[अंतरराष्ट्रीय]
१- दुबई; हनिमूनमधील भारतीय जोडप्याच्या 'त्या' क्षणांचे चित्रीकरण करणा-या पाकिस्तानी ड्रायव्हरला अटक
२- ५०० भारतीय इसिसकडे
३- मोरोक्को; ‘आफ्रिकनांवरील हल्ले तिरस्करणीय’-उपराष्ट्रपती हमीद अन्सारी
४- लंडन; दोन लाख पौंड भरू, पण शरणार्थी नकोत
५- युरोपात इसिसच्या हल्ल्याची भीती: अमेरिका
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- आता रेशन कार्डही मिळणार ऑनलाईन
७- देशात भारतरत्नांचा किती आदर आहे, हे बघायचंय : आशा भोसले
८- गुवाहाटी; रा. स्व. संघाच्या शाळेत शिकणारा मुस्लीम विद्यार्थी दहावीत अव्वल
९- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ
१०- भोपाळ; नरेंद्र मोदींविरोधात फेसबुकवर कमेंट करणा-या आयएएस अधिका-याला नोटीस
११- दूषित रक्तामुळे देशात २,२३४ जणांना एचआयव्ही; महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
१२- ...तर भारतात स्टोअर्स स्थापन करणार नाही:ऍपल
१३- राहुल गांधी लवकरच कॉंग्रेस अध्यक्ष होणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१४- पुणे; डेक्कन क्वीनच्या बर्थडेलाच पासधारकांची तिकीटधारकांना धक्काबुक्की
१५- व्हायरल सत्य : अर्जुनच्या निवडीमागील सत्य
१६- वाराणसी; अमित शाहांचं दलित कुटुंबाच्या घरी जेवण, सपाची टीका
१७- मुंबई; एमएचटी-सीईटीचा विभागवार निकाल जाहीर
१८- मी दिलेला शब्द पाळला, धनगर समाजालाही आरक्षण मिळवून देणार: पंकजा मुंडे
१९- भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांची गुप्त बैठक, संघटन मंत्र्यांना शिव्यांची लाखोली
२०- मुंबई; घोडागाडी चालकांना मिळणार टॅक्सी आणि रिक्षाचे परवाने
२१- 'दाभोलकर हत्येमागील साधकांची पटली ओळख'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- वर्धा; वरिष्ठांच्या चुकीच्या आदेशामुळे पुलगावची आग भडकली; प्रत्यक्षदर्शींची मत
२३- नाशिक; नववधू कौमार्य परीक्षेत नापास, जातपंचांच्या आदेशाने पतीनं लग्न मोडलं
२४- जयपूर; Most Photographed! रणथंबोरची राणी मछली वाघिणीचा दिमाख
२५- नागपूर; बर्थडे पार्टीत फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा स्फोट, दोघांचा मृत्यू
२६- ठाण्यात दुहेरी हत्याकांड, ज्येष्ठ नागरिकासह नोकराची निर्घृण हत्या
२७- मिरारोड; जुगाऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोरुनच केलं पोलिसाचं अपहरण!
२८- दिल्ली; मृत्यू झाल्याचे भासवून आठ वर्षाच्या मुलीने बलात्का-याच्या तावडीतून केली सुटका
२९- मुंबई; अडीच वर्षांच्या मुलावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण
३०- विक्रोळीत चार दुकानांना आग
३१- नागपूर; सोलर नेटने उजळतात एलएडी दिवे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३२- श्रीलंकेच्या नुआन कुलशेकराचा कसोटीला अलविदा
३३- पाकचा हिंदू क्रिकेटपटू दानिश नागरिकत्व स्वीकारण्यास भारतात?
३४- रितेश देशमुखचं घर आनंदाने 'हाऊसफुल्ल', जेनेलियाला दुसरं बाळ
३५- शिल्पा शिंदेचं 'भाभी'च्या भूमिकेतून पुनरागमन
३६- पुरुषांपेक्षा महिलाच स्मार्टफोनच्या अधिक आहारी - एक सर्वेक्षण
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
(सुमित महाजन, नमस्कार लाईव्ह वाचक )
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
==========================================

जनरलच्या डब्यात जागा नसल्यानं तिकीटधारक प्रवाशांना पासधारकांच्या डब्यात बसण्याची परवानगी टीसीने दिली, मात्र पासधारक महिलांनी रिकाम्या जागा असतानाही जागा न दिल्याचा आरोप सामान्य तिकीटधारक प्रवाशांनी केला आहे. फक्त बसायलाच नाही, तर उभं राहण्यासही जागा न दिल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.
पासधारक डब्यातल्या महिला या सामान्य प्रवाशांना जागा असतानाही बसू देत नाहीत, असा आरोप नेहमीच सामान्य प्रवासी करत आले आहेत. तीन जणांची आसनक्षमता असलेल्या सीटवर दोनच महिला बसून जागा अडवतात असा दावाही केला जात आहे.

‘मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही, तो पाहण्याची माझी इच्छाही नाही. मी फारसा टीव्ही पाहत नसल्यामुळे मला माझा नातू चिंटूने यासंदर्भात सांगितलं. आपण एखाद्या महिलेविषयी बोलतोय याचं भान त्याने बाळगायला हवं होती. या तपस्वीने वयाची 70 ते 80 वर्ष संगीतसाधनेत आणि जगभरात आनंद पसरवण्यात वेचली आहेत.’ अशा शब्दात तन्मयवर ताशेरे ओढले आहेत.
‘आता किती जण आम्हाला पाठिंबा देतात, हे मला पाहायचं आहे. प्रकरण ताजं असताना त्यावर चर्चा करायची अनेकांना सवय असते, मात्र काही काळाने सगळेच जण विसरुन जातात. आपल्या देशात भारतरत्नांचा किती आदर आहे, हे बघायचं आहे. सरकारने त्यांना हा सन्मान बहाल केला आहे. त्यामुळे त्यांनी याची दखल घ्यायलाच हवी’ असं त्या म्हणतात.
या वादावर भारतरत्न लता मंगेशकर यांनी मौन सोडलं होतं. लता मंगेशकर म्हणाल्या की, “मी हा व्हिडीओ पाहिलेला नाही. मला याबाबत भाष्य करायचं नाही. तन्मय भट कोण आहे, हे मला माहित नाही.”

दानिशसह त्याची आई, पत्नी आणि मुलं रविवारी रात्री भारतात आली. कनेरिया कुटुंबीय सध्या कोचीत असल्याचं म्हटलं जातं. मात्र दानिश कुटुंबासह भारतात स्थायिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कसोटी क्रिकेटमधील लेग स्पिनर दानिश कनेरियावर बंदी घालण्यात आली होती. मात्र हिंदू असल्यामुळे भारतात न्याय मिळाला असता, असं दानिशने काही महिन्यांपूर्वी म्हटलं होतं. त्यामुळे दानिशच्या भारतभेटीवर शंका उपस्थित केली जात आहे. दानिशने मात्र आपण पाकिस्तान सोडून कुठेही जाणार नसल्याचं ट्विटरवर म्हटलं आहे.

या घटनेत 7 वर्षांचा चिमुरडा नितीन अनिल चापेकर आणि 25 वर्षीय ज्ञानेश्वर भानुदास नंदनवार यांचा मृत्यू झाला, तर 7 वर्षांचा यश घनश्याम वानखडे आणि 36 वर्षीय महेंद्रसिंग बगेल गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नागपूर येथील मेडीकल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वाढोणा येथील शेषराव देवराम चापेकर यांच्या सात वर्षांची मुलगी प्रांजलीचा सोमवारी सायंकाळी वाढदिवस होता. त्यानिमित्त अनिल देवराम चापेकर यांनी मंडप उभारुन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

70 वर्षीय सीताराम श्रॉफ यांच्या तोडावर उशी ठेवून त्यांचा जीव घेण्यात आला, तर संतोष यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करुन हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.
दुहेरी हत्याकांडाच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, सोसायटीमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आता रेशन कार्डही मिळणार ऑनलाईन
मुंबई : आता राज्यातील नागरिकांना रेशन कार्डसाठी ऑनलाईन अॅप्लिकेशन करता येणार आहे. सध्या राज्य सरकारने मुंबईतील गोरेगाव आणि विक्रोळी भागातील नागरिकांकडून रेशन कार्डसाठी आँनलाईन अर्ज मागिवले असून अर्जदारांना 30 दिवसांत रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर ही सुविधा मुंबई आणि महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना अन्न आणि पुरवठा विभागाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यांने सांगितलं की, “सेवा हमी कायद्यानुसार रेशनिंग सेवा आँनलाईन करण्यात येणार असून आम्ही सध्या गोरेगाव आणि विक्रोळी भागातील नागरिकांकडून रेशन कार्डसाठी आँनलाईन अर्ज मागिवणार आहोत. ते इंटरनेटच्या माध्यमातून आँनलाईन अर्ज करु शकतात. त्यानुसार इच्छूकांना आपले सर्व डॉक्यूमेंट स्कॅन करून जोडावे लागणार आहेत. त्यानंतर डॉक्यूमेंट व्हेरीफाय करण्यासाठी आँनलाईन अपॉईंटमेंट दिल्यानंतर डॉक्यूमेंट सादर केल्यास 30 दिवसांत रेशन कार्ड मिळणार आहे. ”
==========================================
वरिष्ठांच्या चुकीच्या आदेशामुळे पुलगावची आग भडकली?
वर्धा : वर्ध्यातील पुलगाव शस्त्रसाठ्यातल्या स्फोटाचं नेमकं कारण अजून कळू शकलेलं नाही. मात्र, निष्काळीपणामुळे ही आग भडकून स्फोट झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
बचावकार्यादरम्यान सुखरुप वाचलेले अग्निशमन दलाचे जवान चंद्रमणी लाडे यांनी हा दावा केला आहे. आग लागल्यानंतर सर्वात पहिले घटनास्थळी पोहचणाऱ्या टीममध्ये चंद्रमणी लाडे होते.
लाडेंनी दिलेल्या माहितीनुसार आग लागलेली शेड सोडून त्या शेजारी असलेल्या शेडमध्ये कुलिंग ऑपरेशन करणं गरजेचं होतं. पण त्यावेळी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं नाही. ज्या ठिकाणी ही आग लागली होती, ती विझवण्याचे आदेश दिले. पण अधिकाऱ्यांचा हा प्रयत्न असफल ठरला आणि ही आग इतर शेड्समध्ये पसरून स्फोट झाला. त्यामुळे मृतांचा आकडा वाढला. या घटनेत मृतांचा आकडा 18 वर पोहचला.
चंद्रमणी लाडे यांच्या मते, ज्या शेडला आग लागली ती विझवण्यास सांगून, त्या शेडवरच लक्ष देण्यास सांगण्यात आलं, मात्र त्याचवेळी दुसऱ्या शेड्सचं कुलिंग करून, त्या बाजूला करणं आवश्यक होतं. ते न झाल्यामुळे इतकी मोठी आपत्ती ओढवली.
==========================================
डेक्कन क्वीनच्या बर्थडेलाच पासधारकांची तिकीटधारकांना धक्काबुक्की
पुणे : मुंबई-पुण्याला जोडणारी डेक्कन क्वीन आज आपला 86 व्या वाढदिवस साजरा करत आहे, मात्र आज त्याच ट्रेनमध्ये तिकीटधारक प्रवासी आणि पासधारकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमुळे सेलिब्रेशनला गालबोट लागलं.
जनरलच्या डब्यात जागा नसल्यानं तिकीटधारक प्रवाशांना पासधारकांच्या डब्यात बसण्याची परवानगी टीसीने दिली, मात्र पासधारक महिलांनी रिकाम्या जागा असतानाही जागा न दिल्याचा आरोप सामान्य तिकीटधारक प्रवाशांनी केला आहे. फक्त बसायलाच नाही, तर उभं राहण्यासही जागा न दिल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.
पासधारक डब्यातल्या महिला या सामान्य प्रवाशांना जागा असतानाही बसू देत नाहीत, असा आरोप नेहमीच सामान्य प्रवासी करत आले आहेत. तीन जणांची आसनक्षमता असलेल्या सीटवर दोनच महिला बसून जागा अडवतात असा दावाही केला जात आहे.
इतकंच नाही, तर हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या प्रवाशाला दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रवाशांना उपद्रव देणे, दमदाटी करणे, धक्काबुक्की करणे यातही पासधारक मागेपुढे पाहत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे डेक्कन क्वीन ही खरंच सामान्यांची आहे? की मूठभर पासधारकांची असा सवाल उपस्थित होत आहे.
==========================================
देशात भारतरत्नांचा किती आदर आहे, हे बघायचंय : आशा भोसले
मुंबई : ‘एआयबी’ शोचा कलाकार तन्मय भटने भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर केलेल्या अश्लाघ्य व्हिडीओविरोधात सर्वच स्तरातून टीका होत आहे. या वादावर आता दिग्गज पार्श्वगायिका आणि लतादीदींची धाकटी बहिण आशा भोसले यांनीही मौन सोडलं आहे.
‘मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही, तो पाहण्याची माझी इच्छाही नाही. मी फारसा टीव्ही पाहत नसल्यामुळे मला माझा नातू चिंटूने यासंदर्भात सांगितलं. आपण एखाद्या महिलेविषयी बोलतोय याचं भान त्याने बाळगायला हवं होती. या तपस्वीने वयाची 70 ते 80 वर्ष संगीतसाधनेत आणि जगभरात आनंद पसरवण्यात वेचली आहेत.’ अशा शब्दात तन्मयवर ताशेरे ओढले आहेत.
‘आता किती जण आम्हाला पाठिंबा देतात, हे मला पाहायचं आहे. प्रकरण ताजं असताना त्यावर चर्चा करायची अनेकांना सवय असते, मात्र काही काळाने सगळेच जण विसरुन जातात. आपल्या देशात भारतरत्नांचा किती आदर आहे, हे बघायचं आहे. सरकारने त्यांना हा सन्मान बहाल केला आहे. त्यामुळे त्यांनी याची दखल घ्यायलाच हवी’ असं त्या म्हणतात.
या वादावर भारतरत्न लता मंगेशकर यांनी मौन सोडलं होतं. लता मंगेशकर म्हणाल्या की, “मी हा व्हिडीओ पाहिलेला नाही. मला याबाबत भाष्य करायचं नाही. तन्मय भट कोण आहे, हे मला माहित नाही.”
==========================================
श्रीलंकेच्या नुआन कुलशेकराचा कसोटीला अलविदा
कोलंबो : श्रीलंकेचा मध्यमगती गोलंदाज खेळाडू नुआन कुलशेकराने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
“मी कसोटी क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती घेत आहे. मला वाटतं कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याची हीच योग्य वेळ आहे. या निर्णयामुळे मी वन डे आणि टी 20 क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करु शकेन,” असं 33 वर्षीय नुआन कुलशेकराने म्हटलं आहे.
कुलशेकराने एप्रिल 2005 मध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. त्याने 21 कसोटी सामन्यात 48 विकेट घेतल्या आहेत. कुलशेकराने 2009 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात 28.4 षटकात अवघ्या 58 धावा देत तब्बल 8 विकेट पटकावल्या होत्या.
कुलशेकराने त्याची शेवटची कसोटी जून 2014 मध्ये लॉर्ड्स मैदानावर खेळली होती. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत श्रीलंकेने विजय मिळवला होता.
दुसरीकडे कुलशेकराने 173 वन डे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 186 विकेट्स घेतल्या आहेत. 2009 मध्ये तो गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला होता.
==========================================
पाकचा हिंदू क्रिकेटपटू दानिश नागरिकत्व स्वीकारण्यास भारतात?
कराची : पाकिस्तान क्रिकेट संघातून स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घातलेला लेग स्पिनर दानिश कनेरिया भारतात आल्यामुळे शंका उपस्थित केली जात आहे. दानिशच्या भावाने मात्र कनेरिया कुटुंबीय काही धार्मिक विधी करण्यासाठी भारतात आल्याचा दावा केला आहे.
दानिशसह त्याची आई, पत्नी आणि मुलं रविवारी रात्री भारतात आली. कनेरिया कुटुंबीय सध्या कोचीत असल्याचं म्हटलं जातं. मात्र दानिश कुटुंबासह भारतात स्थायिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दानिशचा भाऊ विकी कनेरियाने मात्र कुटुंबीय कायमचे भारतात येण्याची शक्यता नाकारली आहे. ‘धार्मिक विधींसाठी साधारण 10 दिवसांचा कालावधी लागेल, मात्र तो निश्चित नसल्यामुळे पाकिस्तानात परतण्याची तारीख अद्याप ठरवलेली नाही.’ असं विकी कनेरिया म्हणतो. विकी सध्या कराचीत असून तो एका ऑईल कंपनीमध्ये नोकरी करतो.
कसोटी क्रिकेटमधील लेग स्पिनर दानिश कनेरियावर बंदी घालण्यात आली होती. मात्र हिंदू असल्यामुळे भारतात न्याय मिळाला असता, असं दानिशने काही महिन्यांपूर्वी म्हटलं होतं. त्यामुळे दानिशच्या भारतभेटीवर शंका उपस्थित केली जात आहे. दानिशने मात्र आपण पाकिस्तान सोडून कुठेही जाणार नसल्याचं ट्विटरवर म्हटलं आहे.
==========================================
रितेश देशमुखचं घर आनंदाने 'हाऊसफुल्ल', जेनेलियाला दुसरं बाळ
मुंबई : अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या घरी आणखी एक नवा पाहुणा आला आहे. जेनेलियाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. जेनेलियाने आज सकाळीच ही गोड बातमी दिली.
यानंतर रितेशने त्यांच्या छोट्या रिआनला भाऊ झाल्याचं ट्विट केलं.
==========================================
व्हायरल सत्य : अर्जुनच्या निवडीमागील सत्य
मुंबई : शालेय क्रिकेटमध्ये नाबाद 1009 धावा ठोकणाऱ्या प्रणव धनावडेची मुंबई ‘अंडर-16’ संघात निवड झाली नाही, मात्र भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची निवड झाली, यावरुन सोशल मीडियात तुफान वाद-विवाद सुरु झाले आहेत.
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स्अप या माध्यमांमधून प्रणवला एकलव्य, तर अर्जुनला आधुनिक अर्जुन म्हटलं जात आहे. या फोटोमागील सत्य काय? याबाबतचा आढावा –
व्हायरल होणारा मेसेज –
प्रणव धनावडे शालेय स्पर्धेत नाबाद 1009 धावा ठोकल्या, मात्र त्याची मुंबई ‘अंडर-16’ संघात निवड झाली नाही. पण दुसरीकडे अर्जुन तेंडुलकरने काहीही विशेष न करता, केवळ तो सचिनचा मुलगा आहे, म्हणून त्याची निवड झाली आहे, अशा आशयाचा मेसेज व्हायरल होत आहे. याशिवाय नॉर्थ झोन विरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर शुन्यावर त्रिफळाचीत झाला होता, तसंच 12 षटकात 52 धावा देऊन केवळ एकच विकेट घेतली होती, असाही मेसेज फिरत आहे.
व्हायरल सत्य –
व्हायरल होणाऱ्या या मेसेजची पडताळणी एबीपी माझाने केली. प्रणव धनावडे या वर्षाच्या सुरुवातीलाच चर्चेत आला. आंतरशालेय क्रिकेटमध्ये कल्याणच्या प्रणव धनावडेने एकट्याने नाबाद 1009 धावा ठोकल्या. एकाच सामन्यात 1 हजार धावा करणारा प्रणव जगातला पहिला फलंदाज ठरला.
प्रणवच्या या खेळीनंतर त्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्कॉलरशीप दिली, तसंच त्याचा खर्च उचलण्याची घोषणा राज्य सरकारने केली. इतकंच नाही तर क्रिकेटचा देव सचिनने स्वत:च्या घरी त्याची भेट घेतली.
प्रणव आणि अर्जुनची तुलना नको-
प्रणव आणि अर्जुनची तुलना करणं चुकीचं आहे. कारण प्रणव धनावडे हा विकेटकिपर फलंदाज आहे, तर अर्जुन अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे अर्जुनची अंडर -16 संघातील निवड ही ऑल राऊंडर म्हणून झाली आहे.
प्रणवच्या विक्रमी खेळीपूर्वीच अर्जुनची निवड –
या मेसेजची पडताळणी करण्यासाठी एबीपी माझाने प्रणव धनावडेचे वडील प्रशांत धनावडे यांच्याशी बातचीत केली. त्यांनीही हा व्हायरल होणारा मेसेज खोडून काढला. तसंच अर्जुनची निवड ही प्रणवने 1 हजार धावांचा विक्रम रचण्यापूर्वीच झाल्याचं प्रशांत धनावडेंनी सांगितलं.
==========================================
रा. स्व. संघाच्या शाळेत शिकणारा मुस्लीम विद्यार्थी दहावीत अव्वल
Muslim Student Topper in RSS School
गुवाहाटी : आसाममध्ये भाजप सत्तारुढ झाला असतानाच संघाच्या शाळेतील मुस्लीम विद्यार्थी राज्यात अव्वल ठरला आहे. आसाममध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत सरफराज हुसैनने ही कामगिरी बजावली आहे.
सरफराज हा रा. स्व. संघाची शैक्षणिक संस्था असलेल्या विद्या भारतीचा विद्यार्थी आहे. सरफराजने राज्य माध्यमिक शालान्त परीक्षेत एकूण 600 पैकी 590 गुण मिळवले आहेत. या यशाचं सर्व श्रेय सरफराज आपल्या शाळेतील शिक्षकांना देतो.
16 वर्षीय सरफराज हा गुवाहाटीच्या दक्षिण भागातील बेतकुचीच्या शंकरदेव शिशु निकेतनचा विद्यार्थी आहे. ही शाळा संघ परिवारामधील विद्या भारतीतर्फे चालवली जाते. सरफराजची इंजिनिअर होण्याची इच्छा आहे.
सरफराजने संस्कृतमध्ये निबंधलेखन स्पर्धा आणि वाद-विवाद स्पर्धांमध्येही नेहमी अव्वल क्रमांक पटकावला आहे. संस्कृतचे शिक्षण घेताना कधीही अडचण आली नसल्याचं तो सांगतो. “सरफराजला या शाळेत प्रवेश मिळवताना कोणतीही अडचण आली नाही. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे ही माझी कायमच इच्छा राहिलेली आहे, असं सरफराजचे वडिल अजमल हुसैन म्हणतात.
सरफराजच्या या कामगिरीवर खुश होऊन राज्याचे शिक्षणमंत्री हेमंत सरमा यांनी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विद्या भारतीची शाळा सुरु करणार असल्याचे जाहीर केले. तसेच सरफराजला पुढील शिक्षणासाठी 5 लाख रुपयांचं बक्षीसही दिलं आहे.
“राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अशा शाळा सुरु केल्याने विद्यार्थ्यांचा विकास होईल.” अशी आशा सरमा यांनी व्यक्त केली आहे.
==========================================
नववधू कौमार्य परीक्षेत नापास, जातपंचांच्या आदेशाने पतीनं लग्न मोडलं
नाशिक: पत्नी कौमार्य परीक्षेत नापास ठरल्यानं लग्नानंतरच्या अवघ्या ४८ तासात पतीनं तिच्याशी वैवाहिक संबंध तोडून टाकल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडला आहे.
लग्नानंतरच्या पहिल्या रात्री जातपंचाच्या आदेशानं नववधूची कौमार्य परीक्षा घेतली गेली. पतीकडे जातपंचानी एक पांढऱ्या रंगाची बेडशीट सोपवली. दोघांच्या शारीरिक संबंधांनंतरही बेडशीटला रक्ताचा डाग न लागल्यानं पत्नी कौमार्य परीक्षेत नापास ठरल्याचा फतवा जातपंचांनी सुनावला.
मुलगी कौमार्य परीक्षेत अपयशी झाल्याचं निर्वाळा आधी जात पंचायतीनं दिला आणि हे लग्न रद्द ठरवलं. त्यानंतर नवऱ्यानं तिच्याशी संबंध तोडून टाकला. २२ मे रोजी हा विवाह झाला होता.
या सगळ्या भयावह प्रकारानंतरही बहिष्काराच्या भीतीनं मुलीच्या पालकांनी घडल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, अंनिस आणि जातपंचायत मूठमाती अभियानाचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, अॅड. रंजना गवांदे यांनी हा प्रकार उजेडात आणला.
जातपंचावर तात्काळ कठोर कारवाई अशी मागणी आता जोर धरते आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही पोलीस भरती प्रक्रियेसाठी प्रयत्न करत होती. त्यामुळे धावणं, सायकल चालवणं, लांब उड्या अशा प्रकाराचा सराव ती नित्यनेमानं करत होती. मात्र शास्त्रीय कारण न तपासता अघोरी पद्धतीनं कौमार्याचा फैसला करणाऱ्या जातपंचायतीवर कठोर कारवाई व्हावी. अशी मागणी आता जोर धरते आहे.
==========================================

रणथंबोरची राणी म्हणून मछली वाघीण प्रसिद्ध आहे. मछली 30 मे रोजी 20 वर्षांची झाली. वाघांचं आयुष्य तसं 10 ते 15 वर्षांचंच. त्यामुळे मछलीचं महत्त्व वेगळं.
जगातली मोस्ट फोटोग्राफ्ड म्हणजे सर्वाधिक फोटो काढली गेलेली अशी मछलीची ख्याती आहे. ही वाघीण राणी माँ, रणथंबोरची राणी म्हणूनही नावाजली गेली आहे. तिच्यावर अनेक डॉक्युमेंट्रीजही तयार झाल्या आहेत. विशेष म्हणजे तिला जीवनगौरव पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
तिला पाहण्यासाठी राजस्थानला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. तिच्यामुळे पर्यटन क्षेत्रात वर्षाला किमान 60 ते 70 कोटी रुपयांची भर पडते.
मछलीला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. आज मछलीचे दात पडले आहेत, वार्धक्याच्या खुणा तिच्या चेहऱ्यावर दिसतात, मात्र तो दिमाख आजही कायम आहे.

शिल्पा शिंदे भाभीच्या भूमिकेतून पुनरागमन करत असल्याचं वृत्त आहे. ही भूमिका अंगुरीभाभीची नाही किंवा टीव्ही शोसाठीही नाही, तर एका वेब सीरीजसाठी आहे. ‘हॅपी-फाय’ या वेब शोमध्ये शिल्पा दिसणार आहे. सब टीव्ही ग्रुपच्या यूट्यूब वाहिनीवर हा शो दिसणार असल्याची माहिती आहे.
यशराज, टीव्हीएफसारख्या बड्या निर्मिती संस्था वेब शो तयार करत आहेत. तरुण प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता शिल्पा शिंदेच्या या शोला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
‘भाभीजी घर पे है’ मालिकेच्या निर्मात्यांनी शिल्पा शिंदेची ‘सिंटा’कडे तक्रार करुन तिच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिल्पा कपिल शर्माच्या शोमध्ये दिसण्याचंही वृत्त होतं, मात्र आता चाहते तिला नव्या स्वरुपात पाहण्यास उत्सुक आहेत.
Most Photographed! रणथंबोरची राणी मछली वाघिणीचा दिमाख
जयपूर : जंगलचा राजा म्हणून सिंहाची ओळख असली तरी वाघासारखा डौलदार प्राणी तसा विरळाच. राजस्थानच्या रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील मछली वाघीण त्याला अपवाद कशी ठरणार. इतकंच काय, मछलीच्या शिरपेचात असे अनेक मानाचे तुरे रोवले गेले आहेत.
रणथंबोरची राणी म्हणून मछली वाघीण प्रसिद्ध आहे. मछली 30 मे रोजी 20 वर्षांची झाली. वाघांचं आयुष्य तसं 10 ते 15 वर्षांचंच. त्यामुळे मछलीचं महत्त्व वेगळं.
जगातली मोस्ट फोटोग्राफ्ड म्हणजे सर्वाधिक फोटो काढली गेलेली अशी मछलीची ख्याती आहे. ही वाघीण राणी माँ, रणथंबोरची राणी म्हणूनही नावाजली गेली आहे. तिच्यावर अनेक डॉक्युमेंट्रीजही तयार झाल्या आहेत. विशेष म्हणजे तिला जीवनगौरव पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
तिला पाहण्यासाठी राजस्थानला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. तिच्यामुळे पर्यटन क्षेत्रात वर्षाला किमान 60 ते 70 कोटी रुपयांची भर पडते.
मछलीचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेट यूझर्सचं लक्ष वेधून घेत आहे. काही वर्षांपूर्वी मछलीने एका 14 फुटी मगरीला मारले, त्या घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. ती एक आई आहे, शिकारी आहे आणि राणीही!
मछलीला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. आज मछलीचे दात पडले आहेत, वार्धक्याच्या खुणा तिच्या चेहऱ्यावर दिसतात, मात्र तो दिमाख आजही कायम आहे.
पाहा व्हिडिओ :
==========================================
शिल्पा शिंदेचं 'भाभी'च्या भूमिकेतून पुनरागमन
मुंबई : अँड टीव्ही वाहिनीवर प्रेक्षकांच्या लाडक्या ‘भाभीजी घरपे है’ मालिकेतून शिल्पा शिंदेची गच्छंती झाली. शुभांगी अत्रेने अंगुरीभाभीचा लहेजा आणि आणि लूक चांगला कॅरी केला असला तरी शिल्पाचे चाहते तिला प्रचंड मिस करत आहेत. त्यामुळे शिल्पा शिंदेच्या चाहत्यांसाठी ती पुनरागमन करत असल्याची खुशखबर आहे.
शिल्पा शिंदे भाभीच्या भूमिकेतून पुनरागमन करत असल्याचं वृत्त आहे. ही भूमिका अंगुरीभाभीची नाही किंवा टीव्ही शोसाठीही नाही, तर एका वेब सीरीजसाठी आहे. ‘हॅपी-फाय’ या वेब शोमध्ये शिल्पा दिसणार आहे. सब टीव्ही ग्रुपच्या यूट्यूब वाहिनीवर हा शो दिसणार असल्याची माहिती आहे.
यशराज, टीव्हीएफसारख्या बड्या निर्मिती संस्था वेब शो तयार करत आहेत. तरुण प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता शिल्पा शिंदेच्या या शोला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
‘भाभीजी घर पे है’ मालिकेच्या निर्मात्यांनी शिल्पा शिंदेची ‘सिंटा’कडे तक्रार करुन तिच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिल्पा कपिल शर्माच्या शोमध्ये दिसण्याचंही वृत्त होतं, मात्र आता चाहते तिला नव्या स्वरुपात पाहण्यास उत्सुक आहेत.
==========================================
अमित शाहांचं दलित कुटुंबाच्या घरी जेवण, सपाची टीका
amit shah
वाराणसी :निवडणुका आल्या की मतदारांना प्रलोभनं दाखवावीच लागतात. मग त्यामध्ये अनेक आश्वासने जशी दिली जातात, तसं वेगवेगळ्या जाती घटकांविषयी विशेष ममत्वही मुद्दाम दाखवलं जातं. आजच्या निवडणुकीच्या राजकारणाचा हा एक अविभाज्य घटक बनलाय. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनीही काल वाराणसीत एका दलित मतदाराच्या घरी जेवण करून उत्तरप्रदेशच्या दलित मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे अमित शाह यांच्या या कृतीवरून समाजवादी पार्टीने त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.
अमित शाह यांच्या दलितांच्या घरी जेवणाने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही अनेकांना आठवण झाली. यापूर्वी त्यांनीही विदर्भातील एका दलित कुटुंबाच्या घरी असंच जेवण केलं होतं. तर गेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक मजुरांसोबत श्रमदान केले होते.
==========================================
एमएचटी-सीईटीचा विभागवार निकाल जाहीर
मुंबई: मेडिकल आणि इंजिनियरिंगसाठी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचसीईटीचा (MH-CET) निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. पण परीक्षेत कोण टॉपर ठरलं हे मात्र जाहीर करण्यात आलेलं नाही. केवळ विभागनिहाय निकाल जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान सविस्तर निकाल आज सकाळी 10 वाजता डीएमईआरच्या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाविद्यालयांनाही आजच विद्यार्थ्यांच्या गुणांची यादी देण्यात येणार आहे.
मेडिकलची मेरिट यादी ही 197 गुणांपासून सुरु होण्याची शक्यता आहे. तर इंजिनियरिंगची मेरिट यादी 200 गुणांपासून सुरु होण्याचे संकेत आहेत. या परीक्षेला राज्यभरातले 4 लाख 9 हजार 275 विद्यार्थी बसले होते.
कुठे पाहाल निकाल?
www.dmer.org, www.mhtcet2016.co.in, www.mahacet.org, www.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
==========================================
बर्थडे पार्टीत फुगे फुगवणाऱ्या सिलेंडरचा स्फोट, दोघांचा मृत्यू
नागपूर : मुलीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीमध्ये फुगे फुगवण्यासाठी आणलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. नागपूरच्या नरखेड तालुक्यातील वाढोणामधल्या घटनेने बर्थडे पार्टीच्या जल्लोषाचं रुपांतर क्षणार्धात शोककळेत झालं.
या घटनेत 7 वर्षांचा चिमुरडा नितीन अनिल चापेकर आणि 25 वर्षीय ज्ञानेश्वर भानुदास नंदनवार यांचा मृत्यू झाला, तर 7 वर्षांचा यश घनश्याम वानखडे आणि 36 वर्षीय महेंद्रसिंग बगेल गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर नागपूर येथील मेडीकल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वाढोणा येथील शेषराव देवराम चापेकर यांच्या सात वर्षांची मुलगी प्रांजलीचा सोमवारी सायंकाळी वाढदिवस होता. त्यानिमित्त अनिल देवराम चापेकर यांनी मंडप उभारुन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सगळी तयारी सुरुच असताना फुगे फुगवण्याचं काम जरीपटका नागपूर येथील महेंद्रसिंग बगेल यांना देण्यात आले. ते फुगे फुगवत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटात सिलेंडरचे तुकडे होऊन 100 ते 150 फुटांपर्यंत विखुरले. यावेळी मंडपात नातेवाईक आणि मित्रमंडळी यायची असल्यामुळे गर्दी नव्हती. त्यामुळे अनर्थ टळला. पण फुगे फुगवताना जवळ दोन लहान मुले नितीन चापेकर, यश वानखडे खेळत होती, तर ज्ञानेश्वर हे बाजुला उभे होते. हा स्फोट इतका भीषण होता की, ज्ञानेश्वर यांचा पाय पुर्णपणे कापला गेला.
==========================================
ठाण्यात दुहेरी हत्याकांड, ज्येष्ठ नागरिकासह नोकराची निर्घृण हत्या
ठाणे : ठाण्यात दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने ब्रम्हांड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घोडबंदर रोडजवळील ब्रम्हांड येथे असणाऱ्या रिजन्सी हाईट्स या सोसाटीतील एका ज्येष्ठ नागरिकासह नोकराची हत्या करण्यात आली आहे.
70 वर्षीय सीताराम श्रॉफ यांच्या तोडावर उशी ठेवून त्यांचा जीव घेण्यात आला, तर संतोष यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करुन हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.
दुहेरी हत्याकांडाच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, सोसायटीमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
==========================================
मी दिलेला शब्द पाळला, धनगर समाजालाही आरक्षण मिळवून देणार: पंकजा मुंडे
अहमदनगर: ‘डॉ. विकास महात्मेंना राज्यसभेची उमेदवारी देऊन मी दिलेला शब्द पाळला, आता धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही.’ असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. अहमदनगरमधलं चौंडी गाव पंकजा मुंडे यांनी दत्तक घेतलं, त्यावेळी त्या बोलत होत्या.
‘सत्तेत गाजर दाखवून जमणार नाही. त्यामुळे महात्मेंना राज्यसभेची उमेदवारी देऊन मी दिलेला शब्द पाळला. मी शब्द देते की याच सरकार कडून तुम्हाला आरक्षण मिळणार. तुम्हाला आरक्षण नाही मिळालं तर तुमच्या आधी मी रस्त्यावर उतरेल.’ असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. यावेळी गृहराज्यमंत्री राम शिंदे देखील उपस्थित होते.
जलयुक्त शिवार प्रकल्पात साठलेल्या पाण्याचं पाणी प्रबोधन पंकजा मुंडे करणार आहेत. त्यासाठी नऊ ते पंधरा ऑगस्ट जलचेतना यात्राही त्या काढणार आहेत.
==========================================
भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांची गुप्त बैठक, संघटन मंत्र्यांना शिव्यांची लाखोली
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या तिकीट वाटपावरुन भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. भाजपमध्ये निष्ठेपेक्ष पैसा मोठा झाला आहे. निष्ठेने काम करणाऱ्यांची पक्षात गरज नाही, असं म्हणत एका भाजप कार्यकर्त्याने संताप व्यक्त केला. तसंच शिव्यांची लाखोली वाहिली.
भाजपने विधानपरिषदेसाठी निष्ठावंतांना डावलून प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड या बाहेरुन आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरुद्ध आता भाजपमध्ये संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे.
एकीकडे तिकीट वाटपावरुन भाजपमध्ये कोणतीही नाराजी नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सांगत आहे. मात्र मुंबईत भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांची गुप्त बैठक बोलावण्यात आली होती. दादर भाजप कार्यालयात ही बैठक पार पडली.
==========================================
जुगाऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोरुनच केलं पोलिसाचं अपहरण!
मीरारोड: मीरारोड येथे जुगाऱ्यांनी एका पोलीस काँस्टेबलचं अपहरण चक्क पोलीस ठाण्यासमोरुनच केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. सुरन शेट्टी, सुकेश कोटीयन, अरुण शेट्टी, आण्णा इंगळे अशी आरोपींची नाव आहेत.
28 मेला पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा मारुन 20 जणांना अटक केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी एक फॉरच्यूनर गाडी मिरा रोड पोलीस ठाण्याच्या समोर आली. या गाडीत जुगारी असल्याची माहिती एका व्यक्तीनं पोलीस कॉन्स्टेबल देवचंद जाधव यांना दिली.
गाडीतील जुगारी पकडण्यासाठी गेलेल्या कॉन्स्टेबल जाधव यांनाच चौघांनी गाडीत बसवलं आणि त्यानंतर घोडबंदर येथील फाऊंटन हॉटेलच्या आवारात जाधव यांना सोडून देण्यात आलं. याप्रकरणी चार जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चारही आरोपींना ठाणे कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
==========================================
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डीझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर 2.58 रुपयांनी वाढले असून डिझेल 2.26 रुपयांनी महागलं आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ झाली असून दोन महिन्यातील ही चौथी दरवाढ आहे. यापूर्वी 17 मे रोजी पेट्रोल 0.83 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 1.26 रुपये प्रति लिटर महागलं होतं. तर त्या याआधी 30 एप्रिलला पेट्रोलचे दर प्रति लिटर 1.06 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर 2.94 रुपयांनी वधारले होते. तसंच 5 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते.
दरम्यान देशात 1 जूनपासून कृषी कल्याण सेस लागू होत असल्यामुळे सर्व्हिस टॅक्स 14.5 टक्क्यांवरुन 15 टक्क्यांवर जाणार आहे. मोबाईल, डीटीएच, वीज, पाणी यांचं बिल, रेस्टॉरंटमधील जेवण, रेल्वे आणि विमानाचं तिकीट, बँकिंग, विमा सेवा महागणार आहेत. बँक ड्राफ्ट, फंड ट्रान्सफर, एसएमएस अलर्ट, चित्रपट, स्पा, सलून, पार्लर यासारख्या सेवाही महागतील. आता पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार आहे.
==========================================
मृत्यू झाल्याचे भासवून आठ वर्षाच्या मुलीने बलात्का-याच्या तावडीतून केली सुटका
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ३१ - एका आठ वर्षाच्या मुलीने स्वत:चा मृत्यू झाल्याचे भासवून बलात्का-याच्या तावडीतून सुटका करुन घेतल्याची घटना दिल्लीमध्ये घडली. पिडित मुलगी दिल्लीच्या किरारी भागामध्ये रहाते. शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास आरोपीने पिडित तरुणी तिच्या घराबाहेर कॉटवर झोपलेली असताना तिचे अपहरण केले.जेव्हा मुलीचे डोळे उघडले तेव्हा आपण अनोळखी ठिकाणी असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण आरोपीने तिचे तोंड दाबले. आरोपीने पिडित तरुणीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपी आपल्याला ठार मारेल अशी त्या मुलीला भिती वाटत होती. म्हणून ती काहीही हालचाल न करता निपचित पडून राहिली जेणेकरुन आरोपीला मृत्यू झाला आहे असे वाटावे.
==========================================
हनिमूनमधील भारतीय जोडप्याच्या 'त्या' क्षणांचे चित्रीकरण करणा-या पाकिस्तानी ड्रायव्हरला अटक
- ऑनलाइन लोकमतदुबई, दि. ३१ - हनिमूनसाठी दुबईला गेलेल्या भारतीय जोडप्याच्या लैंगिक संबंधांचे मोबाईलवर चोरुन चित्रीकरण करणा-या पाकिस्तानी ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. एमएस असे या ड्रायव्हरचे नाव आहे. विवाहानंतर चार दिवसांच्या हनिमूनसाठी हे जोडपे दुबईला गेले होते. या ड्रायव्हरकडे लिमोझीनमधून जोडप्याला दुबई फिरवण्याची जबाबदारी होती.लिमोझीनमधील या जोडप्याच्या अंतरंग क्षणांचे एमएसने चोरुन त्याच्या मोबाईलवर चित्रीकरण केले व जोडप्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. एमएसने जोडप्याला पुन्हा हॉटेलमध्ये आणून सोडल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्याने पतीच्या व्हॉटसअॅपवर तो व्हिडीओ पाठवला व दोन हजार दिरामची मागणी केली.
==========================================
नरेंद्र मोदींविरोधात फेसबुकवर कमेंट करणा-या आयएएस अधिका-याला नोटीस
- ऑनलाइन लोकमत -भोपाळ, दि. 01 - पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात फेसबुकवर कमेंट करणा-या मध्यप्रदेशातील वरिष्ठ आयएएस अधिका-याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. राज्य सरकारने अजय सिंग गंगवार यांना ई-मेलद्वारे ही नोटीस पाठवली आहे. महत्वाचं म्हणजे याअगोदर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचं कौतुक केल्याने त्यांची बदली करण्यात आली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात करण्यात आलेल्या फेसबुकवरील पोस्टला अजय सिंग गंगवार यांनी लाईक करत कमेंटही केली होती. 23 जानेवारी 2016 मध्ये करण्यात आलेल्या या पोस्टवर अजय सिंग गंगवार यांनी 'मोदींच्या विरोधात जनक्रांती झाली पाहिजे' अशी कमेंट केली होती. अजय सिंग गंगवार यांनी मात्र आपण अशा प्रकारच्या कोणत्याच पोस्टवर कमेंट केली नसल्याचं म्हटलं आहे.
==========================================
घोडागाडी चालकांना मिळणार टॅक्सी आणि रिक्षाचे परवाने
- मुंबई : दक्षिण मुंबईत पर्यटकांसाठी असलेल्या घोडागाडी (व्हिक्टोरिया) बंद करायच्या, तर या घोडागाड्यांच्या चालक, मालकांचे, तसेच घोड्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात पॅकेजचे प्रारूप मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केले आहे.हे पॅकेज लवकरच राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविले जाईल आणि ती मंजुरी मिळाल्यानंतर ते मुंबई उच्च न्यायालयात मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. समितीच्या आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत पुनर्वसनाच्या पॅकेजचे प्रारूप निश्चित करण्यात आले.मुंबई उच्च न्यायालयाने ८ जून २०१५ च्या निर्णयाने या घोडागाड्यांवर बंदी आणली होती. एक वर्षाच्या आत या बंदीची अंमलबजावणी करावी आणि ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत शासनाने पुनर्वसनाचे पॅकेज सादर करावे, असे उच्च न्यायालयाने त्यावेळी म्हटले होते. आता विलंबाने का होईना, पण शासनाने पॅकेज तयार केले आहे. या पॅकेजनुसार, घोडागाडी चालक-मालकांना टॅक्सी वा रिक्षाचे परवाने देण्याचा पर्याय उपलब्ध असेल. हे दोन्ही नको असतील, तर हॉकरचा परवानादेखील घेता येईल. घोड्यांची कायमस्वरूपी काळजी घेण्याची तयारी काही स्वयंसेवी संस्थांनी दर्शविली आहे. घोड्यांचे मालक हे घोडे त्यांच्याकडे देऊ शकतील, स्वत:कडे ठेवू शकतील किंवा घोड्यांची विक्रीदेखील करू शकतील. शासनाची या प्रारूपाला मान्यता घेण्यापूर्वी, घोडागाडी चालक-मालकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात येणार
==========================================
अडीच वर्षांच्या मुलावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण
- मुंबई : जीवघेण्या व्याधीसह जन्माला आलेल्या श्रीराज जेधे या अवघ्या अडीच वर्षांच्या मुलावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी जणू त्याला पुनर्जन्म दिला आहे. गायत्री या श्रीराजच्या २९ वर्षांच्या आईनेच आपल्या कलेज्याच्या या तुकड्यासाठी स्वत:च्या यकृताचे अंशत: दान केले.पाच महिन्यांचा असताना श्रीराजच्या ओटीपोटाचा आकार खूपच वाढला. सोनोग्राफी केली असता त्याच्या यकृतात बराच द्रवसंचय झाल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीस त्याच्यावर परळ येथील बाई जेरबाई वाडिया लहान मुलांच्या इस्पितळात उपचार केले गेले.अनेक चाचण्या व तपासण्यांनंतर श्रीराजला ‘बड-चिआरी सिन्ड्रोम’ अशा वैद्यकीय नावाने ओळखली जाणारी दुर्मीळ व्याधी असल्याचे निदान झाले. यात यकृतातील रक्तवाहिन्या रक्ताच्या गाठी झाल्याने अवरुद्ध होतात. यामुळे यकृतातील अंत:स्रावी द्रवाचा निचरा न होता ते तेथेच साठून राहते. अंधेरी येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी इस्पितळात अलीकडेच श्रीराजवर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. तेथील बालरोगतज्ज्ञ डॉ. साईस्ता अमिन यांनी सांगितले की, सुरुवातीस आम्ही श्रीराजच्या यकृताच्या धमन्यांमधील गाठी विरघळविण्यासाठी त्याच्यावर रक्त पातळ करण्याचे औषधोपचार केले. त्यानंतर सुमारे दोन वर्षे फॉलो-अप उपचार सुरू होते. डॉ. अमिन म्हणाल्या की, या वर्षाच्या सुरुवातीस श्रीराजला ‘लिव्हर सिरॉसिस’ होऊन त्याचे यकृत पूर्णपणे निकामी होण्याची अवस्था आली. अशा वेळी यकृताचे प्रत्यारोपण करणे हाच एकमेव पर्याय शिल्लक राहिला.
==========================================
विक्रोळीत चार दुकानांना आग
- मुंबई : विक्रोळीतील सूर्यनगर परिसरात तीन दुकाने आणि एका हॉटेलला मंगळवारी दुपारी भीषण आग लागून लाखो रुपये किमतीचा माल खाक झाला. हार्डवेअरच्या दुकानात शॉर्टसर्किटमुळे घडलेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग विझवण्याचा प्रयत्न करताना अग्निशमन दलाचे दोघे जवान किरकोळ जखमी झाले. नाना वेव्हारे व घनश्याम परब अशी त्यांची नावे असून, प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.विक्रोळी पोलीस ठाण्याच्या बाजूलाच एक हॉटेल, दोन हार्डवेअरची दुकाने आणि एक शिधावाटप केंद्र असून, या ठिकाणी नेहमी वर्दळ असते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हार्डवेअरच्या दुकानामध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली.पोटमाळ्यावर सामान असल्याने आगीचा भडका वाढला. काही वेळातच ही आग बाजूची दुकाने व हॉटेलमध्ये पसरली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या काही वेळातच या ठिकाणी दाखल झाल्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र ही आग विझवत असताना नाना वेव्हारे व घनश्याम परब हे जवान किरकोळ जखमी झाले. त्यांना तत्काळ मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काही वेळातच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
==========================================
दूषित रक्तामुळे देशात २,२३४ जणांना एचआयव्ही; महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
- नवी दिल्ली : दूषित रक्त दिले गेल्यामुळे गेल्या केवळ १७ महिन्यांत देशातील २,२३४ जणांना एचआयव्हीची बाधा झाली आहे. अशा प्रकारच्या सर्वाधिक म्हणजे ३६१ घटना उत्तर प्रदेशात घडल्या आहेत. रुग्णालयांतील असुरक्षित रक्त संक्रमण पद्धत याला कारणीभूत आहे.गेल्या आठवड्यातीलच आसामचे उदाहरण आहे. भाजल्यामुळे कामरूप जिल्ह्यातील तीन वर्षीय मुलाला गुवाहाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दूषित रक्त दिले गेल्यामुळे त्याला एचआयव्हीचा संसर्ग झाला.दूषित रक्तामुळे रुग्णांना एचआयव्ही होण्याच्या घटनांमध्ये गुजरात दुसऱ्या, तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही राज्यांत अशा अनुक्रमे २९२ व २७६ घटना घडल्या आहेत. राजधानी दिल्लीही यातून सुटली नाही. दिल्लीत २६४ जणांना असुरक्षित रक्ताचा फटका बसला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी अर्जानंतर राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेने (नॅको) ही माहिती उघड केली. अर्थसंकल्पीय कात्रीमुळे एड्स जनजागृतीबाबत सरकारने हात आखडता घेतला आहे. दूषित रक्तामुळे एचआयव्हीचा संसर्ग होण्याच्या घटना वारंवार घडत असतानाही जबाबदार रुग्णालये आणि रक्तपेढ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, असे कोठारी म्हणाले. देशभरातील सुरक्षित रक्त संक्रमणाची जबाबदारी नॅकोवर आहे. रक्तदाता व त्याच्याकडून मिळालेल्या रक्ताची चाचणी करून ते एचआयव्ही, एचबीव्ही, हेपटायटिस सी, मलेरिया वा सिफिलीस यासारख्या संसर्गजन्य रोगाने संक्रमित नसल्याची खात्री करून घेणे कायद्याने बंधनकारक आहे. दूषित रक्तामुळे एचआयव्हीचा प्रसारगोयल म्हणाले की, दूषित रक्तामुळे एचआयव्हीची लागण होण्याच्या घटना दुर्दैवी असून, हे प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्याचे आमचे लक्ष्य आहे. आम्ही त्या दिशेने काम करीत आहोत. आमच्या एचआयव्ही कार्यक्रमाचे प्रमाण डोळ्यासमोर ठेवून ताज्या आकडेवारीवर दृष्टिक्षेप टाकला गेल्यास आम्ही किती काम केले याचा प्रत्यय येईल.
==========================================
५०० भारतीय इसिसकडे
- नवी दिल्ली : इसिस या अतिजहाल दहशतवादी संघटनेला भारतात विशेष प्रभाव पाडता आला नसला तरी ताज्या आकडेवारीनुसार ४०० ते ५०० भारतीय या संघटनेच्या तात्त्विक विचारसरणीकडे आकर्षित झाल्याचे निष्पन्न झाले. गुप्तचर संस्थांनी लगेच छडा लावत त्यांचा विदेशात जाण्याचा डाव हाणून पाडला आहे.इसिसकडे आकर्षित झालेल्या भारतीयांमध्ये बहुतांश युवक असून वेबसाईटवर नियमितपणे संवाद साधत काहींनी इराक आणि सिरियामध्ये कसे पोहोचायचे याबाबत इसिसच्या काही लोकांशी संपर्कही साधला होता. इसिसने जगभरात ठेवलेल्या लक्ष्याबाबतही त्यांनी चर्चा केली होती, अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्या हालचालीमुळे गुप्तचर संस्था, राज्य पोलीस आणि राष्ट्रीय तपास संस्थेला सातत्याने सतर्क राहावे लागले. तपास संस्थांनी बहुतांश युवकांना ताब्यात घेतत्यांची चौकशी केली असता कोणत्याही गंभीर प्रकरणांमध्ये न गुंतलेल्यांचे समुपदेशन करीत त्यांना सोडून दिले. (वृत्तसंस्था)1इसिसकडे आकर्षित झालेल्या भारतीय युवकांच्या भारतीय व्यवस्थेबद्दल फारशा तक्रारी नाहीत. त्यांच्यात लष्कर, सुरक्षा दलाबद्दल कोणतीही सूड भावना नसल्याचेही आढळून आले. त्यातील बुहतेकांनी शिक्षण, रोजगार आणि कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य असल्याची कबुलीही दिली.2जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, प. बंगाल, दिल्ली या राज्यांतील युवकांनी वेबवर आधारित कॉलिंग, मेसेजिंगचा वापर केला.
==========================================
‘आफ्रिकनांवरील हल्ले तिरस्करणीय’
- रब्बात (मोरोक्को) : भारतात आफ्रिकन नागरिकांवर गेल्या काही दिवसांत झालेले हल्ले हे तिरस्करणीय आहेत. ते नागरिक आमचे पाहुणे आहेत, असे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी म्हटले.हल्ला मग तो स्वत:च्या देशवासीयांवर असो की, पाहुण्यांवर तिरस्करणीयच आहे, असे ते म्हणाले. सर्व प्रकारच्या हिंसेचा निषेध करण्याशिवाय कोणीही व्यक्तीकिंवा सरकार यापेक्षा वेगळेकाही म्हणू शकणार नाही, असे ते म्हणाले.आफ्रिकन देशांशी भारताचे संबंध चांगले आहेत, असे सांगून अन्सारी म्हणाले की, ते (आफ्रिकन्स) आमचे पाहुणे आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन झालेल्या परिस्थितीत त्यांची आम्ही काळजी घेतली पाहिजे. आफ्रिकन देशांशी आमच्या असलेल्या संबंधांचे आम्हाला मोठे महत्त्व असून आम्ही नेहमीच त्यांच्या बाजूने आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. अन्सारी हे मोरोक्को आणि ट्यूनिशिया देशाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.
==========================================
दोन लाख पौंड भरू, पण शरणार्थी नकोत
- लंडन : आर्थिक विपन्नावस्था आणि अनेक वर्षांच्या यादवीतून सुटका करून घेण्यासाठी सीरियातून आलेल्या १० शरणार्थींना आश्रय देण्याऐवजी दोन लाख पौंडाचा दंड भरण्याचा निर्णय स्वित्झर्लंडमधील एका श्रीमंत गावातील रहिवाशांनी घेतला आहे.राजकीय अस्थिरतेने ग्रासलेल्या आफ्रिका व आशिया खंडातील देशांमधून युरोपमध्ये आलेल्या शरणार्थींपैकी ५० हजार जणांना आश्रय देण्याचा निर्णय स्वित्झर्लंडने घेतला आहे. या शरणार्थींना देशातील २५ विविध राज्यांमध्ये वसविण्यात येणार असून त्यासाठी कोटा ठरवून देण्यात आला. ठरलेल्या शरणार्थींना आश्रय न दिल्यास दंड भरावा लागणार आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या आॅबेरविल-लिएली या गावात या कोटा पद्धतीनुसार सीरियातून आलेल्या १० शरणार्थींना वसविण्यात यायचे होते. हे गाव अतिश्रीमंत असून युरोपमधील सर्वात श्रीमंत गावांमध्ये त्याची गणना होते. गावाची एकूण लोकसंख्या २२ हजार असून त्यापैकी ३०० व्यक्ती दशलक्षाधीश आहेत.शरणार्थींना आश्रय द्यायचा की नाही यावर आॅबेरविल-लिएली गावात सार्वमत घेण्यात आले व त्यात बहुसंख्य रहिवाशांनी ‘शरणार्थी नकोत’ असे मत दिले. यानंतर गावात फूट पडली. शरणार्थी स्वीकारण्यास नकार देणाऱ्यांवर वांशिक पक्षपाताचा आरोप केला जात आहे. गावाचे मेयर आंद्रियास ग्लॅरनर यांनी मात्र या आरोपाचे खंडन केले आहे.
==========================================
पुरुषांपेक्षा महिलाच स्मार्टफोनच्या अधिक आहारी
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. 31 - आजकाल प्रत्येकजण स्मार्टफोनच्या आहारी गेलेला आहे. मात्र स्मार्टफोनच्या वापरामध्ये पुरुषांशी तुलना करता महिलांचं प्रमाण जास्त असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. महिला दिवसातून किमान चार तास स्मार्टफोन वापरात व्यस्त असतात. स्मार्टफोनच्या वापरावर अशा प्रकारे प्रथमच सर्वेक्षण करण्यात आलं आहे. दक्षिण कोरियामधील अजोऊ विद्यापीठातील प्रोफेसर चँग-जेई-येओन यांनी हे सर्वेक्षण केलं आहे. सहा कॉलेजमधील 1236 विद्यार्थ्यांवर केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावरच हा निष्कर्ष काढण्यात आल्याची माहिती चँग-जेई-येओन यांनी दिली आहे.सर्वेक्षणामध्ये 52 टक्के महिला दिवसातून चार तास किंवा त्याहून जास्त वेळ स्मार्टफोनचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. महिलांशी तुलना करता पुरुषांच प्रमाण 29.4 टक्के आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महिलांमधील 22.9 टक्के महिला सहा तास स्मार्टफोन वापरतात तर दुसकीडे फक्त 10.8 टक्के पुरुष दिवसातून सहा तास स्मार्टफोन वापरात व्यस्त असतात.
==========================================
नवी दिल्ली - कंपनीसाठी लागणारे 30% साहित्य भारतामधूनच घ्यावयाच्या निर्बंधामधून सूट न दिली गेल्यास ऍपल कंपनी भारतामध्ये कंपनी स्टोअर्स सुरु करणार नाही, अशी भूमिका कंपनीने जाहीर केली आहे. भारतामध्ये उत्पादन करण्याचा; वा येथील स्थानिक निर्मात्यांकडून काही भाग स्वीकारण्याचा कंपनीचा सध्या कोणताही विचार नसल्याचे यासंदर्भात माहिती असलेल्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
परकीय गुंतवणुकीसंदर्भातील धोरणासंदर्भात एका ब्रॅंडमधील गुंतवणूक करताना 30% माल हा भारतामध्येच उत्पादित व आयात केला असावा, अशी अट घालण्यात आली आहे. मात्र उत्पादन हे जर नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानावर (कटिंग एज) आधारित असल्यास या अटीमधून सूट देण्यास सरकारने तयारी दर्शविली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला सूट मिळावी, अशा आशयाची विनंती ऍपलकडून करण्यात आली होती. मात्र ही विनंती फेटाळण्यात आली होती.
...तर भारतात स्टोअर्स स्थापन करणार नाही:ऍपल
| |
-

नागपूर - महागडी वीज वापरणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे अनेकजण विजेची बचत करण्यासाठी घरात एलएडी दिवे लावतात. ठरावीक वेळी फ्रीज सुरू करून बंद करतात. मात्र, हनुमाननगरातील दिनेश कावडे यांनी घरावर सोलर नेट लावून विजेची बचत केली आहे. या सोलर नेटमुळे दररोज दहा किलोवॉट वीजनिर्मिती होत असून त्यावर एलएडी दिव्यासह पंखे सुरू होतात.
नागपुरात पावसाळ्याचे दीड ते दोन महिने सोडले की सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असतो. या सूर्यप्रकाशावर सोलर ऊर्जा निर्माण करता येते. दिनेश यांनी हेच हेरून घरावर सोलर नेट लावण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी व्हीटेक इंजिनिअर्सच्या मदतीने लाखो रुपये खर्च करून दहा किलो वॉटचा सोलर नेट मीटरिंग प्रोजेक्ट लावला. सौरऊर्जा थेट इर्न्व्हटरला जाते. आणि ती करंटद्वारे घरातील विद्युत उपकरण सुरू करते. घरातील विद्युत उपकरण हे अल्टरनेट करंटनी सुरू होतात हे विशेष. कावडे यांनी लावलेल्या सौर नेटवर हेवी लोडने सुरू होणारे विद्युत उपकरण वगळता लो लोडनी सुरू होणारे दिवे, पंखे सुरू आहेत. त्यांची महिनाभर आठशे ते बाराशे रुपयांच्या विजेची बचत होत आहे.
सोलर नेटने उजळतात एलएडी दिवे

मुंबई - ज्येष्ठ समाजसेवक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या घडविणाऱ्या सनातन संस्थेच्या साधक आरोपीची ओळख तपास संस्थेस पटली असल्याचा दावा आम आदमी पक्षाचे (आप) आशिष खेतान यांनी आज (बुधवार) केला. दाभोलकर यांची हत्या सनातन संस्था आणि या संस्थेस संलग्न असलेल्या हिंदु जनजागृती समिती या उजव्या संघटनांनीच केल्याचा आरोप खेतान यांनी केला.
राजकारणातील "उजव्या घटकां‘चा समावेश असलेल्या कॉंग्रेस पक्षाने दाभोलकर प्रकरणाची क्रूर चेष्टा केल्याची टीका करत खेतान यांनी सनातन संस्थेने गोवा व महाराष्ट्रामध्ये काही बॉंबस्फोट घडविल्याचा आरोपही यावेळी केला. या संघटनांवर बंदी घालण्यासाठी सुरक्षा संस्था प्रयत्नशील होत्या; परंतु कॉंग्रेस सरकार याबाबतीत अपयशी ठरल्याचा हल्ला त्यांनी चढविला.
दाभोलकर प्रकरणाचा तपास सुरक्षा दलांनी पूर्ण केला असून या हत्येमध्ये सनातन संस्थेचे साधक व हिंदु जनजागरण समितीचे कार्यकर्ते सहभागी असल्याचे खेतान यांनी म्हटले आहे.
'दाभोलकर हत्येमागील साधकांची पटली ओळख'

…अखेर ती बालिका ठरली बलात्काराची बळी!
| |
-
| |
नवी दिल्ली - आठ वर्षाच्या बालिकेचे अपहरण झाल्यानंतर तिने सुटकेसाठी स्तब्ध पडून राहत मेल्याचे नाटक करून सुटका करण्याचा प्रयत्न केला. आरोपी दूर जात असल्याचे पाहून धावणाऱ्या बालिकेला गाठून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीतील किरारी परिसरात घडली आहे.
शनिवारी रात्री किरारी परिसरात पीडित बालिका घराबाहेर पलंगावर झोपली होती. रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास तिचे अपहरण करण्यात आले. तिचे तोंड बंद करून तिला जवळच्याच रिकाम्या जागेत नेण्यात आले. हा सर्व प्रकार बालिकेच्या लक्षात आल्यावर ती स्तब्ध पडून राहिली. काहीच हालचाल करत नसल्याचे दिसल्याने आरोपींनी तिला चिमटा काढून जिवंत आहे का हे पाहण्याचा प्रयत्न केला. पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आरोपी तेथून दूर जाऊ लागले. हे पाहून पीडित बालिका घराच्या दिशेने धावू लागली. आरोपीने तिचा पाठलाग सुरु केला. दगडाची ठेच लागून कोसळल्याने आरोपीने तिला पकडले. त्यानंतर खूनाची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

‘माझ्या पत्नीला मुलीच्या पलंगावर रक्ताचे थेंब दिसल्याने धक्का बसला. तसेच तिला वेदना होत असल्याची ती तक्रार करू लागली‘, अशी माहिती पीडित बालिकेच्या वडिलांनी दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यामध्ये आरोपी आढळून आलेला नाही. आरोपी अल्पवयीन असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून तो पीडित बालिकेच्या शेजारीच राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पीडित बालिका एका खाजगी शाळेत तिसऱ्या इयत्तेत शिकत असून तिच्या वडिलांचा खाजगी व्यवसाय आहे.
==========================================
वॉशिंग्टन - यंदाच्या उन्हाळ्यात पर्यटनासाठी युरोपात जाणाऱ्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकी सरकारने संभाव्य दहशतवादी हल्ल्यांपासून सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. ‘उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये युरोपात जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी दहशतवादी हल्ल्यांसाठी उत्कृष्ट लक्ष्य ठरू शकते,‘ असे येथील सरकारचे म्हणणे आहे.
असे हल्ले युरोपातील सार्वजनिक ठिकाणे आणि मोठ्या प्रमाणावर आयोजित होणारे कार्यक्रम उदाहरणार्थ व्यापारी तसेच प्रवासी केंद्रे, प्रसिद्ध उपाहारगृहे, क्रीडा महोत्सव अशा ठिकाणी होऊ शकतात. १० जून ते १० जुलै दरम्यान होणारी युरो २०१६ फुटबॉल विश्वचषक स्पर्धा तसेच जुलै च्या अखेरीस होणारी ‘टूर डी फ्रान्स‘ सायकल शर्यत आणि रोमन कॅथॉलिक चर्चचा जागतिक दिन हे दहशतवादी हल्ल्यांच्या योजनांमध्ये समाविष्ट असू शकतात, असा इशारा सरकारने दिला आहे.
बेल्जियम आणि फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. हा सावधगिरीचा इशारा ३१ ऑगस्ट २०१६ पर्यंत लागू आहे.
युरोपात इसिसच्या हल्ल्याची भीती: अमेरिका

नवी दिल्ली - राहुल गांधी हे लवकरच कॉंग्रेस अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. गांधी हे सध्या कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आहेत.
राहुल यांना अध्यक्षपद सोपविण्यासंदर्भात गेल्या काही काळापासून कॉंग्रेस पक्षात मोठी चर्चा सुरु आहे. राहुल यांच्याकडे अध्यक्षपद केव्हा सोपवायचे, यासंदर्भातही पक्षात मतमतांतरे असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. मात्र कॉंग्रेसमध्ये सध्या असलेली ही दोन नेतृत्वांची व्यवस्था फार काळ चालणे शक्य नसल्याचे पक्षामधील एका वरिष्ठ नेत्याने आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. "एखादी समस्या घेऊन गेले असताना सोनिया या ऐकून घेतात; मात्र उत्तरासाठी त्या राहुल यांच्याकडे पाठवितात. यावर राहुल यांच्याकडे गेले असताना ते याविषयी मी आईशी बोलून निर्णय घेईन, असे म्हणतात,‘ असे कॉंग्रेसमधील नेत्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी लवकरच कॉंग्रेस अध्यक्ष होणार

गुवाहाटी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विद्या भारती या शिक्षण संस्थेशी संलग्न असलेल्या शंकरदेव शिशु निकेतन शाळेतील एका मुस्लिम विद्यार्थ्याने आसाम राज्य बोर्डाच्या परीक्षेत टॉपर म्हणून मान मिळविला आहे. त्याला 600 पैकी 590 गुण मिळाले आहेत.
संघाच्या शाळेतील मुस्लिम मुलगा दहावीत टॉपर
| |
-
| |
सर्फराज हुसैन असे या मुलाचे नाव असून, त्याचे कौतुक करण्यात येत आहे. या मुलाने गरिबीवर मात करत ९८% गुण मिळवले आहेत. या घवघवीत याशाबद्दल आपल्या भावना व्यक्त करत सर्फराज म्हणाला की, कष्टाचे चीज झाल्याचा मला खूप आनंद आहे. परीक्षेनंतर मला पहिल्या दहामध्ये येण्याची अपेक्षा होती, पण पहिला क्रमांक मिळवू शकेन हे अपेक्षित नव्हते. या यशाबद्दल मी माझ्या शिक्षकांचे व माझ्या परिवाराचे आभार मानतो. मला खात्री आहे की पुढे जाऊन अधिक कठोर मेहनत करून मी आर्थिक अडथळे दूर करेल.
==========================================
No comments:
Post a Comment