================================================
प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर कुऱ्हाडीने हल्ला
सातारा : सैराटमधील रक्ताळलेल्या ठशांनी मनावर खोल जखम केली, ज्यावर खपली धरण्याआधी साताऱ्यात ‘सैराट’शी साम्य असणारी घटना घडली आहे. प्रेमविवाह केल्याने दाम्पत्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून पती-पत्नीही दोघेही बचावले. तसंच दोन वर्षांचा मुलगा शेजारी गेल्याने तो सुखरुप आहे.
गजवडी गावातील विनायक कदम आणि उषा यांचा प्रेमविवाह झाला होता. कुटुंबीय आणि नातेवाईक यांचा विरोध झुगारुन त्यांनी चार वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केलं होतं आणि साताऱ्याबाहेर राहत होते. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.
यात्रेनिमित्त हे पती-पत्नी गावात आले होते. याची माहिती मिळल्यानंतर उषा यांच्या नातेवाईकांनी कुऱ्हाड आणि दांड्यांसह विनायक कदम यांच्या घरावर हल्ला केला.
मुलीचे कुटुंबीय येत असल्याचं समजताच त्यांनी घराचा पुढचा दरवाजा आतून लावला. परंतु हल्लेखोरांनी मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि विनायक-उषा यांच्यासह घरातील सगळ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सुदैवाने हे दाम्पत्यांने तिथून कसाबसा शेताच्या दिशेने पळ काढला. मात्र हल्लेखोरांनी विनायकच्या कुटुंबीयांवर कुऱ्हाडीने वार करुन त्यांना जखमी केलं.
महत्त्वाची बाब म्हणजे आजीने दोन वर्षांच्या मुलाला बाहेर नेलं होतं, म्हणून त्याचा जीव वाचला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस तिथे दाखल झाले आणि पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. शंकर कदम, अश्विन कदम, दिनकर कदम, नामदेव कदम, लता कदम, अनिता कदम अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. तर यातील एक जण फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
या घटनेनंतर गजवडी भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
================================================
येत्या 3 ते 4 दिवसात मान्सून अंदमानात
पुणे : उन्हाच्या काहिलीने बेजार झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांत बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भाग, निकोबार द्वीपसमूह आणि दक्षिण अंदमान बेटांवर मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक असेलला कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात निर्माण झालं. आहे. त्यामुळे 16 ते 17 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनीतादेवी यांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात वळवाचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे मान्सून भारतात कधी दाखल होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
================================================
निरंकारी पंथाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांचं अपघाती निधन
मॉन्ट्रियल (कॅनडा) : निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांचं अपघाती निधन झालं आहे. कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरात एका कार्यक्रमासाठी जात असताना हरदेव सिंह यांच्या कारचा अपघात झाल्याने त्यांचं निधन झाल्याचं कळतंय. ते 62 वर्षांचे होते.
देशासह जगभरात निरंकारी पंथाची महती पोहोचवण्यात बाबा हरदेव सिंह यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
बाबा हरदेव सिंह यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1954 रोजी त्यांचा दिल्लीत त्यांचा जन्म झाला. हरदेव सिंह यांच्या वडिलांच्या हत्येनंतर 1980 मध्ये हरदेव सिंह निरंकारी संप्रदायाचे सर्वेसर्वा झाले.
बाबा बटू सिंह यांनी 1929 मध्ये संत निरंकारी मंडळाची स्थापना केली होती. जगभरातील 27 देशांमध्ये सध्या हरदेव सिंह यांच्या निरंकारी पंथानच्या 100 हून अधिक शाखा आहेत. त्यांच्या अपघाती जाण्याने जगभरातील त्यांच्या अनुयायांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
================================================
'सैराट'च्या 'आर्ची-परशा' प्रमाणे 'रवी-मनिषा'चा अंत
शहापूर : राज्यात सध्या नागराज मंजुळेच्या ‘सैराटने धुमाकूळ घातला आहे. चित्रपटातील आर्ची आणि परशाची प्रेमकहाणी सगळ्यांना आवडत आहे. मात्र शेवट पाहून अनेकांना धक्का बसला. परंतु याच ‘सैराट’ची पुनरावृत्ती शहापूर तालुक्यातील कोळीपाडा इथे झाली. कोळीपाडा इथल्या घनदाट जंगलात गावातील तरुण-तरुणीचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली आहे.
कोळीपाडा येथील तरुण रवी हेमा काळचीडा आणि तरुणी मनीषा सोमा पोकळा हे 18 एप्रिलपासून बेपत्ता होते. नातेवाईकची त्याचा शोध घेत होते. मात्र आज सकाळी कोळीपाडा इथल्या जंगलात दोन मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्याचं गावकऱ्यांनी किन्हवली पोलिसांना कळवलं. अधिक तपास केला असता हे मृतदेह रवी आणि मनीषा यांचेच असल्याची खात्री पटली.
मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने शेंद्रून प्राथमिक केंद्राच्या डॉक्टरांना बोलावून घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आलं. किन्हवली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
संबंधित घटना ‘सैराट’शी साधर्म्य साधणारी आहे. परंतु आपल्या मुलाचा खून झाला असून, संशयितांची नावं सांगूनही स्थानिक पोलिस दुर्लक्ष करत आहे, असा आरोप रवीच्या आई-वडिलांनी केला आहे.
तर या प्रकरणाचा तपास सुरु असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील तपासाला वेग येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
================================================
महिला पत्रकार, पोलीस निरीक्षक आणि लिव्ह-इन-रिलेशनशिपचं विकृत रुप
नवी दिल्ली : पूजा तिवारी…. एक अशी शोध पत्रकार, जी आता या जगात नाहीय. पूजाची आत्महत्या की हत्या, हेही अद्याप उलगडलं नाही आणि याचदरम्यान पूजासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पोलीस निरीक्षक अमितची विकृती समोर आली आहे. पूजाला जिवंतपणी मरणयातना देणाऱ्या अमितचे कारनामे ऐकल्यावर मन सुन्न होऊन जातं.
पूजाची आत्महत्या की हत्या?….सध्यातरी हे एक रहस्यच बनून आहे. प्रेमातील धोका होता की शत्रूंचं कट? अखेर महिला पत्रकार पूजा तिवारीचा मारेकरी कोण आहे? अजूनही हे सत्य अंधारातच चाचपडत आहे. पूजाच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलिसांनी तिचा लिव्ह इन रिलेशनशिप पार्टनर पोलीस निरीक्षक अमित याला ताब्यात घेतलं आहे.
पूजाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप अमितवर आहे. अमितवरील या आरोपांचे पुरावे ‘एबीपी न्यूज’च्या हाती लागले आहेत. या पुराव्यांवरुन अमितच्या विकृतीचं दर्शन होतं. पूजाने जिवंतपणी अनुभवलेलं अत्यंत भयानक आयुष्य यातून समोर येतं.
================================================
दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच : भारताचा दावा भक्कम करणारं स्टिंग ऑपरेशन
नवी दिल्ली : भारताचा मोस्ट वॉन्टेड आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिम पाकिस्तानाच वास्तव्याला असल्याचं एका भारतीय न्यूज चॅनेलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनने उघड केलंय. भारतीय गुप्तचर संस्थांनी अनेकदा दाऊदच्या पाकिस्तानातील वास्तव्याचा पत्ता दिल्यानंतरही पाकिस्तानने सरकारने ते मान्य केलेलं नाही. पाकिस्तान सरकार सातत्याने दाऊद पाकिस्तानात नसल्याचंच कंठरवाने सांगत आला आहे. मात्र आता सीएनएन न्यूज 18 या न्यूज चॅनेलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनने पाकिस्तानची पोल खोलली आहे.
डी 13, ब्लॉक 4, क्लिफ्टन, कराची हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पाकिस्तानातील पत्ता आहे. हाच पत्ता भारत सरकारकडून अनेकदा पाकिस्तानला पाठवण्यात आला आहे. मात्र पाकिस्तान भारत सरकारचा दावा मान्य करण्यास तयारच नाही.
सीएनएन न्यूज 18 या न्यूज चॅनेलने दाऊदच्या बंगल्याचा गार्ड आणि या परिसरातील अन्य स्थानिक यांच्याशीही चर्चा केली. दाऊद इब्राहिम कराचीमध्येच वर दिलेल्या पत्त्यावर राहात असल्याचं जवळपास सर्वांनाच माहिती आहे.
दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच असल्याचा भारत सरकारचा दावा या स्टिंग ऑपरेशननंतर अधिक बळकट झाला आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बब्लास्टच्या कटाचा सुत्रधार म्हणून दाऊद इब्राहिम भारताला हवा आहे.
सीएनएन-न्यूज 18 च्या स्टिंग ऑपरेशनमुळे दाऊद पाकिस्तानाच असल्याच्या भारताच्या दाव्याला भक्कम केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितलं.
सीएनएन न्यूज 18 च्या स्टिंग ऑपरेशननुसार, दाऊदच्या घराशेजारीच एक क्रिकेट स्टेडियम असून दुसऱ्या बाजूला क्लिफ्टन मार्की हा या परिसरातील प्रसिद्ध असा वेडिंग आणि बॅन्क्वेट हॉल आहे. दाऊद वास्तव्याला असलेल्या घराच्या कपांऊंडच्या भिंतीची उंची ही जवळपास तीन मीटर उंच असून तिथे खाजगी सुरक्षा रक्षकांचा 24 तास पहारा असतो
================================================
लातूरला पाणी पोहोचवण्याचे बिल आकारणार नाही - सुरेश प्रभू
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १३ - दुष्काळग्रस्त लातूरला रेल्वेने पाणी पोहोचवण्यासाठी आकारण्यात आलेले बिल मागे घेणार असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. मिरजेतून लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी रेल्वेने चार कोटी रुपयांचे बिल आकारले होते. ४ मे पर्यंतचे २ कोटी ४ लाखांचे बिल तात्काळ अदा करावे, असे पत्र सोलापूर मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले होते.'जलपरी'च्या माध्यमातून आतापर्यंत रेल्वेने ६ कोटी २० लाख लिटर पाणी लातूरला पोहोचवले आहे. पाण्यासाठी बिल आकारण्याच्या रेल्वेच्या निर्णयावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी आता बिल मागे घेणार असल्याचे जाहीर केले आहे.लातूरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर तातडीचा उपाय म्हणून १२ एप्रिलपासून दररोज मिरजेहून ५० रेल्वे वॅगनद्वारे २५ लाख लिटर पाणी पुरवले जात आहे. १२ मे पर्यंत ६ कोटी २० लाख लिटर पाणी आणण्यात आले आहे. यासाठी रेल्वेला दररोज १२.५० लाख रुपये खर्च येत आहे. मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात या खर्चाचा उल्लेख आहे.
================================================
उदयने लग्नाचा निर्णय बदलला, नर्गिसला नैराश्याचा झटका
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १३ - अभिनेत्री नर्गिस फाखरी आणि उदय चोप्रा यांनी परस्परांच्या प्रेमात असल्याची कधीही जाहीरपणे कबुली दिली नसली तरी, त्यांच्यामध्ये प्रेमाचा अंकुर फुलला होता. माध्यमांची नजर चुकवून सुरु असलेले हे प्रेमसंबंध आता संपुष्टात आल्याची चर्चा आहे. उदय आणि नर्गिसचे नाते इतके ताणले गेले की, नर्गिसला यामुळे नैराश्याचा झटका आला होता असे वृत्त आहे.'अझर' सिनेमामुळे पुन्हा एकदा नर्गिस चर्चेत आली आहे. 'अझर'मध्ये तिने संगीता बिजलानीची भूमिका केली आहे. डीएनच्या वृत्तानुसार उदय चोप्रा नर्गिस बरोबर विवाह करण्यासाठी अत्यंत गंभीर होता. पण त्यावेळी नर्गिसला तिच्या करीयवर लक्ष द्याचे होते. वेळेबरोबर नर्गिसचा प्राधान्यक्रम बदलला तिने करीयरपेक्षा आपल्या व्यक्तिगत आयुष्याला प्राधान्य दिले.पण तो पर्यंत उदयचे मन बदलले होते. त्याने नर्गिसशी लग्न करण्याचा आपला निर्णय बदलला. नर्गिसला उदयच्या या वागण्याचा इतका त्रास झाला की, तिला नैराश्याचा झटका आला होता.
================================================
व्हॉट्स अॅप वेबही झालं अपडेट
- गेल्या वर्षी लाँच झालेलं व्हॉट्स अॅप वेबही आता अपडेट झालं असून डॉक्युमेंट शेअर करण्याचा पर्याय आता समाविष्ट झाला आहे. त्यामुळे आता डेस्कटॉपवर व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी असून आता त्यांना वर्ड फाइल्स, पीडीएफ व अन्य फॉरमॅटमधल्या फाइल्स शेअर करता येणार आहेत.काही महिन्यांपूर्वी व्हॉट्स अॅपनं मोबाइल अॅपसाटी ही सेवा सुरू केली होती आता, ती वेबसाठीही उपलब्ध झाली आहे. उजव्या वरच्या कोपऱ्यामध्ये असलेल्या अटॅचमेंट आयकॉनमध्ये फोटो, व्हिडीयो व कॅमेरा शॉट्सखाली हा डॉक्युमेंटचा पर्याय देण्यात आला आहे.ही सुविधा वापरण्यासाठी व्हॉट्स अॅपचं लेटेस्ट व्हर्जन अपडेट करणं आवश्यक आहे.काही दिवसांपूर्वीच व्हॉट्स अॅपनं डेस्क टॉप अॅपदेखील दाखल केलं असून व्हॉट्स अॅप वेबप्रमाणेच कनेक्टेड मोबाईलचं संभाषण घडवतं. हे अॅप विंडोज 8 आणि मॅक ओएस एक्स 10.9 व त्यानंतरच्या व्हर्जनसाठी उपयुक्त आहे.
================================================
पॉण्डेचरी- राज्यात 16 मे रोजी विधानसभा निवडणूक होत असून, कॉंग्रेसने आज (शुक्रवार) आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला. प्रत्येक घरातील एकाला नोकरी व स्थानिक निवडणुकांत महिलांना 50 टक्के आरक्षण देणार असल्याचे कॉंग्रेसने आश्वासन दिले आहे.
पॉण्डेचरची प्रदेशाध्यक्ष ए. नमशिवायम यांनी स्थानिक नेत्यांसह पक्षाचा जाहिरनामा प्रसिद्ध केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसने जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. 50 एकर जागेमध्ये आयटी पार्क उभारले जाणार आहे. टीसीएस, सीटीएस, व्हेरीझॉन, एल एण्ड टी व टेक महिंद्रा कंपन्या आपल्या इमारती उभ्या करणार आहेत. यामुळे प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी मिळणार आहे. शिवाय, स्थानिक निवडणूकांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देणार असल्याचे कॉंग्रेसने जाहीरनाम्यात म्हटले आहे.
पॉण्डेचरीत कॉंग्रेस देणार घरातील एकाला नोकरी
| |
-

काश्मीरः 1 कोटीच्या ब्राऊन शुगरसह एकाला अटक
| |
-
| |
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये एक कोटी रुपयांचे ब्राऊन शुगर व दोन लाख रुपयांच्या रोख रकमेसह एकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका नाक्यावर पोलिस वाहनांची तपासणी करत होते. यावेळी विकी कुमार कडे एक बॅग आढळून आली. बॅगेची तपासणी केली असता 1.5 किलो ब्राऊन शुगर आढळून आली. बाजारभावानुसार याची किंमत एक कोटी रुपये होत आहे. शिवाय, 2.20 लाख रुपयांच्या नोटा आढळून आल्या. याप्रकरणी विकी कुमारला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका नाक्यावर पोलिस वाहनांची तपासणी करत होते. यावेळी विकी कुमार कडे एक बॅग आढळून आली. बॅगेची तपासणी केली असता 1.5 किलो ब्राऊन शुगर आढळून आली. बाजारभावानुसार याची किंमत एक कोटी रुपये होत आहे. शिवाय, 2.20 लाख रुपयांच्या नोटा आढळून आल्या. याप्रकरणी विकी कुमारला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
================================================
नवी दिल्ली- सर्जनशीलता, नवे शोध आणि उद्यमशीलतेला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (शुक्रवार) राष्ट्रीय बौद्धिक संपदा अधिकार (IPR) धोरण मंजूर केले. देशातील या संदर्भातील हे पहिले धोरण आहे.
बौद्धिक संपदा अधिकाराचे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक लाभ याविषयी समाजाच्या सर्व घटकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतलेल्या निर्णयांबद्दल पत्रकारांशी बोलताना जेटली यांनी वरील माहिती दिली.
ट्रेडमार्क (व्यापारी चिन्ह) नोंदविण्यासाठी लागणारा कालावधी केवळ एक महिन्याचा करण्यात येईल. 2017 पर्यंत ही कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
जेटली म्हणाले, "सर्व प्रकारच्या बौद्धिक संपदां (IP), संबंधित नियम आणि संस्था यांमध्ये एकसंधता निर्माण करून त्याचा उपयोग करून घेण्यासाठी हे धोरण आखण्यात आले आहे."
हे धोरण ठरविताना सात उद्दिष्टे प्रमुख मानली आहेत. IPR बद्दल जनजागृती करणे, त्याची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देणे, सक्षम व परिणामकारक कायदे करणे, अमंलबजावणी करणे आणि बौद्धिक संपदेची चोरी रोखण्यासाठी यंत्रणा उभारणे अशी या धोरणाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
देशाचे पहिले बौद्धिक संपदा धोरण मंजूर

नवी दिल्ली : देशातील महागाई धोरणकर्त्यांच्या अपेक्षेपेक्षा किंचित जास्त आहे, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे.
ढोबळमानाने, महागाई(कोअर इन्फ्लेशन) आमच्या अपेक्षेपेक्षा किंचित जास्त आहे. त्यात वाढ झालेली नाही किंवा घट झालेली नाही. परंतू त्यात सुधारणेसाठी प्रयत्न सुरु राहतील, असे राजन म्हणाले. ते लंडनमधील शिकागो बूथ बिझनेस स्कूलच्या कार्यक्रमात बोलत होते.
भारताचा विकासदर सध्या वेगाने वाढत आहे. परंतू अद्याप भारताचा पुर्ण विकास झालेला नाही. आगामी मॉन्सूनमुळे विकासाला चालना मिळू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. शिवाय, बँकिंग क्षेत्राविषयी बोलताना ते म्हणाले की दिवाळखोरी कायदा मंजुर झाल्यानंतर बँका अर्थव्यवस्थेला साह्य करण्यास सक्षम बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महागाई दर अपेक्षेपेक्षा जास्त : रघुराम राजन

'बीएसएफ'च्या अधिकाऱ्याची जवानाकडून हत्या
| |
-
| |
वतकारा (केरळ)- सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकाऱ्याची एका जवानाने गोळ्या घालून हत्या केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘राज्यात 16 मे रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सुरक्षेसाठी ‘बीएसएफ‘चे जवान दाखल झाले आहेत. निरीक्षक राम गोपाल मिना (वय 45, रा. राजस्थान) यांच्याकडे उमेश प्रसाद सिंगने सुटी मागितली होती. सुटीवरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी उमेशने रायफलमधून राम यांच्यावर गोळीबार केला. गुरुवारी (ता. 12) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. राम यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. याबाबत पुढील तपास सुरू आहे.‘

नवी दिल्ली - कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी-वद्रा यांच्यामध्ये मी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना पाहात असल्याच्या प्रतिक्रिया उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी व्यक्त केल्या आहेत.
एका वृत्तवाहिनीशी दिलेल्या मुलाखतीत रावत बोलत होते. कॉंग्रेस पक्षासाठी प्रियांकाने मोठी भूमिका बजावल्याचेही रावत म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने उत्तराखंडमध्ये लादलेल्या राष्ट्रपती राजवटीबद्दलही रावत यांनी नाराजी व्यक्त केली. उत्तराखंडने केंद्र सरकारला चांगला धडा दिला असून पुढील वेळी घटनेतील 356 वे कलम लागू करताना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील सरकारने जास्तीत जास्त काळजी घ्यावी, असा सल्लाही दिला. "गेल्या दोन महिन्यात उत्तराखंडमधील नागरिकांनी प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. आता विकासाच्या मार्गाने राज्याला पुढे घेऊन जाण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे‘, असेही रावत पुढे म्हणाले.
प्रियांकामध्ये इंदिरा गांधीना पाहतो- रावत

हिजबुल्लाचा म्होरक्या इस्रायली हल्ल्यात ठार
| |
-
| |
बैरुत- हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुस्तफा बद्रेद्दीन हा इस्राईलच्या एका हवाई हल्ल्यात ठार झाला आहे.
लेबनॉनमधील शियापंथीयांची ही दहशतवादी संघटना असून, लेबनॉन आणि इस्राईल दरम्यानच्या सीमावर्ती भागात बद्रेद्दीन हा ठार झाल्याचे या संघटनेने नुकतेच जाहीरपणे स्पष्ट केले. हिजबुल्लाचा लष्करी प्रमुख असलेल्या बद्रेद्दीनचा खात्मा हा 2008 पासूनचा संघटनेला सर्वांत मोठा धक्का आहे.

लेबनॉनमधील शियापंथीयांची ही दहशतवादी संघटना असून, लेबनॉन आणि इस्राईल दरम्यानच्या सीमावर्ती भागात बद्रेद्दीन हा ठार झाल्याचे या संघटनेने नुकतेच जाहीरपणे स्पष्ट केले. हिजबुल्लाचा लष्करी प्रमुख असलेल्या बद्रेद्दीनचा खात्मा हा 2008 पासूनचा संघटनेला सर्वांत मोठा धक्का आहे.
================================================
बदली टाळण्यासाठी असंख्य कर्मचारी रात्रीत 'अपंग'
| |
-
| |
नाशिक - जिल्हा परिषदेत बदल्यांमुळे मुख्यालयातून उचलबांगडी होऊ नये म्हणून अनेकांनी अचानकपणे अपंगत्वाचा दाखला किंवा संघटनेचे पदाधिकारी असलेले पत्र देऊन बदली टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु, सादर केलेल्या प्रत्येक प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतल्यामुळे संघटनांच्या या कथित पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.
जिल्हा परिषदेत काही ठराविक कर्मचारी व अधिकारी वर्षानुवर्षे मुख्यालयात ठाण मांडून बसतात, तर इतरांना आदिवासी, बिगर आदिवासी क्षेत्रात काम करावे लागते. परंतु ऑनलाइन बदल्यांमुळे पारदर्शकता आल्याने सेवाज्येष्ठता क्रमामुळे विशिष्ट कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. यातूनही मार्ग काढण्यासाठी कर्मचारी संघटनेची पदाधिकारी पदे व अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करण्याची शक्कल काहींनी लढविली. ऐनवेळी प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल व त्यात खोटे प्रमाणपत्र आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा शंभरकर यांनी दिला. संघटनेचे पदाधिकारी असल्याचे पत्र सादर केलेल्यांसंदर्भात संघटनेच्या बैठकीचे प्रोसिडिंग व त्यामध्ये केलेले बदल सादर करण्याचे आदेश शंभरकर यांनी दिल्याचे समजते. यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्येच भांडणे सुरू झाली. अपंगत्वाच्या दाखल्याची पडताळणी सक्षम अधिकाऱ्यांकडून करून घेण्याचे निर्देश दिल्याने त्याची कार्यवाही या बदल्या आटोपताच होईल. खोट्या प्रमाणपत्राबद्दल संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याचेही सूतोवाच शंभरकरांनी केले.
================================================
नवी दिल्ली- अब्रूनुकसानी संदर्भातील कायदा घटनात्मक दृष्ट्या वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) स्पष्ट केले. शिवाय, या कायद्या विरोधात दाखल झालेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.
या कायद्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम होत असल्याचा याचिकाकर्त्यांनी दावा केला होता. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अब्रूनुकसानी संदर्भातील कायद्याच्या तरतुदी रद्द करण्यासाठी याचिका केल्या होत्या. यामुळे या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत.
भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 499 व 500 नुसार एखाद्यावर आरोप करणे चारित्र्यावर शिंतोडे उडवणे हा गुन्हा ठरतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार जपताना समोरच्याची प्रतिष्ठा, आदर राखणे सुद्धा आवश्यक आहे. मात्र, या कायद्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काहीही परिणाम होत नसून, अभिव्यक्त होताना लोकांचा आदर राखणे सुद्धा आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने गांधी, केजरीवाल व स्वामींना बदनामीचे खटले रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले असून, त्यांना आठवडयांचा वेळ दिला आहे.
बदनामी करणे हा गुन्हाच- सर्वोच्च न्यायालय

इस्लामाबाद- अमेरिकेसोबत अत्याधुनिक एफ-16 या लढाऊ विमानाची खरेदी करायची आहे. परंतु, यामध्ये भारतच सर्वांत मोठा अडसर ठरत आहे, असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज यांनी केला आहे.
अझीज म्हणाले, ‘अमेरिकेने आपला निर्णय बदलावा व पाकिस्तानला विमाने विकू नयेत, यासाठी भारतीय लॉबी सतत प्रयत्न करत आहे. भारतामुळेच खरेदी थांबली असून, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कॉंग्रेस नेत्यांपर्यंत आम्हाला पोचता आले नाही. अमेरिका व पाकिस्तानमधील संबंध गेल्या तीन महिन्यांपासून बिघडले आहेत. परंतु, पुढील महिन्यात दोन्ही देशांचे लष्कराचे सल्लागार या विषयावर चर्चा करणार आहेत.‘
एफ-16 घेण्यासाठी भारतच मोठा अडसर- पाक
| |
-
| |
अझीज म्हणाले, ‘अमेरिकेने आपला निर्णय बदलावा व पाकिस्तानला विमाने विकू नयेत, यासाठी भारतीय लॉबी सतत प्रयत्न करत आहे. भारतामुळेच खरेदी थांबली असून, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कॉंग्रेस नेत्यांपर्यंत आम्हाला पोचता आले नाही. अमेरिका व पाकिस्तानमधील संबंध गेल्या तीन महिन्यांपासून बिघडले आहेत. परंतु, पुढील महिन्यात दोन्ही देशांचे लष्कराचे सल्लागार या विषयावर चर्चा करणार आहेत.‘
================================================
जातीनिहाय वर्ग भरविणाऱ्या प्राचार्यांची हकालपट्टी
| |
-
| |
हाथरस (उत्तर प्रदेश) - जातीनिहाय स्वतंत्र वर्ग भरविणा-या येथील सेठ फुलचंद बागला विद्यालयाचे प्राचार्य राधेश्याम वैष्णव यांची जिल्हाधिकाऱ्यांनी प्राचार्य पदावरून हकालपट्टी केली आहे.
याबाबत बोलताना जिल्हाधिकारी अविनाश कृष्ण सिंग म्हणाले, "सेठ फुलचंद बागला विद्यालयाचे प्राचार्य जातीभेद करण्यात येत असल्याच्या तक्रारी आम्हाला मिळाल्या होत्या. ते जातीवरून स्वतंत्र वर्ग भरवित होते. विद्यालयात इयत्ता नववीच्या ए, बी आणि सी अशा तीन तुकड्या होत्या. प्रत्येक तुकडीत समान विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी-जास्त होते. त्यामध्ये खुला, अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय असे गट होते. "ए‘ तुकडीच इतर प्रवर्गाच्या तुलनेत खुल्या प्रवर्गाचे विद्यार्थी अधिक होते. "बी‘ तुकडीत इतर मागसवर्गीय विद्यार्थी अधिक तर "सी‘ तुकडीत अनुसूचित जातीचे अधिक विद्यार्थी होते.‘ सिंग पुढे म्हणाले की, "प्रशासनाने प्राचार्य आणि इतर तीन वर्गशिक्षकांना त्यांच्या पदावरून हटविले आहे. आम्ही त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या विचारात आहोत.‘

No comments:
Post a Comment