Wednesday, 11 May 2016

नमस्कार लाईव्ह १०-०५-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- विजय मल्ल्यांना देशाबाहेर काढू शकत नाही -ब्रिटीश सरकारने फेटाळली मागणी 
२- पाक क्रिकेट सुधारावे अन्यथा पद सोडावे-अख्तर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- पुढील 5 दिवसांत राज्यात पाऊस, हवामान खात्याचा अंदाज 
४- कॉल ड्रॉप झाल्यास नुकसानभरपाईचा आदेश SC कडून रद्द, ग्राहकांना झटका 
५- हमीपत्रे घेऊन आठ डान्सबार परवाने द्या’ - सर्वोच्च न्यायालय 
६- अमिताभ यांची पुन्हा आयटी विभागाकडून चौकशी 
७- श्रीनगर; कुपवाडामध्ये चकमकीत पोलिस जवान हुतात्मा 
८- सकारात्मक बदलासाठी तंत्रज्ञान वापरा - मोदी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
९- उत्तराखंड शक्तिपरीक्षेत काँग्रेसच विजयी! हरीश रावत पुन्हा बनणार CM 
१०- बांधावरची भांडणं संपवणारं पंढरपुरातील 101 मंदिरांचं शेत 
११- तावडेंनी माझ्या मुलाची फसवणूक केली, पालक पोलिसात 
१२- मुंबईत रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये शांताबाई, रिक्षावाला गाण्यांवर डान्स 
१३- मुंबईत २५ टक्के विमानांना विलंब 
१४- बचत खात्यावर शून्य रक्कम असल्यास दंड नाही - आरबीआय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- वसई; फसवणूक करणाऱ्या 35 बिल्डरांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश
१६- बेळगावात शिवजयंतीनिमित्त मिरवणूक, गगनभेदी घोषणांसह ढोल पथकाचा दणदणाट 
१७- सोलापूर; एक लाखाला 2 टक्के व्याज, 3 हजार लोकांना गंडा, गुंतवणूकदार हवालदिल 
१८- उल्हासनगरमध्ये टोळक्याकडून तरुणाची भोकसून हत्या 
१९- 46 वर्षांच्या संसारानंतर 70 व्या वर्षी पहिल्यांदा मातृत्व 
२०- नाशिक; रुग्णाचे दान केलेले अवयव ग्रीन कॉरिडोरमुळे केवळ चार तासांत नाशिकहून पुण्याला 
२१- मुंबई; दिराने केला वहिनीवर बलात्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- 'सैराट'ची रेकॉर्डब्रेक कमाई, 11 दिवसात 'नटसम्राट'ला धोबीपछाड 
२३- नाराज परशाचं चाहत्यांना आवाहन 
२४- डॅशिंग आर्चीला मुख्यमंत्र्यांचा पहिला प्रश्न.... 
२५- शाओमीचा धमाका, Mi max तीन व्हर्जनमध्ये लाँच 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
मनुष्यात असलेल्या गुणांपैकी त्याच्यातील साहस सर्वात महत्वाचे कारण सर्व गुणांची ते जबाबदारी घेते
(सदाशिव सोनवणे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
जयकार शिंदे, अभिजित आव्हाड, सुबोध बोधने, निलेश गौर, संजय जोंधळे, नितीन कल्याने राजीव जैन, मधुसूदन कुलकर्णी, सुनील कुमार, साईनाथ लिंगाडे, हर्ष राई, सतीश चाम्कुरे, भावनेश्वर गोठवल, सतीश सारंग, नारायण नरवाडे, संतोष किनेवाड, आशिष भराडिया, हरिबा धुमाळ, श्रद्धा यशवंतकर, कोमल तायडे, सोनू गायकवाड, अशोक मोकळे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

==============================================
नाराज परशाचं चाहत्यांना आवाहन


नाराज परशाचं चाहत्यांना आवाहन
मुंबई : उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावणाऱ्या सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ‘सैराट’ सिनेमाने 11 दिवसांमध्ये तब्बल 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे सैराट हा मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

असं असलं तरी ‘सैराट’फेम परशा अर्थात आकाश ठोसर मात्र अत्यंत नाराज आहे. त्याचं कारणही तसंच आहे.

‘सैराट’लाही पायरसीचं ग्रहण लागल्याने परशा नाराज आहे. चाहत्यांनी मोबाईल किंवा घरी सीडीवर सिनेमा न पाहता, थिएटरमध्ये जाऊन पाहावा, असं आवाहन आकाश ठोसरने केलं आहे.

याशिवाय संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीचं फळ म्हणजे सैराटचं यश आहे, असं परशा अर्थात आकाश ठोसर म्हणाला.
सैराट टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
दरम्यान, प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमाच्या कलाकारांना भेटण्याचा मोह, खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवरता आला नाही. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री ‘सैराट’फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू, आणि परशा अर्थात आकाश ठोसर यांच्यासह संपूर्ण ‘सैराट’ टीमने मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली. 
मुख्यमंत्र्यांचा प्रश्न 
या भेटीदरम्यान डॅशिंग आर्चीला मुख्यमंत्र्यांनी पहिलाच प्रश्न विचारला तो म्हणजे, तू बुलेटवरुन आलीस का? या प्रश्नानंतर ‘वर्षा’वरील वातावरण अक्षरश: सैराटमय झालं. 
मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रिंकू म्हणाली, “मी बुलेटवरुन नाही, गाडीतून आले”. 
“मुख्यमंत्र्यांशी कधी भेट होईल, हे वाटलंच नव्हतं, पण ‘सैराट’मुळे भेट झाली. सैराटच्या यशामुळे खूप छान वाटतंय”, असं रिंकू म्हणाली.
 यावेळी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण टीमचं भरभरुन कौतुक केलं. तसंच ‘वर्षा’ बंगल्यावरील अनेक कर्मचाऱ्यांनीही आर्ची आणि परशासोबत फोटोसेशन केलं. 
याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह गृहराज्य मंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते. तर ‘सैराट’कडून दिग्दर्शक नागराज मंजुळे, निखिल साने आदी उपस्थित होते. 
मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा ‘सैराट’ 
सैराट हा मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘सैराट’नं अवघ्या 11 दिवसात तब्बल 41 कोटीची कमाई केली आहे. सैराटच्या या रेकॉर्डब्रेक कमाईनं ‘नटसम्राट’लाही मागं टाकलंय.
==============================================

फसवणूक करणाऱ्या 35 बिल्डरांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश

फसवणूक करणाऱ्या 35 बिल्डरांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश
वसई : घराचं स्वप्न दाखवून फसवणूक करणाऱ्या 35 बिल्डरांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिला आहे.


नालासोपारा पश्चिमेला हुनमान नगरमधील 12 एकरवर 45 पेक्षा अधिक इमारती उभ्या आहेत. ही संपूर्ण जागा ना-विकास क्षेत्र अर्थात नॉन डेव्हलपमेंट झोन आहे. तरीही 35 पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे इमारती उभारल्या. तसंच नामांकित बँकांकडून कर्ज उपलब्ध करुन ग्राहकांना ही घरं विकण्यात आली.


यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील यांनी महापालिकेला वेळोवेळी माहिती दिली. मात्र कारवाई न झाल्याने मनोज पाटील यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे तक्रार केली. यानंतर आता फसवणूक करणाऱ्या 35 बिल्डरांवर नालासोपाऱ्यात गुन्हा दाखल होणार आहे.
==============================================

डॅशिंग आर्चीला मुख्यमंत्र्यांचा पहिला प्रश्न....

डॅशिंग आर्चीला मुख्यमंत्र्यांचा पहिला प्रश्न.....
मुंबई प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेल्या नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमाच्या कलाकारांना भेटण्याचा मोह, खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवरता आला नाही. राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री ‘सैराट’फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू, आणि परशा अर्थात आकाश ठोसर यांच्यासह संपूर्ण ‘सैराट’ टीमने मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांचा प्रश्न

या भेटीदरम्यान डॅशिंग आर्चीला मुख्यमंत्र्यांनी पहिलाच प्रश्न विचारला तो म्हणजे, तू बुलेटवरुन आलीस का? या प्रश्नानंतर ‘वर्षा’वरील वातावरण अक्षरश: सैराटमय झालं.

मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रिंकू म्हणाली, “मी बुलेटवरुन नाही, गाडीतून आले”.

“मुख्यमंत्र्यांशी कधी भेट होईल, हे वाटलंच नव्हतं, पण ‘सैराट’मुळे भेट झाली. सैराटच्या यशामुळे खूप छान वाटतंय”, असं रिंकू म्हणाली.

तर संपूर्ण टीमने घेतलेल्या मेहनतीचं फळ म्हणजे सैराटचं यश आहे, असं परशा अर्थात आकाश ठोसर म्हणाला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण टीमचं भरभरुन कौतुक केलं. तसंच ‘वर्षा’ बंगल्यावरील अनेक कर्मचाऱ्यांनीही आर्ची आणि परशासोबत फोटोसेशन केलं.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह गृहराज्य मंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते. तर ‘सैराट’कडून दिग्दर्शक नागराज मंजुळे, निखिल साने आदी उपस्थित होते.
==============================================

पुढील 5 दिवसांत राज्यात पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

पुढील 5 दिवसांत राज्यात पाऊस, हवामान खात्याचा अंदाज
पुणे राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांत पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाचा अंदाज आहे.

राज्यात सध्या पडत असलेला पाऊस, पूर्व मोसमी असून पुढील पाच दिवस हा पाऊस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भ-मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हा पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

मात्र, हा पाऊस सर्वदूर पडणार नाही. असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. 7 ते 15 जून दरम्यान मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होते. मात्र, 20 मे नंतरच मान्सूनच्या आगमनाची अचूक माहिती वर्तवली जाऊ शकेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
==============================================

बेळगावात शिवजयंतीनिमित्त मिरवणूक, गगनभेदी घोषणांसह ढोल पथकाचा दणदणाट

बेळगावात शिवजयंतीनिमित्त मिरवणूक, गगनभेदी घोषणांसह ढोल पथकाचा दणदणाट
बेळगाव : जय भवानी, जय शिवाजी’च्या गगनभेदी घोषणा, झांज, पथक आणि ढोल पथकाचा दणदणाट, चित्ररथावर साकारलेले शिवाजी महाराजांचे जिवंत देखावे, रस्त्यावर घोड्यावरून रपेट करणारे शिवाजी महाराजांमुळे शिवजयंतीची चित्ररथ मिरवणूक संस्मरणीय ठरली.

पाहा फोटो : बेळगावात शिवजयंतीची चित्ररथासह शानदार मिरवणूक

चित्ररथ मिरवणुकीच्यावेळी बेळगावातील रस्त्यावर साक्षात शिवसृष्टी अवतरल्याचा अनुभव शिवप्रेमींनी घेतला. ऐतिहासिक देखावे आणि समाज जागृती करणारे देखावेही शिवप्रेमींच्या उत्सुकतेचे विषय ठरले.

पाहा फोटो : बेळगावात शिवजयंतीची चित्ररथासह शानदार मिरवणूक

नरगुंदकर भावे चौकातील मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या मंडपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे पूजन अध्यक्ष दीपक दळवी, महापौर सरिता पाटील, उप महापौर संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार सुरेश अंगडी, जिल्हाधिकारी एन. जयराम, पोलिस आयुक्त सौमेंदू मुखर्जी, पालिका आयुक्त जी. प्रभू, कार्यकारी अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनीही आरतीत सहभाग घेतला.

पाहा फोटो : बेळगावात शिवजयंतीची चित्ररथासह शानदार मिरवणूक

पालखी निघाल्यावर चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ झाला. झांज पथक, ढोल पथक, वारकऱ्यांचे भजनी पथक, बँड, सनई-चौघडे चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल पथकातील तरुणीचा ढोल वाजविण्याचा जोश उपस्थितांची दाद मिळवून गेला. आग्र्याची सुटका, सिद्धी जोहरच्या वेढ्यातून बाहेर पडण्याचा प्रसंग, अफजल वध, शिवजन्म सोहळा, गुन्हेगारांना शिक्षा देणारे न्यायप्रिय शिवाजी महाराज, शत्रूंच्या महिलांनाही मानाची वागणूक देणारे शिवाजी महाराज, अफजल वधानंतर दिल्ली आणि विजापूर येथे उडालेला हाहा:कार असे नानाविध जिवंत प्रसंग चित्ररथ देखाव्याद्वारे सादर करण्यात आले.
==============================================

बांधावरची भांडणं संपवणारं पंढरपुरातील 101 मंदिरांचं शेत

बांधावरची भांडणं संपवणारं पंढरपुरातील 101 मंदिरांचं शेत!
पंढरपूर : महाराष्ट्रातील ग्रामीण भागात  बांधावरून होणाऱ्या वादामुळे शेतकऱ्यांचा निम्मावेळ पोलीस ठाण्यात आणि कोर्टाचे हेलपाटे मारण्यात जातो, असे म्हटलं तरी अतिशियोक्ती ठरणार नाही. ब्रिटिशांच्या काळात झालेल्या बांधाचे पिढ्या वाढतील तसे आडवे-उभे तुकडे पडत गेले. जमीन तेवढीच राहिली, मात्र पिढ्यात वाढत गेल्याने या जमिनीचे तुकडे वाढत गेले आणि त्याच्या जोडीला भाऊ बांधकीचा शाप जमिनी सोबत माणसातही विषारी फुट पाडू लागला. यातूनच बांधाचे वाद दिवसेंदिवस वाढत चालले.

आज न्यायालयातील बरेचसे दिवाणी दावे निव्वळ बांधावरील वादाचे आहेत. मात्र, बांधाच्या या वादातून कायमची सुटका करण्याचा अनोखा उपाय माढा तालुक्यातील अकोले येथील तोडकरी कुटुंबाने शोधला असून या उपायाने बांधावरच्या भांडणाला पूर्ण विराम मिळाला आहे.
==============================================

शाओमीचा धमाका, Mi max तीन व्हर्जनमध्ये लाँच

शाओमीचा धमाका, Mi max तीन व्हर्जनमध्ये लाँच
नवी दिल्लीः शाओमीच्या आगामी Mi max या स्मार्टफोनच्या लाँचिंगची सर्वांनाच उत्सुकता होती. Mi max हा मच अवेटेड स्मार्टफोन शाओमीने नुकताच चीनमध्ये लाँच केला आहे. फोनची मेटल बॉडी बॉडी असून 6.44 इंचचा डिस्प्ले दिलेला आहे. बाजारात हा फोन सिल्वरगोल्ड आणि डार्क ग्रे यां रंगांमध्ये उपलब्ध असेल. विशेष म्हणजे या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील असणार आहे.

Mi max तीन व्हर्जनमध्ये उपलब्ध

  • शाओमी Mi max बाजारत तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असेलअशी माहिती कंपनीने दिली आहे. त्यापैकी 3GB रॅम, 32 GB स्टोरेज आणि स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसर हेफीचर असणारं एक व्हर्जन असेल. याची किंमत जवळपास 1499 रुपये एवढी असणार आहे. 

  • तर 3 GB रॅम64 GB स्टोरेज आणि स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर असणाऱ्या व्हर्जनची किंमत 17 हजार रुपये असेल.

  • तसंच 4 GB रॅम128 GB स्टोरेज आणि स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर असणाऱ्या व्हर्जनची किंमत जवळपास 20 हजार 500 रुपये असेलअशी माहिती शाओमीने दिली आहे.

Mi max चे फीचर्स


Mi max चा रिअर कॅमेरा 16 मेगापिक्सेलतर फ्रंट कॅमेरा मेगापिक्सेल आहे. Mi max ला 4850 mAh एवढी जबरदस्त क्षमतेची बॅटरी असणार आहे. शिवाय या फोनमध्ये 4G आहे.

दरम्यानशाओमीने हा मोठा धमाका केला असला तरी, Mi max अजून केवळ चीनमध्ये लाँच झालेला आहे. त्यामुळे हा फोन भारतात कधी येणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.
==============================================

एक लाखाला 2 टक्के व्याज, 3 हजार लोकांना गंडा, गुंतवणूकदार हवालदिल

एक लाखाला 2 टक्के व्याज, 3 हजार लोकांना गंडा, गुंतवणूकदार हवालदिल
सोलापूर सोलापुरात गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या दांपत्याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. एका लाखाला दोन टक्के व्याजानं परतावा देण्याचं आमीष दाखवत जवळपास तीन हजार लोकांना या दाम्पत्यानं फसवलं गेलं आहे.

गुंतवणूकदार हवालदिल!

शेखर आणि सुकेशनी काटगावकर हे दोघेही गेल्या 10 वर्षांपासून शहरात फायनान्स चालवायचे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून फायनान्स कार्यालयाला टाळं लागल्याचं पाहून गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

Solapur 3विश्वासार्हता… गुंतवणुकीत वाढ… आणि फसवणूक!

फसवणूक करणारं दाम्पत्य प्रत्येक महिन्याला गुंतवणूकदारांना बोलावून व्याजाची रक्कम देत असत. फायनान्सची ही लोकप्रियता झपाट्याने वाढली. गुंतवणूकदारांची संख्याही दिवसागणिक वाढत गेली. दरमहा प्रामाणिकपणे व्याज मिळतं, अशी विश्वासार्हता निर्माण झाली. त्यामुळेच शहरातील श्रामिकांपासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांनीच रकमा गुंतवल्या. शेवटी व्हायचं तेच झालं… व्याज मिळण बंद झाल्याने लोकांनी मुद्दल परत मिळवण्याचा आग्रह धरला होता. रोज उठून गुंतवणूकदार फायनान्सला जमायचे.
==============================================

उल्हासनगरमध्ये टोळक्याकडून तरुणाची भोकसून हत्या

उल्हासनगरमध्ये टोळक्याकडून तरुणाची भोकसून हत्या
कल्याण : उल्हासनगरमध्ये एका 32 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. दीपक संसारे असं मृत तरुणाचं नाव आहे. पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

सी ब्लॉक जवळच्या कलानी कॉलेज रोडवरील शिव मंदिर परिसरात मंगळवारी रात्री 5 ते 6 जणांनी दीपक संसारेची धारदार शास्त्राने हत्या केली

या घटनेबाबत कळताच शहरातील नागरिकांनी नेहरु चौकातील रस्त्यावरील 25 ते 30 वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या हत्येचा तपास करत आहेत.
==============================================

'सैराट'ची रेकॉर्डब्रेक कमाई, 11 दिवसात 'नटसम्राट'ला धोबीपछाड

'सैराट'ची रेकॉर्डब्रेक कमाई, 11 दिवसात 'नटसम्राट'ला धोबीपछाड
मुंबई : नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाने आपल्या विक्रमांची घौडदौड सुरुच ठेवली आहे. ‘सैराट’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 11 दिवसांमध्ये तब्बल 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सैराट हा मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.


उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावणाऱ्या सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सैराटने नटसम्राट चित्रपटालाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे.


परशा आणि आर्चीच्या संवेदनशील लव्हस्टोरीला प्रेक्षकांनी अक्षरश : डोक्यावर घेतलं आहे. त्याचाच परिणाम म्हणून ‘सैराट’ने पहिल्या आठवड्यात 25 कोटींचा टप्पा पार केला होता.


महत्त्वाचं म्हणजे पहिल्या विकेंडला म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसात तब्बल 12.20 कोटींचा गल्ला जमवला होता.


‘सैराट’ने पहिल्या आठवड्यातील शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 3.80 कोटी आणि रविवारी 4.85 कोटी आणि सोमवारी 2.90 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे अवघ्या चार दिवसात सैराटची कमाई 15.10 कोटी रुपयांवर गेली.
==============================================

46 वर्षांच्या संसारानंतर 70 व्या वर्षी पहिल्यांदा मातृत्व

46 वर्षांच्या संसारानंतर 70 व्या वर्षी पहिल्यांदा मातृत्व
नवी दिल्ली :  दलजिंदर कौर या आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने वयाच्या 70 व्या वर्षी आई झाल्या आहेत. दलजिंदर यांनी मुलाला जन्म दिला असून बाळ-बाळंतिण सुखरुप असल्याची माहिती आहे.

आयव्हीएफद्वारे दलजिंदर यांना मातृत्व लाभण्याबाबत डॉक्टरांनी साशंकता व्यक्त केली होती. मात्र काही आवश्यक चाचण्यांनंतर हे शक्य झालं. आपलं आयुष्य पूर्ण झाल्याचं सांगत दलजिंदर यांनी पहिल्यांदा आई होण्यासाठी वय उलटून गेलं नसल्याचं म्हटलं.

हरियाणामध्ये राहणाऱ्या दलजिंदर यांचे पती मोहिंदर सिंग गिल 79 वर्षांचे आहेत. दोन वर्षांच्या ट्रीटमेंटनंतर गेल्या महिन्यात या दाम्पत्याला बाळ झालं. 46 वर्षांच्या संसारात त्यांनी बाळ होण्याच्या आशा गमावल्या होत्या.

‘देवाने आमची प्रार्थना ऐकली. माझं आयुष्य पूर्ण झालं. मीच बाळाची काळजी घेते. माझ्यात एक वेगळाच उत्साह संचारला आहे. माझे पतीही खूप काळजी घेतात, आणि शक्य तितकी मदत करतात’ असं दलजिंदर कौर सांगतात.

‘मी जेव्हा आयव्हीएफ तंत्रज्ञानाची जाहिरात पाहिली, तेव्हा माझ्याही मनात आशेची पालवी फुटली. मला मातृत्वाची ओढ लागली होती, त्यामुळे आम्ही एकदा प्रयत्न करायचं ठरवलं.’ अशा शब्दात त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
==============================================

तावडेंनी माझ्या मुलाची फसवणूक केली, पालक पोलिसात

तावडेंनी माझ्या मुलाची फसवणूक केली, पालक पोलिसात
बीड : नीट परीक्षेवरुन विरोधकांच्या टीकेचं लक्ष झालेले शिक्षणमंत्री विनोद तावडेंविरोधात आता अंबाजोगाईत पोलिस तक्रार झाली आहे. एका विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांमध्ये तावडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि प्रविण शिनगारे यांनी जाणीवपूर्वक माझ्या मुलाची फसवणूक केली, असं तक्रारीत म्हटलं आहे. संपूर्ण देशात नीट लागू करावी असा आदेश असताना माझ्या मुलाला एमएचसीईटीचा फॉर्म भरण्यास भाग पाडल्याचा दावा यात करण्यात
आला आहे.

कोर्टाने नीट परीक्षा अनिवार्य केल्यानं माझ्या मुलाची फसवणूक झाली, असं संबंधित पालकांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
==============================================

उत्तराखंड शक्तिपरीक्षेत काँग्रेसच विजयी! हरीश रावत पुन्हा बनणार CM


  • ऑनलाइन लोकमत
    डेहराडून, दि. ११ -  संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षेत काँग्रेसच विजयी झाली असून हरीश रावत यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उत्तराखंडमधील हा पराभव भाजपा आणि मोदी सरकारला मात्र मोठी चपराक मानली जात आहे. अॅटर्नी जनरल मुकू रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती सादर केली असून उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट आजच उठवण्यात येईल, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.
    मंगळवारी उत्तराखंड विधासभेत ही बहुमत चाचणी पार पडली, तेव्हाच काँग्रेसने विजयाचा दावा केला होता. हरीश रावत यांच्या बाजूने ३३ तर भाजपाच्या बाजूने २८ मते मिळाली.
    मात्र मतदानाच्या आधी काँग्रेसच्या रेखा आर्य भाजपाच्या गटात दाखल झाल्या, तर भाजपाने निलंबित केलेले बंडखोर आ. भीमलाल आर्य काँग्रेसच्या कळपात गेले. बसपा तसेच अन्य चार सदस्यांनी रावत यांच्या बाजूनेच मतदान केले. काँग्रेसचे २७ व हे ६ मिळून ३३ हा जादुई आकडा मिळवण्यात रावत सरकार यशस्वी ठरले.
==============================================

कॉल ड्रॉप झाल्यास नुकसानभरपाईचा आदेश SC कडून रद्द, ग्राहकांना झटका


  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. ११ -  मोबाइल कॉल ड्रॉप झाल्यास दूरसंचार कंपन्यांनी ग्राहकाला नुकसान भरपाई द्यावी हा दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (TRAI) आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. 
    ग्राहकांच्या हितासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरणने कॉल ड्रॉप झाल्यास दूरसंचार कंपन्यांना दंड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाविरोधात दूरसंचार कंपन्यांनी कोर्टात धाव घेतली. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने ट्रायचा निर्णय योग्य ठरवला. त्याविरोधात कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असता न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली होती. अखेर आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने 'ट्राय'चा हा निर्णय निरर्थक असल्याचे सांगत तो रद्द केला आहे. 
==============================================

मुंबईत रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये शांताबाई, रिक्षावाला गाण्यांवर डान्स


  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. ११ - हॉस्पिटल हे रुग्णावर उपचार करण्याचे ठिकाण. आजारी रुग्णाला त्रास होऊ नये म्हणून तिथे शांतता पाळली जाते. पण मुंबईतील एका रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली नाचगाणी झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 
    मुंबई मिररच्या वृत्तानुसार चेंबूरच्या दीवालीबेन मेहता हॉस्पिटलच्या ओपीडीमध्ये दोन मार्च रोजी हळदीकुंकू समारंभ झाला. यावेळी स्पीकर्सवर गाणी वाजवण्यात आली. त्यावर रुग्णलाच्या कर्मचारी त्यांच्या मुलांनी नृत्याचे कार्यक्रम सादर केले. मुंबई महापालिकेने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 
    रुग्णालयातील वीस पेक्षा जास्त महिला कर्मचारी, डॉक्टर, परिचारीका आणि चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी चौकशीला सामोरे जात आहेत. कार्यक्रमानंतर काही दिवसांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला अज्ञात स्त्रोताकडून या कार्यक्रमाचा व्हिडीओ मिळाला. तक्रारदाराने केलेल्या आरोपानुसार दोन मार्चला पहिल्या मजल्यावरील ओपीडीमध्ये सकाळी दहावाजता कार्यक्रमाची तयारी सुरु झाली. कर्मचारी स्पीकर्सचा आवाज तपासत होते. नाश्ता आणि भिंतीची सजावट सुरु होती. दुपारनंतर ओपीडी डान्स फ्लोअरमध्ये बदलली. शांता बाई, रिक्षावाला या गाण्यांवर कर्मचा-यांनी ठेका धरला. 
    जे रुग्ण तपासणीसाठी आले होते त्यांना तळमजल्यावरील ओपीडीमध्ये पाठवण्यात आले. काहीजणांना दुस-या दिवशी या सांगण्यात आले. तक्रारदाराच्या आरोपानुसार कार्यक्रमाच्या दिवशी दोन ओपीडींमध्ये मिळून  ३७७ रुग्ण तपासण्यात आले. इतर दिवशी आठशे रुग्ण तपासले जातात. 
==============================================

विजय मल्ल्यांना देशाबाहेर काढू शकत नाही -ब्रिटीश सरकारने फेटाळली मागणी


  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. ११ - बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बूडवून देशाबाहेर पळालेले विजय मल्ल्या हे इतक्यात तरी भारतात परतण्याची चिन्हे दिसत नाहीत. सरकारने जरी त्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द केला असला तरीही मल्या यांना भारतात परत पाठवू शकत नाही, असे सांगत ब्रिटीश सरकारने केंद्र सरकारची मागणी फेटाळली. मल्ल्या यांचे हस्तांतरण शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र असे असले तरीही मल्ल्या यांच्यावर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांची ब्रिटन सरकारला पूर्ण कल्पना असून त्यांनी भारत सरकारला मदत करण्यास पूर्णपणे तयारी दाखवली आहे. 
    तीनवेळा समन्स बजावूनही विजय मल्ल्या हजर न झाल्यामुळे सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाला त्यांचा पासपोर्ट रद्द किंवा हस्तगत करावा, असे कळविले होते, त्यानुसार गेल्या महिन्यात मल्ल्या यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आला होता. पासपोर्ट रद्द झाल्यामुळे परदेशातील त्यांचे वास्तव्य बेकायदा ठरून त्यांना मायदेशी परतणे भाग पडेल, असा अधिका-यांचा होरा होता. मात्र ब्रिटन सरकारने त्यांना देशाबाहेर घालवण्यास नकार दर्शवला असून याप्रकरणी भारत सरकारने कायदेशीर मदत घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिल्याचे परराषष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी नमूद केले. 
==============================================

रुग्णवाहिकेने चार तासांत गाठले पुणे


  • नाशिक : उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णाचे दान केलेले अवयव ग्रीन कॉरिडोरमुळे केवळ चार तासांत नाशिकहून पुण्याला रवाना करण्यात आले. पुण्यात गरजू रुग्णांना त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले.
    शनिवारी शोभा शंकर लोणारे (५३, रा. सिन्नर) यांना नाशिकच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना ऋषिकेश रुग्णालयात हलविले. मंगळवारी पहाटे लोणारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर यकृत, मूत्रपिंड, डोळे हे अवयव सुरक्षितपणे डॉक्टरांनी काढले. पावणे बारा वाजता यकृत व एक मूत्रपिंड घेऊन रुग्णवाहिका ‘ग्रीन कॉरिडोर’च्या मदतीने पुणे येथील सह्याद्री डेक्कन रुग्णालयात पोहचली. ३०० किमी अंतर सव्वा चार तासांमध्ये पूर्ण करण्यात आले. साधारणपणे या प्रवासाला पाच तास लागतात.
    पुणे येथे यकृत प्रत्यारोपणासाठी सह्याद्रीच्या पथकाने वैद्यक ीय प्रक्रिया सुरू केली. तर दीनानाथ व
    ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. सुशील नेत्र रुग्णालयाकडे
    गरजुंसाठी डोळे पाठविण्यात आले. पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधून पहिल्यांदाच ‘ग्रीन कॉरिडोर’ मोहिम राबविण्यात आली.
==============================================

मुंबईत २५ टक्के विमानांना विलंब


  • प्रमोद गवळी, नवी दिल्ली
    मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने एअर इंडियाला ९० टक्के आॅन टाइम परफॉर्मन्सचे (वेळेवर उड्डाण) लक्ष्य निर्धारित करण्यास सांगितले होते, परंतु त्याचा परिणाम अद्यापही दिसलेला नाही. त्यामुळे या विमान कंपनीचा ओटीपी आजदेखील ७९ टक्क्यांच्या वर नाही. मुंबईतून उड्डाण करणाऱ्या विमानांचा ओटीपी त्यापेक्षाही कमी म्हणजे ७४.८ टक्के आहे.
    नागरी उड्डयण राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. शर्मा बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘१ एप्रिल २०१५ पासून तर ३१ मार्च २०१६ पर्यंतच्या काळात एयर इंडियाच्या नेटवर्कअंतर्गत एकूण १,५१,९९० उड्डाणे करण्यात आली. त्यात ३२,८४३ उड्डाणे अशी आहेत की, ज्यांची १५ मिनिटांपेक्षा जास्त विलंबाने उड्डाण केले आहे. याच काळात मुंबईवरून २२,४०१ पैकी ५६०३ उड्डाणांना १५ मिनिटांपेक्षा जास्त विलंब झाला होता.’
    विमान उड्डाणांमध्ये होणाऱ्या विलंबामागे ‘रिअ‍ॅक्शनरी’चे सर्वांत मोठे योगदान आहे. याचा अर्थ, आधी येणारे विमान उशिरा पोहोचले की, दुसऱ्या विमानाला विलंब होतो किंवा एखाद्या विमानाने उशिरा उड्डाण केले की, त्यानंतरच्या दुसऱ्या विमानाच्या उड्डाणासही उशीर होतो. धावपट्टी ०९/२७ ची घोषित क्षमता प्रतितास ४५ विमाने आवागमन आणि धावपट्टी १४/३२ ची घोषित क्षमता प्रतितास ३५ विमाने आवागमन एवढी आहे. संचालनासाठी एका वेळी केवळ एकाच धावपट्टीचा वापर केला जाऊ शकतो,’ असे डॉ. शर्मा यांनी या वेळी सांगितले.
    >डॉ. शर्मा म्हणाले, ‘सर्व ए ३२० फॅमिली विमाने उड्डाणयोग्य आहेत. कारण अनुमोदित अनुसूची अथवा कार्यक्रमानुसार त्यांची देखभाल केली जाते. त्यामुळे या विमानांबाबत कसलीही समस्या नाही. एअर इंडियात १४ नवीन ‘ए ३२०’ विमाने खरेदी करण्याचा निर्णय एअर इंडिया बोर्डने नुकताच घेतलेला आहे.’
==============================================

दिराने केला वहिनीवर बलात्कार


  • मुंबई : दिराने आपल्या २३ वर्षीय वहिनीवर बलात्कार केल्याची नात्याला काळीमा फासणारी घटना अँटॉप हिल येथे घडली. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी नरेंद्र शुक्ला या दिराला मंगळवारी अटक केली आहे. अँटॉप हिल परीसरात तक्रारदार महिला पती, सासू, सासरे आणि दिरासोबत राहाते. ३ मे रोजी घरातली मंडळी बाहेर गेली असताना, त्याने वहिनीवर बलात्कार केला. रात्री घरी परतलेल्या पतीला तिने झालेला प्रकार सांगितला. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.
==============================================

हमीपत्रे घेऊन आठ डान्सबार परवाने द्या’


  • नवी दिल्ली: डान्सबारसाठी अर्ज केलेल्या मुंबईतील आठ हॉटेलचालकांनी, प्रत्यक्ष डान्स फ्लोअरवर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कर्मचारी नेमणार नाही, असे लेखी हमीपत्र उद्या बुधवारी द्यावे व त्यानंतर राज्य सरकारने त्यांना गुरुवारी डान्सबारचे परवाने जारी करावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.
    इंडियन हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशनने केलेल्या याचिकेवर न्या. दीपक मिश्रा आणि न्या. शिव किर्ती सिंग यांच्या खंडपीठाने हा आदेश देऊन त्याची अंमलबजावणी होते की नाही याची खात्री करण्यासाठी पुढील सुनावणी शुक्रवारी १३ मे रोजी ठेवली.
    अशी हमीपत्रे दिल्यावर ज्यांना परवाने मिळणे अपेक्षित आहे त्यांत एमआरए मार्ग व आझाद मैदानाजवळील प्रत्येकी एका व अंधेरीतील सात डान्सबारचा समावेश आहे.
==============================================
अमिताभ यांची पुन्हा आयटी विभागाकडून चौकशी


नवी दिल्ली - बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या 2001-02 या कालावधीतील उत्पन्नाचे पुनर्मुल्यांकन करण्याची परवानगी आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर विभागाला दिली.

अमिताभ यांना 2001-2002 मध्ये ‘कौन बनेगा करोडपती‘साठी मिळालेल्या उत्पन्नाची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश आता प्राप्तिकर विभागाला मिळाले आहेत. त्यावेळी अमिताभ यांना प्राप्तिकरात सूट देण्यात आली होती.  

त्यावेळी प्राप्तिकर विभागाने चौकशीसाठी याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने बच्चन यांच्या बाजूने निकाल देत दिलासा दिला होता. प्राप्तिकर विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
==============================================
कुपवाडामध्ये चकमकीत पोलिस जवान हुतात्मा


श्रीनगर - उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात आज (बुधवार) पहाटेपासून सुरु असलेल्या चकमकीत दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक पोलिस जवान हुतात्मा झाला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा भागातील जंगलात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. या गोळीबारात 
ओमवीर सिंह हा जवान जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिस आणि लष्करी जवान यांच्याकडून याठिकाणी शोधमोहिम करण्यात येत आहे. अद्याप काही दहशतवादी या भागात लपल्याची माहिती आहे.
==============================================
सकारात्मक बदलासाठी तंत्रज्ञान वापरा - मोदी


नवी दिल्ली - समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या ट्‌विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदी यांनी ट्‌विटरद्वारे दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, "सर्व नागरिकांना विशेषत: वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाचे आकर्षण असलेल्यांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या दैनंदिन कामकाजात आणि समाजामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करायला हवा. जय जवान, जय किसान, जय विज्ञान!‘

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजधानी दिल्लीत ‘टेक्‍नॉलॉजी इनेबल्स ऑफ स्टार्टअप इंडिया‘ या विषयावर एका कार्यक्रमासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्ष वर्धन हे दिल्लीत आयोजित विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी देशभरात 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो.
==============================================
पाक क्रिकेट सुधारावे अन्यथा पद सोडावे-अख्तर


कराची - आगामी आठ महिन्यांत पाकिस्तान क्रिकेट संघाचे नवनियुक्त प्रशिक्षख मिकी आर्थर यांनी पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदल घडवून आणावा अन्यथा त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हमून काम केलेल्या मिकी आर्थर यांची पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) निवड केली आहे. वकार युनूस यांना पदावरून हटवून पीसीबीने आर्थर यांना निवडले आहे. पाकिस्तान संघाची गेल्या काही वर्षांतील कामगिरी खराब झालेली आहे. त्यांना ट्वेंटी-20 विश्वकरंडकातही साखळीतूनच बाहेर पडावे लागले होते.

अख्तर म्हणाला की, आर्थर यांनी येत्या आठ महिन्यांत इतरांपेक्षा वेग काम करून पाकिस्तान क्रिकेट सुधारावे. या काळात पाकिस्तानचा संघ अनेक महत्त्वाच्या मालिकांत खेळणार आहे. आर्थर यांनी खेळाडूंच्या मानसिकतेत बदल करून त्यांना सर्वोच्च खेळ करण्यासाठी तयार केले पाहिजे. त्यांनी पाक क्रिकेटमध्ये बदल न केल्यास त्यांनी गुडबाय म्हणावे.
==============================================
बचत खात्यावर शून्य रक्कम असल्यास दंड नाही


मुंबई - बॅंकेतील बचत खात्यात काहीच (शून्य) रक्कम शिल्लक नसल्यास बँक दंड म्हणून त्याच्या खात्यावरील रक्कम उणे (मायनस) करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) घेतला आहे.

आरबीआयने या संदर्भात बँकांना दिलेल्या सूचनेनुसार, बचत खात्यातील किमान रक्कम (मिनिमम बॅलेन्स) शून्य झाल्यानंतर देखभाल शुल्क (मेंटनंन्स चार्जेस) न आकारण्याचे आदेश दिले आहेत. बचत खात्यात रक्कम शिल्लक नसताना त्यावर कोणतीही बॅंक दंड किंवा शुल्क आकारत असल्यास ग्राहक त्याची आरबीआयकडे तक्रार करू शकतो. पगार जमा होणार्‍या खात्याबाबत अशा तक्रारी जास्त आहेत. नोकरी देणारी कंपनी कर्मचाऱ्याचे नवीन बॅंक खाते उघडते. मात्र बर्‍याचदा कर्मचाऱ्याने नोकरी बदलल्यानंतर पगारी खात्याचे बचत खात्यात रुपांतर केले जाते. मग त्यावर देखभाल शुल्काचा नियम लागू केला जातो. यामुळे मात्र बचत खात्यात उणे रक्कम (मायनस बॅलेन्स) दाखवली जाते. 

एप्रिल 2015 पासून आरबीआयने बँकांना तसे न करण्याची सूचना दिली होती. आता त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. ज्या ग्राहकाच्या बचत खात्यात रक्कम शिल्ल्क नसेल अश्या ग्राहकांना आगाऊ सूचना देण्यास सांगितले आहे. 
==============================================

No comments: