[अंतरराष्ट्रीय]
१- टोकियो; तीन तासात 1400 एटीएममधून 90 कोटींची चोरी
२- टोकियो; गिफ्ट नाकारल्यामुळे पॉपस्टारवर चाहत्याचा चाकूहल्ला
३- बँकॉकमध्ये हॉस्टेलच्या आगीत 17 विद्यार्थिनींचा मृत्यू
४- 70 वर्षांपूर्वीच्या हिरोशिमा बॉम्बसाठी 55 वर्षीय ओबामा माफी मागणार?
५- हिरोशिमा दौ-यात आण्विक हल्ल्याबद्दल माफी मागणार नाही - बराक ओबामा
६- वॉशिंग्टन; तालिबानी नेता अख्तर मन्सूर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार
७- न्युयॉर्क; ट्रम्प समर्थकांकडून दहशतवाद्यांना अमेरिकेत येण्याचं निमंत्रण
८- कैरो; केबिनमधून धुराचा अलर्ट जारी झाला होता...
९- थायलंडमध्ये वसतिगृहाला आग; 17 मुलींचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
१०- उपराष्ट्रपतींची पत्नी सलमा यांचा ॐ काराला पाठिंबा
११- इस्रोकडून स्वदेशी बनावटीच्या पहिल्या स्पेस शटलचं प्रक्षेपण
१२- मोदींचा इराण दौरा ठरणार 'गेमचेंजर', चीन, पाकिस्तानला ठोस उत्तर
१३- मोदी सरकारने रद्द केले 1,159 कालबाह्य कायदे
१४- इंदूर; 'धर्माच्या नावावर कोट्यवधी उधळता, मग शेतकऱ्यांना मदत का नाही?', भय्यूजी महाराजांचा उद्विग्न सवाल
१५- सोलापूरमध्ये स्वच्छतागृहाला ऋषी कपूरचे नाव
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१६- कांदिवली पोलिसांची जोडप्याला बेदम मारहाण
१७- जयललितांना सहाव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
१८- किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती
१९- दुष्काळाच्या एसटीलाही झळा; २० दिवसांत ४३ कोटींचे उत्पन्न घटले
२०- मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेचे उत्तरपत्रिका घोटाळा प्रकरण: ‘टॉपर’चीही चौकशी होणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२१- मणिपूरमध्ये अतिरेकी हल्ला, आसाम रायफल्सचे 6 जवान शहीद
२२- हैदराबादेत दारुड्याने सिंहासमोर उडी मारली...
२३- दिल्ली; लॅपटॉप चार्जरनं घेतला युवकाचा बळी
२४- वसई; दहा वर्षाच्या मुलाकडून मेव्हण्याची हत्या
२५- कोलकाता; अभिनेत्री आणि भाजप नेत्या रुपा गांगुली यांच्यावर हल्ला
२६- जळगावात 'दुपट्टा गँग'चा धुमाकूळ, चोरट्या महिला सीसीटीव्हीत कैद
२७- चाकण; ९५२ किलो कांद्याची पट्टी १ रुपया
२८- मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून समजवायला गेलेल्या महिलेची भीषण हत्या
१९- पुसद; शेतकरी तरुणाच्या गळ्यात ‘आयआयटीयन’ची माळ
३०- अयोध्या; हिंदू रक्षणासाठी बजरंग दल घेतय शस्त्रांचे प्रशिक्षण
३१- सातारा; जीवन प्राधिकरणाच्या प्रमुख अधिकाऱ्याला टाकीवर तीन तास ठेवले डांबून
३२- कोचीत नौदल तळावर आढळला जवानाचा मृतदेह
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३३- गोळ्या खाऊन वजन कमी होत नाही, जिममध्ये मेहनत करावी लागते: जरीन खान
३४- गेल, डिव्हिलर्सला द्या भारतीय नागरिकत्व-कोहली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.
[मधुकर शिंदे, हदगाव]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
======================================

सतीश धवन स्पेस सेंटरमधून सकाळी 7 वाजता याचं प्रक्षेपण करण्यात आलं. त्यानंतर अभियान यशस्वी झाल्याची घोषणा करण्यात आली. पुनर्प्रयोग करता येणाऱ्या रॉकेटच्या विकासाच्या दृष्टीने हे प्राथमिक मात्र महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. याचा अंतिम टप्पा गाठण्यासाठी 10 ते 15 वर्ष लागतील, असं म्हटलं जातं.
पृथ्वीच्या कक्षेत उपग्रहांना प्रस्थापित करुन पृथ्वीवर परत येणे, हा या स्पेस शटलचा उद्देश आहे. हे उड्डाण घन इंधनाचा वापर केलेल्या रॉकेटच्या सहाय्याने करण्यात आलं. या रॉकेटची लांबी 6.5 मीटर असून वजन 1.75 टन आहे.

पाच जवान आणि ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) या हल्ल्यात शहीद झाले. गेल्या वर्षीही याच परिसरात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 जवान हुतात्मा झाले होते.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केलं. कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

जपान दौऱ्यावर असलेल्या बराक ओबामा यांनी माफी मागणार नसल्याचं यावेळी मुलाखतीत सांगितलं. ‘युद्धकाळात नेते कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकतात, हे समजणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण माफीनामा मागणार नाही’ असं ओबामांनी स्पष्ट केलं.
‘प्रश्न विचारणं आणि पडताळणी करणं हे इतिहासतज्ज्ञांचं काम आहे. मात्र गेली साडेसात वर्ष हे पद भूषवताना नेत्यांना किती कठीण निर्णय घ्यावे लागतात याची मला जाणीव आहे. विशेषतः युद्धप्रसंगात अशी कठीण वेळ नेत्यांवर येते’ असं बराक ओबामा म्हणाले.
पदावर असताना हिरोशिमा दौऱ्यावर जाणारे ओबामा हे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. हिरोशिमावर 6 ऑगस्ट 1945 रोजी अणूबॉम्ब टाकण्यात आला होता. त्यात सुमारे 1 लाख 40 हजार नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र या अणूहल्ल्याचे दुरगामी परिणाम अनेक पिढ्यांवर पाहायला मिळाले. किरणोत्साराचे परिणाम अनेक आठवडे, महिने, वर्ष जपानी नागरिकांना भोगावे लागले.
त्यानंतर नागासाकीवर तीन दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्टला अणूबॉम्ब टाकला. यात 74 हजार नागरिकांचा बळी गेला होता.

उपराष्ट्रपतींची पत्नी सलमा यांचा ॐ काराला पाठिंबा
नवी दिल्ली : मोदी सरकार सध्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आयोजनात व्यस्त आहे. योगदिनी ‘ॐ कार’ करायचं की नाही यावरुन वादावादी सुरु आहे. मात्र ओम बंधनकारक नाही, असं केंद्राने स्पष्ट केलं आहे.
हा वादा संपला असतानाच, उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांच्या पत्नी सलमा यांच्या वक्तव्यावरुना पुन्हा वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.
“मी आयुष्यभर योगा करते. ओम पठणाने ऑक्सिजन मिळतो. जर योगा टाळला असता, तर हाडं ठिसूळ झाली असती”, असं सलमा यांनी म्हटलं आहे.
योगादरम्यान ॐ कार हवं की नको, असा प्रश्न सलमा यांना विचारण्यात आला. त्यावर सलमा म्हणाल्या,”मी आयुष्यभर योगा करत आले आहे. ॐ काराने ऑक्सिजन मिळतो. जर तुम्ही शिकले-सवरले असाल, तर ज्या गोष्टींतून फायदा मिळतो, ती गोष्ट तुम्ही कराल.
======================================
इस्रोकडून स्वदेशी बनावटीच्या पहिल्या स्पेस शटलचं प्रक्षेपण
श्रीहरिकोटा : इस्रोने तयार केलेले संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या पहिल्या स्पेस शटलचं आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आलं आहे. विमानासारखे पंख असलेलं आरएलव्ही-टीडी (RLV-TD) प्रक्षेपक पहिल्यांदाच इस्त्रोकडून अवकाशात सोडण्यात आलं आहे.
सतीश धवन स्पेस सेंटरमधून सकाळी 7 वाजता याचं प्रक्षेपण करण्यात आलं. त्यानंतर अभियान यशस्वी झाल्याची घोषणा करण्यात आली. पुनर्प्रयोग करता येणाऱ्या रॉकेटच्या विकासाच्या दृष्टीने हे प्राथमिक मात्र महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. याचा अंतिम टप्पा गाठण्यासाठी 10 ते 15 वर्ष लागतील, असं म्हटलं जातं.
पृथ्वीच्या कक्षेत उपग्रहांना प्रस्थापित करुन पृथ्वीवर परत येणे, हा या स्पेस शटलचा उद्देश आहे. हे उड्डाण घन इंधनाचा वापर केलेल्या रॉकेटच्या सहाय्याने करण्यात आलं. या रॉकेटची लांबी 6.5 मीटर असून वजन 1.75 टन आहे.
======================================

पोलिसांच्या माहितीनुसार या चोरीमध्ये किमान शंभर जण सहभागी असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यापैकी एकाच्या मुसक्या आवळण्यात यश आलेलं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या एका बँकेतून अवैधरित्या अकाऊण्ट डिटेल्स मिळवून बनावट कार्डाद्वारे पैसे काढण्यात आले.
15 मे रोजी सकाळी 5 ते 8 वाजण्याच्या सुमारास 1400 एटीएममधून पैसे काढण्यात आले. प्रत्येकाने सुमारे 1 लाख येन ( अंदाजे 61 हजार रुपये) काढले. जपानमध्ये एका एटीएममधून एकावेळी इतकीच रक्कम काढण्याची मर्यादा आहे. चोरांनी 1600 बनावट कार्डांचा वापर केला.
पोलिस याचा अधिक तपास करत असून विदेशी चोरांचा समावेश असल्यामुळे अडथळे येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
तीन तासात 1400 एटीएममधून 900000000 ची चोरी
टोकियो : आंतरराष्ट्रीय पातळीवरील सराईत चोरांनी जपानच्या नाकी नऊ आणले आहेत. तीन तासांत 1400 एटीएममधून तब्बल 90 कोटी रुपयांची चोरी झाल्याचं वृत्त आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार या चोरीमध्ये किमान शंभर जण सहभागी असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यापैकी एकाच्या मुसक्या आवळण्यात यश आलेलं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या एका बँकेतून अवैधरित्या अकाऊण्ट डिटेल्स मिळवून बनावट कार्डाद्वारे पैसे काढण्यात आले.
15 मे रोजी सकाळी 5 ते 8 वाजण्याच्या सुमारास 1400 एटीएममधून पैसे काढण्यात आले. प्रत्येकाने सुमारे 1 लाख येन ( अंदाजे 61 हजार रुपये) काढले. जपानमध्ये एका एटीएममधून एकावेळी इतकीच रक्कम काढण्याची मर्यादा आहे. चोरांनी 1600 बनावट कार्डांचा वापर केला.
पोलिस याचा अधिक तपास करत असून विदेशी चोरांचा समावेश असल्यामुळे अडथळे येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
======================================

कांदिवली पोलिसांची जोडप्याला बेदम मारहाण
मुंबई : तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या जोडप्याला कांदिवली पोलीसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी जबर मारहाण केल्याची ही घटना दहा-बारा दिवसांपूर्वी असल्याचं सांगण्यात येत आहे.
मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी तक्रारदार जोडपं 11 मेच्या रात्री कांदिवली पोलिसात गेलं होतं. मात्र इथे तक्रार नोंदवण्यावरुन बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही बेदम मारहाण केल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
======================================

हैदराबादेत दारुड्याने सिंहासमोर उडी मारली...
हैदराबाद : हैदाराबादेतील नेहरु प्राणी संग्रहालयात रविवारी थरारक घटना घडली. दारुच्या नशेत आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीने थेट सिंहांच्या समोर उडी मारली. मात्र सिंह काही अंतरावर असल्याने आणि संबंधित व्यक्ती पाण्यात पडल्याने, प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांना त्याला वाचवण्यात यश आलं.
मुकेश असं आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचं नाव आहे. “मी दारुच्या नशेत होतो. प्राणीसंग्रहालयातही मी फुल्ल घेतली होती. त्यामुळे मी नेमकं काय केलं हे मला आठवत नाही‘, असं मुकेश म्हणाला.
तू आत्महत्येचा प्रयत्न का केलास, असं मुकेशला विचारलं तेव्हा तो म्हणाला ‘काहीच कारण नाही‘. मुकेश हा मूळचा राजस्थानचा आहे. दरम्यान त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
======================================

गोळ्या खाऊन वजन कमी होत नाही, जिममध्ये मेहनत करावी लागते: जरीन खान
मुंबई: अभिनेत्री जरीन खाननं वजन घटविणाऱ्या गोळ्यांचा प्रचार करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. ‘ज्या गोष्टीवर माझा स्वत:चा विश्वास नाही त्याचा मी कसा प्रचार करावा?’ असा प्रश्न तिनं उपस्थित केला आहे.
जरीनच्य मते, “ज्या गोष्टींवर माझा विश्वास नाही त्याचा मी प्रचार करु शकत नाही. मी दररोज जीममध्ये जाते व्यायाम करते. कारण की, मला माहित की, वजन घटविण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही.”
जरीन खान दिग्दर्शक राम गोपाल वर्माच्या आगामी सिनेमा वीरप्पनमध्ये दिसून येणार आहे. ‘खल्लास वीरप्पन’ या गाण्यावर तिचा एक खास लूक पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, याचवेळी तिला वजन घटविणाऱ्या कंपनीनं संपर्क केला होता. त्याच्या जाहिरातीसाठी तिला जवळजवळ 1 कोटींची ऑफर देण्यात आली होती. मात्र, तिनं ती ऑफर धुडकावून लावली. कारण जरीनचं म्हणणं आहे की, वजन कमी करण्याचा योग्य मार्ग म्हणजे जीममध्ये मेहनत करणं.
======================================

'धर्माच्या नावावर कोट्यवधी उधळता, मग शेतकऱ्यांना मदत का नाही?', भय्यूजी महाराजांचा उद्विग्न सवाल
इंदूर: एरवी भपंक महाराजांवर आणि देवकार्यासाठी लाखो उधळणारे लोक शेतकऱ्यांसाठी हात आखडता का घेतात? असा उद्विग्न सवाल भैय्यूजी महाराज यांनी विचारला आहे.
समाजकार्यातून निवृत्त झाल्यानंतर अनेक पैलूविषयी एबीपी माझाला त्यांनी मुलाखत दिली. माझ्या समाजकारणाच्या आर्थिक मर्यादा संपल्या आहेत. मी आता कर्जबाजारी महाराज झालो आहे. अशीही खंत त्यांनी बोलून दाखवली.
समाजकारणाबरोबरच, राजकारणातल्या खुपत असणाऱ्या गोष्टींवरही आम्ही त्यांना बोलतं केलं. याआधी आम्ही देखील शेतकऱ्यांना मदत केली. मात्र मदतकार्याचा कधीही इव्हेंट होऊ दिला नाही. असं सांगत त्यांनी भाजप सरकारला टोला लगावला. त्यांची सविस्तर मुलाखत तुम्ही आज सकाळी १० वाजता एबीपी माझावर बघू शकणार आहात. ज्यात भैय्यूजी महाराजांवर झालेला हल्ला, समाजकार्यातून निवृत्त होण्यामागचं नेमकं कारण. याबाबत त्यांनी सविस्तरपणे भाष्य केलं आहे.
======================================

कसोटी रँकिंगमध्ये अश्विन दुसऱ्या स्थानी कायम
मुंबई: भारताच्या रवीचंद्रन अश्विननं गोलंदाजांच्या जागतिक कसोटी क्रमवारीत दुसरं स्थान कायम राखलं आहे.
आयसीसीनं जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत अश्विनचा अपवाद वगळता एकाही भारतीय गोलंदाजाला टॉप टेनमध्ये स्थान मिळालेलं नाही.
गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड 872 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर अश्विन 871 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत इंग्लंडचाच जेम्स अँडरसन 854 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ अव्वल स्थानावर, तर इंग्लंडचा ज्यो रुट दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर आफ्रिकेचे फलंदाज हाशिम आमला चौथ्या आणि एबी डिव्हिलियर्स सहाव्या स्थानी आहेत.
या यादीत एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही.
======================================

मायूच्या मान आणि छातीवर 12 ते 15 वेळा चाकूने भोसकल्याच्या खुणा असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे. टोकियोमध्ये एका छोटेखानी कॉन्सर्टच्या आधी ही घटना घडली.
27 वर्षीय आरोपी तोमोहिरो इवाझाकीला घटनास्थळावरुन ताब्यात घेण्यात आलं असून रक्तबंबाळ सुरीही हस्तगत करण्यात आली आहे.
गिफ्ट नाकारल्यामुळे पॉपस्टारवर चाहत्याचा चाकूहल्ला
टोकियो : एका जपानी पॉपस्टारवर तिच्या निस्सीम चाहत्याने चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना जपानमध्ये घडली आहे. 20 वर्षीय मायू तोमितावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मायूच्या मान आणि छातीवर 12 ते 15 वेळा चाकूने भोसकल्याच्या खुणा असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे. टोकियोमध्ये एका छोटेखानी कॉन्सर्टच्या आधी ही घटना घडली.
27 वर्षीय आरोपी तोमोहिरो इवाझाकीला घटनास्थळावरुन ताब्यात घेण्यात आलं असून रक्तबंबाळ सुरीही हस्तगत करण्यात आली आहे.
तोमिता कॉलेज शिक्षणासोबतच पॉपस्टार आणि अभिनेत्री म्हणून कार्यरत आहे. हल्ल्यापूर्वी आरोपीने ट्विटरवर आपल्याबाबत आक्षेपार्ह कमेंट केल्याची तक्रार मायूने पोलिसात केली होती. हल्लेखोर इवाझाकीने दिलेली भेटवस्तू नाकारल्यामुळे मायुवर हल्ला केल्याचा दावा केला जात आहे.
======================================

उत्तर थायलंडच्या डोंगराळ भागातल्या जमातीतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या हॉस्टेलमध्ये रात्रीच्या वेळी आग लागली. चिआंग राय भागातील पिठाक्कीआर्त विठ्ठाया शाळेच्या दुमजली इमारतीत ही आग लागली. यात किमान 17 जणींचा मृत्यू झाला असून 5 जणी जखमी आहेत, तर काही विद्यार्थिनी बेपत्ता आहेत.
रात्रीच्या वेळेस आग लागल्यामुळे झोपेत असलेल्या विद्यार्थिनींना घटनेची माहिती मिळाली नाही. त्यामुळेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. भाजल्यामुळे अनेकींचे चेहरे ओळखण्यापलिकडे गेल्याची माहिती स्थानिकी वाहिनीने दिली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
बँकॉकमध्ये हॉस्टेलच्या आगीत 17 विद्यार्थिनींचा मृत्यू
बँकॉक : बँकॉकमधील एका शाळेच्या वसतिगृहात लागलेल्या आगीत होरपळून 17 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. पाच ते 12 वयोगटातील मुलींचा मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
उत्तर थायलंडच्या डोंगराळ भागातल्या जमातीतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या हॉस्टेलमध्ये रात्रीच्या वेळी आग लागली. चिआंग राय भागातील पिठाक्कीआर्त विठ्ठाया शाळेच्या दुमजली इमारतीत ही आग लागली. यात किमान 17 जणींचा मृत्यू झाला असून 5 जणी जखमी आहेत, तर काही विद्यार्थिनी बेपत्ता आहेत.
रात्रीच्या वेळेस आग लागल्यामुळे झोपेत असलेल्या विद्यार्थिनींना घटनेची माहिती मिळाली नाही. त्यामुळेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. भाजल्यामुळे अनेकींचे चेहरे ओळखण्यापलिकडे गेल्याची माहिती स्थानिकी वाहिनीने दिली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
======================================

मोदींचा इराण दौरा ठरणार 'गेमचेंजर', चीन, पाकिस्तानला ठोस उत्तर
तेहरान : इराण दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजधानी तेहरानमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. मोदींनी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात तेहरानच्या प्रसिद्ध गुरुद्वाऱ्यात जाऊन केली.
भाई गंगा सिंह सभा तर्फे निर्माण केलेली ही गुरुद्वारा तेहरानमधील एकमेव आहे. यावेळी, भारतीय संस्कृतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी मोदींनी शीख समुदायाचे आभार व्यक्त केले.
======================================
मणिपूरमध्ये अतिरेकी हल्ला, आसाम रायफल्सचे 6 जवान शहीद
मणिपूर : मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले आहेत. हे सर्व जवान ’29 आसाम रायफल्सचे’ असून यामध्ये एका कनिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश आहे.
चंदेल जिल्ह्यातल्या एका गावात झालेल्या भूस्खलनाचा आढावा घेण्याचं काम करुन जवान परतत होते. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या या अतिरेक्यांनी अचानक हल्ला चढवला. यावेळी भारत-म्यानमार सीमेजवळ जवान आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या चकमकीत आसाम रायफल्सच्या जवानांना वीरमरण आलं.
पाच जवान आणि ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) या हल्ल्यात शहीद झाले. गेल्या वर्षीही याच परिसरात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 जवान हुतात्मा झाले होते.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केलं. कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
======================================
70 वर्षांपूर्वीच्या हिरोशिमा बॉम्बसाठी 55 वर्षीय ओबामा माफी मागणार?
टोकियो : जपानला उद्ध्वस्त करणाऱ्या हिरोशिमा आणि नागासाकीतील बॉम्बस्फोटासाठी माफी मागणार नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलं आहे. 1945 मध्ये जपानच्या दोन शहरांवर अमेरिकेने अणूबॉम्ब टाकला होता, त्याबद्दल माफी मागणार का असा सवाल त्यांना एनएचके टीव्हीच्या मुलाखतीत विचारला गेला.
जपान दौऱ्यावर असलेल्या बराक ओबामा यांनी माफी मागणार नसल्याचं यावेळी मुलाखतीत सांगितलं. ‘युद्धकाळात नेते कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकतात, हे समजणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण माफीनामा मागणार नाही’ असं ओबामांनी स्पष्ट केलं.
‘प्रश्न विचारणं आणि पडताळणी करणं हे इतिहासतज्ज्ञांचं काम आहे. मात्र गेली साडेसात वर्ष हे पद भूषवताना नेत्यांना किती कठीण निर्णय घ्यावे लागतात याची मला जाणीव आहे. विशेषतः युद्धप्रसंगात अशी कठीण वेळ नेत्यांवर येते’ असं बराक ओबामा म्हणाले.
पदावर असताना हिरोशिमा दौऱ्यावर जाणारे ओबामा हे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. हिरोशिमावर 6 ऑगस्ट 1945 रोजी अणूबॉम्ब टाकण्यात आला होता. त्यात सुमारे 1 लाख 40 हजार नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र या अणूहल्ल्याचे दुरगामी परिणाम अनेक पिढ्यांवर पाहायला मिळाले. किरणोत्साराचे परिणाम अनेक आठवडे, महिने, वर्ष जपानी नागरिकांना भोगावे लागले.
त्यानंतर नागासाकीवर तीन दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्टला अणूबॉम्ब टाकला. यात 74 हजार नागरिकांचा बळी गेला होता.
======================================
जयललितांना सहाव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
चेन्नई : तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या जयललिता आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. जयललिता या सहाव्यांदा मुख्यमंत्रिपद भूषवणार असून सहाव्यांदा या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री आहेत.
मद्रास विद्यापीठाच्या प्रांगणात राज्यपाल डॉ. के. रोसैया जयललिता यांना मुख्यमंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. यावेळी ‘अम्मां’सोबत त्यांच्या 28 कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होईल. यावेळी कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येणार असून काही केंद्रीय मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर पक्षांचे मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाने 232 पैकी 134 जागांवर विजय मिळवला होता. तामिळनाडूत यापूर्वी सलग दोनवेळा कोणत्याही सरकारने सत्ता स्थापन केली नव्हती. मात्र जयललितांनी हा इतिहास बदलला आहे.

लॅपटॉप चार्जरनं घेतला युवकाचा बळी
नवी दिल्ली: लॅपटॉप चार्ज करताना काम करणं दिल्लीतल्या एका युवकाच्या जीवावरच बेतलं. लॅपटॉप चार्ज करताना लॅपटॉपवर काम करत असलेल्या ब्रजेशला करंट लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत पावलेला ब्रजेश हा एक्सपोर्ट कंपनीत मॅनेजर म्हणून काम पाहात होता.
विशेष म्हणजे अडीच महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. पोलिसांनी घटनास्थळावरून लॅपटॉप ताब्यात घेतला असून ब्रजेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रजेश लॅपटॉपवर काम करत होता. त्यावेळी त्यानं लॅपटॉप चार्ज व्हावा म्हणून चार्जरही चालू ठेवलं होतं. मात्र, त्याला अचानक शॉक लागला आणि तो बेशुद्ध झाला. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखलही केलं. मात्र, तिथं त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
======================================
अवघ्या दहा वर्षाच्या मुलाकडून मेव्हण्याची हत्या
वसई: वसईमध्ये अवघ्या दहा वर्षाच्या लहानग्यानं आपल्या सख्या मेव्हण्याला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या बहिणीला मारत असताना प्रतिकार करण्यास गेलेल्या या चिमुरडयानं घरातील चाकूने त्याच्यावर वार केला आणि नेमका तो वार त्याच्या वर्मी बसला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
सागर मनोहर उमरखाने असं या ३५ वर्षीय मयत इसमाच नाव आहे. तो पत्नी लता आणि चार मुलांबरोबर गुजरातमध्ये राहत होता. सागरच्या दारू पिऊन मारहाणीच्या स्वभावाला वैतागून, लता आपल्या माहेरी वसईच्या वाघरी पाडा येथे आपल्या वडीलांकडे आली होती.
रविवारी दुपारी ती घरी असताना, दारूच्या नशेत सागर तेथे आला आणि लताला मारहाण करु लागला. त्याला प्रतिकार करण्यासाठी लताचा दहा वर्षाचा भाऊ समोर आला. त्यालाही सागरने गळा दाबून मारण्यास सुरूवात केली. त्याचवेळी लताच्या भावाने भांडयातील चाकू घेतला आणि सागरच्या छातीवर आघात केला. तोच एक घाव सागरच्या वर्मी बसला. सागर रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून, अल्पवयीन मुलाला सध्या ताब्यात घेतलं आहे.
======================================
अभिनेत्री आणि भाजप नेत्या रुपा गांगुली यांच्यावर हल्ला
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता हल्ल्यांचे सत्र सुरु झाले आहे. भाजप नेत्या आणि अभिनेत्री रुपा गांगुली यांच्यावर हल्ला झाला आहे. गांगुली यांच्या डोक्याला जखम झाली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या सुखरुप असल्याची माहिती मिळते आहे.
19 मे रोजी पश्चिम बंगाल निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सत्ताधारी टीएमसी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हा दुसरा मोठा हल्ला आहे.
दक्षिण 24 परगनाहून काकदीपहून परतत असताना रुपा गांगुली यांच्यावर हल्ला झाला. निवडणुकीच्या निकालानंतर राजयकीय हिंसेत जखमी झालेल्यांना भेटण्यासाठी रुपा गांगुली गेल्या होत्या. तिथून परतत असताना हा हल्ला झाला.
रुपा गांगुली या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत हावडा (उत्तर) विधानसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार होत्या. मात्र, टीएमसीच्या लक्ष्मी रत्न शुक्ला यांचा त्यांना निवडणुकीत सामना करावा लागला.
रुपा गांगुली यांच्यावरील हल्ल्याविरोधात भाजप पश्चिम बंगालमध्ये निदर्शनं करणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या शपथविधी सोहळ्यावर भाजप बहिष्कार टाकण्याचीही शक्यता आहे.
======================================
किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती
नवी दिल्ली : माजी आयपीएस अधिकारी आणि भाजप नेत्या किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
किरण बेदी यांनी तीस वर्षांहून अधिक काळ पोलिस दलात काम केलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यानंतर किरण बेदी यांनी राजकारणात प्रवेश केला.
======================================
जळगावात 'दुपट्टा गँग'चा धुमाकूळ, चोरट्या महिला सीसीटीव्हीत कैद
जळगाव : जळगावात महिला चोरट्यांची टोळी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावरील एका कापडाच्या दुकानातून या टोळीनं हात साफ केला.
या महिला टोळीची चोरी करण्याची खास पद्धतही समोर आली आहे. रस्त्यावरील नागरिकांचे लक्ष जावू नये यासाठी चोरट्या महिलांनी शटरसमोर शाल आडवी धरली. त्यांच्या आडोशाला बसलेल्या दोन महिलांनी दुकानाचे शटर उचकवले. त्यानंतर एकीनं या दुकानात प्रवेश केला आणि 62 हजारांचा ऐवज लंपास केला.
महिला चोरट्यानं दुकानाच्या आत बॅटरी लावल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसून आलं आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
======================================
९५२ किलो कांद्याची पट्टी १ रुपया!
- पुणे / चाकण : रात्रं-दिवस काबाडकष्ट करून काळ्या मातीतून सोनं उगवणाऱ्या शेतकऱ्याची सध्या अवहेलना होताना दिसत आहे. शिरूर तालुक्यातील एका शेतकऱ्याला ९५२ किलो कांदा विकून फक्त १ रुपया हातात पडला आहे. कांद्याची पट्टी पाहून हा बळीराजा कोसळून गेला असून, स्वत:च्या नशिबाला दोष देत आहे. आता शेतातील कांद्याला ‘कुणी भाव देता का भाव...’ असे म्हणण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही.मारुती परभाणे असे या शेतकऱ्याचे नाव. शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई या गावात त्यांची शेती आहे. त्यांनी चार एकर शेतात कांद्याची लागवड केली आहे. त्यापैकी १० गुंठा शेतातून त्यांनी विक्रीसाठी कांदा काढला. त्यांनी एका टेम्पोमधून दि.१० मे रोजी गुलटेकडी मार्केट यार्डातील पल्लवी ट्रेडिंग कंपनी या आडतदाराकडे कांदा विक्रीसाठी पाठविला होता.मध्यम प्रतीचा एकूण १८ गोणी कांदा होता. त्याचे एकूण वजन ९५२ किलो इतके भरले. या कांद्याला प्रति १० किलोस केवळ १६ रुपये भाव मिळाला. म्हणजेच प्रतिकिलोस १ रुपया ६० पैसे भावाने त्यांच्या कांद्याची विक्री झाली. या मालाची एकूण रक्कम १५२३ रुपये २० पैसे इतकी झाली. त्यामधून आडत ९१ रुपये ३५ पैसे, हमाली ५९ रुपये, भराई १८ रुपये ५५ पैसे, तोलाई ३३ रुपये ३० पैसे तर मोटारभाडे १३२० रुपये असा एकूण १५२२.२० रुपये पट्टीतून कपात करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती फक्त १ रुपया शिल्लक राहिला.परभाणे याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. अनेक शेतकऱ्यांना कांदा किंवा इतर शेतमालाच्या विक्रीतून केलेला खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे.
======================================
दुष्काळाच्या एसटीलाही झळा; २० दिवसांत ४३ कोटींचे उत्पन्न घटले
- सुशांत मोरे, मुंबईराज्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढत असतानाच त्याचा परिणाम एसटीवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. दुष्काळामुळे २0१६मध्ये सुरुवातीच्या तीन महिन्यांत उत्पन्न बुडाल्यानंतर एप्रिल महिन्यात लग्नसराईमुळे एसटी महामंडळाला थोडाफार दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा एकदा दुष्काळाची झळ वाढली असून, मे महिन्याच्या २० दिवसांत ४३ कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाले आहे. अशीच परिस्थिती जूनपर्यंत राहिली तर १00 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.दुष्काळी परिस्थिती खूपच तीव्र झाली असून, पाण्याअभावी शहरी तसेच ग्रामीण भागातील लोक त्रस्त झाले आहेत. त्याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावरच होत आहे. दुष्काळामुळे अनेक जण स्थानिक पातळीसह लांब पल्ल्यावरचा प्रवासही टाळत आहेत. प्रवास टाळत असल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसत असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसून येत आहे. मागील वर्षीच्या १ ते २0 मेपर्यंत भारमान हे जवळपास ६५ टक्के एवढे होते. या वर्षीच्या मे महिन्यातील याच दिवसांत भारमान ५९ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तुलना केल्यास जवळपास सहा टक्क्यांनी भारमान घसरले असून, त्यामुळे महामंडळाला मे महिन्यात ४३ कोटी रुपये उत्पन्न कमी मिळाल्याचे एसटी महामंडळातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
======================================
विद्यापीठ उत्तरपत्रिका घोटाळा: ‘टॉपर’चीही चौकशी होणार
- समीर कर्णुक, मुंबईमुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेचे उत्तरपत्रिका घोटाळा प्रकरण ‘टॉपर’ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे. अव्वल स्थान पटकाविलेल्या काही विद्यार्थ्यांनाही उत्तरपत्रिका घरी पुरविण्यात आल्या होत्या, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्यांचाही शोध घेतला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता ‘टॉपर’ विद्यार्थ्यांची यादी बनविली जाणार असून, त्याची सविस्तर माहिती मिळविण्यासाठी स्वतंत्र पथक बनविण्यात येणार असल्याचेही तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना लिहिलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा पूर्ण सोडविण्यासाठी घरी देण्याचे विद्यापीठातील रॅकेट शनिवारी मुलुंड पोलिसांनी उघडकीस आणले. या प्रकरणातील अटक केलेल्या सात कर्मचाऱ्यांकडे स्वतंत्रपणे सविस्तर चौकशी सुरू आहे. तसेच गेल्या ४, ५ वर्षांमध्ये अव्वल स्थान पटकाविणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.
======================================
हिरोशिमा दौ-यात आण्विक हल्ल्याबद्दल माफी मागणार नाही - बराक ओबामा
- ऑनलाइन लोकमतटोकियो, दि. २३ - या महिनाअखेरीस जपानमधल्या हिरोशिमाला भेट देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या दौ-यादरम्यान 'आण्विक हल्ल्या'बद्दल माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुस-या महायुद्धात हिरोशिमावर अमेरिकेने दोनदा अणुबॉम्ब टाकल्यानंतर बराक ओबामा हे हिरोशिमाला भेट देणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष असणार आहेत. मात्र अमेरिकेकडून हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकल्याबाबत ते माफी मागणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.जपानमधील नॅशनल ब्रॉडकास्टर 'एनएचके'ला (NHK) दिलेल्या मुलाखतीदरम्यान ओबामा यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. 'संघर्षाच्या वा युद्धाच्या काळात नेत्यांना अनेक वेळेस अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात याची मला कल्पना आहे. (नेत्यांच्या) या निर्णयांबद्दल प्रश्न उपस्थित करणे आणि सत्य माहिती जाणणे हे इतिहासकारांचे कामच आहे' असे ओबामा यांनी सांगितले.
======================================
तालिबानी नेता अख्तर मन्सूर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार
- वॉशिंग्टन / काबूल : अफगाणिस्तानातील तालिबानी नेता मुल्ला अख्तर मन्सूर (वय साधारण ५०) हा अमेरिकेने पाकिस्तानातील अंतर्गत भागात केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. ही माहिती अफगाणिस्तानच्या गुप्तचर संस्थेने रविवारी जाहीर केली.बंडखोरांसाठी हा मोठा धक्का मानला जातो. युद्धाने त्रस्त झालेल्या अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियेतील मोठा अडथळा मन्सूरच्या मृत्यूमुळे दूर झाला आहे. अफगाणिस्तानच्या सीमेला खेटून असलेल्या अस्वस्थ बलुचिस्तान प्रांतातील अहमद वाल या गावात मन्सूर आणि अन्य एक अतिरेकी शनिवारी वाहनाने गेले असताना अमेरिकेच्या विशेष कारवाई दलांच्या मानवरहित विमानाने (ड्रोन) त्यांना लक्ष्य केले, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मन्सूरवर बलुचिस्तानात खूप जवळून लक्ष ठेवले जात होते, असे अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालकांनी निवेदनात म्हटले. मन्सूर अमेरिकेचे कर्मचारी, अफगाणिस्तानचे नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यासाठी मोठा धोका निर्माण झाला होता, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी म्यानमारची राजधानी नेपिव्दॉ येथे वार्ताहरांशी बोलताना सांगितले. मन्सूरने शांतता वाटाघाटींनाही थेट विरोध केला होता, असेही केरी म्हणाले. अफगाणिस्तानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानचे स्वत:चे सलोख्याचे प्रयत्न हे शांतता निर्माण करण्याचे खात्रीचे मार्ग आहेत ही अमेरिकेची फार पूर्वीपासूनची भूमिका आहे आणि मन्सूर त्याला थेट धोका होता, असे त्यांनी म्हटले. मन्सूरला लक्ष्य करण्याच्या कारवाईला अध्यक्ष बराक ओबामा यांनी परवानगी दिल्यानंतर त्याला लक्ष्य करण्यात आल्याचे पेंटॅगॉनने म्हटले. तालिबानी नेत्यांचा मृत्यू झाल्याच्या खोट्या बातम्या यापूर्वी दिल्या गेल्या होत्या. मुल्ला मन्सूर गेल्या डिसेंबरमध्ये ठार झाला, असे सांगितले गेले होते. तालिबानचा संस्थापक एकाक्ष मुल्ला मुहम्मद ओमर याचे पाकिस्तानात २०१३ मध्ये निधन झाल्यानंतर मन्सूरने जुलै २०१५ मध्ये तालिबानचे नेतृत्व हाती घेतले. मन्सूर हा तालिबानचा नेता होता आणि तो काबूल आणि अफगाणिस्तानातील सरकारी कार्यालयांवर व यंत्रणांवर हल्ले करण्यात सक्रिय होता, असे पेंटॅगॉनचे वृत्तपत्र सचिव पीटर कुक यांनी सांगितले. पाकिस्तानातील अबोटाबादेत २०११ मध्ये अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला अमेरिकेच्या नेव्ही सिल्सने ठार मारल्यानंतर पाकिस्तानातील अंतर्गत भागात अमेरिकेने क्वचित ड्रोन हल्ले केले आहेत. मुल्ला मन्सूरकडे तालिबानचे नेतृत्व आल्यापासून तालिबानने अनेक हल्ले केले. त्यात हजारो अफगाण नागरिक व सुरक्षा दल कर्मचारी, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सैनिक ठार झाले, असे कुक म्हणाले.
======================================
ट्रम्प समर्थकांकडून दहशतवाद्यांना अमेरिकेत येण्याचं निमंत्रण
- ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क, दि. 22- ट्रम्प यांच्या शीख-अमेरिकनं समर्थकांनी टि्वटरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना अमेरिकेत येण्यासाठी निमंत्रण दिलं आहे. मात्र मूळचे भारतीय वंशाचे परिषदेतील प्रतिनिधी रवींद्र भाल्ला यांनी याबाबत ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तुम्हाला अमेरिकन असण्याचा बहुदा अर्थ माहीत नसावा, अशी खोचक टीका भाल्ला यांनी ट्रम्प यांच्यावर केली आहे.रवींद्र भाल्ला हे न्यू जर्सींतल्या होबोकेन या शहरातल्या नगर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी ट्रम्प यांच्या समर्थकांना या कृत्याबाबत टि्वटरच्या माध्यमातूनच चोख प्रत्युत्तर दिलंय. भाल्लांच्या टि्वटनंतर ट्रम्प यांचे समर्थक रॉबर्ट डुबेनेझिकही त्यांच्यावर तुटून पडले आहेत.भाल्ला हे एका नगर परिषदेचे अध्यक्ष असल्याचं ऐकून आम्हाला आश्चर्य वाटतं आहे, असं रॉबर्ट डुबेनेझिक म्हणालेत. भारतीय वंशाचे भाल्ला होबोकेन शहराच्या नगर परिषदेचे अध्यक्ष होऊ शकतात, मग अमेरिकेत येण्यासाठी आपण दहशतवाद्यांना का परवानगी देऊ शकत नाही, असा सवालही रॉबर्ट यांनी केला आहे.
======================================
केबिनमधून धुराचा अलर्ट जारी झाला होता...
- कैरो : इजिप्त एअरचे शुक्रवारी अपघातग्रस्त झालेले विमान कोसळण्यापूर्वी विमानाच्या केबिनमधून धुराचा अलर्ट चालू झाला होता, अशी आता नवीन माहिती उघड झाली आहे. पॅरिसहून कैरोला जाणाऱ्या या विमानात ६६ प्रवासीहोते त्यापैकी कोणीही वाचले जाण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.या दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशांच्या मृतदेहाचे काही भाग, त्यांचे सामान आणि विमानाची आसने मिळाल्यानंतर काही वेळातच ही नवीन माहिती जाहीर झाली. या विमानाचा ब्लॅकबॉक्स मात्र अद्याप सापडला नाही. हवाई उद्योगाची वेबसाईट ‘एव्हिएशन हेरॉल्ड’वर जारी डेटाच्या अनुसार सिग्नल गायब होण्याच्या काही मिनिटे अगोदर शौचालय व विमानाच्या वीज उपकरणातून धूर निघाला होता. एअर क्राफ्ट कम्युनिकेशन्स अॅण्ड रिपोर्टिंग सिस्टिमच्या (एसीएआरएस) उड्डाणासंबंधी डेटातून ही माहिती मिळाली आहे, असे या वेबसाईटने म्हटले आहे.
======================================
मुलाच्या मदतीला धावलेल्या महिलेची भीषण हत्या
- ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २३ - मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून समजवायला धावलेल्या महिलेच्या छातीवर आणि गळळ्यावर चाकूचे घाव घालून शेजारच्या तरुणाने तिची भीषण हत्या केली.रविवारी रात्री १०.४५ वाजता यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. ज्योती पप्पूजी शिंदे (वय ६५) असे मृत महिलेचे नाव असून, आरोपीचे नाव महेंद्र महादेव बिनेकर (वय ३३) आहे. आरोपीच्या हल्ल्यात मृत महिलेचा मुलगा कपिल (वय २६) हाही जबर जखमी झाला. माहिती कळताच यशोधरानगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला अटक केली.
======================================
मोदी सरकारने रद्द केले 1,159 कालबाह्य कायदे
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - नवीन कायदे संमत करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारला एकीकडे संसदेत अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने कालबाह्य झालेले तब्बल 1,159 कायदे अवघ्या दोन वर्षात रद्द केले आहेत, ते ही फारसा गाजावाजा न करता. विशेष म्हणजे आधीच्या सरकारांनी 64 वर्षात कालबाह्य झालेले कायदे रद्द केलेल्याची संख्या 1,301 आहे.अर्थात, विरोधकांचे प्राबल्य असलेल्या राज्यसभेनेही जुनाट कायदे रद्द करण्याच्या बिलास मंजुरी दिली हे महत्त्वाचं. अनेक कायदे तर ब्रिटिशांच्या काळापासून चालत आले होते, आणि नवीन कायदे बनल्यावर त्यांची उपयुक्तता संपली होती. संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात कालबाह्य कायदे रद्द करण्याची दोन विधेयके मंजूर करण्यात आली आणि 1,053 कायदे रद्द झाले. अॅप्रोप्रिएशन अॅक्ट व रिपेलिंग अँड अमेन्डिंग बिल ही दोन विधेयके प्रलंबित असून ती मंजूर झाल्यावर आणखी अनुक्रमे 758 व 295 कायदे रद्द होणार आहेत.अपवादात्मक परिस्थितीत जंगली हत्तींना पकडण्याची व मारण्याची परवानगी, कुष्ठरोग्यांसाठी वैद्यकीय उपचार, मानमरातब देण्याचा अधिकार, लहान मुलांची गुलामगिरी, विदेशी नागरिकांची नेमणूक, कैद्यांच्या देवाणघेवाणीसाठी पाकिस्तानशी करार, बंगाल, आसाम व पंजाबमधली न्यायालये वापरण्याची पद्धत आणि वृत्तपत्रांच्या किमती नियंत्रित करण्याचा अधिकार या संदर्भातले अनेक कायदे मागे घेण्यात आले आहेत.
======================================
सोलापूर- युवक कॉंग्रेसच्या वतीने शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाला ऋषी कपूर यांचे नाव दिले असून, कपूर यांच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. यावेळी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बाबा करगुळे, तिरुपती परकीपंडला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. गांधी कुटुंबीयांबाबत अनुद्गार काढल्याच्या निषेधार्थ सार्वजनिक स्वच्छतागृहाला कपूर यांचे नाव दिले आहे, असे करगुळे यांनी आज (सोमवार) सांगितले.
एकट्या दिल्ली शहरामध्येच गांधी कुटुंबाची 64 ठिकाणांना नावे आहेत, असे चौसष्ट वर्षीय कपूर यांनी ट्विटरवरून सांगत छायाचित्रही शेअर केले होते. देशातील महत्त्वाच्या संस्थांना आणि ठिकाणांना कॉंग्रेस सरकारच्या काळात गांधी परिवारातील सदस्यांची नावे दिल्याबद्दल कपूर यांनी एका पाठोपाठ एक "ट्विट‘ करत कॉंग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला होता. देशासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींची नावे महत्त्वाच्या ठिकाणांना देण्याची मागणीही त्यांनी केली. वांद्रे-वरळी "सी लिंक‘ला लता मंगेशकर किंवा जे. आर. डी. टाटा यांचे नाव द्यावे, असे सांगत "देशाला बापाचा माल समजू नका. जर दिल्लीतील रस्त्यांच्या नावांमध्ये बदल केला जाऊ शकतो, तर गांधी परिवारातील सदस्यांच्या नावाने असलेल्या महत्त्वाच्या संस्था आणि ठिकाणांचेही नामकरण करा. ज्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे, अशा व्यक्तींची नावे महत्त्वाच्या संस्थांना द्या. प्रत्येक ठिकाणाला गांधी परिवारातील व्यक्तीचे नाव देण्यास माझा विरोध असून, याबाबत सर्वांनी विचार करावा,‘ असेही कपूर यांनी म्हटले होते.
फिल्म सिटीला दिलीप कुमार, देव आनंद, अशोक कुमार किंवा अमिताभ बच्चन यांचे नाव द्यावे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला महात्मा गांधी, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे किंवा माझे नाव द्यावे असे वाटते, असे कपूर यांनी ट्विट केले आहे. माझे वडील राज कपूर यांनी कुठल्याही राजकीय व्यक्तीपेक्षा देशासाठी मोठे योगदान दिले आहे, असे सांगायलाही कपूर विसरले नाहीत. कपूर यांच्या तिखट शब्दांतील टीकेनंतर त्यावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. कपूर यांच्याप्रमाणेच देशातील अनेकांना असे वाटते आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केली होती.
सोलापूरमध्ये स्वच्छतागृहाला ऋषी कपूरचे नाव
| |
-

‘इको-फ्रेंडली’ लग्नाची अनोखी ‘अरेंज्ड’ प्रेमकहाणी
पुसद (जि. यवतमाळ) - शेतकरी तरुण कितीही शिकला असो; पण नवरा म्हणून नको गं बाई, ही तर सध्याच्या कॉलेजियन युवतीची थीम. त्यातही आत्महत्यांच्या प्रदेशात राहणारा आणि तरीही हट्टाने शेतीच करणारा तरुण तर नकोच... मात्र, या समजुतीला झिडकारले सपना संगल हिने. स्मार्ट आयआयटीयन असूनही सपनाने जीवनसाथी म्हणून निवडले विधी पदवीधर असूनही शेती करणाऱ्या जयंत नंदापुरे याला. ही अनोखी ‘अरेंज्ड’ प्रेमकहाणी आता शुक्रवारी लग्नगाठीत परिवर्तित होणार आहे.
जिल्ह्यातील लोणी येथील निवृत्त प्राचार्य, आदर्श शिक्षक आणि साहित्यिक द. तु. नंदापुरे यांचा मुलगा जयंत विधी पदवीधर आहे. पण, नोकरीच्या मागे न लागता जयंतने साधे जीवन, काळ्या मातीशी इमान व आत्मप्रतिष्ठेसाठी शेती हेच जीवनमूल्य ठरविले. त्या जीवनमूल्यातूनच ते शेतीत नवनवीन प्रयोग करतात. कमी खर्चाच्या सेंद्रिय शेतीतून भरघोस उत्पादन घेतात. लग्नाचे वय झाल्यानंतर अनेक इंजिनिअर मुलींचे अनेक प्रस्ताव जयंतकडे आले. परंतु, गाव सोडणार नाही, मातीशी नाळ तोडणार नाही. पत्नीनेही मातीच्या घरातच जीवनाची सोबत केली पाहिजे, या त्यांच्या तत्त्वामुळे रेशीमगाठ जुळण्यात अडचण. वय वाढत गेले.
शेतकरी तरुणाच्या गळ्यात ‘आयआयटीयन’ची माळ

हिंदू रक्षणासाठी बजरंग दल घेतय शस्त्रांचे प्रशिक्षण
| |
-
| |
अयोध्या - इतर धर्मांच्या नागरिकांपासून हिंदू धर्माचे संरक्षण करण्यासाठी बजरंग दलाने त्यांच्या सदस्यांना बंदूक, तलवार व लाठ्यांचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे.
उजव्या विचारसरणीची संघटना म्हणून प्रसिद्ध असलेल्या बजरंग दलाने आता हिंदूंच्या संरक्षणासाठी पावले उचलण्यास सुरवात केली. बजरंग दलाचे धार्मिक प्रशिक्षण शिबीर नुकतेच अयोध्येमद्ये पार पडले आहे.
बजरंग दलाने एक शिबिर पार पडल्यानंतर आता पुढील शिबीर 5 जूनला सुल्तानपुर, गोरखपुर, पिलिभित, नोएडा व फतेहपुर येथे आयोजित केले आहे. बजरंग दल ही विश्व हिंदू परिषदेची (विहिंप) युवा संघटना आहे. बजरंग दलावर यापूर्वी धार्मिक भावना भडकाविण्याचे, अल्पसंख्यांकांविरुद्ध हिंसेचे व दंगल भडकवण्याचे आरोप झालेले आहेत.
======================================
थायलंडमध्ये वसतिगृहाला आग; 17 मुलींचा मृत्यू
| |
-
| |
बँकॉक - उत्तर थायलंडमधील विंगपताओ शहरातील एका शाळेच्या वसतिगृहाला रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत 17 मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पोलिस अधिकारी शियांग राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अकराच्या सुमारास वसतिगृहात आग भडकली. या आगीत 17 मुलींचा जागीच मृत्यु झाला आहे, तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे.
एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेकडून हे वसतिगृह चालविण्यात येते. याला सरकारी मदत मिळत नाही. त्यामुळे याठिकाणी सोईसुविधांची वानवा आहे. 13 वर्षांखालील मुलीं या वसतिगृहात राहत होत्या.
======================================
पाण्याच्या टाकीवर रात्रीचे तीन तास!
| |
-
| |
नगरसेवकाने अधिकाऱ्याला ठेवले डांबून; कुटुंबीय भयभीत, ‘सातारी तऱ्हे’मुळे अधिकारी रजेवर
सातारा - पाण्याच्या टाकीतून वाहणारे पाणी थांबविले जात नाही म्हणून एका नगरसेवकाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रमुख अधिकाऱ्याला टाकीवर रात्री ११ ते एक असे तीन तास डांबून ठेवले. अखेर कुटुंबातील सदस्य आणि पोलिस आले त्या वेळी या अधिकाऱ्याची टाकीवरून सुटका झाली. नगरसेवक आणि त्याच्यासोबतच्या टोळक्यामुळे भयभीत अधिकाऱ्याची घाबरगुंडी उडाली. साताऱ्यात नव्यानेच बदलून आलेल्या या अधिकाऱ्याला ‘सातारी तऱ्हे’चा अनुभव मिळाल्याने त्याने आता चक्क १५ दिवसांची रजा ठोकली आहे.
गोडोली परिसरातील जिजामाता उद्यानाजवळील पाण्याची टाकी बुधवारी भरून वाहत होती. ‘ओव्हरफ्लो’ झालेले पाणी बंद करावे, म्हणून तेथील नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात दूरध्वनी केले. माणूस पाठवून देतो, असे सांगण्यात आले. तोपर्यंत तिथे ५०- ६० लोक जमा झाले. नगरसेवक दत्तात्रय बनकरही तिथे आले. त्यांनीही दूरध्वनी केला. पिण्याचे पाणी वाया जात असल्यामुळे लोक संताप व्यक्त करीत होते.

रायपूर - ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलर्ससारख्या प्रतिभावंत खेळाडूंची प्रत्येक संघाला गरज आहे. माझी इच्छा आहे की, या दोघांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारायला हवे, अशी गमतीशीर प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली आहे.
गेल, डिव्हिलर्सला द्या भारतीय नागरिकत्व-कोहली
| |
-
| |
आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळविले आहे. गुणतालिकेत बंगळूरचा संघ दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. संघाच्या या वाटचालीत विराट कोहलीचा वाटा मोठा आहे. त्याने 14 सामन्यांमध्ये 900 हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये चार शतकेही झळकाविली आहेत. बंगळूरच्या संघात कोहलीसह गेल, डिव्हिलर्स, वॉट्सन या जबरदस्त खेळाडूंचा भरणा आहे.
======================================
कोचीत नौदल तळावर आढळला जवानाचा मृतदेह
| |
-
| |
कोची - कोचीतील भारतीय नौदलाच्या तळावर आज (सोमवार) सकाळी एका जवानाचा बंदुकीतून गोळ्या घातल्याच्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.
नौदलाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, नौदलात संरक्षण सुरक्षा पथकात (डीएससी) काम करणारे जवान के. शिवदासन यांचा मृतदेह आढळून आला आहे. ते कोचीतील नौदल तळावरील शस्त्रास्त्रांच्या साठ्याजवळ कार्यरत होते. त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा शोध घेण्यात येत आहे.
शिवदासन यांच्या मृत्यूप्रकरणी हार्बर टर्मिनन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते मुळचे थिरुसूर येथील रहिवासी असून, त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली आहेत.
======================================
======================================
======================================

No comments:
Post a Comment