Friday, 20 May 2016

नमस्कार लाईव्ह २०-०५-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल वाहिदला अटक 
२- साओ पावलो; सुझी ब्राझीलची पूनम पांडे 
३- सौदी अरेबिया; सतत फोनवर बोलते म्हणून पत्नीला घटस्फोट 
४- बँगकॉक; ...चक्क एका शब्दामुळे महिलेला धाडलं तुरुंगात 
५- नॅपल्ज; अबब... २ किमीच्या पिझ्झाची गिनीजबुक मध्ये नोंद 
६- भारतीय तरुणाकडे 'नासा'च्या मोहिमेचे नेतृत्त्व 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
७- 'नीट'मधून सुटका, राज्यात यंदा CET प्रमाणेच प्रवेश! 
८- काँग्रेसला मोठ्या सर्जरीची गरज : दिग्विजय सिंह 
९- 'दाऊद कॉल लॉगप्रकरणी खडसेंची चौकशी होणार', प्रीती मेनन यांची माहिती 
१०- मंत्रालयाच्या गेटवर 5 हजारांची लाच घेताना उपसचिव अटकेत 
११- काँग्रेसमुक्त भारताकडे जनतेची वाटचाल - अमित शहा 
१२- निकाल निराशाजनक पण अनपेक्षित नव्हे - दिग्विजय सिंहांचा काँग्रेसला घरचा आहेर
१३- पराभवाला राहुल जबाबदार नाहीत - काँग्रेसची स्पष्टोक्ती 
१४- गिलानी आणि शबीरची नजरकैद कायम 
१५- भारतात 79 टक्के महिलांची होते छेडछाड - एक अहवाल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१६- शरण आलेल्या निलेश राणे यांना अटक 
१७- काशिमिरामधील तीन बारवर छापा, 33 बारबाला पोलिसांच्या ताब्यात 
१८- खडसेंच्या राजीनाम्यासाठी 'आप' नेत्या प्रीती मेनन घेणार मुख्यमंत्र्याची भेट 
१९- प्रादेशिक पक्षांचा पराभव भाजप करू शकला नाही - उद्धव ठाकरे 
२०- नागपूर; साडेपाच हजार जणांना चावला कुत्रा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२१- मुंबई; 13 वर्षांपासून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात डांबलेल्या आईची सुटका 
२२- कोल्हापूर; ढोबळी मिरचीची यशस्वी शेती, 2 एकरातून 18-20 लाखांचं उत्पन्न 
२३- दिल्लीत कारने मुलीला उडवलं, सुदैवाने बचावली 
२४- मुंबई; जनरेटर ओनर्स असोसिएशनच्या सदस्यांचा मनसेत प्रवेश 
२५- मुंबई शहरात वाढल्या अतिधोकादायक इमारती 
२६- कांदिवली; डॉक्टरच्या घरी घरफोडी करणारे अटकेत 
२७- दिल्ली; भावजय आणि पतीच्या अनैतिक संबंधांच्या रागातून पुतणीची हत्या
२८- ऋषी कपूर यांच्याकडून गांधी कुटुंबावर पुन्हा हल्ला 
२९- औरंगाबाद; पोलिस दलातील जवानाची एव्हरेस्टला गवसणी 
३०- मुंबई; विनापरवाना डान्सबारवर छापा; 75 जणांना अटक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३१- द्रविड आणि झहीरला टीम इंडियाचे प्रशिक्षक बनवा 
३२- ‘सैराट’चा तेलुगू रिमेक बनणार. गुजराती आणि हिंदी व्हर्जनही; तूर्तास सिक्वेल नाही 
३३- ...म्हणून कोहलीचं चौथं शतक खास होतं 
३४- गंभीरचा लाजिरवाणा तर रैनाचा अभिमानास्पद विक्रम 
३५- मारुती सुझुकीच्या एस-क्रॉसचा ‘ब्रेक फेल’, 20,427 कार परत मागवल्या 
३६- अभिनेते अनुपम खेर रुग्णालयात दाखल 
३७- ‘एक अलबेला’ सिनेमाचा टीझर लाँच, विद्या बालनची मराठीत एंट्री 
३८- कॉमेडी किंग कपिल शर्माविरोधात पोलिसात तक्रार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
चुकीचा रस्ता..चुकीची माणसं..वाईट परिस्थिती..वाईट अनुभव..हे अत्यंत गरजेचे आहेत...
कारण...यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे
(डाॅ. राहुल कांबळे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

===========================================

'नीट'मधून सुटका, राज्यात यंदा CET प्रमाणेच प्रवेश!

'नीट'मधून सुटका, राज्यात यंदा CET प्रमाणेच प्रवेश!
नवी दिल्ली : ‘नीट’ परीक्षेबाबतच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्वत: मान्यता दिली आहे. या अध्यादेशामुळे मेडिकल प्रवेशासाठी इच्छुक  लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. आता हा अध्यादेश मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे जाणार आहे.

या अध्यादेशानुसार, महाराष्ट्रासह इतर आठ राज्यातील विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी ‘नीट’ परीक्षेतून दिलासा मिळला आहे. त्यामुळे यंदा राज्यात सीईटीप्रमाणेच मेडिकल प्रवेश होणार आहे. मात्र खासगी महाविद्यालयांना दिलासा मिळालेला नाही. त्यांचे मेडिकल प्रवेश ‘नीट’प्रमाणेच होतील.

काय आहे प्रकरण?
मेडिकल प्रवेशासाठी ‘नीट’ ही एकच परीक्षा देशभर घेतली जावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची अडचण झाली होती. राज्यातील सीईटी रद्द करुन नीट परीक्षा देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर ओढावली होती.
===========================================

शरण आलेल्या निलेश राणे यांना अटक

शरण आलेल्या निलेश राणे यांना अटक !
रत्नागिरी : चिपळूणचे काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाणप्रकरणी शरण आलेल्या माजी खासदार निलेश राणे यांना चिपळूण पोलीसांनी अटक केली आहे. हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे, निलेश राणे यांना पोलिसांसमोर हजर राहणं आवश्यक होतं.  त्यांना आज कोर्टात हजर करण्यात येईल.

दरम्यान, पोलिसांना शरण आलेल्या निलेश राणेंना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं आहे.

दुसरीकडे या मारहाण प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्यांकडून तडकाफडकी तपास काढून घेण्यात आला आहे. प्रमोद मकेश्वर यांनी निलेश राणेंविरोधात पुरावे गोळा करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र, त्यांच्याकडून हे प्रकरण आता चिपळूणचे डीवायएसपी महादेव गावडे यांच्याकडे देण्यात आलं आहे.

त्यामुळे आज निलेश राणे पोलिसांसमोर हजर राहात असताना पोलीस निरीक्षक मकेश्वरांकडून तपास काढून घेणं निव्वळ योगायोग आहे की आणखीन काही?…हा प्रश्न आहे.
===========================================

'द्रविड आणि झहीरला टीम इंडियाचे प्रशिक्षक बनवा'

'द्रविड आणि झहीरला टीम इंडियाचे प्रशिक्षक बनवा'
मुंबई: भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंहनं माजी कर्णधार राहुल द्रविड आणि माजी कसोटीवीर झहीर खान यांना टीम इंडियाचा प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पसंती दिली आहे.

“प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक नेमण्याचा अधिकार हा बीसीसीआयचा आहे. द्रविड आणि झहीरच्या अनुभवाचा टीम इंडियाला नक्कीच लाभ होऊ शकतो”, हे माझं वैयक्तिक मत आहे, असं भज्जी म्हणाला.

भारताचा कसोटी कर्णधार असलेल्या विराट कोहलीनं प्रशिक्षकपदासाठी डॅनियल व्हेटोरीच्या नावाची शिफारस केली आहे, याकडे लक्ष वेधले असता हरभजन म्हणाला की, व्हेटोरी हाही एक चांगला पर्याय ठरू शकतो.
===========================================

काँग्रेसला मोठ्या सर्जरीची गरज : दिग्विजय सिंह

काँग्रेसला मोठ्या सर्जरीची गरज : दिग्विजय सिंह
नवी दिल्ली: आसाम आणि केरळच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाला मोठ्या सर्जरीची गरज आहे, असं मत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केलं. त्यांनी केलेल्या या ट्विटची जोरदार चर्चाही होत आहे. त्यांच्या रोख नेमका कुणाकडे, हे स्पष्ट नसलं तरी त्यांच्या ट्विटवरुन तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

Today's results disappointing but not unexpected. We have done enough Introspection shouldn't we go for a Major Surgery ?


पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभेचे निकाल जाहीर झाले. त्यात आसाम आणि केरळ या दोन राज्यात काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागली.
===========================================

13 वर्षांपासून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात डांबलेल्या आईची सुटका


13 वर्षांपासून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात डांबलेल्या आईची सुटका
मुंबई : मुंबईतील एका उच्चभ्रू वसाहतीतील घरातून चक्क चार ट्रक, सहा टेम्पो भरुन कचरा बाहेर काढण्यात आला. धक्कादायक आणि मन सून्न करणारी गोष्ट म्हणजे घरातील मुलानेच जन्मदात्या आईला कचऱ्यात डांबून ठेवलं होतं. मुंलुंड पश्चिमेकडील झवेर मार्गावर असलेल्या गाइड इमारतीत ही घटना घडली.


या इमारतीत राहणाऱ्या सावला कुटुंबाने गेल्या 13 वर्षांपासून घरात कचरा साठवला होता. सोसायटीतील लोकांनी वारंवार तक्रार देऊनही सावला कुटुंबाने याकडे दुर्लक्ष केलं. याशिवाय सावला कुटुंबातील आई 86 वर्षीय मणिबेन या गेल्या काही दिवसांपासून दिसत नव्हत्या. त्यामुळे शेजाऱ्यांनी अखेर पोलिस आणि महापालिकेला पाचारण केलं. इमारतीतील रहिवाशांनी यासाठी सामाजिक कार्यकर्ते विरल शहा यांची मदत घेतली

===========================================

ढोबळी मिरचीची यशस्वी शेती, 2 एकरातून 18-20 लाखांचं उत्पन्न

ढोबळी मिरचीची यशस्वी शेती, 2 एकरातून 18-20 लाखांचं उत्पन्न
कोल्हापूर कोल्हापुरातल्या चिंचवडच्या अभिनंदन पाटील या तरुण शेतकऱ्याने ढोबळी मिरचीच्या माध्यमातून यशस्वी शेती करुन दाखवली आहे. कमी जागेत लाखोंमध्ये उत्पन्न मिळवून इतर तरुणांसमोर अभिनंदन पाटील आदर्श बनला आहे.


स्थानिक ऊसाला भाजीपाल्याचा पर्याय


अभिनंदनला लहानपणापासूनच शेतीची आवड होती. मात्र, शिक्षण सुरु असल्यानं शेतीत लक्ष देता येत नव्हतं. 2005 साली अभिनंदनचं बी.कॉम पूर्ण झालं. मात्र त्याच वर्षी अभिनंदनच्या वडिलांचं निधन झालं आणि शेतीची सगळी जबाबदारी अभिनंदनवर येऊन पडली. यानंतर अभिनंदननं शेतीत पूर्णवेळ लक्ष घालायला सुरुवात केली. स्थानिक ऊस पिकाला भाजीपाला पिकांचा पर्याय दिला.


50 गुंठ्यात ढोबळी मिरची, तर 35 गुंठ्यात मिरची


यंदा जानेवारी महिन्यात अभिनंदनं आपल्या 50 गुंठे क्षेत्रात ढोबळी मिरचीची लागवड केली. तर राहिलेल्या 35 गुंठ्यात हिरव्या मिरचीची लागवड केली.
===========================================

'सैराट'ची रेकॉर्डब्रेक कमाई, आर्ची-परशाला बंपर बोनस

'सैराट'ची रेकॉर्डब्रेक कमाई, आर्ची-परशाला बंपर बोनस?
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला याड लावणारा नागराज मंजुळेचा ‘सैराट’ बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. सिनेमाने आतापर्यंत 60 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळेच की काय सिनेमातील सहजसुंदर अभिनयाने सर्वांचं मन जिंकणाऱ्या आर्ची-परशा अर्थात रिंकी राजगुरु आणि आकाश ठोसरला यांना भरगच्च बोनस मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.


बॉक्स ऑफिसवर ‘सैराट’ने नुकताच 60 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे या दोन्ही कलाकारांना प्रत्येकी पाच कोटींचा बोनस देण्यात येणार आहे. ‘मुंबई मिरर’मध्ये हे वृत्त प्रकाशित झालं आहे.


परंतु आम्ही झी स्टुडिओशी संपर्क साधला असताना त्यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. बोनस देण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं ‘झी स्टुडिओ’तर्फे सांगण्यात आलं.


‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर व्हॉट्सअॅप आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर अफवांचा बाजार रंगत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत कोणत्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीला कोणत्याही सिनेमासाठी एवढं मानधन मिळालं नव्हतं. सध्या अप्रेझलचा मोसम सुरु आहे, त्यात सिनेस्टारही कसे मागे राहतील. त्यामुळे रिंकू आणि आकाशसाठी हा बंपर बोनस ठरला आहे.

मध्यरात्रीही ‘सैराट’चे शो
नागराज मंजुळेचा ‘सैराट’ सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरत आहे. साताऱ्यात ‘सैराट’वेड्या चाहत्यांसाठी सिनेमाचे मध्यरात्री 12 वाजता आणि पहाटे 3 वाजताही शो सुरु होते. चित्रपटाचं प्रमोशन झालं होतं, परंतु माऊथ पब्लिसिटीनेही सिनेमाच्या कमाईत आणखी भर पडली. त्यामुळेच 21 दिवसात 60 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.


चार लाख नाही तर पाच कोटी देणार
खरंतर सुरुवातीला रिंकू आणि आकाशला 4 लाख रुपयांना साईन करण्यात आलं होतं. पण आता त्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनचे सीईओ नितीन केणी आणि ‘झी स्टुडिओ’चे बिझनेस हेड निखिल साने यांनी केली. चित्रपट बनवण्याचा खर्च 4 कोटींपर्यंत गेला होता. बोनस फक्त सिनेमातील मुख्य कलाकारांनाच नाहीत तर इतरांनाही काही रक्कम देणार असल्याचं केणी यांनी सांगितलं. यासंबंधी काम सुरु असून लवकरच त्यांना पैसे देण्यात येतील, असंही केणी म्हणाले. मुंबई उपनगरात मागील आठवड्यात ‘कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर’चे तीन शो, ‘अझहर’चे तीन शो आणि ‘सैराट’चे आठ शो असल्याचं सांगताना केणी यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.


चाहत्यांच्या प्रतिसादामुळे ‘सैराट’चे शो वाढवले
29 एप्रिल रोजी ‘सैराट’ राज्यभरातील 400 थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र दुसऱ्या आठवड्यात सिनेमाचे शो 8500 ते 14,000 पर्यंत वाढले. इतकंच नाही साताऱ्यात मध्यरात्री 12 आणि पहाटे 3 चा शोही सुरु होता. ‘सैराट’चं हे यश सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारं होतं. मराठी सिनेमात हे पहिल्यांदाच घडत होतं, असं नितीन केणी यांनी सांगितलं.


अजय-अतुलच्या संगीताची जादू
नितीन केणी म्हणाले की, सिनेमाचं आणखी एक बलस्थान म्हणजे गाणी. अजय-अतुलच्या संगीताने चाहत्यांना अक्षरश: झिंग आणली. चित्रपटाची गाणी अमेरिकेच्या लॉस एंजलिसमधील सोनी थिएटरमध्ये 100 वाद्य आणि म्युझिशियन्सच्या मदतीने रेकॉर्ड करण्यात आली. अजय-अतुलला अमेरिकेत पाठवण्याचा खर्च 6-70 लाख रुपये होता.


तेलुगू, गुजराती आणि हिंदीत रिमेक
मराठीमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही ‘सैराट’चा तेलुगू रिमेक करण्याचा विचार करत आहोत. यानंतर गुजराती आणि हिंदी व्हर्जनही करण्यात येईल. मात्र सिनेमाचा सिक्वेल करण्याचा कोणताही कोणताही विचार नाही, असंही नितीन केणी यांनी बोलून दाखवलं.
===========================================

...म्हणून कोहलीचं चौथं शतक खास होतं

...म्हणून कोहलीचं चौथं शतक खास होतं !
मुंबई: विराट कोहली सध्या त्याच्या कारकीर्दीच्या सर्वोच्च शिखरावर आहे. कसोटी, वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांपाठोपाठ आयपीएलच्या रणांगणातही विराट कोहलीनं धावांची जणू टांकसाळ उघडली आहे. तो शतकामागून शतकं ठोकतोय. आणि विशेष म्हणजे ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये खेळतानाही त्याला आपल्या तंत्रशुद्ध फटक्यांना कुठं मुरड घालावी लागलेली नाही.

बंगलोरचा हा कर्णधार पंजाबविरुद्धच्या सामन्यात पुन्हा बरसला. त्यानं यंदाच्या मोसमात चौथं शतक साजरं केलं.

बंगळुरूच्या मैदानात बुधवारी आधी बरसला तो पाऊस आणि मग कोसळला तो विराट कोहली. एखाद्या धबधब्यासारखा…

विराटचा गोल्डन फॉर्म

वास्तविक विराट कोहली आयपीएलच्या रणांगणात यंदा दाखल झाला तो ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातला त्याचा गोल्डन फॉर्म घेऊनच. त्यामुळं गाव बदललं काय, खेळपट्टी बदलली काय किंवा समोरचं आक्रमण बदललं काय… विराटचा धावांचा ओघ हा अखंड ओसंडून वाहातोय… धबाबा लोटती धारा.. धबाबा तोय आदळे या समर्थांनी वर्णन केलेल्या शिवथरघळीतल्या धबधब्यासारखा.
===========================================

गंभीरचा लाजिरवाणा तर रैनाचा अभिमानास्पद विक्रम

गंभीरचा लाजिरवाणा तर रैनाचा अभिमानास्पद विक्रम
कानपूर : कानपूरच्या ग्रीन पार्कवर पहिल्यांदाच आयपीएलचा पहिला सामना खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरात लायन्सने कोलकाता नाईटरायडर्सला सहा विकेट्सनी पराभूत केलं. कानपूरच्या या मैदानात एकीकडे नवा इतिहास रचला तर दुसरीकडे याच सामन्यात दोन्ही संघांच्या कर्णाधारांच्या नावावरही अनोखा विक्रम जमा झाला.

गंभीरचा लाजिरवाणा विक्रम
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर हा ट्वेन्टी-20 फॉरमॅटमध्ये जास्त वेळा धावचीत होण्याचा लाजिरवाणा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. टी-20 मध्ये गंभीर आतापर्यंत तब्बल 21 वेळा धावचीत झाला आहे. आयपीएलमधील गुरुवारच्या सामन्यात गंभीर 8 धावा करुन रनआऊट झाला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात गंभीर आतापर्यंत 4 आणि आयपीएलमध्ये एकूण 15 वेळा बाद झाला आहे.

आयपीएलमध्ये रैनाच्या सर्वाधिक धावा
तर दुसरीकडे गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैना हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. आयपीएलमध्ये 4000 धावा करणारा करणारा रैना दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या खात्यात आता 4038 धावा जमा झाले आहेत. त्याच्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने 4002 धावा केल्या होता. कोहली आता दुसऱ्या स्थानावर आहे.
===========================================

मारुती सुझुकीच्या एस-क्रॉसचा ‘ब्रेक फेल’, 20,427 कार परत मागवल्या

मारुती सुझुकीच्या एस-क्रॉसचा ‘ब्रेक फेल’, 20,427 कार परत मागवल्या!
नवी दिल्ली : मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या कार मेकर कंपनीने आपल्या 20 हजार 427 ‘एस-क्रॉस’ कार परत मागवल्या आहेत. या कारमधील ब्रेकचे पार्ट्स खराब असल्याची माहिती मिळते आहे.

एप्रिल 2015 ते 12 फेब्रुवारी 2016 दरम्यान तयार केलेल्या कार्सचा यात समावेश आहे.

‘एस-क्रॉस’च्या सर्व्हिस कॅम्पेनसाठी DDiS 320 आणि DDiS 200 या दोन्ही व्हेरिएंटच्या गाड्या परत मागवल्या जाणार आहेत, अशी माहिती मारुती सुझुकीकडून देण्यात आली आहे. मारुती सुझुकीकडून डिलर्सशी संपर्क साधून गाड्या मागवल्या जणार आहेत.

ब्रेकच्या पार्ट्समध्ये त्रुटी असून, रिप्लेसमेंटसाठी कोणत्याही प्रकारची रक्कम आकारली जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांना याचा आर्थिक फटका बसणार नाही.

मारुती सुझुकी कंपनीच्या माहितीनुसार, सर्व्हिस कॅम्पेन ऑटोमोबाईल कंपनीकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केलं असून, गाड्यांमधील त्रुटींचा शोध यादरम्यान घेतला जाणार आहे. यात जाणाऱ्या वेळामुळे ग्राहकांना काही काळ त्रास सहन करावा लागणार आहे.

एस-क्रॉस गाडीची गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 8 लाख 34 हजार रुपये सुरुवातीची किंमत होती. मात्र, आता दोन डिझेल इंजिन व्हेरिएंटही बाजारात उपलब्ध आहेत.
===========================================

सतत फोनवर बोलते म्हणून पत्नीला घटस्फोट

सतत फोनवर बोलते म्हणून पत्नीला घटस्फोट
सौदी अरेबिया : नवविवाहित पत्नी आपल्या मित्रांशी तासंतास बोलते म्हणून सौदी अरेबियातील एका व्यक्तीने तिला तलाक दिला. पतीला पत्नीशी बोलायचं होतं, मात्र पत्नी फोनवर व्यस्त असल्याने तो बोलू शकला नाही. याच रागातून पतीने पत्नीला तलाक दिला. विशेष म्हणजे तलाकची ही घटना लग्न झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच घडली.

गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, एका नातेवाईकाने सांगितली, “लग्नानंतर पतीने पत्नीला हॉटेलमध्ये घेऊन गेला. नवविवाहित पत्नी हॉटेलमध्ये गेल्यावर फोनवर बोलण्यात व्यस्त झाली. पती तिच्या पत्नीजवळ गेला, तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नी सारखं फोनवरच बोलत होती. पत्नीच्या कोणत्याही प्रश्नला प्रतिसाद देत नव्हती आणि त्यामुळे दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं.”

त्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरु झालं आणि पतीने आपल्या पत्नीला थेट तलाकच दिला.

गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, तलाकचं हे प्रकरण कोर्टात पोहोचलं असून, आता प्रकरण समजुतीने सोडवण्यासाठी एका समितीकडे पाठवण्यात आलं आहे. मात्र, पती आणि पत्नी यांच्यातील कुणीही ऐकायला तयार नाहीत, अशी माहिती मिळते आहे.
===========================================

'दाऊद कॉल लॉगप्रकरणी खडसेंची चौकशी होणार', प्रीती मेनन यांची माहिती

'दाऊद कॉल लॉगप्रकरणी खडसेंची चौकशी होणार', प्रीती मेनन यांची माहिती
मुंबई: ‘दाऊद कॉल प्रकरणी मुंबई पोलिस चौकशी करत असून पोलिस हॅकर्सच्या संपर्कात आहेत.’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं प्रीती मेमनं यांनी म्हटलं आहे. तसेच सध्याच्या लाचखोरी प्रकरणात निष्पक्ष आणि जलद चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आप नेत्या प्रीती मेनन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट झाली.

गेल्या काही दिवसांपासून गजानन पाटील लाचखोरी प्रकरणी खडसे अडचणीत सापडले आहेत. त्यातच दाऊद इब्राहिमच्या कॉल लिस्टमध्ये खडसेंचं नाव असल्याची बातमी गुजराती वृत्तपत्रानं छापली होती. याप्रकरणी प्रीती मेनन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि एकनाथ खडसे यांची कसून चौकशी करण्याची मागणी केली.
===========================================

अभिनेते अनुपम खेर रुग्णालयात दाखल

अभिनेते अनुपम खेर रुग्णालयात दाखल
मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना गुरुवारी संध्याकाळी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नानावटी रुग्णालयाचे डॉ. मनोज पटेल यांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान त्यांची प्रकृती ठीक असून कोणतंही काळजी करण्याचं कारण नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

अनुपम खेर यांना उद्या रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याची माहिती समजते आहे.
===========================================

‘एक अलबेला’ सिनेमाचा टीझर लाँच, विद्या बालनची मराठीत एंट्री

‘एक अलबेला’ सिनेमाचा टीझर लाँच, विद्या बालनची मराठीत एंट्री
मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या स्वत:च्या स्वतंत्र नृत्यशैलीचा ठसा उमटविलेले दिवंगत अभिनेते भगवानदादा यांच्या जीवनावरील ‘एक अलबेला’ या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता मंगेश देसाई या चित्रपटात भगवानदादांची भूमिका साकारतो आहे. तर गीता बालींच्या भूमिकेत विद्या बालन दिसणार आहे.

मराठीत पहिल्यांदाच विद्या बालन दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबदद्लची प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या चित्रपटातील विद्या बालनचा लूक गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहे.

हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून हा चित्रपट हिंदी सिनेसॄष्टीतील पहिले डान्सिंग स्टार म्हणून लोकप्रिय असलेले भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर सरतांडेल यांनी केले आहे.

व्हिडिओ

===========================================

मीरारोडमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मीरारोडमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
आरोपी तरुणी
मीरारोड: काशिमिरा पोलिसांनी इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून युवतीसह एका युवकाला अटक केली आहे. त्याचबरोबर चार मुलींचीही त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यातील एक मुलगी टीव्ही कलाकार असल्याचं समजतं आहे.

मिरा रोड येथे राहणाऱ्या साहिल खान याने सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कशिश प्रकाश दुलानी हिच्याशी फेसबुकवरून मैत्री केली. सलीलने इव्हेंट मॅनेजमेंटसाठी मुली पाहिजे असं कशिशला सांगितला. त्यावेळी कशिशने आपल्याकडे मुली आहेत असं साहिलला सांगितलं आणि त्या मुली कुठल्याही प्रकारचा समजोता करण्यास तयार असतात. अशी माहिती त्याला दिली.

साहिलने याची माहिती काशिमिरा पोलिसांना दिली. पोलिसांनी साहिलच्या मदतीने कशिशला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. साहिलनं कशिशकडून चार मुली मागवल्या, त्याची रक्कम ही प्रत्येकी बारा हजार ठरली. कशिश आपला आणखीन एक साथीदार आणि चार मुलींना घेऊन जीसीसी क्लब येथे आल्यावर पोलिसांनी दोघांना अटक केली आणि चारही मुलींची सुटका केली.
===========================================

काशिमिरामधील तीन बारवर छापा, 33 बारबाला पोलिसांच्या ताब्यात

काशिमिरामधील तीन बारवर छापा, 33 बारबाला पोलिसांच्या ताब्यात
मीरारोड: मीरारोड येथील काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या तीन ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी काल रात्री छापा मारून कारवाई केली आहे. अश्लील गाण्यांवर डान्स करणाऱ्या ३३ बारबाला, हॉटेलमधील १८ कर्मचारी आणि ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

या बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावे लायसन्स घेऊन, बारबालाकडून डान्स करीत असल्याची माहिती काशिमिरा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तीनही बारवर छापा टाकला.  डान्सबारमध्ये चारच मुली ठेवण्यास परवानगी होती. मात्र या तीनही बारमध्ये चारपेक्षा अधिक मुली होत्या.

काशिमीरा पोलीसांनी वेगवेगळ्या तीन टिम बनवून काशिमीरा हद्दीतील सनसिटी, के नाईट आणि ग्रीन चिली या बारवर एकाच वेळी छापा मारला. काशिमिरा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यां सर्वांवर कलम २९४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
===========================================

मंत्रालयाच्या गेटवर 5 हजारांची लाच घेताना उपसचिव अटकेत

मंत्रालयाच्या गेटवर 5 हजारांची लाच घेताना उपसचिव अटकेत
मुंबई : गृहखात्याचा उपसचिव संजय खेडेकरला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. पाच हजारांची लाच घेताना एसीबीने खेडेकरला अटक केली.

पोलिस शिपायाची फाईल क्लिअर करण्यासाठी खेडेकरने दहा हजारांची मागणी केली होती. त्यापैकी पाच हजाराची लाच घेताना खेडेकरला सापळा रचून अटक करण्यात आली.

विशेष म्हणजे मंत्रालयाच्या गेटवरच संजय खेडेकरला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं त्याला अटक केली. तक्रारदाराच्या मुलाची पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती करण्यासंबंधी फाईल क्लीअर करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे.
===========================================

खडसेंच्या राजीनाम्यासाठी 'आप' नेत्या प्रीती मेनन घेणार मुख्यमंत्र्याची भेट

खडसेंच्या राजीनाम्यासाठी 'आप' नेत्या प्रीती मेनन घेणार मुख्यमंत्र्याची भेट
मुंबई: ‘आप’च्या नेत्या प्रिती मेनन या आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्याच्या निवासस्थानी  भेट घेणार आहेत. आज रात्री साडे आठ वाजता मुख्यमंत्र्यानी मेनन यांना भेटीची वेळ दिली आहे.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची तसेच सध्याच्या लाचखोरीच्या प्रकरणात निपक्ष, जलद चौकशीची त्या मागणी करणार आहेत.

दरम्यान, महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी तक्रारदार रमेश जाधव यांना विकृत म्हणत गजानन पाटलाची पाठराखण केली होती. तर आपण गंमत म्हणून जाधव यांच्याकडे 30 कोटीची मागितले होते असं जबाब गजानन पाटील यांनी एसीबीकडे नोंदवला होता.
===========================================

कॉमेडी किंग कपिल शर्माविरोधात पोलिसात तक्रार

कॉमेडी किंग कपिल शर्माविरोधात पोलिसात तक्रार
मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. द कपिल शर्मा शो’मध्ये नर्सला चुकीच्या पद्धतीने दाखवल्यामुळे, तसेच त्यांच्यावर वाईट जोक केल्यामुळे दिल्लीच्या एका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ऑल इंडिया नर्सेस फाऊंडेशनने ही तक्रार नोंदवली आहे.

द कपिल शर्मा शो’मध्ये नर्सला आक्षेपार्ह ड्रेसमध्ये दाखवण्यात आलं. तसंच बोचरे विनोद करण्यात आल्याने नर्स फाऊंडेशन नाराज आहे. अमृतसरच्या सरकारी रुग्णालय आणि गुरुनानक देव रुग्णालयातील नर्सनी कपिलविरोधात मोर्चा उघडला आहे.

“कपिलने त्याच्या शोद्वारे नर्सेसची प्रतिमा खराब केली आहे. त्याला नवज्योतसिंह सिद्धूनेही साथ दिली. सिद्धूने त्याला रोखायला हवं होतं. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे कपिलने देशाची माफी मागावी”, असं नर्सचं म्हणणं आहे.
===========================================

इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल वाहिदला अटक


  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. 20 - दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अब्दुल वाहिद सिद्दीबापाला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अब्दुल वाहिदला अटक करण्यात आली. अब्दुल वाहिदला दुबईवरुन भारतात पाठवण्यात आल्यानंतर विमानतळावर अटकेची कारवाई करण्यात आली. अब्दुल वाहिद सिद्दीबापा हा कर्नाटकच्या भटकळमधील रहिवासी आहे. 
    अब्दुल वाहिद इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख यासीन भटकळ जो सध्या तुरुंगात आहे याच्या घरापासून थोड्याच अंतरावर राहतो. अनेक प्रकरणांमध्ये अब्दुल वाहिद वॉण्टेड होता. अब्दुल वाहिद दुबईत राहत होता. त्याच्याकडे तरुणांना इंडियन मुजाहिद्दीनमध्ये भर्ती करण्याची जबाबदारी होती. तसंच फंडिंग करण्याच कामही करत होता.
===========================================

पोल - स्वतंत्र विदर्भासाठी 56.7 टक्के सहभागी अनुकूल


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 20 - स्वतंत्र विदर्भाच्यामागणीवरून नुकतीच रणधुमाळी उडालेली असताना आणि राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना, ऑनलाइन लोकमतनं नुकताच एक पोल घेतला. यामध्ये स्वतंत्र विदर्भ हवा का? आर्थिक विकास, राजकीय प्रभाव इत्यादी गोष्टींचा प्रभाव आहे का? अशा विविध अंगांनी पाहणी करण्यात आली. या पोलमध्ये तब्बल सात हजारांपेक्षा वाचकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 56.7 टक्के सहभागींनी स्वतंत्र विदर्भाच्या बाजुने कौल दिला. विशेष म्हणजे, या पोलमध्ये जवळपास 40 टक्के सहभागी विदर्भातले होते, तर 60 टक्के सहभागी हे उर्वरीत महाराष्ट्रातले होते. तर तब्बल 81 टक्के सहभागी 15 ते 40 या वयोगटातील होते.
===========================================

व्हिडिओ - दिल्लीत कारने मुलीला उडवलं, सुदैवाने बचावली


  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. 20 - रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने येणा-या सॅट्रो कारने दिलेल्या धडकेत 16 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. मधु विहार परिसरात ही घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पुनमला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेनंतर नगारिकांनी वाहनचालकाला चांगलाच चोप दिला मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
    पुनम शिकवणीवरुन घरी जात असताना संध्याकाळी 5 वाजता हा अपघात झाला. पुनम नेहमीप्रमाणे रस्त्यावरुन घरी जात होती. रस्त्यावर रहदारी जास्त असल्याने वाहतुकीची कोंडी होती. त्यावेळी अचानक सॅट्रो कारने वेग घेतला आणि मोकळ्या जागेतून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र कार पुढे घेतल्यानंतर सरळ जाण्याऐवजी त्याने डाव्या बाजूला वळवली. पुनमला काही कळण्याआधीच कारने तिला उडवले. धडक इतकी जोरदार होती की पुनम हवेत उडून बोनेटवर आदळली. 
    अपघातानंतर वाहनचालकाने गाडी थांबवली होती. जमलेल्या लोकांनी यावेळी त्याला चांगलाच चोप दिला. मात्र नंतर त्याने पलायन केले. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून त्याची ओळख पटली आहे. लवकरच त्याला अटक केलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


===========================================

सुझी ब्राझीलची पूनम पांडे


  • ऑनलाइन लोकमत 
    साओ पावलो, दि. २० - बोल्ड, मादक फोटो प्रसिद्ध करुन चर्चेत कसे रहायाचे हे मॉडेल पूनम पांडेला चांगलेच ठाऊक आहे. भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला तर, मैदानाला नग्न फेरी मारेन असे जाहीर करुन पूनम २०११ मध्ये चर्चेत आली होती. आता ब्राझीलची सौदर्यवती सुझी कॉरटेझ पूनमच्या पावलावर पाऊल टाकून अशीच प्रसिद्धी मिळवत आहे. 
    सुझी स्पॅनिश फुटबॉलर गेरार्ड पिक्यूचे नाव घेऊन प्रसिद्धी मिळवत आहे. गेरार्डचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी तिने ३ नंबरच्या जर्सीमधला स्वत:चा  अर्धनग्न फोटो प्रसिध्द केला आहे. गेरार्ड मैदानावर ३ नंबरची जर्सी परिधान करतो. 
    बार्सिलोनाने ला लिगा कप जिंकला तर, नग्न होईन असे तिने सांगितले होते. त्यानुसार बार्सिलोनाने ग्रानाडावर ३-० ने विजय मिळवून ला लिगाचे जेतेपद पटकावल्यानंतर तिने स्वत:चे नग्न फोटो प्रसिद्ध केले आहेत. यापूर्वी तीने सोशल मिडीयावर मेसी प्रतीचे प्रेम व्यक्त केले होते. गेरार्ड २०१० पासून प्रसिध्द पॉपस्टार शकीरासोबत रहात आहे. त्यांना दोन मुलेही आहेत. 
===========================================

प्रादेशिक पक्षांचा पराभव भाजप करू शकला नाही - उद्धव ठाकरे


  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. २० - पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना पत्रकार, राजकीय विश्लेषक भाजपचे कौतुक करत आहेत. आसाममध्ये सत्ता मिळवणा-या भाजपने केरळ, पश्चिम बंगाल या राज्यात चंचू प्रवेश केला आहे. हे निकाल म्हणजे भाजपचा देशभरात विस्तार होत असल्याचे निदर्शक आहेत असे बहुतांश वर्तमानपत्रांचे मत आहे. 
    पण शिवसेनेला तसे वाटत नाही. प्रादेशिक पक्षांचा पराभव भाजप करू शकला नाही हे सत्य मान्य करायला हवे असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपच्या पाच राज्यातील कामगिरीवर टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. 
    आसाममध्ये भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचा पराभव केला आहे, पण तामीळनाडूत जयललितांचा, प. बंगालात ममतांचा व केरळात डाव्यांचा पराभव भाजप करू शकला नाही. पुद्दुचेरीत काँग्रेसचा विजय झाला आहे. प्रादेशिक पक्षांचा पराभव भाजप करू शकला नाही हे सत्य मान्य करायला हवे. आसाम व केरळात काँग्रेसची सत्ता होती. ही राज्ये काँग्रेसने गमावली आहेत. काँग्रेसचा धुव्वा उडाला असे विश्‍लेषण होत आहे. मग आसाम वगळता इतर चार राज्यांत भाजपच्या बाबतीत काय झाले? असे सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. 
===========================================

जनरेटर ओनर्स असोसिएशनच्या सदस्यांचा मनसेत प्रवेश


  • मुंबई : मनसेत सिनेसृष्टीला तसेच अनेक इव्हेंट्सना विद्युतपुरवठा करणाऱ्या जनरेटर ओनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी प्रवेश केला. मुंबईमध्ये १,२00 जनरेटर व्हॅन्स आहेत. २0१४ मध्ये जनरेटर्सच्या मालकांची जीओए संघटना स्थापन करण्यात आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बुधवारी सकाळी जनरेटर ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मिनाझ अली, कार्याध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जीओएने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेची संलग्नता स्वीकारली. या वेळी मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. इतर राज्यांमध्ये जनरेटर्सबाबतच्या नियमांचे पालन होते, त्याप्रमाणे मुंबईत पालन होत नाही. त्याचा फटका येथील जनरेटर्स व्यावसायिकांना होतो, अशी समस्या यावेळी जीओएच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्यापुढे मांडली. त्यावर ठाकरे यांनी चित्रपट सेनेने निर्मात्यांसोबत दर महिन्याला बैठका घ्याव्यात आणि संबंधित व्यावसायिकांच्या अडचणी सांगाव्यात. आपले मुद्दे मांडताना पदाचा गैरवापर कुणी करणार नाही याची मात्र काळजी घेण्यास सांगितले.
===========================================

मुंबई शहरात वाढल्या अतिधोकादायक इमारती


  • मुंबई : गतवर्षीच्या तुलनेत धोकादायक इमारतींचा आकडा यंदा वाढला आहे़ तब्बल ७४० इमारती कोसळण्याच्या स्थितीत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़ त्यामुळे या इमारतीतील हजारो रहिवासी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. पावसाळ्यापूर्वी या इमारती रिकाम्या करण्यासाठी पालिकेने नोटीस बजाविण्यास सुरुवात केली आहे़
    पावसाळ्यापूर्वी पालिकेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे़ गेल्या वर्षी ५४२ इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले होते़ यंदा मात्र हा आकडा वाढून तब्बल ७४० वर पोहोचला आहे़ सी १ श्रेणी म्हणजे अतिधोकादायक इमारतींच्या यादीमध्ये शहरात १४६, पूर्व उपनगरात २८६ आणि पश्चिम उपनगरात ३०८ इमारतींचा समावेश आहे़ या इमारती पावसाळ्यात कोसळण्याचा धोका आहे़
    गेल्या वर्षी पालिकेच्या मालकीच्या धोकादायक इमारतींमधील वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता़ मात्र या कारवाईला रहिवाशांकडून तीव्र विरोध झाला़ त्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न यंदाही ‘जैसे थे’ आहे़ पालिकेने नोटीस पाठवून इमारत खाली करण्याचा इशारा या वर्षीही रहिवाशांना दिला आहे़ मात्र रहिवासी अन्यत्र स्थलांतरित होण्यास तयार नाहीत़
===========================================

डॉक्टरच्या घरी घरफोडी करणारे अटकेत


  • मुंबई : कांदिवलीच्या चारकोप परिसरात गेल्या शनिवारी डॉक्टरच्या घरी घरफोडी करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन नेपाळी आरोपींना अटक केली आहे. घरफोडी करून झालेल्या पसार आरोपींचा शोध सुरू आहे.
    बिरू धनसिंग विका (३०) आणि शेरबहादूर कुलबहादूर साही उर्फ शेरा (२६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शेराची ओळख सीसीटीव्ही फुटेजवरून करण्यात आली असून त्याच्याकडून पन्नास ग्रम सोने हस्तगत करण्यात आल्याचे चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र गायकवाड यांनी सांगितले. चारकोपच्या सेक्टर पाचमध्ये राहणारे डॉ. एस. शेट्टी हे काही दिवसांपूर्वी महाबळेश्वरला फिरण्यासाठी गेले होते. घरी परतले तेव्हा त्यांच्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी चारकोप पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवून त्यांच्या मुसक्या आवळल्या.
===========================================

काँग्रेसमुक्त भारताकडे जनतेची वाटचाल - अमित शहा


  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. 19 - पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालावरुन भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसमुक्त भारताकडे जनतेने अजून दोन पावलं टाकली आहेत असा टोमणा मारला आहे. अमित शहा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी आसाममधील पक्षाच्या विजयासोबत इतर राज्यांमधील पक्षाच्या कामगिरीवर मत मांडले. 
    ज्यांनी संसदेतील कामकाजात अडचण आणली, मुद्द्यांचं राजकारण केलं त्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला असल्याचं निकालावरुन स्पष्ट होत आहे. अडवणुकीचं राजकारण करणा-या काँग्रेस पक्षाला हा निकाल धडा आहे. निकाल पाहून कोणीही काँग्रेससोबत जाण्याची हिंमत करणार नाही. जे गेले आहेत त्यांचा पराभव झाला असल्याची टीका अमित शहा यांनी केली आहे. 
===========================================

निकाल निराशाजनक पण अनपेक्षित नव्हे - दिग्विजय सिंहांचा काँग्रेसला घरचा आहेर


  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. २० - पुद्दुचेरीतील विजय वगळता आसाम व केरळ या राज्यातील सत्ता गमावणे आणि पश्चिम बंगाल व तामिळनाडूतही मतदारांनी दूर लोटल्याने काँग्रेस उतरणीचा काळ सूर झाल्याची चर्चा सुरू आहे. या पराभवानंतर विरोधकांनी काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवलेला असतानाच आता स्वपक्षीयांनीही याप्रकरणी आपली मते स्पष्ट मते मांडण्यास सुरूवात केली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही 'पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील निकाल निराशाजनक असला तरी अनपेक्षित नक्कीच नव्हता' असे म्हणत नाराजी दर्शवली आहे. 
    दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरून आपली मते स्पष्टपणे मांडत पक्षाने  पराभवापासून धडा घेऊन ठोस कृती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
    ' आजचे (आसाम व केरळमधील) निकाल हे निराशाजनक असले तरी अनपेक्षित नव्हते. आपण बराच काळ पराभवाचे परीक्षण केले आहे, आता (पक्षाने) ठोस कारवाई करण्याची गरज आहे' असे ट्विट त्यांनी केले आहे. आम्ही सर्वजण आता कृतीची वाट पाहात आहोत, असेही त्यांनी म्हटले.
===========================================

पराभवाला राहुल जबाबदार नाहीत - काँग्रेसची स्पष्टोक्ती


  • नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशा आशयाच्या सूचना गुरुवारी पक्षातर्फे फेटाळण्यात आल्या. सोबतच पक्षाने गांधींभोवतीचे सुरक्षा कवच अधिक मजबूत केले.
    काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी सरचिटणीस मुकुल वासनिक आणि प्रवक्ता आरपीएन सिंग यांच्यासोबत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रत्येक निवडणुकीचे आपले वेगळे मुद्दे असतात. आम्ही एखाद्या ठरावीक व्यक्तीच्या संदर्भातून मग ते तरुण गोगोई असोत वा ओमन चंडी राज्याच्या निवडणुकांकडे बघत नाही. कुठे सुधारणोची गरज आहे यावर आम्ही सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा करू. सोनिया आणि राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याचप्रमाणो या वेळीसुद्धा राहुल यांनी जबाबदारी स्वीकारू नये काय, असा सवाल करण्यात आला असता ही अयोग्य सूचना आम्ही फेटाळून लावतो, असे काँग्रेसचे नेते म्हणाले. काँग्रेस आसाममध्ये 15 वर्षे आणि केरळात गेली पाच वर्षे सत्तेत राहिली आणि सक्षम नेतृत्व दिले याकडे सुरजेवाला यांनी लक्ष वेधले. 
    निवडणुकीतील पराभवानंतर प्रियंका गांधी संघटनेत अधिक मोठी भूमिका वठविणार काय, हा प्रश्न अप्रासंगिक असल्याचे सांगून त्यांनी फेटाळला. तर पक्षाला आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, हे वासनिक यांनी मान्य केले. तामिळनाडू, केरळ आणि पुडुच्चेरीत पक्षाचे प्रभारी असलेले वासनिक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, या राज्यांमधील पराभवाची कारणो त्वरित सांगणो शक्य नाही.
    पाच राज्यांती
===========================================

भावजय आणि पतीच्या अनैतिक संबंधांच्या रागातून पुतणीची हत्या


  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. २० - एका २२ वर्षीय महिलेने पुतणीची हत्या करुन तिचा मृतदेह बिछान्याखाली लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना दिल्लीच्या मुस्तफाबाद भागातील एका घरात घडली आहे. रोशन जहान असे आरोपी महिलेचे नाव आहे. आयशा या आपल्या पुतणीची हत्या केल्यानंतर तिचे अपहरण झाल्याचा बनाव रचून रोशनने पोलिसांचीही दिशाभूल केली. 
    शेजा-यांना रोशनच्या घरातून  दुर्गंधी येऊ लागली म्हणून त्यांनी रोशनच्या घरातून वास कुठून येत आहे त्याचा शोध घेतला असता बिछान्याखाली आयशाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी रोशनला अटक केली आहे. आपल्या पतीचे आणि भावजयीचे अनैतिक संबंध आहेत. आपण त्या दोघांना नको त्या अवस्थेत पकडले होते. त्याचा राग मनात होता. आपल्या पतीबरोबर असलेल्या संबंधांचा बदला म्हणून आपण भावजयीच्या मुलीची हत्या केली असे रोशनने पोलिसांना सांगितले. 
===========================================

...चक्क एका शब्दामुळे महिलेला धाडलं तुरुंगात


  •  ऑनलाइन लोकमत
    बँगकॉक, दि. 20- अनेकदा चोर, दरोडेखोर, खुनी लोकांना शिक्षा झालेलं तुम्हाला माहीत असेल. मात्र थायलंडमध्ये चक्क एका महिलेला क्षुल्लक शब्दावरून जेलमध्ये टाकण्यात आलंय. थायलंडमधल्या सामाजिक कार्यकर्त्याच्या आईला फेसबुकवरील तिच्या मॅसेज बॉक्समध्ये आलेल्या एका मॅसेजमुळे राज्याचा अपमान झाल्याचं कारण देत 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 
    पटनरी चंकीज या 40 वर्षांच्या असून, त्या मोलकरणीचं काम करून स्वतःचा उदरनिर्वाह भागवतात. थायलंड लष्कराच्या जंता लेसे-मॅजेस्टी कायद्यानुसार पटनरी चंकीज यांनी थायलंडमध्ये अधिक काळ सत्ता गाजवलेला राजा भूमिबोल अदुल्यादेजसह राणी आणि युवराजांचा अपमान केलाय. थायलंडच्या नव्या कायद्यानुसार त्यांना अटक करण्यात आली. जंता लेसे-मॅजेस्टी या कायद्यांतर्गत 2014 रोजी लष्कराला विशेषाधिकार देण्यात आलेत. "पटनरींनी फक्त फेसबुकवर आलेल्या मॅसेजला रिप्लाय देण्यासाठी 'जा' या शब्दाचा प्रयोग केला. 'जा' या शब्दाचा अर्थ 'हो' असा होतो. त्या व्यक्तीच्या टीकेला समर्थन देण्यासाठी कुठलाही करार केला नव्हता. तो मॅसेज सार्वजनिकही करण्यात आला नव्हता. त्यामुळे या प्रकरणात कोणाचाही अपमान झाला नाही",असं स्पष्टीकरण पटनरींचे वकील पूनसुक यांनी कोर्टात दिलं आहे. मॅसेज पाठवणा-या 28 वर्षीय बुरीन इनटिनला गेल्याच महिन्यात अटक झालीय. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू असताना पटनरींनी योग्यरीत्या सहकार्य केले नसल्याचं म्हटलं आहे. "थायलंडचं लष्कर जंता लेसे-मेजस्टी कायद्यांतर्गत लोकांना गुन्हेगार ठरवू पाहतं आहे. दोन वर्षांपूर्वी सरकारनं या कायद्यांतर्गत 57 जणांविरोधात खटला भरला, त्यातल्या 44 जणांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती", अशी माहिती मानवी हक्क आयोगाकडून देण्यात आलीय. एका कारखान्यात काम करणा-या कामगारानं राजाच्या कुत्र्याचा अवमान केल्याप्रकरणी तपास अद्याप सुरू असल्याची माहिती आता समोर येते आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह अथवा वादग्रस्त वक्तव्य केल्यास त्याची जबाबदारी घ्यायला शिका, असं गुन्हेगार प्रतिबंधक विभागाचे मुख्य पोलीस कोलोमन ओलार्न म्हणालेत. कोलोमन यांनी मीडियालाही याबाबत जास्त वृत्तांकन न करण्याचा सल्लावजा इशाराच दिला आहे. 
===========================================

अबब... २ किमीच्या पिझ्झाची गिनीजबुक मध्ये नोंद


  • ऑनलाइन लोकमत
    नॅपल्ज, दि. १९ - पिझ्झा हा जगातील एक लोकप्रिय इटालियन खाद्यपदार्थ आहे. पिझ्झा बनवण्यासाठी मैद्याच्या गोल लाटलेल्या पोळीवर टोमॅटो पेस्ट व चीझ फासून त्यावर विविध तर्‍हेची टॉपिंग्स कापून ठेवली जातात व भट्टीमध्ये भाजले जाते. अनेक प्रकारचे गरम गरम शाकाहारी, अन्डाहारी व मांसाहारी पिझ्झे जगभर बनवले जातात. अश्याच प्रकारे इटालीमध्ये नेपोलिटन पिझ्झाच्या स्वयंपाक्यांनी २ किमी लांबीचा पिझ्झा बनवला आहे. या पिझ्झाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. १८ मे रोजी नॅपल्ज या शहाराच्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या हायवे वर हा पिझ्झा बनवण्यात आला. २ किमीचा पिझ्झा बनवण्यासाठी सामानही प्रचंड प्रमाणात लागले. 
===========================================
गिलानी आणि शबीरची नजरकैद कायम

श्रीनगर- नजरकैदेत असलेले हुर्रियत संघटनेचे अध्यक्ष सय्यद अली शहा गिलानी व फुटीरतावादी नेते शबीर अहमद शाह यांच्या सुटकेची शक्यता पुसट झाली आहे. त्यांना सुनावलेली नजरकैद पुढे कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांच्यावर हे निर्बंध लादले असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 
हुर्रियत संघटेनचे प्रवक्ते अय्याज अकबर म्हणाले, "गिलानी हे मागील महिन्यात नवी दिल्लीवरून परतल्यापासून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. शबीर यांनासुद्धा या महिन्यात नवी दिल्लीहून परतल्यावर नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दोघांनाही शुक्रवारच्या नमाजासाठीसुद्धा बाहेर पडू दिले जात नाही."

अनेक फुटीरतावादी नेत्यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असल्याचे सांगून अकबर पुढे म्हणाले, "ताब्यात असलेल्या नेत्यांना मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असतानाही बर्‍याच नेत्यांना अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे."
मसरत आलम हे या नेत्यांपैकी एक आहेत. आलम यांनी 2010 मध्ये काश्मीर खोर्‍यात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. या आंदोलनादरम्यान सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात 120 लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला. 
===========================================
मोदींच्या परदेशवाऱ्या.. 'इदं न मम!'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशवाऱ्या रिकामटेकड्यांसाठी चघळायचा विषय झाला आहे. परदेशी फिरून देशाचे हित साधणाऱ्या या वाऱ्यांविषयी : 

अमेरिकेच्या तालावर नाचणारी जागतिक अर्थव्यवस्था संतुलित करायची असेल, तर इतर देशांना आपांपसात व्यवहार वाढविणे अपरिहार्य आहे. विकसित देशांना व्यापाराचीच भाषा समजते. ते त्यांचे शक्तिस्थान आहे. त्यास डळमळीत करणारी आंतरराष्ट्रीय घडामोड झाल्याशिवाय आम्हाला ‘विकसनशील देश‘ म्हणून ज्या सवलती हव्या आहेत, त्या मिळणे शक्‍य नाही, हा साधा व्यावहारिक नियम आहे. त्यासाठी ‘ब्रिक्‍स‘ देशांनी एकत्र येऊन स्वत:ची शक्ती दाखविण्याची गरज होती. आता या देशांची आंतरराष्ट्रीय बॅंक स्थापन झाली आहे आणि ‘आयसीआयसीआय‘चे माजी अध्यक्ष के. व्ही. कामत यांची त्यावर अध्यक्ष म्हणून पहिल्या सहा वर्षांसाठी नियुक्तीही झाली आहे. त्यामुळे ‘ब्रिक्‍स‘ देशांच्या आर्थिक प्रतिनिधित्वाची धुरा भारताच्या खांद्यावर येते. साहजिकच, या देशांना भेटी देणे आले आणि एखादी गोष्ट साध्य करायची म्हटलं, तर त्याचा पिच्छा पुरवावा लागतो, खूप दूरदर्शी विचार करावा लागतो.
===========================================
साडेपाच हजार जणांना चावला कुत्रा

जिल्ह्यात तीन महिन्यांतील हैदोस - ॲन्टी रेबीज इम्युनोग्लोबुलिन लसीचा तुटवडा
नागपूर - शहरात अनेक घरांच्या प्रवेशद्वारावर ‘कुत्र्यापासून सावधान’ अशी पाटी लावली असते. परंतु ग्रामीण भागात अशा पाट्या दिसत नाहीत. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात बेवारस कुत्र्यांची संख्या अधिक आहे. यामुळेच शहरापेक्षा ग्रामीण भागात कुत्र्याने चावा घेतल्याची प्रकरणे अधिक आढळून येतात. अवघ्या तीन महिन्यांत साडेपाच हजार जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.

बेवारस कुत्र्यांच्या उच्छादामुळे ग्रामवासीय हतबल झाले आहेत. विशेष असे की, सावनेर तालुक्‍यात तीन महिन्यांत सर्वाधिक ८६७ जणांना कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. जिल्ह्यातील सावनेर, नरखेड, पारशिवनी, हिंगणा आणि काटोल तालुक्‍यातील नागरिक कुत्र्यांच्या दहशतीमध्ये आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार २६ जणांना कुत्र्यांनी चावे घेतलेत. यावर ॲन्टी रेबीज इम्युनोग्लोबुलिन लसींचा तुटवडा पसरला आहे. मेडिकलमध्ये सध्या ॲन्टी रेबीज इम्युनोग्लोबुलिन या हायपॉवर लसींचा तुटवडा आहे. या लसीअभावी ‘रेबीज’ होऊन मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढण्याचा धोका आहे. परंतु, याकडे स्थानिक प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. ॲन्टी रेबीज इम्युनोग्लोबुलिन लस शासनाकडून मोफत दिली जात नसल्यामुळे अधिक गंभीर स्थिती निर्माण होण्याची भीती आहे. कुत्र्यांनी चावा घेतलेल्या रुग्णांच्या तुलनेत तालुक्‍यातील ग्रामीण भागात ॲण्टी रेबीज इंजेक्‍शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे निदान या काळात तरी सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा आणि ॲण्टी रेबीजचा मुबलक पुरवठा करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
===========================================
भारतात 79 टक्के महिलांची होते छेडछाड

नवी दिल्ली- भारतामध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना पाच पैकी चार महिलांना (79 टक्के) छेडछाडीला सामोरे जावे लागत आहे, अशी माहिती एका अहवालाद्वारे पुढे आली आहे.

ऍक्‍शनएड युके या संस्थेने महिला दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय सुरक्षित शहरांवर अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारतासह ब्राझील, थायलंड व युके मधील काही शहरांमध्ये सर्व्हेक्षण केले आहे.

भारतामध्ये 25 ते 35 वयोगटातील 82 टक्के महिलांची छेडछाड होत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये पूर्णवेळ काम करणाऱ्या महिला व काही विद्यार्थिनींचा समावेश आहे. भारतासह जगभरातील महिलांना सर्वाधिक सार्वजनिक ठिकाणी छेडछाडीला सामोरे जावे लागते. गरीब कुटुंबातील महिलांना सर्वाधिक प्रमाणात छेडछाडीला सामोरे जावे लागत असल्याची माहिती सर्वेक्षणादरम्यान पुढे आली आहे. 
===========================================
भारतीय तरुणाकडे 'नासा'च्या मोहिमेचे नेतृत्त्व

अहमदाबाद - आपल्या सौरमालेबाहेरील ग्रहांचा शोध घेण्यासाठी नासा राबवित असलेल्या प्रकल्पातील एका मोहिमेच्या नेतृत्त्वासाठी मूळ अहमदाबादमधील भारतीय वंशाच्या सुव्रत महादेवन या तरुणाची निवड झाली आहे.

या मोहिमेबाबत माहिती देताना सुव्रत म्हणाले, "गेल्या दोन दशकात आपल्या सौरमालेबाहेरील तीन हजार ग्रहांचा शोध लागला आहे. पण त्यापैकी एकाही ग्रहावर जीवसृष्टी आढळलेली नाही. अद्यापही ज्ञात आणि अज्ञात सौरमालेतील अनेक ग्रहांचा शोध घेणे बाकी आहे. हे काम खूप कठीण आहे. पण आम्हाला आशा आहे की आम्ही नवा शोध लावू.‘ सुव्रत हे सध्या पेनसिल्वानिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून काम करत आहे. नव्या ग्रहांचा शोध लावण्यासाठी आवश्‍यक असलेल्या "एनईआयडी‘ या उपकरणाची निर्मिती करण्यासाठी सुव्रत यांच्या नेतृत्त्वाखालील समूहाची नासाने नासाने निवड केली आहे. सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या सुव्रतने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना याबाबत माहिती दिली. 
===========================================
ऋषी कपूर यांच्याकडून गांधी कुटुंबावर पुन्हा हल्ला

मुंबई- एकट्या दिल्ली शहरामध्येच गांधी कुटुंबाची 64 ठिकाणांना नावे आहेत, असे म्हणत अभिनेते ऋषी कपूर यांनी गांधी कुटुंबावर पुन्हा एकदा ट्‌विटरवरून हल्ला केला आहे.

चौसष्ट वर्षीय ऋषी कपूर यांनी गुरुवारी (ता. 19) ट्‌विट केले आहे. शिवाय, गांधी कुटुंबीयांची नावे देण्यात आलेल्या ठिकाणांचे छायाचित्रही शेअर केले आहे.

तत्पूर्वी, देशातील महत्त्वाच्या संस्थांना आणि ठिकाणांना कॉंग्रेस सरकारच्या काळात गांधी परिवारातील सदस्यांची नावे दिल्याबद्दल कपूर यांनी एका पाठोपाठ एक "ट्‌विट‘ करत कॉंग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला होता. देशासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींची नावे महत्त्वाच्या ठिकाणांना देण्याची मागणीही त्यांनी केली. वांद्रे-वरळी "सी लिंक‘ला लता मंगेशकर किंवा जे. आर. डी. टाटा यांचे नाव द्यावे, असे सांगत "देशाला बापाचा माल समजू नका. जर दिल्लीतील रस्त्यांच्या नावांमध्ये बदल केला जाऊ शकतो, तर गांधी परिवारातील सदस्यांच्या नावाने असलेल्या महत्त्वाच्या संस्था आणि ठिकाणांचेही नामकरण करा. ज्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे, अशा व्यक्तींची नावे महत्त्वाच्या संस्थांना द्या. प्रत्येक ठिकाणाला गांधी परिवारातील व्यक्तीचे नाव देण्यास माझा विरोध असून, याबाबत सर्वांनी विचार करावा,‘ असेही कपूर यांनी म्हटले होते.

फिल्म सिटीला दिलीप कुमार, देव आनंद, अशोक कुमार किंवा अमिताभ बच्चन यांचे नाव द्यावे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला महात्मा गांधी, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे किंवा माझे नाव द्यावे असे वाटते, असे कपूर यांनी ट्‌विट केले आहे. माझे वडील राज कपूर यांनी कुठल्याही राजकीय व्यक्तीपेक्षा देशासाठी मोठे योगदान दिले आहे, असे सांगायलाही कपूर विसरले नाहीत. कपूर यांच्या तिखट शब्दांतील टीकेनंतर त्यावर अनेक उटल सुलट प्रतिक्रिया उमटल्या. कपूर यांच्याप्रमाणेच देशातील अनेकांना असे वाटते आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केली होती.
===========================================
पोलिस दलातील जवानाची एव्हरेस्टला गवसणी

सलग दोन वर्षे नैसर्गिक आपत्तींनंतरही तिसऱ्या वर्षी मारली धडक
औरंगाबाद - नैसर्गिक आपत्तींमुळे सलग दोन वर्षे माघार घ्यावी लागलेल्या गिर्यारोहक शेख रफिकने तिसऱ्यांदा एव्हरेस्टला धडक दिली आणि गुरुवारी (ता. १९) सकाळी त्याने अखेर शिखर सर केले. जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखराला गवसणी घालणारा रफिक हा महाराष्ट्र पोलिस दलातील पहिलाच जवान ठरला.

औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलातील जिद्दी जवान शेख रफिकने हिमालयातील आठ उंच शिखरे यशस्वीपणे सर केल्यानंतर एव्हरेस्टचा (उंची ८८४८ मीटर) ध्यास घेतला. मात्र, सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रफिकला या मोहिमेसाठी लागणारा अवाढव्य पैसा उभा करणे मोठे आव्हान होते. मात्र, स्वभावाने मनमिळाऊ आणि ध्येयवेड्या रफिकला मदत करणारे अनेक हात पुढे आले आणि गिर्यारोहणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेला रफिक ४ एप्रिलला या मोहिमेवर निघाला. 
===========================================
विनापरवाना डान्सबारवर छापा; 75 जणांना अटक

File Photoमुंबई- मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने विनापरवाना सुरू असलेल्या चार डान्सबारवर छापे टाकून 60 महिलांची सुटका केली आहे. तर बारमालक, व्यवस्थापक व ग्राहकांसह एकूण 75 जणांना अटक केली आहे.

आवश्‍यक ती परवानगी न घेता सुरु असलेल्या चार बारवर गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी छापा टाकला. त्यामध्ये ग्रॅंट रस्त्यावरील तेजस बार, घाटकोपरमधील मेहफील बार, अंधेरीतील पिंक प्लाझा बार व मुंबई सेन्ट्रलच्या समुंदर बारचा समावेश होता. परवानगी न घेता बार सुरू ठेवणे आणि महाराष्ट्र अश्‍लील नृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत छापे टाकण्यात आले. दहा वर्षांपूर्वी राज्य सरकारने डान्सबारवर आणलेली बंदी हटविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 15 मार्च रोजी दिली होता. 
===========================================

No comments: