[अंतरराष्ट्रीय]
१- वॉशिंग्टन; ISISविरोधात ओबामांनी पुकारलेलं युद्ध बेकायदेशीर, अमेरिकन आर्मी कॅप्टनचा दावा
२- वॉशिंग्टन; डेंग्यूमुळे जगाचे दरवर्षी ५९३ अब्ज रुपयांचे नुकसान
३- ढाका; बांगलादेशातील ‘जमात’ प्रमुखाचा मृत्युदंड कायम
४- पाकिस्तानी नागरिकांचे स्थलांतर वाढतेय.. - पाकिस्तानमधील मनुष्यबळ विकास विभाग
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- कवडीमोल दरातल्या हेलिकॉप्टरची किंमत अव्वाच्या सवा वाढवून घेतली - मनोहर पर्रीकर
६- सोनिया गांधी वाघिण आहेत - ज्योतिरादित्य सिंदिया
७- उत्तराखंड विधानसभेत १० मे रोजी बहुमत चाचणी
८- भ्रष्टाचाराच्या या नदीचा उगम शोधून काढू: पर्रीकर
९- 'नीट' वर होणार पुन्हा सोमवारी सुनावणी
१०- समुद्रातील पाणी शुद्ध करण्याचे सापडले तंत्र
११- महिला मिग-21 चालवायला घाबरतात- भाजप नेता
१२- काँग्रेस, भाजप हे धरणं धरणारे पक्ष!- केजरीवाल
१३- छगन भुजबळांचा सीए बनला माफीचा साक्षीदार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१४- महाराष्ट्रात गोवंश मांस बंदी कायम, मात्र अजाणतेपणे बीफ खाल्ल्यास गुन्हा नाही
१५- 'केबीसी' घोटाळा : भाऊसाहेब चव्हाण अखेर सापडला
१६- मुंबई; 'सैराट'च्या पायरसीप्रकरणी 6 जणांना अटक, 6 हजार सीडी जप्त
१७- ब्रसेल्स स्फोटातील जखमी निधी मुंबईत परतली
१८- ICSEचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर
१९- पुणे; महापौर थेट लोकांमधूनच निवडा: भाजप
२०- मुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ कान्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
२१- रामदेव बाबांचा छोटा भाऊ पतंजलीचा ‘सीईओ’
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- भंडारा; मंडप सजला, नवरी नटली, पण अक्षता पडण्यापूर्वी नवरदेव पसार
२३- वर्षाचे 365 दिवस चालणारी हिंगोलीतली आदर्श शाळा
२४- बंगळूरू; देवदासी बनली सीईओ
२५- यवतमाळमध्ये घाटंजी इथं एसटी बसवर झाड कोसळलं, दुर्घटनेत 5 प्रवासी जखमी
२६- लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी ]
२७- नांदेड; शिवाजी राजे आणि महात्मा गांधी पुतळा शुशोभिकरण बाबतच्या वादात दोघांना एक महिना कैद आणि १४ लाखांची नुकसान भरपाई
२८- नांदेड; पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या १२ जणांना ९ मे पर्यंत पोलिस कोठडी
२९- अशोकराव चव्हाण यांच्या घराच्या मुख्य रस्त्यावर सुरु आहे जुगार - कॉंग्रेस विचार संघटनचे निवेदन
३०- मध्य प्रदेश; एका गावात ३ महिन्यांत ८० आत्महत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३१- चेंजिंग रुममधील आरशाचं सत्य कसं पडताळाल
३२- वर्षअखेरीस सलमान विवाहाच्या बोहल्यावर ?
३३- ...या आहेत जगातील 7 क्रूर पत्नी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.
( करण पाटील- नमस्कार लाईव्ह वाचक )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये,
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
---------------------------------------------------------------------------

'केबीसी' घोटाळा : भाऊसाहेब चव्हाण अखेर सापडला
मुंबई: असंख्य गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा चुना लावणारा ‘केबीसी’चा संचालक भाऊसाहेब चव्हाणला अखेर जेरबंद करण्यात यश आलं आहे. भाऊसाहेब चव्हाणला मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे.
‘केबीसी’ कंपनीच्या माध्यमातून, गुंतवणूकदारांना अल्पावधीत दामदुप्पट आणि अधिक व्याजदराचं आमीष दाखवून, त्यांची रक्कम लाटल्याचा आरोप भाऊसाहेब चव्हाणवर आहे. गुंतवणूकदारांना तब्बल 220 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी, तो मुख्य आरोपी आहे. मात्र तो सिंगापूरला पळून गेल्यामुळे त्याला अद्याप अटक झाली नव्हती. आज मुंबईत आला असता, विमानतळावरुच त्याला अटक करण्यात आली.
लाखो गुंतवणूकदारांना चुना
गुंतवणुकीपोटी दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून, भाऊसाहेब चव्हाणच्या ‘केबीसी’ कंपनीने राज्यातील लाखो गुंतवणूकदारांना चुना लावला. अनेकजण ‘केबीसी’च्या आमिषाला भुलले आणि आयुष्यभर राबून मिळवलेली रक्कम ‘केबीसी’मध्ये गुंतवली. मात्र, यातील बहुतेकांना दगाफटका झाला.
---------------------------------------------------------------------------
TOTAL SHARES

महाराष्ट्रात गोवंश मांस बंदी कायम, मात्र अजाणतेपणे बीफ खाल्ल्यास गुन्हा नाही
TOTAL SHARES
मुंबई : महाराष्ट्रात गोवंश मांस विक्री आणि खाण्यावरील बंदी हायकोर्टाने कायम ठेवली आहे. मात्र अजाणतेपणे बीफ बाळगणं हा यापुढे गुन्हा ठरणार नाही.
मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या आजच्या सुनावणीदरम्यान हा निर्णय देण्यात आला.
महाराष्ट्रामध्ये आधीपासूनच गोवंश मांस विक्रीस आणि खाण्यास बंदी आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्याने अजाणतेपणे बीफ बाळगलं, किंवा परराज्यातून आणलं, तर तो यापुढे गुन्हा ठरणार नाही.
याआधी अशा अजाणतेपणे बीफ सेवन करणाऱ्यांना किंवा बाळगणाऱ्यांना मोठ्या शिक्षेस सामोरं जावं लागायचं. पण आता तर आरोपीने बीफ अजाणतेपणे बाळगल्याचं किंवा सेवन केल्याचं सिद्ध केल्यास, तो शिक्षेस पात्र असणार नाही.
---------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
जो आळू की भाजी खाता है, उसका ही गला खुजता है - मनोहर पर्रीकर
नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याचे पडसाद आज लोकसभेतही पहायला मिळाले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी लोकसभेत आज घोटाळ्यासंदर्भातले सगळे तपशील मांडले. यावेळी बोलत असताना हेलिकॉप्टर घोटाळ्यासाठी यूपीए सरकार पूर्णपणे जबाबदार असल्याचा दावा पर्रिकारांनी केला.
कवडीमोल दरातल्या हेलिकॉप्टरची किंमत अव्वाच्या सवा वाढवून घेण्यात आल्याचं सांगंत या घोटाळ्यात यूपीएचं सरकार पूर्णपणे बुडालं असल्याचा आरोप पर्रिकरांनी केला.
एक तासाच्या भाषणात पर्रिकरांनी आपले सर्व मुद्दे स्पष्टपणे मांडले. ज्यात विरोधकांनीही फारसा व्यत्यय आणला नाही. भाषणादरम्यान अनेक मराठी, हिंदी म्हणींचा वापर करत पर्रिकरांनी उपस्थित खासदारांच्या टाळ्याही मिळवल्या.
ऑगस्टा प्रकरणात वाहत्या गंगेत अनेकांनी हात धुवून घेतले आहेत. ही गंगा कुठवर पोहोचली आहे, त्याचा तपास करण्याचे आदेश दिल्याचं पर्रिकर म्हणाले.
यावेळी पर्रिकरांनी ” खाई त्याला खवखवे” या मराठी म्हणीचा वापर केला. पण मराठी म्हण हिंदीत समजावून सांगताना, पर्रिकरांना तारेवरची कसरत करावी लागली.
---------------------------------------------------------------------------
भंडारा; मंडप सजला, नवरी नटली, पण अक्षता पडण्यापूर्वी नवरदेव पसार
भंडारा : मंडप सजला होता, नवरी नटली होती, थोड्याच वेळात अक्षता पडणार होत्या, पण त्याआधीच नवरदेव पसार झाला. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील खराबी गावात ही घटना घडली. लग्नापूर्वीच नवरदेव पळून गेल्याने संबंधित तरुणीचं स्वप्न भंगलं.
अमर तितीरमारे असं पसार झालेल्या नवरदेवाचं नाव असून तो एसटी महामंडळात क्लर्क पदावर काम करतो. गावातील समाज मंदिरात लग्नाची सर्व तयारी झाली होती. रंगीबेरंगी फुलांनी मांडव सजवण्यात आला. पण लग्न लागण्यापूर्वीच होणारा नवरा पळून गेल्याने तरुणीने रंगवलेली स्वप्नं बेरंगी झाली.
फसवणुकीप्रकरणी वधूच्या पित्याने अमर तितीरमारे आणि त्याच्या कुटुंबाविरोधात मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
घरातून दोन दिवसांपासूनच नवरदेव फरार
लग्नाची सर्व तयारी झाली होती. अगदी लग्न लागण्याची वेळही सरुन चालली होती. तरीही वऱ्हाड आणि नवरदेव न आल्याने वधूच्या पित्याने फोन करुन चौकशी केली. चौकशी केली असता मुलगा गेले दोन दिवसांपूर्वीच पसार झाला आहे, अशी धक्कादायक माहिती त्यांन मिळाली.
पैशांच्या हव्यासापोटी पसार ?
मुलाला पहिल्यापासूनच पैशांचा हव्यास होता. त्याने अनेकदा महागड्या वस्तूंची मागणीही केली होती. एवढंच नव्हे तर त्याने दोन लाख रुपयेही मागितले होते. पण या मागण्या पूर्ण करण्याची परिस्थिती माझ्या वडिलांची नाही, असं मी त्याला स्पष्ट झालं होतं. त्यामुळेच ऐनवेळी तो पळून गेले, असं मुलीने सांगितलं.
---------------------------------------------------------------------------
चेंजिंग रुममधील आरशाचं सत्य कसं पडताळाल
मुंबई : शॉपिंग ही महिलांची सर्वात आवडती गोष्ट. खरेदीसाठी अनेक महिला, तरुणी मॉल किंवा दुकानात जातात. कपडे व्यवस्थित आहेत की नाही हे पाहण्यासाठी ट्रायल रुममध्ये जातात. पण केंद्रीय मंत्री मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत फॅब इंडियामध्ये घडलेल्या प्रकारानंतर, आता अनेक महिलांना चेंजिंग रुममध्ये छुपा कॅमेरा तर नसेल ना अशी भीती असते.
मात्र ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा किंवा तिथल्या आरशामागे तिसरंच नाही ना जे तुमच्यावर नजर ठेवून आहे, हे हातांच्या बोटांनी तपासता येऊ शकतं.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी एक वर्षापूर्वी गोव्यातील फॅब इंडियाच्या शोरुममध्ये शॉपिंगसाठी गेल्या होत्या. शोरुमच्या ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा असल्याचं त्यांनी उजेडात आणलं होतं. स्मृती इराणींनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर देशात खळबळ माजली होती. पण मॉल किंवा दुकानाच्या चेंजिंग रुममध्ये छुपा कॅमेरा असल्याची घटना समोर येण्याची ही पहिली वेळ नाही.
सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दावा केला आहे की, बोट आरशावर ठेवलं की चेंजिंग रुममध्ये केवळ आरसा आहे की दुसऱ्या बाजूने तुम्हाला कोणी पाहत आहे, हे समजू शकेल. इतकंच नाही तर तो आरसाच आहे कसं ओळखावं याची पद्धतही सांगितली आहे.
कसा ओळखाल फरक?
चेंजिंग रुममध्ये गेल्यावर महिलांनी कपडे बदलण्याआधी आरशावर बोट ठेवून पडताळणी करावी. आरशावर बोट ठेवल्यावर खऱ्या बोटामध्ये आणि प्रतिबिंबामध्ये गॅप दिसत असेल, तर आरसा योग्य आहे. मात्र बोट आणि आरशात दिसत असलेल्या बोटात गॅप दिसला नाही तर समजा की आरशामध्ये गडबड आहे.
---------------------------------------------------------------------------
वर्षाचे 365 दिवस चालणारी हिंगोलीतली आदर्श शाळा
हिंगोली : एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा घसरत जात असल्याचा आरोप होत असताना, दुसरीकडे मात्र हिंगोली जिल्ह्यातील गढाळामधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने शिक्षणाच्या बाबतीत एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
सध्या सर्व शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. पण गाढळच्या शाळेत मात्र चक्क शाळा सुरु आहे. ही आहे हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात येणारी गढाळाची जिल्हा प्राथमिक शाळा. आपल्याला प्रश्न पडला असेल की, इतर शाळांसारखीच असणाऱ्या या शाळेचे वैशिष्ट्य काय? वर वर पाहता ही शाळा इतर शाळांसारखीच वाटते. प्राथमिक शाळा असल्याने या शाळेत 5 वर्ग आहेत आणि दोन शिक्षक.
365 दिवस चालणारी शाळा
काही वर्षांपूर्वी ही शाळा इतर शाळांसारखीच होती. मात्र या शाळेत उत्तम वानखेडे आणि सिद्धेश्वर रणखांब हे दोन शिक्षक आल्यापासून या शाळेचे चित्रच बदलले आहे. या शाळेला कधीच सुट्टी नसते, वर्षाच्या 365 दिवस चालणारी ही कदाचित महाराष्ट्रातील एकमेव शाळा असेल. सध्या इतर शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागलेल्या असताना मात्र ही शाळा सुरु असून, या शाळेत अभ्यास घेतला जात आहे.
विशेष म्हणजे दिवसाचे 24 तास शाळा सुरु असून, विद्यार्थ्यांचे पालक बाहेर गावी कामानिमित्त गेल्यावर विद्यार्थ्यांना शाळेत निवासी व्यवस्था शिक्षक आणि गावकऱ्यांतर्फे करण्यात आली आहे.
सध्या उन्हाळ्यातही शाळा सुरु असून, पुढील वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आताच घेण्यात येत आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना सराव होईल. छोट्याशा शाळेच्या प्रत्येक गोष्टीचा वापर मुलांना शिक्षणासाठी करण्यात आला आहे. बाहेर वऱ्हांड्याचा वापर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केला जातो.
हायटेक शाळा
शाळा जिल्हा परिषदेची असली, तरी पूर्णपणे हायटेक आहे. विद्यार्थांना पुस्तकामधून शिकवलेले विषय चांगल्या प्रकारे समजण्यासाठी त्यांची चित्रफित टीव्हीच्या माध्यमातून दाखवली जाते. शाळेतला लहान विद्यार्थीसुद्धा संगणक अगदी सहजपणे चालवतो. संगणकाच्या माध्यमातून अनेक विषयांचा अभ्यास घेतला जातो.
गावकऱ्यांचीही मदत
शाळेतील डेस्कचा वापरही गणित लिहून ज्ञान वाढवण्यासाठी केला गेला आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून, वर्गात कुलर बसवले आहेत. कोणत्याही मंदिरात साप्ताह, कीर्तन, आरती होत असते. मात्र गढाळा येथील मारुती मंदिरात या शाळेचे दोन वर्ग भरवले जातात. शाळेला दोनच खोल्या असल्यामुळे जागा अपुरी पडत आहे. गावकऱ्यांनी सप्ताह आणि कीर्तन बंद करून ज्ञानदानाचा या उत्तम कामासाठी मंदिर वापरायला दिले आहे. शिक्षक आणि गावकर्यांच्या प्रयत्नाने ही शाळा आदर्श झाली आहे. नावाजलेल्या शाळांच्या विद्यार्थी नवोदय शाळेची परीक्षा पास होऊ शकत नाही. तिथे या शाळेचे अनेक विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविला आहे.
खेळातील सहभागासाठी प्रोत्साहन
शारीरिक क्षमता असूनही अनेक विद्यार्थी योग्य मार्दर्शन आणि प्रोत्साहन अभावी मागे पडतात. या शाळेत फक्त शिक्षणावर भर दिला जात नाही, तर विद्यार्थ्यांच्या शारीरीक विकासाकडेही तितकेच लक्ष दिले जाते. सकाळी 4 वाजल्यापासून शिक्षक विद्यार्थ्यांना मैदानावर घेऊन जातात आणि व्यायाम, प्राणायाम घेण्यात येते. याचे फलित म्हणजे आतापर्यंत या दुर्गम शाळेचे अनेक विद्यार्थी क्रीडा प्रबोधिनी मध्ये लागले आहेत.
अवघ्या 350 वस्तीचं असलेल्या या गावात प्राथमिक शाळेत 84 विद्यार्थी असून, यापैकी 32 विद्यार्थी बाहेर गावचे आहेत. यामध्ये अनेक पालकांनी इंग्रजी शाळा सोडून त्यांच्या पालकांना या शाळेत प्रवेश घेतला आहे. शाळेत 365 दिवस विद्यार्थ्यासाठी पोषण आहार शिजवला जातो.
इंग्रजी शाळेला मात देणाऱ्या गढाळासारख्या शाळा जात इतरत्र झाल्या, तर इंग्रजी शाळा ओस पडल्या शिवाय राहणार नाही. ही शाळा यशस्वीरित्य करण्यात शिक्षकांचे अथक परिश्रम सोबत गावकऱ्यांची त्यांना लाभलेली साथ आहे.
---------------------------------------------------------------------------
'सैराट'च्या पायरसीप्रकरणी 6 जणांना अटक, 6 हजार सीडी जप्त
मुंबई: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या सैराट सिनेमाला पायरसीचं ग्रहण लागलं आहे. याप्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर, पोलिसांनीही झाडाझडती सुरु केली आहे. पोलिसांनी आणखी सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर ‘सैराट’ची पायरटेड कॉपी बनवल्याचा आरोप आहे. तसंच त्यांच्याकडून 23 सीडी जप्त करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी पुण्यात पहिली अटक झाली होती. त्यानंतर काल मुंबईतून सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जवळपास 7 ठिकाणी धाडी टाकून ही कारवाई केली.
कारवाईदरम्यान आरोपींकडून सैराटच्या 23 सीडी, 3 कॉम्प्युटर आणि जवळपास 6 हजार रिकाम्या सीडी जप्त करण्यात आल्या आहेत.
पायरेट कॉपीचे सर्व साहित्य जप्त
पोलिसांनी पायरेट कॉपी बनवण्यासाठीचे सर्व साहित्य आरोपींकडून जप्त केले आहे. सैराटची कॉपी पायरेट करणाऱ्या सुरेंद्र घोसाळकर (34), हशीम खान (21), शाहबाज खान (22), मुश्ताक खान (23), इबनेश शाह (34) आणि अब्दुल शाह उर्फ बबलू (22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
अटक करण्यात आलेल्या सर्वांवर पायरसी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------------------------------------------------------------
वर्षअखेरीस सलमान विवाहाच्या बोहल्यावर ?
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ६ - बॉलिवूड अभिनेता सलमान खानकडे सगळया प्रश्नांची उत्तरे आहेत. पण तो लग्न कधी करणार ? या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नाही. वेगवेगळया प्लॅटफॉर्मवर जेव्हा पत्रकारांनी त्याला हा प्रश्न विचारला त्यावेळी प्रत्येकवेळी त्याने थेट उत्तर देण्याचे टाळले आणि हसण्यावर विषय नेला.वयाच्या पन्नाशीत पोहोचलेल्या सलमान विवाहाच्या बोहल्यावर कधी चढणार या प्रश्नाचे उत्तर या वर्षाच्या अखेरीस मिळू शकते. मुंबई मिररच्या वृत्तानुसार सलमान या वर्षाच्या अखेरीस विवाहाच्या बोहल्यावर चढण्याची शक्यता आहे. सलमानची सध्याची गर्लफ्रेंन्ड लुलिया वेंटर फॉरेनर आहे. सलमान तिच्या प्रेमाखातर विवाह करत असेल असे तुम्हाला वाटेल.पण तुमचा समज चुकीचा आहे. सलमान तिच्यासाठी नव्हे तर, त्याच्या आजारी आईसाठी विवाहाच्या निर्णयाप्रत आला आहे. सलमानने आता घर-संसाराला लागावे अशी त्याच्या आईची इच्छा आहे. आपल्यानंतर सलमानची काळजी घेणारी कोणीतरी असावे असे त्याच्या आईला वाटते.त्यामुळे सल्लूमिया वर्षअखेरीस विवाहाच्या बंधनात अडकू शकतो. सलमानचा विवाह त्याची फॉरेनर प्रेयसी लुलिया वेंटरशी होईल अशी चर्चा आहे.
---------------------------------------------------------------------------
...या आहेत जगातील 7 क्रूर पत्नी
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. 06 - 1) गुजराच्या श्रिया पटेलला अमेरिकेच्या टेक्सस न्यायालयाने पतीची जिवंत जाळून हत्या केल्याबद्द्ल दोषी ठरवत 20 वर्षाची शिक्षा सुनावली होती. या घटनेतील धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्या प्रियकराला मत्सर वाटावा फक्त यासाठीच लग्न केलं होतं असा खुलासा झाला होता. पत्नीने इतक्या क्रूरपणे आपल्या पतीची हत्या करण्याची ही पहिलीच घटना नसून या अगोदरही अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यांनी लोकांना चक्रावून सोडलं होतं. अशा काही क्रूर पत्नींबद्द्ल जाणून घेऊया...2) कैथरीन2000 मध्ये कैथरीन या महिलेने 37 वेळा चाकून भोसकून पतीची हत्या केली होती. इतकंच नाही तर शरिरावरील चामडी खेचून लाऊंजमध्ये टांगून ठेवण्यात आली होती. कैथरीन यांनी क्रूरतेच्या सगळ्या सीमा गाठल्या होत्या ज्या ऐकून अंगावर काटा उभा राहिल. कैथरीन यांनी पतीचं धड कापून स्टोव्हवर भाजलं. इतकचं नाही तर भाजीसोबत ते आपल्या मुलांन जेवायलादेखील दिलं. पोलिसांनी कैथरीनला अटक केली आहे. कैथरीन ऑस्ट्रेलियामधील पहिली महिली आहे ज्यांना नैसर्गिक आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच आजीवन पॅरोलही मिळणार नाही.3) वेलेरियारोममधील किंग क्लॉडियस यांची तिसरी पत्नी वेलेरियाला शारिरिक संबंधांची ओढ होती. आपल्या कर्मचा-यांसोबत अनेकदा दारु पार्टी करत असत. वेलेरिया यांच्या दोन्ही मुलांचा सांभाळ क्लॉडियस यांची पहिली पत्नी केलीगुला यांनी केला. केलीगुला यांच्या मृत्यूनंतर वेलेरिया महाराणी झाल्या. वेलेरिया रात्रीच्या वेळी वैश्याव्यवसाय करत असे. एकदा रोममधील प्रसिद्ध वैश्या सिसलासोबत वेलेरियाने एक पैज लावली. 24 तासात सर्वात जास्त पुरुषांसोबत सेक्स करण्याची ही पैज होती. वेलेरियाने 25 पुरुषांसोबत सेक्स करुन ही पैज जिंकली. वेलेरियाने पुर्व प्रियकरासोबत पतीची हत्या करण्याचा कट रचला होता पण आपल्या लोकांकडून क्लॉडियसला याची माहिती मिळाली. त्यानंतर वेलेरियाला आत्महत्या करण्याचा आदेश देण्यात आला होता, पण ती आत्महत्या करु शकली नाही.टोनी आणि क्रिस्टल बॉर्डरच्या लग्नाला 10 वर्ष झाली होती. ते नेहमी सेक्स गेम खेळायचे. प्लास्टिक बॅगमध्ये, कधी बाथटबमध्ये अशा प्रकारे त्यांचा खेळ चालू असायचा. एकदा टोनीने क्रिस्टलसोबत फासावर लटकण्याचा खेळ खेळला, सुरुवातीला टोनीने क्रिस्टलला फासावर लटकवलं आणि सुरक्षितपणे उतरवलं. पण जेव्हा टोनीला लटकवण्याची वेळ आली तेव्हा क्रिस्टलने 15 मिनिटे त्याला खालीच उतरवलं नाही. त्यानंतर 40 मिनिटं क्रिस्टल त्याची नाडी तपासत होती. पोलिसांसमोर स्पष्टीकरण देताना सेक्स गेम खेळताना अपघाताने हत्या झाल्याचा दावा तिने केला होता. असंही कळत की 1987मध्ये टोनीने अशाच प्रकारे सेक्स गेम खेळताना एकाची हत्या केली होती. ज्यासाठी तो 8 वर्ष जेलमध्ये होता.5) कात्या खारीटोवानोवा2009 साली रशियामध्ये कात्या खारीटोवानोवा या महिलेनं आपला पती मिखाईलचं गुप्तांगच कापून टाकलं होतं. कात्याने आपल्या पतीला त्याची प्रेयसी लिजासोबत सेक्स करताना पाहिले होते. मिखाइल आणि कात्याने लिजाला जेवणासाठी बोलावले होते. जेवण झाल्यानंतर सर्वजण चित्रपट पाहत होते त्यावेळीच सगळ्यांची झोप लागली. अर्ध्या तासानंतर जेव्हा कात्याला जाग आली तेव्हा तिने मिखाईलला लिजासोबत सेक्स करताना पाहिले. तिने रागात लॅम्प फोडला आणि लिजासमोरच मिखाईलचं गुप्तांग कापून टाकलं. न्यायालयाने कात्याला 2 वर्ष लेबर कॅम्पमध्ये काम करण्याची शिक्षा सुनावली होती.6) मारिया शावेजमारिया शावेजने आपल्या पतीला हाऊसकिपरसोबत सेक्स करताना रंगेहाथ पकडले होते. रागात तिने गॅरेजमधील कु-हाड आणून पतीच्या डोक्यात घातली. त्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी ऑपरेशन करुन कु-हाड काढली. यासाठी त्यांना सहा तास लागले. आज तो जिवंत असून साधारण आयुष्य जगत आहे.7) स्टेसी कॉस्टर41 वर्षीय स्टेसी कॉस्टरने 2005मध्ये आपल्या दुस-या पतीची हत्या केली. मात्र ही आत्महत्या असल्याचं तिने सर्वांना सांगितलं. पोलिसांनी तपास केला असताना विषारी इथिनेल ग्लायकॉनचा वापर करुन हत्या केल्याचं समोर आलं होतं. यानंतर पोलिसांनी स्टेसीच्या पहिल्या पतीच्या मृत्यूबद्द्ल शंका निर्माण झाली आणि त्यांनी तपास सुरु केली. त्याचा मृत्यू हार्ट अॅटॅकने झालं असल्याचं सांगण्यात आलं होतं. पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढून तपास केला असता शरिरात विषारी इथिनेल ग्लायकॉन सापडलं. स्टेसी कॉस्टरने आपल्या अल्पवयीन मुलीवर दोन्ही पतीच्या हत्येचा आरोप केला. पहिल्या पतीच्या मृत्यूवेळी त्यांच्या मुलीचं वय 11 वर्ष होतं. कॉस्टरला 25 वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली.
---------------------------------------------------------------------------
ब्रसेल्स स्फोटातील जखमी निधी मुंबईत परतली
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ६ - दोन महिन्यांपूर्वी ब्रसेल्स विमानतळावर झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात जखमी झालेली मुंबईची निधी चाफेकर शुक्रवारी सकाळी मुंबईत परतली. जेट एअरवेजमध्ये फ्लाईट अटेंडट असणारी निधी स्फोट झाला त्यावेळी ब्रसेल्स विमानतळावर होती. स्फोटानंतर सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या तिच्या फोटोमधून या बॉम्बस्फोटाची भीषणता जगासमोर आली होती.बेल्जियममधील रुग्णालयात तिच्यावर ४० पेक्षा जास्त दिवस उपचार झाले. सकाळी सातवाजता जेट एअरवेजच्या विमानाने मुंबईत आल्यानंतर तिला विमानतळावरुन थेट ब्रीच कॅण्डी रुग्णालयात हलवण्यात आले. निधीच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली असून, आता कुटुंबाजवळ आल्यामुळे ती आनंदी आहे. निधीच्या उपचारांचा पुढचा टप्पा आता मुंबईत आहे. जेट एअरवेज सर्व आवश्यक सहकार्य करेल. निधीला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजेत व तिचे लवकरात लवकर सामान्य आयुष्य सुरु झाले पाहिजे असे जेट एअरवेजने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.२२ मार्चला ब्रसेल्स विमानतळावर दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले होते. निधी या स्फोटात १५ टक्के भाजली होती. निधीच्या दोन मुलांना प्रथमच तिला भेटता येणार आहे.
---------------------------------------------------------------------------
ICSEचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ६ : कॉन्सिल ऑर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट अॅक्झामिनेशन बोर्डातर्फ़े घेतल्या गेलेल्या १०वी आणि १२वीच्या परिक्षेचा निकाल आज दुपारी ३ वाजता जाहीर झाला. दहावीची परीक्षा २९ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०१६ दरम्यान घेण्यात आली होती. ८८,२०९ विद्यार्थी आणि ७०,६२६ विद्यार्थीनींनी परीक्षा दिली होती. गेल्या वर्षीच्या परिक्षेतील उत्तीर्णेतेचे प्रमाण ९८.५४ टक्के होते. तो निकालही २०१५ च्या मे महिन्यात लागला होता. यंदाची निकालाची तारिखही आधी जाहीर करण्यात आली होती.असा पहाल तुमचा निकाल :
- cisce.org, cisce.org/results आणि careers.cisce.org या वेबसाईटवर लॉगिंन करा
- त्यानंतर ICSE ClassX Results 2016 यावर क्लिक करा
- त्यानंतर आवश्यक ती माहिती भरा
- लगेच तुमचा रिझल्ट स्क्रिनवर दिसेल.
SMS द्वारे -- आपण SMS द्वारे देखील निकाल पाहू शकता. त्यासाठी ICSE – आपला UID क्रमांक 09248082883 यावर पाठवू शकतात.
---------------------------------------------------------------------------
ISISविरोधात ओबामांनी पुकारलेलं युद्ध बेकायदेशीर, अमेरिकन आर्मी कॅप्टनचा दावा
- वॉशिंग्टन, दि. 5- अमेरिकन आर्मीच्या 28 वर्षीय कॅप्टननं बराक ओबामांविरोधात खटला दाखल केला आहे. आर्मी कॅप्टन स्मिथ यांच्या मते, बराक ओबामांनी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरियाविरोधात पुकारलेलं युद्ध बेकायदेशीर आहे. त्याला अमेरिकेन काँग्रेसची परवानगी नाही.न्यूयॉर्क टाइम्सच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या आर्मीचे कॅप्टन नथन मिशेल स्मिथ यांनी इसिसविरोधात पुकारलेलं युद्ध कायद्याला धरून नसल्याचं म्हटलं आहे. या मिशनमध्ये अमेरिकन काँग्रेसकडून बराक ओबामांना अधिकार मिळाले नाहीत. तरीही आम्ही इसिसविरोधात जोरदार युद्ध करत आहोत. राष्ट्राध्यक्षांनी काँग्रेसकडून युद्ध अधिकाराच्या ठरावानुसार योग्य त्या परवानग्या घ्याव्यात आणि मग इराक आणि सीरियात इसिससोबत युद्ध पुकारावे, अशी माहिती स्मिथ यांनी कोलंबियातल्या सेशन्स कोर्टात दिली आहे.2012मध्ये अमेरिकन आर्मीकडून त्यांना अफगाणिस्तानही आठ महिने तैनात करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी कुवेतमध्ये इंटेलिजन्स ऑफिसरसह टास्क फोर्सनं राबवलेल्या ऑपरेशनमुळेच इसिसविरोधात आंदोलन करण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे. बराक ओबामांनी इसिसला स्वतःचा शत्रू मानून हे युद्ध पुकारलं आहे. भौगोलिक आणि ऐहिक परिस्थितीचा विचार न करता हे युद्ध पुकारल्याचा युक्तिवाद स्मिथ यांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे.मात्र दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा युद्धासंबंधी अमेरिकन काँग्रेसकडून सर्व परवानगी घेतल्याचं म्हणाले आहेत. अमेरिकेवर 9/11चा दहशतवादी हल्लानंतरच इसिसविरोधात आम्ही मोहीम उघडली आहे, अशी माहिती बराक ओबामांनी दिली आहे. स्मिथचे वकील डेव्हिड रेमस यांनी इसिसविरोधात युद्ध पुकारून बंदी प्रत्यक्षीकरण कायद्याची उल्लंघन केल्याची माहिती कोर्टाला दिली आहे.
---------------------------------------------------------------------------
देवदासी बनली सीईओ
- बंगळुरु, दि. ६ - देवदासीच्या अनिष्ट प्रथेमुळे अनेक महिलांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. या प्रथेमध्ये ओढले गेल्यानंतर त्यातून बाहेर पडणे मुश्किल असते. पण सिताव्वा जोदात्ती ही महिला मात्र याला अपवाद ठरली आहे. वयाच्या सातव्या वर्षी देवदासीचे जगणे नशिबी आलेल्या सितव्वाने प्रथा, परंपराशी लढा दिला आणि आज ती एका संस्थेची सीईओ आहे.सितव्वाचा ज्या कुटुंबामध्ये जन्म झाला तिथे तिच्यासह एकूण नऊ मुली होत्या. आई-वडिलांना मुलगा नव्हता. मोठया कुटुंबाचा चरितार्थ चालवणे कठिण असल्याचे घरात गरीबी होती. सितव्वाचे वडील आजारी पडले. त्यांना कामावर जाणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांचा उत्पन्नाचा एकमेव स्त्रोतही गेला त्यानंतर सितव्वाच्या आईने तिला देवदासी बनवले.सितव्वा ज्या माणसाबरोबर रहात होती. तो तिच्या कुटुंबाला नियमित पैसे आणि रेशन पुरवत होता. कर्नाटक सरकारने १९८७ साली कायदा करुन देवदासी प्रथेवर बंदी आणली. त्यामुळे सितव्वाची सुटका झाली. १९९० च्या सुरुवातीला देवदासी म्हणून राहिलेल्या महिलांनी स्वंयम मदत गटांची स्थापना केली आणि सितव्वा त्या बैठकींना उपस्थित रहाण्यास सुरुवात केली.त्यानंतर तिने महिला-मुलांच्या हक्क, बाल मानसशास्त्र, लैंगिक आजार, आर्थिक व्यवस्थापन या विषयावर काम करणा-या 'मास' संस्थेसाठी काम सुरु केले आता ती मासची सीईओ आहे.
---------------------------------------------------------------------------
सोनिया गांधी वाघिण आहेत - ज्योतिरादित्य सिंदिया
- नवी दिल्ली, दि. 6 - अगुस्ता वेस्टलँड प्रकरणी भारतीय जनता पार्टी राजकीय षडयंत्र रचत असून सोनिया गांधींवर वाटेल ते आरोप करत आहेत, परंतु सोनिया गांधी या वाघिण आहेत अशी ठाम बाजू काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंदिया यांनी लोकसभेत मांडली.अगुस्ता वेस्टलँड प्रकरणी गैरव्यवहारांना सुरुवात एनडीएच्या काळातच झाल्याचा आरोप करताना, या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रथम युपीएनेच जाहीर केल्याचे सिंदिया म्हणाले. गांधी परीवारापैकी कुणालाही आर्थिक लाभ दिला नसल्याचे व तसा कुठलाही थेट पुरावा नसल्याचे इटालीच्या कोर्टामध्ये स्पष्ट झाले असूनही भारतीय जनता पार्टीचे नेते मनमानी आरोप करत असल्याचे सिंदिया म्हणाले.ज्या मिशेलचा संदर्भ दिला जातो, त्याने स्पष्टपणे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना आपण कधीही भेटलो नाही, पत्रव्यवहार झाला नाही, संदेशाची देवाणघेवाण झाली नसल्याचे म्हटल्याकडे सिंदिया यांनी लक्ष वेधले.केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षात अगुस्ता वेस्टलँड प्रकरणाची चौकशी का केली नाही असा सवाल विचारत, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी सिंदिया यांनी केली आहे.सिंदिया यांनी अत्यंत आक्रमकपणे काँग्रेसची बाजू लोकसभेत मांडली असून भारतीय जनता पार्टी राजकीय षडयंत्र रचत असून काँग्रेसला नाहक बदनाम करत असल्याचे सांगितले.
---------------------------------------------------------------------------
उत्तराखंड विधानसभेत १० मे रोजी बहुमत चाचणी
- नवी दिल्ली, दि. ६ - उत्तराखंड विधानसभेमध्ये हरीश रावत सरकारच्या बहुमत चाचणीला आपला पाठिंबा असून, आपण त्यासाठी तयार आहोत असे केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. उत्तराखंड विधानसभेत १० मे रोजी बहुमत चाचणी होणार आहे. केंद्र सरकारच्यावतीने युक्तीवाद करणारे अॅर्टोनी जनरल मुकूल रोहतगी यांनी बहुमत चाचणीच्यावेळी निरीक्षकाची नियुक्ती करण्याची विनंती केली.निवृत्त मुख्य निवडणूक आयुक्ताची निरीक्षक म्हणून नियुक्ती करावी असे रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. बहुमत चाचणीच्यावेळी राष्ट्रपती राजवट हटवू नये ही रोहतगी यांची मागणी मात्र न्यायालयाने फेटाळून लावली. उत्तराखंड विधानसभेत बहुमत सिद्ध होत असताना दोन तासांसाठी राष्ट्रपती राजवट लागू नसेल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली असून, इथे राष्ट्रपती राजवट कायम आहे.उत्तराखंड उच्च न्यायालयाने राष्ट्रपती राजवट रद्द केली होती. मात्र केंद्राने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. २७ मार्चपासून उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे.
---------------------------------------------------------------------------
डेंग्यूमुळे जगाचे दरवर्षी ५९३ अब्ज रुपयांचे नुकसान!
- वॉशिंग्टन : भारतासारख्या देशांत सार्वजनिक आरोग्याला डेंग्यूचा फार मोठा धोका असून, त्यामुळे जगाचे दरवर्षी ८.९ अब्ज अमेरिकन डॉलरचे (५९३ अब्ज रुपये) नुकसान होते. कॉलरा, रेबीज आणि रोटाव्हायरस गॅस्ट्रोएंटेरिटिससारख्या अनेक मोठ्या संसर्गजन्य आजारांमुळे जेवढा बोजा पडतो, त्यापेक्षा हा बोजा जास्त आहे.अमेरिकेतील बँ्रडीज युनिव्हर्सिटी येथील आरोग्य अर्थशास्त्रज्ञांच्या गटाने जगात डेंग्यूच्या तापाने १४१ देश आणि विभागांवर किती आर्थिक बोजा पडतो, याचा व्यापक अभ्यास करून अहवाल प्रसिद्ध केला. हे देश आणि विभागांत प्रत्यक्ष डेंग्यूचा उपद्रव झालेला आहे. दरवर्षी त्यांना ८.९ अब्ज डॉलरचे नुकसान होते. कॉलरा, रोटाव्हायरस गॅस्ट्रोएंटेरिटिस, रेबीजसारख्या रोगांमुळेही एवढे नुकसान होत नाही, असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक डोनाल्ड शेफर्डनी म्हटले.डेंग्यू स्थानिक आरोग्य राखणारी व्यवस्था शब्दश: मोडून टाकतो व त्याच्याशी संबंधित वैद्यकीय खर्च वाढवतो व उत्पादन क्षमता घटवतो. तथापि, डेंग्यूचा ताप हा मोठ्या प्रमाणावर जीवघेणा आजार नाही, म्हणून मलेरियासारख्या पारंपरिक आजारात जी उपाययोजना केली जाते, तेवढे लक्ष डेंग्यूच्या तापाकडे जात नाही. भारत, मलेशिया, मेक्सिको आणि फिलिपाइन्ससारख्या देशांमध्ये डेंग्यूमुळे सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे, अशा एकेका देशावर डेंग्यूमुळे किती आर्थिक बोजा पडतो, याचे अनेक अभ्यास शेफर्ड आणि त्यांच्या तुकडीने प्रकाशित केले आहेत. जगात आर्थिक बोजा किती पडतो, हे निश्चित करण्यासाठी या अभ्यासाने सध्याचे सगळे पुरावे मिळविण्यासाठी सर्वसमावेशक भूमिका घेतली.
---------------------------------------------------------------------------
बांगलादेशातील ‘जमात’ प्रमुखाचा मृत्युदंड कायम
- ढाका : १९७१च्या स्वातंत्र्यलढ्यातील युद्धगुन्ह्यांसाठी ठोठावण्यात आलेल्या मृत्युदंडाचे पुनरावलोकन करण्याची मागणी करणारे बांगलादेशातील कट्टरवादी जमात-ए-इस्लामीचा वरिष्ठ नेता मोती-उर-रहमान निजामी याचे अंतिम अपील सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावले. त्यामुळे या नेत्याला धक्का बसला आहे.निजामीने अंतिम अपीलद्वारे या शिक्षेचे पुनरावलोकन करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय अपीलीय खंडपीठाने एकाच वाक्यात निर्णय सुनावला. ७२ वर्षांच्या निजामी यांच्या अंतिम अपीलवर निर्णय देताना सरन्यायाधीश म्हणाले, ‘अपील फेटाळण्यात येत आहे.’ मुस्लीम बहुसंख्यांक असलेल्या या देशात सरन्यायाधीशपदापर्यंत पोहोचलेले सिन्हा हे पहिले हिंदू आहेत.हत्या, बलात्कार व कट रचून बुद्धिवाद्यांच्या हत्या केल्या प्रकरणी निजामीला दोषी ठरविण्यात आले असून, त्याची आतापर्यंतची सर्व अपीले फेटाळण्यात आली आहेत. गुरुवारी त्याचे अखेरचे अपीलही फेटाळले गेले. निकालाचे लिखित स्वरूपातील विवरण नंतर जारी केले जाईल, असे न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीदरम्यान निजामीची उपस्थिती आवश्यक नव्हती. जमातच्या प्रमुखास काशीपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्युदंड झालेल्यांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष बराकीत ठेवण्यात आले आहे.
---------------------------------------------------------------------------
भ्रष्टाचाराच्या या नदीचा उगम शोधून काढू: पर्रीकर
नवी दिल्ली - भारताला व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्स पुरविण्याचे कंत्राट हे ऑगस्टा वेस्टलॅंड कंपनीसच मिळावे, यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (शुक्रवार) संसदेत बोलताना सांगितले. याचबरोबर या व्यवहारामधील लाभार्थींचा सरकारकडून "शोध‘ घेतला जाईल, असा इशारा संरक्षण मंत्र्यांनी यावेळी दिला.
"युपीएने हे कंत्राट ऑगस्टा वेस्टलॅंडलाच मिळावे, यासाठी सर्व प्रयत्न केले. त्यानंतर या कंपनीवर कारवाई करण्याचा सरकारचा निर्णय आपणहून घेतला नव्हता; तर तो तत्कालीन परिस्थितीमुळेच घ्यावा लागला. या गैरव्यवहार प्रकरणी आरोपी असलेले माजी हवाईदल प्रमुख एस पी त्यागी व गौतम खेतान हे छोटे मासे असून भ्रष्टाचाराच्या वाहत्या गंगेत त्यांनी निव्वळ हात धुवून घेतला. मुळात भ्रष्टाचाराची ही नदी कुठे वाहते आहे, हे सरकार शोधून काढेल,‘‘ असे पर्रीकर म्हणाले.
दरम्यान, पर्रीकर यांचे भाषण सुरु असताना कॉंग्रेस पक्षाच्या सभासदांनी सभागृहाचा त्याग केला. यावर पर्रीकर यांनी या सभासदांना उपहासात्मक विचारणा केली. "तुम्हाला इतके वाईट वाटण्याचे कारण काय? मी कोणाचेही नाव घेतलेले नाही. बहुतेक भ्रष्टाचाराची ही नदी कोठे वाहते आहे, हे तुम्हाला माहिती दिसते,‘‘ असा टोला संरक्षण मंत्र्यांनी लगावला. 36 हजार कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारासंदर्भात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या मुख्य लाभार्थी असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

पाकिस्तानी नागरिकांचे स्थलांतर वाढतेय..
इस्लामाबाद : रोजगाराच्या संधी आणि चांगल्या जीवनमानाच्या शोधात मायदेशातून स्थलांतर करणाऱ्यांची संख्या पाकिस्तानमध्ये सातत्याने वाढतच आहे. गेल्या वर्षी जवळपास दहा लाख पाकिस्तानी नागरिकांनी बाहेरच्या देशात स्थलांतर केले. पाकिस्तानमधील मनुष्यबळ विकास विभाग आणि परदेशस्थ पाकिस्तानी नागरिकांशी संबंधित विभागाने काल (गुरुवार) ही माहिती जाहीर केली.
पाकिस्तानमधून अन्य देशांमध्ये स्थलांतर करणाऱ्या नागरिकांची संख्या 2015 मध्ये 9 लाख 46 हजार 571 इतकी होती. 2013 पासून जवळपास 23 लाख नागरिकांनी रोजगाराच्या शोधात स्थलांतर केले आहे. यापैकी सहा टक्के नागरिक आखाती देशांमध्ये स्थायिक झाले. एक टक्का नागरिक युरोपीय देशांमध्ये, तर तीन टक्के नागरिक मलेशिया, लीबिया आणि दक्षिण कोरिया यांसारख्या देशांमध्ये स्थलांतरित झाले. इतर 90 टक्के नागरिक कोणत्या देशांत स्थायिक झाले, याची माहिती या अहवालामध्ये नाही.

'नीट' वर होणार पुन्हा सोमवारी सुनावणी
नवी दिल्ली- राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या (नीट) अंमलबजावणीविरोधात महाराष्ट्रासह आठ राज्यांनी दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवरील सुनावणी आजही (शुक्रवार) अपूर्ण राहिली. या प्रकरणी सोमवारी (ता. 9) पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने बाजू मांडताना जुलैची "नीट‘ची दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. या प्रकरणात महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांनी गुरुवारी आपली बाजू मांडली आणि "नीट‘ची परीक्षा यंदापासून न घेण्याची मागणी केली. या प्रकरणात न्यायालयाने केंद्र सरकार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला आपली बाजू मांडण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. सोमवारी या प्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे.

समुद्रातील पाणी शुद्ध करण्याचे सापडले तंत्र
मुंबई - देशाच्या विविध भागात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना तमिळनाडूतील शास्त्रज्ञांनी समुद्रातील पाणी पिण्यायोग्य करण्याचे तंत्रज्ञान शोधले आहे. या तंत्राद्वारे दररोज तब्बल 63 लाख लिटर पाणी शुद्ध करता येईल, असा दावाही शास्त्रज्ञांनी केला आहे.

भाभा अणु संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. अणुभट्टीतील निरुपयोगी बाष्पाचा वापर करून दररोज 63 लाख लिटर दूषित पाणी शुद्ध करता येऊ शकेल असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. सध्या तमिळनाडूतील कल्पक्कुम येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पंजाब, पश्चिम बंगाल, राजस्थान येथेही हा प्रयोग राबविण्यात येत असल्याची माहिती भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक के. एन. व्यास यांनी सांगितले. "याशिवाय अत्यल्प खर्चात पाण्यातील युरेनियम किंवा आर्सेनिक (विषारी घटक) यासारखे घटक काढून टाकण्यासाठी गाळणी तयार केली असून त्याद्वारे पाण्याला शुद्ध करता येईल‘, असेही व्यास म्हणाले.

महापौर थेट लोकांमधूनच निवडा: भाजप
पुणे - महापौरपदाचा कालावधी पाच वर्षांचा करण्याचा आणि त्याची निवड नागरिकांमधून करण्याचा प्रस्ताव प्रदेश भारतीय जनता पक्षाकडून राज्य सरकारकडे मांडण्यात आला आहे. त्यावर गांभीर्याने विचार सुरू असून, महापालिका निवडणूक चार सदस्यीय पद्धतीने घेण्याचाही निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. राज्य सरकारने हे दोन्ही निर्णय घेतल्यास मतदारांना एकाच वेळी कमाल पाच मते द्यावी लागतील.
महापौरपदाची सध्याची मुदत अडीच वर्षांची आहे. मात्र, जास्तीत जास्त सदस्यांना संधी देण्यासाठी राजकीय पक्ष सव्वा-सव्वा वर्षाची मुदत सदस्यांना देते. मात्र, या पुढील काळात महापौरपद पाच वर्षांसाठीच असावे. तसेच पक्षविरहित राजकारणातून तो अलिप्त असावा. तसेच तो नागरिकांच्या पसंतीचा असावा, या भाजपच्या विचारमंथनातून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मांडण्यात आला आहे. ठराविक बाबींमुळेच त्याला पदावरून दूर करता येईल, असे प्रस्तावात म्हटले आहे. महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने घेण्याचाही निर्णय अंतिम टप्प्यात पोचला आहे. त्याबाबत सत्तारूढ भाजपमध्ये एकमत झाले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक वॉर्ड पद्धतीने घेण्याबाबत शिवसेना राजी झाल्याचे समजते. प्रभाग पद्धतीने निवडणूक घेतानाच राजकीय पक्षांनी त्यांचा महापौरपदाचा उमेदवार जाहीर करायचा आहे. मतदान करताना नागरिकांनी महापौरपदासाठीही मत द्यायचे आहे. त्यामुळे त्यांना कमाल पाच मते देता येतील.
दरम्यान, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. प्रभाग पद्धतीने निवडणूक झाल्यास कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भारत जनता पक्ष- शिवसेना यांची आघाडी आणि युती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महिला मिग-21 चालवायला घाबरतात- भाजप नेता
नवी दिल्ली- भारतीय हवाई दलातील मिग-21 हे लढाऊ विमान चालविण्यास महिला पायलट घाबरतात, असा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते अर्जुन राम मेघवाल यांनी आज (शुक्रवार) संसदेत केला.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मिग-21 या विमानाबाबत मत विचारले असता मेघवाल म्हणाले, ‘मिग-21 या विमानाचे अपघाताचे प्रमाण जास्त असल्यामुळे महिला पायलट घाबरतात.‘ मेघवाल यांच्या या वक्तव्यावर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आक्षेप घेत असे बोलू नका म्हणून सांगितले. मेघवाल यांच्या वक्तव्याशी आपण सहमत आहात का? असे पर्रीकरांना विचारताच त्यांनी तत्काळ नाही म्हणून सांगितले.
दरम्यान, सन 2013 पासून मिग-21 या लढाऊ विमानाचे अपघाताचे प्रमाण कमी झाले असल्याचे पर्रीकरांनी सांगितले.
महिला मिग-21 चालवायला घाबरतात- भाजप नेता
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मिग-21 या विमानाबाबत मत विचारले असता मेघवाल म्हणाले, ‘मिग-21 या विमानाचे अपघाताचे प्रमाण जास्त असल्यामुळे महिला पायलट घाबरतात.‘ मेघवाल यांच्या या वक्तव्यावर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आक्षेप घेत असे बोलू नका म्हणून सांगितले. मेघवाल यांच्या वक्तव्याशी आपण सहमत आहात का? असे पर्रीकरांना विचारताच त्यांनी तत्काळ नाही म्हणून सांगितले.
दरम्यान, सन 2013 पासून मिग-21 या लढाऊ विमानाचे अपघाताचे प्रमाण कमी झाले असल्याचे पर्रीकरांनी सांगितले.
---------------------------------------------------------------------------
लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
- ऑनलाइन लोकमतलातूर, दि. ६ : निलंगा, अहमदपूर, चाकूर आणि रेणापूर तालुक्यात आज दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला़ निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी, निटूर, चाकूर येथे गारा पडल्या़. गुरूवारी सायंकाळपासून वातावरणात बदल झाला आहे़ रात्री लातूर शहरासह औसा, उदगीर येथे रिमझिम पाऊस झाला़ शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते़.त्यामुळे उष्णता कमी झाल्याचे जाणवत होते़ दरम्यान, दुपारी २ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात निलंग्यात अर्धा तास अवकाळी पाऊस झाला़ १० मिनिटे गाराही पडल्या़ तसेच तालुक्यातील औराद शहाजानी निटूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला़.चाकुरात दुपारी अडीचच्या सुमारस अर्धा तास अवकाळी पाऊस झाला़ शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने ग्राहकांसह विक्रेत्यांची तारांबळ उडाली होती़ नळेगाव, शिरूरत अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथेही अवकाळी पाऊस झाला़.अहमदपूर शहरात दुपारी १० मिनिटे रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला़ तर तालुक्यातील किनगाव परिसरात तासभर मध्यम स्वरूपााचा पाऊस झाला़ रेणापूर तालुक्यातील पानगाव परिसरात दुपारी २ वाजता वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली़.वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ त्याचबरोबर निलंगा तालुक्यात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली़ तर काहींच्या घरावरील पत्रे उडाली आहेत़. तीव्र उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसाने थोडासा दिलासा मिळाला आहे़ औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर शुक्रवारी कमाल तापमान ३५ अंशसेल्सिअस तर किमान तापमान १९ अंशसेल्सिअस नोंदले गेले आहे़ दोन दिवसापूर्वी कमाल तापमान ४२़५ अंशावर होते़
- =================================================
शिवाजी राजे आणि महात्मा गांधी पुतळा शुशोभिकरण बाबतच्या वादात दोघांना एक महिना कैद आणि १४ लाखांची नुकसान भरपाई
सन २००८ मध्ये नांदेडच्या छत्रपती शिवाजी राजा आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुतळे सुशोभिकरण प्रकरणातील एका गुत्तेदाराने दुसऱ्या गुत्तेदाराचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन अहमदनगर येथील गुत्तेदार कंपनीसह या कंपनीचा अध्यक्ष गुत्तेदार आणि संचालक पत्नी या तिघांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के.एस.सूर्यवंशी यांनी एक महिना साधी कैद आणि १४ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश जारी केले आहेत.
सन २००८ मध्ये छत्रपती शिवाजी राजा आणि राष्ट्रपिता म.गांधी यांचे पुतळा सुशोभिकरणाचे काम अनेक कारणांनी खूप गाजले होते. हे काम नांदेडच्या इंडियन ट्रॅडिशनल कल्चरल सेंटर यांना मिळाले होते. ते काम या संस्थेचे सचिव संजयसिंह धर्मराजसिंह यांनी अहमदनगर येथील कलाश्री क्रिएशन अहमदनगरच्या सौ.स्वाती प्रमोद कांबळे आणि संचालक प्रमोद कांबळे यांना दि.१६ ऑगस्ट २००८ रोजी दिली. या कामाची एकूण किंमत ३५ लाख रुपये होती. काम सुरु झाल्यावर हळूहळू २४ लाख ७४ हजार २५० रुपये संजयसिंहला देण्यात आले. काम सुरु झाल्यावर या कामाची किंमत ३५ लाखावरुन ३८ लाख ६० हजार २५० झाली. त्यामुळे १३ लाख ८७ हजार ९९९ रुपये अहमदनगरच्या स्वाती आणि प्रमोद कांबळे यांच्याकडे शिल्लक राहिले. त्याबाबत १३ लाख ९७ हजार ९९९ रुपयाचे तीन धनादेश स्वाती आणि प्रमोद कांबळे यांनी संजयसिंह यांना दिले. १३ एप्रिल २००९ रोजी ते धनादेश वटण्यासाठी पाठविले असता परत आले. याबाबत स्वाती आणि प्रमोद कांबळे यांना विचारणा केली असता एक महिन्याने ते धनादेश पुन्हा वठविण्यासाठी टाका, असे सांगण्यात आले. त्यानुसार संजयसिंह यांनी दि.१३ मे २००९ रोजी ते धनादेश पुन्हा एकदा वठविण्यासाठी टाकले, परंतु त्यावर सदर रक्कमेला स्थगिती देण्यात आल्याचे पत्र बॅंकेने संजयसिंह यांना दिले. त्यानंतर अहमदनगरच्या स्वाती आणि प्रमोद कांबळे यंानी नोटीस आणि टेलिग्राम पाठवून पैसे देण्यासंदर्भाची माहिती संजयसिंह यांनी दिली. त्यावर काहीच प्रतिसाद आला नाही.

मुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ कान्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
- टंचाईग्रस्त भागात सर्वोच्च प्राधान्याने उपाययोजना राबवा
मुंबई(प्रतिनिधी)राज्यासाठी पुढील दीड ते दोन महिन्यांचा काळ अत्यंत महत्त्वाचा असून या काळात लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, यासाठी प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्याने उपाययोजना राबवाव्यात. टंचाई परिस्थितीत विविध उपाययोजना करता येण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्वाधिकार देण्यात आले असून त्याचा उपयोग जनतेला दिलासा देण्यासाठी करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
दुष्काळग्रस्त जिल्ह्यात टंचाई निवारणासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आढावा घेतला. या व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये कृषी तथा मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथराव खडसे जळगाव येथून सहभागी झाले होते. कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, सचिव मिलिंद म्हैसकर यांच्यासह ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी आदी त्यात सहभागी झाले होते.
चारा टंचाई, टँकरने पाणीपुरवठा, जलयुक्त शिवार अभियानातील प्रलंबित तसेच नवीन कामे, मागेल त्याला शेततळे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना करण्यात आलेली मदत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, मनरेगा, सिंचन विहिरींची निर्मिती आदी विविध बाबींचा यावेळी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचेही निदर्शनास आले. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, जलसंधारणाची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीनेही पावसाळा सुरु होण्यापूर्वीचा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीने जलयुक्त शिवार अभियानाची कामे, मागेल त्याला शेततळे तसेच मनरेगाची कामे गतिमान पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत. शेततळी बनविताना ती तांत्रिकदृष्ट्या योग्य जागेत बनविणे गरजेची आहेत. त्यादृष्टीने भूजल विभागातील अधिकाऱ्यांकडून जागेची पडताळणी करुन त्याच जागेमध्ये शेततळ्याची निर्मिती करण्यात यावी. जलयुक्त शिवार अभियान आणि मागेल त्याला शेततळे योजनेची कामे मागे पडलेल्या जिल्ह्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन ती गतिमान करावीत, असे आदेशही त्यांनी यावेळी संबंधित सचिवांना दिले. कृषी सहाय्यक, तंत्रज्ञ, भूजल तज्ज्ञ आदींच्या जागा कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये त्यांची पदभरती करण्यात यावी, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. - =================================================
पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या १२ जणांना ९ मे पर्यंत पोलिस कोठडी
३ मे रोजी मौजे देगाव कुऱ्हाडा ता.अर्धापूर येथे सायंकाळी भिमजयंतीची मिरवणूक गावात येऊ देणार नाही असा वाद एका गटाने घातल्यानंतर दगडफेक झाली. सोबतच अनुसूचित जातीच्या लोकांच्या घरावर हल्ला झाला. काही इतर लोकांची शेतातील आखाडे जाळण्यात आले आणि पोलिसांवर सुध्दा दगडफेक झाली. त्यात जवळपास बारा पोलीस जखमी झाले होते. आणि अनुसूचित जातीचे पंधरा लोक जखमी झाले होते. या प्रकरणी अर्धापूरचे पोलीस निरीक्षक सतीश दत्तात्रय गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंधरा नावांसह जवळपास 250-300 लोकांनी पोलिसांवर हा हल्ला केला होता. त्यात पोलिसांच्या पोलिसांचे गाड्यांचे नुकसान पण झाल होते. पोलिसांनी काल चंद्रकांत मोतीराम कदम (२४), गोविंद नारायण कदम (२१), बालाजी उमाजी कदम (४४), आनंदा अहिलाजी कदम (२०), सचिन सुभाषराव वाळके (२२), बंडू श्रीपती कदम (२२), विश्र्वनाथ विठ्ठलराव कदम (२२), विश्र्वास विश्र्वनाथ कदम (३६), चांदू विठ्ठल कदम (४०), विष्णू सुभाष वाळके (२०), सुभाष दिगंबर वाळके (५०), विलास विश्र्वनाथ कदम (३०) या बारा लोकांना पकडले. त्यांच्याविरुध्द भारतीय दंड विधानाचे अनेक कलमे ज्यात जीवघेणा हल्ला करणे, तसेच सार्वजनिक मालमत्ता विद्रुपण कायदा अशा गुन्ह्यांची नोंद झाली. यातील तीन जण फरार आहेत. त्यांची नावे एकनाथ रंगनाथ कदम, भगवान भिमराव कदम आणि पवन शेषराव कदम अशी आहेत.
आज दुपारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अवचार यांनी पकडलेल्या बारा जणांना अर्धापूरच्या न्यायालयात हजर केले. तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचा मुद्दा सरकारी वकील ऍड.गिरीश मोरे यांनी मांडला. त्यानुसार न्यायाधीश राठोड यांनी देगाव कुऱ्हाड मध्ये पोलिसांवर हल्ला करणाऱ्या या बारा जणांना ९ मे २०१६ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.नांदेड(प्रतिनिधी)देगाव कुऱ्हाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी ३ मे रोजी झालेल्या पोलिसांवरील हल्ला प्रकरणी अर्धापूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.बी. राठोड यांनी १२ जणांना ९ मेपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणी ऍट्रासिटीचा आणखीही गुन्हा प्रलंबित आहे.
- =================================================
अशोकराव चव्हाण यांच्या घराच्या मुख्य रस्त्यावर सुरु आहे जुगार
- कॉंग्रेस विचार संघटनने दिले शिवाजीनगर पोलिसाना निवेदन
नांदेड(प्रतिनिधी)शहराच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम मटका,जुगार आणि क्रिकेट सट्टा सुरु असल्याचे निवेदन कॉंग्रेस विचार संघटनने खुद शिवाजीनगरच्या पोलिस निरीक्षकांना दिले आहे.ते निवेदन पोलिस निरीक्षकांनी मोठ्या गंभीर मुद्रेत स्वीकारले आहे.मटका हा जुगार अशोकराव चव्हाण यांच्या घराच्या मुख्य रत्यावर सुरु असल्याचे निवेदनात नमूद आहे.
कॉंग्रेस विचार संघटनचे अध्यक्ष एम.डी.अलीम यांच्या सह एका शिष्टमंडळाने आज शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक राजू तासीलदार यांची भेट घेवून एक निवेदन त्यांना दिले.त्यात नांदेड शहरात खुलेआम मटका,जुगार आणि क्रिकेट सट्टा हे जुगार प्रत्येक भागात सुरु आहेत.असे लिहिले आहे.या प्रकारांमुळे गोर गरीब जनतेचे मोठे नुकसान होत आहे.मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.बेरोजगार तरुण या जुगारांच्या अमिषाला बळी पडत आहे आणि आपले आयुष्य खराब करून घेत आहेत.अनेकांचे जीवन उध्वस्त झाले आहे.मटका,जुगार आणि क्रिकेट सट्टा चालवणाऱ्या लोकांचा लवकर बंदोबस्त करावा.
मटका हा जुगार खा.अशोकराव चव्हाण यांच्या घराच्या मुख्य रस्त्यावर जिलानीभाई हॉटेलच्या बाजूला सैदू यांच्या घरात सुरु आहे. असे निवेदनात नमूद आहे. तसेच जिजामाता शाळेसमोर आणि फायर स्टेशन समोरच्या हॉटेल मध्ये जुगार सर्रास पणे सुरु आहे.या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करून जुगारावर प्रतिबंध घालावा. या जुगार अड्ड्यांमुळे येणाऱ्या - जाणऱ्या महिला,मुली आणि बालकांना त्रास होत आहे.तरीही शासन मटका चालवणाऱ्यावर डोळे झाक होत आहे.या मुले मटका आणि इतर जुगार चालकांचे मनोध्यर्य वाढत आहे. असे लिहिलेले निवेदन शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजू तासीलदार यांनी अत्यंत गंभीर पणे स्वीकारले खरे पण कॉंग्रेस नेत्यांना आपल्याकडून मला शिकायचे नाही असे सांगणारे राजू तासीलदार अशोकराव चव्हाण यांच्या घराच्या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून जुगाराच्या विळख्यातून मुक्तता देतील काय ? हे येणाऱ्या काळात दिसेल. - =================================================
- =================================================

No comments:
Post a Comment