[अंतरराष्ट्रीय]
१- वॉशिंग्टन; घरात धुम्रपान करणे लहान मुलांसाठी धोकादायक - सर्वेक्षण
२- कॅलिफोर्निया; पृथ्वीच्या आकाराचे आणखी १०० ग्रह
३- 3 हजार दहशतवाद्यांना ठार केले: तुर्कस्तान
४- नायजेरियातील भारतीयाची 45 दिवसांनी सुटका!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- हरिश रावतांची भाजपला धोबीपछाड, उत्तराखंडमध्ये काँग्रेसला बहुमत
६- सप्टेंबरपर्यंत वाळू साठ्यांवर सॅटेलाईटची नजर, जावडेकर
७- मोदींची डिग्री खोटीच, दिल्ली विद्यापीठ दबावाखाली - आपचा नवा आरोप
८- शीना बोरा हत्या, श्यामवर रायला बनायचेय माफीचा साक्षीदार
९- शीना बोराला गळा दाबूनच मारले- चालक राय
१०- मंत्रिमंडळ बदलाची शक्यता तूर्त नाही
११- कोलकाता; भारतातील हस्तिदंताचा साठा जाळून नष्ट करण्याचा विचार
१२- सातव्या वेतन आयोगाची वेतन रचना सोपी
१३- राजनच गव्हर्नर राहिले तर रुपया मजबूत होईल
१४- पाकिस्तानकडून 10 भारतीय मच्छिमारांना अटक
१५- प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१६- उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात अॅडमिट
१७- वेगळा विदर्भ नव्हे, पाणी प्रश्न महत्त्वाचा : गडकरीं
१८- कल्याण; तरुणांनी 40 दिवसांत पार केले 21 हजार किमी अंतर
१९- ‘धान्य घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा’ - काँग्रेसचे प्रतापसिंग बाजवा
२०- सुब्रतो रॉय राहणार 11 जुलैपर्यंत कारागृहाबाहेर
२१- दुष्काळामुळे साडेसहा हजार कोटींचे नुकसान
२२- 'मोदी लाटेप्रमाणे 'यूपी'त कॉंग्रेसची लाट आणणार' - कॉंग्रेसचे निवडणूक धोरणकर्ते प्रशांत किशोर
२३- छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
२४- दिल्ली; '100' क्रमांकावर न्यायाधीशांनाही मिळेना दाद!
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२५- सोलापूर; हायप्रोफाईल मर्डर : रगेल डॉ. प्रसन्न अग्रहारची रंगेल कहाणी
२६- औरंगाबाद; म्हणून तिला दोरखंडाने 20 वर्ष बांधून ठेवलं...
२७- नागपुरात पोलिसाची पत्नीला जनावरासारखी मारहाण, घटस्फोटासाठी दबाव
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- 'कौन बनेगा करोडपती'च्या इन्कम टॅक्समुळे बिग बी अडचणीत
२९- BCCI अध्यक्षपदाच्या राजीनाम्यास भाग पाडलं : शशांक मनोहर
३०- कर्णधार धोनीच्या भविष्यावर गांगुलीचा सवाल
३१- मुंबई-बँगलोरची अस्तित्वाची लढाई
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येते
(आशिष देशमुख नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
===========================================
केबीसीची मिळकत आणि कर यांच्यातील तफावतीमुळे 2001 मध्ये अमिताभ बच्चन यांच्याविरोधात केस करण्यात आली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने बच्चन यांना दिलासा दिला होता. त्यानंतर आयकर विभागाने हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.
बच्चन यांना कौन बनेगा करोडपतीच्या सूत्रसंचालनासाठी मिळालेल्या मानधनाची खरी रक्कम त्यांनी उघड केली नसल्याचा दावा इन्कम टॅक्स विभागाने केला होता.
आयटीच्या कलम 80 आरआर अन्वये कलाकार म्हणून करातून सूट देण्याची बिग बींची मागणी मुंबई हायकोर्टाने मान्य केली होती. त्यानुसार बिग बींच्या 50.92 कोटी रुपये मानधनाच्या 30 टक्के रकमेवर सूट दिली होती.
आयसीसीच्या चेअरमनपदाची निवडणूक लढवता यावी यासाठी मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी म्हटलं होतं. पण मिड डे वृत्तपत्रातील बातमीनुसार मनोहर यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडण्यात आलं.

हायप्रोफाईल मर्डर : रगेल डॉ. प्रसन्न अग्रहारची रंगेल कहाणी
सोलापूर: सोलापुरातल्या हायप्रोफाईल मर्डर केसमधून पोलिसांना नवनवीन आणि धक्कादायक माहिती मिळत चालली आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेला प्रसन्न रंगेल तर होताच, पण तो किती निर्दयी होता याची प्रचीती पोलिसांना आली.
जीवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीचा खून करणाऱ्या प्रसन्नाला त्याच्या मुलाच्या भवितव्याचीही चिंता वाटली नाही. हा सगळा प्रकार प्रसन्नची प्रेयसी मेघ रॉय चौधरीच्या साक्षीने झाल्याचं पोलीस तपासात उघड होत चाललं आहे.
डॉ. रश्मी अग्रहारचा खून होण्याच्या काळात मेघ रॉय चौधरी सोलापूर मुक्कामी असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे रश्मी अग्रहार खून खटल्यात प्रसन्नाचा हात खोलवर अडकत चालला आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळुरूची रश्मी पुजार, लग्नानंतर रश्मी अग्रहार बनली. २०११ साली तीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. दुर्दैवाने हे बाळ ऑटीझमच्या आजाराने त्रस्त होतं. डॉक्टर प्रसन्न अग्रहार दिवसभर गंगामाई हॉस्पिटलमध्ये व्यस्त असल्याने रश्मी पूर्ण वेळ मुलाची देखभाल करायची. नवरा आणि मुलासाठी रश्मीने आपल्या वैद्यकीय व्यवसायाकडे दुर्लक्ष केलं.एक व्यवसायिक डॉक्टर कुटुंबवत्सल गृहिणी बनली होती. पण प्रसन्न मात्र आपली प्रेयसी मेघ रॉय चौधरी सोबत व्यस्त असायचा. रश्मीचा संशयास्पद मृत्यू झाला तेव्हा ती सोलापूर वास्तव्यास होती.

म्हणून तिला दोरखंडाने 20 वर्ष बांधून ठेवलं...
औरंगाबाद : एका मनोरुग्ण महिलेला एक दोन नव्हे तर तब्बल 20 वर्षे एका झाडाला बांधून ठेवल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. राधाबाई कानडे असं या महिलेचं नाव आहे.
पतीने सोडून दिल्यानंतर आईकडेच राहणाऱ्या राधाबाईचं सुमारे 20 वर्षांपूर्वी मानसिक संतुलन बिघडलं. हातावर पोट असलेलं हे कानडे कुटुंब नंदीबैलाचे खेळ करतात. त्यामुळे फिरस्ती त्यांच्या आयुष्याचा भाग.अशा परिस्थितीत मानसिक रुग्ण असलेल्या राधाबाई कुठेही जाऊ नयेत म्हणून त्यांना कायम दोरीने बांधून घालावं लागतं.
इच्छा नसतानाही आपल्या मुलीला ही शिक्षा द्यावी लागत असल्यानं, राधाबाईंच्या आईने तिच्यावर उपचारासाठी मदतीची याचना केली आहे. औरंगाबादमधल्या काही सामाजिक संस्थांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
===========================================
हरिश रावतांची भाजपला धोबीपछाड, उत्तराखंडमध्ये काँग्रेसला बहुमत
देहरादून: भाजपचा उतावीळपणा उत्तराखंडमध्ये अंगाशी आला. कारण काँग्रेसच्या हरिश रावत यांनी भाजपला अक्षरश: तोंडावर पाडलं आहे. बहुमत चाचणीत निर्भेळ बहुमत मिळवून, हरिश रावत यांनी मोदी सरकारने उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लादून अततायीपणा केल्याचं दाखवून दिलं.
बहुमत चाचणीत काँग्रेसला तब्बल 33 मतं मिळाली. त्यामुळे पुन्हा एकदा हरिश रावत उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.
या निमित्ताने गेले काही महिने उत्तराखंडात सुरु असलेली राजकीय अनिश्चितता आज अखेर संपुष्टात आल्याचं चित्र आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उत्तराखंडातील राष्ट्रपती राजवट हटवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला.
बहुमत चाचणीचा औपचारिक निकाल आज जाहीर करण्यात आला. हा निकाल सभापतींनी सर्वोच्च न्यायालयात सादर केला. त्यानंतर न्यायालयाने हरिश रावत पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळू शकतात असे निर्देश दिले. त्यामुळे 9 बंडखोर काँग्रेस आमदरांच्या बळावर राज्यात सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भाजपला यामुळे चांगलाच धक्का बसला आहे.
===========================================
'कौन बनेगा करोडपती'च्या इन्कम टॅक्समुळे बिग बी अडचणीत
मुंबई : पनामा पेपर्स लिक प्रकरणात बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांचं नाव समोर आल्याचं प्रकरण ताजं असतानाच, आता बिग बी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. 2001 मधील कौन बनेगा करोडपती या क्विझ शोच्या मिळकतीवरुन सुप्रीम कोर्टाने आयकर विभागाला टॅक्स केस रिओपन करण्यास संमती दिली आहे.
केबीसीची मिळकत आणि कर यांच्यातील तफावतीमुळे 2001 मध्ये अमिताभ बच्चन यांच्याविरोधात केस करण्यात आली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने बच्चन यांना दिलासा दिला होता. त्यानंतर आयकर विभागाने हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.
बच्चन यांना कौन बनेगा करोडपतीच्या सूत्रसंचालनासाठी मिळालेल्या मानधनाची खरी रक्कम त्यांनी उघड केली नसल्याचा दावा इन्कम टॅक्स विभागाने केला होता.
आयटीच्या कलम 80 आरआर अन्वये कलाकार म्हणून करातून सूट देण्याची बिग बींची मागणी मुंबई हायकोर्टाने मान्य केली होती. त्यानुसार बिग बींच्या 50.92 कोटी रुपये मानधनाच्या 30 टक्के रकमेवर सूट दिली होती.
===========================================
BCCI अध्यक्षपदाच्या राजीनाम्यास भाग पाडलं : शशांक मनोहर
मुंबई : शशांक मनोहर यांनी मंगळवारी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, मात्र त्यामागचं कारण स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे मनोहर यांच्या राजीनाम्यावरुन उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मनोहर यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडण्यात आल्याचे ‘मिड डे’ वृत्तपत्रात म्हटलं आहे.
आयसीसीच्या चेअरमनपदाची निवडणूक लढवता यावी यासाठी मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी म्हटलं होतं. पण मिड डे वृत्तपत्रातील बातमीनुसार मनोहर यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडण्यात आलं.
मनोहर यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही, मात्र ‘सध्याच्या परिस्थितीत मी अध्यक्ष म्हणून काम करु शकत नव्हतो. मला इतरांच्या प्रभावाखाली नाही, तर माझ्या तत्त्वांनुसार बोर्डाचा कारभार चालवायचा होता आणि माझी प्रतिमा मलिन होऊ द्यायची नव्हती’ असं मनोहर यांनी म्हटल्याचं या वृत्तात मांडलं आहे.
===========================================
सप्टेंबरपर्यंत वाळू साठ्यांवर सॅटेलाईटची नजर, जावडेकरांचं व्हिजन
नवी दिल्ली: वाळू माफियांवर कायमचा आवर घालण्यासाठी वाळू साठ्यांवर सप्टेंबरपर्यंत सॅटेलाईटद्वारे वॉच ठेवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेंकरांनी दिली.
‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
येत्या काळात 33 टक्के राष्ट्रीय वनीकरणाचं लक्ष समोर ठेऊन केंद्र सरकार काम करत आहे, तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं आम्ही विकास साधणार असल्याचा विश्वास जावडेकरांनी व्यक्त केला.
तसंच पर्यावरण आणि विकास हे एकाचवेळी शक्य आहे, हे आम्ही दाखवून दिलं. गेल्या दोन वर्षा जंगल क्षेत्रात वाढ झाली. पर्यावरणाला बाधा न येता अनेक विकास कामांना परवानगी दिली, असं जावडेकर यांनी सांगितलं.
मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मराठी मंत्र्यांचं महाराष्ट्राबाबतचं व्हिजन ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ या कार्यक्रमातून मांडण्यात येत आहे.
===========================================
वेगळा विदर्भ नव्हे, पाणी प्रश्न महत्त्वाचा : गडकरींचं व्हिजन
नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्रासाठी वेगळ्या विदर्भाचा नव्हे तर पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात पाच वर्षात 3 लाख कोटींची गुंतवणूक करण्याचं लक्ष्य आहे. आतापर्यंत 6 हजार कोटींचा निधी दिला आहे. मात्र चांगल्या सुविधांसाठी पैसे मोजावे लागणार आहेत, त्यामुळे टोलपासून मुक्ती होणं असंभव आहे, असं केंद्रीय परिवहन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
राजधानी दिल्लीत ‘एबीपी माझा’च्या ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मराठी मंत्र्यांचं महाराष्ट्राबाबतचं व्हिजन ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ या कार्यक्रमातून मांडण्यात येत आहे.
===========================================
नागपुरात पोलिसाची पत्नीला जनावरासारखी मारहाण, घटस्फोटासाठी दबाव
नागपूर : “मला घटस्फोट दे. पोटगीची मागणी करू नको”, पत्नीवर याचा दबाव आणत नागपुरात एका पोलिस कर्मचाऱ्याने त्याच्या पत्नीला जनावरासारखे मारले आणि गंभीर जखमी केले. या गुंडागर्दीत आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला त्याचा भाऊ आणि गावातल्या दबंग भाजप नेत्याने साथ दिली. पीडित महिलेला गावात साथ देणाऱ्याना ही परिणामांची धमकी दिली जात आहे. नागपूर पोलिस मात्र या प्रकरणात दोषी पोलिस कर्मचाऱ्याच्या बाजूने उभे राहून काहीच करत नाहीत.
पोलिसाकडून पत्नीला जनावरासारखी मारहाण
प्रीती शेंडे यांच्या शरीरावरच्या या जखमा त्यांच्या पतीने आणि पतीच्या मोठ्या भावाने केलेल्या अमानुष मारहाणीची आहेत. धक्कादायक बाब म्हणजे प्रीती यांना जनावरांसारखा बडवणारा त्यांचा पती देवेंद्र शेंडे हा कायद्याचा रक्षक म्हणजेच पोलिस कर्मचारी आहे. तर पतीचा मोठा भाऊ कमलाकर शेंडे भाजपचा स्थानिक नेता आहे.
प्रीती आणि पोलिस विभागात कार्यरत देवेंद्र शेंडे यांचे 2010 मध्ये लग्न झाले. मात्र, लग्नाच्या एका वर्षानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले. सप्टेंबर 2011 पासून दोघे वेगवेगळे राहू लागले. देवेंद्र यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात केस टाकली. तर प्रीती यांनी देवेंद्र सोबतच राहण्याची मागणी करत घटस्फोटाला विरोध केला.
===========================================
उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात अॅडमिट
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे हे लीलावती रुग्णालयात नियमित तपासणीसाठी (रुटीन चेकअप) गेले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सांगण्यात येत आहे.
लीलावती रुग्णालयानेही पत्रक जारी करुन, उद्धव ठाकरे रुग्णालयात अॅडमिट झाल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच त्यांची प्रकृती ठणठणीत असून काळजी करण्याचं काहीच कारण नाही. त्यांना आज दुपारनंतर डिस्चार्ज देण्यात येईल, असं पत्रकात म्हटलं आहे.
यापूर्वी 2012 मध्ये उद्धव यांची अँजिओप्लास्टी झाली होती. त्यावेळी राज ठाकरेही उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. तसंच त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर स्वत: राज ठाकरे यांनी त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं होतं.
===========================================
कर्णधार धोनीच्या भविष्यावर गांगुलीचा सवाल
नवी दिल्ली : निवड समिती 2019 च्या विश्वचषकापर्यंत महेंद्रसिंह धोनीला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून खेळवणार असेल तर ही धक्कादायक बाब आहे, अशी प्रतिक्रिया माजी कर्णधार सौरव गांगुलीने दिली आहे. तसंच विराट कोहलीकडे लवकरच संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, असे संकेतही गांगुलीने दिले आहेत.
धोनीमध्ये अजून चार वर्ष खेळण्याची क्षमता आहे का?
निवड समितीला भारतीय संघाच्या भविष्याबाबत निर्णय घेणं गरजेचं असल्याचं गांगुली म्हणाला. धोनी मागील्या 9 वर्षांपासून भारतीय संघाचा कर्णधार आहे. धोनीने ज्या पद्धतीने कर्णधाराची भूमिका निभावली आहे, ती कमालीची आहे. मात्र, संघाला 2019 च्या विश्वचषकापर्यंत घेऊन जाण्याची किंवा अजून चार वर्ष खेळण्याची क्षमता धोनीमध्ये आहे का असा प्रश्न पडतो. कारण त्याने कसोटी क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे. तो सध्या फक्त वन-डे आणि टी-20 क्रिकेट खेळत आहे, असंही गांगुलीने नमूद केलं.
2019 च्या विश्वचषकात धोनीच भारतीय संघाचा कर्णधार असेल का, या प्रश्नाचं निवड समितीने शोधलं पाहिजे. निवड समितीकडे उत्तर नसेल तर त्यांनी नवीन कर्णधार शोधावा. मात्र उत्तर नसेल आणि धोनीकडेच कर्णधारपदाची धुरा दिली तर ही बाब धक्कादायक आहे, असं मत गांगुलीने व्यक्त केलं.
===========================================
मोदींची डिग्री खोटीच, दिल्ली विद्यापीठ दबावाखाली - आपचा नवा आरोप
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 11 - दिल्ली विद्यापीठानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बनावट मार्कशीट्सना अधिकृततेचा दर्जा दिल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. भाजपानं दाखवलेल्या मार्कशीट्स व आपल्याकडे असलेल्या मार्कशीट्स यांच्यामध्ये तफावत असून मोदींच्या पदव्या बनावट असल्याचा आरोप नव्यानं आपचे नेते आशुतोष यांनी केला आहे.दोन प्रकारच्या मार्कशीट्स असून एकामध्ये नाव आणि विषय हातानं लिहिलेले आहेत, तर दुसऱ्या मार्कशीट्समध्ये ते हाताने लिहिलेले नाहीत असा आरोप आशितोष यांनी केला आहे. असं का असा प्रश्न विचारत त्यांनी दिल्ली विद्यापीठाचे रजिस्ट्रार तरूण दास यांना लक्ष्य केले आहे.तसेच आपच्या ताब्यात असलेल्या मार्कसीटमध्ये आणि भाजपानं दाखवलेल्या मार्कसीट्समध्ये असलेल्या अधिकाऱ्यांच्या सह्यांमध्येही तफावत असल्याचा दावा आशुतोष यांनी केला आहे.मोदींच्या मार्कशीट्स कम्प्युटरवर तयार करण्यात आल्या असल्याचा आरोप आशुतोष यांनी केला आहे. दिल्ली विद्यापीठाकडे 18975मध्ये कम्प्युटर होते का असा सवालही त्यांनी विचारला आहे. दिल्ली विद्यापीठाने दबावाखाली हा प्रकार केला असून नोकऱ्या वाचवण्यासाठी बनावट प्रमाणपत्रांना अधिकृत केल्याचा दावा आशुतोष यांनी केला आहे. हे प्रकरण आपण लावून धरणार असल्याचंही आशुतोष यांनी म्हटलं आहे.
===========================================
शीना बोरा हत्या, श्यामवर रायला बनायचेय माफीचा साक्षीदार
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ११ - शीना बोरा हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या गुन्ह्यातील आरोपी श्यामवर रायने विशेष सीबीआय न्यायालयासमोर माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आहे. गुन्ह्या संदर्भात मला महत्वाचे खुलासे करायचे असून, मला माफीचा साक्षीदार बनायचे आहे असे मागच्या आठवडयात श्यामवर रायने न्यायालयाला लिहीलेल्या दोन पानी पत्रात म्हटले आहे.विशेष न्यायाधीश एच.एस.महाजन यांनी रायला आरोपीच्या पिंज-यात बोलावले तेव्हा त्याने गुन्ह्यासंदर्भात आपल्यावर काय आरोप आहेत त्याची मला कल्पना आहे. मी सुद्धा गुन्ह्यात सहभागी होतो असे त्याने सांगितले. न्यायाधीशांनी त्याला गुन्ह्यासंदर्भात विचारले तेव्हा त्याने शीनाची गळा आवळून हत्या केल्याचे न्यायालयाला सांगितले.
===========================================
तरुणांनी 40 दिवसांत पार केले 21 हजार किमी अंतर
- ऑनलाइन लोकमत -कल्याण, दि. 11 - भारताला प्रदक्षिणा घालण्यासाठी तीन तरुणांनी हार्ली डेविडसन मोटारसायकलवर स्वार होत 40 दिवसांत तब्बल 21 हजार किलोमीटर अंतर पार करण्याची कामगिरी केली आहे. प्रेम पांडे, अनिकेत गुरव आणि वत्सल जोगानी अशी या तरुणांची नावे आहेत. हे तरुण कल्याण आणि बदलापूरचे रहिवासी आहेत. या प्रवासात त्यांनी संपूर्ण भारतातील राज्यांची भ्रमंती केली आहे.कल्याणमधील प्रेम पांडे, बदलापूरातील अनिकेत गुरव आणि सुरत येथील वत्सल जोगानी या तिघा तरुणांनी आपला प्रवास 28 मार्च रोजी गुजरातमधुन सुरु केला. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, कन्याकुमारी, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, छत्तसगड, ओडिसा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा मेघालय, भुतान, नेपाळचा प्रवास पूर्ण केल्यावर त्यांनी पुन्हा बिहार, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर,पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश आणि पुन्हा गुजरात असा प्रवास केला.
===========================================
मंत्रिमंडळ बदलाची शक्यता तूर्त नाही
- हरीश गुप्ता, नवी दिल्लीनरेंद्र मोदी यांच्या सरकारला दोन वर्षे होण्यास काही दिवस शिल्लक असले तरी मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेची वा खांदेपालट, बदल यांची चर्चा मात्र होताना दिसत नाही. मंत्री आणि खासदार या दोन वर्षांतील सरकारची कामगिरी आणि संसदेमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांनी अडविलेले कायदे आणि कल्याणकारी योजनांची माहिती द्या, अशा सूचना मंगळवारी खासदारांना दिल्या.खासदार व मंत्री यांच्या एकूणच कामाचा आणि विशेषत: दोन महिन्यात ते मतदारसंघात ज्या पद्धतीने वातावरण तयार करतात, याचा आढावा, स्वत: पंतप्रधान करणार आहेत. तोपर्यंत मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची अजिबात शक्यता नाही. हे खासदार पक्षाचा आणि सरकारचा कितपत प्रभावीपणे प्रचार करतात , हे पाहून मंत्रिमंडळातील बदलांचा विचार होण्याची शक्यता दिसत आहे.मोदी यांना मंत्रिमंडळात बदलांची घाई नाही, असे दिसत आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल काय लागतात, हे ते पाहणार आहेत. त्यानंतर ११ व १२ जून रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यावेळी पक्षात आवश्यक ते बदल केले जातील, असे दिसते. त्यानंतर राज्यसभेत पाठवण्याच्या पंधरा जणांविषयीही निर्णय होईल. तोपर्यंत मंत्रिमंडळात बदलांची शक्यता नाही.
===========================================
भारतातील हस्तिदंताचा साठा जाळून नष्ट करण्याचा विचार
- कोलकाता : हत्तींची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना कठोर संदेश देण्याकरिता केनियाच्या धर्तीवर भारतातही हस्तिदंत नष्ट करण्याची तरतूद करण्याचा विशेषज्ञ विचार करीत आहेत. अलीकडेच केनियामध्ये १०५ टन हस्तिदंतांचा साठा जाळून नष्ट करण्यात आला होता.हत्ती प्रकल्पाचे संचालक आर.के. श्रीवास्तव यांनी सांगितले की, ‘आम्ही राज्याच्या वनविभागाला माध्यमांच्या उपस्थितीत हस्तिदंत सार्वजनिकपणे जाळण्यास सांगितले आहे. देशातील काही राज्यांनी या दिशेने पाऊल उचलले आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटकचे मुख्य वन्यजीव संरक्षक एम.बी. होसमत म्हणाले की, ‘त्यांनी राज्यात जप्त करण्यात आलेले हस्तिदंत नष्ट करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळण्याची आम्ही वाट पाहत आहोत.राज्यात प्रथमच हस्तिदंत जाळले जातील, परंतु हा प्रस्ताव अजूनही प्राथमिक टप्प्यात असून, लागू होण्यास वेळ लागेल.’ भारतात सर्वाधिक हस्तिदंत कर्नाटकात असण्याचा अंदाज आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडू, केरळ आणि ओडिशाचा क्रमांक येतो. कारण या राज्यांमध्ये फार मोठ्या संख्येत हत्ती आहेत
===========================================
घरात धुम्रपान करणे लहान मुलांसाठी धोकादायक
- ऑनलाइन लोकमत -वॉशिंग्टन, दि. 11 - तुम्हाला घरात धुम्रपान किंवा स्मोकिंग करण्याची सवय असेल आणि जर तुमच्या घरात कोणी लहान मुल असेल तर ही तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार घरात धुम्रपान केल्याने लहान मुलं आजारी पडतात ज्यामुळे त्यांना वारंवार रुग्णालय किंवा दवाखान्याच्या फे-या माराव्या लागतात.'आम्ही केलेल्या संशोधनात घरामध्ये तंबाखूजन्य पदार्थाचा वापर होत असेल तर त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याचं', अॅशली मेरिअनोस यांनी सांगितलं आहे. नॅशनल सर्व्हे ऑफ चिल्ड्र्न हेल्थ 2011-12 ची पाहणी केली असता हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामध्ये नुकत्याच जन्मलेल्यांपासून ते 17 वर्षाच्या मुलांवर सर्व्हे करण्यात आला होता.24 टक्के मुलांचे कुटुंबिय घरातच धुम्रपान करत असल्याचं समोर आलं होतं. ज्यांच्या घरात धुम्रपान केलं जात नाही त्यांच्याशी तुलना करता इतर मुलांचं डॉक्टरांकडे जाण्याचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलं.
===========================================
कॅलिफोर्निया; पृथ्वीच्या आकाराचे आणखी १०० ग्रह
- ऑनलाइन लोकमतकॅलिफोर्निया, दि. ११ : आकाशगंगेमध्ये पृथ्वीच्या आकाराचे १०० पेक्षा अधिक ग्रह असलेल्याचा शोध अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने लावला आहे. नासाच्या केप्लर दुर्बिणीने पृथ्वीच्या आकाराएवढ्या शंभर ग्रहांचा शोध लावला आहे. या शोधामध्ये नासाने आपल्या सूर्यमालिके बाहेरील १२८४ ग्रहांचा शोध लावला असून यामधील काही ग्रह अधिवासक्षम क्षेत्रात आहेत. यात ५५० लहान ग्रह असून त्यापैकी काही ग्रह खडकाळ आहेत. आकाशगंगेतील अधिवासक्षम ग्रहांचा शोध घेत असून असे अब्जावधी ग्रह असण्याची शक्यता आहे, अशी माहिती केपलर प्रकल्पाच्या डॉ. नताली बताल्हा यांनी दिली.केप्लरच्या या नव्या शोधामुळे आकाशगंगेमध्ये अनेक छोटे ग्रह असल्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे शास्त्रज्ञ नताली बताल्हा यांनी सांगितले. मोठ्या ग्रहांच्या तुलनेत छोट्या ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता जास्त असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
===========================================
मुंबई-बँगलोरची अस्तित्वाची लढाई
- विश्वास चरणकर, बंगळुरूआयपीएलची लढाई आता अखेरच्या टप्प्यावर आल्याने प्रत्येक संघाला एकेक गुण महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रंगणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन्ही संघांसाठी विजय मिळविणे अत्यावश्यक बनले आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास आरसीबीचे आव्हान टिकून राहील, तर अंतिम चार संघांत पोहोचण्याच्या दृष्टीने विजयामुळे मुंबईची वाट सुकर होईल.दोन्ही संघांचे प्रत्येकी ९ सामने झाले असून मुंबई १०, तर आरसीबी ८ गुणांसह अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. आजचा सामना मुंबईने जिंकला तर ते चौथ्या स्थानावर जातील, आरसीबीने जिंकल्यास त्यांना पाचव्या स्थानावर जाण्याची संधी असेल.
===========================================
सातव्या वेतन आयोगाची वेतन रचना सोपी
- नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित सातव्या वेतन आयोगाची वेतन रचना अत्यंत सोपी राहणार असल्याचे वृत्त आहे, तसेच जून-जुलैपासून आयोगाची अंमलबजावणी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.प्राप्त माहितीनुसार, सातव्या वेतन आयोगाची रचना एकपदरी असणार आहे. आतापर्यंतच्या वेतन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे ती दुपदरी नसेल. दुपदरी रचनेत एक ‘पे बँड’ असतो, तसेच त्याच्या जोडीला ‘पे ग्रेड’ असतो. ही रचना सातव्या वेतन आयोगाने टाळली आहे.त्याऐवजी वेतनात एकच बँड असेल. सातव्या आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी कशी करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव पी. के. सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली आहे.
===========================================
राजनच गव्हर्नर राहिले तर रुपया मजबूत होईल
- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीरिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी रघुराम राजन यांची फेरनियुक्ती झाली नाही, तर आंतरराष्ट्रीय नाणे बाजारात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची दररोज वेगाने घसरण होईल, असा लक्षवेधी अहवाल ‘सीएलएसए’ या वित्तीय सेवा क्षेत्रातील जागतिक फर्मने नुकताच जारी केला.रघुराम राजन यांचा गव्हर्नरपदाचा कार्यकाल सप्टेंबर २0१६ अखेर संपत असून, नियमानुसार ते फेरनियुक्तीस पात्र आहेत. ‘सीएलएसए’च्या या अहवालानंतर भारतीय रुपयाचे भवितव्य आणि रघुराम राजन यांची गव्हर्नरपदी पुनर्नियुक्ती या विषयाबाबत बॉण्ड मार्केटमध्येही चिंतेचे वातावरण आहे. रघुराम राजन यांची रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी सप्टेंबर २0१३मध्ये नियुक्ती झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चलनाची स्थिती त्या वेळी चिंताजनक होती.एक अमेरिकन डॉलरला ६८.८५ रुपये अशा पातळीपर्यंत भारतीय चलन घसरले होते. राजन यांनी गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेताच अवघ्या काही महिन्यांत भारतीय रुपयाने पुन्हा उसळी मारली. नोव्हेंबर २0१३पर्यंत प्रति डॉलर ६१ ते ६२ रुपयांवर विनिमय दर स्थिरावला.आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपया मजबूत झाल्यामुळे या कालखंडात भारतीय शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. राजन यांच्या पहिल्या कार्यकालात भारतीय रुपयाने थोडेफार चढउतार जरूर अनुभवले; मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नजीकच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यात रुपया बऱ्यापैकी यशस्वी ठरला, हे वास्तव मान्यच करावे लागेल.
===========================================
‘धान्य घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा’ - काँग्रेसचे प्रतापसिंग बाजवा
- नवी दिल्ली : पंजाबातील धान्य घोटाळ्याचा सीबीआयमार्फत तपास करण्याची मागणी काँग्रेसचे प्रतापसिंग बाजवा यांनी मंगळवारी राज्यसभेत करताच शिरोमणी अकाली दल आणि भाजपने विरोध केल्यामुळे राज्यसभेत जोरदार शाब्दिक चकमक झडली. खा. विजय दर्डा यांनी बाजवा यांच्या मागणीला समर्थन दिले.पंजाबात धान्य खरेदीत मोठ्या प्रमाणात निधीचा गैरवापर, गळती आणि धान्य वळते करण्याचे प्रकार होत असून पंजाब सरकार घोटाळ्यात अडकल्याचा आरोप बाजवा यांनी केला. शून्य तासाला हा मुद्दा उपस्थित करताना बाजवा म्हणाले की, बँकानी प्रकाशसिंग बादल यांच्या सरकारला गव्हाच्या खरेदीसाठी आगाऊ पतपुरवठा करण्याला नकार दिल्यामुळे हा घोटाळा उघडकीस आला आहे. हा घोटाळा २० हजार कोटींपेक्षा मोठा आहे. बाजवा यांनी कॅगच्या अहवालाचा दाखला देत पंजाब सरकार व धान्य माफियांमध्ये संगनमत असल्याचा आरोप केला. शिरोमणी अकाली दल व भाजपच्या सदस्यांनी बाजवा यांच्या विधानावर आक्षेप घेतला. त्यावर वाद झडत असताना उपसभापती पी.जे. कुरियन यांनी सदस्यांना समज दिली.
===========================================
अंकारा - तुर्कस्तानच्या फौजांनी सीरिया व इराकमध्ये इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेच्या सुमारे 3 हजार दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी केला आहे.
इसिसविरोधात तुर्कस्तानएवढा प्रखर लढा दुसऱ्या कोणत्याही देशानी दिला नसल्याचे एर्दोगन यांनी सांगितले. "बाल्कन‘ देशांमधील सैन्यप्रमुखांसमोर बोलताना एर्दोगन यांनी इसिसला तुर्कस्तानचा पाठिंबा असल्याचा आरोपही फेटाळून लावला. ""तुर्कस्तानने इसिसला मदत केली, हा आरोप निखालस खोटा आहे. आमच्याइतका संघर्ष कोणीही केलेला नाही,‘‘ असे एर्दोगन म्हणाले.
याच बैठकीमध्ये बोलताना तुर्कस्तानच्या सैन्यप्रमुखांनी तुर्कस्तानने आत्तापर्यंत 1300 दहशतवाद्यांना ठार केल्याचे म्हटले होते. एर्दोगन व सैन्यप्रमुखांनी सांगितलेल्या आकड्यामधील फरकाबद्दल स्पष्टीकरण मिळू शकलेले नाही.
3 हजार दहशतवाद्यांना ठार केले: तुर्कस्तान
| |

पाकिस्तानकडून 10 भारतीय मच्छिमारांना अटक
| |
अहमदाबाद- पाकिस्तानी नौदलाने सागरी सीमेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहा भारतीय मच्छीमारांना अटक करून त्यांच्या दोन बोटीही ताब्यात घेतल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रीय मच्छीमार फोरमने (एनएफएफ) आज (बुधवार) दिली.
गुजरातमधील पोरबंदरचे हे दहा मच्छीमार मच्छीमारी करून परतत असताना पाकिस्तानी नौदलाने त्यांना अटक केली. समुद्रातील भारत-पाक सीमेवर या मच्छीमारांनी उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्तानी नौदलाने केला आहे.
"एनएफएफ‘चे सचिव मनीष लाधारी म्हणाले, ‘पाकिस्तानने जाकाऊ भागात भारतीय मच्छीमारांना मंगळवारी (ता. 10) अटक केली असून त्यांना कराची येथे नेण्यात आले आहे. पाकिस्तानातील अधिकाऱ्यांनी तशी माहिती आम्हाला दिली आहे.‘
दरम्यान, भारतीय मच्छीमारांना वारंवार चेतावणी देऊनही त्यांनी पाकिस्तानची हद्द न सोडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे पाकिस्तानने म्हटेल आहे.

मुंबई- गुंतागुंतीच्या व खळबळजनक अशा शीना बोरा हत्या प्रकरणात आणखी एक महत्त्वपूर्ण बाब समोर आली आहे. शीनाची हत्या गळा दाबून करण्यात आली होती, असे तिची आई इंद्राणी मुखर्जीचा चालक श्यामवर राय याने सांगितले आहे.
इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांनी शीना बोरा हिची २०१२ मध्ये हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या करून तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील जंगलात फेकून देण्यात आला होता. श्यामवरमुळेच हे प्रकरण उघडकीस आले होते. श्यामवर राय याने घेतलेल्या भूमिकेमुळे इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांचा गुन्हा अधिक स्पष्टपणे समोर येणार आहे. आरोपी श्यामवर राय हा चालक होता, त्याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवत त्यासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक गतीने उलगडू शकेल. न्यायालयाच्या आदेशानुसार श्यामवरला आज (बुधवार) न्यायालयापुढे हजर केल्यावर त्याने माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा न्यायालयाकडे व्यक्त केली. यावर १७ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
यावेळी श्यामवर म्हणाला, "शीना बोरा हत्येबद्दलची सगळी माहिती माझ्याजवळ आहे. घटना घडली त्यावेळी मी स्वतः तिथे होतो. त्याबद्दल सर्व सत्य सांगायची माझी इच्छा आहे."
विशेष सीबीआय न्यायालयात मागील सोमवारी या प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यावेळी श्यामवर रायला न्यायालयात हजर न केल्याबद्दल ठाणे तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना न्यायाधीशांनी विचारणा केली होती.
शीना बोराला गळा दाबूनच मारले- चालक राय

लखनौ- सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) दिलासा दिला असून ते 11 जुलैपर्यंत कारागृहाबाहेर राहणार आहेत.
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी रॉय हे 2013 पासून तिहार कारागृहात आहेत. रॉय यांच्या आईचे 5 मे रोजी निधन झाल्याने अंत्यसंस्कारासाठी चार आठवड्यांचा अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. आज जामीनामध्ये वाढ करण्यात आली.
दरम्यान, रॉय यांना 11 जुलै पर्यंत 200 कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत. ही रक्कम जमा न करता आल्यास त्यांना पुन्हा तिहार कारागृहामध्ये जावे लागणार आहे.
सुब्रतो रॉय राहणार 11 जुलैपर्यंत कारागृहाबाहेर
| |
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी रॉय हे 2013 पासून तिहार कारागृहात आहेत. रॉय यांच्या आईचे 5 मे रोजी निधन झाल्याने अंत्यसंस्कारासाठी चार आठवड्यांचा अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. आज जामीनामध्ये वाढ करण्यात आली.
दरम्यान, रॉय यांना 11 जुलै पर्यंत 200 कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत. ही रक्कम जमा न करता आल्यास त्यांना पुन्हा तिहार कारागृहामध्ये जावे लागणार आहे.
===========================================
नवी दिल्ली - देशातील किमान दहा राज्यांत असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे अर्थव्यवस्थेस सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांचा (सुमारे 100 अब्ज डॉलर्स) फटका बसल्याचे एका अभ्यास अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे.
देशातील एकूण 256 जिल्ह्यांमधील सुमारे 33 कोटी नागरिकांचे जीवन दुष्काळामुळे प्रभावित झाले आहे. सलग दोन वर्षे पावसाचे प्रमाण घटल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक यांसारख्या राज्यांमधील जलाशय कोरडे पडले असल्याचे असोचेमच्या या अभ्यासांतर्गत स्पष्ट झाले आहे. याचबरोबर, या वर्षी मॉन्सूनविषयी सकारात्मक अंदाज व्यक्त करण्यात आला असला; तरी दुष्काळाचा प्रभाव पुढील किमान सहा महिन्यांपर्यंत जाणवत राहिल, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
"या दुष्काळामुळे विकासासाठी राखून ठेवण्यात आलेला निधी हा मदतीसाठी वळविण्यात आला आहे; तर ग्रामीण भागांमधून होणाऱ्या स्थलांतरामुळे शहरी भागामधील पायाभूत सुविधांवर ताण आला आहे. दुष्काळामुळे महागाई वाढण्याचीही शक्यता असून यामुळे सरकारवरील दबाव आणखी वाढेल,‘ असा इशाराही या अभ्यास अहवालामधून देण्यात आला आहे.
दुष्काळामुळे साडेसहा हजार कोटींचे नुकसान

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत
| |
नवी दिल्ली - प्राप्ति
कर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) सादर करणे आणि कर परताव्यासंदर्भातील प्रलंबित दावे दाखल करण्यासाठी कर मंडळाने 31 ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत जाहीर केली आहे.
कर मंडळाने 2009-10 ते 2014-15 या सहा आर्थिक वर्षांमधील विवरण पत्र, कर संबधीच्या अडचणी आणि परताव्याबाबतचे दावे सादर करण्याची शेवटची संधी करदात्यांना दिली आहे. ऑनलाईन किंवा आधार क्रमाकांद्वारे अथवा नेट बॅंकिंगच्या माध्यमातून करदात्यांना ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. तसेच त्याची पोचपावती स्पीडपोस्टने 31 ऑगस्टपर्यंत बंगळुरूला पाठवण्याचे आवाहन केले आहे. 31 ऑगस्टपर्यंत कर मंडळाला प्राप्त झालेल्या प्रकरणांचा नोव्हेंबरपर्यंत निपटारा करून करदात्यांना परतावा दिला जाईल, असे कर मंडळाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
करदात्याने कर प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करणे प्राप्तिकर कायद्यांतर्गत बंधनकारक आहे. तथापि, प्राप्तिकर विवरणपत्र भरले नाही तर व्याजाचा भुर्दंड, परताव्यातील व्याजात घट, सुधारित विवरणपत्र भरणे, दुहेरी कर आकारणी आदी नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवाय प्राप्तिकर कायद्याच्या कलम 271 एफ अंतर्गत प्राप्तिकर अधिकारी मुदतीनंतर भरलेल्या विवरणपत्रांवर पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारू शकतो.

लखनऊ (उत्तर प्रदेश) - लोकसभा निवडणुकीदरम्यान अवघ्या सहा महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट निर्माण केली असून हेच काम उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान कॉंग्रेससाठी करणार असल्याचे कॉंग्रेसचे निवडणूक धोरणकर्ते प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमधील कॉंग्रेसच्या 600 प्रभाग अध्यक्षांना संबोधित करताना प्रशांत किशोर बोलत होते. ते म्हणाले, "मार्चमध्ये आम्ही काम सुरू केले आणि अवघ्या सहा महिन्यात अवघा देश ‘मोदी, मोदी‘ करू लागला. केवळ सहा महिन्यांत कोणत्याही निवडणुकीची दिशा बदलू शकते‘ तसेच सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. प्रशांत किशोर यांनी 2014 च्या लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षासोबत काम केले. उत्तर प्रदेशमधील विधानसभेसाठी ते कॉंग्रेससाठी काम करणार आहेत. दरम्यान बिहारमधील विधानसभेसाठीही त्यांनी काम केले होते.
'मोदी लाटेप्रमाणे 'यूपी'त कॉंग्रेसची लाट आणणार' - कॉंग्रेसचे निवडणूक धोरणकर्ते प्रशांत किशोर
| |
उत्तर प्रदेशमधील कॉंग्रेसच्या 600 प्रभाग अध्यक्षांना संबोधित करताना प्रशांत किशोर बोलत होते. ते म्हणाले, "मार्चमध्ये आम्ही काम सुरू केले आणि अवघ्या सहा महिन्यात अवघा देश ‘मोदी, मोदी‘ करू लागला. केवळ सहा महिन्यांत कोणत्याही निवडणुकीची दिशा बदलू शकते‘ तसेच सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. प्रशांत किशोर यांनी 2014 च्या लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षासोबत काम केले. उत्तर प्रदेशमधील विधानसभेसाठी ते कॉंग्रेससाठी काम करणार आहेत. दरम्यान बिहारमधील विधानसभेसाठीही त्यांनी काम केले होते.
===========================================
नायजेरियातील भारतीयाची 45 दिवसांनी सुटका!
| |
नवी दिल्ली - मरीन इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या संतोष भारद्वाजचे नायजेरियातील समुद्रातून चाच्यांनी अपहरण केल्यानंतर तब्बल 45 दिवसांनी सुटका झाली आहे. त्याबाबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

स्वराज यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे की, ‘संतोष भारद्वाजची नायजेरियातील चाच्यांकडून सुटका झाल्याचे सांगताना मला आनंद होत आहे‘ या ट्विटसोबत स्वराज यांनी संतोष यांच्या पत्नीचे छायाचित्रही पोस्ट केले आहे. संतोष हे सिंगापूरस्थित एका कंपनीमध्ये काम करत होते. दरम्यान इतर देशातील चार सहकाऱ्यांसोबत ते 26 मार्च रोजी नायजेरियातील समुद्रातून प्रवास करत होते. त्यावेळी त्या सर्वांचे चाच्यांनी अपहरण केले. भारद्वाज हे उत्तर प्रदेशमधील वाराणसीतील आहेत. त्याच्या अपहरणाचे वृत्त समजल्यानंतर कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संतोषच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती.

मुंबई- महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर कोठडी यांच्या न्यायालयीन कोठडीत 25 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. भुजबळ दीड महिन्यापासून ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.
भुजबळ दीड महिन्यापासून ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यांनी प्रथमच जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर आज (बुधवार) सुनावणी झाली. जामीन अर्जावर पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली.
दरम्यान, महाराष्ट्र सदन व इतर 11 प्रकरणी घोटाळा केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुजबळांवर आरोपपत्र दाखल करून चौकशीसाठी समन्स बजावले होते. एकूण 870 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ‘ईडी‘च्या अधिकाऱ्यांनी भुजबळ यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. 14 मार्च रोजी ‘ईडी‘ने भुजबळ यांना अटक केली आहे.
छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

दिल्ली; '100' क्रमांकावर न्यायाधीशांनाही मिळेना दाद!
| |
नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीश वाहतुकीच्या अडथळ्यात अडकल्याने त्यांनी ‘100‘ या मदत क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न असता
केला. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही त्यावर दिल्लीतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला पत्र लिहिले असून त्यांच्या या पत्रावरून न्यायालयाने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.
दिल्लीतील उच्च न्यायालयातील न्यायाधीश विपीन संघवी 29 एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी दिल्लीतील वसंत कुंजच्या दिशेने एका विवाहसमारंभासाठी निघाले होते. यावेळी रस्त्यात वाहतुकीच्या अडथळ्यामुळे त्यांना अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ अडकून राहावे लागले. त्यावेळी आजूबाजूला वाहतूक पोलिस नव्हते. त्यामुळे संघवी यांनी 100 क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. उलट पाच मिनिटे त्यांचा कॉल होल्ड करण्यात आला, असे संघवी यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. याच पत्राची एक प्रत संघवी यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी यांनाही पाठविली. न्यायालयाने हे पत्र जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले आहे.

No comments:
Post a Comment