[अंतरराष्ट्रीय]
१- ढाका; बांगलादेशातील ‘जमात’ प्रमुखाचा मृत्युदंड कायम
२- वॉशिंग्टन; ISISविरोधात ओबामांनी पुकारलेलं युद्ध बेकायदेशीर, अमेरिकन आर्मी कॅप्टनचा दावा
३- दक्षिण चीन सागरात चीनचा लष्करी सराव
४- लंडन मुस्लिम महापौर निवडणार ?, विरोधकांकडून मोदींच्या नावाचा वापर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- दिल्लीत काँग्रेसचा एल्गार, संसदेवर 'लोकशाही बचाव' मोर्चा
६- जनताच मोदी सरकारला पाणी पाजेल, सोनियांचा हल्लाबोल
७- मोदींनी लोकशाहीची हत्या केली; मोदींच्या राज्यात सारेच त्रस्त - सोनिया गांधी
८- दागिन्यांवरील अबकारी कर मागे घेणार नाही - जेटली
९- मोदी सरकारला कमजोर करण्यासाठी दाऊदचा मास्टर प्लान
१०- मिजासखोर आयएएस ऑफिसरवर सोशल मीडियातून टीका
११- 73 टक्के भारतीय प्रमोशनच्या अपेक्षेवर
१२- लखनऊ; साक्षी महाराजांसमोर मुलीला काढायला लावली जीन्स
१३- पंतप्रधानांच्या विदेश दौऱयावर 117 कोटी खर्च
१४- प्रवास भत्त्याचा पुरावा बंधनकारक
१५- अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचे आदेश
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१६- महाराष्ट्रात परराज्यातील बीफ विक्रीला परवानगी
१७- सिंगरौली; स्वच्छतागृहाचं काम फोटोशॉपवरुन, घोटाळेबाजाला अनोखी शिक्षा
१८- जैन यांच्याविरुद्धचा खटला मागे
१९- मुंबई पोलिसांना आठ तासांची ड्युटी?
२०- जाहिरातीतील उत्पादनांचा पुरवठा करा!
२१- गुजरातः भाजपच्या आमदाराला 3 महिन्यांची कैद
२२- पटना; लालूंना सीबीआयसमोर हजर राहण्याचे आदेश
२३- जयललितांच्या जाहीरनाम्यात आकर्षणांची बरसात!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२४- पणजी; अल्पवयीन मुलीची खरेदी करुन बलात्कार, आमदाराला अटक
२५- बीड; पंकजा मुंडेंच्या फोटोमुळे हरवलेला चिमुकला सापडला
२६- मुंबईच्या गोवंडीतील भीषण आग आटोक्यात
२७- पुणे; पुण्यात कॅनॉलच्या पाण्यात बुडून चिमुरड्या भावंडांचा मृत्यू
२८- धुळे; मंडपात अवतरली प्रेयसी!
२९- चंडीगड; न्यायालयाची अधिका-याला 5 हजार झाडे लावण्याची शिक्षा
३०- कुरकुंभ; दुष्काळातही भरतो रासायनिक सांडपाण्याचा तलाव
३१- सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या आईचे निधन
३२- चंद्रपूर; स्टेचरवरून बॅंकेत पोहोचला आजारी ग्राहक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३३- 5 मिनिटं चार्ज करा, 3.5 तास वापरा, Le 1s स्मार्टफोनचा 12 मे रोजी फ्लॅश सेल
३४- होंडा डियोचं नवं मॉडेल, किंमत फक्त...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३५- १०,३९९ विद्यार्थ्यांनी दिली एमएचटी-सीईटीची परीक्षा
३६- देगलूरमध्ये वाळूची १३ वाहने ताब्यात
३७- निवघा बाजार परिसरात जोरदार अवकाळी पाऊस
३८- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत द्या - अशोकराव चव्हाण
३९- देगाव येथील दलितांवर बहिष्कार; गावाला छावणीचे स्वरूप
४०- एप्रिल महिन्यात मनपाला मालमता करातून दीड कोटींची वसुली
४१- नांदेड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त के.बी. उपाम लवकरच पदभार स्वीकारणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले
{ विशाल राठोड, नमस्कार लाईव्ह }
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
नरेंद्र गडप्पा, बालासाहेब देशमुख, दिलीप वरवते, रंगराव जाधव, सतीश पवळे, करण चार्केवाद, ज्ञानेश्वर गुडे, पिंटू देशमुख, संदीप मुगटकर, दत्तकुमार धुतडे, चंद्रकांत चव्हाण, मधुकर वानखेडे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
============================================

तर दुसरीकडे हरवलेला सुशील स्थानकाबाहेर आला. पण काहीच न कळाल्याने चिमुकला सुशील नरसी नायगावकडे जाणाऱ्या वडापमध्ये बसला. नरसी नायगाव इथे सर्व प्रवासी उतरले, पण सुशील एकटाच राहिल्याने चालकाने त्याची चौकशी केली. परंतु त्याला काहीच बोलता न आल्याने चालकही हतबल झाला. शेवटी त्याने सुशीलला पोलिसांच्या हाती सुपूर्द केलं.

छत्तीसगडमध्ये 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. जगदिश सोनकर एका सरकारी रुग्णालयात रुटिन इन्स्पेक्शनसाठी गेले होते. सोनकर यांच्याकडे वैद्यकीय पदवी आहे. यावेळी कुपोषित बालकांच्या आईंची भेट घेत असताना डावा पाय त्यांनी बेडच्या स्टील रेलिंगवर ठेवला होता.

मात्र सीईओंना ही फसवणूक लक्षात येताच त्यांचा पारा चांगलाच चढला.रामसुभग यांनी ग्राम पंचायतीच्या स्वच्छतागृहांचं, त्यात वॉश बेसिन आणि नळ बसवल्याचं भासवण्यासाठी फोटोशॉपच्या मदतीने एडिटिंग केलं आणि बिलं पास करुन घेण्यासाठी त्याचे फोटो सादर केले. मात्र जिल्हा पंचायतीच्या सीईओ निधी निवेदिता यांनी ही गोष्ट हेरली. त्यांनी तात्काळ याची खातरजमा करण्यासाठी स्वच्छतागृहाची पडताळणी केली आणि सचिवांचं पितळ उघडं पडलं.
काम न झाल्याचं आणि विशेष म्हणजे फसवणूक केल्याचं लक्षात येताच सीईओ मॅडम संतापल्या आणि त्यांनी तत्क्षणी उठाबशा काढण्याची शिक्षा सचिवाला सुनावली. सचिव रामसुभग सिंह यांनीही चूक कबूल करत उठाबशा काढल्या. यावेळी अधिकाऱ्यांसह गावकरीही
उपस्थित होते.
ग्राम पंचायतींमधील 16 स्वच्छतागृहांच्या कामासाठी प्रत्येकी 12 हजार रुपयांची कामं प्रस्तावित होती. स्वच्छतागृह बांधली गेली, मात्र त्यात नळ आणि वॉश बेसिन बसवण्यात टाळाटाळ केली. तूर्तास या कामांचं पेमेंट रोखण्यात आलं आहे.

10 वर्षांचा कृष्णा बाळू धांडे आणि 8 वर्षांची लक्ष्मी धांडे या चिमुरड्यांचा मृत्यू झाला. या दोघांचे आई-वडील मजुरीचं काम करतात. काल संध्याकाळी चिमुकल्यांच्या पालकांनी मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. त्यानंतर आज सकाळी या दोघांचे मृतदेह खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्यात आढळून आले.
लक्ष्मी आणि कृष्णा दोघंही कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेले असता त्याचवेळी दौंडसाठी पाणी सोडण्यात आलं. अचानक वाढलेल्या पाण्याचा या चिमुरड्यांना अंदाज आला नाही आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला अशी माहिती आहे.
कॅनॉल शेजारी राहणाऱ्या गावांना वस्त्यांवर पाणी सोडण्याची पूर्वसूचना प्रशासनाने दिली होती का, असा सवाल आता विचारला जात आहे.

होंडा डियोच्या नव्या मॉडेलच्या इंजिनमध्ये कंपनीने कोणताही बदल केलेला नाही. यात 10.2 सीसी एअर कूल्ड 4 स्ट्रोक इंजिनचा वापर करण्यात आला आहे. या स्कूटरमध्ये होंडा इको टेक्नॉलॉजीचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे मायलेज वाढण्यास मदत होते.
होंडाचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंह गुलेरिया यांच्या माहितीनुसार हे होंडा डियोचं सहावं मॉडेल आहे. होंडा डियोचं पहिलं मॉडेल 2002 मध्ये लाँच झालं होतं. सध्या या स्कूटर कोलंबिया, मेक्सिको, श्रीलंका आणि नेपाळमध्ये निर्यात केल्या जातात.

जनताच मोदी सरकारला पाणी पाजेल, सोनियांचा हल्लाबोल
नवी दिल्ली : आम्ही संघर्षासाठीच जन्मलो आहे. राष्ट्रासाठी लढणं हे आमचं कर्तव्य आहे. मोदी सरकारने दोन वर्षात देशाचं वाटोळं केलं. काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न सरकार करतंय. लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारसमोर झुकणार नाही. या सरकारच्या अकार्यक्षमतेचा बुरखा फाडा, असं आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलं.
डोक्यावरून पाणी गेल्यावर भारतीय जनता पाणी पाजतेच हा इतिहास आहे, त्यामुळे देशातील जनताच या सरकारला धडा शिकवेल असा हल्ला सोनियांनी चढवला.
नवी दिल्लीत काँग्रेसने मोदी सरकारविरोधात ‘लोकशाही बचाव’ मोर्चा काढला आहे. या मोर्चाला संबोधित करताना सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहन सिंह यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
============================================
अल्पवयीन मुलीची खरेदी करुन बलात्कार, आमदाराला अटक
पणजी : अल्पवयीन मुलीची खरेदी करुन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गोव्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बाबूश मॉन्सेरात यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस मागील काही दिवसांपासून त्यांच्या शोधात होते. आमदार मॉन्सेरात यांनी गुरुवारी पणजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि त्यानंतर त्यांना अटक केली.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात आई-मुलीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 16 वर्षीय तक्रारदार मुलगी मूळची नेपाळची आहे. सावत्र आई आणि आणखी एका महिलेने मला 50 लाख रुपयांत मॉन्सेरात यांना विकल्याचा आरोप मुलीने केला आहे. या प्रकरणी आईविरोधात पणजी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पणजीच्या महिला पोलिस ठाण्यात हे प्रकरण हस्तांतरित करण्यात आलं.
अनेक वेळा मुलीचं लैंगिक शोषण
मार्च महिन्यात मॉन्सेरात यांनी मुलीची खरेदी केली होती. त्यानंतर मॉन्सेरात यांनी त्यांच्या बंगल्यावर मुलीला कैद करुन ठेवलं होतं. धमकी देऊन त्यांनी अनेकदा मुलीचं लैंगिक शोषण केल्याचं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. मॉन्सेरात यांच्यावर बलात्कार करणे, इजा पोहोचवणे, फसवणूक करुन कैदेत ठेवणे, व्यक्तीची खरेदी करुन शोषण करणे या गुन्ह्याअंतर्गत भारतीय दंड विधान, गोवा बाल कायदा आणि बाल लैंगिक शोषणविरोधी कायद्यांतर्गत (POCSO) कलम 376, 328, 342, 370(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
============================================
पंकजा मुंडेंच्या फोटोमुळे हरवलेला चिमुकला सापडला
बीड : राज्याच्या ग्रामविकासमंत्री पकंजा मुंडे यांचा ‘दुष्काळ सेल्फी’ काही दिवसांपूर्वी चांगलाच वादात सापडला होता. पण पंकजा मुंडे यांच्या एका फोटोमुळेच हरवलेला सहा वर्षांचा चिमुकला सापडला.
काय आहे प्रकरण?
परळीच्या भीमनगर भागातील रहिवासी केशव वैजनाथ आदोडे हे पत्नी अर्चना आणि मुलगा सुशीलसह देव दर्शनासाठी चंद्रपूरला गेले होते. परत येताना 30 एप्रिल रोजी नांदेडमध्ये बहिणीकडे पाहुणचार घेतला. त्यानंतर आदोडे दाम्पत्य मुलासह परळीला जाण्यासाठी नांदेड रेल्वे स्थानकावर आले. पण स्थानकावरील गर्दीत सुशील आईचा हात सोडून स्थानकाबाहेर कधी गेला, हे त्यांनाही कळलं नाही. सुशील बेपत्ता झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर आदोडे यांनी रेल्वे पोलिसांना सांगितलं. पण त्याचा कुठेच शोध लागला नाही.
तर दुसरीकडे हरवलेला सुशील स्थानकाबाहेर आला. पण काहीच न कळाल्याने चिमुकला सुशील नरसी नायगावकडे जाणाऱ्या वडापमध्ये बसला. नरसी नायगाव इथे सर्व प्रवासी उतरले, पण सुशील एकटाच राहिल्याने चालकाने त्याची चौकशी केली. परंतु त्याला काहीच बोलता न आल्याने चालकही हतबल झाला. शेवटी त्याने सुशीलला पोलिसांच्या हाती सुपूर्द केलं.
…आणि मुलगा आई वडिलांना भेटला
पंकजा मुंडे 30 एप्रिलला नांदेड दौऱ्यावर होत्या. नायगाव नरसी येथे त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. सुशीलची नजर त्या बॅनरकडे गेली आणि त्याने बॅनरवर असलेल्या पंकजा मुंडे यांच्या फोटोकडे बोट दाखवून मी यांच्या गावचा आहे, असं पोलिसांना सांगितले. त्यानंतर नांदेड पोलिसांनी बीड पोलिसांच्या मदतीने सुशीलला भीमनगरमध्ये त्याच्या आई-वडिलांकडे सुखरुप पोहोचवलं. फक्त पंकजाताई यांच्या फोटोमुळे माझा मुलगा परत मिळाला, अशी प्रतिक्रिया सुशीलच्या वडिलांनी दिली.
============================================
दिल्लीत काँग्रेसचा एल्गार, संसदेवर 'लोकशाही बचाव' मोर्चा
नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचं नाव आल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
भाजप सरकार सूडबुद्धीने वागत असून, लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने दिल्लीत ‘लोकशाही बचाव’ मोर्चा काढला आहे.
काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज संसदेवर मोर्चा काढला. या मोर्चात सोनिया गांधींसह उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह दिग्गज नेते सहभागी होणार आहेत.
इतकंच नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व बडे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.
दुसरीकडे संसदेच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खलनायकाच्या रूपात दाखवणारं एक पोस्टर तयार करुन आपला निषेध व्यक्त केला.
उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा यावेळी निषेध करण्यात आला. तर संसदेतल्या महात्मा गांधींजींच्या पुतळ्यासमोर भाजप खासदारांनीही देशातल्या वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात निदर्शनं केली.
============================================
मुंबईच्या गोवंडीतील भीषण आग आटोक्यात
मुंबई : गोवंडीच्या भीमवाडी झोपडपट्टी परिसरात लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या आणि आठ वॉटर टँकर्सच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
भीमवाडी झोपडपट्टीत पहाटे चारच्या सुमारास आग आली. आगीत 20 ते 30 घरं जळून खाक झाली आहेत. सिलेंडरच्या स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सध्या या परिसरात अग्निशमन दलाचं कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. मात्र चिंचोळी रस्ते आणि धुरामध्ये कामात अडथळा येत आहे.
============================================
मिजासखोर आयएएस ऑफिसरवर सोशल मीडियातून टीका
नवी दिल्ली : हॉस्पिटलमधील महिला रुग्णाची चौकशी करताना एक पाय तिच्या बेडवर ठेवून ऐटीत उभं राहणं एका नवख्या आयएएस अधिकाऱ्याच्या चांगलंच अंगलट आलं आहे. सोशल मीडियावर त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे.
छत्तीसगडमध्ये 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. जगदिश सोनकर एका सरकारी रुग्णालयात रुटिन इन्स्पेक्शनसाठी गेले होते. सोनकर यांच्याकडे वैद्यकीय पदवी आहे. यावेळी कुपोषित बालकांच्या आईंची भेट घेत असताना डावा पाय त्यांनी बेडच्या स्टील रेलिंगवर ठेवला होता.
============================================

5 मिनिटं चार्ज करा, 3.5 तास वापरा, Le 1s स्मार्टफोनचा 12 मे रोजी फ्लॅश सेल
मुंबई : चीनची स्मार्टफोन कंपनी लेईकोने नुकत्याच लॉन्च केलेल्या Le 1s हा स्मार्टफोनने रजिस्ट्रेशनच्या बाबतीत विक्रम केला आहे. 24 तासात तब्बल एक लाख लोकांनी फोनची नोंदणी केली आहे.
कंपनीने हा स्मार्टफोन 3 मे रोजी लॉन्च केला होता. या फोनचा पहिला फ्लॅश सेल 12 मे रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर या फोनची विक्री होईल
Le 1s ची किंमत 10,899 रुपये आहे. मात्र कंपनी सुरुवातीचे 1 लाख हॅण्डसेटची विक्री 9,999 रुपयांना करणार आहे. Le 1s हा एंट्री लेव्हलचा मात्र अतिशय उत्तम फीचर्सने सज्ज असा स्मार्टफोन आहे.
Le 1s स्मार्टफोनचे फीचर्स
स्क्रीन : Le 1s मध्ये 5.5 इंच HD स्क्रीन आहे.
रिझॉल्यूशन : 1080×1920 पिक्सल
प्रोसेसर : 64 बिट ऑक्टा-कोर प्रोसेसर
रॅम : 3 GB रॅम
मेन कॅमेरा : 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
फ्रंट कॅमेरा : 5 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा
मेमरी : 32 GB इंटरनल मेमरी
या स्मार्टफोनमध्ये “मिरर फिंगरप्रिंट सेन्सर” हे खास तंत्रज्ञान देण्यात आलं आहे.
Le 1s स्मार्टफोनमध्ये टाईप सी रिव्हर्सिबल केबलसह फास्ट चार्जिग सुविधा असेल. यामध्ये फोन 5 मिनिटांत एवढा चार्ज होईल की युझर 3.5 तास सहजपणे वापरु शकतो.
मध्ये आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड़, मल्यायम, मराठी, उडिया, पंजाबी, तामिळ आणि तेलुगू अशा दहा भारतीय भाषांना Le 1s हा स्मार्टफोन सपोर्ट करेल.
============================================
स्वच्छतागृहाचं काम फोटोशॉपवरुन, घोटाळेबाजाला अनोखी शिक्षा
सिंगरौली : मध्यप्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यामध्ये घोटाळेबाजांनी पैसे लाटण्याची एक अनोखी पद्धत शोधून काढली आहे. पंचायत सचिव रामसुभग सिंह यांनी बिलं पास करण्यासाठी चक्क फोटोशॉपच्या आधारे स्वच्छतागृहात नळ आणि बेसिन बसवल्याचं काम झाल्याचं दाखवलं.
मात्र सीईओंना ही फसवणूक लक्षात येताच त्यांचा पारा चांगलाच चढला.रामसुभग यांनी ग्राम पंचायतीच्या स्वच्छतागृहांचं, त्यात वॉश बेसिन आणि नळ बसवल्याचं भासवण्यासाठी फोटोशॉपच्या मदतीने एडिटिंग केलं आणि बिलं पास करुन घेण्यासाठी त्याचे फोटो सादर केले. मात्र जिल्हा पंचायतीच्या सीईओ निधी निवेदिता यांनी ही गोष्ट हेरली. त्यांनी तात्काळ याची खातरजमा करण्यासाठी स्वच्छतागृहाची पडताळणी केली आणि सचिवांचं पितळ उघडं पडलं.
काम न झाल्याचं आणि विशेष म्हणजे फसवणूक केल्याचं लक्षात येताच सीईओ मॅडम संतापल्या आणि त्यांनी तत्क्षणी उठाबशा काढण्याची शिक्षा सचिवाला सुनावली. सचिव रामसुभग सिंह यांनीही चूक कबूल करत उठाबशा काढल्या. यावेळी अधिकाऱ्यांसह गावकरीही
उपस्थित होते.
ग्राम पंचायतींमधील 16 स्वच्छतागृहांच्या कामासाठी प्रत्येकी 12 हजार रुपयांची कामं प्रस्तावित होती. स्वच्छतागृह बांधली गेली, मात्र त्यात नळ आणि वॉश बेसिन बसवण्यात टाळाटाळ केली. तूर्तास या कामांचं पेमेंट रोखण्यात आलं आहे.
============================================
पुण्यात कॅनॉलच्या पाण्यात बुडून चिमुरड्या भावंडांचा मृत्यू
पुणे : पुण्यातील घोरपडी परिसरातील बीटी कवडे कॅनॉलमध्ये दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
10 वर्षांचा कृष्णा बाळू धांडे आणि 8 वर्षांची लक्ष्मी धांडे या चिमुरड्यांचा मृत्यू झाला. या दोघांचे आई-वडील मजुरीचं काम करतात. काल संध्याकाळी चिमुकल्यांच्या पालकांनी मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. त्यानंतर आज सकाळी या दोघांचे मृतदेह खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्यात आढळून आले.
लक्ष्मी आणि कृष्णा दोघंही कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेले असता त्याचवेळी दौंडसाठी पाणी सोडण्यात आलं. अचानक वाढलेल्या पाण्याचा या चिमुरड्यांना अंदाज आला नाही आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला अशी माहिती आहे.
कॅनॉल शेजारी राहणाऱ्या गावांना वस्त्यांवर पाणी सोडण्याची पूर्वसूचना प्रशासनाने दिली होती का, असा सवाल आता विचारला जात आहे.
============================================
होंडा डियोचं नवं मॉडेल, किंमत फक्त...
मुंबई : होंडा मोटरसायकलने भारतात होंडा डियो स्कूटरचं नवं मॉडेल सादर केलं आहे. या स्कूटरची दिल्लीत एक्स शोरुम किंमत 48 हजार 246 रुपये आहे.
होंडा डियोच्या नव्या मॉडेलच्या इंजिनमध्ये कंपनीने कोणताही बदल केलेला नाही. यात 10.2 सीसी एअर कूल्ड 4 स्ट्रोक इंजिनचा वापर करण्यात आला आहे. या स्कूटरमध्ये होंडा इको टेक्नॉलॉजीचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे मायलेज वाढण्यास मदत होते.
होंडाचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंह गुलेरिया यांच्या माहितीनुसार हे होंडा डियोचं सहावं मॉडेल आहे. होंडा डियोचं पहिलं मॉडेल 2002 मध्ये लाँच झालं होतं. सध्या या स्कूटर कोलंबिया, मेक्सिको, श्रीलंका आणि नेपाळमध्ये निर्यात केल्या जातात.
============================================
महाराष्ट्रात परराज्यातील बीफ विक्रीला परवानगी
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ६ - बीफ विक्रीवर बंदी घालण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयने झटका दिला आहे. राज्याबाहेरुन आलेल्या बीफ विक्रीला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.महाराष्ट्र सरकारने बीफ बंदीचा कायदा केला होता. तो कायदा न्यायालयाने कायम ठेवला आहे. मात्र राज्यबाहेरुन येणा-या बीफच्या विक्रीला न्यायालयाने परवानगी दिली आहे.महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांमध्ये बीफ विक्रीवर बंदी नाही. त्यामुळे तिथून येणा-या बीफची विक्री करता येईल. बीफ बाळगल्यानंतर सेक्शन ५ डी अंतर्गत होणारी कारवाई न्यायालयाने असंवैधानिक ठरवली आहे.
============================================
मोदी सरकारला कमजोर करण्यासाठी दाऊदचा मास्टर प्लान
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. 06 - देशामध्ये सामाजिक अस्थिरता निर्माण व्हावी, जातीय तणाव वाढावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते तसंच चर्चेवर हल्ले करण्याचा कट भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या 'डी कंपनी'ने आखला होता असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे. डी कंपनीने सामाजिक अस्थिरता निर्माण व्हावी यासाठी आपल्या 10 लोकांवर ही जबाबदारी सोपवली होती. धार्मिक नेत्यांसोबतच संघाचे नेते आणि चर्चेवर हल्ले करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. महत्वाचं म्हणजे 2014मध्ये केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ही कट रचण्यात आला होता. एनआयए या 10 जणांविरोधात लवकरच चार्जशीट दाखल करणार आहे.शिरीष बंगाली आणि प्रग्नेश मिस्त्री यांची हत्या याच कटाचा भाग होती. गुजरातमधील भारुच येथे 2 नोव्हेंबर 2015 ला ही हत्या करण्यात आली होती. डी कंपनीच्या शार्प शुटर्सने ही कामगिरी पुर्ण केली होती. या शार्प शूटर्सना नंतर अटक करण्यात आली होती. 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमनच्या फाशीचा बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याचा दावा त्यांनी तपासात केला होता.
============================================
मोदींनी लोकशाहीची हत्या केली - सोनिया गांधी
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. 06 - मोदी सरकारने दोन वर्षात सगळं उद्ध्वस्त केलं, लोकशाहीची हत्या केली असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वाताखाली 'लोकतंत्र बचाव यात्रा'चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना सोनिया गांधी यांनी ही टीका केली आहे. यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, मनमोहन सिंग यांनीदेखील भाषण करत भाजपा आणि मोदी सरकारवर टीका केली .केंद्र सरकार लोकशाहीची हत्या करत आहेत, गरिबांकडे आणि खासकरुन शेतक-याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वाताखाली 'लोकतंत्र बचाव यात्रा'चं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्च्यासाठी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिल्लीत जमा झाले आहेत.
============================================
जैन यांच्याविरुद्धचा खटला मागे
- पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या विरोधातील बदनामीचा खटला मागे घेतला. त्यामुळे १३ वर्षांनंतर उभयतांमधील न्यायालयीन लढाई संपुष्टात आली.सुरेशदादा जैन यांनी ९ मे २००३ रोजी पत्रकार परिषद घेऊन, अण्णांवर आरोप केले होते. त्यावर हजारे यांनी अॅड़ हर्षद निंबाळकर व अॅड़ मिलिंद पवार यांच्यामार्फत २००३मध्ये पुणे येथील न्यायालयात बदनामीचा फौजदारी खासगी खटला दाखल केला होता. हजारे यांच्या वतीने अॅड़ निंबाळकर यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शीतल एस़ बांगड यांच्या न्यायालयात बदनामीचा खटला मागे घेण्याच्या परवानगीचा अर्ज केला होता.धावपळ न करण्याचा डॉक्टरांचा सल्लाजैन यांनीदेखील आपल्या विरोधातील जळगाव न्यायालयातील बदनामीचा खटला मागे घेतला आहे़ सध्या आपले वय ७८ वर्षे असून, वयोमानपरत्वे अधिक प्रवास किंवा धावपळ न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे़ त्यामुळे आपण हा खटला काढून घेण्याचा निर्णय घेतला, असे हजारे यांनी म्हटले आहे.
============================================
मुंबई पोलिसांना आठ तासांची ड्युटी?
- मुंबई : आठ तासांची ड्युटी असण्याची मुंबई पोलीस दलाची मागणी आता लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. शहर व उपनगरातील काही पोलीस ठाण्यांत प्रायोगिक तत्त्वावर अधिकाऱ्यांना व अंमलदारांना आठ तासांच्या ड्युटीचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास सर्व पोलीस ठाण्यांत ते लागू केले जाईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.अर्थसंकल्प अधिवेशनावेळी एका महिला कॉन्स्टेबलच्या पत्नी यशस्वी पाटील यांनी आपल्या चार वर्षांच्या मुलीसह या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलन केले होते. त्याचप्रमाणे एका पोलीस हवालदाराने केलेल्या अर्जानुसार आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी महिन्याभरापूर्वी पोलिसांना आठ तासांच्या ड्युटीचे नियोजन करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. त्यानुसार अभ्यास करून २४ तासांचे तीन टप्प्यांत वेळापत्रक करून आठ तासांची ड्युटी दिली जात आहे. पोलिसांवरील वाढत्या कामाच्या ताणामुळे प्रत्येक पोलिसाला रोज किमान १२-१३ तास ड्युटी करावी लागत असून, त्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक व्याधीला सामोरे जावे लागत आहे. आठ तासांच्या ड्युटीसाठी सकाळी सात ते दुपारी तीन, दुपारी तीन ते रात्री अकरा व रात्री अकरा ते सकाळी सातपर्यंत, असे त्याचे नियोजन केल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
============================================
मंडपात अवतरली प्रेयसी!
- साक्री (जि. धुळे) : लग्नमंडपात येऊन नवरदेव हा आपला प्रियकर असल्याचा दावा प्रेयसीने केल्यामुळे लग्न मोडलेच. शिवाय, नवरदेवाला नवरीच्या वऱ्हाडींनी चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे वैवाहिक जीवनाचे स्वप्न पाहणाऱ्या नवऱ्या मुलाचे पहिले पाऊल बुधवारी साक्री पोलीस स्टेशनमध्ये पडले. लग्न मोडल्यानंतर यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.साक्री येथील मुलाचे लग्न वसमार येथील मुलीशी ठरले होते. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर बुधवारी विवाहाची तारीख निश्चित झाली होती. लग्न म्हसदी येथील देवीच्या मंदिरात लागणार होते. नवरदेव व नवरीकडचे सर्व नातेवाईक लग्न समारंभाच्या ठिकाणी उपस्थित होते. तेवढ्यात नवरदेवाची मुंबई येथील प्रेयसी मंडपात हजर झाली. नवरदेवाशी माझे संबंध असल्याचे सांगितल्यावर, उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. ही माहिती त्या मुलीने देताच, नवरीकडच्या मंडळींनी नवरदेव मुलाला चांगलाच चोप देण्यास सुरुवात केली, परंतु समाज बांधवांनी मध्यस्ती करून हे प्रकरण शांत केले. त्यानंतर, विवाह रद्द करण्याचा निर्णय घेतला.
============================================
जाहिरातीतील उत्पादनांचा पुरवठा करा!
- - यदु जोशी, मुंबईआदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना ब्रॅण्डेड वस्तूंचा पुरवठा करण्याच्या नावाखाली आदिवासी विकास विभागाने कोणत्या कंपनीची उत्पादने हवीत हे निविदेतच नमूद केले आहे. विशेष म्हणजे, ज्या उत्पादनांची जाहिरात टी.व्ही. अथवा रेडिओवर येते, अशीच उत्पादनेखरेदी करण्याची अजब अटही निविदांमध्ये टाकली आहे.आदिवासी आश्रमशाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना नित्य उपयोगाच्या वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अमरावती, नागपूर, नाशिक, ठाणे या चार आदिवासी विकास विभागांमध्ये सुमारे २८ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.
============================================
73 टक्के भारतीय प्रमोशनच्या अपेक्षेवर
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. 06 - देशातील 73 टक्के कर्मचा-यांना पुढील वर्षी प्रमोशन मिळण्याची अपेक्षा आहे. मायकल पेज इंडियाज जॉब कॉन्फिडन्स इंडेक्सने भारतीय कर्मचा-यांवर केलेल्या सर्व्हेतून ही माहिती समोर आली आहे. 62 टक्के कर्मचारी आपल्या नोकरीवर समाधानी आहेत. सर्व्हेतून आलेल्या माहितीनुसार गेल्या तिमाहीशी तुलना करता कर्मचा-यांचा आत्मविश्वासात खालावला आहे.मध्य आणि वरिष्ठ पदावर कार्यरत असणा-या कर्मचा-यांवर हा सर्व्हे करण्यात आला. 4 मेट्रो शहरांमधील सर्व विविध संस्था आणि क्षेत्रातील एकूण 688 कर्मचा-यांवर हा सर्व्हे करण्यात आला. भारतातील 62 टक्के कर्मचारी आपल्या नोकरीवर समाधानी असून आशिया पॅसिफिकमध्ये हे प्रमाण 54 टक्के आहे. भारतामध्ये बंगळुरुमध्ये यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. बंगळुरुतील 75 टक्के कर्मचारी आपल्या नोकरीत समाधानी आहेत.भारतामध्ये नोकरी शोधण्यासाठी असलेली तीन महत्वाची कारणे नवीन कौशल्य विकास, पगार आणि कामावर चांगल्या सुविधा ही आहेत. 42 टक्के लोकांनी नवीन कौशल्य विकासला प्राधान्य दिलं आहे तर 40 टक्के पगार आणि 39 टक्के लोकांनी कामावरील सुविधांना प्राथमिकता दिली आहे.
============================================
न्यायालयाची अधिका-याला 5 हजार झाडे लावण्याची शिक्षा
- ऑनलाइन लोकमत -चंदिगड, दि. 06 - पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने आपला आदेश न मानणा-या अधिका-याला पाच हजार झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे. प्राथमिक शिक्षण अधिकारी आर एस खारब यांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशांचं पालन न केल्याने न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. राज्यातील शाळांच्या आवारात ही झाडं लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.आर एस खाबर यांनी न्यायालयाने काही चित्रकला शिक्षकांना प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक नेमण्याचे आदेश दिले होते. मात्र खारब यांनी आदेशाचं पालन केलं नाही ज्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त करत ही शिक्षा सुनावली आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीला ही झाडं लावावीत आणि त्याची सविस्तर माहिती न्यायालयात द्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 'सुधारित उपाय करण्यासाठी आदेश दिला आहे. जेणेकरुन अधिका-याला अपली चूक लक्षात यावी', असं न्यायाधीस गगनदीप यांनी सांगितलं आहे.
============================================
साक्षी महाराजांसमोर मुलीला काढायला लावली जीन्स
- ऑनलाइन लोकमत -लखनऊ, दि. 06 - भाजपा खासदार साक्षी महाराज पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. साक्षी महाराजांसमोर तरुण मुलीला जीन्स काढायला लावल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्यानंतर साक्षी महाराजांवर टीकेची झोड उठली आहे. भाजपा कार्यकर्ता मेदान सिंग यांच्या घरी गेले असताना धक्कादायक हा प्रकार घडला आहे.भाजपा कार्यकर्ता मेदान सिंग यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला होता. बेकायदेशीररित्या दारुविक्री सुरु असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी हा छापा टाकला होता. या छाप्यात मेदान सिंग यांच्या कुटुंबातील काही सदस्य जखमी झाले होते. ज्यांची भेट घेण्यासाठी साक्षी महाराज गेले होते. यावेळी साक्षी महाराजांना जखमा दाखवण्यासाठी मुलीला जीन्स काढायला लावण्यात आली. धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा हा प्रकार चालू होता तेव्हा लोक खुप मोठ्या संख्येने उपस्थित होते तसंच कॅमेरेदेखील चालू होते.
============================================
बांगलादेशातील ‘जमात’ प्रमुखाचा मृत्युदंड कायम
- ढाका : १९७१च्या स्वातंत्र्यलढ्यातील युद्धगुन्ह्यांसाठी ठोठावण्यात आलेल्या मृत्युदंडाचे पुनरावलोकन करण्याची मागणी करणारे बांगलादेशातील कट्टरवादी जमात-ए-इस्लामीचा वरिष्ठ नेता मोती-उर-रहमान निजामी याचे अंतिम अपील सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावले. त्यामुळे या नेत्याला धक्का बसला आहे.निजामीने अंतिम अपीलद्वारे या शिक्षेचे पुनरावलोकन करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय अपीलीय खंडपीठाने एकाच वाक्यात निर्णय सुनावला. ७२ वर्षांच्या निजामी यांच्या अंतिम अपीलवर निर्णय देताना सरन्यायाधीश म्हणाले, ‘अपील फेटाळण्यात येत आहे.’ मुस्लीम बहुसंख्यांक असलेल्या या देशात सरन्यायाधीशपदापर्यंत पोहोचलेले सिन्हा हे पहिले हिंदू आहेत.हत्या, बलात्कार व कट रचून बुद्धिवाद्यांच्या हत्या केल्या प्रकरणी निजामीला दोषी ठरविण्यात आले असून, त्याची आतापर्यंतची सर्व अपीले फेटाळण्यात आली आहेत. गुरुवारी त्याचे अखेरचे अपीलही फेटाळले गेले. निकालाचे लिखित स्वरूपातील विवरण नंतर जारी केले जाईल, असे न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीदरम्यान निजामीची उपस्थिती आवश्यक नव्हती. जमातच्या प्रमुखास काशीपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्युदंड झालेल्यांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष बराकीत ठेवण्यात आले आहे.
============================================
ISISविरोधात ओबामांनी पुकारलेलं युद्ध बेकायदेशीर, अमेरिकन आर्मी कॅप्टनचा दावा
- ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 5- अमेरिकन आर्मीच्या 28 वर्षीय कॅप्टननं बराक ओबामांविरोधात खटला दाखल केला आहे. आर्मी कॅप्टन स्मिथ यांच्या मते, बराक ओबामांनी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाविरोधात पुकारलेलं युद्ध बेकायदेशीर आहे. त्याला अमेरिकेन काँग्रेसची परवानगी नाही.न्यूयॉर्क टाइम्सच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या आर्मीचे कॅप्टन नथन मिशेल स्मिथ यांनी इसिसविरोधात पुकारलेलं युद्ध कायद्याला धरून नसल्याचं म्हटलं आहे. या मिशनमध्ये अमेरिकन काँग्रेसकडून बराक ओबामांना अधिकार मिळाले नाहीत. तरीही आम्ही इसिसविरोधात जोरदार युद्ध करत आहोत. राष्ट्राध्यक्षांनी काँग्रेसकडून युद्ध अधिकाराच्या ठरावानुसार योग्य त्या परवानग्या घ्याव्यात आणि मग इराक आणि सीरियात इसिससोबत युद्ध पुकारावे, अशी माहिती स्मिथ यांनी कोलंबियातल्या सेशन्स कोर्टात दिली आहे.2012मध्ये अमेरिकन आर्मीकडून त्यांना अफगाणिस्तानही आठ महिने तैनात करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी कुवेतमध्ये इंटेलिजन्स ऑफिसरसह टास्क फोर्सनं राबवलेल्या ऑपरेशनमुळेच इसिसविरोधात आंदोलन करण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे. बराक ओबामांनी इसिसला स्वतःचा शत्रू मानून हे युद्ध पुकारलं आहे. भौगोलिक आणि ऐहिक परिस्थितीचा विचार न करता हे युद्ध पुकारल्याचा युक्तिवाद स्मिथ यांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे.मात्र दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा युद्धासंबंधी अमेरिकन काँग्रेसकडून सर्व परवानगी घेतल्याचं म्हणाले आहेत. अमेरिकेवर 9/11चा दहशतवादी हल्लानंतरच इसिसविरोधात आम्ही मोहीम उघडली आहे, अशी माहिती बराक ओबामांनी दिली आहे. स्मिथचे वकील डेव्हिड रेमस यांनी इसिसविरोधात युद्ध पुकारून बंदी प्रत्यक्षीकरण कायद्याची उल्लंघन केल्याची माहिती कोर्टाला दिली आहे.
============================================
देश-परदेश : दक्षिण चीन सागरात चीनचा लष्करी सराव
- दक्षिण चीन सागरात
चीनचा लष्करी सराव
बीजिंग : चीनने शक्तीप्रदर्शन करीत वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रासह पूर्व हिंद महासागर आणि पश्चिम प्रशांत सागरात लष्करी सराव सुरू केला असून, त्यातअत्याधुनिक युद्धनौका, हेलीकॉप्टर्स आणि विशेष युद्ध सैनिक सहभागी झाले आहेत.
चीनी नौदलाच्या तीन युद्धनौका बुधवारी हैनान प्रांताच्या सान्या येथील बंदरातून रवाना होताच चीनच्या वार्षिक युद्धसरावास प्रारंभ झाला. या तीन युद्धनौकांत क्षेपणास्त्र विनाशक हेफेई, क्षेपणास्त्र फ्रिगेट सान्या आणि रसद पुरवठा करणारे जहाज होंगघु यांचा समावेश असून, क्षेपणास्त्र विनाशक लांझोउ आणि ग्वांगझोउ आणि क्षेपणास्त्र युद्धनौका युलिनही या सरावात सहभागी होतील. या युद्धनौका सध्या दुसर्या एका मोहिमेवर आहेत.
चीन हेलीकॉप्टर आणि विशेष युद्ध सैनिकांना तीन गटात विभागण्यात आले असून, हे गट दक्षिण चीन सागर, पूर्व हिंद महासागर आणि पश्चिम प्रशांत भागात स्वतंत्रपणे युद्धसराव करीत आहेत. युद्धस्थितीतील तत्परता वाढविणे तसेच युद्धनौका, विमान आणि इतर सैन्यांत समन्वय राखण्याचे कौशल्य वाढविणे हा या लष्करी सरावाचा मुख्य उद्देश आहे. चीन जवळपास संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर दावा करतो. तथापि, त्याला व्हिएतनाम, फिलीपीन्स, मलेशिया आणि ब्रुनेई यासारख्या देशांचा आक्षेप आहे.
============================================
दुष्काळातही भरतो रासायनिक सांडपाण्याचा तलाव
कुरकुंभ येथील रासायनिक सांडपाण्याचा प्रश्न गंभीर
कुरकुंभ : दौंड तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याचे तलाव कोरडे पडले असले तरी कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पातून निघणार्या सांडपाण्याचा मात्र सुकाळ दिसत आहे. डोंगरांच्या खालील बाजूस पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेले ताली सांडपाण्यामुळे भरलेली दिसतायेत.
एकीकडे पाण्याची आवश्यकता भासत असताना दुसरीकडे मात्र पाण्याचा झराच वाहतोय, मात्र तो रासायनिक सांडपाण्याचा आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील विविध रासायनिक प्रकल्पातून रासायनिक सांडपाणी प्रक्रिया करून सोडण्यात येत असल्याचे वारंवार सांगण्यात येते; मात्र याठिकाणचे वास्तवअत्यंत वेगळे असून रासायनिक सांडपाण्याचा उपद्रव राजरोसपणे होताना दिसत आहे. मात्र यावर नियंत्रण अथवा उपाय करताना दिसून येत नाही.
रासायनिक प्रकल्पातील बर्याच नामांकित प्रकल्पांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येतो. त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात रासायनिक पदार्थांचे उत्पादन केले जाते; मात्र यामधून निर्माण होणार्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा विचार न करता सर्रासपणे हे पाणी मोकळ्या जागेत अथवा एखाद्या अडचणीच्या ठिकाणी रात्रीअपरात्री सोडण्यात येते. त्यामुळे कुरकुंभ, पांढरेवाडी, मळद व परिसरातील पाणी दूषित झाल्याचे पाहावयास मिळते.

लंडन मुस्लिम महापौर निवडणार ?, विरोधकांकडून मोदींच्या नावाचा वापर
- ऑनलाइन लोकमतलंडन, दि. ५ - लंडनच्या महापौरपदी प्रथमच मुस्लिम व्यक्तीची निवड होऊ शकते. पाकिस्तानी वंशाचे सादीक खान लेबर पक्षाच्या तिकीटावर लंडनच्या महापौरपदाची निवडणूक लढवत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी कंझर्व्हेटीव्ह पक्षाचे उमेदवार झॅक गोल्डस्मिथ हिंदू आणि शिख मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा वापर करत आहेत.इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्समध्ये महापौर, विधिमंडळ आणि संसदीय निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. लंडनच्या महापौरपदाची लढाई सर्वाधिक प्रतिष्ठेची आहे. माजी मानवधिकार कार्यकर्ते आणि २००५ पासून लेबर पक्षाचे खासदार असणारे सादीक खान (४५) या निवडणुकीत बाजी मारतील असा सर्वांचा अंदाज आहे.सादीक खान यांचे वडील बस चालक होते. खान यांनी ही निवडणूक जिंकली तर, युरोपातील सर्वात प्रभावशाली मुस्लिम नेतृत्व म्हणून त्यांचा उदय होणार आहे. माजी पंतप्रधान गॉरडॉन ब्राऊन यांच्या सरकारमध्ये २००९-१० मध्ये सादीक खान वाहतूक मंत्री होते.
============================================
दागिन्यांवरील अबकारी कर मागे घेणार नाही - जेटली
- नवी दिल्ली : सोन्याच्या दागिन्यांवर लावण्यात आलेला एक टक्का अबकारी कर मागे घेण्याची शक्यता अर्थमंत्री अरुण जेटील यांनी गुरुवारी लोकसभेत फेटाळून लावली. त्याचबरोबर, यंदा भाकीत केल्याप्रमाणे पाऊस चांगला झाल्यास भारताचा वृद्धिदर आणखी वाढेल, असे त्यांनी सांगितले.सोन्याच्या दागिन्यांवरील अबकारी कर मागे घेण्याची मागणी सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेने केली होती. अर्थमंत्री म्हणाले की, हा कर द्यावाच लागेल. मात्र, संबंधित व्यावसायिकांचा छळ होणार नाही, याची मी खात्री देतो.वित्त विधेयक-२०१६ वर झालेल्या चर्चेला उत्तर देताना जेटली बोलत होते. हे विधेयक त्यांच्या उत्तरानंतर सभागृहाने संमत केले. २८ फेब्रुवारी रोजी मांडलेल्या वित्त विधेयकात त्यांनी या वेळी काही दुरुस्त्या केल्या. छोट्या करदात्यांना मदत करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी या वेळी उल्लेख केला. काळ्या पैशाबाबत जेटली म्हणाले की, ‘सरकारच्या प्रयत्नामुळे ७१ हजार कोटी रुपयांचा काळा पैसा उघडकीस आला आहे.
============================================
प्रवास भत्त्याचा पुरावा बंधनकारक
- - मनोज गडनीस, मुंबईकंपनीकडून मिळणारा वार्षिक प्रवास भत्त्यांची रक्कम करमुक्त म्हणून क्लेम करायची असल्यास यापुढे संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्या प्रवासाचे पुरावे कंपनीला सादर करावे लागणार आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाने या संदर्भात देशभरातील प्राप्तिकर खात्यांना सुचित केले असून, या पुराव्याची पडताळणी करण्याचे याद्वारे सुचित केले आहे.पगारदार कर्मचाऱ्यांना पगारातील ज्या घटकाद्वारे करामध्ये सूट घेण्याचा लाभ मिळवता येतो, अशा घटकांतून ती सूट मिळविण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, याची यादी केंद्रीय प्रत्यक्ष मंडळाने नुकतीच प्राप्तिकर कार्यालयांना पाठविली आहे. यातील काही नियमांत बदल करण्यात आला आहे. या बदलांनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीकडून मिळणारा प्रवासभत्ता (लीव्ह टॅव्हल अलाऊन्स) क्लेम केला असेल तर त्याला त्या प्रवासाचा पुरावा सादर करावा लागेल. तसेच हा भत्ता क्लेम करण्यासाठी विभागाने ‘१२ बीबी’ हे नवे फॉर्मही सादर केले आहेत. या फॉर्मवर प्रवासाचा सर्व तपशील करदात्याला भरून द्यावा लागेल. हा सादर केल्यावरच त्या कर्मचाऱ्याचा प्रवास भत्ता करमुक्त ठरेल. तसेच, अशा पुराव्यांची बारकाईने पडताळणी करण्याच्या सूचना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्राप्तिकर विभागाला दिल्या आहेत. कर प्रक्रियेत पारदर्शकता येतानाच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलनाचे प्रमाण वाढविणे हा या मागचा मूळ हेतू आहे. या प्रणालीची अंमलबजावणी जेव्हा १०० टक्के होईल, त्यावेळी कर भरणा प्रणाली अधिक सक्षम होईल. याचे कारण म्हणजे, आजच्या घडीला सर्व कर विषयक आणि आर्थिक व्यवहारातील यंत्रणा संगणकाच्या मार्फत जोडल्या गेलेल्या आहेत. ज्यावेळी एखादा कर्मचारी प्रवास भत्त्यासाठी पैसे खर्च करून हॉटेल अथवा वाहनाचे बिल पुरावा म्हणून जोडेल, तेव्हा त्याच व्यवहारावर ज्याला ते पैसे प्राप्त झाले अशा हॉटेल अथवा वाहन कंपनीने त्या व्यवहारावर कर भरणा केला की नाही, याची माहिती देखील कर यंत्रणांना एका क्लिकवर मिळणार आहे. म्हणून कर विषयक प्रत्येक कलम आणि तरतुदी यांचा अभ्यास करत त्याच्या अभिनव पद्धतीने अंमलबजावणी करण्याकडे कर यंत्रणांचा जोर वाढला आहे
============================================
पंतप्रधानांच्या विदेश दौऱयावर 117 कोटी खर्च
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱयावर 2015-16मध्ये एअर इंडियाने 117 कोटी रुपये खर्च केले आहेत. 2014-15 पेक्षा 25 टक्क्यांनी हा खर्च जास्त झाला आहे, अशी माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे.
सेवानिवृत्त अधिकारी लोश बत्रा यांनी पंतप्रधानांच्या विदेश दौऱयावर झालेल्या खर्चाबाबतची माहिती अधिकारातून माहिती विचारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 ते डिसेंबर 2016 पर्यंत 22 देशांचे दौरे केले आहेत.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या विदेश दौऱयावर 2013-14 मध्ये 108 कोटी रुपये खर्च झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2015 मध्ये फ्रान्स, कॅनडा व जर्मनी या देशांचा केलेला दौरा सर्वाधिक महागडा ठरला आहे. या दौऱ्यांवर 31 कोटी रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती बत्रा यांना देण्यात आली आहे.
पंतप्रधानांचे महागडे दौरे-
एप्रिल 2015- फ्रान्स, कॅनडा व जर्मनी - 31 कोटी खर्च
2014-15- ऑस्ट्रेलिया, म्यानमार - 22 कोटी खर्च
2015- ब्राझील - 20 कोटी खर्च
चीन, मंगोलिया व कोरिया - 15 कोटी खर्च
उज्बेकिस्तान, कझाकस्तान, रूस, तुर्कस्तान, किर्गिस्तान, व ताजिकिस्तान - 15 कोटी खर्च.
पंतप्रधानांच्या विदेश दौऱयावर 117 कोटी खर्च
सेवानिवृत्त अधिकारी लोश बत्रा यांनी पंतप्रधानांच्या विदेश दौऱयावर झालेल्या खर्चाबाबतची माहिती अधिकारातून माहिती विचारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 ते डिसेंबर 2016 पर्यंत 22 देशांचे दौरे केले आहेत.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या विदेश दौऱयावर 2013-14 मध्ये 108 कोटी रुपये खर्च झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2015 मध्ये फ्रान्स, कॅनडा व जर्मनी या देशांचा केलेला दौरा सर्वाधिक महागडा ठरला आहे. या दौऱ्यांवर 31 कोटी रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती बत्रा यांना देण्यात आली आहे.
पंतप्रधानांचे महागडे दौरे-
एप्रिल 2015- फ्रान्स, कॅनडा व जर्मनी - 31 कोटी खर्च
2014-15- ऑस्ट्रेलिया, म्यानमार - 22 कोटी खर्च
2015- ब्राझील - 20 कोटी खर्च
चीन, मंगोलिया व कोरिया - 15 कोटी खर्च
उज्बेकिस्तान, कझाकस्तान, रूस, तुर्कस्तान, किर्गिस्तान, व ताजिकिस्तान - 15 कोटी खर्च.
============================================
सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या आईचे निधन
लखनौ- सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांची आई छबी रॉय यांचे आज (शुक्रवार) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 95 वर्षांच्या होत्या.
सहारा ग्रुपच्या प्रवक्त्यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छबी रॉय यांचे आज पहाटे 1.34 वाजता निधन झाले. सहारा ग्रुपला त्यांचे मोठे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांचा जन्म बिहार मधील अरारिया जिल्ह्यात झाला आहे.
दरम्यान, सहारामधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सुब्रतो रॉय हे 2013 पासून तिहार कारागृहात आहेत.

मोदींच्या राज्यात सारेच त्रस्त - सोनिया गांधी
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात शेतकरी आणि गरीबांसह सर्वच जण त्रस्त असल्याची टीका कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली.
उत्तराखंडमधील राजकीय अस्थिरता, घटनात्मक संस्थांचे अवमूल्यन, शैक्षणिक संस्थांवरील हल्ले, न्यायालयांना धमक्या देणे, राजकीय विरोधकांना लक्ष्य करणारे ऑगस्ता वेस्टलॅंड प्रकरण याविरुद्ध मोदी सरकारला इशारा देण्यासाठी आयोजित लोकशाही बचाव सभेत गांधी बोलत होत्या. "विरोधकांवर निराधार आरोप करण्याचे सत्र मोदी सरकारने सुरू केले असून आम्ही जागरूक विरोधकाची भूमिका निभावणार आहोत‘, असे गांधी म्हणाल्या. यावेळी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी उपस्थित होते. त्यांनीही "कोठे आहेत अच्छे दिन?‘ म्हणत मोदी सरकारवर कडाडून टीका केली.

गुजरातः भाजपच्या आमदाराला 3 महिन्यांची कैद
अहमदाबाद- भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार राजेंद्रसिंग छावडा यांनी बेदरकारपणे मोटार चालविल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्यांना तीन महिन्यांची कारागृहाची शिक्षा सुनावली आहे.
छावडा यांनी डिसेंबर 2013 मध्ये बेदरकारपणे मोटार चालवून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याचा गुन्हा अजेय पटेल यांनी दाखल केला होता. याप्रकरणी हिम्मतनगर येथील न्यायदंडाधिकारी व्ही. सी. त्रिपाठी यांनी गुरुवारी (ता. 5) निकाल दिला. तीन महिन्यांची कैद व 2600 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. न्यायालयाने गुरुवारीच त्यांना दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
दरम्यान, छावडा यांनी पटेल यांना धडक दिली त्यावेळी ते दारूच्या नशेत असल्याचे तक्रारी म्हटले होते. सन 2012 मध्ये ते कॉंग्रेसचे आमदार होते सन 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

लालूंना सीबीआयसमोर हजर राहण्याचे आदेश
पाटना (बिहार) - चारा गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यासह 31 आरोपींना गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयाने आज (शुक्रवार) हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
1994 ते 1996 दरम्यान पशुसंवर्धन विभागाकडून बेकायदेशीररित्या 46 लाख रुपये काढून घेण्यात आले होते. या प्रकरणी 2003 मध्ये सीबीआयने 44 जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. यादव यांच्यासह आज बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. चारा गैरव्यवहाराच्या दुसऱ्या एका प्रकरणात यादव आणि मिश्रा हे जामीनावर बाहेर आहेत. चारा गैरव्यवहाराच्या दुसऱ्या प्रकरणात 1990 ते 1997 दरम्यान विविध जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातून जवळपास 1 हजार कोटी रुपये बेकायदेशीररित्या काढून घेण्या तआले, होते. त्यावेळी लालूप्रसाद यादव हे बिहारचे मुख्यमंत्री होते.
लालूंना सीबीआयसमोर हजर राहण्याचे आदेश
1994 ते 1996 दरम्यान पशुसंवर्धन विभागाकडून बेकायदेशीररित्या 46 लाख रुपये काढून घेण्यात आले होते. या प्रकरणी 2003 मध्ये सीबीआयने 44 जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. यादव यांच्यासह आज बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. चारा गैरव्यवहाराच्या दुसऱ्या एका प्रकरणात यादव आणि मिश्रा हे जामीनावर बाहेर आहेत. चारा गैरव्यवहाराच्या दुसऱ्या प्रकरणात 1990 ते 1997 दरम्यान विविध जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातून जवळपास 1 हजार कोटी रुपये बेकायदेशीररित्या काढून घेण्या तआले, होते. त्यावेळी लालूप्रसाद यादव हे बिहारचे मुख्यमंत्री होते.
============================================
स्टेचरवरून बॅंकेत पोहोचला आजारी ग्राहक
चंद्रपूर - आयुष्याच्या कठीण वळणावर मदत होईल, या आशेने अनेकजण बॅंकेत बचत करीत असतात. आजारी रुग्णांना बॅंकेत येणे शक्य नसल्यास वेळप्रसंगी बॅंक कर्मचारी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रक्कम काढण्यास मदत करीत असतात. मात्र, येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक जवाहर सिंग यांनी रुग्णाला आणल्याशिवाय रक्कम दिली जाणार नसल्याची भूमिका घेतल्याने आजारी रुग्णाला स्टेचरवरून बॅंकेत जाण्याची वेळ आली. या प्रकारामुळे बॅंक व्यवस्थापकाला निलंबित करण्याची मागणी करण्यात येत आहे.
रमेश तानबाजी रासेकर चंद्रपूर महानगरपालिकेत कार्यरत आहेत. येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत त्यांचे बचत खाते आहे. 27 एप्रिलला त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, कुटुंबातील सदस्यांनी पैशाची जुळवाजुळव सुरू केली. वडिलांचे खाते असलेल्या बॅंक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत जाऊन मुलगा अंकुश रासेकर याने व्यवस्थापक जवाहर सिंग यांची भेट घेतली. आजारी असल्याने ते बॅंकेत येऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या खात्यातील रक्कम देण्याची विनंती त्याने केली.

मात्र, जवाहर सिंग यांनी ग्राहकाला आणल्याशिवाय त्यांच्या खात्यातील रक्कम देणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे कुटुंबीय हतबल झाले. याबाबतची माहिती समाजसुधारक फाउंडेशनचे नितीन पोहाणे यांना मिळाली. त्यांच्याही मागणीला सिंग यांनी धुडकावून लावले. अखेर नाइलाजास्तव रमेश रासेकर यांना रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरने बॅंकेत नेण्यात आले. मात्र, यावेळी सिंग बॅंकेतून निघून गेले. सिंग यांच्या वागणुकीमुळे रासेकर कुटुंबीयांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे सिंग यांना निलंबित करावे, अशी मागणी पोहाणे यांनी पत्रकार परिषदेत केली.
============================================
अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचे आदेश
नवी दिल्ली - महसूल विभागातील 33 अकार्यक्षम वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुदतपूर्वीच निवृत्त करण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या दोन वर्षांत 72 अधिकाऱ्यांना विभागीय आणि शिस्तभंगाच्या कारवाईनंतर निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान एकाच वेळी 33 अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची ही पहिलीच घटना आहे. अकार्यक्षमतेचा नोकरीवर काहीही परिणाम होत नसल्याच्या विचाराला तडा देण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध विभागातील अधिकाऱ्यांबाबत देशभरातून तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे जानेवारीमध्ये मोदींनी सर्व विभागाच्या सचिवांना अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर केंद्राने विविध विभागातील आणि मंत्रालयातील 122 उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची यादी तयार केली.
अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचे आदेश
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या दोन वर्षांत 72 अधिकाऱ्यांना विभागीय आणि शिस्तभंगाच्या कारवाईनंतर निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान एकाच वेळी 33 अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची ही पहिलीच घटना आहे. अकार्यक्षमतेचा नोकरीवर काहीही परिणाम होत नसल्याच्या विचाराला तडा देण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध विभागातील अधिकाऱ्यांबाबत देशभरातून तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे जानेवारीमध्ये मोदींनी सर्व विभागाच्या सचिवांना अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर केंद्राने विविध विभागातील आणि मंत्रालयातील 122 उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची यादी तयार केली.
============================================
जयललितांच्या जाहीरनाम्यात आकर्षणांची बरसात!
चेन्नई - तमिळनाडूमधील 1 कोटी 92 लाख शिधापत्रिकाधारकांना विनामूल्य मोबाईल फोनचे वितरण, नोकरी करणाऱ्या महिलांना दुचाकी वाहन खरेदीसाठी 50 टक्के अनुदान, सार्वजनिक ठिकाणी विनामूल्य वाय-फाय अशा प्रकारच्या आकर्षक घोषणांची बरसात एआयएडीएमकेच्या निवडणूक जाहीरनाम्यात नमूद करण्यात आल्या आहेत.

तमिळनाडूमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एआयएडीएमकेच्या प्रमुख जे. जयललिता यांनी त्यांच्या पक्षाच्या जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, "यावेळी मी तुमच्यासाठी तुमच्या कल्पनेपेक्षाही अधिक करणार आहे‘ असे जाहीर केले. मागील वेळीही त्यांनी अशाच प्रकारचा आकर्षक बाबी जाहीर केल्या होत्या. त्यामध्ये इयत्ता अकरावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विनामूल्य लॅपटॉपचे वितरण केले होते. आता त्यांना विनामूल्य इंटरनेटसेवेचीही घोषणा केली आहे. नवमतदारांना आकर्षित करण्यासाठीच अशा घोषणा करण्यात येत असल्याची चर्चा करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment