नमस्कार लाईव्ह ०४-०५-२०१६ चे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- बीजिंग; हाता-पायाला 31 बोटं असलेल्या बाळाचा जन्म
२- सेंट लुईस; जॉन्सन अँड जॉन्सनला 366 कोटींचा दंड
३- वॉशिंग्टन; टेड क्रुझ यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- जैश-ए-मोहम्मदच्या 12 संशयित अतिरेक्यांना अटक
५- पोलीस कोठडीत २६८ जणांचा अंत
६- पीटर मुखर्जीचं इंद्राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र
७- रेल्वेत पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांना नो एन्ट्री
८- उत्तराखंडमधील ठरावाबाबत शुक्रवारी निर्णय
९- दिल्ली विद्यापीठाकडे नाही इराणींच्या डिग्रीचा पुरावा
१०- पठाणकोटमध्ये सुरक्षेच्या त्रुटी
११- धोक्याची सूचना देणारे मोठे चित्र वापरण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे तंबाखू कंपन्यांना आदेश.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- मोदी सरकार सरड्याप्रमाणे रंग बदलत आहे, उद्धव ठाकरेंची टीका
१३- 'सैराट'लाही पायरसीचं ग्रहण, नागराज मंजुळेंची पोलिसात धाव
१४- ठाणे पोलीस ममता कुलकर्णीच्या घरी
१५- दौंडला पाणी सोडण्याचा अद्याप आदेश नाही
१६- आदर्श इमारत पाडण्याऐवजी तिथे सरकारी कार्यालये करा - संजय राऊत
१७- अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- अपघातानंतर टेम्पोने पेट घेतला, चालकाचा होरपळून मृत्यू
१९- शिवरायांच्या खांद्यावर भाजपा नगरसेविकेचा हात
२०- भोपाळ; मोबाईल चोरणा-या माकडाविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
२१- केरळमध्ये रिक्षात विद्यार्थिनीवर बलात्कार
२२- नागपूर; वळूसाठी तिने दिला तीन वर्षे लढा
२३- 'प्रोजेरिया'ग्रस्त निहाल बिटलाचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- रेकॉर्डब्रेक कमाईच्या दिशेने 'सैराट', चार दिवसात 15 कोटी पार
२५- नागराज मंजुळेच्या 'सैराट'बाबात सई ताम्हणकरचं आवाहन
२६- हाशिम अमला आयपीएलमध्ये या संघाकडून खेळणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
कामावर विश्वास ठेवा, नशिबावर नाही.
देवावर विश्वास ठेवा पण अवलंबून राहू नका.
(शिवाशिष दरोडे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
---------------------------------------------------------------------------

'सैराट'लाही पायरसीचं ग्रहण, नागराज मंजुळेंची पोलिसात धाव
मुंबई : उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावणाऱ्या सैराट सिनेमालाही पायरसीचं ग्रहण लागलं आहे. प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेल्या ‘सैराट’ची कॉपी यू ट्यूबवर लिक झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे यू ट्यूबवर चक्क सेन्सॉर कॉपी अपलोड करण्यात आली होती.
याप्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी थेट पोलिसात धाव घेतली आहे. नागराज मंजुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.
प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद
दरम्यान, हा सिनेमा लिक झाला असला तरी प्रेक्षकांनी ‘सैराट’साठी सिनेमागृहात गर्दी केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून ‘सैराट’ने पहिल्या विकेंडमध्ये म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसात तब्बल 12.20 कोटींचा गल्ला जमवला आहे.
29 एप्रिलला प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ सिनेमात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका आहे. परशा आणि आर्चीच्या संवेदनशील लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी अक्षरशा डोक्यावर घेतलं आहे.
---------------------------------------------------------------------------
रेकॉर्डब्रेक कमाईच्या दिशेने 'सैराट', चार दिवसात 15 कोटी पार
मुंबई : उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावणाऱ्या सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. परशा आणि आर्चीच्या संवेदनशील लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून ‘सैराट’ने पहिल्या चार दिवसात तब्बल 15 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
महत्त्वाचं म्हणजे पहिल्या विकेंडला म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसात तब्बल 12.20 कोटींचा गल्ला जमवला होता. पहिल्या विकेंडला इतकी कमाई करणारा हा मराठीतील पहिला सिनेमा ठरला आहे.
यानंतर सोमवारी या सिनेमाने 2.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
‘सैराट’ने शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 3.80 कोटी आणि रविवारी 4. 85 कोटी आणि सोमवारी 2.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे अवघ्या चार दिवसात सैराटने 15.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
---------------------------------------------------------------------------
अपघातानंतर टेम्पोने पेट घेतला, चालकाचा होरपळून मृत्यू
पुणे : पुण्यात आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. पुणे-बंगलोर एक्स्प्रेसवर आज सकाळी 5.30 च्या सुमारास अपघात झाला.
उड्डाणपुलावर ऑईल सांडल्याने नियंत्रण गमावलेल्या ट्रेलरने एका ट्रकला धडक दिली. या धडकेत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर 20 ते 25 मिनिटांच्या अंतराने तीन गाड्या एकमेकांना धडकल्या. यानंतर दूध वाहून नेणाऱ्या टेम्पोने पेट घेतला. गाडीतून बाहेर पडता न आल्याने चालकाचा होरपळून मृत्यू झाला.
---------------------------------------------------------------------------
नागराज मंजुळेच्या 'सैराट'बाबात सई ताम्हणकरचं आवाहन
मुंबई : उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावणाऱ्या सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. परशा आणि आर्चीच्या संवेदनशील लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून ‘सैराट’ने पहिल्या चार दिवसात तब्बल 15 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
या सिनेमाचं आणि दिग्दर्शक नागराज मंजुळेचं अनेकांनी कौतुक केलं आहे. बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख असलेले दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सैराटचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
Sai
@SaieTamhankar
Actor, Go-Getter, Survivor, Optimist
Mumbai · http://www.facebook.com/officialsai
---------------------------------------------------------------------------
जैश-ए-मोहम्मदच्या 12 संशयित अतिरेक्यांना अटक
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अतिरेकी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या 12 संशयित अतिरेक्यांना ताब्यात घेतलं आहे. दिल्ली आणि जवळपासच्या राज्यातून छापा टाकून या 12 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
या 12 संशयित अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणात आयईडीचा साठाही पोलिसांनी जप्त केला आहे.
दिल्ली-एनसीआरच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचे संशयित अतिरेकी घुसले आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी महिन्याभरापूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला माहिती दिली होती.
या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी छापासत्र सुरु केलं, ज्यात 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेण्यात आलेले संशयितांचा राजधानीत घातपात करायचा डाव होता का, याचा तपास पोलिस करत आहेत.
हल्ल्याची शक्यता पाहता दिल्ली आणि जवळच्या भागात अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे दिल्लीत सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
---------------------------------------------------------------------------
हाता-पायाला 31 बोटं असलेल्या बाळाचा जन्म
बीजिंग : सर्वसामान्य मनुष्याच्या हाता-पायाला एकूण 20 बोटं असतात. इतकंच नाही तर हाताला किंवा पायाला जास्तीत जास्त 11 किंवा 12 बोटं असणंही सामान्य मानलं जातं. पण तुम्ही अशा मुलाला पाहिलं आहे का ज्याच्या हाता-पायाची 22 किंवा 24 नाही तर तब्बल 31 बोटं आहेत?
चीनच्या शेनजेन शहरात अशा मुलाचा जन्म झाला आहे, ज्याच्या हात आणि पायाच्या बोटांची एकूण संख्या तब्बल 31 आहे.
मुलाच्या हाताला 10 ऐवजी 15 बोटं आहेत. तर त्याच्या पायांना 16 बोटं आहेत. महत्त्वाचं म्हणजे होंगहोंग नावाच्या या तीन महिन्यांच्या बाळाच्या हाताला अंगठा नाही. त्याऐवजी दोन दोन तळहात आहेत.
हा एक दुर्मिळ आजार असून तो एक हजारांमध्ये एकाला होता. पोलिडेक्टिलिज्म असं या आजाराचं नावं आहे. होंग होंग आई-वडिलांसह चीनच्या पिंगजियांग कौंटीमध्ये राहतो. बाळाची आई शेनजेन शहरातील एका कारखान्यात काम करते. तिलाही पोलिडेक्टिलिज्म आजार आहे.
या बाळाचे आई-वडील त्याच्या उपचारासाठी चांगल्या डॉक्टरच्या शोधात आहे. कारण ही शस्त्रक्रिया अतिशय कठीण आहे.
---------------------------------------------------------------------------
हाशिम अमला आयपीएलमध्ये या संघाकडून खेळणार
मुंबई: दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज हाशिम अमला आयपीएलमध्ये पर्दापण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
यंदाच्या मोसमात मुरली विजयच्या किंग्स इलेव्हन पंजाबकडून आपल्याला हशिम अमला खेळताना दिसणार आहे.
पंजाबचा धडाकेबाज फलंदाज शॉन मार्शने दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांमधून माघार घेतली आहे. त्यामुळे शॉन मार्शच्या जागी हशिम अमलाला पंजाबच्या संघात स्थान देण्यात आलं आहे. किंग्स इलेव्हन पंजाबला गेल्या नऊ सामन्यांपैकी केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत.
---------------------------------------------------------------------------
शिवरायांच्या खांद्यावर भाजपा नगरसेविकेचा हात
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. 04 - भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आणि मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालविकास समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवडकर यांच्या एका फोटोमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवून उभ्या असलेला त्यांचा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागला आहे.अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हात ठेवून उभ्या राहिल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. सोबतच लोकसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रचार करणा-या भाजपा पक्षावरही यानिमित्ताने सोशल मिडियावरुन टीका करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत 'छत्रपतींचा आशीर्वाद चलो मोदी के साथ' असा नाराच भाजपाने दिला होता.भाजपा नगरसेविका राजश्री शिरवडकर यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त सायन येथे बालमेळाव्याचे आयोजन केल होते. पाचशेहून अधिक मुलं या कार्यक्रमात सहभागी झाले होते. चित्रकला स्पर्धा आणि विविध कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात आले होते.
---------------------------------------------------------------------------
भोपाळ; मोबाईल चोरणा-या माकडाविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
- ऑनलाइन लोकमत -भोपाळ, दि. 04 - मोबाईल फोन चोरी होण्याच्या घटना ऐकायला मिळणं काही नवीन नाही. भोपाळमध्ये देखील एका महिलेने मोबाईल फोन चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही तक्रार कोणा चोराविरोधात नाही तर एका माकडाविरोधात केली आहे. पार्वती बहरानी असं या महिलेचं नाव आहे.'घरामध्ये काम करत असताना सकाळी 10 च्या सुमारास माकडाने माझा मोबाईल उचलून नेला. मी माकडाचा पाठलाग केला पण त्यांच्या रौद्ररुप पाहून घाबरले आणि मोबाईल तिथेच सोडून आले', असं पार्वती यांनी सांगितलं आहे. 'मोबाईल घेऊन पळ काढण्याआधी हे माकड खुप वेळ घराभोवती फिरत होते. मी पाठलाग केला पण तो व्यर्थ गेला', अशी माहिती पार्वती यांनी पोलिसांना दिली आहे.पार्वती राहत असलेल्या परिसरात माकडांनी लोकांवर हल्ले करणे नेहमीचंच झालं आहे. आम्ही अजून गुन्हा दाखल करुन घेतलेली नाही पण तपास करत आहोत अशी माहिती कोटावली पोलीस ठाण्याचे अधिकारी कमलेंद्र सिंग यांनी सांगितलं आहे.
---------------------------------------------------------------------------
पोलीस कोठडीत २६८ जणांचा अंत
- - जमीर काझी, मुंबईविविध गुन्ह्यांप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या संशयित आरोपींच्या मृत्यूचा आलेख वाढत राहिला आहे. गेल्या सव्वा आठ वर्षांत राज्यातील विविध पोलीस ठाण्यात अथवा कोठडीत असलेल्या तब्बल २६८ जणांचा अंत झाला आहे. या वर्षात मार्च अखेरपर्यत ६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.पोलिसांच्या ताब्यात असताना काहींनी आत्महत्या केली. तर काहींचा तपास अधिकाऱ्यांचा दबाव, मारहाणीमुळे प्रकृती बिघडून त्यांचा शेवट झाला आहे. पोलीस कोठडीतील मृत्यूच्या वाढत्या प्रमाणामुळे जणू ते मृत्यूचे सापळे बनल्याची टीका मानवधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्याला प्रतिबंधासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह विविध उपाययोजना राबविण्यात येत असलेतरी त्याला मर्यादा पडत आहेत. त्याचप्रमाणे याप्रकरणी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) होत असलेल्या तपासाची बहुतांश प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे संशयित आरोपीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास विलंब लागत आहे.एका घरफोडीच्या गुन्ह्यात मुलुंड पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या अमित राठोड या आरोपीने रविवारी मध्यरात्री शौचालयात स्वत:च्या शर्टने गळफास लावून घेतला. त्यापार्श्वभूमीवर आत्तापर्यंत राज्यभरात पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूबाबतचा आढावा घेतला असता ‘लोकमत’च्या हाती ही धक्कादायक आकडेवारी समोर आली.२००८ पासून ते मार्च २०१६ पर्यंत म्हणजे सव्वा वर्षांच्या कालावधीत पोलीस कोठडीत एकूण २६८ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१४ मध्ये ४३ तर २०१५ या वर्षांत ३८ तर या वर्षाच्या मार्चअखेरपर्यत ६ जणांचा अंत झाला आहे.
---------------------------------------------------------------------------
ठाणे पोलीस ममता कुलकर्णीच्या घरी
- - जितेंद्र कालेकर , ठाणेसुमारे २,५०० कोटींच्या इफे ड्रीन साठ्याप्रकरणी ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी ठाणे पोलिसांच्या रडारवर असून त्याची कथित पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्या मुंबईतील तिनही फ्लॅटची मंगळवारी पोलिसांनी झाडाझडती घेतली. मात्र तेथे पोलिसांना कोणीही आढळले नाही. सोने शुद्धीकरणाच्या व्यवसायात येण्यासाठी मनोज जैन आणि विकी गोस्वामीच्या केनियामध्ये बैठका झाल्याचीही माहिती पोलीस सूत्रांनी दिली.एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना ममताने तिच्यासह विकीवरील आरोप फेटाळले असले तरी तिची आणि विकीची चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सत्य बाहेर येणार नसल्याचेही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यासाठीच अमली पदार्थविरोधी पथकातील एक पथक मंगळवारी ममताच्या वर्सोवाच्या आरसी कॉम्पलेक्समधील बि. नं. चार, रुम नं. १०१, २०१ आणि ७०१ या तिनही फ्लॅटमध्ये गेले होते. तेथे ती किंवा तिचा कोणताही प्रतिनिधी पोलिसांना भेटले नाहीत. पोलीस तिथे गेल्यानंतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीच आल्याचे या इमारतीमधील काही पदाधिकाऱ्यांना वाटले.ममताला काही वर्षांपूर्वी अशाच एका प्रकरणात अटक झाली होती. त्यावेळी या आरसी कॉम्पलेक्सची नाहक बदनामी झाली होती. या पथकाने जेंव्हा पोलीस असल्याचे सांगितल्यानंतर काही मंडळींनी काढता पाय घेतला तर काहींनी मोकळेपणाने माहिती देण्यास सुरुवात केली.
---------------------------------------------------------------------------
पीटर मुखर्जीचं इंद्राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. 04 - शीना बोरा हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या पीटर मुखर्जीने आपली पत्नी इंद्राणी मुखर्जीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र पाठवलं आहे. जानेवारी महिन्यात हे पत्र पाठवण्यात आलं होतं. शीना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी मुख्य आरोपी असून सध्या पीटर आणि इंद्राणी दोघेही अटकेत असून कारागृहात शिक्षा भोगत आहेत. अटकेनंतर दोघांनी एकमेकांवर आरोप केले होते. मात्र या पत्रामुळे दोघांमधील स्नेहसंबंध अजूनही टिकून असल्याचं दिसत आहे.पीटर मुखर्जीने 3 जानेवारीला हे पत्र पाठवलं आहे. पीटर मुखर्जीने हे पत्र स्वत: लिहिलं आहे. पीटरच्या या पत्रामुळे आश्चर्यदेखील व्यक्त केलं जात आहे. पीटर मुखर्जीने सुरुवातीपासून आपल्या या हत्या प्रकरणात कोणताही सहभाग नसल्याचा दावा केला आहे. पीटरने जामिनासाठी याचिका केली असून न्यायालयात सुनावणी सुरु आहे.'तुझी निर्दोषतता सिद्ध व्हावी आणि या भयानक अनुभवातून बाहेर पडावीस अशी प्रार्थना करेन', असं पीटरने पत्रात म्हटलं आहे. हत्येप्रकरणी इंद्राणी आणि आपल्यावर सुरु असलेल्या ट्रायलचा दाखला देत पीटरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. न्यायालयात मात्र दोघेही फार कमी वेळा एकमेकांशी बोलताना दिसतात. गेल्याच महिन्यात दोघांनी एकमेकांसोबत मिठाई खाल्ली होती.
---------------------------------------------------------------------------
मोदी सरकार सरड्याप्रमाणे रंग बदलत आहे, उद्धव ठाकरेंची टीका
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. 04 - हुर्रियतप्रकरणी केंद्र सरकारने केलेल्या घूमजावावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात टीका करत नाराजी व्यक्त केली आहे. सरडाही लाजेल असे रंग बदलले जात असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून केली आहे. हुर्रियतप्रकरणी केंद्र सरकारचे हे घूमजाव म्हणजे अयोध्येतील राममंदिर ही बाबरीच होती अशी पलटी मारण्यासारखाच प्रकार आहे. सगळेच कठीण बनले आहे! सरडाही लाजेल असे रंग बदलले जातात तेव्हा हे यांना कसे जमते बुवा असा प्रश्न जनतेला पडतो असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.हुर्रियत आता कश्मीरप्रश्नी पाकिस्तानशी चर्चा करणार आहे व तशी विशेष सवलत केंद्र सरकारने हुर्रियत मंडळींना दिली आहे. उद्या मसूद अझहर, दाऊद इब्राहिम, लख्वीसारख्यांशीही कश्मीरप्रश्नी चर्चा होईल. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न अशा पद्धतीने साजरे होईल असे वाटले नव्हते असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
---------------------------------------------------------------------------
रेल्वेत पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांना नो एन्ट्री
- मुंबई : लोकलमधून किंवा मेल-एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास करताना तृतीयपंथीयांकडून प्रवाशांकडे पैसे मागितले जातात. काही वेळा बळजबरीही केली जाते. यासंदर्भात प्रवाशांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत मध्य पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांना ट्रेनमध्ये ‘नो एन्ट्री’देण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने(आरपीएफ) नियोजन सुरु केले आहे. यासाठी आरपीएफकडून तृतीयपंथीयांच्या प्रमुखालाच भेटून तसे आवाहन करण्यात येणार आहे.मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे म्हणाले की, आम्ही दहा दिवसांपूर्वीच विद्याविहार ते कुर्ला दरम्यान विशेष मोहीम घेवून १३ तृतीयपंथीयांना पकडले होते. यानंतर आता आम्ही वेगळे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहोत व त्यावर कामही सुरु आहे. त्यांच्याकडून ट्रेनमध्ये चढण्यासाठी तसेच उतरण्यासाठी होत असलेल्या स्थानकांच्या वापराची माहीती घेतली जात आहे. ठाणे,कळवा विटावा, कल्याण पत्रीपुल, मस्जिद स्थानक ते परेल, दातिवली या स्थानक आणि हद्दीत त्यांचा वावर अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. मेन लाईनबरोबरच त्यांचा वावर असलेल्या हार्बरवरील स्थानकांचीही माहिती घेत आहोत, असे भालोदे यांनी सांगितले.
---------------------------------------------------------------------------
उत्तराखंडमधील ठरावाबाबत शुक्रवारी निर्णय
उत्तराखंडमधील ठरावाबाबत शुक्रवारी निर्णय
नवी दिल्ली - उत्तराखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठराव घेण्याबाबत शुक्रवारी निर्णय घेऊ, असे केंद्र सरकारने आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी विश्वासदर्शक ठरावाबाबत सूचना मागवून त्याचे विश्लेषण सादर करा, असे आदेश ऍडव्होकेट जनरल यांना दिले होते. आज राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारपर्यंत राष्ट्रपती लागवट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शुक्रवारपर्यंत केंद्र सरकारकडे विश्वासदर्शक ठरावाबाबत निर्णय घेण्याचा वेळ आहे.
उत्तराखंड राज्यातील राष्ट्रपती राजवट रद्द करण्याच्या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. न्या. दीपक मिश्रा आणि न्या. शिवकीर्ती सिंह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. वस्तुस्थिती समजण्यासाठी केंद्र सरकारने न्यायालयाच्या देखरेखीखाली विश्वासदर्शक ठराव घ्यावा, असे न्यायालयाने सांगितले. आज ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी शुक्रवारपर्यंत न्यायालयाकडे वेळ मागितला आहे.
---------------------------------------------------------------------------
दौंडला पाणी सोडण्याचा अद्याप आदेश नाही
दौंडला पाणी सोडण्याचा अद्याप आदेश नाही
पुणे - खडकवासला धरणातून दौंड, इंदापूरसाठी एक टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश अद्याप जिल्हाधिकारी यांच्याकडून काढण्यात आला नसल्याने पाणी सोडण्यात आले नसल्याचे खडकवासला प्रकल्प कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचा आदेश अद्याप काढलेला नाही. त्यामुळे खडकवासला धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले नाही. पाणी सोडण्याची तयारी झाली आहे. जिल्हाधिकारी सौरव राव पुणे ते दौंडपर्यंत कालव्यावरील बंदोबस्ताची पाहणी करणार आहेत. कालव्यातून पाणी चोरी होत आहे का याची देखील पाहणी होणार आहे. त्यानंतर धरणातून कालव्यातून पाणी सोडले जाईल. अशी माहिती पाटबंधारे मधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. दरम्यान, खडकवासला धरणावर पाणी सोडू नये यासाठी आंदोलक येण्याची शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
---------------------------------------------------------------------------
केरळमध्ये रिक्षात विद्यार्थिनीवर बलात्कार
केरळमध्ये रिक्षात विद्यार्थिनीवर बलात्कार
कोची - केरळमधील वारकाला जिल्ह्यातील अयांथी येथे बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीवर रिक्षा चालकाकडून रिक्षामध्येच बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
केरळमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार होण्याची ही सलग दुसरी घटना घडली आहे. मंगळवारी विधीचे शिक्षण घेणाऱ्या एका दलित विद्यार्थिनीचा अमानूष अत्याचार करून बलात्कार करत हत्या केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आता अयांथी येथील ही घटना समोर आली आहे.
या 19 वर्षीय मुलीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ओळखीच्या रिक्षाचालकाच्या रिक्षातून जात असताना त्याने हे कृत्य केले. त्याने आपल्या दोन मित्रांना बोलावून रिक्षातून बळजबरी मला निर्जण ठिकाणी नेले. त्यानंतर त्यांनी हे कृत्य केले. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.
---------------------------------------------------------------------------
वळूसाठी तिने दिला तीन वर्षे लढा
नागपूर - नागपुरातील खासगी गोरक्षण संस्थेला तिने अपघाग्रस्त वळू दान केला. तिचा स्वभावच कनवाळू असल्यामुळे वाचविलेल्या प्राण्यांचा ती सातत्याने मागोवा घेत असते. काही दिवसांनी कळले की वळू गोरक्षणने कोणाला तरी देऊन टाकला. त्या वळूचा मागोवा घेण्यासाठी तिने गोरक्षणचे व्यवस्थापन हादरवून टाकले.
वळूच्या माहितीसाठी गोरक्षणतर्फे तिला तीस लोकांची यादी देण्यात आली. वळूसाठी तिने महाराष्ट्र पिंजून काढला. माहितीच्या अधिकाराअंतर्गत धर्मादाय आयुक्ताकडे माहिती मागवली. शेवटी तो वळू वर्धा येथील जाम या ठिकाणी सुखरूप गवसला. यानंतर खासगी गोरक्षण संस्थेने तिच्याकडून मुक्या प्राण्यांची घेवाण कायमची बंद केली. ही लढवय्यी आहे स्मिता मोरे. लहानपणापासूनच तिला प्राण्यांविषयी अत्यंत जिव्हाळा होता. नुकतेच पारडी येथील गोरक्षणमध्ये तिने सहा गायी दान केल्या. तिने वाचविलेल्या प्रत्येक प्राण्याकडे तिचे लक्ष असते. तिच्या नोंदणीकृत संस्थेत प्रत्येक प्राण्याची कायदेशीर नोंदणी केली जाते.
वळूसाठी तिने दिला तीन वर्षे लढा
वळूच्या माहितीसाठी गोरक्षणतर्फे तिला तीस लोकांची यादी देण्यात आली. वळूसाठी तिने महाराष्ट्र पिंजून काढला. माहितीच्या अधिकाराअंतर्गत धर्मादाय आयुक्ताकडे माहिती मागवली. शेवटी तो वळू वर्धा येथील जाम या ठिकाणी सुखरूप गवसला. यानंतर खासगी गोरक्षण संस्थेने तिच्याकडून मुक्या प्राण्यांची घेवाण कायमची बंद केली. ही लढवय्यी आहे स्मिता मोरे. लहानपणापासूनच तिला प्राण्यांविषयी अत्यंत जिव्हाळा होता. नुकतेच पारडी येथील गोरक्षणमध्ये तिने सहा गायी दान केल्या. तिने वाचविलेल्या प्रत्येक प्राण्याकडे तिचे लक्ष असते. तिच्या नोंदणीकृत संस्थेत प्रत्येक प्राण्याची कायदेशीर नोंदणी केली जाते.
---------------------------------------------------------------------------
सेंट लुईस; जॉन्सन अँड जॉन्सनला 366 कोटींचा दंड
सेंट लुईस - जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या टॅल्क पावडरमुळे महिेलेला अंडाशयाचा कर्करोग झाल्याची दुसरी घटना समोर आली आहे. त्यामुळे कंपनीला सेंट लुईस न्यायालयाने या महिलेला 55 दशलक्ष डॉलरची (366 कोटी रुपये) भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
सेंट लुईस; जॉन्सन अँड जॉन्सनला 366 कोटींचा दंड
अमेरिकेतील साऊथ डकोटा येथील महिलेने अनेक वर्षे जॉन्सन अँड जॉन्सनची टॅल्कम पावडर वापरल्याने अंडाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोप केला आहे. आठ तासांच्या चर्चेनंतर सेंट लुईस न्यायालयाने जॉन्सन अँड जॉन्सलला दंड ठोठावला आहे. कंपनी लवकरच या निर्णयाला आव्हान देणार आहे.
फेब्रुवारी महिन्यातदेखील जॉन्सन बेबी पॉवडरच्या वापरामुळे अलाबामा येथील एका 62 वर्षीय महिलेचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू झाला होता. त्यानंतर कंपनीला महिलेच्या कुटुंबाला 72 दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता. कंपनीच्या विरोधात सध्या अशा प्रकारचे 1200 खटले सुरू आहेत. परंतू कंपनीने न्यायालयाचा निर्णय वैद्यकीय तज्ज्ञांनी 30 वर्षे केलेल्या संशोधनाच्या विरोधातील आहे. तसेच कंपनीची सर्वे उत्पादने वापरासाठी अत्यंत सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
टॅल्क पावडरचा गर्भाशयाच्या कर्करोगाशी संबंध आहे याविषयी 1970 च्या सुमारास संशोधन सुरू झाले. कंपनीलाही या धोक्याची पुर्ण माहिती होती, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
---------------------------------------------------------------------------
'प्रोजेरिया'ग्रस्त निहाल बिटलाचा मृत्यू
मुंबई - ‘प्रोजेरिया‘ या आजाराने ग्रस्त असलेल्या निहाल बिटला या मुलाचा मृत्यू झाला. अमिताभ बच्चन यांनी ‘पा‘ या चित्रपटात ‘प्रोजेरिया‘ग्रस्त मुलाची भूमिका साकारली होती.
'प्रोजेरिया'ग्रस्त निहाल बिटलाचा मृत्यू
भिवंडीत राहणाऱ्या निहाल बिटला याचे तेलंगणमधील त्याच्या वडीलांच्या गावी मृत्यू झाला. ‘प्रोजेरिया‘ आजाराने ग्रासले होते. त्याचे वय 15 असले तरी त्याचे वजन फक्त 12 किलो होते. ‘प्रोजेरिया‘ या आजारावर अद्याप काही उपचार उपलब्ध नाहीत. बॉलिवूड अभिनेता आमीर खान याने नुकतीच निहालची भेट घेत त्याची इच्छा पूर्ण केली होती.
‘प्रोजेरिया‘ या रोगाने जगभरात ग्रस्त असलेल्या 124 मुलांपैकी एक निहाल हा एक होता. चाळीस ते 80 लाख मुलांच्या जन्मानंतर अश्या रोगाने ग्रस्त असलेल्या मुलाचा जन्म होतो. निहाल चार वर्षांचा असताना त्याला ‘प्रोजेरिया‘ असल्याचे समोर आले होते.
---------------------------------------------------------------------------
दिल्ली विद्यापीठाकडे नाही इराणींच्या डिग्रीचा पुरावा
नवी दिल्ली - केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी या त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि प्रतिज्ञापत्रातील विसंगतींमुळे यापूर्वीच चर्चेत होत्या. आता दिल्ली विद्यापीठानेही इराणींच्या शैक्षणिक पात्रतेबद्दलची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.
दिल्ली विद्यापीठाकडे नाही इराणींच्या डिग्रीचा पुरावा
दिल्ली विद्यापीठातील रजिस्टार ओ. पी. तन्वर यांनी न्यायदंडाधिकारी हरविंदर सिंग यांच्यासमोर मंगळवारी न्यायालयात दिलेल्या माहितीत सांगितले की, स्मृती इराणी यांनी 1996 मध्ये दिल्ली विद्यापीठातून बी. ए. ची पदवी घेतल्याची कोणतीही कागदपत्रे मिळालेली नाहीत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. इराणींनी 1993-94 मध्ये बी. कॉम. साठी प्रवेश घेतल्याच्याही कागदपत्रांचा शोध घेण्यात येत आहे.
इराणी यांनी 2004 मध्ये लोकसभा निवडणूक लढविताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून आपण दिल्ली विद्यापीठातून "बी. ए.‘ची पदवी घेतल्याचा दावा केला आहे. 2011 मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी प्रतिज्ञापत्र सादर करताना इराणी यांनी स्वत:ची शैक्षणिक पात्रता बी. कॉम, प्रथम वर्ष अशी नोंदविली आहे. हाच दावा स्मृती इराणी यांनी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला होता. यावरून त्यांनी दोन्ही पदव्यांचे शिक्षण पूर्ण केलेले नाही हे स्पष्ट होते, असा दावा कॉंग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी केला होता. यावरून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने दिल्ली विद्यापीठातील रजिस्टारला माहिती देण्यास सांगितले होते.
---------------------------------------------------------------------------
टेड क्रुझ यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार
टेड क्रुझ यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या प्रायमरी निवडणुकीत इंडियाना राज्यात स्वीकाराव्या लागलेल्या पराभवामुळे रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार टेड क्रुझ यांनी यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव जवळपास निश्चित मानण्यात येत आहे.
इंडियाना राज्यात झालेल्या प्रायमरी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळविला आहे. तर, डेमोक्रॅटिक पक्षाकडून बर्नी सँडर्स यांनी विजय मिळविला. त्यामुळे या ठिकाणी हिलरी क्लिंटन यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. इंडियानामध्ये स्वीकारावा लागलेल्या पराभवामुळे टेड क्रुझ यांनी मंगळवारी रात्री झालेल्या सभेदरम्यान अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. टेक्सासचे सिनेटर असलेले क्रुझ यांचे ट्रम्प यांच्यासमोर आव्हान होते. पण, आता क्रुझ यांच्या माघारीमुळे ट्रम्प यांचा पक्षाकडून अधिकृत उमेदवार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
क्रुझ यांनी इंडियानापोलिस येथे नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, इंडियानातील पराभवामुळे मी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेत आहे. आम्ही आमचे प्रचारअभियान येथेच थांबवत आहोत.
---------------------------------------------------------------------------
पठाणकोटमध्ये सुरक्षेच्या त्रुटी
संसदीय समितीच्या अहवालात ताशेरे
नवी दिल्ली - पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याबद्दल चौकशी करणाऱ्या संसदीय समितीने केंद्रासह सुरक्षा यंत्रणा व पंजाब पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. पाकिस्तानी पथकाला थेट हवाई तळावर आवतण देण्याबद्दलही समितीने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
पी. भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखालील गृह मंत्रालयाच्या संसदीय समितीने आज आपला 97 वा अहवाल संसदेला सादर केला. या समितीत सीताराम येचुरी, विजय गोयल, नीरज शेखर, मल्लिकार्जुन खर्गे, प्रताप जाधव आदी 41 सदस्य होते.
या वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला करून भारताला जणू नववर्षाची भेट दिली होती. तीन दिवस चाललेल्या चकमकीत सात लष्करी अधिकारी हुतात्मा झाले होते. या हल्ल्यामागे पाकिस्तानातील "जैशे महंमद‘ हा दहशतवादी गटच होता व पाकिस्तानी पथकाला थेट या हवाई तळाच्या आतपर्यंत येऊ कसे दिले, असा सवाल समितीने विचारला आहे. अहवालात म्हटले आहे, की आमच्या दहशतवादविरोधी यंत्रणेत निश्चितपणे "अत्यंत गंभीर त्रुटी‘ राहिल्या. अशा हल्ल्याचा इशारा मिळूनही तो रोखण्यात आपण अपयशी ठरलो हे अतर्क्यच आहे. पंजाब पोलिसांची कार्यपद्धती व दहशतवादी ज्यांच्या गाडीतून हवाई तळापर्यंत पोचले त्या पठाणकोटच्या पोलिस निरीक्षकांची भूमिका हेदेखील संशयास्पद आहे. त्यांची चौकशी तर राष्ट्रीय तपास यंत्रणेनेच (एनआयए) केली पाहिजे. पाकिस्तान सीमेवरील तारांचे कुंपण व सीमा सुरक्षा दलाचे संचलन-गस्त कायम सुरू असूनही दहशतवादी संवेदनशील व कडेकोट सुरक्षा असलेल्या हवाई तळात घुसतात हे गंभीर आहे.

No comments:
Post a Comment