[अंतरराष्ट्रीय]
१- कैरोला जाणारं इजिप्तएअरचं विमान 66 प्रवाशांसह बेपत्ता
२- एबी डिव्हिलियर्स भारताचा नागरिक होणार
३- वॉशिंग्टन; सौदी विरोधातील विधेयकाला अमेरिकन सिनेटची मंजुरी
४- इस्लामाबाद; ब्लेडने पाठ फाडली, नखेही उपटली; अतिरेक्यांचा उपद्रव
५- कोलंबोमध्ये पावसाचा कहर, केरळमध्येही मुसळधार
६- भारताचे नकाशासंबंधी विधेयक युनोने रोखावे - पाक
७- वॉशिंग्टन; कार अपघातात गर्भवती महिला ठार, मात्र बाळ आश्चर्यकारकरित्या बचावलं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
८- पंतप्रधान मोदींच्या ममता आणि जयललितांना शुभेच्छा
९- प. बंगालमध्ये दीदींची जादू, पुन्हा ममता बॅनर्जींची सत्ता
१०- तामिळनाडूत पुन्हा अम्मा, जयललिता यांना बहुमत
११- भाजपसाठी आसाम का महत्त्वाचं; वाचा सविस्तर
१२- विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही - नरेंद्र मोदी
१३- रुपयाचे डॉलरच्या तुलनेत 23 पैशांनी घसरले
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१४- हिमांता बिस्वा सरमा - आसाममध्ये भाजपला सत्तेवर आणणारा वझीर
१५- एन रंगासामी पुद्दुचेरीचा गड राखणार?
१६- 'सैराट' चित्रपटाची टीम उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर
१७- राज्यात पारा वाढला, नागपुरात उष्माघाताचे तीन बळी
१८- कोकण मंडळाची कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ
२०- ...तर केरोसिन परवाने रद्द करण्यात येणार
२१- अहमदाबाद; गोध्राकांडाचा मुख्य आरोपी १४ वर्षांनी एटीएसच्या ताब्यात
२२- शिवान; शहाबुद्दीन यांना भागलपूर कारागृहात हलविले
२३- केरळ; पराभवाची जबाबदारी निश्चित करू- चाको
२४- 'कॉंग्रेसचा अपमान करा, मोदींकडून 'पद्म' मिळवा' - कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२५- परळ स्टेशन लवकरच होणार टर्मिनस, रेल्वेकडून अधिकृत घोषणा
२६- मुंबई; शिवसेना नगरसेवकाची पालिकेच्या अभियंत्याला मारहाण, गुन्हा दाखल
२७- सोलापूर; शासकीय रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल
२८- पुणे; चक्रीवादळामुळे ४८ तास जिकिरीचे
२९- उस्मानाबाद; जैन समाजाकडून ६३ गावांना पाण्याचे टँकर
३०- पाणी बचतीसाठी उद्योजक सरसावले
३१- आता परळ लोकल धावणार - मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील
३२- अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन
३३- वारली; सिलिंडरचा स्फोट होऊन १२ घरांतील सामान जळून खाक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३४- जखमी विराटची तुफानी खेळी, अवघ्या 47 चेंडूत ठोकलं शतक
३५- उदय चोप्रा आणि नर्गिस फाक्रीचं व्हॉट्सअॅपवरुन ब्रेकअप
३६- अवघ्या 99 रुपयात स्मार्टफोन, स्वस्त स्मार्टफोन 'नमोटेल अच्छे दिन' लाँच
३७- शीना बोरा हत्या प्रकरणातील इंद्राणी आता 'अशी' दिसते
३८- उत्तर प्रदेशात सरबजित चित्रपट होणार करमुक्त
३९- २२ मे रोजी आकर्षक शनीला पाहण्याची पर्वणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका,कारण.... काळ इतका ताकदवान आहे की, तो एका सामान्य कोळशालाही हळू हळू हिरा बनवतो...!!
(अरविंद कदम, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
==========================================

234 जागा असलेल्या या विधानसभेमध्ये जयललितांच्या एआयडीएमकेने 135 जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी आवश्यक 118 हा आकडा त्यांनी पार केला आहे.
दुसरीकडे त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एम करुणानिधी यांच्या ‘द्रविड मुन्नेत्रा कळघम’ अर्थात DMK ने 73 आणि काँग्रेसला 2 जागांवर आघाडी मिळाली. या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती.

विमान 37 हजार फूट उंचीवरुन उडत असताना मेडिटेरिअन समुद्रावरुन बेपत्ता झाल्याचं एअरलाईनतर्फे सांगण्यात आलं आहे. पॅरिसच्या स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजून 9 मिनिटांनी विमानाने उड्डाण केलं. पहाटे 3 वाजून 15 मिनिटांनी हे विमान लॅण्ड होणं अपेक्षित होतं, मात्र 2 वाजून 45 मिनिटांनी विमानाशी संपर्क तुटला.

गेल्या दोन-तीन दिवसांपासुन राज्यभरातील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. विदर्भातला पारा तर 45 अंशांवर पोहचला आहे. त्यामुळे ही अतिउष्णता तिघांच्या जीवावर बेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, धुळ्यात बुधवारी दुपारी 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. गेल्या 13 वर्षांतील हे सर्वोच्च तापमान आहे. रविवारी धुळ्यात पारा 44 अंशांवर पोहचला होता. त्यानंतर दोनच दिवसात पाऱ्यानं पंचेचाळीशी गाठली आहे. उन्हाच्या तडाख्यानं धुळ्यातील दैनंदिन जीवनावर परिणाम झाला असून लोकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

उदय चोप्रा आणि नर्गिस यांनी रिलेशनशीपमध्ये असल्याची कबुली दिलेली नसली, तरी दोघं गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असल्याचं त्यांच्या जवळची माणसं सांगतात. उदय चोप्राने डच्चू दिल्याने नर्गिस रातोरात न्यूयॉर्कला निघून गेल्याचं सांगितलं जातं.
दरम्यान, उदय चोप्राने तात्काळ एक स्टेटमेंट काढून या अफवा उडवून लावल्या आहेत. ‘खरंतर मी अफवांना भीक घालत नाही, पण माझ्याबाबत बऱ्याच चर्चा होत आहेत. मी आणि नर्गिस अजूनही चांगले मित्र आहोत. मात्र माध्यमांनी फार छान गोष्ट रंगवली आहे. मला ती फारच इंटरेस्टिंग वाटली, पण त्यात काडीमात्र सत्य नाही.’ असं उदय चोप्राने स्पष्ट केलं आहे.

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी ड्रायव्हर शाम रायने माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा असल्याचं पत्र गेल्या आठवड्यात कोर्टाला लिहिलं होतं. त्यानंतर त्याची साक्ष नोंदवली गेली. त्यामुळे याप्रकरणात आरोपी इंद्राणीसह, पीटर मुखर्जी यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
2012 साली अलिबागच्या जंगल परिसरात शीना बोराचा मृतदेह सापडला होता. मात्र, मृतदेह कुजून गेल्यानं त्याची ओळख पटवण्यात बराच वेळ गेला. अखेर दोन वर्षानंतर तो मृतदेह शीना बोराचा असल्याचं उघड झालं आणि धक्कादायक म्हणजे याप्रकरणी शीनाची आई इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी मुख्य आरोपी म्हणून समोर आले.

पंतप्रधान मोदींच्या ममता आणि जयललितांना शुभेच्छा
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल हाती येत आहेत. या पाच राज्यात कोण सत्ता मिळवणार आणि कोण टिकवणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
————————-
LIVE: सर्बानंद सोनोवाल आसामचे मुख्यमंत्री बनणार
————————-
BREAKING – आसामच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपची सत्ता, भाजपला 70 जागांची आघाडी
==========================================
पाच राज्यांचे सर्व निकाल एकाच ठिकाणी
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल हाती येत आहेत. या पाच राज्यात कोण सत्ता मिळवणार आणि कोण टिकवणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
————————-
LIVE: सर्बानंद सोनोवाल आसामचे मुख्यमंत्री बनणार
————————-
BREAKING – आसामच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपची सत्ता, भाजपला 70 जागांची आघाडी
==========================================
प. बंगालमध्ये दीदींची जादू, पुन्हा ममता बॅनर्जींची सत्ता
कोलकाता : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांचे कल हाती आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने सत्ता टिकवली आहे. 294 जागा असलेल्या या विधानसभेमध्ये तृणमूल काँग्रेसने 210 पेक्षाही अधिक जागांवर बहुमत मिळवलं आहे.
तर यावेळी सत्ता मिळवण्यात डाव्या आघाडीला अपयश आलं आहे. डावी आघाडी आणि काँग्रेसने एकत्र मिळून इथे निवडणूक लढवली. मात्र डाव्यांना 35, तर काँग्रेसला 31 म्हणजे दोघांना मिळून 66 जागांवरच आघाडी मिळवता आली.
प. बंगालमध्ये भाजपपणे पहिल्यांदाच तुलनेने मोठं यश मिळवलं आहे. भाजपला 7 जागांवर बहुमत मिळवता आलं.
एकंदरीत आतापर्यंतच्या निकालाच्या कलावरुन ममता बॅनर्जी पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार हे निश्चित झालं आहे. आता केवळ अंतिम निकालाची प्रतिक्षा असून, कोण किती जागा मिळवतं याकडे सर्वांचं लक्ष आहे.
==========================================
तामिळनाडूत पुन्हा अम्मा, जयललिता यांना बहुमत
चेन्नई : पश्चिम बंगालमध्ये जसं ममता बॅनर्जींनी सत्ता टिकवली, तसंच तामिळानाडूत जयललितांच्या ‘ऑल इंडिया द्रविड मुन्नेत्रा कळघम’ अर्थात अण्णा द्रमुकने (AIDMK) इतिहास रचला आहे.
234 जागा असलेल्या या विधानसभेमध्ये जयललितांच्या एआयडीएमकेने 135 जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी आवश्यक 118 हा आकडा त्यांनी पार केला आहे.
दुसरीकडे त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एम करुणानिधी यांच्या ‘द्रविड मुन्नेत्रा कळघम’ अर्थात DMK ने 73 आणि काँग्रेसला 2 जागांवर आघाडी मिळाली. या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती.
==========================================
हिमांता बिस्वा सरमा - आसाममध्ये भाजपला सत्तेवर आणणारा वझीर
दिसपूर : पूर्वेकडील राज्य आसामध्ये भाजपने इतिहास रचला आहे. कारण आसामच्या इतिहासात पहिल्यांदाज भाजपने बहुमत मिळवलं आहे. 126 जागा असलेल्या या विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी 64 जागांची गरज आहे. मात्र इथे भाजपने 70 पेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे.
या विजयाचा खरा हिरो म्हणजे हिमांता बिस्वा सरमा होय.
- आसाममध्ये भाजप सत्तेत येणार हे वर्षभरापूर्वी सांगितलं असतं तर कुणीही विश्वास ठेवला नसता पण…2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सत्तांतराची बीजं रोवली गेली. तोपर्यंत हिमांता काँग्रेसचे कट्टर विश्वासू नेता, निवडणुका जिंकून देणारे मुख्य स्ट्रॅटेजिस्ट होते.
- हिमांता बिस्वा सरमा हे 3 टर्म काँग्रेस आमदार, अनेक मंत्रीपदं भूषवलेली, मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे अत्यंत निकटवर्तीय, अत्यंत महत्वाकांक्षी अशी त्यांची ओळख होती.
==========================================
एन रंगासामी पुद्दुचेरीचा गड राखणार?
पुद्दुचेरी : केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये सत्ताधारी एनआर काँग्रेस आणि काँग्रेस-डीएमके आघाडी यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. एआयएनआरसी 11 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस-डीएमकेला 9 जागांवर आघाडी मिळाली आहे.
विधानसभेच्या 30 जागांपैकी 22 जागांचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यामध्ये एका जागेसह एआयडीएमकेची स्थिती फारशी चांगली नाही. तसंच इतर एका जागेवर पुढे आहेत. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री एन रंगासामी पुन्हा सत्तेत येणार की काँग्रेस-डीएमके आघाडी सत्ता स्थापन करणार हे थोड्या वेळातच स्पष्ट होईल.
दरम्यान, यंदाच्या निवणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवून चौथ्यांदा पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न एन रंगासामी पाहत आहे. मात्र पहिल्या कलानंतर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणं कठीण वाटत आहे.
30 जागांच्या पुद्दुचेरी विधानसभेसाठी 16 मे रोजी मतदान झालं होतं. केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये 344 उमेदवारंचं भवितव्य मतपेटीत बंद झालं होतं. यामध्ये 96 अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. पुद्दुचेरीत 9.41 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
==========================================
भाजपसाठी आसाम का महत्त्वाचं
दिसपूर : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत . मात्र भाजपचं सर्वाधिक लक्ष आसामवर आहे. आसाम हे भाजपसाठी का महत्त्वाचं आहे, यावर एक नजर –
- आसाम म्हणजे Gateway of North East अर्थात ईशान्येचे प्रवेशद्वार .
- आसाममध्ये विधानसभेच्या 126 जागा आहेत.
- गेली सलग 15 वर्ष आसाममध्ये तरुण गोगोईंच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता आहे.
- सध्या आसाममधे भाजपकडे फक्त 5 जागा आहेत मात्र आजच्या 5 राज्यांपैकी भाजपला सर्वाधिक आशा आसामकडूनच आहेत.
- सर्व एक्झिट पोल्सनी आसाममध्ये कमळ फुलणार असा अंदाज व्यक्त केलाय. (एबीपी आनंदा:- भाजप 81, काँग्रेस 33, एआययूडीएफ -10)
- जुना मित्र असम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांच्या मदतीने बहुमत मिळवण्याची भाजपला आशा आहे
- 2014 च्या लोकसभेत आसाममधील 14 पैकी 7 जागा भाजपने जिंकल्या होत्या तेव्हांपासूनच आसाम भाजपने ‘मिशन 84’ ची तयारी सुरु केली होती.
- भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार सर्बानंद सोनोवाल आहेत.
- सर्बानंद सोनोवाल सध्या केंद्रात मंत्री आहेत (Minister of State with Independent Charge for Youth Affairs and Sports )
- आसाममध्ये बांग्लादेशी मुस्लिम घुसखोरांची समस्या हा कळीचा मुद्दा असतो, यावेळी त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.
- मुस्लिम मतांमुळे बद्रुद्दिन अजमल यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटवर काँग्रेसचं गणित अवलंबून असतं, मात्र यंदा ध्रुवीकरणाचा फायदा भाजपला होऊ शकतो
- आसाममध्ये आत्तापर्यंत फक्त 3 वेळा बिगरकाँग्रेसी सरकार आलं आहे
- आसामच नव्हे तर ईशान्येकडील कोणत्याही राज्यात भाजपचं सरकार येण्याची ही पहिली वेळ असेल
- मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असताना आसाम हातात आलं तर भाजपचं मनोधैर्य वाढेल.
- भाजप आसाममध्ये सत्तेत आलं तर केंद्रीय मंत्रीमंडळातही छोटा बदल अपेक्षित कारण खेळ मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची जागा भरावी लागेल.
==========================================
'सैराट' चित्रपटाची टीम उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळवणाऱ्या ‘सैराट’ चित्रपटाची टीम आज मातोश्रीवर जाणार आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. नागराज मंजुळेंसह आर्ची-परशा साकारणारे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर तमाम रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या कौतुकाची थापही त्यांच्या पाठीवर पडणार आहे. दुपारी एकच्या सुमारास सैराटची टीम मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती आहे.
अनेक चित्रपट महोत्सवात आपली छाप पाडणाऱ्या सैराटची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली जात आहे. सैराटने नटसम्राट चित्रपटालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलं होतं. ‘सैराट’ मराठीत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या तरुण-तरुणीच्या प्रेमकथेनं प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: गारुड घातलं असल्याचंही फोर्ब्सनं म्हटलं आहे.
==========================================
कैरोला जाणारं इजिप्तएअरचं विमान 66 प्रवाशांसह बेपत्ता
कैरो : 66 जणांसह पॅरिसहून कैरोला जाणारं इजिप्तएअरचं विमान रडारवरुन गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. इजिप्तएअर A320 (फ्लाईट क्रमांक MS804) बेपत्ता झाल्याचं कंपनीतर्फे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे.
विमान 37 हजार फूट उंचीवरुन उडत असताना मेडिटेरिअन समुद्रावरुन बेपत्ता झाल्याचं एअरलाईनतर्फे सांगण्यात आलं आहे. पॅरिसच्या स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजून 9 मिनिटांनी विमानाने उड्डाण केलं. पहाटे 3 वाजून 15 मिनिटांनी हे विमान लॅण्ड होणं अपेक्षित होतं, मात्र 2 वाजून 45 मिनिटांनी विमानाशी संपर्क तुटला.
==========================================
एबी डिव्हिलियर्स भारताचा नागरिक होणार
मुंबई : आयपीएलच्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. इतकंच नाही तर बंगलोरच्या ख्रिस गेलने या दोघांनी तुलना बॅटमॅन आणि सुपरमॅनशी केली आहे. विराट कोहली बॅटमॅन तर एबी सुपरमॅन असल्याचं गेलचं म्हणणं आहे.
विराट आणि एबीने मिळून 1200 हून अधिक धावा केल्या आहे. शिवाय चार वेळा 100 हून अधिक धावांची भागीदारी रचली आहे. तसंच आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अनेक विक्रमही मोडले आहेत.
विराट आणि डिव्हिलियर्स मैदानात एकमेकांना अतिशय कम्पॅटिबल आहेत. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेचा हा खेळाडू भारतीय क्रिकेट संघासाठी खेळावा, असं स्वप्न भारताचे क्रिकेटचाहते पाहत आहेत.
इतकंच नाही तर स्वत: एबी डिव्हिलियर्सही भारताच्या नागरिकत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याचा विचार करत आहे.
नुकतंच आरसीबीच्या डिजीटल टीमचा सदस्य मि. नाग्जने एबीला याबाबत विचारलं की, “तू बराच काळ भारतात असतोस, तर भारतीय नागरिकत्व का स्वीकारत नाहीस?” यावर सुपरमॅन एबी म्हणाला की, “नागरिकत्वासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलावं लागेल.”
अर्थात हे सगळं थट्टेत सुरु होतं. पण भारतीय क्रिकेट चाहत्यांना ही कल्पना नक्कीच आवडेल.
==========================================
जखमी विराटची तुफानी खेळी, अवघ्या 47 चेंडूत ठोकलं शतक
बंगळुरु: रॉयल चॅलेजर्स बंगोलरचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीनं आयपीएलमधलं आपलं चौथं शतक ठोकलं आहे. पंजाबविरुद्ध सामन्यात विराटनं अवघ्या 47 चेंडूंत आपलं शतक पूर्ण केलं.
बंगळुरुच्या सामन्यात विराटनं पंजाबच्या गोलंदाजांची अक्षरश: लक्तरं काढली. विराटनं अवघ्या 50 चेंडूंत 12 चौकार आणि 8 षटकारांच्या जोरावर 113 धावांची तुफानी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमध्ये विराटच्या नावावर 13 सामन्यांत 865 धावा जमा झाल्या आहेत. ज्यात चार शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
दरम्यान, विराटच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झालेली असूनही त्यांनी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळत दणदणीत शतक ठोकलं. कोलकात्याविरद्ध लढतीत झेल पकडण्याच्या प्रयत्नात विराटच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. त्यावर उपचारासाठी विराटला मैदानाबाहेर जावं लागलं.
त्यावेळी देखील विराट जखमेवर पट्टी लावून पुन्हा मैदानात उतरला होता. इतकंच नाही तर त्यानं 51 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 75 धावांची खेळी करुन बंगलोरला विजयही मिळवून दिला होता.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात विराटनंच सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटसोबतच आज गेलनंही तुफानी फटकेबाजी केली. गेलनं 32 चेंडूत 8 षटकार आणि 4 चौकार ठोकत 73 धावा केल्या.
==========================================
राज्यात पारा वाढला, नागपुरात उष्माघाताचे तीन बळी
मुंबई : नागपुरातील तीन वेगवेगळ्या भागात तिघा जणांचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. या मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरु असून उष्माघातानं या तिघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासुन राज्यभरातील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. विदर्भातला पारा तर 45 अंशांवर पोहचला आहे. त्यामुळे ही अतिउष्णता तिघांच्या जीवावर बेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, धुळ्यात बुधवारी दुपारी 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. गेल्या 13 वर्षांतील हे सर्वोच्च तापमान आहे. रविवारी धुळ्यात पारा 44 अंशांवर पोहचला होता. त्यानंतर दोनच दिवसात पाऱ्यानं पंचेचाळीशी गाठली आहे. उन्हाच्या तडाख्यानं धुळ्यातील दैनंदिन जीवनावर परिणाम झाला असून लोकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
अकोल्यात सात माकडांचा मृत्यू :
अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथे सात माकडांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे माकडं मृत्युमुखी पडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अकोल्यात 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हे 2011 नंतरचं सर्वाधिक तापमान असल्याची नोंद
आहे.
आहे.
==========================================
परळ स्टेशन लवकरच होणार टर्मिनस, रेल्वेकडून अधिकृत घोषणा
मुंबई: मुंबईतल्या मध्ये रेल्वेवरील गर्दीचं आणि पश्चिम रेल्वेशी जोडल्या गेलेल्या परळ स्टेशनचा लवकरच कायापालट केला जाणार आहे. दादरच्या आधीचं स्टेशन असलेल्या परळला रेल्वेचं नवं टर्मिनस उभारण्यात येईल अशी माहिती रेल्वेनं दिली आहे.
टर्मिनससाठी स्टेशनवर नवे प्लॅटफॉर्म, नवे फुटओव्हर ब्रिज, नवे तिकिट काऊंटर, तसंच नव्यानं एलिव्हेटेड फुट ओव्हर ब्रिज तयार केले जाणार आहेत.
स्टेशनवरच्या सर्व प्लॅटफॉर्मची रुंदी १० मीटरनं वाढवण्यात येणार आहे. या सर्व कायापालटासाठी ५१ ते ५२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी २१ कोटींचं टेंडर निश्चित झालं आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जवळपास २ वर्षांचा कालावधी लागणार आहे.
==========================================
शिवसेना नगरसेवकाची पालिकेच्या अभियंत्याला मारहाण, गुन्हा दाखल
मुंबई: नालेसफाईच्या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या नगरसेवकानं मुंबई महापालिकेच्या दुय्यम अभियंत्याला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी यांनी जी उत्तर विभागाचे दुय्यम अभियंता प्रीतम वनारसेंना मारहाण केल्याचा आरोप आहे. धारावी क्षेत्रातल्या नालेसफाईच्या कामावर विशिष्ट कामगार घ्यावेत यासाठी ही मारहाण केल्याचं प्रितम वनारसे यांनी म्हटलं आहे.
तर नालेसफाईचं काम योग्यरितीनं पार पडत नसल्यानं बाचाबाची झाल्याचं स्पष्टीकरण राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिलं आहे.
==========================================
उदय चोप्रा आणि नर्गिस फाक्रीचं व्हॉट्सअॅपवरुन ब्रेकअप
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या घटस्फोट आणि ब्रेकअप्सची लाट आली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. चित्रपटातून गायब झालेला अभिनेता उदय चोप्रा आणि त्याची कथित प्रेयसी, अभिनेत्री नर्गिस फाक्री यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर चवीने
चघळल्या जात आहेत.
चघळल्या जात आहेत.
उदय चोप्रा आणि नर्गिस यांनी रिलेशनशीपमध्ये असल्याची कबुली दिलेली नसली, तरी दोघं गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात असल्याचं त्यांच्या जवळची माणसं सांगतात. उदय चोप्राने डच्चू दिल्याने नर्गिस रातोरात न्यूयॉर्कला निघून गेल्याचं सांगितलं जातं.
बॉलिवूडलाईफ.कॉम या वेबसाईटच्या वृत्तानुसार उदय चोप्राने व्हॉट्सअॅपवरुन नर्गिसशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर उदयला या ब्रेकअपमुळे फारसा त्रास झाला नसल्याचंही मानलं जातं, तर नर्गिस मात्र यामुळे उदास झाली आहे.
दरम्यान, उदय चोप्राने तात्काळ एक स्टेटमेंट काढून या अफवा उडवून लावल्या आहेत. ‘खरंतर मी अफवांना भीक घालत नाही, पण माझ्याबाबत बऱ्याच चर्चा होत आहेत. मी आणि नर्गिस अजूनही चांगले मित्र आहोत. मात्र माध्यमांनी फार छान गोष्ट रंगवली आहे. मला ती फारच इंटरेस्टिंग वाटली, पण त्यात काडीमात्र सत्य नाही.’ असं उदय चोप्राने स्पष्ट केलं आहे.
काही महिन्यांपूर्वी इंडियनएक्स्प्रेस.कॉम दिलेल्या मुलाखतीत नर्गिसने उदय चोप्रा कायम माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग राहील, असं म्हटलं होतं.
==========================================
अवघ्या 99 रुपयात स्मार्टफोन, स्वस्त स्मार्टफोन 'नमोटेल अच्छे दिन' लाँच
कंपनीचे प्रमोटर माधव रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, या स्मार्टफोनची प्री बुकींग 17 मे ते 25 मेपर्यंत namotel.com या वेबसाइटवर करता येणार आहे. पण सध्या वेबसाइट सुरु होत नसल्याचं आढळून आलं आहे.
मुंबई: रिंगींग बेल कंपनीचा फ्रिडम 251 हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन अद्यापही ग्राहकांच्या हाती आलेला नसताना आता अवघ्या 99 रुपयातील स्मार्टफोनची घोषणा करण्यात आली आहे. बंगळुरुमधील नमोटल कंपनी स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणणार आहे.
या स्मार्टफोनची किंमत फारच कमी ठेवण्यात आली आहे. बंगळुरुमधील नमोटेल कंपनीनं नमोटेल अच्छे दिन नावानं हा स्मार्टफोन लाँच केला आहे. ज्याची किंमत अवघी 99 रु. आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.
कंपनीचे प्रमोटर माधव रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, या स्मार्टफोनची प्री बुकींग 17 मे ते 25 मेपर्यंत namotel.com या वेबसाइटवर करता येणार आहे. पण सध्या वेबसाइट सुरु होत नसल्याचं आढळून आलं आहे.
हा फोन बुकींग करण्यासाठी यूजरला bemybanker.com वेबसाइटवर जाऊन आधी नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर यूजरला आयडी आणि पासवर्ड देण्यात येईल. ज्याच्या मदतीनं namotel.com वर स्मार्टफोन बुक करता येणार आहे. नोंदणीसाठी यूजरला एकदा लाइफ टाइम मेंबरशीप फी 199 रु. भरावी लागणार आहे.
नमोटेल अच्छे दिन स्मार्टफोनचे फीचर्स:
4 इंच डिस्प्ले, 480×800 पिक्सल
5.1 अँड्रॉईड लॉलिपॉप ओएस
1 जीबी रॅम, 4 जीबी मेमरी, 32 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येईल.
2 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि VGA सेल्फी कॅमेरा
ड्यूल सिम सपोर्ट
3जी कनेक्टिव्हिटी
कंपनीच्या वेबसाइटवर याची किंमत 2,999 रु. आहे. मात्र याच्या किंमतीत कपात करण्यात आली असून आता हा स्मार्टफोन अवघ्या 99 रुपयात उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन कॅश ऑन डिलिव्हरीवर देखील खरेदी करता येणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडिया या मोहिमेत सहभागी होऊन त्याविषयी आदर असल्यानं हा स्मार्टफोन तयार करण्यात आला असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
==========================================
शीना बोरा हत्या प्रकरणातील इंद्राणी आता 'अशी' दिसते
मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी सध्या गजाआड आहे. अटक होण्यापूर्वी असलेला इंद्राणीचा लूक आणि सध्याची तिची चेहरेपट्टी यात जमिन आस्मानाचा फरक आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
इंद्राणी मुखर्जी…

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी ड्रायव्हर शाम रायने माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा असल्याचं पत्र गेल्या आठवड्यात कोर्टाला लिहिलं होतं. त्यानंतर त्याची साक्ष नोंदवली गेली. त्यामुळे याप्रकरणात आरोपी इंद्राणीसह, पीटर मुखर्जी यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
2012 साली अलिबागच्या जंगल परिसरात शीना बोराचा मृतदेह सापडला होता. मात्र, मृतदेह कुजून गेल्यानं त्याची ओळख पटवण्यात बराच वेळ गेला. अखेर दोन वर्षानंतर तो मृतदेह शीना बोराचा असल्याचं उघड झालं आणि धक्कादायक म्हणजे याप्रकरणी शीनाची आई इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी मुख्य आरोपी म्हणून समोर आले.
==========================================
शासकीय रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल
- सोलापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय तथा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी आपल्याच नातलगाचा मृतदेह असल्याचे समजून दुसऱ्याचा मृतदेह नेऊन अंत्यसंस्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शवविच्छेदन विभागातील कर्मचारी प्रकाश लोंढे याला निलंबित करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी दिली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास नारायण चंद्रामप्पा चन्ना यांचा मृत्यू झाल्याने मृतदेह शवविच्छेदन विभागामध्ये आणण्यात आला होता. चन्ना यांच्या नातलगांना ‘बुधवारी शवविच्छेदन करून मृतदेह देण्यात येईल,’ असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार, आज (बुधवारी) सकाळी नातलग आल्यानंतरत्यांना नारायण चन्ना यांचा मृतदेह आढळला नाही. दरम्यान, चन्ना कुटुंबीय येण्यापूर्वी एक मृतदेह शवविच्छेदन विभागातून नेण्यात आला होता. यातून मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आला. कर्मचाऱ्यांनी चुकून शेखर यांचा मृतदेह देण्याऐवजी नारायण चन्ना यांचा मृतदेह दिवाण कुटुंबीयांना दिला.
==========================================
चक्रीवादळामुळे ४८ तास जिकिरीचे
- पुणे : बंगालच्या उपसागरात अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप डिप्रेशन) निर्माण झाले असून, त्याची तीव्रता वाढत आहे. त्याचे रूपांतर चक्रीवादळात होणार आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत महाराष्ट्रासह मध्य भारतात उष्णतेची लाट तीव्र होईल, असा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. याशिवाय आनंदाची बातमी म्हणजे मोसमी पाऊस (मान्सून) निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागरात बुधवारी दाखल झाला. बंगालच्या उपसागरात रविवारी हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्याची तीव्रता वाढत गेली व मंगळवारी त्याचे रूपांतर अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले. याची तीव्रता वाढत आहे. अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे पुढील टप्प्यात चक्रीवादळात रूपांतर होते. त्यानुसार या क्षेत्राचेही रूपांतर चक्रीवादळात होणार आहे. हे क्षेत्र चेन्नईकडे सरकत असून, वाऱ्याचा वेग ताशी १० कि.मी एवढा आहे. तीन-चार दिवसांत हे वादळ चेन्नईच्या किनापट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे.
==========================================
जैन समाजाकडून ६३ गावांना पाण्याचे टँकर
- शहाजी फुरडे-पाटील,बार्शी-दुष्काळग्रस्तांचा होणारी होरपळ लक्षात घेऊन येथील भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. सध्या बार्शीसह उस्मानाबाद जिल्ह्यातील ६३ गावांची तहान त्यांच्या या उपक्रमाने भागवली जाते.दुष्काळामुळे समितीने यंदा महावीर जयंती साध्या पद्धतीने साजरी केली. उत्सवातील रक्कम जलयुक्त शिवार अथवा टँकरसाठी देण्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी उपस्थित समाजबांधवांनी पाण्याचे टँकर सुरू करण्याचा निश्चिय केला व त्याच बैठकीत २०० टँकर खेपांची रक्कम जमा झाली. भगवान महावीर यांच्या जयंतीदिवशी प. पू. साध्वीजी प्रशमरसाश्रीजी यांच्या उपस्थितीत तत्काळ वाणेवाडीला पहिला टँकर पाठविला गेला.जैन समाजाने टँकर सुरू केल्याचे कळताच गावागावांतून टँकर मागणीची पत्रे समितीकडे येऊ लागली. त्यानुसार समितीने तत्काळ टँकर देण्यास सुरुवात केली. हळूहळू दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करत योगदान देण्यास सुरुवात केली. बघता बघता हा आकडा एक हजार टँकर खेपांवर गेल्याचे प्रदीप बागमार यांनी सांगितले.
==========================================
पाणी बचतीसाठी उद्योजक सरसावले
- मुंबई : राज्यातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानाला राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे पाणी बचतीची मोहीम सुरू झाली आहे. जळगाव येथील उद्योजकांनीदेखील या अभियानात पुढाकार घेऊन पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत साठवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.जळगावमध्ये या मोहिमेत सहभागी होण्यासाठी उद्योजकांनी घेतलेल्या बैठकीत त्यांच्या कंपनीत पाणी बचतीसाठी शक्य तेवढा पाण्याचा कमी वापर केला जाईल. पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी जलपुनर्भरण यंत्रणा उभारू, पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कामगारांमध्ये प्रबोधन करू, अशी ग्वाही याप्रसंगी दिली.या बैठकीस जिंदा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रजनीकांत कोठारी, जिंदा संघटनेचे अध्यक्ष भुवनेश्वर सिंग, लघु उद्योग भारतीचे अंजनीकुमार मुंदडा, लघु उद्योग भारतीचे जिल्हाध्यक्ष संजयकुमार तापडिया, एम़ सेक्टरचे संचालक अरुण बोरोले, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बेंडाळे उपस्थित होते.कोल्हापूर येथील मंगेशकर नगरातील सांगलीकर कुटुंबीयांनी हात धुतलेले तसेच भांडी धुण्यासाठी वापरलेले अनेकांच्या घरातील पाणी थेट गटारीमध्ये जाऊ न देता आपल्या बंगल्याच्या परिसरातील विविध झाडे जगविण्यासाठी वापरले आहे.
==========================================
आता परळ लोकल धावणार
- मुंबई : ज्या स्थानकांतून लोकल ट्रेन सुटतात, अशा स्थानकांच्या यादीत आता परळ स्थानकाचाही समावेश होणार आहे. परळ टर्मिनस उभारण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या दोन वर्षांत काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. टर्मिनसच्या कामाला पुढील महिन्यापासून सुरुवात केली जाणार आहे.एमयूटीपी-२ अंतर्गत मध्य रेल्वेवर सीएसटी ते कुर्ला दरम्यान पाचवा-सहावा मार्ग बांधला जाणार आहे. या प्रकल्पातच परळ टर्मिनसही बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. आता ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. दादर स्थानकमार्गे आणि स्थानकातून मोठ्या प्रमाणात लोकलची ये-जा असते. त्यामुळे हा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनस उभारले जाणार आहे. या टर्मिनसमधून दादर, सीएसटीप्रमाणेच लोकल सोडण्यात येतील. या कामासाठी ८0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता ५१ कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली.परळच्या सर्व प्लॅटफॉर्मची रुंदी दहा मीटरपर्यंत वाढविण्यात येणार असून, एकूण पाच प्लॅटफॉर्म बांधण्यात येतील. परळच्या मध्यभागी पूर्व-पश्चिमे जोडणारा नवा पूल उभारण्यात येईल. जुन्या पुलाला मुंबई दिशेकडील उड्डाणपुलाशी स्कायवॉकने जोडण्याचा प्रस्तावही आहे. पुलावर तिकीट घर आणि अन्य सुविधा देण्यात येणार आहेत.
==========================================
अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन
- मुंबई : जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये कुपोषणमुक्तीकार्यक्रम राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांमध्ये आता टाटा ट्रस्टही सहभागी होणार आहे. सीएसआर निधीतून त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमवेत दोन्हींच्या अधिकाऱ्यांची बैठक सह्याद्री अतिथी गृहावर झाली.कुपोषणमुक्तीसाठी धुळे, हिंगोली, जालना, नागपूर, परभणी, सांगली, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांना महिला आणि बालकांचे आरोग्य, पोषण, लसीकरण आदींविषयक माहिती, सूचना यांची देवाणघेवाण करणे सुलभ व्हावे यासाठी स्मार्ट फोन किंवा टॅब दिले जाणार आहेत.आयसीडीएस कॉमन अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. जागतिक बँक आणि टाटा ट्रस्टच्या वतीने क्षमता बांधणी कार्यक्रमही राबविला जाईल. अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देऊन बालकांच्या पोषणासाठी करावयाच्या प्रभावी उपाययोजनांची माहिती दिली जाईल. बैठकीला राज्यमंत्री विद्या ठाकूर, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
==========================================
कोकण मंडळाची कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ
- मुंबई : कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) २४ फेब्रुवारी २०१६ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीमधील यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्यास ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.विरार-बोळींज, मीरा रोड, कावेसर-ठाणे व वेंगुर्ला-सिंधुदुर्ग येथील ४ हजार २७५ सदनिकांची सोडत काढली होती. ज्या विजेत्या अर्जदारांना सूचनापत्रे मिळालेली नाहीत, त्यांनी वांद्रे पूर्वेकडील गृहनिर्माण भवनात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण मंडळाच्या खोली क्रमांक २५४ किंवा २५५ येथील पणन कक्षात मिळकत व्यवस्थापक २, ३, ४ (पणन) यांच्यामार्फत विजेत्यांना अधिक माहिती देण्यात येईल, असेही कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांनी सांगितले.
==========================================
.तर केरोसिन परवाने रद्द करण्यात येणार
- मुंबई : पाच वर्षे वा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून नूतनीकरण न झालेले घाऊक, हॉकर्स व किरकोळ केरोसिन परवाने आता रद्द करण्यात येणार आहेत. या परवान्यांच्या नूतनीकरणाचे नवीन नियम अन्न व नागरी पुरवठा विभागाने आज जारी केले.केरोसिन परवाना नूतनीकरण पद्धतीत आता सुधारणा करण्यात आल्या आहेत. केरोसिन परवान्याची मुदत ज्या वर्षी समाप्त होत आहे त्या वर्षी ३१ डिसेंबरपूर्वी नूतनीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरपूर्वी नूतनीकरण न केलेल्या परवान्यावर १ जानेवारीपासून प्रत्यक्ष नूतनीकरण होईपर्यंत कोणताही केरोसिन कोटा देण्यात येणार नाही.केरोसिन परवाना नूतनीकरणास झालेल्या विलंबास शासकीय अधिकारी/कर्मचारी जबाबदार आढळल्यास तसेच परवाना नूतनीकरण केलेले नसतानाही त्यावर केरोसिन कोटा सुरू ठेवल्यास संबंधित अधिकारी/ कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.नूतनीकरणासतील विलंबास परवानाधारक जबाबदार असल्यास अनामत रक्कम जप्त करून तसेच दंडाची रक्कम आकारून पुन्हा नव्याने अनामत रक्कम आकारण्याची पद्धत आहे. या दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, घाऊक परवानाधारकाकडून दरदिवशी ४०० रुपये दंड आकारला जाईल. किरकोळ व हॉकर्सच्या परवानाधारकांना दरदिवशी २० रुपये दंड लावला जाईल.राज्यात केरोसिनचे ५६ हजार ५३५ किरकोळ परवाने आहेत. घाऊक परवान्यांची संख्या ७८६ इतकी असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
==========================================
वरळीत अग्नितांडव
- मुंबई : वरळीतील मधुसुदन चाळीत बुधवारी सिलिंडरचा स्फोट होऊन १२ घरांतील सामान जळून खाक झाले. रहिवाशांच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली. आगीत लाखोंचा ऐवज खाक झाल्याने रहिवाशांना आर्थिक फटका बसला आहे.वरळी येथील पांडुरंग भुतकर मार्ग परिसरात १०० वर्षे जुनी एकमजली मधुसुदन चाळ आहे. बुधवारी सकाळी ११.३०च्या सुमारास येथील पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ८२ मधील गुलशन नट (५५) यांच्या घरात सिलिंडरचा मोठा आवाज आला. त्यांनी आरडाओरडा करत शेजाऱ्यांना तेथून दूर होण्यास सांगितले. नट बाहेर पडणार, तोच आगीच्या संपर्कात येत सिलिंडरचा स्फोट झाला.रहिवासी इमारतीतून खाली उतरेपर्यंत एकामागोमाग एक असे तब्बल ५ ते ६ वेळा आवाज आले. या चाळीला लाकडी आधार असल्याने ही आग वेगाने पेट घेत होती. चाळीतील तरुणांनी खालच्या खोल्यांमधील सिलिंडर बाहेर काढले. त्यात विजेचा मेन स्विचही बंद करण्यात आला. त्यामुळे आग नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली.घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. १० ते १२ घरांमधील सामान आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली. आगीमुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
==========================================
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही - नरेंद्र मोदी
- सुरेश भटेवरा,नवी दिल्ली- केंद्र सरकार कोणत्याही स्थितीत विद्यार्थ्यांचे ‘नीट’मुळे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्ली येथे झालेल्या भेटीत दिले.‘नीट’प्रश्नी सकारात्मक तोडगा निघावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले की, ‘नीट’चा अभ्यासक्रम, राज्यातील ८0 टक्के विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमापेक्षा वेगळा असल्याने ‘नीट’चा आग्रह यंदा धरल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. यासाठी किमान २ वर्षे महाराष्ट्रात नीट परीक्षा नको. आवश्यकता भासल्यास केंद्राने अध्यादेश काढावा व सीईटी परीक्षा दोन वर्षे चालू ठेवाव्यात, अशी मागणी पंतप्रधानांकडे केली आहे.>पक्षाध्यक्ष शाह व गृहमंत्र्यांशी भेटदिल्लीच्या धावत्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचीही भेट घेतली. गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार, राज्यसभेच्या ३ जागांसाठी पक्षाच्या उमेदवारांची निवड याबाबत चर्चा तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी या भेटीत शाह यांना दिली. त्यानंतर राज्यातील दुष्काळासाठी गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे २,५00 कोटींच्या अतिरिक्त रकमेची मागणी मुख्यमंत्र्यांनी केल्याचे समजते.
==========================================
गोध्राकांडाचा मुख्य आरोपी १४ वर्षांनी एटीएसच्या ताब्यात
- अहमदाबाद : २००२ साली घडलेल्या गोध्रा रेल्वे हत्याकांडातील १४ वर्षांपासून फरार असलेल्या प्रमुख आरोपीला बुधवारी एटीएसने ताब्यात घेतले. या घटनेत ५९ कारसेवक मरण पावले होते. या घटनेनंतर गुजरातमध्ये धार्मिक दंगली भडकल्या होत्या.एटीएस अधिकाऱ्याने सांगितले की, फारुख मोहंमद भाना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने गोध्रा रेल्वे स्टेशनवर २७ फेब्रुवारी २००२ रोजी रेल्वेला आग लावण्याचा कट रचला होता. त्या वेळी भाना गोध्रा येथे नगरसेवक होता. अटक टाळण्यासाठी तो मुंबईला गेला होता आणि मुंबईत त्याने प्रॉपर्टी ब्रोकर म्हणून व्यवसाय सुरू केला होता. त्याच्याबाबत माहिती मिळाल्यावर पंचमहाल जिल्ह्यातील कलोल गावानजीक भानाला पकडण्यात आले. तो मुंबईहून गोध्राला जात होता.गोध्रा रेल्वे स्टेशननजीक अमन गेस्ट हाऊसमध्ये अन्य आरोपींसोबत बैठक घेऊन त्याने एस-६ डब्याला आग लावण्याचा कट रचल्याचे त्याच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.
==========================================
सौदी विरोधातील विधेयकाला अमेरिकन सिनेटची मंजुरी
- ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. १८ - अमेरिकेवरील ९/११ हल्ला प्रकरणातील पिडीत आणि त्यांच्या कुटुंबियांना आता सौदी अरेबिया विरोधात खटला दाखल करण्याची परवानवगी मिळू शकते. थेट सौदी अरेबिया विरोधात खटला दाखल करण्यासाठी आवश्यक कायद्याला अमेरिकन सिनेटने मंगळवारी मंजुरी दिली.सौदी अरेबियाने या कायदा करायाल कडाडून विरोध केला आहे. अमेरिकेच्या वर्ल्डट्रेड सेंटर आणि अन्य ठिकाणी २००१ मध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी सौदी अरेबियाने आधीच नाकारली आहे. आपला या हल्ल्याशी काहीही संबंध नाही असे सौदीने म्हटले आहे.असा कायदा केला तर, आपण अमेरिकेतील ७५० अब्ज डॉलर्सची संपत्ती विकून टाकू अशी धमकी सौदीने अमेरिकेला दिली आहे. दहशतवादाच्या पुरस्कर्त्यांच्या विरोधात न्याय किंवा जेएएसटीए हा कायदा सिनेटने एकमताने मंजूर केला.आता हा कायदा पुढच्या टप्प्यात मंजुरीसाठी अमेरिकन प्रतिनिधी सभागृहाकडे जाणार आहे. जेएएसटीए कायदा अमेरिकेत प्रत्यक्षात आला तर, देश म्हणून मिळणारे संरक्षण संपुष्टात येणार आहे.
==========================================
ब्लेडने पाठ फाडली, नखेही उपटली
- इस्लामाबाद : अतिरेक्यांनी माझा अनन्वित छळ केला. ते मला चाबकाने मारायचे. तीन दिवसांत मला त्यांनी जवळपास ५०० फटके मारले. माझ्या पाठीवर ब्लेडने कापले आणि माझ्या हाता-पायांची नखेही काढून टाकली... अंगाचा थरकाप उडवणारी ही व्यथा मांडली आहे पंजाबचे हत्या झालेले गव्हर्नर सलमान तासिर यांचा मुलगा शाहबाज याने.सलमान तासिर यांची हत्या झाल्यानंतर सात महिन्यांनी २०११ साली इस्लामिक मुव्हमेंट आॅफ उझबेकिस्तानच्या अतिरेक्यांनी लाहोरमधून शाहबाजचे (३३) अपहरण केले होते. पाकिस्तानी लष्करी जवानांनी शाहबाजची गेल्या मार्चमध्ये क्वेट्टातील कुचलक गावातील हॉटेल येथे अतिरेक्यांच्या तावडीतून सुटका केली.मला त्यांनी अनेक दिवस अन्न दिले नाही. मी मलेरियाने आजारी असताना माझ्यावर उपचार केले नाहीत. एकदा तर त्यांनी माझे तोंडही शिवून टाकले होते, असे शाहबाज तासिर म्हणाला. इस्लामिक स्टेटशी (आयएस) कशी संलग्नता असावी या मुद्द्यावरून इस्लामिक मुव्हमेंट आॅफ उझबेकिस्तान आणि तालिबान यांच्यात मतभेद झाल्याचेही शाहबाज तासिर याने सांगितले. या मतभेदानंतर अफगाण तालिबानींनी उझबेकींवर हल्ला करून त्यांचा सगळा गटच व नेताही संपवून टाकला. संपूर्ण तीन दिवस तेथे केवळ मृत्यूचेच राज्य होते अशी आठवणही त्याने सांगितली.
==========================================
कोलंबोमध्ये पावसाचा कहर, केरळमध्येही मुसळधार
- कोलंबो : श्रीलंकेत पावसाने कहर केला असून, कोलंबो आणि आसपासच्या शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गेल्या दोन दिवसांत येथे ११ जणांचा बळी गेला आहे, तसेच सहा जण अद्याप बेपत्ता आहेत. दोन लाखांपेक्षा अधिक लोकांना या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. येत्या काळात श्रीलंकेसह भारतात केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी येथेही पावसाचा कहर होण्याचा अंदाज आहे. केरळच्या मध्य आणि दक्षिणेकडील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसल्याने तटवर्ती भागांमध्ये प्रचंड नुकसान झाल्याचे वृत्त आहे. कोची, अलापुळा आणि एर्नाकुलम या तटवर्ती जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला.या भागात शेकडो घरे कोसळली. मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच बरसलेल्या या मुसळधार पावसाने सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याचे वृत्त आहे. अनेक घरांमध्ये पाणी साचल्याने लोकांना मदत शिबिरांत पाठविण्यात आले आहे.
==========================================
भारताचे नकाशासंबंधी विधेयक युनोने रोखावे
- इस्लामाबाद : भारताच्या नकाशा चुकीच्या पद्धतीने सादर करण्यासबंदी घालणाऱ्या विधेयकाला पाकिस्तानने आक्षेप घेतलाआहे. भारतीय संसदेमध्ये सादर केलेल्या विधेयकांवरून आम्ही संयुक्त राष्ट्राकडे (युनो) ‘गंभीरचिंता’ व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांनी भारताच्या त्या विधेयकांना रोखून धरावे, असे आवाहन आम्ही केले आहे, असे पाकिस्तानने मंगळवारी सांगितले.‘आंतरराष्ट्रीय कायद्यांचे’ उल्लंघन करणारी अशी कृत्ये भारताने थांबवावीत, असे आवाहनहीत्याने केले आहे. भारताच्याअधिकृत नकाशामध्ये जम्मूआणि काश्मीरचा वादग्रस्त भाग हा भारताचा भाग असल्याचे दाखविण्यात आले आहे.वास्तविक असे दाखविणे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने केलेल्या ठरावांचे उल्लंघन असून, प्रत्यक्षात चुकीचे व कायदेशीरदृष्ट्याही न टिकणारे आहे, असेही पाकिस्तानचे म्हणणे आहे.
==========================================
कार अपघातात गर्भवती महिला ठार, मात्र बाळ आश्चर्यकारकरित्या बचावलं
- ऑनलाइन लोकमत -वॉशिंग्टन, दि. 17 - अपघातात मृत्युमूखी पडलेल्या गर्भवती महिलेच्या बाळाला डॉक्टरांनी यशस्वीरित्या वाचवलं आहे. साराह या महिलेला रुग्णलायत नेत असताना गाडीचा अपघात झाला ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करुन आश्चर्यकारकरित्या बाळाला वाचवलं आहे.साराह आपल्या पती मॅट रायडरसोबत कारने रुग्णालयात चालली होती. त्यावेळी ट्रेलरला धडकून कारचा अपघात झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी साहारला आणि तिच्या पोटातील बाळाला वाचवण्यासाठी तात्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच साराहचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी अजिबात वेळ न दवडता ऑपरेशन करुन बाळाला वाचवलं.या बाळाचं वजन 4 पाऊंड भरलं आहे. बाळाला व्हेटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. बाळाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा नर्सचं बोट पकडल होतं. बाळाच्या मेंदूला काही इजा झाली आहे का ? याची पाहणी करत आहोत, कारण साराहच्या मृत्यूनंतर ऑक्सिजनची कमतरता जाणवली असल्याची शक्यता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. नेमक त्यानंतरच बाळाची तब्बेत कशी आहे कळू शकेल.मॅट रायडरदेखील गंभीर जखमी झाले असून तब्बेतीत सुधारणा होत आहे. साराहसमोर संपुर्ण आयुष्य होतं. तिच्या बाळाला आता आईशिवाय जगावं लागेल अशी भावना साराहची आई पॅट्रीका यांनी व्यक्त केली आहे.
==========================================
शहाबुद्दीन यांना भागलपूर कारागृहात हलविले
| |
-
| |
सिवान- पोलिस कोठडीत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार शहाबुद्दीन याला आज पहाटे कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या भागलपूर मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहे. शहबुद्दीन याच्या अंगरक्षकांनी पत्रकार राजदेव रंजन यांच्या खून केल्याचा आरोप आहे.
राजदेव रंजन यांच्या खुनाचा कट कारागृहात शिजला असल्याची खबर मिळताच पोलिसांनी कारागृहावर धाड टाकली.
पोलिसांनी काल विभागीय कारागृहावर टाकलेल्या छाप्यामध्ये तुरुंग आवारात शहाबुद्दीनला भेटायला येणाऱ्यांपैकी 62 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर सर्वांना सोडून देण्यात आले व आधी केलेले संपर्कांची माहिती तपासण्यासाठी त्यांचाकडील 38 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
शहाबुद्दीनने त्याच्या दोन भावांचा खून केल्याच्या गुन्ह्यामधे त्याला आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो 2004 पासून कारागृहात आहे. यापूर्वीही त्याला विधानसभा निवडणुकीदारम्यान भागलपूर मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले होते.
==========================================
रुपयाचे डॉलरच्या तुलनेत 23 पैशांनी घसरले
| |
-
| |
मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण सुरूच आहे. रुपयाने आता 67 रुपयांची पातळी गाठली आहे. परकी विनिमय चलन बाजारात रुपया आज (गुरुवार) 23 पैशांनी घसरत 67.20 पर्यंत खाली आला. कालच्या सत्रात देखील रुपया 10 पैसे घसरणीसह 66.97 रुपयांची पातळी गाठली आहे.
फेडरल रिझर्व्हकडून जूनच्या अखेरीस होणार्या बैठकीत व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता असल्याने डॉलर वधारला आहे.
फॉरेन एक्सचेंजकडे आयातदार आणि बँकांकडून डॉलरची मागणी वाढली आहे. परिणामी इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत देखील अमेरिकी डॉलर वधारतो आहे.
सध्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 103 अंशांची घसरण झाली असून सेन्सेक्स 25,601.39 पातळीवर आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 29.95 अंशांची घसरण झाली आहे. निफ्टी 7,840.30 पातळीवर आहे.
==========================================
पराभवाची जबाबदारी निश्चित करू- चाको
| |
-
| |
तिरुअनंतपुरम- केरळमध्ये आम्हाला पराभव मान्य करावा लागेल असे चित्र दिसत आहे. आणि पराभव झाल्यास या पराभवाची जबाबदारीही निश्चित केली जाईल, अशी कबुली काँग्रेसचे नेते पीसी चाको यांनी दिली.
मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर केवळ दोन तासांतच निकालाचा कौल स्पष्ट होऊ लागला. डावी लोकशाही आघाडी केरळमध्ये सत्तेत येणार असे चित्र दिसल्यावर चाको यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) काही मतदारसंघामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविण्याची शक्यता आहे. यावरून भाजपने आपले स्थान अधिक पक्के केले आहे.
काँग्रेसचा पराभव झाल्यास त्याची जबाबदारी प्रादेशिक वा स्थानिक नेत्यांवर निश्चित केली जाते. मात्र, विजय मिळविल्यावर पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना श्रेय दिले जाते असा सूर विरोधक आळवतात. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना चाको यांनी सांगितले की, पराभवाची जबाबदारीही निश्चित केली जाईल.
==========================================
उत्तर प्रदेशात सरबजित होणार करमुक्त
| |
-
| |
लखनौ- ओमंग कुमार दिग्दर्शित ‘सरबजित‘ हा चित्रपट करमुक्त करण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. काल (बुधवार) रात्री ‘सरबजित‘ चित्रपटाला करमुक्त दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
रणदीप हूडा आणि ऐश्वर्या राय-बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत अहेत. हेरगिरी करण्याच्या आरोपावरून पाकिस्तान सरकारने सरबजितसिंग यांना अटक केली होती. त्यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. येत्या 20 मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
‘सरबजित‘बद्दल चित्रपटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
==========================================
'कॉंग्रेसचा अपमान करा, मोदींकडून 'पद्म' मिळवा'
| |
-
| |
नवी दिल्ली - कॉंग्रेस परिवाराचा आणि गांधी कुटुंबियांचा अपमान करून मोदींकडून पद्मभूषण मिळवा, अशा आशयाची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केल्या आहेत.

देशातील महत्त्वाच्या संस्थांना आणि ठिकाणांना गांधी परिवारातील सदस्यांची नावे दिल्याबद्दल अभिनेता ऋषी कपूर यांनी ट्विटरद्वारे बुधवारी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. "देशाला बापाचा माल समजू नका‘ अशा तीव्र शब्दांत कपूर यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आज (गुरुवार) दिग्विजयसिंह यांनी ट्विटरद्वारे कपूर यांच्यावर टीका केली. "कॉंग्रेस परिवार आणि गांधी कुटुंबियांना अपमानित करा. स्वत:ला मोदींकडून पद्मभूषण किंवा राज्यसभेची जागा मिळवून सन्मानित करा‘, अशा शब्दांत त्यांनी प्रत्युत्तर दिले. कपूर यांच्या तिखट शब्दांतील टीकेनंतर त्यावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. कपूर यांच्याप्रमाणेच देशातील अनेकांना असे वाटते आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केली.

आकर्षक शनीला पाहण्याची पर्वणी
| |
-
| |
सोलापूर- यंदाचा मे व जून महिना खगोल प्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे. खगोलप्रेमींना 9 मे रोजी बुधाचे अधिक्रमण पाहायला मिळाले. 22 मे रोजी तेजोमय मंगळ पाहण्याची संधी असून, 3 जून रोजी सूर्य मालिकेतील सर्वांत सुंदर व खगोलप्रेमींचे आकर्षण असणारा शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार आहे. दुर्बिणीच्या साह्याने शनी पाहण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती सोलापूर विज्ञान केंद्राचे संग्रहालय अभिरक्षक राहुल दास यांनी दिली.
शनीचे पृथ्वीपासूनचे अंतर हे 3 जून रोजी कमी असणार आहे. या वेळी शनी हा सूर्याच्या समोर असल्याने सूर्य प्रकाशामुळे नेहमीपेक्षा तो जास्त प्रकाशमान दिसणार आहे. शनीच्या भोवती असणारे कडे हे त्याला इतर ग्रहांपेक्षा वेगळे ठरविते. यादिवशी हे कडे देखील दुर्बिणीच्या माध्यमातून दिसणार आहे. 3 जून रोजी सकाळी 11 वाजून 13 मिनिटांनी शनी सूर्याच्या समोर येणार आहे. त्या दिवशी सायंकाळी 6 पासून 4 जूनच्या पहाटेपर्यंत शनीचे निरीक्षण करणे शक्य होणार आहे. तीन जूननंतर सुमारे 378 दिवसांनी हा नजारा पुन्हा पाहावयास मिळेल.
तीन जूनला पूर्वेकडे सायंकाळी अवकाशामध्ये मंगळ, शनी, ज्येष्ठा तारा यांचा त्रिकोण होणार आहेत. हा त्रिकोण रात्री साध्या डोळ्यांनीसुद्धा पाहता येणार आहे. एकावेळी ते आकाशात दिसणार असून, या वेळी मंगळ जास्त प्रकाशमान दिसेल यानंतर शनी व ज्येष्ठा तारा प्रकाशमान दिसतील.
==========================================
No comments:
Post a Comment