Thursday, 12 May 2016

नमस्कार लाईव्ह १२-०५-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- चीन; धुम्रपान करु न दिल्याने प्रवाशाची महिला चालकाला मारहाण 
२- इस्लामाबाद; पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ फरार घोषित 
३- फ्रांस; आत्महत्येचं लाईव्ह चित्रीकरण करत तरुणीने ट्रेनसमोर मारली उडी 
४- लिबियातून 29 भारतीय मायदेशी परतले़ 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- RBI गव्हर्नर रघुराम राजन यांनी देश सोडून जावं: स्वामी 
६- मल्ल्यांविरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यासाठी ईडीची इंटरपोलला विनंती 
७- प्रशिक्षक महिला फुटबॉलपटूंच्या रुममध्ये रात्र घालवायचे - सोना चौधरी 
८- भुजबळांचा जामीन; उद्या निर्णय 
९- भानगडी व उचापती करण्यासाठी सत्ता दिलेली नाही, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका 
१०- अमित शाहांनी दलित साधूंसोबत केलं स्नान 
११- दिल्ली आता प्रदूषित शहर नाही- WHO 
१२- गोमांसबंदी, दारुबंदी हा निव्वळ मूर्खपणा: गोदरेज 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१३- राज्यातील 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ जाहीर 
१४- विधानपरिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र, डावखरेंना उमेदवारी 
१५- तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात दाखल, मात्र मजार प्रवेश नाही
१६- उद्धव ठाकरेंना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज 
१७- गोवा बोर्डाच्या बारावी परीक्षेचा आज निकाल 
१८- पोलिसांची ड्युटी 8 तास करण्याचे प्रयत्न, मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती 
१९- शिवस्मारकाला विरोध करणाऱ्या मच्छिमारांच्या शंकांचं निरसन करु - तावडे, मेटे 
२०- पुणे; युपीएससी टॉपर अंसार शेखला लपवावा लागला होता धर्म 
२१- गोवंश मांस बंदी, डान्स बारबाबत अंमलबजावणी 
२२- वास्को; मिग-२९ के नौदलाच्या ताफ्यात 
२३- मॉन्सूनचे आगमन यंदा मे महिन्यातच होणार - स्कायमेट 
२४- यंदा सरासरीपेक्षा 27 टक्के जास्त पाऊस पडणार 
२५- यज्ञ करा म्हणजे पाऊस पडेल- भाजप खासदार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२५- दादर; 81 वर्षांच्या आजीने चोराला धडा शिकवला 
२६- बुलढाणा; कर्जामुळे कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, एक अत्यवस्थ 
२७- पुणे; ग्राहक न्यायालयाकडून बिल्डरला 3 वर्षांचा कारावास 
२८- किशनगढ; दिल्लीत छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या, शेजाऱ्यावर आरोप 
२९- आग्रा; नापास करण्याचं कारण विचारल्याने शाळेकडून 1 कोटींची नोटीस 
३०- लातूर; मुख्यमंत्र्यांच्या घोषणा कागदावरच 
३१- डोनाल्ड ट्रम्पसाठी हिंदु संघटनेचे देवांना साकडे 
३२- आसाम: पोलिसांच्या कारवाईत विद्यार्थ्याचा मृत्यू 
३३- येवला; लोकसहभागातून निघाला तीन हजार ट्रॅक्‍टर गाळ 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३४- रिंकू राजगुरु आंतरजातीय विवाह योजनेची ब्रँड अॅम्बेसेडर 
३५- शशांक मनोहर आयसीसीचे नवे चेअरमन 
३६- सुशील कुमार रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळणार नाही 
३७- टीम-स्टाफसमोरच प्रितीची संजय बांगरला शिवीगाळ 
३८- वेस्ट इंडीजचेसमालोचक आणि पत्रकार टॉनी कोझिअर यांचे दीर्घ आजाराने निधन 
३९- खान कुटुंबियांसह लूलिया दिसली एअरपोर्टवर 
४०- मेलबर्न; फलंदाजांना हेल्मेटसक्ती, आॅस्ट्रेलियाचा कठोर नियम 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि आल्याशिवाय डोळे उघडत नाही
(पंकज पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

==================================================

RBI गव्हर्नर रघुराम राजन यांनी देश सोडून जावं: स्वामी

RBI गव्हर्नर रघुराम राजन यांनी देश सोडून जावं: स्वामी
नवी दिल्ली : राज्यसभेतील भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी हे भ्रष्टाचारांच्या आरोपांवरुन विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी परिचित आहेत. आता तर त्यांनी थेट रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावरच निशाणा साधला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशाचं नुकसान झालं आहे, त्यामुळं रघुराम राजन यांनी शक्य तेवढ्या लवकर देश सोडून शिकागोला जावं, असं वक्तव्य स्वामी यांनी केलं आहे.

राजन यांचं धोरण देशाच्या अर्थव्यवस्थेला अनुकूल नाही. बँकेने वाढवलेल्या व्याजदरांमुळेच उद्योग तोट्यात गेले असल्याचं स्वामी यांचा आरोप आहे.

राजन यांनी 5 सप्टेंबर 2013 साली भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची धुरा सांभाळली होती. येत्या सप्टेंबर महिन्यात त्यांचा गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपणार आहे.
==================================================

...आणि 81 वर्षांच्या आजीने चोराला धडा शिकवला!

...आणि 81 वर्षांच्या आजीने चोराला धडा शिकवला!
मुंबई : महिलांना धाडसी होण्यासाठी बळ देईल, अशी एक घटना दादरमध्ये घडली आहे. दादरच्या 81 वर्षांच्या वृद्ध महिलेने एका चोराचा सामना करुन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.

पुष्पाबेन भुल्ला असं या धाडसी वृद्धेचं नाव आहे. मुंबई पोलिसांनीही या वृद्ध महिलेच्या धाडसाला दाद दिली.

अशी घडली घटना!
दादरला राहणाऱ्या पुष्पाबेन बुधवारी सकाळी 10 वाजता आपल्या घराजवळील हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होत्या. इतक्यात एक डमी पोलिस त्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदतीच्या बहाण्याने जवळ आला.

‘मी पोलिस असून पेट्रोलिंग करत आहे’, असे चोराने पुष्पाबेन यांना सांगितले. पुष्पाबेन यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या पाहून चोराने त्यांना बांगड्या बॅगमध्ये काढून ठेवायला सांगितल्या. इतक्यात बाजूलाच उभ्या असलेल्या एका व्हॅनमध्ये पुष्पाबेन यांची नजर गेली. ज्यामध्ये या तोतया पोलिसांचे साथीदार बसलेले होते. त्यामुळे हा तोतया पोलिस असल्याचे पुष्पाबेन यांच्या लक्षात आलं.
==================================================

शशांक मनोहर आयसीसीचे नवे चेअरमन!

शशांक मनोहर आयसीसीचे नवे चेअरमन!
नवी दिल्ली : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांची आयसीसीचे पहिले स्वतंत्र चेअरमन म्हणून निवड झाली आहे. आयसीसीने अध्यक्षपदासाठी गुप्त मतदान केलं होतं. यानंतर शशांक मनोहर यांची बिनविरोध निवड झाली. शशांक मनोहर दोन वर्षांसाठी आयसीसीचे चेअरमन असतील.

“क्रिकेट अधिक संपन्न करण्यासाठी मी सर्व देशांच्या बोर्डांसह मिळून काम करण्याचा प्रयत्न करेन,” अशी प्रतिक्रिया शशांक मनोहर यांनी आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर दिली.
==================================================

सुशील कुमार रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळणार नाही?

सुशील कुमार रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळणार नाही?
नवी दिल्ली : दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कुस्तीत भारताला पदक मिळवून देणारा पैलवान सुशील कुमार यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही. कारण भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत सुशील कुमारचं नावच नाही.
भारतीय कुस्ती महासंघाने आयओएला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या संभाव्या खेळाडूंची यादी सोपवली. मात्र या यादीत सुशील कुमारचं नाव नाही. त्यामुळे सुशील कुमारऐवजी नरसिंह यादव भारताचं प्रतिनिधित्त्व करेल, असं म्हटलं जात आहे.
बदललेल्या नियमांचा फटका सुशील कुमारला
सुशील कुमार आणि नरसिंह यादव हे दोघेही 74 किलो वजनी गटात खेळतात. त्यातच नरसिंह यादवने आधीच ऑलिम्पिकचं तिकीट बुक केल्याने सुशीलला स्पर्धेसाठी कोणताच गट शिल्लक नाही. पण यंदा बदललेल्या नियमांचा फटका सुशील कुमारला बसला आहे. त्यामुळे भारताला पदक मिळवून देणारा सुशीलकुमार यंदाच्या ऑलिम्पिक पथकात नसणार आहे.
==================================================

कर्जामुळे कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, एक अत्यवस्थ

कर्जामुळे कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, एक अत्यवस्थ
बुलडाणा : बुलडाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील मालठाना इथे आदिवासी शेतकरी कुटुंबातील चार जणांनी विषप्राशन करुन सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तर एक जण अत्यवस्थ आहे. त्याच्यावर अकोल्यात उपचार सुरु आहेत.

एक लाख रुपयांच्या कर्जामुळे कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला.

दिनेश मसाने (वय 35 वर्ष), लक्ष्मीबाई मसाने (वय 40 वर्ष), जितेंद्र मसाने (वय 17 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. तर न्यानसिंग मसाने (वय 70 वर्ष) यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

मसाने कुटुंब मोलमजुरी करुन गुजराण करत होतं. त्यांच्याकडे एक एकर शेती आहे. मात्र त्यांच्यावर एक लाख रुपयांचं कर्ज होतं. या एक लाखांच्या कर्जामुळेच मसाने कुटुंबाने सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला.
==================================================
==================================================

ग्राहक न्यायालयाकडून बिल्डरला 3 वर्षांचा कारावास

ग्राहक न्यायालयाकडून बिल्डरला 3 वर्षांचा कारावास

पुणे : पुण्यातील बिल्डरला ग्राहक न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावलीय. सर्रास दंडाची शिक्षा सुनावणाऱ्या ग्राहक न्यायालयाने चक्क कारावासाची शिक्षा सुनावण्याचं कदाचित हे पहिलंच उदाहरण असावं.

 

ग्राहक न्यायालयाच्या आदेशाची अवमानना आणि सराईत पद्धतीने ग्राहकांना वेठीस धरण्यासाठी ग्राहक न्यायालयाने ही शिक्षा सुनावलीय. शिक्षा सुनावलेल्या बिल्डरला रू. 15 हजारांच्या जामीनावर मुक्त करण्यात आलंयतसंच त्याला जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी एक महिन्याचा वेळही देण्यात आला आहे.

==================================================

उद्धव ठाकरेंना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

उद्धव ठाकरेंना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. उद्धव ठाकरेंना सकाळी 7.45 मिनिटांनी रुग्णालयातून सोडण्यात आलं. त्यानंतर ते मातोश्रीवर दाखल झाले.

नियमित तपासणीसाठी (रुटीन चेकअप) उद्धव ठाकरे यांना बुधवारी सकाळी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची प्रकृती उत्तम असल्याची माहिती ट्विटरवर दिली. “उद्धव ठाकरेंचं रुटीन चेकअप झालं. तुमच्या प्रार्थनांमुळे त्यांचे रिपोर्ट्स चांगले आहेत,” असं आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर सांगितलं.
==================================================

ग्राहक न्यायालयाकडून बिल्डरला 3 वर्षांचा कारावास

ग्राहक न्यायालयाकडून बिल्डरला 3 वर्षांचा कारावास

पुणे : पुण्यातील बिल्डरला ग्राहक न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावलीय. सर्रास दंडाची शिक्षा सुनावणाऱ्या ग्राहक न्यायालयाने चक्क कारावासाची शिक्षा सुनावण्याचं कदाचित हे पहिलंच उदाहरण असावं.

 

ग्राहक न्यायालयाच्या आदेशाची अवमानना आणि सराईत पद्धतीने ग्राहकांना वेठीस धरण्यासाठी ग्राहक न्यायालयाने ही शिक्षा सुनावलीय. शिक्षा सुनावलेल्या बिल्डरला रू. 15 हजारांच्या जामीनावर मुक्त करण्यात आलंयतसंच त्याला जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी एक महिन्याचा वेळही देण्यात आला आहे.

==================================================

टीम-स्टाफसमोरच प्रितीची संजय बांगरला शिवीगाळ

टीम-स्टाफसमोरच प्रितीची संजय बांगरला शिवीगाळ
मुंबई : आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. आपल्या संघाची अवस्था पाहून मालकीण प्रिती झिंटाची अस्वस्थता समोर आली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळवलेल्या सामन्यात पंजाबचा निसटता पराभव झाला होता. याचं दुःख प्रिती झिंटाला पचवता आलं नाही. त्यामुळे तिने चक्क संघाचे प्रशिक्षक संजय बांगर यांनाच शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर बांगर यांना संघातून बाहेर करण्याची धमकी दिल्याचंही कळतं.

मुंबई मिरर या वृत्तपत्राने घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.
==================================================

धुम्रपान करु न दिल्याने प्रवाशाची महिला चालकाला मारहाण

VIDEO : धुम्रपान करु न दिल्याने प्रवाशाची महिला चालकाला मारहाण
नवी दिल्लीः धुम्रपान करण्यास विरोध केल्याने त्या प्रवाशाने चक्क महिला बस चालकाला धावत्या बसमध्येच अमानुष मारहाण केली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चीनमधील सुझोऊ शहरातील ही घटना असल्याचं समजतं. बसमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.

धुम्रपान करण्यास विरोध केल्याने प्रवाशाने महिला चालकासह सीटवरच झटापट सुरु केली. त्यानंतर तिला सीटवरुन ओढून हिंसक पद्धतीने मारहाण केली.

बसमधील प्रवाशांनी केली महिलेची सुटका
Driver_Passangar

सुदैवाने महिलेने प्रसंगावधान राखत गाडी तातडीने थांबवली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. महिलेच्या प्रतिकारानंतरही प्रवासी तिला वारंवार मारहाण करत होता. प्रवाशाने चालक महिलेला सीटवरुन ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली, त्यानंतर बसमधील इतर प्रवाशांनी तिची सुटका केली.

दरम्यान, चीनमध्ये पहिला धुम्रपान बंदीचा कायदा 2014 मध्येच लागू झाला आहे.

पाहा व्हिडीओ

==================================================

मुंबई वि. बंगलोर सामन्यादरम्यान ‘त्या’ बातमीनं क्रिकेट विश्व हळहळलं!

मुंबई वि. बंगलोर सामन्यादरम्यान ‘त्या’ बातमीनं क्रिकेट विश्व हळहळलं!
बंगळुरु/बार्बाडोसः आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामन्यादरम्यान अशी एक बातमी आणि ज्याने अवघं क्रिकेट विश्व हळहळलं.

वेस्ट इंडीजचे प्रसिद्ध लेखक, समालोचक आणि पत्रकार टॉनी कोझिअर यांचं काल रात्री दीर्घ आजाराने निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. बार्बाडोस येथील आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोझिअर यांना 3 मे रोजी पाय आणि मानेमध्ये बाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
==================================================

गोवा बोर्डाच्या बारावी परीक्षेचा आज निकाल

गोवा बोर्डाच्या बारावी परीक्षेचा आज निकाल
पणजी : गोवा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. गोवा बोर्डाच्या अल्टो बेतिममधील मुख्यालयात निकालाची घोषणा करण्यात आली.

औपचारिक घोषणा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. तसंच goaresults.nic.in आणि gbshse.gov.in या वेबसाईटवरही विद्यार्थी निकाल पाहू शकतील.

गोवा बोर्डाच्या HSSC ची परीक्षा यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आली होती. राज्याच्या 16 केंद्रांवर परीक्षा पार पडली. कला शाखेतील 3,338, वाणिज्य शाखेतील 5,021, विज्ञान शाखेतील 4,735 आणि व्यावसायिक शाखेतील 2,724 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

विद्यार्थ्यांना 14 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या दरम्यान संबंधित कॉलेजमध्ये गुणपत्रिका मिळेल.

==================================================

तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात दाखल, मात्र मजार प्रवेश नाही

तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात दाखल, मात्र मजार प्रवेश नाही
मुंबई भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आज भल्या पहाटे पोलीस बंदोबस्तात मुंबईतील हाजी अली दर्ग्यात जाऊन दर्शन घेतलं. जिथपर्यंत महिलांना प्रवेश आहे तिथपर्यंतच तृप्ती देसाईंना आज प्रवेश देण्यात आला.

यावेळी भूमाताच्या महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाईंसोबत होत्या. पोलीस बंदोबस्तात तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात जाऊन दर्शन घेतलं. मजारपर्यंतही महिलांना प्रवेश दिला जावा यासाठी आपला लढा सुरू राहणार असल्याचंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

दर्ग्यात प्रवेश केल्यानंतर तृप्ती देसाई यांनी हाजी अली पोलीस ठाण्यातही हजेरी लावली.

हाजी अली दर्ग्यात सध्या महिलांना विशिष्ट मर्यादेपर्यंतच प्रवेशाची परवानगी आहे. मजार-ए-शरीफमध्ये महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे. मात्र, पुरूषांच्या बरोबरीने महिलांनाही त्याठिकाणी प्रवेश द्यावा, अशी मागणी तृप्ती देसाई यांची आहे.
==================================================

राज्यातील 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ जाहीर

राज्यातील 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ जाहीर
मुंबई राज्यातील दुष्काळसदृश गावांमध्ये अखेर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 33 जिल्ह्यातील 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

33 जिल्ह्यातील 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ जाहीर

ज्या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. नागरिकांचं स्थलांतर सुरु आहे, अशा ठिकाणी तात्काळ दुष्काळ जाहीर करा,असे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. त्यानंतर काल रात्री राज्य सरकारनं तातडीनं राज्यातील 33 जिल्ह्यातील 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला.
==================================================

दिल्लीत छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या, शेजाऱ्यावर आरोप

दिल्लीत छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या, शेजाऱ्यावर आरोप
नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील वसंत कुंजच्या किशनगढ परिसरात मंगळवार संध्याकाळी एका 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. तरुणीच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, शेजारी नीरज याच्याकडून गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने आत्महत्येचं पाऊल उचललं. नीरज तरुणीला फोनवरुन त्रास देत असे, असाही आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मृत तरुणी ब्युटिशियन होती आणि तिच्या ब्युटी पार्लरच्या साईन बोर्डवर संपर्क क्रमांक होता. नीरजने त्या साईन बोर्डवरुन मोबाईल नंबर घेतला आणि फोन करुन त्रास देऊ लागला.

तरुणी मंगळवारी संध्याकाळी क्लाईंटकडून जेव्हा घरी येत होती, तेव्हा नीरजने काही मित्रांच्या सोबतीने तरुणीची भर रस्त्यात छेडछाड केली.

तरुणीने नीरज आणि त्याच्या मित्रांना विरोध केल्यानंतर, तरुणीला मारहाण केली गेली. तरुणीने घडला प्रकार फोन करुन आपली बहीण आणि आईला सांगितला. त्यानंतर घरी पोहोचल्यानंतर तिने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. मृत तरुणीच्या आईने पोलिसांना याबाबत सर्व माहिती पोलिसांना दिली असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याअंतर्गत आरोपी नीरजला अटक करण्यात आली आहे.
==================================================

पोलिसांची ड्युटी 8 तास करण्याचे प्रयत्न, मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती

पोलिसांची ड्युटी 8 तास करण्याचे प्रयत्न, मुंबई पोलीस आयुक्तांची माहिती
प्रातिनिधिक फोटो
hdjeमुंबई पोलिसांची ड्युटी 8 तासांवर करण्याचे प्रयत्न असल्याची माहीती मुंबई पोलीस आयुक्त पडसलगीकरांची प्रसारमाध्यमांना दिली आहे. पोलिसांवरचा कामाचा ताण कमी करण्यासाठी हे पाऊल महत्वाचं ठरणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर देवनारमधील पोलिसांना आठ तासांची ड्युटी देण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य पोलिस ठाण्यांतही आठ तासांची ड्युटी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिली.

पोलिसांचे कामकाज पेपरलेस होणार

पोलिसांचे कामकाज पारदर्शक होऊन भ्रष्टाचाराला आळा बसावा, यासाठी मुंबई पोलिस दलातील कामकाज लवकरच पेपरलेस करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिली.

एखाद्या गुन्ह्यासंबंधीची प्राथमिक माहिती नोंदवल्यानंतर त्याची प्रत संबंधिताला इंटरनेटवर देणेही शक्य होईल, असे पडसलगीकर म्हणाले.
==================================================

रिंकू राजगुरु आंतरजातीय विवाह योजनेची ब्रँड अॅम्बेसेडर

रिंकू राजगुरु आंतरजातीय विवाह योजनेची ब्रँड अॅम्बेसेडर?
मुंबई : आंतरजातीय विवाह योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘सैराट’मधून याड लावणारी अभिनेत्री रिंकू राजगुरुला ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याचा विचार आहे. सामाजिक न्याय विभाग यासंदर्भात पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. 
सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा झाली. आता रिंकू राजगुरु आणि तिचे पालक राज्य सरकारचा हा प्रस्ताव स्वीकारतात की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 
आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या मुलांना शैक्षणिक, आर्थिक लाभ देण्याचा विचार सामाजिक न्याय विभाग करत आहे. राज्यभर अभियान चालवलं जाणार असून आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना विवाहाची ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अशा इच्छुक जोडप्यांचा सामुहिक विवाह करण्याचाही विचार असून अद्याप अंतिम निर्णय नाही झाला नाही. 
दुसरीकडे मात्र आर्ची साकारणारी रिंकू राजगुरु अल्पवयीन असताना तिला आंतरजातीय विवाह योजनेचा ब्रँड अँम्बेसेडर बनवणं कितपत योग्य आहे असा सवालही उपस्थित केला जात आहे.
==================================================

विधानपरिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र, डावखरेंना उमेदवारी

विधानपरिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र, डावखरेंना उमेदवारी
मुंबई : आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी केली आहे. मुंबईत झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला. ठाण्यातील जागेसाठी राष्ट्रवादीचे वसंत डावखरे रिंगणात उतरले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून डावखरे चार वेळा ठाणे मतदारसंघातून निवडून आले होते. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचा कार्यकाळ 8 तारखेला संपणार आहे. वसंत डावखरे उद्या ठाण्यात 11 वाजता अर्ज दाखल करणार आहेत.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे उपस्थित होते.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या जागेसाठी 3 जूनला मतदान होणार आहे, तर 6 जून रोजी मतमोजणी होईल.
==================================================

शिवस्मारकाला विरोध करणाऱ्या मच्छिमारांच्या शंकांचं निरसन करु

'शिवस्मारकाला विरोध करणाऱ्या मच्छिमारांच्या शंकांचं निरसन करु'
मुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाला विरोध करणाऱ्या मच्छिमारांच्या शंकांचं निरसन करण्यात येईल, असं महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि विनायक मेटे यांनी स्पष्ट केलं आहे.

तावडे आणि मेटेंनी आज अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाच्या जागेची पाहणी केली. अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाला मुंबईतल्या काही मच्छिमार संघटनांनी विरोध केला आहे. त्या दृष्टीकोनातून मच्छिमारांच्या सर्व समस्यांचं निरसन करण्यात येईल असं विनायक मेटे आणि विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं.

अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेल्या भल्यामोठ्या खडकावर शिवस्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या आहेत.

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात होणारं शिवस्मारकाचं उद्घाटन सप्टेंबरमध्ये होणार आहे.
==================================================

नापास करण्याचं कारण विचारल्याने शाळेकडून 1 कोटींची नोटीस

नापास करण्याचं कारण विचारल्याने शाळेकडून 1 कोटींची नोटीस
प्रातिनिधीक फोटो
आग्रा : आपल्या पाल्याला नापास का केलं, याचं कारण विचारणं एका पित्याला चांगलंच महागात पडलं आहे. आग्य्रातील एका शाळेने संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांवर एक कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे.

विद्यार्थ्याच्या पालकाने संयुक्त शिक्षण संचालकांकडे यांसदर्भात तक्रार केली. त्यामुळे या प्रतिष्ठित शाळेने पालकांवर एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. त्याचप्रमाणे मुलाला शाळेतून काढून टाकण्यात आलं आहे. त्यामुळे पीडित पित्याने डीएमकडे न्यायाची दाद
मागत रस्त्यावर भीक मागण्याचा निर्णय घेतला आहे.

सेंट फ्रान्सिस या शाळेत हाजी सगीर अहमद यांचा मुलगा शहजान आठव्या इयत्तेत शिकतो. नापास झाल्याने पित्याने मुलाला प्रमोट करण्याची मागणी शाळेकडे केली. अनेकदा शाळेच्या पायऱ्या झिजवूनही दाद मिळाली नसल्याचं हाजी सगीर म्हणाले.

आठवीपर्यंत नापास न करण्याच्या नियमाचा उल्लेख करत सगीर यांनी शाळा प्रशासनाला नोटीस पाठवली. त्याचप्रमाणे मानव विकास मंत्रालयालाही पत्र पाठवलं. यावर शाळेने नोटीशीला उत्तर दिलं नाही, मात्र 6 तारखेला सगीर यांना 1 कोटी रुपये पाठवण्यासंबंधी नोटीस बजावली.
==================================================

पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ फरार घोषित

पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ फरार घोषित
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ यांना फरार घोषित करण्यात आलं आहे. पाकच्या एका विशेष कोर्टाने राष्ट्रदोहा प्रकरणी वारंवार समन्स बजावूनही हजेरी न लावल्याने हा निर्णय घेतला आहे.

जस्टिस मझहर आलम खान मिनाखेल यांच्या अध्यक्षतेतील त्रिसदस्यीय समितीने मुशर्रफ यांना तीस दिवसांत हजर करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.

मुशर्रफ यांना फरार घोषित केल्याच्या जाहिराती वर्तमानपत्रात छापण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याशिवाय कोर्टाच्या बाहेर आणि मुशर्रफ यांच्या घराच्या परिसरातही त्यासंबंधी पोस्टर लावण्यास सांगितलं आहे.

परदेश दौऱ्यावर निर्बंध लादूनही मुशर्रफ उपचारांसाठी दुबईला गेले होते. परवेझ यांना परदेशी जाण्याची परवानगी कशी दिली, हा प्रश्न आधी कोर्टाने विचारला होता. त्यांच्यावर दाखल असलेल्या अनेक मोठ्या केसेस पाहता ते मायदेशी (पाकिस्तानात) न परतण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
==================================================

प्रशिक्षक महिला फुटबॉलपटूंच्या रुममध्ये रात्र घालवायचे - सोना चौधरी


  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. १२ - भारताच्या महिला फुटबॉल संघातील खेळाडूंचे लैंगिक शोषण व्हायचे. संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक आणि सचिव याला जबाबदार होते असा धक्कादायक आरोप भारताच्या महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधार सोना चौधरीने केला आहे. सोन चौधरीने तिच्या 'गेम इन गेम' या नव्या पुस्तकातून हे धक्कादायक खुलासे केले आहेत. 
    नुकतेच वाराणसीमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले. मूळची हरयाणाची असणारी सोना चौधरी नव्वदच्या दशकात भारतीय महिला फुटबॉल संघातून खेळायची. १९९५ साली तिला महिला फुटबॉल संघाचे कर्णधार बनवण्यात आले. मी भारतीय फुटबॉल संघामधून खेळायचे तो महिला फुटबॉलपटूंसाठी वाईट काळ होता. संघात स्थान मिळवण्यासाठी प्रशिक्षक आणि सचिव महिला खेळाडूंना तडजोड करण्यासाठी जबरदस्ती करायचे. 
    परदेश दौ-यांवर प्रशिक्षक आणि सचिव  त्यांच्या रात्री महिला खेळाडूंच्या रुममध्ये घालवायचे. महिला खेळाडूंनी याला विरोध करुनही हे सुरुच होते. राष्ट्रीय नव्हे राज्य पातळीवरही महिला खेळाडूंचा असाच छळ व्हायचा. लैंगिक सुखासाठी महिला खेळाडूंना त्रास दिला जायचा. त्याबदल्यात त्यांना संघात स्थान दिले जायचे. 
==================================================

युपीएससी टॉपर अंसार शेखला लपवावा लागला होता धर्म


  • ऑनलाइन लोकमत - 
    पुणे, दि. 12 - विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातच यूपीएससी परीक्षेत अवघ्या २१व्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या अंसार शेखला आपला धर्म लपवावा लागला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुस्लिम असल्याने आपल्याला पुण्यात खोली मिळाली नाही, मेसमध्येही प्रवेश दिला गेला नाही, असे अंसारने सांगितले आहे. अंसार जालनाच्या शेडगावचा रहिवासी असून त्याचे वडिल रिक्षा चालवतात. युपीएससी परिक्षेत 361व्या क्रमांकाने त्याने यश मिळवलं आहे. 
    अंसार शेखला  दहावीमध्ये 91 टक्के मार्क्स मिळाले होते. त्यानंतर त्याने फर्गुसन कोलेजमध्ये प्रवेश घेतला. यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात त्याला रूम हवी होती. 'मित्रांसोबत रूम बघण्यासाठी गेलो असता माझ्या हिंदूधर्मीय मित्रांना रुम मिळत होती पण मुस्लिम असल्याने मला रूम दिली जात नव्हती. शेवटी शुभम वटकर असं नाव सांगितल्यावर मला रुम मिळाली. हे माझ्या मित्राचं नाव आहे, मेसमध्येही हेच नाव वापरावे लागले', असल्याचं अंसारने सांगितलं आहे.
==================================================

मल्ल्यांविरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यासाठी ईडीची इंटरपोलला विनंती


  • डिप्पी वांकाणी - 
    मुंबई, दि. 12 -  मनी लाँड्रिंगच्या आरोपाचा सामना करीत असलेले मद्यसम्राट विजय मल्या यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यास ब्रिटनने स्पष्ट नकार दिल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मल्यांना रेड कॉर्नर नोटिस पाठवण्याची तयारी केली आहे. ईडीने विजय मल्यांना रेड कॉर्नर नोटिस पाठवण्यासाठी इंटरपोलकडे विनंती केली आहे. लोकमतला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडी विजयमल्ल्यांच्या भारतातील संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात करणार आहे. ईडी सध्या फक्त आयडीबीयच्या  900 कोटी कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत आहे. इतर तपासयंत्रणांशी चर्चा केल्यानंतर १७ बँकांच्या थकलेल्या 9000 कोटी कर्जासंबंधीही तपास केला जाण्याची शक्यता आहे. 
    विजय मल्या यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यास ब्रिटनने स्पष्ट नकार दिला आहे. मल्ल्यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी दुस-या पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. रेड कॉर्नर नोटिस जारी केल्याने मल्ल्या यांच्या अडचणी वाढतील आणि त्यांना भारतात आणणंही शक्य होईल. कारण रेड कॉर्नर नोटिस जारी केल्यामुळे मल्ल्या ब्रिटन सोडून इतर कोणत्याही देशात प्रवास करु शकत नाही, आणि जर त्यांनी तसा प्रयत्न केला तर त्यांना अटक होऊ शकते. त्यामुळे ईडीने इंटरपोलला रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यास सांगितलं आहे, जेणेकरुन मल्ल्यांनी ब्रिटनबाहेर प्रवास केल्यास विमानतळावरुन त्यांना अटक करण्यात येईल.
==================================================

होणार सून मी या घरची? खान कुटुंबियांसह लूलिया दिसली एअरपोर्टवर


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १२ - बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याच्या लग्नाच्या बातम्या जोर धरू लागल्या असून या वर्षाखेरीस गर्लफ्रेंड लुलियासोबत लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच ही बातमी व्हायरल झाल्यावर सलमानच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेना. खुद्द सलमानने मात्र यावर कोणतेही भाष्य केले नाही. मात्र आता ही बातमी खरी ठरणार असल्याची चिन्हे आहेत, कारण नुकतीच सलमानची गर्लफ्रेंड लुलिया सलमानची आई सलमा खान यांच्या सोबत दिसली होती.
==================================================

भुजबळांचा जामीन; उद्या निर्णय


  • मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या जामिनाबाबत शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात सध्या ते अटकेत आहेत. भुजबळ यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मागितला आहे.
    सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयात अन्य ३४ आरोपींच्या अटकेसाठी सहा आठवड्यांचा कालावधी मागितला आहे. यात प्रामुख्याने पंकज भुजबळ, राज्यसभेचे सदस्य संजय काकडे, बिल्डर असिफ बलवा, विनोद गोएंका यांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट आहे. यातील बहुतांश आरोपींनी हे वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज केलेले आहेत. पण पंकज भुजबळ यांनी यासंदर्भात कोणतेही पाऊल उचललेले नाही.
    दरम्यान, समीर भुजबळ यांना जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आले, त्याचवेळी छगन भुजबळ यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे हजेरी झाली. या दोघांचीही न्यायालयीन कोठडी २५ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. भुजबळांचे वकील प्रसाद ढाकेफळकर यांनी सांगितले, की भुजबळ यांना काही वर्षांपासून जुने आजार आहेत. अस्थमा, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार त्यांना आहेत. तथापि, या जामिनाला विरोध करताना ईडीच्या वकील पौर्णिमा कंथारिया यांनी सांगितले, की अनेक वर्षांपासून भुजबळ यांना हा त्रास आहे. परंतु या काळात आणि आताही दैनंदिनीत काही समस्या उद्भवली नाही. भुजबळ यांना योग्य त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जामिनासाठी हे कारण होऊ शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.
==================================================

गोवंश मांस बंदी, डान्स बारबाबत अंमलबजावणी


  • मुंबई: गोवंश मांस बंदीबाबत आणि डान्सबार सुरु करण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अंमलबजावणी करण्यात येईल. त्याबाबत अद्याप न्यायालयाकडून पूर्ण सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे डान्सबारवर अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही, असे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी बुधवारी सांगितले. मुंबईत पोलिसांच्या आठ तास ड्युटीबाबत प्रायोगिक तत्त्वावर काम सुरु आहे. त्याला यश मिळाल्यास तो पॅटर्न सर्वत्र लागू करण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
    पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना आयुक्त पडसलगीकर यांनी विविध विषयांवर मते मांडली. गोवंश मांस बंदीबाबत उच्च न्यायालयाने नुकताच दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने विचारले असता. ते म्हणाले की, बीफ बाळगण्यावर आता कारवाई होणार नाही. त्याबाबत कोर्टाने जे निर्देश दिले आहेत, त्यानुसार किंवा त्याची अंमलबजावणी केली जाईल. डान्सबार बाबत न्यायालयात अद्याप सुनावणी सुरु आहे. शुक्रवारी त्याबाबत न्यायालयात सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या अंतिम आदेशानंतर त्यानुसार डान्सबारला परवानगी बाबतच्या सूचना दिल्या जातील.
==================================================

मुख्यमंत्र्यांच्या घोषणा कागदावरच!


  • लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यात पाणीटंचाई निवारणासाठी अनेक घोषणा केल्या. टँकरने पाणीपुरवठा अन् चर खोदण्याची घोषणा वगळता अन्य अर्ध्या घोषणा कागदावरच आहेत.
    मुख्यमंत्र्यांनी भंडारवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी ३७ कोटींचा निधी जाहीर केला होती. शिवाय, मातोळा पाणीपुरवठा योजनेतून लातूरला पाणी आणण्यासाठी २४.४६ कोटी आणि डोंगरगाव प्रकल्पातून पानचिंचोली पाईपलाईनसाठी ४.७६ कोटी, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी १५ कोटी, उदगीर पाणीपुरवठ्यासाठी १२ कोटी, मांजरा, साई, नागझरी चर खोदण्यासाठी २ कोटी अशा योजनाही जाहीर केल्या होत्या. त्यापैकी टँकरने पाणीपुरवठा करण्याची योजना तात्काळ अंमलात आली. या योजनेत आतापर्यंत ३ कोटी रुपये मनपाला मिळाले आहेत. तसेच चर खोदण्यासाठी ४ कोटी ७८ लाख रुपये स्थानिक प्रशासनाला मिळाले आहेत. अन्य योजनांच्या ना निविदा आहेत ना पैसे मिळाले. जवळपास अर्ध्या योजना कागदावरच आहेत.
    भंडारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचा निधी पूर्वी परत गेला होता. मुख्यमंत्र्यांनी या योजनेलाच पुन्हा मंजुरी देऊन ३७ कोटींचा निधी जाहीर केला आहे.
==================================================

भानगडी व उचापती करण्यासाठी सत्ता दिलेली नाही, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका


  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. 12 -  भानगडी व उचापती करण्यासाठी लोकांनी तुमच्या हाती सत्ता दिलेली नाही. ज्यांनी शिखरावर बसवले तेच उद्या धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाहीत, असे टीकास्त्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर सोडले आहे. हूकुमशहा हिटलरचाही गर्व, अहंकार गळून पडला व अंधार्‍या खंदकात त्याला स्वत:वरच गोळी झाडावी लागली. म्हणून लोकशाहीचे महत्त्व समजून वागा. जनतेने राज्य करण्यासाठी हाती दुधारी तलवार दिली आहे. या तलवारीने स्वत:चेच नाक कापू नका! उत्तराखंडात तसेच घडले आहे असेही त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून सुनावले आहे.
    उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे व त्यानंतर शक्तीपरीक्षेत काँग्रेसचा झालेला विजय व भाजपाचा पराभव या सर्व पार्श्वभूमीवर भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने टीका करत त्यांना सल्ला दिला आहे. उत्तराखंडला देवभूमीचा दर्जा आहे. त्यामुळे राजकीय शक्तिपरीक्षणाच्या निकालात कोण जिंकले व कोण हरले यापेक्षा लोकशाहीचा विजय झाला असेच म्हणावे लागेल. काँग्रेस पक्षाला विजयाच्या तुतार्‍या व ढोल वाजविण्याची संधी मिळाली. उत्तराखंडवर घिसाडघाईने राष्ट्रपती राजवट लादून ‘शक्ती’ दाखवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते स्वत: उताणे पडले. पण काँग्रेसला ‘टॉनिक’ मिळाले याचे आम्हाला दु:ख आहे असं उद्धव ठाकरे यांनी लेखात म्हटले आहे. 
==================================================

अमित शाहांनी दलित साधूंसोबत केलं स्नान


  •  ऑनलाइन लोकमत
    उज्जैन, दि. 11 - सिंहस्थ कुंभमेळ्यात भाजपचे अध्यक्ष अमित शाहांनी दलित सांधूसोबत शिप्रा नदीतल्या वाल्मिकी घाटावर समरसता स्नान केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून अमित शाहांनी दलित साधूंसोबत समरसता स्नान केल्याची राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगू लागली आहे. 
    या दलित साधूंसोबत अमित शाहांनी स्नान केल्यानंतर जेवणही केलं आहे. शिप्रा नदीत अमित शाहांसोबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि अन्य नेत्यांनी स्नान केलं आहे. यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख महंत नरेंद्र गिरी, जुना आखाडा पीठाचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद आणि पीठाधीश्वर उमेशनाथही उपस्थित होते. 
    सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यावेळी सरसंघचालक मोहन भागवतांनीही उपस्थिती दर्शवली आहे. शिप्रा नदीत मोहन भागवतांनीही स्नान केलं आहे. त्यानंतर त्यांनी शिप्रा नदीकाठच्या आदिवासींसोबत जेवण केलं. 
==================================================

आत्महत्येचं लाईव्ह चित्रीकरण करत तरुणीने ट्रेनसमोर मारली उडी


  • ऑनलाइन लोकमत - 
    पॅरिस (फ्रान्स), दि. 12 - ट्रेनसमोर उडी मारत 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे आत्महत्या करण्याआधी तरुणीने पेरिस्कोप या अॅप्लिकेशनद्वारे आपल्या आत्महत्येचं लाईव्ह रेकॉर्डिंगही केलं. पॅरिसमध्ये ही घटना घडली आहे. पेरिस्कोप हे स्मार्टफोनमधील एक अॅप्लिकेशन आहे ज्याद्वारे युझर्स ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग करु शकतात. 24 तासांसाठी हा व्हिडिओ उपलब्ध असतो. 
    या तरुणीने आत्महत्या करण्याआधी आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. तसंच आत्महत्येसाठी जबाबदार असणा-या व्यक्तीचं नावही घेतलं असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला असून यातील सत्यता बारकाईने पडताळली जात आहे. 
    मंगळवारी एगली या परिसरात ही आत्महत्या करण्यात आली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. फोनची आणि आत्महत्येपुर्वी रेकॉर्ड करण्यात आलेल्या व्हिडिओची पोलीस तपासणी करत आहेत. पेरिस्कोपवर हे लाईव्ह स्ट्रिम सुरु असताना एका व्यक्तीने हे पाहिल्यानंतर पोलिसांना कळवलं.
==================================================

मिग-२९ के नौदलाच्या ताफ्यात


  • वास्को : नौदलात तीस वर्षे सेवेत असलेल्या सी-हॅरिअर्सची जागा बुधवारी नव्या दमाच्या मिग-२९ के लढाऊ विमानांनी घेतली. भारतीय नौदलाच्या इतिहासात बुधवारी ऐतिहासिक क्षणांची नोंद झाली. दाबोळी येथील आयएनएस हंसा तळावर सी-हॅरिअर्सला निरोप देऊन मिग-२९ के विमानाचे स्वागत करण्यात आले. सी-हॅरिअर्स आणि मिग-२९ के विमानांचे नेत्रदीपक संचलन झाले.‘मिग-२९ के’ हे अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. प्रतिमिनिट साठ हजार फुटांवरून उड्डाण करण्याची त्याची क्षमता आहे. तसेच मल्टिमोडल रडारवर ते येत नाही. एका मिनिटात शून्य ते एक हजार प्रति किलोमीटर नॉटिकल मैल या वेगाने झेपाविण्याची या विमानाची क्षमता आहे.
==================================================

फलंदाजांना हेल्मेटसक्ती, आॅस्ट्रेलियाचा कठोर नियम


  • ऑनलाइन लोकमत
    मेलबर्न, दि. 11 - क्रिकेटपटू फिलीप ह्युज याचा मैदानावरच झालेला मृत्यू आॅस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाला (सीए) प्रचंड वेदना देणारा ठरला. त्यामुळे आता खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेता फलंदाजांनी मैदानावर हेल्मेट वापरायलाच हवे, असा नियम कठोर केला आहे.
    डेविड कर्टेन यांनी बुधवारी परिक्षण शिफारसी सादर केल्या. त्यानंतर सीएने प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात फलंदाजांसोबतच यष्टिरक्षक आणि विकेटजवळ उभ्या राहणाऱ्या क्षेत्ररक्षकाला हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. सीएनुसार, सराव आणि सामन्यादरम्यान वापरण्यात येणारी सर्व हेल्मेट ही ब्रिटिश नियमांना पूर्ण करणारी असायला हवीत.
    सीएचे प्रमुख जेम्स सदरलॅँड म्हणाले की, ह्युजचा विचार डोक्यात येत नाही, ही केवळ एका दिवसाची गोष्ट नाही. ही गोष्ट ह्युजला परत आणू शकत नाही किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे दु:खही कमी करू शकत नाही त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नयेत, याची काळजी घेता येईल. त्यासाठी हेल्मेट वापरणे हा नियम कठोर करण्यात आला आहे.
==================================================
दिल्ली आता प्रदूषित शहर नाही- WHO


File Photoनवी दिल्ली - राजधानी दिल्लीला जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीतून बाहेर पडण्यात यश मिळाले असून ही बाब जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) हवेच्या दर्जाबाबत प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

सध्या दिल्ली हे जगातील तीन हजार शहरांमधील हवेच्या प्रदूषणाच्या बाबतीत अकराव्या स्थानावर आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी दिल्लीतील प्रदूषण कमी झाल्याचे चित्र आहे. "डब्ल्यूएचओ‘ने 2014 मध्ये जगभरातील 1600 शहरांचा अभ्यास केला होता. त्यावेळी दिल्ली ही सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत होती. यंदा 3000 शहरांचा अभ्यास करून त्याबाबतच्या आकडेवारीनुसार दिल्लीने सुधारणा केल्याचे आढळून आले आहे. "डब्ल्यूएचओ‘ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार इराणमधील झाबोल हे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. 
==================================================
डोनाल्ड ट्रम्पसाठी हिंदु संघटनेचे देवांना साकडे


नवी दिल्ली - अमेरिकेत सध्या सुरु असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे आघाडीवर असलेले उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना विजय मिळावा, यासाठी भारतामधील एका हिंदु संघटनेने देवांना साकडे घातले आहे. ट्रम्प हेच आता मानवतेस वाचवू शकतील, अशी या संघटनेची प्रामाणिक भावना आहे.

""इस्लामिक दहशतवादामुळे सध्या सर्व जगामध्ये आकांडतांडव माजले आहे. भारतासही हा धोका आहेच. तेव्हा आता केवळ डोनाल्ड ट्रम्प हेच मानवतेस वाचवू शकतात,‘‘ असे या राष्ट्रवादी हिंदु सेनेचे संस्थापक विष्णु गुप्ता यांनी म्हटले आहे. तेव्हा ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळावा, यासाठी या संघटनेतर्फे यावेळी यज्ञयागासह संस्कृतमध्ये प्रार्थना करण्यात आली.

मुस्लिमासंदर्भात ट्रम्प यांनी केलेल्या काही वादग्रस्त विधानांनी ते अनेकवेळा राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आले आहेत. 
==================================================
मॉन्सूनचे आगमन यंदा मे महिन्यातच होणार


पुणे- यंदा मॉन्सून 1 जूनपूर्वीच केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज ‘स्कायमेट‘ संस्थेने वर्तविला आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यातील उन्हाच्या झळांची तीव्रता फार दिवस राहणार नाही.
जून ते सप्टेंबरदरम्यान पडणारा नैऋत्य मौसमी पाऊस दरवर्षी साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये येतो. मात्र, यंदा जूनच्या आधीच वरुणराजा हजेरी लावेल असे सांगण्यात आले आहे.


"सुरवातीला मॉन्सून हजेरी लावताना अंदमान आणि निकोबार बेटांचा भाग व्यापून टाकेल. 18 ते 20 मे दरम्यान या भागात मॉन्सूनचे आगमन होईल. तर, केरळमध्ये 28 ते 30 मे यादरम्यान मॉन्सूनच्या सरी येतील. तसेच, ईशान्य भारताचा प्रदेशही यावेळी मॉन्सून व्यापून टाकेल," असे ‘स्कायमेट‘ने म्हटले आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभाग मॉन्सूनबद्दलचा आपला अंदाज 15 मे रोजी जाहीर करणार आहे. मॉन्सूनच्या प्रगतीचा अंदाज 15 मे रोजी जाहीर केला जाईल, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी 4 मे रोजी (बुधवार) सांगितले. लोकसभेमध्ये प्रश्‍नोत्तराच्या तासादरम्यान डॉ. हर्ष वर्धन यांनी ही माहिती दिली. 
==================================================
पोलिस चौकीतच महिलेवर अधिकाऱयाचा बलात्कार


श्रीनगर- बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर पोलिस चौकीतच पोलिस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱयांनी आज (गुरुवार) दिली.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्‍मीरमधील अखनूर भागात बुधवारी ही घटना घडली. मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याची तक्रार देण्यासाठी महिला चौकीत आली होती. यावेळी एका पोलिस अधिकाऱ्याने चौकीतच बलात्कार केला. पीडित महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक मोहम्मद इक्‍बाल याला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, बलात्कारमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून ममता कुमारी नावाच्या पोलिस अधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलिस चौकीबाहेर नागरिकांनी आज निदर्शने केली.
==================================================
स्वत:च्या आत्महत्येचे तिने केले थेट प्रक्षेपण!


पॅरिस (फ्रान्स) - धावत्या रेल्वेसमोर उडी मारून जीवन संपविणाऱ्या एका 19 वर्षाच्या तरुणीने या संपूर्ण घटनेचे मोबाईल ऍपद्वारे थेट प्रक्षेपण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मंगळवारी दक्षिण पॅरिसपासून 40 किलोमीटर अंतरावरील एका रेल्वे स्थानकावर 19 वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केली. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार ही घटना मंगळवारी (10 मे) स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता घडली. आत्महत्येपूर्वी ‘पेरिस्कोप‘ या स्मार्ट फोनमधील ऍपद्वारे तिने या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची व्यवस्था केली होती. त्या व्हिडिओमध्ये तिने आपल्यावर बलात्कार झाला असून बलात्कार केलेल्या व्यक्तीचे नावही घेतले आहे. ‘पेरिस्कोप‘वर रेकॉर्ड झालेले व्हिडिओ हे शुटिंग पूर्ण झाल्यानंतर संबंधित युजरच्या ट्विटर अकाऊंडवर पुढील 24 तासांसाठी उपलब्ध असतात. यापूर्वी याच तरुणीने एखादा संदेश पाठविण्यासाठी व्हिडिओचा वापर करण्यासाठी उत्सुक असल्याचे एका लाईव्ह व्हिडिओद्वारे सांगितले होते. तसेच तरुण युजर्सना एखादा धक्कादायक व्हिडिओ न पाहण्याचा इशाराही तिने दिला होता. दरम्यान या संपूर्ण प्रकाराचा पोलिस बारकाईने तपास करत आहेत.
==================================================
यंदा सरासरीपेक्षा 27 टक्के जास्त पाऊस पडणार


ठाणे- दुष्काळात होरपळून निघत असलेल्या मराठी जनतेला दिलासा देणारी एक चांगली बातमी आहे. महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा 27 टक्के जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

हवामान खात्याचे विभागीय उपसंचालक कृष्णानंद होसलीकर यांनी पावसाच्या अंदाजाबद्दल माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन सुसज्जतेबाबत ठाणे जिल्हा मुख्यालयात काल (बुधवार) एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

तसेच, कोकण विभागात दरवर्षीपेक्षा यंदा 27.5 टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा माहिती विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होण्याचा अंदाज असल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. 
==================================================
गोमांसबंदी, दारुबंदी हा निव्वळ मूर्खपणा: गोदरेज


मुंबई - गोमांस आणि मद्यावर लादण्यात आलेल्या बंदीमुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान होत असल्याचे परखड मत गोदरेज उद्योगसमूहाचे अध्यक्ष अदी गोदरेज यांनी व्यक्त केले आहे. गेल्या दोन वर्षांत सरकारकडून राबविण्यात आलेल्या अर्थिक धोरणांची गोदरेज यांनी यावेळी प्रशंसा केली; मात्र गोमांसबंदी व मद्यबंदीसंदर्भात त्यांनी नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली.

"व्यवसायास पूरक धोरण राबविण्यात आल्याने खरच फायदा झाला आहे. याचबरोबर, कमोडिटीजची किंमत कमी झाल्यानेही किफायतशीर वातावरण निर्माण झाले आहे. भारत ही सर्वाधिक वेगाने विकसित पावणारी अर्थव्यवस्था असेल, असे मला वाटते. भारत हा हळुहळू एक प्रभावशाली विकसित देश म्हणून उदयास येईल,‘‘ असे गोदरेज म्हणाले.



""परंतु विकासाच्या या प्रक्रियेवर काही गोष्टींचा नकारात्मक परिणाम होत आहे. उदाहरणार्थ, काही राज्यांत लादण्यात आलेली गोमांसबंदी पहा. यामुळे शेती आणि ग्रामीण विकासावर नकारात्मक परिणाम होत आहे. यामुळे उद्योगांवरही परिणाम होत आहे. अनेक शेतकऱ्यांसाठी हा अर्थप्राप्तीचा एक चांगला मार्ग होता. आपल्या धर्मामध्येही गोमांसाविरोधात काहीही लिहिलेले नाही. वैदिक काळामध्ये भारतीय गोमांसभक्षक होते. मात्र त्यानंतर सातत्याने आलेल्या दुष्काळांच्या वर्षांनंतर गायींना न मारता लहान मुलांसाठी त्यांचे दुध राखून ठेवण्यात यावे, अशी धारणा उदयास आली. परंतु आता गोमांसबंदीस धार्मिक श्रद्धेचे स्वरुप देण्यात आले आहे. हे हास्यास्पद आहे,‘‘ असे गोदरेज यांनी स्पष्ट केले. मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या निर्णयाबद्दलही त्यांनी यावेळी मतप्रदर्शन केले. 
==================================================
आसाम: पोलिसांच्या कारवाईत विद्यार्थ्याचा मृत्यू


सिलछर (आसाम)- गोंधळ घालणाऱया दोन गटांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बुधवारी (ता. 11) रात्री दोन गटांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री सुरू होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. दोन्ही गटांमधील भांडणे मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी पोलिसांना घेराव घालून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. एक गोळी सतरा वर्षाच्या विद्यार्थ्याला लागून त्याचा मृत्यू झाला. यामध्ये सात जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पाच पोलिसांचा समावेश आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.‘
==================================================
यज्ञ करा म्हणजे पाऊस पडेल- भाजप खासदार
-

File Photoनवी दिल्ली - देशातील अनेक भागात उभ्या राहिलेल्या भीषण दुष्काळाच्या आणि पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते व खासदार विरेंद्र सिंह यांनी यज्ञाचे आयोजन केले आहे. तसेच ‘निसर्ग शुद्ध होऊन भरपूर पाऊस पडावा यासाठी सर्वांनी यज्ञ करावेत‘ असे आवाहनही त्यांनी केले आहे.

विरेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशमधील भाडोई येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. यज्ञाचे समर्थन करताना ते म्हणाले, "आधुनिक काळाचा विचार करता यज्ञ ही आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पद्धती आहे. यज्ञामुळे ढगांना आकर्षित करण्यासाठी मदत होते. यज्ञ हा केवळ शेतकऱ्यांसाठी किंवा संपन्न लोकांसाठी नसून यज्ञामुळे वातावरण शुद्ध होते. यज्ञातून निघालेला धूर आकाशात जातो आणि पाऊस पडतो, याला विज्ञानाचाही आधार आहे. मला खात्री आहे की ज्या भागात दुष्काळाची परिस्थिती आहे तेथे यज्ञ केल्यास पाऊस पडू शकेल.‘ तसेच विकासाच्या नावाखाली लोक निसर्गाचा -हास करत असल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असल्याचेही ते म्हणाले
==================================================
लिबियातून 29 भारतीय मायदेशी परतले़
-

तिरुअनंतपुरम - लिबियातून सुटका करण्यात आलेल्या सहा कुटुंबातील 29 सदस्य आज (गुरुवार) सकाळी सुखरुप भारतात परतले.

केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ आणि तमिळनाडूतील रहिवाशी असलेल्या या 29 जणांचे आज सकाळी भारतात आगमन झाले. यांना लिबियाची राजधानी त्रिपोलीतून इस्तांबूलला आणण्यात आले. तेथून दुबईमार्गे कोची येथे आणण्यात आले. यातील बरेचसे कर्मचारी लिबियातील सबरता शहरातील झाविया रुग्णालयात नोकरीस होते.

सबरता शहरात बॉम्बस्फोटात केरळमधील नर्सचा मृत्यू झाल्यानंतर या सर्वांना तेथून सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते. अखेर केंद्रीय परराष्ट्रमंत्रालय आणि केरळ सरकारच्या मदतीने या सर्वांना भारतात आणण्यात आले. लिबियामध्ये इसिसच्या दहशतवाद्यांकडून हिंसाचार करण्यात येत आहे.
==================================================
लोकसहभागातून निघाला तीन हजार ट्रॅक्‍टर गाळ

येवला - अडचणीच्या काळात आधार ठरणाऱ्या शहराच्या पाणीयोजनेच्या जुन्या गंगासागर तलावाची साठवणक्षमता तब्बल १.७० दशलक्ष घनफुटाने वाढणार आहे. कारण लोकसहभागातून तलावातून तब्बल तीन हजार ट्रॅक्‍टर गाळ काढला आहे. यामुळे शेकडो एकर शेतीदेखील सुपीक होणार आहे.

जुन्या गंगासागर तलावाची साठवण क्षमता खूपच कमी झाल्याने साचलेला गाळ लोकसहभागातून काढण्याचा निर्णय ज्येष्ठ नेते ऍड. माणिकराव शिंदे, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या बैठकीत झाला होता. या बैठकीला गंगासागर तलाव ट्रस्टचे विश्‍वस्त धवल पटेल, उपनगराध्यक्ष पंकज पारख, राहुल पटेल, श्रीपाद पटेल, पाणीपुरवठा सभापती रिजवान शेख तसेच माजी नगरसेवक माणिकलाल शर्मा, पाणीपुरवठा अभियंता जनार्दन खिल्लारी आदी उपस्थित होते. या वेळी कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे यांनी पुढाकार घेऊन पोकलॅन मशिन, जेसीबी, ट्रॅक्‍टर, डम्पर व इतर साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. 
==================================================

No comments: