[अंतरराष्ट्रीय]
१- इंडियानामध्ये डोनाल्ड ट्रम्प विजयी, टेड क्रूज शर्यतीतून बाहेर
२- नायजेरिया; पतीचे जननेंद्रिय प्रमाणापेक्षा मोठे, पत्नीची घटस्फोटाची मागणी
३- पाकिस्तानमध्ये 11 तालिबान्यांची फाशी निश्चित
४- रोमानियात किशोरवयीन मुली होताहेत माता...
५- सॅन दिएगो; जगातले पहिले चालकरहित जहाज अवतरणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- मोदी सरकारचं कौतुकास्पद पाऊल, केंद्र सरकार शेतकऱ्यांचा कांदा विकत घेणार
७- व्याजमाफी नव्हे कर्जमाफी द्या, लातुरात उद्धव ठाकरेंची आग्रही मागणी
८- लालूंच्या गालावर रामदेव बाबांची 'गोल्ड क्रीम'
९- रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी केंद्राकडून 9,187 कोटी
१०- अखेर मल्ल्यांचा राजीनामा स्वीकारला
११- बुलेट ट्रेनच्या तिकिटांची किंमत एसी फर्स्ट क्लासपेक्षा दीडपट असणार
१२- सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीपेक्षा जास्त वाढ
१३- मॉन्सूनच्या प्रगतीचा अंदाज 15 मे रोजी
१४- ...आधी "सुपर कॅबिनेट'ची चौकशी करा: स्वामी
१५- सरकार बांधणार 7 वर्षांत दोन कोटी घरे...
१६- सोनिया गांधींचे पुन्हा एकदा भाजपला आव्हान
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१७- रस्ते घोटाळ्यात काळ्या यादीतील कंत्राटदारांना पुन्हा काम
१८- मला ओरिजनल राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका
१९- मुंबईत आकाशात उडणारा 25 लाखांचा वन बीएचके फ्लॅट
२०- बाळासाहेब सर्वोत्कृष्ट भारतीय व्यंगचित्रकार - राज ठाकरे
२१- उत्पादन घटल्याने भाजीपाला ५० टक्क्यांनी महागला
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- राजस्थानात भारतातला सर्वात मोठा सुसाइड पॉइंट
२३- पुणे; आजारी पडते म्हणून आजीकडून नातीची हत्या
२४- अहमदनगर; टँकरमध्ये पाणी भरण्यावरुन सभापतीवर तलवारीने हल्ला
२५- मैनपुरी; हवालदाराकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
२६- पुणे शहरात कोणतीही नवीन पाणी कपात नाही-राव
२७- अकोला; पाकिस्तानी महिलेची येथे राहण्यासाठी फरफट
२८- जयपूर; पोलिस आयुक्त झालेल्या चिमुकल्याचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२९- आयसीसी क्रमवारीत टीम इंडियाची घसरण, तिसरं स्थान गमावलं
३०- अमन - वंदनाच्या लग्नाचा मुहूर्त लांबणीवर
३१- वाढदिवसानिमित्त विराट अनुष्का पुन्हा एकत्र!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
वेळेवर घेतलेल्या चांगल्या व सकारात्मक निर्णयाचा कधीच पश्चाताप होत नाही
(ऋषिकांत कदम, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
==============================================

उन्हाळ्यानंतर पेरणीची कामं सुरु होतील. त्यामुळे दुष्काळातून शेतकऱ्याला पुन्हा उभं करायचं असल्यास कर्जमाफी दिली जावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी इतर कामांचा आढावा घेतला आणि जलसंधारण कामांची पाहणी केली.
दरम्यान पक्षाची जेवढी शक्ती आहे तेवढी दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी खर्ची करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं. हा दौरा सरकारची उणीदुणी काढण्यासाठी नसून मदत करण्यासाठी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. ज्यांनी कामं केली नाहीत, त्यांनी टीका करु नये असं म्हणत मनसेवरही उद्धव यांनी अप्रत्यक्ष टीका केली.

चौकशी समितीने कारवाईची शिफारस केली असताना हँकॉक पुलासह चार पूल बनवण्याचे कंत्राटच या काळ्या यादीतील कंत्राटदारांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पालिका प्रशासन याची पूर्ण जबाबदारी घेणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.
दुसरीकडे, याबाबतची जबाबदारी स्थायी समितीवर आली तर आम्ही मुंबईकरांना काय उत्तर देणार असा सवाल स्थायी समितीच्या बैठकीत भाजपने केला. मात्र प्रस्ताव मंजूर करण्यास भाजपने मदत केली, तर प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर जगातल्या सर्वात महागड्या विमान प्रवासाचा अध्याय सुरु झाला. आखाती देशातल्या सर्वात मोठ्या एतिहाद या विमान कंपनीने न्यूयॉर्क ते मुंबई हा नॉनस्टॉप प्रवास करणारी सेवा सुरु केली. ज्याचं वनवे एअर फेअर आजवरचं सर्वात महागडं ठरलं आहे.
अबुधाबी ते मुंबई या प्रवासासाठी एतिहादचं शुल्क 3 लाख 31 हजार आहे. लंडन ते मुंबई या प्रवासासाठी तब्बल 17 लाख 25 हजार मोजावे लागतील, तर न्यूयॉर्क ते मुंबई या प्रवासासाठी तब्बल 25 लाख 22 हजार मोजावे लागणार आहेत.
या विमानाच्या एका तिकीटाच्या रकमेमध्ये मुंबईबाहेर एखादा फ्लॅटही बुक करता येतो. त्यामुळे इतके पैसे नक्की मोजावे लागणाऱ्या या ए 380 एअरबसमध्ये नेमकं आहे तरी काय असा प्रश्न पडणं साहजिक आहे. एतिहादच्या या विमानामध्ये जणू अपार्टमेन्ट वसलं आहे. समजा तुम्ही मुंबई ते न्यूयॉर्क या प्रवासासाठी 25 लाखांचं तिकीट खरेदी केलंत तर 16 तासांसाठी हा अख्खा फ्लॅट तुमचा असेल.
16 तासांचा प्रवास म्हणजे दैनंदिन आणि अत्यावश्यक गोष्टी आल्याच. त्यामुळे स्वयंपाकघर, शॉवर यासह अनेक गोष्टींची सोय इथे करण्यात आली आहे. लिव्हिंग रुममध्ये गप्पा मारताना कंटाळा आला तर विश्रांतीसाठी अख्खा डबल बेड तुमच्यासाठी सज्ज आहे.

भारतीय संघ यापूर्वी तिसऱ्या स्थानावर होता. मात्र दक्षिण अफ्रिकेने तिसऱ्या स्थानी झेप घेतल्यामुळे भारताची एका स्थानाने पिछेहाट झाली. आयसीसीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने पहिलं स्थान कायम राखलं आहे, तर न्यूझीलंडने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
विश्वचषकात मिळालेल्या उपविजेतेपदामुळे न्यूझीलंडने 113 गुणांची कमाई केली. तर वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंडपेक्षा 11 गुणांची आघाडी घेत पहिल्या स्थानावर आपली मोहोर उमटवली आहे.
दक्षिण अफ्रिकेने भारतापेक्षा तीन गुण जास्त मिळवत 112 गुण कमावले, त्यामुळे भारताला 109 गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

व्याजमाफी नव्हे कर्जमाफी द्या, लातुरात उद्धव ठाकरेंची आग्रही मागणी
लातूर : शेतकऱ्यांना व्याजमाफीऐवजी कर्जमाफी द्या असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. लातूर, उस्मानाबाद आणि बीडच्या एकदिवसीय दौऱ्यावर असताना लातूरमध्ये त्यांनी ही मागणी केली आहे.
उन्हाळ्यानंतर पेरणीची कामं सुरु होतील. त्यामुळे दुष्काळातून शेतकऱ्याला पुन्हा उभं करायचं असल्यास कर्जमाफी दिली जावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी इतर कामांचा आढावा घेतला आणि जलसंधारण कामांची पाहणी केली.
दरम्यान पक्षाची जेवढी शक्ती आहे तेवढी दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी खर्ची करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं. हा दौरा सरकारची उणीदुणी काढण्यासाठी नसून मदत करण्यासाठी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. ज्यांनी कामं केली नाहीत, त्यांनी टीका करु नये असं म्हणत मनसेवरही उद्धव यांनी अप्रत्यक्ष टीका केली.
==============================================
रस्ते घोटाळ्यात काळ्या यादीतील कंत्राटदारांना पुन्हा काम
मुंबई : रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांना मुंबई महापालिकेने पुन्हा काम दिल्याचं समोर आलं आहे. त्याबाबतचा प्रस्तावच स्थायी समितीने सादर केला असून त्याला शिवसेना-भाजपने मंजुरी दिली आहे.
चौकशी समितीने कारवाईची शिफारस केली असताना हँकॉक पुलासह चार पूल बनवण्याचे कंत्राटच या काळ्या यादीतील कंत्राटदारांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पालिका प्रशासन याची पूर्ण जबाबदारी घेणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.
दुसरीकडे, याबाबतची जबाबदारी स्थायी समितीवर आली तर आम्ही मुंबईकरांना काय उत्तर देणार असा सवाल स्थायी समितीच्या बैठकीत भाजपने केला. मात्र प्रस्ताव मंजूर करण्यास भाजपने मदत केली, तर प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
==============================================
मोदी सरकारचं कौतुकास्पद पाऊल, केंद्र सरकार शेतकऱ्यांचा कांदा विकत घेणार
नवी दिल्ली : देशभरात कांद्याला कवडीमोल भाव मिळू लागल्यानं अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला मोदी सरकार धावून आलं आहे. सरकार यंदा 15 हजार टन कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणार आहे.
केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत याबाबतची घोषणा केली. विशेष म्हणजे कांद्याचं आगर असलेल्या नाशकातून या खरेदीची सुरुवात झाली आहे.
सध्या ठोक बाजारात कांद्याचे दर तीन रुपये किलो आहेत. ज्यामुळं शेतकऱ्याला उत्पादन खर्च सोडा, पण वाहतुकीचा खर्च मिळणेही मुश्कील होतं. त्यामुळं आता बाजारभावाप्रमाणं कांदा खरेदी झाली तर शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
रबीमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याखालील क्षेत्र वाढवले, त्यामुळे उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ अपेक्षीत आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यात जास्त उत्पादन झाल्यामुळे कांद्याचे दर गडगडले. सहा- सात महिन्यांपूर्वी 50 रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता शेतकऱ्याला 2 आणि 3 रुपये किलोने लासलगावसारख्या बाजारात विकावा लागतोय. त्यामुळे केंद्राने आता शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी कऱण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारही किंमती स्थिर ठेवण्यासाठी कांदा खरेदी करु शकतं असं रामविलास पासवान यांनी लोकसभेत सांगितलं. त्यासाठी (दर स्थिरीकरण निधी) प्राईस स्टॅबिलायजेशन फंड वापरता येईल असंही पासवान म्हणाले .
गेल्या वर्षी 1 कोटी 90 लाख टन कांद्याचं उत्पादन झालं होतं, तर यंदा 2 कोटी 3 लाख टन उत्पादन झालं आहे. म्हणजे सुमारे 13 लाख टन उत्पादन जास्त झालं आहे.
==============================================
मला ओरिजनल राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका
मुंबई: मी आतापर्यत पक्षात खूप लोकशाही पाळली, मला ओरिजनल राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वपक्षीय नेत्यांना दिला.
निवासस्थान ‘कृष्णकुंज’वर बोलावलेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी पक्षाच्या नगरसेवकांना हा इशारा दिला. गेल्या काही दिवसांपासून मनसेला गळती लागली आहे. अनेक नगरसेवक, नेते मनसेला राम-राम ठोकून अन्य पक्षात प्रवेश करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज यांनी पक्ष कार्यकर्ते, नेत्यांना चांगलाच दम दिला.
“मी आतापर्यत पक्षात खूप लोकशाही पाळली, मला ओरिजनल राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका. तुम्ही पैशासाठी अन्य पक्षात जाणार असाल तर ते सारे क्षणिक आहे, व्यर्थ आहे. तुमच्या काही समस्या असतील तर त्या थेट माझ्याकडे मांडा, मी उपलब्ध आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
गेल्या महिनाभरात मनसेचे मुंबईतील 3 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले. तर नाशिकमध्येही अनेक नगरसेवकांनी शिवसेना- भाजपमध्ये प्रवेश केला.
या गळतीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबईतील नगरसेवकांची बैठक बोलावली होती. मुंबई महापालिकेत मनसेचे 27 नगरसेवक होते. त्यापैपैकी आता 22 नगरसेवकच पक्षात उरले आहेत.
==============================================
मुंबईत आकाशात उडणारा 25 लाखांचा वन बीएचके फ्लॅट
1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर जगातल्या सर्वात महागड्या विमान प्रवासाचा अध्याय सुरु झाला. आखाती देशातल्या सर्वात मोठ्या एतिहाद या विमान कंपनीने न्यूयॉर्क ते मुंबई हा नॉनस्टॉप प्रवास करणारी सेवा सुरु केली. ज्याचं वनवे एअर फेअर आजवरचं सर्वात महागडं ठरलं आहे.
मुंबई : मुंबईत नवी स्कीम सुरु झाली आहे. या स्कीमद्वारे 25 लाखात वन बीएचके फ्लॅट मिळणार आहे. पण हा फ्लॅट कल्याण किंवा डोंबिवलीत नसून चक्क हवेत तरंगणारा आहे.
विशाल, वेगवान आणि राजेशाही असलेल्या या फ्लॅटचा ताबा तुमच्याकडे फक्त 16 तासांसाठी असेल. आतापर्यंत लंडन, अबुधाबी आणि न्यूयॉर्कपर्यंत मर्यादित असलेल्या ए 380 एअरबसची राजेशाही स्वारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवतरली आणि विमान उड्डाण इतिहासात सोनेरी पान जोडलं गेलं.
1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर जगातल्या सर्वात महागड्या विमान प्रवासाचा अध्याय सुरु झाला. आखाती देशातल्या सर्वात मोठ्या एतिहाद या विमान कंपनीने न्यूयॉर्क ते मुंबई हा नॉनस्टॉप प्रवास करणारी सेवा सुरु केली. ज्याचं वनवे एअर फेअर आजवरचं सर्वात महागडं ठरलं आहे.
अबुधाबी ते मुंबई या प्रवासासाठी एतिहादचं शुल्क 3 लाख 31 हजार आहे. लंडन ते मुंबई या प्रवासासाठी तब्बल 17 लाख 25 हजार मोजावे लागतील, तर न्यूयॉर्क ते मुंबई या प्रवासासाठी तब्बल 25 लाख 22 हजार मोजावे लागणार आहेत.
या विमानाच्या एका तिकीटाच्या रकमेमध्ये मुंबईबाहेर एखादा फ्लॅटही बुक करता येतो. त्यामुळे इतके पैसे नक्की मोजावे लागणाऱ्या या ए 380 एअरबसमध्ये नेमकं आहे तरी काय असा प्रश्न पडणं साहजिक आहे. एतिहादच्या या विमानामध्ये जणू अपार्टमेन्ट वसलं आहे. समजा तुम्ही मुंबई ते न्यूयॉर्क या प्रवासासाठी 25 लाखांचं तिकीट खरेदी केलंत तर 16 तासांसाठी हा अख्खा फ्लॅट तुमचा असेल.
16 तासांचा प्रवास म्हणजे दैनंदिन आणि अत्यावश्यक गोष्टी आल्याच. त्यामुळे स्वयंपाकघर, शॉवर यासह अनेक गोष्टींची सोय इथे करण्यात आली आहे. लिव्हिंग रुममध्ये गप्पा मारताना कंटाळा आला तर विश्रांतीसाठी अख्खा डबल बेड तुमच्यासाठी सज्ज आहे.
==============================================
लालूंच्या गालावर रामदेव बाबांची 'गोल्ड क्रीम'
नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबा यांनी थेट राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यासमोर पतंजलीच्या उत्पादनांचं मार्केटिंग केलं. महत्वाचं म्हणजे अनेक उत्पादनांचा उपयोग, परिणामांचं प्रात्यक्षिकही रामदेव बाबांनी करुन दाखवलं.
रामदेव बाबांनी लालूवर त्यांची उत्पादनं लावली. याशिवाय रामदेव बाबांनी लालूंच्या कपाळ आणि गालावर गोल्ड क्रीमही लावली. लालूंनीही बाबांचं आणि पतंजलीच्या उत्पादनांचं कौतुक करण्यात कसर ठेवली नाही.
शिवाय येणाऱ्या योग दिनाला लालू प्रसाद यादव यांनी सहभागी व्हावं, अशी विनंती रामदेव बाबांनी केली.
लालू यादव आणि रामदेव बाबा यांचे संबंध पूर्वी फारसे चांगले नव्हते. पण आज दोघेही मतभेद विसरुन एकत्र आल्याचं दिसले. रामदेव बाबा भरकटले होते, असं लालू यावेळी म्हणाले. तसंच रामदेव बाबांच्या पतंजलीची उत्पादनं देशासाठी आहेत. मीदेखील घरी हीच उत्पादन वापरत असल्याचं त्यांनी सांगितलं.
यावेळी रामदेव बाबा आणि लालू यादव अगदी धम्माल करताना दिसले. यावेळी दोघांनी आपापल्या खास शैलीत उपस्थितांमध्ये हास्याचे फवारेही उडवले.
==============================================
आयसीसी क्रमवारीत टीम इंडियाची घसरण, तिसरं स्थान गमावलं
मुंबई : भारतीय संघाचे बहुतांश खेळाडू सध्या आयपीएल खेळण्यात व्यस्त असताना भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आहे. आयसीसीच्या क्रमवारीत टीम इंडियाची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.
भारतीय संघ यापूर्वी तिसऱ्या स्थानावर होता. मात्र दक्षिण अफ्रिकेने तिसऱ्या स्थानी झेप घेतल्यामुळे भारताची एका स्थानाने पिछेहाट झाली. आयसीसीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने पहिलं स्थान कायम राखलं आहे, तर न्यूझीलंडने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
विश्वचषकात मिळालेल्या उपविजेतेपदामुळे न्यूझीलंडने 113 गुणांची कमाई केली. तर वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंडपेक्षा 11 गुणांची आघाडी घेत पहिल्या स्थानावर आपली मोहोर उमटवली आहे.
दक्षिण अफ्रिकेने भारतापेक्षा तीन गुण जास्त मिळवत 112 गुण कमावले, त्यामुळे भारताला 109 गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
==============================================
रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी केंद्राकडून 9,187 कोटी
नवी दिल्ली: दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दुष्काळग्रस्त भागातील अपूर्ण आणि रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्रला 9 हजार 187 कोटी रुपये देणार आहे.
ज्या भागात शेतकऱ्यांनी जास्त आत्महत्या केल्या आहेत त्या भागातील कामाला प्राधान्य देणार असल्याचंही केंदाने सांगितलं आहे.
राज्य शासनाने मराठवाड्यातील मोठ्या सिंचन प्रकलल्पांसाठी 90 टक्के निधी देण्याची मागणी केली आहे. मात्र ती मागणी अमान्य करत देशातील अपूर्ण प्रकल्पासाठी 80 हजार कोटी रुपये देऊ, त्यापैकी बहुसंख्य निधी महाराष्ट्रासाठी असेल असं आश्वासन केंद्राने राज्य सरकारला दिलं आहे.
दुष्काळ हटवण्याचा निर्धार
केंद्रिय जलसंधारण मंत्री उमा भारती, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान या रकमेला मान्यता देण्यात आली. तसेच मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा सामना करण्यासाठी केंद्र सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले.
==============================================
बाळासाहेब सर्वोत्कृष्ट भारतीय व्यंगचित्रकार - राज ठाकरे
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 4 - बाळासाहेब ठाकरे हेच भारतातले आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. उद्या पाच मे, जागतिक व्यंगचित्रकार दिन असून लोकमतचे राज ठाकरे हे गेस्ट एडिटर आहेत. त्यानिमित्त, लोकमतच्या संपादकीय टीमशी बोलताना राज यांनी व्यंगचित्रकला, व्यंगचित्रकार आणि भारतातलं कल्चर याबाबत आपले विचार मांडले. यावेळी बोलताना, आर. के. लक्ष्मण हे नि:संशय थोर व्यंगचित्रकार होते असे ते म्हणाले. मात्र, लक्ष्मण यांचा विनोद हा हसून बाजुला ठेवला जाण्याची शक्यता होती. तर बाळासाहेबांची व्यंगचित्रे विचार करायला भाग पाडायची आणि ती स्वभावत: तिखट होती असं राज म्हणाले.उपजत ओढ हवी, अवांतर वाचन हवं!काही गोष्टी या शिकवून येत नाहीत, त्या उपजत असाव्या लागतात, असं सांगताना राज ठाकरे यांनी नवोदीत व्यंगचित्रकारांनी भरपूर अवांतर वाचन करायला हवं असा सल्ला दिला. तरूण व्यंगचित्रकार राजकारणातलं किती वाचतात, अवांतर किती वाचतात हा संशोधनाचा विषय असल्याची टीकाही त्यांनी केली. अवांतर वाचन भरपूर असेल तरच कल्पना सुचू शकतात आणि ते नसेल तर विषयाची जुळवाजुळव करता येत नाही आणि कार्टून जमत नाही असं त्यांनी सांगितलं.
==============================================
राजस्थानात भारतातला सर्वात मोठा सुसाइड पॉइंट
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 4- आतापर्यंत मुंबईतल्या वांद्रे-वरळी सी-लिंक सुसाइंट पॉइंट म्हणून लोकांना परिचित होतं. मात्र राजस्थानातल्या कोटा इथं भारतातला सर्वात खतरनाक आणि मोठा सुसाइड पॉइंट असल्याची माहिती आता समोर येते आहे. त्यामुळे कोटा हे शहर आता सुसाइड शहर या नावानं ओळखलं जातं आहे.कोटामध्ये प्रत्येक वर्षाकाठी जवळपास 24 जणांनी सुसाइड केल्याची नोंद होतेय. दोन डझनांहून अधिक आत्महत्यांची या शहरात आतापर्यंत नोंद झाली. मात्र या सुसाइड थांबवण्यासाठी कोणतीही सरकारी अथवा पोलीस यंत्रणा कामी आली नाही. या शहरानं अनेक डॉक्टर आणि इंजिनीअर घडवले. अनेकांना यशोशिखरावर पोहोचवणा-या या शहराला आत्महत्यांच्या सत्रामुळे सुसाइट शहर अशी ओळख मिळाली आहे.शिक्षणासाठी राजस्थानातलं कोटा शहर परिचित आहे. या भागात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. मात्र आता शैक्षणिक संस्थांचं शहर सुसाइट शहर या नावानं ओळखलं जाऊ लागलं आहे. इथं शैक्षणिक संस्था असल्यानं अध्यापनासाठी अनेक मुलं येतात. सूत्रांच्या माहितीनुसार, शैक्षणिक संस्थेतील शिक्षण माफियांमुळे विद्यार्थी आत्महत्या करत असल्याची माहिती समोर येते आहे. काही विद्यार्थी फाशी घेऊन, काही विद्यार्थी विष पिऊन, तर काही विद्यार्थी हाताच्या नसा कापून आत्महत्या करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या आत्महत्या थांबवण्यासाठी आता तरी राजस्थान सरकारनं जागं होण्याची गरज आहे.
==============================================
पतीचे जननेंद्रिय प्रमाणापेक्षा मोठे, पत्नीची घटस्फोटाची मागणी
- ऑनलाइन लोकमतनायजेरिया, दि. ४ : सध्या घटस्फोटांचे प्रमाण वाढत असताना त्यामागील कारणांमध्ये देखील रोज नवनवीन भर पडत आहे. अशातच पतीचे गुप्तांग मोठे असल्याने नववधूने घटस्फोटाचा अर्ज दिल्याची घटना नायजेरियात घडली आहे.तीन मुलांची आई असलेल्या आईशा दान्नुपावा या नायजेरियातील झाम्फारा भागात स्थायिक असून पहिल्या पती बरोबर फारकत घेऊन अली मैझीनारी यांच्याशी आठवडाभरापूर्वीच दुसरा विवाह केला होता.गृहिणी असलेल्या आईशा यांनी पतीचे जननेंद्रिय आकाराने मोठे असल्याने घटस्फोटाची मागणी केली असून घटस्फोटाचे तेच एकमेव कारण असल्याचे सांगितले आहे. नायजेरियातील झाम्फारा भागात नववधूला पतीच्या घरी जाण्यापूर्वी तिचे आई-वडील काही कालावधीसाठी आपल्या घरी निमंत्रित करतात अशी तिथे परंपरा आहे. या कालावधीतचं आपल्या पतीबरोबर पहिल्यांदा प्रणय करताना आईशा यांना त्रास झाला असल्याचे त्रीबून या नायजेरियातील वृत्तपत्राने म्हटले आहे. पतीबरोबर प्रणय करताना अतीव वेदना होतात असे आईशा यांनी घटस्फोटाचा अर्ज करताना कोर्टाला सांगितले आहे.अनेक पयत्न करून देखील वेदना कमी होत नसल्याने आपल्या आईच्या सांगण्यावरून डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधं देखील घेतली परंतु त्रास काही केल्या कमी होत नसल्याने लग्नातून वेगळे होण्याचा मार्ग निवडला असल्याचे आईशा यांनी सांगितले.आईशा यांचे पती अली यांनी आपले जननेंद्रिय मोठे असल्याचे मान्य केले असून सामंजस्याने ही समस्या सोडवण्याची तयारी दाखवली आहे. मात्र या सर्व प्रकरणात आपण हुंड्यापोटी दिलेली रक्कम ही आईशा आणि तिच्या आई वडिलांनी परत करावी अशी मागणी देखील केली आहे
==============================================
आजारी पडते म्हणून आजीकडून नातीची हत्या
- ऑनलाइन लोकमतपुणे, दि. ४ - सतत आजारी पडते आणि खर्च काढते म्हणून वैतागलेल्या आजीने स्वत:च्या तीन महिन्यांच्या नातीचा घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून खून केला. खळबळ उडवून देणारी ही घटना मंगळवारी सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान कोंढव्यामध्ये घडली. मुलीला पळवल्याचा बनाव रचणा-या आजीला पोलिसांनी ‘बोलते’ करुन ही घटना उघडकीस आणली. खून झालेल्या मुलीचे नावही ठेवण्यात आलेले नव्हते.सुशिला संजय तारु (वय 50, रा. अतुरनगर सोसायटी, बी-1, फ्लॅट क्रमांक 13, कोंढवा) असे अटक आजीचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक किरण पावसे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुशिला या पती संजय, मुलगा राजीव आणि सून मोनिका यांच्यासह राहतात.मुळचे खडकवासला येथील रहिवासी असलेले हे कुटुंब चार महिन्यांपुर्वी अतुरनगर सोसायटीमध्ये राहण्यास आले आहे. राजीव जमीन मोजणीची कामे करतात. राजीव आणि मोनिका यांना तीन महिन्यांपुर्वी मुलगी झाली होती. जन्मत:च तिच्या बेंबीमध्ये इन्फेक्श्न झाले होते. त्यामुळे बेंबीमध्ये सतत पस होऊन रक्तस्त्राव होत असे. काही दिवसांपुर्वी तिला रुग्णालयात दाखल केले होते.उपचारानंतर बाळाला घरी आणण्यात आले. तेव्हा ती सतत रडत असायची. त्यामुळे एका महिलेकडून मालिश करुन घेण्यात आली. मालिश केल्यानंतरही तिचे रडणे थांबत नव्हते. त्यामुळे हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. त्यावेळी तिच्या डोक्याला सूज आलेली होती. तसेच पाय पुर्णपणे अधू झालेला होता. पायाला बेल्ट लावून उपचार करुन बाळाला घरी सोडले होते. बाळाच्या सततच्या आजारपणाला आणि त्यामुळे येणा-या खर्चाला आजी सुशिला वैतागली होती. याबाबत ती सतत घरामध्ये बडबड करीत असे.
==============================================
टँकरमध्ये पाणी भरण्यावरुन सभापतीवर तलवारीने हल्ला
- ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. ४ : शासकीय पाणी योजनेवरुन खासगी टँकर भरण्यास विरोध केल्याचा राग आल्याने पाच जणांनी पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे व त्यांचे बंधू भरत पालवे यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याची घटना मंगळवारी रात्री घडली़ मिरी-तिसगाव पाणी पुरवठा योजनेचे पांढरीपुलाजवळ जलशुद्धीकरण केंद्र आहे़.या जलशुद्धीकरण केंद्रावरुन खासगी टँकरद्वारे पाणी नेऊन विकण्याचा सपाटा काहींनी लावला होता़ मंगळवारी ११ वाजण्याच्या सुमारास पाच टँकर घेऊन काही इसम या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी भरत होते़ याची माहिती मिळताच पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे व त्यांचे बंधू भरत पालवे हे तेथे गेले व खासगी टँकर भरण्यास त्यांनी विरोध केला़ याचा राग आल्याने पाच टँकरचालकांनी पालवे यांच्यावर तलवार व लाठीने हल्ला केला़ यात सभापती पालवे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे़
==============================================
अखेर मल्ल्यांचा राजीनामा स्वीकारला
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 4- राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारींनी अखेर उद्योगपती विजय मल्ल्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विजय मल्ल्यांनी हमीद अन्सारींकडे राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा सोपवला होता. मात्र हमीद अन्सारी आणि शिस्तपालन समितीतं त्यावेळी तांत्रिक कारणास्तव राजीनामा फेटाळला होता.विजय मल्ल्यांची राजीनामावर स्वाक्षरी नसून, त्यांनी कोणतीही कागदपत्रं जोडली नसल्याचं कारण हमीद अन्सारींनी दिलं होतं. मात्र आज अखेर विजय मल्ल्यांच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव पाहून राज्यसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.गेल्याच आठवड्यात परराष्ट्र मंत्रालयाकडून मल्ल्या यांचा राजनैतिक पासपोर्ट रद्द करण्यात आला. ईडीच्या आग्रहाखातर मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला, तर मालमत्तेची पूर्ण माहिती बँकांना देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने मल्ल्या यांना दिले आहेत.
==============================================
बुलेट ट्रेनच्या तिकिटांची किंमत एसी फर्स्ट क्लासपेक्षा दीडपट असणार
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 4- बहुप्रतीक्षित बुलेट ट्रेनच्या तिकिटांची किंमत साधारण एसी क्लासपेक्षा दीड पट जास्त असणार आहे. मुंबई आणि अहमदाबाद यांमध्ये प्रस्तावित असलेल्या बुलेट ट्रेनचे प्रवासी भाडे हे सध्याच्या रेल्वेमधील फर्स्ट क्लास एसी भाड्याच्या दीडपट असावे, असा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडून ठेवण्यात आला आहे.मुंबई आणि अहमदाबाद या शहरांमधून धावणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसच्या फर्स्ट क्लासचे प्रवासी भाडे हे 2,200 रुपये आहे. त्याच वेळी 508 किमी अंतरासाठी बुलेट ट्रेनमधून प्रवास करताना 3,300 रुपये भाडे मोजावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जपानमध्ये सध्या या प्रवासाकरिता भारतीय चलनानुसार साडेआठ हजार रुपये इतका खर्च येतो. जपानची राजधानी असलेल्या टोकियो आणि ओसाका या शहरांना जोडणाऱ्या शिंकनसेन या बुलेट ट्रेनचे प्रवासी भाडे भारतीय चलनानुसार सुमारे साडेआठ हजार रुपये इतके आहे. टोकियो व ओसाका या शहरांमध्ये साडेपाचशे किमी इतके अंतर आहे. पहिल्या टप्प्यातील या बुलेट ट्रेनचा वेग तासाला सुमारे 320 किमी इतका असणार आहे.रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार 2023 पर्यंत मुंबई-अहमदाबाद या लाईनवर धावणारी बुलेट ट्रेनचा प्रतिदिनी सुमारे 36 हजार प्रवास प्रवास करू शकणार आहेत. याचबरोबर, 2053 पर्यंत हा आकडा तब्बल 1,86,000 वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या मार्गावर कोणत्याही इतर स्टेशनवर न थांबता धावणाऱ्या ट्रेनचा एकूण प्रवासी वेळ 2.7 तासांचा असेल, तर प्रत्येक स्टेशनवर थांबणाऱ्या बुलेट ट्रेनचा प्रवासी वेळ 2.58 तास असणार आहे. या मार्गांवर मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती अशी 12 रेल्वे स्टेशने प्रस्तावित आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 97,636 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, यासाठी जपान 0.1% च्या सवलतीच्या व्याजाने 1 लाख कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे.
==============================================
इंडियानामध्ये डोनाल्ड ट्रम्प विजयी, टेड क्रूज शर्यतीतून बाहेर
- ऑनलाइन लोकमत -वॉशिंग्टन, दि. 04 - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकासाठी शर्यतीत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवार मिळणार हे आता निश्चित झाल्याचं दिसत आहे. इंडियानात झालेल्या प्राथमिक निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी टेड क्रूज यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला आहे. उमेदवारी मिळण्याच्या दृष्टीने इंडियानामधील निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जात होती.अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी दाखवण्यास सुरुवातदेखील केली आहे. इंडियाना प्राथमिक निवडणुकीत ट्रम्प यांनी 50 टक्क्यांहून जास्त मतं मिळाली आहेत. ट्रम्प यांच्याविरोधात झालेल्या पराभवानंतर टेड क्रूज यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतली असल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. यामुळे ट्रम्प यांचा पुढचा मार्ग सोप्पा झाला आहे.ट्रम्प यांचा मोठा विजय झाला असताना दुसरीकडे डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्लिंटन यांना मात्र सँडर्स यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. ही निवडणूक टेड क्रूज यांच्यासाठी अत्यंत महत्वाची होती, त्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. या निवडणुकीत पराभव झाल्यास आपण शर्यतीतून माघार घेऊ असं क्रूज यांनी सांगितल नव्हतं मात्र एका खास परिस्थितीत असेन असं स्पष्ट केलं होतं.
==============================================
येत आहे जगातले पहिले चालकरहित जहाज !
- सॅन दिएगो (अमेरिका) : हवाई सफर करून ठरलेल्या ठिकाणी जाणाऱ्या मानवरहित ड्रोनचे तंत्र आता सुप्रस्थापित झाले असून, त्यांचा विविध जोखमीच्या कामांसाठी वापरही केला जात आहे. चालकरहित मोटार विकसित करण्याचे कामही प्रगतिपथावर आहे. याच धर्तीवर कप्तान किंवा अन्य कोणीही खलाशी नसलेले सागरी जहाजही आता येऊ घातले असून, जगातील अशा पहिल्या पूर्णपणे स्वयंचलित जहाजांच्या चाचण्या अमेरिकेच्या संरक्षण दलांनी सुरू केल्या आहेत.‘सी हन्टर’ असे या १३२ फूट लांबीच्या जहाजाचे नाव असून, सफरीसाठी तयार केले गेलेले जगातील आतापर्यंतचे ते सर्वात मोठे पूर्णपणे मानवरहित वाहन आहे. हे जहाज कोणाही कप्तानाच्या संचालनाविना१० हजार सागरी मैलांपर्यंतचा प्रवास आपणहून करू शकते व जाताना वाटेत ते सागरात दडलेल्या पाणबुड्या आणि सागरतळाशी पेरलेल्या पाणसुरुंगाचाही शोध घेऊ शकते.
==============================================
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीपेक्षा जास्त वाढ
- नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीपेक्षा जास्त वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. आयोगाच्या शिफारशींवर विचार करण्यास नेमलेली सचिवांची उच्चाधिकार समिती वाढीव वेतनासाठी आग्रही आहे.ही समिती आपला अहवाला या महिन्याच्या अखेरपर्यंत सरकारला सादर करणार आहे. या अहवालात सातव्या वेतन आयोगाने सूचविलेल्या वेतनावाढीपेक्षा जास्त वेतनवाढ देण्याची मजबूत शिफारस करण्यात येणार आहे, असे समजते. उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिवांच्या समितीने जास्तीत वेतन २,७0,000 रुपये असावे असे सूचविले आहे. ही रक्कम सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीपेक्षा २0 हजार रुपयांनी जास्त आहे. याशिवाय कमीत कमी वेतन २१ हजार रुपये असावे, असे समितीने सूचविले आहे. ही रक्कमही सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीपेक्षा ३ हजारांनी जास्त आहे. समितीच्या या सुधारित शिफारशी केंद्र सरकार स्वीकारण्याची दाट शक्यता आहे, असे उच्चस्तरीय वर्तुळातून समजते.
==============================================
उत्पादन घटल्याने भाजीपाला ५० टक्क्यांनी महागला
- मुंबई : उन्हाच्या काहिलीने अंग भाजून निघत असतानाच आता याच उन्हाचा फटका भाजीपाल्यालाही बसला असून गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या तुलनेत यंदा भाजीपाला किमान ३० ते कमाल ५० टक्क्यांनी महागल्याचे वृत्त आहे.वास्तविक उन्हाळा जसजसा वाढतो, तसतसे भाज्यांच्या पुरवठ्याचे प्रमाण घटत जाते. परिणामी, भाज्यांचे भाव भडकतात असा दरवर्षीचा अनुभव आहे. मात्र ही स्थिती साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जाणवते. परंतु, यंदा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यापासून तापमानवाढ नोंदली गेली आहे. याचा परिणाम भाज्यांचे भाव भडकण्याच्या रूपाने दिसत आहे. यंदा देशभरातच उन्हाळा तीव्र आहे. यामुळे पाणीपुरवठ्याचेही प्रमाण घटल्यामुळे याचा फटका भाज्यांचा उत्पादनाला बसत आहे. त्यातच नाशवंत अशा भाजीपाल्याला किमान मुदतीत राखण्यास पुरेशी व्यवस्था नसल्याने बाहेरील वाढीव तापमानामुळेही भाज्यांची नासाडी होण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी किमती वाढल्या आहेत.
==============================================
मॉन्सूनच्या प्रगतीचा अंदाज 15 मे रोजी
नवी दिल्ली : मॉन्सूनच्या प्रगतीचा अंदाज 15 मे रोजी जाहीर केला जाईल, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज (बुधवार) सांगितले. लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान डॉ. हर्ष वर्धन यांनी ही माहिती दिली.
"सध्याचे हवामान पाहता मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या हवामान अंदाजांनुसार, यंदा देशभरात मॉन्सून चांगला असेल,‘‘ असेही डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले.
सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस पडल्यास मॉन्सून ‘नॉर्मल‘ असल्याचे मानले जाते. भारतीय वेधशाळेसह इतर खासगी संस्थांनीही मॉन्सूनविषयी त्यांचे अंदाज जाहीर केले आहेत. त्यानुसार यंदा 105 ते 110 टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवालदाराकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
मैनपुरी : एका अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक करण्यात आली. राजेश यादव असे आरोपीचे नाव आहे. याच हवालदारानेहोळीच्या दिवशी एका 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता.
या मुलीला दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिने याविषयीची माहिती तिच्या आईला दिली. मुलीच्या वडिलांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिगंबर कुशवाह यांची भेट घेऊन तक्रार केल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिसांनी या घटनेविषयी माहिती देताना सांगितले.
पोलिसांनी आरोपी यादव याला काल रात्री (सोमवारी) अटक केली. दरम्यान, अटक टाळण्यासाठी आरोपीने अत्याचार झालेल्या मुलीच्या आईवडिलांवर दबावही आणण्याचा प्रयत्न केला होता.

अमन - वंदनाच्या लग्नाचा मुहूर्त लांबणीवर
टीव्ही स्टार अमन वर्मा व त्याची प्रेयसी वंदना ललवाणी यांचा विवाह पुढे ढकलण्यात आला आहे. अमनचे वडील लेफ्टनंट कर्नल वाय. के. वर्मा यांचे निधन झाल्याने हा सोहळा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.
लेफ्टनंट वर्मा यांचे गेल्या आठवड्यात मोटार अपघातात निधन झाले. ‘वडिलांचा मृत्यू आमच्या कुटुंबासाठी धक्कादायक असून आम्ही त्यातून सावरलो नसल्याने विवाह सोहळा पुढे ढकलला आहे,‘ असे अमनने सांगितले.
अमनचे 1987 मध्ये ‘पचपन खंबे लाल दीवार‘ या मालिकेतून टीव्हीवर आगमन झाले. "प्राण जाये पर शान न जाये‘, "बागबान‘, "तीस मार खॉं‘ आदी चित्रपटातूनही त्याने भूमिका केल्या आहेत. "बिग बॉस‘च्या नवव्या आवृत्तीत तो सहभागी झाला होता. तेथेच त्याची वंदनाशी भेट झाली. त्यांचा साखरपुडा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाला.
अमन - वंदनाच्या लग्नाचा मुहूर्त लांबणीवर
लेफ्टनंट वर्मा यांचे गेल्या आठवड्यात मोटार अपघातात निधन झाले. ‘वडिलांचा मृत्यू आमच्या कुटुंबासाठी धक्कादायक असून आम्ही त्यातून सावरलो नसल्याने विवाह सोहळा पुढे ढकलला आहे,‘ असे अमनने सांगितले.
अमनचे 1987 मध्ये ‘पचपन खंबे लाल दीवार‘ या मालिकेतून टीव्हीवर आगमन झाले. "प्राण जाये पर शान न जाये‘, "बागबान‘, "तीस मार खॉं‘ आदी चित्रपटातूनही त्याने भूमिका केल्या आहेत. "बिग बॉस‘च्या नवव्या आवृत्तीत तो सहभागी झाला होता. तेथेच त्याची वंदनाशी भेट झाली. त्यांचा साखरपुडा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाला.
==============================================
पुणे शहरात कोणतीही नवीन पाणी कपात नाही-राव
पुणे- पुणेकरांचा जोरदार विरोध डावलत खडकवासला प्रकल्पातून एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी दौंड व इंदापूरसाठी सोडण्यात येत असले तरी शहरात कोणतीही नवीन पाणी कपात होणार नाही, असे जिल्हाधिकारी सौर राव यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत सांगितले.
खडकवासला धरणातून दौंड, इंदापूरसाठी एक टीएमसी पाणी सोडण्यास आज (बुधवार) दुपारी सुरवात करण्यात आली. खडकवासला धरणातून 300 क्युसेक्स वेगाने पाणी कालव्यात सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाचे मंगळवारी सकाळपासूनच तीव्र पडसाद शहरात उमटले. सर्वच राजकीय पक्षांनी त्याबाबतच्या भावना विविध पद्धतीने व्यक्त केल्या. पुणेकरांच्या हक्काचे पाणी जाणार असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिंचन भवनात तोडफोड करून आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही पाण्यावरून रणकंदन झाले.

पाकिस्तानी महिलेची येथे राहण्यासाठी फरफट
अकोला : मूळची पाकिस्तानची रहिवासी असलेल्या रुखसाना बानोची (वय 53) अकोल्यात राहण्याची परवानगी मिळविताना फरफट होत आहे. भारतात राहण्याचा व्हिसा संपुष्टात आल्याने तिला पाकिस्तानात पाठविले जाणार असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक संजय खांडेकर यांनी सोमवारी दिली.
अकोल्यातील अकोट फैल पोलिस स्थानकाच्या हद्दीत राहणारे रफिक शेखानी हे 2004 मध्ये पाकिस्तानमध्ये कराची येथे कामानिमित्त वास्तव्यास होते. त्यांची नातेवाईक असलेल्या रुखसाना बानो या महिलेसोबत त्यांचा विवाह झाला. त्यानंतर हे दांपत्य 2007 मध्ये भारतात आले. रुखसाना बानो या अकोल्यातील सासरी 18 दिवस राहल्या. व्हिसाची मुदत संपल्यामुळे ती वाढवून मिळण्यासाठी त्यांना गुजरातमधील जुनागड येथे जावे लागले; पण भारतात राहण्याची परवानगी मिळू न शकल्याने त्या तेथेच नातेवाइकांकडे तीन वर्षे राहिल्या.
दरम्यान, पाकिस्तानी एजंट असल्याच्या कारणावरून जुनागड येथे त्यांची तपास यंत्रणेने चौकशी केली. तेथील पोलिस स्थानकात त्यांच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हेही दाखल आहेत. न्यायालयीन लढाईत त्यांना जामीनही मिळाला. त्यानंतर जुनागड पोलिसांनी रुखसाना बानो यांना अकोला विशेष शाखेच्या स्वाधीन केले. विशेष शाखेने अकोट फैल पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांना पाकिस्तानला पाठविण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यानंतर त्यांना तातडीने पाकिस्तानला पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती खांडेकर यांनी दिली.

...आधी "सुपर कॅबिनेट'ची चौकशी करा: स्वामी
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आज (बुधवार) राज्यसभेमध्ये प्रथमच बोलताना ऑगस्टा वेस्टलॅंड गैरव्यवहारासंदर्भात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव न घेता त्यांना लक्ष्य केले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याहीआधी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांची चौकशी करावयास हवी, असा हल्ला स्वामी यांनी चढविला.
गांधी यांचे नाव न घेता स्वामी यांनी यावेळी "सुपर कॅबिनेट‘ वा "पंतप्रधानांपेक्षा उच्च अधिकार असलेली व्यक्ती‘ अशा आशयाची संबोधने भाषणामध्ये वापरली. याचबरोबर, या गैरव्यवहारामध्ये गांधी यांनीच मुख्य भूमिका बजाविल्याचा पुष्कळ पुरावा असल्याचा दावाही स्वामी यांनी यावेळी केला. दरम्यान, ऑगस्टा वेस्टलॅंड गैरव्यवहारप्रकरणी भारतीय जनता पक्षाने (भाजप) "नव्या बाबी‘ उघड कराव्यातच, असे आव्हान कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (बुधवार) दिले. ऑगस्टा वेस्टलॅंडसंदर्भात संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर हे आज राज्यसभेमध्ये निवेदन देणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोनिया यांनी हे आव्हान दिले आहे.
गेल्या 8 एप्रिल रोजी इटलीतील मिलान कोर्ट ऑफ अपील्सने (येथील उच्च न्यायालय) कनिष्ठ न्यायालयाचा निकाल बाजुला ठेवत या प्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला होता. याचबरोबर, कंपनीच्या हेलिकॉप्टर विभागाचा प्रमुख ब्रुनो स्पाग्नोलिनी आणि फिन्मेकानिया या कंपनीचा प्रभावशाली प्रमुख ग्युसेप्पे ओर्सी हे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दोषी असल्याचा निकाल न्यायालयाने सुनावला होता. ऑगस्टावेस्टलॅंड या कंपनीच्या हेलिकॉप्टर खरेदीवेळी भ्रष्टाचार झाला; आणि त्यामध्ये भारताचे तत्कालीन हवाई दल प्रमुख एस पी त्यागी यांचा समावेश होता, असे मानावयास सबळ कारणे असल्याचे इटलीमधील न्यायालयाने म्हटले आहे. या कंपनीची हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यात यावीत, यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लक्षावधी डॉलर्सचा निधी दिला गेल्याचे निष्पन्न झाल्याचेही न्यायालयाने यावेळी सांगितले.

पोलिस आयुक्त झालेल्या चिमुकल्याचा मृत्यू
जयपूर- एक दिवसासाठी पोलिस आयुक्त बनलेल्या अकरा वर्षीय गिरीश शर्माचा नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात मृत्यू झाला. "मेक-विश-फाउंडेशन‘ आणि राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने एक दिवसासाठी पोलिस आयुक्त बनण्याचा अनोखा उपक्रम यशस्वी झाला होता.
मूत्रपिंडाचा आजार असलेल्या गिरीशवर उपचार सुरू होते. पोलिस आयुक्त बनण्याचे आपले स्वप्न त्याने बोलून दाखवले होते. येथील एसएमएस रुग्णालयाने त्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरविले होते. यासाठी द मेक अ विश फाऊंडेशनची मदत घेण्यात आली होती.
फाऊंडेशनच्या अधिकारी सुनीता शहा यांनी राजस्थान पोलिस अधिकाऱ्यांकडे याबाबतची माहिती कळविली होती. पोलिस अधिकाऱ्यांनीही गिरीशचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे ठरविले होते. 30 एप्रिल 2015 रोजी एक दिवसासाठी त्याला पोलिस आयुक्त करण्यात आले होते. पोलिस आयुक्तांचा गणवेश घालून तो लाल दिव्याच्या गाडीमधून आला होता. विविध अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱयांनी त्याला सलाम केला होता. पोलिस आयुक्त श्रीनिवास जंगा राव यांच्या खुर्चीवर बसून त्याने काही कागदपत्रांवर स्वाक्षरीही केली होती. गिरीशचे पोलिस आयुक्त बनण्याचे स्वप्न एक दिवसासाठी प्रत्यक्षात साकारण्यात आले होते. यामुळे तो चांगलाच खूष झाला होता. विविध वृत्तवाहिन्यांनी प्रक्षेपण दाखविले होते. दिवसाअखेर विविध पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या होत्या.

वाढदिवसानिमित्त विराट अनुष्का पुन्हा एकत्र!
मुंबई- भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. या दोघांचे सूत पुन्हा जुळत असल्याची चर्चा आहे. अलीकडेच दोघांनी एकत्र डिनर केला.
वांद्रे येथील एका मोठ्या लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये बुधवारी ही जोडी एकत्रित आली होती. त्यावेळी त्यांच्यात सुखसंवाद चालू असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. विराट कोहलीने करड्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. तर अनुष्का काळ्या रंगाचा खास वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता. विराट आणि अनुष्काच्या ब्रेकअपच्या बातम्या येत असल्या तरी दोघांनीही ब्रेकअपबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे जाणीवपूर्वक टाळलं आहे.
अनुष्कासोबत झालेल्या वादानंतर विराटने ट्विटरवर अनुष्का शर्माला अनफॉलो केले होते. पण आता विराटने अनुष्काला पुन्हा फॉलो केले आहे. अनुष्काला विराटने वाढदिवसानिमित्त ही खास भेट दिली आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे विराट आणि अनुष्का पुन्हा एकत्र येत आहेत हे दिसते.
सोशल मीडियावर अनुष्काची खिल्ली उडविणाऱ्यांबद्दल विराटने जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर हे दोघे पुन्हा एकत्र येणार असे चित्र निर्माण झाले होते.

सरकार बांधणार 7 वर्षांत दोन कोटी घरे...
नवी दिल्ली - "प्रधान मंत्री आवास योजनें‘तर्गत शहरी गरीबांसाठी परवडण्याजोग्या दरात घरे पुरविण्याच्या उद्देशार्थ देशातील 26 राज्यातील एकूण 2,508 शहरांची निवड करण्यात आल्याची माहिती केंद्रीय नागरी विकास मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी आज (बुधवार) लोकसभेत बोलताना दिली.
"या योजनेनुसार बांधण्यात येणारी घरे ही राष्ट्रीय इमारत नियमावली आणि इतर संबंधित मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून बांधण्यात येतील. ही घरे भूकंप, पूर, वादळ, भूस्खलन अशा नैसर्गिक आपत्तींस तोंड देण्यास सक्षम असणे आवश्यक असल्याचे,‘ प्रतिपादन नायडू यांनी यावेळी केले. याचबरोबर, या घरबांधणी योजनेनुसार देशातील विविध प्रकाराच्या हवामानास पोषक असलेली; आणि विशिष्ट राज्यातील तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यात आलेली घरे बांधण्यात येणार आहेत. येत्या सात वर्षांत (2022 पर्यंत) देशात दोन कोटींपेक्षाही जास्त घरे बांधण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय या योजनेद्वारे निश्चित करण्यात आले आहे.
शहरातील घर नसलेल्या गरीब लोकांसाठी आसरा पुरविणे, ही राज्य सरकारांची प्राथमिक जबाबदारी असल्याचे नायडू यांनी अन्य एका प्रश्नास उत्तर देताना यावेळी सांगितले. देशात सद्यस्थितीत अशा प्रकारच्या एकूण 770 आसरा इमारतींची (शेल्टर्स) बांधणी करण्यात आली असून त्यांमध्ये एकूण 38,770 नागरिक आसरा घेऊ शकतात. यांपैकी 270 शेल्टर्स पूर्णत: कार्यरत आहेत.

सोनिया गांधींचे पुन्हा एकदा भाजपला आव्हान
नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलॅंड गैरव्यवहारप्रकरणी भारतीय जनता पक्षाने (भाजप) "नव्या बाबी‘ उघड कराव्यातच, असे आव्हान कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (बुधवार) दिले. ऑगस्टा वेस्टलॅंडसंदर्भात संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर हे आज राज्यसभेमध्ये निवेदन देणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोनिया यांनी हे आव्हान दिले आहे.
ऑगस्टा वेस्टलॅंड कंपनीच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय कनिष्क सिंग हे गुंतलेले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचा दावा गांधी यांनी यावेळी केला.
सोनिया गांधींचे पुन्हा एकदा भाजपला आव्हान
ऑगस्टा वेस्टलॅंड कंपनीच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय कनिष्क सिंग हे गुंतलेले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचा दावा गांधी यांनी यावेळी केला.
==============================================
पाकिस्तानमध्ये 11 तालिबान्यांची फाशी निश्चित
इस्लामाबाद- पाकिस्तानी नागरिकांचे अपहरण, पोलिस व लष्करी अधिकाऱावरील हल्ला प्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या 11 तालिबान्यांच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुखांनी फाशीच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती लष्कराने दिली.
लष्कराने प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालिबानी दहशतवादी संघटनेच्या 11 सदस्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली अटक करून शिक्षा ठोठावण्यात आली होती. लष्कराच्या न्यायालयाकडे शिक्षेबाबत हस्तांतरित करण्यात आले होते. लष्कर प्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी 11 जणांच्या फाशीच्या निर्णयावर मंगळवारी स्वाक्षरी केली. विविध ठिकाणी त्यांना तत्काळ फाशी देण्यात येणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, तालिबानी दहशतवादी संघटनेने विविध ठिकाणी केलेल्या हल्ल्यात शेकडो जणांना जीव गमवावा लागला आहे.
पाकिस्तानमध्ये 11 तालिबान्यांची फाशी निश्चित
लष्कराने प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालिबानी दहशतवादी संघटनेच्या 11 सदस्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली अटक करून शिक्षा ठोठावण्यात आली होती. लष्कराच्या न्यायालयाकडे शिक्षेबाबत हस्तांतरित करण्यात आले होते. लष्कर प्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी 11 जणांच्या फाशीच्या निर्णयावर मंगळवारी स्वाक्षरी केली. विविध ठिकाणी त्यांना तत्काळ फाशी देण्यात येणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, तालिबानी दहशतवादी संघटनेने विविध ठिकाणी केलेल्या हल्ल्यात शेकडो जणांना जीव गमवावा लागला आहे.
==============================================
रोमानियात किशोरवयीन मुली होताहेत माता...
बोटोसानी- रोमानियामध्ये 12 ते 15 वर्षांच्या किमान 2000 मुली माता होत असल्याची माहिती पुढे आली आहे. खेळण्याच्या वयातच मुलींवर आई होण्याची जबाबदारी येत आहे.
सोळा वर्षीय लोरेना म्हणाली, ‘देवाने मला छान मुलगी दिली आहे. परंतु, माझे सध्याचे वय हे खेळण्याचे वय आहे. या वयातच मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. माझ्या सारख्या अनेक जणी आहेत.‘
‘गर्भवती असतानाच माझा घटस्फोट झाला. नवरा मला सोडून गेला आहे. भविष्यात कसे होणार याची काळजी लागली आहे. माझ्या वयात मला खेळता येत नाही, याचे दुःख आहे,‘ असे पंधरा वर्षीय दियाना सांगते.
लोरेना व दियाना या दोघी केवळ उदाहरणे आहेत. यांच्या सारख्या अनेक मुली लहान वयातच माता बनत आहेत. सन 2013 मध्ये 15.6 टक्के अल्पवयीन मुली माता बनल्या आहेत. सन 2014 मध्ये 18,600 अल्पवयीन मुली माता बनल्या आहेत. त्यांची वये 12 ते 15 दरम्यान आहेत, अशी माहिती युरोपियन युनियनने प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, अल्पवयात माता बनलेल्या व घटस्फोट झालेल्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदविली आहे. पुन्हा विवाह न करण्याचा व मुलांना जन्म न घालण्याचा निर्णय घेत आहेत.

No comments:
Post a Comment