Monday, 23 May 2016

नमस्कार लाईव्ह २३-०५-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- भारत व इराणमधील मैत्री पुरातन: मोदी 
२- भारत- अफगाणिस्तान-इराण या देशांमध्ये त्रिसदस्यीय करारावर स्वाक्ष-या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- पंकज आणि समीर भुजबळ यांच्या एमईटीवरील नियुक्त्या बेकायदा 
४- योगदिनाच्या कार्यक्रमात खास 'सेल्फी झोन' 
५- नितीशकुमार दबावाखाली काम करतात- मांझी 
६- गोव्यात इमानदार सरकार आणा- केजरीवाल 
७- जयललितांकडून 2 तासांत 500 दारूची दुकाने बंद 
८- कोचीमध्येही डिझेलच्या वाहनांवर निर्बंध 
९- पेट्रोल, डिझेल अधिभारातून 1300 कोटी जमा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- ...अखेर निलेश राणेंना सशर्त जामीन मंजूर 
११- मराठवाड्यातल्या धरणांमध्ये राहिला अवघा 1 टक्के पाणीसाठा 
१२- सर्व्हे : ब्रेडमुळे कॅन्सरचा धोका 
१३- जगातलं सगळ्यात मोठ्ठं कुराण बडोद्यातल्या मशिदीत? 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- सिंधुदुर्ग; शहीद पांडुरंग गावडेंना उद्या अखेरचा निरोप 
१५- लातूर; देवदर्शनाहून परतताना अपघात; बाप-लेकीसह महिला ठार 
१६- सातारा: अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू 
१७- मनमाड;  माळेगाव येथील शेतकऱ्याची कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या
१८- इगतपुरी; आर्थिक व्यवहारातून 46 लाखांची फसवणूक; 
१९- अहमदनगर; अंचलगाव शिवारातील विहिरीत सापडले तीन मृतदेह 
२०- सटाणा - मालेगाव रोडवर आज दुपारी इंडिका आणि रिक्षा अपघातातील मृतांची संख्या 5 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणे उपकर्णधार 
२२- टीम इंडियाचं झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक 
२३- पालघरचा शार्दुल ठाकूर भारतीय संघात 
२४- नागपूरकर फैज फजलची एकदिवसीय संघात निवड 
२५- अंगावर शहारा आणणाऱ्या 'प्रोजेक्ट मराठवाडा'चा ट्रेलर 
२६- शिल्पा शेट्टीनं 3 महिन्यांत घटवलं 21 किलो वजन 
२७- 'कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर धूम 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,पण....
एखाद्याच्या मनात घर करणे,यापेक्षा सुंदर काहीच नसते...यापेक्षा सुंदर काहीच नसते
(प्राची पवार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

============================================

सर्व्हे : ब्रेडमुळे कॅन्सरचा धोका

सर्व्हे : ब्रेडमुळे कॅन्सरचा धोका!
मुंबई : आपल्या दैनंदिन खाण्यातील महत्त्वाचा घटक बनलेला ब्रेड जीवघेणा असल्याचं समोर आहे. ब्रेड, पिझ्झा हे पदार्थ कॅन्सरजन्स असल्याचा दावा सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेन्ट या संस्थेने केला आहे.
ब्रेड, पाव, बन पाव, पिझ्झा ब्रेड, बर्गर ब्रेड अशा सर्व घटकांमध्ये कॅन्सरजन्य केमिकल असल्याचा दावा सेंटर फॉर सायन्सने केला आहे. त्यासाठी संस्थेने दिल्लीतील विविध बेकरी आणि फास्ट फूट आऊटलेटमधील नमुने तपासले. धक्कादायक म्हणजे त्यापैकी 75 टक्के टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत.
पोटॅशियम ब्रोमेट, पोटॅशियम लोडेट हे दोन्ही केमिकल कॅन्सरजन्य आहेत. या दोन्ही केमिकल्सचा वापर पीठ फुगवण्यासाठी केला जातो.  पीठ फुगवल्यानंतर त्यात हे केमिकल उरत नाही असा दावा केला जात होता. पण उत्पादनांमध्ये त्याचं घातक प्रमाण आढळल्याचा संस्थेचा दावा आहे
केएफसी, पिझ्झा हट, डॉमिनोजमधील ब्रेडही धोकादायक
सीएसईने दिल्लीमध्ये 38 प्रकारचे ब्रेड तपासले, त्यातल्या 84 टक्के ब्रेडमध्ये ब्रोमेट आणि लोडेट होतं. इतकंच नव्हे तर तुमचे फेव्हरेट डेस्टिनेशन असलेल्या केएफसी, पिझ्झा हट, डॉमिनोज, सब वे, मॅकडॉनल्ड्स या आऊटलेट्सच्या ब्रेडमध्येही हे दोन्ही केमिकल धोकादायक पातळीच्या वर असल्याचा दावा सीएसईचा आहे.
ब्रेड ही वस्तू आपल्या रोजच्या वापरातील आहे. घरी सँडविचसाठी किंवा अगदी मिसळीसोबतही ब्रेड हा हवाच. पण आता या संस्थेच्या अहवालाने आपण आजारांना निमंत्रण तर देत नाही ना? अशी शंका येणं स्वाभाविक आहे
केमिकलमुळे या रोगांना निमंत्रण
– या दोन्ही केमिकल्सच्या सेवनाने मूत्रपिंडाचे विकार होऊ शकतात.
– थायरॉईडसारख्या आजाराला आपण निमंत्रण देऊ शकतो.
– इतकंच नाही, तर केमिकलच्या अति सेवनाने कॅन्सरही होऊ शकतो.
परदेशात बंदी मात्र भारतात सर्रास वापर
अन्न प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी झटणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेने 1989 साली ब्रोमेट हे घातक असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे 1990 पासून कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन, श्रीलंका, ब्राझील, नायजेरिया, पेरु, कोलंबिया अशा देशांमध्ये ही दोन्ही केमिकलवर बंदी आहे.
पण आपल्या देशात अन्न प्रक्रियेला नियंत्रित करणारा कुचकामी कायदा हा आपल्याच जीवावर उठला आहे.
============================================

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणे उपकर्णधार

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणे उपकर्णधार
मुंबई : झिम्बाब्वे दौरा आणि वेस्ट इंडीजमधील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. विराट कोहलीला वन डे आणि टी ट्वेण्टी सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. तर विंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विराट संघाचं नेतृत्व करेल. याशिवाय मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे उपकर्णधारपदाची धुरा सांभाळेल.

मुंबईत संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीनंतर टीमची घोषणा करण्यात आली.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी वन डे संघ – महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), के एल राहुल, फैज फैजल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायुडू, रिषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरण, मंदीप सिंह, केदार जाधव, जयदेव उनाडटकर, यजुवेंद्र चहल

वेस्ट इंडिज कसोटी मालिका – विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, रिद्धिमन साहा, आर. अश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जाडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद सामी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, शार्दूल ठाकूर, स्टुअर्ट बिन्नी
============================================

टीम इंडियाचं झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक

टीम इंडियाचं झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक
मुंबईटी ट्वेण्टी विश्वचषकानंतर आयपीएलमध्ये व्यस्त असलेल्या टीम इंडियाचा आगामी दौरा निश्चित झाला आहे.

धोनीची टीम इंडिया जून महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात भारतीय संघ तीन वन डे आणि तीन ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे.

हे सहाही सामने हरारे स्पोर्टस क्लबच्या मैदानावर खेळवण्यात येतील. त्यापैकी तीन वन डे सामने 11 ते 15 जून या कालावधीत खेळवण्यात येतील, तर तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामने 18 ते 22 जून या कालावधीत खेळवण्यात येतील.

झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक
11 जून – पहिला वन डे सामना
13 जून – दुसरा वन डे सामना
15 जून – तिसरा वन डे सामना
18 जून – पहिला टी ट्वेण्टी सामना
20 जून – दुसरा टी ट्वेण्टी सामना
22 जून – तिसरा टी ट्वेण्टी सामना
============================================

शहीद पांडुरंग गावडेंना उद्या अखेरचा निरोप

शहीद पांडुरंग गावडेंना उद्या अखेरचा निरोप
सिंधुदुर्ग काश्मीरच्या कुपवाडामध्ये वीरमरण प्राप्त झालेले जवान पांडुरंग गावडे याचं पार्थिव आज त्यांच्या मूळगावी म्हणजे सिंधुदुर्गातल्या आंबोली इथं आणण्यात येईल. रात्री उशिरा त्यांचं पार्थिव गावी दाखल होईल. कालपासूनच आंबोलीमध्ये शोककळा पसरली आहे. मंगळवारी या वीराला अखेरचा निरोप देण्यात येईल.

तिकडे श्रीनगरमध्ये गावडे यांच्या सहकाऱ्यांनी आज त्यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहिली.

कुपवाड्यात शनिवारी एका घरात ५ दहशतवादी लपून बसले होते.त्या पाचही दहशतवाद्यांचा गावडे आणि त्यांच्या सहकार्यांनी खात्मा केला. मात्र त्यादरम्यान पांडुरंग गावडे जबर जखमी झाले होते. काल उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली. त्यानंतर संपूर्ण आंबोलीचं वातावरण शोकमग्न झालं.

गेल्या १५ वर्षांपासून पांडुरंग गावडे देशाची सुरक्षा करत होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.
============================================

अंगावर शहारा आणणाऱ्या 'प्रोजेक्ट मराठवाडा'चा ट्रेलर

VIDEO: अंगावर शहारा आणणाऱ्या 'प्रोजेक्ट मराठवाडा'चा ट्रेलर
मुंबई मराठवाड्यातील दुष्काळाची भीषणता टीव्हीवर बातम्यांमधून अनेकवेळा दिसली. मात्र आता हीच दाहकता दिग्दर्शक भाविन वाडिया मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेl. मराठवाड्यातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं भीषण वास्तव मांडणारा ‘प्रोजेक्ट मराठवाडा’ हा हिंदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 
या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. याशिवाय दिलीप ताहिल, गोविंद नामदेव, सीम्स बिसवास यांचीही भूमिका आहे. 
प्रकाश पटेल, जिग्ना पटेल, जय पटेल यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. 
येत्या 3 जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 
ट्रेलर VIDEO:
============================================

...अखेर निलेश राणेंना सशर्त जामीन मंजूर


============================================

शिल्पा शेट्टीनं 3 महिन्यांत घटवलं 21 किलो वजन


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 23 - ब-याच महिलांची बाळंतपणात वजन वाढल्याची तक्रार असते. अर्थात बाळंतपण म्हणजे बाईचा एक प्रकारचा पुनर्जन्मच असतो. अनेक महिला वाढलेल्या वजनाकडे म्हणजेच फॅटकडे कानाडोळा करतात. मात्र बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं गर्भधारणेच्या काळात 3 महिन्यांत तब्बल 21 किलो वजन घटवलं आहे.
    याबाबत सेलिब्रिटींचे फिटनेस एक्सपर्ट आणि शिल्पा शेट्टीचं वजन घटवण्यासाठी मदत करणा-या विनोद चन्ना यांना विचारले असता, त्यांनी गर्भधारणेनंतरही महिला फिटनेसपणा जपू शकतात, असं सांगितलं. तसेच गर्भवती असताना महिलांचा चुकीचा आहार आणि चालण्याच्या अभावामुळे गर्भधारणेच्या काळात 10-15 किलो वजन वाढत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
    महिलांनी गर्भधारणेच्या काळात काळजी घेण्याचाही त्यांनी सल्ला दिला आहे. शिल्पा शेट्टीनं गर्भवती असताना वजन घटवण्यासाठी सुद्ढ आहारसोबत कठीण व्यायाम केला. त्यावेळी तिला मान, गुडघे आणि पाठीच्या मणक्याचा खूप त्रास झाला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत तिने केलेल्या व्यायामामुळेच तिला एवढं वजन घटवणं शक्य झाल्याचं चन्ना म्हणालेत.
============================================

पालघरचा शार्दुल ठाकूर भारतीय संघात


  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. २३ - वेस्ट इंडिजमध्ये होणा-या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या १७ सदस्यीय भारतीय संघात मुंबईकर शार्दुल ठाकूर एकमेव नवीन चेहरा आहे. २४ वर्षीय शार्दुल वेगवान गोलंदाज आहे. मायदेशात दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटीमध्ये खेळलेल्या खेळाडूंवर निवड समितीने विश्वास दाखवला आहे. 
    शार्दुल मूळचा पालघर जिल्ह्यातील आहे. पालघर मुंबईपासून ८७ कि.मी अंतरावर आहे. २०१२ साली शार्दुलने मुंबईच्या रणजी संघात पदार्पण केले. पण पदार्पणात शार्दुलला चमक दाखवता आली नाही. शार्दुलने मुंबईच्या संघात पदार्पण केले त्यावर्षी मुंबईने रणजी करंडक जिंकला पण शार्दुलला चार सामन्यात ८२ च्या सरासरीने फक्त चार विकेट मिळाल्या. 
    शार्दुलला त्याच्या संघ सहाका-यांनी वजन घटवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शार्दुलने गोलंदाजीवर प्रचंड मेहनत घेतली आणि पुन्हा मुंबईच्या संघात परतला. त्याच्या गोलंदाजीच्या कौशल्यात कमालीची सुधारणा झाली होती. पुढच्या मोसमात त्याने २६.२५ च्या सरासरीने २७ विकेट काढल्या. 
============================================

नागपूरकर फैज फजलची एकदिवसीय संघात निवड


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २३ - भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी झिंबाब्वे आणि वेस्टइंडीज दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. झिंबाब्वे दौऱ्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. एकदिवसीय संघात मधल्या फळीत फलंदाज म्हणून ३० वर्षीय फैज फजलची निवड करुन संदिप पाटिल यांच्या निवडसमीतीने सर्वांना अश्चर्याचा धक्काच दिला आहे. फैज फजल हा मुळचा नागपूरमधील आहे. सध्या तो कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी परदेशात गेला आहे. भारतीय संघात निवड झाल्याने त्याला देखिल आश्चर्य वाटले असेल. फैज फजलची भारतीय संघातील निवडीमुळे त्याच्या घरात सध्या आनंदाचे वातावरन निर्माण झाले आहे. विदर्भातील उमेश यादवने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. विदर्भातील फजलची भारतीय संघात निवड झाल्यामुळे नागपूरकरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. फजल हा डाव्या हाताने फलंदाजी करतो. एकप्रकारे असेचं म्हणता येईल मधल्या फळीत सुरेश रैनाच्या जागी त्याची निवड झाली आहे. 
    आपल्या लाडक्या मुलाची भारतीय संघात निवड झाल्याचा आनंद फजलच्या आई-वडिलांनी पेढे वाटून साजरा केला. क्रिकेट खेळायला सुरु केल्यानंतर प्रत्येकाचे एकचं स्वप्न असते, ते म्हणजे भारतीय संघात निवड होण्याचे. फजलने १३ वर्ष रणजी आणि आयपीएलचे सामने खेळल्यानंतर आज भारतीय क्रिकेटमध्ये त्याची वर्णी लागली आहे.  
============================================

मराठवाड्यातल्या धरणांमध्ये राहिला अवघा 1 टक्के पाणीसाठा


  • ऑनलाइन लोकमत
    औरंगाबाद, दि. 23 - मराठवाड्यामध्ये दुष्काळानं तीव्र रूप धारण केलं असून संपूर्ण मराठवाड्यातल्या धरणांमध्ये अवघा एक टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी मराठवाड्यातली जनता पावसाकडे डोळे लावून बसली आहे. औरंगाबादचे डिव्हिजनल कमिशनर उमाकांत दांगट यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रांतातली सगळी धरणं तळाला गेली असून फक्त एक टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
    भूगर्भातल्या पाण्याचा वापर सध्या करण्यात येत असल्याचे दांगट म्हणाले. हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला असून पाऊस येईपर्यंत आम्ही तग धरू शकू अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही विहीरी व बोअर वेल्स ताब्यात घेतल्या असून त्यामधून पाण्याचा उपसा करण्यात येत आहे, असं दांगट म्हणाले. त्याचप्रमाणे जवळपास 3,600 टँकर सध्या रस्तावर असून त्यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त गावांना पाणी पुरवण्यात येत आहे. जायकवाडी धरणातून औरंगाबादला जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाणी पुरवता येईल असं सांगताना तोपर्यंत पाऊस पडेल अशी आशा असल्याचे दांगट म्हणाले.
    गेल्या पाच वर्षात चार वर्षे मराठवाड्याने दुष्काळाची बघितली आहेत. परिणामी या प्रदेशातल्या तब्बल 8,522 गांवांना सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. लातूरसारख्या शहराला तर ट्रेनने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. बीड, लातूर, उस्मानाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये 400 चारा छावण्या उभारण्यात आल्या असून त्यांच्या माध्यमातून जनावारांना दाणा-पाण्याची सोय करण्यात येत आहे.
============================================

पंकज आणि समीर भुजबळ यांच्या एमईटीवरील नियुक्त्या बेकायदा


  • धर्मादाय आयुक्तांचा निर्णय, भुजबळ कुटुंबीयांना आणखी एक धक्का
    मुंबई : छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्यकेशन ट्रस्टचे संस्थापक आणि विश्वस्त सुनील कर्वे यांना हटवून तिथे स्वत:चा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांच्या केलेल्या नेमणुका धर्मादाय आयुक्त्यांनी बेकायदा ठरवल्या आहेत. हा निर्णय म्हणजे आधीच अडचणीत असलेले छगन भुजबळ व त्यांच्या कुटंबीयांना खूपच मोठा धक्का मानला जात आहे.
    या निर्णयामुळे पंकज आणि समीर भुजबळ यांना एमईटीच्या कोणत्याही कामात लक्ष घालता येणार नाही वा संस्थेसंदर्भात कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत. सुनील कर्वे यांनी १ फेब्रुवारी २0१२ मध्ये भुजबळ कुटुंबीयांनी एमईटीचा निधी व मालमत्ता यांच्यात १७७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करणारा दावा धर्मादाय आयुक्तांकडे केला होता.  त्यानंतर अवघ्या २५ दिवसांच्या काळात भुजबळ यांनी ट्रस्टचा चेंज रिपोर्ट आयुक्तांकडे सादर केला. त्याद्वारे सुनील कर्वे यांना हटवण्यात आले आणि  एमईटीच्या सचिवपदी पंकज, तर खजिनदारपदी समीर भुजबळ यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे छगन भुजबळ यांनी धर्मादाय आयुक्तांना कळवले. कर्वे यांचा संस्थेशी संबंधच राहिला नसल्याचा दावाही भुजबळ यांनी तेव्हा केला.
============================================

देवदर्शनाहून परतताना अपघात; बाप-लेकीसह महिला ठार


  • ऑनलाइन लोकमत,
    लातूर, दि. 23- देवदर्शनाहून गावाकडे परतणाऱ्या एका कारचा आणि लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा लातूर-औसा रोडवरील आलमला रोड येथे भीषण अपघात झाला. यात बाप-लेकीसह एक महिला ठार झाली असून, चौघे जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सोमवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घडली.
    राजेश नामदेव पंडगे (वय ४०), समृद्धी राजेश पंडगे (वय ९, दोघेही रा. सिंधगाव, ता. रेणापूर), मीरा व्यंकट नागिमे (वय ४५, रा. महाळंग्रा, ता. चाकूर) असे अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. नांदेड येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन ट्रॅव्हल्स (एमएच १० एडब्ल्यू ५९७५) ही सांगली जिल्ह्यातील विटा गावाकडे सोमवारी पहाटे जात होती. दरम्यान, पंढरपूरचे देवदर्शन आटोपून पंडगे व नागिमे कुटुंबिय कार (एमएच २४ एएफ ४२३८) मधून लातूरकडे परतत होते. ही कार औसा-लातूर रस्त्यावरील आलमला रोडनजिक पोहोचली असता ट्रॅव्हल्स आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. यात कारमधील राजेश पंडगे, समृद्धी पंडगे, मीरा नागिमे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सरिता राजेश पंडगे (वय ३२), प्रणव राजेश पंडगे (वय १३, रा. सिंधगाव, ता. रेणापूर), अनुसया नाथराव उगिले (वय ७०, रा. तळणी मोहगाव) व राहुल व्यंकट नागिमे (वय २५, रा. महाळंग्रा ता. चाकूर) हे चौघे जखमी झाले. यातील दोघांना गंभीर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे औसा पोलिसांनी सांगितले.
============================================

'कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर धूम


  •  ऑनलाइन लोकमत
    अमेरिका, दि. 23- अॅक्शन फिल्म अनेकदा लोकांच्या पसंतीस उतरतात. अॅक्शन सिनेमे पाहणारा एक वेगळा असा प्रेक्षकवर्ग आहे. कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर या सिनेमालाही जगभरातल्या प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.
    2016मधला जगातला सर्वाधिक कमाई केलेला हा चित्रपट ठरला आहे. जगभरात या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 1 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे. एवढा कमाई करणारा तो 25वा सिनेमा ठरला आहे. अमेरिकेत या सिनेमानं फक्त 14 दिवसांत आतापर्यंत 314 दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमानं 23 दिवसांत 677 दशलक्ष डॉलरच्या कमाईचा टप्पा गाठला आहे. डिझ्नी स्टुडिओच्या माहितीनुसार 2016मध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. याआधी एव्हेंजर, एव्हेंजर: ऐज ऑफ एल्ट्रान आणि आयर्न मॅन 3 या सिनेमांनी सर्वाधिक कमाई केली आहे. 

============================================

जगातलं सगळ्यात मोठ्ठं कुराण बडोद्यातल्या मशिदीत?

  • First Published :23-May-2016 : 16:32:03

  • ऑनलाइन लोकमत
    बडोदा, दि. 23 - जगातलं सगळ्यात मोठं कुराण बडोद्यातल्या जामा मशिदीमध्ये असल्याचं समोर आलं आहे. ही मशिद इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्यामुळे भारतामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. मात्र, ही नवीन माहिती या मशिदीसाठी नवीन मानाचा तुरा ठरेल अशी चिन्हे आहेत.
    या मशिदीतल्या कुराणाची लांबी 75 इंच व रुंदी 41 इंच आहे. एकाचवेळी अनेक जण या कुराणाभोवती बसून त्यातल्या आयती वाचू शकतात. मोरपिसाने दौतीच्या सहाय्याने हे कुराण लिहिण्यात आलं असून त्याच्या पानांच्या चौकटींना सोनेरी झालर आहे.
    सध्या तरी गिनिज बुकमध्ये जगातलं सगळ्यात मोठं कुराण म्हणून रशियातल्या कझानमधल्या मशिदीतल्या कुराणाची नोंद आहे. या कुराणाची लांबी 59 इंच तर रुंदी 79 इंच आहे.
============================================
योगदिनाच्या कार्यक्रमात खास 'सेल्फी झोन'

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सेल्फी प्रेमींना सेल्फी काढण्याची भरपूर संधी मिळणार आहे. चंडीगडमधील कॅपिटोल काँप्लेक्स येथे आयोजित कार्यक्रमासाठी खास ‘सेल्फी झोन‘ तयार करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे.

विद्यार्थ्यांसह एकूण सुमारे 30 हजार लोक चंडीगड येथील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तरुणवर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होणे अपेक्षित आहे. प्रवेशद्वाराजवळ सेल्फी  असे चंडीगडचे उपायुक्त अजित जोशी यांनी सांगितले.

दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चंडीगड येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहणार आहेत. योग दिन हा केवळ एक इव्हेंट नाही, तर प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात किमान 20 ते 30 मिनिटे योग करायला पाहिजे असे ते म्हणाले. 

‘21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी चंडीगडमधील एका कार्यक्रमात सहभागी होणार असून, तिथे इतरांसोबत योगासने करणार आहे,‘ असे मोदींनी मन की बात कार्यक्रमात बोलताना सांगितले.
============================================
नितीशकुमार दबावाखाली काम करतात- मांझी

पाटणा- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहेत. यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था कोलमडेल, असे माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी आज (सोमवार) म्हटले आहे.

मांझी म्हणाले, ‘नितीशकुमार हे दडपणाखाली काम करत असल्यामुळे कोणताच निर्णय घेत नाहीत. यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे नेते राज वल्लभ यादव, शहाबुद्दीन यांच्यासह अनेक प्रकरणे पडून आहेत.‘

‘नितीशकुमार हे सन 2005 ते 2013 पर्यंत चांगले सरकार चालवत होते. परंतु, मध्येच त्यांना काहीतरी झाले अन्‌ त्यांच्या हातातून नियंत्रण सुटले. त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे. परंतु, दडपणाखाली त्यांना काम करता येत नाही. यामागे कोण व्यक्ती आहे, हे सर्वांनाच माहित आहे,‘ असेही मांझी म्हणाले.
============================================
गोव्यात इमानदार सरकार आणा- केजरीवाल

पणजी- कॉंग्रेस, भाजपकालीन भ्रष्टाचाराचा समाचार घेत गोवा भ्रष्टाचारमुक्त करू, असे सांगत दिल्लीप्रमाणे गोव्यात आम आदमी पार्टीचे इमानदार सरकार आणण्यासाठी सर्वधर्मियांनी एकजूट बांधावी असे आवाहन आम आदमी पार्टीचे निमंत्रक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येथे केले.

येथील कांपाल मैदानावर हजारो गोमंतकीय व देशभरातील सुमारे तीन हजार आप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत श्री. केजरीवाल यांनी कॉंग्रेस भाजपकालीन भ्रष्टाचार संपुष्टात यायला हवा की नाही? असा प्रश्‍न करीत मुलांच्या भवितव्यासाठी राज्यात आम आदमी पार्टीच्या इमानदार राजनितीची आवश्‍यकता व्यक्त केली. दिल्लीसारखीच गोव्याची अवस्था असून माजी मुख्यमंत्री संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कॉंग्रेसकालीन बेकायदा खनिज व्यवहारात गुंतलेल्यांना तुरुंगात का पाठवले नाही? कसिनो का बंद केले नाहीत? असा प्रश्‍न केला. पूर्वी कॉंग्रेस आणि आता भाजप सरकारात घोटाळे सुरुच असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडे एकमेकांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल्स असतात परंतु दोघेही कारवाई करणार नाहीत. भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई फक्त आम आदमी पार्टीच करू शकते, गोव्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन, बदल घडवेल असा दावा त्यांनी केला.
============================================
जयललितांकडून 2 तासांत 500 दारूची दुकाने बंद

चेन्नई- अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता विक्रमी सहाव्यांदा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्या दोन तासातच त्यांनी राज्यातील 500 दारूची दुकाने बंद केली.

मद्रास विद्यापीठ परिसरात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल डॉ. के. रोसैया यांनी जयललिता यांच्यासह 28 कॅबिनेट मंत्र्यांना आज (सोमवार) दुपारी शपथ दिली. मंत्रिमंडळात जुन्या आणि नव्या चेहऱ्यांचे मिश्रण असून, यामध्ये मुख्यमंत्रिपदासह चार महिलांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात 13 नवे चेहरे असतील.

जयललिता यांनी निवडकूपूर्वी नागरिकांना काही आश्वासने दिली होती. आश्वासने पूर्ण करणार असल्याचे जयललिता यांनी सांगितले. राज्यातील दारूची दुकाने दुपारी 12 ते रात्री 10 पर्यंतच उघडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, 500 दुकाने बंद केली आहेत. शिवाय, शेतकऱ्यांसाठी कर्जयोजनाही सुलभ केली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या दोन तासातच त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
============================================
भारत व इराणमधील मैत्री पुरातन: मोदी

तेहरान - भारत व इराणमधील मैत्री ही "नवी‘ नसल्याचे मत सध्या इराण दौऱ्यावर असलेल्या भारतीय पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे. भारत व इराण या दोन्ही देशांचा इतिहास जितका जुना आहे; तितकीच जुनी त्यांची मैत्री असल्याचे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) केले.

आपल्या भाषणाची सुरुवात प्रसिद्ध उर्दू कवी मिर्झा गालिब यांच्या एका "शेर‘ ने केलेल्या मोदी यांनी छाबहारमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी झालेला करार हा एक मैलाचा दगड असल्याची भूमिका व्यक्‍त केली. मोदी हा शेर म्हणत असताना इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी हे मंद स्मित करत होते. 
============================================
कोचीमध्येही डिझेलच्या वाहनांवर निर्बंध

कोची - राष्ट्रीय हरित लवादाच्या विशेष खंडपीठाने केरळमधील एर्नाकुलम येथेही दिल्लीप्रमाणेच डिझेलवर चालणाऱ्या व 10 वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या गाड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर एका महिन्यानंतर दहा वर्षांपेक्षा जुन्या डिझेलच्या गाड्या आढळल्यास दहा हजार रुपयंचा दंड ठोठावण्यात यावा, असा आदेशही यावेळी खंडपीठाने दिला.

खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये कोचीची ओळख "सर्वांत प्रदुषित शहर‘ अशी झाली असून केरळमध्ये वेगाने विकसित होणाऱ्या भागांचीही वाटचाल याच दिशेने होत असल्याचे म्हटले होते. तेव्हा विषारी वायु सोडणाऱ्या बस व ट्रकसारख्या डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांसंदर्भात तत्काळ उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर खंडपीठाने सुनावलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 
============================================
पेट्रोल, डिझेल अधिभारातून 1300 कोटी जमा

मुंबई : राज्य सरकारने सहा महिन्यांमध्ये पेट्रोल व डिझेलवरील अधिभारातून (सेस) 1300 कोटी रुपयांची रक्कम गोळा केली आहे. राज्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने ऑक्टोबर ते मार्च यादरम्यान दुष्काळ सेस म्हणून पेट्रोल व डिझेलवरील अधिभारातून अनुक्रमे 406.70 कोटी रुपये व 930.60 कोटी रुपयांचा कर गोळा केला आहे
"गेल्या तीन वर्षांपासून राज्यात दुष्काळ पडला आहे. आता सरकारला अतिरिक्त उत्पन्नाची गरज भासत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील लोकांच्या मदतीसाठी आम्ही दुष्काळ सेस गोळा करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत आम्हाला 1,300 कोटी रुपये गोळा करण्यात यश आले आहे," असे मुनगंटीवार म्हणाले.
============================================
सातारा: अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू

पिंपोडे बुद्रूक (सातारा)- वाई-वाठार रस्त्यावर वाघोली गावच्या हद्दीत सोनके फाटा येथे स्कॉर्पियो व दुचाकीमध्ये आज (सोमवार) दुपारी सव्वा बारा वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी क्र. एम एच 11 बी क्‍यू 2640 वरील दोन युवक जागीच ठार झाले आहेत. दुचाकीचालक तिसरा युवक जखमी आहे. रोहित रवींद्र ओतारी (वय 24 रा. वडूज), विजयराज गोविंद शेट्टी, (रा. मूळ सांगली, हल्ली रा. शिरवळ) अशी मृतांची नावे. दिलावर चंदुलाल मुल्ला (रा. दहिवडी) या जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्कॉर्पियोचा (एम एच 42 के 5683) चालक अमोल वसंत भिलारे (रा. मुरुम, ता. बारामती) यास वाठार स्टेशन पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
============================================


No comments: