपने म्हटलं आहे.
दरम्यान, यापूर्वी आदेश न मानणाऱ्या एका फेसबुक एक्झिक्युटिव्हला अटक करण्याचा आदेश न्यायाधीश मार्सेल मोंताल्वो यांनी यंदाच्या मार्च महिन्यात दिला होता.
================================================
No comments:
Post a Comment