Saturday, 14 May 2016

नमस्कार लाईव्ह १४-०५-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- वॉशिंग्टन; भारतीय सीमेजवळच्या सैन्य तुकडया कमी करा, अमेरिकेचा चीनला इशारा 
२- ढाका; बांगलादेशमध्ये बौद्ध भिक्‍खूची हत्या 
३- एफ-16 व्यवहारात भारत आणतय अडथळा-अझिज 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- कोइम्बतुर; तीन कंटेनर भरुन नोटा, तामिळनाडू निवडणुकीत नोटांचा पाऊस 
५- लोकल का खोळंबली, पूर्ववत कधी होणार, सर्व काही प्रवाशांना कळणार 
६- रिलायन्स नागपूरमध्ये करणार प्रवासी विमानांचे उत्पादन 
७- 'सर्वांचे भले व्हावे' हे भारताचे ब्रीद- नरेंद्र मोदी 
८- आर. के. पचौरींविरोधात पुरेसे पुरावे - न्यायालय 
९- भाजपशासित राज्यांत पत्रकारांवर हल्ले: कॉंग्रेस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- कसारा घाटात गॅसगळती, नाशिक-मुंबई वाहतूक ठप्प 
११- जमिनीच्या मोबदल्यासाठी सचिनच्या घरासमोर उपोषण 
१२- विमानाचा टायर फुटला, मुंबई विमानतळाचा मुख्य रनवे बंद 
१३- औरंगाबाद; तुमच्या पासवर्डची होतेय हेरगिरी 
१४- बिहारची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न - जदयू 
१५- नागपूर; मंत्रालयात काढा वाघासोबत सेल्फी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- मुंबई; दीड तासाच्या खोळंब्यानंतर लोकल वाहतूक सुरु 
१७- बरेली; लंगूर माकडाचा आवाज काढता येतो? मग इथे नोकरी नक्की मिळेल.,, 
१८- नागपूर; खरे आव्हान घाण लोटणारे 80 नाले! 
१९- नाशिकमध्ये दुचाकी जळीतसत्र सुरूच 
२०- फलटण तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी 
२१- लोणावळा:द्रुतगती मार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू 
२२- पाटणा; बिहारमध्ये रेल्वे पोलिसांवर गोळीबार; एकाचा मृत्यू 
२३- नागपूर वर्षातील सर्वात गरम दिवस, ४५.६ अंश सेल्सिअस 
२४- सोलापूर ट्रॅक्टर कालव्यात पडून मुलगा ठार, टाकली (ता. मोहोळ ) येथील घटना. 
२५- बिहार सिवानमध्ये पत्रकाराच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक 
२६- जुळे सोलापूरात खासगी बसने घेतला पेट. ही बस महाविद्यालयतील विद्यार्थी घेऊन जात होती.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- सुरेश रैनाच्या घरी नन्ही परी 
२८- 'त्या' संवादामुळे प्रणिता पवार यांची नागराज मंजुळेंना नोटीस 
२९- 'बीसीसीआय'चा नवा अध्यक्ष 22 मे रोजी ठरणार 
३०- आयसीसीच्या क्रिकेट समितीवर द्रविडची निवड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करव, कारण जे लोक नेहमी फुले वाटतात, त्यांच्या हातांना नेहमी सुगंध दरवळत असतो
[महेश आल्हाट]
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

==================================================

तीन कंटेनर भरुन नोटा, तामिळनाडू निवडणुकीत नोटांचा पाऊस

तीन कंटेनर भरुन नोटा, तामिळनाडू निवडणुकीत नोटांचा पाऊस
कोईम्बतूर: विधानसभा निवडणूक होत असलेल्या तामिळनाडूत चक्क नोटांनी भरलेले तीन ट्रक जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत मतदारांना रोख रूपयाचं आमिष दाखवलं जाऊ नये यासाठी प्रशासनाने नोटांचे चोरटे व्यवहार आणि वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन केली आहेत. यापैकी एका भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ही रक्कम पकडण्यात आली.

प्राथमिक तपासानंतर ही रक्कम तब्बल 570 कोटी रूपये असल्याचं सांगितलं जातंय. तीन ट्रक कंटेनरमध्ये ही रक्कम वाहून नेली जात होती. तसंच ही रक्कम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मालकीची असून कोईम्बतूरहून विशाखापट्टणमला नेली जात होती.

तिरूप्पुर जिल्ह्यातील पैरूमन्नलूर-कुन्नातूर मार्गावर भरारी पथकाने केलेल्या कारवाईत पैशाची वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेण्यात आले. आता या रकमेची चौकशी सुरू झालीय.
570 crore trucks-new
तामिळनाडूतील निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पैशाने भरलेल्या या तीन ट्रकसोबत साध्या वेशात आंध्र प्रदेश पोलीस आणि स्टेट बँकेचे अधिकारीही होते. भरारी पथकाने या ट्रक अडविण्याचा प्रयत्न केल्यावर ट्रक डायव्हर्सनी हे ट्रक जोरात पळवले. त्यामुळे भरारी पथकाचा संशय बळावला आणि मग या ट्रकचा पाठलाग करून त्या ताब्यात घेण्यात आल्या.

या ट्रकची पाहणी केल्यावर त्यामध्ये तब्बल 570 कोटी रूपयांच्या नोटा असल्याचं उघड झालं. या नोटांची वाहतूक करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्स तसंच त्या सोबत असलेल्या आंध्र प्रदेश पोलीस किंवा स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांकडे पुरेशी कागदपत्रे नव्हती. त्यामुळे ही रक्कक असलेले तीनही ट्रक तिरूप्पूर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तामिळनाडूतील एका शाखेतून आंध्रातल्या दुसऱ्या शाखेत एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम पाठविण्याची आवश्यकता का पडली.. एवढी मोठी रक्कम वाहून नेण्यापूर्वी दोन्ही राज्यांच्या पोलिसांना अधिकृतपणे का कळवण्यात आलं नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

या सर्व प्रश्नांचा तपास करण्यासाठी तिरूप्पूर जिल्हा प्रशासनाने भारतीय रिझर्व बँक, आयकर अधिकारी, दोन्ही राज्यांचे पोलीस आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती बनवली आहे.

तिरूप्पूर जिल्हा प्रशासनाने या पैशाने भरलेल्या ट्रकच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दल तैनात केलं आहे.
==================================================

कसारा घाटात गॅसगळती, नाशिक-मुंबई वाहतूक ठप्प

कसारा घाटात गॅसगळती, नाशिक-मुंबई वाहतूक ठप्प
नाशिक :  कसारा घाटात टँकर उलटल्यामुळे नाशिक-मुंबई दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. गॅस टँकरला आज सकाळी लतीफवाडीजळ अपघात झाला. त्यामुळे त्यातून गळती सुरु झाल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक रोखण्यात आली आहे.

जमिनीच्या मोबदल्यासाठी सचिनच्या घरासमोर उपोषण

जमिनीच्या मोबदल्यासाठी सचिनच्या घरासमोर उपोषण
Sachin Tendulkar Amit enterprises (File photo)
मुंबई बिल्डरने वेळेत घरं न दिल्याने, टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि आम्रपाली ग्रुपचा रद्द झालेल्या कराराचं प्रकरण ताजं आहे. त्यातच आता दुसऱ्या एका कंपनीसोबतच्या वादात, आता मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव आलं आहे.

सचिन ज्या कंपनीचा ब्रँड अम्बेसेडर होता, त्या  ‘अमित एण्टरप्रायझेस’ने सुमारे दोन कोटीची जमीन अवघ्या 20 लाखात हडपल्याचा आरोप संदीप कुऱ्हाडे यांनी केला आहे. त्यामुळे आता सचिनने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी संदीप यांनी केली आहे. या मागणीसाठी सचिनच्या मुंबईतील घरासमोर 18 मेपासून उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

काय आहे प्रकरण?
पाटे कुटुंबीयांच्या ‘अमित एण्टरप्रायझेस’ या कंपनीने चार वर्षांपूर्वी संदीप कुऱ्हाडे यांच्या मामासोबत जमिनीचा व्यवहार केला होता.  पुणे जिल्हातील आंबेगाव इथंली ही जमीन संदीप कुऱ्हाडे यांच्या आजोबांच्या नावे होती. त्यामुळे वारसा हक्काने संदीप यांच्या मामासोबत आईचं नावही या जमिनीवर होतं.
“या जमिनीच्या मोबदल्यात ‘अमित एण्टरप्रायझेस’ने संदीपचे मामा शिवाजी पिंजन यांना केवळ 20 लाख रुपये दिले. मात्र या जमिनीची किंमत 2 कोटी आहे”, असा दावा संदीप यांचा आहे.
==================================================

सुरेश रैनाच्या घरी नन्ही परी, नाव ठेवलं...

सुरेश रैनाच्या घरी नन्ही परी, नाव ठेवलं...
मुंबई : टीम इंडियाचा क्रिकेटर सुरेश रैनाच्या घरी छोट्या पाहुणीचं आगमन झालं आहे. त्याची पत्नी प्रियांकाने मुलीला जन्म दिला आहे. मात्र रैनाने यासंदर्भात काहीही सांगितलं नाही. पण सोशल मीडियावर याबाबतची चर्चा सुरु आहे. 
सुरेशाने रैनाने मुलीचं नाव श्रेयांशी ठेवलं आहे. रैना बाबा बनल्याचं समजताच सोशल मीडियावर चाहत्यांना त्याला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. सुरेश आणि प्रियांका दोघेही हॉलंडमध्ये आहेत. सुरेश रैनाने कालच प्रेग्नंट पत्नीसह फोटो शेअर केले होते.
==================================================

लोकल का खोळंबली, पूर्ववत कधी होणार, सर्व काही प्रवाशांना कळणार

लोकल का खोळंबली, पूर्ववत कधी होणार, सर्व काही प्रवाशांना कळणार
मुंबई लोकलसाठी ताटकळत उभं राहणाऱ्या मुंबईकरांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून लोकल खोळंबली तर त्याचं कारण आणि लोकलसेवा पूर्ववत होण्यास लागणारा वेळ या दोन्ही गोष्टी आता प्रवाशांना चुटकीसरशी कळणार आहेत.

रेल्वे खोळंबली तर ती कशामुळे खोळंबली हे सांगणारे फलक स्टेशनवर लागणार आहेत. तसंच, रेल्वेसेवा पूर्ववत होण्यास आणखी किती वेळ लागणार हे सुद्धा प्रवाशांना कळणार आहे. प्रवाशांच्या तक्रारीला तात्काळ उत्तर मिळावं आणि स्टेशन मास्तरांमागची डोकेदुखी कमी करण्यासाठी ही सुविधा करण्यात येणार असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं.

रेल्वेसाठी सुरु असणाऱ्या विकासकामांच्या फलकांचाही यात समावेश असेल.
==================================================

विमानाचा टायर फुटला, मुंबई विमानतळाचा मुख्य रनवे बंद

विमानाचा टायर फुटला, मुंबई विमानतळाचा मुख्य रनवे बंद
मुंबई : विमानाचे टायर फुटल्याने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुख्य रनवे अजूनही बंद आहे. यामुळे सध्या दुसऱ्या रनवेचा वापर करण्यात येत आहे. परिणामी काही उड्डाणं रद्द तर काही विमानं वळवण्यात आली आहे.


म्युनिचवरुन येणारं लुफ्तान्झा एअरलाईन्सचं एअरबस A330 या विमानाचे टायर शुक्रवारी रात्री 10.45 फुटले. लँडिंगच्या वेळी चार टाय फुटल्याने विमान धावपट्टीवरच अडकलं. सर्व 163 प्रवाशांना सुखरुपरित्या बाहेर काढलं असलं तरी विमान अजूनही तिथेच अडकलं आहे.


मात्र यामुळे चार आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तर एक विमान हैदराबादला वळवण्यात आलं आहे.
==================================================

'त्या' संवादामुळे प्रणिता पवार यांची नागराज मंजुळेंना नोटीस

'त्या' संवादामुळे प्रणिता पवार यांची नागराज मंजुळेंना नोटीस
मुंबई : आर्ची-परशाचा सैराट सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. पण या सिनेमातील एका संवादामुळे सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

‘सैराट’मधील परशा आणि शिक्षक यांच्यात झालेल्या संवादात आक्षेपार्ह वाक्य होतं, असं सांगत सिनेनिर्माता प्रणिता पवार यांनी वकिलामार्फत नागराज मंजुळे यांना नोटीस पाठवली आहे.
Sairat
या संवादामुळे स्त्री-जातीच्या आणि समाजाच्या भावना दुखावल्याचं नोटीसमध्ये म्हटलं आहे. नागराज मंजुळेंनी माध्यमासमोर येऊन समाजाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर  फौजदारी खटला दाखल करु, असा इशारा पवार यांनी दिला आहे.

परशाला कॉलेजातून काढल्याचं शिक्षक सांगतात. त्यावेळी परशा आणि शिक्षक यांच्यात झालेल्या संवादामुळे स्त्रियांच्या भावना दुखावल्याचा आरोप प्रणिता पवार यांनी केला आहे.
==================================================

दीड तासाच्या खोळंब्यानंतर लोकल वाहतूक सुरु

दीड तासाच्या खोळंब्यानंतर लोकल वाहतूक सुरु
मुंबई : तब्बल दीड तासाच्या खोळंब्यानंतर पश्चिम मार्गावरील लोकल वाहतूक सुरु झाली आहे. अंधेरी स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत झालेला दुरुस्त करण्यात प्रशासनाला यश आलं. परंतु बिघाड दुरुस्त झाला असला तरी लोकलसेवा एक तास उशिराने सुरु आहे.   
दरम्यान, मुंबईकरांची लाईफलाईन अर्थात लोकल ट्रेन सलग तिसऱ्या दिवशी विस्कळीत झाली होती. अंधेरी स्टेशनजवळ स्लो ट्रॅकवरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अप आणि डाऊन मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. लोकल ट्रेन अंधेरी ते जोगेश्वरीदरम्यान उभ्या होत्या. 
मात्र या बिघाडामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. स्टेशनवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
==================================================

रिलायन्स नागपूरमध्ये करणार प्रवासी विमानांचे उत्पादन


  • - मिहानमध्ये 6,500 कोटी रुपयांचा प्रकल्प
    - 25 वर्षातली पहिलीच भारतीय कंपनी
    - युक्रेनमधल्या अंतोनोव्हशी केला भागिदारी करार
    ऑनलाइन लोकमत
    हैदराबाद, दि. 14 - रिलायन्स डिफेन्स ही अनिल अंबानी समूहाची कंपनी भारतामध्ये प्रवासी विमानांचे उत्पादन करणार आहे. युक्रेनमधल्या अंतोनोव्ह या कंपनीशी संयुक्त भागिदारी करून भारतामध्ये 50 ते 80 आसनक्षमता असलेल्या प्रवासी वाहतुकीच्या विमानांचे उत्पादन करण्याचे कंपनीने निश्चित केल्याचे रिलायन्स डिफेन्सचे अध्यक्ष एम. माथेश्वरन यांनी सांगितले. जगातलं सगळ्यात मोठं मालवाहतूक करणारं अंतोनोव्हचं विमान म्रिया दी ड्रीम शुक्रवारी भारतात लँड झाले असून या पार्श्वभूमीवर माथेश्वरन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
==================================================

लंगूर माकडाचा आवाज काढता येतो? मग इथे नोकरी नक्की मिळेल.,,


  • ऑनलाइन लोकमत
    बरेली, दि. १४ - माकडांचा त्रास कमी व्हावा, त्यांना हुसकावून लावण्यासाठी उत्तर प्रदेशमधील बरेली शहरातील महापालिकेने आत्तापर्यंत लाखो रुपये खर्च केले आहेत, मात्र तरीही माकडांचा उपद्व्याप कमी न झाल्याने महापालिकेने आता नवी शक्कल लढवली आहे. माकडांना हुसकावण्यासाठी त्यांनी 'लंगूर मॅन'चा शोध सुरू केला आहे. वाचून आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे.. 
    खरतर आजकालची माकडं ही मनुष्याला जास्त घाबरत नाहीत पण आपल्याच जातीतील लंगूरांना (माकडाचा एक प्रकार) पाहून वा त्यांचा आवाज ऐकून ते धूम ठोकतात. त्यामुळे आता पालिका अधिकारी अशा व्यक्तीचा शोध घेत आहेत, ज्याला लंगूरसारखा आवाज काढता येईल. याआधीही हा प्रयोग यशस्वी ठरला होता आणि माकडे पळून गेली होती. त्यामुळे आता बरेली शहरात हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. 
    महापालिका अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका एनजीओच्या मदतीने आगरा, एटा व कासगंज येथे लंगूरचा आवाज काढणा-या व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. त्यांचा आवाज ऐकूनच उपद्रव देणारी माकडं पळून जातात. त्यामुळे यावेळी महापालिकेने ज्या ठेकेदाराला माकडं पकडण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे, त्यात हे 'लंगूर मॅन'ही सहभागी होणार आहेत. ज्या निवासी परिसरात माकडांचा सर्वाधिर उपद्रव होतो, ही लोकं तेथे जाऊन त्या माकडांना शहराच्या बाहेर पळवून लावतील. व त्यानंतर तेथे उपस्थित असलेली टीम या माकडांना पकडून त्यांना जंगलात सोडून येईल, अशी माहिती अधिका-यांनी दिली.
==================================================

भारतीय सीमेजवळच्या सैन्य तुकडया कमी करा, अमेरिकेचा चीनला इशारा


  • ऑनलाइन लोकमत 
    वॉशिंग्टन, दि. १४ - चीन आपली संरक्षण सिद्धता वाढवत चालला असून, भारताला लागून असणा-या सीमेवर चीन सैनिकांची संख्या वाढू लागली आहे. भारताची कोंडी करण्यासाठी चीनकडून उचलल्या जात असलेल्या या पावालांची अमेरिकेने गंभीर दखल घेतली आहे. अमेरिकेने चीनला भारतीय सीमेवरील  वाढती सैन्य संख्या कमी करण्यासाठी इशारा दिला आहे. 
    जगाच्या विविध भागात लष्करी विस्तार करण्यावर चीनने लक्ष केंद्रीत केले आहे विशेष करुन पाकिस्तानी भूभागात चीनी सैन्याचा वावर मोठया प्रमाणात वाढला आहे. अमेरिकेचे चीनच्या या सर्व हालचालींवर बारीक लक्ष आहे. भारतीय सीमेजवळ चीन आपली सैन्य संख्या वाढवत असल्याचे आमच्या लक्षात आले आहे असे ईस्ट एशियाचे विषयाचे अब्राहम एम डेनमार्क यांनी सांगितले. 
    चीनच्या लष्करी विस्तारासंबंधीचा एक वार्षिक अहवाल पेंटागॉनने अमेरिकन काँग्रेसला दिला आहे. चीनच्या या हालचालींमागचा नेमका उद्देश काय आहे त्याचा निष्कर्ष काढणे कठीण आहे असे डेन्मार्क यांनी सांगितले. आम्ही भारताबरोबर व्दिपक्षीय संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. यामागे फक्त चीन एकमेव कारण नाही तर, भारत आमचा महत्वाचा सहकारी देश आहे. भारताच्या मुल्यांमुळे आमचे संबंध दृ्ढ होत आहेत असे डेन्मार्क यांनी सांगितले. 
==================================================
'सर्वांचे भले व्हावे' हे भारताचे ब्रीद- नरेंद्र मोदी

उज्जैन - ‘सर्वांचे भलेFile Photo व्हावे‘ हे भारतीय संस्कृतीच्या मुळामध्ये रुजलेले ब्रीद असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्जैन येथील सिंहस्थ विचार कुंभ या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, "आंतरराष्ट्रीय समस्यांचे उत्तर भारताकडे आहे. दहशतवाद आणि ग्लोबल वॉर्मिंग या जगातील सगळ्यात मोठ्या समस्या असून भारतीय संस्कृती या समस्यांचा सामना करण्यास समर्थ आहे.‘ कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनाविषयी बोलताना मोदी यांनी भारतातील कुंभमेळ्याचा व्यवस्थित प्रचार-प्रसार होणे आणि त्यातून पर्यटकांना कुंभमेळ्याकडे आकर्षित करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

मोदी पुढे म्हणाले, "गरीबांना अन्न मिळावे म्हणून भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी आठवड्यातून एकदा उपवास करण्याचे आवाहन केले होते. आमच्या सरकारने त्या विचारांतून प्रेरणा घेऊन लोकांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची सवलत सोडून देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने आता सवलतीवर खर्च होणारी कोट्यवधींची रक्कम ज्यांच्याकडे कनेक्‍शन नाही त्यांना स्वस्तात कनेक्‍शन देण्यासाठी उपयोगात आणली जात आहे. प्रत्येक घरात गॅस कनेक्‍शन असेल तर स्वयंपाकासाठी जाळले जाणारे लाकूड वाचेल आणि निसर्गाची हानी टळेल‘ यावेळी काही ऐतिहासिक उदाहरणे देत कर्माचे महत्त्वही मोदींनी विषद केले.
==================================================
खरे आव्हान घाण लोटणारे 80 नाले!

नागपूर : ‘मिशन क्‍लीन नाग रिव्हर‘ जोरा-सोरात सुरू झाले. महापालिका वेगाने कामाला लागली. परंतु, स्वच्छता अभियानाच्या या मार्गात खरे आव्हान उभे ठाकले आहे ते घाण वाहून आणणाऱ्या लहानमोठ्या 80 नाल्यांचे. नागनदी स्वच्छता अभियानाच्या पाचव्या दिवशीही नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर गाळ उपसण्यात आला. विविध भागांतून गाळ उपसण्यात येत असल्याने नदीपात्रासह पाण्याचा प्रवाह सुरळीत होत असल्याचे दिसून येते.

सकाळ प्रतिनिधीने या कामादरम्यान वेध घेतला असता, नागनदीशी छोटे-मोठे एकूण 80 नाले आणि सिवरेज लाइन जोडल्याचे स्पष्ट झाले. शहरातील घाण नाल्यांद्वारे नागनदीत सोडली जात आहे. परिणामी कीतीही गाळ उपसला जात असला तरी नदी पात्रात लोटले जाणारे प्रदूषण कायम आहे. हे सर्व नाले, सिवरेज लाइन आणि मलवाहिन्यांना आवर घालणे आवश्‍यक आहे. नाल्यांना आवर घालण्यासह नदी परिसरातील अतिक्रमणही मोठे आव्हान ठरले आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने आज पोकलेन उपलब्ध करून दिले. उद्या आणखी शासकीय व निमशासकीय विभागांकडून स्वच्छता अभियानासाठी पोकलेन आणि जेसीबी उपलब्ध करून दिले जाणार आहे. मदतीचा हा ओघ लक्षात घेता. सोमवारपर्यंत अभियानला वेग येऊन सर्वच टप्प्यांमध्ये कामाची गती वाढणार आहे. 
==================================================
आर. के. पचौरींविरोधात पुरेसे पुरावे - न्यायालय

नवी दिल्ली - लैंगिक शोषणाचा आरोप असलेले द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूटचे (टेरी) माजी चेअरमन आर. के. पचौरी यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचे आज (शनिवार) दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

पचौरी यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. यामध्ये त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे सादर करण्यात आले आहेत. पचौरी यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी 23 जणांची साक्ष घेऊन काही संदेशांच्या आधारे आरोपपत्र दाखल केलेले आहे. 

दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडे ते साक्षीदारावर प्रभाव टाकत आहेत आणि अधिकाराचा गैरवापर करत असल्याचे यापूर्वी म्हटले होते. ‘टेरी‘च्या कार्यकारी मंडळावरूनही पचौरी यांना हटविण्यात आले आहे. दोन महिला कर्मचाऱ्यांनी पचौरी यांनी आपला लैंगिक छळ केल्याचे आरोप केले आहेत.
==================================================
भाजपशासित राज्यांत पत्रकारांवर हल्ले: कॉंग्रेस

नवी दिल्ली : बिहार आणि झारखंडमध्ये दोन पत्रकारांची हत्या झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर आज (शनिवार) टीकास्त्र सोडले. ‘भाजपशासित राज्यांमध्ये पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत आहेत, याविषयी केंद्र सरकारेने आत्मपरीक्षण करावे,‘ अशी टीका कॉंग्रेसने केली.

कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, "बिहारमध्ये काही अज्ञातांनी एका पत्रकारावर गोळीबार करून त्याची हत्या केली. भाजपची सत्ता असलेल्या झारखंडमध्येही आणखी एका पत्रकाराची हत्या झाली. बिहारमध्ये झालेल्या हत्येप्रकरणी तेथील मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे आणि दोघांना ताब्यातही घेण्यात आले आहे. भाजपही झारखंडमध्ये हाच कित्ता गिरवेल, अशी आशा आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे.‘‘

भाजपचीच सत्ता असलेल्या राज्यांमध्ये पत्रकारांवर हल्ले होत असल्याचा आरोप करून ‘या मुद्यावर भाजपने आत्मपरीक्षण करावे‘ असेही सुरजेवाला म्हणाले. यापूर्वी झारखंडमध्येच 2013-14 मध्ये दोन पत्रकारांची हत्या झाल्याचा उल्लेख सुरजेवाला यांनी केला. ‘व्यापमं गैरव्यवहाराचे वार्तांकन करत असताना मध्य प्रदेशमध्ये ‘आज तक‘चे बातमीदार अक्षयसिंह यांचीही हत्या झाली होती. त्या प्रकरणाच्या तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही. मध्य प्रदेशमधीलच खाण माफियाच्या हल्ल्यात एका पत्रकाराला जिवंत जाळण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने अशा प्रकरणांवर उत्तर दिलेच पाहिजे,‘ अशी मागणीही सुरजेवाला यांनी केली.
==================================================
तुमच्या पासवर्डची होतेय हेरगिरी

औरंगाबाद : नेटसर्फिंग असो वा एखाद्या साईटवर माहिती फिलअप करणे असो, कोणतेही गाणे, गेम अथवा व्हिडिओ डाऊनलोड करताना फसव्या वेबसाईटवरून "फ्री‘ घेण्याच्या फंदात पडू नका. अधिकृत वेबसाईटवरूनच सॉफ्टवेअर, गाणी डाऊनलोड करा, तुम्ही टेक्‍नोसॅव्ही असालही; पण सायबर हॅकर्स तुमच्यापेक्षाही चतुर आहेत. तुमचा पासवर्ड, माहिती चोरण्याचे प्रयत्न ते करू शकतात.

पारंपरिक गुन्ह्यांचे स्वरूप आता बदलत असून विनयभंग, फसवणूक व छेडछाडीचे प्रकार आता सोशल साईटसवर होऊ लागले आहेत. महिला, मुलींना जॉब ऑफर देण्यापासून ते त्यांची फसगत करेपर्यंत हे भामटे सक्रिय झाले आहेत. सायबर क्राईम करणाऱ्यांसाठी अख्खे जग खुले असल्याने या गुन्ह्यांची व्याप्ती वाढत आहे. सोशल वेबसाईटवर खाते उघडण्यापासून ते विविध वेबसाईटस्‌ सर्फिंग करून त्यात माहिती फिलअप करण्यापर्यंत आपण प्रवास करतो. अशावेळी या साईटस्‌ नियंत्रित करणारे आपली माहिती चोरण्याची शक्‍यता असते. फेसबुकचा पासवर्ड चोरून फोटो विद्रुप करून प्रसिद्धही केले जात आहेत. त्यावरील छायाचित्रांचा अश्‍लील वेबसाईटसाठी वापर केला जात आहे. 
==================================================
बिहारची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न - जदयू

नवी दिल्ली - हिंदुत्ववादी पक्षाच्या नेत्यांची मानसिकता बिहारविरोधी असून त्यामुळे बिहारच्या प्रतिष्ठेला धक्का पोचत असल्याची टीका संयुक्त जनता दलाने केली आहे.

राजस्थानमधील सत्य प्रकाश नावाच्या विद्यार्थ्यांची हत्या झाली आहे. ही हत्या बिहारमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या समूहाने केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेबाबत बोलताना भारतीय जनता पक्षाचे आमदार भवानी सिंग राजवट यांनी बिहारी विद्यार्थ्यांवर टीका केली. ते म्हणाले, "शहरातील विविध कोचिंग क्‍लासेसमध्ये नोंद केलेल्या बिहारी विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांची पार्श्‍वभूमी तपासण्याची गरज आहे.‘ तसेच बिहारी विद्यार्थी गुन्हेगारी वातावरण तयार करत असल्याचेही ते म्हणाले. या पार्श्‍वभूमीवर संयुक्त जनता दलाने भाजपवर निशाणा साधला आहे. ‘ही दु:खद घटना आहे. मात्र यातून बिहारचे प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.‘ तसेच आरोपांचे राजकारण करण्यापेक्षा राजस्थान सरकारने गुन्ह्याचा तपास करावा, असे वक्तव्य संयुक्त जनता दलाचे नेते अली अन्वर यांनी म्हटले. तर संयुक्त जनता दलाचे नेते के.सी. त्यागी यांनी, ‘हिंदुत्ववादी पक्षाच्या नेत्यांची मानसिकता ही बिहारविरोधी आहे‘ अशी टीका केली.
==================================================
मंत्रालयात काढा वाघासोबत सेल्फी

नागपूर : सेल्फी, सेल्फी... सध्या सेल्फीची इतकी क्रेझ वाढली आहे की, प्रसंग आणि आजूबाजूची परिस्थिती काहीही असो; पण एक सेल्फी झालाच पाहिजे. आपला सेल्फी कसा उत्तम येईल, यासाठी प्रयत्न करीत असतो, ही क्रेझ लक्षात घेता वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी वाघासोबत सेल्फी काढण्याची नवी युक्ती लढविली आहे. त्यासाठी मंत्रालयात वाघाची प्रतिकृती कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून बांधकाम विभागाला जागेची मागणी केली आहे.

वन व वन्यजीवप्रेमींना आणि इतरांनादेखील वाघासारख्या दिसणाऱ्या सुंदर आणि राजबिंड्या प्राण्यासोबत फोटो घेण्याचे सर्वांना आकर्षण असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मुलींसोबत सेल्फी काढून बेटी बचाव अभियानाचा संदेश जगभर दिला होता. त्याच धर्तीवर वाघाचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी मुनगंटीवार यांनीही नवीन उपक्रम हाती घेतला आहे.
मानव, वने, वन्यजीव आणि पर्यावरण याचे जवळचे नाते आहे. जीवसृष्टीसाठी शुद्ध हवा, पाणी, सकस अन्न या तिन्हीचा आधार वनेच आहेत. सजीवसृष्टीच्या निर्मितीपासून माणसाला याची जाणीव आहे. वृक्ष, वन्यजीव, जैवविविधता याचा मानवी जीवनावर अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन याचे सुयोग्य नियोजन आणि संवर्धन करण्यासाठी वनमंत्र्यांनी तीन वर्षांचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यात याचा समावेश आहे. 
==================================================
नाशिकमध्ये दुचाकी जळीतसत्र सुरूच

नाशिक - नाशिकमध्ये दुचाकी जळीतसत्र सुरुच असून, शहरातील सिडको परिसरातील निलांजन नील या सोसायटीत आज (शनिवार) पहाटे सहा दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिडको परिसरातील निलांजन नील सोसायटीत सहा दुचाकींना आग लावल्याने या दुचाकी भस्मसात झाल्या आहेत. दुचाकी जाळून पळताना चार ते पाच जणांना स्थानिक नागरिकांनी पाहिले. दोन दिवसांपूर्वी यशवंत मार्केट परिसरातील समाज मंदिरालगत याच परिसरात 5 दुचाकी जाळल्या होत्या. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.
==================================================
बांगलादेशमध्ये बौद्ध भिक्‍खूची हत्या
-

File Photoढाका (बांगलादेश) - बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांच्या हत्यांमध्ये वाढ होत असतानाच आज (शनिवार) एका बौद्ध भिक्‍खूची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.

बांगलादेशमधील दक्षिण-पूर्व भागातील बंदारबन जिल्ह्यात एका 75 वर्षांच्या बौद्ध भिक्‍खूची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अलिकडच्या काळात बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक समुदायाच्या आणि समाजवादी कार्यकर्त्यांच्या हत्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच ही घटना समोर आली आहे.  ‘ग्रामस्थांना भिक्‍खू (भंते) मोंग शु यु चाक यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बौद्ध विहारात आढळला. त्यांची हत्या करण्यात आली होती‘, अशी माहिती बंदारवनचे पोलिस उपप्रमुख जश्‍मीम उद्दीन यांनी दिली
==================================================
फलटण तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

फलटण - फलटण शहरात शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यापूर्वी तालुक्याच्या पूर्व भागात वादळ वाऱ्याने मोठे नुकसान झाले. फलटण शहराजवळ वीज पडून दोन शेळ्या ठार, एक जखमी झाली आहे. तहसीलदार भोईटे यांनी गावकामगार तलाठ्यांना सजात जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.

निंबळक, गुणवरे, आसू, पवारवाडी, हनुमंतवाडी, शिंदेनगर, राजुरी, आंदरुड परिसरात वादळ वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे. यापैकी काही ठिकाणी हलक्या पावसाने वाढते तापमान कमी होण्याइतपत दिलासा दिला आहे. आंदरुड येथे शिवाजी तुकाराम अडागळे आपल्या 12 ते 15 शेळ्या चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने अडागळे यांनी आपल्या शेळ्या आडोशाला झाडाखाली आणल्या. तेवढ्यात तेथे वीज पडून दोन शेळ्या जागीच ठार झाल्या तर एक गंभीर जखमी झाल्या. 

आज (शनिवार) सकाळी संपलेल्या 24 तासांत फलटण शहर व तालुक्यात झालेला पाऊस मि. मी.मध्ये खालीलप्रमाणे - फलटण 33, आसू 9, बरड 11, तरडगाव 4, आदर्की 15, गिरवी-राजाळे 30, वाठार निंबाळकर 36.
==================================================
'बीसीसीआय'चा नवा अध्यक्ष 22 मे रोजी ठरणार

मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 22 मे रोजी मुंबईत विशेष सर्वसाधारण सभेचे (एसजीएम) आयोजन केले असून, या सभेत बीसीसीआयच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.

गोवा क्रिकेट संघटनेचे महासचिव विनोद फडके यांनी या सभेचे आयोजन केल्याची माहिती दिली. लोढा समिती शिफारशींच्या अंमलबजावणीवरून सर्वोच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यांना सामारे जावे लागत असलेल्या बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी मंगळवारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनतर त्यांची आयसीसीच्या कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. 

जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर मनोहर ऑक्‍टोबर 2015 मध्ये दुसऱ्यांदा बीसीसाआयचे अध्यक्ष झाले होते. बीसीसीआयच्या घटनेनुसार अध्यक्षपदाच्या व्यक्तीने राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा 15 दिवसांत घेऊन अध्यक्ष निवडण्यात येतो. त्यानुसार या सभेचे आयोजन केले आहे. रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी विद्यमान सचिव अनुराग ठाकूर यांना सर्वाधिक पसंती मिळण्याची शक्‍यता आहे. आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्‍ला, तसेच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्केही शर्यतीत असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. परंतु नव्या अध्यक्षांची निवड लोढा समितीच्या शिफारशीनुसार होणार का? याकडे केवळ भारतीय क्रिकेट वर्तुळाचेच नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचेही लक्ष असेल.
==================================================
लोणावळा:द्रुतगती मार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ आज (शनिवार) सकाळी तवेरा गाडीला झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोघेजण जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या तवेरा गाडीचालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून खाली गेल्याने झाडाला धडकली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, मृतात एका महिलेचा समावेश आहे. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला.
==================================================
एफ-16 व्यवहारात भारत आणतय अडथळा-अझिज
-

इस्लामाबाद - पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील ‘एफ-16‘ लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहार होऊ न देण्यासाठी भारतीय लॉबी अतोनात प्रयत्न असल्याचा आरोप पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अझिज यांनी केला आहे.

‘एफ-16‘ लढाऊ विमानांच्या खरेदी प्रकरणावरून पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील परराष्ट्र संबंधात तणाव निर्माण झाला आहे. "एफ-16‘ प्रकारच्या आठ लढाऊ विमानांच्या खरेदीप्रकरणी पाकिस्तानला अंशदान (सबसिडी) देण्यास नकार देत अमेरिकी कॉंग्रेसच्या (संसद) काही सदस्यांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे पाकिस्तानला अंशदान देण्याचा प्रस्ताव अमेरिकेने रद्द केल्यामुळे हा व्यवहार अडचणीत सापडला आहे.

पाकिस्तानच्या सिनेटसमोर बोलताना अझिज म्हणाले की, अमेरिकेतील सिनेटर रँड पॉल यांनी एफ-16 च्या लढाऊ विमानांच्या खरेदीप्रकरणी पाकिस्तानचा अंशदान न देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे हे अंशदान रोखण्यासाठी भारतीय लॉबी खूप मेहनत घेत असल्याचे स्पष्ट दिसते. परिणामी पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे.
==================================================
बिहारमध्ये रेल्वे पोलिसांवर गोळीबार; एकाचा मृत्यू

पाटणा - मुगलसराय-बक्सर पॅसेंजर रेल्वेत गस्तीवर असलेल्या दोन रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हेगारांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एक पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बक्सर जिल्ह्यातील चौसा स्थानकाजवळ ही घटना घडली. मध्यरात्री बाराच्या सुमारास पाच ते सहा गुन्हेगारांनी पोलिस कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात अभिषेक सिंह या जवानाचा जागीच मृत्यू झाला. तर, नंदलाल यादव हा जवान गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोळीबारानंतर गुन्हेगार या दोघांच्या बंदुका घेऊन पसार झाले.

या गोळीबाराची माहिती मिळताच रेल्वेचे पोलिस अधीक्षक जितेंद्र मिश्रा यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. बिहारमध्ये शुक्रवारी एका पत्रकाराचीही हत्या करण्यात आली होती. त्यामुळे विरोधी पक्षांकडून बिहारमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
==================================================
आयसीसीच्या क्रिकेट समितीवर द्रविडची निवड

दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने यांची क्रिकेट समितीवर निवड केली. या समितीच्या कार्याध्यक्षपदी अनिल कुंबळेची फेरनिवड करण्यात आली.

आयसीसीने शुक्रवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे हे निर्णय जाहीर केले. या समितीत ऍण्ड्रयू स्ट्रॉस, केविन ओब्रायन आणि डॅरेन लीमन यांचाही समावेश आहे. द्रविडने श्रीलंकेच्या कुमार संगकारा, तर जयवर्धने याने मार्क टेलर यांची जागा घेतली. तीन वर्षांचा कालावधी संपल्यामुळे भारताच्या एल. शिवरामकृष्णन हेदेखील समितीतून बाहेर पडले असून, त्यांच्या जागी टीम मे यांची निवड करण्यात आली.
खेळाडूंच्या बरोबरीने रिचर्ड केटलबोरोघ आणि स्टिव्ह डेव्हिस या पंचांचीदेखील पंच प्रतिनिधी म्हणून या समितीत निवड करण्यात आली आहे.
==================================================

No comments: