[राष्ट्रीय]
१- अमिताभ बच्चन यांनी झाडू मारावा : अमर सिंहांचा घणाघात
२- आशियातील सर्वात मोठा वाघ बेपत्ता, 'जय'च्या शोधासाठी 100 जणांची टीम
३- भाजपा नेत्याने मायावतींची तुलना केली शरीर विक्रय करणाऱ्या महिलांशी
४- दलित मारहाणीवर चर्चा सुरु असताना राहुल गांधी झोपले
५- आठ हजार कर्जदारांकडे 76 हजार कोटीची थकीत कर्जे
६- भुतांमुळे शेतकरी आत्महत्या करतात- भूपेंद्र सिंह
७- निवृत्तीसाठी भारत सर्वांत वाईट:जागतिक अहवाल
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, राणे आणि धनंजय मुंडे चेकमेट
९- ऐश्वर्य हा स्मिताचा मुलगा, माझा नाही - जयदेव ठाकरे
१०- सरकारने आंबेडकर भवनमध्ये हस्तक्षेप करु नये, अडथळा आणू नये - कॉम्रेड भालचंद्र कांगो.
११- मुंबईतील पाणीकपात मागे, स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय
१२- औरंगाबाद - बालगृहातून घरी घेऊन गेलेल्या ९ वर्षाच्या चिमुकलीची विक्री
१३- शॉर्टसर्कीटमुळे ठाणे महापालिका इमारतीमध्ये आग
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- माहूर; मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे सासरच्यांनी सुनेला अंधारात डांबलं
१५- औरंगाबाद; टेम्पो नदीत कोसळून तिघांचा मृत्यू
१६- नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलाची हत्या
१७- हैदराबादमध्ये कुत्र्याच्या 3 पिलांना जीवंत जाळले
१८- पहिल्या हॉलिवूडपटात दीपिकाची वेगळी झलक
१९- वर्धा - मंगरूळ गावात काल जादुटोण्याच्या संशयावरून पुरुषांची नग्न धिंड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- मिसेस मुख्यमंत्र्यांचं पुन्हा मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन
२१- कर्णधार स्मिथनं टिपला अफलातून झेल, यष्टीरक्षकही हैराण!
२२- 'कबाली'ची ऑनलाइन कॉपी लिक झाली नसल्याचा निर्मात्यांचा दावा
२३- चेन्नई, बंगळुरुत 'कबाली'साठी कंपन्यांकडून सुट्टी जाहीर !
२४- भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार मोहम्मद शाहीद यांचं निधन
२५- 'या' म्युझिक व्हिडीओमुळे कंदील बलोचची हत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा
===========================================

अमरावतीच्या जिल्ह्यातील कुऱ्हा गावातील जयश्री कुराडे हिचं माहूर गावातल्या सुरेश दुधे यांच्याशी लग्न झालं होतं. तीन वर्षांपूर्वी सुरेश दुधे कुऱ्हा म्हणजे आपल्या सासरी काही कामानिमित्त आले होते. तिथून यवतमाळला परतताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
ही दुर्घटना जयश्रीच्या घरातल्या (माहेरच्या) लोकांमुळेच झाली, असा आरोप सासरच्या मंडळींनी केला. तेव्हापासून सासरच्यांनी छळ सुरु केल्याचा आरोप जयश्री कुराडे हिनं केला आहे.
छळामागे पतीच्या नावे असलेल्या 13 एकर जमिनीचा हव्यासही कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी सासरच्या मंडळींची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

यापूर्वी मिसेस मुख्यमंत्रींनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्यावर आधारित ‘संघर्षयात्रा’ या चित्रपटात पार्श्वगायन केलं होतं. मात्र तो अद्याप प्रदर्शित होऊ शकलेला नाही. त्याचप्रमाणे ‘जय गंगाजल’ या प्रकाश झा यांच्या चित्रपटातही त्यांचा गाता गळा ऐकायला मिळाला होता.
विश्वविधात श्रीपाद श्रीवल्लभ हा सिनेमा दत्तगुरु यांचा कलियुगातील पहिला अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यावर आधारित आ. या चित्रपटाची निर्मिती ‘के पवार फिल्म्स’ करणार आहे. तर लेखन, दिग्दर्शनाची धुरा कैलास पवार यांच्या खांद्यावर असेल.

काविळ आणि डेंग्यूची लागण झाल्यामुळे त्यांची महिन्याभरापासून मृत्यूशी झुंज सुरु होती. वाराणसीतील रुग्णालयातून त्यांची रवानगी गुरगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती.
1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या भारतीय हॉकी संघात शाहीद होते. 1984 आणि 1988 च्या ऑलिम्पिकमधील हॉकी संघाचं नेतृत्वही त्यांनी केलं होतं.

मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, राणे आणि धनंजय मुंडे चेकमेट
मुंबई: कोपर्डी बलात्कारप्रकरणी विरोधीपक्षांनी मुख्यमंत्री आणि सरकारला घेरल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्याच त्वेषाने विरोधकांचं जाळं भेदलं. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना चेकमेट, तर काँग्रेस नेते नारायण राणे यांचं अक्षरश: वस्त्रहरण केलं.
मी एकटा मुख्यमंत्री
नारायण राणे म्हणतात राज्यात एक नव्हे तर तीन मुख्यमंत्री. पण मी राणेसाहेबांना सांगू इच्छितो, तीन मुख्यमंत्र्यांची सवय तुम्हाला असेल. मी एकटाच मुख्यमंत्री आहे, आणि सक्षम आहे, असं रोखठोक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.
कालच चर्चेदरम्यान राणेंनी राज्यात तीन मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं होतं. एक देवेंद्र फडणवीस, दुसरे प्रवीण परदेशी आणि तिसरा वेळ आल्यावर सांगू असं म्हटलं होतं. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.
===========================================
मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे सासरच्यांनी सुनेला अंधारात डांबलं
अमरावती : मुलाच्या अपघाती निधनानंतर सुनेला वर्षभर अंधार कोठडीत डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूरमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे.
अमरावतीच्या जिल्ह्यातील कुऱ्हा गावातील जयश्री कुराडे हिचं माहूर गावातल्या सुरेश दुधे यांच्याशी लग्न झालं होतं. तीन वर्षांपूर्वी सुरेश दुधे कुऱ्हा म्हणजे आपल्या सासरी काही कामानिमित्त आले होते. तिथून यवतमाळला परतताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
ही दुर्घटना जयश्रीच्या घरातल्या (माहेरच्या) लोकांमुळेच झाली, असा आरोप सासरच्या मंडळींनी केला. तेव्हापासून सासरच्यांनी छळ सुरु केल्याचा आरोप जयश्री कुराडे हिनं केला आहे.
छळामागे पतीच्या नावे असलेल्या 13 एकर जमिनीचा हव्यासही कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी सासरच्या मंडळींची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
===========================================
मिसेस मुख्यमंत्र्यांचं पुन्हा मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चित्रपटासाठी पार्श्वगायन करत आहेत. ‘विश्वविधात श्रीपाद श्रीवल्लभ’ या चित्रपटामध्ये त्यांच्या आवाजातील गाणं ऐकायला मिळणार आहे.
यापूर्वी मिसेस मुख्यमंत्रींनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्यावर आधारित ‘संघर्षयात्रा’ या चित्रपटात पार्श्वगायन केलं होतं. मात्र तो अद्याप प्रदर्शित होऊ शकलेला नाही. त्याचप्रमाणे ‘जय गंगाजल’ या प्रकाश झा यांच्या चित्रपटातही त्यांचा गाता गळा ऐकायला मिळाला होता.
विश्वविधात श्रीपाद श्रीवल्लभ हा सिनेमा दत्तगुरु यांचा कलियुगातील पहिला अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यावर आधारित आ. या चित्रपटाची निर्मिती ‘के पवार फिल्म्स’ करणार आहे. तर लेखन, दिग्दर्शनाची धुरा कैलास पवार यांच्या खांद्यावर असेल.
===========================================
टेम्पो नदीत कोसळून तिघांचा मृत्यू
औरंगाबादः सिल्लोड-औरंगाबाद रस्त्यावर भीषण अपघात घडला. जळगाव रोड वरील पाल फाट्याजवळील गिरजा नदीत टेम्पो कोसळून 3 ठार तर तीस जण जखमी झाले आहेत.
या अपघातात तीन ते चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्वजण पैठण, शेवगाव तालुक्यातील विजयपुरी येथील रहिवासी आहेत. सर्व प्रवासी गुरुपौर्णिमेनिमित्त आमसारी येथील कृष्णा गिरी महाराज यांच्या दर्शनासाठी गेले होते. पाल फाट्या जवळ परत येताना ही दुर्घटना घडली.
अपघात कसा झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र अपघात भीषण असल्याचं सांगितलं जात आहे. काह जणांना नदीतून बाहेर काढण्यात आलं आहे, तर काही प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
===========================================
अमिताभ बच्चन यांनी झाडू मारावा : अमर सिंहांचा घणाघात
नवी दिल्ली : राज्यसभा खासदार अमरसिंह यांनी पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
मोदी सरकारनं अमिताभ यांना स्वच्छता दूत बनवल्यानं त्यांनी शूटिंग वगैरे सोडून जन्मठिकाण असलेल्या अलाहाबाद आणि मोदींच्या वाराणसीमध्ये झाडू मारावा, असा घणाघात अमर सिंहांनी केला.
कर्णधार स्मिथनं टिपला अफलातून झेल, यष्टीरक्षकही हैराण!
===========================================

कोलंबो (श्रीलंका): श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या आस्ट्रेलियन संघ सध्या तीन दिवसीय सराव सामना खेळण्यात व्यस्त आहे. पण या सामन्यातील एका कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथनं एक अफलातून झेल घेतला ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
स्टिव्ह ऑफिकच्या गोलंदाजीवर कर्णधार स्मिथ हा स्लिपमध्ये उभा होता. मात्र, फलंदाजानं स्विप शॉट खेळताच कर्णधार स्मिथ उलट्या दिशेने धावत जाऊन शानदार झेल टिपला. या कॅचमुळे फक्त उपस्थित प्रेक्षकच नव्हे तर विकेटकिपर पीटर नेविल देखील हैराण झाला.
===========================================
'कबाली'ची ऑनलाइन कॉपी लिक झाली नसल्याचा निर्मात्यांचा दावा
चेन्नई: नुकतेच रिलीज झालेल्या सुल्तान, उडता पंजाबसहित इतर अनेक चित्रपटांची कॉपी चित्रपट प्रदर्शनाआधीच लीक झाल्याने त्या चित्रपटांच्या कमाईवर परिणाम झाल्याचे बोलले जात होते. याच यादीत सुपरस्टार रजनीकांतचा अपकमिंग चित्रपट ‘कबाली’चाही समावेश झाल्याने अनेकांना कलेक्शनची चिंता सतावू लागली.
पण चाहत्यांच्या चिंतेवर फुंकर घालण्याचे काम निर्मात्यांनी केले आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची कॉपी लिक झाली नसल्याचा दावा केला आहे.
रजनीकांतचा ‘कबाली’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. पण रिलीज होण्याआधीच याची कॉपी लिक झाल्याने अनेकांना कलेक्शनची चिंता सतावत होती.
चित्रपटाशी संबंधीत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाची कॉपी लिक होणे ही फक्त अफवा असून, यासाठी चित्रपटाचे निर्माते कलईपुली एस. थानू आधिकृत स्पष्टीकरण देऊ शकतात.
पण रजनीकांतच्या या चित्रपटाची 30 मिनिटाची कॉपी लिक झाल्याने अनेक चाहते नाराज झाले होते.
पा. रंजीत यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटात राधिका आपटे, धंसिका, दिनेश, कलायरसन, ऋतविका आणि विंस्टन चाओ आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
‘कबाली’ चित्रपटात रजनीकांत एका डॉनची भूमिका साकार करीत असून, त्याने मलेशियातील तमिळ लोकांच्या समान वेतनाच्या हक्कसाठी सुरु केलेल्या अंदोलनावर या चित्रपटाची कथा अधारित आहे.
===========================================
भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार मोहम्मद शाहीद यांचं निधन
नवी दिल्ली : माजी हॉकीस्टार मोहम्मद शाहीद यांचं वयाच्या 56 व्या वर्षी निधन झालं. यकृत आणि किडनीच्या आजारपणातून गुरगावच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
काविळ आणि डेंग्यूची लागण झाल्यामुळे त्यांची महिन्याभरापासून मृत्यूशी झुंज सुरु होती. वाराणसीतील रुग्णालयातून त्यांची रवानगी गुरगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती.
केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी गेल्याच आठवड्यात शाहीद यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यांच्या उपचारांसाठी दहा लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली होती. मोहम्मद शाहीद रेल्वेच्या सेवेत कार्यरत होते.
1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या भारतीय हॉकी संघात शाहीद होते. 1984 आणि 1988 च्या ऑलिम्पिकमधील हॉकी संघाचं नेतृत्वही त्यांनी केलं होतं.
हॉकी विश्वात शाहिद यांचं स्टीकवर्क आणि ड्रिब्लिंगसाठी मोठं नाव होतं. शाहीद यांच्या नेतृत्वात 1982 आणि 1986 च्या आशियाई खेळात रौप्य आणि कांस्यपदकी पटकावलं होतं. 1981 साली अर्जुन पुरस्कारानेही शाहीद यांचा गौरव करण्यात आला होता, तर 1986 मध्ये पद्मश्रीने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
===========================================
चेन्नई, बंगळुरुत 'कबाली'साठी कंपन्यांकडून सुट्टी जाहीर !
चेन्नई : सुपरस्टार रजनीकांतचा बहुप्रतिक्षीत कबाली हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. प्रदर्शनाआधीच या सिनेमाने अनेक विक्रम केले आहेत. त्यातच आता नवा विक्रम होण्याची शक्यता आहे.
कारण चेन्नई आणि बंगळुरुतील अनेक कंपन्यांनी ‘कबाली’च्या प्रदर्शनादिवशी म्हणजेच 22 जुलैला सुट्टीच जाहीर केली आहे.
दक्षिण भारतीय सिनेमांमध्ये रजनीकांत जे काही करेल, ती स्टाईल होऊन जाते. टॉलिवूडमध्ये रजनीकांतला अक्षरश: देवाचं स्थान आहे. त्यामुळेच चाहते रजनीकांतच्या आगामी कबाली सिनेमाची अक्षरश: चातकाप्रमाणे वाट पाहात आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी 22 जुलैला सुट्टीच जाहीर केली आहे.
आजारपणाची सुट्टी, किरकोळ रजा यासारखी कारणं देत अनेकांनी सुट्ट्या टाकल्या होत्या. मात्र त्याचं प्रमाण वाढत असल्यामुळे, कंपन्यांनी त्या दिवशी सुट्टीच जाहीर केली.
कबालीच्या प्रदर्शनादिवशी कर्मचारी दांड्या मारुन फोन स्विच ऑफ ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमच्या कंपनीने थेट सुट्टीच जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसप्रमाणे कबाली बोनस म्हणून ही सुट्टी देण्यात आली आहे, असं ओपस वॉटरप्रूफिंग कंपनीचे प्रमुख मनोज पुष्पराज यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितलं.
===========================================
आशियातील सर्वात मोठा वाघ बेपत्ता, 'जय'च्या शोधासाठी 100 जणांची टीम
नागपूर : नागपूरच्या उमरेड अभयारण्याची ओळख बनलेला जय हा तरणाबांड वाघ 18 एप्रिलपासून बेपत्ता आहे. त्याला शोधण्यासाठी 100 हून अधिक स्वयंसेवकांनी मोहीम राबवली आहे.
जय : आशियातील सर्वात मोठा वाघ
आशियातील सर्वात मोठा वाघ अशी जयची ओळख आहे. तब्बल 250 किलो वजन असलेला हा तरणाबांड वाघ या अभयारण्याची ओळख बनला होता. कित्येकदा पर्यटक या वाघाची एक झलक पाहण्यासाठी उमरेडला भेट द्यायचे. मात्र अचानक हा वाघ गायब झाल्याने वन्यप्रेमींच्या काळजीत भर पडली आहे.
तीन वर्षांपूर्वी जोडीदाराच्या शोधात जय उमरेडमध्ये
जोडीदाराच्या शोधात तीन वर्षांपूर्वी जय नद्या, शेत, इतकंच नाही तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा 100 किमी प्रवास करुन उमरेड अभयारण्यात आला होता. यानंतर तो सगळ्यांचा आवडता वाघ बनला. मात्र सहा वर्षांचा हा वाघ 18 एप्रिलपासून बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी वन्यप्रेमी, फोटोग्राफर्स, स्वयंसेवक तसंच गाईड यांनी जयच्या शोधासाठी मोहीम राबवली आहे.
350 गावांमध्ये जयचा शोध
हे स्वयंसेवक शेजारच्या 350 गावांमध्ये जयचा शोध घेणार आहेत. वर्धा, चंद्रपूर तसंच ज्या ठिकाणाहून जय आला त्या नागझिरा नवेगाव टायगर रिझर्व्ह हे स्वयंसेवक पिंजून काढणार आहेत. अभयारण्यात वाघांची गणना करण्यासाठी गळ्यात रेडिओ कॉलर बसवण्यात येतं. मात्र ते यंत्रही बंद पडल्यामुळे जयला शोधण्यात सध्या अडचणी येत आहेत.
जय मागील वर्षीही दोन महिन्यांसाठी गायब झाला होता, अशी माहिती वनअधिकारी रोहित कारु यांनी दिली.
===========================================
'या' म्युझिक व्हिडीओमुळे कंदील बलोचची हत्या
लाहोर : सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचच्या हत्येमुळे अनेक जण अद्याप सावरले नाहीत. कंदीलचा भाऊ वासिमनेच तिची गोळ्या घालून हत्या केली. कुटुंबाची प्रतिष्ठेसाठी भावाने कंदीलची हत्या केल्याचं समजतं.
विविध कारणांमुळे कंदीलची हत्या झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यापैकी एक कारण म्हणजे म्युझिक व्हिडीओ. 7 जुलै रोजी कंदीलचा ‘बॅन’ हा वादग्रस्त व्हिडीओ यू ट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतरच वासीमने कंदीलाचा खून केल्याचं समजतं.
पाहा व्हिडीओ
===========================================
नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलाची हत्या
नवी मुंबई : नवी मुंबईत प्रेमप्रकरणातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली आहे. स्वप्निल सोनावणे असं मृत मुलाचं नाव आहे. नेरुळच्या सेक्टर 13 मध्ये ही घटना घडली.
मुलगा आणि मुलगी पहिलीपासून एकाच वर्गात होते. त्यामुळे दोघांची मैत्री होती. मात्र मुलीच्या घरच्यांना ही मैत्री मान्य नसल्याने कुटुंबीयांनी स्वप्निलला घरी बोलवून घेतलं आणि जबर मारहाण केली.
यानंतर उपचारासाठी स्वप्निलला डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय.
===========================================
ऐश्वर्य हा स्मिताचा मुलगा, माझा नाही - जयदेव ठाकरे
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २० - मी ऐश्वर्यचा पिता नाही, ऐश्वर्य हा स्मिता ठाकरेंचा मुलगा आहे असे आज जयदेव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीवरुन वाद सुरु असून या प्रकरणाची सुनावणी सध्या उच्च न्यायालयात सुरु आहे.जयदेव ठाकरे यांनी न्यायालयाला ऐश्वर्य आपला मुलगा नसल्याचे सांगितले. बाळासाहेबांनी त्याला वारस केले असून, मातोश्रीत पहिला मजला दिला आहे. स्मिता ठाकरे ही जयदेव ठाकरे यांची पूर्वपत्नी आहे. दोघांचा घटस्फोट झाला आहे.आणखी वाचास्मिता ठाकरे यांना राजकारणात पूर्वीपासून रस होता. मात्र, माँसाहेब गेल्यानंतर त्यांना राजकारणाची अधिक ओढ लागली. मात्र, बाळासाहेबांना हे पटत नव्हते, असे जयदेव यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीसंदर्भातील उलटतपासणीत सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांनी षड्यंत्र करून आपले नाव रेशन कार्डवरून हटवले, असा आरोपही जयदेव यांनी उच्च न्यायालयात केला.बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवरून जयदेव व उद्धव यांच्यात वाद सुरू झाला. जयदेव यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यावरील सुनावणी न्या. गौतम पटेल यांच्यापुढे होती. उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील रोहित कपाडिया यांनी जयदेव यांची उलटतपासणी घेतली. दुसऱ्या दिवशी जयदेव यांना सुमारे ८० प्रश्न विचारण्यात आले.‘जाहीर सभांमध्ये जवळच्या व्यक्तीवर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करावी लागते. बाळासाहेब त्यांच्या निकटवर्तीयांवर अशीच टीका करायचे आणि रात्री सगळे एकत्र यायचे. हे मला पटत नसल्याने मी राजकारणापासून दूर राहिलो,’ असे जयदेव यांनी स्पष्ट केले.
===========================================
धक्कादायक - भाजपा नेत्याने मायावतींची तुलना केली शरीर विक्रय करणाऱ्या महिलांशी
- ऑनलाइन लोकमतलखनौ, दि. 20 - भाजपाचे उत्तर प्रदेशमधील उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी मायावतींची तुलना शरीर विक्रय करणाऱ्या महिलांशी केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लवकरच निवडणुका होणार असून वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मायावती पैसे घेऊन तिकिटं वाटत असल्याचा आरोप दयाशंकर सिंह यांनी केला आहे. सकाळी एक कोटी रुपये देणाऱ्याला तिकिट दिलं जातं, दुपारी एखादा दोन कोटी घेऊन आला, तर त्याला तिकिट दिलं जातं आणि संध्याकाळी तीन कोटी रुपये देणारा मिळाला तर आधीच्यांचे पत्ते कापून तिसऱ्याला तिकिट दिलं जातं असं सिंह यांनी म्हटलं आहे. यापुढे जात आजच्या घडीला मायावतींची अवस्था शरीर विक्रय करणाऱ्या महिलांएवढी वाईट झाल्याचा शेराही त्यांनी लगावला आहे.मायावतींनी या वक्तव्याकडे भाजपाची पराभूत स्थिती या दृष्टीने बघितले आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीची वाढती ताकद आणि असलेला जनाधार बघून भाजपाच्या नेत्यांची अवस्था सैरभैर झाली असल्यामुळे अशी भाषा वापरली जात असल्याचे मायावती म्हणाल्या आहेत.दरम्यान, दयाशंकर सिंह काय म्हणाले आपण ऐकलं नसून, त्यांनी जर काही आक्षेपार्ह विधान केलं असेल तर त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशमधील भाजपा अध्यक्ष केशव मौर्य यांनी दिली आहे.
===========================================
दलित मारहाणीवर चर्चा सुरु असताना राहुल गांधी झोपले
- नवी दिल्ली, दि. २० - गुजरातच्या उनामध्ये चार दलित युवकांना झालेल्या मारहाणीचा मुद्यावरुन काँग्रेसने आज लोकसभेमध्ये सत्ताधा-यांना धारेवर धरले. मात्र हा मुद्दा उपस्थित करणा-या काँग्रेसची चांगलीच पंचाईत झाली. कारण या महत्वाच्या विषयावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह बोलत असताना राहुल गांधी चक्क डुलक्या घेत होते.राहुल गांधींच्या या डुलक्या कॅमे-याने टिपल्या. राजनाथ सिंह यांचे भाषण चालू असताना काँग्रेसचे खासदार विरोध करत होते. घोषणाबाजी सुरु होती. त्यावेळी राहुल गांधी झोपले होते. कॅमे-यांनी हे दृश्य टिपले. राहुल गांधी उद्या उन्नाला भेट देणार आहेत.
===========================================
हैदराबाद- एका मुलांच्या गटाने तीन कुत्र्यांच्या पिलांना जीवंत जाळले असून संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून शेअर केला आहे.
हैदराबादमधील मुशिराबाद भागात असलेल्या एक मिनार मशिदीजवळ ही घटना घडली आहे. परिसरातील काही मुलांनी शनिवारी (ता. 16) सायंकाळी तीन कुत्र्यांच्या पिलांना जिवंत जाळले. शिवाय, कुत्र्याची पिले जळत असताना व्हिडिओ शुटींग केले. संबंधित व्हिडिओ बुधवारी फेसबुकवर अपलोड करण्यात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. प्राणी मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
पाच मुलांनी एका ठिकाणी लाकडे व इतर वस्तू गोळा करून जाळ तयार केला होता. या जाळामध्ये तीन कुत्र्यांच्या पिलांना टाकले. जाळामधून पिले बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, ही मुले काठीच्या सहाय्याने जाळात ढकलत होते. तिन्ही पिलांचा जळून मृत्यू झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दरम्यान, याबाबत गुन्हा दाखल झाला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. व्हिडिओमध्ये दिसत असलेली मुले अल्पवयीन असल्याचे दिसत आहेत. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे, असे पोलिस अधिकारी बी. रविकुमार रेड्डी यांनी सांगितले.
हैदराबादमध्ये कुत्र्याच्या 3 पिलांना जीवंत जाळले
| |
-

नवी दिल्ली - देशातील 8,167 कर्जबुडव्यांकडे (विलफुल डिफॉल्टर्स) बॅंकांचे 76 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकीत असून त्यापैकी 1700 पेक्षा अधिक व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिली. तसेच बॅंकांना कर्जवसुलीसाठी अतिरिक्त अधिकार मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्जवसुलीच्या समस्येचा सामना करण्यासाठी सरकारने नवे विधेयक तयार केले आहे. संबंधित विधेयक संसदेत सादर करण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये 8,167 विलफुल डिफॉल्टर्सकडे 76,685 कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते व 1724 कर्जदारांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर 2014-15 या आर्थिक वर्षात ही संख्या 7,031 होती व थकित कर्जाची रक्कम 59,656 कोटी रुपयांची होती.
8 हजार कर्जदारांकडे 76 हजार कोटीची थकीत कर्जे
| |
-
| |
कर्जवसुलीच्या समस्येचा सामना करण्यासाठी सरकारने नवे विधेयक तयार केले आहे. संबंधित विधेयक संसदेत सादर करण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये 8,167 विलफुल डिफॉल्टर्सकडे 76,685 कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते व 1724 कर्जदारांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर 2014-15 या आर्थिक वर्षात ही संख्या 7,031 होती व थकित कर्जाची रक्कम 59,656 कोटी रुपयांची होती.
===========================================
भोपाळ (मध्यप्रदेश)- पिक समाधानकारक न आल्यामुळे नाही तर भूत व प्रेतांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, असा दावा गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी आज (बुधवार) विधानसभेत केला.
मध्यप्रदेशात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधानसभेत कॉंग्रेसचे आमदार शैलेंद्र पटेल यांनी शेतकरी आत्महत्येबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना भूपेंद्र सिंह म्हणाले, ‘पिक समाधानकारक न आल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत नाहीत तर भूत व प्रेतांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत.‘
भूपेंद्र सिंह यांच्या उत्तरानंतर विधानसभेत आमदारांनी मोठा गोंधळ सुरू केला. गृहमंत्र्यांच्या उत्तरानंतर आमदार राजेंद्र पांडे म्हणाले, सरकार भूत व प्रेतांवर विश्वास ठेवत आहे काय? यावर भूपेंद्र सिंह म्हणाले, मध्यप्रदेशातील काही ग्रामिण भागात भूत उतरविले जाते. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आमदारांना गोंधळ सुरूच ठेवला. अखेर, विधानसभा अध्यक्षांना काही काळासाठी कामकाज स्थगित केले.
भुतांमुळे शेतकरी आत्महत्या करतात- भूपेंद्र सिंह

पहिल्या हॉलिवूडपटात दीपिकाची वेगळी झलक
| |
-
| |
मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या हॉलिवूडमध्ये पदार्पणातील ‘XXX: द रिटर्न ऑफ झँडर केज‘ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. दीपिकाचा हॉट अवतार या ट्रेलरमध्ये दिसत असून, या ट्रेलरमुळे पुन्हा एकदा दीपिका चर्चेत आली आहे.
दिपिकाच्या वेगळ्या अभिनयाची झलक या ट्रेलरमध्ये दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. दीपिकाचा हा पहिलावहिला हॉलिवूड चित्रपट नवीन वर्षाच्या सुरवातीला हा प्रदर्शित होणार आहे. दीपिका सेरेनेाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर ४८ वर्षीय विन डीजेल हा झँडर केज या नायकाची भूमिका साकारणार आहे. कॅनडामध्ये या चित्रपटाचं शूटिंग झालं आहे.
===========================================
नवी दिल्ली - भारतातील नोकरीतून निवृत्त झालेल्या व्यक्तींचे आयुष्य इतर देशांच्या तुलनेत सर्वात बिकट असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे. नॅटिक्सिस ग्लोबल ऍसेट मॅनेजमेंटच्या चौथ्या जागतिक निवृत्ती निर्देशांकात (जीआरआय) भारताला शेवटच्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे.
जगातील एकूण 43 देशांतील निवृत्त व्यक्तींच्या जीवनमानाचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये 34 देश हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्गीकृत केलेले प्रगत देश, आर्थिक सहयोग व विकास संघटनेचे (ओईसीडी) सदस्य असलेले पाच देश तर ब्रिक्स संघटनेतील चार देशांचा समावेश होता. निर्देशांकात देशाचे स्थान ठरविण्यासाठी त्या देशातील पाच वर्षांचा मुलभूत व्याजदर आणि महागाईच्या सरासरीचा अभ्यास करण्यात आला.
निवृत्तीसाठी भारत सर्वांत वाईट:जागतिक अहवाल
| |
-
| |
जगातील एकूण 43 देशांतील निवृत्त व्यक्तींच्या जीवनमानाचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये 34 देश हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्गीकृत केलेले प्रगत देश, आर्थिक सहयोग व विकास संघटनेचे (ओईसीडी) सदस्य असलेले पाच देश तर ब्रिक्स संघटनेतील चार देशांचा समावेश होता. निर्देशांकात देशाचे स्थान ठरविण्यासाठी त्या देशातील पाच वर्षांचा मुलभूत व्याजदर आणि महागाईच्या सरासरीचा अभ्यास करण्यात आला.
===========================================

No comments:
Post a Comment