Sunday, 15 May 2016

नमस्कार लाईव्ह १५-०५-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- वॉशिंग्टन; भारत सीमेवर चीनकडून अतिरिक्त लष्कर तैनात 
३- फ्लोरिडा; दोन वर्षाच्या कुत्र्याने सातवर्षाच्या मुलीला वाचवले सापाच्या दंशापासून 
४- व्हील्नियस; ट्रम्प व पुतीन यांचे वादग्रस्त म्युरल प्रसिद्ध 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- इराक, सिरीयानंतर भारत पत्रकारांसाठी तिसरा धोकादायक देश 
६- कोइम्बतुर; ५७० कोटी रुपये स्टेट बँकेचेच 
७- देशांतर्गत काळा पैसा उघड करण्यासाठी मुदत 
८- सरकारचे ‘नीट’ प्रशिक्षण - विनोद तावडे 
९- संसदेत पुन्हा येणार राममंदिर; विहिंपचे नेते खासदारांना भेटणार  
१०- कालबाह्य परंपरांना तिलांजली द्या - नरेंद्र मोदी 
११- 'एनआयए'च्या निर्णयावर आप'चे प्रश्‍नचिन्ह 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- जमीन 5 कोटींची, लाच 30 कोटींची कशी?: एकनाथ खडसे 
१३- आदिलाबाद; तेलंगणमध्ये अपघात, महाराष्ट्रातील पंधरा जणांचा मृत्यू 
१४- रणबीरने बांद्रा पाली हिलमध्ये फ्लॅटसाठी मोजले ३५ कोटी 
१५- दुष्काळासाठी अतिरिक्त २०१७ कोटींचा प्रस्ताव- खडसे 
१६- ‘नीट’मुळे एका पिढीच्या भविष्याचे नुकसान - देवेंद्र फडणवीस 
१७- करोडोंची मालमत्ता उघड्यावर, देखभालीसाठी पैसेच नाहीत! 
१८- पाटोदा; घोटभर पाण्यासाठी महिलेचा गेला जीव 
१९- 'पीए'प्रकरणी एकनाथ खडसे अडचणीत 
२०- बिहारमधील गुन्ह्यांमुळे नितीशकुमार हैराण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२१- मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, 6 प्रवाशांचा मृत्यू 
२२- सुरत; विहिंपचे नेते प्रवीण तोगडियांच्या भावासह तिघांची हत्या 
२३- संगमनेर; आयुर्वैद्य डॉ. बालाजी तांबेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश 
२४- तेलंगना; जेसीबी-ऑटोची भीषण धडक, एकाच कुटुंबातील 15 जणांचा मृत्यू 
२५- पंढरपूरमध्ये एटीएम सुरक्षा रक्षकानंच लुटले 22 लाख 
२६- धूळे; छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या जवानाची अख्ख्या गावासमोर भोसकून हत्या 
२७- आंध्रप्रदेशात भिंत कोसळली, सात मजूर ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२८- 'सैराट'नं रचला इतिहास... ५५ कोटींची कमाई, झिंगाट सेलिब्रेशन 
२९- फक्त शतक नव्हे.... तर IPLमध्ये विराटनं रचला आगळावेगळा इतिहास 
३०- 'सैराट'च्या शिरपेचात मानाचा तुरा, जगप्रसिद्ध 'फोर्ब्स' मासिकानंही घेतली दखल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३१- दक्षिण नांदेडवर पाणीसंकट; विष्णूपुरीत केवळ अर्धा टक्का पाणीसाठा 
३२- नांदेडच्या ७० टक्के भागासाठी सांगावी बंधाऱ्याचे पाणी 
३३- उमरी; डोणगावजवळ कालव्यात पोहणारे दोन युवक बेपत्ता 
३४- परभणी शहर व ग्रामीण जिल्हा प्रभारीपदी भास्करराव पा. खतगावकर 
३५- कंधार; पत्नीचे अनैतिक संबंध व छळाला कंटाळून पतीची आत्महत्या 
३६- आम आदमी विमा योजनेचा अडीच वर्षात ११ हजारांवर विद्यार्थ्यांना लाभ 
३७- किनवटमध्ये पाणीटंचाईचे उग्ररूप; विद्युत मोटारीचा शॉक लागून महिलेचा मृत्यू 
३८- मांडवी; डॉक्टरच्या चुकीमुळे महिलेचा मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
दुख: भोगणारा भविष्यात सुखी होऊ शकतो..
पण दुख: देणारा कधीही सुखी राहू शकत नाही
(हृतिक देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
गणेश कबाडे, प्रल्हाद सूर्यवंशी, श्याम तोटे, मयूर जाधव, शहंशा बैग, विठ्ठल वानखेडे, तुलसीदास वान्गीलवार, बालाजी शेळगावकर, विशाल राठोड, राहुल रावत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

==========================================

मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, 6 प्रवाशांचा मृत्यू

मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, 6 प्रवाशांचा मृत्यू
इंदापूर (रायगड) मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात झाला आहे. रायगडमधील इंदापूरजवळ हा अपघात झाला असून, या भीषण अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 
शिवनेरी एसटी बस आणि वॅगन आर कारचा अपघात पहाटे 5 च्या सुमारास झाल्याची माहिती मिळते आहे. 
या अपघातात 6 जणांचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला आहे. 
मुंबईहून कोकणात जाणाऱ्या कारने शिवनेरी एसटीला ओव्हरटेक करताना हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
==========================================

विहिंपचे नेते प्रवीण तोगडियांच्या भावासह तिघांची हत्या

विहिंपचे नेते प्रवीण तोगडियांच्या भावासह तिघांची हत्या
सुरत : विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडियांच्या भावासह तिघांची काल हत्या करण्यात आली आहे. भरत तोगडिया असं प्रवीण तोगडियांच्या भावाचं नाव आहे. 
सुरतमध्ये काल रात्री आठच्या सुमारास भारत यांच्यासह आणखी दोघांची हत्या झाली असून, या तिघांचा मृतदेह भरत तोगडियांच्या मित्राच्या कार्यालयाच्या परिसरातच मिळाला. 
भरत तोगडियांच्या मित्राला म्हणजेच बालू हिरानीला मारायला आलेल्या मारेकऱ्यांनी तिथं असलेल्या तिघांनाही मारलं असल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 
भरत तोगडिया यांच्या हत्येमागे राजकीय कट नाही, असे सध्यातरी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
==========================================

आयुर्वैद्य डॉ. बालाजी तांबेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

आयुर्वैद्य डॉ. बालाजी तांबेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
संगमनेर : ‘आयुर्वेदिक गर्भसंस्कार’ या पुस्तकातून पुत्रप्राप्तीसाठी उपाय सुचवून त्याचा प्रचार आणि प्रसार करुन प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनटीडी) भंग केल्यानं संगमनेर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 
याप्रकरणी प्रसिद्ध आयुर्वैद्य डॉ. बालाजी तांबे, पुस्तकाचे प्रकाशक अभिजीत पवार आणि अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सक सखाहरी सोनावणे यांना 9 जूनला सर्व कागदपत्रांसह न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 
या सर्वांना संगमनेर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांनी आधी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, चार महिने उलटूनही काहीही कारवाई न झाल्यानं तक्रारदार गणेश बोऱ्हाडे यांनी संगमनेर न्यायालयात धाव घेतली.
==========================================

तेलंगणात जेसीबी-ऑटोची भीषण धडक, एकाच कुटुंबातील 15 जणांचा मृत्यू

तेलंगणात जेसीबी-ऑटोची भीषण धडक, एकाच कुटुंबातील 15 जणांचा मृत्यू
तेलंगणा : तेलंगणामध्ये जेसीबीने ऑटोला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

देवदर्शनासाठी जाताना हा अपघात झाला असल्याचीही माहिती मिळते आहे.

तेलंगणामधील अदिलाबाद जिल्ह्यातील देगाव गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. मृतांमध्ये पाच चिमुरड्यांचा ही समावेश होता, अशी माहिती मिळते आहे.

दुर्घटना घडल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, अपघाताचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही.
==========================================

'सैराट'नं रचला इतिहास... तुफानी कमाई, झिंगाट सेलिब्रेशन

'सैराट'नं रचला इतिहास... तुफानी कमाई, झिंगाट सेलिब्रेशन!
मुंबई: नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमानं मराठी सिनेसृष्टीत एक नवा इतिहास रचला आहे. कारण की सैराट सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 2 आठवड्यात तब्बल 55 कोटीची कमाई केली आहे.

आजवर एकाही मराठी सिनेमाला 50 कोटींपर्यंत मजल मारता आली नव्हती. सैराट सिनेमानं सर्व रेकॉर्ड मोडीत काढत थेट 55 कोटींची कमाई केली असून अजूनही त्यांची विक्रमी घौडदौड सुरुच आहे.

याच निमित्तानं आज सैराटच्या सक्सेस पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. हा सिनेमा 50 कोटींचा टप्पा गाठेल असं अधीच वाटलं होतं अशी प्रतिक्रिया  यावेळी या सिनेमाचे संगीतकार अजय-अतुल यांनी दिली.

दरम्यान, याआधी अवघ्या 11 दिवसात 41 कोटींचा गल्ला जमवत सैराट मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता.

‘सैराट’ने पहिल्या आठवड्यातील शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 3.80 कोटी आणि रविवारी 4.85 कोटी आणि सोमवारी 2.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे अवघ्या चार दिवसात सैराटची कमाई 15.10 कोटी रुपयांवर गेली.

यापूर्वी ‘नटसम्राट’ने एका आठवड्यात 16 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. तर नऊ दिवसात नानाचा ‘नटसम्राट’ 22 कोटीच्या पार गेला होता. चौथ्या आठवड्यात हा आकडा 35 कोटींच्या घरात गेला होता. मात्र हा आकडा सैराटने अवघ्या 10 दिवसांतच पार केला.

दुसरीकडे ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 7 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ने चार दिवसात 12.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

लय भारीने प्रदर्शनाच्या दिवशी 3 कोटी 10 लाख, शनिवारी 3 कोटी 60 लाख, रविवारी 3 कोटी 85 लाख आणि सोमवारी 2 कोटी 15 लाखांचा गल्ला जमवला होता. तर रवी जाधव यांच्या टाईपमास- 2 ने पहिल्या 3 दिवसांमध्ये तब्बल 11 कोटी रुपयांची कमाई केली होती.
==========================================

फक्त शतक नव्हे.... तर IPLमध्ये विराटनं रचला आगळावेगळा इतिहास!

फक्त शतक नव्हे.... तर IPLमध्ये विराटनं रचला आगळावेगळा इतिहास!
बंगळुरु: विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सनं चिन्नास्वामी स्टेडियम दणाणून सोडलं आणि अनेक विक्रमांनाही गवसणी घातली. आयीपएलमधलं विराटचं हे तिसरं शतक ठरलं असून एकाच मोसमात तीन शतकं ठोकणारा विराट हा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

विशेष म्हणजे विराटनं यंदाच्या मोसमातलं आपलं पहिलं शतकंही गुजरात लायन्सविरुद्ध ठोकलं होतं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात विराटनं अकरा सामन्यांत 677 धावांचा रतीब घातला आहे. तसंच यंदाच्या मोसमात विराटनं सर्वाधिक 55 चौकार ठोकले आहेत. विराटनं यंदा अकरा सामन्यांत 25 षटकारही लागवले आहेत.

बंगळुरूत विराटनं एबी डिव्हिलियर्ससह दुसऱ्या विकेटसाठी रचलेलली 229 धावांची भागीदारी ही ट्वेन्टी20 फॉरमॅटमधली सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. तसंच एकाच ट्वेन्टी20 सामन्यात दोन फलंदाजांनी शतकं साजरी करण्याची ही दुसरीच वेळ आहे. याआधी 2011 साली केविन ओब्रायन आणि हॅमिश मार्शलनं ग्लॉस्टरशायरकडून एकाच सामन्यात शतकं ठोकली होती.
==========================================

जमीन 5 कोटींची, लाच 30 कोटींची कशी?: एकनाथ खडसे

जमीन 5 कोटींची, लाच 30 कोटींची कशी?: एकनाथ खडसे
मुंबई: महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या नावाखाली लाच मागणाऱ्या गजानन पाटीलला अटक केल्यानंतर खडसेंना मात्र त्याची पाठराखण केली आहे. ‘जमिनीची किंमत केवळ 5 कोटी असताना कोणी 30 कोटी कसे काय मागू शकतो?’ असा सवाल एकनाथ खडसेंनी विचारला आहे. तसेच आरोप करणारे विकृत मनोवृत्तीचं असल्याचंही एकनाथ खडसे म्हणाले.

एवढंच नव्हे तर, ‘गजानन पाटील हे चांगले सामाजिक कार्य करतात. मी त्यांना ओळखतो. वारकरी असल्यानं आषाढी, कार्तिकीला ते माझ्या सोबत असतात.’ असंही खडसेंनी म्हणाले.

काय आहे प्रकरण?

कल्याणमधील इंटरनॅशनल सोसायटी फॉर एक्सलन्स या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेने 2004 मध्ये 37 एकर जमीन खरेदी केली होती. मंत्रालयात आग लागल्यानंतर कागदपत्रं जळून खाक झाल्याने संबंधित जमिनीची खरेदी प्रलंबित होती. यानंतर महसूल विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळावं यासाठी संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव पाठपुरावा करत होते. यादरम्यान एकनाथ खडसेंचे ओएसडी उन्मेश महाजन यांनी रमेश जाधव यांची भेट गजानन पाटीलशी घालून दिली. काम करुन देण्याच्या मोबदल्यात गजानन पाटीलने सुरुवातीला एक फ्लॅट आणि एक कोटीची मागणी केली. पाटीलने जाधव यांना चर्चेसाठी खडसेंच्या रामटेक बंगल्यावरही अनेकदा बोलावल्याचं समजतं. हळूहळू त्याची मागणी वाढ गेली आणि जमीन हस्तांतरित करण्यासाठी त्याने तब्बल 30 कोटींची मागणी केली. त्यानंतर रमेश जाधव यांनी लाचलुचत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
==========================================

पंढरपूरमध्ये एटीएम सुरक्षा रक्षकानंच लुटले 22 लाख

पंढरपूरमध्ये एटीएम सुरक्षा रक्षकानंच लुटले 22 लाख!
पंढरपूर: तुमचा एटीएम पासवर्ड गुप्त ठेवा. अगदी एटीएम बाहेरच्या सुरक्षारक्षपासूनही. कारण पंढरपुरात एसबीआय एटीएमच्या सुरक्षा रक्षकानंच बँकेला 22 लाखाला लुटलं आहे.

नवनाथ जाडकर, पंढरपूरच्या एसबीआयच्या एटीएमवर सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा. पण हे काम करतानाच त्यानं बँकेच्या 22 लाख 50 हजार रुपयावर हात मारला. तोसुद्धा एटीएम न फोडता. कुठलीही तोडफोड न करता.

मशीनमधून पैसे काढताना नवनाथ सीसीटीव्ही आणि वीज बंद करायचा. त्यामुळं त्याच्या हालचालीही बँकेला कळत नव्हत्या. तिकडं 22 लाखाची रोकड लंपास झाल्यानं अधिकारी हैराण झाले. त्यांनी एटीएम यंत्रणा नादुरुस्त तर नाही ना, याची पाहणी केली. पण काहीच थांगपत्ता लागत नव्हता.

बँक अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार केली.. पहिल्यांदा दिशाभूल करणारी उत्तरं देणाऱ्या नवनाथला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला. खरंतर एटीएममध्ये पैसे ठेवताना, काढताना बँक अधिकाऱ्यांनी पासवर्ड गुप्त ठेवण्याची हुशारी दाखवायला हवी होती. पण तसं झालं नाही. दुसरीकडे नवनाथला पैशाची हाव सुटली. दोन्ही परिणाम म्हणजे बँकेला 22 लाखाचा चुना लागला. आता त्याची भरपाई कुणाकडून करणार हा प्रश्न आहे.
==========================================

'सैराट'च्या शिरपेचात मानाचा तुरा, जगप्रसिद्ध 'फोर्ब्स' मासिकानंही घेतली दखल

'सैराट'च्या शिरपेचात मानाचा तुरा, जगप्रसिद्ध 'फोर्ब्स' मासिकानंही घेतली दखल!
मुंबई: प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या नागराज मंजुळें यांचा ‘सैराट’ सिनेमा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात धुमाकूळ घालतो आहे. ‘झिंग झिंगाट’ या गाण्यानं तर प्रत्येकाला थिरकायला लावलं आहे. अवघ्या 11 दिवसात तब्बल 41 कोटींची कमाई करणाऱ्या या सिनेमाची आता जगप्रसिद्ध मासिक ‘फोर्ब्स’नेही दखल घेतली आहे.

अनेक चित्रपट महोत्सवात आपली छाप पाडणाऱ्या सैराटची आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली जात आहे. सैराटने नटसम्राट चित्रपटालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलं होतं. ‘सैराट’ मराठीत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.

आंतरजातीय विवाह करणाऱ्या तरुण-तरुणीच्या प्रेमकथेनं प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: गारुड घातलं असल्याचंही फोर्ब्सनं म्हटलं आहे.
==========================================

छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या जवानाची अख्ख्या गावासमोर भोसकून हत्या

छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या जवानाची अख्ख्या गावासमोर भोसकून हत्या
धुळे: बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या लष्करी जवानाची चाकूनं भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना धुळ्यातल्या सय्यदनगरमध्ये घडली आहे. विनोद पवार असं मृत पावलेल्या जवानाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार सरपंच आणि गावातल्या 400 लोकांसमोर घडला. विद्यापीठाच्या परीक्षेसाठी विनोद पवार आपलं मूळगाव असलेल्या सय्यदनगरमध्ये आले होते. त्याचवेळी आपल्या बहिणीची छेड काढणाऱ्यांना विनोद यांनी जाब विचारला. पण त्यांनी विनोद यांना अख्ख्या गावासमोर भोकसून मारलं.

पंजाबच्या पठाणकोटमध्ये लष्करी सेवेत असलेले धुळ्याचे जवान विनोद पवार यांची गावात सुट्टीवर आले असताना हत्या करण्यात आली. विद्यापीठाच्या परीक्षेसाठी विनोद पवार आपलं मूळगाव असलेल्या सैय्यदनगरमध्ये आले होते. बहिणीची छेड काढणाऱ्यांना जाब विचारला म्हणून आठ लोकांनी विनोद पवार यांच्यावर धारदार हत्यारानं वार केले. त्यात विनोद यांचा जागीच मृत्यू झाला. विनोद यांच्या बचावासाठी आलेल्या सहा जणांनाही जखमी केलं.
==========================================

तेलंगणमध्ये अपघात, महाराष्ट्रातील पंधरा जणांचा मृत्यू


  • ऑनलाइन लोकमत 
    अदिलाबाद, दि. १५ - तेलंगणच्या अदिलाबाद जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री ट्रक आणि ऑटो रिक्षाच्या झालेल्या  भीषण अपघातात महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील पंधरा जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील हे कुटुंब होते. मृतांमध्ये पाच महिला आणि सात लहान मुलांचा समावेश आहे. 
    अदिलाबादमधील बहिनसा येथे हा अपघात झाला. खडीने भरलेल्या ट्रकने समोरुन येणा-या ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. ऑटोमध्ये १८ प्रवासी होते अशी माहिती अदिलाबाद पोलिसांनी दिली. अपघात इतका भीषण होता की, १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. एकाचा रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला. तिघा जखमींना निझामाबाद जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
    रिक्षामधील सर्व प्रवासी मंदिरात देवदर्शनासाठी चालले असताना ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये पाच महिला, चार मुलगे आणि तीन मुली आहेत अशी माहिती बहिनसा ग्रामीण पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक विनोद रेड्डी यांनी दिली. 
==========================================

मुंबई-गोवा मार्गावर शिवनेरीची कारला धडक, सहा ठार


  • ऑनलाइन लोकमत 
    इंदापूर, दि. १५ - मुंबई- गोवा महामार्गावर रविवारी पहाटे एसटीची शिवनेरी बस आणि मारुती कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण ठार झाले. इंदापूरजवळच्या रुद्रोली गावाजवळ सकाळी सहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. 
    भरधाव वेगात असलेल्या शिवनेरी बसने समोरुन येत असलेल्या मारुती कारला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. एसटीतील एका प्रवाशाचा रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरुष, एक महिला आणि एका चिमुरडयाचा समावेश आहे. 
    शिवनेरीच्या चालकाची प्रकृती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. अपघातात एसटीच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला त्यावरुन धडक किती जोरदार होती याची कल्पना येते. 
==========================================

आंध्रप्रदेशात भिंत कोसळली, सात मजूर ठार


  • ऑनलाइन लोकमत 
    हैदराबाद, दि. १५ - आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यात शनिवारी रात्री बांधकाम अवस्थेत असलेल्या एका इमारतीची भिंत कोसळली. या दुर्घटनेत सात मजूरांचा मृत्यू झाला. लक्ष्मीपूरम भागामध्ये प्रस्तावित इमारतीसाठी तळघर खणण्याचे काम सुरु असताना ही भिंत कोसळली. 
    खणण्याचे काम सुरु असताना अचानक भूमिस्खलन होऊन आठ मजूर भिंतीखाली अडकले अशी माहिती पोलिसांनी दिली. एक मजूराची सुटका करण्यात यश आले. दुर्घटनेची माहिती कळताच आंध्रप्रदेश विधानसभेचे विधानसभाध्यक्ष कोडेला शिवाप्रसाद राव, आमदार अलापती राजेंद्र प्रसाद, एन आनंद बाबू, जिल्हाधिकारी कांतीलाल दांडे आणि अन्य अधिका-यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. 
    घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी गृहमंत्री एन. चायना राजप्पा यांना घटनास्थळी जाऊन मदतकार्याचा आढावा घेण्यास सांगितले आहे. 
==========================================

रणबीरने बांद्रा पाली हिलमध्ये फ्लॅटसाठी मोजले ३५ कोटी


  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. १५ - बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूरने मागच्या महिन्यात बांद्रा पाली हिल येथे आलिशान फ्लॅट विकत घेतला. ३५ कोटी रुपयांना हा व्यवहार झाल्याची माहिती आहे. प्रति चौरस फुटासाठी रणबीरने १.४२ लाख रुपये मोजले. उपनगरात प्रति चौरसफुटामागे झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार आहे. 
    वास्तू पाली हिल या नव्याने बांधलेल्या टॉवरमध्ये सातव्या मजल्यावर रणबीरचा फ्लॅट आहे. २४६० स्कवेअर फीटच्या या फ्लॅटसाठी रणबीरने ३५ कोटी रुपये मोजले आहेत. रणबीरला महागाडया गाडया वापरण्याचाही शॉक आहे. कपूर कुटुंबाच्या क्रिष्ण राज बंगल्याजवळ हा फ्लॅट आहे. 
    भारतात रिअल इस्टेटमधल्या सर्वात मोठया व्यवहाराची मागच्या वर्षी नोंद झाली होती. उद्योगपती जिंदाल कुटुंबाने अल्टामाऊंट रोडवरील लोढा  टॉवरमधील १० हजार स्कवेअर फीटच्या डयुप्लेक्स फ्लॅटसाठी प्रतिचौरस फूट १.६० लाख रुपये मोजले होते. 
    मुंबईत रिअल इस्टेटमध्ये सध्या मंदी असली तरी, घराच्या खरेदीमध्ये गुंतवणूक सुरक्षित असल्याचे बॉलिवूडचे मत आहेत.
==========================================

इराक, सिरीयानंतर भारत पत्रकारांसाठी तिसरा धोकादायक देश


  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. १५ - बिहारमध्ये पत्रकार राजदेव रंजन आणि झारखंडमध्ये अखिलेश प्रताप सिंह या दोन पत्रकारांच्या २४ तासात झालेल्या हत्यांमुळे पत्रकारांच्या सुरशेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. २०१५ च्या एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार पत्रकारांसाठी धोकादायक असलेल्या पहिल्या तीन देशांमध्ये  भारताचा समावेश होतो. 
    इराक आणि सिरीयानंतर भारत पत्रकारांसाठी तिसरा धोकादायक देश आहे. १९९२ पासून आतापर्यंत भारतात एकूण ६४ पत्रकारांच्या हत्या झाल्या आहेत. भ्रष्टाचार उघड केला म्हणून यातील बहुतांश हत्या झाल्या आहेत असे  प्रोटेक्ट जर्नलिस्ट समितीने म्हटले आहे. 
    बहुतांश हत्या या छोटया शहरातील पत्रकारांच्या झाल्या आहेत. छोटया शहरात तोंड बंद ठेवण्यासाठी मोठया प्रमाणावर लाच दिली जाते. हा व्यवहार उघड करणे म्हणजे मोठा उद्योजक किंवा राजकारण्याशी शत्रूत्व ओढवून घेणे असते. भारतात पत्रकारांच्या मोठया प्रमाणावर हत्या होतात. फक्त इराक आणि सिरीयापेक्षा हा आकडा कमी आहे. 
==========================================

दुष्काळासाठी अतिरिक्त २०१७ कोटींचा प्रस्ताव- खडसे


  • पुणे : राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याने दुष्काळ निवारणासाठी शासनाने २०१७ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी लवकरच जास्तीचा निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे पत्रकार परीषदेत दिली.
    कृषी, मदत आणि पुनर्वसन व महसूल विभागाच्या आढावा बैठकीत खडसे बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजीक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी उपस्थित होते.
    खडसे म्हणाले, की यंदाचा दुष्काळ विभाजीत असून, पाणी टंचाई, चार टंचाई, रोजगार आदी समस्या गंभीर झाल्या आहेत. राज्याला खरीप हंगामसाठी १४ लाख ७७ हजार क्लिंटल विविध प्रकारच्या बियाणांची आवश्यता असते. यंदा मात्र कृषी विभागाकडे १७ लाख ९० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.
==========================================

‘नीट’मुळे एका पिढीच्या भविष्याचे नुकसान - देवेंद्र फडणवीस


  •  नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचा आपण आदर करतो. ‘नीट’ विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. ‘नीट’च्या निर्णयामुळे संपूर्ण पिढीच्या भविष्याचे नुकसान होण्याचा धोका आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’बाबत दिलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने विचार करावा, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले. नागपूरात एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
    महाराष्ट्रात वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ‘सीईटी’ दिली. परंतु ‘एमबीबीएस’ व ‘बीडीएस’चे प्रवेश ‘नीट’च्या माध्यमातूनच होतील असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला व राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना धक्का बसला. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी नागपूरात भाष्य केले.
    ‘नीट’ चा मुद्दाच विद्यार्थ्यांसाठी खरोखरच अन्यायकारक आहे. विद्यार्थी वेगळ््या अभ्यासक्रमाची तयार करत असताना, एका दिवसात म्हणता की ‘सीबीएससी’च्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देऊन द्या. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे व आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका करण्यात येत नाही. सर्वोच्च न्यायालय आपल्यासाठी मोठीच गोष्ट आहे. परंतु न्यायालयानेदेखील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा. कायदा आपल्या जागी आहे व तो ठीकदेखील आहे. परंतु यामुळे जर एका पिढीचे नुकसान होत असताना याचा विचार व्हायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
==========================================

करोडोंची मालमत्ता उघड्यावर, देखभालीसाठी पैसेच नाहीत!


  • अतुल कुलकर्णी,  मुंबई
    राज्यात आजवर कोट्यवधी रुपये खर्चून धरणे उभी राहिली, कोट्यवधींची मशिनरी रानोमाळ उघड्यावर पडून आहे, पण
    त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी दिला जाणारा निधी अत्यंत तोकडा आहे. जलसंपदा विभागाची राज्यात लहान-मोठी मिळून ३९०० धरणे आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांत या कामासाठी फक्त २४२ कोटी रुपये दिले गेले आहेत.
    जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांमुळे किती क्षेत्र सिंचनाखाली आले, हे मोजण्याची यंत्रणा आहे, पण जलयुक्त शिवारमधून कृषी विभाग, जलसंधारण आणि जिल्हा परिषदांनी किती कामे केली, त्यातून किती क्षेत्र सिंचनाखाली आले, हे मोजण्याची व्यवस्था नाही आणि त्यासाठी देखभाल-दुरुस्तीची कोणतीही आस्थापना नाही. त्यामुळे दोन-चार मोठे पाऊस झाले, तर या विभागांनी केलेल्या कामांमुळे किती क्षेत्र सिंचनाखाली आले, याची मोजणी कशी करायची, हा प्रश्नच आहे. शिवाय केलेले काम वाहून गेले की, शिल्लक आहे, याची तपासणी करण्याची यंत्रणाही अस्तित्वातच नाही, असे या विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
==========================================

घोटभर पाण्यासाठी महिलेचा गेला जीव


  • पाटोदा (जि. बीड) : शनिवारी सौंदाणा येथे घोटभर पाण्यासाठी एका महिलेला प्राणास मुकावे लागले. तहान लागल्याने विहिरीत उतरत असताना महिलेचा तोल गेला. पोहता येत नसल्याने तिचा बुडून मृत्यू झाला.
    जिल्ह्यातील हा १४ वा पाणीबळी ठरला. सत्यभामा छगन कदम (५०, रा. सौंदाणा) शनिवारी सकाळी सात वाजता सरपण आणण्यासाठी गावाजळील शेतात गेल्या होत्या. शेताजवळ शिवदास भीमराव कदम यांची विहीर आहे. तहान लागल्याने विहिरीत उतरत असताना त्यांचा तोल गेला होता. दुपारी १२ वाजता त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. सत्यभामा या शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या मागे पती, एक मुलगा व एक विवाहित मुलगी आहे. दहा वर्षांपूर्वी गावात जलस्वराज्य योजना राबविली होती. सार्वजनिक विहिरीला पाणीही आहे; परंतु दीड महिन्यांपूर्वी पाईपलाईन फुटली. त्यामुळे गाव टंचाईच्या झळा सोसत आहे. अनेकजण शेतशिवारातून मिळेल तेथून पाणी आणत आहेत. 
==========================================

५७० कोटी रुपये स्टेट बँकेचेच!


  • कोर्इंबतूर : तामिळनाडूत निवडणूक अधिकाऱ्यांना शनिवारी तिरुपूर जिल्ह्यात तपासणीमध्ये तीन कंटेनर्समधून तब्बल ५७0 कोटी रुपयांचे घबाड हाती लागल्याने देशभर खळबळ माजली. त्यावर लगेच कोणीच दावा न केल्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने हा पैसा मतदारांना वाटला जाणार होता की काय, अशी शंका व्यक्त केली गेली.
    मात्र ती रक्कम आमची असल्याचा दावा रात्री स्टेट बँकेने केला आणि मग निवडणूक आयोगापासून सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. यापूर्वी तीनदा मिळून राज्यातून निवडणूक अधिकाऱ्यांनी सुमारे १00 कोटी रुपये जप्त केले होते. मात्र आज एवढी मोठी रक्कम सापडल्याने संशय निर्माण झाला होता. तामिळनाडूतील प्रचार आज संपण्याआधी ती सापडल्याने शंकेत वाढच झाली होती. पहाटे तीन कंटेनरमधून निघालेली ही रक्कम जप्त करण्यात आली. तिरुपूरमधून तीन कंटेनर वेगाने जाताना पाहून निवडणूक अधिकाऱ्यांना शंका आली. कंटेनर व त्यापुढे पुढे असलेल्या दोन कार थांबवण्याचा प्रयत्नही असफल ठरला. त्यामुळे पाठलाग करून वाहने अडवली. वाहने का थांबवली नाही, असे त्यातील विचारले असता, दरोड्याच्या भीतीने आम्ही निघून न थांबता गेलो, असे त्यातील लोकांनी पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितले. ही रक्कम बँकांतर्गत हस्तांतरणाची असल्याचा दावा वाहनांतील लोकांनी केला होता. कोर्इंबतूरमधील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून ५७० कोटी रुपये विशाखापट्टणम येथील बँकेच्या शाखेत हस्तांतरित करण्यात येणार होते, हे नंतर उघडच झाले.
==========================================

भारत सीमेवर चीनकडून अतिरिक्त लष्कर तैनात


  • वॉशिंग्टन : जगाच्या विविध भागात आणि भारतीय सीमेवरही चीनने संरक्षणक्षमता वाढवून अधिक सैनिक तैनात केल्याचे म्हटले आहे. पूर्व आशियाचे संरक्षण उपमंत्री अब्राहम एम डेनमार्क यांनी सांगितले की, भारतीय सीमेनजीकच्या प्रदेशात चीनी लष्कराची क्षमता आणि संख्या यांच्यात वाढ झाल्याचे आम्हाला दिसून आले आहे. मात्र असे करण्यामागे चीनचा हेतू काय? हे सांगणे कठीण आहे.
    भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यावर अमेरिकेचा भर कायम राहील. केवळ चीनला समोर ठेवून आम्ही भारताशी संबंध वाढवित आहोत, असे नव्हे तर भारत हा स्वत:च एक महत्त्वाचा देश आहे. हे महत्त्व पाहूनच आम्ही भारताशी संवाद चालू ठेवत आहोत, असे ते म्हणाले. तिबेटमध्येही चीनने आपला लष्करी स्तर आणखी वाढविला आहे. अमेरिकी संरक्षण मंत्रालयाच्या या अहवालात जगाच्या विविध भागात आणि त्यातही पाकिस्तानात लष्करी तळ स्थापन करण्याच्या चीनच्या प्रयत्नाबद्दल सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिरिक्त लष्कर तैनात करण्याच्या चीनच्या कृतीवर या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर लडाखमध्ये सप्टेंबर २०१५मध्ये भारत व चीन यांच्यात लष्करी तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर उभय देशांच्या वरिष्ठ स्तरावर फ्लॅग आॅफिसर्सची बैठक घेण्यात आली. त्यात या भागात शांतता कायम ठेवण्यावर सहमती झाली व दोन्ही देशांचे सैनिक जागेवर परत गेले, या घटनेकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. 
==========================================

दोन वर्षाच्या कुत्र्याने सातवर्षाच्या मुलीला वाचवले सापाच्या दंशापासून


  • ऑनलाइन लोकमत 
    फ्लोरिडा, दि. १४ - कुत्रा इमानी प्राणी आहे. मालकाप्रती त्याच्या निष्ठा अत्यंत प्रामाणिक असतात. वेळ पडल्यास मालकासाठी तो आपले प्राण द्यायलाही मागेपुढे पाहत नाही. अमेरिकेत कुत्र्याच्या निष्ठेचे असेच एक उदहारण समोर आले आहे. जिथे मालकाच्या सात वर्षाच्या मुलीला वाचवण्यासाठी कुत्र्याने सापाचा दंश स्वत:वर ओढवून घेतला. 
    अमेरिकेतील फ्लोरिडा शहरातील एका घरात बुधवारी ही घटना घडली. जर्मन शेपर्ड जातीचा दोन वर्षांचा हॉस मॉली डील्युसा या मुली बरोबर घराच्या मागच्या अंगणात खेळत होता. त्यावेळी रॅटलस्नेक जातीचा साप घरात घुसला. साप मॉलीच्या दिशेने चालून गेला. हॉसने ते पाहिले. साप मॉलीला दंश करणार इतक्यात हॉसने उडी घेतली तो साप आणि मॉलीच्या मध्ये जाऊन उभा राहिला. 
    रॅटलस्नेकने हॉसला तीनवेळा दंश केला. हॉस या दंशाने जखमी झाला असून, त्याच्या किडनीचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती सार्वजनिक झाल्यानंतर हॉसला वाचवण्यासाठी आतापर्यंत ३३ डॉलर्सची मदत जमा झाली आहे. डील्युसा कुटुंबाने दोन महिन्यांपूर्वी हॉसला आपल्या घरी आणले होते. 
==========================================
ट्रम्प व पुतीन यांचे वादग्रस्त म्युरल प्रसिद्ध
-

व्हिल्नियस - पूर्व उरोपमधील व्हिल्नियस या शहरामधील एका उपहारगृहाजवळ रेखाटण्यात आलेल्या एका चित्राची आंतरराष्ट्रीय माध्यमांत सध्या दखल घेतली जात आहे.

येथील स्थानिक चित्रकार असलेल्या मिंडाऔगस बोनानु यांनी हे म्युरल तयार केले असून यामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन व अमेरिकेतील सध्या सुरु असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या रणधुमाळीत सहभागी झालेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे एकमेकांचे चुंबन घेताना दाखविण्यात आले आहेत.

1979 मध्ये तत्कालीन सोव्हिएत नेते लिओनाईड ब्रेझनेव्ह आणि पूर्व जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष एरिक होनेकर हे एकमेकांचे चुंबन घेतानाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. यामुळे जगभरात खळबळ उडाली होती. या प्रसंगापासून प्रेरणा घेऊन हे म्युरल रेखाटण्यात आल्याचे मानले जात आहे. 

==========================================
देशांतर्गत काळा पैसा उघड करण्यासाठी मुदत

नवी दिल्ली - केंद्र सरकारने देशांतर्गत अघोषित संपत्ती आणि काळा पैसा जाहीर करण्यासाठी चार महिन्यांची मुदत दिली आहे. येत्या 1 जूनपासून पुढील चार महिने अघोषित संपत्ती आणि काळा पैसा उघड करण्यास सांगितले आहे. 

यादरम्यान स्वेच्छेने अघोषित देशांतर्गत संपत्ती आणि काळा पैसा जाहीर करणारे लोक स्वत:वर होणारी दंडात्मक कारवाई होण्यापासून बचाव करू शकतील. त्यासाठी त्यांना अघोषित संपत्ती आणि काळ्या पैशाच्या 45 टक्के रक्कम आणि दंड प्राप्तिकर विभागाकडे जमा करावा लागणार आहे. 

एक जूनपासून 30 सप्टेंबरपर्यंत केंद्र सरकारने ही मुदत दिली आहे. त्यानंतर काळा पैसा जाहीर करणाऱ्यांवर मात्र कर, अधिभार आणि दंड आकारला जाणार आहे, असे अर्थ मंत्रालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मात्र सरकारने दिलेल्या कालावधीत अघोषित संपत्ती आणि काळा पैसा जाहीर केल्यास प्राप्तिकर कायद्याच्या किंवा संपत्ती कर कायदाअंतर्गत कोणत्याही छाननी आणि चौकशी होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

==========================================
तेलंगणात अपघातात नांदेडमधील 15 जणांचा मृत्यू

अदिलाबाद - तेलंगणामधील अदिलाबाद जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री ट्रक आणि रिक्षाच्या धडकेत महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील 15 जणांचा मृत्यू झाला.

अदिलाबाद जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तरुण जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिलाबाद जिल्ह्यातील भैन्सा गावाजवळ हा भीषण अपघात झाला. नांदेड जिल्ह्यात भोकर येथील हे सर्व रहिवाशी आहेत. देवदर्शनासाठी रिक्षातून हे सर्व जात होते. मृतांमध्ये पाच महिला, चार मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे.

निझामाबादमध्ये हे सर्व कुटुंब वास्तव्यास होते आणि हे कुटुंब वीट भट्टीवर कामावर होते. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रिक्षामध्ये बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
==========================================
प्रवीण तोगडियांच्या चुलत भावासह तिघांची हत्या

सुरत - विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) आंतरराष्ट्रीय महासचिव प्रवीण तोगडिया यांच्या चुलत भावासह तिघांची शनिवारी सुरतमध्ये हत्या करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरतमधील वराछा भागात प्रवीण तोगडिया यांचे चुलत भाऊ भरत तोगडिया यांच्यासह तिघांची शनिवारी रात्री आठच्या सुमारास चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या तिघांचे मृतदेह भरत तोगडियांच्या मित्राच्या कार्यालयाच्या परिसरातच मिळाले. वराछा भागात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. अनेक संघटनांकडून या हत्याकांडाबद्दल निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे. भरत तोगडिया यांचे सख्खे भाऊ प्रफुल्ल तोगडिया हे सुरत महापालिकेत विरोधी पक्षनेते आहेत.
==========================================
सरकारचे ‘नीट’ प्रशिक्षण - विनोद तावडे

मुंबई - ‘नीट’ परीक्षेला बसलेल्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. २४ जुलैला होणाऱ्या या परीक्षेच्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या पूर्वतयारीसाठी दूरदर्शन, खासगी वृत्तवाहिन्या, इंटरनेट आणि यू ट्यूबवरून शिक्षणतज्ज्ञांचे विशेष कोचिंग प्रसारित केले जाणार आहे. १९ मे पासून हे प्रसारण सुरू करण्याचा विचार आहे, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सोमवारी (ता. १६) दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी देशातील सर्व आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला आपण उपस्थित राहणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ‘एमबीबीएस’ आणि ‘बीडीएस’च्या विद्यार्थ्यांसाठी अन्य कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतात, तसेच केंद्र सरकारला काही अधिसूचना काढता येते का, याचा विचारही केला जाणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. नीट परीक्षेसाठी बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी अखेरपर्यंत लढा देणार आहे. प्रसंगी महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांच्या मदतीने राष्ट्रपतींची भेट घेतली जाईल, हा विषय त्यांच्यापर्यंत पोचविण्यात येईल आणि यामधून मार्ग काढण्याचा नक्कीच प्रयत्न करण्यात येईल. राज्य सरकारची फेरविचार याचिका अद्यापही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचेही ते म्हणाले. 
==========================================
'पीए'प्रकरणी एकनाथ खडसे अडचणीत

विरोधकांसोबत शिवसेना आक्रमक, तर भाजप बॅकफुटवर 
मुंबई - महसूल विभागातील काम करून देण्याच्या बदल्यात तब्बल 30 कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या कथित "पीए‘ मुळं महसूलमंत्री एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनादेखील खडसेंच्या विरोधात आक्रमक झाल्याचे आज चित्र होते. कॉंग्रेसने तर खडसेंच्या विरोधातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचे जाहीर केले; तर राष्ट्रवादीने हा सर्व प्रकार म्हणजे मोठा भ्रष्टाचारच असल्याचा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने खडसे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

मंत्रालयात खडसे यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून लाच मागणाऱ्या गजानन पाटील याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. यावरून मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. या प्रकरणात खडसे यांचाही सहभाग असल्याचा आरोप कॉंग्रेस व राष्ट्रवादीने केला आहे; तर शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनीही खडसे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते मात्र या कारवाईने बॅकफुटवर गेल्याचे चित्र आहे. 
==========================================
संसदेत पुन्हा येणार राममंदिर

विहिंपचे नेते खासदारांना भेटणार 
नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राममंदिराचा मुद्दा उकरून काढण्यासाठी विश्‍व हिंदू परिषदेने साऱ्या खासदारांना व्यक्तिशः भेटण्याचे ठरविले आहे. न्यायालयीन निर्णयापर्यंत थांबण्याची काही गरज नाही, असे विहिंपचे सह सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी आज सांगितले.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संघपरिवाराने गेली 24 वर्षे शीतपेटीत टाकलेला राममंदिराचा मुद्दा बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपने नव्यानेच राज्यसभेत आणलेले सुब्रह्मण्यम स्वामी यांनी याच अधिवेशनात एका शून्य प्रहरात मंदिराचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला होता; पण उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी त्यांना परवानगी नाकारली. स्वामी यांनी "सकाळ‘ला सांगितले की, पावसाळी अधिवेशनात आपण राममंदिरावर सभागृहात स्वतंत्र चर्चाच घडवून आणण्याचे प्रयत्न करणार आहोत. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालानंतर हा मुद्दा न्यायालयाच्या नव्हे, तर संसदेच्याच कक्षेत येतो, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. 
==========================================
कालबाह्य परंपरांना तिलांजली द्या - नरेंद्र मोदी

File Photoउज्जैन - केवळ परंपरा म्हणून कालबाह्य गोष्टींना कवटाळण्याची गरज नाही. बदल स्वीकारणे हा जिवंतपणा आहे. मृतप्राय गोष्टींमध्ये बदल होत नाही, असे खडे बोल सुनावून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धार्मिक क्षेत्रातील कालबाह्य गोष्टींना तिलांजली देण्याचे आवाहन केले.

निमित्त होते, उज्जैनमध्ये सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित "विचार महाकुंभ‘ सोहळ्याच्या समारोपाचे. 12 ते 14 मे असे तीन दिवस चाललेल्या या वैचारिक मंथनातून महिला सशक्तीकरण, कृषी, पर्यावरण, मानवता, विश्व बंधुत्व या मूलभूत मुद्‌द्‌यांवर मार्गदर्शन करणारा 51 कलमी जाहीरनामा पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपला सिरीसेना यांच्या हस्ते जाहीर झाला. 60 हून अधिक देशांचे राजनैतिक प्रतिनिधी आणि विशेषतः हिंदू धर्मातील सर्वोच्च धार्मिक संस्था, आखाड्यांचे प्रमुख, धर्मगुरू यांच्या उपस्थितीत बोलताना पंतप्रधान मोदींनी जुनाट परंपरांचा त्याग करण्याचे आवाहन केले.
समुद्रोल्लंघन निषिद्ध मानणारी परंपरा बदलत असेल, तर इतरही कालबाह्य गोष्टी बदलाव्यात. आता तर संत मंडळीही परदेशात जातात. केवळ आपली परंपरा आहे, असे म्हणून भागणार नाही; तर आपल्या चांगल्या गोष्टी जगाला समजेल, अशा भाषेत वैज्ञानिक आधारावर पटवून द्यायला हव्यात, असेही मोदी म्हणाले.
==========================================
'एनआयए'च्या निर्णयावर आप'चे प्रश्‍नचिन्ह

मुंबई - मालेगावमधील बॉंबस्फोटाच्या आरोपातून साध्वी प्रज्ञासिंहसह सहा जणांना "क्‍लीन चिट‘ देण्याच्या राष्ट्रीय तपास पथकाच्या (एनआयए) निर्णयावर आम आदमी पक्षाने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

या प्रकरणी आठ वर्षांपासून तुरुंगात असणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीनही मिळाला नव्हता, त्यांची अचानक पुराव्याअभावी सुटका झाली. मग इतके दिवस त्यांना जामीन का मिळाला नव्हता, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह या निर्दोष आहेत, हे अनाकलनीय असल्याचा टोलाही आम आदमी पक्षाच्या प्रवक्‍त्या प्रीती शर्मा मेनन यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

मालेगाव स्फोटप्रकरणी अटकेत असलेल्या कडव्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांबद्दल मवाळ धोरण स्वीकारा, असा संदेश आपल्याला "एनआयए‘च्या अधिकाऱ्याने दिला होता, असा गौप्यस्फोट विशेष सरकारी वकील रोहिणी सलियन यांनी काही महिन्यांपूर्वीच केला होता, हेही प्रीती शर्मा मेनन यांनी नमूद केले. केंद्रात मोदी यांचे सरकार आल्यानंतरच हा बदल झाल्याचेही त्यांनी म्हटले होते. "एनआयए‘सारख्या देशाच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या यंत्रणांचा मोदी सरकार जर अशा प्रकारे दुरुपयोग करत असतील, तर ही निश्‍चितच चिंतेची बाब आहे. मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणी दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांच्यावर हिंदुत्ववादी शक्तींनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता हे त्यांनीदेखील कबूल केले होते, असे प्रीती शर्मा मेनन यांनी म्हटले.
==========================================
बिहारमधील गुन्ह्यांमुळे नितीशकुमार हैराण

पत्रकाराच्या हत्येपाठोपाठ दोन जवानांवर रेल्वेत गोळीबार 
पाटणा - बिहारमधील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नितीश सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. एका आघाडीच्या हिंदी वृत्तपत्राचे ब्यूरो चीफ राजदेव रंजन यांची सिवानमध्ये अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेस काही तास उलटत नाहीत, तोच मुगलसराय-बक्‍सर या पॅसेंजरमध्ये आरपीएफच्या दोन जवानांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका जवानाचा घटनास्थळी मृत्यू झाला असून, अन्य एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान रंजन यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याचे सिवानच्या पोलिस निरीक्षकांनी सांगितले. दुसरीकडे राज्यातील गुन्ह्यांच्या घटना वाढल्याने भाजपने नितीशकुमारांना धारेवर धरले आहे.

रंजन यांच्या हत्या प्रकरणात ज्या दोघांना अटक करण्यात आली आहे, त्यांची पोलिस सध्या कसून चौकशी करत असून, त्यांच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सिवानचे बाहुबली नेते महंमद शहाबुद्दीन सध्या तुरुंगात असून, त्यांच्याशी या हत्या प्रकरणाचा काही संबंध नाही ना, हेदेखील पडताळून पाहिले जाते आहे. शहाबुद्दीन हे सध्या तुरुंगात असले तरीसुद्धा राष्ट्रीय जनता दलाने त्यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये समावेश केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 
==========================================

No comments: