[अंतरराष्ट्रीय]
१- वॉशिंग्टन; पाकिस्तानची मदत रोखणा-या विधेयकाला अमेरिकन सिनेटची मंजुरी
२- रिओ द जेनेरिओ; बंदुकीचा धाक दाखवून ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडूला लुटलं
३- कैरो; स्फोटामुळे कोसळले 'इजिप्तएअर'चे विमान?
४- कॅलिफोर्निया; अब्राहम बनला बाराव्या वर्षी पदवीधर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- खासगी महाविद्यालयांना 'नीट' कायम : तावडे
६- लखनऊ; तब्बल 100 महिलांचं लैंगिक शोषण, ढोंगी बाबा अटकेत
७- यंदा सरासरी १०९ टक्के पावसाचा अंदाज
८- यंदा 109% पाऊस; "स्कायमेट'चा सुधारित अंदाज
९- फक्त सहाच मोठ्या बँका ठेवाव्यात- विनोद राय
१०- दिल्लीत एअर ऍम्ब्युलन्सला अपघात, 5 जखमी
११- ...तर केजरीवाल मोदींसोबत हातमिळवणी करतील - प्रशांत भूषण
१२- देशात नेहरूंमुळे बलात्कार होतात- भाजपचे आमदार ज्ञानदेव आहुजा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राला ठेंगा
१४- महाराष्ट्रात फक्त २८१० जागांचे प्रवेश सीईटीमधून, अन्य जागांसाठी नीट अनिवार्य
१५- सिंधुदुर्ग; शहीद पांडुरंग गावडे अनंतात विलीन
१६- बीड; बीड जिल्हा बँकेला आग लागली की लावली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- भाईंदर; जाब विचारणाऱ्या जोडप्याला रेल्वे पँट्री कर्मचाऱ्यांची मारहाण
१७- कल्याण; सोसायटीतील स्विमिंग पूलमध्ये बुडून अल्पवयीन मुलीचा मृत्यू
१८- मानखुर्दमध्ये केमिकल गोडाऊनला भीषण आग
१९- मुंबईत 2 लाख स्किझोफ्रेनियाग्रस्त
२०- सोलापूर; लेकराच्या आर्त हाकेने आई आत्महत्येपासून परावृत्त
२१- औरंगाबाद वाळू वाहतूक करणारा ट्रक घराची कंपाउंड वॉल तोडून घरात घुसला
२२- नागालँड; पोलिस जवानाची गोळी मारून केली आत्महत्या
२३- पुणे - मुठा नदीत दोन तरुणी बुडाल्या
२४- शिमला येथील ठियोग येथे डोंगरावरून कार कोसळली, ३ ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- लिझाला डिवचल्याने अक्षयची सटकली, सिद्धार्थ जाधववर वैताग
२६- पाळणा कधी हलणार, राज कुंद्राचा बिपाशाला सवाल
२७- पालघर ते मुंबई अप-डाऊन, काका-काकींकडे वास्तव्य, शार्दूलची कहाणी
२८- 'आर्ची-परशा'मध्ये मला रोमियो-ज्युलिअट दिसले : इरफान
२९- इमर्जन्सीमध्ये तुम्हाला 'इथून' मिळेल कर्ज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
जो जिभेवर ताबा मिळवितो, तो मन जिंकतो......
जो मन जिंकतो, तो जग जिंकतो
(पांडुरंग पोटे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
============================================

भाईंदरला राहणारे व्यापारी प्रदीप गुप्ता आणि त्यांची पत्नीसह कुटुंबातले 12 जण गरिबरथ एक्स्प्रेसने प्रवास करत होते. यावेळी रेल्वेत मिळणाऱ्या रेल नीर ऐवजी दुसऱ्या कंपनीची पाण्याची बाटली का दिली हे विचारायला गेलेल्या गुप्ता यांच्या पत्नीला पँट्रीकारच्या कर्मचाऱ्यांनी चक्क मारहाण केली. ज्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.

अक्षयकुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या हाऊसफुल्ल 3 चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय, रितेश, लिझा हेडन आणि जॅकलिन फर्नांडिस कलर्सवरील कॉमेडी नाईटस बचाओ या कार्यक्रमात आले होते. एआयबी रोस्टच्या धर्तीवर असलेल्या या कार्यक्रमात नेहमीच पाहुण्यांची टर उडवली जाते. मात्र यावेळी विनोदाच्या नावाखाली केला जाणारा लिझाचा अपमान अक्षयला आवडला नाही आणि त्याचा पारा चढला.
ऑस्ट्रेलियाहून आलेल्या लिझा हेडनला सिद्धार्थ जाधवच्या स्कीटमध्ये कांगारु असं संबोधण्यात आलं. याचप्रमाणे आणखी एक वर्णद्वेषी कमेंट केल्यामुळे लिझा आणि जॅकलिन अनकम्फर्टेबल असल्याचं रितेश आणि अक्षयला जाणवलं. लिझाला जी भाषा समजतही नाही, त्या भाषेत तिच्यावर विनोद करणं अशोभनीय असल्याचं मत अक्षयने व्यक्त केल्याचंही युनिटमधील एकाने सांगितलं. त्यामुळे अक्षयने
तात्काळ खाली उतरुन सिद्धार्थला थांबवल्याची माहिती आहे.
अक्षयच्या हस्तक्षेपानंतर स्क्रिप्टमध्ये तात्काळ बदल करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी अक्षयची बाजू कळू शकलेली नाही तर सिद्धार्थ जाधवने मात्र असं काहीच घडलं नसल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं आहे. त्यामुळे हा पब्लिसिटी स्टंट होता का, अशी चर्चाही सुरु आहे.

बिपाशाच्या लग्नाला जेमतेम महिना होत आहे. त्यांच्या लग्नाचे आणि हनिमूनचे फोटो ताजे असतानाच राज कुंद्रा बिप्सला ‘तो’ प्रश्न विचारुन छेडलं आहे. शिल्पा शेट्टीचा मुलगा विआनच्या वाढदिवसानिमित्त बिपाशाने ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या. त्यावर राजने ‘विआन त्याला मित्र कधी मिळणार?’ असं विचारत असल्याचं आडून म्हटलं. राजचा निशाणा अर्थातच बिपाशाच्या प्रेग्नन्सीकडे होता.

‘मराठी रोमियो-ज्युलिअट पाहून मी भारावून गेलो. पाश्चिमात्य सिनेमाकडे वळणाऱ्या तरुण पिढीने हा सिनेमाही पाहायला हवेत. ही भारतीय चित्रपटाची नवी सुरुवात असून प्रादेशिक सिनेमा जागतिक स्तरावर जात असल्याचं लक्षण आहे.’ अशी प्रतिक्रिया इरफान खानने व्यक्त केली आहे.
‘प्रादेशिक चित्रपट प्रत्येक वर्षी शिरपेचात मानाचा तुरा रोवत आहे. यंदा हा मान सैराटला लाभला आहे, यात काही शंकाच नाही.’ असं इरफान म्हणतो.
सैराट पाहून भारावलेल्या इरफान खानने सिनेमाचं स्क्रीनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात तयार होणारे उत्तम चित्रपट तरुण पिढीने पहावे यासाठी इरफान त्याच्या मुलांसह मुलांच्या समवयस्क मित्रांना दाखवणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेही सोबत स्क्रीनिंगला असतील, अशी माहिती आहे.

खासगी महाविद्यालयांना 'नीट' कायम : तावडे
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सरकारी मेडिकल महाविद्यालयातील 2810 जागांचे प्रवेश हे सीईटीप्रमाणेच होतील. मात्र ज्या खासगी महाविद्यालयातील जागा सरकारी CET द्वारे भरण्यात येतात, त्यांनाही ‘नीट’मधून सवलत देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी याबाबतची माहिती दिली.
असं असलं तरी महाराष्ट्रामध्ये खाजगी महाविद्यालयाच्या जागा सरकारकडे नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व खाजगी महाविद्यालयांना ‘नीट’ लागूच राहणार , असं राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं.
दुसरीकडे अभिमत (डीम्ड) विद्यापीठांचे प्रवेश हे नीट परीक्षेद्वारेच होणार आहेत.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज ‘नीट’ परीक्षेबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. त्यानंतर नड्डा यांनी सविस्त माहिती दिली.
============================================
शहीद पांडुरंग गावडे अनंतात विलीन
सिंधुदुर्ग: कुपवाड्यात अतिरेक्यांशी दोन हात करताना शहीद झालेले जवान पांडुरंग गावडे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. आंबोलीतल्या मुळवंदवाडी या त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुपवाड्यात शनिवारी एका घरात ५ दहशतवादी लपून बसले होते..त्या पाचही दहशतवाद्यांचा गावडे आणि त्यांच्या सहकार्यांनी खात्मा केला. मात्र त्यादरम्यान पांडुरंग गावडे जबर जखमी झाले होते. उपचारादरमयान त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि संपूर्ण आंबोलीचं वातावरण शोकमग्न झालं होतं. आज त्याच जड अंतकरणानं अवघ्या पंचक्रोशीनं त्यांना शेवटचा निरोप दिला.
गेल्या 15 वर्षांपासून पांडुरंग गावडे देशाची सुरक्षा करत होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.
============================================
जाब विचारणाऱ्या जोडप्याला रेल्वे पँट्री कर्मचाऱ्यांची मारहाण
मुंबई : मुंबईतल्या भाईंदर परिसरात राहणाऱ्या एका जोडप्याला रेल्वेतल्या पँट्रीकार कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे नीरऐवजी दुसरं पाणी का दिला, असा जाब विचारणाऱ्या जोडप्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. रेल्वेतल्या पँट्रीकार मधल्या जवळपास 20 कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे.
भाईंदरला राहणारे व्यापारी प्रदीप गुप्ता आणि त्यांची पत्नीसह कुटुंबातले 12 जण गरिबरथ एक्स्प्रेसने प्रवास करत होते. यावेळी रेल्वेत मिळणाऱ्या रेल नीर ऐवजी दुसऱ्या कंपनीची पाण्याची बाटली का दिली हे विचारायला गेलेल्या गुप्ता यांच्या पत्नीला पँट्रीकारच्या कर्मचाऱ्यांनी चक्क मारहाण केली. ज्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
============================================
लिझाला डिवचल्याने अक्षयची सटकली, सिद्धार्थ जाधववर वैताग
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार अभिनेता सिद्धार्थ जाधववर चिडल्याचं नुकतंच समोर आलं आहे. ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’ कार्यक्रमात स्कीटमध्ये अभिनेत्री लिझा हेडनची खिल्ली उडवल्यामुळे अक्षयचा पारा चढल्याचं म्हटलं जातं.
अक्षयकुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या हाऊसफुल्ल 3 चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय, रितेश, लिझा हेडन आणि जॅकलिन फर्नांडिस कलर्सवरील कॉमेडी नाईटस बचाओ या कार्यक्रमात आले होते. एआयबी रोस्टच्या धर्तीवर असलेल्या या कार्यक्रमात नेहमीच पाहुण्यांची टर उडवली जाते. मात्र यावेळी विनोदाच्या नावाखाली केला जाणारा लिझाचा अपमान अक्षयला आवडला नाही आणि त्याचा पारा चढला.
ऑस्ट्रेलियाहून आलेल्या लिझा हेडनला सिद्धार्थ जाधवच्या स्कीटमध्ये कांगारु असं संबोधण्यात आलं. याचप्रमाणे आणखी एक वर्णद्वेषी कमेंट केल्यामुळे लिझा आणि जॅकलिन अनकम्फर्टेबल असल्याचं रितेश आणि अक्षयला जाणवलं. लिझाला जी भाषा समजतही नाही, त्या भाषेत तिच्यावर विनोद करणं अशोभनीय असल्याचं मत अक्षयने व्यक्त केल्याचंही युनिटमधील एकाने सांगितलं. त्यामुळे अक्षयने
तात्काळ खाली उतरुन सिद्धार्थला थांबवल्याची माहिती आहे.
अक्षयच्या हस्तक्षेपानंतर स्क्रिप्टमध्ये तात्काळ बदल करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी अक्षयची बाजू कळू शकलेली नाही तर सिद्धार्थ जाधवने मात्र असं काहीच घडलं नसल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं आहे. त्यामुळे हा पब्लिसिटी स्टंट होता का, अशी चर्चाही सुरु आहे.
============================================
पाळणा कधी हलणार, राज कुंद्राचा बिपाशाला सवाल
मुंबई : नवविवाहित दाम्पत्यांना ‘पाळणा कधी हलणार?’ असं विचारुन बऱ्याचदा चिडवलं जातं. बॉलिवूडचं नवदाम्पत्य बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनाही असेच काही प्रश्न विचारले जात आहेत. ट्विटरवर हा खोडसाळपणा करणारा दुसरा तिसरा कोणी नसून शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आहे.
बिपाशाच्या लग्नाला जेमतेम महिना होत आहे. त्यांच्या लग्नाचे आणि हनिमूनचे फोटो ताजे असतानाच राज कुंद्रा बिप्सला ‘तो’ प्रश्न विचारुन छेडलं आहे. शिल्पा शेट्टीचा मुलगा विआनच्या वाढदिवसानिमित्त बिपाशाने ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या. त्यावर राजने ‘विआन त्याला मित्र कधी मिळणार?’ असं विचारत असल्याचं आडून म्हटलं. राजचा निशाणा अर्थातच बिपाशाच्या प्रेग्नन्सीकडे होता.
============================================
पालघर ते मुंबई अप-डाऊन, काका-काकींकडे वास्तव्य, शार्दूलची कहाणी
मुंबई : झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी नुकतीच टीम इंडियाची निवड करण्यात आली. या दौऱ्यासाठी अनेक सिनियर्सना विश्रांती देण्यात आली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी तर कर्णधार महेंद्रसिंह धोनीशिवाय नवख्या यंगस्टर्सना प्राधान्य देण्यात आलं आहे.
तर वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या मुंबईकर शिलेदारांच्या साथीनं शार्दूल ठाकूरचाही संघात समावेश करण्यात आलाय. शार्दूल ठाकूर हा रणजीमध्ये मुंबईच्या संघाचं प्रतिनिधित्त्व करतो.
शार्दूलनं यंदाच्या रणजी मोसमात 11 सामन्यांमध्ये 41 विकेट्स काढल्या होत्या. तसंच रणजी फायनलमध्ये आठ विकेट्स काढून मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
शार्दूल ठाकूर हा मूळचा पालघरचा. तो क्रिकेटसाठी पालघर ते चर्चगेट असा प्रवास रोज करायचा. क्रिकेटमध्येच करिअर करण्याचं त्याचं ध्येय होतं. त्याच कष्टाचं परिश्रम म्हणजे आज त्याची टीम इंडियात झालेली निवड होय.
शार्दूल सध्या मुंबईत काका-काकींकडे राहतो. दररोज पालघरवरुन अप-डाऊन करण्यात खूप वेळ जातो. त्यामुळे क्रिकेटसाठी कमी वेळ मिळतो. त्यामुळेच क्रिकेटला अधिक वेळ मिळावा म्हणून तो काका-काकींकडे शिफ्ट झाला. आता त्याचा वेळ वाचतोय. हा वाचलेला वेळ आणि एनर्जी टीम इंडियाकडून खेळताना वापरायची आहे, असा निश्चय शार्दूलने व्यक्त केला.
============================================
बंदुकीचा धाक दाखवून ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडूला लुटलं
रिओ द जनेरिओ: ऑलिम्पिकसाठी जगभरातून खेळाडू ब्राझीलमधील रिओ दि जनेरिओमध्ये दाखल होत आहेत. मात्र याचवेळी एक अशी घटना घडली आहे की, ज्यानं थेट खेळाडूंच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्पेनचा ऑलिम्पिक पदक विजेता सेलर फर्नांडो इकावारी आणि स्पेनच्या टीममधील दोन सहकाऱ्यांना बंदूकीचा धाक दाखवत लूटल्याची घटना रिओ द जनेरिओमध्ये घडली आहे. नाश्ताला जात असतानाच दरोडोखोरांनी बंदूकीचा धाक दाखवून त्यांना लुटलं.
इकवारीनं दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही थोडं साहसी होतो आणि भाग्यशालीही त्यामुळेच या घटनेतून बचावलो. त्यावेळी आमच्याकडे भरपूर आत्मविश्वास होता आणि हाच आत्मविश्वास ऑलिम्पिकसाठी महत्वाचा असतो.’ असं इकवारी म्हणाला.
इकवारी आणि स्पेनच्या सेलिंग टीमच्या दोन सदस्यांना शुक्रवारी सकाळी दरोडेखोरांनी लुटलं. पाच तरुण दरोडेखोरांनी या तिघांवर थेट बंदूक रोखलं. या पाचही जणांचं वय 16 वर्षापेक्षा अधिक नव्हतं. अशी इकवारीनं माहिती दिली.
============================================
बीड जिल्हा बँकेला आग लागली की लावली
बीड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्टोअर रुमला आज पहाटे आग लागली. या आगीत अनेक महत्वाची कागदपत्रं आणि जुने दस्तऐवज जळाले आहेत. त्यामध्ये भ्रष्टाचाराच्या कागदपत्रांचा समावेश असू शकतो. मात्र भ्रष्टाचारासंबधी एकही कागद जळाला नसल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला आहे.
भ्रष्टाचाराबाबतची सर्व कागदपत्रं स्टोअर रुममध्ये नव्हे तर दुसऱ्या रुममध्ये ठेवली होती. त्यामुळे ती कागदपत्रं सुरक्षित आहेत, असं बँकेकडून सांगण्यात आलं.
============================================
तब्बल 100 महिलांचं लैंगिक शोषण, ढोंगी बाबा अटकेत
लखनऊ: उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे तब्बल 100 महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका ढोंगी बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. अपत्य प्राप्तीच्या नावाखाली निपुत्रिक महिलांवर बलात्कार करणाऱ्या ढोंगी बाबा राम शंकर तिवारी उर्फ परमानंद याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
अपत्य नसलेल्या अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून हा ढोंगी बाबा त्यांचं लैंगिक शोषण करीत होता. मागील काही दिवसांपूर्वी एका पीडित महिलेचा आणि आरोपी परमानंदचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याआधी याच्याबाबत अशी चर्चा सुरुच होती.
या ढोंगी बाबाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये बाबा पीडित तरुणीला धमकी देत असल्याचं समोर आलं.
हा ढोंगी बाबा ज्या महिलांना अपत्य नव्हतं त्याना आपल्या जाळ्यात अलगद अडकवीत असे. त्यानंतर त्यांचे शारीरिक शोषण करीत असे. जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये पीडित महिला कान पकडून माफीही मागत आहे. पण, हा ढोंगी बाबा महिलेला धमकी देऊन लैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करीत होता.
उत्तरप्रदेशमधील या रंगील्या बाबाविरोधात त्याचाच ड्रायव्हर सुशील कुमार अवस्थी याने काही दिवसांपूर्वी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत असा आरोप करण्यात आला होता की, बाबाच्या आश्रमात देह व्यापाराचाही धंदा चालतो. ज्यामध्ये आरोपी बाबाची पत्नी मधु तिवारी आणि त्याचा मुलहगा विजय तिवारी देखील सहभागी आहेत. तर दुसरीकडे एका युवकाचं म्हणणं आहे की, बाबा महिलांवर बलात्कार करुन त्याची अश्लील व्हिडिओ तयार करायचा आणि त्यातून महिलांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैसे उकळायचा. सध्या पोलिसांनी या ढोंगी बाबाला अटक करुन याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.
============================================
'आर्ची-परशा'मध्ये मला रोमियो-ज्युलिअट दिसले : इरफान
मुंबई : ‘सैराट’ चित्रपटाने देशभरातील सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच बॉलिवूडलाही ‘याड लावलं’ आहे. रितेश देशमुख, आमीर खान सारख्या अभिनेत्यांपाठोपाठ इरफान खानने स्तुतिसुमनं उधळली आहेत. ‘आर्ची-परशा’मध्ये मला रोमियो-ज्युलिअट दिसले अशा भावना अभिनेता इरफान खानने व्यक्त केल्या आहेत.
‘मराठी रोमियो-ज्युलिअट पाहून मी भारावून गेलो. पाश्चिमात्य सिनेमाकडे वळणाऱ्या तरुण पिढीने हा सिनेमाही पाहायला हवेत. ही भारतीय चित्रपटाची नवी सुरुवात असून प्रादेशिक सिनेमा जागतिक स्तरावर जात असल्याचं लक्षण आहे.’ अशी प्रतिक्रिया इरफान खानने व्यक्त केली आहे.
‘प्रादेशिक चित्रपट प्रत्येक वर्षी शिरपेचात मानाचा तुरा रोवत आहे. यंदा हा मान सैराटला लाभला आहे, यात काही शंकाच नाही.’ असं इरफान म्हणतो.
सैराट पाहून भारावलेल्या इरफान खानने सिनेमाचं स्क्रीनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात तयार होणारे उत्तम चित्रपट तरुण पिढीने पहावे यासाठी इरफान त्याच्या मुलांसह मुलांच्या समवयस्क मित्रांना दाखवणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेही सोबत स्क्रीनिंगला असतील, अशी माहिती आहे.
============================================
सोसायटीतील स्विमिंग पूलमध्ये बुडून अल्पवयीन मुलीचा मृत्यू
कल्याण: कल्याण पश्चिमेकडील सोसायटीच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या ९ वर्षीय मुलीचा स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गोदरेज हिल परिसरात रोजालिया संकुलातील आवारात ही घटना घडली आहे.
रविवारी दुपारी या इमारतीमध्ये राहणारी मुले या स्विमिंग पूलमध्ये पोहत होती. यावेळी ९ वर्षाची दृष्टी सिंग या स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना अचानक बुडू लागली. आजूबाजूच्या मुलांनी आरडाओरडा सुरु केला.
आरडाओरडा ऐकू येताच तिच्या पालकांनी लगेच स्विमिंग पूलमध्ये धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दृष्टीचा मृत्यू झाला होता. या स्विमिंगपूलवर सुरक्षिततेसाठी लाईफ गार्ड नियुक्त करण्यात आले होते. मात्र त्याने दुर्लक्ष केल्याने हि घटना घडल्याचा आरोप कुटुंबियांना केला आहे. याप्रकरणी लाईफ गार्ड हेमंत राऊत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर हेमंत राऊत फरार झाला असून सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
============================================
महाराष्ट्रात फक्त २८१० जागांचे प्रवेश सीईटीमधून, अन्य जागांसाठी नीट अनिवार्य
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २४ - केवळ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश राज्य सरकारच्या 'सीईटी'परीक्षेनुसार होतील. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना नीट मधून सवलत मिळालेली नाही. खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी नीट परीक्षा द्यावीच लागेल असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी मंगळवारी स्पष्ट केले. महाराष्ट्रात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात २८१० जागा आहेत.खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील सरकारी जागा सीईटीव्दारे भरल्या जातील. अन्य जागांसाठी नीट परीक्षा सक्तीची राहील असे नड्डा यांनी स्पष्ट केले. राज्यात नीटमधून केवळ शासकीय महाविद्यालयांना सूट मिळाली आहे असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.आज सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नीट परिक्षा वर्षभराने पुढे ढकलण्याच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. त्यानंतर सरकारने नीट परिक्षेसंदर्भातील गोंधळ दूर करण्यासाठी अध्यादेशातील तरतुदी स्पष्ट केल्या.
============================================
यंदा सरासरी १०९ टक्के पावसाचा अंदाज
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २४ : गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. मात्र चालू वर्षात बळीराजाच्या मदतीला पाऊस धाऊन येणार असल्याचा सुधारीत अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेने वर्तवला आहे. दुष्काळ, गारपीट आणि अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं स्कायमेटचा अंदाजानं शेतक-यांना नक्कीच आशेची पालवी फुटणार आहे. स्कायमेटच्या सुधारीत अंदाजात यंदा सरासरी १०९ टक्के पाऊस पडणार असल्याचं जाहीर केलं आहे.यापुर्वी, स्कायमेटच्या अंदाजानुसार, सरासरी १०५ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तला होता. जून महिन्यात सरासरीच्या ९० टक्के, जुलै महिन्यात १०५ टक्के, ऑगस्ट महिन्यात १०८ टक्के, तर सप्टेंबरमध्ये सरासरीच्या ११५ टक्के पाऊस पडणार आहे. एकूण सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं होतं.जूनमध्ये १६४ मिमी पाऊस, जुलैमध्ये २८९ मिमी, ऑगस्टमध्ये २६१ मिमी, तर सप्टेंबर महिन्यात १७३ मिमी पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. बळीराजाच्या दृष्टीने चांगल्या पावसाचं भाकित स्कायमेटने वर्तवलं आहे.स्कायमेटनंतर १२ एप्रिल रोजी भारतीय हवामान विभागाने १०६ टक्के पाऊस पडणार असल्याचे भाकित वर्तवले होते.
============================================
इमर्जन्सीमध्ये तुम्हाला 'इथून' मिळेल कर्ज
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २४ - माणसाच्या आयुष्यात पैसा महत्वाचा असून पैशाची कधी, कशी गरज लागेल ते सांगता येत नाही. इमर्जन्सी सांगून येत नाही. अशा आणीबाणीच्या प्रसंगात पैसा उभा करणे एक मोठे आव्हान असते.असा प्रसंग आयुष्यात आला तर, आपण मित्रांकडे, जवळचे नातेवाईक किंवा शेजा-यांकडे मदत मागतो. पण तिथून मदत मिळाली नाही मग, अशावेळी काय कराल ?आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक सुविधा देणा-या अॅपने आता कर्ज मिळवण्याचाही एक स्त्रोत उपलब्ध करुन दिला आहे. अँडरॉईड फोनमधील 'कॅश इ' अॅपकडून तुम्हाला इमर्जन्सीच्या प्रसंगात कर्ज मिळू शकते आणि ते ही फक्त १.५ टक्के व्याजदराने.
- कॅश ई बद्दल ही माहिती जाणून घ्या१) कॅश ई कर्ज सुविधा मर्यादीत आहे. फक्त नोकरदार भारतीयांना कॅश ई चे कर्ज मिळते. स्वयंरोजगार किंवा छोटया व्यावसायिकांना कर्ज मिळत नाही.२) तुम्हाला तुमच्या वेतनाच्या ४० टक्के रक्कम कर्ज म्हणून पंधरा दिवसांसाठी मिळते.३) तुम्ही जे कर्ज घेतले आहे त्यावर फक्त १.५ टक्के व्याज आकारले जाते.४) कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी, फोन क्रमांक द्यावा लागतो तसेच पॅन कार्डची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागते.५) रहिवासी पत्ता, पे स्लीप आणि बँक स्टेटमेंटची ताजी कॉपीही अपलोड करावी लागते.६) पहिल्यांदा कर्ज घेणा-यांना कर्जाच्या रक्कमेनुसार ४५०, ७०० आणि १२५० रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागते.
============================================
पाकिस्तानची मदत रोखणा-या विधेयकाला अमेरिकन सिनेटची मंजुरी
- ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. - अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारे ३० कोटी डॉलरचे लष्करी सहाय्य रोखणा-या विधेयकाला अमेरिकन सिनेटने मंजूरी दिली आहे. पाकिस्तान हक्कानी नेटवर्क विरोधात कारवाई करत असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी काँग्रेसला पटवून दिल्यानंतरही सिनेटने पाकिस्तानची लष्करी मदत रोखणारे विधेयक मंजूर केले.दहशतवादा विरोधात कारवाईसाठी मदत निधी म्हणून पाकिस्तानला ही रक्कम देण्यात येणार होती. मागच्यावर्षीही पाकिस्तानला ही मदत रोखण्यात आली होती.पाकिस्तानने यापूर्वीही अमेरिकेकडून दहशतवादा विरोधात कारवाईसाठी मिळालेल्या अर्थसहाय्याचा वापर भारत विरोधात केला आहे.
============================================
स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राला ठेंगा
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 24 - केंद्र सरकारनं स्मार्ट सिटी स्पर्धेतल्या दुसऱ्या फेरीतली शहरं जाहीर केली असून त्यामध्ये महाराष्ट्रातल्या एकाही शहराचा समावेश नाहीये. आज जाहीर करण्यात आलेली शहरे पुढीलप्रमाणे:1. लखनौ (उत्तर प्रदेश) 2. भागलपूर (बिहार) 3. न्यू टाऊन कोलकाता (प. बंगाल) 4. फरीदाबाद (हरयाणा). 5. चंडीगढ (पंजाब, हरयाणा) 6. रायपूर (छत्तीसगढ) 7. रांची (झारखंड) 8. धरमसाला (हिमाचल प्रदेश) 9. वारांगल (तेलंगणा) 10. पणजी (गोवा) 11. आगरतळा (त्रिपुरा) 12. इंफाळ (मणीपूर) 13. पोर्ट ब्लेअर (अंदमान निकोबार)पहिल्या फेरीमध्ये स्थान मिळालेल्या राज्यांचा समावेश दुसऱ्या फेरीत झाल्याचे बघायला मिळत आहे. बिहार व पश्चिम बंगालला पहिल्या फेरीत स्थान मिळालेले नव्हते. ते आता मिळाले आहे. विशेष म्हणजे या शहरांपैकी तीन शहरे काँग्रेसशासित राज्यांमध्ये आहेत, ती म्हणजे मणीपूर, मिझोराम व उत्तराखंड.याखेरीज बिहारमध्ये जनता दलाचे सरकार आहे, उत्तर प्रदेश (समाजवादी पार्टी), तेलंगणा (राष्ट्र समिती) या ठिकाणीही भाजपाची सत्ता नाही. पहिल्या फेरीतल्या 20 शहरांपैकी 13 शहरे अशी होती, ज्या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. मात्र दुसऱ्या फेरीत ही कसर भरून काढण्यात आली असून भाजपाचे राज्य नसलेल्या राज्यांमधल्या शहरांना निवडण्यात आल्याचे दिसत आहे.
============================================
मानखुर्दमध्ये केमिकल गोडाऊनला भीषण आग
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २४ - घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर मानखुर्द मंडल भागात झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. दाट वस्तीचा इंदिरा नगर झोपडपट्टीचा हा भाग आहे. लेव्हल तीनची ही आग असून, अग्निशमन दलाच्या १२ गाडया आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.आगीची माहिती मिळताच लगेच अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. अनेक झोपडया आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या असून, घरातील भंगार सामना, लाकडामुळे आगीने भीषण रुप धारण केले केले आहे.या भागात जवळपास दोन ते अडीच हजार झोपडया आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आगीवर लवकरच नियंत्रण मिळवू असे अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी सांगितले.
============================================
मुंबईत 2 लाख स्किझोफ्रेनियाग्रस्त
- जागतिक स्क्रिझोफ्रेनिया दिन : मानसोपचारतज्ज्ञांची कमतरतामुंबई : महाविद्यालयातील काही विद्यार्थी एकाकी राहतात, कधीकधी स्वत:च्या विश्वात रमलेले दिसतात. हे बदल त्यांच्यात अचानक झालेले असतात, तरीही या बदलांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेकदा स्क्रिझोफ्रेनियाग्रस्त रुग्णांवर उपचार होत नाहीत. मुंबईत सुमारे 2 लाख स्किझोफ्रेनियाग्रस्त असून, राज्यात 10 लाख रुग्ण आहेत.अनेकदा स्किझोफ्रेनियाची लक्षणो आढळूनही कुटुंबहय या रुग्णांकडे दुर्लक्ष करतात. सर्वसाधारणपणो 13 ते 20 वयोगटातील मुलांना आणि 22 ते 30 वयोगटातील मुलींना स्किझोफ्रेनिया हा आजार जडतो. स्किझोफ्रेनिया हा आजार अनुवांशिक आणि आजूबाजूच्या परिस्थितीमुळेही होऊ शकतो. तज्ज्ञ डॉक्टरच त्यांच्यावर औषधोपचार करू शकतात, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.स्किझोफ्रेनिया रुग्णांची संख्या अधिक असली तरी त्यांच्यावर उपचार करणा:या मानसोपचार तज्ज्ञांची संख्या कमी आहे. ठाण्यातील ‘मेंटल हॉस्पिटल’मध्ये स्किझोफ्रेनियाचे अधिक रुग्ण असतात. तर, मुंबईतील केईएम, नायर, सायन आणि जेजे रुग्णालयातदेखील स्किझोफ्रेनिया रुग्णांना दाखल करून उपचार केले जातात. या रुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग देण्याची आवश्यकता असते. पूर्ण राज्यात फक्त चार ‘मेंटल हॉस्पिटल्स’ आहेत. या रुग्णालयांत 29 मानसोपचार तज्ज्ञांचा जागा आहेत. पण, त्यापैकी 11 जागा भरलेल्या असून, 19 जागा रिक्त आहेत. सरकारने सुरू केलेल्या ‘प्रेरणा प्रकल्पा’त 14 जिल्ह्यांत मानसोपचारतज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार होती. पण, अजूनही जालना, हिंगोली आणि वाशिम येथे मानसोपचारतज्ज्ञ नेमण्यात आलेले नाहीत, असे डॉ. मुंदडा यांनी सांगितले.स्किझोफ्रेनिया आजारात रुग्णांची काळजी हा औषधोपचाराइतकाच महत्त्वाचा भाग असतो. या आजारात कुटुंबीयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून औषधांची आवश्यकता असते. पण, त्याचबरोबर त्यांना या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी तसे आजूबाजूचे वातावरण असणोही आवश्यक असते. कुटुंबीयांनी या व्यक्तींना समजून घेणो आवश्यक असते. त्याचबरोबर या व्यक्तींना वेळच्यावेळी औषध देणो, त्यांना तपासणीसाठी नेणो हे अत्यंत महत्त्वाचे असते. फॉलोअपमुळे या रुग्णांमध्ये चांगला बदल दिसून येतो. या रुग्णांना एकाकी न पाडता त्यांच्याशी संवाद साधणो आवश्यक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. युसुफ माचिसवाला यांनी सांगितले.
============================================
अब्राहम बनला बाराव्या वर्षी पदवीधर
- कॅलिफोर्निया : अमेरिकेतील महाविद्यालयातून वयाच्या १२व्या वर्षी पदवी मिळविलेल्या तनिष्क अब्राहम या भारतीय - अमेरिकन मुलाचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अभिनंदन केले आहे. अशी पदवी मिळविणारा तनिष्क हा अमेरिकेतील सगळ्यात कमी वयाचा विद्यार्थी ठरला असून, आता त्याला १८व्या वर्षी वैद्यकीय पदवी प्राप्त करायची आहे.अब्राहमला लगेचच दोन प्रतिष्ठित विद्यापीठांनी स्वीकारले असून, कोणत्या विद्यापीठातून मेडिकल डीग्री मिळवायची याचा निर्णय अजून झालेला नाही.तनिष्क कॅलिफोर्नियातील सॅक्रामँटोचा रहिवासी आहे. वैद्यकीय पदवीमिळवेन तेव्हा मी १८ वर्षांचा असेन, असे तनिष्क म्हणाल्याचे सीबीसी सॅक्रामँटो टेलिव्हिजनने रविवारी म्हटले. त्याचेवडील बिजोऊ अब्राहम हे सॉफ्टवेअर इंजिनीअर तर आई ताजी अब्राहम जनावरांची डॉक्टर आहे.
============================================
मुंबई - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वरुणराजाची यावर्षी कृपा होणार असून सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज "स्कायमेट‘ या हवामानविषयक अंदाज वर्तविणाऱ्या कंपनीने व्यक्त केला आहे.
हवामानाविषयीचा अंदाज व्यक्त करणारी "स्कायमेट‘ ही आघाडीची खाजगी कंपनी आहे. या कंपनीने व्यक्त केलेल्या सुधारित ताज्या अंदाजानुसार गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा अधिक पाऊस पडणार आहे. यंदा 109 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.
कंपनीने यंदाच्या मोसमातील मासिक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तो खालीलप्रमाणे -
जून - सरासरी 87 टक्के
सरासरी पावसाची शक्यता - 50 टक्के
सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता - 20 टक्के
सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता - 30 टक्के
जुलै - सरासरी 108 टक्के
सरासरी पावसाची शक्यता - 60 टक्के
सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता - 25 टक्के
सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता - 15 टक्के
ऑगस्ट - सरासरी 113 टक्के
सरासरी पावसाची शक्यता - 60 टक्के
सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता - 30 टक्के
सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता - 10 टक्के
सप्टेंबर - सरासरी 123 टक्के
सरासरी पावसाची शक्यता - 40 टक्के
सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता - 50 टक्के
सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता - 10 टक्के
यंदा 109% पाऊस; "स्कायमेट'चा सुधारित अंदाज
| |
-

नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रात सुधारणा करून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरीता सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका एकत्रित करून मुबलक भांडवल असलेल्या केवळ सहा प्रमुख बँका तयार केल्या जाव्यात, असे मत बँक बोर्ड ब्युरोचे अध्यक्ष विनोद राय यांनी व्यक्त केले आहे.
फक्त सहाच मोठ्या बँका ठेवाव्यात- विनोद राय
| |
-
| |
याशिवाय, अर्थसंकल्पातील 25 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीपेक्षा जास्त रक्कम गुंतवण्याची सरकारने तयारी दाखविली आहे, असेही त्यांनी सांगितले.
देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) आपल्या पाच सहयोगी बॅंका आणि नव्याने स्थापन झालेल्या भारतीय महिला बॅंकेला (बीएमबी) आपल्यात विलीन करून घेण्याची तयारी दिला आहे. अशा प्रकारचे अनेक ‘मर्जर‘ अपेक्षित असल्याचे राय यांनी म्हटले आहे. परंतू त्यांनी याबाबत नेमके स्पष्टीकरण दिले नाही. सध्या देशातील सार्वजनिक बँकांचा आकडा 27 पेक्षा जास्त आहे.
============================================
स्फोटामुळे कोसळले 'इजिप्तएअर'चे विमान?
| |
-
| |
कैरा - इजिप्तचे अपघातग्रस्त विमान समुद्रात कोसळण्यापूर्वी त्याचा स्फोट झाल्याचे संकेत मानवी अवशेषावरून मिळाले आहेत. मात्र त्याबाबतची खात्री पटलेली नाही.
"विमानात झालेल्या स्फोटामुळेच विमान कोसळल्याची शक्यता आहे‘, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. मात्र त्याबाबत खात्री नसल्याचेही ते म्हणाले. अपघातामुळे विमानाची अनेक तुकडे झाले आहेत. त्यापैकी छोटे 80 तुकडे तपास पथकाला सापडली आहे. मात्र अद्यापही विमानाचा मोठा भाग मिळालेला नाही. पॅरिसहून कैरोला जाणारे "इजिप्त एअरलाइन्स‘चे एमएस 804 हे विमान मागील आठवड्यात गायब झाले होते. तपासात ते भूमध्य समुद्रात कोसळल्याचे निष्पन्न झाले. या विमानात प्रवासी व कर्मचारी मिळून 66 ज होते. विमानातील प्रवाशांचे मृतदेह, सामान व विमानातील आसने शोधपथकांना आढळली आहेत. विमानाचा संपर्क तुटण्याच्या एक मिनिटापूर्वी स्वच्छतागृहात व इलेक्ट्रिक साधनांमधून धूर येत असल्याचे आढळून आल्याची हवाई कंपनीच्या "एव्हिएशन हेरॉल्ड‘ या संकेतस्थळावर दिली आहे. तांत्रिक बिघाडापेक्षा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता अधिक असल्याचे इजिप्तमधील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली- नैऋत्य दिल्लीजवळील नजाफगड भागात एअर ऍम्ब्युलन्सला आज (मंगळवार) दुपारी अपघात झाला. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलछेमिस्ट एअरलाइन्स कंपनीचे एअर ऍम्ब्युलन्स पाटणावरून दिल्लीकडे येत होते. नजाफगड भागात आज दुपारी 2.45 मिनिटांनी एअर ऍम्ब्युलन्सला अपघात झाला. यावेळी ऍम्ब्युलन्समध्ये सात प्रवासी होते. अपघातात पाच जण जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी आग्निशामक दलाचे जवान दाखल झाले आहेत. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
दिल्लीत एअर ऍम्ब्युलन्सला अपघात, 5 जखमी
| |
-
| |
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलछेमिस्ट एअरलाइन्स कंपनीचे एअर ऍम्ब्युलन्स पाटणावरून दिल्लीकडे येत होते. नजाफगड भागात आज दुपारी 2.45 मिनिटांनी एअर ऍम्ब्युलन्सला अपघात झाला. यावेळी ऍम्ब्युलन्समध्ये सात प्रवासी होते. अपघातात पाच जण जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी आग्निशामक दलाचे जवान दाखल झाले आहेत. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
============================================
वॉशिंग्टन - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे संपूर्णपणे ‘अविवेकी‘ असल्याची टीका एकेकाळचे त्यांचे सहकारी प्रशांत भूषण यांनी केली आहे. तसेच वैयक्तिक लाभ होत असेल तर केजरीवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही हातमिळविणी करतील, असेही ते म्हणाले.
एका खाजगी दौऱ्यानिमित्त अमेरिकेत असलेले प्रशांत भूषण हे सोमवारी भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांच्या छोट्या समूहासमोर बोलत होते. ते म्हणाले, "ज्यादिवशी त्यांना वाटेल त्यादिवशी ते मोदींशी हातमिळवणी करतील. मला त्याबद्दल अजिबात शंका नाही. मी आणि योगेंद्रसारख्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी विश्वास संपादन केला. त्याचवेळी त्यांनी आम आदमी पक्षातील निर्णय घेणाऱ्या विविध मंडळावर मंडळे ताब्यात ठेवली. त्यांना स्वत:कडे कोणतीही जबाबदारी घ्यावीशी वाटत नाही.‘ तसेच आम आदमी पक्षातील अनेक आमदारांसंदर्भातील गैरव्यवहाराच्या तक्रारी त्यांच्याकडे आल्याचेही प्रशांत भूषण म्हणाले. यावेळी केजरीवाल यांची तुलना माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासोबत करताना भूषण म्हणाले, ‘अरविंद केजरीवाल हे मनमोहनसिंगांसारखे आहेत. ते स्वत: कधीही पैसे घेत नाहीत. पण पैसे घेणाऱ्यांना स्वत:च्या आसपास ठेवतात.‘
...तर केजरीवाल मोदींसोबत हातमिळवणी करतील!

अल्वर (राजस्थान)- देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांना नेहरू परिवार जबाबदार असून, त्यांच्यामुळेच देशात बलात्कार होतात, असे वादग्रस्त वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी केले आहे.
अल्वर जिल्ह्यातील रामगढ विधानसभा मतदारसंघातून आहुजा विजयी झाले आहेत. आहुजा म्हणाले, ‘देशातील नेहरू व गांधी परिवाराचे सर्व पुतळे तोडायला हवेत. सद्दाम हुसैन यांचा पुतळा तोडल्यानंतर नागरिक पुतळ्यावर थुंकले होते. याप्रमाणेच नागरिक त्यांच्या पुतळ्यांवर थुंकतील. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी व सोनिया गांधी यांच्यामुळेच देशात समस्या निर्माण होत आहेत. शिवाय, यांच्यामुळेच भ्रष्टाचार व बलात्काराच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. कारण, यांचे संस्कारच तसे आहेत. विजयालक्ष्मी पंडित या मुस्लिमाशी विवाह करणार होत्या, पण महात्मा गांधींमुळे हा विवाह थांबला होता.‘
‘जेएनयू हा सेक्स रॅकेटचा अड्डा असल्याचे यापूर्वी म्हटले होते. हे वक्तव्य आज खरे ठरत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिव्य पुरुष आहेत. मोदीच देशातील सर्व समस्या संपवतील,‘ असेही आहुजा म्हणाले.
देशात नेहरूंमुळे बलात्कार होतात- भाजप नेता

लेकराच्या आर्त हाकेने आई आत्महत्येपासून परावृत्त
| |
-
| |
सोलापुरातील संभाजी तलावातील हृदयद्रावक घटना
सोलापुर - शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता विजापूर रोड येथील संभाजी तलाव येथे मोठी गर्दी झाली होती. जरा पुढे जाऊन पाहिल्यावर एकदम हृदय हेलावणारी घटना पाहायला मिळाली. विजापूर रोड परिसरात राहणारे एक कुटुंबीय होते. कुटुंबामध्ये काही तरी कारणावरून भांडण झाले होते. तेथे काय झाले कोणालाच काही समजले नाही. एकदम पाण्यात काही तरी पडल्याचा आवाज आला. मग काय लोकांची एकदम पळापळ झाली. सगळेजण तलावाच्या दिशेने पळाले...
जवळ गेल्यावर एक महिला पाण्यात पडलेली दिसली. मग लोकांनी महिलेला वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. जमलेल्या लोकांनाही समजेना काय करावे? लोकांनी त्या महिलेला वाचवण्यासाठी हात पुढे केला. आणखी खूप प्रयत्न केले; परंतु त्या महिलेने कोणालाही प्रतिसाद दिला नाही. कोणालाही समजेना काय करावे? त्या महिलेला कसे वाचवावे?
मग त्या महिलेच्या छोट्या मुलाकडे लक्ष गेले. त्याचं वय जेमतेम १२ ते १३. तो आईने पाण्यात उडी घेतल्यामुळे रडत होता. मग काही लोकांनी त्याला थोडे पुढे केले. त्याला या कोवळ्या वयात हृदय हेलावणारे चित्र दिसले. तो जिवाच्या आकांताने ‘आई बाहेर ये’ असे ओरडू लागला. बराच वेळ तो आईला बाहेर येण्याची विनवणी करत होता, पण त्याच्या आईचे लक्ष त्याच्याकडे गेलेच नाही.
शेवटी तो आणखी जोरजोरात रडून आईला बाहेर येण्याची विनवणी करू लागला, मग शेवटी त्या मुलाची हाक आईच्या कानापर्यंत पोचली. आपला मुलगा रडत आहे, आपल्याला बाहेर येण्याची विनवणी करत आहे, असे चित्र त्या आईला दिसले. मुलाच्या डोळ्यातील पाणी पाहून आईच्या मायेलाही पाझर फुटला. आणि ती मुलाच्या दिशेने आली.
‘आई, तू घरी चल...’
मुलाच्या विनवणीमुळे एका दगडाला पकडून त्याची आई कशीबशी तलावातून बाहेर आली. बाहेर येताच तिने आपल्या मुलाला जवळ घेतले. त्याचे डोळे पुसू लागली. मुलगाही आईचे डोळे पुसू लागला. आईला मिठी मारून म्हणाला... ‘आई, तू घरी चल.’ मुलाचे हे वाक्य कानावर पडताच आई उठली आणि मुलगा व पतीसोबत घराच्या दिशेने गेली.

No comments:
Post a Comment