Monday, 30 May 2016

नमस्कार लाईव्ह ३०-०५-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- ढाका; 67 व्या वर्षी लग्न करुन 70 व्या वर्षी पिता 
२- ओहाओ; तीन वर्षांचा चिमुकला गोरिलासमोर पडला आणि... पहा व्हिडीओ 
३- ढाका; बांगलादेशात हिंसाचारात १२ ठार, २०० जखमी 
४- इटली; ७00 शरणार्थींचा बोटी बुडून मृत्यू 
५- १९८४ मध्येच दिल्ली झाली असती खाक; पाकच्या अणुशास्‍त्रज्ञ्यांचा गौप्यस्फोट 
६- कॅनडात खलिस्तानी दहशतवाद्यांचा प्रशिक्षण तळ 
७- इस्लामाबाद; मुल्ला मन्सूरवरील हल्ला; अमेरिकेविरोधात तक्रार 
८- 'इसिस'ला आता इराकमधूनही घेरणार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
९- चंडीगड; कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी संघटना पंजाबवर हल्ला करण्याच्या तयारीत 
१०- हैदराबाद; नेताजी सुभाषचंद्र बोस बंगालमध्ये के के भंडारींच्या नावे करत होते वास्तव्य ? 
११- बलात्कार पीडितेचे नाव जाहीर करू नये- दिल्ली हायकोर्ट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- सचिन आणि लतादीदींवर एआयबीच्या तन्मय भट्टकडून अश्लाघ्य टिप्पणी 
१३- तन्मय भटवर कडक करावई करा, निलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्र्यांना ई- मेल 
१४- मुंबई; ११ नवीन स्थानकांना मंजुरी 
१५- दुर्गापूर; औष्णिक केंद्रातून ४,०२४ मेगावॉट वीजनिर्मिती 
१६- मुंबई; किल्ले रायगडवर ‘शिवशाही’ 
१७- विसापूरच्या गुप्त दरवाजाने घेतला मोकळा श्वास! 
१८- तन्मयला रस्त्यावर फिरू देणार नाही - मनसे 
१९- मेघालयदेखील आता रेल्वेच्या नकाशावर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- सांगलीत स्वत:च्याच कारभाराचे दिलीप सोपलांकडून वाभाडे! 
२१- गाझियाबाद; होंडाचं 'बेस्ट डील' सेकंड हॅण्ड बाइक शोरुम सुरु 
२२- इंदूर; ऑक्सिजनऐवजी नायट्रस ऑक्साईड, रुग्णालयात बालकाचा मृत्यू 
२३- बीड शहरात आता फ्री वाय-फाय सेवा  
२४- कोल्हापूर; ...तर १५ जुलैपासून शाळा बेमुदत बंद! 
२५- डोंबिवली; ‘प्रोबेस’चा ढिगारा उपसला 
२६- वडूज; जलपुनर्भरणाचा परदेशी प्रयोग चक्क गावात..! 
२७- कॉंग्रेसने तिकीट नाकारलेले दर्डा गडकरींच्या भेटीस 
२८- धामणगाव रेल्वे; तेरवीचा खर्च दिला मंदिर बांधकामाला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२९- RCB ची पुन्हा निराशा, हैदराबाद IPL चॅम्पियन 
३०- 'सैराट'चा महिन्याभरात 'विराट' गल्ला 
३१- आयपीएलमध्ये दोन भारतीयांची धडाकेबाज कामगिरी 
३२- ऑरेन्ज कॅप पटकावत IPL मध्ये कोहलीची 'विराट' कामगिरी 
३३- मायक्रोमॅक्सच्या यू टेलिव्हेचर्सच्या यू यूनिकॉर्नचं उद्या लाँचिंग 
३४- असूस झेनफोन 3च्या तीन मॉडेल्सचं आज लाँचिंग 
३५- कंगनाची बाजू घेतल्याने विद्या बालनचे पतीशी खटके 
३६- आली जलपरी... कतरिनाची अदा फारच भारी 
३७- बार्सिलोना; ...तर मेसीला २२ महिने तुरुंगवासाची शिक्षा 
३८- सेन्सेक्समध्ये 100 अंशांची वाढ 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
चुकीचा रस्ता..चुकीची माणसं..वाईट परिस्थिती..वाईट अनुभव..हे अत्यंत गरजेचे आहेत...
कारण...यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे
(डाॅ. राहुल कांबळे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
=============================================

तन्मय भटवर कडक करावई करा, निलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्र्यांना ई- मेल

तन्मय भटवर कडक करावई करा, निलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्र्यांना ई- मेल
मुंबई: भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लाघ्य टिपण्णी करणाऱ्या ‘एआयबी रोस्ट’ या शोचा कलाकार तन्मय भट विरोधात कडक कारवाई करा, अशी मागणी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी केली आहे.  निलम गोऱ्हे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवदेन दिलं आहे. तसंच पोलीस आयुक्तांकडेही तक्रार केली आहे.

तन्मय भट्टवर कारवाई करा
“लताताई मंगेशकर आण सचिन तेंडुलकर  या दोन भारतरत्न आणि संगीत -क्रिकेट क्षेत्रातील आदरणीय व्यक्तीमत्वांवर तन्मय भट आणि एआयबीच्या टीमने कुचेष्टापर व्हिडिओ तयार करून सामाजिक माध्यमात प्रसृत केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघांचे चेहरे ओंगळवाणे मुखवट्याच्या स्वरूपात दाखवले आहेत. तसेच लताताईंबाबत अश्लील, अश्लाघ्य भाषा वापरली आहे. स्री म्हणूनही त्यांच्याबाबत अपमान, अनादर आणि अवहेलना केली आहे” असं निलम गोऱ्हेंनी निवेदनात म्हटलं आहे.
=============================================

मिशन अॅडमिशन : मुंबईतील टॉप 10 कॉलेजची माहिती

मिशन अॅडमिशन : मुंबईतील टॉप 10 कॉलेजची माहिती
मुंबईसध्या वातावरणातला उकाडा वाढतोय आणि टेन्शनही. दहावी असो, बारावी असो वा पदवी,  निकालांचा हंगाम असल्यानं प्रत्येकाला उत्सुकता आहे ती मार्कशीटची. या मार्कशीटवरचे गुणच या विद्यार्थ्यांचा उत्तम भविष्यकाळ घडवणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या या वाटचालीत एबीपी माझाही हातभार लावणार आहे. ‘मिशन अॅडमिशन’ या आमच्या विशेष वृत्तातून मुंबईतल्या टॉप टेन कॉलेजची माहिती दिली जाणार आहे. तर पाहूयात टॉप टेन मधील पहिलं कॉलेज.
=============================================

RCB ची पुन्हा निराशा, हैदराबाद IPL चॅम्पियन

RCB ची पुन्हा निराशा, हैदराबाद IPL चॅम्पियन
मुंबई डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या नवव्या मोसमात विजेतेपदाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. हैदराबादनं अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला 8 धावांनी हरवून पहिल्यांदाच आयपीएलचं विजेतेपद मिळवलं.

बंगळुरूत झालेल्या सामन्यात हैदराबादनं बंगलोरला विजयासाठी 209 धावांचं भलं मोठं आव्हान दिलं होतं. पण बंगलोरला 20 षटकांत सात बाद 200 धावाच करता आल्या.

खरं तर ख्रिस गेलनं 76 धावांची आणि विराट कोहलीनं 54 धावांची खेळी करून बंगलोरच्या डावाची भक्कम पायाभरणी केली होती. त्यामुळं सामना हैदराबादच्या हातून निसटताना दिसत होता. पण बेन कटिंगनं गेलला बाद केलं आणि हैदराबादला ब्रेक थ्रू मिळवून दिला.

कटिंगनं चार षटकांत 35 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स काढल्या आणि बंगलोरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मुस्तफिजूर रहमान, बरिंदर सरन आणि बिपुल शर्मानंही प्रत्येकी एक विकेट काढून हैदराबादच्या विजयाला हातभार लावला.
=============================================

'सैराट'चा महिन्याभरात 'विराट' गल्ला

'सैराट'चा महिन्याभरात 'विराट' गल्ला
मुंबई : ‘सैराट’ चित्रपटाची विक्रमी घोडदौड सुरुच असून चार आठवड्यांमध्ये सैराटने 75 कोटी रुपये कमावल्याची माहिती आहे. बॉलिवूड हंगामा या वेबसाईटने सैराटच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी आकडेवारी दिली आहे.

महाराष्ट्रासह देशभरातून आर्ची-परशा यांच्या आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीवर प्रेक्षकांनी जीव ओवाळून टाकला आहे. सैराट चित्रपटाला पहिल्याच आठवड्यात पायरसी फटका बसूनही रिपीट ऑडिअन्स असल्यामुळे ही विक्रमी कामगिरी करता आली आहे.
मराठी चित्रपटांच्या इतिहासातील हा सर्वोच्च आकडा ठरला आहे. ‘झी’ समुहातर्फे मात्र सैराटच्या गल्ल्याविषयी कोणतीही अधिकृत आकडेवारी देण्यात आलेली नाही.


29 एप्रिल रोजी ‘सैराट’राज्यभरातील 400 थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र दुसऱ्या आठवड्यात सिनेमाचे शो 8500 ते 14,000 पर्यंत वाढले. इतकंच नाही साताऱ्यात मध्यरात्री 12 आणि पहाटे 3 चा शोही सुरु होता. ‘सैराट’चं हे यश सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारं होतं. मराठी सिनेमात हे पहिल्यांदाच घडत होतं, असं नितीन केणी यांनी सांगितलं.

सैराटचा 28 दिवसातील गल्ला :

दिवस

1 . शुक्रवार 29 एप्रिल 2016

कमाई (कोटी रुपये)

3.60
2. शनिवार 30 एप्रिल 20163.95
3. रविवार 1 मे 20164.55
दिवस 4 (सोम) ते दिवस 7 (गुरु)13.4
दिवस 8 (शुक्र) ते दिवस 11 (सोम)15.61
दिवस 12 (मंगळ) ते दिवस 14 (गुरु)10.89
दिवस 15 (शुक्र) ते दिवस 16 (शनि)3
दिवस 17 (रवि) ते दिवस 21 (गुरु)10
दिवस 22 (शुक्र) ते दिवस 28 (गुरु)10
एकूण75
=============================================

आयपीएलमध्ये दोन भारतीयांची धडाकेबाज कामगिरी

आयपीएलमध्ये दोन भारतीयांची धडाकेबाज कामगिरी!
बंगळुरु: रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली यंदाच्या आयपीएलमधला ऑरेन्ज कॅपचा मानकरी ठरला. कोहली यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज ठरला.

यंदाच्या मोसमात 16 सामन्यांमध्ये 81.08च्या सरासरीनं 973 धावांचा रतीब घातला. आयपीएलच्या एकाच मोसमात एक हजार धावा करण्याची कोहलीची संधी हुकली. पण यंदा कोहलीनं एकूण चार शतकं आणि सात अर्धशतकं साजरी केली. तसंच 83 चौकार आणि 38 षटकारांचीही बरसात केली.

भुवीनं पटकावली पर्पल कॅप

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं आयपीएलच्या नवव्या मोसमात सर्वाधिक विकेट्स काढणाऱ्या गोलंदाजासाठीची पर्पल कॅप मिळवली. भुवनेश्वरनं यंदाच्या मोसमात 17 सामन्यांमध्ये 7.42च्या इकॉनॉमी रेटसह 23 विकेट्स काढल्या आणि सनरायझर्स हैदराबादच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
=============================================

ऑरेन्ज कॅप पटकावत IPL मध्ये कोहलीची 'विराट' कामगिरी

ऑरेन्ज कॅप पटकावत IPL मध्ये कोहलीची 'विराट' कामगिरी
बंगळुरु : डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या नवव्या मोसमात विजेतेपदाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये ऑरेन्ज कॅप पटकावली आहे.


कोहली यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज ठरला आहे. यंदाच्या मोसमात 16 सामन्यांमध्ये 81.08 च्या सरासरीने त्याने 973 धावांचा रतीब घातला. आयपीएलच्या एकाच मोसमात एक हजार धावा करण्याची कोहलीची संधी हुकली, मात्र आयपीएलमध्ये 900 धावांचा टप्पा पार करणारा कोहली एकमेव फलंदाज आहे. गेलने 2012 मध्ये आयपीएलमधल्या सर्वाधिक (733) धावा केल्या होत्या.
=============================================

67 व्या वर्षी लग्न करुन 70 व्या वर्षी पिता

67 व्या वर्षी लग्न करुन 70 व्या वर्षी पिता
ढाकाः पितृत्व लाभणं हा कोणत्याही पित्यासाठी एक सुखद अनुभव असतो. मात्र कोणाला जर वयाच्या 70 व्या वर्षी पितृत्व लाभलं तर त्याचा आनंद काही वेगळाच म्हणावा लागेल.

बांगलादेशचे रेल्वे मंत्री मुजीबुल हक यांना असाच आनंद लाभला आहे. हक यांना वयाच्या 70 व्या वर्षी कन्यारत्न झाला आहे.  शनिवारी एका रुग्णालयात हक यांची पत्नी मुनिफा यांनी मुलीला जन्म दिला. मुलगी आणि आई दोघेही ठिक आहेत, असं हक यांनी स्वतः सांगितलं आहे.

13327426_1069882259724034_4552618652106992086_n


29 वर्षीय तरुणीसोबत केलं लग्न
हक यांनी 31 ऑक्टोबर 2014 रोजी वयाच्या 67 व्या वर्षी लग्न केल्यामुळे हक हे काही वर्षांपूर्वी चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर आता वयाच्या 70 व्या वर्षी पिता बनल्यामुळे ते चर्चेत आहेत. हक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी हनुफा अख्तर रिक्ता या 29 वर्षीय तरुणीसोबत लग्न केलं होतं.
=============================================

मायक्रोमॅक्सच्या यू टेलिव्हेचर्सच्या यू यूनिकॉर्नचं उद्या लाँचिंग

मायक्रोमॅक्सच्या यू टेलिव्हेचर्सच्या यू यूनिकॉर्नचं उद्या लाँचिंग
मुंबई: मायक्रोमॅक्स या भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनीची उपकंपनी असलेल्या ‘यू टेलिव्हेंचर्स’ चा Yu सीरिजमधील पुढील स्मार्टफोन भारतात उद्या लाँच होणार आहे. यू यूनिकॉर्न असं या स्मार्टफोनचं नाव आहे. उद्या लाँच होत असलेला हा स्मार्टफोन फक्त फ्लिपकार्टवरच उपलब्ध होणार असल्याचंही यू टेलिव्हेंचर्सने जाहीर केलंय.

यापूर्वी या फ्लॅगशिपच्या लाँचिंगसाठी 19 मे ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र त्या दिवशी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी असल्यामुळे यू टेलिव्हेंचर्सने लाँचिंग इव्हेंट पुढे ढकलला.

यू टेलिव्हेंचर्सचा सध्या ‘यू यूटोपिया’ हा रूपये 24999 किंमतीचा स्मार्टफोन हा फ्लॅगशिप फोन आहे.

मायक्रोमॅक्सच्या यू टेलिव्हेंचर्सने गेल्याच महिन्यात यू युरेका नोट हा स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोनची भारतातील किंमत रू. 13499 निश्चित करण्यात आली होती.
=============================================

असूस झेनफोन 3च्या तीन मॉडेल्सचं आज लाँचिंग

असूस झेनफोन 3च्या तीन मॉडेल्सचं आज लाँचिंग!
मुंबई: स्मार्टफोन निर्मिती करणारी तैवानी कंपनी असूस, आज तीन नवे मॉडेल्स लाँच करणार आहे. असूसचे हे तीनही स्मार्टफोन झेनफोन 3 सीरिजमधील असतील.

असूस झेनफोन 3, असूस झेनफोन 3 मॅक्स आणि असूस झेनफोन 3 डिलक्स अशी या तीन स्मार्टफोनची नावे आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेअकरा वाजता या तीनही झेनफोनचं लाँचिंग होईल.

या तीनही नव्या मॉडेल्समध्ये सी टाईप यूएसबी पोर्ट, फिंगरप्रिंट स्कॅनर आणि संपूर्ण मेटल फ्रेम ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

साधारणपणे महिनाभरापूर्वी लिक झालेल्या माहितीनुसार, झेनफोन 3 मध्ये कॉडकोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम असेल तर अँड्राईडची सर्वात लेटेस्ट ओएस मार्शमेलो 6.0 ने सज्ज असेल.

त्याशिवाय फुल एचडी डिस्प्ले आणि 23 मेगापिक्सलचा मुख्य म्हणजे रिअर कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी असलेला फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा असेल.
=============================================

कंगनाची बाजू घेतल्याने विद्या बालनचे पतीशी खटके

कंगनाची बाजू घेतल्याने विद्या बालनचे पतीशी खटके?
मुंबई : बॉलिवूडची वन वुमन आर्मी मानली जाणारी अभिनेत्री विद्या बालनने बॉलिवूडची आणखी एक सक्षम अभिनेत्री कंगना रनौतचं कौतुक केलं आहे. कंगना-हृतिकच्या या वादात विद्याने कंगनाची कड घेतल्यामुळे विद्याचे पती, निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर मात्र नाराज झाल्याचं वृत्त होतं.


कंगना स्वतःच्या लढ्यात ठामपणे उभी राहिल्यामुळे कंगनाने तिची स्तुती केली होती. मात्र यूटीव्ही डिस्नीचे प्रमुख असलेल्या सिद्धार्थ रॉय कपूर यांची निर्मिती असलेला, हृतिकची मुख्य भूमिका अलेला ‘काबील’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. कंगना आणि हृतिक कायदेशीर वादात अडकले असताना आपल्या पत्नीनेच कंगनाची बाजू उचलून धरणं त्यांना पसंत पडलं नसल्याचं म्हटलं जातं.

विद्या बालनने मात्र पती सिद्धार्थ यांच्यासोबत खटके उडाल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ‘तुम्ही म्हणताय आमच्यात भांडण झालं, मला तर याची काहीच माहिती नाही’ असं विद्याने म्हटलं आहे.

==================

सांगलीत स्वत:च्याच कारभाराचे दिलीप सोपलांकडून वाभाडे!

सांगलीत स्वत:च्याच कारभाराचे दिलीप सोपलांकडून वाभाडे!
सांगली : सांगलीतील एका कार्यक्रमात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप सोपल यांनी मिश्कील शब्दात आघाडी सरकारचे वाभाडे काढले. मंत्रिपदावरुनही राष्ट्रवादी काँग्रेसला दिलीप सोपल यांनी घरचा आहेर दिला.

“मी पक्षात सर्वात ज्येष्ठ असतानाही मागून येणाऱ्या मुलांना मंत्रिपद देण्यात आली. पण मला जेव्हा मंत्रिपद देण्यात आलं, तेव्हा राज्यात दुष्काळ पडलेला होता. थोडक्यात काय तर, मुसलमान व्हायला आणि रोजा महिना यायला अशी माझी गत झाली होती”, असे म्हणत माजी पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल यांनी शिराळ्यात राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला.

राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी असताना अजित पवार यांनी धरणातल्या पाण्याबाबत केलेलं विधान त्यांना चांगलचं भोवलं. त्यामुळे नंतर त्यांच्यावर आत्मक्लेष करण्याचीही वेळ आली. आज राज्यात सत्तांतर झालं आहे, तेव्हाचे कारभारी आज विरोधी बाकांवर आहेत. दुष्काळ स्थितीबाबत युती सरकार सपशेल अपयशी ठरत असल्याचाही आरोप आघाडीकडून होतो आहे. मात्र, राज्याची सत्ता हाती असताना आघाडी सरकार पाणी, जलसंधारण, दुष्काळी मदत याबाबत खरोखर गंभीर होतं का? लोकहिताच्या योजना खरोखर प्रामाणिकपणे राबवल्या गेल्या का? असा प्रश्न दिलीप सोपल यांच्या भाषणानंतर सामन्यांना पडू शकतो.

=============================================

आली जलपरी... कतरिनाची अदा फारच भारी

आली जलपरी... कतरिनाची अदा फारच भारी!
मुंबई: बॉलिवू़ड अभिनेत्री कतरिना कैफनं नुकतंच Vogue मासिकासाठी एक खास फोटोशूट केलं आहे. जूनमध्ये येणाऱ्या Vogue  मासिकाच्या कव्हर पेजवर कतरिना झळकणार आहे. कतरिनाचं हे फोटोशूट सुप्रसिद्ध फोटोग्राफर Luis Monteiro यानं केल आहे.

कतरिनानं आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कतरिना पाण्यामध्ये पोहताना दिसून येते आहे. या व्हिडिओमध्ये कतरिना एखाद्या जलपरीप्रमाणे दिसते आहे.

मासिकाच्या कव्हर पेजवर कतरिना ज्या ड्रेसमध्ये दिसते आहे तो ड्रेस प्रसिद्ध फॅशन डिझायनर टॉम फ्रोड आणि अनिता श्रॉफ यांनी डिझाइन केला आहे. कतरिनाचं हे खास फोटोशूट फिलीपाईन्समधील ‘केबू’मध्ये करण्यात आलं आहे.
=============================================

होंडाचं 'बेस्ट डील' सेकंड हॅण्ड बाइक शोरुम सुरु

होंडाचं 'बेस्ट डील' सेकंड हॅण्ड बाइक शोरुम सुरु!
गाझियाबाद (उत्तरप्रदेश): होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडिया लिमिटेडनं शनिवारी गाझियाबादमध्ये पहिल्या सेकंड हॅण्ड बाइक शोरुम ‘बेस्ट डील’चं उद्घाटन केलं.

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, ज्यांना विश्वसनीय पण सेकंड हॅण्ड बाइक खरेदी करायच्या आहेत त्यांच्यासाठी कंपनीनं हे बेस्ट डील शोरुम सुरु केलं आहे.

‘बेस्ट डील’मध्ये ग्राहकांना स्वस्तात होंडाच्या दुचाकी खरेदी करता येणार आहेत. याबरोबर जुन्या दुचाकी बदलून नवीन किंवा होंडाची सेकंड हॅण्ड बाइक खरेदी करता येऊ शकते. बेस्ट डीलमध्ये ग्राहकांच्या सुविधा लक्षात घेऊन सेकेंड हॅण्ड गाडी विकणाऱ्या मालकाच्या गाडीचे कागदपत्र आणि नव्या ग्राहकाच्या वाहनाची ओनरशीप याचं लवकरात लवकर ट्रान्सफर देण्याचीही हमी देतं. सेकंड हॅण्ड वाहनांनमुळे वाहन बाजाराला एक व्यवस्थित रचना मिळू शकते असं होंडाला वाटतं.

होंडा मोटरसायकलचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंह गुलेरिया म्हणाले की, ‘आम्हाला असं दिसून आलं की, मागील 10 वर्षापासून फार दुचाकी बदलल्या गेल्या नाही. त्यामुळे ग्राहकांचा बदलत्या सवयीनुसार, आम्हाला भविष्यात सेकंड हॅण्ड दुचाकीमध्ये मोठी गुंतवणूक दिसून येते आहे. त्यामुळेच ‘बेस्ट डील’ हे आम्ही ग्राहकांसाठी घेऊन आलो आहे. तसेच याचा लवकरच देशभरातही विस्तार करु.’
=============================================

ऑक्सिजनऐवजी नायट्रस ऑक्साईड, रुग्णालयात बालकाचा मृत्यू

ऑक्सिजनऐवजी नायट्रस ऑक्साईड, रुग्णालयात बालकाचा मृत्यू
इंदूर : मध्य प्रदेशमधील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात सलग दोन दिवस दोन बालकांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. इंदूरच्या रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे 18 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. 
शस्त्रक्रियेदरम्यान ऑक्सिजनऐवजी रुग्ण बालकाला नाईट्रेड वायू दिल्याने मृत्यू झाल्याचा दावा पालकांनी केला आहे. आपली चूक लपवण्यासाठी बालकाला डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी मुलाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, असा आरोपही पालकांनी केला आहे. 
आदल्या दिवशीही अशाच प्रकारची घटना घडल्यानं पालकांनी रुग्णालयाच्या कारभाराविरोधात मोठा संताप व्यक्त केला आहे. रुग्णालय आणि डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईची मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे. पोस्टमार्टमनंतर बालकाचं पार्थिव कुटुंबीयांना सोपवण्यात येणार आहे, मात्र पालकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे.
=============================================

सचिन आणि लतादीदींवर एआयबीच्या तन्मय भट्टकडून अश्लाघ्य टिप्पणी

सचिन आणि लतादीदींवर एआयबीच्या तन्मय भट्टकडून अश्लाघ्य टिप्पणी
मुंबई एआयबी रोस्टच्या माध्यमातून चर्चेत आलेल्या कॉमेडियन्सपैकी तन्मय भट्ट याने अकलेचे तारे तोडले आहेत. नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमधून तन्मयने भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टिप्पणी केली आहे.
विराट कोहली हा सचिनपेक्षा दसपटीने महान क्रिकेटर असल्याच्या विनोद कांबळीच्या कथित वक्तव्याचा धागा पकडत सचिन आणि लता मंगेशकर यांच्या दरम्यानच्या काल्पनिक संवादातून आक्षेपार्ह शेरेबाजी करण्यात आली आहे.

खरं तर ज्यांच्यावर शेरेबाजी करण्यात आली, ते दोघेही भारतरत्न आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात खालच्या पातळीवर केलेल्या कोट्यांमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होतो आहे.

तन्मय भट्टला रस्त्यावर उतरुन दाखवावं, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. शिवाय, मनसेने तन्मय भट्टविरोधात पोलिसांत तक्रारही दिली आहे.

अभिनेते अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ संतापजनक असल्याची प्रतिक्रिया ट्विटरवरून दिली आहे. तर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही हा प्रकार निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
=============================================

बीड शहरात आता फ्री वाय-फाय सेवा

बीड शहरात आता फ्री वाय-फाय सेवा
बीडः बीड नगर परिषदेने आता मेक इन महाराष्ट्राची सुरुवात केल्याचं दिसत आहे. कारण शहरातील पाच ठिकाणी मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

नगर परिषद आणि रिलायन्स इन्फोटेक ही सुविधा देत आहेत. बीडमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा म्हणून मोफत वाय-फाय सुविधा पुरवण्यात आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील या सुविधेचा फायदा होणार आहे.

बीड नगर परिषदेचे गटनेते भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते फ्री वाय-फाय सेवेचं उद्घाटन करण्यात आलं.
=============================================

कामाठीपुऱ्यातील महिलांच्या विरोधात स्थानिकांचा रास्तारोको

कामाठीपुऱ्यातील महिलांच्या विरोधात स्थानिकांचा रास्तारोको
मुंबई: वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या विरोधात कामाठीपुऱ्यातील स्थानिक लोकांनी रस्ता रोको केला. यावेळी कामाठीपुऱ्यातील स्थानिक नागरिक आणि महिलांमध्ये झालेल्या वादाला हिंसक रुप लागलं. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

स्थानिक लोकांना वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या वागणुकीवरुन आक्षेप आहे. याप्रकरणी पोलिसांत अनेकदा तक्रार करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. मात्र, काहीच उपयोग न झाल्यानं स्थानिकांनी त्यांनी रास्तारोको करुन आपली नाराजी व्यक्त केली.

या महिलांवर कारवाई करण्यात यावी यासाठी येथील स्थानिकांनी रात्री उशीरापर्यंत रास्ता रोको केला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलीस काय कारवाई करणार? याकडेच आता स्थानिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
=============================================

तीन वर्षांचा चिमुकला गोरिलासमोर पडला आणि...

VIDEO: तीन वर्षांचा चिमुकला गोरिलासमोर पडला आणि...
ओहाओ (अमेरिका) : अमेरिकेतील ओहाओ प्राणी संग्रहालयात सर्वांच्याच काळजाचे ठोके चुकविणारी घटना घडली. एक तीन वर्षांचा मुलगा चक्क गोरिलासमोर पडला. प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी देखील केवळ पाहण्यापलीकडं काहीही करु शकत नव्हते, असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मुलगा गोरिलासमोर तब्बल 35 मिनिटे तसाच बसून होता. गोरिलाने काही वेळाने मुलाला आपल्या हाताने उचलल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. प्राणी सग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांना शेवटी मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं.

असा वाचला मुलगा!
मुलाला वाचवण्यासाठी प्राणी संग्रहालयाच्या वतीने अनेक प्रयत्न करुनही अपयश येत होतं. शेवटी गोरिला भडकण्याचीही भिती होती. त्यामुळे गोरिलाला चक्क ठार करण्याचा निर्णय घेण्यात आला. गोरिलाला ठार करुन मुलाला बाहेर काढण्यात आलं.

दरम्यान, गोरिला शांतपणे मुलाशी खेळत असतानाही त्याला मारल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पण गोरिलाला त्वरित बेशुद्ध करणं शक्य नाही, बेशुद्धीची गोळी मारल्यानंतर त्याला बेशुद्ध होण्यासाठी कमीत कमी अर्धा तास लागतो. त्यामुळे एवढ्या वेळेत गोरिला चिडून मुलाला मारण्याचीही भीती होती. त्यामुळे ठार मारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता, असं प्राणी संग्रहालयाच्या वतीने सांगण्यात आलं.

=============================================

कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी संघटना पंजाबवर हल्ला करण्याच्या तयारीत


  • ऑनलाइन लोकमत - 
    चंदिगड, दि. 30 - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या सहा महिन्यानंतर गुप्तचर विभागाने कॅनडा सरकारला पत्र पाठवून त्यांच्या देशात खलिस्तानी दहशतवादी संघटना कार्यरत असल्याचा अलर्ट पाठवला आहे. गुप्तचर विभागाने पाठवलेल्या अलर्टमध्ये ब्रिटीश कोलंबियामधील मिशन सिटीमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांच्या समर्थकांकडून कॅम्प चालवले जात आहेत, जिथे पंजाबवर हल्ला करण्याची योजना आखली जात असल्याची माहिती दिली आहे. 
    पंजाबमधील गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार कॅनडामधील शीख हरदीप निज्जर याने खलिस्तानी दहशतवादी संघटनेच्या ऑपरेशनल हेडची जबाबदारी घेतली आहे. शीख तरुणांना भरती करण्यात येत असून पंजाबवर हल्ला करण्यासाठी त्यांना तयार केलं जात आहे. हरदीप निज्जरच्या प्रत्यार्पणासाठी पंजाब सरकारने अगोदरच परराष्ट्र मंत्रालय आणि गृहमंत्रालयाकडे आपला रिपोर्ट सादर केलेला आहे. 
=============================================

नेताजी सुभाषचंद्र बोस बंगालमध्ये के के भंडारींच्या नावे करत होते वास्तव्य ?


  • ऑनलाइन लोकमत - 
    हैद्राबाद, दि. 30 - नेताजी सुभाषचंद्र बोस 1960च्या दशकात के के भंडारींच्या नावे शालुमरी आश्रममध्ये वास्तव्य करत होते का ? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. 27 मे रोजी सुभाषचंद्र बोस यांच्या काही फाईल्स सार्वजनिक करण्यात आल्या होत्या. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. 
    एका फाईलमधील माहितीनुसार 1963मध्ये सरकारमधील उच्च अधिकारी या व्यक्तीबद्दल चर्चा करत होते. सार्वजनिक करण्यात आलेल्या एका फाईलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख वारंवार भंडारी फाईल करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर कुठेच हा उल्लेख दिसत नाही. 
=============================================

...तर मेसीला २२ महिने तुरुंगवासाची शिक्षा


  • ऑनलाइन लोकमत 
    बार्सिलोना, दि. ३० - अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लायोनेल मेसी विरोधात मंगळवारपासून स्पेनच्या बार्सिलोना शहरात खटला सुरु होणार आहे. जगातील सर्वात महागडा फुटबॉल खेळाडू असणा-या मेसीवर कर घोटाळयाचा आरोप आहे. मेसी आणि त्याचे वडील दोषी आढळले तर, त्यांना २२ महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. शिवाय जितक्या रक्कमेच कर टाळला आहे तितकी रक्कम दंड म्हणून ठोठावली जाऊ शकते. 
    मेसीने चाळीस लाख युरोचा कर भरण्याचे टाळून स्पेनची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दोन जूनपर्यंत खटल्याची सुनावणी चालणार असून, दोन जूनलाच मेसी आणि त्याच्या वडिलांची याप्रकरणी कोर्टात साक्ष नोंदवण्यात येईल. 
    अमेरिकेत होणारी कोपा अमेरिका स्पर्धा तोंडावर आलेली असताना मेसीला न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. अर्जेंटिनाचा सहा जूनला पहिल्या फेरीत गतविजेत्या चिली विरुद्घ सामना होणार आहे. मेसी आणि त्याचे वडिल जॉर्ज मेसी यांनी कर टाळण्यासाठी बनावट कंपन्यांच्या साखळीचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २००७-०९ मध्ये मेसीने त्याचे इमेज राईट विकले होते त्यातून मिळालेल्या उत्पन्नात कर चुकवेगिरीचा आरोप आहे. 
=============================================

११ नवीन स्थानकांना मंजुरी


  • मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर दुहेरीकरण करतानाच ११ नवीन स्थानकांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. त्याबाबत कोकण रेल्वेने पाठवलेल्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिली. या ११ पैकी बहुतांश स्थानके महाराष्ट्रातील असून, त्यामुळे कोकणातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
    मध्य रेल्वेकडून दिवा ते रोहापर्यंतच्या दुहेरीकरणाच्या कामाला गती देण्यात येत आहे. हे काम करताना कोकण रेल्वेकडील दुहेरीकरणाच्या कामाचा प्रस्ताव बरीच वर्षे मागे पडला होता. त्यानंतर कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या ७४१ किलोमीटरपर्यंतच्या टप्प्याचे दुहेरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला
    होता.
=============================================

...तर १५ जुलैपासून शाळा बेमुदत बंद!


  • कोल्हापूर : वेतनेतर अनुदान द्यावे, २० पटसंख्येखालील शाळा बंद करू नयेत, आदी मागण्यांकडे वेळोवेळी लक्ष वेधूनही शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे १५ जुलैपासून बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा राज्य शिक्षण बचाव निर्धार लढा समितीच्या रविवारच्या मेळाव्यात देण्यात आला. समाजातील सर्वच घटकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सोमवारपासून जागृती करणार असल्याचेही समितीने जाहीर केले.
    विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे आतापर्यंतचे सर्वांत अधिक फसवे मंत्री असल्याची टीका केली. त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेऊ नये. जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत शाळांचे कुलूप काढू नये, असेही त्यांनी सांगितले. माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे आपल्या भाषणात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे अप्रत्यक्षरीत्या समर्थन करीत असल्याचे जाणवले. त्यामुळे श्रोत्यांमध्ये काही शिक्षकांनी साळुंखे यांच्या मुद्द्यांवर आक्षेप घेत त्यांचे भाषण रोखल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. 
=============================================

‘प्रोबेस’चा ढिगारा उपसला


  • डोंबिवली : प्रोबेस कंपनीतील रिअ‍ॅक्टर स्फोटानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली असलेले मिथेनॉलसह अल्कोहोलने भरलेले १५ बॅरल तळोजा येथे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याने वायुगळती होण्याचा धोका टळला. येथील मातीचे ढिगारे उपसण्याचे काम रविवारी संपल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले.
    रविवारी पहाटेपर्यंत घटनास्थळावरील पोकलेन, जेसीबीसह सर्व साधनसामग्री-अधिकारी, कर्मचारी परतले. त्यामुळे आता केवळ निवडक पोलीस, अग्निशमन दलाचे पथक तैनात केलेले आहे.
    स्फोटात जखमी झाल्याने खाजगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी झाली असून गेले दोन-तीन दिवस अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांना सर्वसाधारण वॉर्डात हलवले आहे. त्यामुळे आता कुणाचीही प्रकृती चिंताजनक नसल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी स्मिता रोडे यांनी दिली.
    प्रोबेस कंपनीशेजारील केमिकल कंपन्यावगळता अन्य कंपन्यांचे कामकाज रविवारपासून सुरू झाले. ज्या कंपन्यांचे खूप नुकसान झाले आहे, तेथील कामगार तुटलेले पत्रे, खुर्च्या, टेबल, पंखे, संगणक, फ्रीज हे सामान गोळा करीत होते. आणखी तीन-चार दिवस हे काम सुरू राहणार आहे.
=============================================

औष्णिक केंद्रातून ४,०२४ मेगावॉट वीजनिर्मिती


  • अजिंक्य वाघमारे,
    दुर्गापूर (चंद्रपूर)- राज्यातील सहा महाऔष्णिक वीज केंद्रातून चार हजार २४ मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. परळी वीज केंद्र पाण्याअभावी गत एक वर्षापासून बंद आहे. याशिवाय अन्य कोणत्याही वीज केंद्राची पाण्याअभावी वीज निर्मिती प्रभावित झाली नसून सर्व वीज केंद्रांच्या जलाशयात जून अखेरपर्यंत पुरेल एवढा जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याअभावी वीज निर्मिती खंडीत होणार नाही. राज्यात महानिर्मितीचे एकूण सात औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहेत. प्रत्येक वीज निर्मिती केंद्राचे स्वतंत्र धरण व जलाशय आहे. वीज केंद्राला वर्षभर पुरेल एवढा पाण्याचा साठा साठवून ठेवण्याची या धरण व जलाशयांची क्षमता आहे. यंदा पाण्याच्या टंचाईमुळे वीज निर्मिती प्रभावित होईल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र परळी वीज केंद्र वगळता कोणत्याच वीज केंद्रावर जलसंकट ओढवले नाही. चंद्रपूर, नाशिक, खापरखेडा, पारस, भुसावळ या महाऔष्णिक वीज केंद्रात सुरळीत वीज निर्मिती सुरू आहे. कोराडी वीज केंद्रात चार संचापैकी केवळ एकाच संचातून वीज निर्मिती सुरू आहे. परळी वीज केंद्र पाण्याअभावी बंद आहे.
=============================================

किल्ले रायगडवर ‘शिवशाही’


  • मुंबई : हिंदवी स्वराज्याची राजधानी ‘किल्ले रायगड’ येथे १७ व १८ जूनला तिथीनुसार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार असून, यावेळी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा शिवशाही अवतरणार आहे. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने हा सोहळा दरवर्षीप्रमाणे शिवकालीन इतमामात व विधीप्रमाणे साजरा होईल.
    १९९५ सालापासून ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी तिथीप्रमाणे होत असलेल्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तसेच राज्याबाहेरीलही हजारो शिवभक्तांचा सळसळता उत्साह यावेळी अनुभवायला मिळतो. या दोनदिवसीय सोहळ्याची सुरुवात ज्येष्ठ शुध्द द्वादशीला (१७ जून) शिर्काई देवीच्या पूजनाने होईल. याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीही साजरी करण्यात येणार असून, त्यानंतर गणेशपूजन व जगदीश्वर पूजन कार्यक्रम पार पडतील.
=============================================

विसापूरच्या गुप्त दरवाजाने घेतला मोकळा श्वास!


  • अजय महाडिक,
    मुंबई- शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील शेकडो गडकोटांची दुरवस्था सुरू असताना सह्याद्रीचे शिलेदार संघाच्या तब्बल ५० शिलेदारांनी मुंबईहून पुण्याला जाताना लोणावळा सोडले की, लागणाऱ्या विसापूरच्या किल्ल्याचे मातीमध्ये गाडले गेलेले दोन प्रवेशद्वार मोकळे केले. विशेष म्हणजे मुंबई, खोपोली आणि पुणे येथील अस्सल चारकमानी असताना स्वत:चे बिझी शेड्युल बाजूला ठेवून त्यांनी किल्ले संवर्धनाची ही मोहीम पार पाडली आहे. या संघामध्ये तीन वर्षांच्या मुलांपासून ६५ वर्षांच्या काकांचाही समावेश आहे. जानेवारी ते फेब्रुवारी २०१६ या काळात सलग येणारे सात रविवार त्यांनी या किल्ले संवर्धनासाठी खर्र्च केले आहेत.
    आतापर्यंत या संघाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर २८ वेळा स्वच्छता मोहीम राबवली आहे. डिसेंबर २०१५ मध्ये केलेल्या विसापूरच्या सर्वेक्षणात त्यांना किल्ल्याचे दोन दरवाजे जवळपास आठ ते दहा फूट मातीमध्ये गाडले गेल्याचे आढळून आले. गत शंभर-सव्वाशे वर्षांत ही दुर्गती झाल्याचे अविनाश निंबाळकरे यांनी सांगितले. मग काय, या मंडळीने एकमेकांना संपर्क साधून ‘मिशन विसापूर’ मोहीम आखली. ८ जानेवारी २०१६ चा मुहूर्त ठरला. कुणी माळवली रेल्वे स्थानकावर उतरून तर कुणी आपल्या खासगी वाहनाने भाजे गावात पोहोचले. कारण, येथे आल्याशिवाय लोहगड व त्याच्या पाठी लपलेल्या विसापूरच्या किल्ल्याचे दर्शन होत नाही. लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण करण्यासाठीच या किल्ल्याची निर्मिती केली गेली.
=============================================

बलात्कार पीडितेचे नाव जाहीर करू नये- हायकोर्ट


  • नवी दिल्ली : न्यायाधीशांनी निर्णय देताना बलात्कारपीडितेचे नाव जाहीर करू नये. बलात्कारपीडिता आणि तिच्या कुटुंबीयांची प्रतिष्ठा राखण्यासाठी नामोल्लेख टाळला जावा, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
    विनयभंगाच्या प्रकरणात न्याय दंडाधिकारी, जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी पीडितेच्या नावाचा उल्लेख केल्याबद्दल न्या.एस. पी. गर्ग यांनी हा आदेश दिला. २१ आॅक्टोबर २०१३ रोजी कनिष्ठ न्यायालयाने निर्णयात पीडितेच्या नावाचा उल्लेख केला होता. कनिष्ठ न्यायालयाकडून तशी अपेक्षा करता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
    जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनीही हीच चूक केली आहे. संबंधितांची प्रतिष्ठा राखण्यासाठी न्यायाधीशांनी पीडितांच्या नावाचा उल्लेख टाळायला हवा.
    विनयभंगाच्या प्रकरणी कलम ३५४ नुसार खटला दाखल करण्यात आल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला आरोपीने जिल्हा आणि सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. या न्यायालयाने जुलै २०१४ रोजी दिलेल्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी आरोपीने उच्च न्यायालयासमक्ष ठेवलेली फेरविचार याचिका न्या. गर्ग यांनी खारीज केली. 
=============================================

बांगलादेशात हिंसाचारात १२ ठार, २०० जखमी


  • ढाका : बांगलादेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शनिवारी दोन उमेदवारांसह १२ जण ठार, तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले. निवडणुकीत एवढा हिंसाचार प्रथमच झाला आहे.
    जमालपूर चित्तगाँग, नोआखली, कोमिला, पंचगढ आणि नारायणगंज येथे माणसे मरण पावली. जखमींपैकी बुहतेक जण हे बंदुकीच्या गोळ्या लागलेले आहेत. देशात ४५ जिल्ह्यांतील ७१७ परिषदांच्या निवडणुकांत उमेदवारांचे पाठीराखे यांच्यात हिंसाचार झाला. या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून १०० पेक्षा जास्त जण ठार झाले आहेत.
=============================================

७00 शरणार्थींचा बोटी बुडून मृत्यू


  • पोझ्झॅलो (इटली) : स्थलांतरांना अवैधरीत्या आणणारी काही जहाजे भूमध्य सागरात बुडाल्याने वा फुटल्याने किमान ७00 जण मरण पावल्याची भीती संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थीविषयक विभागाने (यूएनएचसीआर) व्यक्त केली आहे. हे प्रकार गेल्या काही दिवसांत घडले असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. हे सारे शरणार्थी स्मगलिंगच्या बोटी वा जहाजांतून युरोपात येण्याच्या प्रयत्नात होते.
    बुधवारी शरणार्थींना आणणारी एक बोट बुडाल्याने १00 जण बेपत्ता झाले असून, ते मरण पावल्याची शंका आहे. इटलीच्या नौदलाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. बोट बुडत असल्याची छायाचित्रे नौदलाने टिपली असून, त्यातून हा प्रकार समोर आला आहे.
    लिबियाच्या साब्रता बंदराहून स्थलांतरितांना युरोपकडे घेऊन येणारी एक बोट गुरुवारी सकाळी भूमध्य सागरात बुडाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील ५५0 जणांचाही पत्ता लागला नसून, ते सर्व जण बुडून मरण पावले असावेत, अशी शंका आहे.
=============================================

१९८४ मध्येच दिल्ली झाली असती खाक; पाकच्या अणुशास्‍त्रज्ञ्यांचा गौप्यस्फोट


  • ऑनलाइन लोकमत
    इस्लमाबाद, दि. २९ : १९८४ मध्‍ये पाकिस्‍तान सरकारने एका आण्विक चाचणीला मंजुरी दिली असती तर पाकिस्‍तानातील कहुटा येथून अवघ्‍या पाच मिनिटांत दिल्‍लीला नेस्‍तनाबुत करता आले असते, असा गौप्‍यस्‍फोट आण्विक तंत्रज्ञानाची तस्‍करी केल्‍याचा आरोप असलेले पाकिस्‍तानचे माजी अणुशास्‍त्रज्ञ डॉ. अब्दुल कादिर खान यांनी एका कार्यक्रमात केला. अणुऊर्जेसंदर्भात शनिवारी सायंकाळी पाकिस्‍तानात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यौम-ए-तकबीर नावाचा हा कार्यक्रम होता. 
    १९८४ सालीच देश भारतावर अणू हल्ला करण्यास समर्थ होता. त्याची योजनाही तयार करण्यात आली होती. मात्र, तत्कालीन अध्यक्ष जनरल झिया उल हक यांनी त्याला विरोध केला. कारण त्यामुळे आंतरराष्ट्रीय मदत रोखली जाण्याची भीती होती. अफगाणिस्तानवर सोव्हिएत संघाचा कब्जा होता. त्यामुळे हे अर्थसहाय्य पाकिस्तानला मिळत होते असेही पाकिस्‍तानचे वादग्रस्त अणुशास्‍त्रज्ञ खान म्हणाले. 
    अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये अनेक प्रकारची जोखिम पत्करुन आपण अण्वस्त्राचा विकास केल्याचा दावा त्यांनी केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे खान यांच्यावर अणु गुपिते विकल्याचा आरोप आहे. त्यामध्ये त्यांना नजरबंदीचाही अनुभव घ्यावा लागलेला आहे.
=============================================
कॅनडात खलिस्तानी दहशतवाद्यांचा प्रशिक्षण तळ

चंडीगड- पंजाबमध्ये हल्ल्याच्या तयारीसाठी काही खलिस्तानी दहशतवादी ब्रिटीश कोलंबियामधील मिशन शहराजवळ अतिरेकी प्रशिक्षण तळ चालवत असल्याचे सांगत भारतीय गुप्तचर संस्थांनी कॅनडा सरकारला सावधानतेचा इशारा दिला अहे.  

पंजाब गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. कॅनेडीयन शीख हरदीप निज्जर याने खलिस्तान टेरर फोर्स (KTF) या दहशतवादी गटाची सूत्रे हाती घेतली असून, तो दहशतवादी कारवायांचा प्रमुख बनला आहे. भारतात हल्ला घडवून आणण्यासाठी निज्जर याने शीख तरुणांचा एका खास गट तयार केला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. 

निज्जरचे प्रत्यार्पण करण्यात यावे यासाठी पंजाब सरकारने त्याबाबतचा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे दिला आहे. या अहवालानुसार निज्जरने पाकिस्तानमधून हत्यारे आणण्याची सोय करणार होता. पण पठाणकोट हल्ल्यानंतर सीमेवरील सुरक्षा वाढविण्यात आल्यामुळे त्याचा हा डाव प्रत्यक्षात येऊ शकला नाही. 
निज्जर याच्याकडे कॅनेडीयन पासपोर्ट असून तो 1995 पासून तेथील सरे भागात राहत आहे. पंजाबमध्ये त्याला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. लुधियानातील शिंगार चित्रपटगृहात झालेल्या बाँबस्फोट प्रकरणी तो पंजाब पोलिसांना हवा आहे. त्या स्फोटात सहाजण मृत्युमुखी पडले होते. 

=============================================
सेन्सेक्समध्ये 100 अंशांची वाढ

मुंबई - मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आज (सोमवार) सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये 100 अंशांनी वधारला असून, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 8200 अंशांची महत्त्वपूर्ण पातळी गाठली आहे. मेटल कंपन्यांच्या शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला अधिक चालना मिळाली आहे. 

सध्या (सोमवार, 9 वाजून 45 मिनिटे) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 118.20 अंशांनी वधारुन 26,771.80 अंशांवर व्यवहार करत आहे. निफ्टीदेखील 8,193.05 अंशांवर व्यवहार करत असून 36.40 अंशांनी वधारला आहे. एफएमसीजी आणि कॅपिटल गूड्स क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर तेजीत आहेत. एफएमसीजी व कॅपिटल गूड्स क्षेत्रातदेखील किरकोळ घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसांत जाहीर झालेल्या तिमाही निकालांचा आज शेअर बाजारावर परिणाम दिसून येत आहे.

हिंडाल्को इंडस्ट्रीजच्या तिमाही नफ्यात यंदा तब्बल 123 टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीला सुमारे 356 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्यामुळे निफ्टीवर हिंडाल्कोचा शेअर सर्वाधिक तेजीत आहे. शिवाय, कोल इंडिया, एसबीआय, टाटा मोटर्स आणि अरबिंदो फार्माचे शेअरदेखील तेजीत आहेत. दुसरीकडे, भेल, आयटीसी, एचडीएफसी, झी एन्टरटेनमेंट व एल अँड टीच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.
=============================================
तन्मयला रस्त्यावर फिरू देणार नाही - मनसे
-

मुंबई - भारतरत्नाचे मानकरी असणारे लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांची व्हिडिओद्वारे नक्कल करत त्यांच्यावर अश्लील आणि खालच्या पातळीचे विनोद केल्याबद्दल ‘एआयबी‘च्या तन्मय भट्टला आता सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून खडेबोल ऐकावे लागत आहेत. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तन्मय विरुद्ध पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगत त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असेही म्हटले आहे.

मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले, "भारताच्या अशा दिग्गज ज्यांचा आम्हाला अभिमान आहे, अशा व्यक्तींवर तन्मयने खूप खालच्या पातळीचे विनोद करून त्यांचा अपमान केला आहे. आम्ही शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तन्मयविरुद्ध तक्रार करणार आहोत. अशा लोकांना कधीच माफ केले जाऊ शकत नाही व तन्मय भट्ट रस्त्यावर दिसल्यास त्याला त्याच्या कृत्याचा परिणाम दिसेल." 
=============================================
मेघालयदेखील आता रेल्वेच्या नकाशावर

गुवाहाटी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गुवाहाटी येथील पूर्वोत्तर सीमावर्ती रेल्वेच्या स्टेडीयमवरून मेंडीपत्थर (मेघालय) ते गुवाहाटी या पहिल्या प्रवासी गाडीला हिरवा कंदील दाखवत मेघालय राज्य रेल्वेद्वारे उर्वरित देशाला जोडले.

पंतप्रधानांनी या रेल्वेबरोबरच मिझोरममधील भैरबी ते सैरांग दरम्यानच्या नव्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाची कोनशीला स्थापन केली. देशाच्या पूर्वोत्तर भागाचा विकास ही आपल्या सरकारची प्राथमिकता असल्याचे पंतप्रधानांनी या वेळी सांगितले. या वेळी आसाम, मेघालय आणि मिझोरम या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

देशाच्या पूर्वोत्तर भागात पायाभूत सोयी-सुविधांच्या वेगवान विकासाची निकड असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, या भागाची जितकी जास्त प्रगती होईल तितक्याच वेगाने देशही प्रगतीपथावर जाईल. देशाच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भागांत प्रत्येकी एक रेल्वे विश्वविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. देशाच्या विकासात रेल्वेचा सिंहाचा वाटा असेल केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वे वेगाने प्रगती करेल.
=============================================
जलपुनर्भरणाचा परदेशी प्रयोग चक्क गावात..!

वडूज - पाश्‍चिमात्य देशात कृत्रिमरीत्या पाण्याच्या संवर्धनाचा (आर्टिफिशियल अंडर ग्राउंड वॉटर रिचार्ज) होणारा अनोखा प्रयोग चक्क छोट्याशा खेडेगावात होत आहे. विश्वास नाही ना बसत.. पण भुरकवडी (ता. खटाव) येथील युवा अभियंत्याने ही अनोखी किमया साकारली आहे. विशेषत: अत्यल्प खर्चात होणाऱ्या या प्रयोगामुळे कूपनलिकेत किमान दहा ते पंधरा लाख लिटर पाणीसाठा होण्याबरोबरच परिसरातील अनेक कूपनलिकांना त्याचा मोठा फायदाही होणार आहे. भूरकवडी जन्मभूमी असणाऱ्या व सध्या नेदरलॅंड येथे राहणाऱ्या विनोद कदम असे या युवा अभियंत्याचे नाव आहे.

विनोद हे नेदरलॅंडमध्ये जॉर्ड ऑइल ऍण्ड गॅस सिस्टिम्स या कंपनीत पाईपिंग इंजिनिअर पदावर कार्यरत आहेत. कंपनीच्या कामकाजानिमित्ताने त्यांचे भारतासह युरोप, चीन, सिंगापूर, जॉर्डन आदी देशांत गेली काही वर्षे वास्तव्य राहिले आहे. पाश्‍चिमात्य देशांतील पाणीबचत, त्यासाठी होणारे विविध प्रयोग, त्यांनी जवळून पाहिले, त्यांचा अभ्यास केला. त्यामुळे आपल्या मातृभूमीतही पाणी बचतीचे असा प्रयोग करण्याचे त्यांनी ठरविले. मात्र, कामकाजानिमित्त सतत परदेशात असणाऱ्या विनोद यांचे भुरकवडी गावी लवकर येणे होत नव्हते. अधूनमधून कुटुंबीय व मित्रांशी भ्रमणध्वनीवरून आपल्या भागाची माहिती ते घेत असतात. त्यातच यंदा तालुक्‍यासह सर्वत्रच निर्माण झालेल्या प्रचंड चारा, पाणी टंचाईच्या समस्येने ते व्यथित झाले होते. सध्या ते सिंगापूर येथे आहेत. सध्या तालुक्‍यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईची समस्याही त्यांना समजली. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी जलपुनर्भरणाचा प्रयोग करण्यासाठी त्यांनी थेट सिंगापूरहून भुरकवडीकडे धाव घेतली. त्यांनी याबाबत सध्या दिल्लीस्थित असलेले त्यांचे अभियंता मित्र रूपेश रसाळ पांढरवाडी (ता. माण), दत्तात्रय पाटील (विहे) यांना कल्पना दिली. 
=============================================
कॉंग्रेसने तिकीट नाकारलेले दर्डा गडकरींच्या भेटीस

नागपूर - कॉंग्रेसने राज्यसभेचे तिकीट नाकारल्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे मावळते खासदार विजय दर्डा यांनी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

कॉंग्रेसने उमेदवारी नाकारली असली, तरी राज्यसभेत कोणत्याही परिस्थितीत जाण्यास दर्डा इच्छुक आहेत. हे या भेटीतून अधोरेखित झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. देशभर गाजलेल्या कोळसा घोटाळ्यात दर्डा हे आरोपी आहेत. अशा परिस्थितीत भाजप त्यांना सामावून घेऊ शकेल काय, असा प्रश्‍नही उपस्थित झाला आहे.
खासदार विजय दर्डा यांच्या खासदारकीची मुदत संपणार असून, पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे दर्डांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्‍वभूमीवर दर्डांनी गडकरींची भेट घेतल्यामुळे ते भाजपच्या तिकिटासाठी प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. 


=============================================
तेरवीचा खर्च दिला मंदिर बांधकामाला

धामणगावरेल्वे - येथील राठी नगरातील दीपक राऊत व दत्तापुरातील नंदलाल कनोज यांनी आजच्या गतिमान जीवनातही सेवा व भक्तिभाव जोपासून समाजप्रबोधनपर कार्य केले आहे. राऊत यांनी वडिलांची, तर कनोज यांनी मुलाची तेरवी न करता प्रत्येकी 51 हजार रुपयांची रक्कम श्रीविहार कॉलनीतील श्रीसाई मंदिराच्या बांधकामासाठी देणगी स्वरूपात दिली. या दोन्ही कुटुंबीयांनी समाजासमोर आदर्श निर्माण केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

श्रीविहार कॉलनीतील श्रीसाई सेवा प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे साईमंदिराचे बांधकाम सुरू आहे. या सत्कार्याला सढळ हातांनी मदत व्हावी या उदात्त हेतूने दीपक राऊत यांनी वडील रामदास राऊत यांची तेरवी न करता ती रक्कम मंदिर बांधकामासाठी दिली. तसेच नंदलाल कनोज यांचा मुलगा कृष्णा कनोज याचे नुकतेच आजाराने निधन झाले. त्यांनी आपल्या मुलाची तेरवी न करता 15 हजार रुपये याच मंदिराच्या बांधकामासाठी देणगी स्वरूपात दिली.
राऊत व कनोज यांनी हे सामाजिक कार्य केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. श्रीसाई सेवा प्रतिष्ठानने त्यांच्या या पुढाकाराबद्दल आभार मानले. 

=============================================
मुल्ला मन्सूरवरील हल्ला; अमेरिकेविरोधात तक्रार
-

इस्लामाबाद : तालिबानचा म्होरक्‍या मुल्ला अख्तर मन्सूर याच्यावर झालेल्या हवाई हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमधील बलुचिस्तान येथील अधिकाऱ्यांनी अज्ञात अमेरिकी अधिकाऱ्यांविरोधात काल (रविवार) तक्रार दाखल केली आहे. अमेरिकेने 21 मे रोजी केलेल्या हवाई हल्ल्यात मुल्ला मन्सूर ठार झाला होता. यावेळी त्या टॅक्‍सीचा चालकही ठार झाला.

या प्रकरणी त्या चालकाच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये कोणत्याही अमेरिकी अधिकाऱ्याचे नाव नाही; मात्र ‘काही अमेरिकी अधिकाऱ्यांनी जाहीररित्या या हल्ल्याची कबुली दिली आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,‘ अशी मागणीही करण्यात आली आहे. ‘माझ्या भावाचे कोणत्याही दहशतवाद्याशी संबंध नव्हते. तो एक गरीब आणि निष्पाप नागरिक होता. त्याला चार मुले आहेत आणि त्याच्या कुटुंबात तो एकटाच कमावता होता. अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसखोरी करून माझा भाऊ आणि आणखी एका इसमाला ठार केले. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,‘ असे तक्रारकर्त्याने म्हटले आहे.
=============================================
'इसिस'ला आता इराकमधूनही घेरणार

बगदाद : कट्टर दहशतवादी संघटना ‘इसिस‘च्या नाड्या सीरिया आणि इराक अशा दोन्ही बाजूंनी आवळण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांच्या फौजांनी पावले उचलली आहेत. ‘इसिस‘चा महत्त्वाचा तळ मानल्या जाणाऱ्या फलुजा येथे हल्ला करण्यासाठी इराकी लष्कराच्या विशेष तुकड्या कालपासून (रविवार) सज्ज आहेत. सीरियामधूनही अमेरिकी लष्कराच्या मदतीने कुर्दिश बंडखोर आणि सीरियन लष्कराने आगेकूच करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

नव्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर या भागात उरलेल्या नागरिकांनीही स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे. ‘इसिस‘च्या ताब्यातील प्रदेशात अजूनही असंख्य नागरिक अडकले आहेत. फलुजा येथे हल्ला करण्याच्या दृष्टीने इराकी फौजांनी गेल्या आठवड्यापासून प्रयत्न सुरू केले आहेत. ‘इसिस‘चा हा तळ बगदादपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर आहे. ‘आम्ही तुम्हाला अचूक वेळ सांगणार नाही; पण फलुजावर आता लवकरच हल्ला केला जाईल,‘ अशी माहिती या कारवाईमध्ये सहभागी असलेल्या एका तुकडीचे प्रमुख हदी अल अमेरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिली.
=============================================

No comments: