=========================================
काँग्रेस नेत्या प्रिया दत्त मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला
मुंबई : काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र काँग्रेसच्या कार्यक्रमात शिवसैनिकांच्या राड्यामुळे ही भेट घेतल्याची माहिती आहे.
काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. शनिवारी रात्री कांदिवलीतील काँग्रेसच्या कार्यक्रमात शिवसैनिकांनी घातलेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आहे.
मात्र काँग्रेसच्या खासदार शिवसेना पक्षप्रमुखांच्या भेटीला आल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात होते.
=========================================
पावसाची एन्ट्री लांबणीवर, 7 जूनला केरळात येणार
नवी दिल्ली : यंदा चांगल्या पावसाचं भाकित हवामान विभागानं दिलेलं असलं तरी मान्सूनचं आगमन मात्र काहीसं लांबण्याची शक्यता आहे.
केरळात 7 जूनच्या आसपास मान्सून दाखल होईल, असा अंदाज आज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातलं मान्सूनचं आगमनही थोडं लांबण्याची चिन्हं आहेत.
साधारणपणे मे च्या शेवटी मान्सून केरळात दाखल होतो आणि जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मान्सून कोकण किनारपट्टीवर प्रवेश करतो.
याशिवाय 17 मे च्या आसपास म्हणजे परवा मान्सून अंदमान निकोबार बेटांवर धडकेल, असा अंदाजही भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे.
=========================================
प. बंगालमध्ये गंगा नदीत बोट उलटून अनेक जण बुडल्याची भीती
कोलकाता : पश्चिम बंगालमधील वर्धमानमध्ये गंगा नदीत बोट उलटून अपघात झाला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली असून अनेक जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वर्धमान ते शांतिपूर दरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्या या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसले होते. 60 ते 70 प्रवासी नेण्याची क्षमता असलेल्या या बोटीमध्ये दीडशेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याचं म्हटलं जातं. यापैकी पाच जण अद्यापही बेपत्ता आहेत.
दरम्यान पोलिसांनी आणि प्रशासनानं क्षमतेपेक्षा जास्त लोकांना वाहून नेणाऱ्या बोटींकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये एक पोलिस निरीक्षक आणि एक पोलीस शिपाई जखमी झाला आहे.
शनिवारी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरु न झाल्याने शांतिपूर घाटावर संतप्त नागरिकांनी बोट पेटवून निषेध केला.
=========================================
'बेवॉच'च्या सेटवर प्रियंका चोप्रा जखमी
मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिचा आगामी हॉलिवूडपट ‘बेवॉच’च्या सेटवर जखमी झाल्याची माहिती आहे. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन प्रियंकाने त्याबाबत संकेत दिले आहेत.
पहिल्या फोटोमध्ये प्रियंकाने फर्स्ट एड किट आणि काही औषधं दाखवली आहेत. कामावर असताना झालेल्या दुखापतींचा उपचार, असं कॅप्शन त्याने दिलं आहे.
=========================================
जम्मू-काश्मीरमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्याकडे आधार कार्ड
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बारामूला पोलिसांनी अब्दुल रहमान नावाच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दहशतवाद्याकडे आधार कार्ड सापडला आहे. पोलिसांनी या आधार कार्डचा तपास सुरु केला असून, दहशतवाद्याकडे आधार कार्डवर 647856225315 हा क्रमांक आहे.
दहशतवाद्याकडे सापडलेल्या आधार कार्डवर अब्दुल रहमान या दहशदवाद्याचा फोटो आहे, मात्र नाव नाही. अब्दुल रहमानला बनावट आधार कार्ड कसा मिळाला, याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. अब्दुल रहमान पाकव्याप्त काश्मीरमधील पुँछ भागातील रहिवाशी आहे.
दहशतवादी अब्दुल रहमानला शुक्रवारी संध्याकाळी बारामूलाच्या बाजीबलमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं. अब्दुल रहमान जैश-ए-मोहम्मद या दहशदवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळते आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पठाणकोट हल्ल्यामध्येही अब्दुल रहमानचा सहभाग होता. पोलीस या सर्व बाबींची सखोल चौकशी करत आहेत.
=========================================
"नीटमुळे विद्यार्थांनी आत्महत्या केल्यास सरकारवर गुन्हा दाखल करा"
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १५ : कोंचिंग क्लास्सेस जर नीटच्या तयारीसाठी पैसे मागत असतील तर त्यांच्यावर करवाई करा. त्यांचे परवाने रद्द करा असे आव्हान नितेश राणे यांनी केले आहे. यासंबधीत त्यांनी तातडीची पत्रकार परिषेदेत आयोजित केली आहे. त्यांनी हा माहीती आपल्या ट्विटरवरुन दिली. राज ठाकरे, मुख्यमंत्री यांनी न्यायालयाच्या निर्णायावर नारीजी व्यक्त केल्यानंतर या यादीत आता नितेश राणे यांची भर पडली आहे. नितेश यांनी त्यांच्या पुढील ट्विटमध्ये सरकार आणि विनोद तावडे यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. नीट परीक्षेच्या अभ्यासाच्या तानतनावामुळे विद्यार्थांच्या आत्महत्या झाल्यास सरकार आणि तावड़े यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा असे त्यांनी आव्हान केले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार २४ जुलै रोजी ह्यनीटह्ण परीक्षा घ्यावीच लागली, तर परीक्षेला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार १९ मेपासून विद्यार्थ्यांना धडे देण्याची तयारी करत आहे. त्यासाठी टी.व्ही. आणि इंटरनेटचे माध्यम वापरणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी दिली होती.
=========================================
पुण्याच्या विमानतळासाठी 15 एकर जमीन देणार - मनोहर पर्रीकर
- ऑनलाइन लोकमतपुणे, दि. १५ : पुण्याच्या लोहगाव येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाची 15 एकर जमीन एअरपोर्ट एथोरिटीला देन्याचा निर्णय घेण्यात आला असून विमानतळाबाहेरील रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक परवानग्या 31 मे पर्यंत देण्यात येतील अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.गेल्या दोन वर्षात केलेल्या उपाययोजनांमुळे प्रवासी संख्या 30 टक्क्यांनी वाढल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या पुण्यामधून 55 लाख प्रवासी 66 शेड्युल्ड विमानांद्वारे प्रवास करतात. विमानतळ आणि हवाई दलाच्या सुरक्षेचा विचार करता एका निश्चित वेळेत विस्तारीकरणाचे काम पूर्ण करावे लागणार आहे. फेज 2 साठी पुढील 3 महिन्यात निर्णय घेऊन विस्तारीकरणाला सुरुवात करण्यात येईल. तर फेज एकमध्ये सध्याच्या विमानतळाच्या जागेत 30 ते 40 टक्क्यांची वाढ करणार आहोत. त्यासाठी 15. 84 एकर जमीन हवाई दल एअरपोर्ट एथोरिटीला भाड्याने देणार आहे. रस्त्याच्या विस्तारीकरणा दरम्यान भूमिगत केबल आणि पाईपलाईन हलवण्याचे काम करावे लागणार आहे. सुरक्षेचा विचार करून हवाई दल, एअरपोर्ट एथोरिटी यांच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार योगेश टिळेकर, जगदीश मुळीक उपस्थित होते
=========================================
तिकीटबारीवर ‘सैराट’ सुसाट ; ५५ कोटींची केली कमाई
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १५ : प्रेषकांनी डोक्यावर घेतलेल्या नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाने आपल्या विक्रमांची घौडदौड सुरुच ठेवली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अद्भूत अशी कामगिरी करत सैराट या चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला जमविण्याचा मान पटकाविला आहे. तीन आठवड्यांत ५५ कोटींची कमाई करत ५० कोटींच्यावर कमाई करण्याचा पहिला मान सैराटला मिळालायं. आर्ची आणि परशाची ही प्रेमकथा अजूनही राज्यभरातील चित्रपटगृहांमधून हाऊसफुल्ल गर्दी खेचते आहे. सैराट ची जादू अजूनही कायम असून प्रेक्षक ३-३ वेळा सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहातायंत. यापूर्वी महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट चित्रपटाने तीन आठवडय़ांत ४० कोटींची कमाई केली होती. सैराटने कमीतकमी दिवसांत हा आकडा पार करत सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून आपले नाव कोरले आहे.यापूर्वी नटसम्राटने एका आठवड्यात १६ कोटी ५० लाख रुपयांची कमाई केली होती. तर नऊ दिवसात नानाचा नटसम्राट २२ कोटीच्या पार गेला होता. चौथ्या आठवड्यात हा आकडा ३५ कोटींच्या घरात गेला होता. मात्र हा आकडा सैराटने अवघ्या १० दिवसांतच पार करून नवा विक्रम केला आहे. सैराट सिनेमाने तिकिट खिडकीवर पहिल्या आठवड्यात तब्बल २५ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात कुठल्याही मराठी सिनेमाचीही सर्वाधिक कमाई आहे.सैराट हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच फार चर्चेत होता. चित्रपटातील गाणी, ट्रेलर यांची झिंग प्रेक्षकांवर चढल्यामुळे सिनेमागृहाच्या बाहेर प्रेक्षकांनी अॅडव्हान्स बुकिंगसाठी रांगा लावल्या होत्या. तीन दिवसांपूर्वीच चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले , आठवडाभराची तिकिटे बुक झाली होती. ही परिस्थिती फक्त पुणे-मुंबईपुरतीच मर्यादित नव्हती, तर राज्यभरात सैराटला हाच रिस्पॉन्स मिळत होता.अगदी खेड्यापाड्यात कधी सिनेमागृहात न गेलेला माणूसही आज सैराट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिकीट खिडकीवर जात आहे. सैराटचे पहिल्या दिवशीच जबरदस्त ओपनिंग मिळाले अन् या सिनेमाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. सैराट महाराष्ट्रात ९८० ते १,२०० स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता. पहिल्याच दिवशी या सिनेमाने ४.२३ करोड, तर दुसऱ्या दिवशी ५.१० करोड अन् तिसऱ्या दिवशी ६.५० करोड व चौथ्या दिवशी ३ करोड, असे तीन ते चार दिवसांचेच कलेक्शन जवळपास १५ ते १९ करोडपर्यंत होते.सैराट हा नागराज मंजुळेचा दुसरा चित्रपट. सैराट आणि फँड्री या दोन्हीचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही. पण या दोन्ही चित्रपटांचे शेवट हा दोन्हीतला सामायिक धागा आहे. या दोन्हीत 'नागराज टच' आहे. सैराट ही गोष्ट आहे अर्ची आणि परशाची. एका गावात राहणारे एकमेकांच्या प्रेमात पडतात. अर्ची एका श्रीमंत घराण्यात राहणारी तर परशा अत्यंत गरीब घरात जन्मलेला. या दोघांच्या प्रेमाला त्यांच्या परिवाराचा विरोध आहे. समाजही या दोघांच्या नात्यांना स्वीकारत नाही. आज समाज प्रगती करतोय. जग पुढे चाललंय. विचारसरणी बदलतेय. अनेक जुन्या रुढी परंपरा मागे टाकून प्रगतीच्या दिशेनं प्रत्येक जण वाटचाल करतोय.. अशातच गरीब श्रीमंत, जात- पात, धर्मांच्या नावावर आजही भेद भाव करणारी मानसिकता अस्तित्वात आहे हे या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.दरम्यान, यापूर्वी नटसम्राटने एका आठवड्यात 16 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली होती. तर नऊ दिवसात नानाचा नटसम्राट 22 कोटीच्या पार गेला होता. चौथ्या आठवड्यात हा आकडा 35 कोटींच्या घरात गेला होता. दुसरीकडे कट्यार काळजात घुसली या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 7 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर रितेश देशमुखच्या लय भारीने चार दिवसात 12.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. लय भारीने प्रदर्शनाच्या दिवशी 3 कोटी 10 लाख, शनिवारी 3 कोटी 60 लाख, रविवारी 3 कोटी 85 लाख आणि सोमवारी 2 कोटी 15 लाखांचा गल्ला जमवला होता.
=========================================
दोन तासात १५ घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १५ : कांजुरमार्ग पाठोपाठ भांडुप शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या इमारतीमधील घराचा कडी कोयंडा तोडून घरफोडी करण्यात आली.अवघ्या दोन तासात १५ घरे फोडली असून लाखोंचा ऐवज चोरांनी लंपास कोला आहे, घरातील महिला बाहेर गेल्यानंतर ही चोरीची घटना घडली आहे. यासंबधीत चार संशयितांचा चेहरा कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. चोरट्यांनी अगदी शिताफिने घरावर नजर ठेवून चोऱ्या केल्या आहेत. भरदिवसा ही चोरीची घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
=========================================
लग्नानंतर महिन्याभरातच युवकाचा अपघाती मृत्यू
- ऑनलाइन लोकमतपेठ, दि. १५ - लग्नाला एक महिनाही उलटला नाही तोच युवकाला अपघाती मृत्यूला सामोरे जावे लागल्याने संसाराचा डाव अर्ध्यावर मोडल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. पेठ येथील मच्छी व्यापारी धर्मराज वायडे वय २७ याचा १७ एप्रिल रोजी विवाह झाला.शनिवारी रात्री साडेबारा वाजता आपल्या ओमनी कारने सुतार पाडा गुजरात येथून माल घेऊन पेठकडे येत असतांना वांगणीजवळ इंधन संपल्याने रस्त्याच्या कडेला वाहन ऊभे करून इंधन भरत असतांना गुजरातकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने वायडे यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने शेजारीच उभे असलेले वायडे गंभीर जखमी झाले.परिसरातील नागरिकांनी त्यास पेठच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.याबाबत पेठ पोलीसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कोठूळे, तुंगार अधिक तपास करीत आहेत.
=========================================
भाजपा खासदारांकडून लातूरच्या दुष्काळाची पाहणी सुरु
- ऑनलाइन लोकमतलातूर, दि. १५ : दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या लातूर जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह १३ खासदार रविवारी सकाळी ग्रामीण भागात दाखल झाले आहेत़ जलयुक्त शिवार कामाची पाहणी करण्याबरोबरच दुष्काळी अनुदानासह अन्य विविध शासकीय योजना गोरगरीबांपर्यंत पोहत आहेत की नाही, याची माहिती नागरिकांशी संवाद साधून खासदार मंडळी घेत आहेत़मराठवाड्यातील लातुरात यंदा दुष्काळामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे़ दोन महिन्यांपूर्वीच राज्याच्या मंत्रीमंडळाने तालुक्यांचा दौरा करुन पाहणी केली होती़ आता केंद्र सरकारमध्ये सदस्य असलेले भाजपाचे खासदार लातूर जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी आले आहेत़भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी सकाळी लातूर शहरातील आरेफ सिद्दीकी यांच्या घरी जलपुर्नभरणाच्या कामाचे उद्घाटन करुन शहरवासियांशी संवाद साधत शहरातील पाणीटंचाईची माहिती घेतली़जळकोट तालुक्यातील जगळपूर, उमरगा रेतू येथील जलयुक्तच्या कामाची खासदार कपिल पाटील यांनी पाहणी केली आहे़ चारा- पाण्याचा प्रश्न सोडवा, टँकरच्या फेऱ्या वाढवा अशी मागणी नागरिकांनी केली असता त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येतील़ तसेच विकास कामासाठी राज्यसभेच्या खासदारांना निधी देण्यास सांगून असे आश्वासन खा़ कपिल पाटील यांनी दिले़
=========================================
पत्नीच्या हल्ल्यानंतर पतीने मागितले पोलिस संरक्षण
- ऑनलाइन लोकमतबंगळुरु, दि. १५ - पतीने पत्नीच्या हातातून फोन खेचून घेतला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीला भोसकले. मागच्या आठवडयात बंगळुरुच्या सरजापूरा भागात ही घटना घडली. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या संजयने पत्नी इंदूच्या हातातून मोबाईल फोन खेचून घेतला. त्यामुळे संतापलेल्या इंदूने संजयवर वार केले.या हल्ल्यात संजयच्या हाताच्या बोटांना मार लागला असून, डॉक्टरांनी त्याला सक्तीची तीन महिने विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेनंतर संजयने इंदूचा इतका धसका घेतला आहे की, त्याने थेट पोलिस ठाणे गाठून पत्नीपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. दोघांच्या लग्नाला सात वर्ष झाली असून, त्यांना एक अपत्यही आहे.संजयने दिलेल्या माहितीनुसार मागच्या आठवडयात संजय कामावरुन घरी आला त्यावेळी त्याला इंदू मेसेज टाईप करताना दिसाली. त्याने तिथे जाऊन इंदूच्या मोबाईलवरचा मेसेज वाचला. तो मेसेज अत्यंत घाणेरडा होता. त्याने इंदूला याचा जाब विचारला. पण इंदूने काहीही उत्तर न देता मोबाईल लॉक केला. इंदू उत्तर देत नाही म्हणून त्याने फोन हिसकावून स्वत:कडे घेतला आणि जो पर्यंत समोरचा माणूस कोण होता ते सांगणार नाही तो पर्यंत फोन मिळणार नाही असे सांगितले.
=========================================
रेल्वे आयसीयूमधून बाहेर, पण अजूनही काळजी घेण्याची गरज - सुरेश प्रभू
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १५ - रेल्वे आता रुळावर परतली आहे. पूर्वी लोक रेल्वेबद्दल नकारात्मक बोलायचे पण आता रेल्वेबद्दल लोक सकारात्मक मत व्यक्त करतात ही समाधानाची बाब आहे असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले. गोष्टी वेगाने बदलत आहेत. सोशल मिडीया आणि अन्य माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत.रेल्वेने आपल्यामध्ये जो बदल केला आहे त्याने कॉर्पोरेट सेक्टर आणि अनेक जागतिक कंपन्यांना आकर्षित केले आहे असे सुरेश प्रभू यांनी सांगितले. भारतीय रेल्वे पायाभूत सुविधांच्या उभारणीवर मोठया प्रमाणावर खर्च करत आहे. आम्ही ट्रेनचा वेगही वाढवला आहे तसेच तिकीट शुल्काव्यतिरिक्त जाहीराती आणि अन्य मार्गाने महसूली उत्पन्नही वाढवले आहे.रेल्वेने आपली क्षमता वाढवली असून, यामुळे एक सकारात्मकता आली आहे असे प्रभू यांनी सांगितले. रुग्ण आयसीयूमधून बाहेर आल्यावर लगेच पळायला लागेल अशी अपेक्षा आपण रेल्वेकडून करु शकत नाही. रेल्वे आता आयसीयूमधून बाहेर आली असून, चालायला सुरुवात केली आहे. पण अजूनही भरपूर काळजी घेण्याची गरज आहे असे प्रभू यांनी सांगितले.
=========================================
उत्तर प्रदेश: दहावी, बारावीच्या परीक्षेत मुली पुढे
| |
-
| |
लखनौ (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे निकाल आज जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे.
दहावीचा निकाल 87.66 टक्के तर बारावीचा निकाल 87.99 टक्के लागला आहे. दोन्ही परीक्षांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्या "टॉप 5‘ मध्ये मुलींनीच स्थान पटकावले आहे. बाराबांकी जिल्ह्यातील साक्षी वर्मा ही बारावीत सर्वप्रथम आली असून रायबरेली जिल्ह्यातील सौम्या पटेल हीने दहावीतील परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. 28 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत पास झाले असून 25 लाख 66 हजार विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेला जवळपास 200 कैदीही उत्तीर्ण झाले आहेत.

लखनौ (उत्तर प्रदेश) - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची भेट घेतल्यानंतर आज (रविवार) योगगुरू रामदेवबाबा यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांची भेट घेतली.
याबाबत समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी माहिती दिली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादवही उपस्थित होते. यावेळी रामदेवबाबांनी उत्तर प्रदेशच्या सरकारच्या कामाचे कौतुक केले. विशेषत: राज्य सरकार राबवित असलेल्या कल्याणकारी आणि विकासाच्या योजनांचे त्यांनी कौतुक केले. चौधरी यांनी ही भेट म्हणजे सौजन्य भेट असल्याचे म्हटले आहे. सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या आईच्या निधन झाल्याने त्यांना भेटण्यासाठी रामदेवबाबा आले होते. अलिकडेच रामदेवबाबा यांनी लालूप्रसाद यादव यांची भेट घेऊन "पतंजली‘च्या विविध उत्पादनांची माहिती दिली होती.
रामदेवबाबांनी घेतली मुलायमसिंहांची भेट

श्रीनगर - जैश-इ-मोहम्मद या पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्यास जम्मु काश्मीर राज्यातील बारामुल्ला जिल्ह्यामध्ये अटक करण्यात भारतीय लष्करास यश आले आहे. या दहशतवाद्याकडे यावेळी आधार कार्डही आढळून आले.
मूळचा पाकव्याप्त काश्मीरमधील असलेल्या अब्दुल रेहमान हा गेल्या जानेवारी महिन्यात भारतीय भूभागामध्ये घुसला होता. तो येथील स्थानिक तरुणांना आत्मघातकी हल्ल्यांची चिथावणी देत असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली. रेहमान याच्या चौकशीमधून संवेदनशील माहिती मिळण्याची आशा असल्याचे बारामुल्लामधील "कमांडिंग ऑफिसर‘ असलेल्या मेजर जनरल जे एस नैन यांनी सांगितले.
रेहमान याला जुन्या बारामुल्लानजीकच्या जंगली भागामध्ये अटक करण्यात आली. त्याला अटक करण्याआधी या भागामधील त्याच्या हालचालींवर लष्कराची नजर होती. "रेहमान हा बारामुल्ला येथे तब्बल सात वेळा आला आणि त्याने बारामुल्लासहित सोपोरे व कुपवाडामधील तरुणांना आत्मघातकी दहशतवादी दलात भरती करुन घेण्याचा प्रयत्न केला,‘ असे लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले.
बारामुल्लामध्ये "जैश'च्या दहशतवाद्यास अटक

नवी दिल्ली - भारत व चीनमधील प्रत्यक्ष ताबारेषेनजीक असलेल्या भारतीय हद्दीमधील एका गावामधील सरपंच व इतर गावकऱ्यांना पाकिस्तान; वा चीनमधील "गुप्तहेरां‘चे भारतीय लष्करविषयक माहिती विचारणारे दुरध्वनी आल्यानंतर येथील सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली आहे. दुरध्वनी करणाऱ्याने आपण स्थानिक अधिकारी वा लष्करी अधिकारी असल्याचे सांगत या भागामधील लष्कराची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले.
समुद्रसपाटीपासून सुमारे साडेतेरा हजार फूट उंचीवर असलेल्या दुर्बुक गावाच्या सरपंचास अशा स्वरुपाचा दुरध्वनी आल्याची माहिती सूत्रांनी दिले. या वेळी सरपंच लष्कराच्या छावणीमध्येच होते. अशा स्वरुपाच्या दुरध्वनीमुळे संशय आलेल्या सरपंचाने दुरध्वनी करणाऱ्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दुरध्वनी करणाऱ्याने यावर आपण उप आयुक्तालयामधून दुरध्वनी करत असल्याचे सांगितले. तेव्हा अशी माहिती थेट भारतीय लष्करासच विचारणे योग्य होईल, असे सरपंचांनी स्पष्ट केले. या सरपंचांचे नाव स्टॅन्झिन असे आहे. यानंतर उप आयुक्त कार्यालयामध्ये चौकशी केल्यानंतर येथून अशा स्वरुपाचा कोणताही दुरध्वनी करण्यात आला नसल्याचे निष्पन्न झाले. सरपंचांना करण्यात आलेला दुरध्वनी हा "कॉंप्युटर जनरेटेड कॉल‘ असल्याचेही नंतर आढळून आले. दुरध्वनी करणाऱ्याने भारतीय लष्कराच्या हालचालींबद्दल आणि या भागात बांधण्यात आलेल्या रस्त्यांविषयीही माहिती विचारल्याचे स्टॅन्झिन यांनी सांगितले.
भारतीय-चीन सीमारेषेवर संशयास्पद हालचाल

अजमेरमध्ये पाच नवजात अर्भकांचा मृत्यू
| |
-
| |
अजमेर (राजस्थान) - अजमेर येथील शासकीय पाच नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अजमेर येथील जवाहरलाल नेहरू रुग्णालयात जन्म होऊन पाच ते सहा दिवस झालेल्या नवजात अर्भकांचा मृत्यू झाला आहे. अर्भकांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला. मृतांमध्ये भिलारा, मेरता, पिसांगण, नसीराबाद आणि बिवार येथील नवजातांचा समावेश आहे. या सर्वांचा मृत्यू रक्तदोष, मुदतपूर्व जन्म, श्वसनातील अडचणींमुळे झाल्याचे स्पष्टीकरण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. के. के. सोनी यांनी दिली. दरम्यान या घटनेची बारकाईने चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. "या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन डॉक्टरांची समिती स्थापन केली असून ही समिती अहवाल सादर करेल‘, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

भरपाई ड्रॉप कॉलगळती सुरूच!
| |
-
| |
दूरसंचार क्षेत्र गेल्या वर्षभरात ‘नेट न्यूट्रॅलिटी’ आणि ‘कॉल ड्रॉप’मुळे गाजले. नेट न्यूट्रॅलिटीच्या लढ्यात ग्राहकराजाचा विजय झाला. मात्र, ‘कॉल ड्रॉप’च्या लढाईला तसे फळ आले नाही. सर्वोच्च न्यायालयाने ‘कॉल ड्रॉप’साठी सेवा पुरवठादार कंपन्यांकडून नुकसानभरपाई घेता येणार नाही, असा निकाल दिला. परिणामी भरपाई ‘ड्रॉप’ झाली असली, तरी कॉल गळती सुरूच राहणार आहे.
‘रोटी, कपडा और मकान’ ही पूर्वीची गरजांची व्याख्या गेल्या काही वर्षांत ‘रोटी, कपडा और मोबाईल’ अशी झाली आहे. यात ‘मकान’ नंतर येते. भारताचा मोबाईल फोनधारकांच्या संख्येत दुसरा क्रमांक लागतो. मोबाईलने जीवनाचे सर्वच अंग व्यापले. परिणामी संभाषणात खंड पडल्यास चिडचिड वाढू लागली. मोबाईल ग्राहकांच्या तुलनेत मोबाईल इन्फ्रास्ट्रक्चर वाढले नाही. त्यामुळे रेल्वे, बस, बंदिस्त कार्यालये, आडवाटेवरील घरे आदी ठिकाणी हमखास ‘संवाद गळती’ सुरू झाली. गेल्या वर्षभरात ‘कॉल ड्रॉप’विरोधातील आवाज तीव्र झाला. त्याची दखल केंद्र सरकारलाही घ्यावी लागली. त्यांनी ‘ट्राय’ अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणाला आदेश देत यावर तोडगा काढण्याचा आदेश दिला. ‘ट्राय’ने ‘कॉल ड्रॉप’साठी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांनाच जबाबदार धरले. तसेच दर्जेदार सेवा देण्याची जबाबदारी कंपन्यांची असल्याचे सांगत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. त्यानुसार दिवसातून एका ‘कॉल ड्रॉप’साठी एक रुपया आणि दिवसातून कमाल तीन ‘कॉल ड्रॉप’साठी ही भरपाई मिळणार होती. त्याला कंपन्यांनी जोरदार विरोध केला. नुकसानभरपाई दिल्यास दूरसंचार कंपन्यांचे कंबरडे मोडेल, असा दावा सेवा पुरवठादार कंपन्यांच्या संघटनेने केला. त्यांनी ‘ट्राय’च्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. हायकोर्टाने ग्राहक हित रक्षणासाठी दर्जेदार सेवांची ‘ट्राय’ची अपेक्षा योग्य असल्याचे सांगत कंपन्यांचे आव्हान फेटाळले. त्यामुळे ग्राहकांना कॉल गळतीची भरपाई मिळेल असे वाटत होते. मात्र, कंपन्यांच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले व तेथे प्रत्येक कॉल गळतीसाठी कंपन्यांना जबाबदार धरणे योग्य नाही. दूरसंचार सेवांमध्ये सुधारणा केल्या, तरी ‘कॉल ड्रॉप’ रोखणे शक्य नाही, असा दावा केला. तो खोडून काढण्यात आणि प्रत्येक ‘कॉल ड्रॉप’साठी कंपन्या जबाबदार आहेत हे सिद्ध करण्यात ‘ट्राय’ कमी पडल्याने सर्वोच्च न्यायालयाने भरपाई देण्याचा निर्णय रद्द केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘ट्राय’ व सेवा पुरवठादार कंपन्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे दूरसंचार जाळ्यांचा विस्तार करण्यासोबतच दर्जेदार सेवेसाठी कंपन्यांना व सरकारी यंत्रणेला अधिक जबाबदारी घ्यावी लागणार आहे. सध्याच्या नियमांनुसार ‘कॉल ड्रॉप’चे प्रमाण दोन टक्क्यांच्या आत हवे. मात्र, या वर्षी फेब्रुवारीमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार ‘कॉल ड्रॉप’चे प्रमाण ८ ते ४३ टक्क्यांपर्यंत आढळले. दूरसंचार कंपन्यांच्या ग्राहक संख्येबरोबरच मोबाईलवर इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या शंभरपट वाढली. मात्र, पायाभूत सुविधांमध्ये केवळ ४.६ टक्केच वाढ झाली. शिवाय सरकारी पातळीवरही स्पेक्ट्रम उपलब्धतेबाबत आवश्यक पावले उचलली गेली नाहीत. सरकारी इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्याची परवानगी कंपन्यांना हवी आहे. ती त्यांना मिळावी आणि दर्जेदार व अखंडित सेवेची हमी कंपन्यांनी द्यावी.
=========================================
इस्रोने तयार केले स्वत:चे अवकाशनयान!
| |
-
| |
तिरुअनंतपुरम - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) प्रथमच स्वत:चे अवकाशयान तयार केले आहे. अवकाशयानासाठी आवश्यक असलेल्या पंख्यासह प्रमुख भागाचे (रियुजेबल लॉंच व्हेईकल-आरएलव्ही) वजन आणि आकार हा एसयुव्ही वाहनाएवढा असून या भागावर अंतिम हात फिरविला असून श्रीहरीकोटा येथे तो उड्डाणाच्या प्रतिक्षेत आहे.
अवकाशनयानाच्या उड्डाणासाठी आरएलव्हीचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून हा प्रयत्न जर यशस्वी झाला तर उड्डाणावर होणाऱ्या खर्चामध्ये मोठी बचत होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. भारताने तयार केलेले हे अवकाशनयान अमेरिकेच्या अवकाशनयानासारखे दिसत आहे. माजी राष्ट्रीय एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावरून आरएलव्हीला लवकरच "कलामायन‘ हे नाव देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नजीकच्या भविष्यात स्वदेशी बनावटीच्या अवकाश यानाच्या निर्मितीत भारत जगात सर्वांत पुढे असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

'निर्भय मॉर्निंग वॉक'द्वारे अंनिसचा संघर्षाचा इशारा
| |
-
| |
सांगली - अंधश्रध्दा निर्मूलनाची चळवळ दबणार नाही, पुरोगामी विचार संपणार नाहीत, निधडेपणाने संघर्ष करत राहून असा इशाराच आज अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीच्या कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निग वॉकद्वारे दिला.
दुसऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आज (शनिवार) सकाळी निर्भय मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर, पुरोगामी विचारवंत गोविंदराव पानसरे यांचे कुटुंबिय सहभागी झाले होते. सकाळी आमराईजवळच्या हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या "मॉर्निंग वॉक‘चा प्रारंभ झाला. स्टेशन चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला संमेलनाध्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे, तर्कशील संस्थेचे भोरासिंग यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. तेथून पुढे राजवाडा चौक, पटेल चौकमार्गे पुन्हा आमराईजवळ निर्भय मॉर्निंग वॉकचा समारोप झाला.
यामध्ये डॉ. दाभोळकरांचे पुत्र डॉ. हमीद आणि कन्या मुक्ता तसेच पानसरेंच्या स्नुषा प्रा. मेघा पानसरे व नातू कबीर यांच्यासह अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, माधव बावगे, मिलिंद देशमुख, डॉ. नितीन शिंदे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ऍड. के.डी. शिंदे, प्रा. संजय बनसोडे, ऍड. अमित शिंदे, विकास मगदूम उपस्थित होते. या उपक्रमात संमेलनासाठी इतर राज्यातून आलेले कार्यकर्ते, युवक, युवती, महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बीजिंग - अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालामध्ये चिनी सैन्यासंदर्भात करण्यात आलेल्या उल्लेखाबद्दला चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या या माहितीच्या विपर्यासामुळे दोन देशांमधील परस्पर विश्वासास मोठा तडा गेल्याची,‘ तिखट प्रतिक्रिया चीनकडून व्यक्त करण्यात आली आहे.
"दक्षिण चिनी समुद्रात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम बेटांवरील पायाभूत सुविधांमध्ये चिनी सैन्याकडून या वर्षी मोठी वाढ करण्यात येण्याची शक्यता असल्याचे,‘ कॉंग्रेससमोर मांडण्यात नुकत्याच मांडण्यात आलेल्या या अहवालामध्ये म्हटले आहे. पेंटॅगॉनच्या या अहवालासंदर्भात चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते यांग युजुन यांनी "ठाम विरोध‘ व "असमाधान‘ व्यक्त केले. चिनी संरक्षण धोरणाचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात येत असल्याची टीका यांग यांनी केली.
अमेरिकेच्या संरक्षण अहवालामुळे चीन संतप्त

आग्रा - कुटुंबियांचा प्रेमाला विरोध असल्याने दहाव्या इयत्तेत शिकणारा मुस्लिम विद्यार्थी आणि नवव्या वर्गात शिकणारी हिंदू विद्यार्थींनी यांनी खोली बंद करून स्वत:ला आग लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आग्रा येथील कोतवाली सरदार परिसरातील नैनाना जाट येथे ही घटना घडली. सोनु मोहम्मद आणि शीलम कुमारी हे दोघे एकाच शाळेत शिकत होते. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्या दोघांचे प्रेमप्रकरण होते आणि हे त्यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हते. त्यामुळे 9 मे रोजी शीलमच्या कुटुंबियांनी जबरदस्तीने तिचा विवाह कुबेरपूर येथील एका व्यक्तीशी केला. ‘शुक्रवारी संध्याकाळी साडे सात वाजता शीलम कुबेरपूरहून घरी आली. आणि शनिवारी पहाटे साडे चार वाजता सोनुसोबत तिच्या खोलीत तिचा मृतदेह आढळला‘, अशी माहिती शीलमचा भाऊ सौरभने दिली. ‘प्राथमिक तपासाअंती हा आत्महत्येचा प्रकार दिसत आहे. दोन्ही कुटुंबियांनी कोणतीही तक्रार देण्यास नकार दिला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत‘, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हिंदू-मुस्लिम प्रेमी युगुलाची आत्महत्या

कोलकत्ता - "जादवपूर विद्यापीठामधील (जेयू) विद्यार्थिनी या लज्जाहीन असून येथील विद्यार्थ्यांबरोबर राहण्याची संधीच त्या शोधत असतात,‘ असे वादग्रस्त वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पश्चिम बंगाल राज्याचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी केले आहे. या विद्यापीठामध्ये एका चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेमध्ये झालेल्या संघर्षामध्ये विनयभंग झाल्याची तक्रार काही विद्यार्थिनींनी केली होती. या पार्श्वभूमीवर, घोष यांनी हा आरोप केला आहे.
"विनयभंग झाल्याचा आरोप हा सर्वथा खोटा आहे. अशा स्वरुपाचा आरोप करणाऱ्या मुली या स्वत:च गैरवर्तन करणाऱ्या आणि लज्जाहीन आहेत. विद्यापीठामधील विद्यार्थ्यांच्या बरोबर राहण्यासाठी त्या सतत संधीच्या शोधामध्ये असतात,‘‘ असे घोष म्हणाले. विद्यापीठामधील हिंसाचारासंदर्भातही घोष यांना यावेळी विचारणा करण्यात आली.
'जेयू'तील मुलीच लज्जाहीन: भाजप प्रदेशाध्यक्ष
| |
-
| |
"विनयभंग झाल्याचा आरोप हा सर्वथा खोटा आहे. अशा स्वरुपाचा आरोप करणाऱ्या मुली या स्वत:च गैरवर्तन करणाऱ्या आणि लज्जाहीन आहेत. विद्यापीठामधील विद्यार्थ्यांच्या बरोबर राहण्यासाठी त्या सतत संधीच्या शोधामध्ये असतात,‘‘ असे घोष म्हणाले. विद्यापीठामधील हिंसाचारासंदर्भातही घोष यांना यावेळी विचारणा करण्यात आली.
=========================================
सेवाकर वाढीचा सर्वसामन्यांच्या 'बजेट'ला दणका
| |
-
| |
पुणे - कुठलीही सेवा घेण्यासाठी आता सरासरी 15 टक्के सेवाकराचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. कारण येत्या 1 जूनपासून 14.5 टक्के सेवाकरासोबत (सर्व्हिस टॅक्स) 0.5 टक्के कृषी कल्याण सेवा उपकर अर्थात सेस अतिरिक्त आकारण्यात येणार आहे. त्यामुळे वीज, पाणी, मोबाईल, प्रवासाच्या तिकिटापासून करमणुकीच्या तिकिटापर्यंत प्रत्येक सेवा महागणार आहेत. त्यामुळे वरकरणी ही दरवाढ कमी दिसत असली तरी कौटुंबिक बजेटमधील सर्वच सेवांना ही दरवाढ सोसावी लागणार असल्याने कौटुंबिक बजेटवर काही टक्क्यांचा भुर्दंड पडणार आहे.
2016-17च्या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एक जून 2016 पासून कृषी कल्याण उपकर आकारणी करण्याची घोषणा केली होती. शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासंबंधित आर्थिक निर्णय घेण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे.
दूरध्वनी, मोबाईल आणि भाडे वाढणार
सेवाकर 12.36 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे दूरध्वनी किंवा मोबाईलच्या किमती महागणार आहेत; पण सोबतच त्यावरील संवादही महागणार आहे. पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ होण्याने दरहजारी सरासरी 20 रुपये दराने मोबाईल महागतील. तर बिलात अडीच ते तीन टक्के दरमहा भुर्दंड पडणार आहे. त्याचप्रमाणे सेवाकरात वाढ झाल्यामुळे विमा पॉलिसीचा हप्ता, म्युच्युअल फंडांत तसेच चिट फंडमध्ये गुंतवणूक करणे देखील महागणार आहे.
=========================================

No comments:
Post a Comment