Saturday, 2 July 2016

नमस्कार लाईव्ह ०२-०७-२०१६ चे बातमीपत्र


[अंतरराष्ट्रीय] 
१- बांगलादेशात 26/11 सारखा हल्ला, 6 दहशतवाद्यांचा खात्मा 
२- ढाका हल्ला : ६ दहशतवादी ठार, १ अटकेत, १३ ओलिसांची सुटका 
३- बीजिंग; तैवानचा चीनवर चुकून ‘हल्ला’ 
४- स्विस बँकांमध्ये पाक नागरिकांचे पैसे जास्त 
५- रियाध; हज यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सौदीने निवडला ई-ब्रेसलेटचा पर्याय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला, विमान एरोब्रीजला धडकलं 
७- बुलेट ट्रेन म्हणजे केवळ पैशांचा अपव्यय- माजी उपगव्हर्नर 
८- ‘आप’च्या याचिकेवर सोमवारी सुनावणी 
९- आता पडताळणीविना नियुक्तिपत्रे - केंद्र सरकार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर खडसेंच्या पाठीत वार झाला नसता - उद्धव ठाकरे 
११- ना घुसण्याचा खटाटोप, ना उतरण्याची गडबड, लोकलसाठी आता रांग बंधनकारक ! 
१२- वृक्षारोपणाला भरघोस प्रतिसाद, राज्यभरात 2 कोटीहून अधिक झाडं लावली  
१३- गँगस्टर कुमार पिल्लेने पोलिसांसमोर नरमाईची भूमिका 
१४- विरारपुढील १५ स्थानकांवर सीसीटीव्ही 
१५- गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी अ‍ॅप 
१६- इंद्राणीनेच शीनाचा गळा आवळला - ड्रायव्हर शाम रॉय 
१७- आषाढी एकादशीनिमित्त ३,३५३ जादा बस 
१८- गोव्यात काजू उत्पादन वाढविण्यासाठी जैविक खताचा वापर 
१९- 'इसिस'च्या संशयितांना 'एमआयएम' करणार मदत 
२०- देशातल्या 91 मोठ्या जलाशयांमध्ये फक्त 15 टक्के पाणीसाठा शिल्लक, केंद्र सरकारची माहिती 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२१- उस्मानाबाद; तुळजाभवानीच्या दानपेटीत उंदीर घुसले, 64 हजारांच्या नोटा कुरतडल्या 
२२- मुंबईत सरीवर सरी, उपनगरात मुसळधार, नवी मुंबईत दमदार 
२३- वाशीम; 'आयटीबीपी'त भरतीच्या नावे फसवणूक, तरुणांचे पैसे लाटले 
२४- पुणे; ज्येष्ठ साहित्यिक रा. चिं. ढेरे यांचे निधन 
२५- रांची; भाजपा नेत्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा 
२६- रायगड जिल्ह्यातही पावसाची हजेरी, अलिबाग, पेण, उरणमध्येही मुसळधार पाऊस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- वेगाचा बादशाह जायबंदी, ऑलिम्पिकपूर्वीच उसैन बोल्ट जखमी 
२८- ..आणि आमीरला भेटण्याची इच्छा पूर्ण, रिंकूचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव 
२९- आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचा आधार बनलेल्या नाम फाऊंडेशनचा गौरव 
३०- मी धर्मगुरुंना घाबरत नाही - इरफान खान 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

==============================================

ना घुसण्याचा खटाटोप, ना उतरण्याची गडबड, लोकलसाठी आता रांग बंधनकारक !

ना घुसण्याचा खटाटोप, ना उतरण्याची गडबड, लोकलसाठी आता रांग बंधनकारक !
मुंबई : मध्य रेल्वेवर आजपासून ट्रेन पकडण्यासाठी आता रांगेतच उभं राहावं लागेल. रेल्वे व्यवस्थापनाने सीएसटीसह सर्व महत्वाच्या स्थानकांवर प्रवाशांनी रांगेतच ट्रेन पकडावी असा नियमच लागू केला आहे. रांगेची ही शिस्त प्रवाशांनी स्वतःहून अंगिकारली नाही तर आरपीएफ म्हणजे रेल्वे सुरक्षा दलाचे जवान प्रवाशांची रांग तयार करणार आहेत. याचा फायदा सर्वच मुंबईकर चाकरमान्यांना होणार आहे.

मध्य रेल्वेच्या अनेक प्रचंड गर्दीच्या समजल्या जाणाऱ्या स्थानकांवर ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली की आतील प्रवासी उतरायच्या आतच चढणाऱ्यांची झुंबड उडते. अशा वेळी एखाद्या नवीन प्रवाशाला येणाऱ्या स्थानकाची माहिती नसल्यास त्याला उतरताच येत नाही. त्याला नाईलाजाने पुढील स्थानकापर्यंत प्रवास करावा लागतो.
गर्दीच्या या रेटारेटीमुळे अनेकदा अपघात होण्याचीही शक्यता असते.

मध्य रेल्वेने आता यावर ट्रेनमध्ये रांगेतच चढण्याचा उतारा काढलाय. त्यासाठी प्रसंगी आरपीएफचीही मदत घेतली जाणार आहे.

खरं तर रांगेचा फायदा सर्वांना हे आपल्याकडे सुभाषितासारखं वापरलं जाणारं वाक्य. अनेकांना मनोमन पटतही असतं. मात्र ट्रेनमध्ये चढताना जवळपास प्रत्येक मुंबईकरांना त्याचा विसर पडतो. यामुळे ट्रेन पूर्णपणे प्लॅटफॉर्मवर थांबण्यापूर्वीच अनेक प्रवासी गाडीत चढण्यातही यशस्वी होतात. या गडबडीत अनेकांचा हात सुटून जीवावर बेतण्याची शक्यता असते.
==============================================

बांगलादेशात 26/11 सारखा हल्ला, 6 दहशतवाद्यांचा खात्मा

बांगलादेशात 26/11 सारखा हल्ला,  6 दहशतवाद्यांचा खात्मा
ढाका :  बांगलादेशातल्या ढाका शहरात दहशतवाद्यांनी घडवलेलं ओलीसनाट्य जवळपास संपुष्टात आलं आहे. सुरक्षारक्षकांनी तब्बल 13 तासानंतर 6 दहशतवाद्यांचा खात्मा करुन ओलिसांची सुटका केली.

बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये काल रात्री मुंबईतील 26/11 प्रमाणे दहशतवादी हल्ला झाला .  आयसीसच्या दहशतवाद्यांनी एका कॅफेमध्ये धुमाकूळ घालत, 9 ते 10 बंदुकधाऱ्यांनी 30 जणांना ओलिस ठेवलं . या गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 13 तासांपासून हा थरार सुरु होता.

आधी  18 ओलिसांना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यात पोलिसांना यश आलं. तर एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

गुलशन परिसरात काल रात्री साडे आठच्या सुमारास दहशतवाद्यांनी कॅफेमध्ये प्रवेश करुन धुमाकूळ घातला.  ज्या कॅफेवर हल्ला करण्यात आला, तिथे प्रामुख्याने परदेशी नागरिकांचा वावर असतो. तसंच इथे परदेशी राजकीय अधिकाऱ्यांचीही ये-जा असते.

ज्या परिसरात हा हल्ला झाले तिथे भारतीय दूतावास आहे. दरम्यान दूतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. ओलिसांना सोडवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचं ऑपरेशन सुरु आहे.
==============================================

तुळजाभवानीच्या दानपेटीत उंदीर घुसले, 64 हजारांच्या नोटा कुरतडल्या

तुळजाभवानीच्या दानपेटीत उंदीर घुसले, 64 हजारांच्या नोटा कुरतडल्या
उस्मानाबाद : भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तुळजाभवानी मंदिरात अजब घटना घडली आहे. भाविकांनी श्रद्धेने दानपेटीत अर्पण केलेल्या नोटांवर डल्ला मारण्यात आला आहे. मात्र हा डल्ला कोणी माणसांनी नव्हे तर उंदरांनी मारला आहे.

तुळजाभवानी मंदिरातल्या दान पेटीत भाविकांनी अर्पन केलेल्या नोटा उंदरांनी कुरतडल्या आहे. दानपेटीत 57 लाखापेक्षा अधिक रक्कम आहे. प्राथमिक माहितीनुसार यापैकी 64 हजारांच्या नोटा उंदरांनी कुरतडल्याचे उघड झालं आहे. मात्र अधिकृत माहिती देण्यास मंदिर प्रशासनाने नकार दिला आहे.

भाविकांनी वाहिलेल्या प्रसादामुळे उंदिर दानपेटीत घुसल्याची शक्यता आहे. मात्र यासर्व प्रकारामुळे मंदिर प्रशासनाचा गलथानपणा उघड झाला आहे.
==============================================

वेगाचा बादशाह जायबंदी, ऑलिम्पिकपूर्वीच उसैन बोल्ट जखमी

वेगाचा बादशाह जायबंदी, ऑलिम्पिकपूर्वीच उसैन बोल्ट जखमी
किंगस्टन : रिओ ऑलिम्पिकपूर्वीच जमैकाला मोठा धक्का बसला आहे. कारण वेगाचा बादशाह उसैन बोल्टला दुखापत झाली आहे. त्याने जमैकाच्या राष्ट्रीय चॅम्पियन्सशीपमधून माघार घेतली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बोल्ट उतरणार का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

बोल्टच्या मांडीला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र तो या दुखापतीवर मात करुन रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होईल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

जमैकामध्ये शुक्रवारी ऑलिम्पिक पात्रता फेरी घेण्यात आली. यामध्ये बोल्ट 100 मीटर फायनलसाठी पात्र ठरला होता. 200 मीटरसाठी शनिवार आणि रविवारी पात्रता फेरी होती. मात्र त्यापूर्वीच त्याच्या दुखापतीने उचल खाल्ली.

बोल्टने  100 मीटर रेसमध्ये 2008 च्या बीजिंग आणि 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्येही सुवर्ण पदक पटकावलं आहे. यंदाही अशीच कामगिरी करुन हॅटट्रिक साधण्याचा त्याचा प्रयत्न आहे. मात्र आता त्याच्या खेळण्याबाबतच साशंकता व्यक्त होत आहे.
==============================================

मुंबईत सरीवर सरी, उपनगरात मुसळधार, नवी मुंबईत दमदार

मुंबईत सरीवर सरी, उपनगरात मुसळधार, नवी मुंबईत दमदार
मुंबई : मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसह उपनगरात आज सकाळपासूनही पावसाचा जोर ओसरलेला नाही. दादर, परळसह दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. याशिवाय मुंबईच्या विविध भागात संततधार कायम आहे.

अंधेरी आणि सायनमध्ये अनेक भागात पाणी साचल्यानं वाहतूकही धीम्या गतीने सुरु आहे.

पश्चिम उपनगरांमधे पावसाची रिमझिम सुरू आहे. त्याचा परिणा उपनगरीय वाहतुकीवर झाला आहे.

पूर्व उपनगरांमधेही मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिरा धावत आहेत.

नवी मुंबईमधे रात्रभर थांबून-थांबून मुसळधार पाऊस सुरु आहे. नवी मुंबईकडून सीएसटीकडे येणारी अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक 10-15 मिनिटं उशिराने सुरु आहे.
==============================================

'आयटीबीपी'त भरतीच्या नावे फसवणूक, वाशिमच्या तरुणांचे पैसे लाटले !

'आयटीबीपी'त भरतीच्या नावे फसवणूक, वाशिमच्या तरुणांचे पैसे लाटले !
नवी दिल्ली/वाशिम: आयटीबीपी अर्थात इंडो तिबेटियन फोर्समध्ये भरतीच्या नावाखाली अनेक मराठी तरुणांना लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील माधव इंगोले या तरुणानं पोलिसांत धाव घेतल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे.

आयटीबीपीमध्ये इतर अतिरिक्त सेवांसाठी वाशिम आणि परिसरातल्या अनेक मराठी तरुणांनी अर्ज केले. त्यांची परीक्षा झाली, मुलाखती झाल्या. पण नंतर जे पत्र त्यांना आलं, त्यात 25 हजार रुपये भरा, तरच तुमचं ट्रेनिंग सुरु होईल असं सांगण्यात आलं. अगदी आयटीबीपीच्याच लोगोचा, नावाचा वापर करुन हे पत्र आल्यानं या मुलांनी पैसे भरले. मात्र तरीही काही कॉल आला नाही. शेवटी परत एक मेसेज आला की भरती झाल्यानंतर तुमची पाच लाखांची पॉलिसी काढण्यात येणार आहे. त्यासाठी 10 टक्के रक्कम म्हणजे 50  हजार रुपये तुम्हाला आगाऊ भरावे लागतील.

गरीब घरातल्या या मुलांनी आपल्या घरातली जमीन विकून नोकरीच्या आशेने हे पैसे भरले. मात्र पुढे काहीच होत नाही म्हटल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

स्पेशल 26 या हिंदी चित्रपटातल्या सारखाचा हा प्रकार अनेक मराठी मुलांच्या बाबतीत घडलाय. अमित कुमार या व्यक्तीच्या नावावर त्यांना बँकेत पैसे भरायला सांगितले जात होते. मात्र हा अमित कुमार नेमका कोण आहे याचा पत्ता अजून लागलेला नाही.
==============================================

वृक्षारोपणाला भरघोस प्रतिसाद, राज्यभरात 2 कोटीहून अधिक झाडं लावली 

वृक्षारोपणाला भरघोस प्रतिसाद, राज्यभरात 2 कोटीहून अधिक झाडं लावली !
मुंबई: राज्यभरात 2 कोटी झाडं लावण्याचा महाराष्ट्र वनविभागाचा संकल्प पूर्ण झाला आहे. राज्य सरकारनं 1 ते 7 जुलै, या आठवड्यात वनमहोत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे. वनमहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे काल तब्बल 2 कोटी झाडं लावण्याचा निर्धार केला होता  आणि हा निर्धार पूर्णही केला.

राज्यभरात 2  कोटी 22  लाख वृक्षांची लागवड झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे.

वृक्ष लागवडीसंदर्भात केलेल्या आवाहनाला राज्यातील जनतेनं उदंड प्रतिसाद दिल्याचं पाहायाला मिळालं, सरकारी कर्मचारी, वन विभागाचे अधिकारी, शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी अशा सर्व स्तरातील लोकांनी मोठ्या उत्साहानं वृक्षारोपण केलं.
==============================================

मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला, विमान एरोब्रीजला धडकलं

मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला, विमान एरोब्रीजला धडकलं
मुंबई : मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात थोडक्यात टळला. मुंबईहून रियाधला निघालेलं एअर इंडियाचं विमान टेक ऑफ करताना एरोब्रीजला धडकलं.


या धडकेत विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनाचं किरकोळ नुकसान झालं आहे. एआय 922 रियाध-मुंबई हे विमान पार्क करत असताना मार्गदर्शक सिस्टिमने चुकीची माहिती दिल्यामुळे ही घटना घडल्याचं समजतं.


दरम्यान, या विमानातील सर्व 300 प्रवासी सुखरुप असून विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
==============================================

..आणि आमीरला भेटण्याची इच्छा पूर्ण, रिंकूचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव

..आणि आमीरला भेटण्याची इच्छा पूर्ण, रिंकूचा माझा सन्मान पुरस्काराने गौरव
मुंबईः करिअरच्या सुरुवातीलाच पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्यानंतर एबीपी माझाचा हा मानाचा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाला, त्यामुळे आपला आनंद हा शब्दात सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया ‘सैराट’फेम रिंकू राजगुरुने व्यक्त केली.

‘सैराट’ सिनेमातील अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला याड लावणाऱ्या रिंकू राजगुरु अर्थात महाराष्ट्राच्या लाडक्या आर्ची आणि आकाश ठोसर म्हणजेच परशा यांना ‘माझा सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सिनेमाच्या पदार्पणातच उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दोघांनीही पुरस्काराने गौरविण्यात आलं.

..आणि आमीरला भेटण्याची इच्छा पूर्ण

रिंकूचा अवघा महाराष्ट्र जरी चाहता असला तरी ती आमीर खानची मोठी चाहती आहे. आमीरने देखील सैराट सिनेमा पाहून कौतुक केलं, असं नागराज मंजुळे यांनी रिंकूला कळवलं होतं. त्यामुळे आज या पुरस्काराच्या निमित्ताने आपल्या आवडत्या अभिनेत्याला भेटण्याची इच्छा पूर्ण झाली, अशी प्रतिक्रिया रिंकूने बोलताना व्यक्त केली.
==============================================

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचा आधार बनलेल्या नाम फाऊंडेशनचा गौरव

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांचा आधार बनलेल्या नाम फाऊंडेशनचा गौरव
मुंबई:  सलग तीन वर्ष पडलेला दुष्काळ. सततची नापिकी आणि डोक्यावर कर्जाचा बोजा.  या दुष्टचक्रातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी मृत्युला अलिंगन दिलं.  मात्र, शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळं त्यांच्या अर्धांगिणींसमोर मोठं संकट उभं ठाकलं. धन्यानं अर्धवट सोडलेला डाव सावरणाऱ्या त्या माऊलीच्या मदतीसाठी दोन मराठी कलावंत धावून आले. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे.

या दोन प्रतिभाशाली कलावंतांमधल्या खऱ्याखुऱ्या नायकांच्या कल्पनेतूनच जन्माला आली ‘नाम’ फाऊंडेशन. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना दुख:च्या गर्तेतून बाहेर काढण्याचं काम नामकडून अविरतपणे सुरूय. ‘नाम’नं आतापर्यंत ७०० विधवांना प्रत्येकी १५ हजाराची मदत दिली. तसंच ‘नाम’नं पाच गावं दत्तक घेतली असून त्यांच्या विकासाची धुरा स्वतःच्या खांद्यावर उचललीय.

याशिवाय सामूहिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उद्धाराचा मार्ग दाखवण्यात ‘नाम’नं एक पाऊल पुढे टाकलंय. महाराष्ट्रातून दुष्काळाला कायमचं हद्दपार करण्यासाठी नामनं अनेक गावात जलसंधारणाची काम हाती घेतली आहेत. एवढंच नव्हे तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी मोफत घरं बांधून देण्याचा प्रकल्पही ‘नाम’नं हाती घेतला. महाराष्ट्राला दुष्काळमुक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या ‘नाम’ फाऊंडेशनला एबीपी माझाचा सलाम.
==============================================

बुलेट ट्रेन म्हणजे केवळ पैशांचा अपव्यय- माजी उपगव्हर्नर

बुलेट ट्रेन म्हणजे केवळ पैशांचा अपव्यय- माजी उपगव्हर्नर
नवी दिल्लीः प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा एकदम निरुपयोगी प्रकल्प आहे. भारताला बुलेट ट्रेनची सध्या कसलीही गरज नाही, त्यामुळे बुलेट ट्रेन म्हणजे पैशांचा निव्वळ अपव्यय आहे, असं वक्तव्य रिझर्व्ह माजी बँकेचे उपगव्हर्नर राकेश मोहन यांनी केलं आहे.

भारताला जर विकास साधायचा असेल तर योग्य क्षेत्रात गुंतवणूक करणं गरजेचं आहे. तरच भारताचा विकास निर्देशांक 7 ते 9 टक्क्यांपर्यंत जाऊ शकेल, असं मोहन यांनी म्हटलं आहे.

गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन गव्हर्नरची निवड करण्यात येणार आहे. नवीन गव्हर्नरपदाच्या शर्यतीमध्ये राकेश मोहन यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बुलेट ट्रेनचीच गरज नसल्याचं म्हटलं आहे, त्यामुळं नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
==============================================

ढाका हल्ला : ६ दहशतवादी ठार, १ अटकेत, १३ ओलिसांची सुटका


  • ऑनलाइन लोकमत
    ढाका, दि. २ - बांगलादेशची राजधानी ढाका येथील हल्ल्याची धुमश्चक्री अखेर संपली असून पोलिसांनी ६ दहशतवाद्यांना ठार केले असून एकाला जिवंत पकडले आहे. ढाका येथील परदेशी दूतावास, वकिलांतीची कार्यालये असलेला, सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या डिप्लोमॅटिक क्वार्टरच्या उपहारगृहातील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २० जण ठार झाले. मात्र लष्कराच्या जवानांनी दहशतवादयांना प्रत्युत्तर देत सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले व एकाला जिवंत पकडले.  जवानांनी काही परदेशी नागरिकांसह १३ ओलीसांची रेस्टॉरंटमधून सुखरूप सुटका केली. रेस्टॉरंटमधील गोळीबार आता थांबला असून १ दहशतवादी फरार झाल्याची माहिती मिळत आहे. 
==============================================

वेगाचा बादशाह उसैन बोल्ट जखमी, रिओ ऑलिम्पिकला मुकणार?


  • ऑनलाइन लोकमत
    किंगस्टन, दि. २ - वा-याच्या वेगाने धावणारा, वेगाचा बादशाह अशी ख्याती असणारा जमैकाचा धावपटू उसैन बोल्ट जखमी झाल्याने आगामी 'रिओ' ऑलिम्पिक स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. बोल्टच्या मांडीला दुखापत झाल्याने त्याने जमैकाच्या राष्ट्रीय चॅम्पियन्सशीपमधून माघार घेतली असून पुढील महिन्यात होणा-या ऑलिम्पिकमधील त्याच्या सहभागाबद्दलही साशंकता व्यक्त होत आहे. 
    जमैकामध्ये शुक्रवारी ऑलिम्पिक पात्रता फेरी घेण्यात आली. यामध्ये बोल्ट १०० मीटर फायनलसाठी पात्र ठरला होता. तर २०० मीटरसाठी शनिवार आणि रविवारी पात्रता फेरी घेण्यात येणार आहे, मात्र बोल्टची दुखापत त्यापूर्वीच वाढल्याने त्याने स्पर्धेतून माघार घेतली.  बोल्टने  २००८ साली झालेल्या बीजिंग आणि २०१२ सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्येही १०० मीटर रेसमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. यंदाही अशीच कामगिरी करुन हॅटट्रिक साधण्याचा त्याचा मानस होता, मात्र आता त्याच्या खेळण्याबाबतच साशंकता व्यक्त होत आहे.
==============================================

‘साहब खाने को वडापाव भी चलेगा’...


  • मनीषा म्हात्रे,
    मुंबई- गँगस्टर कुमार पिल्लेने पोलिसांसमोर नरमाईची भूमिका घेत दोन गुन्ह्यांत कबुली दिली आहे. मात्र अन्य गुन्ह्यांत ‘तो मी नव्हेच’ भूमिका घेत हात वर केल्याने पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत. एकेकाळी पूर्व उपनगरात दहशत निर्माण केलेल्या गँगस्टरने पोलिसांसमोर पडती बाजू घेतली आहे. अशावेळी ‘साहेब.. खायला वडापाव दिला तरी चालेल, फक्त पोटापाण्याचे बघा,’ असे तो तपास अधिकाऱ्यांना सांगत आहे.
    सिंगापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर गुन्हे शाखा ७चे अधिकारी पिल्लेकडे अधिक तपास करीत आहेत. हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न असे एकूण ९ गुन्हे कुमार पिल्लेविरोधात दाखल आहेत. यापैकी २००९मध्ये त्याने खंडणीसाठी विकासकावर हल्ला केला होता, त्यानंतर लोढा विकासकाच्या कार्यालयात गोळीबार केला होता. या दोन गुन्ह्यांसह २०१३मध्ये मनसे आमदार मंगेश सांगळे यांना खंडणीसाठी धमकाविणे अशा तीन गुन्ह्यांचा सखोल तपास गुन्हे शाखेने सुरू केला आहे.
==============================================

विरारपुढील १५ स्थानकांवर सीसीटीव्ही


  • मुंबई : पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरारपर्यंतच्या सर्व स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही उपलब्ध आहेत. मात्र विरारपुढील स्थानके सीसीटीव्हीपासून उपेक्षितच राहिली होती. पण आता विरारपुढील जवळपास १५ स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने आपल्या ताफ्यात बॅगेज स्कॅनर मशिन आणि डॉग्ज स्क्वॉडही आणले जाणार असल्याचे पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद झा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
    प्रवाशांच्या त्याचबरोबर संशयितांच्या हालचाली टिपण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही बसवले जात आहेत. यात इंटीग्रेटेड सिक्युरिटी सिस्टम अंतर्गतही महत्त्वाच्या स्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत. सध्या चर्चगेट ते विरारपर्यंतच्या सर्व स्थानकांवर जवळपास १ हजार ९0 सीसीटीव्ही असून, यात विरारपुढील स्थानके मात्र अजूनही उपेक्षितच आहेत. आता विरार ते डहाणूबरोबरच डहाणूपुढीलही महत्त्वाच्या अशा एकूण १५ स्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने घेतला आहे. ‘निर्भया निधी’तून प्रत्येक स्थानकावर सीसीटीव्ही बसविण्यात येतील. यात प्रत्येक स्थानकासाठी जवळपास ५0 लाख खर्च येणार असल्याचे झा यांनी सांगितले. 
==============================================

गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी अ‍ॅप


  • जमीर काझी,
    मुंबई- समाजातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांच्या हातात हात घालून सहकार्य करणाऱ्या राज्यभरातील पोलीस मित्रांना आता एक नवे माध्यम मिळाले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्या नावाचे स्वतंत्र मोबाइल अ‍ॅप कार्यान्वित केले आहे.
    पोलिसांना सहकार्य करणाऱ्या नागरिकांना ‘पोलीसमित्र’ म्हणून संबोधले जाते. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ही महत्त्वपूर्ण संकल्पना राज्यभरात राबविली आहे. त्यासाठी पोलीसमित्र हे स्वतंत्र मोबाइल अ‍ॅप बनविण्यात आले आहे. महाराष्ट्र अ‍ॅपचे अ‍ॅडमिन पॅनल ६६६.स्रङ्म’्रूीे्र३१ं.ङ्म१ॅ इथे उपलब्ध आहे. त्याचा लॉग इन आयडी व पासवर्ड ंे्रिल्ल आहे. राज्यातील १० आयुक्तालये व ३५ अधीक्षक कार्यालयांतर्गत प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय नोंदणी व जबाबदारीचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी सर्व घटकप्रमुखांनी त्याबाबत अधिकाधिक माहिती प्रसारित करून नागरिकांना या योजनेत सहभागी करून घेण्याची सूचना महासंचालक दीक्षित यांनी केली आहे.
==============================================

ज्येष्ठ साहित्यिक रा. चिं. ढेरे यांचे निधन


  • पुणे : लोकसंस्कृतीच्या विविध दालनांना संशोधनाच्या प्रतिभेतून स्पर्श करणारे ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे शुक्रवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा छायाचित्रकार मिलिंद ढेरे, मुली ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे, लेखिका वर्षा गजेंद्रगडकर, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
    गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती, अखेर निवासस्थानीच त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय संस्कृतीच्या विविध शाखांचा ‘शोधयात्री’प्रमाणे अविरतपणे धांडोळा घेत, ज्ञानदानाच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या या उपासकाच्या निधनाने साहित्य आणि संशोधन क्षेत्रात शोककळा पसरली. साहित्य, कला, संशोधन आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या इच्छेनुसार कोणतेही विधी न करता त्यांच्या पार्थिवावर दुपारी साडेबारा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
==============================================

इंद्राणीनेच शीनाचा गळा आवळला


  • मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने आपली मुलगी शीनाच्या छातीवर बसून तिचा गळा आवळला. संजीव खन्ना आणि मी इंद्राणीने दिलेल्या सूचनांचे पालन करत होतो, असे इंद्राणी मुखर्जीचा आधीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने दंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या कबुलीजबाबात म्हटले.
    उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या आदेशानुसार विशेष न्यायालयाने शुक्रवारी संजीव खन्ना व अन्य आरोपींना रायचा कबुलीजबाब दिला. २४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची आर्थिक व्यवहारातून हत्या करण्यात आल्याचा सीबीआयचा संशय आहे. मात्र ही हत्या आॅगस्ट २०१५मध्ये रायच्या अटकेमुळे उघडकीस आली. रायकडे परवाना नसलेली बंदूक सापडल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. ही बंदूक इंद्राणीनेच दिल्याचा दावा रायने केला आहे.
==============================================

आषाढी एकादशीनिमित्त ३,३५३ जादा बस


  • मुंबई : पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाने जय्यत तयारी केली आहे. यंदा ३,३५३ जादा बसेस सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतल्याची माहिती देण्यात आली. या बसेस ११ जुलैपासून सोडण्यात येतील.
    ११ ते १७ जुलै या कालखंडात संपन्न होणाऱ्या या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून विभागनिहाय बस सोडण्यात येतील.
    प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी आणि त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध मार्गांवर २४ माहिती केंद्रे स्थापन करण्यात आली चंद्रभागा बस स्थानकातून मुंबई, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रासाठी बसेस सुटतील.
    भीमा बस स्थानकातून मराठवाडा आणि विदर्भासाठी तर विठ्ठल सहकारी साखर कारखाना बस स्थानक खान्देश भागात जाणाऱ्या भाविकांसाठी निर्माण करण्यात आले आहे. याच साखर कारखाना बस स्थानकावर जाण्यासाठी पंढरपूर येथील अहिल्याबाई होळकर चौकातून एसटीची शटल सेवा
    सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाने दिली. 
==============================================

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर खडसेंच्या पाठीत वार झाला नसता - उद्धव ठाकरे


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १ - : माझ्याविरोधात ठरवून कारस्थान केले गेले. पण मी तोंड उघडले तर देश हादरला असता, असे खळबळजनक विधान करणारे भाजपाचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पाठराखण केली आहे.एरवी एकनाथ खडसेंवर तुटून पडणा-या शिवसेनेने आजच्या अग्रलेखातून खडसेंना सहानुभूती दाखवत भाजप नेत्यांना टोले लगावले आहेत. 
    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही भाजपावर टीकास्त्र सोडत 'शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर खडसेंच्या पाठीत हे असे वार झाले नसते. कारण पाठीत वार करण्याची अवलाद शिवसेनेची नाही' असे सांगत खडसेंना सहानुभूती दर्शवली आहे. 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून उद्धव यांनी भाजपावर टीका केली आहे. 
==============================================

भाजपा नेत्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा


  • रांची : ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणी झारखंड भाजपचे अध्यक्ष तला मरांडी यांचा मुलगा मुन्ना मरांडी याच्याविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. मुन्नाने दोन वर्षे आपले लैंगिक शोषण केल्यानंतर दुसऱ्याच मुलीशी लग्न केले, अशी तक्रार दुसऱ्या एका मुलीने गुरुवारी केल्यानंतर याचा भंडाफोड झाला.
    लग्नाचे वचन देऊन मुन्नाने आपल्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. मात्र, त्याने शब्द पाळला नाही, असे या मुलीने गोड्डा जिल्ह्यातील न्यायालयात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मुन्नाने आपल्याला संपर्कात राहण्यासाठी मोबाईल घेऊन दिला होता. त्याने अनेकदा आपला उपभोग घेतला आणि दुसऱ्याच मुलीशी लग्न ठरविले, असा आरोप या मुलीने केला.
    मुन्नाच्या विवाहाची माहिती समजल्यानंतर या मुलीने तक्रार दिली. मुन्नाचा मंगळवारी एका मुलीशी विवाह झाला. ही मुलगी ११ वर्षांची असल्याचे समजते. कायद्यानुसार मुलीचे लग्नाचे वय १८ आहे.
==============================================

‘आप’च्या याचिकेवर सोमवारी सुनावणी


  • नवी दिल्ली : लोकांची कामे करताना दिल्ली सरकारच्या अधिकाराची व्याप्ती किती यासह अन्य विषयांवर दिल्ली उच्च न्यायालयाला निवाडा देण्यास प्रतिबंध करणारा आदेश द्यावा, अशी मागणी करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या (आप) याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सुनावणी घेण्यास शुक्रवारी मान्यता दिली.
    मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ दिल्ली सरकारच्या याचिकेवर सुनावणी घेईल. राज्यांची सरकारे आणि केंद्र सरकार यांचे अधिकार कोणते, हा विषय घटनेनुसार केवळ सर्वोच्च न्यायालयाच्याच कक्षेत येतो, असा दावा दिल्ली सरकारने याचिकेत केला आहे. दिल्ली सरकारची बाजू वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी मांडताना हा विषय तातडीने सुनावणीस घेण्याचा असल्याचे म्हटले. या खंडपीठात न्या. डी. वाय. चंद्रचुड आणि ए. एम. खानविलकर यांचा समावेश आहे. वादग्रस्त विषयावर दिल्ली उच्च न्यायालयाची कार्यकक्षा कोणती यावरील निवाडा होत नाही तोपर्यंत त्याला निकाल देण्यास मनाई करण्यात यावी, असेही इंदिरा जयसिंह म्हणाल्या.
==============================================

आता पडताळणीविना नियुक्तिपत्रे


  • नवी दिल्ली : यशस्वी उमेदवारांची सरकारी नोकरीसाठीची नियुक्तीपत्रे चारित्र्य आणि पूर्वायुष्याच्या पडताळणीसाठी रोखण्यात येणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
    यशस्वी उमेदवारांची नियुक्तीपत्रे देण्यासाठी अडवणूक न करता त्यांना तात्पुरती नियुक्तीपत्रे देण्यात
    येतील; मात्र यासाठी त्यांना स्वत:चे एक घोषणापत्र व अर्ज भरून
    द्यावा लागेल. या नियुक्तीपत्रात
    अनेक गोष्टी स्पष्टपणे लिहिलेल्या असतील.
    उमेदवाराचे चारित्र्य आणि पूर्वायुष्य याबाबत पडताळणी झाली नाही किंवा उमेदवाराच्या स्वत:च्या घोषणापत्रात काही चुकीची
    माहिती दिलेली आढळली, तर नियुक्ती रद्द केली जाईल, तसेच कायद्याने योग्य असेल ती कारवाईही केली जाईल.
    ‘मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स’ हे धोरण दृष्टीसमोर ठेवून, तसेच नागरिक केंद्रिभूत धरून चांगले प्रशासन देण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. त्याचाच हा एक भाग आहे. याबाबतच्या आवश्यक त्या सूचना केंद्र सरकारतर्फे सर्व मंत्रालये, विभाग यांना, तसेच राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश यांच्या प्रशासनांना पाठवण्यात आल्या आहेत. 
==============================================

स्विस बँकांमध्ये पाक नागरिकांचे पैसे जास्त


  • झुरीच : पाकिस्तानी नागरिकांनी स्विस बँकांमध्ये पैसे ठेवण्याचे प्रमाण १६ टक्क्यांनी वाढून १.५ अब्ज फ्रँक्स (१० हजार कोटी रुपयांच्याही वर) झाले आहे. भारतीय नागरिकांनी या बँकांमध्ये ठेवलेल्या पैशांपेक्षाही ही रक्कम जास्त आहे.
    स्वीत्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने (स्वीस नॅशनल बँक) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार २०१५ अखेर पाकिस्तानशी संबंधित पैसा १,५१३ दशलक्ष फ्रँक्स झाला आहे. आधीच्या वर्षी तो १,३०१ अब्ज फ्रँक्स होता. यातील १,४७७ दशलक्ष फ्रँक्स् थेट पाकिस्तानी नागरिकांचे व संस्थांचे आहेत, तर ३६ दशलक्ष फ्रँक्स विश्वस्तांमार्फत किंवा पैशांचे व्यवस्थापन करणाऱ्यांचे आहेत. पाकिस्तानशी संबंधित पैशांमध्ये वाढ होण्याचे हे दुसरे वर्ष आहे. 
==============================================

तैवानचा चीनवर चुकून ‘हल्ला’


  • बीजिंग : चीनमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या ९५ व्या वर्धापनदिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानच्या स्वातंत्र्यास विरोध दर्शविला असतानाच तैवानी युद्धनौकेने चीनच्या दिशेने चुकून एक जहाजभेदी सुपरसोनिक क्षेपणास्त्र सोडले. तैवानचे राष्ट्राध्यक्ष साई इंग वेन हे परदेशात असताना ही घटना घडली. वेंग हे तैवानच्या लष्कराचे सर्वोच्च कमांडरही आहेत.
    स्वदेशी बनावटीचे सिउंग फेंग ३ हे जहाजभेदी क्षेपणास्त्र काउशुंग येथील नौदल तळावरून सोडण्यात आले. हा प्रकार चुकून घडला. आम्ही प्रकरणाची चौकशी करीत आहोत, असे तैवानी नौदलाचे व्हाईस अ‍ॅडमिरल मेई चिया सू यांनी हाँगकाँगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राला सांगितले. या घटनेमुळे चीनचा गैरसमज होण्याची शक्यता आहे काय, असा सवाल केला असता मेई म्हणाले की, नौदलाने घटनेची माहिती तैवानी संरक्षण मंत्रालयाला दिली असून, मंत्रालय आपल्या स्तरावर हा मुद्दा सोडवेल. ३०० कि.मी.पर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राने पेंघू बेटाजवळ समुद्रात कोसळण्यापूर्वी ७५ कि.मी.चे अंतर पार केले. मेई म्हणाले की, तैवानच्या क्षेपणास्त्राने तैवान सामुद्रधुनीचा मध्यभाग ओलांडला नाही. यावरून हे स्पष्ट होते की, क्षेपणास्त्राचे लक्ष्य चीनचा फुजियान प्रांत नव्हता. हा प्रांत सामुद्रधुनीच्या दुसऱ्या बाजूला आहे. चिनचियांग : पीसीजी -६१० गस्ती जहाजाचे ड्रील इन्स्पेक्शन सुरू होते, तेव्हा अधिकाऱ्यांना प्रक्रियेचे पालन न करता आल्याने चुकून क्षेपणास्त्र सुटले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असेही त्यांनी सांगितले. 
==============================================

हज यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सौदीने निवडला ई-ब्रेसलेटचा पर्याय


  • ऑनलाइन लोकमत
    रियाध, दि. 1 - यंदाच्या हज यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना मनगटावर बांधता येणारे इलेक्ट्रॉनिक सेक्युरिटी ब्रेसलेट देण्याचा निर्णय सौदी अरेबियाच्या प्रशासनाने घेतल्याचे वृत्त आहे. गेल्या वर्षी चेंगराचेंगरीमध्ये दोन हजाराहून अधिक हज यात्रेकरू मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर जवळपास 800 कॅमेरे बसवण्यात आले आहेत आणि यात्रेकरूंवर नियंत्रण ठेवता यावं तसंच त्यांची ओळख पटावी यासाठी ई-ब्रेसलेटचा पर्याय निवडण्यात आला आहे. गेल्या वर्षी अनेक मृतांची ओळख देखील पटू शकली नव्हती. ई ब्रेसलेटमुळे तशीच वेळ आल्यास हज यात्रेकरूंची ओळख पटवता येईल अशी बातमी अरब न्यूज व सौदी गॅझेटने दिली आहे.
    सौदी अरेबियाच्या अधिकृत माहितीप्रमाणे गेल्या वर्षीच्या दुर्घटनेत 769 जण मरण पावले होते, परंतु आंतरराष्ट्रीय संस्थांनी हा आकडा 2,297 पेक्षा जास्त असल्याचा अंदाज वर्तवला होता.
    ई-ब्रेसलेट वॉटर प्रूफ आहेत, तसेच ती जीपीएस यंत्रणेला जोडलेली आहेत, तसेच त्या व्यक्तिची सर्व माहितीही त्यात असणार आहे. यामुळे यात्रेकरूंच्या गर्दीचं नियंत्रण करता येईल तसेच ओळख पटवता येईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
==============================================

गोव्यात काजू उत्पादन वाढविण्यासाठी जैविक खताचा वापर

  • First Published :02-July-2016 : 06:38:33

  • पणजी : गोव्यातील काजू उत्पादन स्थिर असल्यामुळे राज्य सरकारने उत्पादन वाढविण्यासाठी आता जैविक खताचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना जैविक खते उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
    राज्याचे कृषी संचालक उल्हास पई काकोड यांनी सांगितले की, यंदा काजू उत्पादक वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. आम्ही शेतकऱ्यांना सबसिडीवर जैविक खत उपलब्ध करून देणार आहोत. उत्पादन वाढविण्यातही त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. राज्यात ५५ हजार हेक्टरवर काजूची शेती आहे.
    काकोड यांनी सांगितले की, यंदा दीड हजार हेक्टर जमिनीवरील काजू बागांना पुरेल एवढे जैविक खत आम्ही उपलब्ध करून देऊ.
    खताचे उत्पादन विभागामार्फतच केले जाईल. कृषी सहकारी
    संस्थांच्या माध्यमातून हे खत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जाईल. लिंबोळी पेंड आणि रॉक फॉस्फेट ही खते प्रामुख्याने शेतकऱ्यांना दिली जातील. राज्यात काजूच्या शेतीत मशागतीचा अभाव आहे. त्यामुळे उत्पादन कमी आहे.
==============================================
मी धर्मगुरुंना घाबरत नाही - इरफान खान

मुंबई - ‘कुर्बानी‘शी संबंधित केलेल्या वक्तव्यावरून अभिनेता इरफान खानने आपण धर्मगुरुंना घाबरत नाही, असे म्हटले आहे.

‘कुर्बानी‘ देण्याच्या नावाखाली प्राण्यांना बळी देण्यावर इरफान खान याने प्रश्न उपस्थित केल्याबद्दल अनेक मुस्लिम धर्मगुरूंनी नाराजी व्यक्त केली आहे. इरफान याने धार्मिक परंपरांचे अर्थ लावत बसण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावे, असे या धर्मगुरूंनी म्हटले आहे. यावर उत्तर देताना इरफानने धर्मगुरुंना घाबरत नसल्याचे सांगत मी धर्माचा ठेका घेतलेल्यांच्या देशात राहत नाही. माझ्या वक्तव्यामुळे जे दुःखी झाले आहेत, ते स्वतःचे आत्मविश्लेषण करण्यास तयार नाहीत किंवा त्यांना निष्कर्षापर्यंत पोहचायचे नाही, असे इरफानने म्हटले आहे.

आगामी ‘मदारी‘ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी झालेल्या कार्यक्रमादरम्यान इरफान याने, कुर्बानी देण्याच्या नावाखाली निष्पाप प्राण्यांना मारून पुण्य मिळते का, असा सवाल उपस्थित केला होता. याबाबत बोलताना येथील काझी खालिद उस्माई म्हणाले, की इरफान हा कलाकार आहे आणि त्याने आपल्या कामाकडेच लक्ष द्यावे. त्याला धर्माचे कोणतेही ज्ञान नाही. त्याने कोणत्या तरी धर्मगुरूशी चर्चा करून थोडे ज्ञान संपादन करावे आणि मगच कुर्बानी अथवा रमजानबद्दल बोलावे. इतर काही धर्मगुरूंनीही इरफानवर टीका केली होती.

==============================================
'इसिस'च्या संशयितांना 'एमआयएम' करणार मदत

हैदराबाद - इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून भारतातून अटक करण्यात आलेल्या युवकांना कायदेशीर लढाई लढण्यासाठी एमआयएम मदत करणार असल्याचे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.

ओवेसी यांनी या युवकांना मदत करण्याचे जाहीर करताना आमच्या पक्षाचे दहशतवादाला समर्थन नसल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आतापर्यंत अनेक जणांना इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी जाण्याच्या व इसिसशी संबंधित असल्याच्या संशयावरून अटक केली आहे. नुकतेच हैदराबादमधून सहा जणांना अटक करण्यात आली होती.

ओवेसी म्हणाले की, माझी अल्लाकडे दुवा आहे त्यांनी इसिसमधील दहशतवाद्यांची मानसिकता नष्ट करावी. अटकेत असलेल्या युवकांच्या कुटुंबीयांशी मी संवाद साधला आहे, ते सर्व निर्दोष आहेत. एका वरिष्ठ वकिलामार्फत आमचा पक्ष या युवकांना कायदेशीर मदत करणार आहे. उद्या हे युवक निर्दोष निघाले, तर यांचे आयुष्य कोण परत आणून देणार आहे. दहशतवादाचे समर्थन आम्ही करतच नाही. भारतावर हल्ला करण्यासाठी कोण आले, तर आम्ही त्यांच्यासमोर उभे राहू. 

==============================================
ढाक्यात ओलिसनाट्य संपुष्टात;6 दहशतवादी ठार
-


ढाका - बांगलादेशची राजधानी ढाका शहरातील गुलशन परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये गेल्या 13 तासांपासून सुरु असलेले ओलिसनाट्य संपुष्टात आले आहे. बांगलादेश कमांडोंनी कारवाई करत 6 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या 18 जणांची सुटका सुखरुप सुटका करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांनी आपले कर्तव्य चोख पार पाडल्याचे, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले आहे.

ढाक्यातील होली आर्टिसन बेकरी या रेस्टॉरंटमध्ये दहशतवाद्यांनी परदेशी नागरिकांसह 18 जणांना ओलिस ठेवले आहे. यात एका भारतीय नागरिकासह जपान, अर्जेंटिना, इटली या देशांतील नागरिकांचाही समावेश होता. दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू झालाआहे. इस्लामिक स्टेटच्या (इसिस) दहशतवाद्यांकडून हा हल्ला घडविण्यात आला आहे.
==============================================

No comments: