[अंतरराष्ट्रीय]
१- इसिसच्या 'त्या' व्हिडीओतील भारतीयांची ही ओळख
२- तेहरान; ‘चाबहार’द्वारे चीनला शह
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- श्रीनगरमध्ये पोलीस स्टेशनवर दहशतवादी हल्ला, दोन पोलीस शहीद
४- सहारनपुर; पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी मुस्लिम शेतक-याने केला जमीनीचा त्याग
५- भारतीय बनावटीची लोकल चाचणीस सज्ज
६- काश्मीरचं होतंय इस्लामीकरण, पंडितांचा आरोप
७- भाजपाच्या सुंदर महिला आमदारामुळे आसाम विधानसभा चर्चेत
८- 'नीट'च्या अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
९- बेदरकार वाहन चालकांना 6 महिन्यांचा तुरुंगवास
१०- गया; मनोरमादेवींच्या जामीनावरील सुनावणी लांबणीवर
११- भारत-चीन सीमेवर प्रथमच महिलांची तुकडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- उत्तरपत्रिका घोटाळा : मुंबई विद्यापीठातील 138 कर्मचाऱ्यांच्या बदल्या
१३- लोकलमधील स्टंटबाजी जीवावर बेतली, एकाचा मृत्यू तर चौघे जखमी
१४- मुंबईतले वाघ संपले, आता सिंहाचं राज्य, प्रकाश मेहतांचा सेनेवर निशाणा
१५- 'आप'कडून खडसेंच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न : आंबेडकर
१६- शत्रूवर हल्ला कसा करायचा हे भारताने अमेरिकेकडून शिकावं - उद्धव ठाकरे
१७- लाचप्रकरणी मंत्री खडसेंना क्लीन चिट
१८- मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी चाचपणी
१९- पावसाळ्यात कोकण रेल्वेचा वेग मंदावणार
२०- ‘आय कॉल’वर दिवसाला १८ हजार कॉल
२१- गणेशोत्सवात मध्यरात्रीपर्यंत परवानगी द्या - महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघ
२२- मुठेला गतवैभवासाठी केंद्र स्तरावर उपाय-जावडेकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२३- नाशकात गोळ्या झाडून मित्राची हत्या, 5 महिन्यांतील 23 वी घटना
२४- नागपूर; पैसे न भरल्याने डांबलेल्या रुग्णाची सुटका
२५- आंबोली; शहीद गावडेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
२६- पुणे; दुष्काळाच्या झळांनी तरुण बनला चोर
२७- बोरीवली; गोराई होणार ‘पर्यटन हब’
२८- श्रीनगर: 'जैश'च्या कमांडरसह 2 दहशतवादी ठार
२९- मुंबई; पैशांअभावी रुग्णाची शस्त्रक्रियेला टाळाटाळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३०- 'गुरु' अभिषेकचा अखेरचा सोलो हिट, केआरकेचा ट्विटोमणा
३१- दिल्लीत मारुतीच्या सियाज, अर्टिंगा कारच्या किंमतीत भरघोस कपात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
माधव पावडे, गणेश देशमुख, प्रेम मानधने, स्वप्नील पठारे, विनोद साठे, दयानंद भालेराव, गजानन देशमुख, प्रेमज्योतसिंघ लांघरी, संतोष गिरी, राजेश कपूर, संतोष घोनसेवाड, मयूर शेरे, संजय पाटील, दीपक सूर्यवंशी, कैलाश कपवर, रियाझ शेख, मनदेव मामीलवाड, प्रफुल गोरे, पुरभाजी जाधव, सदाशिव सोनावणे, संजय गजरे, सुजित चव्हाडे,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
स्पर्धेत टिकून तोच राहील जो आपल्या माणसांना विसरणार नाही...
कारण माणूस कितीही मोठी काम्गीती जिंकला आणि शाबासकी द्यायला आपली मनसे नसतील तर तो जिंकूनही हरलेला असतो
[विठ्ठल धर्माधिकारी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
======================================

सोमवारी रात्री 11 वाजता शहरातल्या सातपूर कॉलनीत जिजामाता मैदानजवळ संदीप चव्हाण या 29 वर्षीय युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. संदीपच्या मित्रांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. आरोपी आणि मृत संदीप दोघांनाही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये हत्येच्या घटना वाढल्यामुळे शहरात घबराट पसरली आहे. गेल्या पाच महिन्यातील ही हत्येची 23 वी घटना असून, गेल्या चार दिवसांमधली ही तिसरी हत्या आहे. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिस अयशस्वी ठरत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.


पैसे भरु शकत नसल्यामुळे हतबल झालेल्या रुग्णाने एबीपी माझाकडे सुटकेची याचना करणारा व्हिडियो पाठवला. एबीपी माझाने डॉक्टरकडे जाऊन विचारणा केली आणि दीड महिने बंदिस्त असलेल्या गरीब संजय खांडवायेची सुटका झाली.
गोंदिया जिल्ह्यातल्या तेढा गावच्या संजयचा 25 मार्च रोजी एसटीच्या धडकेत अपघात झाला. अपघातात उजवा पाय गमावलेल्या संजयवर नागपूरच्या ग्रीन सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचार पूर्ण झाले, मात्र त्याचे पैसे न भरल्यानं हॉस्पिटलनं त्याला सोडण्यास नकार दिला.

आगाऊपणे इतरांच्या खाजगी आयुष्यावर कमेंट करणारा, किंबहुना नाक खुपसणारा अशी ख्याती असलेल्या कमाल खानने ‘2007 मधला गुरु हा सिनेमा अभिषेक बच्चनचा अखेरचा सोलो हिट होता. जर मी चुकत असेन तर मला सांगा’ असा ट्वीट केला.





१- इसिसच्या 'त्या' व्हिडीओतील भारतीयांची ही ओळख
२- तेहरान; ‘चाबहार’द्वारे चीनला शह
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- श्रीनगरमध्ये पोलीस स्टेशनवर दहशतवादी हल्ला, दोन पोलीस शहीद
४- सहारनपुर; पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी मुस्लिम शेतक-याने केला जमीनीचा त्याग
५- भारतीय बनावटीची लोकल चाचणीस सज्ज
६- काश्मीरचं होतंय इस्लामीकरण, पंडितांचा आरोप
७- भाजपाच्या सुंदर महिला आमदारामुळे आसाम विधानसभा चर्चेत
८- 'नीट'च्या अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
९- बेदरकार वाहन चालकांना 6 महिन्यांचा तुरुंगवास
१०- गया; मनोरमादेवींच्या जामीनावरील सुनावणी लांबणीवर
११- भारत-चीन सीमेवर प्रथमच महिलांची तुकडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- उत्तरपत्रिका घोटाळा : मुंबई विद्यापीठातील 138 कर्मचाऱ्यांच्या बदल्या
१३- लोकलमधील स्टंटबाजी जीवावर बेतली, एकाचा मृत्यू तर चौघे जखमी
१४- मुंबईतले वाघ संपले, आता सिंहाचं राज्य, प्रकाश मेहतांचा सेनेवर निशाणा
१५- 'आप'कडून खडसेंच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न : आंबेडकर
१६- शत्रूवर हल्ला कसा करायचा हे भारताने अमेरिकेकडून शिकावं - उद्धव ठाकरे
१७- लाचप्रकरणी मंत्री खडसेंना क्लीन चिट
१८- मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी चाचपणी
१९- पावसाळ्यात कोकण रेल्वेचा वेग मंदावणार
२०- ‘आय कॉल’वर दिवसाला १८ हजार कॉल
२१- गणेशोत्सवात मध्यरात्रीपर्यंत परवानगी द्या - महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघ
२२- मुठेला गतवैभवासाठी केंद्र स्तरावर उपाय-जावडेकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२३- नाशकात गोळ्या झाडून मित्राची हत्या, 5 महिन्यांतील 23 वी घटना
२४- नागपूर; पैसे न भरल्याने डांबलेल्या रुग्णाची सुटका
२५- आंबोली; शहीद गावडेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
२६- पुणे; दुष्काळाच्या झळांनी तरुण बनला चोर
२७- बोरीवली; गोराई होणार ‘पर्यटन हब’
२८- श्रीनगर: 'जैश'च्या कमांडरसह 2 दहशतवादी ठार
२९- मुंबई; पैशांअभावी रुग्णाची शस्त्रक्रियेला टाळाटाळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३०- 'गुरु' अभिषेकचा अखेरचा सोलो हिट, केआरकेचा ट्विटोमणा
३१- दिल्लीत मारुतीच्या सियाज, अर्टिंगा कारच्या किंमतीत भरघोस कपात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
माधव पावडे, गणेश देशमुख, प्रेम मानधने, स्वप्नील पठारे, विनोद साठे, दयानंद भालेराव, गजानन देशमुख, प्रेमज्योतसिंघ लांघरी, संतोष गिरी, राजेश कपूर, संतोष घोनसेवाड, मयूर शेरे, संजय पाटील, दीपक सूर्यवंशी, कैलाश कपवर, रियाझ शेख, मनदेव मामीलवाड, प्रफुल गोरे, पुरभाजी जाधव, सदाशिव सोनावणे, संजय गजरे, सुजित चव्हाडे,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
स्पर्धेत टिकून तोच राहील जो आपल्या माणसांना विसरणार नाही...
कारण माणूस कितीही मोठी काम्गीती जिंकला आणि शाबासकी द्यायला आपली मनसे नसतील तर तो जिंकूनही हरलेला असतो
[विठ्ठल धर्माधिकारी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
======================================
नाशकात गोळ्या झाडून मित्राची हत्या, 5 महिन्यांतील 23 वी घटना
नाशिक : हत्येच्या घटनेने नाशिक पुन्हा एकदा हादरलं आहे. सातपूर कॉलनीमध्ये संदीप चव्हाण या युवकाची गोळ्या झाडून हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
सोमवारी रात्री 11 वाजता शहरातल्या सातपूर कॉलनीत जिजामाता मैदानजवळ संदीप चव्हाण या 29 वर्षीय युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. संदीपच्या मित्रांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. आरोपी आणि मृत संदीप दोघांनाही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये हत्येच्या घटना वाढल्यामुळे शहरात घबराट पसरली आहे. गेल्या पाच महिन्यातील ही हत्येची 23 वी घटना असून, गेल्या चार दिवसांमधली ही तिसरी हत्या आहे. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिस अयशस्वी ठरत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
======================================
लोकलमधील स्टंटबाजी जीवावर बेतली, एकाचा मृत्यू तर चौघे जखमी
मुंबई: लोकल ट्रेनमधून स्टंटबाजी करणं चार तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. मुंबईच्या स्टंटबाजी करताना एकाचा मृत्यू झाला आहे. तर ४ जण जखमी झाले आहेत.
काल रात्री हे अपघात झाले आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे जखमींमध्ये हे १२ ते १६ वयोगटातील मुलं आहेत. शमशाद उमर, समीर शेख, अमन शेख अशी जखमी झालेल्या मुलांची नावं आहेत. या सर्व जखमी झालेल्यांवर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्टंट करताना मृत्युमुखी पडलेला ३२ वर्षीय इसम असून घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान स्टंटबाजी करताना ट्रेनमधून पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
======================================
पैसे न भरल्याने डांबलेल्या रुग्णाची सुटका
नागपूर : वैदकीय व्यवसायाला काळिमा फासणारी घटना नागपुरात समोर आली आहे. गरीब आदिवासी रुग्ण उपचाराचे पूर्ण पैसे भरु शकत नसल्याने एका महाभाग डॉक्टराने त्याला तब्बल दीड महिने रुग्णालयात डांबून ठेवल्याचं समोर आलं आहे.
पैसे भरु शकत नसल्यामुळे हतबल झालेल्या रुग्णाने एबीपी माझाकडे सुटकेची याचना करणारा व्हिडियो पाठवला. एबीपी माझाने डॉक्टरकडे जाऊन विचारणा केली आणि दीड महिने बंदिस्त असलेल्या गरीब संजय खांडवायेची सुटका झाली.
गोंदिया जिल्ह्यातल्या तेढा गावच्या संजयचा 25 मार्च रोजी एसटीच्या धडकेत अपघात झाला. अपघातात उजवा पाय गमावलेल्या संजयवर नागपूरच्या ग्रीन सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचार पूर्ण झाले, मात्र त्याचे पैसे न भरल्यानं हॉस्पिटलनं त्याला सोडण्यास नकार दिला.
======================================
'गुरु' अभिषेकचा अखेरचा सोलो हिट, केआरकेचा ट्विटोमणा
नवी दिल्ली : केआरके अर्थात कमाल आर खान चर्चेत राहण्यासाठी बॉलिवूडमधील वेगवेगळे कलाकार शोधतच असतो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सध्या केआरकेने आपला मोर्चा ज्युनिअर बच्चनकडे वळवला आहे.
आगाऊपणे इतरांच्या खाजगी आयुष्यावर कमेंट करणारा, किंबहुना नाक खुपसणारा अशी ख्याती असलेल्या कमाल खानने ‘2007 मधला गुरु हा सिनेमा अभिषेक बच्चनचा अखेरचा सोलो हिट होता. जर मी चुकत असेन तर मला सांगा’ असा ट्वीट केला.
======================================
दिल्लीत मारुतीच्या सियाज, अर्टिंगा कारच्या किंमतीत भरघोस कपात
नवी दिल्ली: देशातील नंबर 1 कंपनी मारुती सुझुकीनं आपल्या ग्राहकांसाठी एक खूशखबर दिली आहे. मारुती सुझुकीनं आपल्या सियाज आणि अर्टिगा एसएचव्हीएसच्या किंमतीत भरघोस कपात केली आहे.
सियाज कार 69,000 स्वस्त झाली आहे तर अर्टिगाच्या किंमतीत 62,000ची कपात करण्यात आली आहे. अबकारी करामध्ये कपात करण्यात आल्यामुळे कारच्या किंमती एवढी मोठी घट झाली आहे.
या कारवर का मिळाली एवढी सूट?
मारुती सुझुकीच्या स्मार्ट हायब्रिड व्हीकल बाय व्हीकल जे नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लानच्या अंतर्गत येत असल्यानं त्यांना अबकारी करामध्ये सूट मिळाली आहे. दिल्ली सरकारनं इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कारच्या व्हॅटमध्ये कपात केल्यानं या कारवरील कर कमी झाले आहेत.
======================================
श्रीनगरमध्ये पोलीस स्टेशनवर दहशतवादी हल्ला, दोन पोलीस शहीद
श्रीनगर: श्रीनगरमधल्या गजबजलेल्या जादीबल परिसरातल्या पोलीस स्टेशनवर काल दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यावेळी त्यांनी केलेल्या गोळीबारात दोन पोलीस शहीद झाले.
हल्ल्यानंतर हे दहशतवादी पळून गेले. शहीद झालेल्यांमध्ये एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि हवालदाराचा समावेश आहे. नजीर अहमद आणि बशीर अहमद अशी शहीद झालेल्या पोलिसांची नावं आहेत. या दोघांवरही अगदी जवळून गोळी झाडण्यात आल्यानं हे दोघेही जागेवरच गतप्राण झाले.
दरम्यान, श्रीनगरमध्ये दुसरीकडे सरायबाला भागात पोलीस आणि दहशतवाद्यांच्यात चकमक झाली. यात दोन अतिरेकी ठार झाले आहेत ज्यात जैश ए मोहम्मद या आतंकवादी संघटनेचा कमांडर सैफुल्लाह ठार झाल्याचं कळतं आहे आणि एका अतिरेक्याला जिवंत पकडण्यात आलं आहे.
श्रीनगरमध्ये काल पोलिस ठाण्यांवर केलेल्या हल्ल्यात यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. पोलीस स्टेशन्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांची शोध मोहीम चालू होती. त्याचदरम्यान सरायबाला भागात ही चकमक झाली.
======================================
उत्तरपत्रिका घोटाळा : मुंबई विद्यापीठातील 138 कर्मचाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : उत्तरपत्रिका घोटाळाप्रकरणी मुंबई विद्यापीठातील तब्बल 138 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसंच उर्वरित सहा अस्थायी कर्मचाऱ्यांवर न्यायालयीन सल्ला घेऊन कारवाई करण्यात येणार आहे.
विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तर उत्तरपत्रिका घोटाळ्याचं प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
काय आहे प्रकरण?
अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना लिहिलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा पूर्ण सोडवण्यासाठी घरी देण्याचं विद्यापीठातील रॅकेट शनिवारी मुलुंड पोलिसांनी उघडकीस आणलं. त्यावर विद्यापीठ प्रशासना कठोर पाऊल उचललं आहे.
या कारवाईमुळे आता कर्मचाऱ्यांवर परीक्षा भवनात मोबाईल फोन वापरण्यास बंदी असेल. सीसीटीव्ही कॅमेरा, कंट्रोल रुम याद्वारे त्यांच्यावरही नजर ठेवली जाणार आहे. याशिवाय परीक्षा भवनात सुरक्षा बळकट करण्यासाठी इस्राईल सरकारची मदत घेणार असल्याचंही कळतं.
======================================
मुंबईतले वाघ संपले, आता सिंहाचं राज्य, प्रकाश मेहतांचा सेनेवर निशाणा
मुंबई : भाजपनं पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईतले वाघ संपले असून आता गल्ली गल्लीत फक्त सिंह दिसेल, असं वक्तव्य करुन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
कर्नाक बंदर चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मेक इन इंडिया’चं प्रतिक असलेल्या सिंहाचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी मेहता यांनी गुजराती भाषेत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यामधील धुसफूस वाढताना दिसते आहे. आधी आशिष शेलार यांचं शिवसेनेविरोधातील वक्तव्य आणि आता प्रकाश मेहता यांचं वक्तव्य. आता प्रकाश मेहता यांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
======================================
'आप'कडून खडसेंच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न : आंबेडकर
नवी दिल्ली : एकनाथ खडसे आणि दाऊद इब्राहिम फोन कॉलप्रकरणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खडसेंचं समर्थन केलं आहे. केवळ खडसेंची बदनामी करण्याच्या हेतूने आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी हे आरोप केल्याचं आंबेडकर म्हणाले.
तसंच इतर पाच फोन नंबरही ‘आप’च्या प्रीती मेनन यांच्याकडे असतील. पण ते नंबर मेनन सादर का करत नाहीत, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. एखाद्यावर आरोप करुन बदनामी करण्याचा सपाटा सध्या सुरु असून ते योग्य नसल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी नमूद केलं.
शिवाय सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करुन जनतेसमोर माहिती आणण्याची मागणीही आंबेडकर यांनी केली आहे.
======================================
शत्रूवर हल्ला कसा करायचा हे भारताने अमेरिकेकडून शिकावं - उद्धव ठाकरे
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २४ - अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून तालिबानचा प्रमुख अख्तर मन्सूर याला ड्रोन हल्ल्यात ठार मारल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपा सरकारला यापासून धडा घेण्याचा सल्ला देत भारतानेही पाकिस्तानला धडा शिकूवन दाखवावाच असे आव्हान दिले आहे. अमेरिकेने लादेन व तालिबान प्रमुखाच्या बाबतीत जे केले तेच पाऊल उचलल्याशिवाय हिंदुस्थानचे भविष्य सुरक्षित राहणार नाही, असेही ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत उत्तम यश मिळाल्याचे जाहीर करत आसामसह इतरत्रही ‘उत्तम’ कामगिरी झाल्याचे त्यांचे सांगणे आहे. म्हणजे माहोल आनंदाचा व विजयाचा आहे. तेव्हा तालिबान प्रमुखाच्या हत्येचा धडा घेऊन आपण तोच आनंद हिंदुस्थानला मिळवून द्यायला हवा, असा सल्ला उद्धव यांनी दिला आहे.
======================================
पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी मुस्लिम शेतक-याने केला जमीनीचा त्याग
- ऑनलाइन लोकमतसहारणपूर, दि. २४ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला सत्तेवर येऊन येत्या २६ मे रोजी २ वर्ष पूर्ण होत आहेत. आणि याच दिवशी उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथे मोदींची एक सभा आयोजित करण्यात आली असून त्या सभेसाठी एका मुस्लिम शेतक-याने आपली ८ एकर जमीन मोफत (वापरासाठी) दिली आहे. विशेष म्हणजे सभेसाठी ही जागा वापरता यावी म्हणून त्याने मोठ्या कष्टाने लावलेले उसाचे पीकही कापून टाकले आहे आणि त्यासाठी कोणतीही भरपाई व मोबदला घेण्यासही त्याने नकार दिला आहे.सहारणपूरमधील दिल्ली रोड येथे मोदींची सभा आयोजित करण्यात आली असून त्यासाठी २६५ एकर जमीनीवर स्टेज व मंडप घालण्यात येणार आहे. त्यामधील काही जमीन ही रईस अहमद या मुस्लिम शेतक-याची असून त्यावर त्यांनी ऊसाची पेरणी केली होती. मात्र पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी त्यांनी स्वखुशीने आपली जमीन दिली असून त्याकरिता ऊसाचे पीकही काढून टाकले आहे.सहारणपूरमधील नेते राजीव गुम्बर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जमिनीसाठी रईस अहमद यांना मोबदला म्हणून काही रक्कम देण्यात येणार होती, मात्र त्यांनी ते पैसे घेण्यास नकार दिला.'ज्याप्रमाणे आपण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत, आदरातिथ्य करतो, त्याच परंपरेनुसार मी हे (जमीन देण्याचे) पाऊल उचलले आहे', असे अहमद यांनी सांगितले. 'सर्व गावकरी या सभेसाठी काही ना काही मदत करत असताना मी तरी कसा मागे राहू?' असा प्रश्नही अहमद यांनी विचारला.
======================================
शहीद गावडेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
- ऑनलाइन लोकमतआंबोली (जि.सिंधुदुर्ग), दि. २४ - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील चक ड्रगमुल्ला येथे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान पांडुरंग महादेव गावडे यांच्या पार्थिवावर आज आंबोली येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.शहीद पांडुरंग गावडे यांचे पार्थिव आज सकाळी गोव्यातून आंबोली येथे आणण्यात आले असून त्यांच्या अंत्ययात्रेस सुरूवात झाली थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात येईल. महाराष्ट्राच्या या शूरपुत्राच्या सन्मानासाठी हजारो गावकरी उपस्थित असून या वीर जवानाला मानवंदना देण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, बिगेडियर प्रविण शिंदे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी आंबोलीत दाखल झाले आहेत.श्रीनगर-कुपवाडातील चकड्रगमुल्ला या गावी शनिवारी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत आंबोली-मुळवंदवाडी येथील पांडुरंग महादेव गावडे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी तातडीने श्रीनगर येथील लष्कराच्या ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. शनिवारी दहशतवाद्यांसोबत तब्बल नऊ तासांपर्यंत चकमक चालली. या चकमकीत भारतीय जवानांनी सर्व पाचही दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. परंतु दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ४१ राष्ट्रीय रायफल्सचे गावडे व ४७ रायफल्सचे जवान अतुल कुमार हे जखमी झाले. उपचारावेळी गावडेंचा दुर्दैवी मृत्यू झाला.
======================================
दुष्काळाच्या झळांनी तरुण बनला चोर
- पुणे : वडील वारलेले... म्हातारी आई... लहान बहीण... परिस्थिती हलाखीची... गाव दुष्काळामुळे ओसाड झालेलं... रोजगार नाही की उत्पन्नाचं साधन नाही... तो पुण्याची वाट धरतो... नोकरी शोधतो... हाती मात्र निराशा पडते... पोटाची आग स्वस्थ बसू देत नाही... इच्छा नसताना तो वाहनचोरी करू लागतो... चोरलेली वाहने विकण्याच्या आधीच तो पोलिसांच्या ताब्यात सापडला... दुर्दैवाच्या फेऱ्याने त्याला थेट गजाआड नेले.फरासखाना पोलिसांनी नुकतीच वाहनचोरी प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. अण्णा माणिक चव्हाण (वय २४, रा. गुंजेवाडी, आंबेजवळगे, जि. उस्मानाबाद) हा तरुण गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात नोकरीच्या शोधात फिरत होता. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झालं आहे. आईवडील गावात शेतमजुरी करून कुटुंब जगवत होते. त्याच्या वडिलांचे अकाली निधन झाले. बारावीपर्यंत शिकलेल्या अण्णा हा वडिलांनंतरचा घरातला पुरुष. त्याने नातेवाईक त्यांच्याकडे पाहायला तयार नव्हते. दुष्काळामुळे शेताची कामे बंद होती. त्याला गावाकडे काम मिळेना. त्याच्या गावातले काही तरुण पुण्यात मजुरी करीत होते. त्यांच्या ओळखीने अण्णा पुण्यात आला.वडगाव धायरीमध्ये भाड्याने राहत असताना नोकरी शोधू लागला. एका फॅक्टरीत काम मिळाले; परंतु काही दिवसांत ते कामही सुटले. आई आणि बहीण त्याच्याकडे पुण्यात आली होती.
======================================
कृत्रिम पावसासाठी चाचपणी
- - विकास राऊत, औरंगाबादमराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची आॅक्टोबर २०१५ मध्ये सांगता झाल्यानंतर सी-बँड डॉप्लर रडार, विमान, फ्लेअर्स व इतर सामग्री हलविण्यात आली असली तरी पायाभूत यंत्रणेचा पूर्ण सांगाडा अद्याप विभागीय आयुक्तालयातच आहे. गेल्या शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज आहे. जूनमध्ये अंदाज घेतल्यावर कृत्रीम पाऊस पाडण्याबाबत निर्णय होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.१०० तासांवर १०० तास मोफत, असा कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी ‘ख्याती वेदर मॉडिफिकेशन’ या कंपनीसोबत करार करण्यात आला होता. २७ कोटींमध्ये ९० दिवस क्लाऊड सीडिंगचा प्रयोग करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. विमान पार्किंग, शास्त्रज्ञ, पायलटस्, तंत्रज्ञांचा आवास, निवास खर्चासह ते कंत्राट होते. ४ आॅगस्ट २०१५ रोजी प्रयोगाला सुरुवात झाली होती. आॅगस्टमध्ये १९ दिवस तर सप्टेंबरमध्ये ११ दिवस क्लाऊड सीडिंग करण्यात आले. आॅक्टोबरमध्ये ५ दिवस विमानाने उड्डाण घेतले.यातून आॅगस्टमध्ये २५४ मि. मी., सप्टेंबरमध्ये २५२ मि. मी. पाऊस कृत्रिम प्रयोगातून झाल्याचा दावा करण्यात आला होता. कराराच्या ५० टक्केच विमानाने उड्डाण केले. १३ कोटी ५० लाख रुपयांचा जास्तीचा खर्च कंपनीला द्यावा लागला
======================================
लाचप्रकरणी मंत्री खडसेंना क्लीन चिट
- मुंबई : ३० कोटी रुपयांच्या कथित लाच प्रकरणाशी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा कोणताही संबंध नाही, असा साध्यता अहवाल (स्टेट्स रिपोर्ट) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सरकारला सादर केला असून, एकप्रकारे एसीबीकडून मंत्री खडसे यांना मिळालेली ‘क्लीन चिट’ असल्याचे मानले जात आहे.ठाणे जिल्ह्यातील एका जमीन व्यवहारासाठी शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विश्वस्त रमेश जाधव यांच्याकडे ३० कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी मंत्री खडसे यांचा निकटवर्तीय गजानन पाटील यास एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने राजकीय खळबळ उडाली. या प्रकरणात मंत्री खडसे यांचा हात असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली होती.या आरोप-प्रत्यारोपानंतर एसीबीने या प्रकरणासंबंधी नुकताच आपला साध्यता अहवाल (स्टेट्स रिपोर्ट) सरकारला सादर केला असून, त्यात मंत्री खडसे यांचा कोणताही सहभाग नसल्याचे म्हटले आहे.तक्रारदार जाधव व आरोपी पाटील यांच्यातील १२ संभाषणांचे रेकॉर्डिंग
======================================
पावसाळ्यात कोकण रेल्वेचा वेग मंदावणार
- मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. सुरक्षिततेचे सर्व उपाय योजतानाच कोलाड ते ठोकूरदरम्यान ९५० कर्मचाऱ्यांची गस्त राहणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. त्याचप्रमाणे मुसळधार पाऊस असल्यास ताशी ४० किमी वेगाने ट्रेन चालविण्याचे निर्देशही इंजिनचालकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या ट्रेनचा वेग मंदावणार आहे. पावसाळ्यात दरड कोसळणे, माती खचणे, पाणी साचणे असे प्रकार होऊन कोकण रेल्वे वारंवार विस्कळीत होते. पोमेंडी, निवसर, अडवलीसारखी ठिकाणे तर कोकण रेल्वेसाठी डोकेदुखीच ठरलेली आहेत. या ठिकाणी सुरक्षेचे उपाय केल्यानंतरही दरड कोसळण्याच्या घटना घडतात. मात्र गेल्या चार वर्षांत दरड कोसळूनही कोकण रेल्वे विस्कळीत झालेली नाही, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. गेल्या वर्षी पावसाळ्यात ४00 कर्मचारी कोकण रेल्वेमार्गावर तैनात होते. यंदा ९५0 कर्मचाऱ्यांची गस्त राहणार आहे. गस्त घालतानाच काही मार्गांवर २४ तास वॉचमनही ठेवण्यात येतील. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ हालचालींसाठी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी बी. आर. एन.चे एस्कॅव्हेटर तयार ठेवण्यात आल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले. प्रवाशांच्या सोयीसाठी बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे २४ तास नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले आहेत. प्रवासी ६६६.‘ङ्मल्ल‘ंल्ल१ं्र’६ं८.ूङ्मे किंवा १३९ डायल करून तसेच कोकण रेल्वेच्या १८00२३३१३३२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ट्रेनच्या स्थितीची माहिती घेऊ शकतात. पावसाळ्यात रात्रीच्या वेळेत कोकण रेल्वेवरून चालणाऱ्या गाड्यांचे अधिकारी आणि पर्यवेक्षकांद्वारे फुटप्लेट निरीक्षणही करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) आपत्कालीन उपाययोजना एखादी दुर्घटना झाल्यास अॅक्सिडंट रिलिफ मेडिकल व्हॅन, मेडिकल व्हॅन तैनात ठेवण्यात येईल. लोको पायलट, स्टेशन मास्तर, फिल्ड अधिकाऱ्यांना मोबाइल फोन देण्यात आले आहेत. लोको पायलट आणि गार्ड यांना वॉकीटॉकी देण्यात आले आहेत. १0 जून ते ३१ आॅक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू राहील.
======================================
गोराई होणार ‘पर्यटन हब’
- - मनोहर कुंभेजकर, मुंबईबोरीवली (प.) गोराई खाडीच्या पलीकडे असलेल्या १९.३२ किलोमीटर क्षेत्रफळावर वसलेल्या गोराई आणि येथील कुलवेम व मनोरी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटन हब म्हणून जाहीर करून येथील विकास आराखड्याला मंजुरी दिली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या निर्णयाविरोधात येथील सुमारे २० हजार नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी या तीन गावांच्या नागरिकांना विश्वासात न घेता हा एकतर्फी निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.बोरीवली पश्चिमेच्या पलीकडे असलेल्या गोराई, कुलवेम आणि मनोरी ही सुमारे २० हजार लोकसंख्या असलेली तीन गावे आणि ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर पालिकेच्या हद्दीतील उत्तनसह इतर चार गावे ही स्वातंत्र्यानंतरही विकासापासून वंचित आहेत. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या प्रयत्नाने २००० साली या तीन गावांना सुमुद्राखालून जलवाहिनी टाकून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले. ही बाब सोडली तर मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत असूनही या गावांमध्ये पालिकेचे रुग्णालय, रस्ते, बेस्टची बससेवा, शौचालय या सुविधाच पालिकेने उपलब्ध करून दिल्या नाहीत. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसची सेवादेखील येथे तुटपुंजी आहे, असे गोराईच्या लुड्स डिसोझा यांनी सांगितले.
======================================
‘आय कॉल’वर दिवसाला १८ हजार कॉल
- मुंबई : दहावी-बारावीचा निकाल काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. निकालाचा ताण विद्यार्थ्यांबरोबरच पालकांवरही असून हा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थी ‘आय-कॉल’सारख्या हेल्पलाइनची मदत घेत आहेत. सध्या दिवसाला किमान १८ हजारांहून अधिक विद्यार्थी ‘आय-कॉल’च्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधत आहेत. कॉलबरोबरच मेलमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. साधारण ६५० मेल आय-कॉलच्या मेल आयडीवर येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून निकालाच्या विचारापासून टेन्शन फ्री करण्याचे काम आय-कॉलचे समुपदेशक करत आहेत, असे आय-कॉल समन्वयक पारस शर्मा यांनी सांगितले.निकालाचा ताण कमी करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या ‘आय- कॉल’ या हेल्पलाइनवर कॉल्स करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यात दहावीतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.कोणत्या शाखेची निवड करायची? कोणते महाविद्यालय निवडायचे? निकाल वाईट लागला तर पुढे काय करायचे, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहेत. या विद्यार्थ्यांचा ताण हलके करण्याचे काम आय-कॉलद्वारे केले जात आहे. आहे तो निकाल स्वीकारून पुढे काय करता येईल, शिवाय साचेबद्ध करिअरशिवाय अन्य कोणत्या पर्यायांची निवड करता येईल याविषयी विद्यार्थ्यांना मागदर्शन केले जात आहे.
======================================
गणेशोत्सवात मध्यरात्रीपर्यंत परवानगी द्या
- मुंबई : लोकमान्य टिळकांनी १९१६ साली ब्रिटिशांविरोधात दिलेल्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तो मी मिळवणारच...’ या घोषणेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने यंदाच्या गणेशोत्सवातील ११ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाने केली आहे.राज्यातील गणेशोत्सव मंडळांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांसोबत पदाधिकारी मेळावा व सुराज्य संस्कार परिषदेचे आयोजन महासंघाने केले आहे. परळच्या दामोदार नाट्यगृहात गुरुवारी, २६ मे रोजी रात्री ८ वाजता ही परिषद पार पडेल. या वेळी मूर्तिकारांना येणाऱ्या अडचणी आणि त्यांवरील उपायांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. शिवाय गणेशोत्सवात मंडळांना घ्याव्या लागणाऱ्या मुंबई मनपा, पोलीस, वाहतूक पोलीस, धर्मादाय आयुक्त, वीज कंपन्या यांच्या परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे किंवा आॅनलाइन पद्धतीने देता येतील का, यावरही सविस्तर चर्चा केली जाईल.लोकमान्य टिळकांनी केलेल्या घोषणेला शंभर वर्षे होत असल्याने शासनाने विशेष ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. त्याचावापर अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांना कशा प्रकारे करता येईल, यावरही परिषदेत ऊहापोह होणार आहे. शिवाय गिरगाव चौपाटीचे नामकरण स्वराज्यभूमी म्हणून करण्याची मागणीही महासंघाने केली आहे. लोकमान्यांच्या समाधीचा परिसर स्वच्छ करणे, शिल्पनिर्माण करणे, समाधीच्या पाठी मोठी भिंत उभी करून त्याच्यावर लोकमान्यांनी केलेल्या कामांची शिल्परूपी प्रतिकृती तयार करून इतिहासाला उजाळा देण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.
======================================
भारतीय बनावटीची लोकल चाचणीस सज्ज
- मुंबई : भारतीय बनावटीची पहिलीवहिली ‘मेधा’ लोकल पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवर चाचणीसाठी सज्ज झाली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून या लोकलच्या चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. मे अखेर चाचणीला सुरुवात होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.मुंबई उपनगरीय मार्गावर धावणाऱ्या सिमेन्स आणि बम्बार्डियर लोकलच्या निर्मितीचे काम हे रेल्वेच्या चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) केले जाते. निर्मिती जरी रेल्वेच्या फॅक्टरीत केली जात असली तरी लोकलमधील तंत्रज्ञान हे बम्बार्डियर आणि सिमेन्स याच कंपनीचे असते. मात्र ‘मेधा’ लोकलमधील तंत्रज्ञान हे संपूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे. हैदराबाद येथील ‘मेधा सर्व्हर ड्राइव्ह’ने मेधा हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या लोकलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यात प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असून, आपत्तीत प्रवाशांना मोटरमनशी संपर्क साधता येईल, अशी यंत्रणा आहे. आसनक्षमता १ हजार १६८ असून, एकूण प्रवासी क्षमता ४ हजार ८६२ आहे. वेगमर्यादा ११0 किमी प्रतितास एवढी आहे.मेधा लोकल गाडीला चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. ही लोकल चाचणीसाठी सज्ज झाली असून, पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर चाचणी होईल.
======================================
काश्मीरचं होतंय इस्लामीकरण, पंडितांचा आरोप
- ऑनलाइन लोकमतजम्मू-काश्मीर, दि. 23 - काश्मीर तसं सौंदर्याचं मूर्तिमंत उदाहरण. मात्र काश्मिरातही अनेक जण राजकारण करण्यात मश्गुल आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटन विभागानं काश्मीर फोर्ट फेस्टिव्हलसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत हरी प्रबात टेकडीचं नाव कोहिनूर-ए-मारण असं छापलं आहे. या प्रकारानंतर जम्मू-काश्मिरातल्या पंडितांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.जम्मू-काश्मीरचं इस्लामीकरण होत असल्याची टीका त्यांनी केली आहे. काश्मीरमधल्या काश्मिरी पंडितांची संघटना (एएसकेपीसी) आणि एपीएमसीसी या संघटनांनी याच्या चौकशीची मागणी केली आहे. पर्यटन विभागानं काही दिवसांपूर्वीच वृत्तपत्रात काश्मीर फोर्ट फेस्टिव्हल 23 ते 25 मेदरम्यान श्रीनगरमधल्या हरी प्रबातमध्ये साजरा करणार असल्याचं जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्ध केलं होतं. त्या जाहिरातींमध्येच हरी प्रबात या ठिकाणाला कोहिनूर ए मारन या नावानं प्रसिद्ध करण्यात आलंय. त्यामुळे काश्मिरी पंडितांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. पंडितांच्या विरोधानंतर काश्मीरचं पर्यटन विभागही खडबडून जागं झालं आहे.
======================================
भाजपाच्या सुंदर महिला आमदारामुळे आसाम विधानसभा चर्चेत
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २३ - ईशान्य भारतातील महत्वाचं राज्य असलेल्या आसाममध्ये भाजपने प्रथमच घवघवीत यश संपादन केलं. भाजपच्या या विजयाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. भाजपच्या या विजया इतकीच आसामच्या निर्वाचित आमदार अंगुरलता डेकाचीही चर्चा आहे.सोशल मिडीया आणि व्हॉटस अॅपवर अंगुरलताचे हॉट, ग्लॅमरस फोटो फिरत आहेत. अंगुरलताने भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. आसामच्या नागाव जिल्ह्यातील बातड्रोबा मतदारसंघातून अंगुरलताने काँग्रेसच्या सलग तीन टर्म निवडून येणा-या आमदाराचा पराभव केला.डिसेंबर २०१५ मध्ये अंगुरलताने भाजपमध्ये प्रवेश केला होता. सलग १५ वर्ष आमदार असलेल्या काँग्रेसच्या गौतम बोरा यांचा अंगुरलताने ५८८५ मतांनी पराभव केला. अंगुरलताने अनेक बंगाली आणि आसामी चित्रपटातून काम केले आहे.
======================================
इसिसच्या 'त्या' व्हिडीओतील भारतीयांची ही ओळख
| |
-
| |
नवी दिल्ली - बाबरी, गोध्रा, मुझफ्फरनगर व कश्मीरचा सूड घेण्यासाठी भारतात परतणार असल्याचा व्हिडिओतून संदेश देणाऱ्या इस्लामिक स्टेट (इसिस) दहशतवादी संघटनेत सहभागी झालेल्या भारतीयांची ओळख पटली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून भारतातून सिरीयात गेलेल्यांची माहिती एक वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली आहे.
======================================
नवी दिल्ली - बेदरकारपणे वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे आदी प्रकारचा गुन्हा केल्यास वाहन जागेवर तातडीने परवाना रद्द करण्याची तरतूद मोटार वाहन कायद्यामध्ये करण्यात आली असून गुन्हेगारांना सहा महिन्यांचा तुरुंगवास किंवा दंडही ठोठावण्यात येणार आहे.
देशभरातील विविध राज्यातील वाहतूक मंत्र्यांनी मोटार वाहन कायद्यामध्ये नवा कलम समाविष्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यामध्ये गुन्हेगारांना वाहन चालविण्याबाबतचे उजळणी प्रशिक्षण अनिवार्य करण्याची तरतूद आहे. बेदकारपणे वाहन चालविणे आणि संबंधित गुन्ह्यांमुळे गेल्या सहा महिन्यांत राजधानी दिल्लीत तब्बल तीन लाख जणांचा वाहन परवाना रद्द करण्यात आला आहे. धोक्याच्या इशाऱ्याशिवाय बेदरकारपणे वाहन चालविण्याचे दृश्य असलेली जाहिरात, चित्रपट, दूरचित्रवाहिनीवरील मालिका तसेच इतर कार्यक्रम तातडीने मागे घेण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली आहे.
बेदरकार वाहन चालकांना 6 महिन्यांचा तुरुंगवास
| |
-
| |
देशभरातील विविध राज्यातील वाहतूक मंत्र्यांनी मोटार वाहन कायद्यामध्ये नवा कलम समाविष्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यामध्ये गुन्हेगारांना वाहन चालविण्याबाबतचे उजळणी प्रशिक्षण अनिवार्य करण्याची तरतूद आहे. बेदकारपणे वाहन चालविणे आणि संबंधित गुन्ह्यांमुळे गेल्या सहा महिन्यांत राजधानी दिल्लीत तब्बल तीन लाख जणांचा वाहन परवाना रद्द करण्यात आला आहे. धोक्याच्या इशाऱ्याशिवाय बेदरकारपणे वाहन चालविण्याचे दृश्य असलेली जाहिरात, चित्रपट, दूरचित्रवाहिनीवरील मालिका तसेच इतर कार्यक्रम तातडीने मागे घेण्याच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली आहे.
======================================
'नीट'च्या अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
| |
-
| |
नवी दिल्ली - राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या (नीट) अध्यादेशावर आज (मंगळवार) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षऱी केली आहे. यामुळे आता देशभरात ‘नीट‘द्वारेच वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सरकारने राष्ट्रपतींना आपली भूमिका सांगितली. मात्र, राष्ट्रपतींनी अध्यादेशाबाबत आणखी माहिती आणि स्पष्टीकरण मागितले होते. अखेर आज सकाळी चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी राष्ट्रपतींनी नीटच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. देशाच्या महाधिवक्त्यांनी राष्ट्रपतींना नीटबाबत कायदेशीर बाजू समजावून सांगितली आहे.
आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सोमवारी राष्ट्रपतींची भेट घेऊन ‘नीट’बाबत राज्यांच्या विरोधाची कारणे व अध्यादेशाची परिहार्यता याची माहिती त्यांना दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या ९ मेच्या निर्णयानुसार ‘नीट’ परीक्षेचा दुसरा टप्पा २४ जुलैला घेणे राज्यांसाठी बंधनकारक आहे. दरम्यान, केंद्र एखादा निर्णय घेण्यावर ठाम असेल व काही मतभिन्नता उद्भवली, तर राष्ट्रपतींना त्याबाबत आपली भूमिका समजावून सांगावी लागते. त्यानुसार राष्ट्रपती व नड्डा यांच्यातील आजच्या अर्ध्या तासाच्या भेटीनंतर, सरकारचे मत राष्ट्रपतींना सांगितले, इतकेच सरकारी गोटातून सांगण्यात आले.
======================================
मनोरमादेवींच्या जामीनावरील सुनावणी लांबणीवर
| |
-
| |
गया - माथेफिरू चिरंजीवाने एका निष्पाप युवकाची गोळ्या घालून केलेली हत्या आणि त्यानंतर पोलिसांच्या धाडीमध्ये राहत्या घरीच मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा सापडल्याने वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेल्या संयुक्त जनता दलाच्या आमदार मनोरमादेवी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज (मंगळवार) पुढे ढकलण्यात आली आहे.
मनोरमादेवी यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज गया सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीशांनी जामीनावरील निर्णय अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकला आहे. सुनावणीची पुढील तारिख निश्चित करण्यात आलेली नाही. मनोरमादेवी नुकत्याच न्यायालयास शरण आल्या होत्या. त्यानंतर न्यायालयाने मनोरमादेवींना 14 दिवसांची कोठडी सुनावली होती.
आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप मनोरमादेवी यांनी केला आहे. एका युवकावर गोळीबार करून खून केल्याच्या आरोपावरून मनोरमादेवी यांचा मुलगा रॉकी याला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यानंतर त्यांच्या घराच्या झडतीत मद्याच्या बाटल्या सापडल्या होत्या.
======================================
भारत-चीन सीमेवर प्रथमच महिलांची तुकडी
| |
-
| |
नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवर इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) दलातील 12 महिलांची तुकडी प्रथमच संरक्षण करताना दिसणार आहे.
भारत-चीन सीमेवरील चौक्या उंचीवर आहेत. याठिकाणी महिला कॉन्टेबलची 12 जणांची तुकडी प्रथमच तैनात करण्यात आली आहे. ही तुकडी लडाखमधील लेह येथे सीमेचे संरक्षण करताना दिसणार आहे. देशभरातील 500 महिला कॉन्टेबलमधून या 12 महिलांच्या तुकडीची निवड करण्यात आली आहे. यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
21 बटालियनचे कमांडर कुंदन प्रशाद यांनी सांगितले की, आपली सर्वोत्तम सेवा देण्यासाठी या महिला कॉन्स्टेबलला खडतर प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांना पुरुष जवानांच्या साथीने संरक्षण द्यावे लागणार आहे. अतिशय थंड आणि लहरी वातावरणात या महिला तुकडीवर 14 हजार फूट उंचीवर सीमेचे संरक्षणाची जबाबदारी असणार आहे.
आयटीबीपी या दलाची 24 ऑक्टोबर 1962ला स्थापना करण्यात आली होती. लडाखमधील काराकोरम पासपासून अरुणाचल प्रदेशातील जॅकेब-ला या 3488 किमी सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी या दलावर आहे. भारत-चीन सीमेवर 9 हजार ते 18,700 फूटापर्यंत पर्वतरांगा आहेत.
======================================
श्रीनगर: 'जैश'च्या कमांडरसह 2 दहशतवादी ठार
| |
-
| |
श्रीनगर - श्रीनगर शहरातील महाराजा बाजार भागात सोमवारी रात्री सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेच्या कमांडरसह दोघेजण ठार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराजा बाजार भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराचे जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी परिसरात शोधमोहिम सुरु केली होती. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. अद्याप एक दहशतवादी याठिकाणी लपल्याची माहिती असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.
चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक जण जैश-ए-मोहंमदचा काश्मीर खोऱ्यातील कमांडर आहे. सैफुल्लाह असे त्याचे नाव आहे. दुसऱ्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
======================================
‘चाबहार’द्वारे चीनला शह
| |
-
| |
तेहरान - भारतासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेले चाबहार बंदर विकसित करण्यासाठी सोमवारी इराणबरोबर ऐतिहासिक करार झाला. या बंदराच्या विकासासाठी आणि इतर पायाभूत सुविधांसाठी भारत इराणला ५० कोटी डॉलरची मदत करणार आहे. या करारामुळे भारताला पाकिस्तान आणि चीनला टाळून अफगाणिस्तान व थेट युरोपपर्यंत पोचण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने भारताने शेजारील देशांना शह दिल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, चाबहार बंदराच्या विकासासह दोन्ही देशांदरम्यान बारा करार झाले. यामध्ये व्यापार, संस्कृती, विज्ञान आणि तंत्रज्ञान; तसेच रेल्वे, तेल, गॅस, ऊर्जा आदी क्षेत्रांतील करारांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या करारांची माहिती दिली. मोदी यांनी हा करार द्विपक्षीय संबंधांतील मैलाचा दगड ठरणार असल्याचे म्हटले आहे. गेल्या १३ वर्षांपासून चाबहार बंदर करारासाठी भारत प्रयत्नशील होता.
भारत आणि इराणने आज दहशतवाद, कट्टरपंथीय आणि सायबर गुन्ह्यांविरुद्ध एकत्रितपणे लढण्याचाही निर्धार व्यक्त केला. दोन्ही देश दहशतवादाचा आणि अतिरेकी विचारांचा बीमोड, अमली पदार्थांची तस्करी आणि सायबर क्राइम या क्षेत्रांत सातत्याने संवाद साधतील, असेही मोदी यांनी या वेळी सांगितले. सोमवारी दोन्ही देशांमध्ये शिष्टमंडळ स्तरावरील द्विपक्षीय चर्चा झाली. त्या वेळी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
======================================

भारताला जमीन आणि सागरी मार्गाने घेरण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीने चीनने ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल’ (मोत्याची माळ) घट्टपणे विणायला सुरुवात केली. या माळेतील पहिला मोती म्हणजे हाँगकाँग. सान्या, वूदी, पार्टली (सर्व चीन), सिंहावोकविले (कंबोडिया), इस्तमो डे क्रा (थायलंड), कोको, सित्वे (म्यानमार), चितगाव (बांगलादेश), हंबनटोटा (श्रीलंका), माराव (मालदीव), ग्वादार (पाकिस्तान), अल अहदाब (इराक) लामू (केनिया) आणि पूयेर्तो (सुदान) असे एकूण १५ मोती या माळेत आहेत. चीनने लडाख आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी तळ उभारले.तसेच पाकिस्ताच्या ग्वादार बंदरात पाय रोवल्याने भारताच्या पश्चिम सागरी किनाऱ्याला धोका निर्माण झाला. यावर आता भारताने जालीम उपाय शोधला आहे. इराणमधील चाबहार या बंदराचा विकास करण्याचा करार इराणसोबत करून एकाच बाणात दोन पक्ष्यांचा वेध घेतला. चाबहार हे ग्वादारपासून अवघ्या ७२ किलोमीटर अंतरावर आहे. बंदराचा पूर्ण विकास झाल्यानंतर पाकिस्तान आणि चीनच्या हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य आहे. फाळणीनंतर पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तान हा काश्मीरचा भूभाग बळकावल्याने भारताचा अफगाणिस्तानशी भूमार्गाने असलेला संपर्क तुटला. चाबहारमुळे आता थेट अफगाणिस्तानसोबत संपर्क होणार आहे.
पाकिस्तानच्या ग्वादारवर चाबहारचा उतारा
| |
-
| |
भारताला जमीन आणि सागरी मार्गाने घेरण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीने चीनने ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल’ (मोत्याची माळ) घट्टपणे विणायला सुरुवात केली. या माळेतील पहिला मोती म्हणजे हाँगकाँग. सान्या, वूदी, पार्टली (सर्व चीन), सिंहावोकविले (कंबोडिया), इस्तमो डे क्रा (थायलंड), कोको, सित्वे (म्यानमार), चितगाव (बांगलादेश), हंबनटोटा (श्रीलंका), माराव (मालदीव), ग्वादार (पाकिस्तान), अल अहदाब (इराक) लामू (केनिया) आणि पूयेर्तो (सुदान) असे एकूण १५ मोती या माळेत आहेत. चीनने लडाख आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्करी तळ उभारले.तसेच पाकिस्ताच्या ग्वादार बंदरात पाय रोवल्याने भारताच्या पश्चिम सागरी किनाऱ्याला धोका निर्माण झाला. यावर आता भारताने जालीम उपाय शोधला आहे. इराणमधील चाबहार या बंदराचा विकास करण्याचा करार इराणसोबत करून एकाच बाणात दोन पक्ष्यांचा वेध घेतला. चाबहार हे ग्वादारपासून अवघ्या ७२ किलोमीटर अंतरावर आहे. बंदराचा पूर्ण विकास झाल्यानंतर पाकिस्तान आणि चीनच्या हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य आहे. फाळणीनंतर पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तान हा काश्मीरचा भूभाग बळकावल्याने भारताचा अफगाणिस्तानशी भूमार्गाने असलेला संपर्क तुटला. चाबहारमुळे आता थेट अफगाणिस्तानसोबत संपर्क होणार आहे.
======================================
पुणे - मुठा नदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी "सकाळ‘ने घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत करीत यासंदर्भातील अहवालातून पुढे येणारे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय स्तरावर पावले उचलली जातील, अशी ग्वाही केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
जावडेकर यांनी नुकतीच "सकाळ‘च्या कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी मुठा नदी संवर्धनासाठी "सकाळ‘ने सुरू केलेल्या मोहिमेची माहिती घेतली.
नदीच्या संवर्धनासाठी "सकाळ माध्यम समूहा‘ने उगम ते संगम अशी परिक्रमा केली. या दरम्यान त्या त्या भागातील नदीतील पाण्याचे नमुने घेतले. हे नमुने पुणे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागातर्फे तपासले जाणार असून, त्याचा अहवाल देण्यात येईल. तसेच नदीकाठच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याशिवाय प्रदूषणास कारणीभूत असणारे घटक आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना, याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे जावडेकर यांना सांगण्यात आले. त्यावर हा अहवाल पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.
मुठेला गतवैभवासाठी केंद्र स्तरावर उपाय-जावडेकर
| |
-
| |
जावडेकर यांनी नुकतीच "सकाळ‘च्या कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी मुठा नदी संवर्धनासाठी "सकाळ‘ने सुरू केलेल्या मोहिमेची माहिती घेतली.
नदीच्या संवर्धनासाठी "सकाळ माध्यम समूहा‘ने उगम ते संगम अशी परिक्रमा केली. या दरम्यान त्या त्या भागातील नदीतील पाण्याचे नमुने घेतले. हे नमुने पुणे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागातर्फे तपासले जाणार असून, त्याचा अहवाल देण्यात येईल. तसेच नदीकाठच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याशिवाय प्रदूषणास कारणीभूत असणारे घटक आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना, याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे जावडेकर यांना सांगण्यात आले. त्यावर हा अहवाल पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.
======================================
पैशांअभावी रुग्णाची शस्त्रक्रियेला टाळाटाळ
| |
-
| |
मुंबई - डॉक्टर कमी किमतीचं मशीन बसवून मिळेल काय? आता गाठीला पैसे शिल्लक नाहीत. आधी दोन हार्टऍटॅक येऊन गेलेत... तसंही किती दिवस जगणार आहे मी, असा आर्त प्रश्न विचारणाऱ्या रुग्णाचा डॉक्टरला पाठविलेला मेसेज अस्वस्थ करणारा आहे. केवळ पैशांअभावी शस्त्रक्रियेसाठी अहमदनगरच्या संजीव कुलकर्णी (56 वर्षे) यांना राहुरी तालुक्याहून मुंबईला यावं लागणार आहे. प्रकृती बिघडल्याने ते लांबणीवर पडत आहे.
2011 पासून संजीव यांना हृदयाचा त्रास आहे. या त्रासामुळे त्यांच्या हृदयाचे ठोके कमी-जास्त होत असतात. कधी-कधी तर त्यांच्या ठोक्याची गती 250 चा टप्पा गाठते. त्याने घाबरल्यासारखं होणं, शरीर पांढरं पडणं, अस्वस्थ वाटणं असा त्रास संजीव यांना होतो. महिन्याभरापासून हा त्रास वाढल्याने त्यांनी नगर येथील डॉक्टरचा सल्ला घेतला. तेव्हा डॉक्टरने त्यांना आयसीडी (इम्प्लाण्टेड कार्डिओवर्टर डिफ्रिबलेटर डिवाईस) बसविण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी सुमारे साडेतीन लाखांचा खर्च येणार असल्याचे तिथल्या डॉक्टरांनी सांगितले. राजीव गांधी योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया होत नाही. पैसे नसल्याने संजीव यांनी शस्त्रक्रिया करणे टाळले. परिणामी दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावली आहे. तसंच त्यांचा प्रिंटिंगचा व्यवसायही रडतखडत सुरू असल्याने मिळकतीवर परिणाम झाला आहे.
======================================
No comments:
Post a Comment