Wednesday, 13 July 2016

नमस्कार लाईव्ह १3-०७-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- Pokémon GOनं गुगल ट्रेंड सर्चवर मोडला विक्रम 
२- एनआयएकडून इसिसचे दोघे अटकेत 
३- भारत-पाक सीमारेषेजवळ 21 किलो हेरॉइन जप्त 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- 'एमआयएम'सह 191 राजकीय पक्षांची नोंदणी आयोगाकडून रद्द 
५- पक्ष्यांना दाणे टाकणं इतरांसाठी उपद्रव ठरु नये - हायकोर्ट 
६- वीज दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक 
७- सोनिया गांधी, मनमोहनसिंग उद्या नांदेडमध्ये 
८- धरणे भरण्यास हवा आणखी पाऊस 
९- हिंसेची धग कायम, काश्मीरमध्ये मृतांची संख्या ३० 
१०- झाकिर नाईक यांचे मुंडके उडवा: साध्वी प्राची 
११- बॅंक कर्मचाऱ्यांचा 29 जुलै रोजी देशव्यापी संप 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- APMC व्यापाऱ्यांचा संप मागे, शेतकऱ्यांकडून अडत न घेण्यास राजी 
१३- मुंबईचे रस्ते खड्ड्यात घालणारा पहिला कंत्राटदार अटकेत 
१४- पुण्यात महिला स्वच्छतागृहात लपून शूट, पालिकेचे दोघे निलंबित 
१५- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर माशांचा पाऊस 
१६- सचिवांसाठी राज्यातही आता ‘मोदी पॅटर्न’ 
१७- अडतदारांचे परवाने रद्द करा - राजू शेट्टी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- रेड झोनमध्ये अतिक्रमण केल्यानं कोल्हापुरात पाणी 
१९- ठाणे; पोलीस हवालदाराचा एकाला वाचवताना गेला जीव 
२०- घोडेगाव; डिंभे-आहुपे रस्त्यावर अपघात, ४८ प्रवासी जखमी 
२१- मनोरा; 'त्या' युवकाचा मृतदेह रामेश्वर मंदिर परिसरात सापडला 
२२- बिहारमध्ये न्यायालयाबाहेर बॉम्बस्फोट; 1 ठार 
२३- गुडगाव; परिचारिकेवर बलात्कार करणारा डॉक्‍टर अटकेत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- लॉर्डसवर बेभान होऊन फिरवलेला टी-शर्ट अन् गांगुलीची 14 वर्षापूर्वीची आठवण! 
२५- 'रुस्तम वही'... सिनेमाची कथा रेखाटणारं गाणं रिलीज 
२६- भारताविरुद्ध खेळण्याची अफगाणिस्तानची इच्छा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

=======================================

APMC व्यापाऱ्यांचा संप मागे, शेतकऱ्यांकडून अडत न घेण्यास राजीAPMC व्यापाऱ्यांचा संप मागे, शेतकऱ्यांकडून अडत न घेण्यास राजी


मुंबई: बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर पाचव्या दिवशी मागे घेत असल्याचं जाहीर केलं. मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांकडून अडत घेतली जाणार नाही, असं या बैठकीत ठरवण्यात आलं. त्याला व्यापाऱ्यांनीही मान्यता दिली.

मात्र जो नियम बाजार समितीच्या बाहेर विक्रीसाठी आहे, तोच नियम बाजार समितीच्या आतमध्ये सुद्धा लागू व्हावा, बाजार समितीच्या आवारात विक्री करण्यासाठी नियमन मुक्ती मिळावे, यासाठी सरकारकडून समिती स्थापन करण्यात येणार आहे.

=======================================

'एमआयएम'सह 191 राजकीय पक्षांची नोंदणी आयोगाकडून रद्द

'एमआयएम'सह 191 राजकीय पक्षांची नोंदणी आयोगाकडून रद्द
मुंबई : नोटीस बजावूनही आयकर विवरणपत्र आणि ऑडिट अहवालाची प्रत सादर न करणाऱ्या 191 अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने आयोगाचे सर्वोच्च प्राधान्य असते. त्याचबरोबर सर्व उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना समान संधी उपलब्ध व्हावी, त्याचप्रमाणे बाहुबळाचा वापर आणि आर्थिक बळाचा दुरुपयोग होऊ नये, या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांची नोंदणी करण्यात येते. नोंदणी केलेल्या राजकीय पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी चिन्ह वाटपात प्राधान्य दिले जाते.
राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 359 राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. त्यात 17 मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा समावेश असून उर्वरित सर्व 342 अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत. या पक्षांना नोंदणी आदेशानुसार आयकर विवरणपत्र भरल्याची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत दरवर्षी आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे. मात्र ही कागदपत्रं सादर न केल्यामुळे एकूण 326 राजकीय पक्षांना विविध टप्प्यांत नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही मुदतीत संबंधित कागदपत्रं सादर न केल्यामुळे त्यापैकी 191 पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
=======================================

लॉर्डसवर बेभान होऊन फिरवलेला टी-शर्ट अन् गांगुलीची 14 वर्षापूर्वीची आठवण!

लॉर्डसवर बेभान होऊन फिरवलेला टी-शर्ट अन् गांगुलीची 14 वर्षापूर्वीची आठवण!
फोटो सौजन्य: BCCI
मुंबई: क्रिकेटमधील एखादी खेळी देखील एखाद्या खेळाडूचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. अशा काही खेळी आणि असे खेळाडू नेहमीच क्रिेकेट चाहत्यांच्या लक्षात राहतातं. अशीच चौदा वर्षापूर्वीच एक खेळी आजही भारतीय क्रिकेट चाहते आजवर विसरु शकले नाहीत.

या विजयानंतर टीम इंडियाचा तत्कालिन कर्णधार सौरभ गांगुली देखील आपला आनंद लपवू शकला नव्हता आणि थेट लॉर्डसच्या गॅलरीमध्येच त्यानं आपलं टी-शर्ट काढून गरागरा फिरवलं होतं.

आजच्याच दिवशी म्हणजेच 14 वर्षापूर्वी 13 जुलै 2002 रोजी टीम इंडियानं इंग्लंडला त्यांच्याच धरतीवर धूळ चारली होती. अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या मोहम्मद कैफनं केलेली खेळी चाहत्यांच्या कायम स्मरणात राहिली.

संपूर्ण नेटवेस्ट मालिकेत इंग्लडं आणि टीम इंडियामध्ये अटीतटीचे सामने झाले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण क्रिकेट जगाचं लक्ष लागून राहिलं होतं.
=======================================

Pokémon GOनं गुगल ट्रेंड सर्चवर मोडला विक्रम

Pokémon GOनं गुगल ट्रेंड सर्चवर मोडला विक्रम!
मुंबई: Pokémon GO या रियालिटी गेमची प्रसिद्धी बरीच वाढत आहे. अवघ्या एका आठवड्यापूर्वी काही देशात लाँच करण्यात आलेल्या या गेम अॅपनं इंटरनेटवरील अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. याचबरोबर रियालिटी गेम किती योग्य आणि किती चुकीचं आहे. यावर देखील जोरदार चर्चा सुरु आहे.

Pokémon GO या गेमचे चाहते जगभरात वेगाने वाढत आहेत. गुगल ट्रेंडच्या मते, मागील काही दिवसात यूर्जसनी पॉर्नपेक्षाही अधिक Pokémon GO हे सर्च केलं आहे. गुगल ट्रेंड ग्राफमध्ये पॉर्न सर्चिंग हे नेहमीच सर्वात अधिक असतं. मागील सात दिवसामध्ये Pokémon GO नं रेकॉर्ड मोडला आहे.

हे अॅप 18 ते 24 वर्षीय युजर्समध्ये बरंच पॉप्युलर आहे. SimilarWeb आकड्यांनुसार, Pokémon GO ला अवघ्या एका दिवसात अमेरिकेत स्मार्टफोनमध्ये डेटिंग साइट टिंडरपेक्षा अधिक जास्त डाऊनलोड करण्यात आलं आहे.

Pokémon GO साठी 3 टक्के रोज अॅक्टिव्ह यूर्जस मिळतात. तर सगळ्यात जास्त ट्विटरला 3.6 अॅक्टिव्ह यूर्जस मिळतात. खास गोष्ट ही आहे Pokémon GOनं अमेरिकेतील अनेक सोशल मीडियाच्या अॅपला मागं टाकलं आहे.

=======================================

मुंबईचे रस्ते खड्ड्यात घालणारा पहिला कंत्राटदार अटकेत

मुंबईचे रस्ते खड्ड्यात घालणारा पहिला कंत्राटदार अटकेत !
मुंबई : रस्ते घोटाळ्याप्रकरणी 10 लेखपालांना अटक झाल्यानंतर आता कंत्राटदारांवर कारवाई सुरु झाली आहे. या घोटाळ्याप्रकरणी रेलकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या दीपन शाह या कंत्राटदाराला अटक करण्यात आली आहे. कंत्राटदाराला करण्यात आलेली ही पहिलीच अटक आहे.

मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्याकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर आयुक्तांनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यातून मुंबईत रस्ते घोटाळा झाल्याचं धक्कादायक सत्य बाहेर आलं होतं.

दरम्यान, महापालिकेच्या 10 लेखपालांना अटक झाल्यानंतर कंत्राटदारांना फरार घोषीत करण्यात आलं होतं. मात्र आता याप्रकरणी पहिल्या कंत्राटदाराला अटक झाली असून इतर कंत्राटदारांचा पोलिसांकडून शोध शुरु आहे.
=======================================

पुण्यात महिला स्वच्छतागृहात लपून शूट, पालिकेचे दोघे निलंबित

पुण्यात महिला स्वच्छतागृहात लपून शूट, पालिकेचे दोघे निलंबित
पुणे : पुण्याच्या स्वारगेट भागातल्या महिला स्वच्छतागृहात, मोबाईल कॅमेऱ्यानं चोरीछुपे शुटींग केल्याप्रकरणी पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आलंय. यातील एक पीएमपीचा सफाई कर्मचारी आहे, तर दुसरा कर्मचारी शिकाऊ संगणक ऑपरेटर म्हणून काम करतो.

पीएमपीमधील संबंधित महिला कर्मचारी स्वच्छतागृहात गेल्या असताना त्यांना पुरुष शौचालयातून मोबाईल बाहेर आलेला दिसला. त्यानंतर त्या महिलेनं आरडाओरडा करुन शिपायाला बोलावलं. तेवढ्या वेळात तो मोबाईल काढून कोणीतरी घेऊन गेल्याचं कळलं. त्यावेळी तेथून जाणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर महिलेनं शंका उपस्थित केली.

पीडित महिलेच्या तक्रारीवरुन दोघांविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आलाय. दरम्यान या दोघांच्या विभागीय चौकशीचे आदेशही आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी पीएमपीच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं.
=======================================

'रुस्तम वही'... सिनेमाची कथा रेखाटणारं गाणं रिलीज

'रुस्तम वही'... सिनेमाची कथा रेखाटणारं गाणं रिलीज
मुंबई : मुंबईतील गाजलेल्या नानावटी केसवर आधारित अक्षय कुमारच्या आगामी ‘रुस्तम’ चित्रपटातील नवीन गाणं रिलीज झालं आहे. ‘रुस्तम वही’ असे या गाण्याचे बोल असून सिनेमातल्या अक्षय कुमारच्या भूमिकेबाबत चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.

‘रुस्तम वही’ हे रेट्रो स्टाईल गाणं सुक्रीती कक्करने गायलं आहे. मनोज मुंतशीर यांनी गाणं लिहिलं असून राघव सचर यांचं संगीत गाण्याला लाभलं आहे. अक्षयकुमारने या गाण्याच्या व्हिडिओची लिंक ट्वीट केली असून यातून सिनेमाचा सार या गाण्यात असल्याचं त्याने म्हटलं आहे.

रुस्तम सिनेमात अक्षय कुमार एका नौदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. रुस्तम पावरी असे या व्यक्तिरेखेचं नाव आहे. रुस्तमवर विक्रम मखिजा या पत्नीच्या प्रियकराच्या हत्येचा आरोप असतो.

अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत एलियाना डिक्रूझ झळकणार आहे. अर्जन बाजवा, एशा गुप्ता यांच्याशिवाय उषा नाडकर्णी, सचिन खेडेकर यासारखे मराठमोळे चेहरेही यात दिसणार आहेत. वेनस्डे, बेबी सारख्या चित्रपटाचे मेकर नीरज पांडे यांनी रुस्तमची निर्मिती केली असून टिनू सुरेश देसाई यांचं हे दिग्दर्शकीय पदार्पण आहे. विपुल रावल यांनी चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे.
=======================================

पक्ष्यांना दाणे टाकणं इतरांसाठी उपद्रव ठरु नये

''पक्ष्यांना दाणे टाकणं इतरांसाठी उपद्रव ठरु नये''
मुंबईः पक्ष्यांना दाणे टाकणं किंवा घराभोवती पक्ष्यांचा वावर वाढवताना शेजाऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात यावी, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. पक्ष्यांच्या विष्ठेमुळे विविध आजार होऊ शकतात हे सिद्ध झालं आहे, त्यामुळे पक्ष्यांचा वावर वाढवताना काळजी घेण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
वरळी येथील प्राणी अधिकार कार्यकर्त्याने बालकनीत प्राण्यांना दाणे टाकण्यासाठी ट्रे ठेवला होता. याविरोधात शेजाऱ्यांकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिका निकाली काढताना कोर्टाने ट्रे हटवण्याचे आदेश दिले.
=======================================

रेड झोनमध्ये अतिक्रमण केल्यानं कोल्हापुरात पाणी

रेड झोनमध्ये अतिक्रमण केल्यानं कोल्हापुरात पाणी?
कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये रुद्रावतार धारण केलेल्या पंचगंगेनं 2005 च्या महापुराची आठवण करुन दिली आहे. कोल्हापूरच्या शहरामध्ये घुसलेल्या या नदीनं पुन्हा एकदा अतिक्रमित बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. त्यामुळे कोल्हापूरला कुणी बुडवलं हा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

कोल्हापुरात नदीशेजारी असलेल्या भागात प्रचंड बांधकाम सुरु झालं आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. पण पूररेषा डावलून हे बांधकाम केलं जातंय. या अनधिकृत बांधकामांवर कुणाचाही वचक नाही, उलट राज्यकर्त्यांचं अशा बांधकामांना अभय मिळतंय असा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे.

कसबा बावडा असो किंवा नदीकाठचा कोणताही परिसर, प्रत्येक ठिकाणी रेडझोनमध्ये बांधकामं सुरु झाली आहेत. इतकंच नाही, तर त्याच बांधकामांचा राडारोडा हा नदी आणि नाल्यात टाकला जातोय. त्यामुळे पंचगंगेचं पाणी थेट जयंती नाल्याद्वारे कोल्हापूरच्या मुख्य चौकांमध्ये दाखल होत आहे. रेड झोनमधल्या बांधकामांना वेळीच आवर घातला नाही, तर कोल्हापूरच्या पंचगंगेचा रुद्रावतार वर्षागणिक वाढत जाण्याची शक्यता आहे.
तब्बल 130 वर्षांनंतर पहिल्यांदाच कोरडा पडलेला कोल्हापूरचा कळंबा तलाव यंदा पाच दिवसाच्या मुसळधार पावसानं ओसंडून वाहत आहे. कधीही न पाहिलेला कळंबा तलावाचा तळ यंदा कोल्हापूरकरांनी पाहिला होता, मात्र आता पाण्याची पातळी 27 फुटांपर्यंत वाढली आणि पाणी तलावाच्या बाहेर पडलं.
=======================================

वीज दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

  • First Published :13-July-2016 : 14:47:54

  • ऑनलाइन लोकमत,
    नागपूर, दि. 13-  वीज दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. बुधवारी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणी सुरु असतांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुनावणीमध्ये प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रत्न केला. दरम्यान कार्यकर्ते व पोलिसांच्या झटापटीत गेटवर ठेवलेले मेटल डिटेक्टर व कुंड्या तुटल्या.
    बुधवारी सकाळी वनामती सभागृहात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगातर्फे जनसुनावणी सुरु होती. सकाळी ११ वाजता काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते दखल झाले. ऊर्जामंत्री व राज्य शासनाच्या विरोधात नारेबाजी करीत ते सभागृहात जाण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु पोलिसांनी त्यांना मुख्य गेटवरच अडवले. याच वेळी रॅपीड अ‍ॅक्शन फोर्ससुद्धा तैनात करण्यात आली. पोलीस आणि कार्यकर्त्यांची कार्यकर्ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते तर पोलीस त्यांना अडववित होते. या प्रयत्नात कार्यकर्ते आत घुसले. यात झाडांच्या कुंड्या फुटल्या. मेटल डिटेक्टरही तुटले. वरच्या माळ्यावर सुनावणी सुरु कार्यकर्ते वर घुसण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु वऱ्िषठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना समजावले. दरम्यान वीज दरवाढ मागे घ्या आणि एसएनडीएल हटाव संबंधी नारेबाजी बराच वेळ कार्यकर्ते नारेबाजी करीत होसुरुच होती. त्यामुळे काही वेळ तनाव निर्माण झाला होता. यानंतर आंदोलनकर्त्या कांग्रेसच्या शिष्टमंडळाला आयोगाशी भेटीसाठी पाठवण्यात आले.
=======================================

पोलीस हवालदाराचा एकाला वाचवताना गेला जीव

  • First Published :13-July-2016 : 16:50:11

  • ऑनलाइन लोकमत
    ठाणे, दि. 13 - डोंबिवलीत वास्तव्याला असलेल्या 50 वर्षीय पोलीस हवालदार श्रीमंत डोंबाळे यांच्यावर काळानं घाला घातला आहे. मुंब्रा आणि दिवा स्टेशनदरम्यान जखमी अवस्थेत पडलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी गेलेल्या डोंबाळेंचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला आहे.
    श्रीमंत डोंबाळे हे ठाणे रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असून, डोंबिवलीतल्या निळजे येथे राहतात. विशेष म्हणजे ज्या माणसाला डोंबाळे वाचवण्यासाठी गेले होते. तो माणूस जिवंत असून, त्याच्यावर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोंबाळेंच्या मृत्यूमुळे ठाणे रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये शोककळा पसरली आहे.
=======================================

डिंभे-आहुपे रस्त्यावर अपघात, ४८ प्रवासी जखमी

  • First Published :13-July-2016 : 15:17:59

  • ऑनलाइन लोकमत
    घोडेगाव, दि. 13 - मंचर-आहुपे व आसाणे- कुर्ला नेहरूनगर या दोन एसटी बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत ४८ प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी आंबेगाव तालुक्यात डिंभे आहुपे रस्त्यावर फुलवडे गावच्या हद्दीत झाला. जखमींवर घोडेगाव ग्रामीण रुग्णालय व डिंभे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहेत.
    अडिवरे गावचा बाजार असल्याने बहुतेक लोक आहुपे एसटीने (एमएच-२०/डी-७७१४) बाजारासाठी निघाले होते. तर आसाणे गाडीत (एमएच- १४/बीटी-१५२८) महाविद्यालयीन विद्यार्थी जास्त होते. फुलवडे गावच्या पुढे असलेले अवघड वळण घेवून आहुपे गाडी पुढे गेली असता समोरून आलेल्या आसाणे बसला धडक बसली. तसेच बीएसएनएलची केबल टाकण्यासाठी रस्ता बाजूने खोदल्याने अतिशय खराब व छोटा झाला आहे. त्यामुळे हा अपघात घडला. यात दोन्ही बसमधील प्रवाशांच्या तोंडाला जबर मार लागला. अनेकांचे दात पडले, तर काहींच्या जबडयाला जबर मार लागला. ४८ पैकी चार प्रवाशांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले. सर्व जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले. एसटी महामंडळानेही जखमींना एक हजार रूपये रोख स्वरूपाची मदत केली.
=======================================

'त्या' युवकाचा मृतदेह रामेश्वर मंदिर परिसरात सापडला

  • First Published :13-July-2016 : 16:18:02

  • ऑनलाइन लोकमत,
    मानोरा, दि. 13 - गेल्या पाच दिवसात पावसाने सततधार लावून धरल्याने सोमवार ११ जुलै रोजी अरुणावती नदीच्या बाजूला बंधारा पार करीत असताना मानोरा जुनीवस्तीतील युवक सुनिल भोरकडे वय २८ हा पुरामध्ये वाहुन गेला होता. सतत तीन दिवसाच्या प्रयत्नाने आज १३ जुलै रोजी रामेश्वर मंदिर परिसरात त्याचा मृतदेह आढळुन आला. यासाठी पोलिस व महसूल प्रशासनाने शोध मोहीम अंतर्गत परिसर पिंजुन काढला होता. मानोरा जुनीवस्ती येथील युवक सुनिल सिताराम भोरकडे व त्याचा मित्रपसोबत बंधारा पार करीत असतांना पाय घसरुन अरुणावती नदीच्या प्रवाहात पडला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील युवकांनी शोध घेतला तसेच पोलिस व महसूल प्रशासनाने अरुणावती तिरावरील येणारे खेडे,रामतिर्थ, कारखेडा, वरोली पर्यंत जावून शोधाशोध सुरु केली. दरम्यान मानोरा येथील धाडसी युवकांनी त्या दिवसापासून सतत तीन दिवस शोध घेण्यास पोलिस व महसूल प्रशासनास मदत केली. सततच्या पावसामुळे अनेक अडीअडचणीचा सामना करावा लागला. शोध मोहीम अधिक तीव्र करुन १३ जुलैला रामेश्वर मंदिर परिसरात सुनिल भोरकडे मृतावस्थेत आढळुन आला. 
=======================================

द्रुतगतीवर मासे आले कोठून?

  • First Published :13-July-2016 : 00:40:45

  • उर्से : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर माशांचा पाऊस, तर कोणी म्हणतेय ओढ्याद्वारे मासे आले. रस्त्यावर मासे याबाबत सध्या सोशल मीडियावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
    द्रुतगती महामार्गावर जवळील बऊरवाडी पुलाजवळ ही घटना घडल्याची चर्चा गेले दोन दिवस सुरू आहे. परंतु, याबाबत कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये गाडी उलटली असल्याची नोंद नाही. परंतु, सोशल मिडियावर याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. गेले अनेक दिवस पाऊस नसल्याने मासे रस्त्यावर चालत आले, अशीच चर्चा रंगविण्यात येत आहे. या माध्यमातून काही ग्रुपवर अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत अद्यापही उलटसुलट चर्चा सुरू आहे.
    या घटनेबाबत परिसरातील रहिवासी दत्ता वायभट म्हणाले, ‘‘घडलेली घटना सत्य असून, गाडी उलटली. त्यामुळे गाडीतील मांगुर मासे सर्व रस्त्यावर पसरले. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक काही वेळेपुरती बंद होती. मात्र अशा प्रकारची घटना तीन वर्षांत तीन वेळा घडली आहे.’’
    तसेच उर्से येथील अशोक कारके यांनीही, रस्त्यावर सर्वत्र मांगुर मासे पसरले होते. मुंबईकडून पुण्याकडे जात असताना टायर पंक्चर झाल्याने पिकअप व्हॅन उलटली. त्यामुळे गाडीतील सर्व मांगुर मासे रस्त्यावर पसरले. या वेळी लोकांची मासे घेण्यासाठी धावपळ उडाली. चालकाने मासे नेऊ नका असे सांगितले; परंतु कोणीही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. या घटनेबाबत सोशल मीडियावरून मात्र नदीतील मासे रस्त्यावर आले, माशांचा पाऊस पडला, अशा अफवा पसरल्या जात आहेत. तर काही ग्रुपवरून दोन वर्षांपूर्वीचे जुने फोटो टाकण्यात येत आहेत.
=======================================

सोनिया गांधी, मनमोहनसिंग उद्या नांदेडमध्ये

  • First Published :13-July-2016 : 03:57:03

  • नांदेड : काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ़ शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच स्मृती संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष खा़ सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान खा़ डॉ़ मनमोहनसिंग गुरुवारी नांदेड दौऱ्यावर येत आहेत़
    या सोहळ्यासंदर्भात मंगळवारी पत्रपरिषदेत माहिती देताना माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण म्हणाले, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने साकारण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयाचे लोकार्पण तसेच डॉ़ चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोनिया गांधी यांच्या हस्ते होईल़ अध्यक्षस्थानी मनमोहनसिंग असतील.
    माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी राज्यपाल डी़ वाय़पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ तसेच माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विकास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष वैशालीताई विलासराव देशमुख यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, असे खा. चव्हाण म्हणाले.
=======================================

धरणे भरण्यास हवा आणखी पाऊस

  • First Published :13-July-2016 : 04:23:18

  • मुंबई : राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असला तरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर विभागातील धरणांमधील जलसाठ्यांत अजूनही समाधानकारक वाढ झालेली नाही. त्यातही मराठवाड्यातील धरणांची परिस्थिती चिंताजनक आहे. तेथील सर्व धरणांमधील साठा केवळ तीन टक्के एवढाच आहे. त्यामुळे वर्षभराची तहान भागण्यासाठी मराठवाड्याला अजून मुसळधार पावसाची गरज आहे.
    मराठवाड्यात चिंताजनक स्थिती
    जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील कोरड्या प्रकल्पांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. शून्यावर आलेला विभागातील सरासरी उपयुक्त जलसाठा आठवडाभरातच दोन टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. सर्वात मोठे जायकवाडी धरण अद्यापही मृतसाठ्यातच आहे. मराठवाड्यात सध्या ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी एक टक्का जलसाठा आहे. विभागातील मध्यम तसेच लघू प्रकल्पांमधील साठा सरासरी ३ टक्के आहे.
=======================================

सचिवांसाठी राज्यातही आता ‘मोदी पॅटर्न’

  • First Published :13-July-2016 : 04:16:54

  • अतुल कुलकर्णी,  मुंबई
    नव्या मंत्र्यांच्या कार्यालयात काम करण्याची इच्छा ठेवून अनेकांनी वशिल्यांचे खलिते पाठवणे सुरू केले असले, तरी या मंत्र्यांनी व्यक्तिगत स्टाफविषयी कमालीचे मौन बाळगले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील तेच अधिकारी आपण घेऊ, असे नवे मंत्री सांगत आहेत.
    केंद्रातही नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर कोणत्याही मंत्र्यांना त्यांच्या पसंतीचे अधिकारी घेऊ दिले नव्हते. त्याचीच पुनरावृत्ती राज्यात फडणवीस यांनी केल्याचे बोलले जात आहे. नव्या मंत्र्यांकडे जे-जे अधिकारी आपले बायोडाटा घेऊन जात आहेत, त्यांना ‘मुख्यमंत्री आल्यानंतर पाहू’ असे एकच उत्तर ऐकायला मिळत आहे. एका जुन्या मंत्र्याने त्याच्या कडील स्वीय सचिवास तुमच्याकडे घ्या, असा निरोप नव्या मंत्र्यांना पाठवले. तो निरोप त्या मंत्र्याने जशास तसा मुख्यमंत्र्यांकडे रवाना केला. नवीन आलेली टीम पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणात असल्याचे हे निदर्शक आहे, असेही एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले.
=======================================

हिंसेची धग कायम, काश्मीरमध्ये मृतांची संख्या ३०

  • First Published :13-July-2016 : 03:08:17

  • श्रीनगर : हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वनी मारला गेल्यानंतर काश्मीर खोऱ्यात घडलेल्या हिंसाचारात ठार झालेल्यांची संख्या ३० वर पोहोचली असून, हिंसक निदर्शने होण्याची शक्यता ध्यानात घेऊन त्याच्या मुकाबल्यासाठी प्रशासन सज्ज आहे. श्रीनगर शहरातील काही भाग आणि पुलवामा जिल्ह्यासह खोऱ्यातील अनेक भागांत खबरदारीचा उपाय म्हणून चौथ्या दिवशीही संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.
    गेल्या चार दिवसांपासून सुरक्षा दल आणि अतिरेक्यांत झालेल्या चकमकीने धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यात ११५ सुरक्षा जवानांसह १३०० जण जखमी झाले आहेत. निदर्शनात जखमी झालेला आदिल अहमद मट्टू याचा सोमवारी रात्री इस्पितळात मृत्यू झाला. बिजबेहरा येथील गोळीबाराच्या घटनेत तो जखमी झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.
=======================================

एनआयएकडून इसिसचे दोघे अटकेत

  • First Published :13-July-2016 : 02:55:08

  • हैदराबाद : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी इसिसच्या कथित हैदराबाद मॉड्युलच्या प्रमुखाला त्याच्या सहकाऱ्यासह अटक केली आहे. एनआयएने २९ जून रोजी या मॉड्युलचा भंडाफोड केला होता.
    तेलंगणातील गुप्तचर विभागाने ही माहिती दिली. इसिसच्या हैदराबाद मॉड्युलचा प्रमुख यासिर नियामतुल्ला आणि त्याचा सहकारी अताउल्ला रहमान यांना एनआयएने अटक केली आहे. रहमान हा या मॉड्युलसाठी पैसा एकत्रित करीत होता, असे सांगितले जात आहे. अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून २९ जून रोजी एनआयएने शहरातून पाच जणांना अटक केली होती. या पूर्वी अटक करण्यात आलेल्यांत मोहम्मद इब्राहिम, हबीब मोहम्मद, मोहम्मद इलयास यजदानी, अब्दुल्ला बिन अहमद अल अमुदी आणि मुजफ्फर हुसैन रिजवान यांचा समावेश आहे.
    एनआयएने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे की, या पाचही आरोपींनी अतिरेकी
    हल्ले करण्यासाठी हत्यारे आणि स्फोटक साहित्य जमा केले होते. हे सर्व इसिसच्या संपर्कात होते.
=======================================

No comments: